Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

खर्डेकरांचे शिक्षण क्षेत्रातीलरचनात्मक कार्य अद्वितीय

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी ज्ञानदानाचे कार्य करताना शिक्षणक्षेत्रात रचनात्मक काम केले. स्वत:च्या नोकरीला तिलांजली देताना शिक्षकांना न्याय मिळवून दिला. ज्ञानदान व रस्त्यावरील संघर्ष करताना कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करताना त्यांच्या भाषणांनी पंडित जवाहरलाल नेहरूही प्रभावित झाले. खर्डेकरांचे शिक्षण क्षेत्रातील रचनात्मक कार्य अद्वितीय होते,' असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले.

बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर-निंबाळकर फाउंडेशन आणि जागर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बॅरिस्टर खर्डेकर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार व प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील होते.

माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी बॅरिस्टर खर्डेकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडून दाखविले. ते म्हणाले, 'खर्डेकरांचे व्यक्तिमत्त्व राजबिंडे होते. ते ज्ञानोपासक होते. त्यांनी शिक्षणक्षेत्रात अविश्रांत रचनात्मक कार्य केले. राजाराम, एल्फिस्टन कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन परदेशात बॅरिस्टर परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. पण त्यांनी वकिली न करताना उच्चशिक्षणात प्राध्यापक म्हणून काम केले. राजाराम कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून काम करताना दर्जेदार शिक्षणाबरोबर उत्कृष्ट प्रशासन यंत्रणा उभारली. त्या काळातील विद्यार्थ्यांना 'वुई आर राजारामियन' म्हणून अभिमान वाटावे असे कार्य केले. एकीकडे ज्ञानदानाचे कार्य करत असताना शिक्षकांच्या पगारासाठी त्यांनी रस्त्यावर उतरून मोर्चा काढला. शिक्षकांना पगारवाढ करताना तत्कालीन राज्यकर्त्यांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितल्यावर खर्डेकर व प्राचार्य एम. आर. देसाई यांनी राजीनामा दिला. त्यानंतर शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून कागल, कोल्हापूर, वेंगुर्ला येथे शाळा व महाविद्यालयांची स्थापना केली.'

कार्यक्रमाला माजी उपसचिव डी. पी. मेतके, शानूर मुजावर, सचिन तोडकर, प्रा. बी. जी. मांगले, संग्रामसिंह खर्डेकर, पीटर चौधरी, आदी उपस्थित होते.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘गोकुळ’ची पूरग्रस्तांना ५१ लाखांची मदत

0
0

फोटो...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केरळमध्ये पावसाने अक्षरश: थैमान घातले असून, लाखो लोकांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. अनेक कुटुंबे बेघर झाली असून अशा पूरग्रस्तांना सामाजिक बांधिलकी म्हणून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने (गोकुळ) ५१ लाखांची मदत दिली. रोख रक्कम व वीस लाख रुपये किमतीची दूध पावडर दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

ताराबाई पार्क येथील मुख्य कार्यालयात गोकुळचे मार्गदर्शक माजी आमदार महादेवराव महाडिक व अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते मंत्री जानकर यांच्याकडे मदत सुपूर्द केली.

केरळ राज्यात प्रचंड अतिवृष्टी होऊन नैसर्गिक आपत्तीचा येथील जनतेला सामना करावा लागत आहे. जीवित हानीबरोबर प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. अनेकजण बेघर झाल्यामुळे अन्नपाण्याविना हाल सुरू आहेत. त्यामुळे येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देशातून ओघ सुरू झाला आहे. अशीच मदत शनिवारी गोकुळच्या वतीने देण्यात आली. पूरग्रस्तांना मदत म्हणून गोकुळच्या वतीने रोख १६ लाख रुपये व वीस लाख रुपये किमतीची दूध पावडर, तसेच गोकुळच्या सर्व कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन सुमारे १५ लाख अशी ५१ लाखांची मदत मंत्री जानकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी दुग्धविकास अधिकारी अरुण चौगले, सहायक निबंधक गजेंद्र देशमुख, कर्मचारी संघटनेचे सेक्रेटरी संजय सदलगेकर, प्रशासन अधिकारी डी. के. पाटील, संजय दिंडे, शंकर पाटील, सदाशिव निकम, अजय पवार, लक्ष्मण पाटील, नामदेव कळंत्रे, रामकृष्ण पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात सातशे प्रक्रिया उद्योग

0
0

दुधाचा एकच ब्रँड करण्याला प्राधान्य/ जानकर

निवडणुकीपुरतेच राजकारण करा/ चरेगावकर

.....

शेतीमालाच्या खरेदी विक्रीसाठी एजन्सी

दहा लाख शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याचा निर्धार

सरकारला सहकाराचे वावडे नाही

आंदोलन आणि अडचणीच्या काळातही सरकारकडून पाठपुरावा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सामान्य शेतकऱ्याला श्रीमंत बनवण्यासाठी आता कंपन्यांच्या माध्यमातून दहा लाख शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पादन दुप्पट करण्याचा प्रयोग केला जाणार आहे. यातून उत्पादित होणाऱ्या शेतीमालाच्या खरेदी-विक्रीसाठी स्वतंत्र यंत्रणा (एजन्सी) उभी करण्यात येईल. त्याचबरोबर राज्यात प्रत्येक तालुक्यात शेतीमालावर प्रक्रिया करणारे ७०० उद्योग उभे करणार आहोत,' अशी घोषणा महसूल, कृषी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे केली.

