Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मटार, वांगी महागली!

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील बहुतांश भाजी मंडयांमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाज्यांची मोठी आवक झाली असली तरी मटाराचे भाव चांगलेच वधारले आहेत. आज प्रतिकिलो ८० रुपये दराने मटारची विक्री झाली. वांग्याच्या दरातही प्रतिकिलो २० रुपयांनी वाढ झाली आहे. मात्र, वाढत्या आवकेमुळे अन्य फळ व पालेभाज्यांचे दर स्थिर होते.

मार्केट यार्डातील घाऊक बाजारात गणेशोत्सवामुळे कोकणातील व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी केल्याने मटार व वांग्याच्या दरात वाढ झाली. कोकणात गणेशोत्सवासाठी मुंबईकर मोठ्या संख्याने येतात. त्या काळात कोकणात भाज्यांची मोठी मागणी असते. त्यामुळे रविवारी सकाळी कोकणातील व्यापाऱ्यांनी अन्य भाज्यांसह वांगी, मटाराची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. त्यानंतर स्थानिक भाजी मंडयांमध्ये मटार, वांग्याचे दर वाढल्याचे दिसून आले. मटारचा दर प्रतिकिलो ५० रुपयांवर ८० ते १०० रुपयांपर्यंत पोचला. तर वांग्याचा दर चाळीसवरुन प्रतिकिलो ६० ते ८० रुपयांपर्यंत गेला.

वरणा, दोडका, घेवडा यांचे दर प्रतिकिलो ४० तर भेंडी, घेवड्याची विक्री प्रतिकिलो ४० ते ५० रुपये दराने झाली. फ्लॉवरचा दर चढाच राहिला. फ्लॉवर गड्डा प्रतिनग १५ ते ४० रुपयांपर्यंत विकला गेला. कोबी गड्डा प्रतिनग १० ते २० रुपये होता. गवारीची विक्री प्रतिकिलो ८० रुपये झाली. कांदा प्रतिकिलो २० ते ३० रुपये तर बटाट्याची विक्री २५ ते ३० रुपये अशी झाली. पालेभाज्यांचे दर चांगलेच घसरले आहेत. मेथी पेंढी १५ रुपयांना दोन तर शेपू पेंढी १० रुपयांला दोन अशी विक्री सुरू होती. कोंथबिरीच्या दरात पाच रुपयांची वाढ झाली असून प्रतिपेंढी १० रुपये दराने विक्री सुरू होती.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो, रुपयांत)

वांगी ६० ते ८०

टोमॅटो १०

भेंडी ५० ते ६०

ढबू मिरची ४० ते ५०

गवार ८०

दोडका ४०

कारली ५०

वरणा ४०

ओली मिरची ४०

बटाटा २५ ते ३०

लसूण ३०

घेवडा ५० ते ६०

फ्लॉवर १५ ते ४० नग

कोबी १० ते ३० नग

मुळा ५ ते १० नग

पालेभाजी दर (पेंढी, रुपयांत)

मेथी ५ ते १०

शेपू ५

कांदा पात १०

फळांचे दर (प्रतिकिलो, रुपयांत)

सफरंचद ८० ते २००

डाळिंब ४० ते ८०

पेरू ७० ते ८०

सिताफळ ४० ते ८०

पपई २० ते ४० (नग)

केळी २० ते ६० (डझन)

जवारी केळी २० ते ७० (डझन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोशल मीडियातील बदल आत्मसात करा

0
0

महिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील अभ्यासक कोटक यांचे आवाहन

फोटो आहे

कोल्हापूर टाइम्स टीम

'डिजीटल मार्केटिंग क्षेत्राची वेगाने वाढ होत आहे. विशेषत: व्यापार, उद्योगामध्ये डिजीटलचा वापर वाढत असताना तंत्रज्ञानातही बदल होत आहेत. तंत्रज्ञानातील बदल हे सोशल मीडियामध्ये वेगाने होत असून व्यापारवृद्धीसाठी हे बदल आत्मसात करण्याची आवश्यकता आहे,' असे मत माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील अभ्यासक मनोज कोटक यांनी व्यक्त केले.

रविवारी आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूर यांच्यावतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात व्याख्यान पार पडले. 'डिजीटल मार्केटिंग' या विषयावर कोटक म्हणाले, 'डिजीटल मार्केटिंग देशात वाढत असलेले क्षेत्र असले, तरी याचा अनेक कंपन्यांनी गंभीरपणे विचार केलेला नव्हता. आपल्या धोरणात बदल न करता पारंपरिक पद्धतीच्या मार्केटिंगचा मार्ग स्वीकारुन आपला ब्रँड पोहोचवला जात होता. सद्यस्थितीत मात्र झपटाने बदल झाला असून कंपन्या, उद्योज, व्यवसायिक डिजीटल मार्केटिंगचा आवलंब करत आहेत. त्यातून आवश्यक ते परिणाम साधता येणे शक्य झाले आहे. ऑफ लाइन व ऑन लाइनमध्ये उद्योग, व्यापार करताना सोशल मीडियाचा खुबीने वापर केला जात आहे. त्यामुळे संकेतस्थळ, यू ट्यूब, फेसबूकला महत्त्व प्राप्त झाले आहे.'

ते म्हणाले, 'बदलत्या मार्केटिंगनुसार कंपनीचा किंवा उद्योजकांना व्यापारवृद्धी वाढवण्यासाठी बदल स्वीकारवे लागतील. यासाठी संकेतस्थळ बनवून यू ट्यूबवर आपल्या व्यवसायाची माहिती दिली पाहिजे. दररोज फेसबुकवर अपडेट राहण्यासाठी सोशल मीडियातील बदल स्वीकारा. फेसबुक, गुगलवरुन मिळालेली माहिती संकलित करा. त्याचा व्यवसायवृद्धीसाठी नक्कीच फायदा होईल. डिजीटल मार्केटिंगचे महत्त्व ओळखून अनेक कंपन्यांची बदलत्या मार्केटिंगची कास धरली आहे. त्यामुळे डिजीटल किंवा ऑनलाइन मार्केटिंगला महत्त्व प्राप्त झाल्याने करिअरच्या संधीही निर्माण झाली आहे.' स्वत:च्या व्यवसायासाठी वापरलेल्या तंत्रज्ञानाची माहिती देत इतरांना माहिती देण्यासाठी दोन हजार किमीचा प्रवास केला असल्याचे स्पष्ट करत कोटक यांनी डेस्कटॉप ते स्मार्टफोनपर्यंत झालेल्या बदलाची माहिती त्यांनी स्लाइड शोद्वारे दिली.

