Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

महामार्गावर ८०० हून अधिक वाहने रोखली

$
0
0

मालवाहतूकदारांचा चक्काजाम

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा लॉरी ऑपरेटरर्स असोसिएशनने चक्काजाम आंदोलनाची व्याप्ती वाढविली असून शनिवारी दिवसभरात पुणे-बेंगळुरू महामार्गावर ८०० हून अधिक मालवाहतुकीची वाहने रोखली. मार्केट यार्ड परिसरातील ट्रकमधून आंदोलकांनी माल उतरविला. कागल रोडवरील एका पेट्रोल पंपावर वाहने थांबविण्यात आली असून रविवारी (ता. २२) महामार्गावरील विकासवाडी येथून शहराकडे येणारी वाहने थांबविण्यात येणार आहेत.

ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी २० जुलैपासून चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन, बॉक्साइट, ट्रकवाहतूक, मालवाहतूकदार सहभागी झाले आहेत. शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली पाच भरारी पथकांनी राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या मालवाहतूकदारांचे प्रबोधन केले. या वाहनांना महामार्गावरील पेट्रोल पंपाच्या ठिकाणी थांबण्यास सांगितले. बहुतांशी मालवाहतुकदारांनी वाहनांचे पार्किंग पेट्रोल पंपाजवळ केले. शहर आणि परिसरातील सिमेंट, साखर, स्टीलसह मालवाहतूक करणाऱ्या वाहनांत माल भरण्यासाठी मज्जाव करण्यात आला. शहरात मार्केट यार्डात काही वाहनांतून मालवाहतूक होत असल्याची माहिती असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. या वाहनांतून प्लास्टिक आणि कांदा यांची वाहतूक करण्यात येत होती. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी संबधित ट्रकमालकाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रकचालकाने नकार दिल्याने ट्रकमधील माल खाली उतरविला. शहरात रेल्वे गुडस् यार्ड, मार्केट यार्ड, शिरोली जकात नाका या ठिकाणाहून मालाची वाहतूक करण्यास विरोध करण्यात आला. या ठिकाणी एक हजारांहून अधिक मालवाहतूकीची वाहने थांबून राहिली. असोसिएशनच्या पदाधिकारी कराड, पेठ नाका, निपाणी, शिरोली जकात नाका, कागल, कोगनोळी टोल नाका, गडहिंग्लज या ठिकाणी तळ ठोकून आहेत. आंदोलनात कोल्हापूर जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष भाऊ घोगळे, निपाणीचे माल ट्रक वाहतूक संघटनेचे अरूण जाधव, कागलचे मल्लारी पाटील, आजरा असोसिएशनचे बाबू नायकवडी, राधानगरीचे सूर्याजी पाटील, वडगांवचे संजय दुधाणे आदी सहभागी झाले.

...

अत्यावश्यक सेवांना सूट

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे अत्यावश्यक असलेले दूध, औषधे आणि भाजीपाला वाहतूक करणाऱ्या वाहनांना सूट दिली आहे. दिवसभरात राष्ट्रीय महामार्गावर ही सेवा पुरविणारी ५० वाहने सोडून देण्यात आली. मात्र संपाच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची व्याप्ती आणखीन वाढविली जाणार असल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्राइम थोडक्यात

$
0
0

भिंत पडल्याने महिला जखमी

कोल्हापूर : भिंत अंगावर पडल्याने जेमीला हामजान शेख (वय ३४, रा. सावर्डे बुद्रक, ता. शाहूवाडी) ही महिला जखमी झाली. घराची भिंत सारवत असताना सकाळी सात वाजता ही घटना घडली. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.

तरुणास मारहाण

कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोड येथील अयोध्या कॉलनी येथे अज्ञातांनी केलेल्या मारहाणीत स्वप्नील धनाजी जाधव (वय २१ रा. साळोखे गल्ली, कळंबा ता. करवीर) हा तरुण जखमी झाला. अज्ञातांनी त्याला मारहाण करून त्याच्या दुचाकीची मोडतोड केली. त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.

तरुणावर चाकूहल्ला

कोल्हापूर : राजारामपुरी अकरावी गल्ली येथे रुग्णवाहिकेचा लाइट पडल्याच्या रागातून तरुणाचा पाठलाग करून चाकूने हल्ला केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी शनिवारी पाच जणांना अटक केली. महेश पाटील (वय ३५ रा. जवाहरनगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी इशान शशांक भागवत (वय २३, रा. राजारामपुरी, १४ वी गल्ली), सनी प्रताप देशपांडे (वय २५, राजारामपुरी), प्रज्वल दिनेश देवगिरीकर (वय १९, रा. ११ वीगी गल्ली) नितीन गळियल (वय २०, राजारामपुरी ५ वी गल्ली), गोविंद आयरे (वय २७, रा. गणेश कॉलनी, मणेर मळा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'मनुवाद, मनीवादाचा देशाला धोका'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना ही भारतीय स्वातंत्र्यलढ्याला विरोध करण्यासाठी झाली होती. आज त्याच विचारधारेचे लोक सत्तास्थानी असून मूठभर लोकांसाठी देश चालवायची ही त्यांची नीती समाजासाठी घातक आहे. मनुवादी आणि मनीवादी वृत्तीचा देशाला धोका आहे. अशा कपटी शक्तीच्या विरोधात जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून एकसंधपणे लढा उभारण्याची आवश्यकता आहे.'असे प्रतिपादन निवृत्त न्यायाधीश बी.जी.कोळसे-पाटील यांनी केले.

