Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

क्राइम डायरी३ ऑगस्टसाठी

$
0
0

विहिरीत बुडून

विवाहितेचा मृत्यू

कोल्हापूर

महे (ता. करवीर) येथील विद्या एकनाथ इंगवले (वय ४०) यांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. १ ऑगस्टपासून त्या बेपत्ता होत्या. नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला, मात्र त्या सापडल्या नाहीत. गुरुवारी सकाळी शिंदे मळा नावाच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह सापडला. या घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे.

................

.

बाथरूमध्ये पडून जखमी

कोल्हापूर

बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने पद्माकर पुंडलिक मोरे (वय ४५, रा. कोळंबे, ता. रत्नागिरी) हे जखमी झाले. १ जुलै रोजी सकाळी आठ वाजता हा प्रकार घडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर रत्नागिरी येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.

...................

अपघातात

महिला जखमी

कोल्हापूर

घरी जात असताना दुचाकीने दिलेल्या धडकेत गीता अशोक सावंत (वय ४८, रा. ताराबाई पार्क) या जखमी झाल्या. बुधवारी रात्री साडेअकरा वाजता हा अपघात झाला. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत.

...............

दुचाकी घसरून

तरुण जखमी

कोल्हापूर

दाभोळकर कॉर्नर येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात गणेश दत्तात्रय खाडे (वय ३९, रा. शिवाजी पेठ) हा तरुण जखमी झाला. गुरुवारी सकाळी हा अपघात झाला. तो किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत.

..................

शाळकरी मुलाचा

सर्पदंशाने मृत्यू

कोल्हापूर

सर्पदंश झालेल्या सुमित पांडुरंग जाधव (वय १५, रा. जोंधळेवाडी ता. शाहूवाडी) या शाळकरी मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेले काही दिवस त्याच्यावर उपचार सुरु होते. जोंधळेवाडी परिसरात २९ जुलै रोजी तो म्हशी चरण्यासाठी घेऊन गेला असता त्याला सर्पदंश झाला होता. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. गुरुवारी सकाळी त्याची प्रकृती अधिकच खालावली. तो दत्त सेवा माध्यमिक विद्यालय तुरुकवाडी (ता. शाहूवाडी) शाळेचा दहावीचा विद्यार्थी होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विहिरीत बुडून महिलेचा मृत्यू

$
0
0

महे येथे महिलेचा

विहिरीत बुडून मृत्यू

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

करवीर तालुक्यातील महे येथे शेतात गेलेल्या महिलेचा विहिरीत पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. विद्या एकनाथ इंगवले (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद पोलिसात आहे. विद्या या बुधवारी सकाळी आपल्या शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. शेजारील शिंदे मळा नावाच्या विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेल्या असताना पाय घसरून पाण्यात पडल्यामुळे बुडून त्यांचा मृत्यू झाला. बराच वेळ त्या घराकडे न आल्याने घरच्यांनी शोधाशोध केली. गुरुवारी दुपारी त्यांचा मृतदेह सापडला. मृतदेह उत्तरीय तपासासाठी सीपीआरकडे पाठवण्यात आला. त्यांच्या पश्चात पती, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार गटविकास अधिकारी रुजू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील चार पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकारीपदाचा कार्यभार गुरुवारी अधिकाऱ्यांनी स्वीकारला. तर कागल, पन्हाळा, शाहूवाडी पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकारीपदी नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत.

सांगली जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.बी.जोशी यांची चंदगड पंचायत समिती गटविकास अधिकारीपदी नियुक्ती झाली. फलटण पंचायत समितीमधील गटविकास अधिकारी व्ही. एल. जाधव हे शिरोळ येथे गटविकास अधिकारी म्हणून रुजू झाले. बुलढाणा पंचायत समिती गटविकास अधिकारी बी. डी. वाघ यांची आजरा येथे नियुक्ती झाली. शाहूवाडी येथील गट विकास अधिकारी उदय पाटील यांची राधानगरी पंचायत समितीत गट विकास अधिकारी येथे रुजू झाले. दरम्यान कागल गटविकास अधिकारी म्हणून श्रीमती एस. ए. मोकाशी, पन्हाळा गटविकास अधिकारीपदी टी. बी. शिंदे, आणि शाहूवाडी गटविकास अधिकारीपदी ए. आर. वाघमारे यांच्या बदलीचे आदेश आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हद्दपार केलेल्या दोघांना अटक

$
0
0

दोन सिंगल कॉलम फोटो

कोल्हापूर

जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. आसु बादशहा शेख (रा. गोखले विद्यालयासमोर, राजारामपुरी १४ वी गल्ली), रोहित उर्फ सोन्या परशराम कुऱ्हाडे (रा. बाळकुंद्री महाराज पंत मंदिराजवळ, राजारामपुरी १४ वी गल्ली) यांना अटक करण्यात आली. या दोघांना एक वर्षासाठी हद्दपार केले असतानाही कोल्हापूर शहरात फिरत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदलीची बनावटगिरी महागात पडणार