व्याख्यानास असोसिएशनचे उपाध्यक्ष विश्वजित देसाई, सचिव प्रसन्न कुलकर्णी, खजानीस स्नेहल बियाणी, कौस्तुब नाबर, मनीष राजगोळकर यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी, उद्योजक व व्यापारी उपस्थित होते. स्वागत अद्वैत नार्वेकर यांनी केले. प्रास्ताविक असोसिएशनचे अध्यक्ष ओंकार देशपांडे यांनी केले. सूत्रसंचालन विक्रांत जाधव यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेनेचा भगवा फडकवूया

0
0

बूथप्रमुखांच्या मेळाव्यात आमदार राजेश क्षीरसागर यांचे आवाहन

फोटो आहे

कोल्हापूर टाइम्स टीम

लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवडणुकीत भगवा फडकवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी नियोजनबद्ध काम करावे, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. उत्तर विधानसभा मतदारसंघातील महापालिकेच्या ५७ प्रभागातील बुथप्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

शाहू स्मारक भवन येथे पार पडलेल्या मेळाव्यात बोलताना आमदार क्षीरसागर म्हणाले, 'सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढण्याची शिकवण शिवसेनाप्रमुखांनी दिली असून, प्रतिकार करण्याची क्षमता फक्त शिवसेनेत आहे. शिवसैनिक हा विकावू, नसून महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करणारा टिकाऊ आहे. गेली अनेक वर्षे कोल्हापूरवासीयांच्या प्रत्येक जिव्हाळ्याच्या प्रश्नावर शिवसेना रस्त्यावर उतरत आहे. या कामाची शिदोरी घेऊन जनतेपर्यंत शिवसेनेचे काम पोहोचविणे गरजेचे आहे. सेनेने स्थापनेपासून अनेक वादळे झेलली असून, सेना संपणार म्हणणाऱ्याच्या छाताडावर भगवा फडकवून सेना आजही स्वाभिमानाने उभी आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी कट्टर शिवसैनिकांच्याच पाठबळावर आजपर्यंत योग्यरित्या पार पडली असून, लोकसभेत कोल्हापूरचा खासदार हा शिवसेनेचा हवा ही जबाबदारी पक्षप्रमुख ठाकरे यांनी आपल्यावर दिली आहे. यासह जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातून आठ सेनेचे आमदार निवडून यावेत, असा आदेशही शिवसेना पक्षप्रमुखांनी दिला आहे. त्यामुळे नियोजनबद्ध कामाची आखणी करून आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा,'असे आवाहनही आमदार क्षीरसागर यांनी केले.

चाणक्य सर्वेक्षण संस्थेचे राम भोजणे यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने बुथप्रमुखांच्या जबाबदारी, त्यांची कामे, जनसंपर्क वाढविण्याच्या क्लुप्त्या आदीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, दीपक गौड यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास उत्तर विधानसभा निवडणूक संपर्कप्रमुख रघुनाथ खडके, परिवहन सभापती राहुल चव्हाण, महिला आघाडीच्या मंगल साळोखे, पूजा भोर, ऋतुराज क्षीरसागर, महेश उत्तुरे, जयवंत हारुगले, किशोर घाटगे, पद्माकर कापसे, रघुनाथ टिपुगडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अंकुश निपाणीकर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यावर दुकाने, वाहतुकीची कोंडी

0
0

फोटो : अर्जुन टाकळकर

लोगो : सणात कोंडी

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरातील मध्यवर्ती ठिकाणची बाजारपेठ म्हणून पापाची तिकटी, भाऊसिंगजी रोड येथे खरेदीसाठी दिवसभर रेलचेल असते. सजावट साहित्याची बाजारपेठ असलेल्या पापाची तिकटी, बाजारगेटमधील रस्ते मुळातच अरुंद आहेत. उत्सव कालावधीत ग्राहकांची गर्दी कॅश करण्यासाठी व्यावसायिकांनी चक्क रस्त्यावर स्टॉल आणि पत्र्याच्या छपऱ्या उभारुन व्यवसाय सुरू केला आहे. मुळात रस्ते अरुंद आणि पुन्हा दुकानदारांचे अतिक्रमणामुळे हे प्रमुख रस्तेच गायब झाल्याचे चित्र आहे.

रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दुकानदारांनी स्टॉल उभारल्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता शिल्लक राहिला नसल्यासारखी स्थिती बनली आहे. रविवारी सुट्टीनिमित्त नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाहेर पडले. मात्र वाहनधारकांना वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागले. सायंकाळी तर या मार्गावर दुचाकी वाहन चालविणे जिकिरीचे बनले होते. शहर वाहतूक शाखा आणि महापालिकेच्या अतिक्रमण विभागााच्या पथकाकडून कसलीही प्रभावी कारवाई होत नसल्यामुळे रस्त्यावर पत्र्याचे शेड उभारण्यापर्यंत मजल व्यावसायिकांनी गाठली. पापाची तिकटी ते लोणार गल्ली या मार्गावरही दुकानदार व लहानसहान व्यावसायिकांनी स्टॉल लावले आहेत. काही ठिकाणी मूर्तीकार तर कुठे दुकानदारांनी रस्ता अडविला आहे. या पर्यायी मार्गावरीलही वाहतुकीचा खोळंबा होत आहे.

