Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जिल्हा कृषी अधिकक्षक अधिकारीपदी डी. डी. वाकुरे

$
0
0

जिल्हा कृषी अधिक्षक

अधिकारीपदी डी. डी. वाकुरे

कोल्हापूर

जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी म्हणून डी. डी. वाकुरे यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. बसवराज मास्तोळी यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदावर वाकुरे यांची नियुक्ती झाली. वाकुरे हे जागतिक बँकेच्या हवामान अनुकूल कृषी प्रकल्पाकडे संशोधक तज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. मूळचे तेरेकोडी (जि. उस्मानाबाद) येथील असलेल्या वाकुरे यांनी सांगली जिल्ह्यात उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी व पुणे येथे कृषिगणना उपायुक्त म्हणून काम पाहिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आधी आरक्षण, नंतर चर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा समाज लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने गेली चार वर्षे आरक्षणासाठी लढा देत आहे, मात्र सरकारने समाजाची फसवणूक केली. आता आरक्षणवरुन राज्यभर आंदोलनाचा भडका उडाल्याने सरकारी पातळीवरुन चर्चेच्या फेऱ्यांची निमंत्रणे सुरु आहेत. मात्र सरकार फसवे असून 'आधी आरक्षण, नंतर चर्चा' ही भूमिका सकल मराठा समाजाने श्रीमंत शाहू महाराज, इतिहास अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांच्यासमोर मांडली. समाजाच्या तीव्र भावना जाणत या दोघांनीही मराठा आरक्षणप्रश्नी आता सरकारशी चर्चा नाही, सरकारने अगोदर आरक्षणाचा निर्णय घ्यावा, असे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकीचे निमंत्रण धुडकावले. तसेच मराठ्यांचे आंदोलन मोडीत काढणे सोपे नाही' असेही सरकारला ठणकावले.

मुख्यमंत्र्यांनी चर्चेचे निमंत्रण दिल्यानंतर शाहू महाराज आणि पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देत समाजाच्या भावना ऐकून घेण्यासाठी आल्याचे नमूद केले. दसरा चौक येथील आंदोलनस्थळी झालेल्या बैठकीत सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी सरकारच्या विरोधात तक्रारीचा पाढा वाचला. सकल मराठा समाजाच्यावतीने भूमिका मांडताना इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले,' घटनेत ५० टक्क्यांपेक्षा जादा आरक्षण देऊ नये असा कुठेही उल्लेख नाही. शिवाय इतर मागासवर्ग प्रवर्गात ब प्रवर्ग तयार करुन मराठा व तत्सम जातींना आरक्षण देता येऊ शकते. यामुळे इतरांच्या आरक्षणाला धक्का पोहचत नाही. हा पर्याय उपलब्ध असताना सरकारकडून चालढकल सुरु आहे.'

चर्चेत वसंत मुळीक, दिलीप देसाई, दिलीप पाटील, गुलाबराव घोरपडे, सचिन तोडकर, हर्षल सुर्वे, स्वप्नील पार्टे यांनी सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. सरकार मराठा आरक्षणप्रश्नी गंभीर नाही. गेले वर्षभर कसलीही चर्चा केली नाही. आरक्षणाबाबत सरकारची इच्छा दिसत नाही. ठिय्या आंदोलन सुरू होऊन नऊ दिवस झाले, मंत्र्यांनी आंदोलनस्थळी येऊन चर्चा करण्याचे सौजन्य दाखविले नाही. सरकारी पातळीवरुन बैठकींचा केवळ फार्स सुरू असल्याने आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय सकल मराठा समाज चर्चेसाठी जाणार नाही,'अशा भावना मांडल्या. याप्रसंगी गणी आजरेकर, माजी नगरसेवक आदिल फरास, कादर मलबारी, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, संजय पोवार वाईकर आदी उपस्थित होते.

छत्रपतींचा आशिर्वाद हवा असल्यास कोल्हापुरात या

'मराठा आरक्षणप्रश्नी तिढा निर्माण झाल्याने सरकार धावाधाव करत आहे. आरक्षणप्रश्नी चर्चा करण्यासाठी शाहू महाराजांनी मुख्यमंत्र्याकडे जाण्याची आवश्यकता नाही तर सरकारला छत्रपतींचा आशिर्वाद हवा असेल तर मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात येऊन शाहू महाराजांशी चर्चा करावी,' असे मत हर्षल सुर्वे यांनी व्यक्त केले. प्रतिनिधींच्या तीव्र भावना ऐकून घेतल्यानंतर शाहू महाराजांनी, पालकमंत्र्यांना या साऱ्या बाबींची माहिती द्यायला हवी, असे सुचवले.

सावध राहा पासून ते त्यांना उशिरा कळतं

आंदोलन मोडीत काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी मराठा समाजातील मान्यवरांना व्यासपीठावर आमंत्रित करुन, मध्यस्थी घालून नंतर त्यांना तोंडघशी पाडल्याचे बैठकीत काहींनी निदर्शनास आणून दिले. खासदार संभाजीराजे यांनीही आरक्षणप्रश्नी चर्चा बंद खोलीत नव्हे, तर खुली होऊ दे असे आवाहन सरकारला केले आहे. शिवाय आंदोलनाचे नेतृत्व समाजाने करावे, आपण करणार नाही असे म्हटल्याचे कार्यकर्त्यांनी यावेळी आठवण करुन दिली. त्यावर शाहू महाराजांनी, 'संभाजीराजेंना काही गोष्टी उशिरा कळतात'अशी टिप्पणी केली. शिवाय चार वर्षात पहिल्यांदा मुख्यमंत्र्याचा फोन आला होता, असे त्यांनी सांगितले. त्यावर कार्यकर्त्यांनी 'छत्रपती घराणे म्हणून देशभरात आपल्याविषयी प्रचंड आदर आहे. तुमच्या शब्दाला किंमत आहे. तेव्हा बंद खोलीतील चर्चेसाठी जाऊ नका,'अशी विनंती केली.

