Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

दिलबहार साई मंदिर भाविकांसाठी खुले

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

रविवार पेठेतील दिलबहार तालीम मंडळाचे साई मंदिर गुरुवारी भाविकांसाठी खुले करण्यात आले. मंदिरात साईबाबांच्या मूर्तीची नव्याने प्रतिष्ठापना करण्यात आली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि अंजली पाटील यांच्या हस्ते नवीन मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी सांगवडेकर महाराज उपस्थित होते.

माजी महापौर रामभाऊ फाळके यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी नगरसेवक प्रा. जयंत पाटील, विजय खाडे, मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक विनायक फाळके, सुहास लटोरे, भाजप महानगर अध्यक्ष संदीप देसाई, राहुल चिकोडे, पद्माकर कापसे यांच्यासह परिसरातील नागरिक, भाविक उपस्थित होते. दिवसभर भाविकांनी साई मूर्तीचे दर्शन घेतले. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. २० सप्टेंबर रोजी साईबाबांच्या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्याचा लाभ घ्यावा, असे मंदिराचे विश्वस्त रामभाऊ फाळके यांनी केले आहे. यावेळी फाळके यांच्या हस्ते विश्वपंढरीचे सांगवडेकर महाराज यांचे स्वागत केले. सनई सुरावट, मनमोहक रांगोळ्या, फुल माळाची सजावट आणि भक्ताच्या उपस्थितीत सोहळा रंगला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फूटपाथ चकाचक, अतिक्रमणे तशीच

$
0
0

फोटो आहेत

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरातील रस्त्यांकडेला असलेल्या फूटपाथचा पादचाऱ्यांना विनाअडथळा वापर करता यावा, यासाठी महापालिकेच्यावतीने गुरुवारपासून स्वच्छता मोहीम सुरू केली. तीन दिवस चालणाऱ्या मोहिमेमध्ये अडथळ्यांसह अतिक्रमण हटवण्यात येणार होते. पण दोन दिवसांच्या मोहिमेत केवळ फूटपाथ चकाचक करण्यात धन्यता मानली असून फूटपाथवरील टपऱ्या, बॅनर्स, होर्डिंग हटवण्यात दुर्लक्ष केले आहे.

पावसामुळे फूटपाथवर वाढलेले गवत, झाडे-झुडपे काढण्याबरोबरच खरमाती, साचलेला गाळ उचलणे, नाला-गटर सफाई आणि फूटपाथवरील अतिक्रमणे हटण्याची महापालिकेने मोहीम सुरू केली. महापालिकेच्या चार विभागीय कार्यालयाच्यावतीने ही मोहीम राबवली जात आहे. गुरुवारी यल्लमा मंदिर ते हॉकी स्टेडियम, हॉकी स्टेडियम ते इंदिरा सागर हॉल, फुलेवाडी ते जावळाचा गणपती, जनता बझार चौक ते उड्डाण पूल, उड्डाण पूल ते शाहू नाका, शिरोली जकात नाका ते ताराराणी चौक व धैर्यप्रसाद हॉलपर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छता मोहीम राबवली.

मोहिमेमध्ये चार जेसीबी, सहा डंपरसह विविध विभागातील सुमारे ३४० कर्मचारी सहभागी झाले होते. त्याचबरोरब अतिरिक्त आयुक्तांच्या नियंत्रणाखाली चार उपशहर अभियंत्यांनी मोहीम राबवली. महापालिकेचा एवढा लवाजमा असल्याने सर्व फूटपाथवरील अतिक्रमणे हटवली जाणार अशी शक्यता होती. पण सदरची मोहीम राबवताना फूटपाथवरील केवळ झाडे-झुडपे व पावसामुळे निर्माण झालेली खरमाती उचलण्यात आली. मोहीम राबवलेल्या मार्गावर अनेक ठिकाणी खोकीधारकांची अतिक्रमणे, होर्डिंग, बॅनर असताना ती तशीच ठेवण्यात आली. त्यामुळे एकप्रकारे या मोहिमेतून अतिक्रमणधारकांना अभय दिल्याचे स्पष्ट होत आहे.

गुरुवारप्रमाणे शुक्रवारी शहरात मोहीम राबवण्यात आली. गांधी मैदान विभागीय कार्यालयाच्यावतीने इंदिरा सागर हॉटेल ते कळंबा साई मंदिर, शिवाजी मार्केट कार्यालयांतर्गत टायटन शॉप ते हॉकी स्टेडियम, दसरा चौक ते बिंदू चौक, मिरजक तिकटी ते नंगीवली चौकापर्यंत तर राजारामपुरी कार्यालयाने एसएससी बोर्ड ते सुभाष नगर व ताराराणी मार्केट कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालय ते लाइन बझारपर्यंत मोहीम राबवली. शुक्रवारच्या मोहिमेतही केवळ फूटपाथची स्वच्छता करण्याबरोबरच खरमाती व झाडे-झुडपे तोडून पादचाऱ्यांना महापालिका कर्मचाऱ्यांनी फूटपाथ मोकळा करून दिल्याचे दिसत होते. काही फूटपाथवरील खोकी, बॅनर, होर्डिंग कर्मचाऱ्यांनी हटवली. मात्र महापालिकेचे अतिक्रमण पथक आल्यानंतर बॅनर, होर्डिंग स्वत:च काढून घेतली. पण हे पथक पुढे गेल्यानंतर पुन्हा बॅनर आणि होर्डिंगने फूटपाथचा भाग व्यापून टाकत होते. परिणामी अतिक्रमण मोहिमुळे फूटपाथ स्वच्छ झाली असली, तरी अतिक्रमणांचा अढथळा तसाच राहिल्याचे चित्र सर्रास दिसत होते. मोहीम सुरू असताना आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दसरा चौक तर उपायुक्त मंगेश शिंदे यांनी विविध ठिकाणी भेट देऊन मोहिमेचा आढावा घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवासाठी एसटीच्या जादा फेऱ्या

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'गणेशोत्सवादरम्यान गावी जाणाऱ्या भाविकांसाठी एसटीच्या जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. मुंबई, ठाण्यातून कोल्हापूरमार्गे ८५ जादा बसेस कोकणात जाणार आहेत, तर पुण्यातून कोल्हापूरसह कर्नाटकात जाणाऱ्या दीडशेहून अधिक गाड्यांचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील सर्वच आगारांमध्ये गरजेनुसार जागा गाड्या सोडल्या जाणार आहेत,' अशी माहिती एसटीचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.

गणेशोत्सवासाठी गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या असते, त्यामुळे दरवर्षी या काळात एसटीला प्रचंड गर्दी असते. विशेषत: मुंबई, ठाणे, पुणे या शहरातून कोल्हापूरकडे येणारे आणि कोल्हापूरमार्गे कोकणात जाणारे लाखो भाविक एसटीने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. गणेशोत्सव काळात भाविकांच्या सुविधेसाठी राज्य परिवहन महामंडळाने गर्दीच्या मार्गांवर जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. कोल्हापूर विभागामार्फत कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातून पुणे, मुंबई, रत्नागिरी, सावंतवाडी, मालवण, कणकवली, सांगली, इस्लामपूर, बेळगाव, हुबळी या मार्गावर जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार गाड्यांची संख्या कमी-अधिक केली जाईल. जिल्ह्यांतर्गत प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी सर्व आगारांमधून जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. कोल्हापूर, रंकाळा आणि इचलकरंजी या महत्त्वाच्या बसस्थानकातून इस्लामपूर, सांगली, मिरज, बेळगाव, गडहिंग्लज, गारगोटी, आजरा. चंदगड या मार्गांवर प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार जादा गाड्या सोडल्या जातील.

मुंबई, पुण्यातील भाविक मोठ्या संखेने गावाकडे येतात. यासाठी मुंबई, ठाणे आणि पुणे बसस्थानकांनी स्वतंत्र नियोजन केले आहे. मुंबई, ठाणे व उपनगरांमधून निघणाऱ्या ८५ गाड्या कोल्हापूरमार्गे पुढे कोकणात जाणार आहेत. स्वारगेट, पिंपरी चिंचवड, निगडी, हिंजवडी या आगारांमधून कोल्हापूर, इचलकरंजी, बेळगाव, हुबळीसाठी दीडशेहून अधिक गाड्या सोडल्या जातील. आगाऊ आरक्षण करण्यासाठी ११ व १२ सप्टेंबरला सर्वच आगारांमध्ये व्यवस्था केली जाणार आहे. १२ सप्टेंबरपासून जादा गाड्या सुरू होतील. १७ ते २३ सप्टेंबरदरम्यान परतीच्या प्रवासासाठीदेखील जादा गाड्या उपलब्ध असतील. जादा गाड्यांचे नियोजन दैनंदिन गाड्यांव्यतिरिक्त केले आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागाचे विभागीय नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पगार सरकारी, काम खासगी

$
0
0

सचिन पाटील

sachin.patil1@timesgroup.com

Tweet : sachinpMT

सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य सेवा संकटात सापडली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांतील डॉक्टर आरोग्याप्रती असणारी जबाबदारी झटकून खासगी प्रॅक्टिस करत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच सरकारी वैद्यकीय कर्मचारीही कर्तव्यात कमी पडत असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. अशा कामचुकार डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जनमानसांतून होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार पाहता ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्यसेवा महत्त्वपूर्ण मानली जाते. जिल्ह्याच्या दुर्गम भागातील सर्वसामान्यांसाठी प्राथमिक उपकेंदे उपचारासाठी जवळची आणि सोयीस्कर असतात. दुर्गम तालुक्यातील महिलांना प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे फायदेशीर ठरतात. अलीकडच्या काळात प्राथमिक आरोग्य केंद्रांतील कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांवर अंकुश न राहिल्याने खासगी प्रॅक्टिसचा जोम धरत असून स्वत:च्या खासगी रुग्णालयात पेशंट पळविण्याचे प्रकार घडत आहेत.

