Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आजऱ्यातून दोन गायी, सहा वासरे ताब्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

आजरा शहरात एका घरात बांधून ठेवलेल्या दोन गायी आणि सहा कालवडी (वासरे) आजरा पोलिसांनी ताब्यात घेतली. गायी व वासरांचे संरक्षण व संगोपनासाठी ती कणेरी येथील अदृश्य काडसिद्धेश्वर मठाकडे पाठविण्यात आली. सांगली येथील पीपल्स फॉर अ अॅनिमल्स (पश्चिम महाराष्ट्र) संस्थेचे अध्यक्ष अशोक आप्पासाहेब लकडे यांच्या तक्रार अर्जानुसार ही कारवाई करण्यात आली.

लकडे यांच्या अर्जानुसार येत्या बकरी ईदच्या अनुषंगाने प्रत्यक्ष पाहणी आणि खातरजमा केली असता, येथील दर्गा गल्लीमधील दोन ठिकाणी गायी व वासरे बांधून ठेवल्याचे आढळून आले. त्यानुसार त्यांचे मालक ताहीर अब्दुल कादर तकीलदार व जुनेद मुश्ताक मनेर (दोघेही रा. दर्गा गल्ली, आजरा) यांच्याकडे विचारपूस व चौकशी केली असता समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे या गायी व वासरे पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची ट्रकमधून मठाकडे रवानगी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कसबा बीडला स्वच्छता

$
0
0

कुडित्रे : कसबा बीड (ता. करवीर) ग्रामपंचायत व महादेव मंदिर भक्त मंडळाच्या पुढाकाराने ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारच्या पाश्वर्भूमीवर रविवारी अकराव्या शतकातील प्राचीन ऐतिहासिक महादेव मंदिराची संपूर्ण परिसरासह स्वच्छता करण्यात आली. महादेवाच्या दर्शनासाठी परिसरातील अनेक गावांतून तसेच दूरदूरवरून अनेक भाविक येत असतात. त्यामुळे ग्रामपंचायत व महादेव भक्त मंडळ यांनी ही स्वच्छता मोहीम राबवून सर्व परिसर चकाचक केला. यावेळी गोकुळचे संचालक व सरपंच सत्यजित पाटील, करवीर पंचायत समितीचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी, कुंभी कारखान्याचे संचालक उत्तमराव वरुटे, तुकाराम पाटील, प्रताप पाटील, रासपचे मुकुंद पाटील, श्रीनिवास पाटील, आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धनगर आरक्षणासाठी युवकाची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, परभणी

धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातील, सेलू तालुक्यातील गोमेवाकडी येथील १९ वर्षीय युवकाने रविवारी गळफास लावून आत्महत्या केली. मराठा आरक्षणासाठी गेल्या आठवड्यात सेलू तालुक्यातच एका युवकाने आत्मदहन केले होते.

योगेश राधाकिशन कारके असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी योगेशने 'मी धनगर आरक्षणासाठी जीव देत आहे', असे मोबाइलवर टाइप केलेले आढळून आले. त्याने तो मेसेज पुढे पाठवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र नेटवर्क नसल्याने तो पुढे गेला नाही, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि धनगर समाजातील लोकांनी सेलू पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी या युवकाच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दहा लाख रुपयांची मदत आणि घरातील एकाला सरकारी सेवेत घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर योगेशच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूध अनुदानासाठी ‘कॅशलेश’ची सक्ती

$
0
0

एंट्रो...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गायीच्या दुधाला पाच रुपये अनुदान मिळावे, या मागणीसाठी आंदोलन केले. या आंदोलनानंतर राज्य सरकारने दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दराची घोषणा केली. तसेच दूध संघांना पाच रुपये अनुदान देण्याचे आश्वासन दिले. संघांनी दूध दरवाढीची केलेली अंमलबजावणी, सरकारकडून मिळणारे अनुदान या विषयावर 'दूध अनुदानाचा घोळ' या मालिकेच्या माध्यमातून यावर टाकलेला प्रकाश आजपासून...

०००००

दूध अनुदानासाठी 'कॅशलेस' ची सक्ती

'घोळ दूध अनुदानाचा'

भाग १

Satish.ghatage@timesgroup.com

Twitt@satishgMt

कोल्हापूर : गायीच्या दुधाला पाच रुपये अनुदान थेट दूध उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्यासाठी राज्य सरकारने ऑनलाइन व्यवहाराद्वारे कॅशलेस व्यवहाराची सक्ती दूध संघ व दूध संस्थांवर केली आहे. अनुदानप्राप्तीसाठी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास विभागाकडून दूध संघ व संस्थांना सॉफ्टवेअरप्रणाली अपलोड करण्याची सक्ती केली आहे. दूध उत्पादकाच्या खात्यावर प्रतिलिटर २५ रुपयांची रक्कम जमा झाल्यानंतरच अनुदानाची रक्कम मिळणार असल्याने दूध संघांना अनुदानासाठी चांगलाच ताकतुंबा करावा लागणार आहे.

राज्य सरकारकडून संघांना दूध पावडरसाठी प्रतिकिलो ५० रुपये, तर दुधासाठी पाच रुपये प्रतिलिटर अनुदान देण्यात येणार आहे. अनुदानाची योजना १९ जानेवारी २०१९ पर्यंत दिली जाणार आहे. त्याचबरोबर गायीच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर देणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील गोकुळ, वारणा, शाहूसह ११ दूध संस्थांनी गायीच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दराची अंमलबजावणी एक ऑगस्टपासून सुरू केली आहे. गायीच्या दुधाचे संकलन करून ते दूध पिशवीतून विक्री करतात त्यांना दुधासाठी अनुदान मिळणार नाही. पण जे संघ गायीच्या दुधावर प्रक्रिया करुन दूध पावडर, टोण्ड, दही, ताक, लोणी, तूप, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड तयार करतात त्या संघांनाच अनुदान मिळणार आहे.

