Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कसिनोवर छापा, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

येथील रिंग रोडवरील त्रिशूल चौक परिसरातील एका इमारतीच्या तळघरात असलेल्या कसिनोवर अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाटगे यांच्या पथकाने छापा टाकून सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कसिनोचालक तौफिक शमशुद्दीन झारे (वय २९, रा. कुरुंदवाड) याच्याविरोधात गावभाग पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

गावभाग पोलिसांच्या पाठबळावरच हा कसिनो सुरू असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकारी या ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

त्रिशूल चौक परिसरातील एका इमारतीत बेकायदा कसिनो सुरू असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाटगे यांना समजली. त्यानुसार त्यांनी पोलिस उपनिरीक्षक के. एम. कांबळे, नीलेश भोसले, सतीश कोळी, समाधान माने यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार या पथकाने रात्री छापा टाकून सहा संगणक, रोख नऊ हजार ७०० रुपये व पाच मोबाइल असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तौफिक झारेला ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गैरव्यवहारप्रकरणी कागदपत्रे सादर

$
0
0

कोल्हापूर : कुरुंदवाड येथील एस. के. पाटील बँकेच्या तत्कालीन संचालकांवर गुन्हे दाखल करण्यासंबधी सहकार विभागाचे विशेष लेखापरीक्षक किरण पाटील यांनी कुरुंदवाड पोलिस ठाण्यात कागदपत्रे सादर केली. आर्थिक गुन्हे विभागाने गुन्ह्यासंदर्भात सहकार खात्याने कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात २६ जुलैला पत्र पाठवले होते. या पत्रानुसार आवश्यक असलेली कागदपत्रे सहकार खात्याने कुरुंदवाड पोलिस ठाण्याला दिली. कागदपत्रांच्या आदेशाची पडताळणी करून पोलिस कारवाई करणार आहेत. एस.के. पाटील सहकारी बँकेच्या सर्व संचालकांची व्यक्तिगत मालमत्ता जप्त करून त्याच्या विक्रीतून नुकसानीची रक्कम वसूल करण्याचा कालबद्ध कार्यक्रम ठरविण्याचा आदेश मुंबई हायकोर्टाने यापूर्वीच दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगली महापालिकेवर भाजपचा झेंडा

$
0
0

सांगली ः सांगली-मिरज आणि कुपवाड महापालिकेवर सत्ता स्थापण्याचे स्वप्न भाजपने शुक्रवारी सत्यात उतरवले. महापालिकेच्या ७८ जागांपैकी ४१ जागांवर भाजपने विजयश्री खेचून आणत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलवले. या विजयाने सत्ताधारी कॉंग्रेसचा राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर आघाडी करुन पुन्हा सत्तेवर विराजमान होण्याचा मनसुबा उधळवून लावला गेला. सांगली महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची किमया भाजपने घडवून आणली. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ३५ जागांवर समाधान मानावे लागले तर शिवसेनेला खातेही उघडता आलेले नाही. मतदारांनी बंडखोर आणि अपक्षांनाही सपशेल नाकारले. या विजयाच्या निमित्ताने आता भाजपला प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी लागणार आहे.

सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार देत भाजपने या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण केली होती. महापालिकेच्या सत्ताधारी काँग्रेस आघाडीसोबत थेट लढत असल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते. भाजपने प्रचाराची जय्यत तयारी केली होती. अनेक मंत्रीही प्रचारात उतरवले होते. काँग्रेस आघाडीनेही आपल्या अनुभवाच्या पाठबळावर प्रचार यंत्रणा राबवली होती.

मतमोजणीला शुक्रवारी सकाळी दहा वाजता मिरज रस्त्यावरील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात सुरुवात झाली. परिसरात सकाळपासूनच उमेदवारांचे समर्थक येत होते. सुरुवातीचा कल कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीच्या दिशेने गेल्याने आघाडी समर्थकांत उत्साह संचारला. त्यानंतर मतमोजणीच्या ठिकाणी समर्थकांची भर पडत गेली. त्यामुळे काहीसे निराश झालेल्या भाजप नेते, समर्थकांत कुजबूज सुरु झाली. तरीही त्यांच्यातून सत्तेपर्यंत जाण्याविषयीचा आत्मविश्वास व्यक्त होत होता. ज्या ठिकाणची जागा गृहित धरली होती, तीच गेल्याने प्रत्येकजण विचारात पडला होता. तर जी जागा गेल्यात जमा असल्याचे मानून पुढे निघालेल्या कॉंग्रेसला आश्चर्याचा धक्का बसला. येणार नाही ती जागा पदरात पडल्याने उत्साहात असलेल्या आघाडीचा उत्साह नंतर मात्र फार काळ टिकला नाही.

मतमोजणीनंतर दोन तासांनी १५ जागांवर आघाडी घेतलेली कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी मागे पडत गेली. काही वेळातच भाजपने एकदम मुसंडी मारली आणि भाजपने २९ जागांपर्यंत मजल मारली आणि बहुमताच्या दिशेने कूच केली. त्यानंतर एकापाठोपाठ एक लागणारे निकाल भाजपच्या आकड्यात भर टाकत गेले. बहुमताच्या ४० जागांपेक्षा आणखी एक जागा मिळवून भाजपने सत्तेचे स्वप्न अखेर सत्यात उतरवले.

काही ठिकाणी क्रॉस वोटिंग होईल, अशी चर्चााही होत होती. मात्र अपवाद वगळता जवळपास सर्वच प्रभागात पक्षाच्या उमेदवारालाच मते मिळाल्याचेही स्पष्ट झाले.

सर्वाधिक लक्षवेधी निवडणूक सांगलीवाडीत झाली. तीन जागांच्या या प्रभागात भाजपचे माजी आमदार दिनकर पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यांचे चिरंजीव अजिंक्य पाटील मैदानात उतरल्यानंतर त्यांचे पुतणेही अपक्ष म्हणून पुढे आले. त्याचबरोबर या ठिकाणी आघाडी न करता आघाडीने स्वतंत्र उमेदवार देऊन त्याला मैत्रीपूर्ण लढतीचे नाव दिले. येथेही अत्यंत चुरशीने मतदान झाले होते. भाजपने तीनही जागा मिळवून येथेही कमळ फुलवले.

