Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मंगळवार पेठ...कोठे काय पहाल

$
0
0

मंगळवार पेठ

...........................

पाटाकडील तालीम मंडळ : लालबागचा राजा रुपातील गणेशमूर्ती

दिलबहार तालीम मंडळ : साई दरबार

राधाकृष्ण भक्त मंडळ : बकासुराचा वध करणारा बालगणेश

जय पद्मावती मंडळ : पंचमुखी गणेशमूर्ती

रॅश ग्रुप, माळी गल्ली : श्रीकृष्णारुपातील गणेशमूर्ती व प्लास्टिकबंदीवर देखावा

कलकल तरुण मंडळ : विष्णू अवतारातील अष्टभुजाधारी त्रिमुखी गणेशमूर्ती

गुडलक तरुण मंडळ : शेतकऱ्यांच्या रुपातील गणेशमूर्ती

स्वस्तिक तरुण मंडळ : छत्रपती संभाजी महाराजांची २१ फुटी प्रतिकृती

मॉडर्न स्पोर्टस क्लब : बालगणेशाची आकर्षक गणेशमूर्ती

मंडलिक गल्ली तरुण मंडळ : आकर्षक गणेशमूर्ती

सुबराव गवळी तालीम मंडळ : आकर्षक गणेशमूर्ती

म्हसोबा तरुण मंडळ : विष्णुरुपी गणेश अवतार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तज्ज्ञ संचालकांचे व्यवस्थापक मंडळ स्थापन करा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'नागरी व सहकारी निवडून आलेल्या संचालक मंडळातील तज्ज्ञ संचालकांचे व्यवस्थापक मंडळ स्थापन करावे,' अशी सूचना कर्नाड्स बँकिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनचे संचालक किरण कर्नाड यांनी केली. दिल्ली येथे नागरी सहकारी बँकाच्या राष्ट्रीय शिखर परिषदेत ते बोलत होते. बँकिंग फ्रंटियर्सने परिषदेचे आयोजन केले होते. परिषदेला रिझर्व्ह बँकेचे निवृत्त डेप्युटी गव्हर्नर डॉ. आर. गांधी, केंद्रीय संचालक मंडळाचे सदस्य सतीश मराठे, सहकार भारतीचे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता, रिझर्व्ह बँकेचे माजी कार्यकारी संचालक डॉ. ए.व्ही. दास, माजी महाव्यवस्थापक पी. के. अरोरा, रत्नाकर देवळे प्रमुख उपस्थित होते.

शिखर परिषदेत नागरी बँकांबरोबरच देशातील जिल्हा मध्यवर्ती बँका आणि नागरी पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नागरी बँकांचे व्यवस्थापक मंडळ या विषयावरील चर्चासत्रात कर्नाड म्हणाले, 'नागरी सहकारी बँकांमध्ये व्यावसायिकता नाही या मुद्यावरुन व्यवस्थापक मंडळ स्थापन करावे, असा अध्यादेश रिझर्व्ह बँकेने काढला आहे. ९७व्या घटना दुरुस्तीद्वारे दुरुस्त झालेल्या सहकार कायद्यात बँकांमध्ये संचालक मंडळाचा समावेश असला तरी व्यवस्थापक मंडळाचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार व्यवस्थापक मंडळ स्थापन करणे शक्य नाही. स्वतंत्र व्यवस्थापक मंडळ गठीत करण्याऐवजी बँकिंग, सहकार, हिशोब तपासनीस शास्त्र, अर्थशास्त्र, वकील, माहिती तंत्रज्ञान आदी विषयात तज्ज्ञ असलेल्या उमेदवारांसाठी स्वतंत्र राखीव मतदार संघ करून त्यामध्ये विजयी झालेले पाच उमेदवार व्यवस्थापक मंडळात सदस्य म्हणूनच घ्यावेत.'

परिषदेत वारणा बँक, शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस् बँक, इचलकरंजीची सन्मती बँक, व्यंकटेश्वरा बँक, इचलकरंजी मर्चंट, आष्टा पिपल्स बँक, मानसिंग बँक, सिंधुदूर्ग जिल्हा बँक, रत्नागिरी जिल्हा बँक, सातारा जिल्हा बँक, सोलापूरच्या समर्थ बँक यांचा पुरस्काराने गौरवण्यात आले. राज्य सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड, नागरी बँकांच्या राष्ट्रीय संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष गुप्ता यांसह कोल्हापूर, सांगली, सातारा, इचलकरंजी येथील बँका, पतसंस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रंथालय कर्मचारी बेदखल

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : शहर आणि खेड्यांतील वाड्या-वस्त्यांमध्ये वाचन चळवळ रूजवण्यासाठी सरकारमान्य वाचनालये कार्यरत आहेत. मात्र, त्यांना मिळणाऱ्या अनुदानात १३ वर्षांपासून वाढ झालेली नाही. कर्मचाऱ्यांचे मानधन तुटपुंजे आहे. त्याकडे वारंवार लक्ष वेधण्यात आले तरी सरकारने सोयीस्करपणे बेदखल केले. यामुळे नाइलास्तव बुधवारी (ता.१९) राज्यातील १२ हजार १४८ वाचनालयांतील २१ हजार ६११ कर्मचारी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहेत.

आजही अनेक खेड्यांतील वाचनालयांतील वृत्तपत्रातूनच वाचक राज्य, जिल्ह्यातील दैनंदिन घडामोडी सविस्तरपणे जाणून घेतात. रोजची विविध वृत्तपत्रे ठेवणे, वाचकांना पुस्तके पुरवण्यासाठी सरकारकडून प्रत्येक वर्षी अनुदान मिळते. 'अ' वर्गातील वाचनालयास प्रतिवर्षी सात लाख, 'ब' वर्गासाठी २ लाख, 'क' वर्गासाठी ९६ हजार, 'ड' वर्गासाठी ३० हजार रुपये अनुदान मिळते. या वाचनालयात वर्गनिहाय अधिकाधिक ४ आणि कमीत कमी १ कर्मचारी मानधन तत्त्वावर काम करतात. त्यांना दरमहा दीड हजार ते सहा हजार रुपये मानधन मिळते. नवीन पुस्तके नोंदवून घेणे, वाचकांची संख्या वाढविणे, पुस्तकांची देवाण-घेवाण करण्याचे प्रमुख काम हे कर्मचारी करतात.