'महाराष्ट्र सक्षम आहे, राज्यात दुधाचा एकच ब्रँड करण्यासाठी साऱ्यांनी साथ द्यावी,' असे आवाहन यावेळी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले. तर, राजकारण निवडणुकीपुरतेच करा आणि सहकाराच्या उभारणीसाठी सरकारला साथ द्या, असे आवाहन महाराष्ट्र सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी केले.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या कोल्हापूर आवृत्तीच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त सहकार विषयावरील 'मेक इन कोल्हापूर' कॉन्क्लेवमध्ये उपस्थित झालेल्या चर्चेला उत्तर देताना या सर्वांनी सहकाराला बळ देण्याची ग्वाही दिली. हॉटेल सयाजी येथे हा सोहळा रंगला. कोल्हापूरचा सहकार आणि सहकारातून विकासाचा मंत्र हा 'कॉन्क्लेव'चा मुख्य अजेंडा होता. साखर उद्योग, दुग्ध व्यवसाय, बँकिंग, शेती प्रक्रिया उद्योग, औद्योगिक क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साखर कारखानदारी, बँकिंग, दूध, शेती प्रक्रिया अशा सहकारातील विविध अंगांवर सांगोपांग चर्चा झाली.

यावेळी महापौर शोभा बोंद्रे, खासदार राजू शेट्टी, आमदार हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके, सुरेश हाळवणकर, डॉ. सुजीत मिणचेकर, संध्यादेवी कुपेकर, म्हाडाचे पुणे विभागाचे अध्यक्ष समरजीत घाटगे, सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम देशमुख, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते. मटा कॉन्क्लेवसाठी 'चाटे एज्युकेशन ग्रुप' हे एज्युकेशन पार्टनर तर मॉडर्न होमिओपॅथी किडनी अँड क्यूअर क्लिनिक हेल्थ पार्टनर होते. बँक ऑफ इंडिया बँकिंग पार्टनर तर जाधव इंडस्ट्रिज इव्हेंट पार्टनर होते. ज्योतिरादित्य इस्टेट डेव्हलपर्स रिअल इस्टेट पार्टनर होते.

शेती आणि सहकाराच्या माध्यमातूनच महाराष्ट्राला आर्थिक सुबत्ता प्राप्त झाली आहे. या क्षेत्रांमध्येच महाराष्ट्राचे हित आहे हे जाणून सरकारने पावले उचलली आहेत, असे स्पष्ट करुन पालकमंत्री पाटील म्हणाले, 'शेतीतील उत्पादन वाढवण्यासाठी दहा लाख शेतकऱ्यांची जबाबदारी कंपन्यांकडे सोपवण्यात येणार आहे. त्यासाठी सरकार प्रत्येक शेतकऱ्यामागे कंपनीला ठराविक रक्कम देणार आहे. या कंपनीने त्या शेतकऱ्याच्या शेतातील मातीपरीक्षण करण्यापासून बियाणे लावण्याबरोबरच खत आणि कीटकनाशकही द्यायचे आहे. तसेच विशिष्ट प्रकारचे टॉनिकही दिले जाणार आहे. या माध्यमातून शेतीमालाचे उत्पादन दुप्पट केले जाणार आहे. त्याचबरोबर ३५० तालुक्यात तेथील शेतीमालावर प्रक्रिया करणारे किमान दोन प्रकल्प उभे केले जाणार आहेत. सहकार तत्त्वावरील प्रकल्पासाठी सोसायटी स्थापन करावी. त्यांच्यासाठी अनुदान देण्यात येईल. यातून शेतीमालाला योग्य भाव मिळेल आणि प्रत्येक तालुक्यात रोजगारनिर्मितीही होईल.'

'महाराष्ट्र टाइम्स'च्या पुणे विभागाचे वरिष्ठ संपादक पराग करंदीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कोल्हापूर आवृत्तीचे निवासी संपादक विजय जाधव यांनी 'कॉन्क्लेव'बाबतची भूमिका मांडली. मुख्य प्रतिनिधी गुरुबाळ माळी यांनी आभार मानले. निनाद काळे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोशिमा’ अध्यक्षपदी पटेल, श्रीकांत पोतनीस उपाध्यक्ष

0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (गोशिमा) च्या अध्यक्षपदी लक्ष्मीदास पटेल, तर उपाध्यक्षपदी श्रीकांत पोतनीस यांची निवड करण्यात आली. कार्यकारी मंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत या निवडी बिनविरोध करण्यात आल्या. अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष सुरजित पवार होते.

यावेळी मानद सचिव म्हणून अजित आजरी यांना, तर खजिनदार म्हणून मोहन पंडितराव यांच्या नावाला एकमुखी मान्यता देण्यात आली. नूतन अध्यक्ष पटेल यांनी उद्योजकांच्या अडीअडचणी सोडवून सर्व उद्योजकांना पायाभूत व मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी जे. आर. मोटवाणी, देवेंद्र दिवाण, सचिन शिरगावकर, मोहन मुल्हेरकर, आर. पी. पाटील, राजीव पारीख, संग्राम पाटील, एस. एस. पाटील, संजय उरमनटी, राहुल बुधले, आदी उपस्थित होते.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्चस्ववाद्यांकडून संविधानाला धोका

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'संविधानाला वर्चस्ववादी लोकांकडून धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. संविधानात दुरुस्ती होऊ शकते. पण, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हा संविधानाचा गाभा बदलला तर संविधान शिल्लक राहणार नाही,' अशी भीती ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केली. बामसेफ आयोजित ३१ व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शाहू मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक भवनात अधिवेशनाचे उद्घाटन झाले. साहित्यिक नजुबाई गावित, निवृत्त पोलिस अधीक्षक डॉ. संजय अपरांती प्रमुख उपस्थित होते.

भारतीय समाज संमिश्र स्वरूपाचा आहे. मोठी भिन्नता आणि विविधता देशाला लाभली आहे, असे सांगून डॉ. साळुंखे म्हणाले, 'आपल्याला अखंडित राष्ट्र म्हणून उभे राहायचे असेल तर मूल्यांच्या जोरावर राष्ट्र जोडण्याचे काम केले पाहिजे. सध्या एकमेकांना तोडणाऱ्या शक्ती वेगवेगळे डावपेच आखून काम करत आहेत. त्यामुळे राष्ट्र जोडण्याचे काम निष्ठेने करत राहायला पाहिजे. राष्ट्राच्या उद्धारासाठी बांधीलकी आणि निष्ठा अत्यंत महत्त्वाची आहे. निष्ठा असेल तरच लोकतंत्राचे पालन होते. याचे भान राखले पाहिजे.'