आंदोलन मोडून काढणे सोपे नाही

सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींच्या भावना ऐकल्यानंतर शाहू महाराज व डॉ. जयसिंगराव पवार यांनी 'सरकारला समाजाच्या प्रश्नांविषयी गांभीर्य नसेल तर बैठकीला जाऊन काय चर्चा करायची. सरकारने, पहिल्यांदा आरक्षणाचा निर्णय घ्यावा,'अशी भूमिका मांडत मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकीला जाणार नसल्याची घोषणा केली. 'सरकारने आजपर्यंत अनेक आंदोलने मोडून काढली. गुजरातमधील पटेलांचे आंदोलनही संपुष्टात आणले. मात्र मराठ्यांचे आंदोलन मोडून काढणे सोपे नाही. आरक्षणाचा निर्णय घ्यावा लागेल,'अशा शब्दांत शाहू महाराजांनी सरकारला ठणकावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसपी मोहिते यांना सन्मानपत्र

$
0
0

'कोल्हापूरकरांनी दिलेले

मानपत्र प्रेरणादायी'

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'देशात वेगळेपण जपणारा जिल्हा म्हणून कोल्हापूरकडे पाहिले जाते. माणुसकी आणि आपलेपणा हा केवळ कोल्हापुरात जाणवतो. येथे केलेल्या कामाची पोचपावती म्हणून दिलेले मानपत्र प्रेरणादायी ठरणार आहे', असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी केले. बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीने बुधवारी त्यांचा सन्मानपत्र, पुष्पगुच्छ आणि रोप देऊन सत्कार केला. त्या वेळी ते बोलत होते.

मोहिते यांची नाशिकला पदोन्नतीवर बदली झाली आहे. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन समितीने त्यांचा सत्कार केला. या वेळी समितीचे संस्थापक किसन कल्याणकर म्हणाले, 'मोहिते यांनी वेगवेगळे उपक्रम राबवून जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी केली. कायदा आणि सुव्यवस्था राखून शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाचे बंद पडलेले काम मार्गी लावले. त्यांनी दोन वर्षाच्या कालावधीत केलेले कार्य कौतुकास्पद आहे.' दरम्यान, समितीने त्यांनी केलेल्या सेवेबद्दल त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला. या वेळी समितीचे अध्यक्ष रामेश्वर पत्की, चिन्मय सासने, फत्तेसिंग सावंत, प्रा. मधुकर पाटील, योगेश शेटे, सतीश गरड, अंकुश देशपांडे, राहुल चौधरी, श्रीधर कुलकर्णी, गुरुदत्त म्हाडगुत, सुमित खानविलकर, शशिकांत गुळवणी यांच्यासह अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, गृहविभागाचे पोलिस उपअधीक्षक सतीश माने, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी सावंत उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिरिक्त सीईओ डॉ. शिवदास रूजू

$
0
0

फोटो आहे....

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या सक्षमपणे अंमलबजावणीला प्राधान्यक्रम राहील. प्रभावी कामगिरी करत जिल्हा परिषदेने लौकिक निर्माण केला आहे. यापुढेही जिल्हा परिषद विविध विकास योजना, गतिमान प्रशासनाच्या माध्यमातून अग्रेसर राहील या पद्धतीने कामकाज करू,' अशी ग्वाही अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी शिवदास यांनी दिली.

बुधवारी त्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला. शिवदास यांनी यापूर्वी कागल, भुदरगड आणि करवीर येथे गटविकास अधिकारी म्हणून, तर जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. साडेचार वर्षांनंतर ते पुन्हा जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. सध्या मुख्य कार्यकारी अधिकारीपद रिक्त आहे. या पदाचा प्रभारी कार्यभारही त्यांच्याकडे गुरुवारपासून सोपविण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा योजना, राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुरुंदवाडमध्ये एलईडी पथदिवे बसवणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

कुरुंदवाड शहरात वीज बचतीसाठी एलईडी पथदिवे बसविण्याचा ठराव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. नगरपालिकेच्या आरक्षित जागेवरील आरक्षण उठवून त्याठिकाणी झोपडपट्टी घोषित करणे, तसेच सरकारकडे परत गेलेला निधी परत मिळविण्यासाठी फेरप्रस्ताव पाठविण्यास सभेत मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयराम पाटील होते.

स्थायी समितीतील विषय पालिका सभागृहात घेण्यात यावेत, जेणेकरून नवीन सदस्यांना याची माहिती मिळेल. तसेच प्रत्येक महिन्याला पालिकेची सभा व्हावी, अशी मागणी रामचंद्र डांगे यांनी केली. नगरपालिकेच्या गट नं. ४७८ तबक उद्यान परिसर, शिकलगार वसाहत, कोरवी वसाहत आदी ठिकाणच्या जागेवर आरक्षण उठवून झोपडपट्टी घोषित करावी, नगरपालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी हद्दवाढ प्रस्ताव पाठविण्यात यावा, नवीन सुधारित नळपाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदारास सभागृहापुढे बोलावावे, आदी विषयांवर सभेत चर्चा झाली. एचडीपीई टेलपीसचा अतिरिक्त खर्चाची बाब म्हणून मंजुरी देण्यात आली. तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत विकासकामांना मुदतवाढ घेण्याबरोबरच या योजनांवर खर्च न झालेला निधी सरकारकडे परत गेलेला आहे. हा निधी पुन्हा मिळावा यासाठी प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.

दुर्गामाता मंदिर ते शिरढोण रस्ता यापैकी उर्वरित २० टक्के रस्त्याच्या हद्दीबाबत वाद आहे. भूमी अभिलेखकडून मोजणी करून पुढील काम ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत करून घ्यावे, जिल्हा नियोजन समितीकडे दलितेत्तर योजना, नगरोत्थान योजना, अग्निशमन योजना, लोकशाही अण्णा भाऊ साठे दलित वस्ती योजनेंतर्गत २०१९-२०२० साठी निधी मागणीचा प्रस्ताव चर्चा करून पाठविण्याचा ठराव सभेत करण्यात आला. उपनगराध्यक्ष अक्षय आलासे, रामचंद्र डांगे, बांधकाम सभापती सुनील चव्हाण, उदय डांगे, दीपक गायकवाड, अभिजित पाटील, जवाहर पाटील, आदींनी चर्चेत भाग घेतला. सुजाता मालवेकर, पाणीपुरवठा सभापती फारूख जमादार, नर्गीस बारगीर, मुमताज बागवान, गीता बालगकोटे, जरीना गोलंदाज, सुशीला भबिरे, सुजाता डांगे, स्नेहल कांबळे, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, जलअभियंता अमन मोमीन, महादेव आंबी, नामदेव धातुंडे उपस्थित होते.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाव बंद, आंदोलनाला पाठिंबा

