Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

चौगलेच्या हॉस्पिटलची झडती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगलीतील गणेशनगरमधील चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदेशीर गर्भपात केले जात असल्याचे उघडकीस आणून महापालिकेने तीन डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल करताच पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी या हॉस्पिटलची रविवारी झडती घेतली. स्वतंत्र पोलिस पथकाच्या माध्यमातून दिवसभर केलेल्या चौकशीत आणखी एक रजिस्टर पोलिसांच्या हाती लागले. त्यामध्ये कुटुंबनियोजनाच्या ४९ शस्त्रक्रिया केल्याचे समोर आले आहे.

सांगली महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कवठेकर यांच्या पथकाने चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदेशीर गर्भपाताचा प्रकार उघडकीस आणून शनिवारी रात्री उशीरा शहर पोलिस ठाण्यात तीन डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. यामध्ये डॉ. स्वप्नील जगवीर जमदाडे, डॉ. विजयकुमार शामराव चौगुले आणि त्याची पत्नी डॉ. रूपाली यांचा समावेश आहे.

मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील डॉ. खिद्रापुरेच्या भ्रूणहत्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवून दिली होती. त्यानंतरही सांगलीत डॉ. रुपाली चौगुलेनी वर्षभरापासून हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपात बेमालूमपणे सुरु ठेवल्याचे समोर आले. या प्रकरणी तपासाची सूत्रे हाती घेताच उपअधीक्षक वीरकर यांनी रविवारी सकाळी चौगुले हॉस्पिटलची झडती घेतली. दिवसभर केलेल्या तपासणीत औषधांच्या साठ्यासह काही संशयास्पद कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. त्या ठिकाणी काम करणाऱ्या तीन परिचारकांचीही चौकशी करण्यात आली.

दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाने शनिवारी हॉस्पिटलमधून गर्भपाताची १५ कीट, मुदतबाह्य औषधांचा साठा, कागदपत्रे, दारूच्या बाटल्या असे साहित्य जप्त केले. या औैषधांचा पुरवठा कोणी आणि कोणाच्या हवाल्याने केला, याचीही चौकशी केली जाणार आहे.

डॉ. जमदाडेच्या शोधासाठी पथक रवाना

चौगुले हॉस्पिटलवर आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर डॉ. रुपाली चौगुले चक्कर येवून पडल्या. ज्याच्या नावे हॉस्पिलट आहे तो डॉ. स्वप्नील जमदाडे मुंबईत असल्याचे समजते. तर संशयित डॉ. विजयकुमार चौगुले खासगी रुग्णालयात पोलिसांच्या पहाऱ्याखाली आहे. डॉ. जमदाडेचा अद्याप पत्ता लागलेला नसल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. दरम्यान, ' गर्भपातासाठी कर्नाटकसह कोल्हापूर, सांगलीतील केसेस समोर आल्या आहेत. कोणी एजंट डॉक्टरांच्या संपर्कात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसचे बाहेरून सोनोग्राफी करून त्या अहवालावरून या ठिकाणी गर्भपात होत असावा असे वाटते. त्यामुळे सखोल चौकशी केल्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल,' असे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२५ पासून बेमुदत कामबंद

$
0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता आठवड्यात न केल्यास २५ सप्टेंबरपासून राज्यात बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला. स्वामी विवेकानंद कॉलेजच्या बापूसाहेब साळुंखे स्मृतिभवन सभागृहात रविवारी झालेल्या शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) मेळाव्यात निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी 'सुटा'चे अध्यक्ष डॉ. आर. एच. पाटील होते. प्रमुख पाहुणे माजी शिक्षक आमदार बी. टी. देशमुख होते.

देशमुख म्हणाले, 'देशातील १४ राज्यांतील प्राध्यापकांना सहाव्या वेतन आयोगातील थकीत रक्कम मिळाली, तर १५ राज्यांतील प्राध्यापकांना मिळाली नाही. महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशनच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील शिक्षकांना वेतन आयोगातील फरक मिळाला. पण देशाचे शिक्षणमंत्री अर्धवट माहितीच्या आधारे खोटी माहिती देत आहेत. परिणामी राज्यकर्त्यांच्या कृपेवर शिक्षकांच्या मागण्या मान्य होणार नसून, त्यासाठी महासंघाची ताकद दाखवावी लागेल. अपुऱ्या मनुष्यबळामुळे शिक्षकांवर कामाचा ताण पडत आहे, पण हे राज्यकर्त्यांना कळत नाही का? मराठी विषयाच्या शिक्षकांनी इतिहास विषयाचे अध्ययन करायचे का?'

ते पुढे म्हणाले, 'नेट-सेट आणि पीएचडी पदवीधारक शेकडो शिक्षक आहेत. पण सरकारने शिक्षकांची भरती बंद केल्याने या सर्वांवर पात्रता असूनही बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयानुसार केंद्र व राज्य सरकारच्या सर्व विभागांमध्ये पदभरती केलेली असताना, शिक्षण क्षेत्रात मात्र भरती प्रक्रिया राबविलेली नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाने २०११ मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी पत्रव्यवहार करूनही जागा भरत नसल्याने आंदोलनाच्या माध्यमातूनच शिक्षकांचा प्रश्न सोडवावा लागेल.'

प्रास्ताविकात आंदोलनाचा आढावा घेताना प्रा. सुभाष जाधव म्हणाले, 'शिक्षकांचे आंदोलन चिरडण्यासाठी राज्य सरकारने ७१ दिवसांचे वेतन दिले नाही. पण यामुळे आंदोलनाची धार कमी होणार नाही. सरकारविरोधात टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू असून आंदोलनाचा सहावा टप्पा म्हणून बेमुदत काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.'

मेळाव्यास डॉ. ईला जोगी, प्रा. डॉ. अरुण पाटील, प्रा. डॉ. ए. बी. पाटील, प्रा. डॉ. आर. के. चव्हाण, प्रा. डॉ. सुधाकर मानकर, प्रा. एस. जी. पाटील, प्रा. टी. व्ही. स्वामी, डॉ. एन. के. मुल्ला यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील प्राधापक उपस्थित होते. कार्यवाह प्रा. डॉ. डी. एन. पाटील यांनी स्वागत केले.

०००

ही तर सरकारची हुकूमशाही

सरकारच्या धोरणाविरोधात आणि आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शिक्षकांनी असहकार आंदोलन केले. मार्च २०१३ मध्ये झालेल्या आंदोलनातील सहभागी शिक्षकांचे ७१ दिवसांचे वेतन रोखले आहे. सरकार कारवाईचा बडगा उगारून शिक्षकांचे मनोबल खच्चीकरण करत आहे. सरकारची ही असंवैधानिक व हुकूमशाही वृत्ती असल्याचे प्राध्यापकांचे मत बनले आहे.

०००

शिक्षकांच्या प्रमुख मागण्या...

नोकरभरतीवरील बंदी उठवावी

प्राध्यापकांचे ७१ दिवसांचे प्रलंबित वेतन द्यावे

सातव्या वेतन आयोगातील शिफारसी लागू कराव्यात

नवीन पेन्शनयोजना बंद करून पूर्वीचीच सुरू करावी

विनाअनुदानित महाविद्यालयांतील शिक्षकांना कोर्टाच्या निर्देशानुसार वेतन द्यावे

अर्हताप्राप्त कंत्राटी शिक्षकांना सेवेत कायम करावे

युजीसीच्या नियमाप्रमाणे सर्व शिक्षकांचे वय वाढवून द्यावे

००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूर्ती-निर्माल्यदानसाठी २६ ठिकाणी सुविधा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आज होणाऱ्या घरगुती गौरी-गणपती विसर्जनासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. पर्यावरणपूरक मूर्ती व निर्माल्यदान उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी २६ ठिकाणी विसर्जन कुंड व काहिली ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी अग्निशमन, पवडी, आरोग्य व इतर विभागेच सुमारे ५०० कर्मचारी तैनात राहणार आहेत.

