Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

क्राइम डायरी

$
0
0

अपघातातील जखमीचा मृत्यू

कोल्हापूर : कणेरीवाडी (ता. करवीर) येथे गुरुवारी झालेल्या दुचाकी अपघातातील जखमी सुनील रामचंद्र चव्हाण (वय ३५, रा. कणेरीवाडी) यांचा मृत्यू झाला. अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला.

...

बेशुद्ध कर्मचाऱ्याचा मृत्यू

कोल्हापूर : गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत येथे फॅब्रिकेशनचे काम सुरू असताना बेशुद्ध पडलेल्या महेश बापू निर्मळे (वय ४२, रा. यड्राव) यांचा शनिवारी मृत्यू झाला. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू होते.

०००

माय-लेक भाजून जखमी

कोल्हापूर : भवानी मंडप परिसरात शेकोटी करून बसलेल्या छाया तलवार (वय ३७) व त्यांचा मुलगा अर्जुन (वय १४, रा. अर्नावळ, जि. बेळगाव) हे दोघे माय-लेक भाजून जखमी झाले. शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. शेकोटीने अचानक पेट घेतल्याने दोघेही जखमी झाले. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘संस्कारमय प्रबोधनाची व्यापक चळवळ उभारावी’

$
0
0

सिंगल फोटो...

लोगो : वर्षा व्याख्यानमाला

म. टा. वृत्तसेवा, शिराळा

'सरड्याप्रमाणे क्षणाक्षणाला रंग, रूप बदलणारे मानवरूपी सरडे समाजात निर्माण होऊ पाहत आहेत. उद्याच्या पिढीत असे सरडे निर्माण होऊ नयेत यासाठी संस्कारमय प्रबोधनाची व्यापक चळवळ उभारण्याची आज खरी गरज आहे,' असे प्रतिपादन कवी सुनील जवंजाळ यांनी केले.

वारणानगर येथे वर्षा व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प गुंफताना 'एक मैफल शब्दांची' या विषयावर ते बोलत होते.

जवंजाळ म्हणाले, 'साप बाहेरचे तापमान बघून रक्ताचे तापमान बदलतो आणि सरडे ऋतूचा रंग बघून स्वत:चे रंग-रूप बदलतात. एकाचवेळी रंग रूप आणि तापमान बदलणारी ही जात कोणत्या विचित्र समागमातून जन्माला आली हे कळत नाही. अशा प्रवृत्तीचे साप आणि सरडे समाजात निर्माण होऊ नयेत यासाठी संस्कारमय प्रबोधनाची व्यापक चळवळ उभारण्याची आज गरज आहे. 'कविता घरातून, रानातून, वनातून आणि विदारक परिस्थितीतून जन्माला येते. कवितेतील एक शब्द अनेक अर्थ सांगून जातो. व्यथा, वेदना दु:ख ,गरिबी, नाती, गोती, प्रश्न आणि समस्या प्रभावीपणे मांडण्याची ताकद केवळ शब्दांतच असते.'

पद्मनाभ पोवार यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. वक्त्यांचा सत्कार कथाकार आप्पासाहेब खोत यांच्या हस्ते झाला. कवी गोरख कुंभार यांनी जागर काव्यसंग्रहातील निवडक कवितांचे सादरीकरण केले. यावेळी वारणा साखर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक विजयकुमार कोले, माजी प्राचार्य एस. बी. कणसे, बझारचे सरव्यवस्थापक शरद महाजन, ए. बी. पाटील, उपप्राचार्य के. जी. जाधव, संपत शिंदे, उल्हास कुलकर्णी, मनोज शेटे, संभाजी मुदगल, सुनील बनसोडे, राजन मेकले, आदींसह वारणा समूहातील विविध संस्थांचे संचालक, अधिकारी, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. शामराव कोकाटे यांनी आभार मानले.

०००००

आजचे व्याख्यान

व्याख्याते : विजय काळे

विषय : चला, थोडा विचार करूया

ठिकाण : शास्त्री भवन, वारणानगर

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आई कामाला जाऊ नको, छोट्या जवळ थांब

$
0
0

आई कामाला जाऊ नको, छोट्या घरीच थांब

नोकरीच्या शोधताना विनायक म्हणायचा, मराठा समाजाला आरक्षण हवेच

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आई, आज तू कामाला जाऊ नको, सुट्टी घे. छोट्या तू क्लासला जाऊ नको, घरी थांब. मला भीती वाटतेय. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. पण ते सहजासहजी मिळणार नाही..' सकाळी ८.३० ते नऊ वाजण्याच्या सुमारास विनायकचा आई सुनंदा आणि लहान भाऊ प्रमोद यांच्याशी झालेला हा संवाद. नंतर दोन तासांनी विनायकशी आपली कायमची ताटातूट होईल याची किंचितही कल्पना कुटुंबींयांना आली नाही. नेहमीप्रमाणे घरकाम आटोपून सुनंदा कामासाठी बाहेर पडल्या. लहान भाऊ प्रमोद विनायकची काळजी घेत घरीच थांबून राहिला. सकाळी ११च्या सुमारास प्रमोद बाथरुमसाठी बाहेर गेला आणि विनायकने किचनमध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. अवघ्या मिनिटाभरात होत्याचे नव्हते झाले. विनायकच्या आत्महत्येचे वृत्त समजताच कणेरीवाडीत शोककळा पसरली.

सीपीआर परिसरात विनायकच्या आठवणींनी वडील परशराम आणि लहान भाऊ प्रमोदचा कंठ क्षणाक्षणाला दाटून येत होता. ऐन तारुण्यात मुलाने जीवन संपविल्याने कुटूंबच हादरून गेले. गुदगी कुटुंबीय मूळचे कर्नाटकातील. उदरनिर्वाहासाठी परशराम गुदगी यांनी २०-२२ वर्षापूर्वी कोल्हापूर गाठलं. कणेरीवाडीत ते स्थायिक झालं. दोन खोल्यांमध्ये संसार. पत्नी सुनंदा, मुले विनायक आणि प्रमोद या असा संसार फुलला होता. मोठा मुलगा विनायकने कागल येथील डी. आर. माने कॉलेजमधून वाणिज्य शाखेतून बारावीपर्यंत शिक्षण घेतले. एमएससीआयटी पूर्ण केलेली. लहान मुलगा प्रमोद हा डिप्लोमाचा विद्यार्थी. परशराम इंडोकॉन कंपनीन इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमध्ये नोकरीला तर आई सुनंदा यासुद्धा एमआयडीसीमध्ये खासगी नोकरी करतात.