कर्मचाऱ्यांच्या मानधनात तिपटीने वाढ करावी, वेतनश्रेणी, सेवाशर्ती, सेवा नियम मंजूर करावेत, अनुदानात दुपटीने वाढ करावी, पात्र ग्रंथालयांना अनुदान सुरू करावे, कर्मचाऱ्यांची सरकारी नियमानुसार पूर्ण आणि अर्धवेळ नियुक्ती करावी, वर्ग बदल करावा, राज्य ग्रंथालय परिषद आणि जिल्हा ग्रंथालय समित्यांची पनर्रचना करावी या मागण्यांसाठी ग्रंथालय संघ सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. मागण्यांची पूर्तता करण्यासाठी दोन समित्या स्थापन करण्यात आल्या. त्यांचा अहवालही लालफितीत अडकला आहे. सरकार टोलवाटोलवी करीत असल्याची भावना कर्मचारी, संचालकांची झाली आहे.

००००००

जिल्ह्यातील वाचनालये

६८५

कर्मचारी

१८००

संचालक

६ हजार १६५

सभासद

२० हजार

०००००

कोट

सार्वजनिक वाचनालयांच्या प्रलंबित मागण्यांसाठी दहा वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. सध्याच्या आणि यापूर्वीच्या सरकारनेही मागण्या पूर्ण केल्या नाहीत. सरकारने केवळ, चर्चा, बैठका घेऊन आश्वासने दिली. प्रत्यक्षात अंमलबजावणी केली नाही. या नकारात्मक धोरणामुळे वाचन चळवळीला खीळ बसत आहे.

तानाजी मगदूम, अध्यक्ष, जिल्हा ग्रंथालय संघ

०००००

बदलत्या काळानुसार वाचनालयात सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. डिजिटलचे युग असल्याने त्या दिशेने प्रत्येक ग्रंथालयास जाणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी सरकारकडून भरीव अनुदान मिळावे, अशी मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत पुस्तके आपल्या शाळेत हा उपक्रम राबविला जात आहे. अनेक गावांत मागेल त्यांना घरपोच पुस्तके दिली जात आहेत.

रामचंद्र पाटील, प्रमुख कार्यवाह, जिल्हा ग्रंथालय संघ

०००००

२००४ पर्यंत वाढ

१९८० ते २००४ पर्यंत दर सहा वर्षांनी ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ झाली. त्यानंतर नियमानुसार २०१० मध्ये दुपटीने आणि २०१६ मध्ये चौपट वाढ करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. २०१२ मध्ये केवळ ५० टक्के वाढ झाली. त्यानंतर ग्रंथालयांचे अनुदान जैसे थे राहिले. मानधनही वाढले नाही.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांचे हस्तक साउंड सिस्टीमसाठी प्रयत्नशील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ध्वनिप्रदूषण होऊ नये म्हणून एकीकडे पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्रयत्न करत असताना त्यांचे हस्तक साउंड सिस्टिम लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पालकमंत्र्यांच्या हस्तकांची कृती म्हणजे 'लबाड लाडगं ढोंग करतंय, जनतेची दिशाभूल करतंय' असा टोला माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांचे नाव न घेता लगावला.

इंगवले यांनी पत्रकात म्हटले आहे की, कोल्हापुरात गणेशोत्सवात साउंड सिस्टीम लावण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गतवर्षी पालकमंत्र्यानी मंडळांनी सिस्टीम लावू नये यासाठी पोलिस प्रशासनावर दबाव टाकला होता. तसेच शहरातील तालमी, तरुण मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन दहशत माजवली होती. त्यामुळे शहराचा आवाज दबला होता. यंदा पालकमंत्री पाटील यांचे हस्तक स्पीकर, दोन टॉप, दोन बेस लावण्याची परवानगी द्यावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास चालले आहेत. त्यांची कृती म्हणजे लबाड लांडगं ढोंग करतंय अशी आहे. कोल्हापूरवासियांनी साऊंड सिस्टीम लावण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन व कोर्टाच्या नियमांना धरुन लावावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा गर्भपातप्रकरणी डॉ. विजयकुमार चौगुलेला अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

येथील चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपातप्रकणातील संशयित डॉ. विजयकुमार चौगुले (वय ४३) यांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली. कोर्टाने त्यांना सहा दिवसांच्या पोलिस कोठडी सुनावली. मंगळवारी पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी या दाम्पत्याची तसेच गर्भपातासाठी येऊन गेलेल्या चार ते पाच महिलांचीही चौकशी करण्यात आली. या महिला शिरोळ तालुक्यातील असल्याची माहिती पुढे आली आहे.

डॉ. रुपाली चौगुले या पोलिस कोठडीत आहेत. त्यांची मंगळवारी कसून चौकशी सुरु होती. हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर पसार झालेले डॉ. विजयकुमार शामराव चौगुले यांना पोलिसांनी सांगलीतूनच अटक केली. पसार काळात ते इचलकरंजीत लपून बसले होते. त्यांच्या मोबाइल लोकेशनच्या माध्यमातून पोलिस त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. सोमवारी रात्री उशीरा डॉ. चौगुले सांगलीतील भोसले नामक मित्राच्या घरी येणार असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी सापळा लावून पोलिसांनी भोसले यांच्या घराबाहेरच डॉ. चौगुलेंना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत डॉ. चौगुले यांचा हॉस्पिटलशी भूलतज्ज्ञ म्हणून संबंध होता, इतकीच माहिती पुढे आली असल्याचे वीरकर यांनी सांगितले. डॉ. रुपाली यांचा भाऊ डॉ. स्वप्नील जगवीर जमदाडे अद्याप पसारच असून तो मुंबईत नोकरी करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. डॉ. विजयकुमार कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव व डॉ. रुपाली पलूस तालुक्यातील बुर्लीच्या मूळ रहिवाशी आहेत.