$
0
0

गाव बंद, आरक्षणाला पाठिंबा

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत आहे. बुधवारी कळंबा, दोनवडे,आणूर, पडळ या गावांनी पाठिंबा दिला. ठिकठिकाणी ग्रामीण भागातील व्यवहार बंद ठेवत आरक्षणाला समर्थन दिले. कळंबा येथे मानवी साखळी करुन कोल्हापूर-गारगोटी मार्गावर रास्ता रोको करण्यात आला. सरपंच सागर भोगम, उपसरपंच वैशाली मर्दाने, पंचायत समिती सदस्या मीनाक्षी पाटील यांच्यासह अन्य सदस्य, तालीम संस्था, सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. कळंबा ते दसरा चौकपर्यंत मोटारसायकल रॅली काढून आंदोलनाला पाठिंबा दिला. दोनवडे ग्रामपंचायत, गोकुळ शिरगाव, उचगाव ग्रामपंचायत, पन्हाळा तालुक्यातील पडळ ग्रामपंचायत यांनीही पाठिंबा दिला.

.................

विविध संस्था, संघटनांचेही समर्थन

कोल्हापूर जिल्हा सहकारी पाणी पुरवठा संस्था, भोगावती सहकारी पाणी पुरवठा संस्था, उचगाव परिसर व्यापारी असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा कोतवाल संघटना, राजर्षी शाहू जीवन विकास चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिब्यांचे निवेदन दिले.

.............

फोटो ओळी

मराठा आरक्षणप्रश्नी सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींसोबत श्रीमंत शाहू महाराज, डॉ. जयसिंगराव पवार यांची चर्चा झाली. यामध्ये इंद्रजित सावंत,वसंतराव मुळीक, हर्षल सुर्वे, दिलीप देसाई, सचिन तोडकर, गुलाबराव घोरपडे, संजय पोवार, दिलीप पाटील, भगवान काटे, गणी आजरेकर, कादर मलबारी आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिजिटल सहीविना खुलेआम लूट

$
0
0

ऑनलाइन सातबारा प्रक्रिया लटकली, केवळ १ लाख १५ हजार डिजिटल सहीनीशी अपलोड

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर

येथील महसूल प्रशासनातर्फे चार वर्षांपासून जिल्ह्यातील सातबारा ऑनलाइन केले जात आहे. आतापर्यंत ९८ टक्के सातबारा ऑनलाइन झाले तरी ते डिजिटल सहीनिशी अपलोड झालेले नाहीत. त्यामुळे अपवाद वगळता सर्वत्र सातबारा, आठ अ देण्यासाठी तलाठ्यांकडून मनमानी पध्दतीने खुलेआम पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी आहेत. परिणामी ऑनलाइन सातबारा करण्याचा मूळ उद्देशच बाजूला पडला आहे. ऑनलाइन अपलोड करण्याचा राज्यपातळीवरील सर्व्हर एक महिन्यापासून बंद आहे. साहजिकच ऑनलाइन सातबारा आणि डिजिटल सहीनिशी सातबारा अपलोडची प्रक्रिया लटकली आहे.

सरकारी योजना, बँक कर्ज यासह विविध कारणांसाठी शेतकऱ्यांना सातबारा, आठ अ लागतो. हस्तलिखित देण्यासाठी तलाठी मनमानी पैसे उकळतात. न दिल्यास संबंधित शेतकऱ्यांची अडवणूक होते. अशाप्रकारे होणरी लूट थांबावी, खातेदार शेतकऱ्यांना कोठूनही, कधीही ऑनलाइन सातबारा मिळावा, राज्य, जिल्हा पातळीवर एका क्लिकवर एकूण सातबारांची संख्या कळावी, सर्व सातबारा कायमस्वरूपी इलेक्ट्रॉनिक यंत्रणेवर राहावेत या प्रमुख कारणांसाठी २०१४ पासून सातबारा तलाठी ऑनलाईन करीत आहेत. हस्तलिखित सातबारा संगणकावर टाइप करताना अनेक चुका, त्रुटी राहिल्या असल्याने काही ठिकाणी सातबारावरील नावे गायब झाली. व्यापक प्रमाणात तक्रारी झाल्याने चुका, त्रुटी दुरूस्ती करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, ऑनलाईन सातबारा करण्यात पहिल्यापासून राज्यात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर राहिला. सध्या ९८. ७० टक्के सातबारा ऑनलाइन आहेत. मात्र सर्व सातबारा डिजिटल सहीनिशी अपलोड नाहीत. यामुळे ऑनलाइन सातबारा घेऊन पुन्हा तलाठ्याकडे सहीसाठी जावे लागते. सही करताना पुन्हा चिरीमिरीची लूट होत आहे. अनेक तलाठी घरातील संगणक, प्रिंटरवर सातबारा, आठ अ काढून देतात. त्यासाठी कमीत कमी २० ते १०० रूपयांपर्यंत पैसे उकळतात. आता सर्व्हर डाऊन असल्याने खातेदारांना आपला सातबारा ई- भूमी वेबसाइटवरही पाहता येत नाही. तलाठ्याकडेच जाऊन प्रिंट घ्यावी लागते. अशा सध्याच्या व्यवस्थेमुळेच शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून होत आहे. ऑनलाइनमध्ये चांगले काम असूनही सातबारा मिळण्यात पारदर्शकता निर्माण झाली नसल्याचे चित्र आहे.

----------------------------

कोट

'जिल्ह्यातील सातबारा ऑनलाइन अपलोड करण्याचे काम संपूर्ण राज्यात चांगले झाले आहे. दहा तालुक्यातील सर्व सातबारा ऑनलाईन करण्यात आले आहेत. डिजिटल सहीनिशी सातबारा अपलोड करण्याचे कामही गतीने सुरू होते. मात्र राज्यपातळीवरील सर्व्हर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बंद आहे. परिणामी ऑनलाईन प्रक्रिया खंडीत झाली आहे. ऑफलाईन प्रक्रिया सुरू आहे. गैरसोय टाळण्यासाठी शेतकऱ्यांना सातबारा, आठ सही करून देण्याच्या सूचना सर्व तलाठ्यांना दिल्या आहेत.

अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी

-------------------------

चौकट

करवीर, हातकणंगले मागे

ऑनलाईन सातबारा करण्यात करवीर, हातकणंगले तालुके मागे आहेत. उर्वरित आजरा, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ तालुक्यांचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. परंतु, डिजिटल सहीनिशी सातबारा नसल्याने खातेदार शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला नाही. डिजिटल सहीनिशी जोपर्यंत सातबारा अपलोड होत नाही, तोपर्यंत ऑनलाईन साताबारा केवळ दिखाऊच ठरणार आहे.