महापालिकेने पंचगंगा घाट, रंकाळा, कोटीतीर्थ, राजाराम तलावाबरोबर शहरासह उपनगरांमध्ये विसर्जनाची सुविधा निर्माण केली आहे. यासाठी कृत्रिम कुंड निर्माण केले आहेत. भाविकांनी दान केलेल्या मूर्ती सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून इराणी खण येथे विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे. भाविकांनी दिलेले निर्माल्य आरोग्य विभागाच्या १२ पथकांच्या मार्गदर्शनाखाली ३०० कर्मचारी एकत्र करचीसल. निर्माल्यापासून खत तयार करण्यात येणार आहे. वाशी येथील 'एकटी' संस्थेकडे निर्माल्य सुपूर्द करण्यात येणार आहे. भाविकांनी दरवर्षीप्रमाणे मूर्ती व निर्माल्यदान उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बकासूर वध, बाप्पाचे लग्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कलात्मक आणि आकर्षक गणेशमूर्ती हे मंगळवार पेठेचे उत्सवातील वैशिष्ट्य. यंदाही ही परंपरा जपत प्राचीन काळातील मूर्ती, सजीव देखाव्यांची येथे रेलचेल आहे. प्रिन्स क्लबने विवाह संस्थांवर भाष्य करणारा प्रबोधनात्मक देखावा केला आहे. तर राधाकृष्ण भक्त मंडळाने बकासूर राक्षसाचा वध करणारा गणेश असा देखावा तयार केला आहे.

मंगळवार पेठेतील जय पद्मावती तरुण मंडळ, राधाकृष्ण तरुण मंडळ, रॅश ग्रुप माळी गल्ली, मॉडर्न स्पोर्टस क्लब, कलकल तरुण मंडळाच्या आकर्षक व कलात्मक गणेशमूर्ती नागरिकांच्या आकर्षण ठरतात. राधाकृष्ण भक्त मंडळाने 'बकासूर वध' करणारा श्रीगणेश या विषयावर देखावा करत वेगळेपण जपले आहे. महाभारतकालीन विषयावर आधारित हा देखावा आहे. कलकल तरुण मंडळाची अष्टभूजाधारी व त्रिमुखी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. दिलबहार तालीम मंडळाची आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई आणि दख्खनचा राजा गणेश असा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाच्या मूर्तीच्या दर्शनासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. पाटाकडील तालीम मंडळाची मूर्ती आकर्षण ठरत आहे. मंगळवार पेठेत सजीव देखाव्यांची परंपरा आहे. ज्वलंत विषयावर विनोदी ढंगाने भाष्य करणाऱ्या नाटिकांच्या तालमी सुरू आहेत.

चला गणपती बाप्पांच्या लग्नाला

खासबागेतील प्रिन्स क्लबने 'चला गणपती बाप्पांच्या लग्नाला' या विषयावर प्रबोधनात्मक देखावा तयार केला आहे. मंडळाचे ४२ वे वर्ष आहे. लग्न समारंभावरील अनावश्यक खर्च, लग्नासारख्या पवित्र सोहळ्यातील हुल्लडबाजी या विषयावर प्रकाशझोत टाकला आहे. यात गणपतीबाप्पा हे नवरदेवाच्या भूमिकेत आहेत. फायबरची सहा फूट उंचीची मूर्ती वरमाला घेऊन मंडपात प्रवेश करते आणि लोकांचे प्रबोधन करते असा देखाव्याचा विषय आहे. बुधवारपासून देखावा खुला होईल. मंडळातर्फे नेत्रदानविषयी प्रबोधन सुरू आहे अशी माहिती मंडळाचे सदस्य अशोक पोवार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरगुती गणरायाला आज निरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाच दिवसांच्या थाटामाटाच्या वास्तव्यानंतर घरगुती गौरी-गणपतींना सोमवारी (ता. १७) निरोप देण्यात येणार आहे. लाडक्या बाप्पाला वाजतगाजत निरोप देण्यासाठी रविवारी घरोघरी तयारी सुरू होती. महापालिका प्रशासनानेही पर्यावरणपूरक उत्सवासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. शहर आणि परिसरात ठिकठिकाणी विसर्जन कुंड, काहिलींची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी मूर्तीदान व निर्माल्य दान करून पाणीप्रदूषण टाळण्याचा संकल्प केला आहे.

महापालिका प्रशासनाने मोठ्या संख्येने दान होणाऱ्या मूर्ती, निर्माल्य संकलित करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाची जबाबदारी निश्चित केली आहे. नागरिकांनी दान केलेल्या मूर्ती सजविलेल्या वाहनातून इराणी खणीमध्ये विसर्जित करण्यात येणार आहे. निर्माल्य संकलित करण्यासाठी बारा पथके कार्यरत असतील.

पंचगंगा घाट संवर्धन समिती, अंधश्रद्दा निर्मूलन समितीसह शहरातील विविध सामाजिक संस्थांनी पर्यावरणपूरक उत्सवाची साद घातली आहे. घरगुती गणेश विसर्जनासाठी पंचगंगा नदी घाट, रंकाळा तलाव परिसर, राजाराम तलाव, कोटीतीर्थ तलाव, गंजीवली खण येथे विसर्जन कुंड ठेवले आहेत. महापालिकेचे ५००हून अधिक कर्मचारी विविध ठिकाणी कार्यरत असतील. अग्निशमन विभागाचे ५० कर्मचारी, रेस्क्यू बोट तैनात ठेवली आहे.

जिल्ह्यातही 'स्वच्छ व पर्यावरणपूरक उत्सव'

जिल्हा परिषद प्रशासनानेही घरगुती गौरी गणपती विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. जिल्ह्यात सुमारे ७५९ काहिली व वापरात नसलेल्या ४७२ खणीत मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. प्रशासनाने यंदा 'स्वच्छ व पर्यावरणपूरक गणेशोत्सव' संकल्पना मांडली आहे. पाणी प्रदूषण होऊ नये, पर्यावरणपूरक उत्सव साजरा व्हावा यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे. प्रशासनाने तालुकानिहाय पालक अधिकारी नेमले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. चौगले दाम्पत्य सरकारी नोकर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगलीतील चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदेशीर गर्भपातप्रकरणी धक्कादायक माहिती पुढे आली असून संशयित डॉ. रुपाली चौगुले आणि डॉ. विजयकुमार चौगुले हे दोघेही सरकारी सेवेत आहेत. परंतु डॉ. रुपाली या नोकरीच्या ठिकाणी कित्येक महिन्यांपासून गैरहजर आहेत. इतकेच नव्हे तर सांगलीतील सरकारी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उगाणे हे चौगुले हॉस्पिटलमध्ये येवून वैद्यकीय जबाबदारी पार पाडत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. दरम्यान, 'रविवारी पुन्हा चौगुले हॉस्पिटलचे सील तोडून केलेल्या चौकशीत आणखी दोन रुग्णांचा गर्भपात केल्याची कागदपत्रे सापडली आहेत. गर्भपातासाठी लागणारी औषधे, काही कालबाह्य औषधेही सापडली असून हॉस्पिटलच्या पाठीमागे काही औषधे आणि कागदपत्रे जाळण्याचा प्रयत्न झाल्याचेही समोर आल्याची माहिती सांगली महापालिकेचे आयुक्त रविंद्र खेबुडकर यांनी रविवारी पत्रकारांना दिली.

महापालिकेचे आयुक्त खेबुडकर आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कवठेकर म्हणाले, 'गर्भपाताचे केंद्र सुरु करण्यासाठी संबधितांनी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. केवळ नर्सिंग होमची परवानगी त्यांच्याकडे होती. हॉस्पिटलचा मालक डॉ. स्वप्नील जमदाडे आणि डॉ. रुपाली चौगुले यांचे बहिण- भावाचे नाते आहे. तर डॉ. विजयकुमार चौगुले हा डॉ. रुपालीचा पती आहे. डॉ. चौगुले पती पत्नी सरकारी सेवेत असल्याचे समोर आले आहे. डॉ. रुपालीची नांदणी प्राथमिक आरोग्य केंद्रातून आटपाडीकडे बदली झाल्यानंतर त्या काही दिवस नोकरीच्या ठिकाणी कार्यरत होत्या. त्यानंतर त्या आतापर्यंत गैरहजर आहेत. गैरहजेरीबाबत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. डॉ. विजयकुमार हे गारगोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेमणुकीस आहेत. परंतु ते बहुतेकवेळा सांगलीतील चौगुले हॉस्पिटलमध्येच थांबत होते.'

