Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

महावीरमध्ये कार्यशाळा

$
0
0

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ अग्रणी कॉलेजअतंर्गत महावीर कॉलेज, समाजशास्त्र विभागातर्फे 'युवतींचे आरोग्यविषक प्रश्न' या विषयावर कार्यशाळा झाली. प्रा. डॉ. पाडुरंग पाटील यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. प्राचार्य डॉ. आर. पी. लोखंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी डॉ. अर्चना खाडे यांनी मार्गदर्शन केले. उर्मिला चव्हाण यांचेही भाषण झाले. कार्यशाळेचे समन्वयक म्हणून डॉ. उषा पाटील यांनी काम पाहिले. कार्यशाळेचे आयोजन प्रा. अंकुश गोंडगे, प्रा. उमेश वागंदरे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेसची जोरदार निदर्शने

$
0
0

फोटो आहे.

राफेल करार, इंधन दरवाढी विरोधात जोरदार घोषणाबाजी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल खरेदी व्यवहारात अनियमिता केली आहे. याशिवाय पेट्रोल, डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. ही दरवाढ कमी करावी,अशी मागणी करत काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी जोरदार निदर्शने केली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील, महापौर शोभा बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.

लढाऊ विमान (राफेल) खरेदी करताना देशहिताच विचार केलेला नाही. हा व्यवहार संशयास्पद झाला आहे. सरकार तिजोरीतून ४१ हजार, २०५ कोटींची लूट झाली आहे. दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने जनता त्रस्त आहे. त्यांच्यात प्रचंड असंतोष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कामकाज सामान्यांसाठी नसून उद्योजकांसाठी आहे. येणाऱ्या काळात इंधनाचे दर कमी करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस यशवंत हाप्पे, प्रकाश सातपुते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध

निवेदन देण्यासाठी येणार असल्याचे पत्र दिले होते. तरीही निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार उपस्थित राहिले नाहीत, त्याबद्दल माजी मंत्री पाटील आणि आमदार सतेज पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. निवेदनाची गंभीर दखल घेत सरकारशी पत्रव्यवहार करावा. त्यासंबंधीची माहिती आम्हाला पत्राने कळवावे, असे माजी मंत्री पाटील यांनी सांगितले. आधी पत्र देऊनही गैरहजर राहिल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तांत्रिक देखाव्याची ‘जयशिवराय’ची परंपरा

$
0
0

फोटो आहे

भारताने वैज्ञानिक भरारीतून जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाची गणेशोत्सवाच्या माध्यमातून माहिती करून देण्याचा प्रयत्न शिवाजी उद्यमनगरातील जयशिवराय मित्र मंडळ नेहमीच करत आहे. तांत्रिक देखाव्याची परंपरा कायम ठेवताना मंडळाने 'इस्रो : भारताची अवकाश भरारी' हा तांत्रिक देखावा तयार केला आहे. विशेष म्हणजे गणेशमूर्ती आणि गणरायाचे वाहन असलेला उंदीरसुद्धा वैज्ञानिक रूपात साकारला आहे.

मंडळाची स्थापना ३३ वर्षांपूर्वी झाली. सुरुवातीची दोन-तीन वर्षे वगळता मंडळ दरवर्षी तांत्रिक देखावा सादर करत आहे. यावर्षीही तांत्रिक देखाव्याची परंपरा कायम ठेवताना अवकाश भरारीचा देखावा तयार केला आहे. तांत्रिक स्वरूपात तयार केलेल्या देखाव्यातून वैज्ञानिक रूपातील गणेश व उंदीर सुमारे तीस फूट अवकाशात भरारी मारणार आहे. महेश बुधले व रवींद्र सुतार यांच्या संकल्पनेतून देखावा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

केवळ तांत्रिक देखाव्यातून मंडळ आपले वेगळेपण जपत नसून त्याला सामाजिक आणि पर्यावरणाची जोड दिली जात आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मंडळाच्यावतीने दरवर्षी दहा झाडांचे रोपण करून त्यांचे संवर्धन केले जात आहे. त्यामुळे परिसरात चांगलीच हिरवाई दिसत आहे. तर गेल्या पंधरा वर्षांपासून मूर्तीची उंची अवघी पाच ते सहा फूट केली आहे. तसेच मूर्तीदान प्रदूषणमुक्तीचा चळवळीला हातभार लावला जात आहे.

मंडळाने सामाजिक बांधिकी जोपासत महापालिका व हुतात्मा उद्यानमध्ये स्वच्छतागृह उभारले आहेत, तर अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक व क्रीडा साहित्यांचे वाटप केले जात आहे. यामुळेच मंडळाने तांत्रिक देखाव्याबरोबर पर्यावरण व सामाजिक बांधिलकी जपणारे मंडळ म्हणून ओळख तयार केली आहे. मंडळाचे अध्यक्ष संजय कोईगडे, उपाध्यक्ष सौरभ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळानी नवी ओळख तयार करत आहेत.

००००

जयशिवराय मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते म्हणून पांडुरंग पाटील यांची ओळख. पाटील वाळू व्यावसायिक आहेत. मंडळाची स्थापना झाल्यापासून स्वत:च्या जागेत फोल्डिंगचा मंडप उभारणी करून गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करतात. वाहतुकीला अडथळा न ठरता आणि रस्त्यावर एकही खड्डा गणेशोत्सव काळात पाडला जात नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकांनी रोजगारसंधी निर्माण कराव्यात

$
0
0

फोटो आहे.

प्रताप पुराणिक; इंजिनिअर डेनिमित्त आठ जणांचा सत्कार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भारतीय अभियंत्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. यामुळेच विदेशात त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्यांसाठी उद्योजकांनी नवनवीन संधी उपलब्ध करून द्याव्यात,' असे आवाहन ज्येष्ठ उद्योजक प्रताप पुराणिक यांनी शनिवारी केले. द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सतर्फे आयोजित ५१ व्या इंजिनिअरर्स डे च्या कार्यक्रमात ते बोलत होते. शाहू स्मारक भवनात कार्यक्रम झाला.

पुराणिक म्हणाले, 'अनेक इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना वाव दिला जात आहे. जगात अशक्य असे काहीही नाही, प्रयत्न केल्यास यश मिळते, हे सूत्र अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नेहमी लक्षात ठेवावे. प्रचंड कष्ट हे यशापर्यंत पोहचण्याचा मार्ग आहे.'

डाटा संशोधक डॉ. अमित अंद्रे म्हणाले, 'डाटा तंत्रज्ञानात प्रचंड बदल होत आहेत. बदल स्वीकारात अभियंत्यांनी अपडेट राहिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करावी. उद्योजकांनी नवीन तंत्रज्ञाचा वापर करून रोजगार निर्मिती करावी.'