--------------------

जिल्ह्यातील एकूण महसूल गावे

१२३४

एकूण तलाठी संख्या

२९५

सातबारा उताऱ्यांची संख्या

१०,६७,५९२

ऑनलाईन सातबारा शंभर टक्के तालुके

१०

डिजिटल सहीनिशी तयार सातबारा

११७२२६

डिजीटल सहीनिशी अपलोड सातबारा

११५५१२

---------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूध उत्पादक कॅशलेसपासून दूरच

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर : नोटाबंदीच्या काळात ग्रामीण भागातील प्राथमिक दूध संस्थांना ऑनलाइन कॅशलेस पेमेंट करण्याचा अध्यादेश पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स (पदुम) विभागाने काढला होता. अनेक दूध उत्पादकांची बँकेत खाती नसल्याने कॅशलेस पेमेंट योजना पूर्णक्षमतेने राबविण्यात आली नाही. त्यामुळे 'पदुम'चा हा अध्यादेश कागदोपत्रीच राहिला आहे. आजही दूध उत्पादकांचे बिल त्यांच्या खात्यावर जमा न होता ते थेट जिल्हा बँक अथवा अन्य बँकांतून दूध संस्था अथवा डेअरीच्या खात्यावर जमा होते. त्यानंतर डेअरीची यंत्रणा उत्पादकाच्या बँक खात्यावर अथवा रोखीने बिल देते.

जिल्ह्यात ग्रामीण भागात शेतीला पूरक असलेला दुग्ध व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. इथले ऊस हे प्रमुख पीक असून, साखर कारखान्यांकडून उसाचे बिल थेट ऊस उत्पादकाच्या खात्यावर जमा होते. दूध व्यवसायात मात्र त्रिसूत्री पद्धतीने दूध बिल उत्पादकाला मिळते. दूध संघांकडून बँकेत बिल जमा होते. बँकेकडून दूध संस्था अथवा दूध डेअरीकडे बिल जमा होते. त्यानंतर दूध डेअरीकडून दूध उत्पादकाला दर दहा दिवसांनी बिल देण्याची प्रक्रिया पूर्ण होते.

नोटाबंदीच्या काळात ग्रामीण भागातील प्राथमिक दूध संस्थांना ऑनलाइन कॅशलेस पेमेंट करण्याचा अध्यादेश पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स (पदुम) विभागाने काढला होता. अनेक दूध उत्पादकांची बँकेत खाती नसल्याने कॅशलेस पेमेंट योजना पूर्णक्षमतेने राबविण्यात आली नाही. त्यामुळे पदुमचा हा अध्यादेश कागदोपत्री राहिला आहे. जिल्ह्यात जिल्हा दूध उत्पादक संघासह (गोकुळ) वारणा, अन्नपूर्णा, समृद्धी, वैजनाथ सह्याद्री, शिरोळ तालुका संघ, हनुमान दूध संस्था यळगूड, शाहू मिल्क, ज्योतिर्लिंग संस्था वाडीचरण, समाधान अशा ११ सहकारी व खासगी दूध संघ व संस्था आहेत. या संस्थांच्या अंतर्गत ४५२३ प्राथमिक दूध संस्था असून, दूध उत्पादकांची संख्या ३ लाख ७६ हजार आहे. बँक खात्याची संख्या अडीच लाखांच्या पुढे आहे. नोटाबंदीनंतर काही काळ कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला, पण त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. आजही दूध उत्पादकांचे बिल त्यांच्या खात्यावर जमा न होता ते थेट जिल्हा बँक अथवा अन्य बँकांतून दूध संस्था अथवा डेअरीच्या खात्यावर जमा होते. त्यानंतर डेअरीची यंत्रणा उत्पादकाच्या बँक खात्यावर अथवा रोखीने बिल देते. वारणा दूध संघाने दूध उत्पादकांना थेट हातात रक्कम न देता डेअरींना दूध उत्पादकांच्या खात्यावर थेट पैसे जमा करण्याची यंत्रणा सुरू केली आहे. तसेच प्रत्येक दूध उत्पादकाला एटीएम कार्ड दिल्याने दूध उत्पादकांना रक्कम बँकेतून काढतात. पण छोट्या गावांत बँका नसल्याने डेअरीकडून दूध उत्पादकांना थेट हातातच रोख रक्कम दिली जाते, तसेच काही दूध संस्था डेअरीमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुविधांची रक्कम कापून दूध उत्पादकाला रक्कम देतात. काही दूध उत्पादकांचे दूध कमी असल्याने बँकेतून रक्कम काढण्याऐवजी तेच रोख देण्याचा आग्रह करतात. त्यामुळे पदुमचा कॅशलेस पेमेंट करण्याच्या अध्यादेशाचे पालन झालेले नाही. २०१७ मध्ये कॅशलेस व्यवहाराची प्रभावी अंमलबजावणी केली असती तर थेट ग्राहकांच्या खात्यावर दूध दरवाढीची रक्कम जमा झाली असती.

गोकुळ, वारणेसह काही दूध संघांच्या दूध उत्पादकांची बँकेत खाती आहेत. पण खासगी दूध संस्था आपला व्यवहार लपविण्यासाठी रोखीच्या व्यवहारावर भर देतात. जनधन योजनेतून ग्रामीण भागात ८० टक्क्यांहून अधिक नागरिकांनी बँकेत खाती उघडली आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचे अनुदान थेट बँक खात्यावर जमा होते. भविष्यात सरकारला अनुदानाचा थेट फायदा ग्राहकाला द्यावयाचा असेल तर सरकारी अनुदान दूध संघांना देण्याऐवजी ग्राहकाच्या खात्यावर जमा करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी २०१७ च्या कॅशलेस व्यवहारासाठी पदुमने काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी होण्याची गरज आहे.

००००००

प्राथमिक दूध संस्था

४५२३

दूध उत्पादक

३,७६,०००

बँक खाती

२,५०,०००

बँक खाते नसलेले उत्पादक

५२,०००

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस डायरी ...