चौगुले हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णाचे बाळ दगावल्यानंतर त्याची चौकशी करावी, म्हणून एक निनावी तक्रार आल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाला या हॉस्पिटलची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते, असे सांगून आयुक्त खेबुडकर म्हणाले, 'त्या ठिकाणी शनिवारी सात रुग्णांचे केसपेपर सापडले. त्यावर स्पष्टपणे गर्भपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. कोणत्या कारणासाठी किंवा संबधित रुग्णाची अवस्था काय आहे, अशा कोणत्याही नोंदी नव्हत्या. रविवारी पुन्हा केलेल्या चौकशीत आणखी दोन रुग्णांचे केसपेपर सापडले आहेत. एक गर्भपात २० आठवड्यांच्या आतला केल्याचे दिसत आहे. गर्भपातासाठी लागणारी औषधे, काही कालबाह्य औषधे आणि काही संबधित औषधांची रिकामी पाकिटे सापडली आहेत. काही औषधे आणि कागदपत्रे जाळण्याचा प्रयत्न झालेला आहे. वैद्यकीय सेवेसाठी नियुक्त करण्यात आलेला कर्मचारी वर्ग अल्पशिक्षित आहे. अशा प्रकारचे केंद्र चालविण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याने वैद्यकीय सुविधेद्वारे गर्भपात करण्याविषयीच्या कायद्याचा भंग केल्याचा गुन्हा तिघांच्यावर दाखल करण्यात आला आहे. आरोग्याचे कारण सांगून डॉ. रुपाली चौगुले खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या आहेत. त्या खरोखर आजारी असतील तर त्यांना उपचारासाठी दाखल करुन घेण्यास आमची हरकत नाही. परंतु केवळ त्यांची पाठराखण करण्यासाठी कोणी डॉक्टर त्यांना आपल्या हॉस्पिटलमध्ये ठेवून घेत असेल त्या डॉक्टरवर कारवाई करण्यात येईल. तशी नोटीस संबधित डॉक्टरांना देण्याचे आदेश महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.'

......................

सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरशी कनेक्शन

डॉ. रुपाली चौगुलेच्या हॉस्पिटलमध्ये गर्भपात आणि प्रसुतीकरीता सांगली , सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्ण आल्याची नोंद आहे. त्या भागातील कोणत्या डॉक्टरांनी संबधित रुग्ण पाठवलेत, त्यांचीही नावे समोर आली आहेत. अशा सर्व डॉक्टरांची, संबधित रुग्णांची, त्यांच्या नातेवाईकांची, चौगुले हॉस्पिटलच्या संपर्कात असलेल्या स्थानिक डॉक्टरांची, हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे आयुक्त खेबुडकर म्हणाले. ' महापालिकेने दहा विशेष पथके तयार केली आहेत. एका पथकात दोन डॉक्टर्स आणि दोन कर्मचारी असतील. त्यांनी महापालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालयांची सखोल चौकशी करुन त्याबाबतचा अहवाल द्यायचा आहे. ज्या ठिकाणी बेकायदेशीर काही आढळेल त्या ठिकाणी तात्काळ कारवाईला सुरुवात करणार असल्याचेही खेबुडकर यांनी सांगितले.

..................

स्त्रीभ्रूण हत्यांबाबत सखोल चौकशी

'चौगुले हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीरपणे गर्भपात केल्याची नऊ प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये कोणाचा गर्भपात कोणत्या कारणासाठी, कोणाच्या परवानगीने केला, याची चौकशी सुरु आहे. लिंगनिदानानंतर स्त्री भ्रूण हत्या करण्यात आली आहे की नाही, हे सखोल चौकशीनंतरच समोर येईल',असेही आयुक्त खेबुडकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयसिंगपूर पालिकेत बसविणार सीसीटीव्ही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

जयसिंगपूर नगरपालिकेतील विविध विभागांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबरोबरच २१ सप्टेंबरला जयसिंगपूर शहर स्थापनादिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्याचा ठराव जयसिंगपूर पालिकेच्या विशेष सभेत करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा डॉ. नीता माने होत्या.

सभेत प्रारंभी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. २१ सप्टेंबर हा जयसिंगपूर शहराचा स्थापनादिवस असल्याने कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. मात्र, याच वेळी शिवाजी कुंभार यांनी शहरात ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. शहरातील कोंडाळी पालिकेने काढली. तथापि, कचरा त्याच ठिकाणी टाकला जात आहे. बदल्या तसेच निवृत्तीमुळे पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत आहे. यामुळे पालिकेच्या कामकाजात विस्कळीतपणा आला आहे. कचरा तसेच पाणीपुरवठ्यासंदर्भातील विषयावर चर्चा करण्यासाठी विशेष सभा बोलवावी, अशी सूचना त्यांनी केली.

बजरंग खामकर यांनी कार्यक्रमांपेक्षा शहराला शववाहिकेची गरज असल्याचे सांगितले. स्थापनादिनानिमित्त शहर स्वच्छतेचा कार्यक्रम घेण्यात यावा, अशी सूचना पराग पाटील यांनी मांडली. स्वच्छतेचा कार्यक्रम हाती घेत असताना मंडळांच्या कार्यकर्त्यांना बक्षीस द्यावे, असे मत शैलेश चौगुले यांनी व्यक्त केले. मात्र, २१ सप्टेंबरला शहरातील सर्व मंडळांचे कार्यकर्ते गणेश विसर्जन मिरवणुकीत दंग राहणार असल्याने शहर स्वच्छतेऐवजी अन्य कार्यक्रम घ्यावेत, असे सर्जेराव पवार यांनी सांगितले. यानंतर कार्यक्रमाच्या आयोजनाचे सर्वाधिकार नगराध्यक्षा डॉ. माने यांना देण्यात आले. शहरातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करता येऊ शकते, असे डॉ. माने म्हणाल्या.

नगरपरिषद कार्यालयात सभागृहासह काही विभागांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. उर्वरित विभागात कॅमेरे बसविण्यास सभेत मंजुरी देण्यात आली. पालिकेचे अभिलेख स्कॅनिंग करून सुस्थितीत ठेवण्याच्या विषयालाही मंजुरी देण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत नगरसेविका प्रेमला मुरगुंडे, संजय पाटील-कोथळीकर यांसह अन्य सदस्यांनी भाग घेतला.

00000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक गाव, एक गणपती’चीमाजनाळला परंपरा कायम

$
0
0

फोटो...

म. टा. वृत्तसेवा, पन्हाळा

माजनाळ (ता. पन्हाळा) येथे सन १९७६ साली श्री हनुमान तालीम मंडळाची स्थापना झाली. स्थापनेच्या काही वर्षांनंतर ज्येष्ठ लोकांच्या संकल्पनेतून गावसभेच्या ठरावानुसार गावात एकमत झाले आणि तेव्हापासून गावात 'एक गाव-एक गणपती' संकल्पना उदयास आली. आजतागायत ही संकल्पना कायम आहे.

गावातील काही हौशी व अल्पसंतुष्ट तरुणांनी या प्रथेला फाटा देण्याचा प्रयत्न केला, पण गावातील प्रतिष्ठित लोकांनी याला विरोध करून या संकल्पनेचे महत्त्व पटवून दिल्याने तरुणवर्गानेही ही प्रथा अखंडपणे सुरू ठेवली आहे. गावातील गणेशोत्सव पूर्णपणे विधायक स्वरुपात साजरा केला जातो. गावातील मुख्य चौकात गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. यासाठी कोणाकडूनही वर्गणी गोळा केली जात नाही. नवसाला पावणारा गणपती असल्यामुळे गावातील लोक दरवर्षी मूर्ती देतात. पुढील चार ते पाच वर्षे मूर्ती देणाऱ्या लोकांनी आपले नंबर लावून ठेवले आहेत. २०१८ या वर्षीची मूर्ती राकेश वसंत हांडे यांनी दिली आहे. गावात एकच गणपती असल्यामुळे सकाळी व संध्याकाळी सामुदायिक आरती होते. या विधायक कार्यक्रमासाठी गावातील लहान मुले, तरुण वर्ग, प्रौढ व्यक्ती, वयस्कर लोक सर्वजण राबतात. यावेळी समाजकारण व राजकारणाला फाटा देऊन सर्वजण एकत्र येतात.

