Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

एकाची आत्महत्या

$
0
0

वाघवडेत एकाची आत्महत्या

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

वाघवडे (ता. राधानगरी) येथील सुनील शिवाजी यादव (वय ३५) याने मळी नावाच्या शेतातील सागवानच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झाली आहे.

याबाबत घटनास्थळी व राधानगरी पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, सुनील हा एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. तो विवाहित असून त्याला एक मुलगा आहे. रविवारी रात्री तो बाहेरगावी जेवायला गेला होता. त्यामुळे घरातील नातेवाईकांना वाटले की रात्री उशिरा येऊन झोपला असेल. रविवारी पहाटे साडेसहा वाजता मळी नावाच्या शेतातील सागवानच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. याबाबत भाऊ अनिल यादव याने पोलिस ठाण्यात वर्दी दिली. आत्महत्येचे नेमके कारण आद्याप समजले नाही. सोळांकूर येथील ग्रामीण रुग्णालयात उतरीय तपासणी करण्यात आली. पोलिस कान्स्टेबल नलवडे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पासिंग ट्रॅकसाठी इचलकरंजीत बैठक

$
0
0

पासिंग ट्रॅक सुरू करून

वाहनधारकांची ससेहोलपट थांबवा

म.टा.वृत्तसेवा,इचलकरंजी

वाहन पासिंग ट्रॅकसाठी पंचवटी चित्रमंदिरलगतच्या जागेला रिक्षाचालक, टेम्पोचालक अथवा माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी संमती दर्शविली असताना भाजपा पक्षप्रतोद तानाजी पोवार व भाजपा शहराध्यक्ष शहाजी भोसले हे आम्ही विरोध केल्याचे सांगत दिशाभूल करीत आहेत. त्यांना रिक्षाचालक, मालवाहतूक टेम्पोचालकांचा इतका कळवळा असेल तर या जागेत वाहन पासिंग ट्रॅक तातडीने सुरू होण्यासाठी पाठपुरावा करत आवश्यक ६० लाख रुपयांचा निधी नगरपरिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देऊन वाहनधारकांची होणारी ससेहोलपट थांबवावी, अशी मागणी रिक्षाचालक, मालवाहतूक टेम्पो कृती समितीच्या बैठकीत उपस्थित मान्यवरांनी केली.

इचलकरंजीत तातडीने वाहन पासिंग ट्रॅक सुरु व्हावा, आरटीओ कॅम्पसाठी क्रांती गारमेंट प्रशिक्षण केंद्राची इमारत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात रिक्षाचालक, मालवाहतूक टेम्पो कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक इचलकरंजी पॉवरलूम असोशिएशनच्या सभागृहात पार पडली. इचलकरंजी शहरासह हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून पाठिंबा व्यक्त केला. नंदा साळुंखे, प्रकाश लोखंडे, जीवन कोळी, साताप्पा आदमापुरे, लियाकत गोलंदाज, दशरथ मोहिते आदींनी मनोगत व्यक्त केले.

वाहन पासिंगचे केंद्र सुरु होण्यासाठी किमान सात ते आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत तात्पुरती सोय म्हणून माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी तारदाळ येथील कल्लाप्पाण्णा आवाडे इंटीग्रेटेड टेक्स्टाईल पार्क संस्थेच्या जागेचा पर्याय सुचविला. हे ठिकाण दोन्ही तालुक्यातील वाहनधारकांना सोयीचे होणार असून संस्थेनेही जागा देण्यास सहमती दर्शविली आहे. याठिकाणी २५० मीटरचा ट्रॅकसरळ रेषेत विनाअडथळा होऊ शकतो. शिवाय सीसीटिव्हीची उपलब्धता करून देणेची तयारी केएटीपी संस्थेने दाखविली आहे. असे असताना भाजपाचे पक्षप्रतोद पोवार व भाजपा शहर अध्यक्ष भोसले यांनी पासिंग ट्रॅकसाठी केएटीपी या संस्थेची स्टेशन रोडवरील जागा देण्याची मागणी केली आहे. त्यातून ट्रॅक संदर्भातील त्यांचे अज्ञानच उघड झाले आहे. केवळ राजकारण करत आणि दिशाभूल करत पोवार व भोसले हे स्टेशन रोडवरील जागेची मागणी करत आहेत असे आरोप यावेळी करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हाडा कार्यशाळा...

$
0
0

म्हाडाच्या घरकुल कामांना गती लाभेल

कोल्हापुरातील कार्यशाळेत माहिती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'प्रधानमंत्री आवास योजनेंर्गत 'सर्वांसाठी घर' संकल्पना लोकाभिमुख करताना प्रभावी अंमलबजावणीचे नियोजन आहे. या योजनेंर्गत सार्वजनिक खासगी-भागीदारी तत्वावरील (पीपीपी)गृहप्रकल्पांची म्हाडामार्फत आठवडाभरात छाननी आणि राज्य केंद्रीय संनियंत्रण समितीची महिन्यात मंजुरी मिळवून दिली जाईल. यामुळे घरकुलांच्या कामांना गती लाभेल,'अशी माहिती पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय लहाणे यांनी दिली.

पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, क्रिडाई कोल्हापूर आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 'प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावरील प्रकल्पांची अंमलबजावणी' या अनुषंगाने कार्यशाळा आयोजित केली होती. पुणे म्हाडा'चे अध्यक्ष सरमजितसिंह घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा झाली. रेसिडेन्सी क्लब येथे आयोजित कार्यशाळेत बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'म्हाडा'चे कार्यकारी अभियंता विवेक पाटील यांनी विविध शंकांचे निरसन केले. तर दिलीप मुगळीकर यांनी सादरीकरण केले.

लहाणे म्हणाले, 'म्हाडामार्फत पुणे येथे पहिल्या टप्प्यात ३००० घरकुलांसाठी लॉटरी योजना राबविली, परिणामी कोल्हापुरात योजना गतिमान करण्यास विलंब झाला. मात्र पीपीपी'योजनेंतर्गत २५० घरकुलांसाठीचा प्रस्ताव सादर केल्यास आठवड्याभरात त्याची छाननी आणि महिन्याच्या आत संनियंत्रण समितीची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या तत्वावरील गृहनिर्माण प्रकल्पाच्या बांधकामाचे अधिकार म्हाडाला उपलब्ध झाले आहेत. '

समरजितसिंह घाटगे म्हणाले, 'म्हाडाच्या गृहनिर्माण योजना लोकांपर्यत पोहचविण्यासाठी गतिमान कामकाजाला प्राधान्यक्रम राहील. यासाठी अधिकाऱ्यांनी दफ्तर दिरंगाई टाळावी. मुदतीत फायलींचा निपटारा, मंजुरी प्रकिया जलद झाली तर योजना लोकाभिमुख बनतील. प्रधानमंत्री आवास योजनेच्या गृहप्रकल्पांसाठी क्रिडाईने आवश्यक बाबींबाबत पत्र द्यावे, ते मुख्यमंत्र्यांना देऊन पाठपुरावा करु. शिवाय गृहनिर्माण विभागाच्या सचिवांसोबत संयुक्त बैठक घेऊन अडचणी दूर करु. प्रत्येक महिन्याला येणाऱ्या प्रस्तावावर चर्चा करुन जास्तीत जास्त घरे कोल्हापुरात व्हावीत यासाठी प्रयत्न करू.' महापालिका आयुक्त अभिजित चौधरी यांनी म्हाडामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांना महापालिकेचे पूर्ण सहकार्य राहील, असे सांगितले.