खासगी वैद्यकीय सेवेतील कमाई जोरात

सार्वजनिक आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी सरकारच्या पातळीवर प्रयत्न होत असताना प्राथमिक आरोग्य केंद्रांतील काही डॉक्टरांनी खासगी प्रॅक्टिसची दुकाने थाटत कमाईचा नवा मार्ग अनुसरला आहे. सरकारच्या सर्व सुविधा, भत्ते व इतर लाभ घेऊनही अतिरिक्त कमाईचा घाट घातला जात आहे. वैद्यकीय सेवा अत्यावश्यक गणली जात असल्याने डॉक्टरांनी मुख्यालयात राहणे बंधनकारक आहे. मात्र, सरकारी रुग्णालयात सोयीने नोकरी केली जाते. नोकरीतील सेवेपेक्षा खासगी सेवेकडे जास्त ओढा असल्याचे चित्र आहे. अनेकदा उपचारादरम्यान ओळख वाढल्यास आपल्याकडे खासगी उपचारासाठी पेशंट वळविण्याचा प्रयत्न तसेच सल्लाही दिला जातो. वरिष्ठांना खूश ठेवण्याची कला अशा डॉक्टरांना साधल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात नाही. ग्रामीण भागात अशा डॉक्टरांना पायबंद घालणे सर्वसामान्यांना शक्य होत नाही. सरकारी नोकरी करत खासगी सेवेतूनही कमाई करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने अशा डॉक्टरांचा आत्मविश्वास वाढतो आहे.

मुख्यालयात राहण्याच्या नियमाला हरताळ

रुग्णाला चोवीस तास सेवा मिळावी यासाठी डॉक्टरांनी मुख्यालयातच राहावे, असा कायदेशीर नियम असूनही या नियमाला बगल देण्याचे प्रकार घडत आहेत. अनेकदा अत्यवस्थ रुग्ण आल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात किती डॉक्टर उपस्थित राहतात? उपचारादरम्यान डॉक्टर उपस्थित नसल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्यास डॉक्टरांवर बडतर्फीची कारवाई करण्यात येणार असल्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी कितपत होणार याबाबत साशंकता आहे. ग्रामीण भागातील रुग्णालयात जबाबदारी टाळण्याचे प्रयत्न होतात. प्रसूतीच्या कितीतरी रुग्णांना सीपीआरमध्ये पाठविण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे सीपीआर प्रसूती विभागाला अनेकविध समस्यांना सामोरे जावे लागते. रुग्णांसाठी १०८ सेवा उपलब्ध झाल्याने 'दिसला रुग्ण की पाठवा सीपीआरला' अशी प्रवृत्ती वाढत आहे.

खासगीकरणाचा धोका

आरोग्य व्यवस्थेतील अपप्रवृत्तींमुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था धोक्यात आली आहे. सध्याचे महागडे उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरचे होत आहेत. लाखो गरिबांना सेवा देणारे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये बंद पडली तर खासगी सेवा देऊन नफा मिळवण्याच्या बेलगाम पद्धतींना चालना मिळेल. सध्या सरकारही आरोग्यविषयक जबादाऱ्या झटकू लागल्याने सार्वजनिक वैद्यकीय सेवा धोक्यात आल्या आहेत. वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या जनतेसाठी आरोग्याची जबाबदारी घेणाऱ्या व्यवस्था टिकवणे गरजेचे आहे.

०००००

कोट...

सरकारी सेवेत असणाऱ्या डॉक्टरांना त्यांनी खासगी सेवा देऊ नये यासाठी भत्ता दिला जातो. त्यामुळे त्यांनी खासगी प्रॅक्टिस करू नये. सरकारी डॉक्टर खासगी सेवा देत असल्याबाबत तक्रारी आल्यास त्याबद्दल चौकशी लावली जाईल. दोषी आढळल्यास संबंधितावर कडक कारवाई केली जाईल.

डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी

००००००००

ग्रामीण भागात सरकारी डॉक्टरांकडून खासगी सेवा देण्याचे प्रमाण अधिक आहे. सरकारने डोळसपणे अशा घटनांकडे पाहिल्यास त्याला पायबंद घालणे शक्य होईल. तसेच बोगस डॉक्टरांवरही कारवाईत सरकारने पुढाकार घ्यावा.

सागर चौगुले, सामाजिक कार्यकर्ते

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकार चालवताना कसरत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कणकवली

युती सरकार चालवताना समतोल साधताना कसरत करावी लागते, अशी कबुली देत तुम्हीही एक दिवस भाजप नेते होऊन बघा, म्हणजे समजेल, असे वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे दुरुस्तीच्या पाहणीसाठी ते शनिवारी आले होते. त्यानंतर कणकवलीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महामंडळ नियुक्तीत कोकणवर अन्याय झाल्याचे निदर्शनास आणून दिले असता ते म्हणाले की, भाजपला घटकपक्षांसोबत समतोल साधावा लागतो. शिवसेना-जानकर-रिपाइं-खोत या सर्वांना बरोबर घेऊन आम्हाला जावे लागत आहे. या सर्वांना सोबत घेऊन कसे पुढे जायचे हे तुम्हाला कळेल. त्यासाठी तुम्ही एक दिवस भाजप नेते होऊन बघा, असे सांगून सरकार उर्वरित वर्षही पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिवसेना-भाजप युती करून लढवणार आहे. त्यामुळे काळजी नको असे संकेतही पाटील यांनी दिले.

ते म्हणाले, 'यावर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना खड्ड्यांचे विघ्न येणार नाही. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम डिसेंबर २०९१९ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. मुंबईहून कोकणात येताना मुंबई-गोवा आणि मुंबई-पुणेमार्गेही टोल भरावा लागणार नाही. वाहनचालकाला तशी स्टीकर पुरवण्यात येतील.'

पाटील यांच्यासोबत पालकमंत्री दीपक केसरकर, जेएनपीटीचे विश्वस्त प्रमोद जठार, आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, अतुल काळसेकर, प्रमोद रावराणे आदी उपस्थित होते.

केसरकर यांनी चिपी विमानतळावरुन उड्डाणाची चाचणी सोमवारी, (ता.१०) रोजी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. विमानतळावरुन व्हीआयपींना प्रवास करण्याची परवानगी मिळावी, यासाठी विमान वाहतूक अॅथॉरिटीकडे संपर्क साधत असल्याचेही त्यांनी सांगितले.

संगणकीकृत सातबारावर आता नायब तहसीलदाराची सही चालणार आहे. त्यामुळे सातबारा घेऊन सहीसाठी तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही. महामार्ग प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांना यावेळी पाटील यांनी दिल्या.

.. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खपली गहू, गूळ, सुक्यामेव्याला मागणी

$
0
0

लोगो : बाजारभाव

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गौरी गणपती, हरितालिकाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर किराणा दुकानात खपली गहू, भरडलेले गहू, गूळ, सुक्या मेव्याला मागणी वाढली आहे. गहू, सूर्यफूल दरात दोन रुपयांना वाढ झाली आहे.

गणेशोत्सवात मोदक, खीर हे गोड पदार्थ घरोघरी प्रसादासाठी तयार केले जातात. त्यामुळे बाजारात खपली गहू, भरडलेल्या गव्हाची आवक झाली आहे. गव्हाच्या दरात दोन रुपयांना वाढ झाली आहे. तर खपली गव्हाचा दर प्रतिकिलो ६० रुपये असून भरडलेल्या गव्हाचा दर ७० ते ८० रुपये इतका आहे. गुळाच्या दरात प्रतिकिलो दोन रुपयांनी वाढ झाली आहे. ग्रामीण भागातून एक किलो व दोन किलोचे छोटे रवे विक्रीस आले आहेत. गव्हाच्या खिरीसाठी सुक्यामेव्याचा वापर केला जात असल्याने खारीक, काजू, बेदाणे, मणुका, बदाम या सुक्यामेव्याला मोठी मागणी आहे. मिक्स सुक्यामेव्याची किंमत प्रतिकिलो ६०० ते १००० रुपये इतकी आहे. हरतालिका व गौरी सणासाठी खारका, बदाम, हळकुंडाची मागणी असते. गौरीसाठी वडी,भाकरीचा नैवेद्य केला जात असल्याने ज्वारी, हरभरा डाळ, बेसनला मागणी वाढली आहे. उंदीरबीज सणासाठी घुगऱ्या तयार करण्यासाठी मिक्स धान्य, कडधान्य विक्रीस ठेवण्यात आले असून त्याची किंमत प्रतिकिलो १०० ते १२० रुपये इतकी आहे. कडधान्ये, खादय तेलाचे दर स्थिर असले तरी सूर्यफूल तेलाच्या दरात दोन रुपयांनी वाढ झाली आहे.

किराणा प्रतिकलो दर (रुपयामध्ये)

पोहे ४८ ते ५० रु.

साखर ३६ रु.

शेंगदाणे ८८ ते ९६ रु.

मैदा ३२ रु.

आटा ३० ते ३२ रु.

गूळ ५० ते ५२ रु.

शाबू ६० ते ६४ रु.

डाळीचे दर (किलोमध्ये)

तूरडाळ ६६ ते ७२ रु.

मूगडाळ ८० ते ८४ रु.

उडीद डाळ ६० ते ७५ रु.

हरभरा डाळ ६० ते ६४ रु.

मसूर डाळ ६४ रु.

मसूर ७० ते १३० रु.

चवळी ८० रु.

हिरवा वाटाणा ६० रु.

काळा वाटाणा ६४ रु.

पांढरा वाटाणा ६० रु.

मटकी ८० ते १०० रु.

छोले १०० ते १२० रु.

पावटा १०० रु.

०००

बार्शी शाळू ३८ ते ४० रु.

गहू २८ ते ३६ रु.

ज्वारी नं.१ २४ ते ३० रु.

ज्वारी नं.२ १८ ते २५ रु.

बाजरी २४ रु.

नाचणी ३६ रु.

००००

तेलाचे दर (किलो)

शेंगतेल १२४ रु.

सरकी तेल ९० रु.

खोबरेल २४० रु.

सूर्यफूल ९७ ते १०० रु.

०००

मसाले दर (किलोमध्ये)

तीळ १४० ते १६० रु.

जिरे २४० ते २८०रु.

खसखस ७०० रु.

खोबरे २०० रु.