यावेळी अमित आडमुठे, डॉ. संजय सावंत, विजय पाटील, जयंत घाटगे, बाळकृष्ण शिपुकडे, डॉ. महेश चौगुले, जयप्रकार माने यांचा विविध पुरस्काराने सन्मान करण्यात आला. शिपुकडे यांनी सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

डॉ. पी. व्ही. कडोले यांनी प्रास्ताविक केले. एन. बी. मते यांचे भाषण झाले. ए. बी. देशपांडे, डॉ. जयदीप बागी यांच्यासह अभियांत्रिकी विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. एम. एन. चव्हाण यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभेची पुढे ढकलणे हा पहिला दणका

$
0
0

गोकुळ बचाव कृती समितीचा निशाना

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्याबाबात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश म्हणजे मनमानी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना पहिला दणका आहे,' अशी टीका गोकुळ बचाव कृती समितीने पत्रकाद्वारे केली.

जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी आदेश दिल्यानंतर गोकुळची सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्यात आल्याचे गोकुळ प्रशासनाने जाहीर केले. त्यानंतर समितीचे पदाधिकारी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, कुंभीचे संचालक किशोर पाटील, गोकुळचे माजी संचालक बाबासाहेब चौगले किरणसिंह पाटील यांनी पत्रक काढून गोकुळच्या संचालक मंडळावर टीका केली आहे.

दोन दिवसांपूर्वी गोकुळच्या संपर्क सभेत कसबा बावड्यातील विश्वास नेजदार यांना सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. त्या पार्श्वभूमीवर सर्वसाधारण सभेत काय होणार याबाबत उत्सुकता लागली होती. शुक्रवारी महादेवराव महाडिक यांनी आमदार पाटील यांच्या घरी भेट दिली तर नेजदार यांना भेटून माफी मागितली होती. त्यावेळी महाडिक यांनी सभेची तारीख आणि वेळ बदलण्यासाठी तुमच्या नेत्याला पत्र द्यायला सांगा, त्याबाबात निर्णय घेऊ असे सांगितले होते. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी सभेची तारीख पुढे ढकलण्याची घोषणा करण्यात आली.

त्यानंतर गोकुळ बचाव कृती समितीने काढलेल्या पत्रकात असे म्हटले आहे, गोकुळची सर्वसाधारण सभा २१ सप्टेंबर रोजी घेण्याचे सत्ताधाऱ्यांनी नियोजन केले होते. गणेशोत्सव आणि मोहरम सण असताना देखील सत्ताधाऱ्यांनी मनमानी करत मुद्दाम याच काळात सभा घेण्याचे ठरवले. ताराबाई पार्क येथील गोकुळच्या आवारात जागा कमी असल्याने सभा घेऊ नये, अशी मागणी कृती समितीने केली असताना संचालक मंडळाने तारखेत व सभा कार्यस्थळात बदल केला नाही. कृती समितीने याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुखांना देऊनही गोकुळचे सत्ताधारी २१ तारखेलाच सभा घेण्याबाबत अडून बसले होते. मल्टिस्टेटला जिल्ह्यात सध्या सर्वत्र विरोध होत असताना कायदा व सुव्यस्थेच्या आढावा घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सभेची तारीख बदलण्याचे आदेश देत सत्तारुढ गटास दणका दिला आहे. गोकुळच्या सर्व सभासदांच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करतो असेही पत्रकात म्हटले आहे.

नरके गटाची आज बैठक

आमदार चंद्रदीप नरके यांनी मल्टिस्टेट विषयाबाबत दूध संस्थांच्या सभासदांशी चर्चा करण्यासाठी रविवारी (१६)कळंबा येथील अमृतसिद्धी मंगल कार्यालयात बैठक आयोजित केली आहे. बैठकीला करवीर विधानसभा मतदारसंघातील करवीर, पन्हाळा व गगनबावडा तालुक्यातील सर्व दूध संस्थांचे प्रतिनिधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, साखर कारखाना, बँक व विविध संस्थांचे आजी-माजी प्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘युवक मित्रमंडळ’चीरॉकेटमधून दहाजणांना चंद्रस्वारी

$
0
0

पर्यावरणविषयक जनजागृती करण्यासाठी राजारामपुरी ११व्या गल्लीतील युवक मित्रमंडळ दरवर्षी वेगवेगळे देखावे साकारते. यंदा अवकाशात झेप घेणाऱ्या रॉकेटचा देखावा साकारला आहे. या रॉकेटमधून चंद्रावरून पृथ्वीचे रूप पाहता येणार आहे. वैज्ञानिक देखाव्यांच्या माध्यमातून पर्यावरणासंबंधी अनेकविध समस्या युवक मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी हाताळल्या जातात. सांस्कृतिक परंपरा जपण्याबरोबर पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जाणीवजागृती करण्याचे काम मंडळाने हाती घेतले आहे.

चांद्रयान या नावाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. या देखाव्यामध्ये तब्बल पंधरा फुटांहून अधिक उंचीचे रॉकेट साकारले जात आहे. यामध्ये किमान दहा लोक बसू शकतील अशी त्याची अंतर्गत रचना केली आहे. बाहेरून हे रॉकेट पाहताना इस्रो अवकाश संस्थेत गेल्यासारखे वाटते. रॉकेटमध्ये आधुनिक तंत्राचा वापर केला असून त्यामध्ये दहा लोकांना काही उंचीवर नेऊन रॉकेट चंद्रावर उतरवले जाणार आहे. तसेच रॉकेट उडाण करताना धूर निर्माण केला जाणार आहे. रॉकेट आकाशात झेप घेतानाचे असलेले संपूर्ण वातावरण तयार केले आहे. रॉकेट चंद्रावर उतरल्यानंतर तिथल्या वातावरणासारखी स्थिती निर्माण केली आहे. शून्य गुरुत्वाकर्षण निर्मिती, चंद्रावरील जमीन तसेच समोरच थ्रीडी तंत्राचा वापर करून पृथ्वी साकारण्यात आली आहे. थेट चंद्रावरून पृथ्वी कशी दिसते याची प्रचिती येण्यासाठी सहा मिनिटांची दृश्यरूपातील व्हिडीओ क्लिप दाखविण्यात येणार आहे. यामध्ये मानवाने पृथ्वीची केलेली हानी दाखविली जाईल. तसेच जागतिक महायुद्धानंतर पृथ्वीचे कसे नुकसान झाले याचे दृश्य दाखविण्यात येईल. पाणी, हवा, जमीन या घटकांच्या प्रदूषणाला माणूस कसा जबाबदार आहे याची जाणीव या देखावाच्या माध्यमातून केली जाणार आहे.

०००

मानवाने पर्यावरणाची अतोनात हानी केली आहे. त्याला पृथ्वीवरील प्रदूषणाची जाणीव नाही. निसर्गाने मुक्तहस्ते दिलेल्या देणगीची जपणूक करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. पुढच्या पिढ्यांसाठी चांगले वातावरण द्यायचे असेल तर पृथ्वीची काळजी घेणे गरजेचे आहे. पर्यावरण रक्षणासाठी जाणीवजागृती व्हावी हाच या देखाव्यांमागील हेतू आहे.

