Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

इचलकरंजीत वाढीव वीजदर पत्रकाची होळी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

वीज नियामक आयोगाच्या वाढीव वीजदर प्रस्तावाची मंगळवारी महावितरण कंपनीच्या प्रवेशद्वारात विविध संघटनांच्या वतीने होळी करण्यात आली. तत्पूर्वी शहरातून मोटारसायकली रॅली काढण्यात आली. तसेच शिष्टमंडळाच्या वतीने कार्यकारी अभियंता व प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

राज्यातील सर्व २.५ कोटी वीज ग्राहकांवर सरासरी १.४५ रुपये प्रतियुनिट म्हणजे सरासरी २२ टक्के दरवाढ लादणारा प्रस्ताव महावितरण कंपनीने जाहीर केलेला आहे. महाराष्ट्रातील औद्योगिक वीजदर शेजारील सर्व राज्यांच्या तुलनेने जास्त आहेत. प्रस्तावित दरवाढीमुळे हे दर दीडपट वा अधिक होणार आहेत. त्यामुळे उद्योगांना राष्ट्रीय व जागतिक स्पर्धेत टिकाव धरता येणार नाही. शेतीपंपांचे सवलतीचे वीजदर २.७ ते ५ पट होणार आहेत. घरगुती वीज दरातील वाढही अधिक होणार आहे. यंत्रमागधारकांच्या सवलतीच्या वीजदरात २७ अश्वशक्तीच्या आतील ग्राहकांवर किमान ३० पैसे प्रतियुनिट व २२ अश्वशक्ती च्या वरील ग्राहकांवर किमान ८० पैसे प्रति युनिट दरवाढ होणार आहे. महावितरण कंपनीचा हा प्रस्ताव राज्याच्या कृषी, औद्योगिक व सामाजिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत घातक व विनाशक असल्याने या विरोधात वीजग्राहक व औद्योगिक संघटना समन्वय समितीच्यावतीने आंदोलनाची हाक देण्यात आली होती.

शाहू महाराज पुतळ याठिकाणी विविध संघटनांचे पदाधिकारी जमा झाले. त्यानंतर मोटरसायकली रॅलीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरुन रॅली महावितरण कंपनीच्या प्रवेशद्वारात आल्यानंतर तेथे दरवाढीच्या निषेधार्थ घोषणा देत प्रस्तावाची होळी केली. तसेच शिष्टमंडळाच्यावतीने महावितरणचे कार्यकारी अभियंता एस. एल. कोळी यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर शिष्टमंडळाने प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन दिले. यावेळी पुंडलिक जाधव, सतिश कोष्टी, विनय महाजन यांनी यंत्रमागधारकांच्या समस्या मांडत दरवाढ प्रस्ताव मागे घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी जयंत मराठे, दीपक राशिनकर, दीपक सोमाणी, काशिनाथ जगदाळे, बंडोपंत लाड, आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अजेंडा

$
0
0

महाराष्ट्र टाइम्स :

वर्धापन दिन २०१८ :

मेक-इन-कोल्हापूर : सहकार

………………………

मांडा, सहकारसमृद्धीचा अजेंडा !

सहकाराने वैभव आणि समृद्धीचा एक काळ अनुभवला. कृषी-उद्योगाधारित अर्थकारणाची भक्कम पायाभरणी केली. महाराष्ट्राच्या विकासाच्या नकाशावर कोल्हापूरने ठळकपणे नाव नोंदवले, कृषी, कृषिपूरक उद्योग आणि त्या बळावर उभ्या राहिलेल्या सहकाराच्या डोलाऱ्याने सहकारातून समृद्धीचे मॉडेल यशस्वी करून दाखवले.

सहकार चळवळीसमोर आज आव्हान आहे ते नव्या बाजारीकरण, खासगीकरणाचे. जागतिकीकरणानंतर ते अधिक ठळक झाले आहे. या स्थितीत सहकारातून उभ्या राहिलेल्या कोल्हापुरी ब्रँडसमोरील अडचणी आणि संधींची चर्चा…, सहकाराचे सक्षमीकरण आणि पुनरुज्जीवन करण्याची हीच संधी…. मांडा, सहकार समृद्धीचा अजेंडा.

साखर, दूध, सूत, गूळ उद्योगातील संधी, बँका-पतसंस्थांचे आधुनिकीकरण, जलसिंचन, कृषिपूरक क्षेत्रातील सहकार अधिक बळकट व्हावा, यासाठी तुमच्या सूचना, संकल्पना कळवा. शब्दमर्यादा : ३००, नाव, छायाचित्र, संपर्काचा क्रमांकासह आमच्याकडे पाठवा, १५ ऑगस्टपर्यंत.

-संपादक,

महाराष्ट्र टाइम्स,

गुलमोहर अपार्टमेंट, नागाळा पार्क, कोल्हापूर

( ई-मेल : )

…………………………………………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५ तोळे सोने लंपास