साळुंखे म्हणाले, 'बहुजनांनी स्वत:ची प्रसारमाध्यमे प्रभावी करणे गरजेचे आहे. चार्वाक, महावीर, बुद्ध, शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांनी समाजाला दिशा दाखवूनही त्यांना प्रतिक्रांतीला सामोरे जावे लागले. माध्यमांकडे दुर्लक्ष करत राहिल्याने अशी स्थिती उद्भवते. आम्ही दुसऱ्या कुणाचे प्रतिबिंब असणार नाही, आम्ही गुलाम असणार नाही, असे सांगायचे असेल तर माध्यमे प्रबळ करण्यावर जोर द्यायला हवा. या देशातल्या विषम व्यवस्थेला उत्तर द्यायचे असेल तर फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेची गरज आहे. आजच्या वर्चस्ववादी लोकांना रंग बदलणे सोपे जात आहे. स्वातंत्र्याला छेद देणाऱ्या गोष्टी परत येत आहेत. स्वातंत्र्याला हिरावून घेण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक होत आहेत. कारण अशा प्रवृत्तींनाच स्वातंत्र्याची भीती वाटते. स्वातंत्र्य हे मूल्य महत्त्वाचे असून ते जपण्यासाठी तेवढीच मोठी किंमत चुकवावी लागते.'

सुरक्षिततेच्या बदल्यात गुलाम बनवले जात असल्याचे सांगून साळुंखे म्हणाले, 'गुलामगिरी स्वीकारल्यास माणूस म्हणून जगण्याचा अधिकार राहत नाही. सगळ्या महामानवांनी प्रवाहाविरोधात जाऊन काम केले. मात्र प्रवाहाविरोधात जाताना अनाठायी आक्रमकता रोखायला हवी. संघर्षाचा हेतू ठरवून काम करायला हवे. तसेच सूडबुद्धी न ठेवता विचारांची मांडणी करायला हवी. यासाठी कार्यकर्त्यांची एकजूट महत्त्वाची आहे. यापुढे हिंसेला अहिंसेने उत्तर द्यावे लागेल कारण हिंसा करणारा माणूस भित्रा असतो.'

महाराष्ट्र राज्य बामसेफचे अध्यक्ष रवी मोरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बामसेफ राष्ट्रीय अध्यक्ष डी. आर. आर्या, दीपा श्रावस्ती, प्रा. प्रभाकर निसर्गंध, नितीन गणोरकर, संजय मोहिते, तालीम हन्सारी, अरुण गोडघाटे, बाबासाहेब कांबळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप पोटनिवडणुकीच्या तयारीत

0
0

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर महापालिकेच्या १९ नगरसेवकांच्या पदांवर कोणत्याही क्षणी गंडातर येण्याची शक्यता आहे. नगरसेवकांचे पद राज्य सरकारच्या मेहरबानीवर अवलंबून असले तरी कोणत्याही क्षणी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ता मिळविण्यासाठी भाजप आणि ताराराणी आघाडीने पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यासाठी आघाडीच्या अपात्र ठरलेल्या सात जागा कायम राखत दोन्ही काँग्रेस व शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या १२ जागांवर विजय मिळविण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

महापालिका निवडणुकीनंतर सहा महिन्यांत विशेष प्रवर्गातून निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. म्युनिसिपल अॅक्टचा आधार घेऊन सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावल्याने १९ नगरसेवकांचे पद रद्द होणार आहे. हा निर्णय देत असताना पोटनिवडणूक घेण्याचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित असल्याने त्यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर गंडातर आलेल्या नगरसेवकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे धाव घेतली. पालकमंत्री पाटील यांनीही आश्वासनाच्या माध्यमातून नगरसेवकांना दिलासा दिला असला, तरी दुसरीकडे त्यांचे समर्थक मात्र पोटनिवडणुकीच्या मोर्चेबांधणीची तयारी करू लागले आहेत.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीपासून राज्यात व जिल्ह्यात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजप पर्यायाने पालकमंत्री पाटील यांनी यश मिळवले. सर्वच निवडणुकीत त्यांना माजी आमदार महादेवराव महाडिक गटाची साथ मिळाली. सर्वत्र विजयाचा वारू चौफेर उधळत असताना कोल्हापूर महापालिकेची सत्ता काबीज करण्यात त्यांना अपयश आले. आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांनी काठावरील बहुमत मिळवले. तरी भाजप-ताराराणी आघाडीने लक्षणीय यश मिळवले. पण शिवसेनेने भाजपची साथ सोडल्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी चमत्काराची आशा बाळगत लागेल त्या जोडण्या करण्याच्या सूचना केल्या. तरीही सत्ता काबीज करण्यात त्यांना अपयश आले. ही सल अद्यापही भाजप-ताराराणीच्या आघाडीमध्ये वेळोवेळी दिसून येते. काँग्रेस आघाडीने तीन महापौर करून सत्ता मजबूत केली. पण त्यानंतर आघाडीतील असंतोषाचा फायदा घेत स्थायी समितीचे महत्त्वाचे पद मिळवले. यानिमित्ताने सत्तारुढ गटातील खदखद चव्हाट्यावर आली. अद्याप ही खदखद कायम आहे. विकासकामाबाबतही शहरवासियांमध्ये समाधानाचे वातावरण नसताना पुन्हा निवडणुकीला सामोरे जायचे म्हणजे मनपातील सत्ताधाऱ्यांची अग्नीपरीक्षाच ठरणार आहे.