\Bपापाची तिकटी ते महापालिका जीवघेणी वाहतुकीची कोंडी

\Bपापाची तिकटी ते महापालिकापर्यंतचा मार्गापर्यंत एकेरी वाहतूक सुरू आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूला दुकाने आहेत. कापड विक्रेते, शूज विक्रेते, कटलरी साहित्य विक्रेते व उत्सव कालावधीत सजावटीच्या साहित्याची विक्री करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या मार्गालगतच शिवाजी मार्केट आहे. यामुळे या मार्गावरुन दिवसभर वाहतूक सुरू असते. य मार्गावरील लहानसहान व्यावसायिक उत्सव कालावधीत बिनधिक्कतपणे दुकानसमोर अडीच ते तीन फुटापर्यंत पत्र्याचा शेड उभारून साहित्य विक्रीस ठेवतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील विक्रेत्याकडून हा प्रकार होतो. सध्या या एकेरी मार्गाचा कब्जा दुकानदार, विक्रेत्यांनी घेतल्याचे चित्र आहे. पत्र्याची छपरी काढून सजावट साहित्याची विक्री सुरू आहे. परिणामी रस्ता आणखी अरुंद बनला असून वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. सायंकाळी चार नंतर या मार्गावरुन वाहन चालविणे म्हणून जीव धोक्यात घालून प्रवास करण्यासारखे आहे.

बाजारगेटमधील रस्ताही गायब

महापालिकेच्या मागील बाजूस बाजारगेट आहे. बाजारगेटमध्ये लहान मोठ्या दुकानदारांची संख्या मोठी आहे. बाजारगेट ते गंगावेसपर्यंतच्या मार्गावर ठिकठिकाणी अडथळे जास्त आहेत. बाजारगेटमधील रस्ता विक्रेत्यांनी, स्टॉलधारकांनी गायब केला आहे. पापाची तिकटी मार्गावरील अतिक्रमणासारखी स्थिती बाजारगेटमध्ये पाहावयास मिळते. जवळपास प्रत्येक दुकानदाराने दुकानासमोरील रस्त्याची जागा तात्पुरत्या स्वरुपात ताब्यात घेतल्यासारखे चित्र आहे. वेगवेगळया प्रकारच्या सजावट साहित्याचे स्टॉल पावलोपावली आढळतात. रहदारीसाठी रस्ता शिल्लक नसल्याने वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे.

पर्यायी पार्किंगचा अभाव, चप्पललाइनचा रस्ता उखडला

शिवाजी चौकात दोन मोठ्या मंडळामार्फत गणशोत्सव साजरा होतो. उत्सव कालावधीत शिवाजी मार्केट समोरील पार्किंग सुविधा बंद ठेवण्यात येते. चौकात केएमटी बस स्टॉप आहे. रिक्षा वाहतूक सुरू असते. गणेशोत्सवात रस्त्यावर स्वागत कमानी उभ्या राहतात. वाहतुकीचा मोठा ताण असलेल्या चौकात वाहतूक व्यवस्थेचे नियोजन दिसत नाही. पर्यायी पार्किंग ठिकाणाचा अभाव आहे. चप्पल लाइनच्या दोन्ही बाजूला दुकाने आहेत. छत्रपती शिवाजी चौकातून गंगावेशकडे जाणाऱ्या या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. छत्रपती शिवाजी चौक ते पापाची तिकटीपर्यंतचा हा रस्ता पूर्ण उखडला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीत या रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून वापर होतो. आतापर्यंत या रस्त्याची डागडुजी झाली नाही.

दिव्याखाली अंधारसारखी स्थिती

महापालिकेच्या शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयापासून पापाची तिकटी, भाऊसिंगजी रोड आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीलगत बाजारगेठ आहे. महापालिका मुख्य इमारतीलगत बाजारगेठजवळ खुली जागा आहे. या जागेवर पार्किंगची सोय केल्यास महापालिका चौकात होणारी वाहनांची गर्दी कमी होऊ शकते. त्या मोकळ्या जागेवर स्टॉलधारकांनी व्यवसाय सुरू केले आहेत. पापाची तिकटी ते महापाालिका, बाजारगेठ, भाऊसिंगजी रोडवर वाहतुकीला अडथळे ठरणारे पत्र्याचे शेड, रस्त्यावरील दुकानाचे फलक हे महापालिकेतील व विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या नजरेस पडत नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूलगल्ली तालीम मंडळ

0
0

पूलगल्ली तालमीच्या

गणेशमूर्तीचे आज आगमन

कोल्हापूर: पूलगल्ली तालीम मंडळाच्या २१ फुटी गणेशमूर्तीचे सोमवारी (ता.१०) आगमन होणार आहे. बिंदू चौक येथून दुपारी बारा वाजता वाजत गाजत स्वागत करण्यात येणार आहे. महाराष्ट्र गर्जना ढोल ताशा पथक या मिरवणुकीचे आकर्षण असणार आहे. गुरुवारी (ता.१३) गणेश चतुर्थीदिवशी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना आणि उद्घाटन समारंभ आहे. उत्सवकाळात सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे मंडळाने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतुकीचे योग्य नियोजन हवे

0
0

मटा भूमिका...

सणासुदीच्या कालावधीत नागरिक खरेदीसाठी बाहेर पडतात. शहराच्या महत्त्वाच्या बाजारपेठांत दिवसभर गर्दी असते. मात्र अनेक ठिकाणी पार्किंगचा अभाव आहे, वाहतुकीला शिस्त नसल्याने पादचारी आणि वाहनधारक त्रस्त होत आहेत. वास्तविक महापालिका व शहर वाहतूक शाखेने संयुक्तपणे सणासुदीच्या कालावधीत शहरातील वाहतुकीचे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक आहे. रस्त्यावर स्टॉल टाकून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला पाहिजे. फुटपाथ हे पादचाऱ्यासाठी आणि रस्ते हे वाहतुकीसाठी खुले असले पाहिजेत. प्रशासनाने, त्यादृष्टीने नियोजन करुन नागरिकांना दिलासा दिला पाहिजे. पार्किंगची सुविधा, वाहतुकीचे नियोजनाची सांगड घातली तर वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजारामपुरीत गणेशोत्सवात दही हंडीचा थरार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गणेशोत्सवात वैशिष्ट्यपूर्ण देखावे तयार करण्याची परंपरा यंदाही राजारामपुरीतील जय शिवराय तरुण मंडळाने जपली आहे. सहाव्या गल्लीतील जय शिवराय मंडळाने यावर्षी तीस फूट उंचीची दही हंडी हा तांत्रिक देखावा तयार करणार आहे. हा देखावा उभारण्याची सुरुवात झाली आहे.