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet@Appasaheb_MT

शिक्षक बदलीत पारदर्शकता आणण्यसाठी ऑनलाइन पध्दतीचा अवलंब झाला. सोयीच्या ठिकाणच्या बदलीतील राजकीय हस्तक्षेप आणि वशिलेबाजीला चाप बसला. पण जिल्ह्यातील १५० हून अधिक शिक्षकांनी चुकीची माहिती आणि खोटी कागदपत्रे सादर करत बदलीसाठी बनावटगिरी केली आहे. जिल्हा परिषदेने या साऱ्या प्रकरणाची पडताळणी करुन संबंधित शिक्षकांना नोटीसा काढल्या. तालुकानिहाय संबंधित शिक्षकांच्या सुनावण्या आता अंतिम टप्प्यात आहेत. आठवड्यात प्रशासनाचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे. कारवाईची टांगती तलवार निर्माण झाल्यामुळे संबंधित शिक्षक धास्तावले आहेत.

प्रशासनाची दिशाभूल करुन मोक्याच्या जागा वर्णी लागलेल्या शिक्षकांची वेतनवाढ रोखण्यासह मूळ ठिकाणी बदली होण्याचा संभव आहे. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या आणि घोळ असे जणू समीकरण बनले होते. सोयीच्या ठिकाणी बदलीसाठी वशिलेबाजी, पदाधिकारी अधिकाऱ्यांशी लागेबंधे असा सर्रास प्रकार पाहावयास मिळत होता. बदलीतील हा घोळ संपविण्यासाठी ऑनलाइन बदली प्रक्रियेचा अवलंब केला. यंदाच्या शैक्षणिक वर्षारंभी शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या झाल्या. सवलतीच्या बदली योजनेत काहींनी गडबड केल्याच्या तक्रारी झाल्या.

बदली प्रक्रियेत कुणावर अन्याय होऊ नको म्हणून ऑनलाइनचा अवलंब झाला, पण त्यामध्येही अनेक शिक्षकांनी वेगळी शक्कल लढविताना बनावटगिरीचे धडे गिरवले. नेमणुकीची तारीख, पती,पत्नी एकत्रीकरण, अंपगत्वाचे दाखलेही दिले. आंतरजिल्हा बदली प्रकरणी नियुक्तीच्या मूळ तारखेचा उल्लेख केल्यामुळे सेवाज्येष्ठता वाढली आहे. सोयीच्या ठिकाणी वर्णी लागावी म्हणून काही जणांनी बिनधिक्कतपणे खोटी कागदपत्रे सादर केली आहेत. पहिल्या टप्प्यात ४० शिक्षकांनी बदलीसाठी खोटी कागदपत्रे पुरविणे, प्रशासनाची दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले. प्रशासनाने संबंधितांना कारणे दाखवा नोटीसा काढल्या. प्रशासनांनी नोटीसा काढल्यानंतर संबंधित शिक्षकांकडून खुलासा सादर केला आहे. मात्र बदली प्रक्रियेतील त्यांची बनावटगिरी सिध्द झाल्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित आहे.

अन्यायग्रस्त शिक्षकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने सवलत योजनेतील बदलीच्या सर्वच प्रकरणांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या प्रकरणाची तालुकानिहाय चौकशीचे आदेश दिले. गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला. १०० हून अधिक शिक्षकांच्या माहितीमध्ये तफावत आढळली आहे. शिरोळ तालुका वगळता अन्य ठिकाणची सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शिरोळमधील सुनावणी पूर्ण झाली की एकत्रित अहवाल तयार करुन कारवाईचा निर्णय होणार आहे.

सोयीच्या ठिकाणी बदलीसाठी सादर केलेल्या माहितीमध्ये तफावती आढळल्याची उदाहरणे आहेत. तालुकानिहाय संबंधित शिक्षकांनी सादर केलेली माहितींची खातरजमा, कागदपत्रांची पडताळणी केली आहे. काही प्रकरणात खोटी माहिती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या काही दिवसात एकत्रित अहवाल करुन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केला जाईल. त्यानंतर कारवाईचा निर्णय होणार आहे.

- रवीकांत आडसूळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

कारभाऱ्यांची लुडबूड

प्रशासनाकडून नोटीसा, सुनावणीची प्रक्रिया सुरू झाल्याने कारवाईच्या भितीने संबंधित शिक्षक धास्तावले आहेत. अहवाल तयार होण्याअगोदरच कारवाई सौम्य प्रकारची व्हावी, त्यामधून पळवाट शोधण्यासाठी शिक्षक संघटना आणि जिल्हा परिषदेतील यंत्रणा सक्रिय झाली आहे. दोन्ही घटकांतील काही कारभारी प्रकरण मिटवण्याच्या प्रयत्नात आहेत. शिक्षक संघटनेतील काही कारभाऱ्यांच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या दालनात फेऱ्या वाढल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेठवडगाव सभेत वादावादी

$
0
0

पेठवडगाव पालिका सभेत

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. स्व.शिवाजीराव सालपे यांच्या नावची स्वागतकमान व रस्त्याला नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मार्ले यांची जागा ताब्यात घेण्याचा ठराव स्थगित ठेवण्यात आला. सत्ताधारी नगरसेवकांनी रमाई घरकुल योजनेच्या अनुदान वाटपावरून पालिका प्रशासनाचे वाभाडे काढले. स्व. विजयसिंह यादव सभागृहात सर्वसाधारण सभेत झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मोहनलाल माळी होते. उपनगराध्यक्ष अजय थोरात, मुख्याधिकारी अतुल पाटील आदी उपस्थित होते.