स्वर्गीय एस. आर. पाटील विकास ट्रस्ट आणि रयत सेवा कृषी उद्योग सहकारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे आयोजन केले होते. सहकार शिरोमणी एस. आर. पाटील यांच्या १६ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रम शाहू स्मारक भवन येथे झाला. '२०१४ नंतरचा भारत' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. ट्रस्टचे अध्यक्ष विश्वास पाटील अध्यक्षस्थानी होते.

कोळसे-पाटील म्हणाले 'जातीयता,धर्मांधतेने देशाला गिळकृंत केले. डोके आणि मन दिशाहीन बनविण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू आहे. माणसाचे कर्तृत्व, दातृत्व जातीच्या बंधनात अडकले आहे. लोकशाहीचे चार आधारस्तंभ दबावाखाली आहेत. केंद्रातील सध्याच्या सरकाराला दलित, आदिवासी, सामान्य लोकांच्या मूलभूत प्रश्नापेक्षा मूठभर भांडवलदारांची अधिक काळजी आहे. सर्वसामान्य घटक आणि विरोधकांना कंगाल बनवून त्यांनी आपल्या ओंजळीने पाणी प्यावे या विचाराने नोटबंदी लादली. नोटबंदीचा निर्णय हा महंमद तुघलकी प्रवृत्तीचा होता.'

ट्रस्टचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी रयत सेवा कृषी उद्योग सहकारी संघाचे अध्यक्ष नेमगोंडा पाटील, ट्रस्टचे विश्वस्त माधुरी जाधव, मंगला पाटील, बडदारे, बाबासाहेब पाटील भुयेकर, नामदेव कांबळे, आनंदराव पाटील, सचिन यादव आदी उपस्थित होते.

म्हणून एस. आर. वंदनीय

सहकार हा सामान्य लोकांच्या उन्नतीचा मार्ग आहे. सहकारशिरोमणी एस. आर. पाटील यांनीही सहकाराच्या माध्यमातून लोकांचा उद्धार हा वृत्तीने काम केले. म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा हा वंदनीय आहे असे उद्गार कोळसे-पाटील यांनी काढले. मात्र सध्याचे राज्यकर्ते, सहकार आणि सहकारसम्राट संपले पाहिजेत, या पद्धतीने कामकाज करत असल्याचा त्यांनी टोला लगावला.

संभाजीराजे भाजपात कसे?

कोळसे-पाटील म्हणाले,'बहुजन समाजावर हजारो वर्षापासून आणीबाणी आहे. पूर्वी प्रस्थापित मंडळी समाजाला स्वर्ग नरकाची भीती घालायचे आता प्रत्येक गोष्ट पैशात तोलतात. मनुस्मृतीने माणुसकीच नाकारली होती. मनुस्मृतीला पहिल्यांदा धक्का बुद्धांनी व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. राजर्षी शाहू महाराज, बडोद्याचे सयाजीराव महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यामुळे कोल्हापूरचे संभाजीराजे हे भाजपात कसे जाऊ शकले? असा प्रश्न पडतो.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मार्केटिंग हे कला आणि शास्त्र

$
0
0

मटा, 'उर्जा क्रांती'च्या कार्यशाळेत डॉ. गुरव यांचे प्रतिपादन

म.टा. विक्री कार्यशाळा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मार्केटिंग ही एक कला आणि शास्त्र आहे. या दोन्हीमध्ये समन्वय साधला जातो तेव्हाच यशस्वी मार्केटिंग करता येते,' असे मत शिवाजी विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. ए. एम. गुरव यांनी व्यक्त केले. मटा कल्चर क्लब, उर्जा क्रांती बिझनेस फाउंडेशनच्यावतीने उत्तम विक्रेते बनण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत ते शनिवारी बोलत होते. शिवाजी उद्यमनगरातील कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनच्या हॉलमध्ये कार्यशाळा पार पडली.