'एक गाव-एक गणपती' संकल्पनेमुळे गावाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र पोलिस दलामार्फत कळे पोलिस ठाण्यांतर्गत गणेशोत्सव स्पर्धा २०१७ चा डॉल्बीमुक्त ग्रामदैवत यात्रा पुरस्कार मिळाला आहे. गावातील एकोप्यामुळे गावाचा विकास झाला आहे. मंडळाने गणपती आगमन किंवा विसर्जन मिरवणुकीत उच्च ध्वनियंत्रणेला पूर्णपणे फाटा दिला आहे. मंडळाचे अध्यक्ष जालिंदर पाटील व उपाध्यक्ष महादेव पाटील यांच्यासह सर्व कार्यकर्ते, ग्रामस्थ कार्यक्रमात भाग घेऊन सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडतात.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अवयवदानासाठी ग्रीन कॉरीडॉर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कुटुंबाचा आधारवड असलेल्या धनंजय जामदार यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे निष्पन्न होताच डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केले. जामदार कुटुंबीयांनी काळजावर दगड ठेवत अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यातून दोघांना किडनी आणि एकाला यकृत देऊन जीवनदान देण्यात आले. कसबेकर पार्क येथील डायमंड हॉस्पिटलमधून रविवारी सुरू झालेला हा ग्रीन कॉरीडॉर पुण्यातही यशस्वी ठरला.

कोल्हापुरात अवयवदानाची चळवळ अलीकडे रुजू लागली आहे. महावीर कॉलेज परिसरातील धनंजय बापूसाहेब जामदार (वय ६१) यांची शुक्रवारी तब्ब्येत बिघडल्याने डायमंड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने ब्रेन हॅमरेज झाल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर जामदार यांचा मुलगा निखील याने वडिलांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. नातेवाईकांच्या अधिकृत परवानगीनंतर डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये अवयव काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी पुण्याहून वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. या मोहिमेत जामदार यांच्या दोन्ही किडन्या व यकृत यशस्वीरीत्या काढण्यात यश आले. यातील एक किडनी कोल्हापुरातीलच एका रुग्णाला देण्यात आली. दुसरी किडनी पुणे येथील रुबी रुग्णालयाला तसेच यकृत डॉ. डी. वाय. पी हॉस्पिटलला पाठवण्यात आले. अवयव घेऊन रुग्णवाहिका खानविलकर पेट्रोल पंप, जिल्हाधिकारी कार्यालय, धैर्यप्रसाद हॉल, छत्रपती ताराराणी पुतळा, तावडे हॉटेलमार्गे पुण्याकडे रवाना झाली.

या मोहिमेसाठी डायमंड हॉस्पिटलमध्ये सकाळपासून तयारी करण्यात आली. अवयव सुरक्षितरीत्या नेण्यासाठी पुण्याहून रुग्णवाहिका आली होती. मोहिमेत न्यूरोसर्जन डॉ कौस्तुभ औरंगाबादकर, डॉ. साई प्रसाद, किडनी तज्ज्ञ डॉ. विलास नाईक व डायमंड रुग्णालयातील अन्य डॉक्टर सहभागी होते. वाहतूक व्यवस्था सुरळीत पार पडावी यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. शहर वाहतूक पोलिस निरीक्षक अनिल गुजर, पोलिस निरीक्षक सुरेश पोरे, संजय चाचे, समीर शेख यांनी सहभाग घेतला. पायलट म्हणून संजय कुंभार यांनी महत्वाची भूमिका बजावली.

अवयवदानाचा वारसा

धनंजय जामदार अत्यंत मितभाषी व्यक्तिमत्व होते. त्यांचा जनसंपर्क मोठा होता. आधुनिक विचारसरणीचा वारसा त्यांना, वडील बापूसाहेब जामदार यांच्याकडून मिळाला होता. जामदार यांच्या वडिलांनीदेखील देहदान केले होते. मुलानेही वडिलांच्या मार्गावर पाऊल ठेवल्याची चर्चा होती.

कोल्हापूर हे आधुनिक विचारांचा वारसा पुढे नेणारे शहर आहे. अलिकडे अवयवदानाबाबत जागरूकता वाढली आहे. देशात मोठ्या प्रमाणात अवयवाच्या प्रतिक्षेत अनेक रुग्ण आहेत. नागरिकांनी अवयवदानाबाबत पुढाकार घेतल्यास अनेकांना नवे जीवन देता येईल.

- डॉ. कौस्तुभ औरंगाबादकर

वडिलांचे ब्रेन हॅमरेज झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर अवयवदान करण्याबाबत मार्गदर्शन केले. अवयवदानाच्या माध्यमातून अनेकांना जीवन मिळणार असल्याने आम्ही हा निर्णय घेतला. या अवयवांच्या माध्यमातून आमच्या वडिलांच्या स्मृती जपल्या जातील. अवयवदानासाठी सर्वांनी पुढे यावे.

- निखील जामदार, मुलगा

०००

(मूळ कॉपी)

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घराचा आधारवड असलेल्या त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने कसबेकर पार्कातील धनंजय जामदार यांना डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केले. जामदार कुटुंबीयांनी काळजावर दगड ठेवत अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. या अवयवदानातून दोघांना किडनी आणि एकाला यकृत देऊन जीवनदान देण्यात आले. ग्रीन कॉरीडॉर मोहीम डायमंड रुग्णालयात रविवारी यशस्वीरित्या पार पडली.

कोल्हापुरात अवयवदानाची चळवळ अलीकडे रुजू लागली आहे. महावीर कॉलेज परिसरातील धनंजय बापूसाहेब जामदार (वय ६१) यांना शुक्रवारी (ता.१४) तब्ब्येत बिघडल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने ब्रेन हॅमरेज झाल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले. यानंतर जामदार कुटुंबियांनी तसेच जामदार यांचा मुलगा निखील याने वडिलांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. अधिकृत परवानगी तसेच नातेवाईकांच्या संमतीनंतर डॉक्टरांनी येथील डायमंड रुग्णालयात अवयव काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी पुण्याहून वैद्यकीय तज्ञाच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. या मोहिमेत जामदार यांच्या दोन्ही किडन्या व यकृत यशस्वीरीत्या काढण्यात यश आले. यातील एक किडनी कोल्हापुरातील रुग्णाला देण्यात आली. दुसरी किडनी पुणे येथील रुबी रुग्णालयाला तसेच यकृत डॉ. डी. वाय. पी हॉस्पिटलला पाठवण्यात आले. अवयव घेऊन रुग्णवाहिका खानविलकर पेट्रोलपंप, जिल्हाधिकारी कार्यालय, धैर्यप्रसाद हॉल, छत्रपती ताराराणी पुतळा, तावडे हॉटेल यामार्गे पुण्याकडे रवाना झाली.

या मोहीमेसाठी सकाळपासून डायमंड रुग्णालयात तयारी केली जात होती. अवयव सुरक्षितरीत्या नेण्यासाठी पुण्याहून रुग्णवाहिका पाठवण्यात आली होती. या मोहिमेत न्यूरोसर्जन डॉ कौस्तुभ औरंगाबादकर, डॉ. साई प्रसाद, किडनी तज्ज्ञ डॉ. विलास नाईक व डायमंड रुग्णालयातील इतर डॉक्टर सहभागी झाले होते. वाहतूक व्यवस्था सुरळीत पार पडावी यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यामध्ये शहर वाहतूक पोलिस निरीक्षक अनिल गुजर, पोलिस निरीक्षक सुरेश पोरे, संजय चाचे, समीर शेख यांनी सहभाग घेतला. पायलट म्हणून संजय कुंभार यांनी महत्वाची भूमिका बजावली.

अवयवदानाचा वारसा पुढे नेला.