एकूण प्रभाग २० : जागा ७८

पक्षनिहाय मिळालेल्या जागा

भारतीय जनता पक्ष ४१

काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडी ३५

स्वाभीमानी विकास आघाडी १

अपक्ष १

०००००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्यथा पालकमंत्र्यांना फिरू देणार नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अधूनमधून पडणाऱ्या पावसाला तसेच कर्नाटक हद्दीतील पोलिसांच्या अरेरावीला झेलत ६० किलोमीटरचे अंतर पायी चालून चिकोत्रा खोऱ्यातील सकल मराठा समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी लाँग मार्चद्वारे मराठा ठिय्या आंदोलनाला पाठिंबा दिला. दोन दिवसांच्या चालण्याने पायाला फोड आले असतानाही त्याची तमा न बाळगता चिकोत्रावासीयांनी हक्काचे आरक्षण मिळवण्याचा निर्धार शुक्रवारी केला, तर ९ ऑगस्टपर्यंत निर्णय न घेतल्यास पालकमंत्र्यांना कोल्हापुरात फिरू न देण्याचा इशाराही देण्यात आला. दरम्यान, आंदोलकांमध्ये भांडणे लावून आंदोलन मोडीत काढण्याच्या प्रयत्नात सरकार आहे. यासाठी समाजाने संयमाने ९ ऑगस्टचा बंद यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दसरा चौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला विविध माध्यमातून पाठिंबा दिला जात आहे. सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या चिकोत्रा खोऱ्यातील मराठा समाजाने पाठिंब्यासाठी वेगळाच मार्ग अवलंबला. सेनापती कापशीसह परिसरातील गावांमधील नागरिकांनी गुरुवारी लाँग मार्च काढला. लिंगनूर येथून कर्नाटक हद्दीत प्रवेश करत असताना कर्नाटक पोलिसांनी केलेला अटकाव व दोन दिवस सतत चालण्याने पायाला आलेले फोड अशा अवस्थेतील आंदोलकांनी शुक्रवारी सकाळी कागलमधून पुढील वाटचाल सुरू केली. 'मराठा आरक्षण आमच्या हक्काचे' अशा घोषणा देत सर्वजण दुपारी दसरा चौकात पोहोचले. त्यांच्यासोबत तसेच दसरा चौकातही प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. या लाँग मार्चमुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली.

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांवर नोंदवलेले गुन्हे सरकारने मागे घ्यावेत, अशी मागणीही केली. यावेळी संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी आरक्षण देण्यास विलंब करणाऱ्या सरकारचा निषेध केला. तसेच आरक्षणाशिवाय थांबणार नाही असा इशाराही दिला. प्रताप माने म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांनी गोड बोलून आंदोन गुंडाळण्याचा प्रयत्न चालवला आहे. तर शिष्यवृत्तीसाठी तरतूद नसताना कोल्हापुरात पंधरा मुलांच्या वसतिगृहाचे उद्घाटन करुन खोटे बोल, पण रेटून बोल असा प्रकार सुरू केला आहे.' सेनापती कापशी येथील शशिकांत खोत म्हणाले, '५८ मोर्चे काढले तरी सरकारने दखल घेतलेली नाही. केवळ झुलवत ठेवले आहे. आता रडायचे नाही, लढायचे. समाजाचा संयम सुटला असला तरी ९ ऑगस्टला संयमाने विरोध करावा.'

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, 'राज्यात १४ जणांनी आत्महत्या केल्या तरी सरकार अजून निर्णय घेत नाही. नाना फडणवीसांचे नवे अवतार असलेल्या मुख्यमंत्र्यांनी बैठकांवर बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांना मराठा समाजातील नेते दिसत नाहीत. फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण ९ ऑगस्टचा बंद शांततेने करायचा आहे. मोडतोड केली तर आपल्याला अटक करून आंदोलन मोडीत काढायचा हा त्यांचा हेतू आहे. त्यामुळे लढाई जिंकली आहे, आता तह जिंकण्यासाठी आर या पारचे प्रयत्न करायचे आहेत.' दिलीप देसाई म्हणाले, 'आंदोलनात पेड कार्यकर्ते आहेत, असे सांगणाऱ्या सरकारने चिकोत्रावासीयांचा लाँगमार्च पाहायला हवा होता. ९ ऑगस्टपर्यंत निर्णय घेतला नाही तर मराठ्यांचा उद्रेक काय असतो हे दाखविले जाईल. हर्षल सुर्वे म्हणाले, 'जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार.' यावेळी सचिन तोडकर, युवराज पाटील, बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील, सुनील चौगुले, विजय सातवेकर, सूर्यकांत भोसले, प्रवीण नाईकवडे, आदी उपस्थित होते.

....

आणि पालकमंत्र्यांची भेट थांबली

पालकमंत्री चंद्रकांत पाटील शुक्रवारी कोल्हापुरात होते. दुपारी ते आंदोलनस्थळी भेट देणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली. आंदोलकांना हे समजताच 'येथे जर कुणी मंत्री भेट देण्यास आले तर सर्वांनी व्यासपीठावरून खाली उतरायचे. त्यानंतरही भेट घेण्याचा प्रयत्न केला तर शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर माथेफोड आंदोलन करण्यात येईल,' असे जाहीर करण्यात आले. त्याचवेळी चिकोत्रा खोऱ्यातील लाँग मार्चही दसरा चौकात येत होता. त्यामुळे जी काही परिस्थिती उद्भवेल, त्याला यंत्रणा जबाबदार असेल, असे सांगितल्यानंतर पोलिसांनी तसे काही नाही, असे म्हणत सारवासारव केली.

.....

सोमवारी कुशिरे बंद

ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील कुशिरे येथील ग्रामस्थांनी सोमवारी (ता.६) बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत घेण्यात आलेल्या बैठकीत संतोष साबळे, तुषार तोडकर, विशाल पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रभू सांगावकर, उत्तम खुटाळे, बाबासो पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, राज्यातील ४८ खासदार आहेत. त्यांनी मराठा आरक्षण व इतर सर्व जातीच्या प्रश्नावर लोकसभेत चर्चा घडवून त्याबाबत ठराव केल्यास रस्त्यावरील लढाई संपणार आहे. याबाबत खासदारांनी प्रयत्न करावा, असे आवाहन स्वतंत्र भारत पक्षाचे अशोकराव पवार यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

.......

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सर्वसमावेशकतेचा वारसा समजून घ्या’

$
0
0

लोगो : वर्षा व्याख्यानमाला

म. टा. वृतसेवा, शिराळा

'जागतिकीकरणानंतरच्या नव्या जगाचे आकलन करताना भारतीयांनी आपला सर्वसमावेशकतेचा वारसा समजून घेतला पाहिजे,' असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी केले. वारणानगर येथे श्री शारदा वाचन मंदिर आणि श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्षा व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना 'नव्या युगाचे नवे आकलन' या विषयावर ते बोलत होते. व्याख्यानमालेचे हे ४२ वे वर्ष आहे.