यावेळी बोलताना डॉ. गुरव म्हणाले, 'यशस्वी विक्रेता बनण्यासाठी विक्री कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. विक्री तंत्र ही एक कला असून ती प्रयन्तपूर्वक अवगत करावी लागते. कुठल्याही व्यवसायात यश मिळवायचे असल्यास कौशल्य विकास महत्त्वाचा ठरतो. अफाट संवाद कौशल्य व ग्राहकाची मानसिकता समजून घेण्याची क्षमता विकसित केल्यास यश दूर राहत नाही. मार्केटचा ट्रेड, स्वतःची देहबोली या बाबीदेखील महत्त्वाच्या ठरतात. उत्तम विक्रेता म्हणून वाटचाल करताना ग्राहकांच्या अपेक्षा काय आहेत? तसेच बाजारात काळानुसार होणारे बदल याचे मुलभूत ज्ञान विक्रेत्याला असणे गरजेचे आहे. उत्तम विक्रेता हा शिक्षक असतो. व्यवसायात पुढे जाताना परस्पर संबंध महत्त्वाचे असतात. यश मिळवण्यासाठी आवश्यक कौशल्ये शोधून त्यांचा विकास करण्यावर भर द्यावा. कार्यशाळेत विविध क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यशाळा संयोजनात नरेंद्र जोशी यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळम्मावाडी ८८ टक्के भरले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात गेल्या दहा-बारा दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने दोन दिवसांपासून उसंत घेतल्याने नद्यांच्या णीपातळीत घट होत आहे. बहुतांश बंधाऱ्यांवरील पाणी ओसरल्याने मार्ग खुले झाल्याने जनजीवन सुरळीत झाले आहे. मात्र, शिरोळ तालुक्यात पूरस्थिती कायम असून, कृष्णा व पंचगंगा नद्याच्या पाणीपातळीत इंचाइंचाने घट होत आहे. काळम्मावाडी धरण ८८ टक्के भरले असून, धरणातून पाच हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दोन दरवाजे अद्याप उघडलेलेच आहेत.

कृष्णा, पंचगंगेच्या पातळीत घट

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात पूरस्थिती कायम असून शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी पावसाने उघडीप दिली. कृष्णा, पंचगंगा नदीचा पूर इंचाइंचाने ओसरत आहे. अंकली पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी सात इंचाने कमी होऊन ३३.६ फुटांवर पोहोचली, तर नृसिंहवाडी येथे कृष्णा पंचगंगा नदी संगमाजवळ पाणीपातळीत सहा इंचाने कमी झाली. तालुक्यातील सात मार्ग व तीन बंधारे अद्याप पुराच्या पाण्याखाली आहेत. सायंकाळी पाच वाजता नृसिंहवाडी येथील कृष्णा-पंचगंगा नदी संगमाजवळ पाणीपातळी ५६ फूट, तेरवाड बंधाऱ्याजवळ ६०.६ फूट, शिरोळ बंधारा ५६.६ फूट तर राजापूर बंधाऱ्याजवळ ४४ फूट होती. राजापूर बंधाऱ्यावरून सायंकाळी पाच वाजता एक लाख ५२ हजार ११३ क्युसेक पाण्याचा विसर्ग होता.

काळम्मावाडी ८८ टक्के भरले

राधानगरी : तालुक्यात पावसाची उसंत आहे. जलाशय परिसरात अधूनमधून जोराच्या सरी वगळता तालुक्यात कोरडे वातावरण निर्माण झाले आहे. राधानगरी धरण परिसरात शनिवारी गेल्या चोवीस तासांत ६९ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, एकूण पाऊस २९८२ मि.मी. झाला. सध्या पावसाची उघडझाप सुरू आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे अद्याप उघडलेले असून, एकूण ४४५६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. भोगावती नदीची पूरपातळी किंचितशी कमी झाली आहे. मात्र, राशिवडे, तारळे बंधारे पाण्याखाली आहेत. काळम्मावाडी (दूधगंगा) धरणातून पाच हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदीत सुरू असून धरण ८८ टक्के पाणीसाठा (२२.३० टीएमसी) झाला आहे.

००००००

तुळशी, भोगावतीच्या पातळीत घट

कुडित्रे : दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने करवीर तालुक्यातील तुळशी व भोगावती नदीपात्रातील पाण्याची पातळी तीन ते चार फुटांनी उतरली. तालुक्यातील कोगे, बहिरेश्वर, शिंगणापूर, राजाराम, कसबा बीड, बाचणी-शिरोली दुमाला, आरे हे बंधारे पाण्याखाली गेले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पाणी ओसरू लागले आहे. पूरपरिस्थिती आटोक्यात येत आहे. प्रयाग चिखलीला पडलेला पुराचा वेढा कमी कमी होत आहे. प्रयाग चिखली, आंबेवाडी वाहतूक सुरू झाली आहे. तुळशी व भोगावती नदीतील पाणीपातळी ओसरू लागल्यामुळे तालुक्यातील बाचणी- हिरवडे दुमाला बंधारा तसेच म्हारूळ-सांगरूळ मार्ग पूर्ववत सुरू झाला. कसबा बीड बंधाऱ्यावरील पाणी बऱ्यापैकी ओसरू लागले आहे. येथील वाहतूकही आज किंवा उद्या सुरू होण्याची शक्यता आहे.

००००

शाहूवाडीत पडझड सुरूच

शाहूवाडी : तालुक्यात पावसामुळे घरांची पडझड कायम राहिली आहे. पडझडीत निम्मीअधिक घरे जमीनदोस्त होत असल्याने आर्थिक नुकसानीबरोबरच संबंधितांसमोर वास्तव्याचा प्रश्न उभा राहिला आहे. शुक्रवारी झालेल्या पडझड सत्रात प्रशांत गावित कांबळे, रघुनाथ महिपती पाटील (दोघेही रा. भाडळे) यांच्या वैयक्तिक राहत्या घराची भिंत कोसळून प्रत्येकी ५० हजारांचे,, माळापुडे येथील सदाशिव लहू धुमाळ यांच्या घराची भिंत कोसळून एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात संथ पाऊस सुरूच असून, पुरामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे.