आई वडिलांना मदत व्हावी म्हणून विनायकही नोकरीच्या शोधात होता. बारावी वाणिज्य शाखेच्या शिक्षणानंतर एमएससीआयटी झाल्याने नोकरी मिळेल म्हणून आशावादी होता. प्रयत्न करुनही नोकरी न मिळाल्याने तो नाराज झाला. गेले काही दिवस तो अस्वस्थ होता. गारमेंट क्षेत्रामधील नोकरी त्याला पसंत नव्हती. इतरत्र प्रयत्न करुनही काही न मिळाल्याने एक प्रकारचे नैराश्य आले होते. तो फारसा बोलायचा नाही. 'मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे, पण ते सहजासहजी मिळणार नाही' असे तो अधुनमधून म्हणत असल्याचे प्रमोदने सांगितले.

आंदोलनात सक्रिय

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सकल मराठा समाजाने राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही आंदोलनाची व्याप्ती वाढली आहे. सकल मराठा समाजाच्या आंदोलनात विनायक सक्रिय होता. समाजातर्फे तीन ऑगस्ट रोजी गोकुळ शिरगावमध्ये ठिय्या आंदोलन झाले. वसंत मुळीक यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात कणेरीवाडीतील सार्वजनिक मंडळे, तरुण सहभागी होते. आंदोलनात विनायकही सहभागी होता. आंदोलनात त्याने 'मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे' असे भाषण केले. ही आठवण सांगताना नातेवाईकांना व मित्रांना सीपीआर परिसरात अश्रू अनावर झाले.

बाथरुममधून येईपर्यंत जीवन संपविले

आई-वडील दोघेही कामासाठी सकाळी लवकर बाहेर पडल्यानंतर नऊ वाजल्यानंतर विनायक आणि प्रमोद दोघेच घरी होते. यावेळी विनायकने 'मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. तू बाहेर जाऊ नकोस. तुला मारून टाकतील. मला भीती वाटतेय' असे सांगत प्रमोदला घरी थांबवले. तेव्हा प्रमोदने 'तुला, मावशीच्या घरी सोडतो' असे त्याला सांगितले. तरीही विनायकाने त्याला घरीच थांबायला सांगितले. विनायकची अस्वस्थता पाहून प्रमोद घरीच थांबला. सकाळी ११ वाजेपर्यत सगळे ठीकठाक होते. दरम्यान प्रमोद बाथरुमसाठी गेला. घरी कुणीही नव्हते. या कालावधीत विनायक स्वयंपाकगृहात गेला. किचनमध्ये त्याने वाशाला साडी बांधून गळफास लावून जीवनयात्रा संपविली हे सांगताना प्रमोदला हुंदका फुटला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षणप्रश्नी जनतेची माफी मागा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भाजप सरकार हुकूमशाही, भांडवलदारांचे असून सर्वच घटक नाराज आहेत. या सरकारला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी सर्वच विरोधी पक्षांची मोट बांधली जाणार आहे. सर्वसामान्यांच्या हक्कासाठी काँग्रेस आता रस्त्यावर उतरून संघर्ष करणार आहे. मराठा आणि धनगर आरक्षण देण्यातही सरकार अप्रामाणिक असल्याने जनतेची जाहीर माफी मागावी. भाजप सरकार सर्वच मागण्यांना आश्वासनाचे गाजर दाखवत आहे,' अशी टीका काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, 'सरकारने विश्वासार्हता गमावली आहे. शेतकरी, दूध, ऊस उत्पादकांना फसविण्याचे काम केले. त्याविरोधात काँग्रेसने पावसाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरले. मात्र, सर्वच घटकांची फसवणूक केली आहे. भाजप मराठा आरक्षण देण्यासाठी खेळी करीत आहे. शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याची ग्वाही दिली होती. मात्र, आजअखेर आश्वासनाचे गाजर दाखविले जात आहे. शिक्षण संस्थांमध्ये आरक्षणाची मागणी आहे. मात्र, शिक्षण संस्थांचा दर्जा खालावला आहे. धनगर आरक्षणाचे आश्वासन दिले आहे. मात्र, दोन्ही आरक्षण देण्यासाठी केवळ चालढकल केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्यानेच मुख्यमंत्री बदलून परिस्थिती बदलणार नसल्याचे भाष्य केले आहे.'

चव्हाण म्हणाले, 'भाजप सरकार केवळ भांडवलदारांचे आहे. या सरकारला सर्वसामान्यांचे काहीच देणे घेणे नाही. सरकारमधील काही मंत्री भ्रष्टाचारी आहेत. काँग्रेसने सिडको घोटाळा उघडकीस आणला. त्याची न्यायालयीन सुनावणी सुरू आहे. मंत्री प्रकाश मेहता यांचीही लोकायुक्तांकडून सुनावणी सुरू आहे. सरकार पारदर्शी आहे, असे ठामपणे सांगते. मात्र, भ्रष्टाचारी मंत्री, पदाधिकाऱ्यांची चौकशी केली जात नाही. अरबी समुद्रात शिवस्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा काहीही निर्णय घेतलेला नाही. शिवस्मारकासाठी नियोजित ३८०० कोटींच्या निविदेऐवजी केवळ २५०० कोटींची निविदा काढली आहे. युवकांना ७२ हजार नोकऱ्या देण्याची जाहिरातही फसवी आहे. ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अद्याप ठोस तपास नाही. विवेकवादी विचारांची हत्या करण्याचे षङयंत्रच रचले जात आहे. सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी यापूर्वी केली होती. त्यासाठी काँग्रेस सरकारने २०११ मध्ये प्रस्तावही पाठविला होता. मात्र, या प्रस्तावाला अन्य राज्यांनी समंती दिली नाही.'