.. .. ५

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलात्मक गणेशमूर्तींचा देखणा आविष्कार

$
0
0

मंगळवार पेठेतील देखावे खुले

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वस्तिक तरुण मंडळाची छत्रपती संभाजी महाराजांची २१ फुटी प्रतिकृती, दिलबहार तालीम मंडळाचा साई दरबार, जय पदमावती मंडळाची पंचमुखी गणेशमूर्ती यांच्यासह कलात्मक आणि आकर्षक मूर्ती मंगळवार पेठेतील गणेशोत्सवाचे आकर्षण ठरत आहेत. मंगळवार पेठेतील बहुतांश सार्वजनिक तरुण मंडळाच्या गणेशमूर्ती आणि देखावे खुले झाले आहेत.

पाटाकडील तालीम मंडळाचा लालबागचा राजा गणेशमूर्ती, श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ, रॅश ग्रुप माळी गल्लीतर्फे श्रीकृष्णरुपातील गणेशमूर्ती व प्लास्टिकबंदी विषयी देखावा नागरिकांची गर्दी खेचत आहे. दिलबहार तालीम मंडळाची आकर्षक गणेशमूर्ती आणि साई दरबार उत्सवाची शोभा वाढवित आहे. मंगळवार पेठेत सजीव देखाव्यांची परंपरा आहे. सजीव देखाव्यांची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

जय पद्मावती मंडळाने यंदाही प्राचीन आणि कलात्मक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. 'वज्रभैरव'रुपातील गणेशमूर्ती लक्ष वेधत आहे. मूळ तिबेटीयन मूर्तीवर ही गणेशमूर्ती आधारित आहे. मूर्ती पंचमुखी असून ३४ भुजा आणि सोळा पाय आहेत. गुडलक तरुण मंडळाची शेतकऱ्याच्या रुपातील गणेशमूर्ती आकर्षित करत आहे. कलकल तरुण मंडळाची विष्णू अवतारातील अष्टभुजाधारी त्रिमुखी गणेशमूर्ती पाहताना नजर हटत नाही.

सुबराव गवळी तालीम मंडळ, जादू ग्रुप टेंबे रोड, मंडलिक गल्ली तरुण मंडळ व भाई ग्रुपच्या गणेशमूर्ती आकर्षण ठरल्या आहेत. राधाकृष्ण भक्त मंडळाचा बकासुराचा वध करणारा बालगणेश हा देखावा गणेशभक्तांच्या पसंतीस उतरला आहे. मॉडर्न स्पोर्टस क्लबची बालगणेशची सुबक मूर्ती, गजानन महाराजनगरमधील श्री म्हसोबा तरुण मंडळातर्फे 'विष्णुरुपी गणेश'अवतारातील गणेशमूर्ती, सुधाकर जोशीनगर येथील जय भीम प्रेम मित्र मंडळाच्या गणेशमूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मंगळवार पेठेतील स्वस्तिक तरुण मंडळातर्फे छत्रपती संभाजी महाराज यांची २१ फुटी प्रतिकृती तयार केली आहे.

..........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्ष्मीपुरीत आकर्षक गणेशमूर्तींवर भर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

आकर्षक विद्युत रोषणाई, विलोभनीय गणेशमूर्ती आणि देखाव्यांमुळे लक्ष्मीपुरी परिसरातील गणेश मंडळांना भेटी देण्यासाठी आबालवृद्ध गर्दी करत आहेत. अनेक मंडळांनी पर्यावरणपूरक वाट चोखाळली आहे. देखाव्यांच्या माध्यमातून प्रबोधनावर भर देण्यात आला आहे. देखाव्यांसह गणेशमूर्ती पाहण्याचा आनंद लुटला जात आहे.

लक्ष्मीपुरी परिसरातील देशप्रेमी तरुण मंडळाने लिहायला बसलेली तपकिरी आणि सोनेरी रंगातील आकर्षक मूर्ती साकारली आहे. गणपती लिहिण्यात दंग असून समोर मूषक गणेशाकडे चीत्तवृत्तीने पाहत आहे. डाव ग्रुपच्या न्यू भारत मित्रमंडळाने बालगणेशमूर्ती साकारली आहे. देखाव्यामध्ये लहान मुलांसोबत गणेश खेळत आहे. खुर्चीवर लहान मुले आरामात बसल्याचा देखावा आहे.

दरवर्षी नाविन्यपूर्ण सजावटीसाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर धान्य व्यापारी मंडळाने ३३ फुट उंच मीनाक्षी मंदिर साकारले आहे. एलईडी लायटिंगच्या सहाय्याने मंदिर सजवण्यात आले आहे. मंदिर बाहेरून पाहताना भान हरपायला होते. १९८०पासून या मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात असल्याचे अध्यक्ष नयन प्रसादे यांनी सांगितले. शिवशक्ती तरुण मंडळाने १८ फुटी गणेशमूर्ती साकारली आहे. एका हातात सरस्वतीची वीणा, दुसऱ्या हातात पुस्तक आणि गणेश बदकावर स्वार झाला आहे.

कोंडाओळ येथील कौन्तेय ग्रुपची प्राचीन काळातील मूर्ती आहे. यामध्ये बालगणेश खेळत आहे. बालगणेश एक गाडी ओढत असून उंदीर मागे बसला आहे. तो गाडा साखळीने गणपती ओढत आहे. शिवशाही मित्रमंडळाने नैसर्गिक धबधबा तयार केला आहे. दगडात बांधकाम करून त्याला निसर्गाचे रूप देण्यात आले आहे. लॉन तयार करून त्यात पक्षी, प्राणी यांचा देखावा साकारला जाणार आहे. या माध्यमातून निसर्ग वाचविण्याचा संदेश देण्यात आला आहे.