मॅजिक फीगरसाठी आखणी

सद्यपरिस्थितीचा फायदा घेण्यासाठी भाजप-ताराराणी आघाडीने पोटनिवडणुकीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या दणक्यात भाजप-ताराराणीचे सात नगरसेवक अडचणीत आले असले, तरी त्यांना लागेल ती आर्थिक रसद पुरवताना दोन्ही काँग्रेस व शिवसेनेचे एक अशा १२ जागा घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी इच्छुकांची चाचपणी सुरू असून कोणत्याही स्थितीत ४१ हा मॅजिक फिगर गाठण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. महापालिकेच्या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीची तयारीही केली जाईल. त्यामुळे महापालिकेत पुन्हा एखदा पालकमंत्री पाटील, महाडिक गट विरुद्ध आमदार मुश्रीफ व पाटील अशी लढत होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२ बालकांवर शस्त्रक्रिया

0
0

चंदगड : येथील ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत १२ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये सिस्ट ४, फायमॉसिस ४, टंग टाय ४ यांचा समावेश आहे. याकामी वैद्यकीय अधिकारी एस. एस. पाटील यांच्यासह डॉ. मनवाडकर, डॉ. एस. एस. साने, डॉ. कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण, डॉ. दळवी, डॉ. मुसळे यांचे सहकार्य लाभले. यापूर्वी शस्त्रक्रियांसाठी उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज व सीपीआर कोल्हापूर येथे जावे लागत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नारळ काढायला गेला आणि जीव गमावला

0
0

नारळ काढायला गेला

अन् बुडून जीव गमावला

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीतील वाहून आलेले नारळ काढण्यासाठी गेलेल्या दत्तात्रय केशव संकपाळ (वय ६५, रा. शिवाजी पेठ) या वृद्धाचा सुमारास बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शिवाजी पूल परिसरातील दशपिंड घाट परिसरात घटना घडली.

संकपाळ हे भाऊसिंगजी रोडवरील एका भेलच्या दुकानात नोकरीस करतात. नेहमी त्यांचा वावर पंचगंगा घाट परिसरात असतो. संकपाळ आणि त्यांचा मित्र सखाराम पाडळकर हे रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कपडे धुण्यासाठी नदीवर गेले होते. नदीकाठावर कपडे धूताना पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून आलेला नारळ काढत असताना संकपाळ यांचा पाय घसरुन ते पाण्यात बुडाले. त्यांचा मित्र पाडळकर यांनी आरडाओरड केला. त्यावेळी नदीकाठावर असलेल्या काही नागरिकांनी पाण्यात उड्या मारल्या. पण, संकपाळ यांना वाचवण्यात यश आले नाही. त्यानंतर अग्निशमन दलाशी संपर्क साधण्यात आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी एक तासानंतर संकपाळ यांचा मृतदेह बाहेर काढला. करवीर पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अध्यक्षांविरोधात चौघांनी थोपटले दंड

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकरी संघातील सत्तारूढ गटातील काही कारभाऱ्यांचा मनमानी कारभार पुन्हा एकदा वादाचा विषय ठरला आहे. शेतकरी संघांची स्थापना सर्वसामान्य घटकांसाठी झाली असताना एक पदाधिकारी आणि अन्य दोघा कारभाऱ्यांनी निवडणुकीबाबतचा पोटनियम दुरुस्तीसाठी सर्वसाधारण सभेपुढे ठेवला आहे. त्यामागे संघाची सूत्रे मूठभर लोकांच्या हाती राहावीत हा डाव असल्याचा संशय आल्याने सत्तारूढ गटातील चार संचालकांनी पोटनियम दुरुस्तीविरोधात भूमिका घेतली आहे.

पोटनियम दुरुस्ती सामान्य सभासदांवर अन्याय करणारी असल्याने मंजुरी देऊ नये, अशी मागणी आजी-माजी संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. पोटनियम दुरुस्तीवरून शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील व सत्तारूढ गटातील कारभारी संचालकांचा एकतर्फी कारभार पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. शेतकरी संघाची २८ ऑगस्टला सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेसमोर शेतकरी संघाच्या निवडणुकीला उभे राहण्यासाठी व्यक्ती व संस्था सभासदांच्या नावावर २५ हजार रुपयांचे शेअर्स असावेत. संबंधित व्यक्तीने प्रतिवर्षी २५ हजार रुपयांची खरेदी तर संस्था सभासदांनी एक लाख रुपये किमतीचा माल खरेदी करणे बंधनकारक करण्याचा पोटनियम दुरुस्ती मंजुरीसाठी ठेवला आहे.

ही पोटनियम दुरुस्ती शेतकरी सभासदांसाठी अन्यायी व एकाधिकारशाहीला प्रोत्साहित करणारी असल्याची भूमिका घेत विद्यमान संचालक शोभना शिंदे, मानसिंगराव जाधव, शिवाजीराव कदम व विजयादेवी राणे यांनी त्याला विरोध केला आहे. त्यांच्यासह संघाचे माजी अध्यक्ष वसंतराव मोहिते, माजी कार्यकारी संचालक अजितसिंह मोहिते, माजी संचालक विजय पोळ यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे संबंधित पोटनियम दुरुस्ती फेटाळावी, अशी मागणी केली. संघाचे माजी कार्यकारी संचालक सुरेश देसाई यांनी उपनिबंधकांकडे रितसर तक्रार करून पोटनियम दुरुस्तीला मंजुरी देऊ नये अशी मागणी केली आहे. संघात सध्या एक विद्यमान पदाधकारी, थकबाकीवरून संचालक पद गमावलेले एक माजी संचालक आणि संघावर दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करत असलेल्या एका संचालकाचा मनमानी कारभार वाढल्याच्या तक्रारी आहेत.

००००

कारभाऱ्यांना नेतेमंडळी चाप लावणार?