करनिरीक्षक सूर्याजी भोपळे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी संतोष गाताडे यांनी केली. त्यास सर्वांनी पाठिंबा दिला. विरोधी पक्षनेत्या विद्याताई पोळ यांनी प्रभाग चारमध्ये आळीयुक्त पाणी येत आहे याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. गुरूप्रसाद यादव यांनी शिल्लक चावी कनेक्शन न जोडल्यामुळे पाण्याच्या तक्रारी आहेत असे सांगितले. यावेळी नगराध्यक्ष माळी यांनी, फिल्टर हाऊसची अनेक वर्षे सफाई झालेली नाही. सध्या सफाईचे काम सुरू असून लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा सुरू होईल असे सांगितले.

नगराध्यक्ष माळी यांनी गेले वर्षभर पाठपुरावा करून शौचालये गळकीच आहेत. काही ठिकाणी स्लॅब कोसळत आहे. त्यामुळे या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली. त्याला विद्याताई पोळ यांनी, कामे चुकीची झाली असल्यास चौकशी कराच असे आव्हान दिले. मुख्याधिकारी पाटील यांनी ठेकेदारास काळ्या यादीत टाका असे सांगितले.

कालीदास धनवडे यांनी प्रभागात वर्षभरात काहीही कामे झाली नाहीत असा आरोप केला. रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना वारंवार हेलपाटे मारायला लागत असून लाभार्थ्यांची अडवणूक होत असल्याचे सांगितले. उपनगराध्यक्ष अजय थोरात यांनी चर्चेत हस्तक्षेप करत बांधकाम अभियंता अजित पाटील चुकीची माहिती देतात, उडवाउडवाची उत्तरे देतात असा आरोप केला. मुख्याधिकारी पाटील यांनी लाभार्थ्यांच्या अडचणींबाबत प्रशासन दक्षता घेत आहे असे सांगितले.

स्व. शिवाजीराव सालपे यांचे नाव बिरदेव चौक ते आंबेडकर पुतळा रस्त्यास द्यावे असा विषय सभेसमोर होता. यावर बोलताना विद्याताई पोळ म्हणाल्या, 'सालपे यांचे शहरासाठी योगदान आहे. त्यांच्या कमानीस आमचा विरोध नाही. त्यांच्या नावाला साजेशी कमान हातकणंगले रोडवर व्हावी. छ. शिवाजी महाराजांचा पुतळा विचारात घेता वाठार रोडला त्यांचे नाव देण्यात यावे.' यास प्रजापती सनदी, संतोष चव्हाण यांनी हरकत घेतली. यापूर्वीही राष्ट्रपुरूषांची नावे देण्याचा विषय चर्चा होऊन ते प्रलंबित राहिले असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरास १९८४ साली बाबासाहेब आंबेडकर पथ असे नामकरण झाल्याचे फोटो व नागरिकांचा अर्ज नगरसेवक जवाहर सलगर यांनी सभागृहात सादर केला. या रस्त्यास पुर्वी बाबासाहेब आंबेडकर पथ असे नाव दिले असल्यास सालपे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मागे घेवू असे आश्वासन नगराध्यक्ष माळी यांनी दिले. सभेत प्राथमिक शाळेसाठी क्रिडांगणाचे आरक्षण असलेली जागा पाालिकेने जागा खरेदी करण्याचा विषय स्थगित ठेवण्यात आला. गुरूप्रसाद यादव यांनी पालिकेस दोन वर्षे मुदत आहे त्यामुळे घाई गडबडीने निर्णय घेवू नका असे आवाहन केले. चर्चेत गटनेत्या प्रविता सालपे, संदीप पाटील, शरद पाटील, संतोष गाताडे, जवाहर सलगर आदींनी भाग घेतला. सुनीता पोळ, अनिता चव्हाण, अलका गुरव, शबनम मोमीन, संगिता मिरजकर, नम्रत ताईगडे, मैमुन कवठेकर, सावित्री घोटणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्नाटक पोलिसांनी लॉंग मार्च रोखला

$
0
0

निपाणी राधानगरी राज्यमार्गावर तणाव, वाहतूक ठप्प

म. टा. वृत्तसेवा, कागल

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी कागल तालुक्यातील चिकोत्रा खोऱ्यातील पाचशे आंदोलनकर्ते लॉंग मार्चने कोल्हापूरकडे जात असताना कर्नाटक हद्दीत हायवेनजीक कर्नाटक पोलिसांनी आंदोलकांना रोखले. यामुळे आंदोलक व कर्नाटक पोलिसांमध्ये वादावादी झाली. त्यामुळे निपाणी राधानगरी राज्यमार्गावर काहीकाळ तणाव निर्माण झाला व वाहतूक ठप्प झाली. आमदार हसन मुश्रीफ आणि निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या मध्यस्थीनंतर लॉंग मार्च वाहनांच्या ताफ्यातून महाराष्ट्राच्या हद्दीत आला.

