Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

हेल्पलाइन कोट : डॉ. जयसिंगराव पवार

0
0

' अनंत अडचणींतून मार्ग काढून अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात. गुणवत्ता आहे, मात्र केवळ पैसे नसल्याने शिक्षण घेता येत नाही. त्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी एकत्र येऊन मदत करण्याची गरज आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'कडून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सुरु असलेला उपक्रम अनुकरणीय आहे. एक चांगला विचार समाजापुढे मांडला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गरीबांच्या शिक्षणासाठी सातत्याने आग्रह धरला. हा महापुरुषांचा विचार प्रत्येकाने अंमलात आणला पाहिजे. अनेक महापुरुषांच्या जयंती साजरी करतो. जयंती साजरी करण्यासह त्यांचे विचार प्रत्यक्ष अंमलात आणले पाहिजेत. आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक बनतील. दानशूरांनी गरीब विद्यार्थ्यांना मदत केल्यास शिक्षणाची ज्ञानगंगा त्यांच्यापर्यंत पोहचू शकेल.

डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ इतिहास संशोधक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मधुमेहा’ वर कोट्यवधींची उलाढाल

0
0

जिल्ह्याला मधुमेहाचा विळखा घट्ट, परिस्थिती चिंताजनक

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet-sachinpMT

गतिमान शहरीकरणाकडे वाटचाल सुरु असलेले कोल्हापूरकर मधुमेहाच्या विळख्यात अडकले जात असून मधुमेहाच्या औषधांवर कोल्हापूर जिल्ह्यात दरमहा साडेतीन कोटी रुपये खर्च होत आहे. शहरात महिन्याला २० ते २२ लाख रुपयांच्या मधुमेहावरील औषधांची विक्री होते, तर कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यात दर महिन्याला तब्बल आठ कोटींची औषध विक्री होत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

बदलती जीवनशैली, रोजच्या जगण्यात वाढलेला ताणतणाव, आहाराच्या चुकीच्या व अनियमित सवयींमुळे विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. श्रीमंताचा रोग समजला जाणारा मधुमेह सामन्यांच्या दारापर्यंत पोहचला आहे. ऐंशीच्या दशकात साठीत आढळणारा मधुमेह नव्वदीच्या दशकात पन्नाशीत पोहचला तर एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर तो वयाच्या तिशीत पोहचला आहे. जन्माला येणाऱ्या लहान मुलांतदेखील मधुमेह आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. मधुमेहाच्या रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक असून ही धोक्याची घंटा मानली जात आहे. सध्या मधुमेहाची नवनवीन औषधे बाजारपेठेत उपलब्ध होत आहेत. या औषधात इन्सुलिन आणि गोळ्यांचा समावेश होतो. सद्यस्थितीत इन्सुलिनचे नऊ प्रकार व गोळ्यांचे बारा ते तेरा प्रकार बाजारपेठेत मिळतात. इन्सुलिनमध्ये 'ह्युमन इन्सुलिन' हा औषध प्रकार असून यामध्ये तत्काळ आणि जास्त काळ परिणाम करणारे प्रकार असतात. तसेच वेगवेगळे तयार कॉम्बिनेशन्स देखील मिळतात. ह्युमोलॉग्स, ग्लीप्टीन्स, एसजीएलटीटू इनहिबीटस अशी महागडी औषधे उपलब्ध आहेत. औषधांचा मारा होत असला तरी त्याचे शरीरावर विपरीत परिणाम होतात.

पाईंटर

कोल्हापूरकरांत मधुमेहींच्या संख्येत दरवर्षी ५.८ टक्क्यांसह लक्षणीयरीत्या वाढ

दर दहा हजारात लोकसंख्येमागे २३५ रुग्ण मधुमेहाचे

मधुमेही रुग्णात २५ ते ३५ वयोगटातील तरुण आणि महिलांचा समावेश सर्वाधिक

बालकांत वाढते प्रमाण

..................

कोट

'मधुमेहाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. मधुमेहात कोल्हापूरकर आघाडीवर असून त्याबाबत वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे. अनियमित जीवनशैलीमुळे मधुमेहावर होणाऱ्या खर्चात येणाऱ्या दोन ते तीन वर्षात पाचपट वाढ होण्याची शक्यता आहे. मधुमेहाचा वाढता प्रभाव थांबवण्यासाठी आरोग्याकडे सजगतेने पाहणे गरजेचे आहे.

डॉ.प्रल्हाद केळवकर, मधुमेह विकार तज्ज्ञ

............

'गोळ्यांची अॅलर्जी झाल्यानंतर डॉक्टरांकडे गेल्यावर मधुमेह असल्याचे निदान झाले. या गोष्टीमुळे मला जबर धक्का बसला, पण त्याचवेळी मधुमेहावर प्रयत्नपूर्वक मात करण्याचा निर्धार केला. रोज नित्यनियमाने योगा, ध्यानधारणा आणि नियमित दोन तास घाम निघेपर्यंत व्यायाम सुरु केला. काही दिवसानंतर साखर पूर्णत: कमी झाल्याचे निदर्शनास आले. इच्छाशक्ती आणि व्यायामाची जोड दिल्यास मधुमेहावर विजय मिळवता येतो.

जितेंद्र बामणे, मधुमेहावर मात केलेला रूग्ण

................

कोट

'कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मधुमेहाच्या औषधांची सर्वाधिक विक्री होते. तर त्या पाठोपाठ रक्तदाब व हृदयविकारावरील औषधांचा खप अधिक आहे. गेल्या दोन ते तीन वर्षात मधुमेहावरील औषधांची मागणी वाढली आहे. यात अनेक महागड्या औषधांचा समावेश आहे.

