Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

गुद्द्वारात हवा सोडली; कामगाराचा मृत्यू

$
0
0

कोल्हापूर:

एखाद्याची मस्करी करणे किती महागात पडू शकते हे कोल्हापूरमधील एका थरारक घटनेतून दिसून आलं आहे. एका कामगाराने मस्करीत दुसऱ्या कामगाराच्या गुद्द्वारात हवा सोडल्याने त्या कामगाराचा पोट फुगून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

कोल्हापूरच्या अतिग्रे येथील फॉन्ड्री गावातील एका फॅक्ट्रीत ३ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. कामावरून घरी जात असताना कारखान्यातील धातूचे कण अंगावर चिकटलेले असतात, ते काढण्यासाठी एका पंपाद्वारे कामगारांच्या अंगावर हवा मारली जाते. ३ सप्टेंबर रोजी आदित्य जाधवच्या अंगावरील धातूचे कण काढण्यासाठी सुपरवायझरने त्याच्या अंगावर हवा मारण्यास सुरुवात केली. मस्करी करता करता त्याने आदित्यच्या गुद्द्वारात ही हवा सोडली. त्यामुळे आदित्य जागीच कोसळला आणि पोट फुगल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर सुपरवायझरने तिथून पळ काढला असून तो अजूनही गायब आहे.

फॅक्ट्रीत बेशुद्ध पडलेल्या आदित्यला इतर कामगारांनी तातडीने इचलकरंजीतील खासगी दवाखान्यात दाखल केले. परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला कोल्हापूरला हलविण्यात आले. मात्र कोल्हापूर येथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आदित्य आजारी नसतानाही त्याचा अचानक मृत्यू झाल्याने त्याच्या घरच्यांचा संशय बळावला. त्यामुळे त्यांनी फॅक्ट्रीतील सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याची मागणी केली असता त्यातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेतले असून फरार सुपरवायझरचा शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सणासुदीच्या काळात स्वाईन फ्लूचा कहर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी गर्दी वाढत असून शहरात बाहेरून येणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. शहराला डेंगी पाठोपाठ स्वाईन फ्लूचा धोका वाढला असून गेल्या दोन आठवड्यात स्वाईन फ्लूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या नऊवर पोहचली आहे. तर शहरातील सीपीआरसह खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लू सदृश २९ रुग्ण उपचार घेत आहेत.

गेल्या तीन महिन्यात डेंगीने शहराला हैराण केले होते. जानेवारी महिन्यापासून डेंगीसदृश्य रुग्णसंख्या १२६६ पेक्षा अधिक आहे. डेंगीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना होत असताना आता स्वाईन फ्लूने डोके वर काढले आहे. स्वाईन फ्लू सदृश रुग्णांच्या संख्येत वाढ होवू लागली. बदलते हवामान, ऊन-पाऊस असा बदल होत राहिल्याने स्वाईन फ्लूचा धोका अधिक वाढला आहे. गणेशोत्सवकाळात शहराबाहेरून येणाऱ्या भाविकांत वाढ झाल्यामुळे स्वाईन फ्लू सदृश संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शहरात साधारणपणे २०१० पासून स्वाईन फ्लूचा धोका वाढला आहे. मागील वर्षी स्वाईन फ्लूने दगावलेल्या रुग्णांची संख्या ६३ होती. यंदाही स्वाईन फ्लू सदृश रुग्णसंख्येत वाढ होत आहे. जुलैअखेर स्वाईन फ्लूची तीव्रता कमी वाटत होती. ऑगस्ट महिन्यात वातावरणातील बदलांमुळे स्वाईन फ्लूचा जोर वाढला. गेल्या दहा दिवसांत स्वाईन फ्लूमुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

सीपीआरमध्ये स्वतंत्र कक्ष

स्वाईन फ्लूवरील उपचारासाठी सीपीआरमध्ये सुसज्ज असा १८ बेड्सचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये रुग्णांची रक्त तपासणी, स्क्रीनिंग, एक्सरे व सर्व औषधोपचार केले जातात.

अशी घ्या काळजी ...

गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे

खोकताना तोंडावर रुमाल धरावा

सकस आहार, पुरेशी विश्रांती घ्यावी

तत्काळ उपचारास प्राधान्य द्यावे.

यांना अधिक धोका

स्वाईन फ्लूशी लढताना रुग्णाची प्रतिकारशक्ती महत्वाची ठरते. रुग्णाला हृदयविकार, मधुमेह, किडनीचे विकार असतील स्वाईन फ्लूशी लढणे जिकीरीचे जाते. गरोदर स्त्रिया व वृद्धांनी देखील विशेषतः काळजी घेणे गरजेचे आहे.


जिल्ह्यासह शहरातील १८ सप्टेंबरअखेरची आकडेवारी

स्क्रीनिंग तपासणी-११९६

प्रगतीपर रुग्ण-९७०३९

संशयित रुग्ण-७८

पॉझिटीव्ह रुग्ण-३५

मयत-९

'स्वाईन फ्लूची लक्षणे आढळ्यास रुग्णांनी घाबरून न जाता तत्काळ उपचार घेण्यास प्राधान्य द्यावे. सीपीआरमध्ये स्वाईन फ्लूवर उपचारासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाताना विशेषतः काळजी घ्यावी. स्वाईन फ्लूशी लढताना प्रतिकारशक्ती महत्वाची ठरत असल्याने सकस आहार, पुरेसा व्यायाम याकडे लक्ष द्यावे.