बाबा इंदुलकर, सामाजिक कार्यकर्ते

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धागा संस्कृतीचा

$
0
0

उत्तरप्रदेशीय लोकांची

अभिनव गणेश आराधना

फोटो आहे....

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कठोर परिश्रम करणारा समाज म्हणून उत्तरप्रदेशीय लोकांची ओळख. दिवसरात्र अत्यंत कष्टाची कामे करण्यात त्यांचा जणू हातखंडा. पडले ती कामे करून उदरनिर्वाह करणारा समाज शिक्षणाकडे अधिक आकर्षित होत असून, याच विद्येची आराधना करण्यास समाजाने सुरुवात केली. त्यामुळे अनेक उत्तरप्रदेशीय कुटुंबीयांमध्ये मनोभावे पूजा करून येथील संस्कृतीशी एकरूप होत आहेत.

विविध प्रकारची कलाकुसर, गवंडी, सुतारकाम या कष्टाचा कामाबरोबर उद्योग, व्यापार करताना शहर आणि परिसरात अनेक उत्तरप्रदेशीय कुटुंबे दिसतात. अत्यंत कष्टाची कामे करणारा समाज म्हणून त्यांची ओळख असली तरी चाकोरबाहेरची कामे करताना हा समाज दिसत आहे. शहरातील या समाजाला एकत्र बांधणीसाठी उत्तरप्रदेश-बिहार समाजबांधव संघटनाही स्थापन केली आहे. संघटनेच्या माध्यमातून मराठी संस्कृतीतील अनेक सणसमारंभ साजरे केले जातात.

या समाजातील प्रमुख सचदानंद रामधर सिंह गेल्या १२ वर्षांपासून ताराबाई पार्कमध्ये वास्तव्य करत आहेत. मूळचे गोरखपूरचे असलेले सचदानंद प्रथम व्यवसायानिमित्त थायलंड येथे वास्तव्यास होते. दहा वर्षांनंतर ते मुंबईत दाखल झाले. मुंबईत फार काळ त्यांचे वास्तव्य राहिले नाही. कोल्हापुरात अनेक नातेवाईक असल्याने ते २००६ मध्ये येथे आले. बांधकाम व्यवसायाशी निगडित अनेक व्यवसाय करत त्यांनी चांगला जम बसवला. बांधकाम व्यवसायामुळे त्यांची येथील मराठा समाजातील अनेक व्यक्तींशी ओळख झाली. व्यवसायाच्या माध्यमातून त्यांचे मराठी कुटुंबीयांबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध निर्माण झाले आणि त्यांना गणेशोत्सव साजरा करण्याची प्रेरणा मिळाली. दिवाळी, दसरा याप्रमाणे श्रावण महिन्यातील व्रत करताना त्यांनी प्रथम २०१२ मध्ये घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली. भव्य नसली, तरी आकर्षक सजावट करून त्यांनी मनोभावे पूजेस सुरुवात केली. सकाळी व सायंकाळी गणपतीची आराधना करताना सचदानंद दोन्ही वेळेला विधिवत पूजा करतात. दोन्हीवेळा नैवेद्य तयार करून जवळच्या नातेवाइकांना आरतीसाठी निमंत्रित केले जाते. गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेपासून ते घरगुती गणपती विसर्जनापर्यंत ते इतर नातेवाइकांकडे आरतीला आवर्जून हजेरी लावतात. कुटुंबात मराठी समाजातील प्रत्येक सण अत्यंत आवडीने साजरा केला जात असल्याने अनेक कुटुंबांबरोबर त्यांचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले आहेत. यामुळे दोन्ही समाजातील संस्कृतीची वीण वृद्धिंगत झाली आहे.

००

गणेशाची आराधना करण्यास सुरुवात केल्यापासून एक वेगळे समाधान मिळत आहे. विद्येची देवता म्हणून गणरायाची ओळख असल्याने भावाच्या मुलाला शिक्षणासाठी कोल्हापुरात आणले असून, तो सध्या शिवाजी विद्यापीठात एमबीएचे शिक्षण घेत आहे. त्यामळे एक वेगळेच समाधान मिळत आहे.

सचदानंद रामधर सिंह

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूर्ती, निर्माल्य संकलनासाठी ५०० कर्मचारी

$
0
0

घरगुती गौरी गणपती विसर्जनासाठी महापालिका यंत्रणा सज्ज

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घरगुती गौरी गणपती विसर्जनावेळी मूर्तिदान व निर्माल्यदान उपक्रमाला चालना देण्यासाठी सोमवारी (ता. १७) रोजी होणाऱ्या विसर्जनासाठी महापालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. मूर्ती व निर्माल्य विसर्जनामुळे पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी ठिकठिकाणी महापालिकेने विसर्जनकुंड व काहिलींची व्यवस्था केली आहे. सुमारे ५०० कर्मचारी मूर्ती व निर्माल्य संकलित करणार आहेत. या उपक्रमामध्ये अधिक सहभाग वाढवण्यासाठी ठिकठिकाणी प्रबोधनात्मक फलक लावले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून कोल्हापुरात मूर्ती व निर्माल्यदान उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहून महापालिकेने अनेकठिकाणी विसर्जन कुंड, काहिली, व निर्माल्य कुंडाची व्यवस्था केली आहे. पर्यायी कुंडाची स्वच्छता करण्यात आली असून वीज यंत्रणांचीही दुरुस्ती केली आहे. विसर्जनस्थळी अग्निशमन दलाचे जवान तैनात ठेवण्यात येणार आहेत.

भाविकांनी दान केलेल्या गणेशमूर्ती सजवलेल्या ट्रॉलीमधून इराणी खणीमध्ये विसर्जित केल्या जाणार आहेत. तसेच निर्माल्य संकलित करण्यासाठी आरोग्य विभागाची १२ पथके तयार केली आहेत. संकलित झालेले निर्माल्य एकटी संस्थेच्या वाशी येथील खत निर्मिती प्रकल्पाला देण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र डंपरची व्यवस्था करण्यात आली आहे.

पंचगंगा घाट संवर्धन समिती, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समितीसह शहरातील अनेक सामाजिक संस्था पर्यावरणपूरक विसर्जन उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. भाविकांनी मूर्ती अथवा निर्माल्यदान करुन उपक्रमात सहभाग नोंदवल्यास पंचगंगा घाट संवर्धन समितीच्यावतीने प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

मूर्ती व निर्माल्यदानासाठी केलेली व्यवस्था

गांधी मैदान विभागीय कार्यालय : इराणी खण, तांबट कमान, मोहिते खण, गंजीवली खण, रामानंदनगर चौपाटी, संध्यामठ, राजे संभाजीनगर तरुण मंडळ, पदपथ उद्यान, पतौडी खण, सरदार तालीम, पांढरा घाट, तलाव परिसर.

शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय : पंचगंगा नदी घाट परिसर, प्रायव्हेट हायस्कूल पटांगण, मंगेशकर नगर.

राजारामपुरी विभागीय कार्यालय : स्वामी समर्थ मंदिर, नारायणदास मठ, कोटीतीर्थ, राजाराम तलाव, सायबर चौक व राजाराम गार्डन.

ताराराणी विभागीय कार्यालय : राजाराम बंधारा कसबा बावडा, नर्सरी उद्यान रुईकर कॉलनी, बापट कॅम्प, मसुटे मळा, महावीर गार्डन, सासने ग्राऊंड. इ. ठिकाणी कृत्रीम कुंड, काहिली, निर्माल्यकुंड आदीची व्यवस्था करणेत आली आहे.

महापालिकेचे विविध विभागाचे कर्मचारी

पवडी विभागाचे : २००

आरोग्य विभाग : ३००

अरोग्य निरिक्षकांचे १२ पथके

ट्रॅक्टर : ४०

डंपर : १०

जे.सी.बी. : ४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बुधवार पेठेत अवतरली ‘आदिवासी लोकसंस्कृती’

$
0
0

लोप पावत चाललेल्या आदिवासी लोकसंस्कृतीवर यंदा बुधवार पेठेतील सोल्जर्स ग्रुपने देखावा तयार केला आहे. आदिवासी लोकसंस्कृतीची वैशिष्ट्ये, त्यांच्या चालीरिती, शेती करण्याची पद्धत आणि आदिवासी समाजाच्या शोषण करणाऱ्या यंत्रणेवर देखाव्याच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकला आहे. आदिवासी समाजाच्या उद्धारासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना हा समाजप्रबोधनात्मक देखावा समर्पित केला आहे.

सोल्जर्स ग्रुपची स्थापना १९८९ मध्ये झाली. दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर देखावे सादर करण्याची परंपरा ग्रुपने यंदाही जपली आहे. आदिवासी रूपातील गणेशमूर्ती, गणरायाची सेवा करणारे आदिवासी हा देखावा प्रेक्षकांना आकर्षित करणारा आहे. संदीप कुंभार यांनी मूर्ती तयार केली आहे. तीन वेगवेगळ्या देखाव्यांतून आदिवासी लोकसंस्कृती उलगडली आहे. आदिवासी समाजाची जीवन जगण्याची पद्धत, त्यांच्या बोलीभाषा, देश आणि राज्यांमधील वेगवेगळ्या भागातील समाजाचे वास्तव्य यासंबंधी माहिती मिळते. राज्यात गोंड, ठाकर, वारली, भिल्ल, कातकरी, पारधी, कोलम, कोरकू या आदिवासी जमाती आढळतात.

वाढती जंगलतोड, पशुपक्ष्यांची तस्करी, वन्यप्राण्यांची शिकार, विकासाच्या नावाखाली जंगले नष्ट करण्याच्या प्रकारामुळे आदिवासी लोकसंस्कृती धोक्यात आली आहे. सावकार, जमीनदार, कंत्राटदार अशा विविध घटकांकडून आदिवासींचे होणारे शोषण देखाव्याद्वारे मांडले आहे. आदिवासी समाजाच्या उद्धारासाठी काम केलेल्या महात्मा फुले, सरदार पटेल, ठक्कर बाप्पा, डॉ. बाबा आमटे, पद्मश्री जिवा सोमा म्हसे, डॉ. रवींद्र कोल्हे यांच्या कार्याला देखाव्यातून उजाळा दिला आहे. आदिवासी आणि इंग्रज यांच्यातील लढाईवर आधारित एक देखावा या समाजाच्या शूरतेची साक्ष देतो.

उत्सवासोबत अन्य सामाजिक उपक्रम मंडळातर्फे आयोजित केले जातात. मंडळाचे अध्यक्ष शुभम गुरव, उपाध्यक्ष स्वप्निल मेस्त्री, कार्याध्यक्ष अवधूत कोळी, खजानिस विनायक गणबावले, लेखापरीक्षक बंडा नाईक, सदस्य संदीप देसाई, राहुल गवळी, अब्दुल मीरशिकारी, उमेश सूर्यवंशी, संजय पाटील, संतोष गणबावले, रोहित फराकटे, आदी उत्सवाच्या यशस्वितेसाठी प्रयत्नशील असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’ची सभा लांबणीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गणेशोत्सव आणि मोहरम सणासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त नियुक्त केला आहे. त्यामुळे गोकुळची सर्वसाधारण सभा २५ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने सभा ३० सप्टेंबरला घेण्याचा निर्णय संघाने घेतला. संघ मल्टिस्टेट करण्याबाबतच्या निर्णयावर विचारविनिमय करण्यासाठी २१ सप्टेंबर रोजी सर्वसाधारण सभा होणार होती. मल्टिस्टेटवरुन सुरू झालेल्या राजकारणामुळे ही सभा वादळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गोकुळच्या सर्वसाधारण सभेत संघ मल्टिस्टेट करण्याचा ठराव सत्ताधाऱ्यांकडून विषयपत्रिकेवर ठेवण्यात आला आहे. मात्र राजकीय हेतूने मल्टिस्टेटचा ठराव आणण्यात येत आहे, या ठरावामुळे दूध संघाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार असल्याचा आरोप करीत आमदार सतेज पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी या ठरावाला विरोध केला आहे. सभा ताराबाई पार्कच्या प्रांगणात होणार असल्याने सभेचे ठिकाण बदलावे, अशी मागणीही पाटील यांनी केली होती. तसेच सभेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिस अधीक्षक जबाबदार राहतील, असा इशाराही दिला होता.

पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनीही गणेशोत्सव व मोहरम सणानिमित्त मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला असल्याने सभेस बंदोबस्त पुरवता येणे शक्य नाही. त्यामुळे गोकुळची सभा पुढे ढकलावी, अशी विनंती सहायक निबंधक, सहकारी दूध संस्था (दुग्ध) व गोकुळ प्रशासनाला केली होती. मात्र सभेची तारीख आणि ठिकाणाबाबत गोकुळ प्रशासन ठाम राहिले. तालुकावार संपर्क सभेतही दूध संस्थांकडून मल्टिस्टेटला विरोध होऊ लागला आहे. संपर्क सभेत राजाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्वास नेजदार यांना झालेली मारहाण, त्यानंतर पाटील समर्थकांनी दिलेले आव्हान आणि महाडिकांची बावडा भेट या पार्श्वभूमीवर सर्वसाधारण सभा होणार होती. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता होती. महोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस गुंतले असल्याने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी गोकुळची सभा पुढे ढकलण्याबाबत कार्यवाही करण्याचे पत्र शुक्रवारी सहायक निबंधकांना पाठवले. पण गोकुळ प्रशासन २१ तारखेलाच सभा घेण्यावर ठाम राहिले. अखेर शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांनी ही सभा गणेशोत्सवानंतरच घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी संचालकांशी चर्चा करुन सभा ३० तारखेला सकाळी ११ वाजता घेण्याचे जाहीर केले.

