Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पाणीपुरवठा तीन दिवस बंद

$
0
0
संगम टॉकीजसमोर सोमवारी रात्री फुटलेल्या शिंगणापूर योजनेच्या पाइपलाइनमुळे ई वॉर्डमधील बहुतांश भागाचा पाणीपुरवठा किमान तीन दिवस बंद राहणार आहे. या परिसरात पाणीपुरवठ्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे.

इथेनॉल निर्मितीतून जादा भाव शक्य

$
0
0
अतिरिक्त उसाचा साखरेऐवजी इथेनॉल निर्मितीसाठी केला तर प्रस्तावित दरापेक्षा उसाला एक हजार रुपये अधिक मिळू शकतात. परंतु सरकारला साखरनिर्मितीत कर अधिक मिळतो तसेच पेट्रोलियम कंपन्यांच्या हितसंबंधांना धक्का बसतो. म्हणून, इथेनॉल निर्मितीकडे सरकार दुर्लक्ष करते, असा आरोप जैवइंधन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शामराव देसाई यांनी पत्रकार परिषदेत केला.

काँक्रिट फोडूनच दुरुस्ती

$
0
0
आयआरबीच्या रस्त्याखाली असलेली शिंगणापूर योजनेची पाइपलाइन फुटल्याने संगम टॉकीजसमोरील ३५ मीटर रस्त्याची अक्षरशः वाट लागली आहे. ही लाइन सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याखाली असल्याने काँक्रिट फोडल्यानंतरच दुरुस्ती करता येणार आहे.

टेंडरच्या चक्रव्यूहात अडकला रस्ता

$
0
0
नगरोत्थान योजनेंतर्गत शहरातील काही रस्ते करण्याचे मंजूर झाले पण दोनवेळा टेंडर काढूनही प्रतिसाद न मिळाल्याने अनेक वर्षे दुर्लक्षित असलेला राजारामपुरी मेन रोड व साईक्स एक्स्टेन्शन रस्त्याला टेंडर मंजूर झाल्याशिवाय मुर्हूत मिळणार नाही.

सिमेंट ग्राउंटिंगमुळे थांबली गळती

$
0
0
दूधगंगा धरणाची (काळम्मावाडी) गळती जवळपास ७० टक्क्यांपर्यंत रोखण्यात यश आले आहे. सिमेंट ग्राउंटिंगचा प्रभावी वापर करून ही गळती थांबविल्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात वाया जाणारे पाणी रोखणे शक्य झाले आहे. हे धरण १९९९ मध्ये पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्याला गळती लागल्याचे लक्षात आले.

सरकार नोकरी देत नाही, खासगीत पगार कमी मिळतो

$
0
0
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्व मॅनेजमेंट बीएचएमएस पदवीधर सांभाळतात. पण राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये होमिओपॅथिक डॉक्टराला नोकरी मिळत नाही.

आम्हीच बदलू आमचा समाज

$
0
0
सगळ्यांना अंगभर कपडे मिळावेत, वडील, भावाने व्यसन सोडावे, किड्यामुंग्यांची चटणी करण्यापेक्षा सकस अन्न शिजावं म्हणून आणि झोपडीतच, पण आरोग्यपूर्ण जीवन जगता यावे म्हणून गडचिरोलीसारख्या भागातील जंगलाने व्यापलेल्या आणि असुविधांनी भरलेल्या छोट्याशा खेड्यात १३ ते १५ वर्षाची पाच मुले जीवाचे रान करत आहेत.

युवा महोत्सवात वैविध्यपूर्ण मिरवणूक

$
0
0
शिवाजी विद्यापीठ येथे २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवाच्या मुहूर्ताचे औचित्य साधून वैविध्यपूर्ण मिरवणूक काढण्यात येणार आहे.

साउथ इंडियनची ‘टेस्ट’

$
0
0
कोल्हापुरातच काय जगाच्या पाठीवर कोठेही गेला तरी दक्षिणात्य पदार्थांची चव चाखायला मिळणारच ! अगदी घरात देखील सिद्धहस्तपणे दक्षिणात्य पदार्थ बनवले जातात.

चॅम्पियन बॅनरची एनसीसीकडून फेरी

$
0
0
‘उत्तम नागरिक, देशभक्तीचा वसा, हाच खरा एनसीसीचा ठसा’, ‘जडणघडण युवकांची जाणा महत्ता एनसीसीची’ अशा घोषणा देत राष्ट्रीय छात्रसेनेतर्फे शहराच्या मुख्य मार्गावरुन बुधवारी चॅम्पियन मुख्यमंत्री बॅनर फेरी काढण्यात आली.