मदन पाटील,अध्यक्ष, जिल्हा केमिस्ट असोसिएशन

......................

आवाहन

मधुमेहाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. परंतु योग्य आहार, व्यायाम आणि योग्य जीवनशैली अंगिकारल्यास मधुमेहावर मात करता येते हे सिध्द झाले आहे. अनेकजणांनी मधुमेहाशी लढून त्याच्यावर विजय मिळविला आहे. आपणही मधुमेहावर प्रयत्नपूर्वक मात केली असल्यास आपले अनुभव लिहून 'महाराष्ट्र टाइम्स' कडे पाठवावेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांगलेत एसटी जाळली

0
0

म. टा. वृत्तसेवा, शिराळा

शिराळा तालुक्यातील मांगले येथे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या बंद आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागले. आंदोलकांनी सकाळी दहाच्या सुमारास शिराळा आगाराची वारणानगर-शिराळा बस पेटवून दिली. सकाळी नऊच्या सुमारास तरुणांनी मोटारसायकल रॅली काढली.

दूध संकलन पूर्ण झाल्यानंतर तरुण एकत्र जमण्यास सुरुवात केली. सुरुवातीला शिराळा रस्त्यावर टायर पेटवून वाहतूक बंद करण्यात आली. त्याचवेळी बसस्थानकाजवळील चौकात जमलेले तरुण अचानक आक्रमक झाले. यावेळी वारणानगरहून शिराळ्याकडे जाणारी एसटी बस क्र. एमएच ४०- ८९३१ जमावाने अडवली. प्रवाशी आणि चालक-वाहकांना खाली उतरवून पेटलेल्या टायर बसमध्ये टाकण्यात आल्या. त्यामुळे आगीचा भडका उडाला. हे तरुण एवढे आक्रमक झाले होते की, एसटी जळत असतानाही बसच्या काचा फोडून टाकण्यात आल्या. तासाभराने विश्वास सहकारी साखर कारखान्याची अग्निशमन गाडी आल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. तोपर्यंत एसटी खाक झाली होती. गावात दिवसभर तणावपूर्ण शांतता होती.

याबाबत एसटी चालक जगन्नाथ यमगर यांनी फिर्याद दिली. इस्लामपूरचे पोलिस उपाध्यक्ष किशोर काळे, शिराळ्याचे निरीक्षक स्वनिल धोंगडे, कोकरूडचे सहाक निरीक्षक संजय उबाळे, कुरळपचे सहायक निरीक्षक विवेक पाटील अर्ध्या तासाने घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जमाव पांगला.

दरम्यान सागाव, कोकरूड येथील बंद शांततेत पार पडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू

0
0

सिंगल फोटो...

आजरा : विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने नववीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना उत्तूरमध्ये घडली. आदित्य सुनील कांबळे (वय १५, रा. मिलिंदनगर, उत्तूर) असे त्याचे नाव आहे. कांबळे यांच्या घराचे काम सुरू आहे. पावसाचे साचलेले पाणी काढण्यासाठी मोटर लावली होती. वीजपुरवठा खंडित झाल्याने आदित्य पाण्यात उतरला होता. त्याचवेळी अचानक वीजपुरवठा सुरू झाल्याने आदित्यला विजेचा जोरदार धक्का बसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. विजेच्या मोटरच्या तारेचा स्पर्श आदित्यला झाल्याने तो बाजूला फेकला गेला. त्याला गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आजरा पोलिसांत नांद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२ कोटींसाठी तिनं स्वतःच्याच मुलाला लपवलं

0
0

पतीची पत्नी,सासू-सासऱ्या विरुध्द तक्रार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पतीकडून दोन कोटींची खंडणी उकळण्यासाठी पत्नीनेच स्वत:चा मुलगा लपवून ठेवल्याचा प्रकार राजारामपुरी येथे बुधवारी रात्री घडला. या प्रकरणी पत्नीसह पाचजणांवर राजारामपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पती गिरीश प्रकाश भंडारे (वय ३५, रा. घर क्रमांक १७७८, बी, २ ई वॉर्ड, राजारामपुरी दुसरी गल्ली) यांनी या प्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पत्नी सुप्रिया गिरीश भंडारे (वय ३३), सासरे मोहन बाळकृष्ण मांगलेकर (वय ७०), सासू सुनिता मोहन मांगलेकर (वय ६८), मेव्हणा स्वप्नील मोहन मांगलेकर (वय ३३), भावजय वीणा स्वप्नील मांगलेकर (वय ३३, सर्व रा.चंद्रभागा बंगला, जयभवानी कॉलनी, फुलेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

फुलेवाडी येथे राहणाऱ्या सुप्रिया व राजारामपुरी येथील गिरीश यांचा ४ फेब्रुवारी २००७ मध्ये प्रेमविवाह झाला. त्यांना एक वर्षाचा शौर्य नावाचा मुलगा आहे. मात्र गेल्या पाच वर्षांपासून या दाम्पत्यात वाद निर्माण झाल्याने सुप्रिया माहेरीच असते. तरीही दोघांत वाद होत असल्याने प्रकरण न्यायालयात गेले. पती गिरीश हा मुलगा शौर्य याला भेटण्यासाठी राजारामपुरी येथे गेल्यानंतर लपवून ठेवण्यात येत असे. अनेकदा त्याला वडिलांची भेटही होऊ दिली नाही. हा प्रकार अनेकदा झाला असल्याने गिरीश यांनी संबधित प्रकाराची माहिती देऊन न्यायालयात तक्रार दाखल केली. दोन कोटी रुपये उकळण्यासाठी मुलगा शौर्यला भेटू दिले जात नाही. तसेच पत्नीसह तिला सहकार्य करणाऱ्यांनी सुझुकी (एम. एच ०९, डी एच ६९३०) ही दुचाकी वाहनही लपवून ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गिरीश यांनी केलेल्या तक्रारीनुसार न्यायालयाने राजारामपुरी पोलिसांनी तपास करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हार,भेटवस्तूंना फाटा देत मदत