००००

कधी मुसळधार, कधी रिमझिम

चंदगड : शहर परिसरात दिवसभर कधी मुसळधार, तर कधी रिमझिम पाऊस पडत होता. सकाळच्या सत्रात मुसळधार पाऊस झाला. मात्र दुपार पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. मात्र या पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा जाणवत आहे. त्यामुळे वृद्ध व बालरुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ताम्रपर्णी व घटप्रभा नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाणीच्या घटना वाढल्या

$
0
0

संवादाअभावी डॉक्टर-नातेवाइकांत होतात वादावादी; कोल्हापुरात जानेवारीपासून चार घटना

sachin.patil1@timesgroup.com

Tweet- sachinpMT

गेल्या तीन वर्षात कामाच्या ठिकाणी डॉक्टरांना नातेवाइक व इतरांकडून मारहाणीच्या घटनात वाढ झाली असून यामुळे डॉक्टरांत भीतीचे सावट आहे. त्यामुळे कनिष्ठ डॉक्टरांवर गंभीर परिणाम होत असून मागील तीन वर्षांत इमर्जन्सी, आयसीयू आणि सर्जरी विभागातील मारहाणीच्या घटनांचे राज्यातील प्रमाण ४९ टक्के आहे. कोल्हापुरात जानेवारीपासून डॉक्टरांना मारहाणीच्या चार घटना घडल्या असून त्यापैकी केवळ एका घटनेची रीतसर नोंद झाली आहे.

रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्याचे काम डॉक्टर करत असतो. मात्र, गैरसमजातून किंवा अन्य कारणांतून अलीकडे डॉक्टरांना मारहाणीच्या घटनात सातत्याने वाढत होत असून यात रुग्णाच्या जवळच्या लोकांव्यतिरिक्त इतर लोक आघाडीवर असतात. घडलेल्या घटनेत नातेवाइकाव्यतिरिक्त बाहेरचे ६९ टक्के लोक मारहाणीत सहभागी झाल्याचे निदर्शनास आले आहे. अशा घटनांमुळे कनिष्ठ तसेच नव्याने वैद्यकीय व्यवसायात येणाऱ्या तरुणांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. यामुळे अनेकजण वैद्यकीय प्रॅक्टिस बंद करण्याच्या मार्गावर आहेत. कोल्हापुरात मारहाणीच्या घटना वारंवार घडत असल्याने येथे बाहेरून काम करण्यास यायला डॉक्टर तयार नाहीत.

राज्यभरात डॉक्टरांनी मार्च २०१७ मध्ये मारहाणीच्या निषेधार्थ संप केला होता. यामध्ये ५३ केसेस प्रलंबित असून त्यावर पुढे कार्यवाही झाली नसल्याबाबत निषेध नोंदवण्यात आला होता. नोंद झालेल्या घटनांत कुणालाही दोषी ठरवून सजा झालेली नाही. २०१० मध्ये डॉक्टर प्रोटेक्शन अॅक्टनुसार कार्यरत असताना डॉक्टरांना मारहाण झाल्यास तीन वर्षे सजा, ५० हजार रुपये दंड व रुग्णालयाचे झालेल्या नुकसानीची दुप्पट भरपाई अशी तरतूद करण्यात आली तरीही डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनेत वाढ होतेय. मागील दोन वर्षात अनेक खटले प्रलंबित आहेत. तसेच नोंद न झालेल्या घटनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कायद्याची अंमलबजावणी होवून दोषींना सजा होत नसल्याने कायद्याचा धाक उरला नसल्याची चर्चा आहे.

मारहाणी मागची काय आहेत कारणे?

खाजगी रुग्णालयाच्या तुलनेत शासकीय रुग्णालयात मारहाणीच्या घटना जास्त घडतात. रुग्ण आणि डॉक्टरांत संवादाचा अभाव असणे हे मुख्य कारण आहे. डॉक्टर पेशंट यांच्यात एक नाते तयार होणे गरजेचे असते. वाढती रुग्णांची संख्या अपुरी डॉक्टर संख्या यामुळे पेशंटकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार एक हजार रुग्णांच्या पाठीमागे एक डॉक्टर अशी संख्या हवी; मात्र भारतात १० हजार रुग्णांमागे १ डॉक्टर अशी अवस्था आहे. अनेकदा उपचार चालू असताना मोठ्या संख्येने नातेवाइक भेटायला येत असल्याने उपचारात अडथळा निर्माण होतो. आजाराबद्दल पुरेशी माहिती नसल्याने गंभीर स्थितीत रुग्णाला उपचारासाठी आणले जाते. तेव्हा डॉक्टर धोका असल्याची कल्पना देतात पण नातेवाइक वस्तुस्थिती स्वीकारण्याच्या तयारीत नसतात. अशावेळी रुग्ण दगावल्यास नातेवाइक आक्रमक होतात. यामध्ये रुग्णाची आर्थिक समस्या, भावनिक समस्या आदी कारणीभूत असतात. काहीवेळा दारू पिऊन दंगा करणे किंवा राजकीय, सामाजिक कारणांमुळे समुहाला डॉक्टरांविरुद्ध भडकावणे अशा घटना घडतात. रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने रुग्णाकडे वैयक्तिक लक्ष देणे शक्य नसल्याने त्याचाही राग डॉक्टर तसेच प्रशासनावर काढला जातो. यात शिवीगाळ हा प्रकार अधिक घडतो.