$
0
0

दोन सिंगल कॉलम फोटो

मटका अड्ड्यावर छापा ; दोघांना अटक

कोल्हापूर

राजारामपुरी नऊ नंबर शाळेच्या परिसरात उघड्यावर मटका घेतल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. आकाश प्रकाश सांगावकर (वय २३, रा. भाजी मार्केट परिसर, शाहूनगर) व बाजीराव दत्तात्रय मुडेकर (वय ३९, रा. राजारामपुरी १२ वी गल्ली) अशी त्यांची नावे आहेत. या ठिकाणी मटका सुरु असल्याची माहिती शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी एक पथक नेमून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मटका घेणाऱ्यांकडून सुमारे अडीच हजार रुपये आणि मटक्याचे साहित्य जप्त केले. मटका मालक राहुल पाटील (रा. प्रतिभानगर) असल्याचे पोलिसांनी सांगितले.

..................

अपघातात दुचाकीस्वार जखमी

कोल्हापूर

घरी जात असताना उचगांव ते गडमुडशिंगी रोडवर रोडवर कुत्रे आडवे आल्याने झालेल्या अपघातात भूपाल लक्ष्मण सोनवणे (वय ५५, रा. सांगवडे, ता. करवीर) हे जखमी झाले. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सोनवणे यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत.

.............

मारहाणीत एक जखमी

कोल्हापूर

कापूरवाडी (ता. हातकणंगले) येथे झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या गोविंद शहाजी घाटगे (वय ४६, रा. कापूरवाडी) यांची प्रकृती बिघडल्याने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. किरकोळ कारणावरुन कापूरवाडी येथे काहीजणांनी केलेल्या मारहाणीत घाटगे जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. बुधवारी सकाळी त्यांची प्रकृती अधिकच बिघडली.

..........

मारहाणीत दाम्पत्य जखमी

कोल्हापूर

भामटे (ता. करवीर) येथे किरकोळ कारणावरुन झालेल्या मारहाणीत धनाजी आप्पासाहेब जाधव (वय ४२) आणि संगीता धनाजी जाधव (वय ४०, रा. दोघे भामटे) हे दाम्पत्य जखमी झाले. किरकोळ कारणावरुन काहीजणांसोबत झालेल्या वादात या दाम्पत्याला मारहाण झाली. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.

.............

नजरचुकीने विष प्राशन

कोल्हापूर

खोकल्याचे औषध समजून नजरचुकीने विष प्राशन केल्यामुळे शोभा सुरेश कांबळे (वय ४५, रा. तळसंदे, ता. हातकणंगले) यांची प्रकृती बिघडली. त्यांना नातेवाईकांनी सीपीआरमध्ये दाखल केले. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी हा प्रकार घडला.

.............

अपघातात वृद्ध जखमी

कोल्हापूर

कागल येथील सरकारी विश्रामगृहाच्या बाहेर बुधवारी पहाटे झालेल्या अपघातात बंडा शंकर बाकुंडे (वय ६०, रा. हणबर गल्ली, कागल) हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.

..............

मारहाणीत महिला जखमी

कोल्हापूर

निगवे दुमाला (ता. करवीर) येथे कौटुंबिक वादात झालेल्या मारहाणीत जयश्री गोरख यादव (वय ३४) या जखमी झाल्या. त्यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. घरगुती वादातून रात्री साडेअकरा वाजता हा प्रकार घडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रीमंत शाहू महाराजांचा मुख्यमंत्र्यांशी चर्चेस नकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरात शांततेने ५८ मोर्चे निघाले. समाजाने आरक्षणासाठी निवेदने सादर केली, मागासवर्गीय आयोगाकडे पुरावे सादर केले. आता चर्चा कसली करताय? आरक्षणाचा निर्णय घ्या,' अशा शब्दांत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारला फटकारले. चार वर्षांत सरकारकडून समाजाची फसवणूक झाली. सरकार विश्वास ठेवण्यास पात्र नाही, अशा तीव्र भावना व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी बोलाविलेल्या बैठकीचे निमंत्रण नाकारले. ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनीही मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकीत सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मराठा आरक्षणप्रश्नी राज्यभर आंदोलनाचा भडका उडाल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरक्षणासंदर्भात चर्चेसाठी गुरुवारी बैठक बोलावली आहे. त्यासाठी श्रीमंत शाहू महाराज, डॉ. एन. डी. पाटील, डॉ. जयसिंगराव पवार यांना आमंत्रित केले आहे. मुख्यमंत्र्यांचा दुपारी बाराच्या सुमारास महाराजांशी फोन झाला. दरम्यानआरक्षणप्रश्नी कोल्हापुरात सकल मराठा समाजाने दसरा चौकात ठिय्या आंदोलन पुकारले आहे.

मुख्यमंत्र्याच्या मुंबईतील बैठकीच्या निमंत्रणानंतर श्रीमंत शाहू महाराज, डॉ. पवार दुपारी अडीचच्या सुमारास सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधीसोबत चर्चेसाठी दसरा चौकातील आंदोलनस्थळी दाखल झाले. मुस्लिम बोर्डिंग येथे त्यांची सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधीसोबत दीड तास चर्चा झाली. यावेळी सरकार आरक्षणप्रश्नी दिशाभूल करत असल्याचा आरोप समाजाच्या प्रतिनिधींनी केला. यानंतर शाहू महाराजांनी मुख्यमंत्र्यांनी आयोजित बैठकीत सहभागी होणार नसल्याची घोषणा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीत आठ महिन्याच्या गर्भवतीवर बलात्कार

$
0
0

सांगली:

सांगलीच्या तुरची फाटा येथे आठ जणांनी एका गर्भवती महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेच्या नवऱ्याला कारमध्ये बांधून या नराधमांनी तिच्यावर बलात्कार केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

तासगाव तालुक्यातील तुरची फाटा येथे ही संतापजनक घटना घडली. पीडीत महिला साताऱ्यातील माण तालुक्यातील आहे. ही महिला आणि तिचा नवरा पोटापाण्यासाठी तुरची फाटा येथे राह्यला आले होते. त्यांनी या ठिकाणी हॉटेलचा व्यवसाय सुरू केला होता. हॉटेलमध्ये काम करण्यासाठी त्यांना विवाहित जोडप्याची गरज होती. त्यांनी त्याबाबत काही ग्राहकांना सांगूनही ठेवले होते. मुकुंद माने नावाच्या संशयित व्यक्तीने या महिलेच्या पतीला फोन करून कामासाठी जोडपं मिळाल्याचं सांगितलं. तसंच तुरची फाट्यावर दोघांनाही बोलावून घेतलं. येताना सोबत २० हजार रुपये आणण्यासही सांगितले होते. त्यानुसार सदर महिला आणि तिचा पती तुरची फाट्यावर गेले असता आठ जणांनी या दोघांना प्लास्टिकच्या पाईपने जबर मारहाण केली. त्यानंतर या महिलेच्या पतीला कारमध्ये बांधून डांबले आणि या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. नराधमांच्या तावडीतून सुटण्यासाठी या महिलेने मोठमोठ्याने टाहो फोडला. 'मी आठ महिन्याची गर्भवती आहे. मला सोडा... मला सोडा...' अशी गयावयाही या महिलेने केली. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, या महिलेने सदर घटनेची तासगाव पोलिसांत तक्रार नोंदविली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

