Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

स्मशानभूमी विस्तारीकरणाची निविदा मंजूर

$
0
0

कोल्हापूर

पंचगंगा स्मशानभूमी विस्तारीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदेला सोमवारी मंजुरी मिळाली. सुमारे सात लाखांची निविदा मंजूर झाली असून याद्वारे स्मशानभूमीमध्ये नवीन सहा बेड तयार केले जाणार आहेत. लवकरच विस्तारीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे. स्मशानभूमीत सध्या ४० बेड आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिरोळ तालुक्यात प्रतिसाद

$
0
0

शिरोळ तालुक्यात प्रतिसाद

जयसिंगपुरात मनसेची निदर्शने, कुरूंदवाड येथे सरकारचा निषेध

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस दरवाढीच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला शिरोळ तालुक्यात प्रतिसाद मिळाला. तालुक्यात अनेक ठिकाणी व्यापार्‍यांनी व्यवहार बंद ठेवले. कुरुंदवाड आगारने एसटी वाहतूक बंद ठेवली होती. जयसिंगपुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मोटारसायकल ढकलत नेऊन निदर्शने केली. काँग्रेसच्यावतीने शिरोळ येथे तहसिलदार गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आले.

जयसिंगपुरात मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकातून क्रांती चौकापर्यंत मोटारसायकल व चारचाकी गाड्या ढकलत नेऊन इंधन दरवाढीचा निषेध नोंदविला. क्रांती चौकात कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणा देत निदर्शने केली. भाजप सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. आंदोलनात तालुकाध्यक्ष राहुल मोरे, तालुका सचिव श्रीकांत सुतार, शहराध्यक्ष विश्‍वनाथ शिंदे, उपाध्यक्ष निलेश भिसे, विभागाध्यक्ष सुरज बुरांडे, मनविसे शहराध्यक्ष सुशांत पाटील, शाखाध्यक्ष राजू कर्नाळे, अक्षय मोरे, ओंकार मोरे, महेश माने, अभि पाटील व नागरिक सहभागी झाले होते.

दरम्यान, शिरोळ येथे काँग्रेसच्यावतीने दत्त साखरचे अध्यक्ष गणपतराव पाटील, तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा रंजना कोळी, सुभाष भोजणे, अमरसिंह निकम यासह कार्यकर्त्यांनी तहसिलदार गजानन गुरव यांना निवेदन दिले. इंधन दरवाढीमुळे सामान्य जनतेला महागाईचे चटके बसत आहेत. मात्र सरकारला याचे कोणतेही सोयरसूतक नाही. परिणामी जीवनावश्यक वस्तुंच्या दरात वाढ झाली आहे. ती कमी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.

भारत बंदला कुरूंदवाड येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापार्‍यांनी व्यवहार बंद ठेवले. थिएटर चौकात विविध पक्षाच्या नेत्यांनी भाजप सरकारच्या धोरणांचा निषेध केला. शहरातून मोटारसायकल रॅलीही काढण्यात आली. भाजपने सर्व वस्तूंवर जीएसटी कर लादला. परंतु पेट्रोल-डिझेलवरील इतर कर रद्द करून जीएसटी कराची आकारणी केलेली नाही. हा कर लावल्यास पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी होतील. नोटाबंदीमुळे मंदीचे सावट, भाजप शासनाच्या काळात पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीमुळे महागाई वाढली. अशा तीव्र भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या. यावेळी धनपाल आलासे, माजी नगराध्यक्ष दादासो पाटील, आण्णासो चौगले, चंद्रकांत मोरे, अजित देसाई, रामदास मधाळे, बाळासो गायकवाड, सुनील चव्हाण, रमेश भुजुगडे, बाबासो बाबर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब दिवटे, प्रभारी नगराध्यक्ष अक्षय आलासे, विजय पाटील, अभिजित पाटील, जवाहर पाटील, तानाजी आलासे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसभेच्या दाव्यावरून संघर्षाची चिन्हे

$
0
0

राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मौन पक्षांतर्गत गटबाजीला बळ देणारे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर या राष्ट्रवादीच्या हक्काच्या लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने हक्क सांगितला, जागा दिल्यास निवडून आणण्याची घोषणा झाली, याला अकरा दिवस उलटले, तरीही राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आक्रमक भूमिका घेण्याऐवजी मौन बाळगणे पसंत केले आहे. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवत परस्पर पत्ता कट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने पक्षातील अंतर्गत गटबाजीची चर्चा पुन्हा वेगावली आहे.

पंधरा वर्षांपासून कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही जागा राष्ट्रवादी पक्षाकडे होत्या. सदाशिवराव मंडिलक व निवेदिता माने घड्याळाच्या चिन्हावर दोन वेळा निवडून आले. गेलेली जागा खासदार धनंजय महाडिक यांनी पक्षाकडे परत खेचून आणण्यात यश मिळवले. चार वर्षापूर्वी हातकणंगलेची जागा काँग्रेसला देण्यात आली. त्यामुळे प्रत्येकी एक जागा दोन्ही पक्षांकडे राहिली. पण दहा दिवसांपूर्वी झालेल्या जनसंघर्ष यात्रेत कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसने हक्क सांगितला. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार सतेज पाटील यांनी या विषयाला तोंड फोडले. जागा दिल्यास निवडून आणण्याची जबाबदारी देखील स्वीकारली. त्यासाठी उमेदवार तयार असल्याचेही सांगण्यात आले. यावरून दोन्ही पक्षात संघर्षाची चिन्हे निर्माण झाली.

