Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

ठोक आंदोलनातून ठोस वाटचालीकडे

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet : satishgMT

कोल्हापूर : सकल मराठा समाजाच्या ठोक आंदोलनाच्या ३९ दिवसांच्या ठिय्या आंदोलनाच्या तीव्रतेनंतर अखेर राज्य सरकारने आरक्षणासह अन्य २२ मागण्यांबाबत लेखी आश्वासन देऊन ठोस वाटचालीकडे सुरुवात केली आहे. आंदोलनकाळात हिंसेचा मार्ग न अवलंबता लोकशाहीमार्गाने मराठा समाजाने थेट मुंबईला स्वाभिमान गाडी मार्च आंदोलनाच्या केलेल्या घोषणेने हडबडलेल्या सरकारने तातडीने थेट मंत्रिगट पाठवून राजर्षी शाहू जन्मस्थळावर विविध मागण्यांच्या अंमलबजावणीस कटिबद्ध असल्याचे आश्वासित केल्याने खऱ्या अर्थाने राज्यसरकारची कसोटी लागणार आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार वेळकाढूपणा करत असल्याची भावना बळावल्याने राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देताना कोल्हापुरात सकल मराठा समाजाने २३ जुलैला दसरा चौकात देशात सर्वप्रथम आरक्षण लागू केलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने आंदोलन सुरू करत राज्याला दिशा दिली. आरक्षण प्रश्नावर राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचार सुरू असताना कोल्हापुरात मात्र कायदा-सुव्यवस्थेवर ताण पडला नाही. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची अभ्यासपूर्ण मांडणी आणि वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, हर्षल सुर्वे, सचिन तोडकर, स्वप्निल पार्टे यांच्यासह अन्य शिलेदारांनी संघटन कौशल्याची परिसीमा न करता आंदोलनाची तीव्रता वाढवली.

केंद्र व राज्य सरकारवर टीका करताना विरोधी पक्षांना आंदोलकांनी जाणीव करून दिली. मराठा आरक्षण मागणीच्या व्यासपीठावरुन प्रथमच खासदार शरद पवार यांनी घटनेत बदल करण्याची भूमिका मांडून आरक्षणाला पाठिंबा दिला. पवारांपाठोपाठ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, गोव्याचे माजी मुख्यमंत्री रमाकांत खलप, आमदार नीलेश राणे, माजी खासदार मेजर सुधीर सावंत यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. भाजप वगळता सर्व राजकीय पक्षांच्या आजी-माजी खासदार, आमदारांसह सर्व जातीजमातीचे लोक आंदोलनात सहभागी झाले.

नऊ ऑगस्टला महाराष्ट्र बंदवेळी राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचार सुरू असताना दसरा चौकातील जाहीर सभेला उपस्थित राहण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा युवक आले होते. सोशल मीडियावरून कोल्हापुरातील शांततापूर्ण आंदोलनाची दखल राज्याने घेतली. दुसरीकडे आंदोलन स्थगित करण्यात यावे यासाठी सरकारने राजकीय, प्रशासकीय ताकद वापरली. पण श्रीमंत शाहू छत्रपती यांनी ठिय्या आंदोलन सुरूच राहील याचा पुनरुच्चार केल्याने सलग ३९ दिवस आंदोलन सुरूच राहिले.

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य सरकारने तातडीने अधिवेशन बोलवावे अशी मागणी मराठा समाजाने ९ ऑगस्टच्या मोर्चात केली. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारची भूमिका काय आहे हे स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारने राजर्षी शाहूंच्या जन्मस्थळाच्या ठिकाणी येण्याचे आवाहन केले.

एकीकडे आंदोलक रस्त्यावर उतरले असताना लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन समाजाच्या भावना कळविण्याची मागणी केली. खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील दहा आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पण त्यांनी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतरच अधिवेशन बोलावू, असे स्पष्ट केले. सरकारकडून वेळकाढूपणा होत असल्याने सकल मराठा समाजाने मुंबईला स्वाभिमान गाडी मार्च काढण्याची घोषणा केली. या मार्चच्या अग्रभागी श्रीमंत शाहू छत्रपती यांचे वाहन राहणार होते. त्यामुळे मुंबईला जाण्यापूर्वीच मोर्चा अडवला तर त्याचे पडसाद राज्यात उमटण्याची शक्यता होती. ऐन श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी, गणेशोत्सव तोंडावर आला असताना गाडी मार्चच्या घोषणेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याने सरकारने वेगवान हालचाली सुरू केल्या. अखेर मराठा आरक्षण समितीसाठी नियुक्त केलेल्या मंत्रिगट उपसमितीतील पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे यांनी तातडीने कोल्हापुरात धाव घेतली. मुंबईतील हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षण प्रश्नावर सलग दोन दिवस अधिवेशन घेतले जाईल ही मागणी मान्य केली. तसेच आंदोलकांनी राजर्षी शाहूंच्या जन्मस्थळी येऊन लेखी निवेदन देण्याची मागणी पूर्ण करताना २२ मागण्या सोडविण्याबाबत सकारात्मक असल्याचे लेखी निवेदन देत ठोस वाटचाल करताना राज्य सरकारला जबाबदारी पार पाडण्यास प्रवृत्त केले हेच आंदोलनाच फलित समजले पाहिजे.

०००००

आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, राजर्षी शाहू जन्मस्थळी येऊन लेखी निवेदन द्यावे, या मागण्यांसाठी राज्य सरकारचे प्रतिनिधी आल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. पण यापुढे चर्चा, बैठका, व्याख्यानातून प्रबोधन करण्यात येणार आहे. सरकारने आश्वासन न पाळल्यास पुन्हा आंदोलन छेडले जाईल.

इंद्रजित सावंत, समन्वयक

००००

३९ दिवस आंदोलन केल्याने सरकारने लेखी निवेदन दिले. ऐन सणासुदीत गाडी मार्चच्या आंदोलनामुळे नागरिकांना त्रास होण्याची शक्यता होती. तसेच राज्य सरकारने विशेष अधिवेशन, अण्णासाहेब पाटील महामंडळ, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत हे निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने श्रीमंत शाहू छत्रपती यांच्याह मान्यवरांच्या विनंतीनंतर आंदोलन स्थगित केले.