धनंजय जामदार अत्यंत मितभाषी व्यक्तिमत्व होते. त्यांचा जनसंपर्क मोठा होता. आधुनिक विचारसरणीचा वारसा त्यांना त्यांचे वडील बापूसाहेब जामदार यांच्याकडून मिळाला होता. जामदार यांच्या वडिलांनी देखील देहदान केले होते. मुलानेही वडिलांच्या मार्गावर पाऊल ठेवल्याची चर्चा यावेळी चालू होती.

कोट::::

कोल्हापूर हे आधुनिक विचारांचा वारसा पुढे नेणारे शहर आहे. अलीकडे अवयवदानाबाबत जागरूकता वाढली आहे. देशात मोठ्या प्रमाणात अवयवाच्या प्रतीक्षेत अनेक रुग्ण आहेत. नागरिकांनी अवयवदानाबाबत पुढाकार घेतल्यास अनेकांना नवे जीवन देता येईल.

डॉ. कौस्तुभ औरंगाबादकर

वडिलांचा ब्रेन हॅमरेज झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर अवयवदान करण्याबाबत त्यांनी सांगितले. अवयवदानाच्या माध्यमातून अनेकांना जीवन मिळणार असल्याने आम्ही सर्वांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. अवयवांच्या माध्यमातून आमचे वडील जिवंत राहणार आहेत. अवयवदानासाठी सर्वांनी पुढे यावे.

निखील जामदार, मुलगा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अस्वस्थ वेदनांचा चित्ररुपी हुंकार

$
0
0

फोटो आहेत....

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जात आणि धर्माच्या नावाखाली माणसामाणसांत फूट पाडण्याचे कारस्थान, संविधानावरील वाढते हल्ले, मानवी मूल्यांवर आघात करणाऱ्या प्रवृत्ती असा सध्याचा अस्वस्थ करणारा भवताल आणि त्यासंबंधी अतिशय संवेदनशील मनाने अभिव्यक्त झालेला चित्ररूपी हुंकार येथील शाहू स्मारक भवनमध्ये उमटला आहे.

'सेक्युलर मूव्हमेंट'च्या चौथ्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून 'सेक्युलर कला प्रदर्शन' भरविले आहे. शाहू स्मारक भवन येथील कलादालन येथे भरविलेल्या चित्र प्रदर्शनात 'अस्वस्थ भारतीय वर्तमान : चित्रकारांचे आकलन' घडते. २५ ते २८ मे या कालावधीत पाचगणी येथे आयोजित कार्यशाळेत निर्माण झालेल्या कलाकृती येते मांडल्या आहेत. चित्रकलेच्या माध्यमातून प्रबोधन साधणाऱ्या या प्रदर्शनात ३५ हून अधिक चित्रांचा समावेश आहे.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांच्या हस्ते आणि पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनचे संचालक प्रा. मर्झबान जाल व मुंबई येथील क्लार्क हाउस इनिशिएटीचे संस्थापक सुमेश्वर शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रविवारी दुपारी चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. सेक्युलर मूव्हमेंटचे अध्यक्ष गौतमीपुत्र कांबळे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी माजी पोलिस सहायक आयुक्त भरत शेळके यांच्या हस्ते 'सेक्युलर व्हिजन'चे प्रकाशन झाले.

प्रदर्शनातील प्रत्येक चित्र आशयपूर्ण आहे. चित्रकारांनी अतिशय खुबीने देशातील सध्य स्थिती कॅनव्हासवर रेखाटली आहे. जातीयता, धर्मांधतेमुळे निर्माण होणारी सामाजिक तेढ, विशिष्ट समूहाने लोकशाही व्यवस्थेला दिलेले आव्हान, संविधानावरील हल्ल्याच्या घटना, वंचित घटकांचे शोषण अशा विविध प्रश्नांकडे चित्रकारांनी कुंचल्याच्या माध्यमातून समाजाचे लक्ष वेधले आहे.

याप्रसंगी चित्रकार प्रमोद रामटेके (नागपूर), चित्रकार प्रभाकर कांबळे (मुंबई), कवी बबन चहांदे (नागपूर) व उद्योजक एम. बी. शेख यांची भाषणे झाली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, प्राचार्य टी. एस. पाटील, व्यंकाप्पा भोसले, आदी उपस्थित होते. प्रा. जे. व्ही. सरतापे यांनी स्वागत केले. प्रा. भरत नाईक यांनी सूत्रसंचालन केले. प्रदर्शन सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत २२ सप्टेंबरपर्यंत खुले राहणार आहे.

..........

सेक्युलर विचारच देशाला तारणारा

'भारतीय स्वातंत्र्यलढ्याने धर्मनिरपेक्षवादी (सेक्युलर) विचार जपला. स्वातंत्र्यावर कधीही गंडांतर येऊ द्यायचे नसेल तर धर्मनिरपेक्षवादी विचार देशासाठी महत्त्वाचा ठरणारा आहे. अभिव्यक्तीचे माध्यम कोणतेही असो, प्रस्थापितांच्या गुलामगिरीविरोधात सातत्याने आवाज उठवावा,' असे आवाहन विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांनी चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी काढले. प्रा. मर्झबान जाल, सुमेश्वर शर्मा यांनी कलाकार हा कलेच्या माध्यमातून अभिव्यक्त होत असतो. सद्य:स्थितीत कसल्याही प्रकारची भीती न बाळगता कलाकारांनी व्यक्त होणे आणि समाजप्रबोधन करणे हा 'सेक्युलर कला प्रदर्शन'चा मुख्य उद्देश सफल होत आहे,' अशा भावना व्यक्त केल्या. प्रा. जाल यांनी देशातील विविध प्रकारच्या विचारधाराविषयी ऊहापोह केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोहन हंकारेचे यश

$
0
0

कोल्हापूर: भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) ६२ व्या वर्धापनदिनानिमित्त कोल्हापूर विभागातर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेत सोहन नागेश हंकारेने पहिली व दुसरी गटातून तृतीय क्रमांक पटकाविला. सोहन हा, शेलाजी वन्नाजी संघवी विद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याला मुख्याध्यापिका व शिक्षिकांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणपतराव आंदळकर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शिराळा

हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांचं वयाच्या ८५ व्या वर्षी पुण्यात हृदयविकाराने निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना पुण्यातील जोशी रुग्णालयात दाखल केले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा अभिजित, दोन भाऊ, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर सोमवारी पुनवत (ता. शिराळा) या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार होणार आहेत. आंदळकर यांच्या निधनामुळे देशभरातील कुस्तीक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

आंदळकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील पुनवत (ता.शिराळा) येथे १९३५ साली शेतकरी कुटुंबात झाला. १९५० साली ते गावातून कुस्ती शिकण्यासाठी कोल्हापुरात आले. मोतीबाग तालमीत बाबासाहेब वीर यांच्याकडे कुस्तीची तालीम सुरू केली. जन्मजात मिळालेल्या बळकट शरीरयष्ठीवर मेहनत घेऊन त्यांनी कुस्तीचा सराव केला. जयपराजयाची फिकीर न करता शेकडो कुस्त्या त्यांनी केल्या. पूर्ण कारकिर्दीत २०० हून अधिक कुस्त्या केल्या. त्यांनी ४० हून अधिक कुस्त्यांमध्ये पाकिस्तानमधील मल्लांना धूळ चारली. कुस्तीविश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे आंदळकर हे प्रशिक्षक म्हणून जेवढे कडक, कठोर होते, तेवढेच ते विनम्र स्वभावाचे होते. कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू स्मारक ट्रस्टचा शाहू पुरस्कार जाहीर झाला तेव्हा अर्जुन पुरस्कारापेक्षा अधिक आनंद झाल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते . १९६४ साली भारत सरकारने त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले होते. आंदळकरांच्या उमेदीचा काळ कुस्तीचे सुवर्णयुग होते. कुस्तीला प्रतिष्ठा होती आणि मल्लांना ग्लॅमर होते. खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवले होते, ते कोल्हापुरात सराव करूनच.