हक्काच्या जागेवर दावा केल्याने राष्ट्रवादी पक्षात दुसऱ्या दिवशी मोठे पडसाद उमटतील, अशी शक्यता होती. पण तसे काहीच झाले नाही. खासदार महाडिक, शहराध्यक्ष आर.के. पोवार वगळता इतरांनी 'आपला काय संबंध' हीच भूमिका घेतली. विद्यमान खासदार राष्ट्रवादीचा आहे, जागा या पक्षाकडे आहे, त्यामुळे ती इतरांना मिळणार कशी, असा सवाल या दोघांनी केला. दहा दिवसांत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दोन वेळा कोल्हापुरात येऊन गेले. त्यांनी देखील हा विषय फारसा गांभीर्याने घेतला असे दिसले नाही. निर्णय राज्य व देशपातळीवर होईल असे सांगत त्यांनी प्रश्नाला बगल दिली.

पक्ष अथवा पक्षातील नेत्यांबाबत काहीही घडल्यास आमदार हसन मुश्रीफ तातडीने प्रतिक्रिया देतात. या प्रकरणात मात्र अकरा दिवसानंतरही ते मौन बाळगून आहेत. पक्षाचे ते जिल्ह्यातील प्रमुख नेते आहेत, त्यामुळे त्यांनी तातडीने याबाबत बोलणे आवश्यक होते. पण पत्रकार बैठकीत सांगेन, असे म्हणत ते वेळ मारून नेत आहेत. राजकीयदृष्ट्या संवेदनशील नेत्याचे हे मौन संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे. यामुळे पक्षातच उलटसुलट चर्चेला वेग आला आहे. खासदार महाडिक व त्यांच्यातील दुरावा अजूनही कमी झालेला नाही. महाडिक यांच्याऐवजी प्रा. संजय मंडलिक हे त्यांच्या मनातील उमेदवार आहेत, अनेकदा उघडपणे त्यांनी हे बोलून दाखवले आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी केल्यानंतरही दोघांतील संबंधात फार सुधारणा झाल्याचे दिसत नाही. यामुळे जागाच काँग्रेसला गेली तर राजकारणाला नवे वळण लागणार आहे. यामुळेच कदाचित दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोट

'राष्ट्रवादीची हक्काची जागा मित्रपक्षाने मागितली आहे, त्यामुळे विषय गंभीर आहे. याबाबत आपली भूमिका सविस्तर सांगणार आहे. त्यासाठी लवकरच पत्रकार बैठक घेण्यात येईल.

हसन मुश्रीफ, आमदार

...

कोट

'कोल्हापूरची जागा आमच्या हक्काची आहे, त्यामुळे त्या जागेवर इतर कुणी हक्क सांगणे मुळातच चुकीचे आहे. काहीही झाले तरी ती आम्ही सोडणार नाही. त्यासाठी पक्षाध्यक्षांकडे शेवटपर्यंत आग्रही राहू.

ए. वाय. पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

.......

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तडीपार गुंडाकडून दौलतनगरात दहशत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गंभीर गुन्ह्यात पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला तडीपार गुंड संदीप उर्फ चिन्या अजित हळदकर (वय १९, रा. दौलतनगर) याने रविवारी (ता. ९) रात्री दौलतनगरात दहशत माजवली. एका घरात घुसून महिलेचा विनयभंग केला, तर गणेश जाधव या तरुणावर चाकूहल्ला केला. पोलिसांनी रात्री उशिरा त्याला अटक केली.

राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप हळदकर हा दौलतनगर परिसरातील एका कुख्यात टोळीत होता. खून, मारामारी, लूटमार करणे, धमकावणे असे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. अजित पाटील या बांधकाम मजुराच्या खूनप्रकरणी हळदकर हा संशयित गुन्हेगार आहे. वाढत्या गुन्हेगारी कृत्यांमुळे पोलिसांनी १० एप्रिल २०१८ मध्ये त्याच्यावर तडीपारीचा प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने त्याला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले होते. तडीपार असतानाही तो अनेकदा कोल्हापुरात वावरतो. रविवारी संध्याकाळपासून तो मद्यधुंद अवस्थेत हातात चाकू घेऊन दौलतनगरात फिरत होता. गणेश जाधव याच्या घरात जाऊन त्याने गणेशवर चाकू हल्ला केला. सुदैवाने पळून गेल्याने गणेश बचावला. यानंतर हळदकरने परिसरातील एका महिलेच्या घरात जाऊन तिचा विनयभंग केला. महिलेने आरडाओरडा केल्याने तिलाही हळदकरने चाकू दाखवून धमकावले. लोकांची गर्दी जमताच त्याने पळ काढला. घाबरलेल्या नागरिकांनी राजारामपुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी रात्री उशिरा त्याला दौलतनगर परिसरातून अटक केली. तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्याने त्याच्यावर कारवाई होणार आहे, त्याचबरोबर महिलेचा विनयभंग आणि चाकूहल्ल्याचाही गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंदमुळे केएमटी, एसटीमहामंडळाला फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पेट्रोल, डिझेल दरवाढविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी सोमवारी पुकारलेल्या बंदमुळे सकाळी १० ते दुपारी साडेतीनपर्यंत केएमटी आणि एसटी महामंडळाच्या बसेस बंद राहिल्या. महामंडळाला ८९ हजार तर केएमटीला साडेपाच लाखांचा फटका बसला. दुपारनंतर शहर आणि जिल्ह्यातील बससेवा सुरळीत झाली. बंदची तीव्रता कमी झाल्याने दुपारनंतर प्रमुख बाजारपेठेतील बंद दुकाने सुरू झाली. दरम्यान, सायंकाळी गणेश चतुर्थीच्या खरेदीसाठी महाव्दार रोड, शिवाजी चौकात गर्दी दिसत होती.

