Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

केएमटीच्या तोट्यात भर

0
0
तोट्यात असलेल्या केएमटीने खर्च कमी करण्यासाठी बसफेऱ्या कमी करुन दररोजचे २ हजार ७०० किलोमीटरचे पैसे वाचवले. पण नुकत्याच झालेल्या किरकोळ डिझेल दरवाढीनेही केएमटीचा बोजा वाढवला आहे.

भारतीय संस्कृती आणि पुण्य

0
0
बहुतेक माणसं इतर उद्योग सांभाळून किंवा सगळं सोडून जणू काही एखादा उद्योगच ‘उरावर’ घेतल्याप्रमाणं, पाहावं तेव्हा पुण्योत्पादनाच्या खटपटीत गुंतलेली असतात. भर माध्यान्ही घरी आलेल्या माणसाला जेवू खाऊ घालूनच पाठवणं, तहानलेल्याला पाणी देणं, शारीरिकदृष्ट्या दुर्बल माणसाला हात देणं हे खरंतर भारतीय संस्कृतीत सन्माननीयच आहे. भाबडेपणानं ह्याला पुण्य पदरात पडणं वगैरे म्हणतात.

कोल्हापुरी टेस्ट

0
0
कोल्हापूर आणि सिनेसृष्टी यांचे नाते अगदीच घनिष्ट असे आहे. हे नाते अधिक बळकट करण्यास कोल्हापूरची खाद्यसंस्कृती देखील तेवढीच कारणीभूत ठरली आहे. मिसळ, तांबडा पांढरा रस्सा, वडापाव, भेळ अशा कितीतरी पदार्थांची चव जीभेवर रुळलेले अनेक कलाकार आहेत.

थॅलेसेमियाचे ४७ पेशंट दत्तक

0
0
राजारामपुरी गोज ग्रीन आणि शिवसेनेच्या राजारामपुरी शाखेच्यावतीने ४७ थॅले‌सेमिया पेशंट दत्तक घेण्यात आले आहेत. त्यांना मोफत रक्तपुरवठा करण्यात येणार आहे. थॅलेसेमिया पेशंटसाठी हा एक मोठा दिसला ठरणार आहे.

झोन प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

0
0
फेरीवाल्यांच्या नियोजनाबाबत सरकारी अध्यादेशाच्या मार्गदर्शनाप्रमाणे प्रत्येक विभागीय कार्यालयातंर्गत झोन निश्चितीचे प्रस्ताव तयार आहेत. पाच महिन्यांपासून या प्रस्तावांबाबत फेरीवाला प्रतिनिधी व स्थानिक नगरसेवकांमध्ये नीट समन्वय होत नसल्याने मंजुरी झालेली नाही.

खासगी कालबाह्य रिक्षा बंद करा

0
0
शहरातील खासगी व भंगारात निघालेल्या रिक्षांमुळे परवानाधारक रिक्षाचालकांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांना आर्थिक चणचण भासत असल्याने शहरातील खासगी व भंगारात निघालेल्या रिक्षा ताबडतोब बंद कराव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र रिक्षाचालक संघटनेच्यावतीने सोमवारपासून सहा जणांनी बेमुदत उपोषणास सुरुवात केली.

नरगेवाडी खून : संशयितांना ४ दिवस कोठडी

0
0
गवत कापण्याच्या वादातून शिरोली पैकी नरगेवाडी येथे कुऱ्हाडीने हल्ला करून मधुकर बापू कराळे याने सख्खा भाऊ दगडू बापू कराळे (वय ६०) यांचा सोमवारी खून केला. पोलिसांनी मधुकर बापू कराळे व त्यांचा मुलगा नीलेश ऊर्फ सरदार कराळे (वय २०) याला अटक केली. त्यांना कोर्टात उभे केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

कसबा सांगावमध्ये बेकरीला आग

0
0
कसबा सांगाव (ता.कागल) येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत बेकरी जळून खाक झाली. भोजे उद्याग समूहाची ही बेकरी असून सुमारे तीन कोटी दहा लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.

‘शविआ’ची माघार; NCP ला पाठिंबा

0
0
विरोधकांच्या फुटीवरच आवाडेंचे यश अवलंबून असून हे टाळण्यासाठीच या पोटनिवडणुकीत विरोधकांची एकजूट व्हावी या उद्देशाने शहर विकास आघाडीने आपला उमेदवार संजय रंगाटे यांची उमेदवारी मागे घेऊन राष्ट्रवादीचे उमेदवार विठ्ठल चोपडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ‘शविआ’चे पक्षप्रतोद अजित जाधव यांनी पत्रकार बैठकीत दिली.

आरोप-प्रत्यारोपांत ‘ऊसदर’ गायब

0
0
ऊसदराच्या प्रश्नावर मागील पाच-सात वर्षे सत्ताधाऱ्यांना आणि साखर कारखानदारांना पुरून उरलेले खासदार राजू शेट्टींची यंदा पुरती कोंडी झाली आहे. खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्याशी केलेली २२०० व ४५० ही उचलीची तडजोड खा. शेट्टी यांच्या टीका करण्याचे प्रमुख शस्त्र बनले आहे.