क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष महेश यादव यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष सचिन ओसवाल यांनी स्वागत केले. सचिव रविकिशोर माने यांनी आभार मानले. याप्रसंगी सहकार परिषद आयुक्त शेखर चरेगांवकर, म्हाडाचे उपअभियंता अशोक पाटील, प्राधिकरणचे सीईओ शिवराज पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

..............

२५,१४४ घरांसाठी

शहरात मागणी

सर्वांसाठी घर योजनेंतर्गत कोल्हापूर शहरातून २५१४४ तर जिल्ह्यात ४६९०० घरकुलांची मागणी नोंदविली असल्याची माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, क्रिडाईचे राज्य उपाध्यक्ष राजीव पारीख यांनी परवडणाऱ्या घरासाठी आकारण्यात येणारी जीएसटी आठ टक्क्यांपेक्षा कमी करावी. अन्य वित्तीय संस्थेकडून अर्थपुरवठा झाला पाहिजे. पीपीपी गृहप्रकल्पासाठी बांधकाम व्यावसायिकांच्या कर्जाला म्हाडाने हमी द्यावी, अशी मागणी केली. तर महेश यादव यांनी कोल्हापुरात क्रिडाई कार्यालयासाठी जागा मिळावी तसेच इंजिनीअर व बांधकाम कामगारांसाठी प्रशिक्षण आयोजित करावे, अशा सूचना केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोकादायक इमारतींचे कवित्व

$
0
0

भूमिका

शहरातील धोकादायक इमारतींबाबत महापालिका नेहमीच मिळकतधारकांना नोटीस देते. गणेशोत्सव जवळ आल्यानंतर महापालिका कारवाईचा धडाका लावते. पण प्रत्यक्षात यातून काहीच निष्पन्न होत नाही. मिळकतधारकांमधील वाद तर कधी कोर्टात प्रलंबित असलेल्या दाव्यांमुळे या इमारती डौलाने उभ्या असून विशेष म्हणजे यामध्ये मिळकतधारकांसह भाडेकरुही वास्तव्यास आहेत. कोणत्याही क्षणी इमारती पडण्याची शक्यता असताना नोटीस आणि पोलिस स्टेशनला यादी देण्याव्यतिरिक्त कोणतीही कार्यवाही होत नाही. उत्सवाच्या काळात हा प्रश्न गांभीर्याने समोर येत असला, तरी यातून लवकर मार्ग न काढल्यास मोठी जीवित हानी होण्याची शक्यता आहे. यासाठी काही ठिकाणचे मिळकतधारकांमधील वाद समेटाने तर काही ठिकाणी कायदेशीर पद्धतीने मिटवण्याची आवश्यकता आहे. अन्यथा दरवर्षी धोकायदायक इमारतींचे कवित्व मागील पानावरुन पुढे असे सुरुच राहील.

फोटो आहे

....................

धोकादायक इमारतींचे कवित्व सुरुच

९० इमारती धोकादायक, नागरिकांचा जीव टांगणीला

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर :

शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न दिवसेंदिवस ज्वलंत बनत आहे. मिळकतधारकांमधील न्यायालयीन वाद, कौटुंबिक कलहामध्ये अडकलेल्या अशा इमारतींमध्ये बिनदिक्तपणे सुरु असलेला व्यवसाय आणि रहिवासामुळे या इमारतींमधील हजारो नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. दोन ते तीन वर्षापूर्वी असलेल्या धोकादायक इमारतींच्या संख्येत चांगलीच वाढ झाल्याने या इमारती कशा उतरवयाचा हा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

महापालिकेच्या बांधकाम विभागाच्यावतीने दरवर्षी शहरातील धोकादायक इमारतींचा सर्वे केला जातो. सर्वेद्वारे शहरातील धोकादायक इमारती ठरवल्या जातात. यावर्षीही सर्वेचा कार्यक्रम राबवण्यात आला. सर्वेनुसार शहरात ९० धोकादायक इमारती असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन वर्षापूर्वी केलेल्या सर्वेमध्ये ६९ धोकादायक इमारती होत्या. त्यामध्ये नव्याने २१ इमारतींची नोंद झाली. महापालिकेच्या दप्तरी ९० इमारतींची नोंद असली, तरी प्रत्यक्षात सुमारे २०० इमारती धोकादायक असल्याचा अंदाज आहे.

महापालिकेकडे नोंद असलेल्या ९० मिळकतधारकांना मुंबई प्रांतिक अधिनियम १९४९ कलम ६२४ नुसार दुरुस्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. इमारती दुरुस्तीचे प्रस्ताव विभागीय कार्यालयात पाठवून देण्याच्या सूचनाही केल्या. पण दुरुस्ती प्रस्तावाला मिळकतधारकांनी फारसा प्रतिसाद दिला आहे. धोकादायक इमारतीमधील हाताच्या बोटावर मोजण्याइतपत इमारतींची डागडुजी करण्यात आली. त्यामुळे महापालिकेने अत्यंत धोकादायक अशा चार इमारतीमध्ये नागरिकांना रहिवास करण्यास मज्जाव केला. पण ज्या इमारतींच्या मालकीवरुन वाद सुरू आहे, तेथे दुरुस्तीची कोणतीच प्रक्रिया झालेली नसल्याने येथे व्यवसाय किंवा रहिवास करत असलेल्या नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे.

शहरातील ज्या जुन्या व जीर्ण झालेल्या इमारती आहेत, त्या विशेष करुन गणपती विसर्जन मार्गावर आहेत. विसर्जन मिरवणुकीदरम्यान अशा इमारतींच्या खाली उभा राहून भाविक मिळवणूक पाहण्यात मग्न असतात. मोठ्या आवाजाच्या साउंड सिस्टिममुळे अशा इमारतींना धोका असतानाही त्यांना अभय दिले जात आहे. दहा वर्षांपूर्वी अशाच धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळल्यामुळे एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तरीही मिरवणूक मार्गावरील इमारतींना हात लावला जात नाही.

.......................

चौकट

विभागनिहाय धोकादायक इमारती

शिवाजी मार्केट : ३९

गांधी मैदान : १८

राजारामपुरी : २६

ताराराणी : सात

एकूण इमारती : ९०

.............

चौकट

जुन्या भागात धोकादायक इमारती

महाद्वार रोड, ताराबाई रोड, भाऊसिंगजी रोड, शिवाजी पेठ, उत्तरेश्वर पेठ, रविवार पेठ, राजारामपुरी, मंगळवार पेठ आदी शहराच्या जुन्या भागात धोकादायक इमारती आहेत.