दुपारपर्यंत शहरातील प्रमुख बाजारपेठेत बंदची तीव्रता अधिक राहिली. लक्ष्मीपुरी धान्य बाजारात परजिल्ह्यातून येणारी वाहने आली नाहीत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महामंडळाची बससेवा बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. परिणामी प्रशासनाने सकाळी ११ वाजता बससेवा बंद केली. त्या दरम्यान कोल्हापूर -पुणेसह कोकणात जाणाऱ्या ७७ फेऱ्या रद्द झाल्या. ३ हजार ३१६ किलोमीटरची धाव रद्द झाली. जिल्हांतर्गत बससेवा विस्कळीत झाली. मोठ्या संख्येने प्रवाशी स्थानकात ताटकळत राहिले. कुटुंबासह असलेल्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. दुपारी दीड वाजता बससेवा पूर्ववत झाली.

केएमटी प्रशासनाने नेहमीप्रमाणे १०० बसेस शहरातील नियोजित मार्गावर आणल्या. बंदची तीव्रता वाढल्याने प्रशासनाने ११ वाजता बंद केल्या. दुपारी तीननंतर ७७ बसेस पुन्हा रस्त्यावर आल्या. मात्र शहरातर्गंत बससेवा बंद झाल्याने सामान्यांची मोठी गैरसोय झाली. पायपीट करीत घर गाठावे लागले. कसबा बावड्यासह उपनगरांतील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तपणे बंद पाळले. वडणगे, निगवे, आंबेवाडी, चिखली, शिरोली गावांतही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. सरपंच शशिकांत खवरे यांच्या नेतृत्वाखाली शिरोलीतून फेरी काढून बंदचे आवाहन केले. वडणगे येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गाव बंद ठेवले. वडणगे फाटा येथे कोल्हापूर - रत्नागिरी महामार्ग काहीकाळ रोखून धरला. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य बी. एच. पाटील, सरपंच सचिन चौगले, शंकर पाटील, डॉ. एम. बी. किडगावकर, प्रकाश पाटील, कुमार बागडी यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्राची प्रमुख गांधीनगरातील व्यापारपेठ सुरू राहिली.

-----------------

.................................

आयटकची निदर्शने

कोल्हापूर

महागाई कमी करावी, असंघटित कामगारांसाठी कल्याण मंडळाची स्थापना करावी, आदी मागण्यांसाठी आयटक कामगार केंद्रातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी दिलीप पवार, एस. बी. पाटील, सदाशिव निकम, मेघा पानसरे, विक्रम कदम, विठ्ठल येडगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवामध्ये केएमटी बसफेरीत कपात

$
0
0

तोटा टाळण्यासाठी परिवहनचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गणेशोत्सवाच्या कालावधीत केएमटीच्या दैनंदिन प्रवासी संख्येत घट होत असते. दरवर्षीचा अनुभव लक्षात घेऊन केएमटी प्रशासनाने गणेशोत्सव काळात बसफेऱ्यांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अनंत चतुर्थी दिवशी केएमटीच्या मार्गात बदल केला आहे.

दरवर्षी गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रवासी संख्येत घट होते. परिणामी अनेकदा प्रवाशांविना केएमटी धावत असते. त्याचा परिणाम उत्पन्नावर होत असल्याने यावर्षी गणेशोत्सवामध्ये बसफेऱ्यांमध्ये कपात केली आहे. गुरुवारी (ता. १३) गणेशचतुर्थीपासून सोमवारी (ता. १७) घरगुती गणपती विसर्जनापर्यंत नियमित होणाऱ्या फेऱ्या कमी करण्यात येणार आहेत. तसेच गुरुवारी (ता. २०) ताबूत विसर्जन व अनंत चतुर्थी (ता. २३) दिवशीही फेऱ्या कमी केल्या जाणार आहेत.

तसेच अनंत चतुर्थी दिवसी केएमटीच्या मार्गात बदल केला आहे. या दिवसी आर. के. नगर, पाचगाव व कळंबा मार्गावर धावणाऱ्या बसेस लक्ष्मीपुरी सायन्स कॉलेज मार्गे जातील. कंदलगाव, मोरेवाडी, विद्यापीठ, कणेरी मठ, राजारामपुरीमार्गे कागल मार्गावर धावणाऱ्या बसेस लुगडी ओळ मार्गे, वालावलकर दुकान, आईसाहेब महाराज पुतळा, सायन्स कॉलेज, बिंदू चौक मार्गे धावतील. राजारामपुरीकडे जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व बसेस लक्ष्मीपुरी-उषा टॉकीज-गोकुळ हॉटेल-विनायक बंगला मार्गे जातील. कदमवाडीकडे जाणाऱ्या बसेस लिशां हॉटेल मार्गे धावतील.

आठ नंबर शाळेमार्गे जाणाऱ्या बसेस लाड चौक, टिंबर मार्केट कमान, राजाराम चौक, राजकपूर पुतळा मार्गे ये-जा करतील. शिवाजी चौक येथील महागणपती पाहण्याकरिता गर्दी वाढल्यास वडगाव, आर. के. नगर, कदमवाडी, शिये, शुगर मिल मार्गावर धावणाऱ्या बसेस पर्यायी मार्गेने धावतील. तसेच मिर‌वणूक व देखावे पाहण्यासाठी गर्दी होईल, अशा मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार असल्याचे परिवहन उपक्रमाच्यावतीने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राधानगरी, भोगावती परिसरात निदर्शने, निषेध फेऱ्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी पुकारलेल्या बंदला राधानगरीत उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुपारपर्यंत बाजारपेठेतील सर्व व्यवहार बंद राहिले. बंद शांततेत व सुरळीत पार पडला. यावेळी काँग्रेसच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.

केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल, डीझेल आणि स्वयंपाकाच्या गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सकाळी बंदचे आवाहन करीत बाजारपेठेत मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. निदर्शने करण्यात आली. बंदमुळे काही काळ

एसटी वाहतूक विस्कळीत झाली. निदर्शनात काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे, माजी शिक्षण सभापती अभिजित तायशेटे, सुधाकर साळोखे, सरिता बालणकर, दीपक शेट्टी, पप्पू पालकर, बाळासाहेब कळमकर, मारुती टिपुगडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

भोगावती साखर कारखाना कार्यक्षेत्रातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भोगावती बसस्थानक आणि पेट्रोल पंप येथे जाऊन निदर्शने केली. भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी निषेध फेरी काढून घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. राधानगरी काँग्रेस समन्वयक सुशील पाटील, गोकुळ संचालक अरुण डोंगळे, पी. डी. धुंदरे, भोगावती साखर कारखाना माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, संचालक बी. आर. पाटील, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदीगरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भोगावती बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

फोटो ओळ : राधानगरीत इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसच्यावतीने बंद पाळून जोरदार निदर्शने करण्यात आली. दुसऱ्या छायाचित्रात भोगावती येथे काँग्रेसने काढलेली निषेध फेरी. (छाया : नंदू गुरव)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत विरोधी पक्षांची निदर्शने

$
0
0

इचलकरंजीत विरोधी पक्षांची निदर्शने

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या बंदमध्ये काँग्रेस व समविचारी पक्षांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. पेट्रोल-डिझेलचे दर तातडीने कमी करावेत अशा मागणीचे निवेदन काँग्रेस व समविचारी पक्षांच्यावतीने प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले.

इचलकरंजीत गणेशोत्सवाची लगबग सुरू असल्याने आणि शहर संवेदनशील असल्याने बंद न करता काँग्रेस पक्षासह सर्वपक्षीय कृती समितीने निदर्शने करून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरले. कॉ. के. एल. मलाबादे चौकात माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सर्व श्रमिक संघ, शेतकरी कामगार पक्ष, भारिप बहुजन महासंघ, जनता दल (से), राष्ट्रवादी कामगार संघटना, पिपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट), समता संघर्ष समिती, लालबावटा बांधकाम कामगार संघटना, इचलकरंजी म्युनिसिपल वर्कर्स युनियन, सोशलिस्ट पार्टी, कोल्हापूर जिल्हा जॉबर संघटना, एमएसएमआरए संघटना या समविचारी पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र जमले. 'कहाँ गए अच्छे दिन',"वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारु महंगा तेल' अशा घोषणा देत परिसर दणाणुन सोडला. यावेळी माजी मंत्री आवाडे, प्रकाश मोरे, मदन कारंडे, प्रताप होगाडे, शशांक बावचकर आदींनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यानंतर शिष्टमंडळाच्यावतीने प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गंठण चोरीप्रकरणी तीन महिलांना अटक

$
0
0

गंठण चोरीप्रकरणी

तीन महिलांना अटक

कोल्हापूर

जवाहरनगर येथील रेणुका मंदिरात दर्शनासाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे गंठण हिसडा मारून लंपास केल्याप्रकरणी तिघा सराईत महिलांना राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी अटक केली. संशयित राणी विजय कांबळे (वय ३०, रा. संभाजीनगर जयसिंगपूर, ता. शिरोळ), मीना मारुती पाटोळे (३०, रा. बुधगाव, ता. मिरज, जि. सांगली), ज्योती मारुती सकट (६०, रा. समडोळे मळा, जयसिंगपूर, ता. शिरोळ) अशी त्यांची नावे आहेत. सुमन शंकर इंगळे (६०, रा. दत्तोबा शिंदे नगर, कळंबा) या २१ ऑगस्ट रोजी जवाहरनगर येथील ओढ्यावरील रेणुका मंदिराच्या मंडपामध्ये दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत तिघा महिलांनी त्यांना धक्का देऊन खाली पाडून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसडा मारून घेतले होते. संशयित महिलांना पुणे-बंगलोर महामार्गावर इचलकरंजी पोलिसांनी चोरीप्रकरणी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी इंगळे यांच्या गंठण चोरीची कबुली दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गव्याच्या हल्ल्यात एकजण गंभीर

$
0
0

गव्याच्या हल्ल्यात गंभीर

राधानगरी : गवशी (ता. राधानगरी) येथे सोमवारी सायंकाळी पाच वाजता शेतात वैरण काढण्यासाठी गेलेल्या विष्णू बाळकू पाटील (वय ५५) या शेतकऱ्यावर गव्याने हल्ला केला. ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने गवशी परिसरात घबराट निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैव विविधता आराखडा तयार करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका कार्यकक्षेतील नव्या जैव विविधता समृद्ध जागांची माहिती घेऊन आराखडा सादर करण्याबरोबरच जैव विविधता नोंदवही तयार करण्याची सूचना आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे यांना दिल्या. महापालिकेच्या जैव विविधता समितीची बैठक सोमवारी महापालिकेच्या ताराराणी सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी महापौर शोभा बोंद्रे होत्या.