$
0
0

गारगोटी : श्री साई कॉलनी येथील प्रकाश तुकाराम पसारे यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून दिवसाढवळ्या अज्ञात चोरट्यांनी सुमारे १५ तोळे सोने लंपास केले. भरदिवसा चोरी झाल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. पसारे यांच्या घराच्या बंद दाराचे कुलूप तोडून सुमारे तीन लाख ९० हजार रुपये किमतीचा माल लंपास केला. पसारे सकाळी आपल्या पत्नीस बारवे येथे सोडण्यासाठी गेले होते. यादरम्यान, अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून सोन्याचा राणीहार, सोन्याची साखळी, चार अंगठ्या, बांगड्या, टॉप्स, नेकलेस, मणिमंगळसूत्र असे एकूण सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेले. पोलिस निरीक्षक उदय डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करत आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्वज आंदोलनाने होणार आंदोलनाची सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षण मागणीसाठी गुरुवारी नऊ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी कोल्हापूर बंदची हाक दिली असून दसरा चौकात आंदोलनाची सुरुवात ध्वजवंदनाने होणार आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. दसरा चौकात सकाळी ११ वाजता सभा होणार असून राज्यभरातील सकल मराठा समाजाचे नेते मार्गदर्शन करणार आहेत. आंदोलन शांततेत करण्यासाठी आचारसंहितेचे पालन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दसरा चौकात क्रांती दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ स्वातंत्रसैनिक, माजी सैनिकांच्या उपस्थितीत तिरंगा ध्वजवंदनाने होणार आहे. त्यानंतर शाहू गौरव गीत, महाराष्ट्र गीत, आरक्षण गीत होणार आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन होणार असून मराठा समाजाचे नेते मार्गदर्शन करणार आहेत. आंदोलन शांततेत व शिस्तबद्ध होणार असून मराठा समाजाने अफवांना बळी पडू नये आवाहन करण्यात आले. यावेळी वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, दिलीप देसाई, सचिन तोडकर, हर्षल सुर्वे, स्वप्निल पार्टे, गणी आजरेकर, प्रा. जयंत पाटील, फत्तेसिंह सावंत, जयेश कदम, दिलीप पाटील, राजू जाधव आदी उपस्थित होते.

.................

आंदोलनाची आाचरसंहिता

०० पावसाची शक्यता लक्षात घेऊन महिला, युवती, युवक, लहान मुलांनी छत्री, रेनकोट, पाण्याची बाटली व शिदोरी घेऊन यावे.

०० कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

०० शिवाजी महाराज व शाहू महाराजांचा जयघोष करावा. आक्षेपार्ह घोषणा देऊ नयेत

०० सभा संपल्यावर रिकाम्या बाटल्या व कचरा मागे ठेऊ नये.

०० हुल्लडबाजी करणाऱ्यांना रोखावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्म्या शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बालिंगा जलउपसा केंद्राजवळील बालिंगा ते चंबुखडी टाकीकडे जाणाऱ्या जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाला शुक्रवार(ता.१०) पासून सुरुवात होणार आहे. जलवाहिनी दुरुस्तीला दोन दिवस लागणार असल्याने या कालावधीत निम्म्या शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

बालिंगा जलउपसा केंद्राजवळून बालिंगा ते चंबुखडीकेड जाणाऱ्या ८०० मिमी रायझिंग व आपटेनगरकडे जाणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली आहे. दोन्ही ठिकाणच्या दुरुस्तीच्या कामाला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे फुलेवाडी रिंगरोड परिसर, लक्षतीर्थ वसाहत, सानेगुरुजी वसाहत, राजेपाध्येनगर, कनेरकर नगर, आपटेनगर, तुळजा भवानी कॉलनीसह संपूर्ण सी व डी वॉर्डच्या भागातील पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामाला दोन दिवस लागणार असल्याने पाणीपुरवठा न होणाऱ्या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. दुरुस्ती झाल्यानंतर या भागातील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.

गेल्या आठवड्यापासून बालिंगा ते चंबुखडीकडे जाणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली आहे. सोमवारी (ता.६) व मंगळवारी दोन दिवस गळती काढण्याचे काम सुरू होणार होते. शुक्रवारी (ता. ३) बालिंगा उपसा केंद्राजवळील विद्युत वाहिनीला शॉर्ट सर्किंट झाल्याने पाणीपुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे अनेक भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. विद्युत वाहिनीतील बिघाड दूर झाल्यानंतर आपटेनगर पाण्याच्या टाकीजवळील ट्रान्सफॉर्ममध्ये बिघाड झाला. दोन दिवस ट्रान्सफॉर्ममधील बिघाड काढण्यास अपयश आल्याने नवीन ट्रान्सफॉर्म बसवण्यात आला. त्यामुळे सोमवारी दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही. दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी बालिंगा येथे रायझिंगमध्ये झालेल्या बिघाडाची पाहणी केली. त्यानंतर शुक्रवारपासून दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला. दुरुस्तीला दोन दिवस लागणार असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असून नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन शहर पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जाच्या आमिषाने १.३३ लाखाची फसवणूक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून सहाजणांची एक लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात पाचजणांविरोधात गुन्हा दाखल केला. प्रसाद अरविंद यादव ऊर्फ देशमुख (रा. सोळशी जि. सातारा), शिवानंद लक्ष्मण माळी (रा. अब्दुललाट), विशाल मठपती-स्वामी (रा. दत्तनगर कबनूर), विमलाताई करडीले व नवीन मारुती खापर्डे (दोघे रा. गुजरवाडा नानापेठ पुणे) अशी संशयितांची नांवे आहेत. याबाबतची तक्रार अरुणा बंडू पवार (रा. दावतनगर कबनूर) यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार कुपेकरांच्या घरावर मराठा आरक्षणासाठी धडक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मंगळवारी गडहिंग्लजकरांनी थेट आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या निवासस्थानी घेराओ घालीत आंदोलन केले. कानडेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील आमदार कुपेकर यांना भेटून निवेदन दिले. यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, एक मराठा...लाख मराठाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी कुपेकर यांनी आरक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन दिले.