सांगली निवडणुकीत पैशाचा पाऊस

'सांगली महापालिका निवडणुकीत भाजपने पैशांचा पाऊस पाडला. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. या ठिकाणी निश्चितच विजय होईल अशी खात्री होती. मात्र, पैसा आणि काँग्रेसमधील नाराज कार्यकर्ते आणि उमेदवारांना भाजपने विकत घेतले. त्यांना मिळालेले यश कायमस्वरूपी नाही. ईव्हीएम मशिनचा प्रश्न चर्चेत आहे. काँग्रेस सरकारच्या काळापासून ईव्हीएम मशिन कार्यरत होते. मात्र, त्याची चर्चा भाजप सरकारच्या काळात होऊ लागली. या सरकारने विश्वार्हता गमावली आहे' अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी ६ ऑगस्टसाठी

$
0
0

प्रदर्शन : ग्रंथ कॉर्नर पुस्तक प्रदर्शन, स्थळ : शाहू स्मारक भवन, वेळ : सकाळी १० वा.

पुरस्कार वितरण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर नवप्रबोधन विचारमंचतर्फे उत्कृष्ट जयंती पुरस्कार वितरण, स्थळ : शाहू स्मारक भवन, वेळ : सायं. ४ वा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारला प्रदूषित पाण्याचा जलाभिषेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा आरक्षण मागणीसाठी कणेरीवाडी येथील विनायक परशूराम गुदगी यांनी आत्महत्या केली. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात आतापर्यंत २३ आत्महत्या झाल्या आहेत. सरकारने या आत्महत्याग्रस्त कुटूंबीयांची भेट घेतली नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता. ६ ऑगस्ट) दिवसभर सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शहरातील १३ नाल्यांतील प्रदूषित पाण्याने जलाभिषेक घालण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्यावतीने पत्रकार परिषदेत जाहीर केला. १५ ऑगस्ट रोजी, स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना जिल्ह्यात ध्वजावंदन करू देणार नसल्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

मराठा आरक्षणासाठी कणेरीवाडीतील विनायक गुदगी या तरुणाने आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर तणावाचे वातावरण होते. कोल्हापूर बंद आंदोलन करण्यासह कार्यकर्त्यांनी विविध मते निर्माण झाली. त्यानंतर ठिय्या आंदोलनातील प्रमुख नेत्यांनी भूमिका स्पष्ट करण्यासाठी तातडीने पत्रकार परिषद बोलावली. यावेळी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्री पदाची जबाबदारी आहे. त्यामुळे पोलिस आत्महत्याग्रस्त कुटुंबावर दबाव टाकत आहेत. राज्यात मराठा समाजाच्या २३ युवकांनी आत्महत्या केल्या असताना एकाही कुटूंबाची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतलेली नाही. ब्रिटिशांपेक्षा जास्त दडपशाहीचा वापर करत सरकार आंदोलनात फूट पाडत आहे.'

सचिन तोडकर म्हणाले, 'विनायक गुदगी यांना सकाळी ११ वाजता आदरांजली अर्पण करून शोकसभा घेण्यात येणार आहे. विनायक गुदगी यांच्या आत्महत्याप्रकरणी पालकमंत्री पाटील यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करू देणार नाही.' तर 'आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात २३ आत्महत्या झाल्या आहेत. या आत्महत्यांना जबाबदार असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री पाटील यांनी राजीनामा द्यावा. पोलिसांनी मुख्यमंत्री व पालकमंत्री पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,' अशी मागणी स्वप्नील पार्टे यांनी केली.

पत्रकार परिषदेस अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, जयेश कदम, दुर्गेश लिंग्रस, प्रा. मधुकर पाटील, संग्रामसिंह निंबाळकर, राजू लिंग्रस, जयकुमार शिंदे, उमेश पवार, फत्तेसिंह सावंत, कमलाकर जगदाळे, गणी आजरेकर, कादर मलबारी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलनात दिवसभर....

$
0
0

घटनाक्रम....

- सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विनायक गुदगीची आत्महत्या

- उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल

- दुपारी दीडच्या सुमारास विनायक मृत असल्याचे डॉक्टरांकडून घोषित

- मराठा आरक्षणासाठी विनायकने आत्महत्या केल्याचे आंदोलकांचे म्हणणे

- दोन वाजता आंदोलकांकडून सरकारच्या निषेधार्थ दसरा चौकात रास्ता रोको

- सव्वादोनच्या सुमारास वडील व भावाच्या जबाबावेळी सीपीआरमध्ये पोलिस, कार्यकर्त्यांत वाद

- सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सीपीआरमध्ये

- दुपारी पावणेचार वाजता दसरा चौकात विनायकला आदरांजली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘साखर विक्री करूनदौलतने देणी द्यावीत’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जिल्हा बँकेच्या ताब्यात असलेली साखर विक्री करून दौलत सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक व कामगारांची देणी द्यावीत,' अशी मागणी शिवसेनेने केली आहे. जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, बँकेने दौलत साखर कारखाना न्यूट्रिएन्टस् अॅग्रो फ्रुटसला चालवायला दिला होता. न्यूट्रिएन्टसने अटींचा भंग केल्याने बँकेने त्यांच्याबरोबरचा करार रद्द केला आहे. बँकेने कारखाना चालविण्यास नवीन निविदा प्रसिद्ध करावी, अशी मागणी केली. न्यूट्रिएन्टसची साखर बँकेच्या ताब्यात असून, या साखरेची विक्री करून ऊस उत्पादक व कामगारांची देणी द्यावीत. शेतकरी व कामगारांची देणी ६८ कोटी ६० लाख रुपये आहेत. नवीन निविदेनुसार कारखाना चालविण्यास देताना करारपत्रात २०१८ पूर्वीची शेतकरी व कामगारांची देणी याची नोंद करावी. तसेच करारपत्र करताना बँक प्रतिनिधी व कामगार संघटना प्रतिनिधींची संयुक्त बैठक घ्यावी.