कोट

'धोकादायक इमारतींच्या मिळकतधारकांना यापूर्वीच महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. त्यापैकी काही मिळकतधारकांनी इमारतींची दुरुस्ती केली असून चार इमारतींमध्ये रहाण्यास मज्जाव केला आहे. तसेच धोकादायक इमारतींची यादी ज्या-त्या पोलिस ठाण्याला दिली आहे.

नेत्रदीप सरनाईक, शहर अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत आज लाटणे मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने मंगळवार ७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता प्रांताधिकारी कार्यालयावर महिलांचा लाटणे मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर ९ ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सहभागी होऊन शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

आंदोलनाच्या अनुषंगाने येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात सर्वसामावेश बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा मंडळाचे अध्यक्ष सुनिल शेलार होते. ९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तांबेमाळ येथील मराठा सांस्कृतिक भवनात सर्वसमावेश बैठक घेण्यात आली. यावेळी आरक्षणाची गरज आणि त्यासाठी शासनाकडून होत असलेला विलंब यावर ऊहापोह करण्यात आला. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात जमून शहरातील प्रमुख मार्गावरुन मोर्चा काढून पुरवठा कार्यालयाच्या प्रांगणातील क्रांती स्तंभास अभिवादन करुन मोर्चा विसर्जित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. गुरुनाथ म्हातुगडे, नितीन जांभळे, अजय जावळे, बाळासाहेब देशमुख, अरविंद माने, मेघा चाळके, ऊर्मिला गायकवाड, शेखर हळदकर, मोहन मालवणकर, रणजित जाधव, संजय जाधव, पै. अमृत भोसले आदींनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस महादेव गौड, उल्हास सूर्यवंशी, आनंदराव नेमिष्टे, भारत बोंगार्डे, बंडोपंत लाड, वसंत पाटील, उदय निंबाळकर, मधुकर पाटील, संतोष सावंत, किरण पवार, शहाजी भोसले उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कूर येथे आंदोलन

$
0
0

आरक्षण मागणीसाठी

कुर येथे रास्ता रोको

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी कुर येथे गारगोटी -कोल्हापूर रस्त्यावर वाघापूर ग्रामस्थांचा वतीने तासभर रास्ता रोको करण्यात आला. वाघापूर ग्रामस्थानी कुर येथे रास्ता रोको केल्यामुळे दोन्ही बाजुला वाहतुक ठप्प झाली होती.

सचिन घोरपडे म्हणाले, 'मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आरक्षण महत्वाचे असुन आजच्या लढाईत सर्वांनी झोकून देवून काम करावे.' आंदोलनात तानाजी कुरडे, बाळासाहेब शिंदे, बी. एस जठार, दिलीप कुरडे, सुनील जठार, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव नाना जठार, प्रदीप कुरडे, अरविंद जठार, किशन जठार, युवराज दाभोळे, नेताजी आरडे, बाजीराव शिंदे, प्रकाश जठार, मारुती दाभोळे, निवृत्ती कामीरकर , संकेत जठार, प्रकाश कुरडे, अमर बरकाळे आदींनी सहभाग घेतला. सचिन घोरपडे, एकनाथ जठार, सचिन भांदीगरे, बजरंग कुरळे यांनी मनगते व्यक्त केली. यावेळी प्रा. अर्जुन आबिटकर, राहुल देसाई, काँग्रेसचे तालुकाप्रमुख शामराव देसाई, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, शिवराज देसाई, अजित चौगले, सुशांत सूर्यवंशी, संग्राम सावंत, रवींद्र शेंडगे, अरुण शिंदे, नंदकुमार शिंदे, मच्छिंद्र मुगडे, संग्राम पोफळे, मनोज दंडवते सहभागी झाले होते. बेडीव ग्रामस्थांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. दरम्यान, समाजाच्यावतीने युवकांनी घंटानाद करत गारगोटी शहरातून भव्य फेरी काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीरशैव बँकेतर्फे शाखा उद्घाटन

$
0
0

वीरशैव बँकेची कळंबा

शाखा नूतन इमारतीत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अमॄतमहोत्सवी मल्टीस्टेट श्री वीरशैव को ऑप बँकेच्या कळंबा शाखेचे नवीन वास्तूत स्थलांतर झाले. नवीन वास्तूत अत्याधुनिक बँकिंग यंत्रणेसह एटीएम सेंटरची सोय ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. कळंबा शाखेची सुरुवात २००२मध्ये झाली असून अत्याधुनिक सेवेसह नवीन इमारतीत स्थलांतरीत झालेल्या शाखेचे उद्घाटन अध्यक्ष दिलीप चौगुले यांच्या हस्ते झाले. शाखेचे संचालक चंद्रकांत स्वामी होते. बँकेची नवीन शाखा कर्नाटकातील बेळगाव येथे सुरु होणार असल्याची माहिती अध्यक्ष चौगुले यांनी यावेळी दिली.

कळंबा शाखेचे संचालक चंद्रकांत स्वामी म्हणाले, 'ग्राहक व सभासदांना सेवा दिल्याने कळंबा परिसरात वीरशैव बँकेची विश्वासार्हता टिकून आहे. कळंबा हे उपनगर वेगाने विकसित होत असून बँकेच्या व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.'

बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश खोत यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. बँकेने मल्टीस्टेट दर्जा प्राप्त केलेला असून भविष्यात ७५० कोटीं रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण करून शेडयुल्ड दर्जा प्राप्त करणेचा मनोदय असल्याचे त्यांनी सांगितले. बँकेचे उपाध्यक्ष अनिल सोलापुरे यांनी ग्राहकांना कोअर बँकींग, एटीम, आरटीजीएस, एनर्इएफटी, एसएमएस, आधार कार्ड संलग्न शासकीय अनुदान थेट ग्राहकांच्या खातेस जमा करण्याची सुविधा, मोबाइल बँकिंग, पॉस मशिनव्दारे खरेदीची सुविधा दिल्याची माहिती दिली. इमारत जागेचे मालक जयसिंग जाधव, प्रदॉीप पाटील, मनोहर सुतार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शाखा सल्लागार विलास आंबोळे, चंद्रकांत पन्हाळकर, विजय मुधाळे, सचिन पाटील, आनंदराव गंगाजळे, जेष्ठ संचालक नानासो नष्टे, कल्लेश माळी, राजेश पाटील, सूर्यकांत पाटील, शकुंतला बनछोडे, राजेंद्र शेटे, अरविंद माने, राजेंद्र लकडे, रंजना तवटे, चंद्रकांत सांगावकर यांसह कळंबा परिसरातील सभासद व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बँकेचे उपसरव्यवस्थापक राजेंद्र कोरे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णाच्या फ्रिजमध्येच आढळल्या डेंगीच्या अळ्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

आरोग्यसेविका सुशिला अर्जुन चव्हाण यांना डेंगीची लागण झाल्याने सोमवारी जयसिंगपूर नगरपरिषद व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने चव्हाण यांच्या निवासस्थान तसेच परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्या घरातील फ्रिजच्या ट्रेमध्ये डेंगी डासाच्या अळ्या आढळून आल्या. यानंतर पथकाने परिसरात औषध फवारणी केली.