.. .. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुधवार, शनिवार पेठेत देखावे खुले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महागाईचा राक्षस, बालकामगारांच्या समस्या, सर्वसामान्य माणसाचे प्रश्न अशा सामाजिक विषयांसह पक्षी वाचवा मोहिमेसारख्या पर्यावरणीय प्रश्नांवर प्रकाश टाकणाऱ्या देखावर शनिवार पेठ आणि जुना बुधवार पेठेतील मंडळे, तालीम संस्थांनी खुले केले आहेत. इजिप्तमधील तसेच शंकराच्या रुपातील आकर्षक मूर्ती व देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे.

जुना बुधवार पेठेतील डांगे गल्ली तरुण मंडळाने 'अपारंपरिक उर्जास्रोत' हा देखावा शनिवारी (ता. १५) खुला केला. अपारंपरिक उर्जेचे महत्व पटवणारा गणराय, सौरउर्जेचा वापर करणाऱ्या गावाची मांडणी, अपारंपरिक उर्जेचे प्रकार, त्याचे फायदे देखाव्यातून मांडले आहेत. तोरस्कर चौकातील सोल्जर्स ग्रुपने लोप पावलेल्या आदिवासी लोकसंस्कृतीवर प्रकाश टाकणारा देखावा सादर केला आहे. आदिवासी संस्कृतीची वैशिष्ट्ये, त्यांच्या चालीरिती, शेती, आदिवासींचे होणारे शोषण अशी देखाव्याची मांडणी आहे.

शिपुगडे तालमीने 'स्त्री भ्रूण हत्या' तर हायकमांडो फ्रेंड्स सर्कलने 'कॉमन मॅन'चा देखावा साकारला आहे. 'कॉमन मॅन'पुढे कोल्हापुरातील अर्धवट रखडलेल्या प्रकल्पांचे काय होणार? हा देखावा मांडला जात आहे. 'प्रश्न तेच, उत्तरे अनेक' या टॅगलाइनखाली थेट पाइपलाइन, कचऱ्यापासून वीजप्रकल्प, सीपीआरचे आधुनिकीकरण, पर्यायी शिवाजी पूल, राजर्षी शाहू जन्मस्थळ, रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण, विमानतळ हे प्रश्न देखाव्यातून मांडण्यात येणार आहे. केसापूर पेठ तरुण मंडळाने 'गुरु शिष्य' परंपरेचा देखावा मांडला आहे. राजगुरू तरुण मंडळाने मयूरासमवेत गणराय मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. गवंडी मशीद येथील मराठा मावळा ग्रुपने वृक्षारोपणाचे महत्व पटवणारा गणराय या देखाव्यातून सामाजिक संदेश दिला आहे.

जुना बुधवार पेठ तालमीने सिंहासनावरील मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. भगतसिंग तरुण मंडळाची शंकराची रुपातील मूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. नंदीच्या पाठीवर मूषक व त्यावर शंकराच्या रुपातील मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. शनिवार पेठेतील एसपी बॉईजने चिंतामणी रुपातील मूर्ती प्रतिष्ठापना केली आहे. तोरणा तरुण मंडळ 'महागाईचा राक्षस' देखाव्याची मांडणी करीत आहे. साई मित्र मंडळाने इजिप्तमधील प्राचीन मंदिरातील गणेशमूर्ती भाविकांसाठी खुली केली आहे.

अमर तरुण मंडळाने 'बाल कामगार' हा ज्वलंत विषय हाताळला आहे. राइस मिलमध्ये काम करणाऱ्या बालकामगाराच्या डोक्यावरील पोते गणराय काढून घेत आहे. गणराय त्याला पुस्तक देऊन शिक्षणाचा मार्ग चोखाळण्यास सांगत आहेत. बुरुड गल्लीतील अंकुश ग्रुपने 'पक्षी वाचवा' मोहिमेंतर्गत गणपती पक्ष्यांसमवेत खेळत असल्याचा देखावा मांडला आहे.

जोशी गल्लीतील संरक्षक मित्र मंडळाने खोडकर कृष्णाला माकडाची मदत हा देखावा खुला केला आहे. कृष्णरुपातील गणपतीला यशोदेने बांधून ठेवले आहे. कृष्णाला मदत करण्यााठी एक माकड तेथे येते. त्याला लोणी खाण्यासाठी माकड मदत करते असा देखावा बच्चेकंपनीला खिळवून ठेवणारा आहे. गवळी गल्लीने बैलगाडीवर बसलेल्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. चौगुलेंच्या कारमान्यांनी गारगोटीवासीयांना धक्का

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

सांगलीतील बेकायदा गर्भपात प्रकरणात सहभागी असलेला डॉ. विजयकुमार शामराव चौगुले गारगोटी ग्रामीण रुग्णालयात भूलतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचे वृत्त गारगोटीत समजताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह तो राहत असलेल्या ठिकाणच्या लोकांना धक्काच बसला. या घटनेने आता गारगोटी ग्रामीण रुग्णालय डॉक्टराविना झाले आहे.

डॉ. विजयकुमार चौगुले गारगोटी ग्रामीण रुग्णालयात गेले सात-आठ महिने वर्ग २ दर्जाचे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. ग्रामीण रुग्णालयासाठी वैद्यकीय अधीक्षकांसह तीन वैद्यकीय अधिकारी अशी एकूण चार पदे मंजूर असतानाही डॉ. चौगुले एकमेव वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत असल्याने त्याच्याकडेच अधीक्षकपदाचाही कार्यभार आहे. डॉ. चौगुले याच्या सुट्टी अथवा गैरहजेरीवेळी अधिपरिचारिकांनाच रुग्णालय सांभाळावे लागते.

डॉ. चौगुले भूलतज्ज्ञ म्हणून काम करीत असला तरीही त्याला ऑपरेशनपेक्षा ओपीडीच बघावी लागत असल्याचे सांगण्यात येते. रुग्णालयात दररोज साधारणतः दोनशे रुग्ण आरोग्यसेवा घेण्यासाठी येतात. याशिवाय सर्पदंश, अन्न विषबाधा, अपघात, प्रसूती यांसारख्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. मात्र, डॉक्टरांची संख्या अपुरी असल्यामुळे रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. गोरगरीब रुग्णांना मोफत आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे. सरकार या ग्रामीण रुग्णालयाला डॉक्टर उपलब्ध करून देत नसल्याने आरोग्य विभाग खासगी आरोग्य सेवेला खतपाणी घालते की काय? अशा प्रतिक्रया व्यक्त होत आहेत.