कोल्हापूर येथील सकल मराठा समाजाच्या सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकाळी सात वाजता सेनापती कापशीच्या ऐतिहासिक स्वामी चौकात चिकोत्रा खोऱ्यातील विविध गावांतून कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे जमा झाले. सुमारे पाचशे मोर्चेकऱ्यांनी सुरुवात केलेला हा लॉंग मार्च निपाणी मार्गावरील मुगळी, जैन्याळ, करड्याळ, नंद्याळ, लिंगनूर, मेतके, गलगले, खडकेवाडा आदी भागातील कार्यकर्त्यांच्या सहभागाने वाढतच गेला. अत्यंत शिस्तबध्दपणे सुरु असलेला हा लॉंग मार्च लिंगनूर गावात पोहोचल्यावर कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राच्या हद्दीत अतिक्रमण करत रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी अत्यंत शांततामय मार्गाने निघालेले मोर्चेकरी आणि कर्नाटक पोलिस यांच्यात वादावादी झाल्याने वातावरण तणवपूर्ण बनले. कार्यकर्ते संतप्त होवून कर्नाटक सरकारविरुद्ध घोषणा देवू लागले. मात्र कर्नाटक पोलिस आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. कार्यकर्त्यांनीही आम्ही इथून परत जाणार नाही, कोल्हापूरकडे कोणत्याही परिस्थितीत जाणारच , अशी आग्रही भूमिका घेतली.

या प्रकाराची माहिती कळताच आमदार हसन मुश्रीफ यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. माजी आमदार काकासाहेब पाटीलही तेथे पोहोचले. आमदार मुश्रीफ यांनी या वेळी पोलिसांशी चर्चा केली. चिकोत्रा खोऱ्यातील हे कार्यकर्ते कोल्हापुरात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चालले आहेत. ते शांततेच्या मार्गानेच आंदोलन करणार आहेत. त्यामुळे त्यांना रोखू नये, अशी विनंती पोलिसांना केली. अखेर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना पुढे जाण्यास परवानगी दिली. त्यानंतर सुमारे दोन ते अडीच तास सुरू असलेली परिसरातील तणावपूर्ण परिस्थिती निवळली.

कर्नाटक पोलिसांनी बंदोबस्तात लॉंग मार्च महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत सोडण्याचे मान्य केले. अखेर तब्बल दहा पोलिस गाड्यांच्या बंदोबस्तात लॉंग मार्च आपल्या नियोजित मार्गाने मार्गस्थ झाला . कोगनोळी टोल नाक्याच्या पुढे आल्यावर पुन्हा लॉंग मार्च सुरू झाला आणि कार्यकर्ते कागलमध्ये पोहचले. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता कागलच्या गैबी चौकात मेळाव्याचे आयोजन केले असून त्यानंतर कार्यकर्ते कोल्हापूरकडे प्रस्थान करणार आहेत.

------------

चौकट

निपाणी-राधानगरी मार्गावर ठिय्या

पूर्वपरवानगी मागितली असतानाही कर्नाटक पोलिसांनी लॉंग मार्चला आयत्यावेळी परवानगी नाकारल्याचा आरोप यावेळी मोर्चेकऱ्यांनी केला. पोलिसांच्या या दडपशाहीचा आंदोलकांनी तीव्र शब्दांत निषेध केला. मोर्चेकऱ्यांनी निपाणी-राधानगरी मार्गावर ठिय्या मारल्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. यामुळे सुमारे अडीच तास वाहतूक खोळंबली आणि तणावही वाढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावर्डे, वडगाव ग्रामस्थांचा ठिय्या

$
0
0

वडगाव, सावर्डे ग्रामस्थांचा ठिय्या

हातकणंगले : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसापासून हातकणंगले तहसिलदार कार्यालयासमोर सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनात गुरुवारी पेठवडगाव व सावर्डे येथील सकल मराठा समाजाने सहभाग नोंदवला. आज पेठवडगाव व सावर्डेतील समाजाचे कार्यकर्ते मोटरसायकल रॅलीने घोषणाबाजी करत आंदोलनस्थळी आले. शिवाजी माने, राजू देसाई, नागनाथ खोत, संजय देसाई, प्रल्हाद तालुगडे, संतोष ताईंगडे, बबन पाटील, सुनील चव्हाण, डॉ. संजय खाडे, अजित गर्जे, नारायण बिरांजे, मानसिंग पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. पेठवडगाव शहरातील मराठा बांधवांनी आंदोलनाला गर्दी करत आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रा. रवींद्र पाटील, सागर मोरे, पंडित निंबाळकर यांच्यासह मराठा युवा शक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खाऊचे पैसे ‘बळ द्या पंखा’साठी