स्वयंभू गणेश मित्र मंडळाची गजराजच्या रूपातील १२ फुटी मूर्ती पाहायला मिळते. मुख्य मंडपात बाजूला डिजिटल चित्राच्या सहायाने हत्ती दाखवण्यात आले आहेत. घिसाड गल्लीतील सोमवार पेठ तरुण मंडळाची हत्तीच्या सोंडेवर असणारी ९ फूट उंच मूर्ती आकर्षण ठरली आहे. पोलिस लाइनच्या दत्त तरुण मंडळाने दत्त अवतारातील १५ फुटी मूर्ती बसवली आहे. दसरा चौकातील शाहू तरून मंडळाने पुरातन दगडासारखी रचना करून आजूबाजूला निसर्ग साकारला आहे. सुतारवाड्यातील भगवा ग्रुप मित्र मंडळाने युद्धासाठी उंदराला पंख दिलेला देखावा उभा केला आहे. यामध्ये उंदराचे हलते पंख आकर्षकरित्या साकारले आहेत. गणेश युद्धाला तयार दिसतो आहे. आजुबाजूला युद्धजन्य वातावरण तयार करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तालमींनी जपला सामाजिक सलोखा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरातील बाबूजमाल, बालगोपाल, सरदार, शिवाजी तालमीसह अनेक ठिकाणी गणेशमूर्ती आणि पंजांची एकत्र प्रतिष्ठापना करत संस्थांनी सामाजिक सलोखा, एकतेचे दर्शन घडवले. गणपती व पंजांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. बुधवारी (ता. १९) खत्तलरात्र तर गुरुवारी (ता. २०) ताबूत विसर्जन होणार आहे.

कोल्हापूर शहराचा सामाजिक समतेचा मोठा वारसा आहे. हिंदू-मुस्लिमांचे एैक्य दर्शवणारा मोहरम सण तालमी व मंडळे अत्यंत धार्मिक भावनेने साजरा करतात. यंदा ३३ वर्षांनी गणेशोत्सव व मोहरम हे दोन्ही सण एकत्र आल्याने शहरातील अनेक तालमी, मंडळांनी गणेशमूर्ती, पंजाची एकत्र प्रतिष्ठापना केली आहे. बाबूजमाल तालमीतील नाल्या हैदर हा भाविकांचे श्रद्धास्थान आहे. तालमीत नाल्या हैदर पंजा व गणेशमूर्तीची एकत्रित प्रतिष्ठापना केली आहे. नाल्या हैदर पंजाच्या पूजेचा मान जाधव कसबेकर घराण्याकडे आहे. तालमीने प्रवेशद्वाराजवळ गडकोटाची प्रतिकृती उभारली आहे. येथे हिंदू-मुस्लिम भाविक देवतांची पूजा अर्चा, आराधाना करत आहेत. गणपती व पंजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असून बुधवारी खत्तलरात्री दिवशी प्रचंड गर्दीची शक्यता गृहित धरून जुना राजवाडा पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

बालगोपाल तालीम मंडळ, शिवाजी पेठेतील सरदार तालीम, रंकाळा तलाव परिसरीतल शिवाजी तालीम मंडळ, लक्ष्मीपुरीतील सत्यनारायण तालीम, शिवाजी पेठेतील सरदार तालमीने, राजारामपुरीतील एकता मित्र मंडळ गणपती व पंजाची एकत्र प्रतिष्ठापना केली आहे. खंडोबा तालीम, जुना बुधवार पेठ, नंगीवली तालीम, अवचित पीर तालीम मंडळ, बोडके गल्ली तालीम मंडळ, बजाप माजगावकर तालीम मंडळ यांनी तालमीच्या इमारतीत पंजा प्रतिष्ठापना तर मंडपामध्ये गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. तालमी व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पंजा व गणपतीची पूजा करण्यासाठी स्वतंत्र समित्या नियुक्त केल्या आहेत.

शिवाजी चौकात महागणपती आणि घुडणपीरचे तर भवानी मंडपात वाळव्याची स्वारी, अंबाबाई मंदिरातील महालक्ष्मी भक्त मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेण्यास गर्दी होत आहे. बाराईमाम, ब्रह्मपुरी येथील बुऱ्हानबाबा, लक्ष्मीपुरीतील गरीबशाह, शाहू मिल चौकातील झीमझीम साहेब या पंजांच्या दर्शनासाठी गर्दी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अतिरिक्त सीईओ करणार किरण लोहार यांची चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. शिवदास यांची नियुक्ती केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी शिवदास यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी, शिक्षणाधिकारी लोहार यांच्या कामकाजाचा पंचनामा केला होता. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी सर्वसाधारण सभेत दिले होते. माध्यमिक विभागातील शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचीच चौकशी करावी असा आदेशही त्यांनी दिला होता.

सीईओ मित्तल यांनी मंगळवारी लोहार यांच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्ती सीईओ शिवदास यांची समिती नेमली. शिवदास चौकशी अहवाल शिक्षण समितील सादर करतील. शिक्षण समितीकडून हा अहवाल स्थायी समितीकडे सादर होईल. याविषयी बुधवारी अधिकृत आदेश निघणार आहे. लोहार यांच्या कारभाराची चौकशी व्हावी यासाठी सदस्य आक्रमक आहेत.