बैठकीत समिती सदस्यांनी गणेशोत्सव आणि जैवविविधता संबंधी विविध सूचना केल्या. सदस्यांनी मत नोंदवल्यानंतर आयुक्त डॉ. चौधरी यांनी जैव विविधता नोंदवही तयार करणे, नव्या जैवविविधता जागांची माहिती घेणे, संवर्धन कार्यशाळा घेणे, सरकारच्या मत्सालय विभागाच्या मार्गदर्शनाखाली महावीर गार्डन येथे मत्स विभागात विविध माशांची पैदास करण्यासाठी सहकार्य करणे, मधमाशांचे पोळे नैसर्गिकरित्या काढण्याकरिता आवश्यक असणारा पोषाख वर्धा येथील खादी ग्रामोद्योगमार्फत खरेदी करण्याची सूचना केली. तसेच जैवविविधता संवर्धन आराखड्याकरिता आवश्यक मुद्यांची यादी तयार करुन त्याचा समावेश अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश आयुक्त डॉ. चौधरी यांनी व्याघ्रांबरे यांना दिले. कळंबा तलावाचे पाणी पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत असल्याने पाण्याचे प्रदूषण होऊ नये, यासाठी मासेमारीचा जो ठेका दिला जातो, त्या ठेकेदारास सरकारच्या मत्स विभागाने सूचना द्याव्यात, असेही आदेश दिले.

बैठकीस नगरसेविका सुरमंजिरी लाटकर, विज्ञान प्रबोधिनीचे उदय गायकवाड, कृषी महाविद्यालयाचे डॉ. डी. एस. पाटील, प्राथमिक शिक्षण विभागाकडील बाळासाहेब कांबळे, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, मत्स व्यवसाय प्रतिनिधी अमर जाधव, उप वनसंरक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आवाहन

'पाणी प्रदूषण रोखण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून निर्माल्य व मूर्तीदान उपक्रम राबवला जात आहे. उपक्रमाला बळकटी देण्यासाठी महापालिकेच्यावतीने अनेक ठिकाणी निर्माल्य व मूर्तीदानाची व्यवस्था केली आहे. गणेशभक्तांनी या उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करुन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा' ,असे आवाहन महापौर शोभा बोंद्रे यांनी जैव विविधता समितीच्या बैठकीत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सकल मराठा समाजाच्यावतीने बुधवारी बैठक

$
0
0

उद्या बैठक

कोल्हापूर

सकल मराठा समाजाच्यावतीने बुधवारी (ता. १२) राजर्षी शाहू स्मारक भवनाच्या मिनी सभागृहात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे, अशी माहिती समन्वयक वसंतराव मुळीक यांनी दिली. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. तसेच मराठा समाजास आरक्षण देण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या मंत्रीगट उप समितीने कोल्हापुरात येऊन सकल मराठा समाजाच्या २२ मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर श्रीमंत शाहू छत्रपती व प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या विनंतीवरुन सकल मराठा समाजाने ३९ दिवसानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान, आरक्षणाची घोषणा होईपर्यंत सकल मराठा समाजाच्यावतीने कोणते धोरण अवलंबावे यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपात्र नगरसेवकांचे डोळे मुंबईकडे

$
0
0

मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत निर्णय होणार ?

महापालिका लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सुप्रीम कोर्टाने जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केलेल्या महापालिकेच्या १९ नगरसेवकांना अपात्र ठरवले आहे. नगरसेवकांना दिलासा देण्यासाठी वटहुकूम काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर मंत्रिमंडळाची तिसरी बैठक मंगळवारी (ता.११) होत आहे. नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत बैठकीत निर्णय होण्याची शक्यता असल्याने सर्वांचे डोळे मुंबईच्या बैठकीकडे लागले आहेत.

सुप्रीम कोर्टाने २३ ऑगस्ट रोजी जातवैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्यांचे पद रद्द करण्याचा निर्णय दिला. कोर्टाच्या निर्णयाचा फटका महापालिकेतील १९ नगरसेवकांना बसणार आहे. तसेच राज्यातील अनेक सदस्यांचे पद अपात्र ठरणार असल्याने मंत्रिमंडळात निर्णय घेऊन दिलासा देण्याचे आश्वासन सरकारच्यावतीने दिले होते. गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत कोणताही निर्णय झालेला नव्हता. मात्र नगरविकास, ग्रामविकास, विधी व न्याय आणि सामाज कल्याण विभागाककडून अभिप्राय मागवले होते.

चारही विभागाकडून मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिप्राय सादर होण्याची शक्यता आहे. विविध विभागांकडून आलेल्या अभिप्रायांवर चर्चा झाल्यानंतर अपात्र नगरसेवकांच्या पद रद्दबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वटहूकुम काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, महापालिकेची महासभा बुधवारी (ता.१२) दुपारी १२ वाजता होणार आहे. प्रशासनाने महासभेचा अजेंडा प्रसिद्ध केला आहे. परिणामी अपात्र नगरसेवकांसह महापालिकेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे लक्ष बैठकीकडे लागले आहे. बैठकीत वटहुकूम काढण्याच्या निर्णय झाला तरच नगरसेवकांना महासभेत उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे, अन्यथा त्यांना पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.

....................