या घटनेमुळे संपूर्ण सांगली तालुक्यात खळबळ उडाली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. ही घटना अत्यंत गंभीर आणि धक्कादायक असल्याचं सांगतानाच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर शिवसेना प्रवक्त्या, आमदार नीलम गोऱ्हे यांनीही या घटनेचा निषेध नोंदवला आहे. आरोपींना अटक करावी अशी मागणी करतानाच महिला दक्षता समित्या आणखी सक्षम करण्याची सूचनाही त्यांनी केली. मुंबई आणि सांगलीतील आरोपींच्या शिक्षेचं प्रमाण ८ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांवर गेल्याचंही गोऱ्हे यांनी निदर्शनास आणून दिलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात एक ठार

$
0
0

खोराटवाडीनजीक

अपघातात एकाचा मृत्यू

म. टा. वृत्तसेवा, आजरा

आजरा-गडहिंग्लज मार्गावर खोराटवाडीनजिकच्या वळणावर काल रात्री एकाचा दुचाकीवरून घसरून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. सुनील शंकरराव शिंदे (वय ४२, रा. तुळजाभवानी कॉलनी, आजरा) असे त्यांचे नाव आहे. गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याची नोंद आजरा पोलिसात झाली आहे. सुनील हे गडहिंग्लज येथील साखर कारखाना कार्यालयात कामास होते. काल सायंकाळी ते गडहिंग्लजवरून आजऱ्याकडे येत असताना खोराटवाडीनजिकच्या वळणावर त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना तातडीने गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सुनील हे येथील पेन्शनर्स संघटनेचे नेते व सामाजिक कार्यकर्ते शंकरराव शिंदे यांचा कनिष्ठ चिरंजीव. त्यांच्या अपघाती निधनाने शिंदे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात वडील, भाऊ, पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. आज सकाळी त्यांच्यावर आजरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पांडुरंग दोरुगडे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळंदगेला पाणीयोजना मंजूर

$
0
0

तळंदगे पाणी योजनेसाठी

सव्वा कोटी रुपये मंजूर

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

तळंदगे (ता. हातकणंगले) या गावासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. योजनेच्या प्राथमिक टप्प्यासाठी सव्वा कोटी रुपयांचा निधीही तत्काळ मंजूर झाल्याची माहिती हुपरीच्या जिल्हा परिषद सदस्या स्मिता शेंडूरे यांनी दिली.

तळंदगेमध्ये ही स्वतंत्र योजना कार्यन्वित होणार आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल निधीतून योजना मंजूर झाली आहे. यासाठी अनेकवेळा जिल्हा परिषदेमध्ये मागणी करून मंत्रालयात पाठपुरावाही केला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील,आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, जनता उद्योग समुहाचे नेते आण्णासाहेब शेंडूरे, वीरकुमार शेंडूरे यांच्यासह तळंदगेच्या सरपंच जयश्री भोजकर यांच्यासह सर्वांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ही मंजूर केली आहे. याबाबतचे पत्र नुकतेच जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्याचे शेंडूरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन फसवणूकप्रकरणी दिल्लीच्या महिलेला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सोने, महागडया वस्तू असे बक्षीस लागले आहे', असे अमिष दाखवून जाळ्यात ओढणारी आणि पैसे ऑनलाइन ट्रान्स्फर करुन घेणाऱ्या टोळीतील संशयित महिला लक्ष्मी छबीलाल गुरुंग (वय ४२ रा. डब्ल्यू गरीब वस्ती,रामारोड, मोतीनगर, दिल्ली) हिला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. या महिलेने कोल्हापुरातील एका शिक्षिकेला बक्षीस लागल्याचे अमिष दाखवून ५ लाख २९ हजार रुपयांचा गंडा घातला होता. न्यायालयाने संशयित आरोपी महिलेला १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

गेल्या आठवड्यात एका शिक्षिकेला या संशयित महिलेने ५ लाख २९ हजार रुपयांना फसवले होता. या शिक्षिकेला दिल्ली येथून मोबाइलवरुन आलेल्या फोनवर तुमचा मोबाइल क्रमांक लकी ठरला असून दागिने, महागड्या वस्तू बक्षीस म्हणून दिल्या जाणार असल्याचे आमिष दाखविले होते. संबधित शिक्षिकेने फेसबुकवरील जाहिरातीनुसार भेटवस्तूसाठी ऑनलाइन पैसे भरले होते. भेटवस्तू इंदिरा गांधी एअरपोर्ट येथे आल्या असून अबकारी करासाठी ऑनलाइन पैसे भरण्याचे सांगितले होते. त्यासाठी वेळोवेळी शिक्षिकेकडून पैसे उकळले होते. मात्र एकही वस्तू मिळाली नसल्याने संबंधित शिक्षिकेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने शाहूपुरी पोलिसांत २७ जुलै २०१८ रोजी तक्रार दाखल केली होती.

या प्रकरणी पोलिसांनी शिक्षिकेने पैसे भरलेल्या बँकेच्या डिटेल्सवरुन संबधित बँकांशी पत्रव्यवहार करुन विविध बँकांतील लाभार्थी खाती बंद केली. दिल्ली येथील किर्तीनगर पोलिस ठाणे आणि बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांना फसवणूक झाल्याची माहिती दिली. शिक्षिकेच्या खात्यावरुन पैसे काढण्यास कोणी आल्यास पोलिसांना सूचना करण्यास सांगितले. ३१ जुलै रोजी दिल्ली येथील एका बँकेच्या शाखेत 'ती' संशयित महिला शिक्षिकेच्या खात्यातील पैसे काढण्यासाठी आल्यानंतर बँक व्यवस्थापकांनी किर्तीनगर पोलिसांना क‌ळविले. त्यांनी या महिलेला तत्काळ अटक केली. तिला न्यायालयासमोर हजर केले असता किर्तीनगर पोलिसांना या महिलेचा ताबा शाहुपूरी पोलिसांना देण्याचे आदेश दिले. शाहुपूरी पोलिसांनी गुरुवारी या संशयित महिलेला न्यायालयासमोर हजर केले असता १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

.