०००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतिकात्मक भीक मागूनजावडेकरांचा निषेध

$
0
0

फोटो आहे.

बिंदू चौकात यूथ फेडरेशनेचे आंदोलन

कोल्हापूर टाइम्स टीम

शाळांनी वाडगा घेऊन सरकारकडे पैसे मागण्याऐवजी माजी विद्यार्थ्यांकडे जावे, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसात रविवारी कोल्हापुरात उमटले. अखिल भारतीय नौजवान सभेच्या ऑल इंडिया यूथ फेडरेशनतर्फे बिंदू चौकात प्रतिकात्मक भीक मागून मंत्री जावडेकरांचा निषेध नोंदवला. मंत्री जावडेकर, भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणा देऊन चौक दणाणून सोडला.

गिरीष फोंडे म्हणाले, 'मनुष्यबळ विकासमंत्री जावडेकर यांनी शाळांबद्दल अतिशय चुकीचे विधान केले आहे. जनता कर भरते त्यातून सरकार अनुदानाच्या रूपात शाळा चालवते. जावडेकर स्वत:च्या खिशातून हे अनुदान देत नाहीत. तरीही ते शाळांना पैशांची भीक मागू नका, असा सल्ला दिला. त्यांचा निषेध म्हणून आम्ही कार्यकर्ते प्रतिकात्मक भीक मांगो आंदोलन केले. त्यातून गोळा झालेले पैसे त्यांना पाठविणार आहे. त्या वक्तव्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून जावडेकरांचा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा.'

यावेळी आंदोलनातील कार्यकर्त्यांनी 'भाजप सरकार चले जाव', 'मुर्दाबाद, मुर्दाबाद जावडेकर मुर्दाबाद', 'भाजप सरकारचा धिक्कार असो', 'शिक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे' अशा घोषणा देत लक्ष वेधले. आंदोलनात प्रशांत आंबी, हरीश कांबळे, धीरज कठारे, आनंद सातपुते, दिलदार मुजावर, अमोल देवरकर, अजित समुद्रे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘युवक पदाधिकाऱ्यांनी पक्ष बळकट करावा’

$
0
0

आमदार सतेज पाटलांचे आवाहन

कोल्हापूर टाइम्स टीम

'युवक काँग्रेसच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना एनएसयूआयच्या माध्यमातून काम करण्याची उत्कृष्ट संधी मिळाली आहे. संधीचा फायदा घेऊन पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सामान्य जनतेला न्याय मिळवून देवून काँग्रेस पक्ष बळकट करावा', असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. अजिंक्यतारा संपर्क कार्यालयात आयोजित नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभात ते बोलत होते.

आमदार पाटील म्हणाले, 'युवक काँग्रेस ही पक्षाची मोठी ताकद आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवून देण्यासाठी ही ताकद अजमावण्याची गरज आहे. १९९२ मध्ये शिवाजी विद्यापीठातून एनएसयूआयच्या माध्यमातून पक्षकार्याला सुरुवात केली. त्यामुळेच मी मंत्रिपदापर्यंत पोहोचलो. कार्य चांगले असल्यास संधी हमखास मिळते. युवक पदाधिकाऱ्यांना विद्यमान सरकारच्या धोरणाविरोधात काम करण्याची संधी आहे. ईबीसी सवलत, समाजकल्याण विभागातील सवलती, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलत मिळते का? याबाबत पाठपुरावा करण्याबरोबर समाजातील सर्वच घटकांना सरकारच्या योजनांचा लाभ मिळतो का? याची माहिती घेऊन संघर्ष केला पाहिजे. भाजप सत्तेत आल्यापासून घरगुती वीज दरवाढ व कृषीपंपाच्या वीज दरवाढीमुळे सामान्य व्यक्ती होरपळत आहेत. सरकारच्या या सर्व धोरणाविरोधात ताकदीने उतरले पाहिजे. सरकारच्या जनतेविरोधी धोरणांचा पर्दाफाश करण्याची चांगली संधी आहे.' गडहिंग्लज पंचायत समिती सदस्य विद्याधर गुरबे, शहर उपाध्यक्ष संतोष कांबळे, अमृता भोसले, बायजी शेळके यांनी मनोगत व्यक्त केली.

यावेळी आमदार पाटील यांच्या हस्ते युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक थोरात, उत्तर विधानसभा युवक अध्यक्ष स्वप्निल सावंत, दक्षिण विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष सचिन रावळ तर उपाध्यक्ष वैभव पाटील यांचा सत्कार केला. शंभूराजे देसाई, दयानंद कांबळे, बयाजी शेळके, ऐश्वर्या भाट, नितीन हाप्पे, महादेव कांबळे यांच्यासह तालुका पदाधिकाऱ्यांचाही सत्कार आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिनय स्पर्धेत यश

$
0
0

कोल्हापूर: जिल्हा शैक्षणिक व्यावसायिक विकास संस्थेतर्फे आयोजित लोकनृत्य व अभिनय स्पर्धेत येथील राजमाता जिजाबाई हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. यामध्ये वैशाली तिवले, पूजा केसरकर, पायल केंगार, कोमल खवळे, धनाजी धुरके, निसर्ग सावंत यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका अंजली जाधव, सोनल पाटील व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अवती भवती....

$
0
0

दवाखान्याची इमारत शाळेला

प्रशासकीय कामकाजात अधिकारी अनेकदा कागदी घोडे नाचविण्यात धन्यता मानतात. सामाजिक परिणाम, वस्तुस्थिती विचारात न घेता प्रस्ताव तयार होतात. असाच प्रताप आरोग्य विभागाने नुकताच केला. राधानगरी तालुक्यातील सार्वजनिक दवाखान्याची इमारत खासगी शाळेस भाड्याने देण्याचा अफलातून प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर मान्यतेसाठी मांडला. जिल्ह्यात एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा टिकाव्यात, पटसंख्या वाढावी यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे आरोग्य विभागाने मात्र जिल्हा परिषदेच्या मालकीची इमारत खासगी शाळेला भाड्याने देण्याच्या प्रस्तावाने सभागृहातील सदस्यही अवाक् झाले. क्षणभर कुणाला काय बोलावे हेच सुचेना. नंतर मात्र सदस्यांनी आरोग्य विभागाच्या या प्रस्तावाचा पंचनामा केला. प्रस्ताव सभेसमोर मांडणाऱ्या 'आरोग्य विभागाची प्रकृती तपासा, खासगी शाळांना जि.प.च्या इमारती भाड्याने देण्याचे सुपीक डोके कुणाचे?'अशी प्रश्नांची सरबत्ती केली. सदस्यांच्या वाढत्या विरोधामुळे प्रस्ताव नामंजूर झाला. एव्हाना आरोग्य विभागाला चूक लक्षात आली; पण अधिकाऱ्यांच्या स्वकेंद्रित कारभाराची चर्चा सभागृहात रंगली.