नांदणीत प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणार्‍या चव्हाण या जयसिंगपूर येथे डवरी सोसायटीत राहतात. डेंगीची लागण झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती मिळताच जयसिंगपूर नगरपालिका व प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहायक चंद्रकांत आपटे, आरोग्य सेवक डी. बी. गायकवाड, जे. आय. मुल्ला यांनी रुग्ण चव्हाण यांचे निवासस्थान तसेच परिसराची पाहणी केली. यावेळी चव्हाण यांच्या घरातील फ्रिजखालील ट्रेमध्ये डेंगीचा प्रसार करणार्‍या डासांच्या अळ्या आढळल्या. परिसरात सिमेंटच्या टाक्यातील पाण्यातही डासांच्या अळ्या आढळल्या.

नगरसेवक संजय पाटील कोथळीकर, प्रेमला मुरगुंडे यांनीही परिसरातील नागरिकांची भेट घेवून कोरडा दिवस पाळण्याबाबत नागरिकांचे प्रबोधन केले. नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक एस. व्ही. कांबळे, विशाल सावंत उपस्थित होते. नगराध्यक्षा डॉ. नीता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, आरोग्य समिती सभापती अनुराधा आडके, मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांनी नागरिकांना कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आंदोलनाला पाठिंब्यासाठी रीघ

$
0
0

दसरा चौक घोषणांनी दणाणला; पालकमंत्री, सरकारवर जोरदार टीका

कोल्हापूर टाइम्स टीम

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी येथील दसरा चौकात सकल मराठा ठोक मोर्चातर्फे १४ दिवसांपासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला सोमवारी पाठिंबा देण्यासाठी रीघ लागली. मोटारसायकल रॅली काढून जिल्ह्यातील समाजातील युवक, कार्यकर्ते, विविध संघटना, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी दुपारी दोनपर्यंत येत राहिले. यामुळे दसरा चौकात मोठी गर्दी झाली. 'एक मराठा, लाख मराठा', 'आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. सर्वच वक्त्यांनी आरक्षण देण्यास विलंब केल्याप्रकरणी सरकार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. हातात भगवा ध्वज घेऊन कार्यकर्ते येत राहिल्याने दसरा चौक भगवामय दिसत होता.

सकल मराठा समाजातर्फे राज्यभर लाखोंच्या संख्येने मोर्चे काढून मागण्यांकडे लक्ष वेधले. मात्र सरकारने आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मराठा समाजातर्फे केला आहे. आरक्षणाचा निर्णय होण्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेगा भरती जाहीर केली. हे निमित्त झाल्याने मराठा समाज आक्रमक होत रस्त्यावर उतरला. तीव्रपणे आंदोलन करीत आहे. येथील मराठा समाजार्फे दसरा चौकात भव्य मंडप उभारून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले.

आंदोलन सुरू असतानाच आरक्षणसाठी कणेरीवाडीतील विनायक गुदगी या तरुणाने रविवारी आत्महत्या केली. राज्यातही अनेक तरुणांनी आत्महत्या झाल्या. आत्महत्याग्रस्त कुटुंबास सरकारच्या प्रतिनिधींनी भेट न दिल्याच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या प्रतिकात्मक पुतळ्यास दुषित पाण्याचा अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर आत्महत्या केलेल्या गुदगी यास श्रद्धांजंली वाहण्यात आली. शोकसभेत मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, प्रा. जयंत पाटील, फत्तेसिंह सावंत यांची भाषणे झाली. सर्वच वक्त्यांनी आरक्षणला दिरंगाई करीत असल्याबद्दल सरकारवर जोरदार टीका केली. आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. आरक्षणासाठी आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, दिवसभर जिल्ह्यातील विविध ग्रामस्थ, तरुणांनी दुचाकीने रॅलीने आंदोलनाच्या ठिकाणी येत राहिले. हातात भगवा ध्वज, एक मराठा, लाख मराठाच्या घोषणा देत ते येत राहिले. पाटाकडील तालीम मंडळ, कोल्हापूर जिल्हा मातंग समाज संघर्ष कृती समिती, तुकाराम माळी तालीम मंडळ, राजारामपुरी शाहूनगर मंडळ, कोल्हापूर जिल्हा फेरीवाले कृती समिती, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना, काळम्मावाडी धरणग्रस्त संघटना, ओबीसी सेवा संघ, मुस्लिम सुन्नत मद्रसा जमाअत, राधाकृष्ण सत्कार्य संवर्धन मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भुये, कुशिरे तर्फ ठाणे, पोहाळे तर्फ, नेर्ली, गिरगाव, केर्ले, सडोली खालसा, जठारवाडी, भुये, सडोली दुमाला, सावर्डे दुमाला गावातील ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलनास पाठिंबा दिला. या गावातील ग्रामस्थ, तरुण मोठ्या संख्येने दुचाकीवरून रॅलीत येते राहिले. प्रचंड घोषणाबाजी करीत ते आंदोलनाच्या ठिकाणी दाखल होत होते. यामुळे दुपारी दोनपर्यंत मोठी गर्दी झाली होती. आक्रमक कार्यकर्ते, सरकारच्या विरोधातील संताप, घोषणाबाजी यामुळे कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. परिणामी दसरा चौकाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिलिंद हायस्कूलतर्फे जनजागृती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रतिभानगर येथील मिलिंद हायस्कूलतर्फे प्लास्टिक मुक्तीसाठी जनजागरण रॅली काढण्यात आली. तत्पूर्वी बी.एम. नदाफ यांचे 'प्लास्टिकपासून होणारे दुष्परिणाम' या विषयावर व्याख्यान झाले. मुख्याध्यापक एम. एम. शिर्के कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जनजागृती रॅलीमध्ये शिक्षक, विद्यार्थी व परिसरातील नागरिकांचा सहभाग होता. यावेळी घोषवाक्ये आणि चित्रमय फलक, पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा देत रॅली काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजऱ्यात साकारणार माहितीचे दालन

$
0
0

जुन्या तहसील इमारतीत

'आजरा इतिहास दालन'

पूरक माहितीसाठी आजरा तहसीलदारांचे आवाहन

रमेश चव्हाण, आजरा

आजरा तहसील कार्यालयाच्या जुन्या इमारतीचा सुयोग्य कारणासाठी वापर करण्याचा निर्धार आजरा तहसीलदार अनिता देशमुख यांनी घेतला आहे. या इमारतीचा वापर अन्य काही कारणापेक्षा आजरा तालुक्याची ओळख करून देणाऱ्या माहितीचे 'आजरा इतिहास दालन' उभारण्याचे स्तुत्य पाऊल उचलण्यात येत आहे. त्यासाठी प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांचेही सहकार्य आहे. स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्टला या दालनाचे उदघाटन करण्यात नियोजन आहे. या पार्श्वभूमीवर, स्थानिक आणि बाहेरगावी वास्तव्यास असणाऱ्या जेष्ठ व अभ्यासू आजरेकरांनी या संदर्भातील उपयुक्त व दर्जेदार माहिती आणि छायाचित्रे पुरवून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आजरा तालुक्याच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम आणि इतर कामे पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच तहसीलदार कार्यालय तेथे स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे आजरा तहसीलची जुनी इमारत सध्या ओस आहे. ब्रिटीश राजवटीत १९व्या शतकाच्या अखेरीस बांधण्यात आलेली ही भव्य इमारत अद्यापही दणकट आहे. त्यामुळे ती पाडून तेथे अन्य काही वास्तू उभारणे अथवा रिकामी ठेवणे स्तुत्य नाही. सांगली येथील शेखर गायकवाड यांनी अशाच प्रकारे रिकाम्या वास्तूचे दालनात रुपांतर केले होते. त्या प्रेरणेतून येथे टप्प्याटप्प्याने माहिती प्रदर्शित केली जाईल. पण यामुळे इमारतीचे संरक्षण व देखभाल ठेवली जाईल.