0
0

लोगो : शुभवार्ता

अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त प्राध्यापकाचा अनोखा उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वाढदिवसानिमित्त स्नेहीजणांकडून शुभेच्छांच्या स्वरुपात हार, बुके, भेटवस्तूंचा वर्षाव होता. अमृत महोत्सवी वाढदिवस म्हटला की त्या कार्यक्रमाचा थाटमाट आणखी वाढतो. मात्र भेटवस्तू आणि हार स्वरुपात शुभेच्छा न देता तीच रक्कम सामाजिक संस्थेच्या मदतीसाठी जमा करण्याचे आवाहन केले. आणि त्या माध्यमातून अडीच तीन-तासात ७५ हजार रुपये संकलित झाले. त्या निधीत स्वत:कडील २५ हजार रुपये जमा करून अंध, अपंग, कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी काम करणाऱ्या संस्था व गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हातभार देण्याचा अनोखा उपक्रम निवृत्त प्रा. एल. एस. खोत यांनी राबविला.

येथील कॉमर्स कॉलेजमधील माजी जिमखाना विभागप्रमुख प्रा. एल. एस. खोत यांचा ७५ वा वाढदिवस नुकताच साजरा झाला. खोत हे मूळचे कारदगा येथील आहेत. शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने गेल्या ५८ वर्षापासून त्यांचे कोल्हापुरात वास्तव्य आहे. अमृत महोत्सवी वाढदिनाचे औचित्य साधून प्रा. खोत यांनी लिहिलेल्या 'माझी जीवनगाथा' या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. मराठी आणि इंग्रजी भाषेत पुस्तकाची निर्मिती केली आहे.

ताराराणी विद्यापीठ परिसरातील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृह येथे अमृत महोत्सवानिमित्त समारंभ आयोजित केला होता. व्यासपीठावर अनाथ, अपंग आणि कॅन्सरग्रस्तांसाठी काम करणाऱ्या संस्थांना आर्थिक मदत करावी, असे आवाहन करणारे फलक आणि पैसे संकलनासाठी तीन भरण्या ठेवल्या होत्या. प्रा. खोत यांच्या स्नेहीजणांनी व माजी विद्यार्थ्यांनी त्या आवाहनाला प्रतिसाद दिला. हार, बुके आणि भेटवस्तू न देता प्रत्येकाने आपआपल्यापरीने रोख व धनादेश देऊन आर्थिक मदत केली. तीन तासाच्या कार्यक्रमात सुमारे ७५ हजार रुपये जमले. यामध्ये २५ हजाराची भर घालून तीन संस्थांना प्रत्येकी ३३,३३३ रूपये देण्याचा निर्णय खोत यांनी घेतला आहे.

'बुके नको, सामाजिक संस्थांना मदत करा'या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला. संकलित ७५ हजार रुपयांत माझ्याकडील २५ हजार रुपये जमा केले. या रकमेचा विनियोग गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी केला जाईल. गरीब रुग्णांच्या वैद्यकीय मदतीसाठी काही रक्कम शिल्लक ठेवली आहे. तसेच अंध, अपंग व कॅन्सरग्रस्तांसाठी कार्यरत तीन संस्थांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा धनादेश दिला जाईल. समाजाकडून जमलेली रक्कम समाजहितासाठी खर्च व्हावी हा उद्देश आहे.

प्रा. एल. एस. खोत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्लिम समाज करणार एक ऑगस्टला ठिय्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दसरा चौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात जिल्ह्यातील समस्त मुस्लिम समाज बुधवारी एक ऑगस्ट रोजी सहभागी होणार आहे. मुस्लिम बोर्डिंगमध्ये शुक्रवारी झालेल्या बैठकीत आंदोलनात सहभागाचा निर्णय घेण्यात आला. दी मोहामेडन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आदिल फरास, चेअरमन गणी आजरेकर, सुपरिटेंड कादर मलबारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देऊन सर्वोतोपरी सहकार्याचे आवाहन करण्यात आले. एक ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्हा समस्त मुस्लिम समाजाच्या बॅनरखाली आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला संचालक साजिद खान, रफिक शेख, पापाभाई बागवान, लियाकत मुजावर, हमजेखान शिंदी, जहाँगिर अत्तार, रफिक मुल्ला, फारुख पटवेगार, मलिक बागवान, अस्लम मोमीन, महमंदशरिफ शेख, इकबाल उमराणी, अजीज जमादार, असिफ कुरेशी, इस्माईल शेख, गौसखान पठाण, यासिन उस्ताद, मुनाफ देसाई आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारविरोधात कार्यकर्त्यांचे मुंडण

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा समाजाचे आंदोलन भडकावणाऱ्यांचे रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे असे वक्तव्य करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांची नावे जाहीर करावेत', असे आव्हान सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोलकांनी शुक्रवारी दिले. दसरा चौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनावेळी पालकमंत्र्यांचा निषेधही करण्यात आला. आंदोलनाला पाठिंबा वाढत असून आरक्षण देण्यास दिरंगाई करणाऱ्या सरकारचा तीन कार्यकर्त्यांनी मुंडन करून निषेध केला.