चौकट

'नगरविकास' च्या पत्राची प्रतीक्षा

प्रमाणपत्र मुदतीत सादर न केलेल्या नगरसेवकांना कोर्टाने अपात्र ठरवले आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने नगरविकास, विभागीय आयुक्तांना पत्र पाठवले आहे. कोर्टाच्या आदेशानुसार सदस्यांना अपात्र ठरवण्याची कार्यवाही करण्याची सूचना आयोगाने केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती मागवली असली, तरी नगरविकास विभागाकडून महापालिकेला अद्याप पत्र मिळालेले नाही. पत्र आल्यानंतर प्रशासन पुढील कारवाई करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवीर बंदला प्रतिसाद

$
0
0

करवीरमध्ये बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद

कोपार्डे, हळदी, वडणगे येथे रास्ता रोको

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

काँग्रेस पक्षाने पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस दरवाढ, महागाईविरोधात पुकारलेल्या भारत बंदला करवीर तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सांगरुळ, शिंगणापूर जिल्हा परिषदेअंतर्गत कोपार्डे येथे व सडोली खालसा, परिते जिल्हा परिषद अंतर्गत हळदी येथे तसेच वडणगे फाटा येथे रास्ता रोको करत भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून सरकारचा निषेध केला. बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कोपार्डेत सांगरुळ फाट्यावर रास्ता रोकोप्रसंगी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे म्हणाले, 'काँग्रेस पक्षाने आपल्या राजवटीत सर्वसामान्य जनता केंद्रस्थानी मानून काम केले. मात्र सत्ताधारी भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई गगनाला भिडल्याने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. डिजिटल इंडियाच्या नावाखाली सामान्य माणसाला होरपळण्याचे होत आहे. बंदला २१ पक्षांनी पाठिंबा दिला आहे. महागाईला भाजपबरोबरच शिवसेनाही जबाबदार आहे.'

आंदोलनात शिवसेनाव्यतिरिक्त सर्व पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, सांगरुळ गावातही पुकारण्यात आलेल्या बंदला सर्व व्यवहार ठप्प ठेवत पाठिंबा देण्यात आला.

करवीर पंचायत समिती सभापती राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा समन्वयक बाजीराव खाडे , यशवंत बँक अध्यक्ष एकनाथ पाटील, उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर, संभाजी पाटील, करवीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शिवाजी देसाई, बाजीराव देवाळकर, संजय पाटील, संभाजी पाटील, एस. के. पाटील, यशवंत बँकेचे संचालक, विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

हळदी येथेही रास्ता रोको करून सरकारचा निषेध केला. आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील, भोगावती कारखान्याचे संचालक बळवंत पाटील, प्रा. शिवाजी पाटील, बी. ए. पाटील, शिवाजी कारंडे, प्रा. सुनील खराडे, सर्जेराव पाटील, सरपंच संदीप पाटील कुर्डू , पंचायत समिती सदस्य विजय भोसले, चेतन पाटील, कृष्णा धोत्रे, बबन रानगे , सचिन पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो :

कोपार्डे येथील सांगरुळ फाट्यावर पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात रास्ता रोको करताना कॉंग्रेससह विविध पक्षांचे कार्यकर्ते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकारी कार्यालयावरदेवदासींची धडक

$
0
0

फोटो आहे.

सरकार विरोधी घोषणाबाजी, जोरदार निदर्शने

कोल्हापूर टाइम्स टीम

देवदासींना प्रतीमहिना तीन हजार निवृत्तीवेतन मिळावे, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी नेहरू युवा देवदासी विकास मंडळाच्या नेतृत्वाखाली देवदासींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली. मोर्चाने येऊन त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भाजपने विश्वासघात केल्याचा आरोपही त्यांनी केला.

वयोवृद्ध देवदासी महिलांना पेन्शन मंजूर करावे, घरकुल योजनेचे प्रस्ताव मंजूर करावेत, देवदासी कक्षाची स्थापना करावी, हयातीचे दाखले देण्याची अट रद्द करावी, आदी मागण्यांसाठी सरकारकडे अनेकवेळा मंडळातर्फे पाठपुरावा करण्यात आला. मात्र सरकार सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तीन बैठका घेतल्या. अजूनही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभ पात्र देवदासींना मिळालेला नाही. भाजप, शिवसेनेचे सरकार आश्वासनांशिवाय काहीही करीत नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही दखल घेतलेली नाही. याउलट पुणे, कोल्हापुरातील एका संस्थेशी संबंधित ४०० ते ५०० देवदासींचे अर्ज गतीने मंजूर झाले. मात्र शहरात पात्र देवदासीं वंचित राहिल्या आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष अशोक भंडारे, माजी नगरसेविका मायादेवी भंडारे यांच्या नेतृत्वाखाली महावीर गार्डनपासून मोर्चाला सुरुवात झाली. हातात मागण्यांचे फलक घेऊन सहभागी देवदासींचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला. तेथे सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. त्यानंतर मोर्चाची सांगता झाली. देवा साळोखे, रेखा वडर, द्रौपदी सातपुते, मालन आवळे, नसीम देवडी, यल्लव्वा कांबळे, शांताबाई पाटील, शारदा अवघडे यांच्यासह जिल्ह्यातील देवदासी महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

तर पालकमंत्र्याच्या घरासमोर उपोषण

देवदासींच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा पालकमंत्र्याच्या घरासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देणारे फलक एका देवदासी महिलेने मोर्चात घेऊन लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर

$
0
0

महापालिका क्षेत्रातून दररोज सुमारे १८५ मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दररोज कचरा संकलित केला जातो. पण यामध्ये सुसूत्रता नसल्याने अनेकदा कचराकुंड्या ओसंडून वाहत असतात. कचरा उचण्याबाबत अनास्था असताना उचललेला कचरा टाकण्यासाठी महापालिकेकडे जागाच उपलब्ध नसल्याने कसबा बावडा येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पात कचऱ्याचे डोंगर उभारल आहेत.