जिल्ह्यात सध्या गायीचे नऊ लाख १५ हजार १८७ लिटर दूध संकलन होते. जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) गायीच्या दुधावर कोणतीही प्रक्रिया करत नसल्याने त्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे, तर वारणा, प्रतिभा, शाहू हे दूध संघ गायीच्या दुधापासून पावडर व अन्य उत्पादने तयार करत असल्याने त्यांना सरकारी अनुदानाचा लाभ होणार आहे. पण हे अनुदान प्राप्त करण्यासाठी त्यांना प्रादेशिक दुग्धविकास अधिकाऱ्यांना अर्ज करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. तसेच सध्या दूध खरेदी दराची रक्कम थेट दूध उत्पादकांच्या खात्यावर ऑनलाइन जमा करण्याचे बंधन घातले आहे.

नोटाबंदीच्या काळात दुग्ध विकास विभागाने ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करण्याचे बंधन घातले होते. जिल्ह्यात सव्वातीन लाखांहून अधिक दूध उत्पादक असून, सव्वादोन लाख दूध उत्पादकांची खाती आहेत. फक्त १५ हजार दूध उत्पादकांना कॅशलेस पेमेंट केले जाते. जिल्ह्यात दूध संघांकडून संस्थांकडे दुधाचे बिल जमा होते. त्यानंतर दूध उत्पादकांना रोखीने अथवा त्यांच्या बँक खात्यावर बिल जमा होते. गोकुळ, वारणा दूध संघांनी ऑनलाइन बिल जमा करण्यात आघाडी घेतली आहे. पण खासगी दूध संघांकडून रोखीने व्यवहार होत असल्याने त्यांना ऑनलाइन पेमेंटची यंत्रणा उभा करावी लागणार आहे.

दुग्ध विकास खात्याकडून उत्पादकाच्या खात्यावर किती रक्कम जमा झाली याची माहिती मिळावी यासाठी दुग्ध विकास विभागाने सॉफ्टवेअर तयार केले आहे. हे सॉफ्टवेअर दूध संघ, दूध संस्थांना अपलोड करणे बंधनकारक होणार आहे. दूध संघांनी २५ रुपये दराने बिल दिले आहे की नाही याची सॉफ्टवेअरवरून खातरजमा केली जाणार आहे. संघांनी गायीच्या दुधावर प्रक्रिया करुन कोणती उत्पादने तयार केली आहेत याची माहिती सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सरकारला मिळणार आहे. सॉफ्टवेअरच्या माहितीवरून जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी अनुदानासाठी प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकाऱ्यांना अहवाल पाठविणार आहे. प्रादेशिक अधिकारी दर दहा दिवसांचा अहवाल दुग्धव्यवसाय आयुक्तांकडे पाठवतील. त्यानंतर अनुदानाची रक्कम दूध संघांना मिळणार आहे. त्यामुळे पाच रुपये अनुदानासाठी दूध संघांना मोठा खटाटोप करावा लागणार आहे. दूध संघांकडून सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत नाराजी व्यक्त केली जात असली तरी व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी व थेट दूध उत्पादकांना अनुदानाचा लाभ मिळावा यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात असल्याचा दावा केला जात आहे.

००००

कोट...

गायीच्या दुधाला पाच रुपये अनुदान देण्यासाठी दूध संघ व संस्थांना ऑनलाइन व्यवहार करावे लागणार आहेत. त्यासाठी दुग्धविकास खात्याने सॉफ्टवेअर तयार केले असून, पुढील आठवड्यात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील सर्व दूध संघांकडे सॉफ्टवेअर अपलोड केले जाईल. त्यानुसार अनुदानाची रक्कम खात्यावर जमा होणार आहे.

अरुण चौगुले, विभागीय दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी

०००००

जिल्ह्यातील गाय दूध संकलन : ९ लाख १५ हजार १८७ लिटर

प्राथमिक दूध संस्था : ४४५०

दूध उत्पादक सभासद : ३ लाख १५ हजार ४१८

उत्पादकाची बँक खाती : २ लाख ३४ हजार ९९७

बँक खाते नसलेले उत्पादक : ८० हजार ४२१

गोकुळ दूध संकलन : ११ लाख ३८ हजार ६३५ लिटर

वारणा दूध संकलन : ३ लाख ६४ हजार ८१० लिटर

स्वाभिमानी संघ : ६६ हजार ३९५ लिटर

००००

उत्पादकांसाठी गाय दूध दर

गुणप्रत प्रतिलिटर

३.२ फॅट २४.१० रुपये

३.३ फॅट २४.४० रुपये

३.४ फॅट २४.७० रुपये

३.५ फॅट २५ रुपये

०००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएसच्या हाती महत्वाचे धागेदोरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) राज्यातील प्रमुख शहरात घातपात घडविण्याच्या तयारीत असलेले संशयित शरद कळसकर, वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर या तिघांना ताब्यात घेतले. नरेंद्र दाभोलकर, ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे हत्या प्रकरण, पत्रकार गौरी लंकेश हत्या, गोव्यातील मडगाव बॉम्बस्फोट आणि दोन दिवसांपूर्वी मुंबईतील नालासोपारा येथून जप्त केलेला शस्त्रसाठा या पाच घटनांचे कनेक्शन सांगली आणि कोल्हापूरमध्ये असल्याचे महत्वाचे धागेदोरे असल्याची चर्चा आहे. सध्याच्या तपासात एटीएसला काही महत्वाची माहिती मिळाली आहे. या सर्व हत्यांचा छडा लावण्यासाठी कोल्हापूर आणि सांगलीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

मुंबईतील नालासोपारा परिसरातील एका घरातून स्फोटके जप्त करण्यात आली. या प्रकरणी एटीएसने ताब्यात घेतलेल्या तीन संशयितांची कोल्हापुरात ये-जा सुरू असल्याचे तपासात उघड होत आहे. कोल्हापुरात वास्तव्यास असलेल्या कळसकरला त्याचे मित्र सुधन्वा आणि वैभव राऊत हे कोल्हापुरात येऊन भेटल्याचे तपासात उघड होत आहे. कोल्हापुरात एका खोलीवर त्याचे वास्तव्य होते. येथूनच ते सांगली आणि सातारा येथे जात होते. बेंगळुरू येथील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात वैभव राऊतचे नाव तपासात पुढे येत आहे. त्यामुळे पानसरे हत्या प्रकरणातही या तिघांचा संबध आहे का याची पडताळणी करण्यात येत आहे.