आजरा तालुका तसा कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला वसला असला तरी त्याचे साधर्म्य घाटमाथ्यावर वसल्यामुळे तळकोकणाशी मिळते-जुळते आणि म्हणूनच वैशिष्ठ्यपूर्ण आहे. या तालुक्यातील केवळ जीवनशैलीच नव्हे तर कला, सांस्कृतिक, धार्मिक, हवामान, पर्यावरणीय आणि भौगोलिक संदर्भ आगळे-वेगळे आहेत. तसेच येथील इतिहास बनून राहिलेली माणसे, आजऱ्याचे सुपुत्र 'मृत्युंजय'कार शिवाजी सावंत, शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक, लोकशाहीर गवाणकर पासून आजचे प्रतिथयश लेखक राजा शिरगुप्पे आणि डॉ. श्रद्धानंद ठाकूर आदींची माहिती, इथे पिकणारा अस्सल, सुवासिक 'घनसाळ', शेकडो हेक्टरवर पिकणारा चविष्ट काजू, निसर्ग पर्यटकांच्या परिचयाचा 'रामतीर्थ' धबधबा, तुडुंब चित्री जलाशय आणि सदाहरित घनदाट जंगलसंपदा, विविध प्रकारच्या दुर्मिळ आणि वनौषधी वनस्पती, हिरण्यकेशी आणि चित्री नद्यांचे सुपीक खोरे, या नद्यांवर उभारलेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, रस्त्यावरचा संघर्ष करणाऱ्या इथल्या चळवळी अशा अनेक वैशिष्ठ्यपूर्ण पैलूंना या दालनाच्या माध्यमातून उजागर करण्याची संधी आहे. त्यासाठी अभ्यासपूर्ण लेखन तहसीलदारांकडे सुपूर्द करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मध्यवर्ती बसस्थानकातील हिरकणी कक्ष वापराविना

$
0
0

प्रभावी जनजागृतीअभावी महत्वाकांक्षी योजनेला खो

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet-sachinpMT

प्रवास करणाऱ्या मातांना आपल्या तान्हुल्याला स्तनपान करता यावे यासाठी सरकारकडून राज्यातील बसस्थानकांवर हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले. सन २०१३ साली या अभिनव उपक्रमाची सुरुवात झाली. मात्र कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातील हिरकणी कक्ष वापराविना कुलूपबंद आहे. 'हिरकणी' उपक्रमाच्या प्रभावी जनजागृतीत सरकारी यंत्रणा कमी पडल्याने हिरकणी योजनेला खो बसला आहे.

प्रवास तसेच कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढली आहे. अनेक मातांना आपल्या तान्हुल्याला सोबत घेऊन प्रवास करावा लागतो. गर्दीच्या ठिकाणी पुरेशी बैठक व्यवस्था, स्वच्छ परिसर नसल्याने सार्वजनिक ठिकाणी स्तनपानासाठी अडचण निर्माण होते. त्यामुळे महिलांची कुचंबणा होऊन त्या स्तनपान टाळतात. त्याचा परिणाम बाळाच्या स्वास्थावर होत असतो. या सर्व बाबींचा विचार करून ब्रेस्ट फिडिंग प्रमोशन नेटवर्क कौन्सिलने केलेल्या सूचनेवरून सरकारकडून राज्यातील बसस्थानकांवर लाखो रुपये खर्च करून स्वतंत्र आणि सुरक्षित हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली .

कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक नेहमीच गजबजलेले असते. मुख्य इमारतीत दोन वर्षांपूर्वी गाजावाजा करत हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली. कलात्मक रचना असललेल्या या कक्षाची बांधणी सुंदररित्या करण्यात आली . सध्या मात्र येथील हिरकणी कक्ष कुलुपबंद असून प्रवेशद्वाराशेजारी हिरकणी कक्षाची चावी चौकशी कक्षामध्ये उपलब्ध असल्याचा सूचना फलक लावण्यात आला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून हिरकणी कक्षाचा वापर झालेला नाही असे प्रशासनाने म्हटले आहे. मुळातच कोणतीही सरकारी योजना कार्यान्वित करताना त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसह पुरेशा जनजागृतीकडे लक्ष देणे गरजेचे असते. हिरकणी कक्षाविषयी स्तनदा मातांच्या मनात विश्वासाहर्ता निर्माण करण्यात यंत्रणा अपयशी ठरली आहे. जनजागृतीचा अभाव असल्याने राज्यातील अनेक हिरकणी कक्ष वापराविना पडून आहेत.

कोट

'बसस्थानकात हिरकणी कक्ष आहे याची पुरेशी माहिती सहजरीत्या मिळत नाही. यासाठी एसटीच्या वेळा सांगण्यासाठी उद्घोषणा होत असताना त्यातून हिरकणी कक्षाची माहिती सांगितली जावी. यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या अनेक महिलांना याबाबत माहिती मिळेल. अजूनही सार्वजनिक ठिकाणी स्तनपानाबद्दल महिलांच्या मनात संकोच असल्याने तो दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत.

मयुरी पाटील, प्रवासी

.............