विजयकुमार बर्गे, उपवैद्यकीय अधिक्षक, सीपीआर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेंजो पथकातील वादकावर हल्ला

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

आपटेनगर पाण्याच्या टाकीजवळ अज्ञात केलेल्या हल्ल्यात सरदार धर्मा चौगुले (वय २२, रा. वडणगे, ता. करवीर) हा तरुण गंभीर जखमी झाला. जखमी चौगुले हा बेंजो पथकातील वादक आहे. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

आपटे नगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ नागरिकांना जखमी अवस्थेतील युवक आढळला. त्यांनी त्याला सीपीआरमध्ये उपचारास दाखल केले. जखमी युवकाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाला आहे. त्यामुळे मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली. त्याच्यावर रात्री उशिरा शस्त्रक्रिया करण्यात आली असून प्रकृती स्थिर आहे. दरम्यान हल्ल्याचे वृत्त समजताच चौगुले याच्या नातेवाइक व मित्रांनी सीपीआरमध्ये गर्दी केली. चौगुले मंगळवारी रात्री नऊ वाजेपर्यंत बेंजो पथकातील सहकाऱ्यासमवेत गंगावेश येथे उपस्थित होता. त्यानंतर कामानिमित्त बाहेर जातो, असे सांगून गंगावेश येथून निघून गेला होता, असे त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितले. चौगुले गंगावेश येथून आपटेनगरपर्यंत कोणत्या वाहनाने गेला, त्याच्यावर कोणी हल्ला केला याचा पोलिस शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज व्याख्यान

$
0
0

कोल्हापूर: येथील सागरमाळ ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे जागतिक स्मृतिभ्रंश दिनानिमित्त शुक्रवारी (ता. २१) कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांची व्याख्यान होणार आहेत. प्रतिभानगर येथील हुतात्मा स्मारक येथे सायंकाळी चार वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल, अशी माहिती ज्येष्ठ नागरिक महासंघाने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विवेकानंद’ला दुहेरी विजेतेपद

$
0
0

कोल्हापूर: महानगरपालिका जिल्हास्तर बेसबॉल स्पर्धेत विवेकानंद कॉलेजच्या मुले व मुलींनी विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यामध्ये विवेकानंदच्या मुलींनी महावीर कॉलेजचा २१- ८ अशा गुणांनी पराभव केला. तर मुलांच्या संघाने महावीर कॉलेजचा ४-३ असा पराभव केला. महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचलनालय, पुणे व कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच कोल्हापूर जिल्हा क्रीडा परिषद यांच्यावतीने स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या संघांची सिंधुदूर्ग येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. खेळाडूना संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार सांळुखे,संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर, जिमखाना चेअरमन प्रा. किरण पाटील, ज्युनिअर विभागाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. संतोष कुंडले. प्रा. सहिदा कच्छी, प्रा. स्वप्निल खोत व प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत कमानींना ‘जाग्यावर पावती’

$
0
0

फोटो आहेत.

.....

सत्ताधारी पक्ष-कार्यकर्ते, तालीम संस्थांनी उभारल्या परवानगीविना कमानी

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर :

उत्सवाच्या कालावधीत नित्याची वाहतूक कोंडी निर्माण झाली असताना शहर आणि परिसरातील प्रमुख मार्गावर आता विनापरवाना स्वागत कमानी वाढल्या आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना या राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी महापालिकेची कसलीही रितसर परवानगी न घेता शहरभर स्वागत कमानी थाटल्या आहेत. शहरातील अनधिकृत स्वागत कमानींना शुल्क आकारताना महापालिकेने 'जाग्यावर पावती' मोहिम आरंभली आहे.

महापालिकेच्या या मोहिमेमुळे बिनदिक्कतपणे कमानी उभारलेल्या पक्ष, कार्यकर्ते, सार्वजनिक मंडळे व तालीम संस्थांना आता पैसे मोजावे लागत आहेत. सार्वजनिक गणेश उत्सवाच्या कालावधीत मंडळांसाठी मंडप उभारणी, खड्डे खोदणे, स्वागत कमानी उभारणीसाठी रितसर परवानगी घ्यावी लागते. वाहतुकीला अडथळा होणार नाही या पध्दतीने मंडप उभारणी करावी याची खबरदारी मंडळांपासून प्रशासनापर्यंत साऱ्यांनी घ्यायची असते. जिल्हा पोलिस प्रशासन आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश उत्सवासाठी 'एक खिडकी'योजना सुरू केली होती. 'एक खिडकी'योजनेंतर्गत फक्त तीन स्वागत कमानींसाठी परवानगी घेतल्याचे सामोरे आले आहे.

यावरुन प्रशासनाच्या आवाहनाला झुगारुन शहर आणि परिसरात स्वागत कमानी उभ्या केल्या आहेत. रितसर परवानगी न घेता स्वागत कमानींना शुल्क आकारुन तात्पुरत्या स्वरुपात ते नियमित करण्याचा फंडा महापालिका प्रशासनाने सुरू केला आहे. यासाठी दोन पथकांची स्थापना केली आहे. एका पथकात चार वसुली क्लार्कचा समावेश आहे. या पथकामार्फत भागनिहाय पाहणी करुन स्वागत कमानींना शुल्क आकारुन पावती दिली जाते. प्रत्येक भागात जायचे, जाग्यावर पावती करायची या पध्दतीने काम सुरू आहे. मात्र शहरभर स्वागत कमानी आणि पथके मात्र दोन यामुळे शुल्क आकारुन पावत्या करण्यातही मर्यादा पडत आहेत. राज्यातील सत्ताधारी पक्ष आणि नेते मंडळीच्या स्वागत कमानींवर कारवाईचा बडगा उगारण्याऐवजी जाग्यावर पावतीचा मध्यममार्ग काढल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे. राजकीय पक्ष, संघटनांसह व्यावसायिक कंपन्या, व्यापाऱ्यांनी फुकटात जाहिरातबाजी केली आहे.

...............