आंदळकर यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय देदीप्यमान कामगिरी बजावली. त्यांनी १९६० मध्ये हिंदकेसरीची गदा पटकावली. पाकिस्तानी मल्ल गोगा पंजाबी, सादिक पंजाबी, जिरा पंजाबी, नसीर पंजाबी, दिल्लीचा खडकसिंग पंजाबी, अमृतसरचा बनातसिंग पंजाबी, पतियाळाचा रोहेराम, लीलाराम, पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, महंमद हनीफ, श्रीरंग जाधव या नामवंत मल्लांबरोबरच्या त्यांच्या लढती गाजल्या होत्या. १९६२ मध्ये जकार्ता येथे झालेल्या अशियाई स्पर्धेत त्यांनी सुपर हेवी गटात ग्रीको रोमन स्टाइलमध्ये सुवर्णपदक, तर फ्री स्टाइलमध्ये रौप्यपदक पटकावले. १९६४ मध्ये टोकिओ ऑलिम्पिकमध्ये हेवी गटात भारतीय कुस्ती संघाचे नेतृत्व आंदळकर यांनी केले. तिथे त्यांनी चौथ्या फेरीपर्यंत धडक मारली होती. महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल १९८२ मध्ये शिवछत्रपती पुरस्काराने गौरविले आहे. कोणत्याही मल्लाची कारकीर्द खूप कमी असते. उमेदीच्या अल्पशा कालावधीत विजेसारखे चमकून दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहावे लागते. कुस्ती सोडल्यानंतर बहुतेक मल्ल आपल्या पारंपरिक व्यवसायात गुंतून जातात.

गणपतराव आंदळकर यांनी मात्र लाल मातीची संगत सोडली नाही. १९६७ पासून मोतीबाग तालमीत कुस्ती प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडताना त्यांनी अनेक मल्ल घडविले. पैलवान मेहनतीवर घडतो आणि मेहनतीचा दर्जा खुराकावर अवलंबून असतो हे पैलवानकीचे मूळ शास्त्र आंदळकर नेहमी सांगत होते.

००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनापरवाना मंडपावर महापालिकेची कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हायकोर्टाच्या नियमांचे उल्लंघन करुन शहरात उभा केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर रविवारी महापालिकेने कारवाई केली. विनापरवाना उभा केलेल्या आठ मंडळांचे मंडप महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उतरवले. महापालिका क्षेत्रात गणेशोत्सवासाठी मंडप उभारणीसाठी हायकोर्टाने नियम घालून दिले आहेत. तसेच मंडप उभारणीसाठी महापालिकेची परवानगी घेणे अनिवार्य केले आहे. परिणामी विनापरवाना मंडप उभारणी केलेल्या बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर पेठ येथील सहा मंडळाचे तर यादव नगर व महालक्ष्मीनगर येथील दोन मंडळाचे मंडप उतरवले. अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता एस. के. माने, हर्षजीत घाटगे, कनिष्ठ अभियंता व पवडी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. ज्या मंडळांनी विनापरवाना मंडप उभारले आहेत, त्यांनी स्वत: मंडप काढून घ्यावेत असे आवाहन महापालिकेच्यावतीने केले आहे. दरम्यान विनापरवाना मंडप उभारणीबाबत बुधवारी (ता. १९) हायकोर्टात सुनावणी होणार आहे. कोर्टाने सुनावणी दरम्यान महापालिकेने विनापरवाना मंडळाच्या मंडपावर कोणती कारवाई केली, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोहार यांच्यावर गुन्हा दाखल करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अनुसूचित जातीसाठीच्या रिक्त पदांवर जाणीवपूर्वक खुल्या प्रवर्गातील शिक्षकांची नियुक्ती करून आरक्षण कायद्याचा भंग केल्याचा आरोप माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर अन्यायग्रस्त शिक्षकांच्या बैठकीत झाला. याप्रकरणी लोहार यांच्यावर गुन्हा दाखल करावा, त्यांना त्वरित निलंबित करावे, अशी मागणीही करण्यात आली.

बसस्थानक परिसरातील महालक्ष्मी चेंबरर्समधील 'रिपब्लिकन'च्या कार्यालयात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे बैठक झाली, यावेळी ही मागणी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रा. शहाजी कांबळे होते.

नियमबाह्य शिक्षक मान्यता देणे, त्यांना वेतन मंजूर करणे, अवैध नेमणुकांना पाठीशी घालणे, माहिती लपवणे, सरकारची दिशाभूल करणे, आर्थिक व्यवहार करणे अशा तक्रारी अनेक शिक्षकांनी बैठकीत केल्या. हिंडगाव विद्यालयात एकाचवेळी दोन शिक्षकांच्या नियुक्या केल्या. पगार तिसऱ्याचाच काढला. छात्र जगदगुरू विद्यालयातील शिक्षक नामदेव कांबळे यांनी न्यायासाठी आत्मदहनाचा प्रयत्न केला. अजूनही त्यांचा पगार मिळालेला नाही. कणेरी मठातील काडसिध्देश्वर हायस्कूलमधून अतिरिक्त ठरलेल्या एका शिक्षकाचे समायोजन केलेले नाही. कसबा तारळेतील छत्रपती शिवाजी हायस्कूलमधील मृत शिपायाच्या वारसांना २० वर्षे झाली तरी पेन्शन मंजूर केली नाही. शिक्षक पी. आर. पाटील यांना वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यास टाळाटाळ केली, असे अनेक गंभीर आरोप लोहार यांच्यावर बैठकीत करण्यात आले. बैठकीस दगडू थटके, शिवाजी कांबळे, पी. आर. पाटील, बनाबाई कांबळे, तिलोतमा सोनवणे, नामदेव कांबळे यांच्यासह अन्यायग्रस्त शिक्षक उपस्थित होते.

०००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मल्टिस्टेट’ याचिका कोर्टात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सर्वसाधारण सभेत 'मल्टिस्टेटचा' (बहुराज्यीय सहकारी संस्थांचा कायदा) निर्णय आवाजी मतदानाने घेतला जाणार आहे. मात्र आवाजी मतदानामुळे दूध उत्पादकांवर अन्याय होणार असल्याने हा निर्णय घेण्यासाठी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात यावे, अशी याचिका दूध उत्पादक संस्थांनी सहकार न्यायालयात दाखल केली आहे. तसेच मल्टिस्टेटचा ठराव घटनाविरोधी असल्याने या निर्णयालाही न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. दोन्ही याचिकांवर सोमवारी (ता. १७) सुनावणी होणार आहे. दरम्यान, खासदार राजू शेट्टी, शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनीही गोकुळ मल्टिस्टेटच्या निर्णयाला विरोध केला आहे. 'मल्टिस्टेटच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे,' अशी माहिती बचाव समितीचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर यांनी दिली.

गोकुळचे दूध संकलन १३ लाखांवरून वीस लाख लिटरपर्यंत वाढविण्यासाठी कार्यक्षेत्र विस्ताराचा, मल्टिस्टेटचा निर्णय गोकुळच्या संचालकांनी घेतला आहे. सर्वसाधारण सभेतील विषय पत्रिकेवर १२व्या क्रमांकावर मल्टिस्टेटचा ठराव आहे. याला विरोध करण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ बचाव कृती समितीची स्थापना केली आहे. समितीने दूध संस्थांना भेटी देऊन ठरावाला विरोध करण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे सत्ताधारी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने मल्टिस्टेटचा ठराव बहुमताने मंजूर करण्यासाठी रणनीती आखली आहे.

मल्टिस्टेटच्या विरोधात जनजागृती सुरु असताना आता न्यायालयीन लढाईही सुरू झाली आहे. सर्वसाधारण सभेत आवाजी मतदानाने निर्णय होईल. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून 'मंजूर... मंजूर...'ची घोषणा तर विरोधकांकडून 'नामंजूर.. नामंजूर...'ची घोषणाबाजी होईल. आवाजी मतदानाच्या निर्णयामुळे मल्टिस्टेटसारख्या महत्वाच्या निर्णयावर दूध उत्पादकांवर अन्याय होणार असल्याने काही दूध संस्थांनी सहकार कोर्टात धाव घेतली आहे. गुप्त पद्धतीने मतदान घेतल्यास मल्टिस्टेटचा निर्णय लोकशाहीस पूरक ठरणार आहे, अशी भूमिका कोर्टात मांडली जाणार आहे. तर दुसरीकडे 'मल्टिस्टेटच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे,' अशी माहिती बचाव समितीचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर यांनी दिली. गोकुळ हा जिल्हा संघ असून संघाला सहकार कायद्यानुसार सभा घ्यावी लागते. दूध संघाचे अस्तित्व नष्ट करून मल्टिस्टेटचा ठराव विषयपत्रिकेवर घेणे सहकार कायद्याच्या विरोधात आहे, असे म्हणणे मांडण्यात येणार आहे. त्यावर सोमवारी कोर्टात निर्णय होणार आहे.