वेलदोडे १७०० ते १८०० रु.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरी गावात, मुक्काम शहरात

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_Mt

कोल्हापूर : सरकारच्या विविध खात्यांतील अधिकाऱ्यांना मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याचे स्पष्ट आदेश असताना 'नोकरी गावात आणि मुक्काम शहरात' असा प्रकार राजरोस सुरू आहे. आरोग्य अधिकारी, शिक्षक आणि ग्रामसेवक यांच्या मुख्यालयावरून पंचायत राज समितीने (पीआरसी) संबंधित घटकांना मुख्यालयी राहण्याचे स्पष्ट आदेश दिल्यानंतर हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पीआरसीने पाणीपुरवठा, बांधकाम, आरोग्य आणि शिक्षण विभागातील कामकाजावरून चांगल्याच कानपिचक्या दिल्या. शिवाय पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, पाणीपुरवठा व प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या कामकाजाबाबाबत संबंधित अधिकाऱ्यांची मुंबईत साक्ष होणार आहे. दरम्यान, मुख्यालयी राहण्याबाबत पीआरसीने सक्त सूचना केल्यानंतर विभागाच्या कामकाजात बदल घडणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती हे घटक थेट नागरिकांशी निगडित आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण विकासाची वाटचाल होत असल्याने त्याच्या यशस्वितेची भिस्त प्रशासन आणि अधिकाऱ्यांवर आहे. आरोग्य, शिक्षण आणि ग्रामसेवक तर थेट गावपातळीशी संबंधित आहेत. यामुळे आरोग्य अधिकारी, शिक्षक आणि ग्रामसेवक यांना मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव्य करण्याविषयी सरकारी आदेश आहेत. मात्र, संबंधित घटक मुख्यालयी न करता थेट शहर गाठतात. 'गावात नोकरी आणि मुक्काम शहरात' असा हे सूत्र अनेकांनी अंगिकारले आहे. अनेक शिक्षक व संघटनांचे नेते कार्यालयीन वेळेत जिल्हा परिषदेत घुटमळत असतात. शिक्षक संघटनांसह सर्वच कर्मचाऱ्यांच्या संघटनांचे बहुतांश नेते कार्यालयीन कामापेक्षा संघटनेचे राजकारण, संघटनेच्या कामात व्यस्त असतात. काहींनी जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये संघटनेच्या नावावर मक्तेदारी निर्माण केली आहे. अधिकारी बदलले तरी त्यांच्या कामकाजात काही फरक पडला नाही.

००००

मिटिंगच्या नावाखाली कार्यालयाबाहेर

वैद्यकीय अधिकारी आणि ग्रामसेवक नियुक्तीच्या ठिकाणी भेटत नाहीत अशा तक्रारी नागरिकांपासून जिल्हा परिषद सदस्यांपर्यंत आहेत. जिल्ह्यात १०२७ ग्रामपंचायती आहेत. मात्र, बहुतांश तालुक्यांत ग्रामसेवक पदे रिक्त आहेत. जिल्ह्यासाठी १५७ वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर असताना केवळ ११२ पदे कार्यरत आहेत. शिक्षण विभागात अध्यापकांची ६२७८ व पदवीधर अध्यापकांची १८४५ पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात ५६८६ अध्यापक आणि १६६५ पदवीधर अध्यापक पदे भरली आहेत. शिक्षक, ग्रामसेवक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मोठ्या संख्येने रिक्त आहेत. शिवाय अनेकदा अधिकारी, ग्रामसेवक, डॉक्टर्स हे प्रशासकीय बैठकांचे निमित्त पुढे करत कार्यालयाबाहेर असतात. मिटींगच्या नावाखाली दिवसभर कार्यालयाकडे फिरकत नाहीत. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

०००००

अफरातफरीच्या वसुलीचे आव्हान

जिल्हा परिषद व विविध पंचायत समितीत मिळून जवळपास एक कोटी सहा लाख रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पाणीपुरवठा, बांधकाम, शिक्षण, आरोग्य विभागातील या सर्व प्रकाराची चौकशी होऊन जबाबदारी निश्चित केली आहे. काहीजण दोषी आढळून वीस वर्षांचा कालावधी उलटला, पण अपहारप्रकरणी निश्चित केलेली रक्कम वसूल करण्यात प्रशासनाला यश आले नाही. प्रशासकीय दिरंगाई, सदस्यांचा हस्तक्षेप यामुळे अफरातफरीतील दोषींवर शंभर टक्के कारवाई होऊ शकली नाही. पीआरसीच्या दौऱ्यानंतर तर प्रशासन हे सारे प्रकरण गांभीर्याने घेणार का, यावरच बरेचसे अवलंबून आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. पाटील विद्यापीठाचीडॉ. सुभाष देसाईंना डी. लिट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ नवी मुंबईतर्फे डॉक्टरेट ऑफ लिटरेचर (डी. लिट) पदवी प्रदान करण्यात आली. याप्रसंगी डॉ. डी. वाय. पाटील म्हणाले, 'डॉ. देसाई गेली ५० वर्षे ते प्रसारमाध्यमांत काम करतात. पत्रकारिता, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य आहे. या क्षेत्रात ते अत्यंत निष्ठेपूर्वक आत्मीयतेने कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून डी.लिटने सन्मानित करण्यात येत आहे.' विद्यापीठाचे कुलपती विजय डी. पाटील, अजिंक्य डी. पाटील आणि विद्यापीठाचे कुलसचिव संदीप सुहाग यांच्या उपस्थितीत पदवी प्रदान करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाप्पांच्या मार्गात खड्ड्यांचे विघ्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गणेशोत्सवाची सर्वत्र लगबग सुरू असताना बाप्पांचे आगमन ज्या कुंभारगल्लीतून होणार आहे तेथेच खड्डे पडले आहेत. शाहूपुरी कुंभार गल्ली व आयर्विन ख्रिश्चन बाजूकडील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर खड्डे पडल्याने भाविकांना यातूनच मार्ग काढावा लागणार आहे. बापट कॅम्पमध्ये मुख्य रस्ता चांगला असला तरी गल्लीबोळातील रस्त्यांची चाळण झाली आहे.

गेल्या दोन वर्षांत शाहूपुरी कुंभार गल्ली वगळता प्रमुख गल्ल्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते. या गल्लीतील रस्त्याची डागडुजी केली, पण पूर्ण रस्त्याचे डांबरीकरण केले नाही. परिणामी जूनपासून झालेल्या जोरदार पावसामुळे या रस्त्यावर पुन्हा छोटे-छोटे खड्डे पडले. गंगावेश, बापट कँपबरोबर शाहूपुरी कुंभार गल्लीत मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती तयार होतात. विशेषत: सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती येथे तयार केल्या जातात. त्यामुळे गणेश चतुर्थीपूर्वी बुकिंगसाठी एक महिना भाविकांची व कार्यकर्त्यांची येथे वर्दळ असते. याच मार्गावरुन व्यापार पेठेत जावे लागत असल्याने या नेहमीच गर्दी असते. सतत वर्दळ असूनही रस्त्यावर पडलेले खड्डे भरुन घेण्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. याचा फटका भाविक आणि कार्यकर्त्यांना बसत आहे.

शाहूपुरी कुंभार गल्ली व आयर्विन ख्रिश्चन जवळच्या रस्त्यावर बरेच छोटे खड्डे पडले आहेत. काही दिवसांपूर्वी इतर ठिकाणी महापालिका प्रशासनाने मुरुम टाकून खड्डे बुजवले. पण खड्डे मुजवण्यासाठी टाकलेला मुरूम वाहून गेला. यामुळे बुजवलेले खड्डे पुन्हा जैसे थे दिसू लागले. शाहूपुरीतील रस्त्याकडे महापालिका प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे अनेक ठिकाणी बारीक खडी रस्त्यावर आली असून खडीवरून वाहन घसरून वाहनधारक पडत आहेत. बापट कॅम्प भागातदेखील हीच अवस्था आहे. येथे मुख्य रस्ते चांगले आहेत, पण गल्लीबोळातील रस्ते खड्डेमय झाले आहेत.

गणेश चतुर्थी अवघ्या चार दिवसांवर आल्याने कुंभार गल्ली, बापट कॅम्प येथे भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. परिणामी येथे येणाऱ्या भाविकांना या खड्ड्यांतूनच मार्ग काढावा लागत आहे. कुंभार गल्लीत गणेश मूर्तीबरोबर इतर अनेक व्यवसाय आहेत. त्यामुळे रस्ता छोटा आणि गर्दी मोठी असे चित्र येथे नेहमीच पहायवास मिळते. व्यवसायिकांचे साहित्य येथे रस्त्याच्या दुतर्फा ठेवलेले असते. त्यातच दुचाकी व चारचाकी व वाहन पार्किंग केले जाते. त्यामुळे मुळात अरूंद असलेला रस्ता आणखी अरूंद होतो. पार्किंग केलेली वाहने आणि रस्त्यावरील खड्डे चुकवताना वाहनधारकांना कसरतच करावी लागत आहे. उर्वरित चार दिवसांत रस्त्यावरील खड्डे बुजवणे अशक्य असल्याने मूर्ती घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना प्रथम खड्ड्यांचे विघ्न पार करावे लागणार आहे.

गणेशमूर्तीसाठी या आठवड्यात कुंभार गल्लीत मोठी गर्दी होणार याची माहिती महापालिका प्रशासनाला असूनही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याची सवयच पालिकेला झाली आहे. याचा त्रास मात्र शहरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूर्ती, निर्माल्यदान जनजागृती रॅली उद्या

$
0
0

महापालिका व पंचगंगा घाट संवर्धन समितीचा संयुक्त उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पर्यावरणाचे संवर्धन आणि जतन करण्याबरोबरच नदी, तलावांतील प्रदूषण रोखण्यासाठी दरवर्षी गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन कुंडांमध्ये विसर्जन करण्यात येते. यावर्षीही हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. उपक्रामाची जनजागृती करण्यासाठी सोमवारी (ता. १०) सकाळी नऊ वाजता भवानी मंडप येथून पर्यावरणपूरक जनजागृती रॅलीचे आयोजन केले आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष सुमित वैद्य यांनी पत्रकार बैठकीत दिली.