कोल्हापुरात कळसकर ज्या ठिकाणी राहत होता, त्या ठिकाणी चौकशी करण्यासाठी एटीएसच्या एका पथकाने चौकशी सुरू केली. सुधन्वाचा सातारा-पुणे असा सातत्याने प्रवास झाल्याची माहिती तपासात मिळाली आहे. सुधन्वा हा इंटिरिअर डेकोरेटर असून पुणे येथे काम करीत होता. मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य संशयित रुद्रगौडा पाटीलसह दोघेजण अद्याप फरारी आहेत. या तीन संशयितांकडे स्फोटके सापडल्याने तिन्ही घटनांतील गूढ उलगडण्याची शक्यता आहे. बॉम्बस्फोटासाठी वापरला जाणारा स्फोटकांचा साठा घरी सापडल्याने दक्षिण महाराष्ट्रातील या मोठ्या शहरांच्या कनेक्शनचा शोध सुरू आहे.

कोण आहे कळसकर ?

कळसकर हा औरंगाबाद येथील केसापूरचा रहिवासी आहे. मात्र त्याचा चार वर्षे कोल्हापूरशी संपर्क आहे. कामासाठी बाहेर जातो म्हणून त्याने पाच वर्षापूर्वी घर सोडले. त्याचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. नोकरीसाठी तो कोल्हापुरात आला. तो कोल्हापुरातील एका कारखान्यात लेथ मशीनवर मोल्डिंगचे काम करीत होता. तो कधीही मोबाईल वापरत नव्हता. भावाने अनेकदा मोबाईल खरेदी कर, असे सांगून त्याने त्याकडे दुर्लक्ष केले होते. लँडलाइन फोनवरूनच तो घरच्या लोकांच्या संपर्कात होता. यापूर्वी तो १५ जून २०१८ मध्ये गावाकडे गेल्याची माहिती एसआयटीच्या सूत्रांनी दिली.

पानसरे हत्या प्रकरण

ज्येष्ठ विचारवंत गोविंदराव पानसरे यांची प्रतिभानगर येथे भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येप्रकरणी सनातनचा साधक समीर गायकवाडचे नाव पुढे आले. पानसरे याच्या हत्येचे कनेक्शन सांगलीशी निघाले. समीर हा मूळचा सांगलीचा असून विश्रामबाग येथील मौतीचौकात राहतो. पानसरे हत्या प्रकरणाला त्याला दोन वर्षांपूर्वी अटक झाली होती. मात्र तो सध्या जामिनावर मुक्त आहे. एटीएसने दोन दिवसांपूर्वी नालासोपारा येथून एका घरातून स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला. या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. कळसकर, गोंधळेकर, राऊत या तिघांचे कनेक्शन कोल्हापूर आणि सांगलीसी आहे. गोंधळकर हा सांगली येथील आहे. मात्र तो आमच्या कार्यकर्ता नसल्याचा दावा शिवप्रतिष्ठानने केला आहे. सापडलेल्या शस्त्रसाठ्याचे कनेक्शनही सांगली असल्याचे प्राथमिक तपासात उघड होत आहे.

बॉम्बस्फोट चाचणीची

एनआयने केलेल्या तपासात मलगोंडा पाटील, रुद्रगौडा पाटील, प्रविण लिमकर या तिघांनी मडगावमध्ये स्फोटापूर्वी जत तालुक्यात निर्जन ठिकाणी बॉम्बस्फोटाची चाचणी घेतली होती, अशी माहिती पुढे आली होती. पथकाने जत आणि कवठेमहाकाळ येथे पाहणी केली होती. मलगोंडाच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्याचे जबाबही नोंदवून घेतले होते. मात्र, या कित्येक वर्षापासून तिघांचाही गावांकडे संपर्क नसल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. या प्रकरणात रुद्रगौडा आणि लिमकर अजूनही फरारी असून एनआयए, दहशतवादी विरोधी पथक शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच संशयितांची चौकशी, गोपनीय तपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नालासोपारा येथील एका घरात स्फोटके सापडल्याच्या प्रकरणासह कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचे कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त करुन राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या पाच टीम कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात रविवारी दाखल झाल्या. या प्रकरणी तिघा संशयितांना ताब्यात घेतल्याने कोल्हापूर कनेक्शन उघड होत असून दिवसभरात पाच संशयितांची कोल्हापुरात चौकशी करण्यात आली. शरद कळसकर नोकरी करीत असलेल्या औद्योगिक वसाहतीसह त्याचे संबध असलेल्या संस्था, संघटना, मित्र, नातेवाईक आणि काही साधकांची चौकशी सुरु केली आहे.

बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी स्फोटके बाळगल्याप्रकरणी एटीएसने दोन दिवसांपूर्वी शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर आणि वैभव राऊत या तिघांना अटक केली. या पैकी शरद कळसकरच्या कोल्हापूर कनेक्शनची माहिती एटीएसकडून घेतली जात आहे. त्यासाठी एटीएसचे पथक कोल्हापुरात दाखल झाले. या पथकात एक अधिकारी आणि दोन कर्मचारी आहेत. कळसकर राहत असलेले ठिकाण, त्याचे कोल्हापुरातील संस्था, संघटना यांच्याशी असलेल्या संबधांची माहिती पथकाने घेतली. कळसकर हा औद्योगिक वसाहतीत लेथ मशीनवर मोल्डिंगची कामे करत होता. त्याबाबत गोकुळ शिरगांव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (गोशिमा) कागल हातकणंगले पंचतारांकित असोसिएशन (मॅक), पुलाची शिरोली, उद्यमनगर आणि वाय. पी. पोवारनगर परिसरातील औद्योगिक वसाहतीत पथकाने माहिती घेतली. या प्रकरणी एटीएसने स्थानिक पोलिसांची मदत घेतली. कळसकरचे कोल्हापुरात चार वर्षे वास्तव्य होते. तो एका औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात लेथ मशीनवर कामाला होता. या ठिकाणाहून हत्येसाठी साहित्य तयार केले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याचे मित्रही कोल्हापुरातील त्याच्या खोलीवर राहून गेल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. तपास पथकाने तो राहत असलेली खोली आणि कारखान्याची माहिती घेतली.