मंडळातर्फे ५० तंत्रज्ञ देखावा उभारणीचे काम करत आहेत. २०० अश्व शक्तीचा हैड्रोलिक पंपाव्दारे देखावा उभारणी सुरू आहे. १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता देखाव्याचे उद्घाटन होणार असल्याची माहिती मंडळाचे कार्यकर्ते ऋतुराज माने यांनी केले आहे. मंडळाच्या गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवातील तांत्रिक देखाव्याला 'पोलिस गणराया अॅवॉर्ड'मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मंदिरातील शिलालेखांची माहिती समाजासमोर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्री महालक्ष्मी भक्त मंडळ, धर्मशाळेतर्फे यंदा १२८ वा गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. यंदाच्या उत्सवात अंबाबाई मंदिरातील शिलालेखांची माहिती मांडण्यात येणार आहे. डिजिटल बोर्डांच्या माध्यमातून शिलालेखांची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याचा उद्देश आहे.

करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. बुधवारी (ता. १२) सायंकाळी सहा वाजता करवीर नाद ढोलताशा पथक व सुप्रभात बँडसह मूर्तीचे वाजतगाजत आगमन होणार आहे. गुरुवारी (ता. १३)सकाळी सात वाजता गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजू मेवेकर यांनी दिली आहे. किरण धर्माधिकारी यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना होईल. महालक्ष्मी भक्त मंडळातर्फे १८९० पासून गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप आहे. या उत्सवाला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सहकार्य आहे.

१३ ते २२ सप्टेंबर या कालावधीत अंबाबाई मंदिरातील सिध्दिविनायक मंदिरासमोरील व्यासपीठावर सायंकाळी ५.३० ते रात्री ८.३० या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होतील. गुरुवारी (ता. १३) स्वरनिनाद निर्मित 'शब्दसुरांच्या झुल्यावर', शुक्रवारी (ता. १४) कलातरंग सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे कॉमेडी एअर लाइन्स, शनिवारी (ता. १५) स्वरनाद म्युझिकतर्फे भावगीत, भक्तीगीताचा कार्यक्रम होईल. रविवारी (ता. १६) प्रा. प्रकाश इनामदार यांचे 'अष्टविनायक महती' या विषयावर व्याख्यान तर मंगळवारी (ता. १८) ओंकार निर्मित शिवगंधार प्रस्तुत 'मनबावरी गाणी' हा गाण्यांचा होईल. बुधवारी (ता. १९) नर्तना स्कूल ऑफ डान्स प्रस्तुत 'भरत नाट्यम'सादरीकरण, गुरुवारी (ता. २०) नाद सूरमयी प्रस्तुत गीत गदिमा, शनिवारी (ता. २२) नाद ब्रम्ह प्रस्तुत भावगीत, भक्तीगीतांचा कार्यक्रम आहे. रविवारी (ता.२३) सायंकाळी सात वाजता विसर्जन मिरवणूक होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शालिनी सिनेटोनमध्ये बांधकाम परवानगी नाही

0
0

महापालिका लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या बुधवारी (ता.१२) होणाऱ्या महासभेत 'ए' वॉर्डमधील रि.स.नं. ११०४ पैकी भूखंड क्रमांक पाच व सहा शालिनी सिनेटोनसाठी आरक्षित केली आहे. या भूखंडावर बांधकामास परवानगी देण्यात येऊ नये, असा सदस्य ठराव महासभेत मांडला जाणार आहे. महासभेने ठरावास मंजुरी दिल्यास ही जागा शालिनी सिनेस्टोनसाठी आरक्षित राहण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

शालिनी सिनेटोनची जागा चित्रीकरणासाठी देण्यात आली आहे. या जागेपैकी काही जागेवर बांधकाम करण्याची परवानगी मागितली होती. त्यामुळे शालिनी सिनेटोनचे प्रकरण शहरात चांगलेच गाजले होते. बांधकाम परवानगीसाठी आर्थिक घडामोडी झाल्याची चर्चा शहरात जोरदार रंगली होती. यातून बांधकाम परवानगीचा ठराव राज्य सरकारकडे पाठविल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतर झालेल्या विविध आंदोलनांमुळे या प्रकरणावर पडदा पडला होता. पण महासभेत शालिनी सिनेटोनच्या जागेबाबत सदस्य ठराव येणार असल्याने पुन्हा चर्चेला तोंड फुटले आहे.

शालिनी सिनेटोनच्या जागेवरील आरक्षण कायम राहण्याबरोबर या जागेवर बांधकाम करण्यास परवानगी देऊ नये, असा सदस्य ठराव महासभेत मांडला जाणार आहे. परिणामी या ठरावावर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. ठरावाला महासभेने पाठिंबा देऊन मंजुरी दिल्यास या जागेवर बांधकाम करण्यास प्रतिबंध लागणार आहे. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या महासभेकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

याबरोबर कदमवाडी प्रभागातील कपूर वसाहत येथे महापालिकेच्या सांस्कृतिक हॉलचे दिलीपराव माने सांस्कृतिक हॉल असे नामकरण करावे, या मागणीचा ठराव मांडण्यात येणार आहे. स्थायी समितीने नामकरणाच्या ठरावाला मंजुरी दिल्यानंतर महासभेसमोर येणार आहे.