नागेश चौगुले व किरण कदम यांच्या नेतृत्वाखाली गडहिंग्लज येथील दसरा चौकातून सकाळी दहा वाजता आंदोलक नेसरीकडे रवाना झाले. पावणेअकराच्या सुमारास कुपेकर यांच्या निवासस्थानापासून तावरेवाडी तिट्याजवळ आंदोलक एकत्र आले. यानंतर मोर्चाने आंदोलक कुपेकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी प्रचंड घोषणाबाजी झाली. आंदोलकांनी सरकारविरुद्ध निषेध व्यक्त केला. यावेळी किरण कदम, विद्याधर गुरबे, नागेश चौगुले, दिलीप माने, प्रभाकर खांडेकर, अलका भोईटे, राजेश पाटील, अॅड.संतोष मळवीकर, अॅड.दिग्विजय कुराडे, प्रसाद हल्याळे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी निवेदन स्वीकारले. त्या म्हणाल्या, 'मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. त्यासाठी आम्ही सर्वजण समाजाच्या पाठीशी आहोतच. मात्र, राजीनामा देऊन प्रश्न सुटणार नाहीत. आमदारपदाचा राजीनामा दिल्यानंतर सभागृहात यासंदर्भात आवाज कोण उठवणार. मराठा आरक्षणासाठी लढा सुरू राहील. यासाठी समाजासोबत आहोतच. याबाबत गरज पडल्यास सर्वच आमदार राजीनामा देतील.'

यावेळी मंजुषा कदम, वसंतराव यमगेकर, बी.एन.पाटील-मुगळीकर, उदय जोशी, आजरा पंचायत समिती सभापती रचना होलम, रामाप्पा करीगार, आदींसह मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी ८ ऑगस्टसाठी

$
0
0

व्याख्यान : शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान, अध्यक्ष : प्राचार्य अभयकुमार साळुंखे, वक्ते : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे, विषय : 'आजचे शिक्षण उद्याचे जीवन', स्थळ : डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन, ताराबाई पार्क, वेळ : सकाळी १० : ३० वा.

प्रदर्शन : ग्रंथ कार्नर पुस्तक प्रकाशन, स्थळ : शाहू स्मारक भवन, वेळ : सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत.

मोटारसायकल फेरी : संयुक्त राजारामपुरीतर्फे सकल मराठा समाज आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोटारसायकल फेरी, स्थळ : शाळा क्रमांक नऊ, राजारामपुरी, वेळ : दुपारी ४ वा.

सत्कार : ज्येष्ठ चित्रकार गुरुवर्य गणपतराव वडणगेकर यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या व्यक्तिचित्रण स्पर्धा बक्षीस वितरण, सत्कार स्थळ : कलामंदिर महाविद्यालय, पापाची तिकटी, वेळ : दुपारी ४ वा.

शोकसभा : दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे चित्रकार, कलाशिक्षक सेवानिवृत्त प्राचार्य शिवाजी शर्मा यांना आदरांजली वाहण्यासाठी शोकसभा, स्थळ : शाहू स्मारक भवन, वेळ : सायंकाळी ५ वा.

व्याख्यान : राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे व्याख्यान, वक्ते : ज्येष्ठ शास्त्रज्ञ आर. व्ही. भोसले, विषय : अवकाश संशोधन, स्थळ : राधाकृष्ण मंदिर, शाहूपुरी, वेळ : सायंकाळी ५ वा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दंगल काबूची रंगीत तालीम

$
0
0

फोटो आहे

कोल्हापूर

नऊ ऑगस्ट रोजी होत असलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर शाहूपुरी पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात दंगल काबू योजनेची रंगीत तालीम राबविली. रात्री साडेनऊ वाजता ही तालीम झाली. बंदच्या काळात दंगल झाल्यास परिस्थिती नियंत्रणाखाली कशी आणावी, याचे संचलन करण्यात आले. शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील प्रमुख मार्गावरुन सशस्त्र संचलन झाले. यामध्ये एक सहायक पोलिस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक, २७ पोलिस कर्मचारी यांच्यासह शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पाच कर्मचारी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षणासाठी जयसिंगपुरात धरणे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जयसिंगपूर येथील क्रांती चौकात सलग तिसऱ्या दिवशी मराठा समाजबांधवांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी विविध पक्ष संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

मराठा आरक्षण आंदोलनाची धग आता वाढली असून गावागावांत मराठा बांधव रस्त्यावर उतरले आहेत. नुकतीच शिरोळ तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाच्या आज तिसऱ्या दिवशी जयसिंगपूर मुस्लिम समाज, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल यांच्यावतीने पाठिंबा दर्शविणारी पत्रे माजी नगराध्यक्षा रोहिणी धनवडे यांच्याकडे सुपूर्द केली. जयसिंगपूर बार असोसिएशन, डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन यांनीही पाठिंबा दर्शविला. यावेळी शिरोळ तालुका मराठा मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत नलवडे, नगरसेवक सर्जेराव पवार, बजरंग खामकर, युनूस डांगे, माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव, विठ्ठलराव नाईक- निंबाळकर, उदयसिंह खाडे, धनाजी देसाई, संजय चव्हाण, विठ्ठल मोरे, अशोक कराळे, आदी उपस्थित होते.

दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट क्रांतिदिनी पुकारलेला राज्यव्यापी बंदला शिरोळ तालुक्यासह जयसिंगपूर शहरात सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत पाळावा, असे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.