संकलन : आप्पासाहेब माळी

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्यावर एक दृष्टीक्षेप

$
0
0

हिंदकेसरी गणपतराव आंदळकर

पूर्ण नाव : गणपतराव कृष्णाजी पाटील आंदळकर

जन्मतारीख : १५ एप्रिल १९३५

जन्म गाव : पुनवत, ता. बत्तीस शिराळा, जि. सांगली

१९५० : कुस्तीसाठी कोल्हापुरात दाखल

१९६० : हिंदकेसरीची गदा पटकाविली

१९६२ : जकार्ता आशियाई स्पर्धेत ग्रीको रोमन स्टाइलमध्ये सुवर्णपदक, फ्री स्टाइलमध्ये रौप्यपदक

१९६४ : टोकिओ ऑलिंम्पिकमध्ये भारतीय कुस्ती संघाचे नेतृत्व

१९६४ : भारत सरकारने अर्जुन पुरस्कारांनी सन्मानित केले

१९८२ : महाराष्ट्र सरकारने शिवछत्रपती पुरस्कारांनी गौरविले

१९९० : महाराष्ट्र गौरव पुरस्कार

१९९९ : कोल्हापूर भूषण पुरस्कार

२०१४ : राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे मध्ये शाहू पुरस्काराने सन्मान

अशा गाजल्या लढती

आंदळकर यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली. चटकदार कुस्त्या ही त्यांची खासियत. कुस्तीच्या फडात त्यांनी अनेकांना चितपट केले. विविध ठिकाणच्या स्पर्धा गाजवत त्यांनी कोल्हापूरसह देशाचे नाव उंचावले. पाकिस्तानी मल्ल गोगा पंजाबी, सादिक पंजाबी, जिरा पंजाबी, नसिर पंजाबी, दिल्लीचा खडकसिंग पंजाबी, अमृतसरचा बनातसिंग पंजाबी, पतियाळचा रोहेराम लिलाराम, पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, महमंद हनिफ, श्रीरंग जाधव अशा नामांकित मल्लासोबतच्या त्यांच्या कुस्त्या रंगल्या.

लाल मातीशी शेवटपर्यंत गट्टी

गणपतरावांचा जन्म हा शेतकरी कुटुंबांतील. १९५०च्या आसपास ते खास कुस्तीसाठी कोल्हापुरात दाखल झाले. कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेला साजेसा खेळ करत त्यांनी कुस्ती केली. आशियाई स्पर्धा, टोकिओ ऑलिंम्पिकसह ठिकठिकाणची मैदाने गाजविली. १९६७मध्ये मोतीबाग तालमीत कुस्ती प्रशिक्षक म्हणून त्यांनी नवी जबाबदारी स्वीकारली. कुस्ती प्रशिक्षक म्हणून त्यांनी अनेक मल्लांना घडविले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या मल्लांनी महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरीपर्यंत मजल मारली. महान भारत केसरी दादू चौगुले, महाराष्ट्र केसरी चंबा मुत्नाळ, अॅग्नेल निग्रो, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, संभाजी वरुटे, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता रामचंद्र सारंग, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील अशा नामवंत मल्लांना घडविण्यात त्यांचे योगदान राहिले.

मल्ल, संघटक, कुस्ती प्रशिक्षक

गणपतराव आंदळकर यांनी कुस्तीक्षेत्रासाठी आयुष्य वाहिले. त्यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष व कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष या पदांवर कार्यरत असताना अनेक कुस्त्यांचे उत्कृष्ट संयोजन केले. आयुष्याच्या शेवटपर्यंत हा मल्ल आखाड्याशी जोडला होता. मल्ल असो की प्रशिक्षक, या दोन्ही भूमिकेत त्यांचे कुस्तीवरील प्रेम कायम राहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदकेसरी गणपतराव आंदळकर कालवश

$
0
0

उपचारादरम्यान पुण्यात निधन, आज पुनवतला अंत्यसंस्कार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लाल मातीच्या कुस्तीसह मॅटवर प्रभुत्व प्राप्त असलेले, अशियाई व ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीची पताका फडकवणारे, अखेरपर्यंत लाल मातीत मल्ल घडवणारे हिंदकेसरी गणपतराव कृष्णाजी पाटील आंदळकर (वय ८३) यांचे रविवारी रात्री नऊच्या सुमारास पुणे येथे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना निधन झाले. सोमवारी (ता. १७) त्यांचे पार्थिव कोल्हापुरात आणण्यात येणार असून त्यानंतर जन्मगाव पुनवत (ता. शिराळा, जि. सांगली) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आंदळकर यांच्या निधनाने कुस्तीक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

गेली दोन वर्षे आंदळकर यांच्या प्रकृतीत चढउतार सुरु होते. एक वर्षापूर्वी ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे त्यांची स्मृती कमी झाली होती. त्यांचे वास्तव्य कोल्हापूर व पुणे येथे होते. गेल्या महिन्यात काही दिवस ते न्यू मोतीबाग तालमीत राहिले होते. आठ दिवसांपूर्वी त्यांचा मुलगा अभिजित यांनी त्यांना उपचारासाठी पुण्यात नेले. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांना उलटी झाल्यावर ते बेशुद्ध पडले. त्यांना पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना रात्री नऊच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे.

सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथील पुनवत येथे १५ एप्रिल १९३५ रोजी आंदळकरांचा जन्म झाला. लहानपणापासून कुस्तीचा शौक जोपासताना अधिक सरावासाठी ते कुस्तीपंढरी कोल्हापुरातील मोतीबाग तालमीत १९५० मध्ये दाखल झाले. दरबारातील मल्ल वस्ताद बाबासाहेब वीर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लाल मातीत डाव शिकण्यास सुरूवात करून पुढे चपळ मल्ल म्हणून ख्याती मिळवली. हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, श्रीरंग जाधव, महमंद हनिफ यांच्यासह उत्तरेतील दिल्लीच्या खडकसिंग पंजाबी, अमृतसरच्या बनातसिंग पंजाबी, पतियाळाच्या रोहेराम, लिलाराम यांच्याशी त्यांनी लढती दिल्या. पाकिस्तानच्या गोगा पंजाबी, सादिक पंजाबी, जिरा पंजाबी, नसीर पंजाबी यांच्यासमवेत लढताना कुस्तीतील डावपेचांनी आपले कौशल्य सिद्ध केले. १९६० मध्ये त्यांनी हिंदकेसरीची गदा पटकावली.