०००

लोहारांचे सीईओंना पत्र

शिक्षणाधिकारी लोहार यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश सर्वसाधारण सभेत झाला होता. प्रशासन त्यांच्यावरील कारवाईसंदर्भात कायदेशीर बाबी विचारात घेत आहे. त्यांच्यावरील कारवाईसंदर्भात सीईओ मित्तल यांना विचारले असता त्यांनी सर्वसाधारण सभेतील इतिवृत्तांत अद्याप उपलब्ध झाला नाही. ते उपलब्ध झाल्यानंतर निर्णय घेतला जाईल असे सांगितले. दरम्यान, लोहार यांनी सीईओ मित्तल यांना १८ व १९ सप्टेंबरला हायकोर्टात काम असल्यामुळे मुख्यालय सोडण्याची परवानगी मिळावी असे विनंती पत्र पाठविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज निदर्शने

$
0
0

कोल्हापूर : केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शिक्षणक्षेत्राविषयी केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फी बुधवारी (ता.१९) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या आंदोलनात सर्व शिक्षक संघटना सहभागी होणार आहेत. शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षक संघटना समन्वय समितीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रखडलेल्या प्रश्नांवर ‘हायकमांडो’चा प्रकाश

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जुना बुधवार पेठेतील हायकमांडो फ्रेंड्स सर्कलने 'रखडलेले कोल्हापूर, प्रश्न एक उत्तरे अनेक' या देखाव्यातून कोल्हापूर शहरातील रखडलेल्या प्रश्नांची मालिका उभी केली आहे.

कोल्हापूर शहरात यापूर्वीच्या काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी तर सध्याच्या भाजप महायुती सरकारने कोल्हापूरच्या विकासासाठी अनेक योजनांची घोषणा केली आहे. गेली दहा वर्षे विकास प्रकल्प रखडले आहेत. या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न हायकमांडो फ्रेंड्स सर्कलने केला आहे. रस्ते, वीज, पायाभूत सुविधा आणि शहराचा विकास अशा माफक मागण्या कॉमन मॅनच्या असतात. 'कॉमन मॅन'च्या रुपातील गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून गेले अनेक वर्षे रखडलेले प्रश्नांची मांडणी देखाव्यात केली आहे. 'प्रश्न तेच... उत्तरं अनेक, रखडलेलं कोल्हापूर' ही देखाव्याची टॅगलाइन आहे. 'विरोधक सत्ताधारी झाले, सत्ताधारी विरोधक झाले, पण अर्धवट प्रकल्पांचे काय...' हा प्रश्न विचारताना आंदोलन करणाऱ्या मंडळींना चांगलेच सुनावले आहे. 'आंदोलन आमच्या हक्काचं, त्यात कोणी तरी कमावतात लाखाचं' या स्लोगनद्वारे कान टोचले आहेत. थेट पाइपलाइन, कचऱ्यापासून वीजप्रकल्प, सीपीआरचे आधुनिकीकरण, पर्यायी शिवाजी पूल, राजर्षी शाहू जन्मस्थळ, रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण, अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, विमानतळ हे प्रश्न देखाव्यातून मांडले आहेत. प्रत्येक प्रकल्पाचे सुंदर मॉडेल तयार करण्यात आले आहे. त्यांची मांडणी सुरेख केली आहे. रखडलेल्या प्रकल्पाचे फ्लेक्सही लावले आहेत. अंबाबाई मंदिर, राजर्षी शाहू रेल्वे स्टेशनच्या प्रतिकृती लक्ष वेधून घेतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देखाव्यात झळकले मेस्सी, रोनाल्डो

$
0
0

कोल्हापूर : फुटबॉल खेळाडू अक्षय रविंद्र पायमल यांनी मंगळवार पेठेतील अमर तरुण मंडळाशेजारी गणेश उत्सवानिमित्त फुटबॉलवर देखावा तयार केला आहे. अक्षयने, त्याच्या निवासस्थानी केलेल्या देखाव्यात खेळाडू, फुटबॉलची प्रतिकृती तयार केली आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू मेस्सी, रोनाल्डो, नेमार या खेळाडूंची प्रतिमा पोस्टरवर साकारली आहे. अक्षय हा राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छत्रपती संभाजी महाराजांवर देखावा

$
0
0

कोल्हापूर : मंगळवार पेठेतील स्वस्तिक तरुण मंडळातर्फे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर देखावा तयार केला आहे. मंडळाने, संभाजी महाराजांची २१ फुटी प्रतिकृती तयार केली आहे. या देखाव्याचे मंगळवारी उद्घाटन झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुळकूडबाबत अखेर प्रशासनास जाग

$
0
0

म. टा. इम्पॅक्ट लोगो...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कर्नाटकात जाण्याचा ठराव केल्यानंतर कागल तालुक्यातील सुळकूड येथील मूलभूत विकासकामे करण्यासंबंधी प्रशासनास अखेर जाग आली. येथील शासकीय मध्यवर्ती इमारतीमध्ये शिवसेनेच्या पुढाकाराने मंगळवारी झालेल्या बैठकीत प्रलंबित विकासकामे त्वरित मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागाशी पाठपुरावा करण्याचे आश्वासन कागलच्या प्रांताधिकारी मनीषा कुंभार यांनी दिले.

गावातील मूलभूत समस्या, अडचणींची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी दिली. त्यानंतर समस्यानिहाय चर्चा झाली. सुळकूड ते कागल रस्त्यावरील प्रलंबित पुलाचे काम २५ सप्टेंबरपासून सुरू करणे, मराठी शाळा इमारतीची दुरुस्ती करणे, संजय गांधी, इंदिरा गांधी निराधार योजनेच्या प्रस्तावासाठी गावात विशेष शिबिराचे आयोजन करणे, लिंगायत समाजासाठी स्मशानभूमीला जागा उपलब्ध करून देणे, पाणंद रस्ते करणे, पशुसंवर्धन दवाखाना इमारतीची दुरुस्ती करणे, गावातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करण्याच्या कामासंबंधी पाठपुरावा करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी गावात २१ सप्टेंबरला, तर १ ऑक्टोबरला कोल्हापुरात पुन्हा आढावा बैठक घेण्याचा निर्णय झाला.