००००

फोटो ओळ - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जयसिंगपूर येथील क्रांती चौकात सलग तिसर्‍या दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास शहरातील वकीलांनी पाठींबा दिला.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापारी आत्महत्येप्रकरणी चौघा साावकारांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पैसे दे , अन्यथा आत्महत्या कर' असा सल्ला देणाऱ्या सांगली येथील चार खासगी सावकारांसह दहाजणांवर राजारामपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या खासगी सावकाराच्या छळाला कंटाळून उमेश रामेश्वर बजाज (वय ४७, रा. माळी कॉलनी, टाकाळा) या व्यापाऱ्याने राहत्या आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी चिठ्ठीतील मजकूर आणि दिलेल्या फिर्यादीनुसार पैशाच्या मागणीवरुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सांगली येथील खासगी सावकार महेश शिंदे, भाऊसाहेब माळी, सचिन ढब्बू, निखिल महाबळ (सर्व रा. सांगली) यांच्यासह अज्ञात आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दिलीप दामोदर बजाज (वय ५८, रा. श्रीनिवासा बिल्डींग, तिसरा मजला, माळी कॉलनी, टाकाळा) यांनी फिर्याद दाखल केली होती. तेल उद्योगासाठी मृत उमेश बजाज आणि त्यांचा भाऊ दिलीप बजाज यांनी खासगी सावकाराकडून पैसे घेतले होते. बजाज यांचे सांगली येथील माधवनगर रोड बुधगाव आणि मार्केट यार्ड येथे दुकान आहे. या दोन्ही दुकानातील आर्थिक व्यवहार मृत उमेश बजाज पाहत होते. जानेवारी ते मार्च २०१७ या कालावधीत दरमहा पाच टक्के आणि सात टक्के व्याजाने सांगली येथील भाऊसाहेब माळी याच्याकडून ३३ लाख रुपये आणि महेश शिंदे याच्याकडून ९ लाख रुपये घेतले होते. या रक्कमेचे व्याज म्हणून माळी याला २९ लाख ७५ हजार रुपये आणि शिंदे याला ७ लाख ६५ हजार रुपये वेळोवेळी दिले होते. तरीही जून महिन्यापासून व्याज आणि मुद्दल देण्याचा तगादा या खासगी सावकारांनी लावला होता. जुलै ते २ ऑगस्ट २०१८ या कालावधीत पैसे देण्यासाठी सातत्याने मोबाइलवरुन धमकी आणि दुकानात येऊन मानसिक त्रास दिला. ३० जुलै रोजी सचिन ढब्बूने मृत उमेशला त्याच्या कार्यालयात बोलाविले. त्या वेळी त्याच्यासोबत आणखी आठ ते दहा लोक होते. त्यांनी 'व्याजाचे पैसे तातडीने द्या, नाहीतर तुमची दुकाने, घर, होंडासिटी गाडी आमच्या नावावर करुन द्या, तुम्ही दुकाने कशी उघडताय ते बघतो', अशी धमकी दिली. हा सततचा तगादा आणि आर्थिक पिळवणुकीला कंटाळून उमेशने राहत्या घरी नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न हाणून पाडू

$
0
0

सकल मराठा समाजाचा राज्य सरकारला इशारा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेत व शिस्तबद्ध ५८ मोर्चे काढूनही राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास विलंब करत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने पुन्हा राज्यभर आंदोलन सुरु केले असून सरकारवर दबाव वाढत आहे. पण या आंदोलनात फूट पाडण्याचे सरकारचे प्रयत्न अयशस्वी झाल्यावर पोलिसांकडून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे', असा आरोप इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केला. शांततेत मोठी ताकद असल्याने नऊ ऑगस्ट रोजी कोल्हापूर बंदचे आंदोलन शांततेत राहील, अशी ग्वाहीही आंदोलकांच्यावतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. तर 'मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहील', अशी घोषणा श्रीमंत शाहू छत्रपती यांनी केली.

सकल मराठा समाजाच्यावतीने दसरा चौकात ठिय्या आंदोलन सुरु आहे. गुरुवारी नऊ ऑगस्ट रोजी कोल्हापूर बंदची हाक दिली असून त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने आंदोलकांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेतली. बैठकीला श्रीमंत शाहू छत्रपती, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, ज्येष्ठ पत्रकार प्रतापसिंह जाधव, पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

इंद्रजित सावंत म्हणाले, 'मराठा आरक्षणप्रश्नी मराठा समाजाचा राज्य सरकारवर विश्वास राहिलेला नाही. एक वर्षापूर्वी मुंबईत झालेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनात मराठा आरक्षणासह सर्व प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन सरकारने लेखी व तोंडी दिले होते. पण सरकारने आरक्षणासह एकही मागणी पूर्ण केलेली नाही. सरकारवरचा विश्वास उडाला असल्याने मराठा समाजाने ठोक आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनात फूट पाडण्याचे प्रयत्न असफल झाल्यावर शांततेत आंदोलन करणाऱ्या डॉक्टर, वकील, प्राध्यापक व युवक कार्यकर्त्यांना पोलिस नोटीस पाठवत आहेत. कायदेशीर नोटिसा पाठवून मराठा समाजाला भिती दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु जितका दबाव येईल तितका मराठा समाज उसळून उठेल.' 'यापूर्वी मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध केला आहे. १५ सप्टेंबरनंतर आयोगाने नकार दिला तर सरकार काय करणार? राज्यातील ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांनी अध्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षण देता येते असे स्पष्ट केले आहे. पण ज्येष्ठ विधीतज्ज्ञांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करुन सरकार वेळकाढूपणा काढत आहे', असा आरोप सावंत यांनी केला.

मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी कोल्हापूर शहरासह सर्व तालुक्यात गुरुवारी शांततेत बंद पाळण्यात येणार आहे असे स्पष्ट करत मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण होईलपर्यंत आंदोलन स्थगित करु नये असा समाजाकडून रेटा सुरु आहे, याकडे लक्ष वेधले. गणी आजरेकर म्हणाले, 'दसरा चौकात एका बाजूला पोवाडा, भजन सुरु असते तर दुसरीकडे मुस्लीम बोर्डिंगमध्ये नमाज सुरु असते. आंदोलनाला नैतिकता प्राप्त झाली असून आंदोलन शांततेत होईल.' तर 'आंदोलनकर्त्यांवर मंत्री दबाव आणत आहेत, असा आरोप करत सरकारने दबाव टाकून प्रयत्न केला तर आम्ही सहन करणार नाही', असा इशारा दिलीप देसाई यांनी दिला. यावेळी माजी महापौर आर.के. पोवार, माजी नगरसेवक धनंजय सावंत, प्रसाद जाधव, सागर धनवडे यांनी गुरुवारचा बंद शांततेत राहील, अशी ग्वाही प्रशासनाला दिली.

जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी नऊ ऑगस्टचा बंद शांततेत पाळावा, असे आवाहन केले. करवीर प्रातांधिकारी सचिन इथापे यांनी आभार मानले.

०००००

पोलिस अधिक्षकांच्या वक्तव्यावर आक्षेप

नऊ ऑगस्ट रोजी होणाऱ्या दसरा चौकातील आंदोलनात कार्यकर्त्यांच्या घरातील महिला व मुले येणार आहेत का, असा प्रश्न विचारत कार्यकर्त्यांना हात वर करण्याची सूचना पोलिस अधीक्षक देशमुख यांनी केली. त्यांच्या सूचनेला आंदोलकांनी जोरदार आक्षेप घेत आंदोलन शांततेत करण्यासाठी आचारसंहिता केल्याचे स्पष्ट केले. शहर व उपनगरातील नागरिकांनी महिला व लहान मुलांसह आंदोलनला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलन सुरुच राहणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी गेली चार वर्षे सातत्याने प्रयत्न केले आहेत. मराठा समाजाने शिस्तबद्ध पद्धतीने ५८ मोर्चे काढले. शांतता आणि सनदशीर मार्गाने आंदोलन करुनही सरकारकडून आरक्षण देण्यास विलंब होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी नोव्हेंबरपर्यंत आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर दोन दिवसांत कसा विश्वास ठेवणार?' असा प्रश्न उपस्थित करत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरुच राहील, अशी घोषणा केली.

नऊ ऑगस्ट रोजी होणाऱ्या 'कोल्हापूर बंद'च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले, 'सर्व समाजांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. मात्र राजकीय इच्छाशक्तीअभावी आरक्षण देण्यास विलंब होत आहे. सरकारने आरक्षणाची मागणी गांभीर्याने घेतली पाहिजे. वेळकाढूपणा करु नये. शांततेत आंदोलन करण्याची मराठा समाजाची परंपरा कायम ठेवत नऊ ऑगस्ट रोजीचा कोल्हापूर बंद शांततेत पाळावा.'

आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिस दडपशाही करत आहेत, असा आरोप इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, दिलीप देसाई यांनी केला. नऊ ऑगस्ट बंद शांततेत करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार व पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी केले.

दरम्यान सकल मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असून ग्रामीण भागातील नागरिक, विविध समाज संस्थांनी रॅली काढून पाठिंबा दिला. माजी राज्यमंत्री आमदार भास्करराव जाधव, आमदार नीतेश राणे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. राज्य सरकार आरक्षण देण्यास विलंब करत असल्याचा आरोप करत आमदार राणे यांनी सरकारने बळाचा वापर केला तर उद्रेक होईल, असा इशाराही दिला.

\Bउद्या बंद\B

दरम्यान उद्या, गुरुवारी मराठा समाजाच्यावतीने बंद पुकारण्यात आला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी बैठका घेऊन सतर्कतेचे आदेश दिले. जिल्हा प्रशासनाने आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. कोणताही अनूचित प्रकार घडू नये, याची खबरदारी घेण्यात आली आहे.

.. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्राइम डायरी ८ ऑगस्टसाठी

$
0
0

गुंडाविरोधी पथक बरखास्त

कोल्हापूर

गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी स्थापन केलेले गुंडाविरोधी पथक विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी मंगळवारी बरखास्त केल्याचे समजते. या प्रकरणी तक्रारदाराने सबळ पुरावे दिल्याने ही कारवाई केल्याचे समजते. या पथकातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्या केल्याची चर्चा पोलिस दलात सुरु आहे. या पथकात प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. इस्पुर्ली आणि देवाळे (ता. करवीर) परिसरात या विशेष पथकाने कर्तव्यात कसूर केल्याचा तक्रार एकाने केली होती. पथकातील कर्मचाऱ्यांचे लागेबंधे असल्याचे पुरावेही दिल्याने या प्रकरणाची गांभीर्याने दखल नांगरे पाटील यांनी घेतल्याचे समजते.

.

१७ ऑगस्टला सुनावणी

कोल्हापूर

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित समीर गायकवाडवरील अटी शिथिल करण्याबाबतच्या अर्जावर १७ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणी विशेष सरकारी वकिलांनी मुदत मागितली. गायकवाडवर पासपोर्ट जमा करणे, राज्याबाहेर जाऊ नये, दर रविवारी एसआयटीसमोर हजेरी देण्यासह अन्य काही अटी लावल्या आहे. या अटी शिथिल करण्यासाठी गायकवाडने अर्ज केला आहे.

.....

रोख रक्कमेसह टीव्ही लंपास

कोल्हापूर

रुईकर कॉलनी येथील मेनन कंपनीच्या गेस्ट हाऊसमधून रोख ७ हजार रुपये व टीव्ही चोरट्याने लंपास केला. या प्रकरणी शामराव बामणे यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. सहा ऑगस्ट रोजी गेस्ट हाऊसची साफसफाई करण्यासाठी कर्मचारी आल्यानंतर चोरीचा हा प्रकार निदर्शनास आला. चोरट्याने कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केल्याचे तपासात उघड झाले आहे.

................