दरम्यान, आमदार हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील, मालोजीराजे यांनी ठिय्या आंदोलनाला आज पाठिंबा दिला. सोमवारी (ता. ३० जुलै) आणि मंगळवारी (ता. ३१ जुलै) कोल्हापुरात होणारा पंचायत राज समितीचा दौरा रद्द करावा अशी मागणी करण्यात आली. पन्हाळा तालुक्यातील वाघवे ग्रामपंचायत समितीचे सदस्य संजय नामदेव सुतार यांनी आंदोलनाला पाठिंबा देऊन ग्रामपंचायतीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीमध्ये वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत मराठा समाजाचे आंदोलन भडकाविणाऱ्यांचे रेकॉर्डिंग सरकारकडे असल्याचा दावा केला. या वक्तव्याचे पडसाद सकल मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनात उमटले. याबाबत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले, 'पालकमंत्री पाटील यांनी आंदोलन पेटवणाऱ्यांचे रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता मराठा समाजाचा राग उफाळला आहे. सरकारला शांतता नको आहे. लोकशाहीवर विश्वास ठेऊन सनदशीर मार्गाने शांततेत आंदोलन सुरू असताना मुख्यमंत्री फडवणीस व पालकमंत्री पाटील भडकावू वक्तव्ये करीत आहेत. आंदोलन भडकावणाऱ्यांचे रेकॉर्डिंग जाहीर करावे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री पाटील हे समन्वयक आहेत. त्यांच्यावर आमचा विश्वास होता. पण गेली चार वर्षे ते आम्हाला झुलवत आहेत. एक वर्षात एकही आश्वासन पूर्ण झाले नसल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. यापुढे मोर्चे शांततेत काढले जाणार नाहीत तर मुंबईत ठोक मोर्चा काढला जाईल.'

वसंतराव मुळीक म्हणाले, 'गेली वीस वर्षे मराठा समाज सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहे. पण आता समाज पेटून उठला आहे. तरुण, महिला रस्त्यावर येत आहेत. या उद्रेकाची जाणीव सरकारने घेण्याची गरज असताना त्यांच्याविरोधात गैरउद्गार काढणे निषेधार्ह आहे. त्यामुळे मराठा समाज आता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरेल आणि सरकारला सळो की पळो करून सोडेल.'

दिलीप देसाई यांनी, 'आंदोलन शांततेत सुरू असताना आंदोलन कोण भडकावत आहेत याचे रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे असे सांगून पालकमंत्री पाटील यांनी आंदोलनाची कुचेष्टा केली आहे' अशी टीका केली.

हर्षल सुर्वे म्हणाले, 'जबाबदार मंत्री असलेल्या पालकमंत्र्यांनी चुकीच्या वक्तव्यांनी ते बेजबाबदार मंत्री आहेत हे दाखवून दिले आहे. आंदोलन भडकावणाऱ्यांची नावे लवकर जाहीर करा, अन्यथा मराठा आंदोलकांची माफी मागा.' सचिन तोडकर यांनी पालकमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास सरकारला घरी जावे लागेल, असे टोला भगवान काटे यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

0
0

गडहिंग्लज : दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील महेंद्र कल्लाप्पा मगदूम (वय ३५) याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. हसूरचंपू रस्त्यावर मगदूम यांची पोल्ट्री आहे. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास पोल्ट्री धुण्यासाठी महेंद्र गेला होता. पोल्ट्री धूत असताना कॉम्प्रेसर शॉर्ट झाल्याने पाण्यात वीजप्रवाह अचानक सुरू झाल्याने महेंद्रचा जागीच मृत्यू झाला. दुपारी चारच्या सुमारास ही बाब निदर्शसनास आली. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा त्याच्यावर दुंडगे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गारगोटीत भरपावसातटेम्पोला अचानक आग

0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

येथील पोलिस क्वार्टरपासून जवळच सालपेवाडी रोडवर रस्त्याच्या कडेला लावलेला टेम्पो अचानक पेटला. टेम्पो तब्बल तीन तास पेटत होता. शुक्रवारी पहाटेच्या वेळी ही घटना घडली. रस्त्याच्या कडेला लावलेला टेम्पो अचानक पेटला कसा? याची चर्चा नागरिकांत होती.

टायर फुटल्याचा आवाज आणि जळलेला वास आल्यानंतर आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. तोवर टेम्पो जळून खाक झाला होता. हा टेम्पो पुठ्ठे, खोकी यांच्या रद्दीचा व्यवसाय करणाऱ्या ननकवा महावीर बेन (रा. गारगोटी) यांच्या मालकीचा होता. त्यांच्या मुलाने रद्दी भरून टेम्पो रात्री या ठिकाणी लावला होता. पहाटे त्यास आग लागली.

काही दिवसांपूर्वी गारगोटीत रद्दी व्यापाऱ्यांमध्ये मोठा वाद झाला होता. त्या वादाचे साक्षीदार असलेल्यांनी सांगितले की, त्या वादातून ही घटना घडलेली नसावी, पण गेल्या आठ-दहा दिवसांपासून अवैद्य धंद्यातील वादातून ही घटना घडल्याची शक्यता काहीजण व्यक्त करत आहेत. पावसाच्या सरी कोसळत असताना थांबलेला टेम्पो पेटतो कसा? असा प्रश्न उपस्थित होत असून, पोलिस क्वार्टरजवळच घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैक्षणिक साहित्य वाटप