वसंतराव मुळीक, समन्वयक

००००

सरकारने यापूर्वी आश्वासन देऊन मराठा समाजाची वेळोवेळी फसवणूक केली होती. यावेळी मात्र सरकारने लेखी निवेदनाद्वारे समाजाच्या २२ मागण्यांबाबत आश्वासन दिले असल्याने ते राज्य सरकारवर बंधनकारक राहणार आहे. लेखी आश्वासन न पाळल्यास राज्य सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील.

दिलीप देसाई, समन्वयक

००००

आरक्षण प्रश्नावरील मंत्रिगट उपसमितीने कोल्हापुरात येऊन जन्मस्थळी येऊन लेखी आश्वासन दिले आहे. लेखी आश्वासनमुळे राज्य सरकारवर ते बंधनकारक राहणार आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळला भरीव निधी, महामंडळाकडून फक्त मराठा समाजातील तरुणांना अर्थपुरवठा यासाठी पुढील आठवड्यात सरकार निर्णय घेणार आहे.

हर्षल सुर्वे, समन्वयक

०००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अवसायनातील २५९७ संस्थांची नोंदणी रद्द

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

tweet : @MarutipatilMT

कोल्हापूर : गैरकारभार आणि भ्रष्टाचाराने सहकार क्षेत्राचे अस्तित्व धोक्यात आले असल्याने राज्य सरकारने सहकार शुद्धीकरणासाठी हाती घेतलेल्या सर्वेक्षण मोहिमेत जिल्ह्यातील ४१८१ संस्था अवसायनात निघाल्या आहेत. यापैकी येणी-देणी पूर्ण केलेल्या तब्बल २५९७ संस्थांची नोंदणी सहकार विभागाने रद्द केली. येणी-देणी पूर्ण न झालेल्या १४०१ संस्था विभागाच्या रडारवर आहेत. सभासदांच्या देण्याची पूर्तता झाल्यानंतर अवसायनातील या संस्थांची नोंदणी रद्द होणार आहे.

राज्य सरकारने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनिय, १९६०च्या कलम १०२ व १०५ सर्वेक्षण मोहीम हाती घेतली होती. सहकार क्षेत्राचे शुद्धीकरण प्रक्रिया राबवताना चालू, बंद, अवसायनातील व ठावठिकाणा नसलेल्या संस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन सर्वेक्षण केले. बँका, नागरी व ग्रामीण पतसंस्था, औद्योगिक संस्था, सेवक पतसंस्थांचे सर्वेक्षण केले. सहकार विभाग व लेखापरीक्षण विभागाने संयुक्तपणे ही मोहीम राबवली. संस्थांची तपासणी करताना अनेक संस्था अस्तित्वात नसल्याचे दिसले. तर काही संस्थांचे व्यवहार पूर्णपणे बंद पडले होते. अशा ४१८१ संस्थांच्या प्रमुखांशी सहकार विभागाने पत्रव्यवहार करून कागदपत्रे सादर करण्याची सूचना केली.

यानुसार अनेक संस्थांनी कागदपत्रे सादर करून संस्था चालू ठेवण्याची विनंती केली. तरीही सहकार विभागाने ४१८१ संस्था अवसायनात काढल्या. सर्व संस्थाचालकांना एक महिन्याची मुदत दिली. मात्र मुदतीत विहित नमुन्यात खुलासा न केल्याने २५९७ संस्थांची नोंदणी रद्द केली. विशेषत: येणी-देणी पूर्ण केलेल्या संस्थांची नोंदणी सहकार विभागाने केली. आणखीन १,४०१ संस्था सहकार विभागाच्या रडारवर असून यातील २६७ संस्थांबाबत निर्णय घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.

६० टक्के संस्थांची येणी-देणी बाकी

सहकार विभागाने संस्था अवसायनात काढून नोंदणी रद्द करताना सभासदांचे भागभांडवल, ठेवी आणि कर्ज वसुलीला प्राधान्य दिले आहे. संपूर्ण आर्थिक व्यवहार पूर्ण झाल्यानंतर संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. सर्वेक्षणात अवसायनात काढलेल्या संस्थापैकी २,५९७ संस्थांची नोंदणी रद्द झाली असून उर्वरीत अवसायनातील संस्थांची येणी-देणी भागवल्यानंतर या संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येईल.

नोंदणी रद्द झालेल्या संस्था

करवीर (१७२), कोल्हापूर शहर (१६०), आजरा (२४), गडहिंग्लज (५३), पन्हाळा (११५), राधानगरी (६६), भुदरगड (१५५), शाहूवाडी (१८), चंदगड (५२), शिरोळ (२३२), गगनबावडा (३२), कागल (३७९), हातकणंगले (१,१३९).

६१४८

जिल्ह्यातील एकूण संस्था

४१८१

अवसायनातील संस्था

२५९७

नोंदणी रद्द झालेल्या संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सद्य:स्थिती अभिव्यक्तीची गळचेपी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'लिंगायत धर्म हा परिवर्तनीय चळवळीचा कणा आहे. या धर्माची उभारणी करताना संघर्षाला सामोरे जावे लागले आहे. वैदिक धर्माने नाकारलेले स्वातंत्र्य लिंगायत धर्माने दिले आहे. सध्याच्या घडीला व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे,' असे प्रतिपादन प्राचार्य आनंद मेणसे यांनी केले.

विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त 'शरण संगम' आणि 'लिंगायत स्वतंत्र धर्म' या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कोल्हापूर लिंगायत समाज संस्था व बसव केंद्राच्या वतीने चित्रदुर्ग मठात पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्रा. राजा शिरगुप्पे होते.

प्राचार्य मेणसे म्हणाले, 'आजही समाजावर मनुस्मृतीचा मोठा पगडा आहे. मनुस्मृतीने जातीव्यवस्था बळकट केली असून, स्त्रियांना शूद्र म्हणून हिणवले आहे. वैदिक धर्म समाजातील पन्नास टक्के समूहाचे सर्व प्रकारचे अधिकार नाकारतो. वैदिक परंपरेने सर्वांत जास्त अन्याय स्त्रियांवर केला. ज्ञान बंदिस्त ठेवणाऱ्या व्यवस्थेला बसवण्णांनी नकार दिला. विषमतेच्या जोखडातून समाजाला बाहेर काढण्याचे क्रांतिकारी कार्य त्यांनी केले. लिंगायत स्वतंत्र धर्म असून, तो सर्व वेदांना नाकारतो. देशातील समाजाच्या अधोगतीला चातुर्वर्ण्य व जातव्यवस्था जबाबदार आहे.'