गेल्या निवडणुकीवेळी शेतकरी संघाचे जिल्ह्यातील विविध नेते एकत्र आले होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते व आमदार हसन मुश्रीफ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते व माजी आमदार विनय कोरे यांनी संयुक्त पॅनेल तयार केले होते. त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने १९ पैकी १९ जागा जिंकल्या होत्या. मात्र, सत्तारूढ गटातील काही कारभारी संचालकांनी पोटनियम दुरुस्तीचा प्रस्ताव आणला आहे. त्यांनी हा प्रस्ताव नेत्यांच्या संमतीने सभेसमोर मांडला की त्यांना न विचारता परस्पर रेटत आहेत यावरून सभासदांमध्ये तर्कवितर्क सुरू आहेत. कारभाऱ्यांना नेतेमंडळी चाप लावणार का? असा प्रश्न सभासद उपस्थित करत आहेत. गेल्या काही वर्षांत संघाच्या मोक्याच्या ठिकाणावरील जागांची विक्री झाली आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला मारहाण

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

किरकोळ वादानंतर एका व्यक्तीने डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने निवृत्त पोलिस उप अधीक्षक बाळासाहेब कोडिंबा सांगळे (वय ६० रा. ताराबाई पार्क) हे गंभीर जखमी झाले. शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास दाभोळकर कॉर्नर परिसरात ही घटना घडली

सांगळे यांचे दाभोळकर कॉर्नर परिसरात मद्यविक्रीचे दुकान आहे. शनिवारी मध्यरात्री काही व्यक्तींवर त्यांचा वाद झाला. वादातून एका व्यक्तीने त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने ते रस्त्यांवर कोसळले. परिसरातील स्थानिक नागरिकांनी त्यांना सीपीआरमध्ये उपचारास दाखल केले. पण, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. सीपीआर पोलिस चौकीत या प्रकरणी नोंद झाली आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलिस ठाण्यात याची झाली नाही. दाभोळकर कॉर्नर परिसरात गुंडगिरी वाढली असून परिसरात शाहूपुरी पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धडक मोर्चासाठी जिल्हाभर नियोजन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा आरक्षणासाठी चार सप्टेंबर रोजी मुंबईत काढण्यात येणाऱ्या धडक मोर्चासाठी जिल्हाभर नियोजन सुरू आहे. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी शहर आणि तालुका पातळीवर बैठका घेतल्या. नागरिकांनी अधिकाधिक संख्येने धडक मोर्चात सामील होण्याचे आवाहन केले. दरम्यान, सकल मराठा समाजाच्या आंदोलनाच्या व्यासपीठावर महिला कार्यकर्त्यांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम करीत लवकर आरक्षण मिळावे अशी मागणी केली.

सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते धडक मोर्चासाठी शहर आणि तालुकानिहान बैठका घेऊन नियोजन करत आहेत. रविवारी गारगोटी, आजरा, गडहिंग्लज, हुपरी, वडगाव येथे बैठका झाल्या. कार्यकर्त्यांनी शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, राजारामपुरी या भागात समाजातील मान्यवरांशी चर्चा केली. दसरा चौकातील धरणे आंदोलनाला रविवारी विविध संस्था, संघटनांनी पाठिंबा दिला. शिरोळ तालुक्यातील आलास येथील मुस्लिम सुन्नत जमातने आंदोलनात सहभाग घेतला. यामध्ये सोसायटीचे फजले अली पाटील, गौस साहेबवाले, इकबाल पाशा पटेल, चाँद पाशा पटेल, इरफान पटेल, मुनाफ देसाई, महमंद फारुक देसाई आदींचा समावेश होता. राज्य शिक्षक सेना, जिल्हा शाखेचे शिरीष मोरे, आनंद पाटील, अर्जुन पाटील, सुनील यादव यांचाही धरणे आंदोलनात समावेश होता.

रक्षाबंधन अन् आरक्षणाची मागणी

सकल मराठा समाज व जिजाऊ ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी दसरा चौकात व्यासपीठावर रक्षाबंधनाचा कार्यक्रम सादर केला. महिला कार्यकर्त्यांनी मुस्लिम समाजातील नागरिकांना राखी बांधत सामाजिक समतेचा संदेश दिला. मराठा आरक्षणाची मागणी केली. मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, मराठा महासंघाचे वसंत मुळीक उपस्थित होते. महिला कार्यकर्त्या सुनंदा चव्हाण, आयेशा खान, वैशाली जाधव, सारिका पाटील, सीमा सरनोबत, मीना नलवडे, अलका देवाळकर, रसिका देसाई, रतन शेळके, शहनाज शेख, कार्तिकी जाधव, अर्चना मेढे आदी यावेळी सहरभागी होत्या.

दरम्यान, शिवाजी चौकात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनस्थळी रक्षांबधनाचे औचित्य साधून मुलींनी भावाच्या हातावर रक्षाबंधनाचा धागा बांधून लवकर आरक्षण मिळावे अशी मागणी केली. कार्यक्रमात प्रसाद जाधव, राजू जाधव, राहुल इंगवले, किशोर डवंग, महेश कुलकर्णी, शिवराज गायकवाड, संपतराव पाटील आदींचा समावेश होता. याप्रसंगी 'एक मराठा लाख मराठा,' 'आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे,' 'आरक्षण कुणासाठी, आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी' अशा घोषणा दिल्या.

कार्यकर्त्यांनी घेतली उदयनराजेंची भेट

सकल मराठा शौर्य पीठाच्या कार्यकर्त्यांनी सातारा येथे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन आरक्षणाबाबत चर्चा केली. ठोस निर्णय घ्यावा अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. शिष्टमंडळात जयदीप शेळके, उदय लाड, राजेंद्र चव्हाण, जनार्दन पाटील, शिवाजी लोंढे, अक्षय घाटगे आदींचा समावेश होता. उदयनराजे यांनी 'कोल्हापूर दौऱ्यावर येण्याचे निश्चित झाल्यास शौर्यपीठास कळवू' असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुरवस्था