घनकचरा तयार होणारी ठिकाणे

निवासी क्षेत्र : ७७ टक्के

हॉटेल व रेस्टॉरंट : ८ टक्के

व्यावसायिक : ८ टक्के

बाजारपेठ : ५ टक्के

शैक्षणिक संस्था : २ टक्के

प्रतिदिन निर्माण होणारा कचरा : १८५ मेट्रिक टन

प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाचे क्षेत्रफळ : पाच एकर

८५०

कचरा कुंड्यांची संख्या

२००

छोट्या कचरा कुंड्या

१,७८८

आरोग्य विभागातील कर्मचारी

१,५४०

स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या

कचरा गोळा करणारी यंत्रणा

ट्रॅक्टर

जेसीबी

३००

सायकल रिक्षा

डंपर

१४

रिफ्युज कॉम्पॅक्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडळे हजार, कनेक्शन ३५

$
0
0

अधिकृत वीज जोडणीकडे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची पाठ

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : कोल्हापुरात कायमस्वरूपी नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळाची संख्या ८०० पेक्षा अधिक, उत्सव कालावधीत जवळपास २०० च्या आसपास धर्मादाय आयुक्ताकडे तात्पुरत्या स्वरुपात नोंदणी करूनही अधिकृत वीजजोडणीसाठी केवळ ३५ जणांनी नोंदणी केली आहे. महावितरणने आवाहन करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याकडे मंडळांनी दुर्लक्ष केले आहे.

महावितरणने, उत्सव कालावधीत सार्वजनिक मंडळांना घरगुती वापराच्या दरापेक्षा कमी दरात वीज पुरवठा उपलब्ध केला आहे. मात्र बहुतांश मंडळांनी अधिकृत वीज जोडणीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. उत्सव कालावधीत विजेचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. प्रत्येक मंडळात गणेशमूर्ती भोवती रोषणाईचा झगमगाट, मंडपात सप्तरंगी विद्युतमाळा, देखाव्यासाठी विजेचा वापर केला जातो. बहुतांश वेळेला मंडळानजीकच्या घरातून अथवा कार्यालयातून वीज जोडणी होते. या धांदलीत वीज जोडणी करताना पुरेशा प्रमाणात सुरक्षाविषयक खबरदारी घेतली जात नाही. यामुळे अनेकदा लहानमोठ्या प्रमाणात दुर्घटना घडल्याची उदाहरणे आहेत.

दरम्यान, उत्सव कालावधीत कसल्याही प्रकारची दुर्घटना घडू नये, लोकांनी गणेश उत्सव आनंदात साजरा करावा असा उद्देश ठेवून महावितरणने, मंडळासाठी तात्पुरती वीज जोडणी उपलब्ध केली आहे. सिंगल फेज व थ्री फेज जोडणी करुन दिली जाते. यासाठी सार्वजनिक मंडळाने महावितरणच्या शाखा कार्यालयात मागणी अर्ज, चाचणी अहवाल व इलेक्ट्रिकल इन्सपेक्टरचा दाखला सादर करावयाचा आहे. महावितरणच्या शहरात २५ शाखा आहेत. सोमवार अखेर महावितरणकडे सिंगल फेज जोडणीचे ५१ तर थ्री फेज जोडणीचे २१ अर्ज दाखल आहेत. सिंगल फेज अंतर्गत २६ ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात तर थ्री फेज अंतर्गत नऊ ठिकाणी वीज जोडणी केली आहे. एकूण ३५ वीज जोडण्या केल्या आहेत.

\B

अधिकृतसाठी प्रयत्न, कारवाईला मर्यादा

\Bशहरातील सार्वजनिक मंडळाची संख्या एक हजाराच्या आसपास आहे. मात्र अधिकृत वीज जोडणीसाठी अत्यल्प अर्ज दाखल आहेत. दुसरीकडे महावितरणने, मंडळांनी अधिकृत वीज जोडणी करून घ्यावी, सुरक्षितता बाळगावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. महावितरणचे कर्मचारी, सार्वजनिक मंडळाच्या गणेश उत्सव ठिकाणी जाऊन अधिकृत वीज जोडणीबाबत कार्यकर्त्यांना आवाहन करत आहेत. मात्र जी मंडळे अधिकृत वीज कनेक्शन घेत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यास महावितरणला मर्यादा पडत असल्याचे चित्र आहे.

उत्सव कालावधीसाठी कंट्रोलरुम

महावितरणने, ताराबाई पार्क कार्यालयात कंट्रोल रुम उभारण्यात आले आहे. उत्सव कालावधीत विजेच्या समस्या उदभवल्या तर त्याची सोडवणूक करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. जबाबदार अधिकाऱ्यांच्या मोबाइल नंबरची यादी महापालिका, जिल्हा परिषद आणि जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे दिली आहे. मिरवणूक मार्गावरील वीज वाहिन्या व अन्य घटकांची देखभाल दुरुस्ती केली आहे.

गणेशोत्सवात मंडळासाठी तात्पुरती वीज जोडणी घरगुतीपेक्षा कमी दराने उपलब्ध केली आहे. शहरातील शाखा कार्यालयात अर्ज दाखल केल्यानंतर एका दिवसात वीज जोडणी केली जाते. शहरातील पाच विभागातंर्गत ६०० अधिकारी व कर्मचारी उपलब्ध आहेत. मंडळाने अधिकृत वीज जोडणी करुन घेत सुरक्षितपणे व आनंदाने उत्सव साजरा करावा यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. मिरवणुकीच्यादिवशी आणखी २५ इंजिनीअर उपलब्ध असणार आहेत.

सुनील माने, कार्यकारी अभियंता महावितरण कोल्हापूर शहर विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यशस्वीतेसाठी भावनिक बुद्धिमत्ता महत्वाची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जीवनाच्या विविध टप्यांवर यशस्वी होण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता विकसित होणे महत्वाचे आहे. त्यासंबंधी पालकांनी माहिती आत्मसात करून मुलांना मार्गदर्शन करावे,' असे आवाहन 'प्रोजेक्ट द्रोणा'चे संचालक कर्णजित गावडे यांनी केले.