कोट

'सायबर क्षेत्रात 'फिशींग' नावाने ओळखल्या जाणाऱ्या या गुन्ह्याची उकल झाली आहे. वेगवेगळ्या नावाने वेगवेगळी अकाउंट, बनावट सिमकार्ड वापरुन केलेल्या गुन्ह्याचा शोध सायबर सेलने घेतला . फेसबुक आणि व्हॉटसअॅपवर जाहिरात करुन या महिलेने अनेकांना जाळ्यात ओढल्याचा प्रकार तपासात पुढे येत आहे. या प्रकाराची फसवणूक करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी विविध राज्यात पथके रवाना करण्यात येणार आहेत.

संजय मोरे, पोलिस निरीक्षक,शाहूपुरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविध संस्थांचा पाठिंब्याने आंदोलनाला धार

$
0
0

राष्ट्रीय महामार्गावर आज रास्ता रोको

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळ शिरगाव परिसरातील सात गावांतील कार्यकर्त्यांकडून शुक्रवारी (ता. ३) पुणे बेंगळुरु महामार्गावर मराठा आरक्षण मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, दसरा चौकातील सकल मराठा संघाच्या ठिय्या आंदोलनाला उपनगरासह विविध संस्थांचा पाठिंबा मिळत असल्याने आंदोलनाला धार चढली आहे.

करवीर तालुक्यातील कणेरी, कणेरीवाडी, गोकुळ शिरगाव, कोगील खुर्द, कोगील बुद्रुक, विकासवाडी, नेर्ली तामगाव या गावातील सकल मराठा समाजाच्यावतीने शुक्रवारी सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तर दसरा चौकातील सकल मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनाला उपनगरे व शहराजवळील गावांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. पाचगाव, मोरेवाडी या गावात कडकडीत बंद पाळून आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. तसेच मुडशिंगी, दऱ्याचे वडगाव येथील ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. शुक्रवार पेठ जैन मठ येथील लक्ष्मीसेन महाराजांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. तसेच महानगरपालिकेतील काँग्रेस गटनेते नगरसेवक शारंगधर देशमुख, राहुल माने, संजय मोहिते, प्रविण केसरकर, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, इंद्रजित बोंद्रे, अशफाक आजरेकर, सुयोग मगदूम यांनी ठिय्या आंदोलनात भाग घेतला. तसेच माजी आमदार सुरेश साळोखे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी आंदोलनास्थळी भेट देऊन राज्य सरकार मराठा आरक्षणप्रश्नी वेळ काढूपणा करत असल्याची टीका केली.

पाठिंबा देणाऱ्या संस्थां

ग्रामपंचायत पाचगाव, ग्रामपंचायत मोरेवाडी, ग्रामपंचायत मुडशिंगी, बहुजन क्रांती मोर्चा, वीरशैव कक्कया व चर्मकार समाज, लाल निशान पक्ष, जनता दल सेक्युलर, जिल्हा जंगम पुरोहित सेवा संस्था, क्षत्रिय मराठा मेडिको चेंबर ऑफ कॉमर्स, शिवाजी विद्यापीठ प्राध्यापक संघ, राधानगरी तालुका गुरव समाज, जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटना, तुळजाभवानी सहकारी गृहनिर्माण संस्था, जिल्हा वसुली अधिकारी सेवा संस्था, कोल्हापूर सिंधी संस्था, पाटोळे तालीम मंडळ, हिंदू एकता आंदोलन.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साकारले पहिले मराठा वसतिगृह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सदरबाजार परिसरातील शाहू कॉलेजजवळ सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी निवासस्थानाच्या इमारतीमध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तयार करण्यात आले आहे. त्यासाठी जुन्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी मूलभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. वसतिगृहाचे उदघाटन आज (शुक्रवारी) दुपारी साडेतीन वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. मराठा विद्यार्थ्यांसाठी सुरू होणारे राज्यातील हे पहिले वसतिगृह ठरणार आहे.

मराठा समाज आरक्षणासाठी दोन वर्षांपासून सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. आरक्षण देण्यास विलंब होत असल्याने समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे तातडीने दिलासा देण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी विशेष पुढाकार घेत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्याची घोषणा केली. २६ जुलै रोजी कोल्हापुरात पहिले वसतिगृह सुरू करण्याचे नियोजन केले होते. मात्र हा मुहूर्त टळला. वसतिगृहासाठीच्या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याने शुक्रवारी उदघाटन होणार आहे. पहिल्या टप्यात २२ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. इमारतीची एकूण क्षमता ७२ विद्यार्थ्यांची आहे. स्वयंसेवी संस्थेस वसतीगृह चालविण्यास देण्यात आले आहे.

वसतिगृहातात प्रवेशसाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नावे नोंदवली आहेत. सरकारच्या निकषानुसार पात्र विद्यार्थ्यांची निवड जिल्हा व्यावसायिक शिक्षण प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे. वसतिगृह इमारतीच्या क्षमतेनुसार नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे अवघड आहे. त्यामुळे आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मराठा समाजातील व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात येत आहे. त्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यासंबंधी निर्णय घेण्यात येणार असल्याचे, प्रशासनातर्फे सांगितले. दरम्यान, विद्यार्थ्यांना निवासासाठी आवश्यक असलेल्या सर्व सेवा, सुविधा निर्माण केल्या आहेत. प्रचंड प्रमाणात पडझड झालेल्या इमारतीची ६० दिवसांत डागडुजी करण्यात आली. खिडक्या, दरवाजे, फरशासह इतर साहित्य नव्याने बसविले आहे. यामुळे इमारतीचा पूर्णपणे लूक बदलला आहे. वसतिगृहाभोवती स्वतंत्र संरक्षक भिंत बांधण्यात येत आहे. एक खासगी सुरक्षा रक्षक २४ तास तैनात असणार आहे.