कॉल डिटेल्स, सीडीआर मागवला

कळसकर कोल्हापुरात असताना तो कोणाच्या संपर्कात होता. त्याचे मोबाइलवर झालेले बोलणे, त्याचा कालावधी, संवादात आलेले मुद्दे यांची चौकशी करण्यासाठी कॉल डिटेल्सही तपासले जात आहेत. कोल्हापुरात त्याचे कोण हस्तक आहेत का, तसेच कॉ. पानसरे यांच्या हत्येशी काही संबंध आहे का याची पथकाने माहिती घेतली. त्याचा सीडीआर (कॉल डिटेल्स रिपोर्ट) ही मागविला आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा येथे चौकशी

संशयित तिघांचेही कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात वास्तव्य होते. या ठिकाणी त्यांचा मित्र परिवार, काही संस्था, संघटना संपर्कात होत्या. आठवड्यातून त्यांचा काही लोकांशी संपर्क होत होता. या सर्व बाबींची माहिती घेण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांची पथके जिल्ह्यात तैनात केली आहेत. त्यातून काही महत्वाचे धागेदोरे हाती मिळण्याची शक्यता आहे.

काय चौकशी

मोबाइल कॉल डिटेल्स

वास्तव्याची माहिती

नातेवाईक, संस्था, संघटनांची चौकशी

तीन जिल्ह्यात चौकशी

कोल्हापूर एसआयटीचे पथक पुण्याला

तपास गोपनीय

या प्रकरणी एटीएस आणि कोल्हापूर एसआयटीकडून गोपनीय तपास सुरु आहे. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कोल्हापुरातील एसआयटीचे एक पथक पुण्याला गेल्याचे सूत्रांनी सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी माहिती देण्यास टाळाटाळ केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘योजनांसाठी अर्ज करा’

$
0
0

कोल्हापूर : संकटग्रस्त, पीडित महिलांना आधार देण्यासाठी तसेच अनैतिक व्यापारास प्रतिबंध करण्यासाठी उज्वला आणि स्वाधारगृह योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी महिला, बालविकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडे १८ ऑगस्टपर्यंत द्यावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नितीन मस्के यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धार्मिक एकोपा वाढवा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

'स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजरा धार्मिकदृष्ट्या असंवेदनशील असल्याची नोंद पोलिसांत आहे. पण खऱ्या अर्थाने इथे एकदाही तशी तेढ निर्माण झालेली नाही. यामुळेच आजऱ्याची ही ओळख येथील हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी जतन करून येथील धार्मिक एकोपा वृद्धिंगत करावा,' असे आवाहन आजरा-भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी येथे केले.

२०१८ मध्ये आजरा शहरात झालेल्या दंगलसदृश घटनेत गोवण्यात आलेल्या ७४ आरोपींवरील खटले पोलिस प्रशासनाने नुकतेच मागे घेतले आहेत. गेली अनेक वर्षे भिजत पडलेल्या याप्रकरणी आमदार आबिटकर यांनी पुढाकार घेतल्याबद्दल आजऱ्यातील हिंदू-मुस्लिम समाज बांधवांमार्फत येथील गंगामाई वाचन मंदिर सभागृहात सत्कार समारंभ आयोजित केला होता, त्यावेळी आमदार आबिटकर बोलत होते. आजरा तहसीलदार अनिता देशमुख प्रमुख उपस्थित होत्या.

आमदार आबिटकर म्हणाले, 'ती घटना किरकोळ स्वरूपाची होती, पण त्यास धार्मिक मुलामा देण्यात आला. आजऱ्यात दंगल कधीच घडली नाही. हे दोन्ही समाज समोरासमोर कधीच आले नाहीत. पण या घटनेमुळे धरपकड झालेल्यांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. आजऱ्याची धार्मिक व सांस्कृतिक मूस तशी नसल्याने एक लोकप्रतिनिधी म्हणून याप्रश्नी लक्ष घातले. मंत्री दीपक केसरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यामुळे अनेकांचे संसार व भविष्य बेचिराख होण्यापासून वाचले. आता येथील सलोख्याला डाग लागणार नाही, याची दक्षता आजरेकरांनी घ्यावी.'

शिवसेनेचे परशुराम बामणे म्हणाले, 'या घटनेमुळ गेली १० वर्षे कोर्ट-कचेरी करत आलो आहोत. यामुळे सर्वांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून आमदार आबटिकरांना विनंती केली आणि त्यांनी आम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे करून दाखवले. हे ऋण आम्ही कधीच विसरणार नाही.'

यावेळी धंनजय देसाई, प्रदीप शिर्के, सचिन इंजल, जावेद दिंडबाग, देविदास आजगेकर, आदी वकील बांधवांचाही यांचाही सत्कार करण्यात आला. तहसीलदार श्रीमती देशमुख, समीर देशपांडे, अम्मानुला आगलावे, धनंजय देसाई , ज्योतिप्रसाद सांवत यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ . प्रवीण निंबाळकर यांनी सूत्रसंचालन केले यावेळी नगरसेवक विलास नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र सांवत, मुस्लिम समाजाचे नेते आदमसाब माणगावकर, आजरा साखर कारखाना संचालक दशरथ अमृते व जनार्दन टोपले, मारूती मोरे, विजय थोरवत, समीर चाँद, उमेश पारपोलकर, संजय पाटील आदी उपस्थित होते.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॉमर्स कॉलेजमध्ये होणार माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स या शिक्षण संस्थेच्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात ५० हजार विद्यार्थी सहभागी होतील. नऊ व दहा फेब्रुवारी २०१९ मध्ये हा मेळावा होणार असल्याची माहिती कॉमर्स कॉलेज माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.