$
0
0

खाऊचे पैसे 'बळ द्या पंखा' साठी

महावीर इंग्लिश स्कूलकडून वीस हजाराची मदत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक हातभार लावण्याचा निर्धार सुर्वेनगर येथील महावीर एज्युकेशन सोसायटीच्या महावीर इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी केला. या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी या शैक्षणिक उपक्रमांसाठी पुढे सरसावला. कुणी खाऊसाठी दिलेल्या पैशाची बचत केली, कुणी आईबाबांनी वाढदिवसाला भेटवस्तू खरेदीसाठी दिलेली रक्कम 'मटा हेल्पलाइन'साठी राखून ठेवली. तर कुणी वीस रुपये, कुणी पंचवीस रुपये या पध्दतीने रक्कम जमा होत गेली. आठवडाभरात तब्बल वीस हजार रुपये संकलित झाले.

ही संपूर्ण रक्कम विद्यार्थ्यांमार्फत मुख्याध्यापिका धनश्री व्हनागडे यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष ललित गांधी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. ललित गांधी यांनी विद्यार्थ्यांनी जमविलेली ही रक्कम महाराष्ट्र टाइम्सकडे सुपूर्द केली . विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून जमलेला हा निधी 'बळ द्या पंखांना'या उपक्रमांत समाविष्ट ११ विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल. गरीब मुलांच्या शिक्षणासाठी महावीर इंग्लिश स्कूलमधील शाळकरी मुलांनी राबविलेल्या मदतीच्या या उपक्रमाचे सर्व थरातून कौतुक होत आहे. सर्वच शाळांनी असा उपक्रम राबवला तर होतकरू मुलांच्या पंखांना बळ मिळणार आहे. महावीर स्कूलने एक चांगला आदर्शच इतर शाळांसमोर ठेवला आहे.

उपनगरातील एक नावाजलेली शाळा म्हणून महावीर इंग्लिश स्कूलची ओळख आहे. संस्था सध्या रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करत आहे. या कालावधीत शाळेने शैक्षणिक गुणवत्ता, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध शैक्षणिक उपक्रम सुरू आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा 'मटा हेल्पलाइन'साठी निधी जमविण्याचा संकल्प केला आणि आठवडाभरात वीस हजार रुपये जमवले. इतर शाळांनी देखील अशा सामाजिक उपक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन या शाळेच्या मुलांनी केले.

.................

कोट

'मटा हेल्पलाइन' या उपक्रमासाठी शाळेतील मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रत्येक विद्यार्थ्यांने आपआपल्या परीने मदत केली. शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या मनी सामाजिक बांधिलकीचे बीज रुजल्याचे हे अनोखे उदाहरण आहे.

धनश्री व्हनागडे, मुख्याध्यापिका, महावीर इंग्लिश स्कूल

...................

कोट

'मटा हेल्पलाइन' शैक्षणिक उपक्रम हा गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य घडविणारा आहे. या उपक्रमांसाठी मुलांनी उस्फूर्तपणे आर्थिक हातभार लावला. समाजातील प्रत्येक घटकाने 'बळ द्या पंखांना'या उपक्रमासाठी सढळ मदत केली तर गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक करिअर घडेल.

ललित गांधी, अध्यक्ष, महावीर एज्युकेशन सोसायटी

..........................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदस्यपदी डॉ. पाटील

$
0
0

कृषिमूल्य आयोगाच्या

सदस्यपदी डॉ. संपतराव पाटील

म. टा. वृत्तसेवा, शाहूवाडी

सरुड (ता. शाहूवाडी) येथील डॉ. संपतराव बाळासाहेब पाटील यांची राज्य कृषिमूल्य आयोगाच्या अशासकीय सदस्यपदी नियुक्ती झाली. विविध जिल्ह्यांतील आठ अशासकीय सदस्यांचे मंडळ नुकतेच सरकारने निर्माण केले. यामध्ये डॉ. पाटील यांना संधी मिळाली आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या नावाशी शिफारस केली होती. माजी आमदार पाशा पटेल हे आयोगाचे अध्यक्ष आहेत. आयोगाकडील आठ अशासकीय सदस्य मंडळाची नावे सरकारने जाहीर केली आहेत. रयत संघटनेचे युवकनेते व राज्यमंत्री खोत यांचे चिरंजीव सागर खोत, संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव पाटील यांच्या माध्यमातून डॉ. पाटील यांना कृषिमूल्य आयोगावर सदस्यपदाची संधी मिळाली आहे. थोरतांचे वडगाव (ता. शाहूवाडी) येथील डॉ. पाटील हे विद्यार्थीदशेपासूनच शेतकरी चळवळीत कार्यरत आहेत. 'पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे' असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परदेशातील संधींविषयीकार्यशाळेचे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

इन्स्टिट्यूट ऑफ होलिस्टिक हीलिंग, इंडिया (आयएचएचआय) आणि 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने शनिवारी (४ ऑगस्ट) परदेशी शिक्षणाबाबत माहिती देणारी 'भरारी विदेशाची...' ही विशेष कार्यशाळा आयोजिण्यात आली आहे.