लॉकरमधून पैसे चोरीस

कोल्हापूर

चारचाकी गाडीच्या लॉकरमधून ३४ हजार रुपये चोरल्याची घटना लक्ष्मीपुरी येथे घडली. या प्रकरणी अरविंद खांबे (वय ४०, रा. आपटी, ता. पन्हाळा) यांनी फिर्याद दाखल केली. खांबे हे आपल्या हॉटेलसाठी माल खरेदी करण्यासाठी लक्ष्मापुरीत आले होते. त्या वेळी पार्किगमध्ये लावलेल्या त्यांच्या गाडीच्या लॉकरमधून पैसे चोरीस गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरचा सार्थक राज्यात अव्वल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी विभागातून तेजस मुक्त विद्यालयाचा विद्यार्थी सार्थक बाबूराव खोत (९४.६३ टक्के) राज्यात प्रथम, तर यशवंतराव घाटगे हायस्कूलचा विद्यार्थी अश्लेषा अजित पोवारने (९३.९५ टक्के) याने दुसरा क्रमांक पटकावला. पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या पहिल्या दहाजणांच्या यादीत नऊ विद्यार्थी कोल्हापूरचे आहेत.

यामध्ये श्रीराम विद्यालयाचा विद्यार्थी अनीश अरुण होनगेकर याने ९२.६१ टक्के गुण मिळवत चौथे स्थान पटकाविले. शिवराज विद्यालय मुरगूडचा विद्यार्थी वेदांत संतोष पाटील, जरगनगर विद्यालयाचा विद्यार्थी साईराज आनंदा पाटील व श्री दत्त विद्या मंदिर कागल येथील मयुरा मिलिंद कालेकरने प्रत्येकी ९१.२७ टक्के मिळवत सातव्या स्थानावर राहिले. सरस्वती हायस्कूलची विद्यार्थिनी संजना यशवंत होडगे, जरगनगर विद्यामंदिरातील ओंकार आबासाहेब बिक्कड व इचलकरंजीचा अथर्व शिरीष हावळ प्रत्येकी ८९.९३ टक्के गुण मिळवत दहाव्या स्थानी राहिले. याशिवाय प्रायव्हेट हायस्कूलचा विद्यार्थिनी राधा कोठावळे ८९.२६, भाऊसाहेब जगदाळे विद्यालयाचा विद्यार्थी ओम गणेश देसाई ८९.२६, विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी रुचा हरीश शिंदेने ८८.५९, श्रेया साळुंखे ८७.२४, श्रीधर सावंत विद्यामंदिरमधील वसुंधरा दिलीप इंगवले आणि शिवराज विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी साकिब अत्तार ८७.९१, यशवंतराव दत्तात्रय देसाई ८७.२४ यांचा गुणवत्ता यादीत समावेश आहे. विद्यामंदिर बेलेवाडी खुर्दचा विद्यार्थी श्रीवर्धन सुनील पाटील ८७.९१, श्री वसंतराव चौगुले इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी ओजस मंदार जोग ८७.७५, मुरगूड विद्यालयमधील विश्वजित बाबूराव पाटील ८७.२४, इचलकरंजी येथील अथर्व वैभव नलवडे ८७.२४ व साधना हायस्कूल गडहिंग्लज येथील सृष्टी चंद्रकांत पतंगेचा समावेश आहे.

००००

गुणवत्तेने झळाळला

'जरगनगर पॅटर्न'

इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी विभागातून गुणवत्ता यादीत येथील लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरातील २१ विद्यार्थ्यांनी स्थान पटकावले. विद्यालयातील साईराज आनंदा पाटीलने २७२ गुण मिळवत राज्यात सातव्या क्रमांकांनी उत्तीर्ण झाला. त्याच्यासह ओंकार आबासाहेब बिक्कड २६८, राजवर्धन भगवान फडतारे २६४ गुण मिळवत राज्य गुणवत्ता यादीत झळकले. जिल्हा गुणवत्ता यादीत उत्कर्षा विनायक कांबळे २५४, वेदांती अमोल कळंत्रे २५२, श्रीराज युवराज भोसले २५२, प्रथमेश सचिन भोसले २५०, सानिध्य पाटील २४८, सलोनी पाटील २४८, प्राची पांडुरंग गवळी २४६, सार्थक रवींद्र घाडगे २४४, वरद सतीश कांबळे २४२, प्रियानी नामदेव पाटील २३८, समृद्धी राहुल जाधव २३८, जयराज गणपती माळी २३४, समीक्षा विनायक फाळके २३२, निहाल जाधव २३०, मानसी नितीन वाळके २३०, स्वरा कोराणे २२८, ज्योतिरादित्य पाटील २२८, महमदआबिद फारुख शेख २२६ हे विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. त्यांना मुख्याध्यापक उत्तम गुरव, सहायक शिक्षक संदीप सुतार, अमित पाटुकले, शैलजा पाटील, विनोद गायकवाड आणि सेजल शिवाजी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. नेहरूनगर विद्यामंदिरमधील प्रज्ञेश मिठारी तर टेंबलाईवाडी विद्यामंदिरातील गौतमी गायकवाड, मुकुंदराज धुमाळ, शर्वरी रोकडे, सृष्टी चव्हाण, ऋतूजा वळकुंजे यांचा गुणवत्ता यादीत समावेश आहे. यशवंतराव चव्हाण विद्यामंदिराचा विद्यार्थी गंधर्व पाटील, अहिल्याबाई सेंट्रल स्कूलचा विद्यार्थी अर्जुन पाटील यांचा गुणवत्ता यादीत समावेश आहे.