मेळाव्याच्या नियोजनासाठी कॉमर्स कॉलेजच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी स्नेहमेळाव्याच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. कॉमर्स कॉलेज या शिक्षण संस्थेची स्थापना १९५७ मध्ये झाली. या कॉलेजमधून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण प्राप्त केले आहे. संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या ६१ वर्षाच्या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा भरविण्यात येत असल्याचे क्षीरसागरांनी सांगितले. स्नेहमेळाव्याच्या अनुषंगाने विविध समित्यांची स्थापना झाली. स्नेहमेळाव्यात विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

दरम्यान स्नेहमेळाव्यास कॉलेजचे माजी विद्यार्थी ऋषिकेश गोडबोले यांनी २५००० रुपयांची देणगी दिली. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्रसाद कामत, सचिव अॅड. व्ही. एन. पाटील, प्राचार्य व्ही. ए. पाटील, विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष सुनील नागावकर, प्रमोद जगताप, प्रवीण गृहागरकर, रवींद्र खेडेकर, अनिरुद्ध भुर्के, मदन कारेकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुतात्मा आडूरकरांच्या स्मारकास सहकार्य करू

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

हुतात्मा निवृत्ती सुतार-आडूरकर यांचा पुतळा व स्मारकासाठी महापालिकेच्यावतीने जागा व निधीची उपलब्धता करुन देऊ, अशी ग्वाही महापौर शोभा बोंद्रे यांनी दिली. सुतार-लोहार समाज उन्नती संस्था व हुतात्मा निवृत्ती तरुण मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

हुतात्मा निवृत्ती आडूरकर यांच्या ७४ व्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी व सर्व रोग तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. याप्रसंगी महापौर बोंद्रे यांनी देशासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांचे स्मरण आजच्या युवा पिढीने करणे काळाची गरज असल्याचे नमूद केले. शिक्षण उपसंचालक किरण शिराळे यांच्या हस्ते मिरजकर तिकटी येथील क्रांती स्तंभास पुष्पहार अर्पण करण्यात आले. सखी मंचच्या अध्यक्षा रुपाली सातार्डेकर यांचे हुतात्म्यांच्या बलिदानाविषयी भाषण झाले. प्रल्हाद लोहार यांनी एकात्मतेची प्रतिज्ञा दिली. स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.

सुतार-लोहार समाज उन्नती संस्थेचे संस्थापक दिगंबर लोहार यांनी हुतात्मा निवृत्ती आडूरकर यांच्या स्मारकासाठी महापालिकेने जागा व निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. शिक्षण समिती सभापती अशोक जाधव यांनी स्मारकासाठी मानधन देण्याची ग्वाही दिली. देवस्थान समिती अध्यक्ष जाधव यांनी स्मारकासाठी सहकार्य केले जाईल असे सांगितले. याप्रसंगी नगरसेवक राजसिंह शेळके, माजी उपमहापौर परिक्षित पन्हाळकर, चित्रकार अरुण सुतार, बळीराजा पार्टीचे शहराध्यक्ष किसन काटकर, गव्हर्मेंट बँकेचे संचालक संजय सुतार, हुतात्मा निवृत्ती तरुण मंडळाचे अध्यक्ष संजय शेळके, रिक्षाचालक संघटनेचे राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते. ओबीसी सेवा संघाचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर सुतार यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान समाजातर्फे काढलेल्या रॅलीमध्ये राधा मेस्त्री, मालती सुतार, प्रिया सातार्डेकर, सुप्रिया सुतार, साक्षी क्षीतिजा, शोभा सुतार, सुनंदा सुतार, लता लोहार आदी सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विवेकानंद’मध्ये व्याख्यान

$
0
0

कोल्हापूर: 'वाढत्या वयात मुलींच्या शरीरात होणारे बदल व त्यांचे शारिरीक आरोग्य सदृढ राहण्यासाठी सकस आहार घेणे आवश्यक आहे. मनावरचा अतिताण व अतिरिक्त कामामुळे अशक्तपणा येतो हे टाळण्यासाठी शाकाहाराबरोबरच फलाहार गरजेचा आहे. जीवनाची सकारात्मकता यातूनच सुंदर आरोग्याची निर्मिती होते.'असे प्रतिपादन स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मंजुश्री डिंगरे यांनी केले आहे.

येथील विवेकानंद कॉलेजमध्ये सचेतना समितीमार्फत आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. 'मुलींचे मानसिक व शारिरीक आरोग्य' हा व्याख्यानाचा विषय होता. प्राचार्य एस. वाय. होनगेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य होनगेकर म्हणाले, 'आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये व बाहेरच्या वातावरणामध्ये मुलींना सदृढ, निरोगी राहायचे असेल तर आहार, विहार व व्यायाम या त्रिसुत्रीचा अवलंब केला पाहिजे. जीवनातील गोष्टींचा ताण न घेता खेळीमेळीच्या वातावरणात जगले पाहिजे. स्वतचा छंद व कलाही जोपासली पाहिजे.' डॉ. श्रृती जोशी यांनी स्वच्छता व आरोग्य अभियान यासंबंधी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पी. ए. पाटील यांनी केले. डॉ. एस. डी. शिर्के यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. डॉ. एम. व्ही.चरणकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीचा बूथ कमिट्यांच्या सक्षमीकरणावर भर

$
0
0

१८ ऑगस्टला राष्ट्रवादी युवकचा मेळावा

कोल्हापूर टाइम्स टीम

'आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथ कमिट्या सक्षम करण्यावर भर दिला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागा वाटपाच्या फॉर्म्युलानुसार जिल्ह्यात विधानसभेच्या पाच जागा राष्ट्रवादीला मिळणार आहेत, या पाचही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी बूथ संकल्पना सर्वसामान्यापर्यंत पोहचवावी,' असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले.