तंत्रज्ञान, व्यवस्थापन, विदेशी भाषा आणि इतर आवडीच्या विषयांत विदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची स्वप्ने पाहणारे अनेक तरुण आहेत. आपल्या आवडीच्या विषयाचे सर्वोत्तम ज्ञान देणाऱ्या विद्यापीठाची निवड, आर्थिक तरतूद, कागदपत्रांची पूर्तता, राहण्याची सोय इत्यादींचा मेळ घालणे अतिशय अवघड असते. हे करताना मनावर येणारे दडपण, त्यातून निर्माण होणारा ताण हा बरेचदा असह्य होतो. तांत्रिक बाबींची पूर्तता यशस्वीपणे पार पडल्यानंतरही या तरुणांच्या मनात परदेशातील वास्तव्याशी निगडित अनेक अनुत्तरित प्रश्न दडलेले असतात. या सगळ्याबाबत स्वतःच स्वतःला कशी मदत करता येते आणि स्वतःचे मन:स्वास्थ्य कसे जपता येते, याविषयी 'आयएचएचआय'च्या तज्ज्ञ समुपदेशक शर्मिला पुराणिक आणि मेधा कदम मार्गदर्शन करणार आहेत.

आयएचएचआय ही संस्था व्यक्तीच्या भावनिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्यविषयक समग्र स्वास्थ्यावर काम करते. आरोग्य, मानसशास्त्रीय आणि करिअर समुपदेशन, सायकोमेट्रिक अॅनॅलिसिस, योग, प्राणिक हीलिंग अशा विविध विषयांत ही संस्था कार्यरत आहे. ही कार्यशाळा शनिवारी सकाळी ११ वाजता 'महाराष्ट्र टाइम्स'च्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळा सशुल्क असून, नावनोंदणीसाठी ९४०५९६९९९६ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जवान बेपत्ता

$
0
0

सातारा : भारतीय सैन्य दलात असलेले सचिन मानाजी पवार (वय ३२, मूळ गाव रा. वाठार कि. ता. कोरेगाव) हे २९ जुलै रोजी सातारा मध्यवर्ती बसस्थानकातून बेपत्ता झाले असल्याची तक्रार त्यांचे भाऊ महेश पवार यांनी दिली आहे. सचिन पवार यांचे सध्या काश्मीर येथे नेमणूक असून, ते २३ जुलै रोजी सुट्टीसाठी गावी आले होते. पाच दिवसांची सुट्टी झाल्यानंतर त्यांना पुणे येथे कोर्ससाठी जायचे होते. त्यासाठी वाठार किरोली येथून सचिन यांचे भाऊ महेश हे त्यांना सोडण्यासाठी सातारा बसस्थानक येथे आले होते. परंतु, गाडी पार्क करेपर्यंत जवान सचिन पवार तेथून निघून गेले. मात्र, ते पुण्यात पोचले नसल्याचे कळाल्यानंतर कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, जवान सचिन कुठेच सापडले नसल्याने अखेर महेश पवार यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रारी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टेराकोटा मग’वरशिका वारली पेंटिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पाहुण्यांचे स्वागत करताना वेगळ्या कटलरी किंवा अॅक्सेसरीजचा उपयोग केला जातो. यासाठी विविध आकार- प्रकारांच्या अॅक्सेसरीज घरीच रंगवता आल्या, तर?तुम्हालाही घरच्या घरी कप रंगवायचे असतील, तर 'वारली पेंटिंग' हा एक उत्तम पर्याय आहे. हे शिकवण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब'च्या वतीने उद्या, ४ ऑगस्ट रोजी 'वारली पेटिंग वर्कशॉप' आयोजित करण्यात आले आहे.

नर्मदा बंगला, प्रभात रस्ता, गल्ली क्रमांक १५ येथे दुपारी ३ वाजता ही कार्यशाळा होईल. यासाठी श्रुती आठल्ये मार्गदर्शन करणार आहेत. वारली पेटिंग हा आदिवासी जीवनशैलीतील कलाप्रकार असून, उत्तर सह्याद्रीच्या पट्ट्यात तो साकारण्याचे प्रमाण जास्त आहे. डहाणू, तलावेरा, जव्हार, पालघर जिल्ह्यात प्रामुख्याने या कलेची केंद्रे आहेत. घराच्या सुशोभीकरणासाठी वारली पेंटिंग केले जाते. या पारंपरिक कलेचा समकालीन म्हणून वापर करून ती टिकवून ठेवण्यासाठी सध्या विविध प्रयत्न होत असताना, भिंतीव्यतिरिक्त टी शर्ट, टेबल टॉप, दागिने, पिशव्या, दिवे अशा निरनिराळ्या ठिकाणीही वारली पेंटिंग साकरले जाते.

याचाच भाग म्हणून कार्यशाळेत श्रुती 'टेराकोटा मग'वर वारलीची कला शिकवणार आहेत; तसेच या कलेचे इतर भाग, त्याची माहितीही या वेळी देण्यात येईल. टेराकोटाचे दोन मग, काळा आणि पांढरा अॅक्रेलिक रंग हे साहित्य आयोजकांकडून पुरवण्यात येईल. पेन्सिल (अप्सरा ग्लास मार्किंग), झिरो नंबर ब्रश, वॉटर बाउल आणि कॉटन कापड आदी साहित्य सहभागींनी आणणे आवश्यक आहे.