अशा घटना टाळण्यासाठी काय करावे

रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी त्याला त्याच्या आजाराबद्द्द्ल पुरेशी कल्पना द्यावी. रुग्णाशी संवाद वाढण्यावर भर देऊन डॉक्टर पेशंट नाते तयार करावे. तरुण डॉक्टरांनी रुग्णाच्या आजाराबाबत वरिष्ठांना वेळोवेळी कल्पना द्यावी. रुग्णालयात सुरक्षिततेच्यादृष्टीने सीसीटीव्ही कॅमरे लावणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या व्हिजिटिंग अवर्सच्या वेळेत मर्यादित लोकांना पेशंटला भेटण्यासाठी सोडण्याचा नियम प्रशासनाने करावा. वैद्यकीय अभ्यासक्रमात संवाद कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाचा समावेश केल्यास लोकांच्या समस्येची जाणीव झाल्यास अशा घटनांना पायबंद घालता येईल.

निवासी डॉक्टरांना मारहाणीच्या घटना वारंवार घडत आहेत. यासाठी सुरक्षिततेच्यादृष्टीने पुरेश्या सुविधा रुग्णालयात असणे गरजेचे आहे. यासाठी रुग्णाला भेटायला येणाऱ्या नातेवाइकांसाठी पास सिस्टीम लागू करावी, एकावेळी एक किंवा दोन नातेवाइकांना रुग्णाला भेटण्याची परवानगी द्यावी, धोक्याची सूचना देणारी अलार्म यंत्रणा प्रत्येक विभागात लावणे तसेच सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी.

डॉ. चैतन्य कुलकर्णी,

अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा निवासी डॉक्टर संघटना

रुग्ण आणि नातेवाईक यांच्यात संवाद महत्वाचा आहे. डॉक्टरांनी रुग्णासोबत अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न करावा. रुग्णाला त्याच्या नातेवाईकांना आजाराची स्थिती वेळोवेळी कळवावी म्हणजे अनावश्यक गैरसमज राहणार नाहीत. रुग्णाला विश्वासात घेण्यास डॉक्टरांनी पुढाकार घ्यावा. डॉक्टर रुग्णाला वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न करतात. त्यांना मारहाण करणे हा पर्याय होत नाही. काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर रीतसर तक्रार करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. डॉक्टरांना मारहाण झाली तर रुग्णाला वाचवणार कोण? याचाही विचार नागरिकांनी करावा.

डॉ.अशोक जाधव, अध्यक्ष कोल्हापूर मेडिकल असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीए परीक्षेत आठजण उतीर्ण

$
0
0

फोटो आहेत..

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नवी दिल्ली येथील दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) घेतलेल्या सीए परीक्षेचा ऑनलाइन निकाल शुक्रवारी जाहीर झाला. कोल्हापूर विभागातील आठ विद्यार्थी या परीक्षेत उतीर्ण झाले. यामध्ये सहा युवतींचा समावेश आहे. देशपातळीवर ही परीक्षा घेण्यात येते.

आयसीएआयच्या वेबसाइटवर पहिल्या व दुसऱ्या ग्रुपमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. सीए परीक्षेसाठी पहिल्या व दुसऱ्या ग्रुपमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या समावेश आहे. कोल्हापूर विभागातून घनश्याम बी. जोशीराव, जुई राजन यादव, मयुरी प्रवीण पारेख, वैदेही रवींद्रनाथ सांगरुळकर, रेणू दावडा, तरुण कटेजा, रिया शहा, अंकिता शिरोडर आदींचा समावेश आहे.

मे २०१८ मध्ये परीक्षा झाली होती. आयसीएआय कोल्हापूर विभागातर्फे सीए परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अभ्यासिका उपलब्ध केली आहे. शिवाय त्यांच्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, कम्प्युटर कक्ष आहे. संदर्भ पुस्तके व इतर सुविधा पुरविल्या जातात. सीए परीक्षेत गेल्या काही वर्षात कोल्हापूर व परिसरातील उमेदवारांनी सातत्याने यश मिळवत आहेत,, अशी माहिती संस्थेच्या कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष नवीन महाजन यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्री आषाढी महापूजेला जाणार नाहीत

$
0
0

पंढरपूर:

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्याचं ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विठ्ठलाची महापूजा करू देणार नाही, असा इशारा मराठा समाजाने दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीच्या पूजेला पंढरपूरला न येण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपुरात कोणतीही अप्रिय घटना घडू नये आणि त्याचा वारकऱ्यांना फटका बसू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा संघटनांनी आंदोलन सुरू केलं आहे. मोर्चे, ठिय्या आंदोलनं करणाऱ्या आंदोलकांनी सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत १३ बसेस फोडल्याने या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. त्यातच या आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या आषाढी पूजेला विरोध केला आहे. मराठा आंदोलनाचं स्वरूप पाहता वारकऱ्यांनीही मुख्यमंत्र्यांनी पूजेला येऊ नये अशी भावना व्यक्त केली होती. शिवाय शिवसेनेनेही फडणवीस यांच्या पूजेला विरोध करत मराठा आंदोलकांना पाठिंबा दिला होता. या पार्श्वभूमीवर पंढपुरात कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून यंदा विठ्ठलाच्या पूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. मुख्यमंत्री रात्री १२ वाजता आषाढी पूजेसाठी येणार होते. पण आंदोलकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन ते पूजेला येणार नाहीत. पंढरपुरात १५ लाखाच्यावर भाविक येतात. यावेळी काही अप्रिय घटना घडू नये, वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं महाजन म्हणाले.