0
0

कोल्हापूर: महापालिकेच्या टाकाळा विद्यामंदिर येथे इन्स्पायरिंग यंग इंडियाची १७५ वी कार्यशाळा उत्साहात झाली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना संस्थेचे प्रमुख कृपाल यादव यांनी विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकास आणि इंग्रजी संभाषण कौशल्य प्राप्त करणे आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना इ लर्निंगच्या माध्यमांतूनही मार्गदर्शन केले. ओंकार यादव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना काटकर, महंमद हनिफ खानापुरे, राजीव अंकली आदी उपस्थित होते. किस्कींदा मुंडे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवाच्या तयारीला वेग

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अवघ्या दीड महिन्यांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाहूपुरी, शुक्रवार पेठ, बापट कँप, पापाची तिकटी कुंभार गल्ली, दत्त गल्ली, गंगावेश, दुधाळी, फुलेवाडी परिसर, कळंबा परिसरातील कुंभारवाड्यात मूर्ती बनविण्याचे काम रात्रंदिवस सुरू आहे. बाहेरील जिल्ह्यात मूर्ती पाठविण्याची जय्यत तयारी सुरू आहे.

वेळेत गणेशमूर्ती तयार व्हाव्यात यासाठी कुंभार बांधव प्रयत्नशील करत असून दोन्ही शिफ्टमध्ये काम चालू आहे. तयार झालेल्या मूर्तींना पॉलिशिंग तसेच रंगकाम सुरू झाले आहे. कुंभार गल्लीत प्रत्येकजण मूर्ती बनविण्याच्या कामात व्यस्त असून परगावी पाठविण्यात येणाऱ्या मूर्ती वेळेत पोहोचाव्यात याची काळजी कुंभारबांधवांना लागून राहिली आहे. गेल्या चार महिन्यांपासून मूर्तीकाम सुरू आहे. आता रंगकाम पूर्ण झालेल्या मूर्तींचे पॅकिंग केले जात आहे. मध्यंतरी पावसाचा जोर वाढल्याने काहीकाळ काम मंदावले होते. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे कामाला गती आली आहे.

मालवाहतूक संपाचा परिणाम

शुक्रवारपासून वाहतुकदारांनी संप सुरू केल्याने बाहेरगावी मूर्ती पाठविण्यात अडचणी आल्या आहेत. त्यामुळे नवीन मूर्तींना जागा उपलब्ध होण्यात अडथळे येत आहेत. वाहतूकदार संपकाळात काम मंदावले आहे. प्लास्टर ऑफ परीसची मागणी वाढली असून संपामुळे त्याचा पुरवठा ठप्प झाला आहे. मूर्ती बनविण्याचे काम मंदावल्याने तयार मूर्तींना रंगकाम, कलाकुसरीचे काम चालू आहे.

यंदाही दरवाढ

यंदाही गणेशोत्सवावर महागाईचे सावट आहे. जीएसटी लागू झाल्याने रंग एक लिटरमागे २० ते ३० रुपयांनी तर प्लास्टर पोते ३० रुपयांनी महागले आहे. मजुरीत वाढ झाल्याने गणेशमूर्तींचे दर १० ते २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे असे व्यावसायिकांनी सांगितले.

मूर्ती निघाल्या गावोगावी

दरवर्षी कोल्हापुरात गणोशोत्सवात मोठी उलाढाल होते. येथून बाहेरगावी एक ते बारा फुटांपर्यंतच्या मूर्ती जातात. कोल्हापुरातून कर्नाटकात बेंगळुरू, विजापूरपर्यंतचा सीमाभाग, गोवा, सांगली, मिरज, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी मूर्ती पाठविल्या जातात. कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात लहान मूर्ती पाठविण्यात येतात.

महिलांसह कुटूंब सहभागी

गणेशोत्सव जवळ आल्याने काम उरकण्याकडे कुंभार बांधवांचा कल आहे. मूर्तीच्या रंगकामात महिलादेखील मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. या कामातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. घराघरातील शाळकरी मुलेही घरातील सर्वांना मदत करीत असल्याचे दिसते. कुटूंबीय रात्री उशिरापर्यंत जागून काम पूर्ण करीत आहेत.

पर्यावरणपूरक मूर्तींना मागणी

गेल्या काही वर्षात पर्यावरणपूरक उत्सवाबाबत जनजागृती झाल्याने मातीच्या, पर्यावरणपूरक मूर्तींना मागणी वाढली आहे. याकामी पर्यावरणक्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी शाडूच्या मूर्ती बनवल्या जात असून जलरंगांचा वापर केला जात आहे.

यंदा गणेशमूर्तींची मागणी वाढली आहे. काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महागाईची थोडी झळ बसल्याने काही प्रमाणात मूर्तींच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. वाहतुकदारांचा संप झाल्याने गेल्या आठवडाभर कामाची गती मंदावली आहे.

- गणेश माजगावकर, मूर्तिकार, बापट कँप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिल्लीला अभ्यासदौरा

0
0

कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषदेतील ३६ सदस्य दिल्लीकडे रवाना झाले. चार दिवसाच्या दौऱ्यात विविध स्थळांना भेटी, प्रकल्पांची पाहणी तसेच केंद्रीय मंत्री व खासदारांशी भेट घेणार आहेत. या दौऱ्यात सत्तारुढ भाजप व मित्रपक्ष आघाडीच्या सदस्यांची संख्या मोठी आहे. विरोधी काँग्रेस आघाडीच्या बहुसंख्य सदस्यांनी त्याकडे पाठ फिरवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारगील दिवस साजरा

0
0

कोल्हापूर: शिवाजी पेठेतील न्यू प्राथमिक विद्यालयामध्ये कारगील विजय दिन साजरा करण्यात आला. कारगील युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर व स्फूर्तीगीते सादर केली. अभिमानस फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना रिबिन बँड बांधण्यात आले. मुख्याध्यापिका एस. आर. पाटील, सहायक शिक्षिका एस. जे. पाटील यांची भाषणे झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंडन करुन सरकारचा निषेध