आवटे म्हणाले, 'भारताच्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विविधतेला एकसूत्रात गुंफून जनमानसाला जोडणारे गांधी, नेहरू, फुले, आंबेडकर यांचे विचार आज रुजविण्याची गरज आहे.' व्याख्यानमालेचे उद्घाटन वारणा कारखान्याच्या अध्यक्षा शोभाताई कोरे यांच्या हस्ते झाले. यावर्षीचा आदर्श वाचक पुरस्कार कृष्णात घारगे-वंडकर यांना देण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे, विजयसिंह जाधव, प्रमोद कोरे, शरद महाजन, विजय पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. वारणा कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक व्ही. एस. कोले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ग्रंथमित्र बाबासाहेब कावळे यांनी आभार मानले.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कायदा साक्षरतेसाठी ‘कायदा वाचनालय’

$
0
0

कायद्याचा वाचनकट्टाही भरणार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

किशोरवयीन मुलांत कायदा साक्षरता रूजण्यासाठी शहरातील पाच शाळांत आणि कळंबा मध्यवर्ती कारागृहात कायदा वाचनालय सुरु झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्याने कायदा वाचनालय स्थापन करण्यात पुढाकार घेतला आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण संचलित विधी सेवा मंडळाकडून उपक्रम सुरु आहे. या शाळांत १० हजार पुस्तके, एक कपाट, एक टेबल या वस्तू दिल्या असून कम्प्युटर, प्रिंटरही प्रदान केला जाणार आहे. येत्या काही दिवसांत 'कायद्याचा वाचनकट्टा' हा उपक्रमही राबविला जाणार आहे.

दुचाकी चालविण्याचे लायसन्स नसल्यास वाहतूक पोलिस काय कारवाई करु शकतात, अल्पवयीन मुलांनी चोरी केल्यास होणारी शिक्षा, आई आणि वडिलांना सांभाळले नसल्यास त्याचा संरक्षण कायदा, अनेक ठिकाणी होणारी ग्राहकांची फसवणूक, व्हॉटस्अप, फेसबुकसह सोशल मीडियावर होणारी फसवणूक, सायबर क्राइमकडून केली जाणारी कार्यवाही, रॅगिंग केल्यास होणारी शिक्षा त्यासह संशयित आरोपी, गुन्हा दाखल, अटक, न्यायालयीन प्रकरणाची प्राथमिक माहिती या वाचनालयात विद्यार्थ्यांना दिली जात आहे. शहरातील दत्ताबाळ हायस्कूल, महानगरपालिकेची महागांवकर शाळा, चेतना अपंग मूकबधीर विद्यालय, संत गाडगेमहाराज विद्यालय आणि कोरगांवकर हायस्कूल या पाच शाळांत कायदा विषयक वाचनालय सुरु झाले आहे. साध्या सोप्या भाषेत या वाचनालयात कायद्याची पुस्तके मराठी भाषेतून उपलब्ध करुन दिली आहेत. ही पुस्तके वाचण्यासाठी विद्यार्थी घरी घेऊन जाऊ शकतात. माता पिता संरक्षण कायदा, ज्येष्ठ नागरिक कायदा, घरगुती हिंसाचार कायदा, मोटार अपघात कायदा, ग्राहक संरक्षण कायदा, सायबर क्राइम कायदा, रॅगिंग विरुद्ध कायदा, निर्भया कायदा, मध्यस्थी कायदा, लोकअदालतीची माहिती दिली जात आहे. या पुस्तक वाचनाची जबाबदारी शाळांतील ग्रंथपाल आणि कायदा साक्षरता मंडळाच्या ५० समन्वयकांवर सोपविली आहे. या शाळांना पंधरा किंवा महिन्यातून एकदा वकिलांचे शिष्टमंडळ भेट देऊन आढावा घेणार आहे. लॉ कॉलेजचे विद्यार्थीही या वाचनालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहे.

.........

'संवाद कायदा ज्ञानयात्रा'

'संवाद कायद्याची ज्ञानयात्रा' ५० शाळांत सुरु होत आहे. कायद्याचे ज्ञान प्रत्येक विद्यार्थ्यांला होण्यासाठी २० कायदातज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. रॅगिंग, महिला सक्षमीकरण, सायबर क्राइम, आई वडिलांचे संरक्षण या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे.

..................

कोट

'वयाच्या १४ आणि १८ व्या वर्षी गंभीर गुन्हे करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. ही निकोप समाजासाठी धोक्याची घंटा आहे. क्रमिक पाठ्यपुस्तकांसोबत शाळांच्या वाचनालयात कायद्याचे (ज्ञान विधी साक्षरता मंडळ) शिक्षण दिले जात आहे.

उमेशचंद्र मोरे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेकेदार तुमचे जावई आहेत काय?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पेयजल योजनांचे काम अपूर्ण ठेवून ठेकेदारांनी बिलांची शंभर टक्के रक्कम घेतलीच कशी? ठेकेदार तुमचे जावई आहेत काय? ठेकेदारांविरोधात फौजदारी दाखल करा, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून बिलाचा बोजा त्यांच्या मालमत्तेवर चढवला जाईल,' असा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला. जिल्हा परिषदेत शुक्रवारी आयोजित केलेल्या पेयजल योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांतील पेयजल योजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्री खोत यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील एकूण पाणीपुरवठा योजनांची मंजुरी, त्यावर झालेला खर्च, प्रगतिपथावरील कामांची स्थिती, रखडलेल्या योजना याची सविस्तर माहिती घेतली. शिरोळ तालुक्यातील शिरदवाड, शिवनाकवाडी, अलाटवाडी येथील रखडलेल्या योजनांबद्दल त्यांनी पाणीपुरवठा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. 'ठेकेदार कृष्णात पोवार यांच्याकडून तीन गावांतील पाणी योजनांचे काम १० ते १२ वर्षांपासून सुरू आहे. काम पूर्ण होण्यापूर्वीच त्यांना बिलाची १०० टक्के रक्कम मिळालीच कशी? असा सवाल मंत्री खोत यांनी उपस्थित केला. याबाबत पूर्वीच्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याचे काय झाले?' अशी विचारणा खोत यांनी अधिकाऱ्यांना केली. यावर ठेकादाराला काळ्या यादीत टाकल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, यावर खोत यांचे समाधान झाले नाही. 'अर्धवट काम सोडून गेलेले ठेकेदार तुमचे जावई आहेत काय? त्या ठेकेदारांवर फौजदारी दाखल करा. त्यांच्याकडील रक्कम वसूल करण्यासाठी त्यांच्यासह नातेवाइकांच्या मालमत्तेवर बोजा चढवा, अन्यथा बिलांना मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या मालमत्तांवर बोजा चढवला जाईल.'