ते पुढे म्हणाले, 'लिंगायत धर्म जातव्यवस्था न मानणारा जगातील एकमेव धर्म आहे. विविध जाती-धर्मात आंतरजातीय विवाह झाल्याशिवाय जातीव्यवस्था संपविणे शक्य होणार नाही. पहिला आंतरजातीय विवाह बसवण्णांनी लावून दिला होता. देशातील सद्य:स्थिती चिंताजनक असून, स्त्रियांना शिक्षण मिळू नये यासाठी खासगीकरण करण्याचा डाव आखला जात आहे. शिक्षण महाग करण्याचा सनातन्यांचा प्रयत्न आहे. समतेचा विचार पुढे नेण्याची गरज असून, त्यासाठी वैदिक धर्माच्या प्रभावातून मुक्त होणे काळाची गरज आहे. देशातील वंचितांना व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य लिंगायत धर्माने दिले आहे. मात्र, आजच्या स्थितीत घटनेने दिलेले अधिकार हिरावून घेतले जात आहेत. शोषणमुक्त समाज उभारणीसाठी अहिंसेच्या मार्गावर विश्वास ठेवून यापुढेही कार्यरत राहावे लागणार आहे.'

अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा. राजा शिरगुप्पे म्हणाले, 'आपली लढाई अविचारांशी आहे. मानवतावादी विचार डोक्यात ठेवून कार्यरत राहावे लागणार आहे. लिंगायत समाजाचे ब्राह्मणीकरण केले जात असून, त्याला पायबंद घालण्यासाठी एकत्र येऊन एकजुटीने लढा द्यावा लागणार आहे.'

यावेळी उमादेवी कलबुर्गी, प्रा. मेघा पानसरे यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रंथ परिचय राजू जुबरे यांनी केला. यश आंबोळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उमाताई पानसरे, विजय कलबुर्गी, रंजना तवटे, दिलीप पवार, एस. बी. पाटील. व्यंकप्पा भोसले, राजशेखर तंबाखे, आदी उपस्थित होते. बाबूराव तारळे यांनी आभार मानले.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपला हाकलून लावा

$
0
0

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेत आवाहन

म. टा. वृत्तसेवा, सांगली

'संपूर्ण भारतात भितीचे वातावरण आहे. माध्यमांची गळचेपी सुरु आहे. भाजप सरकारने सामान्य जनतेचे जगणे कठीण केले आहे. नागरिक महागाईच्या वणव्यात होरपळत आहेत. स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिशांना जसे पिटाळून लावले तसे भाजप सरकारला पिटाळून लावण्याची वेळ आली आहे. या सरकारला सत्तेतून हाकलून लावा', असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले. कडेगाव येथे काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते .

प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले,' भाजप सरकारच्या काळात उद्योगात कायम अग्रेसर राहिलेल्या महाराष्ट्राची अधोगती झाली . मागील चार वर्षात राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे ढासळली आहे. यामुळे राज्यात सरकार नावाची गोष्ट शिल्लक आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. समाजातला कोणताच घटक या निष्क्रिय सरकारच्या कामकाजावर समाधानी नाही.'

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,' देशातील शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. महागाई गगनाला भिडल्याने सर्वसामान्य व गरिबांचे जगणे मुश्किल झाले आहे. पंतप्रधान मोदींचा कारभार हुकूमशाही पद्धतीचा आहे. '

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले,' राज्यात धार्मिक दहशतवाद निर्माण करण्याचा डाव असून तरुणांच्या हाताला रोजगार देण्याऐवजी त्यांच्या हातात बंदुका देण्याचे काम हे सरकार करत आहे. डॉ. दाभोलकर, पत्रकार गौरी लंकेश, कॉ. पानसरे यांचे खरे मारेकरी हे भाजप सरकारच आहे.'

आमदार डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, ' भाजपच्या अनेक मंत्री व आमदारांवर गुन्हे दाखल असताना ही मंडळी निर्लज्जपणे सत्तेला चिकटून बसली आहेत. भाजप सरकारच्या नोटाबंदीने सामान्य नागरिकांना वेठीस धरले. जातीधर्मात विष पेरण्याचे काम हे सरकार करत आहे.' यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार सतेज पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जन्माष्टमी: विठुरायाच्या डोक्यावर मुंडासे

$
0
0

पंढरपूर । सुनील दिवाण

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत रविवारी रात्री बारा वाजता जन्माष्टमीच्या सोहळा संपन्न झाला. कृष्णाचेच रूप असलेल्या विठुरायाच्या मंदिरात शेकडो वर्षांपासून विठ्ठल जन्माष्टमी साजरी करण्याची परंपरा आहे. त्या परंपरेनुसारच हा उत्सव पार पडला.

विठ्ठल सभामंडपात सुरुवातीला कृष्ण जन्माचे कीर्तन करण्यात आले. त्यानंतर रात्री बारा वाजता सभामंडपातील पाळण्यात ठेवण्यात आलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर गुलाल आणि फुले उधळून जन्मसोहळा साजरा करण्यात आला. याचवेळी विठुरायाच्या पायावरही फुले आणि गुलाल उधळून देवाचा जन्माष्टमीचा सोहळा संपन्न झाला. देवाच्या मस्तकी ११० हात लांबीचे वैशिष्ट्यपूर्ण पागोटे बांधण्यात आले. देवाच्या अंगावर किरमीजी रंगाची मखमली अंगी आणि कमरेला पितांबर नेसविल्यावर डोक्याभोवती शाल आणि हातात चांदीची काठी देण्यात आली. विठ्ठलाच्या मूर्तीला विविध प्रकारच्या फुलांच्या माळा आणि तुळशीहार घालण्यात आले होते. सुंठवडा, पेढे आणि फळांचा नैवेद्य दाखवून शेजारती करण्यात आली आणि कालपासून जागा असलेला देव रात्री बारा वाजता झोपण्यासाठी गेला. या जन्मसोहळ्यात सहभागी होण्यासाठी हजारो भाविकांनी मंदिर आणि मंदिराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्किटेक्ट असोसिएशन अध्यक्षपदी अजय कोराणे

$
0
0

सर्व जागांवर विजय मिळवत कोराणे गटाचे वर्चस्व ; विद्यमान ९ संचालकांचा पराभव

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत दि असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजय कोराणे यांनी बाजी मारली. कोराणे यांच्या नेतृत्वाखालील सर्व १४ जागांवर विजय मिळवत असोसिएशनवर वर्चस्व मिळवले. विरोधी पॅनेलचे प्रमुख अतुल जाधव यांच्यासह विद्यमान नऊ संचालकांचा पराभव झाला. तर चार विद्यमान संचालक निवडून आले.