००००

तेजस मुक्त विद्यालय आघाडीवर

तेजस मुक्त विद्यालयातील १३ विद्यार्थी पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ताधारक ठरले. यामध्ये सार्थक खोत राज्यात प्रथम, तर साईनंद अजित तिवले १५ वा आला. रोहन सुधीर सांगावकर, सोहम युवराज पाटील, श्रेयश संभाजी पाटील, अनुष्का मिलिंद चौगले, गौरी प्रशांत कुंभार, स्नेहा दीपक हजारे, गुरुप्रसाद अशोक पाटील, आदिराज सुनिल लव्हटे, श्रावणी अभिजित गर्दे, मधुरिमा शार्दूल मुटकेकर हे शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका संगीता प्रकाश साळोखे, वर्गशिक्षक विजय सदाशिव नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.

००००

आठवी शिष्यवृत्तीतही कोल्हापूरची चमक

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता आठवी) परीक्षेत शहरी विभागात सरस्वती हायस्कूलची विद्यार्थिनी धनश्री रघुनाथ शिवदासने ९७.२९ टक्के घेऊन राज्य गुणवत्ता यादीत दुसऱ्या, तर इचलकरंजी हायस्कूलमधील ईशान भूषण म्हेत्रेने ९६.६२ टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकाविला. एस. पी. हायस्कूलमधील सलोनी सुनील शिंदेने ९५.२७ टक्के गुण घेत चौथ्या स्थानी, तर श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूलचा विद्यार्थिनी वसुंधरा विनायक चिले ९४.५९ टक्के गुण मिळवत पाचव्या स्थानी आहे. इचलकरंजी येथील योगेश अशोक नेजे आठव्या व सरस्वती हायस्कूलची विद्यार्थिनी दिव्या गोपालकृष्ण घुमठानावर नवव्या क्रमांकावर आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युनियन कर्मचारी आज कामावर रुजू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या तीन दिवसीय संपात जिल्हा परिषद कर्मचारी युनियने मंगळवारी सहभाग घेतला. दरम्यान, कर्मचारी युनियन बुधवारपासून कामावर रुजू होणार आहेत. कर्मचारी युनियनने एक दिवस आंदोलन करुन दुसऱ्या दिवसापासून कामात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे युनियनचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी सांगितले. यामुळे बुधवारपासून आरोग्य कर्मचारी, वाहक, शिपाई हे कामावर हजर होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाकडील माहितीनुसार ७८१९ कर्मचारी संपात सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात तीन हजार पोलिस तैनात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजातर्फे गुरुवारी (ता. ९) होत असलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ३ हजार पोलिस तैनात केले आहेत. जिल्हा पोलिस दलाने ३१ पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोख बंदोबस्त तैनात केला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येणार असून शहरात १५० हून अधिक सीसी टिव्ही कॅमेरे बसविले आहेत. हुल्लडबाजांवर नजर ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांचे पथक तैनात केले आहे. दरम्यान,जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दंगल काबू पथकाचे संचलन करण्यात आले.

जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात तीन हजार पोलिस गुरुवारी पहाटेपासून रस्त्यावर उतरणार आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी बुधवारी सर्व अधिकाऱ्यांची मुख्यालयात बैठक घेतली. बंदोबस्ताची आखणी करुन बंद काळातील प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीवर नजर ठेवण्याचे आदेश दिले. त्यासाठी विशेष पथके नियुक्त केली असून दहा मिनिटाला पथकप्रमुख मुख्यालयाला माहिती देणार आहेत. पोलिस मुख्यालयातील कंट्रोलमध्ये एक विशेष पथक शहरातील हालचालीवर लक्ष ठेवणार आहे.

जिल्ह्यात शिरोळ, गगनबावडा, शाहूवाडी, कागल, इचलकरंजी या संवेदनशील भागात उपअधीक्षक, निरीक्षकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. शहराजवळील ग्रामस्थही दसरा चौकात येण्याची शक्यता गृहीत धरुन त्या ठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे. सरकारी, खासगी मालमत्ता आणि वाहनांचे नुकसान होऊ नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गावरील वाहनांची तपासणी बॉम्बशोधक पथकाव्दारे करण्यात आली. सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करण्यात आली.

बंदोबस्त असा

पोलिस अधीक्षक १

अप्पर पोलिस अधीक्षक २

पोलिस उपअक्षीक्षक ७

पोलिस निरीक्षक ३०

पोलिस उपनिरीक्षक, एपीआय १२०

पोलिस कर्मचारी,एलपीसी १६००

एसआरपीएफ २ तुकड्या

राज्य राखीव दलाच्या ३ तुकड्या

बॉंम्बशोधक पथक १

होमगार्ड जवान ६००

'बंदकाळात नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. कोणत्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल. '

डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिंगायत धर्म मान्यतेसाठी परळीत राज्यव्यापी बैठक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता मिळावी व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा. या मागणीकरीता बीड जिल्ह्यातील परळी येथील वक्रेश्वर मंदिर येथे अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीची राज्यव्यापी बैठक होणार आहे. बैठकीला समितीचे मुख्य मार्गदर्शक डॉ. शिवलिंग शिवाचार्य महास्वामी (अहमदपूर) हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती समितीचे राज्य महासचिव विजयकुमार हत्तुरे यांनी दिली.

लिंगायत समाजाने आपल्या मागण्यांसाठी राज्यातील आठ प्रमुख शहरांत लाखोंच्या संख्येने महामोर्चे काढले. परंतु, सरकारने त्याची योग्य ती दखल घेतली नाही. इतर समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या मान्य करा. परंतु, लिंगायत धर्म मान्यतेबाबत लवकरात लवकर विचार करावा, याबाबत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावरही अद्याप काही निर्णय झाला नाही. त्यामुळे, आम्हाला जनआंदोलनाची दिशा ठरवणे भाग पडले आहे. या आंदोलनाला योग्य दिशा देण्याचे काम बैठकी होणार असल्याचे हत्तुरे यांनी सांगितले.