एसटी प्रशासनाचा कोट आवश्यक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीपीआरमधील कामकाजावर परिणाम

$
0
0

विविध मागण्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात सीपीआरमधील तृतीय, चतुर्थ श्रेणी व नर्सिंग कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. या संपात सुमारे ४५० कर्मचारी सहभागी झाल्याने सीपीआरमधील दैनंदिन कामावर त्याचा काहीसा परिणाम झाला. कर्मचारी राज्यव्यापी संपावर जाणार असल्याने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करत रुग्णांची काळजी घेतली. तरी काही प्रमाणात जिल्ह्यातून मोठ्या संख्येने आलेल्या रुग्णांना मात्र गैरसोयीला सामोरे जावे लागले. संपकरी कर्मचाऱ्यानी त्वरित सातवा वेतन आयोग विनाविलंब मिळावा, अंशदायी जुनी पेन्शन योजना चालू करावी, सरकारी कर्मचाऱ्याचे निवृत्तीचे वय ६० वर्ष करावे, कार्यालयीन कामाचा आठवडा पाच दिवसांचा करावा, सर्व संवर्गातील रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशा मागण्या यावेळी केल्या. संपात राज्य सरकारी चतुर्थ कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश भोसले, गणेश आसगावकर, हाश्मत हावेरी, संजय क्षीरसागर, अंजली दोरकर, कृष्णा नाईक यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पर्यायी व्यवस्था

सीपीआर प्रशासनाने रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी काळजी घेतली. संपामुळे अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या. यावेळी नर्सेसची कमतरता जाणवली. प्रसुती विभाग आणि अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यात आल्या होत्या. आंतरवासिता वैद्यकीय अधिकारी, एमबीबीएसचे द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थी तसेच डी. वाय. पाटील मेडिकलच्या परिचारिकांची मदत यावेळी घेण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोटारसायकल पार्किंगवरूनआठजणांकडून तिघांना मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विवेकानंद कॉलेज परिसरात मोटारसायकल पार्किंग करण्याच्या कारणावरून आठ तरुणांनी केलेल्या मारहाणीत तिघेजण जमखी झाले. भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या ओंकार राणे यांच्या नाकाचे हाड मारहाणीत मोडले. या तरुणांनी विवेकानंद कॉलेज परिसर आणि मेरी वेदर ग्राउंड या दोन्ही ठिकाणी मारहाण केली. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी आठजणांवर गुन्हा दाखल केला आहे.

संशयित आठ आरोपींनी ओंकार शिवाजी राणे (वय २२, रा. दत्तवाड, ता. शिरोळ, सध्या रा. जुने एसपी कार्यालयच्या पाठीमागे, पी. डब्ल्यू कॉटर्स, कसबा बावडा रोड), अर्जुन जाधव (रा. निगवे, ता. करवीर), भारत विष्णू जाधव (रा. सादळे मादळे, ता. करवीर) यांना मारहाण केली. या प्रकरणी राणे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली.

६ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अर्जुन आणि भारत हे दोघेही विवेकानंद कॉलेज परिसरात मोटारसायकल पार्किंग करीत होते. त्या वेळी या परिसरातील आठ तरुणांचा या दोघांसमवेत वाद झाला. त्यांनी अर्जुन आणि भारत यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दोघांतील वाद वाढत गेला. त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर या तरुणांनी येथून पळ काढला. जाधव यांनी हा प्रकार त्यांचे मित्र राणे यांना सांगितला. त्या वेळी मारहाण केलेल्या त्या तरुणांनी संबधित प्रकरण मिटवू असे सांगितले. राणे यांच्यासह जाधव यांना मेरीवेदर ग्राउंडवर येण्यास सांगितले. झालेल्या प्रकरणाच्या संदर्भात आम्ही माफी मागणार असल्याचे फिर्यादी राणे यांना या तरुणांनी सांगितले. त्या वेळी संशयित आरोपींनी पुन्हा वाद निर्माण करुन तिघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी साजन माने, साहिल पुजारी, शिर्के, यश, श्रीकांत, सागर, आशिष, ओंकार (पूर्ण नावे समजली नाहीत) या आठजणांवर गुन्हा दाखल केला .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अमृत’च्या मार्गातील अडथळा दूर

$
0
0

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर :

राज्य सरकारच्या तांत्रिक समितीच्या मंजुरीनंतरही ठेकदार कंपनीने बँक गॅरंटी भरण्यास विलंब लावल्याने अमृत योजनेतील पाणीपुरवठा करणाऱ्या लाइनच्या कामाला सुरुवात झालेली नव्हती. कंपनीने या कामासाठी महापालिकेकडे दोन कोटी ५० लाखाची बँक गॅरंटी जमा केली असून ऑडिट विभागाकडून करार प्राप्त झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांत प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून 'अमृत'मध्ये निर्माण झालेल्या अडचणी दूर झाल्या आहेत.

शहराची २०४९ ची लोकसंख्या गृहीत धरुन पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी अमृत योजना कार्यन्वित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. नवीन व जुनी जलवाहिनी मिळून सुमारे ४५० किमीची पाइपलाइन, साडेतीन ते १६ लाख लिटर क्षमतेच्या बारा टाक्या, मुबलक पाणीपुरवठ्यासाठी तीन पंप आदी कामांसाठी अमृत योजनेसाठी १०७ कोटी रुपयांची योजना मंजूर झाली. निविदा आणि वर्क ऑर्डरला विलंब लागत होता. योजनेच्या कामाला त्वरीत सुरुवात होण्यासाठी महापालिकेने एसजीआय कंपनीमार्फत शहरातील सध्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचे हायड्रोलिक मॉडेलिंग करुन वितरण प्रणालीची माहिती संकलित केली. यासाठी वॉटर जेम्स सॉफ्टवेअरची आधार घेतला. महापालिकेने एसजीआय कंपनीमार्फत संकलीत केलेल्या माहितीच्या आधारे महापाराष्ट्र जीवन प्राधिकरणने प्रकल्प आराखडा तयार केला. हा आराखडा राज्य सरकारच्या तांत्रिकी समितीकडे पाठवला. पण यामध्ये दोनवेळा बदल करण्यात आला. त्यामुळे ही योजना रखडण्याची शक्यता निर्माण झाली होती. प्रथम मंजूर झालेल्या निधीपेक्षा जादा खर्च येणार असल्याने हा जादाचा भार महापालिकेला सोसावा लागणार होता. त्याची तयारीही महापालिकेने केली होती. मात्र कंपनी बँक गॅरंटी भरण्यासाठी महापालिकेत येत नव्हती. महापालिकेने अनेकवेळा पत्रव्यवहार करुनही कंपनी येत नसल्याने सर्वसाधारण सभेत याचे पडसाद उमटले होते. कंपनी विलंब लावत असल्याने करार आणि प्रत्यक्ष वर्क ऑर्डरला विलंब लागत होता.

दरम्यान, स्थायी समितीमध्ये सत्तांतर होण्यापूर्वी या योजनेचे उद्घाटन झाले होते. तरीही कामाला सुरुवात होत नसल्याने योजनेचे भवितव्यच अधांतरी लटकले होते. पण अखेर गेल्या आठवड्यात कंपनीने अडीच कोटीची बँक गॅरंटी महापालिकेकडे जमा केली. बँक गॅरंटीनंतर महापालिका व कंपनीतील करार ऑडिट विभागाकडे देण्यात आला आहे. ऑडिट विभागाच्या शेऱ्यानंतर अमृतमधील पाणीपुरवठा योजनेच्या कामाला दहा ते १५ दिवसांत सुरूवात होणार आहे.

.........................

चौकट

पाणीपुरवठा योजना दृष्टिक्षेप

१०७ कोटी

प्रशासकीय खर्च

४५० किमी

पाइपलाइन

२४ महिने

कामाची मुदत

२.५० कोटी

बँक गॅरंटी

...............

