Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पर्यावरण मालिका भाग - दोन

$
0
0

पर्यावरण मालिका भाग - दोन

..................

'अमृत'चा निधी मुरला खड्ड्यात

अशास्त्रीय पद्धतीने वृक्षारोपण झाल्याचा पर्यावरण तज्ज्ञांचा आक्षेप

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर

महापालिकेला अमृत योजनेंतर्गत शहरात विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्यासाठी दोन कोटींचा निधी मिळाला. प्राप्त निधीतून कोठे वृक्ष लागवड केली, कोणत्या वृक्षांची केली, यासाठी वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य अथवा पर्यावरण अभ्यासकांचे मार्गदर्शन घेतले का, आदी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ज्या ठिकाणी वृक्ष लागवड केली तेथे अशास्त्रीय पद्धतीने लागवड केल्याने ज्या कारणासाठी लागवड करायची तो हेतूच बाजूला पडला आहे. परिणामी अमृत योजनेचा मिळालेला निधी खड्ड्यात मुरला असल्यासारखी स्थिती शहरात निर्माण झाली आहे.

शहरात विविध प्रजातींचे शास्त्रीय महत्त्व लक्षात घेऊन वृक्षारोपण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून महापालिकेला अमृत योजनेंतर्गत दोन कोटी रुपयांचा निधी मिळाला. वृक्षारोपण करण्यासाठी खासगी कंपनीला टेंडर देण्यात आले. कंपनीने समितीची बैठक किंवा मार्गदर्शन न घेताच अनेक ठिकाणी वृक्ष लागवड केली. महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसह कंपनीने समितीतील सदस्यांना वृक्ष लागवडीची माहिती दिली नाही. योग्य मार्गदर्शन न घेतल्याने अनेक मोठ्या झाडांची लागवड करताना दोन्ही झाडांतील अंतर अत्यंत कमी ठेवले. तसेच मोठ्या झाडाखालील इतर प्रजातींची लागवड केली. परिणामी अशा अशास्त्रीय पद्धतीने केलेल्या वृक्षलागवडीतील झाडे किती जगतील याबाबत पर्यावरण अभ्यासकांमध्ये साशंकताच आहे.

शहरात वृक्षारोपण करताना वृक्ष प्राधिकरणाची बैठक घेणे आवश्यक असते. पण समितीची बैठक न घेताच वृक्षारोपण केले जाते. मात्र त्याचवेळी झाडे तोडण्यासाठी केवळ समितीसमोर अर्ज सादर केला जात आहे. वृक्ष प्राधिकरण कायद्यानुसार कोणत्या झाडांची लागवड करावी याचे मानक ठरवले आहे. पण शहरात कोणत्या प्रकारची झाडे आहेत, याची नोंद नसताना वृक्षारोपण करुन निधीचा अपव्यव केला आहे. वृक्ष लागवड करण्यापूर्वी समितीची बैठक होणे अनिवार्य आहे. समितीतील सदस्यांची मते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू नये, यासाठी महापालिकेचे अनेक अधिकारी समितीच्या बैठका घेणे टाळत असल्याचा आरोप पर्यावरण अभ्यासक करत आहेत. निधी प्राप्त होण्यापूर्वी किंवा निधी मिळाल्यानंतर स्थानिक प्रजातींना महत्त्व देवून रोपवाटीका तयार करणे आवश्यक होते. पण अशी कोणतीही पूर्वतयारी नसल्याने ऐनवेळी वृक्षारोपण करताना आंध्र प्रदेशवरुन रोपे आणावी लागली. परिणामी रोपे व वाहतुकीवर जादा खर्च झाल्याने रोपांची संख्या कमी राहिली.

...........................

चौकट

वृक्षगणना होण्याची आवश्यकता

रस्ते विकास प्रकल्पात शहारातील नऊ हजार झाडांची कत्तल केली. झाडे तोडताना वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी किंवा जनसुनवणी घेतली नाही. याबाबत पर्यावरण अभ्यासकांनी अनेकवेळा महापालिकेशी पत्रव्यवहार केला. पण अशा कागदांना केराची टोपली दाखवली गेली. परिणामी पर्यावरण अभ्यासकांनी कोर्टात धाव घेतली. कोर्टाने सहा हजार झाडांची लागवड करण्याचे आदेश दिले. मात्र आदेशानुसार लावलेल्या झाडांची माहितीच मिळत नाही. अशी माहिती उपलब्ध होण्यासाठी वृक्षगणना होण्याची आवश्यकता पर्यावरण अभ्यासक व्यक्त करत आहेत.

.......................

चौकट

पर्यावरण निधी बंगल्याच्या डागडुजीसाठी

पर्यावरण संवर्धनासाठी आलेला निधी पर्यावरणदृष्ट्या आवश्यक असणाऱ्या बाबींवर खर्च होत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. निधी कोठे खर्च केला याची माहितीच समितीतील सदस्यांना नसते. दहा वर्षांपूर्वी पर्यावरणासाठी आलेला निधी आयुक्तांच्या बंगल्याची डागडुजी करण्यासाठी वापरला असल्याचा आरोप पर्यावरण अभ्यासक करत आहेत. यातून महापालिकेचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी शहराच्या पर्यावरणाबाबत किती जागरुक आहेत हे स्पष्ट होत आहे.

..........................