'महाराष्ट्र टाइम्स'चा कल्चर क्लब आणि 'प्रोजेक्ट द्रोणा'तर्फे 'मुलांची भावनिक बुद्धिमत्ता आणि पालकत्व' या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात कार्यशाळा झाली.

कर्णजित गावडे म्हणाले, 'सध्याच्या शिक्षण व्यवस्थेतून गुणांच्या माध्यमातून आयक्यू स्पष्ट होतो. मात्र, त्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेचे मूल्यमापन होत नाही. त्यासंबंधी पालकांत जाणिव, जागृकता नाही. ती होणे ही काळाची गरज आहे. करिअरमध्ये भावनिक बुद्धिमत्तेचा वाटा ८० टक्के तर आयक्यूचा २० टक्के असतो. त्यामुळे भावनिक बुद्धिमत्ता वाढविणे, त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पालकांनी प्रयत्न करावे. करिअरची निवड करताना भावनिक बुद्धिमत्तेचाही विचार झाला पाहिजे. नोकरी मिळवण्यासाठीचा दरवाजा उघडण्याचे काम आयक्यू म्हणजेचे परीक्षेतील गुण करतात. मात्र, नोकरी टिकवणे आणि पदोन्नतीसाठी अनेकवेळा भावनिक व्यवस्थापन उपयोगी पडते. म्हणूनच अलिकडे नामांकित कंपन्यांतील मुलाखतीत याचे मूल्यमापन केले जाते. प्रत्येक पालकांनी मुलांची भावनिक बुद्धिमत्ता वाढण्यासाठी प्रयत्न करावे.'

गावडे यांनी कार्यशाळेत सुरुवातीला भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? हे सोप्या भाषेत सांगितले. त्यासाठी चित्रफित दाखवण्यात आली. उपस्थित पालकांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. गैरसमज दूर केले. दामिनी हवालदार यांनी स्वागत केले. 'द्राणा'चे संचालक सहेज हरणाल, अर्चना आरबोळे, सोनल दुधाळे, अपूर्वा सिंग, साक्षी गावडे यांच्यासह पालक उपस्थित होते.

भावनिक बुद्धिमत्तेविषयी कार्यशाळेत चांगली माहिती मिळाली. मुलांचे करिअर घडवण्यासाठी ती माहिती उपयोगी ठरणार आहे. त्यासंबंधी जागरूक झाले पाहिजे.

- महेश कुलकर्णी, पालक

कार्यशाळेत नवी माहिती मिळाली. किचकट माहिती सोप्या पद्धतीने मांडल्याने पालकांना समजण्यास सोपे झाले. मुलांच्या करिअरसाठी भावनिक बुद्धिमत्ता किती महत्वाची आहे, त्याची जाणीव झाली.

- राजेंद्र जगदाळे, उपस्थित पालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पळसंबेतील युवकाची खुपिरेत आत्महत्या

$
0
0

फोटो..

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

खुपिरे फाटा येथे श्रीनिवास आकाराम माने (वय २६, रा. पळसंबे, ता. गगनबावडा) याने झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी सकाळी निदर्शनास आला. श्रीनिवास गेली तीन वर्षे खुपिरे येथील नारायण दत्तू जगदाळे यांच्या गगगनबावडा मार्गावरील खुपिरे येथील श्री बिअर शॉपीत कामाला होता. दोन दिवस सुट्टी घेऊन तो गावी गेला होता. रविवारी दुपारी तीनच्या दरम्यान तो पुन्हा कामावर हजर झाला. त्यानंतर पुन्हा बाहेर गेला तो परत आलाच नाही. मंगळवारी सकाळी धोंडीलमाळ नावाच्या परिसरात फणसाच्या झाडाला दोरीने गळफास लावलेल्या अवस्थेत श्रीनिवासचा मृतदेह दिसला. पोलिसपाटील सविता गुरव यांनी करवीर पोलिस ठाण्यात वर्दी दिली.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उच्च साखर उतारा’ पुरस्कार ‘कुंभी’ला

$
0
0

फोटो :

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन को-ऑप. शुगर फॅक्टरिज (नवी दिल्ली)कडून २०१७-१८ च्या हंगामासाठीचा 'सर्वाधिक उच्च साखर उतारा' पुरस्कार मिळाला. माजी कृषिमंत्री शरद पवार व केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सी. आर. चौधरी यांच्या हस्ते अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके, उपाध्यक्ष ॲड. बाजीराव शेलार, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांनी पुरस्कार स्वीकारला.

कुंभी कारखान्याने यापूर्वी हंगाम १९९१-९२ मध्ये अखिल भारतीय पातळीवर ऊस विकास कार्याबद्दलचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आणि उच्च साखर उतारा विभागातील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार यापूर्वीच मिळाला आहे. तसेच हंगाम १९९२-९३, १९९३-९४, २००१-०२, २००४-०५, २०११-१२ व २०१४-१५ साठी उत्कृष्ट कार्यक्षमतेबद्दल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे या संस्थेकडून पुरस्कार मिळालेले आहेत. कार्यक्रमास उत्तर प्रदेशचे कृषिमंत्री सुरेश राणा, नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, अमित कोरे, कल्लाप्पाण्णा आवाडे, जयंतीभाई पटेल, विजयसिंह मोहिते-पाटील, हर्षवर्धन पाटील, केंद्र सरकारचे चीफ डायरेक्टर ऑफ शुगर जी. एस. साहू, आदींसह मान्यवर उपस्थित होते.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images