रस्त्यांची दोनवेळा खोदाई

अमृत योजनेतंर्गत शहरात ड्रेनेज व पाणीपुरवठा लाइनचे काम करण्यात येणार आहे. ड्रेनेज व पाणीपुरवठा लाइनचे एकाचवेळी काम करण्याचा मानस होता. पण पाणीपुरवठ्याच्या कामाला विविध कारणाने विलंब होत गेल्यानंतर ड्रेनेज लाइनच्या कामाला सुरुवात झाली. आतापर्यंत १५ किमीचे काम पूर्ण झाले असून यासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची खोदाई करण्यात आली. आता अमृतमधील पाणीपुरवठ्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याने पुन्हा रस्त्यांची खोदाई करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जि. प. च्या कॉम्प्लेक्सचा नव्याने आराखडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाऊसिंगजी रोडवरील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवर कमर्शिअल कॉम्प्लेक्स प्रस्तावित आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाचा नव्याने आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत सोमवारी त्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. पुणे येथील प्लॅनमॅक्स कंपनीने हा आराखडा तयार केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक अध्यक्षस्थानी होत्या.

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०१७-१८ अंतर्गत ५०५४ इतर जिल्हा मार्ग व ३०५४ ग्रामीण मार्ग रस्त्याचा विकास व मजबुतीकरण कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. ग्रामपंचायत शिरोळचे नगरपंचायतमध्ये रुपांतरण झाल्यामुळे ०.२५ टक्के वर्गणीची रक्कम परत करण्याच ठराव तसेच पन्हाळा तालुक्यातील पोहाळे तर्फ बोरगाव येथे जिल्हा ग्राम विकास निधीमधून दुकानगाळे बांधण्याचे ठरले. जिल्हा परिषद स्वनिधीतून ग्रामीण भागातील विविध व्यावसायिकांना पारंपरिक व्यवसायाभिमुख साहित्य पुरविण्याचा निर्णय झाला.

हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे येथे नवीन उपकेंद्राच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आला. यासाठी ६४ लाख रुपये खर्च प्रस्तावित आहे. तसेच कागल तालुक्यातील सुळकूड येथे ग्रामपंचायत इमारत बांधकाम करण्यासाठी कर्ज मंजुरीचा प्रस्ताव मंजूर केला. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, बांधकाम सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर, शिक्षण सभापती अंबरिश घाटगे, महिला बालकल्याण सभापती वंदना मगदूम, समाजकल्याण सभापती विशांत महापुरे, सदस्य राजवर्धन निंबाळकर, जयवंत शिंपी, अरुण इंगवले यांनी चर्चेत सहभाग घेतला.

'तळदंगे' प्रश्नी

दोन दिवसांत निर्णय

तळंदगे ग्रामपंचायतीने थकीत एक कोटी साठ लाखांच्या घरफाळाप्रश्नी महापारेषण कंपनीच्या कार्यालयाला ठाळे ठोकले. यासंदर्भात कंपनीने गटविकास अधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाल्यावर त्यांनी ग्रामपंचायतीची मागणी रास्त असल्याचा निकाल दिला. त्या विरोधात कंपनीने स्थायी समितीकडे दाद मागितली होती. स्थायी समितीत अध्यक्षांच्यासमोर याप्रश्नी पुन्हा सुनावणी झाली. ग्रामपंचायतीत आवाडे गटाची सत्ता आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने नगरसेवक राहुल आवाडे यांनी बाजू मांडली. ग्रामपंचायत थकीत घरफाळा वसुलीसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. कंपनीशी पत्रव्यवहार केला. पण त्यांनी दखल न घेतल्याने ग्रामपंचायतीने ठाळेठोक कारवाई केली. कंपनीच्या वकिलांनी गटविकास अधिकाऱ्यांना सुनावणी घेण्याचा अधिकार पोहचत नसल्याचे सांगितले. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर अध्यक्षांनी याप्रश्नी दोन दिवसात निर्णय देऊ असे जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिग्दर्शकाला मारहाण

$
0
0

फोटो आहे

केर्लीत खंडणीसाठी चित्रीकरण सेटची तोडफोड

उपसरपंचासह नऊजणांना अटक, दिग्दर्शकाला मारहाण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आमच्या गावात चित्रीकरण करायचे असेल तर महिन्याला तीस हजार रुपये द्यावे लागतील, अशी खंडणीची मागणी करत उपसरपंचासह नऊजणांनी केर्ली (ता. करवीर) येथील एका बंगल्यात सुरु असलेल्या मराठी मालिकेच्या चित्रीकरणाच्या सेटवर दहशत माजविली. मालिकेचे निर्मिती प्रमुख रवींद्र गावडे आणि दिग्दर्शक गौतम कोळी (रा.मुंबई) यांना धक्काबुकी करत बेदम मारहाण केली. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संशयितांनी चित्रीकरणाच्या साहित्यासह कारची तोडफोड केली असून या प्रकरणी करवीर पोलिसांनी उपसरपंचासह एकूण नऊजणांना अटक केली . त्यांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

संशयित उपसरंपच अमित भिमराव पाटील (वय ३६), दगडू देवाप्पा कांबळे (५९), किरण सुरेश कांबळे (२६), चंद्रकांत मारुती कोपार्डे (३३), अक्षय हंबीरराव पाटील (२६), अवधूत हंबीरराव पाटील (२२), अमित पंडीत मोहिते (३३), कपिल आकाराम माने (२९), रविंद्र आनंदा पाडेकर (३३, सर्व रा. केर्ली, ता. करवीर) यांना पोलिसांनी अटक केली. केर्ली (ता. करवीर) येथे १३ जूनपासून कॅप्टन शंकर माने यांच्या बंगल्यात 'जुळता जुळता जुळतंय की' या मराठी मालिकेचे चित्रीकरण सुरु आहे. संशयित उपसरपंचासह नऊजणांनी या मालिकेचे निर्मिती प्रमुख रवींद्र सिध्दु गावडे (रा. कोल्हापूर) यांच्याकडे, 'आमच्या गावात चित्रीकरण करायचे असेल तर महिन्याला ३० हजार रुपये प्रोटेक्शन मनी द्यावे लागतील, अशी खंडणीची मागणी केली. त्यासाठी सातत्याने मोबाइलवरुन संपर्क साधला. मात्र गावडे यांनी ही मागणी नाकारली. त्याचा राग मनात धरुन संशयितांनी सोमवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास कॅप्टन माने यांच्या बंगल्यात घुसून गावडे आणि दिग्दर्शक गौतम कोळी (रा. मुंबई) यांना धक्काबुक्की करत बेदम मारहाण केली. चित्रीकरणासाठी बंगल्याच्या दारात उभ्या असलेल्या कारची (एम. एच. ०२ डी. एन. ६७२८) दगडविटांनी तोडफोड करुन दहशत माजवली. तसेच चित्रीकरणाच्या साहित्याची नासधूस केली. या प्रकरणी गावडे यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी संशयितांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

.................