कोट

'अमृत योजनेंतर्ग वृक्ष लागवड केलेल्या ठिकाणांची माहितीच समिती सदस्यांना दिली जात नाही. जेथे लागवड केली तेथे अशास्त्रीय पद्धतीने लागवड केली आहे. परिणामी निधीचा अपव्यव झाला असून राज्य सरकारच्या 'कॅग' च्यावतीने अमृत योजनेच्या निधीची चौकशी झाली पाहिजे.

उदय गायकवाड, सदस्य, वृक्ष प्राधिकरण समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हातकणंगले गणेश विसर्जन

$
0
0

हातकणंगले तालुक्यात पर्यावरणपूरक विसर्जन

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

गणेश गणेश ...मोरया ,गणपती बाप्पा मोरया....पुढच्या वर्षी लवकर या ....असा अखंडीत गजर करत सोमवारी घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन मोठ्या भक्तिमय वातावरण करण्यात आले. तालुक्यातील अनेक गावांत नदी, नाल्यांमध्ये मूर्तींचे विसर्जन न करता पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जन झाले. हुपरी, पेठवडगावमध्ये सुमारे पाच हजार मूर्तींचे विसर्जन करून निर्माल्य दान करण्यात आले.

दरम्यान, पंचगंगा नदीच्या प्रदूषणावर आळा बसावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घातल्याने सर्व सरकारी कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी आज सकाळपासून इंगळी-रुई पुलासह पंचगंगा नदीकाठच्या गावांत गौरी गणपती मूर्ती, निर्माल्य दान स्वीकारण्याची विशेष मोहीम राबवली.

घरगुती गणेश विसर्जनासाठी हुपरी शहरात नगरपरिषदेच्या आवाहनानुसार सूर्य तलाव, कालवा, पंचगंगा नदीकाठावर रोटरी व रोटरॅक्ट क्लब, नगरपरिषदेच्यावतीने विसर्जन कुंड ठेवून निर्माल्य दानासाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती. हुपरीत सुमारे पाचशे जणांनी गणेशमूर्ती कुंडात विसर्जित केली. निर्माल्य दान केले. व्यंकटेश सूतगिरणी व पंचगंगा नदीकाठावर, पंचतारांकीत औद्यौगिक वसाहतीमधील कालव्यामध्ये मूर्ती विसर्जित करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी नगराध्यक्षा जयश्री गाट, मुख्याधिकारी तानाजी नरळे, सहायक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी विसर्जन ठिकाणांची पहाणी करुन कर्मचाऱ्यांना सूचना केल्या होत्या.

पेठवडगावमध्ये नगरपालिका प्रशासनाच्यावतीने जुन्या तलावाचे सुशोभीकरण सुरू असल्याने शहरात दहा ठिकाणी गणेशमूर्ती व निर्माल्य दान करण्याचे आवाहन नगराध्यक्ष मोहनलाल माळी व मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी केले. त्याला वडगावकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. बावडेकर कॉम्प्लेक्स, विद्या कॉलनी, नगरपालिका चौक, बिरदेव चौक, गणेश मंदीर, मरगुबाई देवालय, ठाणेकर चौक, सावरकर चौक, नुक्कड चौक, उत्कर्ष सामाजिक सेवा संघ, सणगर समाज, अॅक्टिव्ह ग्रुप, यंग स्पोर्ट्स, भारत तरुण मंडळ, युवा कला-क्रिडा आदी ठिकाणी मूर्ती विसर्जन पर्यावरणपूरक करण्यासाठी आवाहन करण्यात आले. त्यास नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. गणेश मंदीराजवळील तलावावर विसर्जन कुंड ठेवला होता. शहरातील अडीच ते तीन हजार गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. पेठवडगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप काळे यांनी बंदोबस्त तैनात केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी एकाला अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी एकावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रसाद अनिल मोहिते (वय १९ रा. दत्तनगर गल्ली नं. १२) असे संशयित आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

दत्तनगर कबनूर परिसरात संशयित आरोपी प्रसाद हा पीडित मुलीच्या शेजारीच राहण्यास आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास पीडित मुलगी घरात एकटीच असल्याचे पाहून प्रसाद घरात शिरला. त्याने मुलीशी अश्लिल चाळे सुरू केले. भेदरलेल्या मुलीने आरडाओरडा केल्याने शेजारचे नागरिक जमा झाले. घडलेल्या घटनेची माहिती समजताच नागरिकांनी प्रसादला पकडून बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. शिवाजीनगर पोलिसात त्याच्यावर बाललैंगिक अत्याचार कायदा व अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाण करणाऱ्या मुलास सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जमिनीची वाटणी देण्यास नकार देणाऱ्या वडिलांना ठार मारण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी रमेश रंगराव कांबळे (वय ३७, रा. गोलीवडे, ता. पन्हाळा) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.डी. शेळके यांनी पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. रंगराव कांबळे (७०) यांचे गावी घर व शेतजमीन आहे. कांबळे यांनी दुसऱ्या पत्नीच्या मुलीच्या विवाहासाठी २०१२ मध्ये एक एकर जमिनीवर दीड लाख रुपयांचे कर्ज काढले होते. त्यामुळे रंगराव कांबळे यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा रमेश याने वडलांच्याकडे घर व जमीन नावावर करुन देण्यासाठी तगादा लावला होता. या कारणावरुन त्यांच्यात सतत वाद व भांडणे होत होती. आठ जानेवारी २०१३ रोजी रमेश याने वडिलांच्या पाठीवर, कमरेवर, हातावर, पायावर कुळवाच्या लोखंडी फासाने जबर मारहाण केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बावड्यात चाकूहल्ला