शिष्टमंडळात चंदगड विधानसभा संघटक माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम कुपेकर, उप जिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, महिला संघटक संज्योती मळवीकर, तालुकाप्रमुख अशोक मनवाडकर, अॅड संतोष मळवीकर यांच्यासह बँकेच्या संचालिका निवेदिता माने, असिफ फरास, मुख्य कार्यकारी अधिकारी ए.बी. माने उपस्थित होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परराज्यातील दहावीमुळे एमबीबीएस प्रवेश रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुलाला एम. बी. बी. एस. ला प्रवेश मिळाल्याचा आनंद साजरा होत असताना प्रवेश रद्द झाल्याचे कळविण्यात आले. त्यासाठी परराज्यात दिलेली दहावीची परीक्षा कारणीभूत ठरली. सायनमधील (मुंबई) लोकमान्य टिळक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मिळालेला प्रवेश रद्द झाल्याने गौरव द्वारकानाथ पवार या विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे. महाराष्ट्र वगळता इतर राज्यात दहावीची परीक्षा दिलेल्या एकूण ३१ विद्यार्थ्यांचे भवितव्य अंध:कारमय बनले आहे.

मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील द्वारकानाथ पोवार हे शासकीय नोकरीत आहेत. त्यांचा मुलगा गौरव याला राज्य कोट्यातून एमबीबीएससाठी मुंबई सायन येथील लोकमान्य टिळक शासकीय कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. त्यानंतर शैक्षणिक फीदेखील त्यान भरली. मात्र नंतर कॉलेज प्रशासनाने त्याची दहावी राज्याबाहेर झाल्याचे कारण दाखवत प्रवेश रद्द करण्यात आल्याचे कळविले. गौरवला एमबीबीएससाठी सीबीएसई कोट्यातून औरंगाबाद येथे तर राज्य कोट्यातून मुंबईत प्रवेश मिळाला होता. गौरवने राज्य कोट्यातून अॅडमिशन घेतले होते. आता प्रवेशच रद्द झाल्याने करायचे काय? असा प्रश्न पोवार कुटूंबीयांसमोर आहे. गौरवप्रमाणेच ३१ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे.

राज्य शासनाने सप्टेंबर २०१६ मध्ये परराज्यात दहावी झालेल्या विद्यार्थ्यांना एमबीबीएससाठी प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला. मात्र; गौरवने मार्च २०१६मध्ये दहावीची परीक्षा दिली होती. राज्य सरकारच्या निर्णयाआधी त्याचे दहावीचे शिक्षण परराज्यात झाले असल्याने शासनाने याचा विचार करावा. याबाबत निर्णय घेण्यासाठी आवश्यक वाटले तर त्याची मूळ रहिवासाबद्दलची कागदपत्रे तपासावीत अशी मागणी पोवार कुटुंबियांनी केली आहे. मूळचे महाराष्ट्रातील असूनही केवळ दहावी परराज्यात केल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान न करता शासनानाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी पोवार कुटूंबीयांनी केली आहे.

एमबीबीएस प्रवेश रद्द झाल्याने माझ्या मुलाचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे. प्रवेश रद्द झाल्यापासून मुलगा गौरव तणावात वावरत आहे. आम्ही राज्याचे मूळ रहिवाशी असल्याची खातरजमा करून शासनाने प्रवेश पूर्ववत करावा अशी आमची मागणी आहे.

- द्वारकानाथ पवार, पालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवा सोसायट्यांवरच केडीसीसीची प्रगती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

'शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विविध योजना राबविल्या आहेत. क्षारपड जमिनी विकास, ऊसतोडणी यंत्र खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले आहे. शेतकऱ्यांना गरज असेल, तेव्हा कर्ज देण्यात येत आहे. जिल्हा बँकेची प्रगती साधण्यासाठी विकास सेवा संस्था अधिक चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत,' असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.

जयसिंगपूर येथील इंद्रध्वज सभागृहात जिल्हा बँकेच्या वतीने शिरोळ तालुक्यात सभासद पातळीवर शंभर टक्के कर्जवसुली केलेल्या विकास संस्थांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी खासदार राजू शेट्टी, संचालक राजेंद्र पाटील-यड्रावकर, गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील प्रमुख उपस्थित होते.

आमदार मुश्रीफ म्हणाले, 'अन्य बँकांच्या तुलनेत जिल्हा बँक सेवा संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देते. शेतकऱ्यांनीही आपली बँक समजून जिल्हा बँकेत ठेवी ठेवण्यास प्राधान्य द्यावे. उसाची बिले यापुढे जिल्हा बँकेत जमा होतील.'

खासदार राजू शेट्टी म्हणाले, 'जिल्हा बँक शेतकऱ्यांसाठी आधारवड असून बँक, सेवा सोसायट्या व शेतकरी यांच्यातील संबंध चांगले राहिले पाहिजेत. सोसायट्यांवरच शेतकरी अवलंबून असतो. यामुळे बँक व सोसायट्या अधिक चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. स्पर्धेच्या काळात शेतकऱ्यांना कमी व्याजाने अधिकाधिक कर्जपुरवठा झाला पाहिजे. मात्र, कर्जाच्या परतफेडीची क्षमताही आपल्याकडे असावी. सामान्य माणसाला सहकारी संस्थांचा आधार असून या संस्था मोडल्या जाऊ नयेत, याची दक्षताही घेण्याची गरज आहे.'

बँकेचे संचालक राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, 'अडीच वर्षांपूर्वी जिल्हा बँक तोट्यात होती. बँकेवर प्रशासक नियुक्ती केली होती. यानंतर आमदार मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील नव्या संचालक मंडळाने बँक प्रगतिपथावर नेण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. एकेकाळी राज्यात आदर्शवत असणाऱ्या जिल्हा बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी थकीत कर्जवसुलीचे योग्य नियोजन केल्यानेच बँक नफ्यात आली.'

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. माने यांनी स्वागत केले. १०० टक्के कर्जवसुली करणाऱ्या विकास संस्थांचा सत्कारही करण्यात आला. बबन यादव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सावकर मादनाईक, बंडा माने, अमरसिंह पाटील, सुभाषसिंग रजपूत, सुरेश शहापुरे, रावसाहेब भिलवडे, संजय नांदणे, संजय बोरगावे, आदित्य पाटील-यड्रावकर, इकबाल बैरागदार, पै. केशव राऊत, आदिनाथ हेमगिरे यांच्यासह विविध विकास सेवा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

०००

एफआरपी द्यायची कशी?