महापालिकेने २०१८-१९ साठी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आराखड्यात सुधारणा करणारा ठरावही यावेळी चर्चेला येणार आहे. तसेच शिपुगडे तालीम प्रभागातील विठ्ठल मंदिर ते जुना बुधवार तालमीपर्यंतच्या रस्त्याला एकनाथ शंकरराव पोवार पथ असे नामकरण करण्यात येणार आहे. याबाबचा सदस्य ठराव महासभेत चर्चेला येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोटा गुन्हा मागे घ्या, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ

0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

'खोटे गुन्हे दाखल करून दिशाभूल करण्याचा आमदार आबिटकरांचा कारखाना आहे. येथे विरोधात जाणाऱ्यांना कसे अडचणीत आणायचे याचे ट्रेनिंग दिले जाते. त्यांनी आमच्या पदाधिकाऱ्यांविरूद्ध दाखल केलेला खोटा गुन्हा त्वरीत मागे घ्यावा. अन्यथा यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल,' असा इशारा युवक नेते राहुल देसाई यांनी दिला. आमदार आबिटकर गटाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी गारगोटी ग्रामपंचायत कार्यालयावर हल्ला करून तोडफोड व सदस्य, ग्रामविकास अधिकाऱ्यास केलेल्या शिवीगाळ, मारहाणीच्या निषेधार्थ आयोजित ठिय्या आंदोलनात ते बोलत होते. भुदरगड तहसिल कार्यालयासमोर ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी आघाडी, पदाधिकारी, व कर्मचाऱ्यांच्यावतीने हे आंदोलन झाले.

राहुल देसाई म्हणाले, 'ग्रामपंचायतीत यापूर्वी आमदार आबिटकर व त्यांच्या बगलबच्च्यांनी काळा कारभार केला. त्यामुळे जनतेचे त्यांना जागा दाखवून दिली. तरीही त्यांचा सत्तेचा माज उतरला नाही. त्यामुळे सत्ता उपभोगलेले, मटकावाले ग्रामपंचायतीवर हल्ला करतात हे निंदनीय आहे.'

यावेळी ग्रामपंचायतीवर केलेल्या हल्ल्याचा तालुका संघाचे अध्यक्ष प्रा. बाळ देसाई, सर्जेराव देसाई, शिवराज देसाई, पं. स. सदस्या गायत्री भोपळे, ग्रा. प. सदस्या स्नेहल कोटकर, रुपाली कुरळे, जयवंत गोरे, अस्मिता कांबळे, बजरंग कुरळे यांनी तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला. आंदोलनात जिल्हा परिषद सदस्या रेश्मा देसाई, शामराव इंदूलकर, सदस्य अलकेश कांदळकर, मेघा देसाई, सुकेशनी सावंत, सविता गुरव, राहुल कांबळे, आशाताई भाट, विजय आबिटकर, पांडुरंग सोरटे, सुनंदा वास्कर, संपत देसाई, शरद मोरे, राहुल चौगले, अरूण वास्कर आदींसह कार्यकर्ते, महिला व ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकजागृतीशिवाय प्रदूषणमुक्ती अशक्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गावागावातील तलाव नष्ट झाल्याने पाण्याचे स्रोत कमी झाले. आता नद्यांच्या प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. देशातील दहा प्रदूषित नद्यांमध्ये पंचगंगा नदीचा समावेश असणे ही जिल्ह्यासाठी नामुष्कीची बाब आहे. नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रबोधन हा एकमेव मार्ग आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शिक्षकांनी लोकजागृती करावी. लोकजागृतीशिवाय प्रदूषणमुक्ती अशक्य आहे' असे प्रतिपादन पर्यावरण तज्ज्ञ, प्राचार्य डॉ. मधुकर बाचूळकर यांनी केले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग, रोटरी क्लब ऑफ करवीर आणि रोटरी करवीर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित 'चला पंचगंगा जपूया' कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या.

डॉ. बाचूळकर म्हणाले, 'पूर्वी जिल्ह्याची ओळख तलावांमुळे होती. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये गावागावांतील तलावांचे अस्तित्वच संपुष्टात आले. याउलट शेजारील कर्नाटक राज्याने तलावांचे पुनरुज्जीवन करून पाण्याचे स्रोत निर्माण केले. आपल्याकडे पाण्याचे स्त्रोत कमी होत असल्याने आणि मानवी हस्तक्षेपाने नद्यांच्या प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. १९९८च्या दरम्यान काही सामाजिक संस्थांनी एकत्र येत पर्यावरण चळवळ सुरू केली. या चळवळीच्या माध्यमातून आम्ही प्रथम निर्माल्यदान व नंतर मूर्तीदान संकल्पना राबवली. प्रथम दोन्ही उपक्रमांना विरोध झाला. पण विरोधापेक्षा प्रबोधन करण्यावर भर दिला. परिणामी नागरिकांमध्ये जागृती होऊन सद्य:स्थितीत शंभर टक्के हा उपक्रम यशस्वी होत आहे.'

डॉ. बाचुळकर म्हणाले, 'कोल्हापूर जिल्हा प्रदूषणमुक्त होऊ शकतो. त्यासाठी प्रबोधन हाच मार्ग आहे. शिक्षक हे काम उत्तम प्रकारे करू शकतात. कार्यशाळेत उपस्थित शिक्षक १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. या विद्यार्थ्यांचे प्रबोधन झाल्यास ते कुटुंबांचे प्रबोधन निश्चित करतील. त्यातून लोकजागृती निर्माण होईल. शहरात लोकजागृतीमुळे आज अनेकठिकाणी इको-फ्रेंडली गणेशमूर्ती मिळेल असे फलक झळकत आहेत, हे चळवळीचे यश आहे. याच पद्धतीने नदीकाठावरील वृक्षसंपदा वाढवावी. गावांतील सांडपाणी रोखावे, कचरा नदीत टाकू नये याचे महत्त्व पटवून द्या.'

उपशिक्षणाधिकारी जयश्री जाधव म्हणाल्या, 'पंचगंगा नदीच्या प्रदुषणावर सरकार आणि सामाजिक संस्था उपाययोजना करत आहेत. पण सद्य:स्थितीत प्रदूषण होणार नाही, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.'

कार्यशाळेस पंचगंगा नदी काठावरील शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते. स्वागत करवीर रोटरीचे अध्यक्ष मनोज कोळेकर यांनी केले. सूत्रसंचालन एस. एन. पाटील यांनी केले. आभार दिनकर अदिक यांनी मानले.