$
0
0

कसबा बावडा

दत्त मंदिर रोड, कसबा बावडा येथे किरकोळ कारणावरुन झालेल्या चाकूहल्ल्यात प्रकाश भूपाल चव्हाण (वय ४६, रा. कसबा बावडा) गंभीर जखमी झाले. जखमी चव्हाण यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयितास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सदर बाजार परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा संशयित ओंकार उर्फ भूकंप आनंदा दाभाडे (वय १९) याला शाहूपुरी पोलिसांनी मंगळवारी पन्हाळा तालुक्यातील सातवे सावर्डे येथे अटक केली. कोर्टाने त्याला पाच दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. संशयित दाभाडे याने शनिवारी (ता. १५) अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. या मुलीला आई वडील नसून ती आजीसमवेत राहते. अत्याचारानंतर मुलगी रडू लागल्यावर या प्रकाराला वाचा फुटली. परिसरातील नागरिकांनी थेट शाहूपुरी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून संशयिताला अटक करण्याची मागणी केली. निरीक्षक संजय मोरे यांनी दोन पथके नियुक्त करुन संशयितांचा शोध घेतला. संशयित दाभाडे हा सहा महिन्यांपूर्वी सदर बाजार परिसरात रहायला आला होता. घटनेनंतर तो व त्याच्या कुटुंबियांनी घराला कुलूप घालून पलायन केले होते. दाभाडे हा नातेवाईकांकडे असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला सातवे सावर्डे येथून अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाणीत जखमी

$
0
0

कोल्हापूर

लक्ष्मीपुरी येथे रिलायन्स मॉल परिसरात पूर्ववैमनस्यातून रॉडने केलेल्या मारहाणीत फय्याज सलीम अन्सारी (वय २५, रा. शाहूपुरी) हा युवक जखमी झाला. सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फय्याज याचा दोन महिन्यांपूर्वी इस्माईलशी वाद झाला होता. सोमवारी दुपारी रिलायन्स मॉलजवळ फय्याज व त्याचे दोन सहकारी थांबले होते. तिघांनी इस्माईलला अडवत जुन्या वादाचा विषय काढून मारहाण केली. यावेळी इस्माईलने फय्याजच्या डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने तो जखमी झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन मंडळाच्या मंडपांवर कारवाई

$
0
0

कोल्हापूर

हायकोर्टाच्या निर्देशानुसार नियमाचे उल्लंघन करणाऱ्या तीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांवर महापालिकेने कारवाई केली. लक्ष्मीपुरी व आझाद गल्ली येथील मंडपांवर कारवाई करताना काहीकाळ तणाव निर्माण झाला. पण पोलिस बंदोबस्तात महापालिकेने कारवाई केली. रात्री उशीरापर्यंत लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कटाच्या सूत्रधारांना अटक करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या संशयितांना मदत करणाऱ्या व कटाच्या सूत्रधारांना अटक करावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे व शहर सचिव अनिल चव्हाण यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. हत्येतील संशयितांच्या २५ सहकाऱ्यांचे कोल्हापुरात वास्तव्य होते. संशयितांना नोकरी देणाऱ्या, फ्लॅट भाड्याने देणाऱ्या उद्योगपती व शिक्षण संस्थाचालकांची पोलिसांनी दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे.

पत्रकात म्हटले आहे , पानसरे हत्येचा कट पाच वर्षांपूर्वी कोल्हापूर रचला गेला होता, अशी माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिल्याचे उघड झाले आहे. पानसरे हत्येच्या कटामध्ये कोणती धर्मद्रोही, राष्ट्रद्रोही संघटना सामील आहे याचा तपास करणे आवश्यक आहे. कटामधील संशयित कोल्हापुरातील कारखान्यात नोकरीस होते. त्यांच्याकडे त्यांचे २५ साथीदार येत जात असत अशी माहिती समोर आली आहे. संशयितांना मदत करणाऱ्या उद्योगपती व शिक्षण संस्थाचालकांनी त्यांना नोकरीवर ठेवण्यासाठी मदत केली होती का तसेच त्यांना भाड्याने फ्लॅट देण्यासाठी मदत केली होती का याची पोलिसांनी दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मल्टिस्टेट याचिकावर आज सुनावणी

$
0
0

'मल्टिस्टेट' याचिकेवर

आज सुनावणी

कोल्हापूर

जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळच्या मल्टिस्टेट निर्णयाच्याविरोधात दोन याचिकांवर मंगळवारी (ता.१८) सहकार कोर्टात सुनावणी होणार आहे. सर्वसाधारण सभेची तारीख बदलल्याची नोंद याचिकेत करण्यात आल्याने सोमवारी होणारी सुनावणी मंगळवारी घेण्यात येणार आहे. मल्टिस्टेटचा (बहुराज्यीय सहकारी संस्थांचा कायदा) निर्णय आवाजी मतदानाने घेतला जाणार असल्याने दूध उत्पादकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यासाठी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात यावे, या मागणीसाठी काही दूध संस्थांनी याचिका दाखल केली आहे. तसेच मल्टिस्टेटचा निर्णय घटनाविरोधी असल्याने या निर्णयालाही आव्हान देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोटीतीर्थ येथे विसर्जनानंतर प्रमाणपत्र