१८ ऑगष्ट रोजी शाहू स्मारक भवन येथे दुपारी बारा वाजता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा होणार आहे. माजी मंत्री व आमदार शशिकांत शिंदे, आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील हे मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याच्या नियोजनासाठी रविवारी राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाध्यक्ष पाटील बोलत होते.

जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, 'राष्ट्रवादी काँग्रेसने बूथ कमिट्या सक्षम करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने जबाबदारी घ्यावी.' जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष नाविद मुश्रीफ यांचीही भाषणे झाली. राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रवादी 'युवक'चे जल्हाध्यक्ष रोहित पाटील यांनी स्वागत तर बाळासाहेब देशमुख यांनी आभार मानले. याप्रसंगी महिला आघाडीच्या संगीता खाडे, बाजार समिती संचालक नेताजी पाटील, प्रतापराव देशमुख, रवींद्र माने, प्रकाश पाटील, सोनाजी पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका शाळांची दुरवस्था

$
0
0

अनेक शाळांच्या छपरांना गळती, बेंच, गणवेशाविना विद्यार्थी

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर

शाळांच्या छतांना लागलेली गळती, भिंतींना गेलेले तडे, मैदानांचा अभाव, कंपाऊंड नसल्याने मोकाट जनावरांचा वावर, विद्यार्थ्यांना बसण्यास अपुरे पडणारे बेंच यामुळे महापालिकेच्या ५९ शाळांपैकी ४२ शाळांना बकाल स्वरुप प्राप्त झाले आहे. निधी वितरणात प्रत्येक शाळा दुरुस्तीसाठी एक समान निधी मिळत नसल्याचे शाळांची पर्यायाने विद्यार्थ्यांची परवड सुरू आहे. महिला व बालकल्याण समितीच्यावतीने नुकत्याच केलेल्या सर्वेमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व शाळांच्या दुरुस्तीसाठी सर्व शिक्षा अभियानातंर्गत मिळणारा निधी देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. तर एक कोटी पाच लाखांचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला आहे.

महापालिकेच्या सर्वच शाळांमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. पण या शाळांच्या दर्जाबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. शाळांचा दर्जा खालावत गेल्यानंतर पटसंख्या कमी होऊ लागली. पटसंख्येअभावी शाळा बंद पडण्याचा धोका निर्माण झाला. यातून मार्ग काढण्यासाठी शिक्षण समिती, मुख्याध्यापक, शिक्षक आणि लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. सर्वशिक्षा अभियान, महिला व बालकल्याण विभागाकडून मिळणाऱ्या निधीतून शाळांना पायाभूत सुविधा देण्यात आल्या. सुविधांबरोबर शिक्षणही चांगले मिळू लागल्यानंतर महापालिकेच्या ठराविक शाळांच्या पटसंख्येत चांगलीच वाढ झाली.

शाळांना पायाभूत सुविधा देताना सर्वशिक्षा अभियान व महिला आणि बालकल्याण विभागाकडून आलेल्या निधीचे एकसमान वाटप न केल्याने इतर शाळांचा दैना उडाली आहे. शाळांच्या भिंतींना गेलेले तडे, स्लॅबला लागलेली गळती आणि शाळेच्या मैदानातून जाणारी गटारे यामुळे शाळांची अवस्था दयनीय झाली असल्याचे महिला व बालकल्याण समितीने केलेल्या पाहणीमध्ये स्पष्ट झाले आहे. पाहणीनंतर महापालिकेलच्या ४२ शाळांना कोणत्या सुविधा आवश्यक आहेत, त्याचा अहवाल तयार केला आहे. अहवालाची एक प्रत आयुक्तांना देवून शाळांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक गोष्टी आणि त्यासाठी लागणाऱ्या एक कोटी पाच लाख निधीचा प्रस्ताव दिला आहे. तर एक प्रत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना सादर करुन सर्वशिक्षा अभियानातंर्गत मिळणारा निधी नादुरुस्त शाळांसाठी देण्याची मागणी केली आहे.

महिला व बालकल्याण विभागाने यापूर्वी सर्वशिक्षा अभियानातून प्राप्त झालेल्या ३२ लाख ५० हजार निधीपैकी दहा लाखांचा निधी शाळांसाठी देण्याचा ठराव महासभेमध्ये झाला होता. पण हा निधी अद्याप मिळाला नसल्याने अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नसल्याचे महिला व बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा यांनी सांगितले.

..............

चौकट

निधी वितरणात असमानता

महापालिकेच्या शाळांचा दर्जा ढासळल्यानंतर पटसंख्या वेगाने कमी होऊ लागली. सर्वसामान्यांचा आधार असलेल्या या शाळा बंद पडण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर महापालिकेने विशेष प्रयत्न करुन शाळांचा दर्जा वाढवला. अशा प्रयत्नातून केवळ १५ ते २० शाळांची स्थिती बदलली आणि या शाळांच्याबाहेर प्रवेश फुल्लचे फलक लागले. मात्र इतर शाळांची अवस्था पूर्वीप्रमाणेच राहिली. निधी वितरित करताना चांगल्या शाळांकडे जादा लक्ष दिल्याने इतर शाळांकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळेच महापालिकेच्या सर्व शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी समान निधी देवून पायाभूत सुविधा निर्माण करण्याची मागणी पुढे आली आहे.

..............

कोट

'महापालिका शाळांना सुविधा पुरवण्यासाठी सर्वशिक्षा अभियान व महिला बालकल्याण समितीकडून निधी वितरित होतो. निधी वितरित करताना ज्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा अपुऱ्या आहेत, त्याठिकाणी निधी वितरित करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

सुरेखा शहा, सभापती, महिला व बालकल्याण समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी सिनेसृष्टीत येतोय नवा चेहरा

$
0
0

फोटो आहे.....