पर्यावरणाची दिशा व दशा

'राधानगरी, आजरा, चंदगड येथील बॉक्साइट उत्खननाविरोधात आम्ही याचिका दाखल केली. याचिकेवर बाजू मांडण्यासाठी पाच जिल्ह्यांत वकील न मिळाल्याने कोर्टात स्वत:च बाजू मांडली. रस्ते विकास प्रकल्पात वृक्षाची कत्तल केली गेली. त्यात किती वृक्षांचे रोपण केले याबाबत कोर्टात दाद मागितली. पण त्याला फारसा पाठिंबा मिळाला नाही. पण टोलविरोधात आदोलनांत भरघोस पाठिंबा मिळाला. यावरून शहराच्या पर्यावरणाची दिशा आणि दशा स्पष्ट होते' अशी खंत डॉ. बाचूळकर यांनी व्यक्त केली.

डॉ. बाचूळकरांच्या शिक्षकांनी टिप्स

- प्लास्टिक पिशव्यांतून निर्माल्य दूर हटवा

- शालेय विद्यार्थ्यांचे प्रबोधन करा

- निर्माल्यापासून खत निर्मितीचा विश्वास निर्माण करा

- वनस्पतीजन्य रंगांबाबत प्रबोधन करा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हातकणंगलेत बंदला संमिश्र प्रतिसाद

0
0

हातकणंगलेत बंदला संमिश्र प्रतिसाद

पेठवडगावात निदर्शने, मोटरसायकल रॅली

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

वाढत्या महागाई व पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे यांसह अन्य मित्रपक्षांच्यावतीने पुकारलेल्या बंदला हातकणंगले तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

पेठवडगावमध्ये माजी मंत्री जयवंतराव आवळे, राजू आवळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. निषेध फेरी आणि मोटारसायकल रॅली काढून केंद्र व राज्य सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. माजी मंत्री जयवंतराव आवळे म्हणाले, 'इंधनदरात वाढ करुन भाजपने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्याचे काम केले आहे. सत्तेवर आल्यापासून चार वर्षात इंधनाच्या दरात वाढ करण्याचे काम भाजप करीत असून जनतेला वेठीस धरत आहे. सर्वसामान्य नागरिकांना अडचणी निर्माण करणाऱ्या सत्ताधारी सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन काँग्रेस पक्षाने केले आहे.'

युवक काँग्रेसचे नेते सचिन चव्हाण यांनी, केंद्र व राज्य सरकारच्यावतीने तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे असा आरोप केला.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेठवडगाव शहराचा सोमवारचा आठवडी बाजार असल्यामुळे व्यापारी वर्गाला त्रास होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी बंद न करता निषेध फेरी काढून काळ्या फिती बांधून हे आंदोलन केले. सकाळी पेठवडगावात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पालिका चौकात ठिय्या मारुन निदर्शने केली. युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व नगरसेवक जवाहर सलगर, महालक्ष्मी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सचिन चव्हाण, मनसेचे नगरसेवक संतोष चव्हाण, हातकणंगले काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवान जाधव, अमर पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेसने पुकारलेल्या इंधन दरवाढीच्या आंदोलनाला वडगाव शहर मनसेच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला होता. दिलीप दबडे, धनाजी घोगरे, सुकुमार रावळ, रमेश पाटोळे, अरुण पाटील, जगन्नाथ दाभाडे, डॉ. विजय गोरड, अभिजित दबडे, मनसेचे अमित पाटील, नागराज घट्टे, विश्वास पाटील, नितीन कुचेकर, सुनील सणगर आदीसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आळतेत महागाई व पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ कडकडीत गाव बंद ठेऊन केंद्र व राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायरी जाळल्या. माजी जि.प.सदस्य अमर पाटील, संदीप कारंडे, भगवान पोवार, संजय किल्लेदार, अल्पसंख्यांक सेलचे हातकणंगले तालुका अध्यक्ष शकील अत्तार, देवाप्पा कांबळे, सद्दाम मुजावर, बबलू मुल्ला आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो :

पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथे नगरपालिका चौकात इंधन दरवाढीविरोधात भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा देताना माजी मंत्री जयवंतराव आवळे, युवा नेते राजू आवळे, भगवानराव जाधव, सचिन चव्हाण, नगरसेवक जवाहर सलगर आदीसह कार्यकर्ते.

आळते (ता. हातकणंगले) येथे गाव बंद ठेऊन इंधन दरवाढीच्या निषेधार्थ संतप्त कार्यकर्त्यांनी टायरी जाळून निषेध व्यक्त केला.

(छाया : सतीश माळवदे पेठवडगाव, अब्दागिरे फोटो, आळते)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गारगोटीत निदर्शने

0
0

गारगोटीत काँग्रेस, राष्ट्रवादीची निदर्शने

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

गारगोटी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढून बंदचे आवाहन केले. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पुकारण्यात आला होता. यावेळी व्यापारी वर्गाने चांगला प्रतिसाद दिला. सकाळी आठ वाजेपर्यंत बस सेवा सुरू होती. त्यानंतर एस. टी. बंद ठेवण्यात आली होती. दुपारी तीननंतर बससेवा सुरू झाली.

कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई म्हणाले इंधन दर वाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. महागाईमध्ये वाढ होत आहे. जनतेमध्ये पेट्रोल-डिझेल दराच्या बाबत असंतोष पसरत आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार म्हणाले, पेट्रोल आणि डिझेलचे भाव दररोज वाढत आहेत. गेल्या दोन महिन्यांत १० ते १२ रुपयांनी इंधनाचे दर वाढले आहेत. तालुका संघाचे चेअरमन प्रा.बाळ देसाई, माजी उपसभापती सत्यजित जाधव यांची भाषणे झाली.