असोसिएशनच्या एकूण १४ जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात होते. कॉसमॉस कॉम्प्लेक्समधील असोसिएशनच्या हॉलमध्ये सकाळी मतदानाला सुरुवात झाली. एकूण ४१४ मतदारांपैकी ३३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. कोराणे पॅनेलचे उमेदवार पहिल्या फेरीपासून अखरेपर्यंत आघाडीवर राहिले. अधिकार मंडळ पदासाठीच्या गटातही कोरणे गटाने बाजी मारली. पॅनेल प्रमुख अजय कोराणे यांनी २१० मते मिळवत विरोधी आघाडीचे उमेदवार अतुल शिंदे यांचा ८५ मतांनी पराभव केला. कोराणे पॅनेलचे उपाध्यक्ष विजय चोपदार (२०३), सेक्रेटरी राज डोंगळे (१८४), खजानिस उमेश कुंभार (२०९), जॉईन्ट सेक्रेटरी अनिल घाटगे (२२२) यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव केला.

निवडणूक अधिकारी म्हणून ज्येष्ठ आर्किटेक्ट मोहन वायचळ, बलराम महाजन, गणपत व्हटकर, सतीश मिराशी, रमेश पोवार यांनी काम पाहिले.

...........

चौकट

मान्यवरांची उपस्थिती

असोसिएशनच्या पदाधिकारी निवडीसाठी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काहीवेळाने करवीरचे आमदार चंद्रदीप नरके, कुंभी बँकेचे चेअरमन अजित नरके व माणिक पाटील-चुयेकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर महापालिकेचे भाजपचे गटनेते विजय सुर्यवंशी यांनी मतदान केले. स्थायी समितीचे सभापती आशिष ढवळे मतदान केंद्रावर दिवसभर थांबून होते. मतमोजणी केंद्राबाहेर क्रिडाईचे अध्यक्ष महेश यादव, संचालक विद्यानंद बेडेकर, रवी माने, निखिल अग्रवाल आदी उपस्थित होते.

.........

विजयी उमेदवार

अजय कोराणे गटाचे विजयी उमेदवार व कंसात मिळालेली मते

अध्यक्ष - अजय कोराणे (२१०), उपाध्यक्ष - विजय चोपदार (२०३), सेक्रेटरी - राज डोंगळे (१८४), खजानिस - उमेश कुंभार (२०९), जॉईन्ट सेक्रेटरी - अनिल घाटगे (२२२). संचालक : जयंत भागमपुरे (२१७), अंजली जाधव (२३०), गौरी चोरगे (२१९), प्रशांत काटे (२०८), निशांत पाटील (१९४), विजय पाटील (२१०), प्रशांत पत्की (२१२), उदय निचिते (२१२), प्रमोद पवार (२०२)

.....................

अतुल जाधव गटाचे पराभूत उमेदवार व कंसात मते

अध्यक्ष - अतुल जाधव (१२५), उपाध्यक्ष - सुधीर हंजे (१३१), सेक्रेटरी - विजय भांबुरे (१५४), खजानिस - बाजीराव भोसले (१२७), जॉईन्ट सेक्रेटरी - सुनील मांजरेकर (११३). संचालक : चंद्रकांत घेवारी (११२), विजय पाटील ( १०४ ), आशुतोष केसरकर (१३२), मिलिंद नाईक (१२४), निरंजन वायचळ (१३७), सचिन चव्हाण (११०), परशराम रेमानिचे (११९), महेश ढवळे (११४), सुधीर पाटील (१११).

...................

कोट

'सभासदांनी विक्रमी मतांनी विजय मिळवून दिला आहे. सभासदांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवू. असोसिएशनचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ सभासदांची सल्लागार समिती स्थापन करुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना सोबत घऊन काम केले जाईल.

अजय कोराणे, पॅनेल प्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपात्र नगरसेवकांचे मंत्रिमंडळ बैठकीकडे लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सुप्रीम कोर्टाने जात वैधता प्रमाणपत्र वेळत सादर न केलेल्या महापालिकेच्या १९ नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. नगरसेवकांना दिलासा देण्यासाठी वटहुकूम काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. राज्याचे धोरण निश्चित करण्यासाठी मंगळवार किंवा बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयावर बुधवारी (ता. १२) होणाऱ्या महापालिकेच्या सभेतील अपात्र नगरसेवकांचा प्रवेश अवलंबून राहणार आहे.

महाराष्ट्र म्युनिसिपल कौन्सिल, नगरपंचायत व इंडस्ट्रियल टाउनशिप अॅक्ट १९६५ कलम ९ 'अ' नुसार निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या आत महापालिकेच्या नगरसेवकांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. सुप्रीम कोर्टाने या कायद्यातील तरतुदीनूसार असे प्रमाणपत्र सादर न केलेल्या राज्यातील सुमारे नऊ हजार स्थानिक स्वराज संस्थेतील सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. यामध्ये कोल्हापूर महापालिकेच्या १९ नगरसेवकांचा समावेश आहे. कोर्टाने नगरसेवकांना अपात्र ठरवले असले, तरी निवडणुकीचा निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारित येत आहे. परिणामी येथील नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने प्रथम पालकमंत्री चंद्रकांत पाटील, नंतर आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली.