0
0

फोटो वृत्त.... अमित गद्रे

टेंबलाई मंदिर परिसर हे धार्मिक स्थान आणि विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून शहरवासियांच्या पसंतीचे ठिकाण. राज्य सरकारच्या निधीतून टेंबलाई मंदिर परिसरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली. मंदिर परिसराचे सुशोभिकरण, लॉन, अॅम्पी थिएटर, खेळणी साहित्य, जॉगिग ट्रॅक अशा विविध सुविधा केल्या. मात्र गेल्या काही वर्षात देखभाल दुरुस्तीकडे पूर्णत दुर्लक्ष झाल्यामुळे टेंबलाई मंदिर परिसराची दुरवस्था झाली आहे. टेकडीवरील शिल्पकृती खराब झाल्या आहेत. जॉगिग ट्रॅक, अॅम्पी थिएटरवर ठिकठिकाणी कचरा पडला आहे. खेळणी साहित्याची मोडतोड झाली आहे. उत्सव कालावधीतही साफसफाई होत नाही. देवस्थान समिती आणि महापालिकेने टेंबलाई मंदिर परिसराच्या सुशोभिकरणाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगारांवर हल्ला

0
0

कोल्हापूर : शिरोली एमआयडीसी परिसरात रॉड डोक्यात मारल्याने सोहेल मौला पठाण (वय २१, रा. चिकुर्डे, ता. वाळवा, जि. सांगली) हा कामगार गंभीर जखमी झाला. शनिवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शिरोली एमआयडीसी परिसरात कामगारांच्या दोन गटात वाद सुरू आहे. या वादातून पठाण यांच्यावर हल्ला झाला. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयित सागर सरनाईक, सुमित पाटील, महेंद्र साळे यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी नाटकाची ‘फोर्ब्ज’कडून दखल

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विठ्ठलाच्या भक्तीने देहभान हरपलेल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पत्नी अवली आणि विठ्ठलाची सहचारिणी रुक्मिणी यांच्यामधला भावपूर्ण संवाद रसिकांसमोर मांडणाऱ्या 'संगीत देवबाभळी' या नाटकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या नाटकाची 'फोर्ब्ज'च्या जगप्रसिद्ध मासिकाने दखल घेतली असून 'भारतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय होत असलेल्या नाटकांपैकी एक' असा या मासिकात 'संगीत देवबाभळी'चा गौरव करण्यात आला आहे. याशिवाय निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित 'अमर फोटो स्टुडिओ' तसेच 'इंदिरा', 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला', 'वाडा चिरेबंदी' या नाटकांचेही 'फोर्ब्ज'द्वारे कौतुक करण्यात आले.

तरुण नाटककार प्राजक्त देशमुख लिखित आणि दिग्दर्शित 'संगीत देवबाभळी' या संगीत एकांकिकेने सुरुवातीला एका स्पर्धेच्या माध्यमातून रंगमंचावर पाऊल ठेवले. स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर या नाटकाने काही महिन्यांपूर्वी व्यावसायिक रंगभूमीवरही पदार्पण केले. विठ्ठलाच्या भक्तीचा आधार घेऊन उलगडला जाणारा वेगळा विषय आणि त्याला साजेशा अशा संगीताचे मंचावरील प्रत्यक्ष सादरीकरण कमी कालावधीतच रसिकांना भावले. काही महिन्यांतच या नाटकाने १२५ प्रयोगांचा टप्पा पूर्ण केला. त्याची लोकप्रियता आणि विषयाचे सादरीकरण लक्षात घेऊन फोर्ब्जच्या मासिकाने जागतिक नाट्यकलेवर आधारित असलेल्या लेखामध्ये देवबाभळीची दखल घेतली आहे. 'देवबाभळी'सारख्या नाटकांद्वारे मराठी रंगभूमी तिच्या कक्षा रुंदावत असल्याचेही मत यामध्ये व्यक्त करण्यात आले आहे.

मराठी रंगभूमीच्या गेल्या काही वर्षांच्या प्रवासाबद्दल सांगताना 'अमर फोटो स्टुडिओ', 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला', 'इंदिरा', चंद्रकांत कुलकर्णी यांच्या 'वाडा चिरेबंदी' अशा प्रयोगशील नाटकांचीही मासिकाने दखल घेतली आहे. केवळ विनोदी नाटकेच नाही; तर वेगळ्या प्रकारचे विषय मांडण्यासाठीही मराठी रंगभूमी सक्षम होत चालली, आहे असे 'फोर्ब्ज'कडून सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीरशैव बँक अध्यक्षपदी राजेंद्र शेटे

0
0

वीरशैव बँकच्या

अध्यक्षपदी शेटे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वीरशैव को ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी राजेंद्र शेटे यांची तर उपाध्यक्षपदी अरविंद माने यांची निवड झाली. ज्येष्ठ संचालक नानासो नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मावळते अध्यक्ष दिलीप चौगुले यांनी शेटे यांचे अध्यक्षपदासाठी नाव सुचवले तर राजेश पाटील चंदूरकर यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी अरविंद माने यांचे नाव मावळते उपाध्यक्ष अनिल सोलापुरे यांनी सुचवले तर सूर्यकांत पाटील बुदिहाळकर यांनी अनुमोदन दिले. अध्यक्ष शेटे हे विश्वप्रभा उद्योगसमूहाचे संस्थापक असून कोल्हापूर व गोवा या ठिकाणी उद्योजक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. बैठकीला कल्लेश माळी, गणपतराव पाटील चंद्रकांत स्वामी, शकुंतला बनछोडे, राजेंद्र लकडे, अनिल स्वामी, रंजना तवटे, सदानंद हत्तरकी, चंद्रकांत सांगावकर, आप्पासो आर्वे, सिद्धार्थ मजली आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वांगी, फ्लॉवर महागला

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रक्षाबंधन आणि श्रावण मिहन्यातील तिसरा सोमवार या पार्श्वभूमीवर भाजीमंडईत रविवारच्या बाजारात मोठी उलाढाल झाली. वांगी आणि फ्लॉवरच्या दरात वाढ झाली तर टोमॅटोचा दर घसरला. प्रतिकिलो १० रुपये दराने टोमॅटोची विक्री झाली.

