Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

तांदूळ न मिळाल्याने पोषण आहार बंद

$
0
0
दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा सुरू होऊन तब्बल २० दिवस उलटले तरीही अद्याप कराड तालुक्यातील बहुतांश शाळांमध्ये शालेय पोषण आहाराचे वाटप सुरू झाले नाही.

सेनापती कापशीत ज्वेलरी दुकान फोडले

$
0
0
सेनापती कापशी (ता. कागल) येथे गुरूवारी रात्री ज्वेलरी दुकानासह अन्य चार दुकाने फोडून एक लाख रुपयांचा ऐवज व रोख रक्कम अज्ञात चोरट्यानी लाबवला. याबाबत मिळालेली माहिती अशी, येथील बाजार पेठेतील स्वामी चौकाजवळील संतोष बजरंग चौगले यांच्या सोन्या-चांदीच्या दुकानातून एक लाख रुपयाची चांदी चोरट्यांनी लांबविली.

हत्तींच्या कळपाकडून पिळणीत नुकसान

$
0
0
पिळणी (ता. चंदगड) येथीळ निलगिरीचे माळ नावाच्या शेतात गुरूवारी रात्री हत्तींच्या कळपाने सहा शेतकऱ्यांचा ऊस, केळीअ आणि नारळीची झाडे फस्त केली आहेत. यामध्ये अर्ध्या एकरातील ऊस, ४५ केळीची झाडे व पाच नारळाची झाडे खाऊन फस्त केली आहेत.

कोल्हापूर, सांगलीसाठी गूळ बोर्ड

$
0
0
राज्याचे कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोल्हापूर आणि सांगलीसाठी गूळ बोर्ड स्थापण्याची घोषणा केली आहे. कोल्हापूरी गुळाला जिओग्राफिकल इंडिकेशन नुकतेच मिळाले आहे, त्यानंतर बोर्ड स्थापन्यात आल्याने गुळाला चांगले दिवस येऊ शकणार आहेत.

भाजप घराणेशाहीचा नव्हे, तर कार्यकर्त्यांचा पक्ष

$
0
0
भारतीय जनता पार्टी पक्ष हा घराणेशाहीवर मोठा झालेला नाही. आंदोलनाच्या जोरावर आणि कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झाला आहे. देशात चांगले नेतृत्त्व देण्याची ताकद फक्त याच पक्षात आहे, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले.

मराठा आरक्षणाची लढाई निर्णायक टप्प्यावर

$
0
0
‘मराठा आरक्षणाची लढाई निर्णायक टप्प्यावर आली आहे. मराठा समाजाच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी या समाजाला मराठा प्रवर्ग म्हणून आरक्षण मिळालेच पाहिजे,’ असे प्रतिपादन मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केले. बुवाचे वाठार (ता.हातकणंगले) येथे मराठा जोडो अभियानांतर्गत मेळाव्यात ते बोलत होते.

पन्हाळा तालुक्यात कोतवाल आरक्षण जाहीर

$
0
0
पन्हाळा तालुक्यातील कोतवाल पदाच्या रिक्त १४ जागांसाठी आरक्षण सोडतीत चार जागा महिलांसाठी राखीव झाल्याने तालुक्यात पहिल्यांदाच महिला कोतवालांची निवड होणार आहे. वाडीरत्नागिरी, आसुर्ले, बोरिवडे आणि बांदिवडे येथील कोतवालपदे महिलांसाठी आरक्षित झाली आहेत.

‘गोडसाखर’चे संचालक निर्णय प्रक्रियेबाहेर

$
0
0
अनेक नाट्यमय घडामोडीनंतर शनिवारी हरळी (ता. गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना अखेर सुरू झाला. कलम ७८ ची नामुष्की ओढवलेल्या व दोन वेळा फौजदारी झालेल्या कारखान्याला अखेर ब्रिस्क कंपनीने फायनान्स केल्याने हा हंगाम सुरू झाला. केवळ फायनान्स केला असा दावा उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण आत्तापर्यंत करत होते.

युवतीच्या शोधासाठी पथके रवाना

$
0
0
तीन लाखांच्या खंडणीसाठी युवतीचे अपहरण केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्याने तीन पथके तयार केली असून शोध सुरू असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयवंत खाडे यांनी दिली.

पंचगंगा प्रदूषित करणा-या घटकांवर कारवाई करा

$
0
0
पंचगंगा नदीचे प्रदूषण जोपर्यंत नियंत्रित होत नाही तोपर्यंत ती प्रवाहीत करा व पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करा, या मागणीसाठी शुक्रवारी शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शंखध्वनी आंदोलन करण्यात आले.