भेटी दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूर्वलक्षी प्रभावाने वटहूकुम काढण्याचे आश्वासन दिले होते. आठवड्यानंतरही अद्याप वटहुकूम काढलेला नसला, तरी महापालिका प्रशासनाने १२ रोजी होणाऱ्या महासभेचा अजेंडा काढला आहे. महासभेला अद्याप आठवड्याचा अवधी आहे. मात्र मंगळवारी किंवा बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होऊन राज्याच्या धोरणाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. यामुळे अपात्र नगरसेवकांसह महापालिकेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. बैठकीत वटहुकूम काढण्याच्या निर्णय झाला तरच नगरसेवकांना महासभेत उपस्थित राहता येणार आहे. अन्यथा त्यांचे भवितव्य अधांतरी राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे गारगोटीत निदर्शने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

पेट्रोल-डिझेल, गॅस सिलेंडर दरवाढीच्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने सोमवारी भाजप सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. शहरातून सायकल फेरी काढून दरवाढीचा निषेध केला. पेट्रोल, डिझेल, गँस दरवाढ कमी करावी या मागणीचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन दिले. दरवाढीच्या कारणावरून अच्छे दिनचा नारा देणाऱ्या भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर पेट्रोल पंपावरील ग्राहकांना गुलाबपुष्प देऊन ग्राहकांच्यात जागरूकता निर्माण करीत दरवाढीचा निषेध केला. माजी आमदार के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली निषेध फेरी काढण्यात आली. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर देसाई, पंडितराव केणे, तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार, विलास कांबळे, के. ना. पाटील, संतोष मेंगाणे, विजय आबिटकर, बी. डी. भोपळे, संग्राम देसाई, उपरसरपंच सचिन देसाई, शेखर देसाई, धोंडिराम वारके, अजित देसाई, विलास झोरे, सर्जेराव देसाई, अशोक यादव, अशोक कांबळे, पी. एस. कांबळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संघर्ष ग्रुप तीन लाखाचा मानकरी

$
0
0

धनंजय महाडिक युवाशक्तीचा दहीहंडीचा चार तास थरार, ट्रीपल एक्काचा फॉर्म्यला यशस्वी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एकावर एक मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकातील चढाओढ, ठेका धरायला लावणारा संगीताचा ठेका, सोबतीला गोविंदांचा गजर आणि क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा अशा जल्लोषी वातावरणात तब्बल चार तास खासदार धनंजय महाडिक युवाशक्तीचा दहीहंडीचा थरार रंगला. चार मानवी मनोरे आणि त्यावर ट्रिपल एक्काचा (एकावर एक तीन गोविंदा) अशा पध्दतीने रचना करत गडहिंग्लजच्या संघर्ष ग्रुपने युवा शक्तीची ३८ फूट उंचीवरील दहीहंडी फोडली अन् तीन लाख रुपयांचे बक्षीस जिंकले.

नेताजी पालकर व्यायामशाळा गोविंदा पथक गडहिंग्लज, जय हनुमान तालीम मंडळ शिरोळ, शिवाजी युवक मंडळ तासगाव, शिवगर्जना तासगाव यांच्यामध्ये तीन लाख रुपयांच्या बक्षीसाची दहीहंडी फोडण्यासाठी कमालीची चुरस नागरिकांनी अनुभवली. दसरा चौक पटागंणावर सोमवारी रात्री दहीहंडीचा थरार अनुभवण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी लोटली होती. डीजेचा ठेका आणि गोविंदा रे गोपाळाच्या तालावर तरुणाई थिरकली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस समारंभ झाला.

दहीहंडी स्पर्धेत सहभागी गोविंदा पथकांनी पाच थरांची सलामी दिल्यानंतर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी दहीहंडी ५४ फुटांवरुन ४४ फूट उंचीवर आणली. सात गोविंदा पथकांनी या फेरीत सहभाग नोंदवत सहा व सात थर रचले. मात्र दहीहंडी फोडण्यात ते अपयशी ठरले. यामुळे पुन्हा दहीहंडी ३९ फूट उंचीवर आणली. सहभागी संघांमध्ये दहीहंडी फोडण्यासाठी पुन्हा एकदा कमालीची चढाओढ पाहावयास मिळाली. या फेरीतही कुणाला यश न मिळाल्याने दहीहंडीची उंची ३८ फुटांवर आणली. यामध्ये संघर्ष ग्रुपने जिगरबाज वृत्तीचे दर्शन घडवित काही मिनिटातच सात थर रचले. वरच्या थरावरील गोविंदाने दहीहंडी फोडताच मैदानात एकच जल्लोष सुरू झाला.

.........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक पुरस्कारांचा घोळात घोळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या शिक्षक पुरस्कारासाठी प्राप्त शिक्षकांच्या नावाची घोषणा उद्या (मंगळवारी) करण्यात येणार आहे. पुरस्कार निवडीत यंदाही राजकारण आणि जवळच्या शिक्षकांची निवड करण्याचा अट्टाहास असा प्रकार घडल्याने नियोजित वेळेत पुरस्काराची घोषणा झाली नाही.

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी तालुका पातळीवरुन छाननी होऊन अर्ज आल्यानंतर प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची पुरस्कारासाठी निवड होणार होती. मात्र यातही घोळ असल्याचे दिसून येत आहे. काही सदस्यांनी आपापल्या तालुक्याला जादा प्रतिनिधीत्व मिळावे असा आग्रह धरला. त्यामुळे हातकणंगले व करवीर तालुक्यातील दोघा शिक्षकांना यंदा पुरस्कार दिला जाणार आहे. अन्य तालुक्यातून प्रत्येकी एका शिक्षक आणि करवीर, हातकणंगलेतून दोघा शिक्षकांना पुरस्कारावरून नवा वाद उपस्थित झाला आहे. या दोन तालुक्यांवर मेहेरनजर कशासाठी? असा सवाल यानिमित्ताने काही सदस्यांनी उपस्थित केला. तालुका पातळीवरील अर्जाच्या छाननीनंतर शनिवारी जिल्हा परिषदेत संबंधित शिक्षकांच्या मुलाखती झाल्या. प्रत्येक तालुक्यातून चार शिक्षकांच्या मुलाखती झाल्या. त्यापैकी एकाची निवड करून नावे सोमवारी जाहीर करण्याचे ठरले होते. मात्र सोमवारी त्या नावाबाबत एकमत झाले नसल्यामुळे घोषणा एक दिवस लांबणीवर पडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीआरसीसाठी जिल्हा परिषद सज्ज, नऊ कमिट्या कार्यरत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचायत राज समितीच्या बुधवारपासून (ता. ५) सुरू होणाऱ्या तीन दिवसीय दौऱ्याची जिल्हा परिषद प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. प्रत्येक विभागाची माहिती अपडेट ठेवली आहे. शिवाय समितीच्या दौऱ्यात कसल्याही प्रकारची कसर राहू नये यासाठी प्रशासनाने नऊ समित्या स्थापन केल्या आहेत.