परळी येथे आयोजित या बैठकीस अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय समन्वयक अविनाश भोसीकर (नांदेड), महाराष्ट्र राज्य समन्वयक माधवराव पाटील-टाकळीकर (लातूर), मराठवाडा समन्वयक प्रदीप बुरांडे (औरंगाबाद), सदस्य प्रा. राजेश विभूते (लातूर), आत्मलिंग शेटे (परळी), प्रा. सुनील हेंगणे (अहमदपूर), विरेंद्र मंगलगे (औरंगाबाद), बी. एस. पाटील (कोल्हापूर), सुधीर सिंहासने (सांगली), राजेंद्र अलमखाने (पुणे), डॉ. अशोक मेनकुदळे (यवतमाळ), कैलास वाघमारे (वर्धा), प्रा. आनंद कर्णे (नांदेड), चेतन सौंदळे (परळी) आदी राज्यभरातून सर्व समन्वय समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेस शहर अध्यक्ष सकलेश भाबुळगांवकर, सोलापूर युवक अध्यक्ष अमित रोडगे, धोंडप्पा तोरणगी, सिद्धाराम कटारे, प्रा. शिवलिंग अचलेरे, प्रा. हर्षवर्धन पाटील, मयूर स्वामी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेस्कॉम, कोल्हापूर विभागाची बिनविरोध निवड

$
0
0

फेस्कॉमच्या विभागीय

अध्यक्षपदी प्रभाकर माने

कोल्हापूर टाइम्स टीम

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या (फेस्कॉम) कोल्हापूर विभागाच्या अध्यक्षपदी प्रभाकर कुंडलिक माने (पलूस) तर उपाध्यक्षपदी यशवंत नानासाहेब चव्हाण (जत) यांची एकमताने निवड झाली. विभागाची त्रैवार्षिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. यामध्ये कोल्हापुरातील २७४ व सांगली जिल्ह्यातील २६९ सेवा संघांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

फेस्कॉमच्या सचिवपदी अंजुमन रशिद खान (मिरज), सहसचिव सोमनाथ पांडुरंग गवस (चंदगड), कोषाध्यक्षपदी शरद भास्कर फडके (कोल्हापूर)यांची निवड झाली. सर्वसाधारण सभासद म्हणून श्रीमती विद्या सुमनलाल शहा (कोल्हापूर), विजय सदाशिव चव्हाण (कोल्हापूर), आनंदराव विठ्ठल पाटील (साखराळे) आणि लक्ष्मण पाटील (पलूस) यांचा समावेश झाला. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी डॉ. मानसिंगराव जगपात, आण्णासाहेब दानोळे, रामकुमार सावंत, हिंदुराव पाटील, अरविंद कुलकर्णी, लक्ष्मण कनुजे यांनी प्रयत्न केले. सी. के. नलवडे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात क्राइम

$
0
0

वायरमनला शिविगाळ

करणाऱ्यावर गुन्हा

कोल्हापूर : घरातील वीजपुरवठा तत्काळ सुरू केला नसल्याच्या रागातून पन्हाळा येथे वायरमन कोडिंबा नलवडे (वय ५८, रा. कासार्डे, ता. शाहूवाडी) याला मारहाण करण्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला. या प्रकरणी संशयित आरोपी श्रीकांत कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. घरातील वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर कांबळे याने वायमरन नलवडे यांना दूरध्वनीवरून याची माहिती दिली होती. वायरमन नलवडे हे त्या ठिकाणी दुरुस्तीसाठी गेले असता, वीजेच्या खांबावर हा बिघाड असल्याचे आढळले. रात्रीच्या वेळी खांबावर चढून दुरूस्ती शक्य नसल्याने दुसऱ्या दिवशी वीजपुरवठा पूर्ववत केला जाईल, असे नलवडे यांनी सांगितले. त्यानंतर कांबळे याने वायरमनला शिवीगाळ करून मारहाण केली. नलवडे यांच्या तक्रारीनंतर कांबळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

कारच्या धडकेत

एकजण जखमी

कोल्हापूर : रंकाळा परिसरातील राजघाट रोडवरील हिंदुस्थान बेकरीसमोर भरधाव वेगाने आलेल्या कारने दिलेल्या धडकेत शिवाजी जाधव (वय ६४, रा. चैतन्य हॉस्पिटलनजीक, पेठवडगाव) जखमी झाले. जाधव हे मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास महाद्वार रोडकडे चालले असताना भरधाव आलेल्या कारने (क्र. एमएच ०५ डीएच २३६२) त्यांना धडक दिली. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली आहे.

बनावट चावीने

कार पळवली

कोल्हापूर : घरासमोर लावलेली कार बनावट चावीच्या सहाय्याने अज्ञातांनी चोरून नेल्याची घटना सायबर कॉलेजजवळील काटकर माळ, कामते रेसिडेन्सी परिसरात घडली. त्याबाबत विशाल राजाराम सासमिले (वय ३२, रा. कामते रेसिन्डसी, प्लॅट नं जी-२) यांनी राजारामपुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. २९ जुलै रोजी सासमिले हे घरगुती कार्यक्रमासाठी निपाणी येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी अपार्टमेंटच्या भिंतीला लागून टाटा इंडिका गाडी (क्र. एएएच ०२ एएल ०४३६) पार्क केली होती. गावाहून परत आल्यानंतर त्यांना कार चोरीला गेल्याचे दिसले. सासमिले हे शिक्षक आहेत. त्यांनी अज्ञातांनी कार चोरून नेल्याची फिर्याद राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images