पी. एन. पाटलांची महाडिकांना साथ

मल्टिस्टेटला विरोध होत असताना माजी आमदार पी. एन. पाटील यांनी मल्टिस्टेटच्या ठरावाला पाठिंबा दिला आहे. 'गोकुळच्या १९पैकी १५ संचालक हे काँग्रेसशी संबधित आहेत. तसेच विरोधी पॅनेलमधील निवडून आलेल्या संचालकांनी मल्टिस्टेटला विरोध केलेला नाही. गोकुळने २० लाख लिटर दूध संकलनाचा प्रकल्प सुरू केला आहे. त्यासाठी परराज्य, परजिल्ह्यातील दूधाची आवश्यकता असल्याने मल्टिस्टेटला पाठिंबा द्यावा. ३० सप्टेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत स्वत: उपस्थित राहून मल्टिस्टेटचे समर्थन करणार आहे' असे पी. एन. पाटील यांनी सांगितले.

बारकोड पाहून सभेला प्रवेश

गोकुळच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी दूध संस्थांना बारकोड असलेली फिकट पिस्ता रंगाची ठरावाची प्रवेश प्रक्रिया पाठविण्यात आली आहे. सभेसाठी उपस्थित राहण्यासाठी दूध संस्थांना प्रतिनिधीची निवड करावी लागणार आहे. बारकोड प्रवेशपत्रिकेवर दूध संस्थांचा शिक्का असेल. प्रत्येक संस्थेला एकच प्रतिनिधी पाठवता येणार आहे. बोगस प्रवेशपत्रिका तयार होऊ नयेत यासाठी दक्षता घेतली जात आहे. मल्टिस्टेटला विरोध करणाऱ्या दूध संस्थांच्या प्रतिनिधींची यादी गोकुळ प्रशासन व सहाय्यक निंबधक (दूध) कार्यालयाला पाठवण्यात येणार आहे. बारकोडची तपासणी करण्यासाठी पोलिस प्रशासनाची मदत घ्यावी, अशी मागणी विरोधी आघाडीने केली आहे.

प'दुम'चे अधिकारी उपस्थित राहणार?

सर्वसाधारण सभेस उपस्थित राहण्यासाठी सहकार विभागाचे जिल्हा निबंधक, 'पदुम'चे सहाय्यक निबंधक, दुग्ध विकास अधिकाऱ्यांना आमंत्रण दिले जाते. पण त्यांनी सभेस उपस्थित रहावे, असे बंधन नसते. पण मल्टिस्टेटचा महत्वाचा ठराव असल्याने सभेस सहकार व पदुम विभागातील अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, अशी मागणी करण्यात आली आहे. हे अधिकारी उपस्थित राहतील अशी शक्यता आहे.

नेते कुठे बसणार?

सभेला विरोधातील आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके यांच्यासह सत्तारुढ माजी आमदार महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील उपस्थित राहणार आहेत. खासदार धनंजय महाडिकही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सभेत व्यासपीठावर संचालकांची बैठक व्यवस्था आहे. पण नेते उपस्थित राहणार असल्याने ते स्टेजवर बसणार की दूध संस्थांच्या प्रतिनिधींसोबत बसणार याचीही उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाहूवाडी निर्माल्य दानासाठी प्रतिसाद

$
0
0

शाहूवाडीत निर्माल्य संकलनासाठी प्रशासनाचा पुढाकार

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

मलकापूर, शाहूवाडी, बांबवडे, सरुड, भेडसगाव परिसरासह सर्वत्र घरगुती गौरी-गणपतीचे भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. मोरया.. मोरया.. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात घरगुती गणपतींचे ठिकठिकाणी पाणवठ्यावर विसर्जन करण्यात आले. सोबत घरोघरी गौराईला निरोप देण्याच्या तयारीत असणाऱ्या महिलांची लगबग सुरू होती. पारंपरिक गौरीगीतांचा सूरही वातावरणात उत्कटता निर्माण करीत होता. भावुक वातावरणात घरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान, बंदोबस्ताचा ताण काही वेळासाठी विसरून शाहूवाडी पोलिस ठाण्यातील गणपती बाप्पाचे पारंपारिक वाद्याच्या निनादात मिरवणुकीने विसर्जन करण्यात आले. यावेळी पोलिस निरिक्षक मनोहर रानमळे, पीएसआय गिरी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून प्रशासनाने मूर्ती व निर्माल्य दान करण्याचे नागरिकांना आवाहन केले होते. मलकापूर नगरपरिषदेच्यावतीने गौरी-गणपती विसर्जनानिमित्त शाळी व कडवी नदी परिसरात चार निर्माल्यकुंड निर्माण करण्यात आले होते. बांबवडे, सरुड येथेही जलप्रदूषण रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने स्थानिक तलाव परिसरात घंटागाडीच्या रुपाने निर्माल्य कुंडची व्यवस्था केली होती. शित्तूर वारुण ग्रामपंचायतीने वारणा पुलाजवळ निर्माल्य कुंड उभा केला होता. यातून निर्माल्यदान साठी महिलांचा प्रतिसाद मिळाला. परंतु भेडसगांव येथे झालेल्या २० मूर्तीदान वगळता अन्यत्र मूर्तीदान आवाहनास नागरिकांनी सर्रास बगल दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजऱ्यात भावपूर्ण वातावरणात गणेश विसर्जन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

घरगुती गौरी-गणपती विसर्जनाच्या निमित्ताने आजरा तालुक्यातील गणेश मूर्ती आणि गौरींना आज मोठ्या भावपुर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. पारंपरिक वाद्ये, फटाक्यांची आतषबाजी आणि 'मोरया'च्या जयघोषात सायंकाळच्या सुमारास गावोगावच्या परिसरातील नदीकाठ, ओढे, नाले आणि तलावांसह विहिरींवर गणेशभक्तांनी मोठी गर्दी करीत 'श्री'ना निरोप दिला. मात्र यानिमित्ताने काही ठिकाणी मूर्तीदानासाठी करण्यात आलेल्या आवाहनास मात्र विशेष प्रतिसाद मिळू शकला नाही.

गणेश आगमनानंतर गेले पाच दिवस मोठ्या आनंदी वातावरणात पूजा, अर्चा आणि आरत्यांच्या निनादात तालुक्यातील अवघे वातावरण भक्तिमय झाले होते. मात्र आज याच गणेशमूर्तींना निरोप देताना भक्तांचे डोळे भरून आले होते. दुपारनंतर गावागावातून गणेश विसर्जनाच्या निमित्ताने तयारी केली जात होती. यासाठी काही गावात ओढे, नाले आणि विहिरींसारख्या नैसर्गिक पाणीस्रोत वापरण्यात आले. तर पाण्याच्या काहिलीतही विसर्जन करण्यात आले. आजरा शहरातील गणेश विसर्जनासाठी हिरण्यकेशी नदीचे विविध घाट यासाठी वापरण्यात आले. विशेषतः मोरजकर महाराज समाधीनजिकच्या हिरण्यकेशी नदी आणि नेसरी मार्गावरील चित्री नदी घाटावर गणेश विसर्जनासाठी भक्तगणांनी मोठी गर्दी केली होती. काही गणेश मंडळ भक्त, नगरपंचायत आणि पोलिसांच्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे विसर्जन सुरळीत पार पडले. काही टन निर्माल्य जमा झाल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य विभागाची डोळ्यावर पट्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारी नोकरीत असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खासगी प्रॅक्टीस करण्याची नाही असा नियम आहे. मात्र महापालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामीण रुग्णालयातील अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा नियम धाब्यावर बसविला आहे. ग्रामीण रुग्णालये व जिल्हा परिषदेच्या सेवेतील बहुतांश वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव्य करणे बंधनकारक आहे. मात्र त्यांनी मुख्यालयाला रामराम ठोकत शहरात निवासासोबतच दवाखाने सुरू केले आहेत. ना त्यांच्यावर कुणाचे नियंत्रण, ना कारवाई अशी स्थिती आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आरोग्य विषयक सुविधा मिळाव्यात, उपचाराअभावी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ४१३ आरोग्य उपक्रेंद्रे आणि ७४ प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यान्वित आहेत. रुग्णाला चोवीस तास सेवा मिळावी हा उद्देश ठेवून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहावे यासंदर्भात स्पष्ट सूचना आहेत. मात्र, जिल्ह्यातील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती हा नेहमीच वादाचा विषय बनला आहे. सरकारी दवाखान्यांत रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याऐवजी, संबंधित रुग्णांना स्वतच्या खासगी हॉस्पीटलकडे वळविण्यासाठी अनेक वैद्यकीय अधिकारी खटाटोप करत असतात. मुळातच जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे.