स्वागत कमानीत हरवले रस्ते

बिंदू चौक, जुना देवल क्लब इमारती समोरील रस्ता, टेंबे रोड, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, नंगीवली तालीम चौक, संभाजीनगर पेट्रोल पंप, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, ताराबाई रोड, राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, कसबा बावडा अशा विविध ठिकाणी असंख्य स्वागत कमानी उभारल्या आहेत. मिरजकर तिकटी आणि मंगळवार पेठेत स्वागत कमानीत रस्ते हरवल्यासारखे चित्र आहे. भाजप, शिवसेना, पाटाकडील तालीम मंडळ, बालगोपाल तालीम मंडळ, जादू ग्रुपने या मार्गावर स्वागत कमानी उभारल्या आहेत. भाजपच्या स्वागत कमानीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अमल महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजप महानगर अध्यक्ष संदीप देसाई यांच्या छबी आहेत. शिवसेनेच्या कमानीवर आमदार राजेश क्षीरसागर, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांच्या प्रतिमा ठळकपणे नजरेस पडतात. ताराबाई रोड येथे कार्यकर्त्यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या फोटोची स्वागत कमान उभारली आहे. कसबा बावड्यात कार्यकर्त्यांनी, आमदार सतेज पाटील व आमदार क्षीरसागर यांचे मोठ्या आकारातील फोटो लावून स्वागत कमानी रस्त्यावर उभारल्या आहेत.

...........................................

चौकट येणार आहे...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कसबा बावड्यातील देखावे खुले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

गणेशोत्सवात शहराबरोबरच सर्वात जास्त सजीव देखाव्यासाठी गर्दी होणारा परिसर म्हणून कसबा बावडा परिसर ओळखला जातो. या परिसरात ग्रामीण बाज जपत अनेक सामाजिक विषयांवरील देखावे सादर केले आहेत. हे देखावे पाहण्यासाठी बावड्यात गर्दी होत आहे.

भव्य सेट आणि ऐतिहासिक सजीव देखाव्यांची परंपरा ठेवत चौगुले गल्लीतील भारतवीर मित्र मंडळ, पाटील गल्लीतील छत्रपती शिवाजीराजे तरुण मंडळाचे देखावे सादर झाले आहे. भारतवीर मित्र मंडळ गेल्या वर्षीची परंपरेचे सातत्य ठेवत यावेळीही ८० कलाकारांचा समावेश असलेला देखावा सादर करणार आहे. यामध्ये ४० लहान कलाकार काम करणार आहेत. भव्य स्टेज, लाइट इफेक्ट्स, साऊंड सिस्टीम यांमध्ये 'संस्कारमय पाऊल खुणांची उजळणी' अशी घोषणा करत युगनिर्मात्या राजमाता भाग २ हा देखावा सादर केला आहे. स्टेजच्या मागील बाजूस ३० बाय १२ ची मोठी स्क्रीन असणार असून त्यावर विविध भागातील क्षणचित्रे दाखवून वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे. हा सजीव देखावा २१ मिनिटे असून यावर्षी प्रथमच हौशी कलाकारांची ऑडिशन घेऊन निवड केली आहे.

छत्रपती शिवाजीराजे मंडळाने ६० बाय ४० फूट भव्य रंगमंचावर शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सजिव देखावा सादर केला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बालपणापासून सर्व प्रसंग २५ मिनिटांत सादर केले आहेत.

हनुमान चौक येथील अंकुश ग्रुप बाबाची कमाल स्वयंवराची धमाल हा विनोदी सजीव देखावा केला आहे. डगमग बॉईज विनोदी सजीव देखावा करणार आहेत. तालीम चौकातील स्वस्तिक मित्र मंडळ 'खेळ नवा रंगेल' हा हल्लीच्या लहान वयातील प्रेमविवाह वर आधारित सामाजिक प्रबोधनपर सजीव देखावा सादर करणार आहेत. आडवे गल्लीतील सस्पेन्स स्पोर्ट्स ऐतिहासिक सजीव देखावा करणार आहेत.

त्याचबरोबर वेगवेगळे तांत्रिक देखावा करण्यात अग्रेसर असणारे रणदिवे गल्लीतील बिल्वदल मित्र मंडळ यावर्षी क्रांतीकारी राजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची गवा रेड्यासोबतची लढत साकारणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुण मनाचा सांघिक आविष्कार

$
0
0

मंडळांची जबाबदारी तरुणांवर

कोल्हापूर टाइम्स टीम

सार्वजनिक गणेशोत्सव म्हटला की तरुणाईचा सळसळता उत्साह असे जणू समीकरण बनले आहे. बाप्पाच्या आगमनापासून ते देखाव्याच्या प्रत्येक टप्प्यावर उत्सवात कुठलीच कसर राहू नये, यासाठी कार्यकर्ते झटत असतात. शहरातील बहुतांश तरुण मंडळाची निम्म्याहून अधिक जबाबदारी तरुण कार्यकर्त्यांवर आहे. तरुण मनाचा सांघिक बळाचा आविष्कार या निमित्ताने पाहावयास मिळत आहे.

शहर आणि परिसरात नोंदणीकृत मंडळाची संख्या एक हजाराच्या आसपास आहे. सार्वजनिक तरुण मंडळाचा कणा हा तरुण कार्यकर्ता आहे. उत्सव कालावधीचा अकरा दिवसांचा थाटमाट डोळयांचे पारणे फेडणारा असला तरी त्यासाठी दीड, महिने कार्यकर्त्यांची लगबग सुरू असते. शहरातील तालीम संस्था, मोठ्या मंडळांनी गणेश उत्सव साजरा करण्यासाठी तरुण कार्यकर्त्यांचा समावेश असणारी उत्सव कमिटी नेमली आहे. हे कार्यकर्ते गणेशमूर्ती ठरविण्यापासून मंडपाच्या उभारणीपर्यंत सगळ्या कामात स्वतला हिरीरीने झोकून देतात.

'मंडप व्यवस्था, डेकोरेशनची जबाबदारी पार पडतात. देखाव्याची तयारी करताना रात्र रात्र जागवितात. गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीसाठी वाहनांची व्यवस्था, सजावट योग्यरित्या झाले पाहिजे, यासाठी तरुण कार्यकर्ते प्रयत्नशील असतात, असे डांगे गल्ली तरुण मंडळाचे कार्यकर्ते कुणाल कोठावळे यांनी दिली. मंडळानी उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे. ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, अंध शाळांना आर्थिक मदत, अनाथ, निराधार व्यक्तीसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना सहकार्य करण्यासाठी तरुण कार्यकर्ते सरसावल्याची असंख्य उदाहरणे यंदा पाहावयास मिळत आहे.