बिद्रीचे संचालक मधुकर देसाई, के.ना.पाटील, पंडितराव केणे, माजी सरपंच सर्जेराव देसाई, शरद मोरे, व्यंकटराव मोरे, भालचंद्र कलकुटकी, आर.व्ही.देसाई, व्ही जे कदम, रमेश देसाई, विलास मोरे, बाजीराव देसाई, बाबूल देसाई, के.के.कांबळे, सचिन घोरपडे, अनिकेत कल्याणकर, अजित देसाई, विजय कोटकर, विलास झोरे, प्रकाश देसाई, पी.एस.कांबळे, राजू काझी, विजय आबिटकर, रवी वायंदडे, भुजंगराव मगदूम आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहूवाडी बंदपासून अलिप्त

0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीविरोधात विरोधी पक्षांनी पुकारलेल्या बंदचा शाहुवाडीत फज्जा उडाल्याचे दिसून आले. केवळ भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने शाहुवाडीचे तहसिलदार चंद्रशेखर सानप यांना निवेदन देऊन इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यात आला. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सरकारविरोधी एकही पक्ष रस्त्यावर न उतरल्याने तालुक्यातील दैनंदिन व्यवहार दिवसभर सुरळीत होते. केंद्र व राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी भाजप सरकारने जनतेसमोर आश्वासनांची खैरात करून अच्छे दिन दाखवण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकाळात जनतेला वाईट दिवसांचाच अधिक कटू अनुभव येत असल्याचे 'शेकाप'ने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पन्हाळ्यात काँग्रेसच्यावतीने कळे येथे निदर्शने

0
0

पन्हाळ्यात काँग्रेसच्यावतीने कळे येथे निदर्शने

म. टा. वृत्तसेवा, पन्हाळा

पेट्रोल- डिझेल दरवाढीसह वाढत्या महागाईच्या निषेधार्थ भाजप सरकारचा निषेध करत पन्हाळा काँग्रेसच्यावतीने कळे पोलिस ठाण्यासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी कारण्यात आली. निषेधाचे निवेदन कळे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अभिजित गुरव यांना देण्यात आले. आंदोलनात पन्हाळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जयसिंराव हिर्डेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब मोळे, पन्हाळा पंचायत समितीचे माजी सदस्य विलास पाटील, सुरेश बोरवणकर, जी. बी. पाटील, दिनकर पाटील, सुदर्शन पाटील, संदीप चौगले, राकेश काळे, संतोष नारकर, सुनील पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओ‌ळी : कळे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अभिजित गुरव यांना पन्हाळा काँग्रेसचे अध्यक्ष जयसिंराव हिर्डेकर, माजी जि. प. सदस्य बाळासाहेब मोळे, पन्हाळा पं. स.चे माजी सदस्य विलास पाटील, सुरेश बोरवणकर, जी. बी. पाटील, सुदर्शन पाटील आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बोगस गुन्हा मागे घेण्याची आबिटकरांची मागणी

0
0

ग्रामसेवकांना हाताशी धरून दाखल

बोगस गुन्हा मागे घ्यावा : प्रा.आबिटकर

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

गारगोटी ग्रामपंचायतीचे सरपंच संदेश भोपळे तसेच सत्ताधारी मंडळीनी ग्रामपंचायत कार्यलयात महिलेसोबत केलेल्या लज्जास्पद वागणुकीबद्दल सोमवारी शहरातील महिला व नागरीकांनी भव्य मूकमोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. यावेळी भुदरगड तहसीलदार, पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक, प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले. ग्रामसेवक बुवा यांना हाताशी धरून दाखल केलेला बोगस गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. आबिटकर यांनी केली.

यावेळी प्रा. अर्जुन आबिटकर म्हणाले, 'ग्रामपंचायतीमध्ये पाच वर्षे काम केलेल्या पदाधिकाऱ्यांवर सत्ताधारी मंडळींनी सुडबुद्धीने कारवाई केली. तसेच खोटी व्हिडीओ क्लीप तयार केली आहे. ग्रामसेवक बुवा यांना हाताशी धरून दाखल केलेला बोगस गुन्हा मागे घ्यावा. सरपंच व सत्ताधारी सदस्यांची हुकूमशाही शहरातील जनता खपवून घेणार नाही.'

यावेळी पीडित महिलेने आपली कैफियत मांडली. त्या म्हणाल्या, 'गारगोटीचे सरपंच संदेश भोपळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्यासोबत ग्रामपंचायतीमध्ये अत्यंत घृणास्पद वर्तन केले. कारण या मंडळीकडून यापुढे कोणत्याही महिलेला त्रास होवू नये. माझ्या समर्थनार्थ आलेल्या लोकांवर सत्ताधारी मंडळींनी केलेले सर्व आरोप खोटे असून ते एका बहिणीच्या संरक्षणासाठी आलेले होते. तरी मला न्याय मिळावा.'

जिल्हा परिषद सदस्या रोहीणी आबिटकर, माजी उपसभापती विजयमाला चव्हाण, छाया सारंग, गिता मोरे, रुपाली राऊत, सरिता चिले, सदस्या अनिता गायकवाड, स्मिता चौगले, राजश्री शिंदे, अंकुश चव्हाण, बाजीराव चव्हाण, दिलीप देसाई, भिमराव शिंदे, सुर्यकांत चव्हाण, अजित चौगले, सदाशिव खेगडे, सदस्य सर्जेराव मोरे, सुशांत सूर्यवंशी, रणधीर शिंदे, मनोज मुगडे, रफिक बागवान, दत्ता आबिटकर, शिवाजी मुगडे यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयसिंगपूरला ३५ जण हद्दपार

0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून जयसिंगपूर पोलिसांनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ३५ जणांना शिरोळ तालुक्यातून हद्दपार केले आहे. १० ते २५ सप्टेंबर या कालावधीसाठी ही हद्दपारीची कारवाई करण्यात आल्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक शहाजी निकम यांनी सांगितले.