एकीकडे पारंपरिक लाल मातीतील कुस्ती खेळताना आंतरराष्ट्रीय कुस्तीतील मॅटवरील कौशल्य प्राप्त करताना भारताकडून अशियाई स्पर्धेत प्रतिनिधीत्व केले. १९६२ मध्ये जकार्ता अशियाई स्पर्धत सुपर हेवी गटात ग्रीकोरोमन प्रकारात त्यांनी भारताला सुवर्णपदक पटकावून दिले तर फ्री स्टाईल प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली. कुस्तीतील त्यांच्या यशाबद्दल भारत सरकारने त्यांना १९६२ मध्ये अर्जुन पुरस्काराने गौरविले. १९६४ मध्ये टोकिओ ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यांनी हेवी गटात चौथ्या फेरीत मजल मारली. १९८२ मध्ये राज्य सरकारने शिवछत्रपती पुरस्कार, १९९० मध्ये महाराष्ट्र गौरव, तर १९९९ मध्ये कोल्हापूर भूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. २०१४ मध्ये कुस्तीतील योगदानाबद्दल राजर्षी शाहू पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. पुढे प्रशिक्षकांच्या भूमिकेतील आंदळकरांनी शेवटपर्यंत कुस्तीशी इनाम राखले. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मल्ल घडवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणरायाच्या दर्शनासाठी गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर आणि परिसरातील गणेश मूर्ती पाहण्यासाठी रविवारी सुट्टी असल्याने दिवसभर गर्दी राहिली. बहुतांश देखावे मंगळवारपासून पाहण्यासाठी खुले होणार आहेत. तत्पूर्वीच मूर्ती, विद्युत रोषणाई पाहण्यासाठी भक्तांची वर्दळ वाढली होती.

पुणे, मुंबईनंतर कोल्हापुरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही सार्वजनिक मंडळांनी जोरदार तयारी केली आहे. राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, शिवाजीपेठ, महाद्वार रोड, शिवाजी चौक, संभाजीनगर, कसबा बावडा, गांधीनगर आदी ठिकाणी भव्य मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. विविध रुपांतील मूर्ती लक्षवेधी ठरल्या आहेत. सर्व मंडळांनी विद्युत रोषणाई केल्याने शहर उजळून निघाले आहे. प्रतीवर्षाप्रमाणे यंदाही तांत्रिक, सजीव देखाव्यांवर अनेक मंडळांनी भर दिला आहे. शिवाजी आणि मंगळवार पेठेत सजीव देखाव्यांची रेलचेल आहे. शाहूपुरी, उद्यमनगर, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, जुना बुधवारपेठेत तांत्रिक देखाव्यांची संख्या अधिक आहे.

रविवार असल्याने अनेकजण दर्शनासाठी दिवसभर सहकुटुंब तसेच मित्रमंडळी, नातेवाईकांसह येत राहिले. त्यामुळे प्रमुख मार्गांवर गर्दी होती. गणेशदर्शनानंतर अनेक भाविकांनी अंबाबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तेथे दर्शनासाठी रांग लांब लागली होती. शहरातील प्रमुख चौकातील पार्किंग फुल्ल होते. सायंकाळी सहानंतर वाहतुकीची कोंडी वाढली. कोंडी फोंडण्यासाठी पोलिस प्रयत्न करताना दिसत होते. बुधवारनंतर सर्व देखावे खुले करण्यासाठीची तयारी अंतिम टप्यात आहे. जिल्हा प्रशासनाने २० ते २३ सप्टेंबर म्हणजे अनंत चतुर्थीपर्यंत गणपती, देखावे खुले ठेवण्यासाठी १२ वाजेपर्यंत वेळ वाढवली आहे. परिणामी अन्य जिल्ह्यांतील आणि राज्यातील भक्तांना गणेश दर्शनासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. दर्शनावेळी गर्दी होऊ नये, यासाठी मध्यवस्तीमधील मंडळांनी बॅरिकेड्स लावले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात पंजे भेटीस आजपासून प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील तालमी व मंडळांमध्ये पीर व पंजाची प्रतिष्ठापना झाली असून, सोमवार (ता.१७) पासून पंजे भेटीस सुरुवात होत आहे. शहरातील अनेक मंडळे व तालमींनी एकत्रित गणपती व पंजाची प्रतिष्ठापना केली असून भाविकांची गणपती व पंजांच्या दर्शनासाठी गर्दी होऊ लागली आहे. तसेच शहरातील ८० हून अधिक मंडळे व तालमींनी बुधवारी खत्तलरात्र व गुरुवारी ताबूत विसर्जनाचा निर्णय घेतला आहे.

सोमवारी पंजे भेटीस सुरुवात होणार आहे. पंजा प्रतिष्ठापनेच्या सहाव्या दिवसापासून पंजे भेटीस बाहेर पडतात. पारंपरिक वाद्याच्या गजरात पंजे भेटीचा कार्यक्रम होणार आहे. खत्तलरात्रीच्या दिवशी अनेक पंजे भेटीस बाहेर पडणार आहेत. शहरातील बाबूजमाल तालीम मंडळ, रंकाळा परिसरातील शिवाजी तालीम मंडळ, बालगोपाल तालीम मंडळ, राजारामपुरीतील एकता मित्र मंडळ, लक्ष्मीपुरीतील सत्यनारायण तालीम मंडळ, संत गोरा कुंभार तालीम मंडळ, तोरस्कर चौकातील द्विमुखी मारुती भक्त मंडळ, शिवाजी पेठेतील सरदार तालीम, राजारामपुरी दुसरी गल्ली मातंग वसाहत येथील नवसंदेश सेवा ट्रस्टने गणपती व पंजांची एकत्रित प्रतिष्ठापना होणार आहे. शहरातील घुडणपीर, बारा ईमाम, वाळव्याची स्वारी, नंगीवली, बुऱ्हाणबाबा, आप्पा शेवाळे पंजाच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत.

दरम्यान पंजे प्रतिष्ठापनेवरून बाबूजमाल दर्गा, घुडणपीर दर्गा यांच्यात मतभेद झाले आहेत. बाबूजमाल तालमीने मंगळवारी (ता.११) नाल्या हैदर पंजाची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर शहरातील दर्गे, तालमी, मंडळांनी पाचव्या व सातव्या दिवशी पंजांची प्रतिष्ठापना केली. पण चंद्रदर्शन न झाल्याने मोहरमचा पहिला दिवस मंगळवार न धरता बुधवार धरून खत्तलरात्र गुरुवारी (ता.२०) तर शुक्रवारी (ता.२१) ताबूत विसर्जन करावे, असा निर्णय शिवाजी चौक येथील घुडणपीर दर्ग्यातील बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. पण या निर्णयाला बाबूजमाल दर्ग्याने असहमती दर्शवली आहे. बाबूजमाल तालमीने दिनदर्शिकेप्रमाणेच खत्तलरात्र बुधवारी (ता.१९) खत्तलरात्र तर गुरुवारी (ता. २१) ताबूत विसर्जनाचा निर्णय घेतला. बाबूजमाल तालमीच्या निर्णयाला शहरातील ८० हून अधिक तालीम, मंडळांनी पाठिंबा दिला आहे.

००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images