चौदा दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी साखर विकणे अथवा ती तारण ठेवून पैसे उपलब्ध करणे, हे दोनच पर्याय आहेत. मात्र, साखर वेळेत विकली जात नाही. तर राष्ट्रीयीकृत बँकांनी साखर उद्योग डेंजर झोनमध्ये टाकला आहे. यामुळे एफआरपी चौदा दिवसांत द्यायची कशी, असा प्रश्न आहे. एफआरपीसाठी कारखान्यांना चौदा दिवसांचे बंधन घालू नये, अशी अपेक्षा आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

०००००

फोटो-

जयसिंगपूर येथे शंभर टक्के कर्जवसुली करणाऱ्या सेवा संस्था प्रतिनिधींचा सत्कार करताना बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ. शेजारी खासदार राजू शेट्टी, संचालक राजेंद्र पाटील-यड्रावकर, आदी. (छाया : राहुल मोरे, जयसिंगपूर)

००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाणीत दोघे जखमी

$
0
0

आजरा : किरकोळ कारणावरून विचारणा करीत दोघांना काठीने मारहाण करून जखमी करण्याची घटना आजरा शहरात घडली. यानुसार आजरा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. विजय कांबळे व संतोष कांबळे (दोघेही रा. गांधीनगर, आजरा) अशी त्यांची नावे आहेत. काल दुपारी येथील चाफे गल्लीतील कृपा दूध संस्थेसमोर ही घटना घडली. पंडित लक्ष्मण राठोड (वय-४५, रा. नागझरी, चाफे गल्ली, आजरा) यांनी फिर्याद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर आंदोलनाची धग आणि आत्महत्येचे सत्र सुरू असताना रविवारी कोल्हापूरजवळील कणेरीवाडी येथील विनायक परशराम गुदगी या २६ वर्षीय तरुणाने नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून गळफास घेवून आत्महत्या केली. मराठा आरक्षणासाठी तरुणाने जीवनयात्रा संपविण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. विनायकच्या आत्महत्येचे वृत्त समजताच त्याचे संतप्त पडसाद उमटले. दसरा चौक येथे सकल मराठा समाजाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत रस्त्यावरच ठिय्या मांडला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही दसरा चौक आंदोलनात सहभाग घेत रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला. दरम्यान, गुदगी कुटुंबियांवर जबाब बदलण्यासाठी पोलिस प्रशासनाने दबाव टाकल्याचा आरोप सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला.

माजी मुख्यमंत्री चव्हाण आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी सीपीआर येथे भेट देऊन गुदगी कुटुंबियांचे सात्वंन केले. विनायकच्या मृत्यूनंतर दसरा चौक, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे प्रचंड तणाव निर्माण झाला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त लावला होता. दरम्यान, विनायकचे वडील परशराम व लहान भाऊ प्रमोद यांनी पोलिस जबाबात विनायकने नोकरी नसल्यामुळे नैराश्येतून आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. विनायक हा सकल मराठा समाजाच्या माध्यमातून आरक्षण आंदोलनात सक्रिय होता. तीन ऑगस्ट रोजी गोकुळ शिरगाव येथे सकल मराठा समाजातर्फे आयोजित आंदोलनात त्याने सहभाग घेतला होता. वाणिज्य शाखेतून बारावी आणि एमएससीआयटी पूर्ण केलेला विनायक हा नोकरीच्या शोधात होता. नोकरी न मिळाल्यामुळे तो गेले काही दिवस अस्वस्थ होता.

पोलिसांच्या जबाबाला आक्षेप

मराठा आरक्षणासाठी तरुणाने आत्महत्या केल्याच्या वृत्ताने सीपीआरमध्ये तणाव निर्माण झाला होता. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस फौजफाटा बंदोबस्तासाठी लावला होता. पोलिस प्रशासनातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सीपीआरमध्ये धाव घेतली. विनायकचे वडील व लहान भाऊ प्रमोदचे जबाब घेण्यासाठी सीपीआरमधील पोलिस त्यांना पोलिस कक्षात घेऊन गेले. यावरुन सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते व पोलिस अधिकाऱ्यांत खटके उडाले. बंद खोलीत जबाब घेण्यापेक्षा, सगळ्यांच्या समक्ष जबाब घ्या. त्या दोघांवर कसलाही दबाव टाकू नका असे सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यांनतर सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत जबाब नोंदविले.

..........

दुमदुमणाऱ्या घोषणा अन् स्मशान शांतता

शवविच्छेदनानंतर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास विनायकचे पार्थिव दसरा चौकात आणले. पार्थिव दसरा चौकात आणताच सारा परिसर शोकसागरात बुडाला. 'अमर रहे ... अमर रहे ... विनायक गुदगी अमर रहे' अशा घोषणा दिल्या. विनायकचे पार्थिव आंदोलनस्थळाच्या व्यासपीठावर ठेवून पुष्पहार अर्पण केले व 'मराठा आरक्षण मिळाले पाहिजे, सकल मराठा'अशा आशयाची भगवी टोपी घालत आदरांजली वाहिली. यानंतर पोलिस बंदोबस्तात पार्थिव कणेरीवाडीकडे रवाना झाले. गुदगी कुटुंबीय मूळचे हुक्केरी तालुक्यातील दड्डी येथील आहे.

...............

पोलिसांची दडपशाही

'विनायक हा सकल मराठा समाजाचा कार्यकर्ता होता. गोकुळ शिरगाव येथे झालेल्या मराठा आंदोलनावेळी त्याने मनोगत व्यक्त केले होते, तसेच दसरा चौक येथील आंदोलनात सहभागी होता. नोकरी नसल्याने त्याच्यामध्ये नैराश्य निर्माण झाले होते. याबाबतची आपली भावना तो मित्रांकडे बोलून दाखवन होता. विनायकने नोकरी नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केली असताना पोलिसांनी मात्र दबाव टाकून कुटुंबाकडून जबाब नोंदवून घेतला. गेल्या तीन वर्षांपासून गुदगी कुटुंबीय कणेरीवाडी वास्तव्यास असताना पोलिसांनी दबाव निर्माण करुन अंत्यसंस्कारासाठी त्याचा मृतदेह दड्डी (कर्नाटक) येथे नेला असल्याचा आरोप सकल मराठा समाजाचे नेते दिलीप देसाई यांनी केला.