पेयजल योजनांची रखडलेली कामे प्राधान्याने मार्गी लावण्याच्या सूचना मंत्री खोत यांनी बैठकीत दिल्या. '५० लाखांची कामे तातडीने पूर्ण करा. यानंतर एक कोटी आणि दीड कोटींच्या खर्चाची कामे पूर्ण करा. निर्धारित वेळेत आणि दर्जेदार कामांसाठी एका ठेकेदाराला दोनच कामांचे ठेके दिले जातील. टेंडर नोटीस प्रसिद्ध करतानाच याचा उल्लेख केला जावा. एखाद्या ठेकेदारास अधिक ठेके मिळाल्यास त्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याची असेल,' असेही मंत्री खोत यांनी स्पष्ट केले. यावेळी ग्रामीण पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता यांना मंत्र्यांनी धारेवर धरले. पाणीपुरवठा योजनांसाठी पश्चिम महाराष्ट्राला ७०० कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अंबरिश घाटगे यांनी मंत्री खोत यांना पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.

बैठकीसाठी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार प्रकाश आबिटकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी शिवदास, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ, बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर, महिला बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम यांच्यासह अरुण इंगवले, विजय भोजे, राहुल आवाडे, आदी उपस्थित होते. जि.प. अध्यक्षा आणि उपाध्यक्ष मात्र या बैठकीला उपस्थित नव्हते.

०००

उदगावच्या नळ योजनेचे रिटेंडर

उदगाव येथील नळपाणी पुरवठा योजनेचे टेंडर वाढीव रकमेने काढले आहे. ठरलेल्या रकमेपेक्षा जादा रकमेचे टेंडर मंजूर केले जाणार नाही, त्यामुळे उदगावच्या नळपाणी पुरवठा योजनेचे टेंडर नव्याने काढले जाईल. ६ कोटी ७३ लाख रुपये या योजनेसाठी मंजूर आहेत. यातील किमान एक कोटी शिल्लक राहतील, असे मंत्री खोत म्हणाले.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांचा आंदोलनात फुटीचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मराठा आरक्षणासाठी समाजातील १४ जणांनी आत्महत्या केली. ठोस कार्यवाहीऐवजी मराठा समाजातील काही व्यक्तींसोबत बैठक घेऊन मुख्यमंत्री असंवेदनशीलपणे आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्र्यांकडून फसवणूक सुरू आहे,' असा आरोप इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला.

सावंत म्हणाले, 'मुख्यमंत्री विचारवंतांना बैठकीला बोलावून गोड बोलून परत पाठवत आहेत. ते बैठकीला जाणाऱ्या व्यक्तींची विश्वासार्हता धोक्यात आणत आहेत. त्यामुळे या व्यक्तींनी बैठकीला जायचे की नाही, हे ठरवावे. सरकार प्रत्येकवेळी वेगवेगळे बोलत असल्याने त्यांच्यावर अजिबात विश्वास नाही. कागदोपत्री जोपर्यंत अहवाल येत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. अहवाल देण्यासाठी सरकार आयोगाकडे विनंती करत आहे. पण आयोग चालढकल करत आहे. राज्यातील परिस्थिती व आत्महत्या पाहता आयोगाने संवेदनशीलता दाखवत तातडीने अहवाल द्यावा.

ते पुढे म्हणाले, 'सरकार आरक्षणासाठी अध्यादेश काढू शकते. मराठ्यांना ओबीसीमध्ये समावेश करण्याची शिफारस आयोगाने केली नाही तर सरकार काय निर्णय घेणार, हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे. नऊ ऑगस्टचे आंदोलन एकदा घोषित झाले असल्याने आता मागे फिरण्याचा अधिकार कोणत्याही संयोजकांनी घेऊ नये. आता नाही तर कधीच नाही, अशा भावनेने आर पारची लढाई करण्यासाठी समाजाने सज्ज राहावे.' दिलीप देसाई म्हणाले, 'वसतिगृहाचे पुन्हा उद्घाटन करण्याचे नाटक आहे. मंत्री असले म्हणजे कायदा डावलून चालत नाही.' यावेळी वसंतराव मुळीक, हर्षल सुर्वे, स्वप्निल पार्टे, सचिन तोडकर यांनीही भावना व्यक्त केल्या.

०००

पालकमंत्र्यांचा ठिय्या

आंदोलनाला पाठिंबा

जिल्ह्यातील एक नागरिक आणि मराठा समाजातील एक सामान्य कार्यकर्ता म्हणून दसरा चौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही माझी जाहीर भूमिका असून ते कायद्याच्या कसोटीवर टिकणारे असावे असाही प्रयत्न आहे, अशी भूमिका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे जे प्रयत्न सुरू आहेत, त्याचा एक साक्षीदार आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून आरक्षण देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाचे सध्या सुरू असणारे आंदोलन सनदशीर मार्गाने आणि शांततेने व्हावे. हिंसक किंवा आत्मघातकी कृत्य करू नये, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी पत्रकात केले आहे. मंत्र्यांच्या दौऱ्यात सहभागी होणाऱ्यांना बहिष्कृत केले जाईल, अशा आशयाचा मजकूर सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. मंत्री हे लोकप्रतिनिधी असल्याने मंत्र्यांनी जनतेशी आणि जनतेने मंत्र्यांशी संपर्क ठेवण्यात गैर काय? आंदोलक आणि सरकार परस्परविरोधी घटक नसून संवादातून आरक्षणाची लढाई जिंकू शकू, अशी माझी ठाम धारणा आहे. राजीनामे, निदर्शने ही लोकशाहीतील प्रभावी अस्त्रे आहेत. पण संवाद, चर्चा आणि सामूहिक प्रयत्न यातूनही तोडगा निघू शकतो यावर विश्वास ठेवावा. कोल्हापूरने आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी पुढाकार घ्यावा. संवाद साधत आरक्षणाचा लढा जिंकावा आणि राज्यात एक आदर्श घालून द्यावा. आरक्षणाबाबत कुठेही वेळकाढूपणा होत नाही, अशी विनंती त्यांनी केली आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झिरो पेंडन्सीत कोल्हापूरचेकाम राज्यात उत्कृष्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'झिरो पेंडन्सीत कोल्हापूर जिल्ह्यातील महसूल प्रशासनाचे काम राज्यात उत्कृष्ट आहे. प्रभावशाली, गतिमान प्रशासनासाठी कर्मचाऱ्यांनी तणावविरहीत काम करावे', असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले.

महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, ' येत्या काळात अधिकारी कर्मचाऱ्यांच्या तणावमुक्तीसाठी विशेष मोहिम राबवली जाईल. अधिकारी, कर्मचारी सांघिक भावनेने काम केल्यास चांगली कामगिरी करता येते. व्यवस्थेला सुधारण्याची संधी प्रशासनातील सेवेमुळे उपलब्ध झाली आहे. त्याची जाणीव ठेवून काम केल्यास काम म्हणजे ओझे वाटणार नाही.'

निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी महसूल दिनाचे महत्व सांगितले. उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, डी. के. शिंदे, विनायक लुगडे, प्रवीण माने, अनंत दांडेकर यांची भाषणे झाली. महसूल विभागात उल्लेखनीय काम केल्याबद्दल ४० आदर्श महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. प्रकाश दगडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी अविनाश हदगल, शंकरराव भोसले, तहसीलदार गणेश शिंदे, बी. जे. गोरे, अजित कराडे- पाटील आदी उपस्थित होते.

------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्र्यांना कडेकोट पोलिस बंदोबस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे कोल्हापुरातील दसरा चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे. सरकार, मंत्र्यांविरोधात समाजात मोठा असंतोष आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावरील पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना दिवसभर प्रचंड पोलिस बंदोबस्त देण्यात आला. कार्यक्रम स्थळापर्यंत जाईपर्यंत आणि संपल्यानंतर वाहनात बसेपर्यंत त्यांच्याभोवती पोलिसांचे कडे राहिले. त्यांना भेटण्यासाठी जाणाऱ्या प्रत्येकावर पोलिसांची बारीक नजर राहिली.

मुंबईहून पालकमंत्री पाटील यांचे सकाळी रेल्वे स्टेशनवर आगमन झाले. ते येण्यापूर्वीच रेल्वेस्टेशन परिसरला पोलिस छावणीचे स्वरूप होते. दुपारी साडेतीन वाजता सदर बाजार परिसरातील डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या उदघाटनासाठी पालकमंत्री पाटील यांचे आगमन झाले. तेथे देखील पोलिसांचा मोठा ताफा होता. कार्यक्रम संपून ते वाहनात बसेपर्यंत जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते उपस्थित होते. पोलिस बंदोबस्त कडक राहील, यावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले. जिल्हा परिषदेत विविध कामांचा आढावा घेण्यासाठी आलेल्या कृषी राज्यमंत्री खोत यांनाही असाच पोलिस बंदोबस्त होता. सहकारमंत्री देशमुख देखील शुक्रवारी कोल्हापुरात होते. त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रम झाला. त्यावेळी देखील पोलिसांचा गराडा होता.

------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस डायरी

$
0
0

अपघातात दुचाकीस्वार ठार

कोल्हापूर

पुणे बेंगळुरू महामार्गावरील लक्ष्मी टेकडी परिसरात गुरुवारी रात्री झालेल्या अपघातातील जखमी नारायण बंडू कांडणे (वय ५० रा. कागल) यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरु होते. त्यांना लक्ष्मी टेकडी येथे अज्ञात वाहनाने धडक दिली होती. या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरु असतानाच शुक्रवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.

............

अपघातात डॉक्टर जखमी

कोल्हापूर

दसरा चौकात शुक्रवारी सकाळी अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत डॉ. सुचित्रा सुरेश मोरे (वय २८, रा. मंगळवार पेठ) जखमी झाल्या. त्या दसरा चौकातून घरी परतत होत्या. अपघातात त्यांच्या पायाला जखम झाली असून त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.

..............

अपघातात महिला जखमी

कोल्हापूर

रस्त्यात कुत्रे आडवे आल्याने दुचाकीवरून अचानक उडी मारल्याने साक्षी संदेश चरणकर (वय २४ रा. राजापूर, जि. रत्नागिरी) या जखमी झाल्या. गुरुवारी सायंकाळी पती संदेश राजापूर मार्गावर दुचाकी चालवित होते. या रोडवर कुत्रे आडवे आल्याने भीतीने साक्षी यांनी उडी मारली. त्यांच्यावर रत्नागिरी येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र त्या उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईत क्रांतिदिनी शेतकरी परिषद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्येचा कलंक लागला आहे. तो पुसण्यासाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या वतीने क्रांतिदिनी (ता. ९) शेतकरी परिषद होणार आहे. शिवाजी मंदिर दादर, मुंबई येथे सकाळी दहा वाजता परिषद होणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिली.

पाटील म्हणाले, 'शेतकऱ्यांना आश्वासने देत सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. शेतीमालावरील निर्यातबंदी आणि सुधारित बियाणे, तंत्रज्ञानाला अटकाव केला आहे. उसाचा उतारा ९.५ टक्क्यांवरून दहा टक्के केला. गुजरातमध्ये उसाला प्रतिटन ४,४०० रुपये दर मिळत असताना महाराष्टातील शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाने बिले मिळत आहेत. जून २०१७ मध्ये गायीच्या दुधाला प्रतिलिटर २७ रुपये दराची सरकारने घोषणा केली. दूध उत्पादकांना जाहीर केलेला दर मिळत नसताना, कोणत्याही दूध संघावर कायदेशीर कारवाई केलेली नाही.'

'ऊस, तूर, सोयाबिन, हरभरा खरेदीचे हजारो कोटी रुपये थकीत आहेत. कर्जमाफीची घोषणा केली असली, तरी अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखण्यासाठी परिषदेत चर्चा होणार आहे. परिषदेत शेतकरी प्रश्नाबाबत आंदोलनाचा निर्णय घेणार आहे.' पत्रकार बैठकीस जिल्हाध्यक्ष अॅड. माणिक शिंदे, मुन्ना सय्यद, वैशाली जाधव, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज दरवाढीविरोधात मंगळवारी मोर्चा

$
0
0

वीज दरवाढीविरोधात मंगळवारी मोर्चा

व्यापारी, उद्योजक जिल्हाधिकाऱ्यांसह महावितरणला देणार निवेदन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यातील अडीच कोटी वीज ग्राहकांवर सरासरी २२ टक्के वीजदरवाढ लादणाऱ्या प्रस्तावाला व्यापारी आणि उद्योजकांनी विरोध दर्शवला आहे. या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी मंगळवारी (ता. ७) जिल्हाधिकारी कार्यालय आणि महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय व्यापारी व उद्योजकांच्या बैठकीत घेण्यात आला.