पंचायत राज समितीत २८ आमदारांचा समावेश आहे. प्रत्येक विभागातील त्रुटींची पूर्तता केली जात आहे. २०१३ पासूनचा आढावा घेतला जाणार आहे. समितीचा दौरा पाच ते सात सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. त्यांच्यासोबत सचिवालयातील अधिकारी असणार आहेत. मंगळवारी काही आमदार आणि अधिकारी दाखल होणार आहेत. तीन दिवसीय दौऱ्याचा कार्यक्रम निश्चित केला आहे. बुधवारी सकाळी दहा ते १०.३० दरम्यान पंचायत राज समितीची जिल्ह्यातील आमदारांसोबत अनौपचारिक चर्चा होणार आहे. सकाळी १०.३० ते ११ या वेळेत जिल्हा परिषदेचे पदाधिकारी समितीसोबत चर्चा करणार आहेत. सकाळी ११ वाजता २०१३-१४ च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवालातील जिल्हा परिषदेच्या संबंधातील परिच्छेदासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची साक्ष होणार आहे. गुरुवारी सकाळी नऊ वाजल्यापासून जिल्ह्यातील पंचायत समित्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा व ग्रामपंचायतींना भेटी असा कार्यक्रम आहे. समितीसमोर गट विकास अधिकाऱ्यांची साक्ष होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयडियल बिझनेसमॅन’ पुरस्काराने उद्योगपती घोडावत सन्मानित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योगपती, घोडावत ग्रुपचे सर्वेसर्वा संजय घोडावत यांना उद्योग व शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल पुणे मर्चंट चेंबर्सच्यावतीने आयडियल बिझनेसमॅन पुरस्काराने गौरविण्यात आले. पुण्यात झालेल्या कार्यक्रमात अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. संजय घोडावत व त्यांच्या पत्नी नीता यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

संजय घोडावत यांनी आतापर्यंत एफएमसीजी, विंड टर्बाइन, रिअल इस्टेट, टेक्स्टाइल, एव्हिएशन, फ्लोरीकल्चर आदी उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देऊन यशस्वी उद्योजकाची भूमिका बजावली आहे. घोडावत यांना यापूर्वी शिक्षण, उद्योग, कोर्पोरेट व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल देशातील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या उद्योग व शिक्षण क्षेत्राच्या यशस्वी वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

यावेळी संजय घोडावत म्हणाले, 'आमच्या ग्रुपने उद्योगक्षेत्रात उत्पादनाच्या बाबतीत गुणवत्ता व दर्जा जपून ग्राहकांना सेवा देण्याचे अविरत कार्य सुरू ठेवले आहे. ग्राहकांची विश्वासाहर्ता टिकवून ठेवण्याचे काम ग्रुपमधील प्रत्येक घटक करीत आहे. उद्योग व शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक व देश प्रगती नक्कीच साधता येईल. या पुरस्कारामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे.'

खासदार अनिल शिरोळे, पृथ्वीराज धोका, अशोक लोढा, राजेंद्र बाठिया, विजय मुथा, सतीश शहा, वालचंद संचेती, विजय भंडारी, जवाहर बोथरा, पोपटलाल ओस्तवाल, स्वप्नील बापट, प्रवीण चोरबेले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध मद्य जप्त

$
0
0

कुमरीनजीक अवैध मद्य जप्त

गडहिंग्लज : नेसरीनजीक कुमरी-आमरोळी रस्त्यावर अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या कारसह तिघांना अटक करण्यात आली. आज सकाळी कारवाई झाली. कारवाईत सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सचिन हवन्नाप्पा नाईक (वय २७, रा. आमरोळी, ता. चंदगड), दत्तात्रय आप्पा नाईक (वय ३४, रा. बिद्रेवाडी, ता. गडहिंग्लज), भरमू कृष्णा नाईक (वय ५०, रा. बिद्रेवाडी, ता. गडहिंग्लज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चोरट्या मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार कारवाई करण्यात आली. कारवाईत मारुती अल्टोमधून (जीए ०७ ई २२४९) विविध ब्रँडचे ४५ बॉक्स जप्त करण्यात आले. उपायुक्त यशवंत पवार, निरीक्षक युवराज शिंदे, उपनिरीक्षक जितेंद्र पवार यांच्यासह सुहास वरुटे, जयसिंग खुटावळे, सुखदेव सिद यांच्या पथकाने कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालकुंद्री ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणुकीचे निर्देश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणुक करण्याबाबतचे निर्देश जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चंदगड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. एकूण ११ सदस्यांपैकी ८ सदस्यांनी राजीनामे दिल्याने ग्रामपंचायतीची रचना वैधरित्या पूर्ण होत नसल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार प्रशासक नेमण्याची तरतुद आहे. त्यानुसार प्रशासक नेमणेचा परिपूर्ण प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश संबंधीत प्रशासनाला जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आले आहेत. प्रशासक नेमुणकीमुळे दुसर्‍यांदा कालकुंद्री ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त होणार आहे. कार्यकाळात सदस्यांनी राजीनामे दिल्याने प्रशासकाची नियुक्ती झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्याधिकाऱ्यांच्या बनावट सहीने बांधकाम परवाना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

फायबर शौचालयाच्या ४४ लाखांच्या बिलावरील सहीसंदर्भात घोळ असताना आता बोगस बांधकाम परवान्यावर तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्या सहीचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे नगरपालिकेत बोगस सह्या करणारी टोळी कार्यरत आहे की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी मुख्याधिकारी दीपक पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

बावचकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, २३ जून २०१७ रोजी झालेल्या नगरपालिकेच्या सभेत नगरपालिका हद्दीतील बांधकामांना दिल्या जाणाऱ्या बांधकाम परवान्यासंदर्भात हरकत घेतली होती. त्यावेळी नगरपालिकेकडून दिल्या जाणाऱ्या बांधकाम परवान्यांवर तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांच्या बनावट सह्या तसेच नगरपालिकेचे शिक्के असल्याचे पुराव्यासहित निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधितांवर फौजदारी कारवाईची मागणी सर्वच नगरसेवकांनी केली होती. नगराध्यक्षांनीही चौकशीचे आदेश दिले असताना या गंभीर प्रकरणाची साधी चौकशीही सत्ताधारी वा प्रशासनाकडून केली गेली नाही. त्याचप्रमाणे नगरसेवक राजू बोंद्रे यांनी ४ ऑगस्ट २०१८ रोजी फायबर शौचालयाच्या ४४ लाख रुपयांच्या बिलावर तत्कालीन मुख्याधिकारी रसाळ यांची सही संशयास्पद असल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली होती. त्याकडेही कानाडोळा केला जात आहे. ही प्रकरणे ताजी असतानाच ३१ जुलै २०१८ रोजी गृह बांधणीसाठी कर्ज देणाऱ्या फायनान्स लि. ने दोन ठिकाणांच्या बांधकाम परवान्यांची व संबंधित जागांच्या नकाशांची मागणी नगरपालिकेकडे केली होती. या प्रकरणाची अधिक चौकशी करता दोन्ही बांधकामांसाठी नगरपालिकेने बांधकाम परवानेच दिले नसल्याचे समोर आले. विशेष म्हणजे या परवान्यावरही तत्कालीन मुख्याधिकारी रसाळ यांचीच बोगस सही व शिक्के दिसून येतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आजाराला कंटाळून आत्महत्या

$
0
0

इचलकरंजी : आजारास कंटाळून मच्छिंद्रनाथ दत्तात्रय बुचडे (वय ५८) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात झाली आहे. याबाबत त्यांचा मुलगा राजेंद्र बुचडे याने पोलिसात वर्दी दिली. पुजारी मळा तिरंगा चौक परिसरातील मच्छिंद्रनाथ बुचडे हे गेल्या काही दिवसांपासून आजारांमुळे त्रस्त होते. सोमवारी दुपारच्या सुमारास कोरोचीतील अल्कली कस्तुरे गोदामाच्या पिछाडीस असलेल्या झाडाला बुचडे यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

.. तर ६०० घरांवर हातोडा

$
0
0

बालिंगा भूखंड घोटाळा, कोर्टाकडून गंभीर दखल

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर

करवीर तालुक्यातील बालिंगा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला हाताशी धरून नियमबाह्य वाटप केलेल्या भूखंडांवर सुमारे ६०० घरे बांधण्यात आली आहेत. दरम्यान, भूखंड वाटप बेकायदेशीर, नियमबाह्य झाल्याची याचिका हायकोर्टात दाखल झाली असून सुनावणी होऊन कोर्टाने आदेश दिल्यास प्रशासनास ६०० घरांवर हातोडा चालवावा लागणार आहे. अन्यथा सरकारकडून परवानगी घेऊन दंडात्मक रक्कम घेत ती घरे नियमित करावी लागणार आहेत.

बालिंगा गावात वाढीव गावठाणची ४० एकर तर गायरानची १७ एकर जमीन आहे. शहरालगत गाव असल्याने भूखंडाला सोन्याचा भाव आहे. त्याचा आर्थिक लाभ उठवण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सरकारी जमिनीची जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेताच विल्हेवाट लावली. वाढीव गावठाणच्या ४० एकर जमिनीचे भूखंड पाडून ६०० भूखंडांचे चुकीच्या पध्दतीने वाटप केले. त्यातून सरकारी मूल्यांकनानुसार सरकारचे २०० कोटींचे नुकसान झाले. शिवाय गरजूंना भूखंड विकून लाखोंची कमाई केली. १९८२ पासून सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भूखंडावर डल्ला मारला. त्यामुळे २०१४ मध्ये गायरान व गावठाण भूखंड घोटाळ्याची तक्रार ग्रामस्थ कपिल कृष्णात जांभळे यांनी पंचायत समितीकडे केली. त्याची चौकशी झाली. चौकशीत भूखंडांचे वाटप नियमबाह्य झाल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले. तलाठ्याने गावठाणची ४० एकर तर गायरानची १७ एकर जमीन सरकारच्या ताब्यात असल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षात ग्रामपंचायत दप्तरातून गावठाण जमिनीवरील सरकारची नोंद गायब झाली आहे. गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. असे असतानाही जिल्हा परिषद, ग्रामपंचात आणि महसूल प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नाही. सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत गैरप्रकाराला पाठिशी घातले. तक्रारदारालाच मॅनेज करण्याचे कौशल्य ग्रामपंचायत कारभाऱ्यांना असल्याने घोटाळा बाहेर आला नाही. म्हणून शेवटी जागृत ग्रामस्थ शरद संभाजी जांभळे यांनी माहिती अधिकाराखाली भूखंड घोटाळ्याची सर्व कागदपत्रे मिळवली. प्रशासन काहीही करीत नसल्याने हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली. याचिका दाखल होऊन १४ सप्टेंबरला सुनावणी होणार असल्याने ग्रामपंचायत, पंचायत समिती, महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे.

---------------

कोट

'भूखंड घोटाळ्यात तथ्य असल्यानेच हायकोर्टाने याचिका दाखल करून घेतली आहे. याचिकेतील पुरावे भक्कम असल्याने कोर्टाने गंभीर घेतली आहे. सुनावणीनंतर आमच्या बाजूने निकाल लागला तर बेकायदेशीर वाटप केलेल्या भूखंडांवर बांधलेल्या ६०० घरांवर हातोडा मारावा लागेल किंवा दंडात्मक रक्कम भरून घ्यावी लागेल.

शरद जांभळे, याचिकाकर्ते

--------------

कोट

'बालिंगा भूखंड वाटपासंबंधीची तक्रार जि. प. ग्रामपंचायत विभागाकडे आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी झाली. चौकशीत भूखंड वाटप चुकीचे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी दोषी ग्रामसेवकास निलंबित केले असून त्याची खातेनिहाय चौकशीही सुरू आहे.