पाच सहा महिन्यात आरक्षण देणात

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या पाच-सहा महिन्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार असल्याचं महाजन यांनी सांगितलं.

यांनाही पूजा करता आली नाही

>> १९९७ साली घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरात झालेल्या गोळीबारात ११ दलितांचा बळी गेल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी आषाढी पूजा रद्द केली होती

>> वारकरी संप्रदायाचे बंडा तात्या कराडकर यांच्या आंदोलनानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आषाढी पूजा रद्द केली होती

>> दुष्काळात धरणाबाबतचं वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पूजा करता आली नव्हती

>> वारकऱ्यांच्या प्रश्नावर बंडा तात्या कराडकरांनी आंदोलन केले होते. आंदोलकांनी तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा ताफा अडवला होता. पण चव्हाणांनी आश्वासन दिल्यानंतर ही पूजा पार पडली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्रांतिदिनी मराठा समाजाचा ठोक मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने क्रांती मूक मोर्चे काढले. पण सरकारने समाजाची दिशाभूल केली. सरकारला आपल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी राज्यभर मोर्चाच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. त्याचा भाग म्हणून मराठा क्रांती संघटनेच्यावतीने क्रांतिदिनी (ता. ९ ऑगस्ट) जिल्हा बंदची हाक देत ठोक मोर्चा काढण्यात येणार आहे. दसरा चौकातून सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात होईल. यादिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराओ घालण्यात येणार आहे. तत्पूर्वी मंगळवारी (ता. ३१ जुलै) मोटारसायकल रॅली काढून करवीरनिवासिनी अंबाबाईला साकडे घालणार आहे,' अशी माहिती माहिती संघटनेचे जिल्हाप्रमुख परेश भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाध्यक्ष भोसले म्हणाले, 'मराठा क्रांती मूक मोर्चे काढल्यानंतर राज्य सरकारने अनेक आश्वासने दिली. आश्वासनांच्या माध्यमातून सरकारने समाजाची फसवणूक केली आहे. त्यामुळे राज्यातील विविध २८ संघटनांनी एकत्र येऊन ठोक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. तुळजाभवानीचा जागर करुन मोर्चाला सुरुवात झाली आहे. इतर जिल्ह्यांप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातही क्रांतिदिनी ठोक मोर्चा काढण्यात येणार आहे. दसरा चौकातून सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात होईल. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर कार्यालयाला घेराओ घालण्यात येईल. मागण्या मान्य होत तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. मोर्चात अधिकाधिक मराठा समाजाचा सहभाग वाढवण्यासाठी शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्थांना निमंत्रण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोर्चात सहभागी करून घेण्यासाठी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना मंगळवारी (ता. २४) दुपारी दोन वाजता शिष्टमंडळ भेटणार आहे. मोर्चादिवशी सुट्टी देण्याची मागणी करण्यात येणार आहे.'

भोसले म्हणाले, 'आरक्षणासह इतर मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने सरकार व मंत्र्यांना निवेदने दिली. तसेच काळे झेंडेही दाखवले. सद्यस्थितीत यामुळे फारसा फरक पडलेला दिसत नाही. मागण्या मान्य केल्या नाहीत तर मंत्र्यांच्या गाड्या फोडू. आंदोलनात गुन्हे दाखल झाले तरी संघटना त्याची पर्वा करणार नाही.'

पत्रकार परिषदेस नितीन लायकर, शहराध्यक्ष राहुल इंगवले, चंद्रकांत पाटील, राजू सावंत, सुनीता पाटील, निरंजन पाटील, संजय कुडळे, सुभाष पाटील, अमोल कल्याणकर, गोरख शिंदे, सुधा सरनाईक, पूजा पाटील, सुवर्णा मिठारी, लता जगताप, अनिता जाधव आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

कृषी राज्यमंत्री खोत अपयशी

'गेल्यावर्षी झालेल्या संपामध्ये तोडगा काढण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुढाकार घेतला. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेण्याची मागणी रयत क्रांती संघटनेच्या कार्यकारिणीने केली. मंत्री खोत यांनी ही मागणी मान्य केली नाही. कार्यकारिणीतील अनेकांनी आरक्षणाचा मुद्यावर टीका करण्यास सुरुवात केल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्या सदस्यांना आवर घालण्याची सूचना मंत्री खोत यांना केली. खोत यांनी तशी सूचना केली, पण रयत संघटनेपेक्षा आरक्षणाला प्राधान्य देत पूर्ण संघटनेने कार्यकारिणीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला', असे संघटनेचे तत्कालीन जिल्हा संपर्कप्रमुख संतोष कांदेकर यांनी सांगितले.