बैठकीस कागलचे तहसीलदार बी. जे. गोरे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, सभापती राजश्री माने, कागल तालुका शिवसेना अध्यक्ष शिवगोंडा पाटील, आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फन पार्क अन् झुलता पूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाहूपुरी परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदाही वैशिष्टपूर्ण देखावे, मूर्तींची परंपरा कायम राखली आहे. अनेक देखावे पाहण्यासाठी खुले झाले आहेत. चौथ्या गल्लीतील शिवनेरी मित्र मंडळाने साकारलेला फन पार्क आणि पहिल्या गल्लीतील मंडळाचा झुलता पूल देखावा लक्षवेधी ठरत आहे. रात्री विद्युत रोषणाईने आसंमत उजळून निघत आहे.

शिवनेरी मंडळाने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही देखाव्यातील वेगळेपण जपले आहे. गणेश दर्शनासाठी पालकांसोबत लहान मुले, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात. त्याचा विचार करून फन पार्क तयार केले आहे. पार्कमध्ये लहान मुलांसाठीची खेळणी तयार केली असून त्यावर खेळणाऱ्या लहान मुलांची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. हा देखावा पाहण्यासाठी गर्दी होत आहे. पहिल्या गल्लीतील शाहूपुरी गणेश मंडळाने 'झुलता पूल' देखवा केला आहे. चौथ्या गल्लीतील न्यू शिवनेरी मित्र मंडळाने हत्तीवर स्वार होऊन आसुराचा नाश करण्यासाठी निघालेल्या सूर्यपूत्र कर्णाच्या रूपातील मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. पाचव्या गल्लीतील शाहूपुरी बॉईज गणेश मंडळाने लालबागचा राजा रूपातील मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सामाजिक प्रश्नांना देखाव्यांतून वाचा

$
0
0

शनिवार पेठेसह, जुना बुधवारमध्ये विविधांगी देखावे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महागाईचा राक्षस, बालकामगारांच्या समस्या, कोल्हापुरातील रखडलेले प्रकल्प, मराठा क्रांती मोर्चा अशा सामाजिक विषयांसह पक्षी वाचवा, वृक्षारोपणाचे महत्व अशा पर्यावरणीय प्रश्नांवर प्रकाश टाकणारे देखावे शनिवार व जुना बुधवार पेठेतील वैशिष्ट्य राहणार आहे. शंकर, श्रीकृष्ण रुपातील आकर्षक मूर्ती व देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे.

जुना बुधवार पेठेतील डांगे गल्ली तरुण मंडळाचा 'अपारंपरिक उर्जास्रोत' हा देखावा खुला झाला आहे. अपारंपरिक उर्जेचे महत्व पटवणारा गणराय, सौरउर्जेचा वापर करणाऱ्या गावाची मांडणी, अपारंपरिक उर्जेचे प्रकार, त्याचे फायदे देखाव्यातून मांडले आहेत. तोरस्कर चौकातील सोल्जर्स ग्रुपने लोप पावलेल्या आदिवासी लोकसंस्कृतीवर प्रकाश टाकणारा देखावा सादर केला आहे. आदिवासी संस्कृतीची वैशिष्ट्ये, त्यांच्या चालीरिती, शेती, आदिवासींचे होणारे शोषण अशी देखाव्याची मांडणी आहे.

शिपुगडे तालमीने 'स्त्री भ्रूण हत्या' तर हायकमांडो फ्रेंड्स सर्कलने 'कोल्हापुरातील रखडलेल्या प्रकल्पांचे काय होणार?' हा देखावा मांडला जात आहे. 'प्रश्न तेच, उत्तरे अनेक' या टॅगलाइनखाली थेट पाइपलाइन, कचऱ्यापासून वीजप्रकल्प, सीपीआरचे आधुनिकीकरण, पर्यायी शिवाजी पूल, राजर्षी शाहू जन्मस्थळ, अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास, रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण, विमानतळ हे प्रश्न देखाव्यातून मांडण्यात येणार आहे. केसापूर पेठ तरुण मंडळाने 'गुरु शिष्य' परंपरेचा देखावा मांडला आहे. राजगुरू तरुण मंडळाने मयुरासमवेत गणराय मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. गवंडी मशीद येथील मराठा मावळा ग्रुपने 'वृक्षारोपणाचे महत्व पटवणारा गणराय' या देखाव्यातून सामाजिक संदेश दिला आहे. नससोबा तरुण मंडळाने कार्तिक स्वामीच्या रुपातील मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. मृत्यूंजय तरुण मंडळाने 'झाडे वाचवा' संदेश देणारा देखावा मांडला आहे.

जुना बुधवार पेठ तालमीने सिंहासनावरील मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. भगतसिंग तरुण मंडळाची शंकराच्या रुपातील मूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. नंदीच्या पाठीवर मूषक व त्यावर शंकराच्या रुपातील मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. शनिवार पेठेतील एसपी बॉईजने चिंतामणी रुपातील मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. तोरणा तरुण मंडळ 'महागाईचा राक्षस' देखाव्याची मांडणी करीत आहे. साई मित्र मंडळाने इजिप्तमधील प्राचीन मंदिरातील गणेशमूर्ती भाविकांसाठी खुली केली आहे.

जोशी गल्लीतील संरक्षक मित्र मंडळाने 'खोडकर कृष्णाला माकडाची मदत' हा देखावा खुला केला आहे. कृष्णरुपातील गणरायाला यशोदेने दोरीने खांबाला बांधून ठेवले आहे. कृष्णाला मदत करण्यासाठी कौले तोडून एक माकड खाली येते, असा देखावा बच्चेकंपनीला खिळवून ठेवणारा आहे. गवळी गल्लीने बैलगाडीवर बसलेल्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.

.....................