कार्यशाळेसाठी प्रवेशमूल्य असून, कल्चर क्लब सदस्यांना यासाठी सवलत देण्यात येईल. कार्यशाळा सगळ्या वयोगटासाठी खुली असेल. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क क्रमांक : ९६५७०३२६०९.

'वारली पेंटिंग' कार्यशाळा

कधी : ४ ऑगस्ट

कुठे : नर्मदा बंगला, प्रभात रस्ता, गल्ली क्रमांक १५

किती वाजता : दुपारी ३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोवीस तासांत आरोपी गजाआड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

पोवई नाक्यावरील दुकान फोडून त्यातील ५० हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने अवघ्या २४ तासांत संशयितांना शोधून काढून कारवाई केली आणि चोरीला गेलेला मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे. अटक केलेल्या संशयितांची अजित विनय गाडे (वय २४, रा. किडगाव) व विवेक राजेंद्र चव्हाण (वय २३, रा. धावडशी, ता. सातारा) अशी नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जुलै रोजी मध्यरात्री दोन अज्ञात संशयितांनी आशिष जेजुरकर यांचे दुकान फोडून त्यातून लॅपटॉप, सीसीटीव्ही, कॅमेरे, डीव्हीआर, कॅमेरा असा ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरला गेला होता. दुसऱ्या दिवशी दुकान उघडताना चोरी झाली असल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणी शहर पालिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर चोरट्यांबाबतची माहिती मिळाली. दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली. दोघे संशयित त्यांच्या दुचाकीवरून पोवई नाका येथे आले होते व तेथे चोरी केली असल्याची कबुली दिली. चोरट्यांनी मुद्देमालाबाबत विचारल्यानंतर तो लपवल्याची जागाही दाखवली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त केला तसेच संशयितांची दुचाकी असा एकूण एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने, पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक बी. जे. ढेकळे, पोलिस हवालदार मुनीर मुल्ला, अनिल स्वामी, अविनाश चव्हाण, भिसे, गायकवाड, ढाणे, कुंभार यांनी कारवाईत सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कार्यकर्त्यांना संधी द्या’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शिराळा

'आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून क्रियाशील कार्यकर्त्याना कामांची संधी द्या,' असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी केले. शिराळा येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी सह्याद्री खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संपतराव देशमुख, हणमंतराव पाटील, काँग्रेसचे शिराळा तालुका अध्यक्ष आनंदराव पाटील, के. डी. पाटील, शिराळा पंचायत समितीच्या सभापती मायावती कांबळे, दत्तात्रय पाटील उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक संभाजी नलवडे यांनी केले.

देशमुख म्हणाले, 'शिराळा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुथनिहाय सभासद नोंदणी करून कार्यकर्त्यांची फळी निर्माण करावी. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संकल्पनेतील 'शक्ती अॅप' च्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्त्याला जोडले जाणार आहे. यामुळे पक्षाची धोरणे, विचार कार्यकर्त्यांला एकमेकांबरोबर जोडण्याचे काम केले जाणार आहे, या योजनेमध्ये सर्वांत जास्त नोंदणी झाली पाहिजे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Sagli Election Results: भाजपची मुसंडी

$
0
0

सांगली:

सांगली-मिरज-कुपवाड महापालिका स्थापन झाल्यापासून सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाची पिछेहाट झाली असून, भाजपनं या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. सर्व ७८ निकाल हाती आले असून भाजपने ४१ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ३५ पर्यंतच मजल मारता आली. स्वाभिमानी आघाडीच्या पदरी १ जागा पडली असून १ अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. या निवडणुकीत अनेक प्रस्थापितांना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, शिवसेनेची पाटी कोरीच राहिली आहे.

सांगली महापालिका निवडणुकीच्या ७८ जागांसाठी ४५१ उमेदवार रिंगणात उतरले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजपनं संपूर्ण ताकद पणाला लावली होती. सांगलीचा गड राखण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला. तर सत्तास्थापनेचा निर्धार भाजपनं केला होता. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीचे निवडणूक कल बघता भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळाली. त्यानंतर भाजपनं अनपेक्षित मुसंडी मारली.