रक्षाबंधनाचा सण रविवारी, सुटीदिवशी आल्याने बाजारपेठेत ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. बटाटा, वांगी, टोमॅटो, फ्लॉवर, वाटाण्याला मोठी मागणी होती. पालेभाजांची आवकही बाजारात चांगली झाली. वांग्याच्या दरात १० रुपयांची वाढ झाली. तर फ्लॉवरचा गड्डा पाच ते दहा रुपयांनी महागला होता. उपवासाच्या पदार्थांत बटाटा, मिरचीलाही मोठी मागणी होती. बटाट्याचा दर प्रतिकिलो ३० रुपये तर मिरचीचा दर प्रतिकिलो ४० ते ६० रुपये होता. घेवडा, वरणा, दोडक्याचे दर प्रतिकिलो ४० रुपयांवर स्थिर होते. भेंडी, कारल्याला प्रतिकिलो ५० ते ६० रुपये दर मिळाला. कोबीचा दर १० ते २० रुपये होता. श्रावण महिना सुरू असल्याने सोमवारी स्वयंपाकात मुळ्याचा वापर केला जातो. ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे बाजारात मुळ्याची मोठी आवक झाली. पाच ते दहा रुपयाला प्रती नग असा दर होता.

पालेभाज्यांचीही मोठी आवक झाली. मेथी पेंढीचा दर दहा रुपयांना एक तर पंधरा रुपयांना दोन होता. शेपू, कांदा पात, कोथंबिरीची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने आणि सततच्या पावसामुळे दर चांगलेच घसरले आहेत. दहा रुपयांना दोन शेपू, कांदा व कोथंबिरीची पेंढीची विक्री झाली.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो, रुपयांत)

वांगी ४० ते ६०

टोमॅटो १०

भेंडी ५०

ढबू मिरची ४० ते ५०

गवार ८०

दोडका ४०

कारली ५० ते ६०

वरणा ४०

ओली मिरची ४० ते ६०

बटाटा २५ ते ३०

लसूण ३०

घेवडा ४० ते ५०

फ्लॉवर १५ ते ४० नग

कोबी १० ते ३० नग

मुळा ५ ते १० नग

पालेभाजी दर (पेंढी, रुपयांत)

मेथी १०

शेपू ५

कांदा पात ५

०००००००

फळांचे दर (प्रतिकिलो, रुपयांत)

सफरंचद १०० ते २००

डाळिंब ५० ते ९०

पपई ३५ ते ४० (नग)

केळी २० ते ६० (डझन)

जवारी केळी ३० ते ७० (डझन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जप्तीच्या वाहनांवर चोरट्यांचा डल्ला

0
0

'बुद्धगार्डन' मधील वाहनांच्या स्टेपनी, सीट्स, हॉर्न गायब

फोटो जोडले

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर :

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आणि महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईमध्ये जप्त केलेली वाहने केएमटीच्या बुद्धगार्डनमधील वर्कशॉपमध्ये ठेवली आहेत. जप्त केलेली वाहने शुल्क भरुन वाहनधारकांनी नेण्यापूर्वीच या वाहनांच्या स्टेपनी, सीट्स, हॉर्न, आरसे आदी साहित्यांवर चोरटे डल्ला मारत आहेत. त्यामुळे येथील सुरक्षारक्षकांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विविध स्वरुपाच्या वाहनांच्यावर कारवाई केली जाते. जप्त केलेली वाहने ठेवण्यास जागा नसल्याने ती बुद्धगार्डन येथे ठेवली जात आहेत. वाहनधारकांनी दंडात्मक रक्कम जमा केल्यानंतर ताब्यात घेतलेली वाहने वाहनमालकांच्या ताब्यात दिली जातात. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जप्त केलेल्या वाहनांबरोबरच वाहतुकीला अढथळा ठरणाऱ्या आणि बरेच दिवस रस्त्यावर पार्किंग केलेली वाहने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जप्त केली आहेत. दोन्ही विभागाची सुमारे २५० वाहने बुद्धगार्डनमध्ये ठेवली आहेत.

महापालिकेने जप्त केलेली वाहने एक ऑगस्टपासून शुल्क भरुन ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचबरोबर प्रादेशिक परिवहनकडे दंडाची रक्कम भरल्यानंतर वाहने ताब्यात दिली जात आहेत. मात्र वाहन ताब्यात घेताना वाहनांच्या स्टेपनी, सीट्स, हॉर्न, आरसे आदी साहित्यांची चोरी झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे वाहन ताब्यात घेण्यास आलेले वाहनधारक सुरक्षारक्षकांबरोबर हुज्जत घालत असून दररोज वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. बुद्धगार्डनच्या संपूर्ण परिसराला संरक्षक भिंत असली, तरी भिंतीची उंची कमी असल्याने भिंतीवरुन येऊन वाहनांचे विविध साहित्य गायब केले जात आहे. संपूर्ण परिसरासाठी एकच सुरक्षारक्षक असल्याने पहारा देण्यावर मर्यादा येत आहेत. त्याचाच फायदा घेऊन चोरटे वाहनांच्या साहित्यांवर डल्ला मारत आहेत. त्यामुळे वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने वाहतुकीस अढथळा ठरणारी ६९ वाहने ताब्यात घेतली आहेत. वाहनमालकांना दंडात्मक शुल्क भरुन देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र तीन आठवड्यात केवळ २२ वाहने संबंधित वाहनमालकांनी ताब्यात घेतली आहेत. या वाहनांच्या साहित्यांची अधिक चोरी होऊ नये, यासाठी संबंधित वाहनमालकांना वाहने नेण्यासाठी महापालिकेने पत्रव्यवहार करण्यास सुरुवात केली आहे.