प्रस्तावित वीज दरवाढीविरोधात चर्चा करण्यासाठी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री, कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फौंड्रीमेन, कोल्हापूर उद्यम को-ऑपरेटिव्ह सोसायटी आदी औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत प्रस्तावित वीज दरवाढीला सर्वानुमते विरोध करण्यात आला. मुंबई येथील राज्यस्तरीय वीज परिषदेत ठरल्याप्रमाणे महावितरणची कार्यालये, सरकारी कार्यालयांवर मोर्चे काढले जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व व्यापारी आणि उद्योजक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासह महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देणार आहेत. जिल्ह्यातील सर्व उद्योजक, कारखानदार, व्यापारी यांनी मोर्चासाठी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन औद्योगिक व व्यापारी संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.

बैठकीस नितीन वाडीकर, राजू पाटील, सुरजीतसिंग पवार, गोरख माळी, संजय शेटे, सुरेश चैगुले, चंद्रकांत जाधव, अतुल आरवाडे, कमलाकांत कुलकर्णी, दीपक परांडेकर, हर्षद दलाल, एस. एस. पाटील, अशोक जाधव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडपीठाच्या जागेसाठी हालचाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खंडपीठासाठी शेंडा पार्क (ता. करवीर) येथील ७५ एकर जागेसाठी १३ विविध सरकारी कार्यालयांचा अभिप्राय मागविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्याचा अहवाल पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना दिला आहे. जिल्हा प्रशासनाने शेंडा पार्कातील जागेची पाहणी पूर्ण केली असून काही विभागांकडून 'एनओसी' मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. खंडपीठ कृती समितीसोबत विभागीय आयुक्तांची चर्चाही पूर्ण झाल्याने खंडपीठाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

खंडपीठाासाठी दिलेल्या जागेची वस्तुस्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. विवेक शुक्ल यांनी जिल्हा प्रशासनासोबत चर्चा केली. मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सहा जिल्ह्यांसाठी खंडपीठ होण्यासाठी सरकारकडे शेंडा पार्कातील ७५ एकर जागेची मागणी केली आहे. ही जागा देण्यासाठी महापालिकेने दोन वर्षापूर्वी ठरावही केला आहे. शेंडा पार्क येथील (रि. स. नं. ५८९ ते ७०९) येथील जागेच्या प्रस्तावात त्रुटींची पूर्तता जिल्हा प्रशासनाकडून सुरु आहे. खंडपीठासाठी सहा जिल्ह्यातील वकिलांच्या भेटीगाठी सुरु झाल्या आहेत.

.................

कोट

' ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठासाठी शेंडा पार्कातील ७५ एकर जागा निश्‍चित व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्या वेळी त्यांनी ती जागा देण्याचे जाहीर करून त्या जागेवर आरक्षण टाकण्याचे आणि १०० कोटींची तरतूद करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे ती जागा खंडपीठासाठी आरक्षित करण्याची मागणी आहे.

..

अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समादेशक सपकाळ याची बदली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जवानांकडून ४० हजारांची लाच स्विकारण्याच्या प्रकरणात चर्चेत असलेल्या भारत राखीव बटालियन क्रमांक तीनचे समादेशक खुशाल विठ्ठल सपकाळ यांची अखेर बदली झाली . गृह विभागाने त्यांची नांदेडच्या नागरी हक्क संरक्षणच्या पोलिस अधीक्षकपदी बदली केल्याने बटालियनमध्ये तो चर्चेचा विषय ठरला आहे.

आहार भत्ता, हजेरीत सूट, निलंबन टाळण्यासाठी आणि पतंसस्थेतून कर्ज मंजुरीसाठी काही उमेदवारांकडून पाच हजार रूपयांची मागणी केली होती. कसबा बावडा येथील बटालियनच्या कार्यालयातच एका जवानांकडून चाळीस हजार रुपयांची लाच घेताना बटालियनच्या उपअधिक्षकासह निरीक्षक, दोन उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल व लिपिक असे सहा अधिकारी, कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला रंगेहात सापडले होते. या प्रकरणात सपकाळ यांच्यावरही संशय व्यक्त केला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीसाठी दोन वेळा नोटीसही बजाविली होती. मात्र सपकाळ गैरहजर राहिले होते. या प्रकरणी सहा संशयित सध्या जामिनावर मुक्त आहेत. भारत राखीव बटालियन नंबर तीन, कसबा बावडा येथील खेळाडू सहायक फौजदाराने लाचप्रकरणी फिर्याद दाखल केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बदलीची बनावटगिरी महागात पडणार

$
0
0

बनावटगिरी पडणार महागात

बदलीप्रकरणी १५० शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार, सुनावणी अंतिम टप्प्यात

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet@Appasaheb_MT

शिक्षक बदलीत पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाइन पध्दतीचा अवलंब झाला. सोयीच्या ठिकाणच्या बदलीतील राजकीय हस्तक्षेप आणि वशिलेबाजीला चाप बसला. पण जिल्ह्यातील १५० हून अधिक शिक्षकांनी चुकीची माहिती आणि खोटी कागदपत्रे सादर करत बदलीसाठी बनावटगिरी केली आहे. जिल्हा परिषदेने या साऱ्या प्रकरणाची पडताळणी करुन संबंधित शिक्षकांना नोटीसा काढल्या. तालुकानिहाय संबंधित शिक्षकांच्या सुनावण्या आता अंतिम टप्प्यात आहेत. आठवड्यात प्रशासनाचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे. कारवाईची टांगती तलवार निर्माण झाल्यामुळे संबंधित शिक्षक धास्तावले आहेत.

प्रशासनाची दिशाभूल करुन मोक्याच्या जागा वर्णी लागलेल्या शिक्षकांची वेतनवाढ रोखण्यासह मूळ ठिकाणी बदली होण्याचा संभव आहे. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या आणि घोळ असे जणू समीकरण बनले होते. सोयीच्या ठिकाणी बदलीसाठी वशिलेबाजी, पदाधिकारी अधिकाऱ्यांशी लागेबंधे असा सर्रास प्रकार पाहावयास मिळत होता. बदलीतील हा घोळ संपविण्यासाठी ऑनलाइन बदली प्रक्रियेचा अवलंब केला. यंदाच्या शैक्षणिक वर्षारंभी शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या झाल्या. सवलतीच्या बदली योजनेत काहींनी गडबड केल्याच्या तक्रारी झाल्या.