आता सर्व जागांचे निकाल जाहीर झाले असून ४१ नगसेवकांचं बळ मिळालेल्या भाजपचा महापौर सांगलीत बसणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

या प्रस्थापितांना धक्का

- धनपाल खोत
- विवेक कांबळे
- किशोर जामदार
- इद्रिस नायकवडी
- प्रमोद सूर्यवंशी
- अजित सूर्यवंशी
- दिलीप पाटील
- हरिदास पाटील
- रणजितसिंह सावर्डेकर
- विक्रमसिंह सावर्डेकर
- मुन्ना कुरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोवा बनावटीची दारू जप्त

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विनापरवाना गोवा बनावटीच्या विदेशी दारुची मोटारीतून वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागाने ताराराणी कॉलनी, मैल खड्डा येथे एकाला अटक केली. या प्रकरणी मोटारचालक आनंद पांडुरंग मोहिते (वय ३३, रा. दुर्गामाता मंदिराजवळ, ताराराणी कॉलनी) याच्यावर गुन्हा दाखल केला . उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक यु. डी. शिंदे ताराराणी कॉलनी येथे पेट्रोलिंग करत होते. त्यांनी मोटारीची (क्रमांक एमएच १२, सीडी २६१६) तपासणी केली. यामध्ये विनापरवाना बेकायदा गोवा बनावटीची विदेशी दारू आढळली. विदेशी मद्य, चारचाकी वाहनासह एकूण १ लाख २५ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उत्पादनशुल्क विभागाचे वाय. एम. पवार, अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावकाराच्या छळाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या

$
0
0

सिंगल कॉलम फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पैसे दे, अन्यथा आत्महत्या कर' असा सल्ला देणाऱ्या खासगी सावकाराच्या छळाला कंटाळून उमेश रामेश्वर बजाज (वय ४७, रा. माळी कॉलनी, टाकाळा) या व्यापाऱ्याने राहत्या घरी टेरेसवर गळफास लावून आत्महत्या केली. त्यांनी तेल उद्योगासाठी सांगलीतील खासगी सावकाराकडून पैसे घेतले होते. सावकाराच्या तगाद्याला कंटाळून त्यांनी शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता आत्महत्या केली. याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

उमेश बजाज आणि त्यांच्या भावाने सांगली येथील माधवनगर भागात खाद्यतेल विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. त्यासाठी सांगलीतील काही खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. गेले काही दिवस या व्यवसायात मंदी आल्याने बजाज यांना पैसे परत करणे शक्य झाले नाही. काही दिवसांनंतर पैसे परत देतो, असे खासगी सावकाराला विनंती केली होती. मात्र, 'पैसे परत दे, अन्यथा आत्महत्या कर' असा तगादा लावत सहा महिन्यांपासून मुद्दल आणि व्याजाच्या रकमेची मागणी केली. सावकाराकडून बजाज यांची आर्थिक पिळवणूक सुरूच राहिली. शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास राहत्या घरातील टेरेसवरील लोखंडी बारला गळफास लावून आत्महत्या केली. पत्नी आणि मुलगा यांनी बजाज फिरायला गेले असतील, असा अंदाज व्यक्त केला. मात्र, अर्धा तास उलटूनही ते न परतल्याने परिसरात शोधाशोध सुरू केली. अखेर त्यांचा मुलगा टेरेसवर गेल्यानंतर वडिलांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठविला. उमेश यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी भाऊ असा परिवार आहे.

००००

चिठ्ठीत सावकाराचे नाव

उमेश बजाज यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीमध्ये सांगली येथील खासगी सावकारांकडून पैसे घेतले होते. त्यांनी पैशासाठी सतत तगादा लावला. 'दोघा भावांपैकी कोणीतरी एकाने आत्महत्या करा, आम्ही तुमचे पैसे माफ करतो', असा उल्लेख चिठ्ठीत केला आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेली ही चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन वृत ३

$
0
0

तुकाराम वारके

कागल : बोरवडे (ता. कागल) येथील हॉटेल व्यावसायिक तुकाराम कृष्णा वारके (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ५) आहे. बिद्रीतील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक प्रकाश वारके व संतोष वारके यांचे ते वडील होत.

००००

हिराबाई कांबळे

आजरा : उतूर (ता. आजरा) येथील हिराबाई दत्तू कांबळे (वय ८५) यांचे निधन झाले. येथील निवृत शिक्षक एन. टी. कांबळे यांच्या त्या बहीण होत. रक्षाविसर्जन रविवारी (ता.५) आहे.

०००

इंदुमती किल्लेदार

कागल : येथील इंदुमती राजाराम किल्लेदार (वय ७५) यांचे निधन झाले. सामाजिक कार्यकर्त महेश किल्लेदार यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योगमंत्री देसाई आज कोल्हापुरात

$
0
0

कोल्हापूर : उद्योग व खनिकर्ममंत्री सुभाष देसाई शनिवारी (ता. ४) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. सकाळी आठ वाजता ते शासकीय विश्रामगृह येथे पोहोचतील. सकाळी दहा ते साडेदहाच्या दरम्यान अंबाबाई मंदिरात दर्शन घेऊन ते साडेदहा वाजता हॉटेल सयाजी येथे गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. दुपारी दीडच्या सुमारास ते इचलकरंजीला रवाना होतील. इचलकरंजीत पहिल्या निर्यात मार्गदर्शन परिषदेस ते उपस्थित राहणार आहेत. यानंतर इचलकरंजी शिवसेना शहर कार्यालयास भेट देऊन पुन्हा कोल्हापुरात येतील. रात्री साडेआठ वाजता ते महालक्ष्मी एक्स्प्रेसने मुंबईला रवाना होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images