Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कारवरील हल्ला IRB कर्मचा-यांकडूनच

$
0
0
निवृत्ती चौकात २९ नोव्हेंबर रोजी झालेल्या कारवरील हल्ल्यात आयआरबीच्या चेतन रमेश मोहिते (वय २९, रा. टिंबर मार्केट) व रमेश हणमंत पाथरवट (वय २०, रा. गंजीमाळ, संभाजीनगर) या दोन कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

आघाडी धर्माला काँग्रेसकडून हरताळ

$
0
0
‘आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाचा चेहरा लाभलेला व सक्षम उमेदवार द्या, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी असूनही काँग्रेसकडून आघाडी धर्म पाळला जात नाही, निवडणुकीत काँग्रेसकडून राष्ट्रवादीला मदत होत नाही,’ असा तक्रारींचा पाढाच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे महासमन्वयक वसंतराव वाणी व पक्ष निरीक्षक दिलीप पाटील यांच्यासमोर वाचला.

‘अलमट्टी’: शिवसेनेचा इचलकरंजीत मोर्चा

$
0
0
केंद्रीय लवाद समितीने अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढविण्याबाबत परवानगी दिली असल्याने कृष्णा-पंचगंगा नदी खोऱ्यात महापूराचा धोका निर्माण होणार आहे. ही स्थिती लक्षात घेऊन धरणाची उंची कमी करण्याबाबत सरकारने ठोस पावले उचलावीत, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

आंधळे प्रशासन, बेजबाबदार पदाधिकारी

$
0
0
रस्त्यांची प्रचंड झालेली दुरवस्था पाहू न शकणाऱ्या महापालिकेच्या आंधळ्या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने डोळ्यावर पट्ट्या बांधून दाभोळकर चौक ते आदित्य कॉर्नर रस्त्यावर मोर्चा काढला. सत्ता आल्यानंतर कोल्हापूरचे नंदनवन करण्याच्या वल्गना करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनीही शहरवासियांना फसवल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

उचंगी प्रकल्प रखडला

$
0
0
आजरा तालुक्यातील बहुचर्चित उचंगी प्रकल्पाला पूनर्वसन विभागाच्या धिम्या गतीचा फटका बसला आहे. प्रकल्पग्रस्तांचे न्याय्य पुनर्वसन गतीने करण्यात प्रशासनाला आलेले अपयश आणि परिसरातील राजकारण्यांची सरड्याप्रमाणे रंग बदलण्याची वृत्ती कायम राहिल्यास प्रकल्प पूर्ण होण्यास किती वर्षे लागतील याचा नेम नाही.

मंडलिकांना पुन्हा राष्ट्रवादीत आणणार

$
0
0
गेल्या लोकसभा निवडणुकीत बंडाचा झेंडा उभारून निवडून आलेल्या खासदार सदाशिवराव मंडलिक यांना पुन्हा राष्ट्रवादीत आणण्यासाठी पक्षीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार मं​डलिक जुने मित्र आहेत.

‘वंदे मातरम्’बाबत गळचेपीचे धोरण

$
0
0
‘अजूनही देशात खोटा इतिहास शिकविला जातो. लोकशाहीचे नाव घेत संत, महापुरुषांचे विचारही पुस्तकातून गायब झाले. ‘वंदे मातरम्’बाबतही गळचेपीचे धोरण राबविले गेले. मूठभर लोकांच्या स्वार्थासाठीच राष्ट्रमंत्र बनलेले वंदे मातरम् देशाचे राष्ट्रीय गीत होऊ शकले नाही,’ अशी खंत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली.

शाहू समाधीसाठी सर्व सहकार्य करू!

$
0
0
राजर्षी शाहू महाराजांची समाधी बांधण्याचे काम नर्सरीबागेत सुरू आहे. हे काम उत्तम पद्धतीने आणि वेळेत पूर्ण व्हावे अशी अपेक्षा श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी व्यक्त केली. समाधीसाठी संपूर्ण सहकार्य असल्याचे त्यांनी सांगितले. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या हयातीतच त्यांची समाधी कोठे बांधली जावी या संदर्भात ठराव केला होता.