वैद्य म्हणाले, 'प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींमुळे होणारे पाणी प्रदूषण टाळण्यासाठी मूर्ती व निर्माल्यदान उपक्रम सुरू झाला. भाविकांनी मूर्ती व निर्माल्यदान करून उपक्रमाला प्रतिसाद दिला आहे. उपक्रम सुरू ठेवण्यासाठी घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिका व समितीच्यावतीने अनेक ठिकाणी पर्यावरणपूरक विसर्जन कुंडाची व्यवस्था केली आहे. या विसर्जन कुंडामध्ये चार धाम येथील नद्यांचे पाणी मिसळण्यात येणार आहे. असे कुंड पंचगंगा नदी घाट, रंकाळा, कोटीतीर्थ तलाव आदी ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत.'

'विसर्जनाच्या ठिकाणी ठेवलेल्या विसर्जन कुंडात शंभर टक्के मूर्ती विसर्जित करण्यासाठी जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीमध्ये चार धाममधील नद्यांच्या पाण्याच्या कलशांचा समावेश असेल. कलशातील पाणी पर्यावरणपूरक विसर्जन कुंडात विविध प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सोडण्यात येणार आहे. प्रबोधन फेरीला भवनी मंडप येथून सुरुवात होणार आहे. रॅलीचे उद्घाटन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते व महापौर शोभा बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. रॅली भवानी मंडप, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, गंगावेश मार्गे पंचगंगा घाटावर दाखल होईल. उपक्रमामध्ये सार्वजनिक संस्था, मंडळे, संघटना, उद्योजक व बांधकाम व्यवसायिक सहभागी होणार आहेत. रॅलीची सांगता जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार व जिल्हा परिषदेचे सीईओ अमन मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.' पत्रकार बैठकीस प्रमोद पुंगावकर, संजय आम्रुस्कर, अमित सूर्यवंशी यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्या कोल्हापूर बंद

$
0
0

काँग्रेसच्या आंदोलनाला डाव्या पक्षांचाही पाठिंबा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात राष्ट्रीय काँग्रेसने सोमवारी (ता. १०) 'भारत बंद'ची हाक दिली आहे. त्यामुळे कोल्हापूरवासियांनी सोमवारी व्यवहार बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, या आंदोलनात सर्व पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला डावी लोकशाही आघाडीने पाठिंबा दर्शविला आहे. नागरिकांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. 'देशात आणि राज्यामध्ये पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. देशामध्ये सर्वाधिक इंधन दर राज्यामध्ये असल्याने नागरिक त्रस्त बनले आहेत. सामान्य नागरिक महागाईने होरपळत आहेत. १६ मार्च, २०१४ रोजी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रतिबॅरल १०७.०९ डॉलर होती. आज कच्च्या तेलाची किंमत प्रतिबॅरल ७३ डॉलर आहे. काँग्रेस आघाडीच्या कालावधीतील राजवटीपेक्षा सध्या कच्च्या तेलाचा दर ४० टक्के कमी आहे. तरीसुद्धा मोदी सरकारच्या काळात पेट्रोल, डिझेलच्या किंमतीने उच्चांक गाठला आहे. काँग्रेस पक्षाने जुलै २०१७ नंतर पेट्रोल, डिझेल हे जीएसटी अंतर्गत आणून त्याचा फायदा नागरिकांना होण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. महागाईच्या विरोधातील नागरिकांचा आवाज सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी काँग्रेसतर्फे सोमवारी भारत बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. आपआपले व्यवहार बंद करून पाठिंबा द्यावा. सोमवारी पुकारलेल्या बंदला सर्व मित्रपक्षांनी समर्थन दिल्याचे पत्रकात म्हटले आहे.

बंदमध्ये डावी लोकशाही आघाडी

महागाईच्या विरोधात सोमवारच्या बंदला डाव्या लोकशाही आघाडीने पाठिंबा दिला आहे. आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी सोमवारी सकाळी नऊ वाजता बिंदू चौकात जमावे, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले आहे. भाकपचे जिल्हा सचिव सतीश कांबळे, प्रा. सुभाष जाधव, आप्पा कुलकर्णी, कॉम्रेड चंद्रकांत यादव, अशोक जाधव, शेकापचे कुमार जाधव, संभाजी जगदाळे, बाबुराव कदम, अनिल चव्हाण, मधुकर हरेल, रवी जाधव, संग्राम माने यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन् नागनाथअण्णांनी सातारा जेल फोडला!

$
0
0

क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी सातारचा तुरुंग फोडण्याच्या घटनेला १० सप्टेंबर (सोमवार) रोजी ७५ वर्षे होत आहेत. या शौर्याच्या आणि स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती जागवण्यासाठी सातारा येथे 'शौर्य दिन' साजरा होत आहे. जयवंत अहिर यांनी त्यांच्या पुस्तकात या घटनेवर प्रकाश टाकला आहे. त्यातील संपादित भाग...

.. .. .. ..

दोनच दिवसांत साताऱ्याहून डीएसपीची ऑर्डर आली. नागनाथ नायकवडी यांना इस्लामपूर जेलमधून सुरक्षित अशा सातारा जेलमध्ये हलवा. पोलिसांना अण्णा व त्यांच्या क्रांतिकारक भूमिगतांची भीती वाटत होती. म्हणून त्यांना सातारला हलवताना विशेष दक्षता घेऊन त्यांना कधी हालवावयाचे याची गुप्तता ठेवली. अधिकाऱ्यांची आपसात खलबते चालू होती. एक दिवस अचानक कडेकोट बंदोबस्तात हत्यारबंद पोलिसांच्या बंदोबस्तात नागनाथअण्णांना पोलिस गाडीत बसवले. त्यांच्या बाजूला दोन-दोन हत्यारबंद पोलिस पुढे दोन-दोन हत्यारबंद पोलिस, पुढच्या एका गाडीत पोलिसांची पलटण, मध्ये आण्णांची गाडी, पाठीमागे एसआरपीची (राखीव पोलिसांची) गाडी अशा सुरक्षतेखाली साताऱ्याकडे गाड्या निघाल्या. रस्त्यात पोलिसांची सारखी घालमेल होत होती. पोलिस सारखे बावरल्यासारखे भीतीच्या दडपणाखाली होते. अचानक एखादेवेळी क्रांतिकारक हल्ला करतील की काय? सातारा जेलच्या दारात सर्व गाड्या सुरक्षित पोहचल्या. अण्णांची गाडी जेलच्या आत गेली आणि पोलिसांनी एकदाचा श्वास घेतला. डीवायएसपी भोसले यांनी जेलरला खास सूचना दिल्या. 'यांनी इस्लामपूर सबजेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता; म्हणून यांच्यावर नजर ठेवण्यासाठी एका खास पोलिसाची नेमणूक करा,' असे सांगून पोलिस इस्लामपूर परतीच्या मार्गी लागले.

सातारा जिल्ह्यातील तो जेल अभेद्य. अशा जेलमधून पळून जाणे सोपे नव्हते. डीवायएसपी भोसलेंच्या सांगण्याचे गांभीर्य वाटले नाही. जेलरने त्या गोष्टीला विशेष महत्त्व न देता पूर्वी जेलमध्ये असलेल्या बर्डे गुरुजींवर लक्ष ठेवणाऱ्या अडिसरे नावाच्या पोलिसाला अण्णांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले आणि बर्डे गुरुजींना ज्या बऱ्याकमध्ये ठेवले होते, त्याच बराकीत नागनाथअण्णांना ठेवले. त्यांना वाळव्यात पकडल्यापासून साताऱ्याला आणले तो ४० वा दिवस होता, तो वार होता गुरुवार. सातारच्या तुरुंगाला चारी बाजूला उंच-उंच काळ्या दगडांच्या भक्कम भिंती, तुरुंगाला एक मोठे प्रवेशव्दार, ते मोठ्या लाकडी दरवाजाने सतत बंद ठेवले जात असे. गरजेप्रमाणे त्याची उघडझाप केली जायची. इतर वेळी लहान दिंडी दरवाजाने ये-जा होत असे. सतत जेलच्या आत बाहेर चोवीस तास हत्यारबंद पोलिसांचा कडक पहारा असे. आतल्या आत कैद्यांना ठेवण्यासाठी बंद बऱ्याक बांधलेल्या आहेत. तसेच बरेच मोठे मोकळे मैदान कैद्यांना फिरण्यासाठी आहे. कैद्यांच्या आंघोळीसाठी मोठा पाण्याचा हौद, जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघर, धान्य भांडार, ग्रंथालय वगैरे आवश्यक तेवढ्या सोई केल्या आहेत. रात्री कैद्यांची हजेरी घेऊन सर्वांना बराकीमध्ये डांबले जायचे आणि बराकीच्या दरवाजाला कुलूप घातले जायचे. रात्रभर कडक पहारा असायचा. सकाळी सर्वांना प्रातर्विधी व आंघोळीसाठी मोकळे सोडले जायचे, अशी पद्धत होती. या पद्धतीची नागनाथअण्णांना काडीमात्र कल्पना नव्हती. त्यांना आजच इस्लामपूरच्या सबजेलमधून आणले होते आणि सातारच्या सेंट्रल जेलमध्ये बर्डे गुरुजींच्या बराकीमध्ये बंदिस्त ठेवले होते.

सकाळी नेहमीप्रमाणे एक हवलदार आला. त्याने प्रत्येक बराकीची ओळीने कुलपे काढली. सर्व कैदी बाहेर आले. त्याप्रमाणे नागनाथअण्णांही बाहेर आले आणि जेलमधल्या मैदानात येऊन थांबले. तिथं त्यांना कामेरीचे एस. बी. पाटील भेटले. अण्णा त्यांना म्हणाले, 'अहो एस. बी. इस्लामपूरच्या जेलपेक्षा या जेलमधून पळून जायला सोपं आहे. तुम्ही येणार का माझ्याबरोबर?' एस. बी. पाटील म्हणाले, 'माझी शिक्षा संपत आली आहे. थोडे दिवस राहिलेत. आता पळून जाण्यात काय अर्थ आहे?' हीच गोष्ट बर्डे गुरुजींना विचारली. त्यांनीही एस. बी. पाटलांसारखेच उत्तर दिले. शेवटी अण्णा म्हणाले, 'मी जेल फोडून जातो. निदान मला तरी मदत करा.' त्यावर एस. बी. पाटील म्हणाले, 'मी हा जेल फोडून पळून जाण्यासाठी नियोजन केलं आहे. तुम्ही जेल फोडणार, तर माझ्या नियोजनाचा उपयोग केलात, तर नक्की यशस्वी व्हाल.' एस. बी. पाटलांना अण्णा म्हणाले, 'मला पकडून इंग्रजांनी माझा अपमान केलाय. मला त्यांचा पराभव करून त्यांना धडा शिकवायचा आहे. काही झाले तरी मी तुरुंग फोडणारच.'

ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रायल घेतली. बर्डे गुरुजी हौदाकडे निघाल्यावर नेहमीच्या सवयीप्रमाणे पोलिस बर्डे गुरुजींच्या मागे गेला. आता कसलीही अडचण राहिली नाही. पलायनाचा बेत अण्णांनी निश्चित केला. त्यांनी एस. बीं. ना तसे सांगितले व पुढील बेतही सांगितला. सकाळी बऱ्याकमधून बाहेर सोडल्याबरोबर बर्डे गुरुजींनी हातपाय धुण्यासाठी पाण्याच्या हौदाकडे जायचे. तेथे त्यांनी नेहमीपेक्षा जास्त वेळ काढायचा. तुरुंगाच्या आतील एका पोलिसाची कटकट मिटली. दुसरा पोलिस कुलपे काढायच्या नादात आपोआपच राहतोय आणि तिसरा पोलिस धान्य कोठीतील शिदा घ्यायला जातो. त्याला तिकडेच एकाने गुंगवायचे. सर्व नियोजन व्यवस्थित ठरवले. नंतर दुपारी अण्णांना जेलमधून बाहेर काढले व सर्व पोलिस चौक्यावरुन (अगदी मेढ्यापर्यंतच्या) अधिकाऱ्यांना हेच नागनाथ नायकवडी म्हणून ओळख करण्यासाठी फिरवले आणि चार वाजता परत सातारा जेलमध्ये आणून बर्डे गुरुजींच्या बऱ्याकमध्ये बंद केले. रात्री बर्डे गुरुजींनाही जेल फोडण्याचे नियोजन समजून सांगितले. गुरुजींनीही त्या नियोजनाला संमती दिली. अण्णा जेलमध्ये आलेला तिसरा दिवस होता. चौथ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे प्रातर्विधी व अंघोळीसाठी सर्व कैद्यांना सोडण्यासाठी पोलिसाने बराकीच्या किल्ल्या घेऊन कुलपे काढण्यास सुरुवात केली. प्रथम बर्डे गुरुजींच्या बऱ्याकीचे कुलूप काढले. नागनाथअण्णा व बर्डे गुरुजी बाहेर आले. ठरल्याप्रमाणे बर्डे गुरुजी पाण्याच्या हौदाकडे गेले. अडिसरे पोलिस बर्डे गुरुजींबरोबर गेला. एस. बी. पाटील, साळी व शामू रामा बाहेर आल्याबरोबर चौघेही पलायनच्या भिंतीजवळ गेले. वशीचा साळी व नेर्लेचे बाबू रामाचे भाऊ शामूराम भिंतीकडे तोंड करुन बसले, लगेच एस. बी. दोघांच्या खांद्यावर बसले. नागनाथअण्णा एस. बीं.च्या खांद्यावर बसले. नियोजनाप्रमाणे पहिली जोडी उभी राहिली. नंतर एस. बी. पाटील उभा राहिले आणि शेवटी अण्णा उभा राहिले. अण्णा एस. बीं.च्या खांद्यावर उभे राहिल्यावर छातीच्या खाली पर्यंतचा भाग भिंतीच्या वर आला. भिंतीवर चढायचे म्हटले तर भिंतीवर हाताचा जोर देऊन चढणे भाग होते. विचार करायला वेळ नव्हता. नागनाथअण्णा भिंतीवर चढले. तुरुंगाच्या बाहेर पाहिल्यावर ये जा करणारे लोक दिसले. रविवार १० सप्टेंबर १९४४ चा नुकताच सूर्योदय व्हायला लागला होता. त्या उगवत्या सूर्याला साक्ष ठेवून कसलाच विचार न करता १८ फूट उंचीच्या तटावरुन डोळ्याचे पाते लवते न लवते तोपर्यंत त्यांनी खाली उडी मारली. तळहाताला थोडीसी इजा झाली. बाकी कुठेही खुट्ट झाले नाही.

तळहातातून रक्त येत होते. विचार करायला नागनाथअण्णांना वेळ कुठे होता? तुरुंगाच्या बऱ्याकीतून बाहेर पडल्यावर सूर्योदयाच्या बरोबर आठव्या मिनिटाला भिंतीवरून उडी मारली व तुरुंगातून बाहेर पडले. रक्ताने माखलेले तळहात मातीत चोळले आणि शेळीसाठी गवत उपटतोय असा देखावा करत, गवत उपटत-उपटत मुलांनी वाट पाडलेल्या तारेच्या कंपाउंडमधून ते बाहेर पडले. कुठेच नागनाथचा पत्ता लागत नाही म्हटल्यावर कैदी पळाल्याचे घोषित केले. बिगुल वाजायला लागला. सातारा शहरात अण्णांची शोधाशोध सुरु झाली. त्याला आता खूप वेळ झाला होता. सातारा जेलच्या तटावरुन उडी मारून नागनाथ आण्णा सातारा शहराच्या दिशेने चालले होते. एका घराला वकिलाच्या नावाची पाटी दिसली. त्या काळात वकील मंडळी व शाळा मास्तर जवळ-जवळ सर्वच राष्ट्रप्रेमी होती. वकिलांची आपल्याला मदत होईल म्हणून त्याच्या घरात जाताना हातातली गवताची मूठ त्याच्या छोट्याशा बागेच्या कोपऱ्यात टाकली आणि 'वकीलसाहेब आहेत का?' म्हणून विचारले. घरातून बाईमाणसाचा आवाज आला. (बहुतेक त्याची बायको असावी) 'आहेत अंघोळ करतायत. तुम्ही बसून घ्या.' घरात येऊन ते खुर्चीवर बसले. समोरच्या भिंतीवर त्यांना पंचम जॉर्जचा फोटो लटकवलेला दिसला. वाघाच्या घरात आपण पाहुणा म्हणून आलोय हे त्यांनी ताबडतोब ओळखले आणि दूध घालायला आलेल्या शेतकरी बाईला पाटी उचलू लागल्याच्या निमित्ताने ते उठले. त्या बाईच्या डोक्यावर पाटी ठेवली ते तडक घराच्या बाहेर पडले. थोडे चालल्यावर रस्त्यालगत कन्याशाळेजवळ जाजू मारवाड्याचे दुकान लागते. जाजू मारवाडी राष्ट्रप्रेमी होता. शिवाय अण्णांची व त्याची ओळखही होती. त्यांना घडला प्रकार थोडक्यात सांगितला. जाजू म्हणाले, 'दिवसभर दुकानात गिऱ्हाईकांची वर्दळ असते. उगीच धोका पत्करायला नको.' नागनाथअण्णा म्हणाले, 'ठीक आहे. मला सोमवार पेठेतील कर्मवीर अण्णांचे घर दाखवायला माणूस द्या.' त्या प्रमाणे त्यांनी आपल्या भाच्यास त्यांच्या बरोबर दिले. थोडे अंतर चालून गेल्यावर सोमवार पेठेतील कर्मवीर अण्णांच्या घरचा रस्ता लक्षात येताच जाजूच्या भाच्यास परत जायला सांगून ते सोमवार पेठेतील कर्मवीर भाऊराव अण्णांच्या घरात शिरले. क्रांतिवीर नागनाथ नायकवडींनी अभेध्य असा सातारचा जेल फोडून यशस्वी पलायन केल्याची बातमी सातारा शहरापासून जिल्ह्यापर्यंत पोहचली. सर्व जनतेला, भूमिगतांना आनंद झाला. याने ब्रिटिशांची चांगलीच जिरवली. 'वारे बहाद्दरा!' म्हणून अनेक जणांनी आपला आनंद व्यक्त केला. रहिमतपूरचे एक पैलवान रहिमतपुरापासून साताऱ्यापर्यंत अण्णांच्या नावाच्या घोषणा देत साताऱ्यापर्यंत पळत येऊन त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. १० सप्टेंबर १९४४ ला नागनाथ अण्णांनी जेलमधून पलायन केले.

.. .. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुदान प्रस्तावास मान्यता

$
0
0

कोल्हापूर - जिल्ह्यात दोन महिन्यांत सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी दोन शेतकऱ्यांच्या वारसांना एक लाखांच्या अनुदानाच्या प्रस्तावास शुक्रवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी समिती सदस्य शिवाजी परूळेकर यांच्यासह कृषी अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मंदिरास आढळला शिलालेख

$
0
0

तज्ज्ञ करणार अभ्यास

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील मातृलिंग मंदिर परिसराची स्वच्छता करताना शिलालेख सापडला असून त्याचा अभ्यास तज्ज्ञांकडून करण्यात येणार आहे. दोन ते तीन दिवसांत शिलालेखाचा अहवाल मिळण्याची शक्यता आहे. मातृलिंग मंदिर परिसरातील बंद खोल्या, दगडी खांबांबाबत नवीन माहिती पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अंबाबाई मंदिरात भाविकांची संख्या वाढली असून मंदिरातील आर्द्रता कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी अनेक उपाय सुचविले आहेत. मंदिराचे मूळ रुप कायम ठेवण्यासाठी दगडी खांब व भिंतीवरील रंग काढण्याची सूचना केली आहे. त्यानुसार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, पदाधिकारी व संचालक मंडळाने मातृलिंग मंदिराची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला.