............

प्रिन्स क्लबने मांडला खर्चाचा तपशील

मंगळवार पेठेतील प्रिन्स क्लब खासबागने गणेशोत्सवात देखाव्याची परंपरा जपताना उत्सवातील खर्चाचा तपशीलही मांडला आहे. प्रिन्स क्लबच्या कार्यकर्त्यांची उत्सव कालावधीतील कामाची जबाबदारी स्वीकारली आहे. रोज सकाळी मंडप परिसरातील स्वच्छता, सुशोभिकरण, देखाव्याची तयारी अशा कामाचे नियोजन केले आहे. देखावा शिस्तबद्ध पद्धतीने साजरा होण्यासाठी असंख्य कार्यकर्ते परिश्रम घेत असतात असे मंडळाचे कार्यकर्ते अभिजित पोवार व संदीप पोवार यांनी सांगितले. दोघांनी कॉलेजपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर आता लहान सहान व्यवसाय करत आहेत.

........

गणेशोत्सव हा तरुण कार्यकर्त्यांचा उत्सव आहे. गणेशमूर्ती ठरविण्यापासून त्यांची लगबग सुरू होते. उत्सव कालावधीत प्रत्येकजण जबाबदारी घेऊन काम करत असतो. उत्सव साजरा करताना तरुण कार्यकर्त्यांनी त्याला सामाजिक कार्याची जोड दिली आहे.

संदीप पाटील, जादू ग्रुप टेंबे रोड

डांगे गल्ली तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांचे श्रमदान

सार्वजनिक तरुण मंडळाच्या गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी डांगे गल्ली तरुण मंडळाचे कार्यकर्ते पंचगंगा घाट परिसरात स्वच्छता मोहीम राबवितात. घाट परिसरातील निर्माल्य, ठिकठिकाणी टाकलेले टाकावू साहित्य एकत्र जमा करतात. गेल्या पाच, सहा वर्षापासून मंडळाचे तरुण कार्यकर्ते श्रमदानातून घाट परिसराची स्वच्छता करुन 'पर्यावरणपूरक उत्सव'ला मूर्त रुप देत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बदलातून आव्हाने पेलतील

$
0
0

रिझर्व्ह बँकेचे संचालक मराठे यांचा नागरी बँकांना सल्ला

कोल्हापूर टाइम्स टीम

'जागतिक अर्थव्यवस्थेत होणाऱ्या बदलांचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून रुपया घसरला आहे. बदलत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी नागरी बँकांनी तयार राहावे. भविष्यात कामकाजामध्ये बदल, अंतर्गत बदलाची तयारी, सखोलपणे प्रश्नांचा अभ्यास आणि गुंतवणूक वाढीबाबत पुरेशी काळजी घेतल्यास बदलत्या आव्हानांना सक्षमपणे तोंड देता येईल,' असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे नूतन संचालक सतीश मराठे यांनी केले. श्री महालक्ष्मी को ऑप. बँक, श्री पंचगंगा नागरी सहकारी बँक व सहकार भारतीच्यावतीने आयोजित सत्कारप्रसंगी ते बोलत होते. रिझर्व्ह बँकेच्या संचालकपदी निवड झालेबद्दल सतीश मराठे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन महालक्ष्मी बँकेच्या श्री भवन येथे करण्यात आले होते. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना मराठे म्हणाले, नागरी सहकारी बँकांसमोर अनेक आव्हाने आहेत. रिझर्व्ह बँकेशी संवाद साधून या प्रश्नांची सोडवणूक करावी लागणार आहे. २००८ नंतरच्या जागतिक मंदीनंतर जगातील सर्वच बँकिंग क्षेत्रावर त्याचे दूरगामी परिणामी झाले आहेत. जगातील सर्वात चांगली सेन्ट्रल बँक म्हणून रिझर्व्ह बँकेकडे पाहिले जाते. अभ्यासांती रिझर्व्ह बँक कायदे व नियमावली तयार करत असते. सध्या सहकारी कायदे जुने व कालबाह्य झाले असून त्यात सामाजिक, आर्थिक परिस्थितीनुसार बदल करणे गरजेचे आहे. सध्याच्या सहकार क्षेत्राला सक्षम कायद्याची आवश्यकता आहे.

देशाच्या जीडीपीत सव्वाआठ टक्के वाढ होत आहे. भारतीय अर्थव्यवस्था वेगाने विस्तारत आहे. जागतिक पातळीवरील अमेरिका आणि चीन यांच्यातील आर्थिक युद्धाचा फटका सर्व जगाला बसत आहे. इतर देशांच्या तुलनेत साठ टक्के रुपया घसरला आहे त्यामागे आर्थिक युद्ध कारणीभूत आहे. या पार्श्वभूमीवर बँकिंग क्षेत्रासमोरील आव्हानात वाढ होत असून अर्थव्यवस्थेला बळकटी आणणे आव्हानात्मक आहे. यासाठी बँकांनी गुंतवणुकीवर अधिक काटेकोरपणे लक्ष द्यायला हवे. लहान बँकांच्या क्षमतेत होत असलेली वाढ कौतुकास्पद असली तरी नवी आव्हाने पेलण्यासाठी नागरी बँकांनी सज्ज राहायला पाहिजे. यासाठी येणाऱ्या काळात तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करावा लागणार आहे. कोअर बँकिंग सुविधेच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करायला हवेत. भविष्यात कामकाजामध्ये बदल, अंतर्गत बदलाची तयारी, सखोलपणे प्रश्नांचा अभ्यास आणि गुंतवणूक वाढीबाबत पुरेशी काळजी घेतल्यास बदलत्या आव्हानांना सक्षमपणे तोंड देता येईल.'