.............

दसरा चौक सुन्न

सकल मराठा समाजाच्या आंदोलनाचे दसरा चौक हे केंद्र बनले आहे. नेहमीप्रमाणे दसरा चौकात रविवारी सकाळपासूनच मराठा आरक्षणाचा जागर सुरु होता. या दरम्यान कणेरीवाडी येथील विनायक गुदगी या तरुणांनी सकाळी ११ वाजता मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचे वृत्त थडकले. आणि एका क्षणार्धात दसरा चौक परिसरात स्मशान शांतता पसरली. गेले बारा दिवस मराठा आरक्षणाच्या घोषणांनी दुमदुमणारा चौक मराठा तरुणाच्या आत्महत्येच्या वृत्तेने अक्षरश सुन्न झाला. सकल मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी तत्काळ सीपीआरकडे धाव घेतली. सीपीआर परिसरात कणेरीवाडीतील नागरिकांनी व मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली. सरकारविरोधी भावनांनी वातावरण तणावपूर्ण बनले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा समाजाला आरक्षण हवे

$
0
0

बामसेफच्या राज्य अधिवेशनात वामन मेश्राम यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार विलंब करीत आहे. अशा टप्यातच पुढील निवडणुकीत ओबीसींची मते मिळवण्यासाठी मेगा भरतीचे गाजर दाखविले. यामुळे मराठा समाजात असंतोष निर्माण झाला. त्यातून आंदोलन भडकले. त्यास सरकार जबाबदार आहे. संविधानच्या चौकटीत बसवून मराठा समाजालाही आरक्षण द्यायला हवे', असे मत बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी रविवार व्यक्त केले. भाजपच्या अमिषांना बळी न पडता येत्या निवडणुकीत ओबीसी, एस.टी, एससींनी सूज्ञपणे एकत्र येत परिवर्तन करण्यास सज्ज राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

बामसेफच्या ३२ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. येथील गवत मंडईतील आयर्विन ख्रिश्चन हॉलमध्ये अधिवेश झाले. उदघाटन उद्योजक राजेश खाडे यांच्या हस्ते झाले.

मेश्राम म्हणाले, 'मराठा आणि ओबीसी समाजात भांडणे व्हावीत, त्याचा राजकीय फायदा आपल्याला व्हावा, यासाठीच भाजपने मराठा आंदोलन चिघळवत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७२ हजार नोकरभरतीच्या घोषणा करून गाजर दाखविल्याने मराठा आंदोलनाचा भडका उडाला. त्यास मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून ओबीसी समाजाचे धुव्रीकरण होईल. ओबीसी समाज भाजपच्या पाठिशी उभा राहील, असा जाणीवपूर्वक प्रयत्न सरकार करीत आहे. मराठा समाजाचा समूह तयार करून मागासलेपण स्पष्ट केल्यास आरक्षण मिळू शकते. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास त्यास एबीसी म्हणजे अॅडीशनल बॅकवर्ड क्लास म्हणावे लागेल. गुजरातमधील पटेल, दक्षिणेतील ओबीसीप्रमाणे महाराष्ट्रातही मराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे.'

लोकसभेतील अविश्वास ठरावावेळी शिवसेनेने भाजपला मतदान केले नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजप एकाकी पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच भाजप आश्वासनाचे गाजर दाखवत मतांची गोळाबेरीज करीत आहे. मराठा आरक्षणाला विलंब झाल्याने मराठा समाजाची मते मिळणार नाहीत. म्हणून भाजप ओबीसीची मते मिळवण्यासाठीच ७२ हजार पदांची भरती करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. मराठा आंदोलन चिघळत ठेवत ओबीसी समाजाची मते मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

यावेळी जीएसटीचे उपायुक्त अश्विनकुमार उके, सहायक विक्रीकर आयुक्त संदीप माने, विजयकुमार भाले, डॉ. सुरज पवार, उदय सूर्यवंशी, विठ्ठल सातव, दिलीप पालवे, भारत पाटील, इंद्रजीत कांबळे, नितीन गायकवाड, डॉ. डी. आर. कसाब, जी. बी. जाधव, आनंद थोरात आदी उपस्थित होते.

--------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीपाल्याचे दर कडाडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील लक्ष्मीपुरी, कसबा बावड्यासह शहरातील विविध भाजी मंडयांमध्ये आणि आठवडा बाजारात आवक कमी असल्याने सर्व भाजीपाल्याचे दर कडाडलेले राहिले. त्यामुळे ग्राहकांना पाव किलो भाजीसाठी किमान १० ते २० रुपये मोजावे लागले. चांगल्या प्रतिच्या गवार, वांगी, दोडक्याचा किलोचा दर ८० रुपयांपर्यंत राहिला. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादूर्भाव वाढल्याने भाजापाल्याला मोठा फटका बसला आहे. उत्पादन कमी झाल्याने सर्वच भाज्यांचे दर वाढल्याचे चित्र आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून पालेभाज्यासह इतर भाज्यांचे दर चढे राहिले. या आठवडाभरात पावसाचे प्रमाण कमी आहे. मात्र, किडीची लागण मोठ्या प्रमाणात झाल्याने सर्वच भाजीपाल्याचे उत्पादन कमी होत आहे. सांगली, कोल्हापूर, निपाणी, शिरोळ, हातकणंगले, करवीर आदी भागातून भाजीपाल्याची आवक कमी झाली. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात तेजी राहिली. बटाटा, कांद्याचेही असेच चित्र राहिले. त्यामुळे कांदा, बटाट्याचा दर २० रुपये किलो आहे. या आठवड्यात टोमॅटोची आवक चांगली झाली. त्यामुळे दर पाच रुपयांनी कमी झाला. हलक्या प्रतीच्या टोमॅटोचा दर दहा रुपये किलो होता. मुळ्याची आवकही वाढली आहे. दहा रुपयांना दोन मुळा विक्री सुरू होती. शेवग्याची आवक जास्त राहिल्याने दहा रुपयाला पाच असा दर राहिला. सध्या लिंबूचा दर घसरला असून पाच रुपयांना दहा लिंबू विक्री सुरू आहे.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रूपयांत)