बदली प्रक्रियेत कुणावर अन्याय होऊ नको म्हणून ऑनलाइनचा अवलंब झाला, पण त्यामध्येही अनेक शिक्षकांनी वेगळी शक्कल लढविताना बनावटगिरीचे धडे गिरवले. नेमणुकीची तारीख, पती,पत्नी एकत्रीकरण, अपंगत्वाचे दाखलेही दिले. आंतरजिल्हा बदली प्रकरणी नियुक्तीच्या मूळ तारखेचा उल्लेख केल्यामुळे सेवाज्येष्ठता वाढली आहे. सोयीच्या ठिकाणी वर्णी लागावी म्हणून काहीजणांनी बिनदिक्कतपणे खोटी कागदपत्रे सादर केली आहेत. पहिल्या टप्प्यात ४० शिक्षकांनी बदलीसाठी खोटी कागदपत्रे पुरविणे, प्रशासनाची दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले. प्रशासनाने संबंधितांना कारणे दाखवा नोटीसा काढल्या. प्रशासनांनी नोटीसा काढल्यानंतर संबंधित शिक्षकांकडून खुलासा सादर केला आहे. मात्र बदली प्रक्रियेतील त्यांची बनावटगिरी सिध्द झाल्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित आहे.

अन्यायग्रस्त शिक्षकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने सवलत योजनेतील बदलीच्या सर्वच प्रकरणांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या प्रकरणाची तालुकानिहाय चौकशीचे आदेश दिले. गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला. १०० हून अधिक शिक्षकांच्या माहितीमध्ये तफावत आढळली आहे. शिरोळ तालुका वगळता अन्य ठिकाणची सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शिरोळमधील सुनावणी पूर्ण झाली की एकत्रित अहवाल तयार करुन कारवाईचा निर्णय होणार आहे.

..................

कोट

'सोयीच्या ठिकाणी बदलीसाठी सादर केलेल्या माहितीमध्ये तफावती आढळल्याची उदाहरणे आहेत. तालुकानिहाय संबंधित शिक्षकांनी सादर केलेली माहितींची खातरजमा, कागदपत्रांची पडताळणी केली आहे. काही प्रकरणात खोटी माहिती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या काही दिवसात एकत्रित अहवाल करुन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केला जाईल. त्यानंतर कारवाईचा निर्णय होणार आहे.

- रविकांत आडसूळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

...............

कारभाऱ्यांची लुडबूड

प्रशासनाकडून नोटीसा, सुनावणीची प्रक्रिया सुरू झाल्याने कारवाईच्या भितीने संबंधित शिक्षक धास्तावले आहेत. अहवाल तयार होण्याअगोदरच सौम्य प्रकारची कारवाई व्हावी, त्यामधून पळवाट शोधण्यासाठी शिक्षक संघटना आणि जिल्हा परिषदेतील यंत्रणा सक्रिय झाली आहे. दोन्ही घटकांतील काही कारभारी प्रकरण मिटवण्याच्या प्रयत्नात आहेत. शिक्षक संघटनेतील काही कारभाऱ्यांच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या दालनात फेऱ्या वाढल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समितीमध्ये फेरीवाल्यांचा समावेश करा

$
0
0

नवीन सर्वेमध्ये फेरीवाल्यांवर अन्याय नको,आज आयुक्तांसोबत बैठक

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्यावतीने स्थापन केलेल्या शहर फेरीवाला समितीमध्ये मूळ फेरीवाला व्यवसायिकांचा समावेश करावा. तसेच नवीन सर्वेमध्ये फेरीवाल्यांवर अन्याय न करता त्यांना सर्व सुविधा द्याव्यात, अशी मागणी करण्याचा ठराव कोल्हापूर शहर फेरीवाला संघटनेच्या बैठकीत करण्यात आला. शनिवारी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत ठराव सादर करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय फेरीवाला धोरण २००९ नुसार शहर फेरीवाला समिती स्थापन केली आहे. तसेच पथविक्रेता अधिनियम २०१४ व महाराष्ट्र पथविक्रेता अधिनय २०१६ शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मात्र महापालिकेने स्थापन केलेल्या समितीमध्ये प्रत्यक्ष व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचा समावेश केलेला नाही. बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी, एसटी स्टँड, शाहूपुरी, शिवाजी मार्केट, बिंदू चौक, मटण मार्केट आदी ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना प्रतिनिधीत्व देण्यात आलेले नाही. समितीमध्ये केवळ नऊ लोकांचा समावेश असल्याने अनेकजणांना प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. त्यामुळेच सदस्य संख्या १६ करुन प्रत्यक्ष फेरीवाला व्यवसायिकांना समितीमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी शनिवारी होणाऱ्या बैठकीत करण्यात येणार आहे.

शहरातील फेरीवाल्यांचे २०१४ मध्ये सर्वेक्षण केले होते. यासाठी एका खासगी कंपनीला सर्वेचे काम देण्यात येवून लाखो रुपये देण्यात आले. त्यानंतर फेरीवाल्यांना बायोमेट्रिक कार्ड दिले, त्या कार्डचे काय करणार, असा प्रश्न बैठकीत उपस्थित केला. २०१४ च्या सर्वेक्षणानुसार फेरीवाल्यांना जागा देवून तेथे पायाभूत सुविधा देण्याची मागणी केली जात आहे. मात्र याबाबत ठोस निर्णय होत नाही. गेल्या दोन वर्षापासून मोर्चे, आंदोलनाच्या माध्यमातून मागण्याचा पाठपुरावा सुरू आहे. आयुक्त याबाबत निर्णय घेण्याचा प्रयत्न करत असले, तरी त्यामध्ये यश येत नाही. शहरातील फेरीवाल्यांची अशी वस्तुस्थिती असताना पुन्हा नव्याने सर्वेक्षण होणार असले, तर जुन्या सर्वेक्षणाचे काय झाले असा प्रश्न उपस्थित केला.

शनिवारच्या बैठकीत समाधान न झाल्यास जनआंदोलन उभारण्यात येणार आहे. जनआंदोलनामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी महापालिका जबाबदार राहील, असा इशाराही फेरीवाला संघटनेच्या बैठकीत देण्यात आला.

बैठकीत माजी महापौर आर. के. पोवार, नंदकुमार वळंजू, दिलीप पवार, प्र. द. गणफुले, समीर नदाफ, आशोक भंडारे, महमद शरीफ शेख, सतिशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे, किरण गवळी, किशोर घाडगे, सुरेश जरग, राजू जाधव, मारुती भागोजी यांनी मनोगत व्यक्त केले. नितीन पाटील यांनी आभार मानले.