प्रास्ताविक सनदी लेखापाल महेश धर्माधिकारी यांनी केले. यावेळी श्री पंचगंगा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष राजाराम शिपुगडे, नागरी बँक असोसिएशनचे अध्यक्ष निपुण कोरे, महालक्ष्मी को.ऑप. बँकेचे अध्यक्ष अॅड. रवी शिराळकर उपस्थित होते. सूत्रसंचालन शीतल जोशी यांनी केले. श्री पंचगंगा नागरी सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा डॉ.माधुरी कुलकर्णी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यू पॅलेस स्कूल दुरुस्तीस सुरुवात

$
0
0

न्यू पॅलेस स्कूल दुरुस्तीस सुरुवात

फोटो आहे

कोल्हापूर टाइम्स टीम

महापालिकेच्या न्यू पॅलेस स्कूल क्रमांक १५ च्या शाळेच्या दुरुस्तीस सुरुवात झाली. शाळेची जुनी कौल बदलून नवीन पत्रे बसवण्यात येणार आहेत. प्राथमिक शिक्षण मंडळाचे सभापती अशोक जाधव व नगरसेवक राजाराम गायकवाड यांच्या हस्ते दुरुस्ती कामास सुरुवात झाली.

प्राथमिक शिक्षण मंडळ आणि महिला बालकल्याण समितीच्यावतीने महापालिकेचा शाळांचा सर्व्हे केला आहे. यामध्ये सुमारे ४७ शाळा नादुरुस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. शाळांच्या दुरुस्तीसाठी सर्व शिक्षा अभियानांर्तगत निधीची मागणी केली आहे. पण अद्याप निधीची पूर्तता झालेली नाही. शिक्षण मंडळांकडून प्राप्त झालेल्या निधीतून शाळेची दुरुस्ती करण्यास सुरुवात केली.

सभापती जाधव म्हणाले, 'महापालिकेच्या शाळांचा कायापालट करुन गुणवत्ता वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांचा भाग म्हणूनच शाळांची दुरुस्ती करण्यास सुरुवात झाली. टप्प्याटप्प्याने आवश्यक शाळांना सर्व सुविधा देण्यात येतील.' 'प्रभागातील शाळांना सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नगरसेवक राजाराम गायकवाड यांनी आश्वासन दिले.'

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेवादल प्रदेश संघटक अनिल घाटगे, न्यू पॅलेस सोसायटीचे माजी सभापती दत्तात्रय इंगवले, सुजीत जांभळे, अनिल अधिक, कनिष्ठ अभियंता मीरा नागिमे, भिमराव कोरवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा संजीवनी जांभळे, शांताराम सुतार, दिपमाला ओतारी, सायराबानू मोकाशी, अरुण सुनगार यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

स्वागत मुख्याध्यापिका विमल जाधव यांनी केले. सूत्रसंचलन साताप्पा पाटील यांनी केले. आभार पूनम कोळी यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणच्यावतीने वीजजोडणीसाठी निविदा प्रक्रिया

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महावितरणने, ३१ मार्च, २०१८ पर्यंत असलेल्या कृषीपंप ग्राहकांना उच्चदाब वीज यंत्रणेतून वीज जोडणी मिळावी यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या निविदा प्रक्रियेत देशातील नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदविला असल्याची माहिती महावितरणने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

महावितरणच्या औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, नंदूरबार, धुळे, व जळगाव विभागातील कामासाठी निविदा काढल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यासाठी पाच ते आठ निविदा महावितरणला प्राप्त झाल्या आहेत असे महावितरणने म्हटले आहे. यामध्ये प्रामुख्याने टाटा प्रोजेक्ट, नागार्जून कंन्स्ट्रक्शन कंपनी, एल अँड टी, होल्टास, अग्रवाल पॉवर कंपनी, भारत इलेक्ट्रिकल्स या कंपन्याचाही समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हृदयरोग तपासणी शिबिर

$
0
0

कोल्हापूर: आण्णा ग्रुपतर्फे गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिवस्वरुपनगर येथे शनिवारी (ता.२२) मोफत हृदयरोग तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. शिवस्वरुपनगर, महादेव मंदिराशेजारी सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत शिबिर होणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती व आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन होईल. नागरिकांनी आरोग्य सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रुपचे अध्यक्ष व पाचगाव ग्रामपंचायतीचे सदस्य सागर दळवी, ग्रुपचे उपाध्यक्ष गणेश घोरपडे, सचिव प्रतिक मुळीक, खजानीस निलेश पवार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१० ऑक्टोबरला शेतकरीसंघटनेची ऊस परिषद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एफआरपीचे तुकडे करू नये, यंदाच्या उसाला पहिला हप्ता ३ हजार ५०० रुपये मिळावा, या मागण्यांसाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी १० ऑक्टोबरला कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील ऊस उत्पादकांची परिषद येथील शाहू स्मारक भवनात आयोजित केल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

पाटील म्हणाले, 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार राजू शेट्टी यांनी गेल्यावर्षी एफआरपीचे तुकडे करण्यास मान्यता दिली. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ताब्यातील कारखान्यांची अजूनही एफआरपी थकीत आहे. त्यांची साखर जप्त करण्याचे आदेश आयुक्तानी दिले. मात्र, त्यास सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी स्थगिती दिली. देशमुख यांच्या कारखान्यानेही एफआरपी थकवली आहे. मुख्यमंत्री, सहकारमंत्रीच कायदा न पाळणाऱ्यांना संरक्षण देत आहेत. परिणामी ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

माजी मुख्यंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या ताब्यातील साखर कारखान्यांनीही एफआरपी थकवली आहे. दोन टप्प्यांत एफआरपी देण्यास परवानगी मिळावी, अशी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. शेतकऱ्यांना हे अशाप्रकारे लुबाडत आहेत. दुसऱ्या बाजूला संघर्ष यात्रा काढून शेतकऱ्यांसंबंधी मागण्या केल्या जात आहेत. भाजपप्रमाणे काँग्रेसही दुटप्पी आहे. भाजप सरकार सत्तेवरून जायची वेळ आल्यावर इथेनॉलचा निर्णय घेतला. एफआरपीचा रिकव्हरी बेस ९.३० वरून १० केला. यामुळे उत्पादकांचे नुकसान होणार आहे. सरकारमध्ये असलेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कारखानदारांकडून देय रक्कम मिळवून द्यावी, अन्यथा सरकारी तिजोरीतून पैसे द्यावेत.'