0
0

पोलिसांच्या नोटिसा

आंदोलकांनी फाडल्या

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सकल मराठा समाजाच्यावतीने सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोनलातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिस प्रशासनाने नोटिसा पाठवल्या आहेत. आंदोलन शांततेत सुरू असताना पोलिसांनी पाठवलेल्या नोटिसींचा निषेध करत कार्यकर्त्यांनी त्या नोटिसा फाडून प्रशासनाचा निषेध केला. दरम्यान, दसरा चौकातील आंदोलनस्थळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी ठिय्या आंदोलनाला भेट देऊन प्रमुख कार्यकर्त्यांची चर्चा केली. आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, करवीर प्रातांधिकारी सचिन इथापे उपस्थित होते.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेचे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. मुश्रीफ म्हणाले, 'आघाडी सरकारने मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण दिले होते तर लिंगायत समाजाला अल्पसंख्याकांचा दर्जा दिला होता. पण बापट आयोगाने मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध केला असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. भाजप आघाडी राज्यसरकारने आरक्षणासंदर्भात कोर्टात म्हणणे मांडण्यास १७ महिने उशीर केला. सरकारने जंबो नोकरभरती जाहीर केली आहे. भरती प्रक्रियेत मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. पण सरकार भरतीप्रक्रिया रेटून नेत असल्याने मराठा समाजाचा कडेलोट झाला आहे. समाजाला आरक्षण देण्यासाठी लोकसभा व विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे.' 'आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रसंगी राजीनामा देण्याची तयारी आहे' अशी तयारी त्यांनी दर्शवली. एकीकडे मुख्यमंत्री वारीत साप सोडण्याचा कट असे विधान करतात. तर पालकमंत्री पाटील पेड कार्यकर्ते घुसल्याचा आरोप करतात आणि नंतर माफीही मागतात अशी खिल्लीही मुश्रीफांनी उडवली.

दरम्यान, कोल्हापूर सिटिझन फोरमचे उदय लाड, उत्तरेश्वर पेठ वाघाची तालमीचे कार्यकर्ते नंदकिशोर सुतार, गणेश सुतार यांनी मुंडन केले. तर पन्हाळा तालुक्यातील वाघवेतील ग्रामपंचायत सदस्य संजय सुतार यांनी आरक्षण प्रश्नांवर राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनाम्याचे पत्र त्यांनी सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

हिंसेचे समर्थन नाही पण...

'मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार चालढकल करत आहेत', असा आरोप माजी आमदार मालोजीराजे यांनी केला. आंदोलनातील हिंसेचे समर्थन करता येणार नाही. पण ही वेळ का आली हे सरकारने समजून घेतले पाहिजे. राजर्षी शाहू महाराजांनी १९०२ साली मराठा समाजाला आरक्षण दिले होते पण राज्य सरकारला का देता येत नाही, असा प्रश्न मालोजीराजे यांनी उपस्थित केला.

आबिटकर, केपी यांची भेट

आमदार प्रकाश आबिटकर यांनी ठिय्या आंदोलनाला सायंकाळी भेट दिली. थोड्याच वेळात माजी आमदार के. पी. पाटील आले.

०००००

करवीर पंचायत समिती सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. दक्षिण भारत जैन समाज, वाघाच्या तालमीचे पदाधिकारी बालगोपाल तालीम मंडळाचे अध्यक्ष निवास साळोखे, दक्षिण भारत जैन समाज, वाघाची तालीम, केडीसी बँकेचे माजी संचालक राजू आवळे यांनी पाठिंबा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दौलतनगर मारामारीप्रकरणी ३० जणांवर गुन्हा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दौलतनगरात गुरुवारी रात्री झालेल्या दोन गटांतील मारामारीप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी शुक्रवारी, ३० जणांवर गुन्हा दाखल केला. दोन्ही गटाच्या १३ संशयितांना अटक केली. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी शुक्रवारी परिसरात संशयितांची धरपकड केली. अटक केलेल्यांना शनिवारी (ता. २८) न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. परिसरात आज मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.

गैरसमज आणि पूर्ववैमनस्यातून दौलतनगरातील तीन बत्ती चौकात गुरुवारी मध्यरात्री दोन गटात धुमश्चक्री उडाली. यामध्ये दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक करून परिसरात दहशत माजवली. मारामारीत दगड, विटा, काचेच्या बाटल्या आणि तलवारीचा वापर करण्यात आला. राजारामपुरी १४ वी गल्ली, तीन बत्ती चौक परिसरातील दुचाकी, चारचाकी वाहनांना तरुणांनी लक्ष्य केले. तासभर परिसरातील तणावाचे वातावरण होते. शुक्रवारी सकाळी राजारामपुरी पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबविली. परिसरातील नागरिकांकडे चौकशी करून मारामारीत सहभागी ३० संशयितांवर गुन्हा आणि एका गटाच्या ८ आणि दुसऱ्या गटाच्या ५ अशा १३ संशयितांना अटक केली.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यांदी जयश्री पाटील (वय ३८) यांचा संभाजीनगर रिंगरोडवरील एनसीसी भवनसमोर ' रेणुका' वडापाव हातगाडी आहे. रूवारी रात्री हातगाडी बंद करून त्या घरी आल्यानंतर त्यांचा लहान मुलगा अजिंक्य हा तीनबत्ती चौकात आत्याच्या घरात दारू पिऊन दंगा करीत असल्याचे कळाले. त्याची समजूत काढून त्याला घरी आणण्यासाठी त्या तीन बत्ती चौकात गेल्या. त्यावेळी अजिंक्यने आईला मोठ्याने शिवीगाळ केली. हा प्रकार सुरू असताना चौकात काही तरुण बसले होते. अजिंक्य हा आपल्याला शिव्या देत असल्याचा या तरुणांचा गैरसमज झाला. त्यातून वादाची सुरुवात झाली. विशाल घायतडक, यल्लाप्पा पाटील, धनाजी पाटील, विनायक अलकुटे, विशाल अलकुटे यांनी अजिंक्य आणि त्याची आई जयश्री यांच्यावर हल्ला केला. तरुणांनी अजिंक्यच्या डोक्यात बाटली फोडल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. हा प्रकार सुरू असताना गल्लीतील नागरिक जमा झाले. त्यावेळी दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. दौलतनगर, राजारामपुरी १४ वी गल्ली येथील विशाल स्पोर्टस आणि आर. के. स्पोर्टस या मुलांच्या दोन गटात किरकोळ कारणावरुन वाद सुरू असतात. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