वांगी ५० ते ८०

टोमॅटो १५ ते २०

भेंडी ४० ते ५०

ढबू मिरची ६० ते ७०

गवार ८० ते १००

दोडका ६०

कारली ५० ते ६०

वरणा ४० ते ६०

ओली मिरची ४० ते ८०

बटाटा २० ते ३५

लसूण ४०

घेवडा ४० ते ६०

फ्लॉवर २० ते ३० प्रती नग

कोबी १० ते २० प्रती नग

फळांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

सफरचंद १६० ते १८०

डाळिंब २० ते ५०

पपई ३० ते ४०

केळी (डझन) २५ ते ६०

जवारी केळी (डझन) ४० ते ८०

अननस २० ते ३५

पालेभाजी दर (पेंडी, रुपयांत)

मेथी १०

शेपू १० ते १५

करडई १० ते १५

कांदा पात १० ते १५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मराठा तरुणांची कर्जप्रकरणे तत्काळ मंजूर करा’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

अण्णासाहेब विकास महामंडळाअंतर्गत जिल्ह्यातील मराठा युवकांची प्रलंबित ६२३ कर्ज प्रकरणे १५ दिवसांत मंजूर करावीत, या मागणीसाठी शिवसेनेने भवानी मंडप परिसरात निदर्शने केली. शिवसेनेच्यावतीने जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महामंडळाचे साहाय्यक संचालक ज.बा. करीम यांना निवेदन देण्यात आले.

भवानी मंडपातील पागा बिल्डिंग परिसरातील महामंडळाच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. शिवसेनेने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे, राज्य सरकारने मराठा समाजातील युवकांना बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्याचे धोरण जाहीर केले आहे. कर्जाचे व्याज सरकार भरणार आहे. जिल्ह्यातील ६२३ युवकांनी महामंडळाकडे कर्ज मागणीसाठी अर्ज केले आहेत. पण १६ युवकांना कर्ज मिळाले आहे. महामंडळाने कर्ज मागणीची सर्व प्रकरण मंजूर करावीत. महामंडळाने कर्ज मंजुरीसाठी राष्ट्रीय व शेड्यूल्ड बँकांच्या प्रतिनिधीबरोबर बैठका घेऊन कर्ज प्रकरणे मंजूर करावीत, महामंडळाच्या सर्व योजनांची माहिती जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालये, महाविद्यालये, ग्रामपंचायतीत लावावीत, अशी मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात शहर उप प्रमुख शिवाजीराव जाधव, दुर्गेश लिंग्रस, अवधूत साळोखे, हर्षल सुर्वे, विराज पाटील, राजू यादव, शशी बिडकर, दिलीप जाधव आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्मचाऱ्यांच्या संपाला जिप कर्मचाऱ्यांचा पाठिंबा

$
0
0

राज्यव्यापी संपाला

जि.प. कर्मचाऱ्यांचा पाठिंबा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी सात ऑगस्टपासून पुकारलेल्या तीन दिवसीय संपाला जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला. जिल्हा परिषदेतील विविध कर्मचारी संघटनांनी बैठक घेऊन पाठिंबा जाहीर केला. याप्रसंगी समन्वय समितीचे सुरेश डावरे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सचिन जाधव, जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटनेचे अध्यक्ष नीलेश म्हाळुंगेकर, अजय शिंदे, जिल्हा परिषद युनियन संघटनेचे अध्यक्ष धनंजय जाधव, आरोग्य संघटनेचे अध्यक्ष एम.एम.पाटील व सुभाष इंदूलकर, वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष तांबोळी, लेखा संघटनेचे महावीर जोंधळे, परिचर संघटनेचे सुनील मिसाळ यांची भाषणे झाली. जिल्हा परिषदेतील विविध विभागातील मिळून १५ हजार कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइलचा वापर हानीकारक

$
0
0

कोल्हापूर: 'मोबाइलचा अमर्याद वापर मेंदूची वाढ खुंटवण्यास कारणीभूत ठरत आहे.'असे मत एआयएसच्या संचालिका आरती टोपले यांनी व्यक्त केले. भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, 'डिजिटल माध्यमांच्या अतिरेकी वापरामुळे डोळयांचे आजार, एकाग्रतेचा भंग, मेंदूचे विकार आणि खासगी जीवनात वितुष्ठ असे पेच निर्माण होत आहेत. या सर्व गोष्टीवर वेळेत नियंत्रण आणणे गरजेचे आहे. हाच निरोगी व समृद्ध जीवनाचा मंत्र आहे.' प्रा. यू. एस. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एस. ए. पिशवीकर यांनी आभार मानले. प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे, उपप्राचार्य डॉ. एम. एस. भाटिया यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंद खोल्याचे अतिक्रमण जमीनदोस्त

$
0
0

इचलकरंजी : येथील जुना सांगली नाका चौकातील नगरपालिकेच्या मालकीच्या दोन बंद अवस्थेत असलेल्या खोल्या वाहतुकीला अडथळा ठरत होत्या, त्या रविवारी नगरपालिकेने जमीनदोस्त केल्या. शहरातील जुना सांगली नाका चौकातील नाक्याच्या खोलीसह दोन खोल्या वाहतुकीला अडथळा ठरत होत्या. या खोल्या हटवून रस्ता रुंदीकरण झाल्यास वाहतुकीला सोयीचे होणार असल्याने या खोल्या हटवण्याची मागणी वारंवार होत होती. नगरसेविका संगीता आलासे यांनीही या खोल्या हटविण्याची मागणी पालिकेकडे लावून धरली होती. त्यामुळे रविवारी जेसीबीच्या सहाय्याने या खोल्या हटविण्यात आल्या. दरम्यान, याच चौकाजवळील हनुमान मंदिरालाही पर्यायी जागा देऊन मंदिर स्थलांतराबाबत दोन दिवसांत चर्चा करून मार्ग काढणार असल्याचे नगरसेवक अमर जाधव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् क्षणात हळद रुसली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्या आत्येभावासोबत बालपणी मौजमजा केली, शाळा-कॉलेजच्या दिवसातील अनुभव शेअर केले, त्या भावाच्या आयुष्यातील लग्नासारखा आनंदाचा क्षण काही तासांवर आला होता. लग्नाच्या आदल्या रात्री घराच्या अंगणात हळदीचा कळस मांडला. भावाच्या हळदीसमारंभाच्या तयारीत तो भान हरवून लगबग करत होता. हळद खेळण्यासाठी मागवलेल्या टँकरवर ठेवलेली विजेची मोटर त्याच्या लक्षातच आली नाही. पाण्याचा अंदाज घेण्यासाठी तो टँकरकडे गेला आणि उत्साहाने धावपळ करणारा राम एका क्षणात विजेच्या धक्क्याने निपचित पडला. डोळ्यादेखत राम कोसळलेला पाहून हळदीच्या घरातला आनंदाचा रंगच उडून गेला. पाचगाव येथील पंचशील कॉलनीत घडलेल्या या घटनेने खारकर कुटुंबीय अजूनही सुन्न आहेत. शनिवारची रात्र राम रणजित खारकरला (वय २१) शेवटची ठरली.