$
0
0

कोटीतीर्थ येथे विसर्जनानंतर प्रमाणपत्र

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोटीतीर्थ तलाव येथे गणरायाची विधीवत पूजा झाल्यानंतर छोट्या काहिलींमध्ये विसर्जन करण्यात आले. मूर्तीदान केलेल्या भाविकांची नोंद करुन शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभाग व महापालिकेकडून भाविकांना प्रमाणपत्र देवून गौरव केला जात होता. कोटीतीर्थ तलावावर जल्लोषपूर्ण वातावरणात आणि ढोलताशांच्या गजरात भाविक कुटुंबासह दाखल होत होते. भाविकांनी तलावात मूर्ती विसर्जन न करता काहिलीमध्ये करण्यासाठी नारायणदास मठ व स्वामी समर्थ मंदिराशेजारी प्रत्येकी दोन काहिली ठेवल्या होत्या. काहिलीमध्ये भाविकांनी मूर्ती विसर्जीत करत उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पी. डी. राऊत, सेव्ह कोल्हापूरचे सुरेश मिरजकर यांच्यासह विद्यार्थी व महापालिका कर्मचारी भाविकांना मूर्तीदान करण्याचे आवाहन करत होते.

प्रचंड वाहतूक कोंडी

कोटीतीर्थ तलावावर मूर्ती विसर्जनासाठी नागरिक मोठ्या संख्येने येतात. तलावाकडे येणारा शाहू मील व उद्यमनगर येथील रस्ता बॅरिकेड्स लावून वाहतुकीसाठी बंद केला होता. परिणामी भाविकांनी तलावापासून लांब वाहनांचे पार्किंग केले. पण अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत होती. वाहतूक पोलिस वाहनचालकांना सूचना करीत होते. मात्र त्याकडे वाहनधारकांनी दुर्लक्ष केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जावयाकडून सासऱ्याचा खून

$
0
0

इचलकरंजीतील घटना

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

कौटुंबिक कलहाच्या वादातून जावयाने मागाचा मारा व खुरप्याने सशस्त्र हल्ला करत सासऱ्याचा खून केला. तर सासू व पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना जवाहरनगर परिसरातील कोरवी गल्लीत सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. धोंडीराम मारुती रावण (वय ५५) असे मृताचे नाव असून सासू राधा रावण व पत्नी रुपाली पाटील यांची प्रकृती गंभीर आहे. घटनेनंतर जावई अजित बाळासो पाटील हा फरार झाला असून या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.

येथील जवाहरनगर परिसरात राहण्यास असलेल्या धोंडीराम रावण यांची मुलगी रुपाली हीचा दहा वर्षापूर्वी अजित पाटील याच्याशी विवाह झाला. या दाम्पत्याला पाच वर्षांची मुलगी आहे. विवाहानंतर अजित व रुपाली यांच्यात कौटुंबिक कारणातून सतत वाद झडत होते. त्यातूनच रुपाली ही माहेरी राहण्यास आली होती. तर अजित हा मूळचा कर्नाटकातील असून काही वर्षांपासून इचलकरंजीत वास्तव्यास आहे. काही वर्षे तो मुंबईत रहात होता. तेथे तो एका राजकीय पक्षाचा शाखाप्रमुखही होता. काही महिन्यांपूर्वी तो सासरे धोंडीराम रावण यांच्या घराशेजारीच भाड्याच्या खोलीत राहण्यास आला होता. सोमवारी पहाटेच्या सुमारास अजित हा रावण यांच्या घरात शिरला. झोपेत असणारे सासरे धोंडीराम यांच्यावर खुरप्याने आणि मागाच्या माऱ्याने त्याने हल्ला चढविला. त्यामध्ये धोंडीराम यांच्या डोक्यावर व मानेवर वर्मी घाव बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. आवाज ऐकून मदतीसाठी आलेल्या सासू राधा व पत्नी रुपाली यांच्यावरही अजितने हल्ला केला. दोघेही जखमी होऊन बेशुध्द पडल्या. या घटनेची माहिती भागातील नागरिकांनी धोंडीराम यांचा मुलगा प्रदीप याला दिल्यानंतर त्याने नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच धोंडीराम यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. तर राधा व रुपाली यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले .

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रज्ञा चव्हाण यांनी धाव घेतली. अप्पर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, पोलिस उपअधिक्षक धीरज पाटील, पोलिस निरिक्षक पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. हल्ल्यानंतर अजित हा फरारी झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुढच्या वर्षी लवकर याऽऽऽ

$
0
0

विघ्नहर्त्या गणरायाला निरोप, मुर्तीदान आवाहनास प्रतिसाद

म. टा. वृत्तसेवा,जयसिंगपूर

गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ पुढच्यावर्षी लवकर याऽऽऽ असा जयघोष करीत जयसिंगपूर व परिसरात घरगुती गौरी व गणपतींचे विसर्जन करण्यात आले. पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत भाविकांनी मुर्ती दान केली. विघ्नहर्त्या श्री गणरायाला निरोप देण्यासाठी अंकली पुलाजवळ कृष्णा नदीकाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती.