‘चित्रशारदा’ पुन्हा नव्याने भेटीला

$
0
0
कधी चित्रपट महामंडळाच्या समारंभानिमित्त तर कधी सिनेमा व्यवसायाच्या वर्धापनदिनानिमित्त प्रकाशित होणारी ‘चित्रशारदा’ आता दर तीन महिन्यांनी वाचकांच्या भेटीस येणार आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीने ‘चित्रशारदा’ त्रैमासिक प्रकाशनात सातत्य ठेवण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

खड्‍डयांचा दणका राहणारच

$
0
0
नगरोत्थान योजनेतून केल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या कामांसाठी कंत्राटदार नेमणुकीसाठी घातलेल्या अटी फेरटेंडरमध्ये कायम ठेवल्याने नगरोत्थानच्या रस्त्यांचे काम रखडण्याची शक्यता आहे. टेंडरमध्ये सहभागी होण्यात स्थानिक कंत्राटदारांना या अटी अडचणीच्या ठरणार असल्याने त्यासाठी मंगळवारी (३ डिसेंबर) प्रशासन व स्थानिक कंत्राटदारांची बैठक होणार आहे.

परप्रांतीयांकडून फसवणूक

$
0
0
रेल्वेत ‘टीसी’ म्हणून नोकरी लावण्याच्या अमिषाने कोलकाता येथील भामट्यांनी कराड शहर परिसरातील तीन युवकांना चार लाखांचा गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसवणूक झालेल्या युवकांनी सोमवारी रात्री उशीरा शहर पोलिसांत फिर्याद दिली.

मुद्रांक शुल्काच्या २ कोटींची प्रतीक्षा

$
0
0
गेले सहा महिने मुद्रांक शुल्काची आकारणी सुरू आहे. परंतु, एक टक्क्याप्रमाणे महापालिकेला द्यावयाची १ कोटी ९३ लाख रुपये रक्कम अद्याप मिळाली नाही, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली. राज्य सरकारने दस्तऐवज नोंदणीसाठी एक टक्का जादा मुद्रांक शुल्कची आकारणी करण्याचा निर्णय घेतला.

वाईत स्वाइन फ्ल्यू संशयिताचा बळी

$
0
0
व्याजवाडी (ता. वाई) येथील अरविंद मारुती पिसाळ (वय ४४) यांचा रविवारी रात्री थंडी तापाने मृत्यू झाला. अरविंद पिसाळ यांची भावजय सुरेखा रामदास पिसाळ (वय ३५) यांचाही दहा दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने मृत्यू झाला होता. हे दोन्ही मृत्यू स्वाइन फ्ल्यूने झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

७ लाखांचा अंकलगीचा अपहार

$
0
0
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे निलंबित कर्मचारी अमर अंकलगी याच्याकडील पावती पुस्तकांच्या तपासणीत ६ लाख ९२ हजार १५८ रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही रक्कम २०१०-११, २०११-१२ आणि २०१२-१३ या तीन वर्षांतील आहे. आणखी दोन वर्षांतील पावती पुस्तकांची तपासणी पूर्ण झालेली नाही.

परवाना, नोंदणीची बचतगटांना सक्ती

$
0
0
शाळांना पोषण आहार पुरवणाऱ्या तसेच खाद्य पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या सर्व महिला बचत गटांना यापुढे अन्न व औषध विभागाचा परवाना आणि नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे.

​औद्योगिक संघटनांचा टोलला विरोध

$
0
0
टोल विरोधी कृती समितीने सुरू केलेल्या टोल विरोधी आंदोलनाला सर्व औद्योगिक संघटनांनी सक्रिय पाठिंबा जाहीर केला असून टोल न भरण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला.

‘बार्टी’चे जानेवारीत विद्यार्थी मिशन

$
0
0
व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेशित आणि अकरावी, बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची कास्ट व्हॅलिडीटी वेगात होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने (बार्टी) जातवैधता प्रमाणपत्राचे विद्यार्थी मिशन हाती घेतले आहे.

जुना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद

$
0
0
नवीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प होईपर्यंत जुन्या प्रकल्पातूनच सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाईल, अशी महापालिका हमी देत आहे. मात्र, तो प्रकल्प बंद असल्याने प्रक्रियेसाठी सक्षम नसल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सोमवारी निदर्शनास आले.

इंटरनॅशनल ट्रेड, कोल्हापुरी पदार्थांना मागणी

$
0
0
दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअरमधील स्वयंसहाय्यता बचत गटांच्या प्रदर्शनात हुपरीतील व्हाइट मेटल दागिने, कोल्हापुरी चटणी आणि मसाले तसेच कोल्हापुरी चपलने बाजी मारली.

एकट्या महिलांसाठी निवारा मोहीम

$
0
0
विविध कारणांमुळे एकटेपणाचे जीवन जगणाऱ्या महिलांच्या सुरक्षित निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एकटी या संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या कार्यशाळेत निवारा मोहिम सुरू करण्याचा निर्धार केला.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images