चौकट

१४ एकराच्या जागेसाठी

एक सुरक्षारक्षक

बुद्धगार्डन येथे केएमटीचे वर्कशॉप १४ एकर इतक्या विस्तीर्ण परिसरात आहे. संपूर्ण परिसराला संरक्षक भिंत असून निम्म्या जागेत केएमटीची बस दुरुस्तीची कामे सुरू असतात. वर्कशॉपला एक गेट असून येथे दिवसरात्र सुरक्षारक्षक असतो. कर्मचारी, वाहनांच्या नोंदी ठेवाव्या लागतात. त्यामुळे इतरत्र लक्ष देता येत नाही. याच संधीचा फायदा घेऊन चोरटे जप्त केलेल्या वाहनांचे साहित्य चोरुन नेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डेक्कन’मध्ये प्रवेश सुरू

0
0

'डेक्कन'मध्ये प्रवेश सुरू

कोल्हापूर : विविध प्रकारचे तांत्रिक शिक्षण देणाऱ्या डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत पदविका तसेच सर्टिफिकेट कोर्ससाठी प्रवेश सुरू आहेत. व्यवसाय शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या बिल्डिंग साइट सुपरवायझर हा अभ्यासक्रम एक वर्ष कालावधीचा आहे. शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत घेतला जाणारा सर्टिफिकेट कोर्स इन व्हॅल्युएशन ऑफ इम्मुव्हेबल प्रॉपर्टीज हा कोर्स चार महिने कालावधीचा आहे. इंटेरियर स्केप अँड गार्डन डिझाइन हा अभ्यासक्रम एक वर्ष कालावधीचा आहे. प्रवेशासाठी डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ट्रेड सेंटर चौथा मजला न्यू शाहूपुरी येथे संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्या अस्मिता पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुमारवयासाठी साहित्याची आवश्यकता

0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'तंत्रज्ञानाच्या युगात मुलांमध्ये लवकर प्रौढत्व येत आहे. परिणामी कुमार वय कमी होत आहे. अशा काळात बदललेल्या परिस्थितीचा वेध घेत १० ते १६ या कुमार वयोगटातील मुलांसाठी साहित्याचे लेखन करणाऱ्यांची संख्या वाढायला हवी. लेखिका सोनाली नवांगुळ यांनी 'जॉयस्टिक' पुस्तकातून निमशहरी कुमार वयोगटातील मुलांचे वास्तव भावविश्व लिहिले आहे,' असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.

माउस मल्टिमीडियातर्फे प्रकाशित सोनाली नवांगुळ लिखित जॉयस्टिक पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी रविवारी आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रम शाहू स्मारक भवनमध्ये झाला.

देशमुख म्हणाले, 'कुमार वयातील भावविश्व झपाट्याने बदलत आहे. या वयात मुला-मुलींमध्ये शारीरिक, मानसिक बदल होत असतात. भावना तरल असतात. हे टिपलेले साहित्य कमी झाले आहे. त्यांच्यासाठीचे साहित्य वाढण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे काळाची गरज आहे. ग्रामीण आणि शहरातील कुमार वयातील मुलांमधील बदल भोवतालच्या परिस्थितीवरून वेगवेगळ्या पद्धतीने होत आहे. त्याचा नेमकेपणाने वेध घेऊन साहित्यनिर्मिती झाल्यास वाचनीय ठरेल. नवांगुळ यांनी उपदेश, सल्ला देण्यापलीकडचे कुमार वयातील मुलांमधील वास्तव लेखन आपल्या पुस्तकात केले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी केलेले लिखाण दर्जेदार आहे. कोल्हापूरसारख्या निमशहरी भागातील मुलांमधील भावना शब्दबद्ध केल्या आहेत.'

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राजन गवस म्हणाले, 'साहित्यजगतात कुमार साहित्य, गाण्यांचे लेखन अपेक्षित झालेले नाही, ही खेदाची बाब आहे. अशा कालखंडात नवांगुळ यांचे कुमार वयातील मुलांसाठीचे लेखन महत्त्वाचे आहे. भोवतालचे वर्तमान, मुलांमध्ये होत असलेल्या बदलाचा वेध त्यांनी पुस्तकात घेतला आहे. सध्याचा कालखंड मुलं नकोशी वाटण्याचा आहे. यामुळेच निवासी शाळांची संख्या वाढते आहे.'

कवी अजय कांडर म्हणाले, 'आजची परिस्थिती चांगली नाही. चांगला लेखक चांगला राहिला नाही, चांगला नट चांगला राहिला नाही. माणसांना चांगले जगावे असे वाटते. मात्र चांगले जगता येत नाही, असे वास्तव आहे. बाल, कुमार वयोगटातील मुलांमधील तरलताही बदलल्या आहेत. त्या नेमक्यापणाने टिपण्याचे काम नवांगुळ यांनी जॉयस्टिकमधून केले आहे.'

लेखिका सोनाली नवांगुळ म्हणाल्या, 'प्रकाशिका अमृता वाळिंबे यांच्या पाठपुराव्यामुळे कुमार वयोगटातील मुलांसाठी लेखन केले. या वयोगटातील भावकल्लोळ टिपले. बालवयात अपघातामुळे अपंगत्व आले असतानाही मोठ्या जिद्दीने लिखाण करीत आहे.' माउस मल्टिमीडियाच्या अमृता वाळिंबे यांनी प्रास्ताविकात जॉयस्टिक पुस्तकाबद्दल माहिती दिली. चिन्मय आठले, वसुधा खांडेकर यांनी जॉयस्टिक पुस्तकातील कथा सादर केली. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

०००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हद्दपार झालेल्या तिघांना अटक

0
0

कोल्हापूर : जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले असतानाही शहरात वास्तव्य करणाऱ्या तिघा आरोपींना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. मुज्जमील खुतबुद्दीन करणे (वय २८, रा. यादवनगर), हसन रफीक शेख (२१, रा. यादवनगर), संदीप उर्फ चिन्या अजित हळदकर (२१, रा. दौलतनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी तिघांवर वेगवेगळ्या गुन्ह्यात गुन्हे दाखल केले असून त्यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले होते. हद्दपारीची कारवाई सुरू असतानाही तिघेही कोल्हापुरात आल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. तिघांना सम्राटनगर तीन बत्ती चौकाजवळ अटक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images