कोल्हापूर टाइम्स टीम

शालेय जीवनापासूनच जोपासलल्या नृत्याच्या आवडीमुळे कोल्हापूरच्या एका तरुणीने सिनेसृष्टीत पाऊल ठेवले आहे. वार्षिक स्नेहसंमेलनांपासून ते अन्य समारंभांमध्ये नृत्य आणि अभिनयाचे सादरीकरण करत असताना आता तिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पन केले आहे. टेंबलाईवाडी येथील जोया खान ही कोल्हापूरची तरुणी संघर्षमय वाटचाल करत नशीब आजमावत आहे.

जोया पुणे येथील 'अॅपटेक'या संस्थेत हवाई सुंदरीचे प्रशिक्षण पूर्ण करत आहे. कलेच्या क्षेत्रात करिअर करण्याचे तिचे ध्येय आहे. जोयाच्या रुपाने कोल्हापुरातील आणखी एक चेहरा मराठी इंडस्ट्रीजमध्ये झळकणार आहे. 'अॅपटेक'मध्ये दरवर्षी आयोजित करणाऱ्या स्पर्धेमध्ये जोया 'मिस अॅपटेक'ठरली आहे. दिग्दर्शक अंजिक्य लॅकेड आणि अजिंक्य बिजवाल यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मुकूट प्रदान करत सत्कारही झाला. जोयाचे वडील बाळासाब हे निवृत्त सुभेदार आहेत. तर आई नूरजहाँ या गृहिणी आहेत. जोयाचे दहावीपर्यंतचे शिक्षण आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलमध्ये झाले. पुढे ती, डी. आर. माने कॉलेजमधून विज्ञान शाखेत बारावी उत्तीर्ण झाली. मात्र नृत्य आणि अभिनयाची आवड तिला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून जोयाने विविध ग्रुपच्या माध्यमातून नृत्य कार्यक्रमात सहभाग घेतला. शिवाय एका कंपनीच्या 'अशी ही माझी जवानी'या मराठी गाण्यांच्या अल्बममधील गाणे तिच्यावर चित्रीत झाले आहे.

नृत्यामध्ये कौशल्य दाखविताना जोयाने शॉर्टफिल्ममध्येही काम केले. शिवाय एका वाहिनीवरील मालिकेत प्रमुख भूमिकेत ती चमकत आहे. 'ढोलकीच्या तालावर'या शोमध्ये ठसकेबाज नृत्य करत तिने प्रेक्षकांसह परीक्षकांची मने जिंकली.नृत्य आणि कलेची आवड जोपासताना तिने 'बेटी बचाओ-बेटी पढाओ, स्त्री भ्रूण हत्या'या सारख्या सामाजिक विषयावर सांस्कृतिक समारंभ व नृत्याच्या कार्यक्रमातून प्रबोधनावर भर असतो. नृत्य, शॉर्ट फिल्म आणि मालिका करत असताना जोयाला मराठी सिनेमाची ऑफर आली. 'तू फक्त हो म्हण' या सिनेमात महत्त्वाचा रोल आहे. 'अहिल्या' या सिनेमात तिच्यावर आयटम साँग चित्रीत केले आहे. 'कोल्हापूरला कलेची मोठी परंपरा आहे. या क्षेत्रात काम करताना कोल्हापूरचे नाव उंचावण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल.'असे जोया म्हणते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदगड पाऊस

$
0
0

चंदगडला पावसाची संततधार सुरुच

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

चंदगड तालुक्यात गेले तीन दिवस पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामुळे नद्याच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पावसाची संततधार सुरुच राहिल्यास नद्याचे पाणी पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात सरासरी ३५.६६ मिलीमीटर तर तालुक्याची सरासरी १६२२.६६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे चंदगड येथील तौफिक किल्लेदार यांचे घर पडल्याने सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. करंजगाव येथील बाळू रामू बामणे यांच्या घराची भिंत कोसळून दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. करंजगाव येथील पुंडलिक रामू गावडे यांच्या गोठ्याची भिंत कोसळून २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हातकणंगलेत मोर्चा

$
0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

बेरड, नायका, रामोशी या सर्व जमाती एकच असून बेरड रामोशी या जमातीचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी जय मल्हार क्रांती संघटनेच्यावतीने सोमवारी हातकणंगले तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याबाबत तहसीलदार वैशाली राजमाने यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे, महाराष्ट्रात रामोशी आणि बेरड समाजाची लोकसंख्या ५० ते ६० लाख आहे. हा समाज क्रांतिकारी आहे. सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. सरकारच्या विकासात्मक आणि कल्याणकारी योजनांपासून वंचित आहे. समाजाला अनुसुचित जमातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी तहसील कार्यालयावर जय मल्हार क्रांती संघटनेने मोर्चा काढला. मोर्चा आळते रोड, पंचायत समितीमार्गे तहसीलदार कार्यालयावर आला. जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यापूर्वी अनेक आंदोलने करण्यात आली. पण सरकारने आश्वासनाशिवाय काहीही केले नाही. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास १६ आँगष्ट पासून बेमुदत आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. या मोर्चात रोहीत मलमे, काकासाहेब चव्हाण, सोमनाथ माने, बबन माने, सुरेखा नाईक, बाबासाहेब मंडले, राज मदने, भरत नाईक, संदीप नाईक यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर्ववैमनस्यातून चाकूहल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर तालुक्यातील पिरवाडी येथे हॉटेल ऑन दि रॉक्स येथे पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूहल्ला झाला. या घटनेत पवन सुहास सरनाईक (वय २६, रा. आर.के. नगर, पाचगाव) हा जखमी झाला. हा प्रकार शनिवारी (ता. ११) रात्री पावणेदहाच्या सुमारास घडला. याबाबत सूरज तिवले, आकाश डोंगळे (दोघे रा. शिवाजी पेठ), अक्षय हात्तेकर (रा. लक्ष्मीपुरी), जावेद (पूर्ण नाव समजले नाही) याच्यासह अनोळखी दोघे अशा सहाजणांवर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी पवन सरनाईक आणि सूरज तिवले या दोघांचा २०१५ मध्ये कॉलेजमधील ट्रॅडिशनल डेच्या कारणावरून वाद झाला होता. याबाबत दोघांनीही पोलिसात तक्रार दिली होती. अधूनमधून हा वाद उफाळून येत होता. पवन सरनाईक हा वाढदिवस असल्याने शनिवारी रात्री पिरवाडी येथील हॉटेल ऑन दि रॉक्स येथे मित्रांसह जेवणासाठी गेला होता. याच हॉटेलमध्ये सूरज तिवले हा मित्रांसह जेवणासाठी आला होता. रात्री पावणेदहाच्या सुमारास तिवले, डोंगळे, हात्तेकर यांच्यासह सहाजणांनी पवन सरनाईक याच्यावर हल्ला केला. 'तुला मस्ती आली आहे. आता तुला जिवंत सोडणार नाही,' असे म्हणत कमरेचा चाकू काढून हल्ला केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओसवाल यांच्यावर गुन्हा दाखल