महामंडळाकडून फक्त

११ जणांना कर्जपुरवठा

'अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे मराठा समाजासाठी ४०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असल्याचे पालकमंत्री पाटील सांगतात. महामंडळाकडे राज्यातून कर्ज मागणीचे दहा हजार अर्ज दाखल झाले. त्यापैकी ११५ व्यक्तींना कर्ज मिळाले. त्यामध्ये मराठा समाजाच्या फक्त ११ व्यक्तींचा समावेश आहे. महामंडळ जर मराठा समाजासाठी असेल तर, केवळ ११ व्यक्तींनाच कर्जपुरवठा का? अशी विचारणा मोहन मालवणकर यांनी केली. 'मोर्चानंतर सरकारने काढलेल्या सात आध्यादेशांतून मराठा समाजाची फसवणूक केली आहे' असा आरोप त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बटाटा, कोबी, फ्लॉवरची आवक वाढली

$
0
0

बटाटा, कोबी, फ्लॉवरची आवक वाढली

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आठवडाभराच्या दमदार पावसाने गेले दोन दिवस विश्रांती घेतली असून त्याचा परिणाम भाजी मंडईत दिसू लागली आहे. ग्रामीण भागातून भाज्यांची मोठी आवक झाली आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर बटाटा, मिरची खरेदीला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कोबी, फ्लॉवर, दोडका, घेवडा, दुधीची चांगली आवक झाली आहे. अननस, राघू आंबा, डाळिंब या फळांच्या खरेदीत तेजी दिसून आली.

आठवडाभर पावसामुळे मंडईत भाज्यांची आवक घडली होती. पण पूर ओसरू लागला असून वाहतुकीसाठी रस्ते खुले झाल्याने ग्रामीण भागासह शेजारच्या जिल्ह्यातील भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. सोमवारी आषाढी एकादशी असल्याने बटाटा खरेदीला अनेकांनी प्राधान्य दिले. २५ ते ३० रुपये किलो असा बटाट्याचा दर होता तर मिरचीचा दर प्रतिकिलो ४०-६० रुपये होता. घेवडा व दोडक्याच्या दरात प्रतिकिलो १० रुपयांनी वाढ झाली आहे. हा दर अनुक्रमे ६० ते ८० रुपये प्रतिकिलो होता. कोबी, फ्लॉवरची आवक वाढली असून कोबी गड्डा दहा रुपयांपासून तीस रुपयांपर्यंत तर फ्लॉवरचा प्रति गड्डा १५ ते ४० रुपये होता. शेवग्याची शेंग चांगलीच भडकली असून दहा रुपयांना तीन अशी विक्री सुरू होती. गवारीची आवक कमी झाली असून गवारीचा दर प्रतिकिलो ८० ते १०० रुपयांपर्यंत पोहोचला होता.

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर केळीच्या दरात डझनाला पाच ते दहा रुपयांनी वाढ झाली आहे. केळीचा दर डझनाला २० ते ६० रुपये तर जवारी केळीचा दर ३० ते ८० रुपये होता. अननस स्वस्त झाला असून १५ रुपयांना दोन अशी विक्री सुरू होती. गेल्या आठवड्यात गायब झालेल्या राघू अंब्याची आवक वाढली असून १० ते ३० रुपये एक असा अंब्याचा दर होता.

फळभाजांचे दर (प्रतिकिलो, रुपयांत)

वांगी ४० ते ८०

टॉमॅटो २०

भेंडी ५० ते ६०

ढबू मिरची ६० ते ७०

गवार ८० ते १००

दोडका ५० ते ८०

कारली ६०

वरणा ५० ते ६०

ओली मिरची ४०-६०

बटाटा २५ ते ३०

लसूण ३०

घेवडा ६० ते ८०

फ्लॉवर १५ ते ४० (नग)

कोबी १० ते ३० रु. (नग)

पालेभाजी दर (पेंडी)

मेथी ८ ते १०

शेपू १० ते १५

करडई १० ते १५

कांदा पात १० ते १५ रु.

फळांचे दर (प्रतिकिलो, रुपयांत)

सफरंचद १५० ते १६०

डाळिंब २० ते ६०

पपई ४० (नग)

केळी २० ते ६० (डझन)

जवारी केळी ३० ते ७० (डझन)

अननस १० ते ३० (नग)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इन्व्हेस्टर्स असोसिएशनची व्याप्ती वाढविणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

\Bइन्व्हेस्टर्स असोसिएशनच्यातीने \Bनवीन सभासद वाढवण्यासाठी व्याप्ती शेअर बाजारापुरती मर्यादित न ठेवता इतर क्षेत्रातील सर्व आर्थिक क्षेत्रांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतील. तसेच गुंतवणूकदारांमध्ये जागृती वाढविण्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येतील, अशी ग्वाही कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित गुंदेशा यांनी दिली. ते असोसिएशनच्या २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.