पाच दिवस श्री गणरायाची भक्तीभावाने पुजा-अर्चा केल्यानंतर जयसिंगपुरात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. रेल्वे स्थानकाच्या नजीकच्या विहिरीत तसेच अंकली पुलाजवळ कृष्णा नदीपात्रात आणि नृसिंहवाडी येथे कृष्णा नदीपात्रात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

अंकली पुलाजवळ कृष्णा नदीपात्रात मूर्ती विसर्जानासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली होती. पुलावर संभाजीपूर तसेच उदगाव ग्रामपंचायतीचे कर्मचारी भाविकांकडून निर्माल्य संकलित करीत होते. नदीकाठी आरती करुन 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असा जयघोष करीत विघ्नहर्त्या गणरायाला निरोप देण्यात आला. नदीकाठी मूर्ती विसर्जानासाठी तराफा ठेवण्यात आला होता. उदगांव येथील ड्रिम इंडिया फौन्डेशन तसेच ग्रामपंचायतीच्यावतीने मूर्ती व निर्माल्य दान करण्याचे आवाहन करण्यात आले. यास गणेश भक्तांनी प्रतिसाद दिला. मुर्ती विसर्जनासाठी नदीकाठी कुंड तयार करण्यात आले होते.

गणेश मूर्ती विसर्जनासाठी नागरिकांनी गर्दी केल्याने कृष्णाकाठ फुलून गेला होता. याठिकाणी आपत्कालीन व्यवस्थाही तैनात ठेवण्यात आली होती. पोलिसांनी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी नियोजन केले होते. जयसिंगपूर नगरपालिकेबरोबरच रोटरॅक्ट क्लबच्यावतीने जयसिंगपूर रेल्वेस्थानक नजीकच्या सरकारी विहिरीजवळ निर्माल्य व मूर्ती दानाचे आवाहन करण्यात आले. यास नागरिकांनी प्रतिसाद दिला. याठिकाणी ठेवलेल्या काहिलीत काही भाविकांनी मूर्तीचे विसर्जन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

... अन् मोतीबाग तालीमही गहिवरली

$
0
0

लाडक्या वस्तादाला निरोप देताना पैलवानांना अश्रू अनावर

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आयुष्यभर लाल मातीशी इमान राखलेले हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर अखेरच्या प्रवासाला कायमचे निघून गेले. ज्या मातीत आणि वास्तूत आपली जडणघडण झाली त्या मातीला, तालमीला नमस्कार करण्याची त्यांची अखेरची इच्छा होती. हिंदकेसरी, अर्जुन पदकाला गवसणी घालताना याच लाल मातीने त्यांना बळ दिले होते. त्यांच्या निधनानंतर पार्थिव मोतीबाग तालमीत आणून आखाड्यातून फिरवण्यात आले. आपल्या लाडक्या वस्तादाला निरोप देताना मोतीबाग तालमीच्या भिंतीही गहिवरल्या होत्या.

हिंदकेसरी आंदळकर यांचे रविवारी रात्री पुण्यात निधन झाले. पार्थिव मूळ गावी पुनवत येथे नेण्याआधी कोल्हापुरात अंत्यदर्शनसाठी आणण्यात आले. आंदळकर यांच्या निधनाची बातमी समजताच मोतीबाग तालमीत आक्रोश सुरु झाला. अनेक पैलवानांनी अन्नाचा कणही न शिवता रात्र जागून काढली. 'वस्ताद', 'आबा' अशी लाडकी बिरुदे घेऊन आयुष्यभर विनम्रतेने जगलेल्या आंदळकर आबांचा सर्वच वयोगटातील पैलवानांना लळा होता. कुस्तीत नाव कमवायला आलेल्या कितीतरी नवोदित पैलवानांच्या आयुष्याला त्यांनी आकार दिला होता. वय, दोन पिढ्यातील अंतर सोडून त्यांची नव्या पोरांशी सलगी होती. व्यक्तिमत्वातला रुबाब, देखणं रूप आणि आभाळाएवढे यश मिळवूनही असलेली त्यांच्यातील विनम्रता तरण्याबंड पैलवानांना भावत असे.

आंदळकर आबांचा तालामीतील सहवास कित्येकांना सुखावणारा ठरत असे. शारीरिक व्याधींशी झगडतानाही आबांचा उत्साह कायम होता. नव्या ताकदीचे, नव्या दमाचे पैलवान तयार व्हावेत यासाठी तब्येत बरी नसतानाही ते तालमीत येत होते. शरीर थकलं तरी त्यांच्या मनाची उर्जा कायम होती. वैद्यकिय उपचारासाठी आंदळकर यांना पुण्याला हलवण्यात आले. काहीकाळ स्मृतिभ्रंशाने त्यांना काही आठवायचे नाही. आंदळकर आबांनी आपल्याला ओळखावे यासाठी तालमीतील पैलवान धडपडायचे. त्यांच्या सहवासात फुललेले क्षण सांगून त्यांना आठवण करू द्यायचे. कित्येक वादळं आली तरी नव्या पिढीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आबा आता कायमचे जाणार असल्याने तालमीच्या वास्तूसह सारेच आक्रोश करत होते.

....................

हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

हिंदकेसरी आंदळकर यांचे पार्थिव भवानी मंडपात आणताच 'ये आबा...!' म्हणून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या पैलवानांसह चाहत्यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यांच्या पार्थिवाला नमस्कार करून अनेकजण हमसून रडत होते. हजारोंच्या गर्दीतही ते हुंदके कानावर पडत होते. एक आजीबाई तर 'आता आबा माझ्याकडं कसा जेवायला येणार' म्हणून रडत होती. यशाच्या उंचीवर जाऊनही माणूसपण जपणाऱ्या आंदळकर आबांना निरोप द्यायला जनसागर लोटला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंत्यदर्शनासाठी कुस्तीप्रेमींची अलोट गर्दी

$
0
0

आंदळकर यांची फुलांनी सजवलेल्या रथातून अंत्ययात्रा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'अमर रहे, अमर रहे हिंदकेसरी गणपतराव आंदळकर अमर रहे'..! अशा घोषणांनी भवानी मंडपातील न्यू मोतीबाग तालीम परिसर दणाणून गेला. हिंदकेसरी आंदळकर यांच्या अंत्यदर्शनासाठी हजारोंच्या संख्येने कुस्तीप्रेमींसह मान्यवरांनी गर्दी केली होती. मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, महानगरपालिका, सीपीआर, दसरा चौक मार्गावर फुलांनी सजवलेल्या रथातून अंत्ययात्रा काढण्यात आली.