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवात लाखोची उलाढाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सार्वजनिक गणेशोत्सवात कलाकार, मंडप डेकोरेशन, नेपथ्यकार, वाद्यवृंद, हॉटेल, मिठाई, आचाऱ्यांना मोठा रोजगार मिळाला आहे. उत्सव काळात ११ दिवसांत लाखो रुपयांची उलाढाल झाली. काही मंडळांनी खर्चात बचत करुन शिल्लक वर्गणीतून समाजोपयोगी संस्थांना मदत करत सामाजिक बांधिलकी जपली आहे.

शहरात ६०० हून अधिक मंडळांनी मूर्तीची प्रतिष्ठापना मंडपात केली आहे. छोट्या मंडळांनी प्रतिष्ठापनेसाठी दहा फूट लांब, दहा फूट रुंदीचे तर देखाव्यासाठी अंदाजे १० फूट लांब ते १५ रुंदीचे मंडप उभारले आहेत. भव्य मूर्तीसाठी, सेट उभारणीसाठी मोठे मंडप उभारले आहेत. मंडपासाठी खर्च १० हजारापासून एक लाख रुपये इतका दर डेकोरेशन व्यावसायिकांकडून आकारला जातो. उत्सवामुळे डेकोरेशन व्यवसायिकांची चांगलीच चांदी झाली आहे. तसेच मंडप व्यावसायिकांकडे काम करणाऱ्या कारागीरांना रोजगार मिळाला आहे. काही मंडळांनी नेपथ्य रचनाकारांकडे मंडप आणि सेटची ऑर्डर दिली आहे. ५० हजारापासून पाच लाख रुपयांचे भव्य सेट उभारण्यात आले आहेत. राजारामपुरी, बिंदू चौक, शिवाजी चौकातील मंडळांचे मंडप आणि सेट आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरले आहेत.

साउंड सिस्टीमला बंदी असल्याने पारंपरिक वाद्यांना मोठी मागणी आहे. ढोल पथक, झांज पथक, बँड, बेंजो, हलगी ताशा, लेझिम या वाद्यपथकांना मोठी मागणी आहे. विसर्जन मिरवणुकीत १५ हजार ते एक लाख रुपयांपर्यंतची बिदागी या पथकांना दिली जाते. अनेक कलाकारांना उत्सवातून रोजगार मिळत आहे. जिवंत देखावे सादर करणाऱ्या मंडळाकडून संवाद लेखन, नेपथ्यकार, डबिंग, अभिनय करणारे कलाकार, संगीतकार, प्रकाश योजना, ध्वनी मुद्रण करणाऱ्या कलाकारांसाठी या माध्यमातून मोठा रोजगार मिळाला आहे. या कलाकारांना पाच ते १० हजारापर्यंत मानधन दिले जाते. काही कलाकार मानधनाची अपेक्षा न ठेवता काम करतात. जिवंत देखाव्यात काम करणारे मंडळाचे कार्यकर्ते चहा, पाणी नाष्ट्यावर समाधान मानतात.

उत्सव काळात सर्वांत जास्त रोजगार खाद्यपदार्थ विक्रेत्यांना होतो. राजारामपुरी, शाहूपुरी राधाकृष्ण तरुण मंडळ, खासबाग मैदान खाऊ गल्ली, व्हीनस कॉर्नर, बीटी कॉलेज, शिवाजी चौक, महापालिका, निवृत्ती चौक येथे खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या विक्रेत्यांची मोठी कमाई होते. भेल, आईस्क्रीम, पाणीपुरी, चाट, डोसा, कॉर्न, पॉप कॉर्न, गोबी मंच्युरियन, शाकाहारी व मांसाहारी बिर्याणी, रोल अशा पदार्थांना मोठी मागणी असते. शहरातील शाकाहारी व मांसाहारी हॉटेलमध्ये खवय्यांची संख्याही या काळात वाढल्याचे दिसते. नेहमीपेक्षा २० ते ३० टक्के जास्त ग्राहक वाढले आहेत. तसेच खेळण्याची दुकाने, इमिटेशन ज्वेलरी विक्रेत्यांचा व्यवसायही चांगला होतो. राजारामपुरी पहिल्या गल्लीपासून शेवटच्या गल्लीपर्यंत खेळणी विक्रेत्यांची गर्दी दिसते. त्यांचीही उलाढाला चांगली होते.

मिठाईच्या दुकानातही खव्याचे मोदक, बुंदीसह विविध मिठाईंना मोठी मागणी आहेत. अनेक मंडळांनी महाप्रसादाचे आयोजन केले असल्याने आचारी व वाढप्यांना काम मिळाले आहे. काही मंडळांनी अन्नछत्राचे आयोजन केले आहे. तसेच काही आचाऱ्याकडे शाकाहारी बिर्याणीच्या ऑर्डर मंडळे, राजकीय पक्षांनी बुक केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भीतीच्या भिंती’तून बालविश्वावर प्रकाशझोत

$
0
0

त्रिमूर्ती मित्रमंडळाचा प्रबोधनपर देखावा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवसेंदिवस पालकांचे बालकांवर अपेक्षांचे ओझे प्रचंड प्रमाणात वाढते आहे. त्यांचे बालपण करपून जात आहे. यावर प्रकाशझोत टाकणारा जिवंत देखावा उषा टॉकीच्या मागे असलेल्या त्रिमूर्ती मित्रमंडळाने 'भीतीच्या भिंती' नावाने साकारला आहे. हा देखावा पाहण्यासाठी खुला झाला आहे. ज्वलंत विषयावरील देखावा असल्याने मोठी गर्दी खेचत आहे.