अंबाबाई मंदिर हे पाषाणातील दुमजली मंदिर आहे. पहिल्या मजल्यावर दगडी खांबावर मातृलिंग मंदिर उभारले असून त्यावर शिखरे आहेत. येथे शिवलिंग आणि चौथऱ्यावर गणेशाची मूर्ती आहे. मंदिराच्या सुरक्षितेच्यादृष्टीने दगडी खांबाला लागून जांभा खडकाचा वापर करून भिंत बांधली होती. त्यामुळे मंदिर बंदिस्त झाले होते. तसेच मंदिराच्या भिंती, गाभारा, प्रदक्षिणा मार्गावरील भिंतींवर चुन्याचा रंग दिला होता. केंद्रीय व राज्य पुरातत्व विभागातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार अर्किटेक्ट अमरजा निंबाळकर यांच्या सूचनेनुसार सोमवारपासून (ता. २७) स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. व्ह्यू कोटिंग प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर ऋषिकेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ कामगार भिंती स्वच्छ करण्याचे काम करत आहेत. काही ठिकाणी ब्रशने चुना, रंग खरवडून काढला जात आहे, तर काही ठिकाणी पाण्याने धुऊन काढला जात आहे. स्वच्छता करत असताना उत्तरेच्या बाजूला असलेल्या भिंतीवर शिलालेख आढळला आहे. साळुंखे यांनी ही बाब देवस्थान समितीच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली. आठ फूट उंचीच्या दगडी खांबावर चार फूट शिलालेख असून त्यावर त्रिकोणी, गोल, नागमोडी, उभ्या व आडव्या रेषा अशा आकृत्या आहेत. या शिलालेखाचा अभ्यास तज्ज्ञ करणार आहेत. सध्या चुना काढण्याचे काम सुरु असून यासाठी एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. स्वच्छतेनंतर मंदिरातील आर्द्रता किती कमी झाली याची तपासणी केली जाणार आहे.

विटांचे बांधकाम आणि जोडकाम

स्वच्छता मोहिमेची प्रक्रिया अखंडपणे चालणार आहे. मातृलिंग मंदिरात तीन खोल्या असून त्याचे कोनाडे वीट बांधकाम करून बुजवले आहेत. राज्य पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानंतर या बांधकामाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तसेच कासव चौकाच्यावरील मजल्यावर ४० हून अधिक दगडी खांबावर शिखर उभारण्यात आले आहे. दगडी खांब जांभा दगडाचा वापर करुन भिंतीने जोडले असल्याने मंदिरात हवा येण्याचा मार्ग बंद झाला आहे. सध्या केवळ मातृलिंग मंदिरातील चुना काढून स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांचा राडा, एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले

$
0
0

सांगली

शिक्षक म्हटले म्हणजे विद्यार्थ्यांपुढे आदर्श निर्माण करून समाज घडवण्याचे काम करणारा दूत अशी प्रतिमा आपल्या डोळ्यापुढे येते. मात्र सांगलीतील काही शिक्षकांनी ही प्रतिमा डागाळेल असे वर्तन केले आहे. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक सभेत वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. हे शिक्षक लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यावरच न थांबता त्यांनी एकमेकांच्या अंगावर खुर्च्याही फेकल्या.

ही घटना सांगली दीनानाथ नाट्यगृहात आज सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या ६६व्या वार्षिक सभेत घडली. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सभेला सुरुवात झाल्यानंतर बँकेचे कामकाज हाती असणाऱ्या सत्ताधारी गटाने वार्षिक अहवाल मांडण्यास सुरुवात केली. दरम्यान, विरोधी गटाने त्यांच्या कामकाजावर आक्षेप घेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप लावला. त्यामुळे दोन्ही गटात तणाव निर्माण झाला. विरोधी गटाने मंचकाकडे धाव घेतली आणि राडा सुरू झाला.

मुद्यांची चर्चा गुद्यावर आली आणि दोन्ही शिकक्षांच्या गटाने एकमेकांची कॉलर धरत हाणामारी सुरू केली. एकमेकांवर खुर्च्या भिरकावत खाली पाडून फ्री-स्टाईल हाणामारी सुरू केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इंधन भडक्याने महागाईची झळ

$
0
0

सर्वसामान्यांचे नियोजन कोलमडले; सणासुदीच्या तोंडावर खिशाला फटका

कोल्हापूर टाइम्स टीम

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच आहेत. याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला असून, महागाई वाढत आहे. भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. सणासुदीच्या महागाईची झळ बसल्याने बजेट कोलमडले आहे. एकदा वाढलेले दर पुन्हा कमी होण्याची शक्यता कमीच असते, त्यामुळे महागाईची झळ सोसत असलेल्या नागरिकांकडून इंधन दरवाढीबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत.

रोजच्या दळणवळणासाठी पेट्रोल आणि डिझेलचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. संपूर्ण वाहतूक व्यवस्था यावरच अवलंबून आहे. इंधनाचे दर वाढताच भाजीपाला, फळे, अन्नधान्य यासह इतर वस्तूंचेही दर वाढतात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही यातून सुटत नाही. इंधन दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्यावर होतो. यामुळे इंधनाची दरवाढ होऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जाते. प्रत्यक्षात मात्र सरकारने इंधन दरवाढीतून नागरिकांची लूट सुरू ठेवल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मे २०१७ मध्ये पेट्रोलचा दर ८६ रुपयांच्या उच्चांकावर होता. या आठवड्यात पेट्रोलच्या दराने पुन्हा नवा उच्चांक गाठला. शुक्रवारी हा दर ८७ रुपये ४९ पैसे होता, तर डिझेलचा दर ७५ रुपये ४८ पैसे होता. ही वाढ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत, त्यामुळे आगामी काही दिवस महागाईचा भडका उसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पुढील आठवड्यात गणेशोत्सव सुरू होत आहे. यानंतर नवरात्रोत्सव, दसरा, दिवळी या सर्वच सणांमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होते. इंधन दरवाढीमुळे सणांवर महागाईचे सावट आहे. गणपतीची आरास, मिठाई, नारळ, खजूर यांचे दर वाढण्याची शक्यता आहे. किरकोळ बाजारात सध्या वांग्याचे दर तीस ते चाळीस रुपये किलो आहेत. दोडका, कारली, ढबू याचेही दर चाळीस रुपयांवर पोहोचली आहे. घेवडा, गवार, बिनिस, भेंडीचे दर ५० ते ६० रुपये प्रतिकिलो आहेत. भाज्यांचे दरही वाढत आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात दरांमध्ये प्रतिकिलो पाच ते दहा रुपयांची वाढ झाली फळांचे दरही काही प्रमाणात वाढले आहेत. सफरचंदाचे दर ८० ते १२० रुपये आहेत. केळी ३० ते ६० रुपये प्रतिडझन, पेरू ८० ते १००, डाळींब ५० ते ८० रुपये प्रति किलो विक्री सुरू आहे. गेल्या आठवड्यात हे दर पाच ते दहा रुपयांनी कमी होते. अन्नधान्यांची दरवाढ रोखता येणे अवघड आहे. गहू, तांदूळ, ज्वारी, कडधान्ये, डाळी यांची आवक बाहेरून होते. वाहतुकीवरील खर्च वाढल्याने याच्या विक्रीवरही परिणाम होणार आहे.

सोशल मीडियातून सरकारची खिल्ली

शंभरीच्या जवळ जाणाऱ्या पेट्रोल दरावरून सोशल मीडियात सरकारच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 'कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा?', 'हेच का अच्छे दिन?',' पेट्रोलची शंभरी उंबरठ्यावर', असे टोले मारले जात आहेत. अन्नधान्यांची एकदा दरवाढ झाली की, इंधनाचे दर पाच-दहा रुपयांनी कमी झाले तरी वाढलेली महागाई कमी होत नाही, त्यामुळे पुढील धोका लक्षात घेऊन महागाई भडकू नये, याची दक्षता सरकार घेणार आहे की नाही? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

संकट आणखी वाढणार

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलची किंमत वाढल्याने इंधनाच्या आयातीवरील खर्च वाढत आहे. यातच डॉलरच्या तुलनेत रुपयाची रोजच घसरण सुरू आहे. अमेरिकन डॉलरला ७२ रुपये मोजावे लागत आहेत. कच्च्या तेलाची वाढलेली किंमत आणि घसरलेला रुपया या दुहेरी संकटामुळे इंधनाच्या किमती वाढत असल्याचे सरकारकडून सांगितले जाते. याशिवाय अमेरिका आणि चीनच्या बाजारयुद्धाचाही परिणाम इंधन दरांवर होत आहे. केंद्र सरकारने याची पूर्वतयारीच केली नसल्याने दरवाढीचा धोका आणखी वाढणार असल्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.

मोटारसायकलवरून शहरात दही विकण्याच्या कामाला मला रोज १०० रुपयांचे पेट्रोल लागत होते. गेल्या महिन्यापासून रोज दीडशे रुपयांचे पेट्रोल टाकावे लागते. दह्याचा दर वाढवला तर ग्राहक कमी होतील याची भीती आहे, त्यामुळे आर्थिक नियोजनच कोलमडले. सरकारने तातडीने पेट्रोलचे दर कमी करावेत.

नरेश अगरवाल, दुग्धपदार्थ विक्रेते

दरवाढीचा परिणाम आमच्या आठवड्याच्या बाजारावर होत आहे. गेल्या चार दिवसांपासून भाज्यांचे दर वाढत आहेत. सणासुदीच्या काळात हीच स्थिती राहिली तर आनंदाने सण कसा साजरा करणार? येणाऱ्या दीड-दोन महिन्यात वाढत्या खर्चाचा ताळमेळ घालणे अवघड होईल असे वाटते.

विद्या तिबिले, गृहिणी

आमच्या कारखान्यातून रोज कच्च्या आणि पक्क्या मालाची आवक-जावक केली जाते. यासाठी टेम्पोचा वापर करावा लागतो. डिझेलचे दर वाढल्याने वाहतुकीवरील खर्चात वाढ झाली. नियोजित रकमेपेक्षा डिझेलवर दिवसभरात एक हजार रुपये जास्तीचे खर्च करावे लागतात. या वाढीव खर्चामुळे नुकसान सहन करावे लागते.