रविवारी रात्री पुण्यात हिंदकेसरी आंदळकर यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी पुनवत (ता. शिराळा) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी सोमवारी (ता.१७) सकाळी पार्थिव अंत्यदर्शनसाठी कोल्हापुरात आणण्यात आले. कुस्तीप्रेमींनी त्यांच्या छत्रपती पार्क शंभरठाणा परिसरातील निवासस्थानी अंत्यदर्शनसाठी गर्दी केली होती. पुण्याहून येताना गावोगावी अंत्यदर्शनासाठी नागरिक थांबल्याने पार्थिव कोल्हापुरात पोहचायला पाच तासांचा वेळ लागला. दुपारी साडेबारा वाजता हिंदकेसरी आंदळकर यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. आंदळकर यांच्या पत्नी सुमित्रा, मुलगा अभिजित, सून ममता, नातवंडे ऐश्वर्या, आदेश व अन्य नातेवाइकांसह उपस्थितांनी अंत्यदर्शन घेतले. यावेळी महापौर शोभा बोंद्रे, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी.एन. पाटील, आमदार चंद्रदीप नरके, महाराष्ट्र केसरी शिवाजीराव पाचपुते, नगरसेवक राजाराम गायकवाड उपस्थित होते.

त्यानंतर त्यांचे पार्थिव भवानी मंडपातील न्यू मोतीबाग तालमीत आणण्यात आले. यावेळी जिल्ह्यासह सांगली, सातारा जिल्ह्यातून आलेल्या कुस्तीशौकीनांनी अंत्यदर्शन घेतले. याप्रसंगी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख अभिनव देशमुख, महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते वसंत पाटील सोनवडेकर, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग, कर्नाटक केसरी आप्पा बेळगावकर, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, आंध्र केसरी शंकर पैलवान, महाराष्ट्र केसरी आप्पा कदम, नगर केसरी सुभाष लोंढे, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, नगरसेवक संदीप नेजदार, राहुल माने, प्रकाश चांदुगडे, विजय सिंग, व्ही. बी. पाटील, वस्ताद रसूल हनिफ, माजी महापौर भिकशेठ पाटील, पांडुरंग पाटील-चिखलीकर, महाराष्ट्र चॅम्पियन बाजीराव चौगुले, राष्ट्रवादीचे शहरध्यक्ष आर. के. पोवार, हिंदुराव घाटगे, श्रीपती म्हाकवेकर, आप्पा करजगे, बाळू पाटील- कुडित्रेकर, पी. जी. पाटील, बी. टी. भोसले, दुर्गासिंग लडू, रावसाहेब तनपुरे, दिलीप टोणपे, नामदेव मोहिते आदींनी अंत्यदर्शन घेतले.

.............

गदेची साथ कायम ..

पैलवानासाठी गदा मानाची समजली जाते. हिंदकेसरी आंदळकर यांच्या शंभरठाणा परिसरातील निवासस्थानी अंत्यदर्शनावेळी त्यांच्या उशाशी हिंदकेसरी आणि महाराष्ट्र केसरीच्या विजयानंतर मिळालेल्या गदा ठेवण्यात आल्या होत्या. अखेरच्या प्रवासातही सोबत असलेल्या गदा पाहून उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गव्याचे मारेकरी मोकाटच

$
0
0

तपास पथक हतबल, भुदरगड, राधानगरी वन्यक्षेत्रात गस्त वाढवली

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भुदरगड तालुक्यातील केडगे गावच्या हद्दीत दोन आठवड्यांपूर्वी गवा संशयास्पद स्थितीमध्ये मृत्यूमुखी पडलेला आढळला होता. याबाबत चौकशीसाठी पथकाची नियुक्ती करण्यात आली. मात्र पथकास या प्रकरणाचा छडा लावण्यात अपयश आले. गव्याचे मारेकरी मोकाटच राहिले आहेत. दरम्यान, यापुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी राधानगरी, पन्हाळा, भुदरगड परिसरातील वनक्षेत्रात रात्रभर गस्त वाढवण्यात आली आहे.

केडगे जवळच्या हद्दीतील वनजमिनीत ६ सप्टेंबरला परिसरातील रहिवाशी, वन प्रशासनास गवा मृतावस्थेत आढळला होता. मृत गव्याचे खुर, मांस, शिंग काढून नेण्यात आले होते. केवळ सांगाडा शिल्लक होता. यावरून शिकारीच्या उद्देशानेच त्याला मारले असावे, असा संशय वन अधिकाऱ्यांना आला. त्या दिशेने तपास करण्यासाठी उपवनसंरक्षक सतीश धुमाळ यांनी पथकाची नियुक्ती केली. सात दिवसात अहवाल देण्याचा आदेश देण्यात आला. त्यानंतर पथकाने परिसरातील काही परवानाधारक बंदुकधारी लोकांकडे चौकशी केली. पण गव्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, हे उघडकीस आणता आले नाही.