या मंडळाची स्थापना १९५९ मध्ये झाली. गणेशोत्सव काळात प्रत्येक वर्षी मंडळातर्फे प्रबोधनपर सामाजिक देखावा तयार केला जातो. २०१५ मध्ये डॉल्बीविरोधी जनजागृतीसाठी 'प्रबोधनाला येईन पण ... ' तर २०१६ मध्ये पोलिसांच्या ताणावर 'गर्दी विरूध्द वर्दी', गेल्या वर्षी हेल्मेटचे महत्व सांगणारा 'व्हीलचेअर' हे देखावेही गाजले होते.

यंदा बालकांच्या आयुष्यावरील देखावा आहे. मुलांना त्यांच्या कलानं घडू द्या, त्यांना आवडी निवडी जपू द्या, दहावी, बारावीसह कोणत्याच परीक्षेतील गुणवत्तेचे दडपण नको असा संदेश यातून दिला जात आहे. निलेश पोवार यांनी लेखन केले आहे. प्रसाद जानवेकर, रौनक गांधी, विजया कोरवी यांनी भूमिका केल्या आहेत. मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी स्वत: विषयाचा अभ्यास करून संहितेचे लेखन केले. कार्यकर्ते सराव करून प्रभावीपणे त्याचे सादरीकरण करीत आहेत. अपेक्षांनी बालमन खुडून टाकण्याऐवजी सुप्तगुणांना प्रोत्साहन देणे किती महत्वाचे आहे, हे दाखवले आहे. देखाव्यात आई, वडील आणि सामान्य माणूस अशा तिघांच्या भूमिका आहेत.

-----------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राहीला अर्जुन पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा अर्जुन पुरस्कार कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू राही सरनोबतला जाहीर झाला. क्रीडा मंत्रालयाकडून अर्जुन पुरस्कार निवडीबाबतचा मेल तिला बुधवारी मिळाल्याचे सरनोबत कुटुंबीयांनी सांगितले.

राहीच्या रुपाने कोल्हापुरातील पाचव्या खेळाडूला अर्जुन पुरस्काराचे भाग्य मिळाले आहे. यापूर्वी दिवंगत हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, टेबल टेनिसपटू शैलेजा साळोखे, सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत, जलतरणपटू वीरधवल खाडे यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. राहीला मिळालेल्या अर्जुन पुरस्काराने क्रीडाप्रेमींत आनंदाचे वातावरण आहे.

जाकार्ता, इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत राहीने २५ मीटर पिस्तूल प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. गेली काही वर्षे दुखापतीमुळे राही नेमबाजीपासून दीर्घकाळ लांब राहिली होती. आशियाई स्पर्धेतील यशामुळे तिला पुनरागमनाची संधी मिळाली. यापूर्वी दोनवेळा अर्जुन पुरस्कारासाठी तिची शिफारस करण्यात आली होती. दोन्हीवेळा पुरस्काराने हुलकावणी दिल्याने यंदा शिफारस करण्याबाबत तिच्याकडून विचार झाला नव्हता. आठवड्यापूर्वी महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्यावतीने तिची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली. आठवड्यातच पुरस्कार निवडीची बातमी मिळाल्याने सरनोबत कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. राहीला २०१० मध्ये महाराष्ट्र सरकारने क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले आहे. तिचा विशेष सन्मान म्हणून महाराष्ट्र सरकारने तिची थेट उपजिल्हाधिकारी पदावर २०१४ साली निवड केली.

प्रथम महिला होण्याचा बहुमान

आशियाई क्रीडा स्पर्धेत पिस्तूल नेमबाजीत देशाला सुवर्णपदक मिळवून देणारी राही पहिला महिला खेळाडू ठरली. तसेच दक्षिण कोरियात २०१३ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत पिस्तूल प्रकारात देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याचा व २०१२ साली लंडन ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचा पहिला मानही तिला मिळाला आहे.

नेमबाजीतील कामगिरी

२००८ युवा राष्ट्रकुल स्पर्धा- सुवर्णपदक

२०१० राष्ट्रकुल स्पर्धा- सुवर्णपदक व रौप्यपदक

२०१४ राष्ट्रकुल स्पर्धा- सुवर्णपदक

२०१४ आशियाई क्रीडा स्पर्धा- ब्रांझ पदक

२०१८ आशियाई क्रीडा स्पर्धा- सुवर्णपदक

अर्जुन पुरस्कार मिळावा हे प्रत्येक खेळाडूचे ध्येय असते. या सन्मानामुळे जबाबदारी वाढली आहे. सध्या २०२० मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याचे ध्येय आहे. यासाठी कसून सराव सुरु आहे. ऑलिम्पिकपर्यंतच्या प्रवासात 'अर्जुन पुरस्कार' बळ देईल.

राही सरनोबत, नेमबाज

.. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हा तर कोल्हापूरच्या कुस्तीचा गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महान भारत केसरी, रुस्तम-ए-हिंद आणि राष्ट्रकुल रौप्यपदक विजेते दादू चौगुले यांना भारत सरकारने मानाचा मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार जाहीर केला आहे. रोख पाच लाख रुपये, मानचिन्ह, प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार प्राप्त करणारे दादू चौगुले कोल्हापूरचे पहिले मानकरी ठरले आहेत. पुरस्कार जाहीर झाल्यावर चौगुले यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून कोल्हापूरच्या कुस्तीचा गौरव झाला आहे, अशी प्रतिक्रिया चौगुले यांनी व्यक्त केली आहे.

आशियाई सुवर्णपदक विजेती नेमबाज राही सरनोबत हिला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. राहीबरोबर कुस्तीमध्ये दबदबा निर्माण करणाऱ्या चौगुलेंना ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात मंगळवारी (ता. २५) पुरस्काराचे वितरण होणार आहे. खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार पी. एन. पाटील यांच्यासह राजकीय, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनी चौगुले यांचे अभिनंदन केले.

अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथील दादू चौगुले यांनी वयाच्या दहाव्या वर्षी लाल मातीच्या आखाड्यात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी मोतीबाग तालमीत वस्ताद हिंदकेसरी गणपत आंदळकर, बाळू बिरे यांच्याकडू कुस्तीचे धडे गिरवले. संघटक बाळ गायकवाड यांनी महाराष्ट्र केसरीसह मोठ्या स्पर्धेत चौगुले यांना कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. या संधीचे सोने करताना महाराष्ट्र केसरी, रुस्तम-ए-हिंद, महान भारत केसरी या मानाच्या गदा चौगुले यांनी पटकावत कोल्हापूर जरीपटका फडकवत ठेवला. १९७३ मध्ये न्यूझीलंडची राजधानी ऑकलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत १०० किलो वजन गटात फ्री स्टाइल प्रकारात रौप्यपदक पटकावले. त्यांच्या सत्पालबरोबर झालेल्या लढती चांगल्याच गाजल्या. कुस्तीतून निवृत झाल्यानंतर त्यांनी बाळ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय तालीम संघाच्या संघटनात्मक कामात लक्ष घातले. चौगुले यांचा मुलगा विनोद यानेही हिंद केसरीची गदा पटकावली. सध्या शहर व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष म्हणून दादू चौगुले धुरा सांभाळत आहेत. यापुढे ऑलिम्पिक दर्जाचे मल्ल घडविण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.

गुरुवारी रात्री पुरस्काराची घोषणा झाल्यावर मोतीबाग तालमीच्या मल्लांनी जल्लोष साजरा केला. त्यांच्या आनंदात चौगुले यांचा मुलगा हिंदकेसरी विनोद, अमोल, सून वैभवी, अंजली, मुलगी सुहानी, नातू अर्जुन, पृथ्वीराज, नात अदिती, पवित्रा सहभागी झाले होते.

कोल्हापुरात कुस्तीला राजाश्रय देणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांना माझा पुरस्कार अर्पण करतो. वस्ताद गणपतराव आंदळकर आणि बाळ गायकवाड यांच्यामुळे कुस्तीक्षेत्रात नाव कमावले. मल्लसम्राट कै. युवराज पाटील, डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वडार, सत्पाल यांचे कायम सहकार्य लाभले. कुस्ती शौकिनांनी माझ्यावर दाखविलेल्या प्रेमामुळे मला हा सन्मान प्राप्त झाला आहे.

दादू चौगुले, महान भारत केसरी



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस डॉक्टरांवर कारवाई करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'अधिकृत वैद्यकीय परवान्याशिवाय उपचार करून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई करावी. त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करावीत,' असे आदेश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी दिले. बोगस वैद्यकीय व्यवसायास आळा घालण्याबाबत आयोजित जिल्हास्तरीय बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, 'बोगस डॉक्टरांच्या शोधासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत अचानक तपासणी मोहीम राबवण्यात यावी. त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी. त्यासाठी पोलिस प्रशासनाच्या मदतीने आरोग्य विभागाने तपासणी पथक तयार करावे. अचानक तपासणीची धडक मोहीम राबवावी. दुर्गम भागात बोगस डॉक्टर अधिक आहेत. यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समितीने गठीत करावी. इलेक्ट्रो होमिऑपॅथीचे पदवीधारक ॲलॉपॅथीचे उपचार करीत असतील तर त्यांच्यावरही कडक कारवाई करावी. लोकांनीही व्यापकपणे आरोग्य, पोलिस प्रशासनाविरोधात तक्रारी कराव्यात. तक्रार करणाऱ्याचे व माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल.'

बैठकीस पोलिस उपाधीक्षक सतीश माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, समिती सदस्य डॉ. सुनीलकुमार लवटे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. डी. एस. सोनवणे, डॉ. हर्षला वेदक आदी उपस्थित होते.

फलक लावण्याच्या सूचना

'जिल्ह्यातील सर्व सरकारी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, सीपीआर, महानगरपालिकेच्या दवाखान्यांसमोर दर्शनी ठिकाणी बोगस डॉक्टरांविषयी कोणाकडे तक्रार करावी, संबंधित अधिकाऱ्याचे नाव, पद, दूरध्वनी क्रमांकाचा फलक प्रदर्शित करावा,' अशी सूचनाही सुभेदार यांनी बैठकीत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात बसर्गेचा जवान ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निपाणी

दुचाकीची अज्ञात वाहनाला पाठीमागून जोराची धडक बसून झालेल्या अपघातात बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथील जवान जागीच ठार झाला. अण्णासाहेब रामगोंडा शिखारी (वय २५) असे त्याचे नाव आहे. पुणे-बेंगळुरू महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलिसांत झाली आहे.

शिखरी हे मराठा लाइफ इन्फंन्ट्रीत कार्यरत होते. सहा महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले आहे. आठ दिवसांची सुट्टी काढून तो गावी बसर्गे याठिकाणी आला होता. सुट्टी संपवून रात्री दीड वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून जाताना पुणे बेंगलोर महामार्गावर वेगात त्याने अज्ञात वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की शिखारी याच्या डोक्यावर हेल्मेट असूनही त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात तो जागीच ठार झाला. अपघातात दुचाकीचाही चक्काचूर झाला. घटनास्थळी निपाणीचे सिपीआय किशोर भरणी, के. एस. कल्लाप्पागौडर, ए. एम. आंची यांनी भेट देऊन पंचनामा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदगड भवनसाठीजागेची पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयानुसार बांधकाम विभागातर्फे चंदगड भवन बांधण्यात येणार आहे. त्यासाठी जि. प. जवळच्या सभापती निवासस्थानी असलेल्या रिकाम्या जागेची पाहणी शुक्रवारी करण्यात आली. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर, शिक्षण सभापती अंबरीश घाटगे, सदस्य राजवर्धन निंबाळकर, कल्लाप्पा भोगण, कार्यकारी अभियंता तुषार बुरुड यांनी पाहणी केली. जागा निश्चित झाल्यानंतर भवनसाठीचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर आवश्यक त्या परवानग्या घेण्यात येईल, असे बुरुड यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images