रोहित पवार, लघू उद्योजक

दुचाकीचा वापर ही रोजची गरज आहे, त्यामुळे तिचा वापर टाळता येत नाही. पेट्रोलच्या दरवाढीमुळे जादा पैसे खर्च करावे लागतात. महिन्याला येणारी रक्कम मात्र तेवढीच असते. याचे नियोजन करताना कसरत करावी लागते. इंधनाचे दर वाढल्यानंतर महागाईदेखील वाढते, त्यामुळे सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा.

प्रसाद मोहिते, नोकरदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच मिनिटात गुंडाळली सभा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगलीत जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत शिक्षक एकमेकांना भिडले. विरोधकांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या संचालकालाच सभागृहातून धावत आलेल्या एका शिक्षकाने चोप दिला. त्यानंतर संचालक, सत्ताधाऱ्यांनी त्या शिक्षकाला मारहाण केली. धडपडणारा शिक्षक सभासदांमध्ये धावत असतानाच त्याला खाली पाडून फ्रिस्टाइल हाणामारी झाली. अशा गोंधळातच अवघ्या पाच मिनिटांत विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर झाल्याचा दावा करत सभा गुंडाळली आणि शिक्षक बँकेची सभा म्हणजे गोंधळ, मारामारी हे समीकरण कायम राहिले.

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची ६६ वी सर्वसाधारण सभा रविवारी दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होती. सत्ताधाऱ्यांनी व्यासपीठाला मजबूत कडे करून ठिय्या मारला होता. त्यावेळी सत्ताधाऱ्यांचे कडे भेदून व्यासपीठावर धावलेल्या शिक्षकाने संचालक शशिकांत बजबळे यांना मारहाण केली. त्यानंतर अनेक गुरुंजीच्या अंगात भलतेच संचारले. संचालकाला मारहाण करून धावणाऱ्या शिक्षकाला खाली पाडून मारहाण करण्यात आली. प्रचंड गोंधळात १३ विषय मंजुरीच्या घोषणा देत अध्यक्ष रमेश पाटील यांनी सभा संपल्याचे जाहीर केले. त्यांनी सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झाल्याचे सांगितले. मारामारी आणि गोंधळाचा ठपका विरोधकांवर ठेवून त्यांच्यावर फौजदारी करणार असल्याचे सांगून पाटील यांनी काढता पाय घेतला. दरम्यान, विरोधकांनी सभा झाली नसल्याचा दावा करीत सत्ताधारी गटाच्या निषेधाच्या घोषणा देत नाट्यगृहाच्या दारात प्रतीसभा घेतली.

सभेत विरोधकांना प्रश्न विचारण्याची संधी द्यायची नाही अशी व्यूहरचना करून सत्तारुढ गटाने व्यासपीठाभोवती कडे केले होते. पुढील तीन ते चार रांगामध्ये सत्ताधारी सभासद होते. नंतर विरोधी गटाचे नेते, संचालक सभागृहात आले. सभागृहातील मोकळ्या जागांवर जादा खुर्च्या ठेवून रस्ता अडविण्यात आला होता. सत्ताधारी गटाचे नेते किसन पाटील यांच्यासह प्रमुख मंडळी तेथे होते. सभासदांनी रस्ता मोकळा ठेवावा, अशी मागणी केली. परंतु बँकेचे अध्यक्ष रमेश पाटील, सत्ताधारी गटाचे संचालक, नेते किरण गायकवाड, बाबासाहेब लाड, शहाजी पाटील आदींनी त्यास नकार दिला. यावरूनच वादाला सुरवात झाली. विरोधकांनी घोषणाबाजी करून सभागृह दणाणून सोडले. यावेळी काही विषयांना हरकत घेत विरोधी गटाचे नेते विनायक शिंदे यांच्यासह काही संचालकांनी अध्यक्षांशी चर्चेचा प्रयत्न केला. संचालक शशिकांत बजबळे आणि विनायक शिंदे यांच्यात व्यासपीठावरच वाद सुरू झाला. संचालक हरिबा गावडे यांनी शांततेचे आवाहन करत स्वागत केले.

अध्यक्ष पाटील यांनी सभा सुरू केली. मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब कोले यांनी अहवालवाचन केले. विरोधी गटाचे नेते शिंदे यांनी व्यासपिठासमोर येत विषयपत्रिकेवरील जागा खरेदीचा ९ क्रमांकाचा विषय रद्द करण्याची मागणी केली. यावेळी सत्ताधारी संचालकांनी शिंदेंच्या दिशेने धाव घेतली. हा गोंधळ सुरू असतानाच सभागृहात बसलेला एक सभासद व्यासपिठावरच धावत आला. त्याने संचालक बजबळे यांना खुर्चीवरून खेचत मारहाणीस सुरू केली. दोघांत फ्रीस्टाइल मारामारी झाली. सत्ताधारी संचालक, समर्थकांनीही व्यासपीठावर धाव घेत त्यास मारहाण केली. मात्र तो निसटला. त्यानंतर पाच मिनिटात सभा गुंडाळण्यात आली.

दंगेखोरांवर फौजदारी करणार

सभासदांची कामकाजाविषयी तक्रार नाही. याचा विरोधकांना पोटशूळ आहे. त्यातूनच विरोधकांनी सभा उधळली, असा दावा अध्यक्ष पाटील यांनी केला. 'आम्ही सर्व विषय मंजूर केले आहेत. सभा कायदेशीरच झाली आहे. विरोधकांनी बाहेरची माणसे आणून गोंधळ घातला. त्यांच्यावर फौजदारी दाखल करणार आहे' असे पाटील म्हणाले.

फेरसभेची मागणी करणार

'सभेत दंगा करणारा शिक्षक हा सत्ताधाऱ्यांचा कार्यकर्ता आहे. सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला वैतागून त्याने त्यांना घरचा आहेर दिला आहे. आम्ही जागा व इमारती खरेदीचा विषय रद्दची मागणी केली. संचालक मंडळाच्या बैठकीतही तशी चर्चाही झाली. पण त्यांनी हा विषय रेटून नेण्याचा प्रयत्न केला. त्यांचेच समर्थक गोंधळ करीत होते. धक्काबुक्की, खुर्च्यांची फेकाफेकी केली. सभा झालेली नाही. आम्ही सभासदांच्या सह्या घेऊन फेरसभा घेण्याची मागणी उपनिबंधकाकडे करणार आहोत,' असे थोरात गटाचे जिल्हाध्यक्ष व बँकेचे संचालक विनायक शिंदे, सरचिटणीस अविनाश गुरव यांनी पत्रकारांशी बोलाताना स्पष्ट केले.

बँकच बंद करा

'शिक्षक बँकेच्या सभेत पेक्षाला काळीमा फासणाऱ्या घटना घडत असतील, सत्ताधारी-विरोधक व काही मोजके सभासद भान न ठेवता आपल्या वागण्याने समाजात शिक्षकांची प्रतीमा मलिन करीत असतील तर ही बँकच बंद करण्याची मागणी करावी लागेल,' अशी प्रतिकीया जुनी पेन्शन हक्क शिक्षक संघटनेचे अमोल शिंदे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकामात शहराचा बाज असावा

$
0
0

बांधकामात शहराचा बाज असावा

कोल्हापूर टाइम्स टीम

'पाश्चात शैलीचा सध्याच्या बांधकामात वापर केला जातो. पण अर्किटेक्टनी कल्पकतेचा वापर करुन प्रत्येक शहराचा बाज लक्षात घेऊन जुन्या काळातील बांधकामात वापरणाऱ्या वस्तूंचा वापर बांधकामात केला पाहिजे,' असे प्रतिपादन मुंबईतील अर्किटेकट चंद्रशेखर कानेटकर यांनी केले. द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अर्किटेकटस् महाराष्ट्र चॅप्टर कोल्हापूर सेंटर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ताराबाई पार्क येथील रेसिडन्सी क्लब येथे झालेल्या कार्यक्रमात अर्किटेक्ट कानिटकर यांनी स्लाइड शोद्वारे भारतातील प्रत्येक शहरातील बांधकामाची वैशिष्ट्ये विशद केली. आर्किटेक्ट कानेटकर म्हणाले, 'प्रत्येक शहराला इतिहास असतो. तसेच परिसरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचा वापर बांधकामात केला जातो. महाराष्ट्रात काळा दगड तर राजस्थानच्या बांधकामात लाल दगडाचा वापर केला जातो. अजूनही अनेक शहरात चिरेबंदी वाडे, पॅलेस, गढी, हवेली पहायला मिळतात. या बांधकामाचा अभ्यास करुन आधुनिक बांधकामात वापर केला तर इमारतीचे सौंदर्य वाढते. अशा इमारतींना त्या शहरांचा बाजू निर्माण होण्यास मदत होते.'

अर्किटेक्ट मोहन वाचयळ यांच्या वास्तूपर्व या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी झाले. अर्किटेक्ट वाचयळ यांनी स्थानिक वास्तूसह देश परदेशातील वास्तू रचनेची माहिती स्लाइड शोद्वारे दिली. कोल्हापूर सेंटरचे अध्यक्ष सतीशराज जगदाळे यांनी स्वागत केले तर वर्किंग कमिटी चेअरमन विजय कोराणे यांनी कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. सचिव वंदना पुसाळकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लूचा कोगेत रुग्ण

$
0
0

कुडित्रे : कोगे (ता. करवीर) येथे स्वाइन फ्लूचा संशयित रुग्ण आढळल्याने साथीचा धोका अजून टळला नसल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे. कोगेतील संशयित महिलेला आठवड्याभरापासून ताप, सर्दी, खोकला, थंडीचा त्रास होऊ लागला. गावात उपचार चालू ठेवले, पण पुढील उपचारासाठी कोल्हापुरात खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील विविध चाचण्यांद्वारे या महिलेला स्वाइन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेने आरोग्य विभाग खडबडून जागा होऊन सांगरूळ आरोग्य केंद्राच्या पथकाने कोगेत जाऊन घरोघरी भेटी दिल्या. पिण्याचे पाणी, स्वच्छता, आदींची पाहणी करून ग्रामस्थांना स्वच्छतेबाबत दक्ष राहण्यास सांगितले.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६७ कारखान्यांतून सांडपाणी

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रशासनाने नुकताच पंचगंगा नदीच्या प्रदूषणास प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कारणीभूत उद्योगांचा सर्व्हे केला. त्यात ६७ कापड प्रक्रिया कारखान्यांतून (प्रोसेस युनिट) सांडपाणी थेट नदीत जात असल्याचे पुढे आले. प्रशासनाने त्यांच्या व्यवस्थापनास कारवाईसंबंधी नोटीसा दिल्या आहेत. दरम्यान, हा सर्व्हे झालेल्या काळात साखर कारखाने बंद होते. परिणामी त्यातून किती प्रदूषण होते, हे स्पष्ट झाले नाही.

पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न हायकोर्टात गेला आहे. प्रदूषणावर उपाययोजनेसाठी कोर्टाच्या अंतरिम आदेशानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती कार्यरत आहे. समितीतर्फे प्रदूषण रोखण्यासाठी तात्पुरत्या, कायमस्वरुपी उपाययोजनांवर नियंत्रण ठेवले जात आहे. महिन्यापूर्वी समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. बैठकीत समितीचे अध्यक्ष, विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी कोणत्या कारखान्यांतील सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित होते याची नेमकेपणाने माहिती मिळण्यासाठी सर्व्हे करून अहवाल देण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सर्व्हे केला. त्यात इचलकरंजीतील ६७ कापड प्रक्रिया कारखान्यांचे सांडपाणी विनाप्रक्रिया बाहेर सोडले जात असल्याचे आढळले. यापैकी ३९ कारखाने बंद करण्याचा प्रस्ताव प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रशासनाने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे. उर्वरित कारखान्यांनाही 'बंदची कारवाई का करण्यात येऊ नये?' अशी नोटीस दिली आहे. त्यांच्याकडून खुलासा आल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे.

अहवालानुसार, लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमध्ये ३ मोठे वस्त्रोद्योग कारखाने आहेत. त्यापैकी एका कारखान्याकडे प्रक्रिया प्रकल्प नाही. तेथील सांडपाणी बाहेर येत होते. मात्र त्या कारखान्याचे उत्पादनच बंद आहे. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये फाउंड्री उद्योग मोठ्या संख्येने आहेत. तेथील गोकुळ दूध संघाकडून रोज ११ लाख ६० हजार लिटर सांडपाणी निर्माण होते. त्यावर प्रक्रिया केली जाते. कागल पंचतारांकित वसाहतीमध्ये ६ मोठे वस्त्रोद्योग कारखाने आहेत. प्रत्येक उद्योगातून निर्माण होणाऱ्या ५० टक्के सांडपाण्यावर ते स्वत: प्रक्रिया करतात. ५० टक्के सांडपाणी सामूहिक प्रक्रिया प्रकल्पाकडे वळवण्यात आले आहे. या वसाहतीमधील कोणत्याही कारखान्यांतून सांडपाणी विना प्रक्रिया बाहेर पडत नसल्याचे म्हणणे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आहे.

बस, रेल्वेकडून बोळवण

शहराच्या मध्यवस्तीत बसस्थानक आहे. तेथे रोज बस धुतल्या जातात. रेल्वे स्टेशनवर पाण्याने रेल्वेचे डबे स्वच्छ केले जातात. या दोन्ही ठिकाणांहून निर्माण झालेल्या सांडपाण्यात ग्रीस, ऑईलचा अंश असतो. असे पाणी गटारव्दारे थेट नदीत मिसळते. त्यामुळे विभागीय आयुक्त म्हैसकर यांनी बसस्थानक, रेल्वे स्टेशनमधून किती सांडपाणी तयार होते? त्यावर काय प्रक्रिया केली जाते? याची माहिती घेण्याची सूचना केली होती. मात्र, बसस्थानक प्रशासनाने सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते, अशी मोघम माहिती दिली. रेल्वे प्रशासनाने याची माहितीच दिलेली नाही.

प्रक्रिया केलेले पाणी

कागल पंचरांकित वसाहत, गोकुळ शिरगाव, हातकणंगलेतील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. प्रक्रियायुक्त पाणी उन्हाळ्यात जवळचे शेतकरी वापरतात. पावसाळ्यात ते पाणी नैसर्गिक स्रोताद्वारे नदीतच जाते, असेही सर्व्हेतून दिसून आले. प्रक्रियायुक्त सांडपाण्यातही काही प्रमाणात प्रदूषणकारी घटक असतात. त्यातूनही पाणी प्रदूषण होते, असेही पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कोट

विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार पंचगंगा नदीच्या प्रदूषणास कारणीभूत कारखान्यांचा सर्व्हे केला. इचलकरंजीतील ६७ प्रोसेसिंग युनिटचे सांडपाणी विनाप्रक्रिया नदीत जात असल्याचे आढळले. त्यांना नोटिसा दिल्या आहेत. कागल पंचतारांकित वसाहत, लक्ष्मी, गोकुळ शिरगाव या औद्योगिक वसाहतींमधील काही कारखान्यांच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात त्रूटी आढळल्या. त्यांना त्रूटी दूर करण्याचे आदेश दिले आहेत.

- प्रशांत गायकवाड, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ

०००

(मूळ कॉपी:)

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्व्हेचा अहवाल, सर्वाधिक इचलकरंजीतील

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणास प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे कारणीभूत उद्योगांचा सर्व्हे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रशासनाने नुकताच केला. त्यात ६७ कापड प्रक्रिया कारखान्यांतून (प्रोसेस युनिट) सांडपाणी थेट नदीत जात असल्याचे पुढे आले. प्रशासनाने त्यांच्या व्यवस्थापनास कारवाईसंबंधी नोटीसा दिल्या आहेत. दरम्यान, सर्व्हे काळात साखर कारखाने बंद होते. परिणामी त्यातून किती प्रदूषण होते, हे स्पष्ट झाले नाही.

नदी प्रदूषणाचा प्रश्न हायकोर्टात गेला आहे. कोर्टाच्या अंतरिम आदेशानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे. समितीतर्फे प्रदूषण रोखण्यासाठी तात्पूरत्या, कायमस्वरूपी उपाय योजनांवर नियंत्रण ठेवले जात आहे. महिन्यापूर्वी समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. बैठकीत समितीचे अध्यक्ष आणि विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी कोणत्या कारखान्यांतील सांडपाण्यामुळे नदी प्रदूषीत होते, त्याची नेमकेपणाने माहिती मिळण्यासाठी सर्व्हे करून अहवाल देण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. 'प्रदूषण'च्या अधिकाऱ्यांनी सर्व्हे केला. त्यामध्ये इचलकरंजीतील ६७ कापडावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांचे सांडपाणी विनाप्रक्रिया बाहेर सोडले जाते. त्यातील ३९ कारखाने बंद करण्याचा प्रस्ताव 'प्रदूषण'च्या प्रशासनाने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवले आहे. उर्वरित कारखान्यांना बंद का करण्यात येऊ, अशी नोटीस देण्यात आली आहे. खुलासा आल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे.

लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमध्ये ३ मोठे वस्त्रोद्योग आहेत. त्यापैकी एका कारखान्याकडे प्रक्रिया प्रकल्प नाही. तेथील सांडपाणी बाहेर येते होते. मात्र त्या कारखान्याचे उत्पादनच बंद आहे. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये फौंड्री उद्योग मोठ्या संख्येने आहेत. तेथील गोकुळ दूध संघाचे रोज ११ लाख ६० हजार लिटर सांडपाणी निर्माण होते. त्यावर ते प्रक्रिया करतात. कागल पंचतारांकित वसाहतीमध्ये ६ मोठे वस्त्रोद्योग आहे. प्रत्येक उद्योगातून निर्माण होणारे ५० टक्के सांडपाण्यावर ते स्वत: प्रक्रिया करतात. ५० टक्के सांडपाणी सामुहिक सांडपाणी प्रकल्पाकडे वळवण्यात आले आहे. या वसाहतीमधील कोणत्याही कारखान्यांतून सांडपाणी विना प्रक्रिया बाहेर पडत नसल्याचा दावा प्रदूषणच्या प्रशासनाचा आहे.

--------------

बस, रेल्वेकडून बोळवण

शहराच्या मध्यवस्तीत बस स्थानक आहे. तेथे रोज बसेस धुतल्या जातात. स्टेशनवर पाण्यानी रेल्वेचे डबे स्वच्छ केले जातात. या दोन्ही ठिकाणाहून निर्माण झालेल्या सांडपाण्यात ग्रीस, ऑईलचा अंश असतो. असे पाणी गटाराव्दारे थेट नदीत मिसळते. म्हणून विभागीय आयुक्त म्हैसकर यांनी बसस्थानक, रेल्वेस्टेशनमधून किती सांडपाणी तयार होते, त्यावर काय प्रक्रिया केली जाते, याची माहिती घेण्याची सूचना केली होती. मात्र बसस्थानक प्रशासनाकडून सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते, असे मोघम माहिती दिली. रेल्व प्रशासनाने माहिती दिली नाही. अशाप्रकारे बस, रेल्वेने 'प्रदूषण'च्या अधिकाऱ्यांचीच बोळवण केली.

------------

प्रक्रिया केलेले पाणी बाहेरच

कागल पंचरांकित, गोकुळ शिरगाव, हातकणंगले लक्ष्मी औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. प्रक्रियायुक्त पाणी उन्हाळ्यात जवळचे शेतकरी वापरतात. पावसाळ्यात ते पाणी नैसर्गिक स्त्रोताव्दारे नदीतच जाते, असेही सर्व्हेतून दिसून आले. प्रक्रियायुक्त सांडपाण्यातही काही प्रमाणात प्रदूषणकारी घटक असतात. त्यातूनही पाणी प्रदूषण होते, असेही पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

-------------------

कोट

विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार पंचगंगा नदी प्रदूषणास कारणीभूत कारखान्यांचा सर्व्हे केला. इचलकरंजीतील ६७ प्रोसेसिंग युनिटचे सांडपाणी विना प्रक्रिया नदीत जात असल्याचे आढळले. त्यांना नोटीसा दिल्या आहेत. कागल पंचतारांकित, लक्ष्मी, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतींमधील काही कारखान्यांच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात त्रुटी आढळल्या. त्यांना त्रुटी काढण्याचे आदेश दिले आहेत.

प्रशांत गायकवाड, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ

-----------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images