राज्यकर्त्यांना प्रश्नच समजलेले नाहीत

0
0
आजच्या राज्यकर्त्यांना जनतेचे नेमके प्रश्न समजलेले नाहीत. त्यांनी राजर्षी शाहू महाराजांचा जयजयकार न करता त्यांचे विचार समजून घेण्याची गरज आहे. राजर्षी शाहू महाराजांचे विचार आजच्या परिस्थितीत ही दिशा देणारे आहेत असा विश्वास ज्येष्ठ विचारवंत अॅड. गोविंदराव पानसरे यांनी व्यक्त केला.

‘दत्त- दालमिया’ची २३०० रुपये उचल

0
0
पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले -पोर्ले येथील श्री दत्त साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ मंगळवारी दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक के. पी. सिंग यांच्या हस्ते झाला. यावेळी कारखान्याचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

‘कोल्हापूर, हातकणंगले’वर राष्ट्रवादीचाच हक्क

0
0
‘कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा हक्क राहील. कोण काय बोलते याकडे लक्ष देऊ नका. गटतट, वैयक्तिक वाद विसरुन लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागा, ’असा सल्ला राष्ट्रवादीचे महासमन्वयक वसंत वाणी यांनी कार्यकर्त्यांना दिला. ताराबाई पार्कातील राष्ट्रवादीच्या शहर जिल्हा कार्यालयात मंगळवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिला.

महापौरांचा राजीनामा लांबला तर अन्य पदांवर परिणाम

0
0
महापालिकेची सर्वसाधारण सभा १६ डिसेंबर रोजी घेण्याचे निश्चित झाले असून शनिवारी(ता.७) सभेचा अजेंडा प्रसिद्ध केला जाणार आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ व काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी मालोजीराजे यांच्याशी चर्चा करुन या सभेत महापौरांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. हा राजीनामा लांबला तर इतर सर्व पदांवर त्याचा परिणाम होईल, असा इशारा दिल्याचे समजते.

‘तिसऱ्या आघाडीचाच सक्षम पर्याय’

0
0
आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ११० जागा मिळाल्या तरी पुष्कळ होईल. काँग्रेसविरोधी वातावरणाचा फायदा भाजपला होणार असला तरी त्यांच्या पक्षाला भौगोलिक मर्यादा असल्याने त्यांची संख्याही १५० वर जाणार नाही. त्यामुळे भाजपला जास्त जागा मिळाल्या तरी त्यांच्याशी आघाडी करायला अन्य पक्ष तयार होणार नाहीत.

अखेर आपणच जिंकू

0
0
‘आपला संघर्ष हा वंचितांसाठी सुरु आहे. आयुष्य हे लढण्यासाठीच आहे. कार्यकत्यांनो, समाजवादासाठी लढत राहा. गौतम बुध्द आणि महावीरांच्या या देशात आपला जन्म झाला आहे याचा गर्व बाळगा. जनतेत मिसळा त्यांच्याशी घनिष्ठ सबंध ठेवा. आपली कम्युनिस्ट विचारसरणी ही समानतेसाठी असल्याने जनता त्याचा स्विकार निश्चितपणे करेल.

१.२५ लाखाची रोकड लंपास

0
0
शिक्षकाने मोटारसायकलच्या डिकीत ठेवलेले एक लाख ३० हजार रूपये चोरट्यांनी लंपास केले. जयसिंगपुरातील तिसऱ्या गल्लीत ज्ञानसागर विद्यालयासमोर सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत श्रीशैल्य श्रीवंतप्पा निवरगी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

लहान मुलांची उपचारांअभावी परवड

0
0
एड्स या आजारावर उपचार करण्यासाठी शहरात अनेक ठिकाणी एआरटी सेंटर यंत्रणा सरकारने विकसित केली आहेत. या सेंटरमध्ये औषधे मोफत मिळतात, पण या यंत्रणेचा फायदा शहरातील आणि जवळपासच्या परिसरातील पेशंटना होतो. मात्र ग्रामीण आणि जिल्ह्याच्या ठिकाणाहून कोसो अंतर दूर असणाऱ्या एड्ससह जगणाऱ्या पेशंट बच्चूंना (लहान मुलांना) मात्र औषधांची मदत गावपातळीवर मिळतच नाही.

‘टोलप्रश्नी मतदान घ्या’

0
0
दारुबंदीसाठी ज्या पध्दतीने मतदान घेतले जाते, तसे टोल हवा की नको याबाबत आता थेट जनतेतून मतदान घ्यावे, असा ठराव राजर्षि शाहू यांच्या विचारांच्या कोल्हापुरातील ५४ समाजांच्या प्रतिनिधींच्या मेळाव्यात मंगळवारी करण्यात आला.

प्रभावी अध्यापनासाठी ‘ICT’ प्रणाली उपयुक्त

0
0
‘सध्याच्या स्पर्धात्मक युगात सक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी अध्यापन व अध्ययनाकरिता बदलत्या माध्यमांचा अवलंब झाला पाहिजे. शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थीकेंद्रीत उपक्रम राबविताना गतीमान प्रशासनही तितकेच महत्वपूर्ण आहे. या​करिता प्राचार्यानी कामकाजात ‘इनफॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी’ (आयसीटी) अधिकाधिक वापर केला पाहिजे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images