आरोग्य विभागाने, सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवत रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळवून द्यायला हव्यात. सरकारी सेवेतील अधिकारी खासगी हॉस्पीटल्स चालवित असेल तर त्याला कारवाईचा डोस देणे अत्यावश्यक आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद प्रशासन मात्र त्या डॉक्टराविरोधात कुणाची तक्रार नाही म्हणून कारवाईचा बडगा उगारत नाहीत. वास्तविक या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'खासगी प्रॅक्टीस'करणाऱ्या डॉक्टरावर कारवाई करण्यााी गरज आहे. मात्र या विभागाचे प्रमुख अधिकारी मात्र 'सरकारी डॉक्टरी खासगी प्रॅक्टीस करत असल्याविषयी कुणी तक्रार केल्यास चौकशी करु'असा उलटा पवित्रा घेत जबाबबदारी झटकत आहेत.

अधिकाऱ्यांचीच खासगी हॉस्पिटल्स

जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आणि महापालिकेतील अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांची खासगी हॉस्पिटल्स आहेत हे जगजाहीर आहे. जसध्या जिल्हा परिषदते एका मोहिमेच्या प्रमुख असलेल्या महिला डॉक्टरांचा ग्रामीण भागात मोठे हॉस्पिटल आहे. कोल्हापूर महापालिकेत तर गेल्या काही वर्षात मुख्य आरोग्य अधिकारीपदाचा 'प्रभारी'कार्यभार पाहिलेल्या डॉक्टर्सचा शहराच्या मध्यवस्तीत दवाखाने आहेत. ही मंडळी सरकारी सेवेत कमी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये जास्त इंटरेस्ट दाखवितात. महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभेतही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खासगी 'प्रॅक्टिस'ची चर्चा होऊनसुद्धा कारवाई झाली नाही.

मुक्काम शहरात

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नोकरीचे ठिकाण ग्रामीण भागात मात्र वास्तव्य शहरात असे चित्र आहे. अनेक अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत, तालुका पंचायत स्तरावर संगनमत करुन मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव्य करत असल्याची शिफारसपत्रे सादर करतात.अधिकाऱ्यांच्या बनवेगिरीला काही वेळेला स्थानिक समित्यांची साथ लाभते. त्याचा गैरफायदा उठवित ही मंडळी वर्षानुवर्षे 'पगार सरकारी अन् काम खासगी' या पध्दतीने कार्यरत आहेत.

महापालिकेच्या सेवेतील अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांची खासगी दवाखाने आहेत. आठ तास काम करण्याची सक्ती असताना दोन ते तीन तास इतका वेळ ते महापालिकेच्या दवाखान्यासाठी देतात.काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बोगस बिले सादर करुन रक्कम उचलली आहे.

- भूपाल शेटे, नगरसेवक

ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहिले पाहिजे. मात्र अनेक ठिकाणी रुग्णांना वैद्यकीय अधिकारी भेटत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही डॉक्टरांनी परस्पर खासगी दवाखाने सुरू केली आहेत. त्याचा फटका ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर होत आहे.

- पांडुरंग भादिंगरे, जिल्हा परिषद सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदगडला उत्साहात विसर्जन

$
0
0

चंदगडला घरगुती गणेशमूर्तींचे

भक्तीमय वातावरणात विसर्जन

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

'गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या', 'गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला'च्या जयघोषात तालुक्यातील घरगुती गणेशमूर्तींचे ताम्रपर्णी व घटप्रभा नदीपात्रात मोठ्या भक्तीभावाने विसर्जन करण्यात आले. कोणी शांततेत तर कोणी पारंपरिक वाद्यासह गणेशमूर्ती विसर्जनासाठी नेत होते. तरुणांसह बालचमूही गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी उत्साहाने सहभागी झाले होते.

गेले पाच दिवस वातावरण गणेशमय झाले होते. शाळांना सुट्टी असल्यामुळे मुले सहभागी झाली होती. आज विसर्जनासाठी काही ठिकाणी नागरीकांनी सकाळपासूनच गणेशमूर्ती विसर्जन करण्याचे नियोजन केले होते. यामध्ये लहान मुलेही सहभागी झाली होती. येथील गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी ताम्रपर्णी नदीकाठावर दुपारनंतर मोठी गर्दी झाली. कोणी आपापल्या वहानातून, कोणी दुचाकीवरुन, चारचाकी वाहनांतून तर कोणी ट्रॅक्टरमधून, पायी गणपती विसर्जन करण्यासाठी जात होते. त्यातच फटाक्यांची आतषबाजी सुरु होती. पावसाने उघडीप दिल्याने भक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राधानगरी तालुक्यात मूर्तीदान चळवळीला प्रतिसाद

$
0
0

राधानगरी तालुक्यात मूर्तीदान चळवळीला प्रतिसाद

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

राधानगरी तालुक्यात निर्माल्य दान उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. गौरी आणि गणपती मूर्ती आणि निर्माल्य पाण्याला स्पर्श करून दान करण्यात आले. लाडक्या घरगुती गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. निर्माल्य गोळा करण्यासाठी ग्रामपंचायत आणि युवा पिढीने पुढाकार घेतला. जल प्रदूषण टाळा असा संदेश देत सर्वत्र युवक, युवतींनी मूर्तीदान उपक्रमात पुढाकार घेतला.

राधानगरी तालुक्यात गावोगावी सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून घरगुती गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले. भोगावती, तुळशी, दुधगंगा आणि धामणी नदीच्या तिरावर महिलांची, युवतींनी मोठी गर्दी गौरी-विसर्जन करण्यासाठी झाली होती. गौरी निर्माल्य नदीत न सोडता पाण्यात भिजवून बाहेर ठेवले. प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत निर्माल्य वाहतुकीसाठी सुविधा देण्यात आली होती. दुपारी तीननंतर घरगुती गणपती विसर्जन भक्तिमय वातावरणात करण्यात आले. पारंपरिक वाद्याच्या गजरात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप भक्तिमय पद्धतीने देण्यात आला. प्रत्येक गावच्या नदी घाटावर गणेश विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती. कौलव गावात गेली वीस वर्षे मूर्ती दान करण्याची प्रथा सुरू आहे. कौलव ग्रामपंचायत मार्फत गणेशमूर्ती स्वीकारण्यात आल्या. राशिवडे येथील नागेश्वर हायस्कूलच्यावतीने मिरवणूक पारंपरिक पद्धतीने वाद्याच्या गजरात काढण्यात आली. मुलींचे लेझीम, झांजपथक राशिवडे परीसरात आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. गावोगावी उत्साही वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला.

निर्माल्य दान आणि मूर्तीदान चळवळीला चांगला प्रतिसाद मिळाला. कौलव, राशिवडे, शिरगाव, धामोड, बरगेवाडी, आवळी येथे भोगावती नदीकाठी मूर्ती पाण्याला स्पर्श करून बाहेर काढण्यात आल्या. तर वाडी-वस्तीवर विहिरीच्या ठिकाणी काहील ठेवून मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. सरवडे, सोळंकुर, कसबा वाळवे परिसरातील घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन दुधगंगा नदीकाठी पाण्याच्या काहिलीत करून मूर्तीदान करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images