राजेंद्र भालेराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)

----------------

चौकट

महसूल प्रशासनाचे कानावर हात

बालिंगा भूखंड घोटाळा सुमारे २०० कोटींचा आहे. त्यासंबंधी महसूल प्रशासनास माहिती आहे, असे तक्रारदार जांभळे यांचे म्हणणे आहे. याउलट महसूल प्रशासनाने या प्रकरणी कानावर हात ठेवले आहेत. कोर्टाकडून विचारणा झाल्यानंतर खुलासा केला जाईल, अशी सध्याची त्यांची भूमिका असल्याचे दिसते.

----------------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हासुर्लीत अडीच लाखांचा गुटखा जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

राधानगरी पोलिसांनी सोमवारी तालुक्यातील म्हासुर्ली बाजारपेठेत गुटखा, सुगंधी तंबाखूजन्य पदार्थांसह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

राधानगरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक इंदलकर यांनी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार धामोड ते म्हासुर्ली जाणाऱ्या मार्गावरून अल्टो कारमधून (एमएच १ एनए ३९०५) प्रतिबंधित तंबाखुजन्य मालाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार राधानगरी पोलिसांनी म्हासुर्ली बाजारपेठेत सापळा रचला. बंदी असणारा गुटखा, सुगंधी तंबाखू आदी प्रतिबंध पदार्थांचा साठा, वाहतूक व विक्री करताना वाहनचालक सुनील महिपती चौगुले (वय ३०, आवळी बुद्रूक), तानाजी गोविंद फराकटे (३४, रा. आणाजे) हे म्हासुर्ली बाजारपेठेत नेताना सापडले. अल्टोमध्ये विमल पानमसाला, तंबाखू, आर्यन गुटखा, स्टार पान मसाला, राज कोल्हापूरी पानमसाला, राज जर्दा असा वेगवेगळा मुद्देमाल आढळला. हा माल म्हासुर्लीत संदीप शामराव पाटील (वय २५) यांच्या हॉटेलमध्ये विक्री होणार होती. चहा टपरीततही पिशव्यांमध्ये भरलेला विमल पान मसाला, तंबाखू, आर्यन गुटखा, स्टार पान मसाला, राज कोल्हापुरी पान मसाला, राज जर्दा व तंबाखूजन्य माल जप्त करण्यात आला. पुढील कारवाई असून कोल्हापूर विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी ए. जे. टोणपे यांच्याकडे देण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक महादेव पाटील, कॉन्स्टेबल प्रशांत गोजारे, अजित देसाई, अमर पाटील, सचिन पारखे यांचा कारवाईत सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला बचत गटांची कर्जाच्या आमिषाने फसवणूक

$
0
0

तीन लाखांची फसवणूक, दोन महिलांना अटक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सहकारी बँकेकडून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोन महिला गटांकडून तीन लाख रुपये उकळण्याचा प्रकार घडला . याबाबत चौघांवर गुन्हा दाखल झाला असून, यातील दोन महिलांना जुना राजवाडा पोलिसांनी सोमवारी (ता. ३) अटक केली.

अनिकेत शेट्टी उर्फ यल्लाप्पा वैजू कोलकर (रा. सांबरा, ता. कुंदापूर, जि. बेंगळुरू), सीमा सागर दवडते, शारदा तानाजी शेट्टी, आकाश शेट्टी (तिघेही रा. फुलेवाडी, पहिला बसस्टॉप) यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, यातील शारदा शेट्टी आणि सीमा दवडते या दोघींना पोलिसांनी अटक केली. अटकेतील दोघींना मंगळवारी कोर्टात हजर केले जाणार आहे.

जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै ते २८ सप्टेंबर २०१७ या कालावधीत अनिकेत शेट्टी उर्फ यल्लाप्पा वैजू कोलकर (रा. सांबरा, ता. कुंदापूर, जि.बेंगरळुरू), शारदा शेट्टी, सीमा दवडते, आकाश शेट्टी (सध्या रा. फुलेवाडी) या चौघांनी संगनमताने ध्रुव संदेश ग्राम अभिरुदी सहाय्य को. ऑपरेटिव्ह सोसायटी लि. यांच्यामार्फत महिलांना उद्योगासाठी कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी १३ महिलांचा 'शिवम' या नावाचा बचत गट तयार केला. प्रोसेसिंग फी व इतर खर्चासाठी या गटाकडून १ लाख ५४ हजार रुपये घेतले. त्यानंतर २१ महिलांच्या वैयक्तिक कर्जासाठी १ लाख ३९ हजार रुपये भरून घेतले. दोन्ही गटांकडून २ लाख ९३ हजार रुपये घेऊनही कर्ज दिले नाही. महिलांनी अनेकदा या चौघांकडे पैशांची मागणी केली. मात्र, या चौघांनीही पैसे देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अमृता अमोल सावंत (२६, रा. कोयना कॉलनी, गांधीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अनिकेत शेट्टी व आकाश शेट्टी यांना यापूर्वीच अटक झाली होती. उर्वरित संशयित आरोपी शारदा शेट्टी व सीमा दवडते यांना सोमवारी दुपारी अटक केली. मंगळवारी त्यांना कोर्टात हजर केले जाणार असल्याचे निरीक्षक मानसिंग खोचे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपसभापतींचा राजीनामा

$
0
0

गडहिंग्लज पंचायत समिती उपसभापतींचा राजीनामा

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकराच्या सुमारास बहुचर्चित पंचायत समितीची सभा झाली. अविश्वास प्रस्ताव दाखल झालेल्या सभापती जयश्री तेली यांनी चार दिवस अगोदर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे राजीनामा दिल्याने आजची सभा ही फक्त सोपस्कार ठरली. दुपारनंतर उपसभापती बनश्री चौगुले यांनी गटविकास अधिकारी सीमा जगताप यांच्याकडे राजीनामा दिल्याचे चर्चा सुरु आहे.

पंचायत समितीमधील सात सदस्यांनी बंड केल्याने सभापती तेली यांच्याविरोधात अविश्वास दाखल झाला. दरम्यान एक सप्टेंबर रोजी तेली यांनी राजीनामा दिला. त्यामुळे आजची सभा सोपस्कार ठरली. विशेष सभेला भारतीय जनता पक्षाचे तिन्ही सदस्य गैरहजर होते. पीठासीन अधिकारी रामलिंग चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश वाचून दाखविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images