चौकट

'बाल कामगार' देखावा

अमर तरुण मंडळाने 'बाल कामगार' हा ज्वलंत विषय हाताळला आहे. राइस मिलमध्ये काम करणाऱ्या बालकामगाराच्या डोक्यावरील पोते गणराय काढून घेत आहे. गणराय त्याला पुस्तक देऊन शिक्षणाचा मार्ग चोखाळण्यास सांगत आहेत. बुरुड गल्लीतील अंकुश ग्रुपने 'पक्षी वाचवा' मोहिमेंतर्गत गणपती पक्ष्यांसमवेत खेळत असल्याचा देखावा मांडला आहे. अष्टविनायक ग्रुपची तांत्रिकेतेची जोड घेत डोळे हलवणारी, हसणारी गणरायाची मूर्ती यंदा आकर्षण ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधानसभेच्या वाटेवर ‘मल्टिस्टेट’ चे काटे

$
0
0

वाद 'गोकुळ' चा मात्र लक्ष्य आगामी निवडणुकाच

Gurubal.Mali@timesgroup.com

gurubalmaliMT

कोल्हापूर

'गोकुळ'च्या मल्टिस्टेटचा मुद्दा पुढे करत माजी आमदार महादेवराव महाडिक यांना घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. पण राजकीय प्रवासात याचा त्रास खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी.एन. पाटील यांच्यासह लोकसभा व विधानसभेसाठी इच्छूक असलेल्या नेत्यांना बसण्याची शक्यता आहे. वाद 'गोकुळ' चा असला तरी विरोधकांचे 'लक्ष्य' मात्र आगामी निवडणुका असल्यानेच वादाची ठिणगी अधिक पेटण्यासाठीच फिल्डींग लावली जात आहे. या निमित्ताने महाडिक विरोधकांची एकत्रित मोट बांधण्याचा प्रयत्न आहे.

गोकुळ दूध संघाला होणारा दुधाचा पुरवठा वाढवण्याबरोबरच इतर काही राजकीय कारणांसाठी हा संघ मल्टिस्टेट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या ३० सप्टेंबर रोजी होणाऱ्या सभेत याबाबतचा ठराव मंजूर करण्यासाठी संचालक सक्रीय झाले आहेत. पण याला विरोध करताना काही नेत्यांनी वातावरण चांगलेच तापवले आहे. गोकुळच्या निमित्ताने माजी आमदार महाडिक यांच्यासह सत्ताधारी गटाला घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. संघाच्या आर्थिक उलाढालीवर अनेकांचे लक्ष आहे. त्यामुळे ती रसद तोडण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. मल्टिस्टेटचा मुद्दा पुढे करत महाडिक यांना लक्ष्य करण्यात येत आहे.

महाडिक व आमदार सतेज पाटील यांच्यातील संघर्ष या निमित्ताने अधिकच वाढला आहे. पाटील यांच्यासह आमदार हसन मुश्रीफ, खासदार राजू शेट्टी, आमदार चंद्रदीप नरके, प्रा. संजय मंडलिक हे सारे महाडिक विरोधक एकवटले आहेत. गोकुळ मल्टिस्टेट करणे म्हणजे कोल्हापूरच्या स्वाभिमानाला धक्का, सभासदांचा हक्क हिरावणार, कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार अशी वातावरण निर्मिती करण्यात विरोधकांना यश आले आहे. याउलट मल्टिस्टेटचे फायदे सभासदापर्यंत पोहोचवण्यात संचालक अपयशी ठरले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात संचालकांविरोधात वातावरण तयार झाले आहे.

'गोकुळ'च्या नव्या वादाने खासदार धनंजय महाडिक यांच्या लोकसभेच्या विजयाचा मार्ग अधिक खडतर होणार आहे. कारण या निमित्ताने काका पुतण्यांना लगाम घालण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणुकीत खासदारांची उमेदवारी निश्चित आहे. आमदार सतेज पाटील, प्रा. मंडलिक हे उघडपणे तर मुश्रीफ छुप्या पद्ध्तीने त्यांच्या विरोधात सूत्रे हलवतील. ताकदीचे दोन नेते आणि गोकुळच्या निमित्ताने तयार झालेले विरोधी वातावरण खासदारांना त्रासदायक ठरणार आहे. यामुळे गोकुळच्या वादाचा धुरळा विरळ करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. याची जाणीव झाल्यानेच कदाचित ते अधिक सक्रीय झाले आहेत.

लोकसभेप्रमाणेच विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या नेत्यांच्या विधानसभेच्या वाटेवर काटे पेरले जाण्याची शक्यता आहे. आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार सत्यजित पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी.एन. पाटील, संचालक अरूण डोंगळे, माजी आमदार भरमू सुबराव पाटील, राजेश पाटील अशा अनेकांचा त्यामध्ये सहभाग आहे. विधानसभेला दोन्ही काँग्रेसची आघाडी होणार की नाही याचा निर्णय अजूनही झालेला नाही. पण सध्या तरी महाडिक व पी.एन. यांच्या विरोधात राष्ट्रवादी काम करण्याची शक्यता आहे. आमदार नरके यांनी मेळावा घेऊन पी.एन. यांनाच आव्हान दिले आहे. या मेळाव्यात अरूण नरके यांनी पुतण्याचा झेंडा हाती घेतला. शिवाय शेकापही ताकदीने संचालकांच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्यासाठी पत्रकबाजी करत आहे. या निमित्ताने सारे विरोधक एकवटत आहेत.

'गोकुळ' ची रसद मिळत असल्यानेच अनेकांच्या विधानसभेचा मार्ग सोपा होतो. पण आता गोकुळच्या निमित्ताने विरोधी वातावरण तयार होत आहे. संघाचे केवळ तीन हजार सातशे सभासद असले तरी साडेपाच लाख दूध उत्पादक संघाला दूध पुरवठा करतात. ग्रामीण भागातील शेतकरी संघाशी कनेक्ट आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात नाराजीची भावना निर्माण झाली तर त्याचा फटका निवडणुकीत बसू शकतो. यामुळे मल्टिस्टेटचा निर्णय सभासदांच्या हिताचा आहे हे पटवून देण्याचे खडतर आव्हान सध्या संचालकांसमोर आहे.

...