नैसर्गिक मृत्यू झाल्यास गव्याचे सर्व अवयव अस्तित्वात असणे गरजेचे असते. मात्र या प्रकरणात ज्या अवयवाची तस्करी होते, ते अवयव काढले आहेत. त्यामुळे गव्याची शिकारच झाल्याचा दावा वनमित्र, निसर्गप्रेमींचा आहे. वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनाही याचाच संशय आहे. मात्र शिकार केलेल्यांपर्यंत त्यांना पोहचता येत नसल्याचे चित्र आहे. मारेकऱ्यांचा शोध घेण्यासंबंधी स्थानिक वन प्रशासन उदासीन दिसत आहे. यामुळे आणखी काही दिवसांनी गवा प्रकरणाची फाईल बंद होईल. मारेकारी मोकाटच राहतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

-------------------------

'गवा मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी पथकाची नियुक्ती केली होती. अद्याप संशयीत आरोपी सापडलेले नाहीत. नेमक्या कोणत्या कारणाने त्याचा मृत्यू झाला असावा, त्याचा शोध घेतला जात आहे. यापुढे असे प्रकार होऊ नयेत, यासाठी वनक्षेत्रात गस्त वाढवली आहे.

सतीश धुमाळ, उपवनसंरक्षक

--------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदळकरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शिराळा

हिंदकेसरी, अर्जुनवीर पैलवान गणपतराव आंदळकर यांच्यावर त्यांच्या मूळ गावी पुनवत, ता. शिराळा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र अभिजित यांनी पार्थिवाला भडाग्नी दिला आणि हजारो कुस्तीशौकिन आणि त्यांच्या चाहत्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. पोलिसांनी बंदुकीच्या तीन फैऱ्या झाडून त्यांना सलामी दिली. अंत्यदर्शन आणि अंत्यविधीसाठी राजकीय, कुस्ती क्षेत्र, कला, क्रिडा तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, दुपारी तीनच्या सुमारास कोल्हापुरातून त्यांचे पार्थिव आणण्यात आले. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या रथात ठेवून गावातील प्रमुख मार्गावरुन टाळ मृद्ंग आणि 'राम कृष्ण हरी'च्या गजरात अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातील व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 'हिंदकेसरी अर्जुनवीर गणपतराव आंदळकर विद्यालया'च्या पटांगणात काही काळ पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यांनतर गावच्या पूर्वेला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

महाराष्ट्रासह उत्तर भारतातील कुस्तीगीर तसेच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख, अमरसिंह नाईक, सम्राट महाडिक, सम्राटसिह नाईक, उदयसिंगराव नाईक, अभिजित पाटील, सुखदेव पाटील, के. डी. पाटील, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, ऑलम्पिकवीर बंडा नाना पाटील, आंतरराष्ट्रीय कोच आनंदराव धुमाळ, महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, उपमहाराष्ट्र केसरी संपतराव जाधव, भीमराव माने, महाराष्ट्र केसरी बापू लोखंडे, महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड, अर्जुनवीर पुरस्कार विजेते काका पवार, दिलीप महान, माणिक पवार, सरपंच विजय कोळेकर, उपसरपंच सुखदेव कोळेकर, उपमहाराष्ट्र केसरी नामदेव भोसले, तानाजी सोरटे, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग, तहसीलदार शीतलकुमार यादव, नायब तहसीलदार राजाराम सिद, वाळवा विभागाचे पोलिस उपअधीक्षक किशोर काळे, पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांनी अंत्यदर्शन घेतले.

पुनवत परिसरात सोमवारी सकाळपासूनच कर्नाटक, नगर, विदर्भ, मराठवाडा, सोलापूर, सातारा, पुणे तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून कुस्तीशौकीन तसेच आंदळकर यांचे शिष्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख, सुखदेव पाटील, के. डी. पाटील, पै. आप्पासाहेब कदम, विष्णू जोशीलकर, काका पवार, आनंदा धुमाळ, धनाजी पाटील, सुधीर पवार (सातारा) संपतराव जाधव राम सारंग, सत्यजित देशमुख, माजी आमदार बाबासाहेब पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. विजयकुमारांवर निलंबानाची कारवाई शक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सांगलीतील बेकायदा गर्भपात प्रकरणी डॉ. रुपाली चौगुले यांचे पती व गारगोटी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयकुमार चौगुले यांच्यावरील कारवाईच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. बेकायदा गर्भपात, सरकारी सेवेत असताना खासगी प्रॅक्टीस या कारणाखाली त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते असे आरोग्य विभागाकडील सूत्राकडून समजते.

ग्रामीण रुग्णालये ही आरोग्य विभागाच्या अखत्यारित येतात. डॉ. विजयकुमार चौगुले हे गारगोटी येथील ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी आहेत. मात्र बहुतांश वेळेला ते नोकरीच्या ठिकाणाऐवजी सांगली येथील चौगुले मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टीस करत असल्याच्या तक्रारी आहेत. गर्भपात प्रकरणी चौगुले पती, पत्नींच्या विरोधात वैद्यकीय गर्भपात प्रतिबंधक कायद्यातंर्गत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या साऱ्या प्रकाराची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे.