पोलिसांनी सीआरपीसी १४४ (२)प्रमाणे ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. भाजयुमो जयसिंगपूर मंडल अध्यक्ष संतोष बाबूराव जाधव याच्यासह शहेनशहा सरताज इराणी, सुकुमार उमाजी गोसावी, जावेद बाळू शेख, चेतन नूर शिकलगार (सर्व रा. जयसिंगपूर), संजय आप्पासाहेब कांबळे (रा. कोथळी), निलेश रामू मगदूम, उदय दत्तात्रय माने, विजयकुमार राजाराम भवरे (सर्व रा. उमळवाड), विजय उर्फ दिपक बापू गावडे-मोरड, स्वप्निल थोरात, काशिनाथ दत्ता थोरात, किरण आमाण्णा थोरात, संभाजी दत्तू थोरात, आमण्णा कृष्णा थोरात, फिरोज इसमान नाईकवडे, निलेश उर्फ किशोर अर्जुन माने, गणेश उर्फ कैलास अशोक मोरे, वकील संजय वाळकुंजे, सलमान शब्बीर जमादार, अमर उर्फ गॅस्न्या बाबासो शिंदे, सचिन आनंदराव शिंदे, दादासो रघुनाथ खोत, सचिन बबन खिलारे, हैदर गुलाब मुजावर, धनाजी उर्फ खंडू दत्तात्रय मंडले, बंडू पांडुरंग भिसे, महेश बजरंग दळवी (सर्व रा. दानोळी), विवेक तानाजी वरेकर, अजित खंडू जाधव, वासिम शहाजहान नदाफ, मोहसिन शहाजहान नदाफ (सर्व रा. उदगाव), महावीर श्रीधर चौगुले, वर्धमान महावीर मगदूम (दोघे रा. जैनापूर) अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हातकणंगलेत दंड वसूल

0
0

गौण खनिज वाहतुकीवर कारवाईत

साडेनऊ लाखांचा दंड वसूल

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

हातकणंगले तालुक्यात सुरू असलेल्या गौण खनिज उत्खनन व वाहतूकप्रकरणी नूतन तहसीलदार सुधाकर भोसले यांनी सोमवारी कारवाई केली. सुमारे साडेनऊ लाखांचा दंड वसूल केला. यामुळे तालुक्यातील अवैध व्यवसायीकांचे धाबे दणाणले आहे.

तहसिलदारांच्या पथकाने अनाधिकृत गौण खनिज वाहतूक करणारी वाहने जप्त केली. महेश रामचंद्र गवळी यांचा ट्रक जप्त करून (एमएच १२ एएक्स ४९६६) ३ लाख ७२ हजार १०० रुपये दंड वसूल केला. मधुकर सोमनाथ शेटे यांचा ट्रक (एमएच ०९ ए ६४८९) यांना एक लाख ५८ हजार रुपये दंड केला. एम. डी. युसुफ (रा.औरवाड, ता. शिरोळ)यांचा ट्रक (एमएच ०९ ३२१३) यांना एक लाख ५८ हजार रुपयांचा दंड केला. साजीद मोमीन (रा. औरवाड, ता. शिरोळ) यांचा ट्रक (एमएच ०९ बीसी ५०४९) यांना एक लाख ५८ हजार रुपये दंड केला. एकूण ९ लाख २९ हजार ५०० रुपये दंड वसूल करून ट्रक जप्तीची कारवाई तहसिलदार सुधाकर भोसले यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत आत्मदहनाचा इशारा

0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

नगरपरिषद मालकीच्या जागेवर जामे मस्जिद सुन्नत जमात या संस्थेने अतिक्रमण करून बेकायदेशीर इमारत उभारली आहे. यासंदर्भात १९८७ पासून तक्रार करूनही त्यावर नगरपरिषदेकडून अद्याप काहीच कारवाई केली गेलेली नाही. या जागेवर नवे बांधकाम सुरू झाले असून त्याकडेही दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ आत्मदहन करण्याचा इशारा दिलीप माणगावकर यांनी दिला आहे.

शहरातील सिसनं १७१०६ या मालमत्तापत्रकी कब्रस्तान असा वापर दर्शविण्यात आला आहे. त्यामध्ये शासनाने कोणताही बदल केलेला नसल्यामुळे ही जागा नगरपरिषदेच्या मालकीचीच आहे. मात्र मुस्लिम समाजाने याठिकाणी बेकायदेशीरपणे कब्जा करत सन १९८३ साली व्यापारी संकुल उभारले. नगरपरिषद मालकीच्या जागेवर अतिक्रमण होऊनही संबंधित विभागाने त्यांच्यावर कारवाई न करता केवळ कागदोपत्री कारवाई दाखवत या कृतीला पाठीशी घातले गेले. त्यातूनच या जागेवर पुन्हा मशिद जिर्णोद्धाराच्या नावाखाली बांधकाम सुरू करण्याचा प्रयत्न संस्थेकडून केला जात आहे. त्याकडेही नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने या बांधकामावर कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.तीस दिवसांत अतिक्रमण न हटवल्यास प्रशासकीय दिरंगाईच्या निषेधार्थ आत्मदहन करण्याचा इशारा माणगावकर यांनी यावेळी दिला. यावेळी अनिल सातपुते, प्रसाद दामले, शशिकांत कालेकर, अनुप हल्याळकर, सुशांत ऐवारे, सुजित कांबळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत शिवसेनेकडून प्रशासन धारेवर

0
0

म. टा. वृत्तसेवा,इचलकरंजी

शहरातील बंद पथदिवे, खड्डेमय रस्ते दुरुस्तीसंदर्भात पाठपुरावा करुनही नगरपालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने शिवसेनेने मोर्चा काढून प्रश्नांचा भडीमार करत प्रशासनाला धारेवर धरले. सोमवारी आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात काहीकाळ गोंधळ निर्माण झाला.

शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी व बंद पडलेले पथदिवे दुरुस्तीसंदर्भात शिवसेनेच्यावतीने पाठपुरावा सुरू आहे. पण गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन पोहोचला असताना प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. खड्डेमय रस्ते आणि अंधारातूनच शहरात श्रींचे आगमन होणार की काय असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने नगरपालिकेवर मोर्चा काढणयत आला. मुख्याधिकारी दीपक पाटील यांना मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा केली.

शिवसेना उपजिल्हा प्रमुख महादेव गौड, शहर प्रमुख सयाजी चव्हाण यांनी प्रशासनाला धारेवर धरले. तातडीने रस्ते आणि पथदिव्यांची दुरूस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. आंदोलनात उप जिल्हाप्रमुख मलकारी लवटे, नगरसेविका उमा गौड, संतोष गौड, दत्ता साळुंखे, शिवानंद हिरेमठ यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images