अटक झालेल्या एका गटातील आठ संशयितांमध्ये अनिल पोवार (वय ३५), दिनेश कलकुटकी (२४), ओंकार वाघमारे (१९), भीमराव अलकुटे ( ४६ रा. तिघेही तीनबत्ती चौक), आनंद येडगे (१९ राजारामपुरी, माऊली पुतळा परिसर) शिवराम मातीवडे (३६), विशाल गायतडक (२५), यल्लाप्पा पाटील (२०, राजारामपुरी) यांचा समावेश आहे. दुसऱ्या गटातील अजिंक्य पाटील (वय २३), रामचंद्र माडीमगिरी (२२ दोघेही रा. दौलतनगर), उमेश मळगेकर (२६), दीपक मळगेकर (१९), अर्जुन माडीमगिरी (५१ सर्व रा. जगदाळे शाळा परिसर, दौलतनगर ) या पाच जणांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी डॉक्टरांचा आज संप

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारने लोकसभेत मंजूर केलेले नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक गरिबांसाठी असुविधाजनक आहे. या विधेयकामुळे सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर वैद्यकीय सेवा आणि शिक्षण महागणार आहे. त्या विधेयकाचा निषेध करण्यासाठी कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शनिवारी (ता. २८) सर्व खासगी दवाखाने बंद ठेऊन या विधेयकाचा निषेध करणार आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत दवाखाने बंद राहतील. हा दिवस धिक्कार दिवस म्हणूनही पाळण्यात येणार आहे. संपकाळात तत्काळ सेवा आणि रुग्णालयातील दाखल रुग्णांच्या सेवा सुरु राहतील, असे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक जाधव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंभोजमध्ये ग्रामपंचायत सदस्यांचे कारनामे उघड

0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

कुंभोज (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या बिडाच्या पाणीपुरवठा पाइपलाइन चोरी प्रकरणातील संशयित कंत्राटदार अमित माळी याच्या जबाबावरून ग्रामपंचायत सदस्य जहाँगीर हजरत, अभिजित जाधव व ग्रा.पं. सदस्याचा पती नंदकुमार माळी यांना हातकणंगले पोलिसांनी अटक केली. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता जामिनावर सुटका करण्यात आली. सदस्यांचा या चोरी प्रकरणात सहभाग असल्याचे दिसून आल्याने गावात खळबळ उडाली असून, कुंपणाने शेत खाल्ल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जुन्या बिडाच्या पाणीपुरवठा पाइप कोणताही लेखी आदेश नसताना काढून घेऊन जाताना कंत्राटदार अमित माळी, अक्षय माळी, विकी माळी, अतुल जाधव, प्रतीक सोनवणे, अजय ठोकळे, संतोष खडतरे, गोपाळ भाट या आठ संशयितांकडून सुमारे २९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अटक करण्यात आली आहे.

कुंभोज ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जुन्या पाणीपुरवठा पाइप चोरून नेत असताना अमित माळीला रंगेहाथ पकडून चांगलीच धुलाई केल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीत तीन ग्रामपंचायत सदस्यांनी पाइप काढण्यास सांगितल्याचे उघडकीस आले. याबाबत ग्रामविकास अधिकारी आर. सी. पाटील यांच्या फिर्यादीवरून कंत्राटदार अमित माळीसह आठजणांवर बुधवारी हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गंभीर घटनेत काही सदस्यांची नावे आल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी पाणीपुरवठा पाइप चोरी प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी गुरुवारी गावबंद आंदोलन करून ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला होता.

या घटनेनंतर गावात संशयित सदस्यांबद्दल अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. गुरुवारी कंत्राटदार अमित माळी याच्या जबाबावरून रात्री उशिरा ग्रामपंचायत सदस्य जहाँगीर हजरत, अभिजित जाधव व सदस्या पती नंदकुमार माळी यांना चौकशीसाठी हातकणंगले पोलिस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी केली व त्यानंतर या तिघांना अटक करण्यात आली. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. या घटनेमुळे गावात ग्रामपंचायत सदस्यांच्या कारनाम्याने नाराजीचा सूर उमटत आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'संघ मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे का?'

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

'राज्य आणि केंद्रातले सरकार आरएसएस चालवत आहे. त्यामुळे आरएसएस मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सकारात्मक आहे का?,' असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी उपस्थित केला. अस्तित्वात असलेल्या आरक्षणाबाबतच सरकार सतत वेगवेगळी विधाने करतेय. हा प्रश्न पंतप्रधान सोडवू शकत नाहीत आणि आमदारांच्या राजीनाम्याचाही उपयोग होणार नाही. क्रांती मोर्चाला कुणाचे ठरविक नेतृत्व नाही. त्यामुळे सरकार चर्चा कुणाबरोबर करणार आहे? हा सगळा सरकारचा निव्वळ वेळकाढूपणा असल्याचीही टीकाही चव्हाण यांनी केली.

मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारने विश्वासार्हता गमावली आहे. केवळ प्रतिज्ञापत्र द्यायला सरकारने १७ महिन्याचा विलंब लावला. आरक्षण द्यायचेच असते तर गेल्या चार वर्षात काहीतरी करता आले असता. कायदा आपण केल्याचे आणि प्रकरण कोर्टात आहे, असे जनतेला सांगून उपयोग नाही, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले, 'भ्रष्टाचारमुक्त सरकारचा नारा देत आश्वासनांची खैरात करुन सत्तेवर आलेल्या दोन्ही सरकारांनी विश्वासार्हता गमावली आहे. नागपूर अधिवेशनात जमीन घोटाळा चव्हाट्यावर आणल्यानंतर मुख्यमंत्र्यांना तो व्यवहार रद्द करुन न्यायालयीन चौकशीचे आदेश द्यावे लागले. त्यामुळे सरकारला भ्रष्टाचारावर बोलायचा अधिाकारच उरला नाही. कोणताही विचार न करता एलबीटीसारखे निर्णय घेतल्याने महापालिका आर्थिक कोंडीत सापडल्या. नोटबंदी आणि जीएसटीचा दुहेरी फटका तर सर्वच क्षेत्राला बसला आहे. ही मंदी कधी संपेल माहीत नाही.'

सरकार केवळ आकडेवारीचा खेळ करत असल्याचा आरोप करुन चव्हाण म्हणाले, 'जुन्या योजनांची नावे बदलून नव्याने घोषणा केली जाते. मुंबई महापालिकेची निवडणूक आल्यानंतर या सरकारला समुद्रातील शिवस्मारकाची आठवण झाली. पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन करण्याच्या आदल्या दिवशी स्मारकाची उंची कमी करुन नवा आराखडा देण्यात आला. अडीच हजार कोटींची निविदा आधीच निघाली होती. त्याचा खर्च ३८०० कोटीवर जात असल्याचे दिसताच ठेकेदाराला ते २५०० कोटीत बसवण्याची गळ घातली गेली. त्यामुळे मुख्य पुतळ्याची उंची कमी करुन तलवारीची उंची वाढविली.'

दिल्लीची कामे दाखवून उपयोग काय?

औद्योगिकरणात अपयश आल्याने रोजगार निर्मिती ठप्प आहे. नोकऱ्या नाहीत म्हणून अस्वस्थ तरुण आरक्षणाच्या आंदोलनातून आक्रमक होत आहे. त्यामुळे सांगली महापालिकेच्या निवडणुकीत दिल्लीकरांच्या कामाचे दाखले देऊन काहीही उपयोग होणार नाही. भाजपला सक्षम उमेदवारच मिळाले नाहीत, यातच त्यांचे अपयश दिसून येते, असे चव्हाण म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुलांमध्ये कायदा साक्षरता हवी’

0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'किशोरवयीन मुलांत कायद्याची साक्षरता अत्यंत महत्त्वाची आहे. सध्याच्या पिढीत १४ आणि १८ वर्षाच्या मुलांचा कल गंभीर गुन्हे करण्याकडे वाढत चालला आहे. ही समाजासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे मुलांमध्ये कायदा साक्षरता आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे,' असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण संचलित विधी सेवा मंडळाच्या विधी साक्षरता मंडळाच्या (कायदेविषयक वाचनालय) उद्घाटनप्रसंगी श्री दत्ताबाळ हायस्कूलमध्ये ते बोलत होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी मोरे म्हणाले, 'किशोरवयीन मुलांतील गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या वयातील मुलांनी आदर्श डोळ्यासमोर ठेवले पाहिजेत. वयाच्या सोळाव्या वर्षी संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य प्रेरणादायी आणि नव्या पिढीला अनुकरणीय आहे. मात्र सध्याच्या पिढीतील १४ आणि १८ व्या वर्षात गंभीर गुन्हे करण्याकडे कल वाढत चालले असल्याने ही धोक्याची घंटा आहे. योग्य वयातच किशोरवयीन मुलांना कायद्याची साक्षरता महत्त्वाची आहे.'

डिव्हाइनच्या अध्यक्षा पल्लवी देसाई, जनरल सेक्रेटरी निलेश देसाई, मुख्याध्यापक डी. व्ही. पाटील, सचिन डवंग, कीर्ती मिठारी,व्यवस्थापक संदीप डोंगरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सुनील बाबर, सर्जेराव सावंत ,ज्ञानेश्वर मिरजकर, अनिकेत मोहिते आदी उपस्थित होते. जयश्री सावंत यांनी सूत्रसंचालन केले. प्रगती कारंडे यांनी आभार मानले.

कायदेविषयक वाचनालय

कायदेविषयक वाचनालयाच्या माध्यमातून मराठी भाषेतून ही पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही पुस्तके विद्यार्थी घरीही घेऊन जाऊ शकतात. यामध्ये माता पिता संरक्षण कायदा, ज्येष्ठ नागरिक कायदा, घरगुती हिंसाचार कायदा, मोटार अपघात कायदा, मोटार वाहन कायदा, ग्राहक संरक्षण कायदा, सायबर क्राइम कायदा, रँगिग विरुद्ध कायदा, निर्भया कायदा, मध्यस्थी कायदा, लोकअदालत आदी कायद्याची माहिती दिली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images