‘जीवनदायी’च्या श्रेयासाठी चढाओढ

$
0
0
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना जिल्ह्यात सक्षमपणे राबविण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतल्यानंतर शुक्रवारी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी कार्यालयात बैठक घेऊन ही योजना योग्यप्रकारे राबविण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या.

वाहतुकीचा रस्ता, देखभालीची ‘वाट’

$
0
0
रस्ता उखडून पडलेले दीड फुटांचे खड्डे, अंतर्गत कामासाठी खोदाई केल्यानंतर तसाच पडलेला ढिगारा आणि अवजड वाहनांसह दुचाकी, चारचाकींच्या सतत सुरू असलेल्या वर्दळीमुळे किरकोळ अपघातांची वाढती संख्या अशा असुरक्षिततेच्या विळख्यात शिवाजी पुलापासून गंगावेशमार्गे रंकाळा टॉवरला जोडणारा रस्ता अडकला आहे.

‘त्या’ प्राध्यापकाला पदावरून हटवा

$
0
0
शिवाजी विद्यापीठात २०११ मध्ये उघडकीस आलेल्या लैंगिक छळ प्रकरणातील प्राध्यापक डॉ.रमोत्रा यांना भूगोल विभागप्रमुख पदावरून त्वरित हटवावे, अशी मागणी कोल्हापुरातील पुरोगामी स्त्री संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. एन.जे.पवार यांच्याकडे केली.

नववर्षात ‘ए’ वॉर्डात घरे महागणार

$
0
0
कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत शिवाय संपूर्ण ए वाॅर्डात रेडीरेकनरपेक्षा ​जादा दराने प्लॉट, फ्लॅट व दुकानगाळ्यांची विक्री झाल्याची कागदोपत्री नोंद झाल्याने या भागात नवीन वर्षात रेडीरेकनरचा दर २५ टक्के वाढविण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय जिल्ह्यात इतर ठिकाणी​ १० ते २० टक्के वाढीचा प्रस्ताव आहे.

भारत-द. अफ्रिका सामन्यावर बेटिंग

$
0
0
भारत व दक्षिण अफ्रिका यांच्यातील एकदिवसीय सामना सुरू असताना बेर्टिंग घेत असताना लक्ष्मीपुरी पोलिसांनी छापा टाकून पाच आरोपींना अटक केली. सोमवारी रात्री साडेदहा वाजता केलेल्या कारवाईत १५ मोबाईल हॅन्डसेट, लॅपटॉप, एलसीडी टीव्ही, कॅलक्युलेटर्स, मटक्याच्या चिठ्ठ्या असा एक लाख आठ हजार ३३२ रूपयाचा माल जप्त केला.

‘नीरी’ करणार ‘पंचगंगे’चा सर्व्हे

$
0
0
पंचगंगा प्रदूषणाबाबतची वस्तूस्थिती स्पष्ट होण्यासाठी हायकोर्टानेच नागपूरच्या नॅशनल एन्व्हायर्न्मेंटल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटची (नीरी) नदीचा सर्व्हे करण्यासाठी शुक्रवारी नियुक्ती केली. कोल्हापूर ते नृसिंहवाडीपर्यंतच्या ६० किलोमीटरपर्यंतच्या पात्राचा हा सर्व्हे असेल. प्रदूषणाची कारणे आणि उपायांबाबतचा अहवाल सादर करण्याचा आदेशही संस्थेला दिला आहे.

साडेसहा लाख टन उसाचे गाळप

$
0
0
‌स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन स्थगित केल्यानंतर जिल्ह्यातील सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहे. शुक्रवारपर्यंत कोल्हापूर विभागातील २७ कारखान्यांनी ६ लाख, ५५ हजार ७१२ टन उसाचे गाळप केले आहे.

मिनी बस अपघातात ६ विद्यार्थी ठार

$
0
0
धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर, तुळजापूरजवळच्या माळुंब्रा गावाजवळ, सहलीला निघालेली मिनी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सहा विद्यार्थी आणि बसचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

१२ वी ऑनलाइन आवेदनपत्रासाठी मुदतवाढ

$
0
0
मार्च २०१४ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेच्या ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र मिळालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतंर्गत तसेच तुरळक विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी ही सुधारित मुदतवाढ आहे.

हिरेमठांसह तिघांना ५ दिवसांची पोलिस कोठडी

$
0
0
निलंबित अन्नसुरक्षा अधिकारी स्मिता हिरेमठ हिच्यासह तिचा पती व एजंट या तोतया दोन अधिकाऱ्यांना आज न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आदमापूर येथील व्यापाऱ्याने फसवणूक झाल्याची तक्रार या तिघांच्या विरोधात केली होती.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images