$
0
0

ओसवाल यांच्यावर

गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाहू स्टेडियमजवळ बांधकाम सुरू असेलल्या ठिकाणी अवैधरित्या खड्डे काढून ठेवल्याने महापालिका प्रशासनाने बांधकाम व्यावसायिक पारस ओसवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला. ओसवाल यांच्या मे. करण असोसिएट्सच्या वतीने हे खड्डे काढले आहेत. या खड्ड्यांसाठी महापालिकेची परवानगी घेतलेली नाही, त्याचबरोबर खड्ड्यांमध्ये पाणी साठून दुर्गंधी पसरत आहे. संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण केल्याबद्दल महापालिकेचे अधिकारी दिलीप पाटणकर यांनी सोमवारी ओसवाल यांच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारणा बँकेचा सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर

$
0
0

वारणा बँकेचा

१० टक्के लाभांश

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणा सहकारी बँकेच्या ५३ व्या सर्वसाधारण सभेत सभासदांना १० टक्के लाभांश देण्याची घोषणा अध्यक्ष निपुण कोरे यांनी केली. वारणानगर येथील लालबहाद्दूर शास्त्रीभवन येथे झालेल्या सभा झाली.

सभेत अध्यक्ष कोरे यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले, ~५३ व्या वर्षाच्या वाटचालीमध्ये बँकेचे सभासद, ग्राहक, हितचिंतकांच्या मोलाच्या सहकार्यामुळे प्रतिकूल परिस्थितीमध्ये बँकेने उल्लेखनीय प्रगती केली आहे. यावर्षी बँकेने भागभांडवलात २५ कोटी रुपयांचा टप्पा पूर्ण केला आहे ही अत्यंत महत्वाची घटना असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी सभासदांना १० टक्के डिव्हिडंट जाहीर करून सभासदांनी मंजुरी द्यावी असे आवाहन केले. त्यानंतर सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक सर्व निकषांचे पालन केल्याची माहितही त्यांनी दिली. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सार्दळ यांनी स्वागत करून नोटिशीचे वाचन करत सभासदांच्या शंकांचे निरसन केले. उपाध्यक्ष उत्तम पाटील यांनी आभार मानले. प्रा. एन. आर. चोपडे यांनी सूत्रसंचलन केले. संचालक प्रमोद कोरे, बसवेश्वर डोईजड, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी मोरे, वारणा दूध संघ संचालक एच. आर. जाधव, माजी पंचायत समिती सभापती रवींद्र जाधव, बँकेचे मुख्य व्यवस्थापक प्रकाश डोईजड, हेमंत बोंगाळे, बोर्ड सेक्रेटरी संपत शिंदे, संचालक उपस्थित होते.

दरम्यान, सकल मराठा समाजाच्या मागण्या रास्त असून राज्यभर सुरु असलेल्या मराठा आरक्षण मागणीच्या आंदोलनाला एकमुखी पाठिंबा दिला. हा ठराव बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे यांनी मांडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातातील वृद्धाला लुबाडणारा तरुण अटकेत

$
0
0

(सोबत फोटो आहे)

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वृध्दास दुचाकीची धडक दिल्यानंतर त्यांना उपचारासाठी घेऊन जाण्याचे नाटक करून गंभीर जखमी अवस्थेत रंकाळा तलाव परिसरात सोडून जाणारा तरुण पोलिसांच्या हाती लागला. अभिमन्यू जयसिंग पाटील (वय २२, रा. उजळाईवाडी) असे त्याचे नाव आहे. पाटील याने वेळेत उपचारासाठी दाखल न केल्याने शंकरराव रामचंद्र मोरे (७७, रा. धोत्रे गल्ली, गंगावेश) यांचा मृत्यू झाला होता.

धोत्रे गल्लीतील शंकरराव मोरे हे १० जुलै रोजी टिंबर मार्केट येथील काम आटोपून घरी निघाले होते. शिवाजी पेठेतील लाड चौकात एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिक जमा झाल्यानंतर अभिमन्यू पाटील याने मोरे यांना रिक्षातून रुग्णालयात घेऊन जाण्याचे नाटक केले. रंकाळा परिसरातील जाऊळाचा गणपती मंदिराजवळ त्याने मोरे यांना सोडले. त्यांच्या खिशातील पैसे काढून घेवून तो पसार झाला. जखमी मोरे त्याच ठिकाणी दुपारी एक ते चारपर्यंत बेशुद्ध अवस्थेत पडले होते. परिसरातील नागरिकांनी त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. एका दुकानातील सीसीटीव्हीमुळे दुचाकीस्वाराकडून घडलेला हा चीड आणणारा प्रकार उघडकीस आला.

जुना राजवाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला होता. उजळाईवाडी येथील अभिमन्यू पाटील याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिस निरीक्षक मानसिंग खोचे, हेड कॉन्स्टेबल एकनाथ चौगले, प्रीतम मिठारी, सचिन देसाई, हणमंत कुंभार, प्रदीप पाटील, संदीप बेंद्रे, नितीन कुराडे, शाहू तळेकर यांनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images