चौकट

विरोधकांचे लक्ष्य महाडिकच

'गोकुळ' वादाच्या उकळीला महाडिक व पाटील गटातील वादाचा वास आहे. काहीही करून हा वाद उकळी येईपर्यंत ताणवण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. यामध्ये भाजपची ताकद महाडिकांसोबत असली तरी शिवसेना मात्र विरोधात आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाडिकांच्या घरातील उमेदवार रिंगणात असणार आहेत. त्यामुळे विरोधकांचे लक्ष्य गोकुळपेक्षा महाडिक आहेत. त्यांना गोकुळमध्ये अडवले तरच विरोधकांचे पुढचे राजकीय गणित सोपे जाणार आहे, म्हणून तर सारेजण पक्ष विसरून एकवटले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात ४४ हजार मूर्तीदान

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

नदी, तलावांतील पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका व स्वयंसेवी संस्थांनी राबवलेल्या मूर्तीदान उपक्रमाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सोमवारी घरगुती गणेशमूर्ती विसर्जनावेळी पंचगंगा व रंकाळा तलावासह अन्य ठिकाणी भाविकांनी ४४ हजार २२३ मूर्ती दान करून उपक्रमात सहभाग घेतला. प्रमुख पाणवठ्यांसह अनेक उपनगरांमध्ये महापालिका, स्वयंसेवी संस्थांनी काहिलींची सुविधा दिल्याने भाविकांनी तेथेच मूर्ती विसर्जित करून दान केल्या.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महापालिकेने आवाहन केले होते. मूर्ती व निर्माल्यदान उपक्रमामध्ये भाविकांचा अधिक सहभाग वाढवण्यासाठी प्रमुख पाणवठ्यांसह अनेक ठिकाणी कृत्रिम कुंड व काहिलींची व्यवस्था केली होती. त्याचबरोबर सुमारे ५०० कर्मचारी, अग्निशमन दल, ट्रॅक्टर, डंपर, जेसीबी अशी यंत्रणा तैनात ठेवली होती. महापालिकेसह अन्य स्वयंसेवी संस्थांमुळे उपक्रम शंभर टक्के यशस्वी झाला. भाविकांनी दान केलेल्या मूर्ती पवडी विभागाकडून एकत्र करून सजविलेल्या ट्रॉलीमधून नेऊन इराणी खणीमध्ये विसर्जीत केल्या जात होत्या.

इराणी खण, तांबट कमान येथील कुंड, मोहिते खण, गंजीवली खण, रामानंदनगर चौपाटी, संध्यामठ, राजे संभाजीनगर तरुण मंडळ, पदपथ उद्यान, पतौडी खण, सरदार तालीम, संभाजीनगर, साळोखेनगर, पंचगंगा नदीघाट, प्रायव्हेट हायस्कूल पटांगण, स्वामी समर्थ मंदिर, नारायणदास मठ, कोटीतीर्थ, राजाराम तलाव, सायबर चौक व राजाराम गार्डन, राजाराम बंधारा कसबा बावडा, नर्सरी उद्यान रुईकर कॉलनी, बापट कॅम्प नदी परिसर, मसुटे मळा, महावीर गार्डन आदी ठिकाणी कृत्रीम कुंड, काहिली, निर्माल्यकुंड आदींची व्यवस्था केली होती. या ठिकाणी नागरिकांनी गणेशमूर्ती व निर्माल्याचे विसर्जन करुन महापालिकेस आवाहनास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. भाविकांच्या योगदानाबद्दल महापौर शोभा बोंद्रे व आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी आभार व्यक्त केले आहेत.

दृष्टिक्षेपात मूर्तीदान

रंकाळा तलाव : १२,४०१

पंचगंगा घाट : ८,४९४

कोटीतीर्थ : २,७७२

कळंबा तलाव : २,७१९

राजाराम तलाव : ७२२

उपनगरे : १०,१५५

एकूण : ४४,२२३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुनीता हंकारे यांना पुरस्कार

$
0
0

कोल्हापूर : महापालिकेच्या शेलाजी वन्नाजी संघवी विद्यालयाच्या सहायक शिक्षिका सुनीता नागेश हंकारे यांना प्राथमिक शिक्षण समितीतर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरविले. माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, महापौर शोभा बोंद्रे आणि शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, आयुक्त अभिजित चौधरी यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण समारंभ झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉम्रेड मोहन शर्मा यांची जागतिक कामगार परिषदेवर निवड

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जागतिक कामगार परिषदेच्या सचिवपदी कॉम्रेड मोहन शर्मा यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा येथील विविध संघटनेतर्फे सत्कार केला. कॉम्रेड महेश जोतराव यांच्या अध्यक्षतेखाली वीज मंडळ सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात कार्यक्रम झाला.

याप्रसंगी अनेक वक्त्यांनी डॉ. शर्मा हे एमएसई वर्कर्स फेडरेसशनच्या अध्यक्षपदावरुन काम करताना केलेल्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले. कॉम्रेड श्रीमंत खरमाटे, कॉम्रेड के. पी. तांबेकर यांनी कामगारांचे प्रश्न मांडले. कॉम्रेड जोतराव यांनी वीज कामगारांच्या पगारवाढीसह विविध प्रश्नासंदर्भातील लढ्याची माहिती दिली. याप्रसंगी बोलताना कॉम्रेड शर्मा यांनी, जागतिक कामगार परिषदेच्या माध्यमातून वीज, कोळसा उद्योग आदी प्रश्नावर काम करण्यात येणार आहे. कार्यालय फ्रान्स येथे राहणार असल्याचे सांगितले.

विभागीय सचिव कॉम्रेड शकील महात यांनी प्रास्ताविक केले. सुरेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी कॉम्रेड शिवशंकर भस्मे, एम. पी. शिंदे, आण्णाप्पा कांबळे, अरुण गावडे, स्मिता केखलेकर, सागर मळगे, सुनील मासुर्ले, रावसाहेब कदम, जगदिश नलवडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images