कोल्हापूरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. एस. केम्पीपाटील यांनी डॉ. विजयकुमार चौगले यांच्यावरील पोलिस कारवाई, आरोग्य विभागाचा अहवाल यासंदर्भात माहिती मागिवली आहे. महापालिका आरोग्य अधिकारी व पोलिस प्रशासनाचा कारवाई अहवालासाठी एक वैद्यकीय अधिकारी सांगलीत जाऊन माहिती घेणार आहे. मंगळवारी हा अहवाल उपलब्ध होईल. या संपूर्ण प्रकाराची माहिती आरोग्य उपसंचालक कार्यालयामार्फत सरकारच्या आरोग्य विभागाकडे करण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर आरोग्य विभागाकडून डॉ. चौगुले यांच्यावर कारवाई होऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदगड तालुका शासकीय व निमशासकीय अधिकारी पतसंस्था

$
0
0

चंदगड तालुका कर्मचारी

पतसंस्थेला जिल्हा कार्यक्षेत्र

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'चंदगड तालुका शासकीय, निमशासकीय अधिकारी कर्मचारी पतसंस्थेच्या कार्यक्षेत्र विस्ताराच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. नजीकच्या काळात पतसंस्थेचे कार्यक्षेत्र जिल्हाभर पसरणार आहे' अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष भरमाजी पाटील यांनी दिली. पतसंस्थेची २० वी वार्षिक सर्वसाधारण झाली.

अध्यक्ष पाटील म्हणाले, 'संस्थेला आठ लाख हजार इतका नफा झाला आहे.सभासदांना दहा टक्के लाभांश दिला जाईल. येत्या वर्षभरात पतसंस्थेची स्वमालकीची इमारत उभारण्यात येणार आहे.'याप्रसंगी राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस को ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष प्रकाश पाटील व उपाध्यक्ष भरत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सचिव रवींद्र जांभळे यांनी अहवाल वाचन केले. संस्थेचे उपाध्यक्ष सिताराम दळवी, संचालक सदानंद जाधव, अशोक सरोळकर, भुजंगराव चौगुले, सिद्राय कोळी, संचालिका रेणुका चव्हाण, सुरेखा शेटवे, तज्ज्ञ संचालक शरद नाकाडी उपस्थित होते. संचालक जनार्दन राव यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुदरगडला मूर्तीदान उपक्रमास उस्फुर्त प्रतिसाद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

भुदरगड तालुक्यात गारगोटीसह ठिकठिकाणी घरगुती गणेशमूर्तींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला. गारगोटीत दरवर्षीप्रमाणे मूर्तीदान उपक्रमास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

सकाळी भुदरगड तहसीलदार कार्यालयातील गणेशमूर्ती गाव कामगार तलाठी राजेंद्र शिंदे यांनी दान केली. गारगोटीचे सरपंच संदेश भोपळे यांनी मूर्ती स्वीकारली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई उपस्थित होते. वेदगंगा नदीवरील दत्त मंदिर घाट, सोनाळी घाट, तुळशी घाट अशा तीन घाटांवर गणेशमूर्तींच्या संकलनाचे नियोजन करण्यात आले होते. त्यास गणेश भक्तांनी चांगला प्रतिसाद दिला. दान न केलेल्या मूर्ती पाण्याबाहेर काढण्याचे काम शिवाजी तरुण मंडळाचे कार्यकर्ते करत होते.

गारगोटी ग्रामपंचायतीने मूर्तीदान करण्याचे आवाहन केले होते. ग्रामपंचायतीचे कर्मचारी दिवसभर मूर्ती घेण्याच्या कामात व्यस्त होते. जुन्या गावासह शहरातील सुदर्शन नगर, अवधूत कॉलनी, सोनाळी, सरोजिनी कॉलनी, भक्ते कॉलनी, शिवाजीनगर , विकास कॉलनी, साई कॉलनी, कला नगर, मेन बाजारपेठ, मौनी विद्यापीठ, डी. वाय पाटील कॉलनी, इंजूबाई कॉलनी, के. डी. देसाई, रेखा नगर, पिसे कॉलनी, खडक गल्ली, गुरव गल्ली, निकाडे गल्ली, वाणी गल्ली, आझाद गल्ली, आदी ठिकाणी गणेशभक्त मूर्ती विसर्जनासाठी घेऊन येत होते. मूर्ती दान करा असे आवाहन करण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई, पंचायत समितीच्या सदस्या गायत्री भोपळे, सरपंच संदेश भोपळे, उपसरपंच सचिन देसाई, सदस्य जयवंत गोरे, प्रकाश वास्कर, अलकेश कांदळकर, सचिन देसाई, विजय कोटकर, राहुल कांबळे, अस्मिता कांबळे, सविता गुरव, सागर पाटील यांच्यासह कर्मचारी अविनाश साळवी, अशोक शिंदे, युवराज मुगडे, शामराव राऊत, सचिन वास्कर, दिपक वास्कर, अजित कांबळे, भीमराव शितोळे आदी कर्मचारी सहभागी झाले. टी. बी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो : १} गारगोटी येथील दत्त घाटावर कोल्हापूर उप मुख्यकार्यकारी अधिकारी सुषमा देसाई यांच्याकडे मूर्ती दान करताना गणेशभक्त सोबत सरपंच संदेश भोपळे, उपसरपंच सचिन देसाई, अलकेश कांदळकर आदी

२} तहसीलदार कार्यालयातील मूर्तीचे दान तलाठी राजेंद्र शिंदे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई, सरपंच संदेश भोपळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images