चौकट

मराठा आंदोलनाला पाठिंबा

शुक्रवारी झालेल्या फेरीवाला संघटनेच्या बैठकीत दसरा चौक येथे सुरू असलेल्या मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. पाठिंबा देण्यासाठी सर्व फेरीवाला संघटनेचे नेते रविवारी दोन तास ठिय्या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

चौकट

फेरीवाला समितीतील सदस्य

आर. के. पोवार, अशोक भांडारे, नंदकुमार वळंजू, पद्मा तिवले, किशोर घाडगे, दिलीप पोवार, प्रा. रुपा शहा, आशा कुकडे, सुमन घोसे यांचा शहर समितीमध्ये समावेश आहे. समितीमध्ये शहरात अनेक ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना प्रतिनिधीत्वच मिळालेले नाही. त्यामुळेच संघटनेने समितीमध्ये प्रत्यक्ष फेरीवाला व्यवसाय करणाऱ्या सदस्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा समाजाच्या १० लाख कर्जास सरकारची हमी

$
0
0

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरूणांना विविध व्यवसाय उद्योगासाठी देण्यात येणाऱ्या १० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जास सरकारची हमी राहणार असून कर्जाचे व्याज सरकार भरणार आहे', असे प्रतिपादन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पतसंस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सहकारमंत्री देशमुख म्हणाले, 'आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरूणांना विविध व्यवसाय उद्योगासाठी देण्यात येणाऱ्या कर्जाचे व्याज सरकार भरणार आहे. राष्ट्रीयकृत तसेच सहकारी बँकांनी या कर्जयोजनांमध्ये सक्रीय होवून अधिकाधिक तरूणांना कर्ज उपलब्ध करून देण्याची भूमिका घ्यावी. कर्ज वितरणासाठी जिल्हास्तरावर जिल्हा उपनिबंधकांसह तीन सदस्यांची समिती स्थापन करून ही कर्ज प्रकरणे मंजूर करण्याबाबत प्रयत्न केले जातील. पतसंस्थांनी बँकींग क्षेत्राबरोबरच सहकारी रूग्णालयासारखे अन्य व्यवसाय-उद्योग विकसित करून उत्पन्नाची विविधांगी साधने निर्माण करणे आवश्यक आहे.'

याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन शंकर पाटील यांनी जिल्ह्यातील पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून एमसीडीसीला भाग भांडवलाप्रती एक कोटीचे भागभांडवल उपलब्ध करून दिले जाईल, अशी घोषणा केली. पतसंस्था सक्षम करण्यासाठी बँकेसारखे व्यवहार करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक अनिल पाटील यांनी केले. बालाजी पतसंस्थेचे अध्यक्ष मदन कारंडे यांनी कृषी पूरक व्यवसायासाठी सरकारने मदत करावी, अशी मागणी केली.

व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे यांनी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाची माहिती दिली. सहकार विभागाचे विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील यांनी महामंडळाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती दिली. जिल्हा निबंधक अरुण काकडे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागलमध्ये २१ तरुणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

मुलींची छेडछाड काढणे, विनापरवाना व ट्रिपल शीट मोटारसायकल चालवणे, सार्वजनिक ठिकाणी दंगामस्ती करणे, आदी कारणांवरून कागल पोलिसांनी धडक मोहीम राबविली. यामध्ये सुमारे २१ तरुणांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. चार दिवसांपूर्वी महाविद्यालयीन तरुणीची छेडछाड करण्याचा प्रकार व त्यातून घडलेला मारहाणीचा बसस्थानकावरील प्रकार यामुळे कागल पोलिसांना चांगलीच जाग आली आहे.

स्वप्निल सांळुखे, राहुल पाटील, आकाश चव्हाण, सुशांत खोत, शुभम कांबळे, अमृत वास्कर, रोहन तेली, रविकिरण काटकर, आरबाज मुल्ला, तुषार वाघरा, महादेव जाधव, राहुल पाटील, मलगोंडा पाटील, नितीन पाटील, राहुल वाघमारे, सुनील तांबेकर, उदय मगदूम, शहाजी नागारजी, स्वप्निल आगळे, विशाल पाटील या २१ तरुणांवर सकाळी कायदेशीर कारवाई करण्यात आली. करवीर उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज गुरव यांच्यासमोर त्यांना हजर केले असता त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून समज देऊन सोडून दिले. शहरातील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थीनींची छेडछाड काढण्याचे प्रकार वारवांर घडत असल्याने कागल पोलिसांनी गांभीर्याने घेत कारवाईचा बडगा उगारला आहे. कारवाईमुळे रोडरोमीओंना चांगलाच दणका बसत आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तावेड हॉटेल जागेप्रश्नी सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तावडे हॉटेल ते निगडेवाडी परिसरातील अवैध बांधकामप्रश्नी शुक्रवारी सुप्रीम कोर्टात महापालिकेने प्रतिज्ञापत्र सादर केले. प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर मिळकतधारक व उचगाव ग्रामपंचायतीच्या वकिलांनी अभ्यास करण्यासाठी वेळ मागितल्यानंतर त्यांनाही प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले. तावडे हॉटेल परिसरातील या जागेप्रश्नी पुढील सुनावणी चार सप्टेंबर रोजी होणार आहे.

तावडे हॉटेल ते निगडेपर्यंतच्या जागेवरुन महापालिका व उचगाव ग्रामपंचायतीमध्ये वाद सुरू आहे. हायकोर्टाने महापालिकेची हद्द असल्याचा निर्णयविरोधात तावडे हॉटेल परिसरातील मिळकतधारक व उचगाव ग्रामपंचायतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. दोन जुलै रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश महापालिकेला देत येथील बांधकामाबाबत जैसे थे आदेश दिले होते. तावडे हॉटेल परिसरातील जागेबाबत महापालिकेची भक्कम बाजू असताना म्हणणे मांडण्यास महापालिकेच्या वकिलांनी वेळ मागून होती. वकिलांना आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी योग्य कागदपत्रे पुरवली नसल्याने सर्वसाधारण सभेत पडसाद उमटले होते. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

'कोर्टाच्या आदेशानुसार येथील बांधकामाची वस्तुस्थिती, पंचनामे आणि छायाचित्रांसह प्रतित्रापत्र सादर केले. महापालिकेने प्रतित्रापत्र सादर केल्यानंतर उचगाव ग्रामपंचायत व मिळकतधारकांच्या वकिलांनी प्रतिज्ञापत्राचा अभ्यास करण्यासाठी वेळ मागितली. त्यानंतर कोर्टाने चार सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी घेण्याचे आदेश दिले', अशी माहिती विधी अधिकारी अॅड. संदीप तायडे यांनी दिली. महापालिकेच्यावतीने अॅड. मारला पल्ले व अॅड. विनय नवरे यांनी बाजू मांडली. 'तावडे हॉटेल ते निगडेवाडी पर्यंतची जागा प्रादेशिक विकास आराखड्यात दाखवली आहे. विकास आराखड्यामध्ये या जागेचा समावेश असल्याने महापालिकेचा हा भक्कम पुरावा होणार असल्याचे नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images