कळंबा तलावावर ओपन बार

$
0
0
मूर्ती व निर्माल्यदान उपक्रम राबवून सर्वांसमोर आर्दश ठेवणाऱ्या कळंबा तलावावर सध्या ओपन बार संस्कृती वाढीस लागत आहे. मद्यपानाबरोबरच येथे होणाऱ्या पार्ट्यांमुळे ओल्या कचऱ्याचे आणि बाटल्यांचे ढीग साचले आहेत.

चर्चा तर होणारच...

$
0
0
स्टेडियमच्या कोणत्या बाजूला कोणत्या संघाचे समर्थक बसलेले असणार तेसुद्धा ठरलेलं. मॅच सुरू झाली की, चिअरिंग तर असणारच, पण मैदानातील खेळाडूला हमखास शिव्या पण घालणारं पब्लिक.

पायाभूत सुविधांसाठी झगडा

$
0
0
उद्योगांसाठी वीज आणि पाणी या महत्त्वाच्या आणि पायाभूत बाबी. मात्र, त्यासाठी त्यांना अजूनही झगडावे लागत आहे. कधी वीज पुरेशी मिळत नाही म्हणून, तर कधी विजेच्या वाढलेल्या दरांसाठी आणि आता तर पाण्याचे दर वाढल्यामुळे पुन्हा पाणीदराचे ओझे उद्योगांवर पडले आहे.

मेळाव्याने दिला चारशेजणांना रोजगार

$
0
0
सरकारी नोकरी मिळण्याच्या संधी कमी झाल्या असल्या तरी, जागतिकीकरणामुळे खासगी क्षेत्रात निर्माण झालेल्या नोकरीच्या संधी व लघुउद्योजकांसाठी सरकारचे मिळणारे अनुदान यामुळे जिल्हा स्वयंरोजगार व रोजगार कार्यालयामध्ये नाव नोंदणी करण्याच्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे.

पंचगंगेत प्रथमच स्कुबा डायव्हिंग

$
0
0
जीवनमुक्ती सेवा संस्थेच्या व्हाईट आर्मीच्या आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये स्कुबा डायव्हिंगचे पथक तयार करण्यात आले आहे. महाराष्ट्रात प्रथमच आपत्कालीन व्यवस्थापनात प्रथमच स्कुबा डायव्हिंगचा वापर करण्यात येणार आहे.

‘ऑनलाइन’ शिक्षण खात्याचीच पिछाडी

$
0
0
शिक्षण उपसंचालक कार्यालयाचा कारभार ऑनलाइन झाला असला तरी खात्याच्या संकेतस्थळावर मात्र अद्याप जुनीच माहिती आहे. कार्यालयात कम्प्युटर असले तरी त्यावरील डेटा २०११ चा आहे.

सांगली महापालिका प्रशासनाचा पंचनामा

$
0
0
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत सभापती राजेश नाईक यांच्यासह सर्वच सदस्यांनी प्रशासनाच्या ढिसाळपणाचा पंचनामा केला. प्रभारी आयुक्त जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह यांच्याकडे फाईली असल्याचे सांगून अधिकारी पदाधिकाऱ्यांची दिशाभूल करत आहेत.

वाहनांचे भंगार करणा-यांना मोक्का

$
0
0
पलूस (सांगली) तालुक्यातील तुपारी भागात चोरीच्या जड वाहनांचे भंगार करणारा पांडुरंग घाडगे याच्यासह आठ जणांच्या टोळीला सांगली पोलिसांनी बुधवारी मोक्का लावला. जमिनीखाली अवजड वाहनांचे सांगाडे, सुटे भाग गाडल्याचा प्रकार ऑक्टोबरमध्ये उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ माजली होती.

शिक्षण व्यापाराची वस्तू झालीय!

$
0
0
‘माणसाला विचार असल्याने तो नराचा नराधम किंवा नारायणही बनू शकतो. त्यामुळे त्याने काय निवडावे, काय मिळवावे, हे त्याला समजावे यासाठी त्याच्यातील विवेक जागविण्यासाठी शिक्षण आवश्यकच आहे.

बैलगाडीला धडक दिल्याने दोघे जखमी

$
0
0
ऊसाचे वाडे घेऊन जाणाऱ्या बैलगाडीला पाठीमागून मारुती ओमनी गाडीने जोराची धडक दिली. या अपघातात बैलगाडीचे दोन्ही बैल व गाडीवरील दोघेजण जखमी झाले. हा अपघात पिंपळगांव खुर्द (ता.कागल) येथे कागल मुरगूड रोडवर आदर्श रोपवाटीकेजवळ सायंकाळी साडे सहाच्या सुमारास झाला.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images