कलाकारांनी घेतले कोंडून

रात्री अचानक सुरु झालेल्या प्रकारामुळे चित्रीकरणासाठी आलेले कलाकार घाबरून गेले. त्यांनी भीतीने स्वत:ला बंगल्यातील एका खोलीत कोंडून घेतले. नेमका काय प्रकार सुरु आहे, हे काही कलाकारांच्या लक्षात आले नाही. संशयित आरोपींनी दिग्दर्शक आणि निर्मिती प्रमुखांना मारहाण केल्यानंतर कलाकारांनी कोंडून घेतलेल्या खोलीकडे मोर्चा वळवला. खोलीवर धडका मारल्या, मात्र दार बंद असल्याने कलाकार वाचले. संशयितांनी अन्य खोलीतील साहित्यही विस्कटले. काही महिला कलाकारही खोलीत होत्या. त्यांचीही भीतीने गाळण उडली.

........................

कोट

'गेल्या काही दिवसांपासून त्रास देण्याचा हा प्रकार सुरु होता. मात्र सोमवारी रात्री या प्रकाराने कळस गाठला. मद्यधुंद अवस्थेत आलेल्या या तरुणांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार चुकीचा आहे. घडलेल्या प्रकारामुळे चित्रीकरण थांबविले जाणार नाही.

गौतम कोळी, दिग्दर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन : २ फोटो आहेत

$
0
0

माधवी खासबारदार

कोल्हापूर : येथील प्रा. माधवी भालचंद्र खासबारदार (वय ६९) यांचे बेंगळुरू येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांनी विवेकानंद, न्यू पॉलिटेक्निक येथे अभियांत्रिकी विषयाचे अध्यापन केले.

---

मिलिंद चव्हाण

कोल्हापूर : संभाजीनगर येथील मिलिंद गणपतराव चव्हाण (वय ४२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ९) सकाळी नऊ वाजता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी कर्मचारी रस्त्यावर

$
0
0

फोटो आहे.

सरकारविरोधात घोषणाबाजी, ३९ कर्मचारी संघटना सहभागी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आमच्या मागणी मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा',' मुख्यमंत्री, पालकमंत्री, अर्थमंत्री हाय हाय' अशा घोषणा देत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी शहरातून भव्य मोर्चा काढला. काम बंद करून सर्वच सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मोर्चादरम्यान रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी तातडीने करावी, केंद्र सरकारप्रमाणे महागाई भत्ता द्यावा यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी तीन दिवसापासून संपावर आहेत. सरकारने कारवाईचा दिलेला इशारा धुडकावून जिल्ह्यातील एक लाख सरकारी कर्मचारी संपात उतरले. शहरातील टाऊन हॉलपासून दुपारी बारा वाजता कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला सुरूवात झाली. मोठ्या संख्येने सहभागी कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करीत लक्ष वेधले. शहर, जिल्ह्यातील कर्मचारी, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, चतुर्थश्रेणीतील कर्मचारी मोर्चात सहभागी झाल्याने पूर्ण रस्ता व्यापला. शिवाजी चौकातून मोर्चा बिंदू चौकात आला. मोर्चाचे सुरूवातीचे टोक बिंदू चौक आणि शेवटचे टोक टाऊन हॉलपर्यंत राहिले. मोर्चातील सर्व कर्मचारी बिंदू चौकात आल्यानंतर पोलिसांनी चौकातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली.

बिंदू चौकात संघटनेचे जिल्हा शाखेचे सरचिटणीस अनिल लवेकर यांनी मागण्यांची माहिती दिली. ते म्हणाले, 'सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, विनाअनुदानित शाळांना अनुदान द्यावे, रिक्त जागा त्वरित भराव्यात आदी मागण्यासंबंधी सरकारकडे दोन वर्षांपासून पाठपुरावा केला जात आहे. वेळोवेळी मुख्यमंत्र्यासोबत बैठक झाली. मात्र ते केवळ आश्वासन देत राहिले. संप पुकारल्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघटनांच्या प्रतिनिधींशी बैठक बोलावली. बैठकीत नोव्हेंबरपर्यंत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागण्या तातडीने सोडविण्यासाठी संप सुरू आहे.'

दरम्यान, मोर्चात पुरोगामी शिक्षक संघटनेचे प्रसाद पाटील, प्राथमिक शिक्षक संघटनेचे दादासाहेब लाड, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे रमेश भोसले, नर्सिंग फेडरेशनचे हास्मत हावेरी, खासगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे भरत रसाळे, मुख्याध्यापक संघाचे किशोर संकपाळ, भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे युवराज चाळके, शासकीय तंत्रनिकेतनचे रमेश पाटील, जिल्हा परिषद कर्मचारी संघाचे सचिन जाधव यांच्यासह सर्व सरकारी कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले .

-----------

चौकट

३९ संघटना मोर्चात सहभागी

कृषी कर्मचारी, शासकीय तंत्रनिकेत कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम कर्मचारी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, भूमि अभिलेख, जिल्हा तलाठी संघ, गव्हमेंट प्रेस राष्ट्रीय कामगार संघ, खासगी प्राथमिक शिक्षक, शिक्षकेतर महासंघ, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांच्यासह ३९ राज्य कर्मचारी तर ३६ शिक्षक संघटना मोर्चात सहभागी झाल्या .

----------

चौकट

महत्वाच्या मागण्या

पाच दिवसांचा आठवडा करावा, महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना दोन वर्षाची बालसंगोपन रजा द्यावी, सेवानिवृत्तीचे वय केंद्राप्रमाणे ५८ वरून ६० वर्षे करावे, सर्व रिक्त पदे भरावीत, अधिकारी, कर्मचाऱ्यांना होणाऱ्या मारहाणीसंदर्भात परिणामकारक कायदा करावा, वैद्यकीय खर्च मिळावा, खासगीकरण, कंत्राटीकरण रद्द करावे, विनाअनुदानित शाळांना अनुदान द्यावे, जुनी पेन्शन योजना लागू करावी.

--------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत आरक्षणासाठी प्रांतसमोर थाळीनाद आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मंगळवारी सकल मराठा समाजाच्या वतीने महिलांचा लाटणे मोर्चा काढून थाळीनाद आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात रास्ता रोको करण्यात आल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.

इचलकरंजीतही मोर्चे, श्राद्ध, निवेदने, ठिय्या, आदी मार्गांनी आंदोलनाची तीव्रता वाढविली जात आहे. त्याच अनुषंगाने मंगळवारी महिलांचा लाटणे मोर्चा काढण्यात आला. शिवाजी महाराज पुतळा येथून मोर्चाला सुरुवात झाली. जोरदार घोषणाबाजी व थाळीनाद करत मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर आला. त्यानंतर रचना मोरे, ज्योतीकिरण माने, सलोनी शिंत्रे, प्रियांका आर्दाळकर, पूजा शिंदे, ऋतुजा बेलेकर या मुलींच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन दिले. यावेळी आरक्षण तातडीने न मिळाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्षा मेघा चाळके, मौसमी आवाडे, तेजश्री भोसले, ध्रुवती दळवाई, सायली लायकर, सुनीता मोरबाळे, आदींसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images