बी. कॉम.च्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेला राम आत्येभावाच्या लग्नाच्या तयारीसाठी सकाळपासूनच घरी वावरत होता. पाचगावच्या पंचशील कॉलनीत आत्येभावाचे घर जवळच आहे. पाचगावात नेहमी पाण्याची तारांबळ उडते. हळदी समारंभाची तयारी जय्यत सुरू होती. सात वाजल्यापासून घरातल्या मंडळींची हळदीच्या कार्यक्रमाची धावपळ सुरू असताना राम घरच्या कामात मदत करण्यासाठी धडपड करीत होता. धार्मिक कार्यक्रमासाठी पाणी मोठ्या प्रमाणात लागणार असल्याने परिसरातून पाण्याचा टँकर मागिवला. रविवारी नातेवाइकाच्या लग्नाचा मुहूर्त असल्याने सर्वच पाहुणे मंडळींची धावपळ सुरू झाली. काही पाहुणे हातावर मेंदी काढण्यात दंग होते. आत्येभावाचे मित्रही कार्यक्रमासाठी उपस्थित होते. घरात शुभकार्य काही मिनिटांतच सुरू होणार म्हणून धांदल सुरू होती. काहीजण घराची सजावट करण्यात दंग होते. हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. तोपर्यंत पाण्याचा टँकर मागविण्यात आला. टँकरमधील पाणी काढण्यासाठी विजेची मोटर लावली होती. शनिवारी झालेल्या पावसामुळे मोटार भिजल्याने वीज प्रवाह थेट पाण्यात उतरला होता. रात्री सव्वा आठच्या सुमारास राम टँकरमध्ये किती पाणी आहे, हे पाहण्यासाठी गेला आणि काही मिनिटांतच विजेचा धक्का बसल्याने टँकरवरून कोसळून जागेवरच बेशुद्ध होऊन कोसळला. हळदीची धांदल थांबली अन् घरातील सर्वजण रामकडे धावले. नातेवाइकांनी मिळेल त्या वाहनाने खासगी दवाखान्यात रामला दाखल केले. आत्येभावाचे शुभकार्य होत असतानाच सारे कुटुंबच खासगी दवाखान्यात दाखल झाले. मात्र, विजेच्या तीव्र धक्क्यामुळे मेंदूपर्यंत इजा झाली होती. डॉक्टरांनी त्याला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न अखेरपर्यंत केले. मात्र, त्याची जगण्याची सुरू असलेली झुंज संपली. रामच्या दुर्दैवी मृत्यूने पंचशील कॉलनी हळहळली. हळदी आणि लग्नकार्यासाठी केलेल्या रोषणाईत रामच्या चटका लावून गेलेल्या मृत्यूने खारकर कुटुंबांच्या आयुष्यात काळोख पसरला. रामच्या पश्चात आई, वडील, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.

कोट...

अचानक झालेल्या घटनेने सारे कुटुंबच हादरून गेले आहे. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. आता मुलाच्या केवळ आठवणीच आयुष्यभर राहणार आहेत.

रणजित खारकर, रामचे वडील

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला क्रांतिज्योतीचे आयोजन

$
0
0

क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला

क्रांतिज्योतीचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेच्यावतीने ऑगस्ट क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी (ता. ८ ऑगस्ट) क्रांतिज्योतीचे आयोजन केले आहे. संस्थेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक मधुकर रामाणे, उपाध्यक्ष सुनिलकुमार सरनाईक यांनी ही माहिती दिली.

अध्यक्ष रामाणे म्हणाले, 'यंदा क्रांतिज्योतीचे ४० वे वर्ष आहे. यानिमित्त आठ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते व जिल्ह्यातील खासदार, आमदारांच्या उपस्थितीत ज्योतीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, खरी कॉर्नरमार्गे पुन्हा मिरजकर तिकटी असा ज्योतीचा मार्ग आहे. संस्थेच्या आजवरच्या वाटचालीवर आधारित स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहेत. विविध क्रांतिकारकांच्या लढ्यावर पुस्तक निर्मितीचा संकल्प केला आहे. महापालिकेच्या पाचवी ते सातवीमधील विद्यार्थ्यांना क्रांतिकारकांची पुस्तके भेट देण्यात येणार आहेत. केएमटीने प्रवास करणाऱ्या महिलांना तुळशीची रोपे वितरीत केली जातील. अंध शाळेतील मुले, अंगणवाड्यातील मुलांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. '

संस्थापक अध्यक्ष किसन कल्याणकर म्हणाले, '१९७८ पासून क्रांतिज्योत काढण्यात येते. माजी नगराध्यक्ष केशवराव जगदाळे, एम.के.जाधव, दत्तोबा चव्हाण, सखारामबापू खराडे, तात्यासाहेब पाटील यांनी १८५७ मधील क्रांतिकारकांची स्मृती जपण्यासाठी १९५७ मध्ये मिरजकर तिकटी येथे हुतात्मा स्तंभाची उभारणी केली आहे. '

पत्रकार परिषदेला कार्याध्यक्ष रामेश्वर पत्की, महादेव जाधव, सुनील रसाळ, मुसाभाई शेख आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images