मार्गदर्शन केंद्र

वसतिगृहातील तळमजल्यावर विद्यार्थ्यांना करिअर, व्यक्तीमत्व विकासासंबंधी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तेथे विद्यार्थ्यांना करिअरसंबंधी मोफत मार्गदर्शन मिळणार आहे. वसतिगृहात मोफत निवासाची सोय असली तरी भोजनाची व्यवस्था विद्यार्थ्यांना स्वत:च्या पातळीवर करावी लागणार आहे. उद्घाटनादिवशीच राहण्यासाठी प्रवेश देण्यासाठी प्रातिनिधीक स्वरुपात पाच विद्यार्थ्यांची निवड केली आहे.

बदलला चेहरा-मोहरा

या इमारतीची देखभाल, दुरुस्ती गेले अनेक वर्षे केलेली नव्हती. अनेक वर्षे तेथे कोणी अधिकारीही राहत नव्हते. त्यामुळे इमारतीचा केवळ सांगाडाच शिल्लक राहिला होता. चोरट्यांनी शौचालयातील भांड्यासह जे काढून नेणे शक्य होते, ते सर्व नेले होते. अशा अवस्थेतील इमारतीच्या चारही मजल्यावरील खोल्या अवैध धंद्यांचे अड्डे बनले होते. दारू, जुगारासह ओल्या पार्ट्याही रोज झडत होत्या. यामुळेच सुरुवातीला इमारत नूतनीकरण, डागडुजीच्या कामाला काही मद्यपींकडून अडथळा आणला गेला. नूतनीकरण करणाऱ्या ठेकेदाराने पोलिसांची मदत घेत दोन महिन्यांत रात्रंदिवस काम केले. इमारतीचा चेहरा, मोहरा बदलला.

वसतिगृहासाठी इमारतीचे नूतनीकरण केले आहे. वसतिगृहात राहण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व मूलभूत सेवा, सुविधा दर्जेदार निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. शुक्रवारपासून वसतिगृह अधिकृतपणे सुरू होईल.

- अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभारी सीईओपदी आर. पी. शिवदास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा प्रभारी कार्यभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास यांच्याकडे सोपविला. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून या संदर्भात गुरुवारी आदेश निघाला. यापूर्वीचे सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली आहे. त्यानंतर ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या सुषमा देसाई यांची प्रभारी सीईओपदी नियुक्ती झाली.

दरम्यान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला. त्य रिक्त जागेवर शिवदास यांची बदली झाली. सेवाज्येष्ठतेनुसार शिवदास यांच्याकडे सीईओपदाचा प्रभारी कार्यभारही सोपविला आहे. दरम्यान खेमनार यांची बदली होऊन तीन आठवड्याचा कालावधी झाला. अजूनही मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियमित व पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती झाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंतप्रधानांच्या भेटीने मुले भारावली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तीस शाळकरी मुला मुलींनी बुधवारी विमानातून दिल्ली गाठली. विमान प्रवासाच्या आनंदाच्या हिंदोळ्यावर झुलत असताना गुरुवारी या विद्यार्थ्यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी मराठीतून साधलेला संवाद, आपुलकीने केलेली चौकशीने सारे मुले भारावून गेली.

खासदार धनंजय महाडिक यांच्या अभिनव संकल्पनेनुसार 'तुमच्या मनातील प्रश्न पाठवा आणि दिल्लीला चला' असा उपक्रम राबविला होता. त्या उपक्रमांतर्गत जवळपास ९५०० हजार प्रश्न खासदार महाडिकांकडे जमा झाले. त्यापैकी शिक्षकांच्या समितीने २००० प्रश्नांची निवड केली. अंतिमत २५० विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन ३० विद्यार्थ्यांची दिल्ली दौऱ्यासाठी निवड केली. ग्रामीण भागातील निवडक मुलांना दिल्ली प्रवासाचा योग घडला. बुधवारी या साऱ्या विद्यार्थ्यांना विमानातून दिल्लीला नेले.

विमान प्रवास करताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता. दिल्लीत पोहचल्यानंतर खासदार महाडिकांने सगळ्या मुलांचे स्वागत केले. त्यांच्या सोबत संसदेचे कामकाज, राष्ट्रपती भवन पाहताना मुलांच्या आनंदाला पारावर राहिला नाही.यानंतर पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी मुलांशी मराठीत संवाद साधला. तसेच महाडिकांच्या 'मनातील प्रश्न विचार, दिल्लीला चला' या संकल्पनेचे कौतुकही केले. यानंतर लोकसभा वाहिनीसाठी कोल्हापुरातील ३० मुलांची विशेष मुलाखती घेतली. ही मुलाखत लवकरच लोकसभा चॅनेलवरुन प्रसारित होणार आहे. हा दिल्ली प्रवास अविस्मरणीय असल्याच्या भावना विद्यार्थ्यांच्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजारामपुरी परिसरात बसविणार सीसीटीव्ही

$
0
0

कोल्हापूर

येत्या गणेशोत्सव काळात राजारामपुरी परिसरात २२ ठिकाणी ६९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असल्याची माहिती राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक औंदुबर पाटील यांनी दिली. राजारापुरीतील परिसर हा संवेदनशील परिसर आहे. उत्सव काळात अनेक ठिकाणी हुल्लडबाजी केली जाते. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संवेदनशील २२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. त्यासाठी सुमारे ८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. स्थानिक नगरसेवक, सार्वजनिक तरुण मंडळे आणि दानशूर व्यक्तींकडून सहकार्य घेतले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जवान बेपत्ता

$
0
0

सातारा : भारतीय सैन्य दलात असलेले सचिन मानाजी पवार (वय ३२, मूळ गाव रा. वाठार कि. ता. कोरेगाव) हे २९ जुलै रोजी सातारा मध्यवर्ती बसस्थानकातून बेपत्ता झाले असल्याची तक्रार त्यांचे भाऊ महेश पवार यांनी दिली आहे. सचिन पवार यांचे सध्या काश्मीर येथे नेमणूक असून, ते २३ जुलै रोजी सुट्टीसाठी गावी आले होते. पाच दिवसांची सुट्टी झाल्यानंतर त्यांना पुणे येथे कोर्ससाठी जायचे होते. त्यासाठी वाठार किरोली येथून सचिन यांचे भाऊ महेश हे त्यांना सोडण्यासाठी सातारा बसस्थानक येथे आले होते. परंतु, गाडी पार्क करेपर्यंत जवान सचिन पवार तेथून निघून गेले. मात्र, ते पुण्यात पोचले नसल्याचे कळाल्यानंतर कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, जवान सचिन कुठेच सापडले नसल्याने अखेर महेश पवार यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रारी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images