अध्यक्ष गुंदेशा यांनी गुंतवणूकदारांमध्ये जागरुकता वाढवण्यासाठी आवश्यकता व्यक्त केली. वर्षभर राबवण्यात आलेल्या सभासद व गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित केलेल्या चर्चासत्राची माहिती दिली. कार्यकारणीला सहकार्य केल्याबद्दल सेबी, बीइएसई आयपीएफ, एनएसई, एमसीएक्स संस्थांचे आभार मानले. आगामी काळात असोसिएशनच्यावतीने गुंतवणूकदारांच्या हितरक्षणासाठी त्यांना शेअरबाजाराविषयी माहिती व प्रशिक्षण देणे, तज्ज्ञ व मान्यवरांची व्याख्याने, चर्चासत्र आयोजित करणार असल्याचे सांगितले. अहवाल वाचन सचिव राजीव शहा यांनी केले. सहसचिव विपीन दावडा यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष नितिन ओसवाल यांनी आभार मानले. यावेळी खजानीस संदीप अथणे, सहखजिनदार, प्रवीण ओसवाल, संचलक मनीष झंवर, राजेंद्र शहा, अशोक पोतनीन, रवींद्र सबनीस आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज मैफल

$
0
0

'आधी रचिली पंढरी'

संगीत मैफल आज

कोल्हापूर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने निशांत-प्रल्हाद प्रस्तुत 'आधी रचिली पंढरी' या अनोख्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (ता. २३ जुलै) सायंकाळी ६.१५ वाजता दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात ही मैफल रंगणार आहे. या कार्यक्रमाची निर्मिती व संकल्पना निशांत गोंधळी आणि प्रल्हाद जाधव यांची आहे. मैफिलींमध्ये अभंग आणि संतरचनांची पर्वणी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. मैफिलीत शिवराज पाटील, प्रल्हाद जाधव, निशांत गोंधळी या गायकांचा स्वरसाज असणार आहे. त्यांना संदेश खेडेकर व नरेंद्र पाटील (तबला), अमित साळोखे (हार्मोनियम), गुरु ढोले (साइड रिदम) अशी साथसंगत असेल. कार्यक्रमाला निशांत गोंधळी यांची निवेदन असेल तर रमेश सुतार यांनी ध्वनी संयोजन केले आहे. मैफल सर्वांसाठी विनामूल्य असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन संकल्पक-निर्माते निशांत आणि प्रल्हाद यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रांतीदिनी मराठा समाजाचा ठोक मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने मराठा क्रांती मूक मोर्चे काढले. पण सरकारने मराठा समाजाची दिशाभूल केली. सरकारला आपल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी राज्यभर मोर्चाच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली असून त्याचाच भाग म्हणून मराठा क्रांती संघटनेच्यावतीने क्रांतीदिनी (ता. ९) जिल्हा बंदची हाक देत ठोक मोर्चा काढण्यात येणार आहे. दसरा चौकांतून सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराओ घालण्यात येणार आहे. तत्पुर्वी मंगळवारी (ता. ३१) मोटारसायकल रॅली काढून करवीर निवासिनी अंबाबाई देवीला साकडे घालणार आहे,' अशी माहिती माहिती संघटनेचे जिल्हा प्रमुख परेश भोसले यांनी पत्रकार बैठकीत दिली.

भोसले म्हणाले, 'मराठा क्रांती मूक मोर्चे काढल्यानंतर राज्य सरकारने अनेक आश्वासने दिली. आश्वासनाच्या माध्यमातून सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. त्यामुळे राज्यातील विविध २८ संघटना एकत्र येऊन ठोक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. तुळजाभवानीचा जागर करुन मोर्चाला सुरुवात झाली असून इतर जिल्ह्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातही क्रांतीदिनी ठोक मोर्चा काढण्यात येणार आहे. दसरा चौकातून सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात होईल. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर कार्यालयाला घेराओ घालण्यात येणार असून मागण्या मान्य होत तोपर्यंत घेराओ मागे घेतला जाणार नाही. मोर्चात अधिकाधिक मराठा समाजाचा सहभाग वाढवण्यासाठी शैक्षणिक संस्था विविध समाजिक संस्थांना निमंत्रण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोर्चात सहभागी करून घेण्यासाठी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना मंगळवारी (ता. २४) दुपारी दोन वाजत्या शिष्टमंडळासह भेट घेऊन मोर्चा दिवशी सुट्टी देण्याची मागणी करण्यात येणार आहे.'

'आरक्षणासह इतर मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने सरकार व मंत्र्यांना निवेदने दिली, तसेच काळे झेंडेही दाखवले. सद्य:स्थितीत या मार्गांचा फारसा फरक पडलेला दिसत नाही. मागण्या मान्य केल्या नाहीत तर मंत्र्यांच्या गाड्या फोडू. आंदोलनामध्ये गुन्हा दाखल झाले तरी, त्याची पर्वा संघटना करणार नाही.'

पत्रकार बैठकीस नितीन लायकर, शहराध्यक्ष राहुल इंगवले, चंद्रकांत पाटील, राजू सावंत, सुनीता पाटील, निरंजन पाटील, संजय कुडळे, सुभाष पाटील, अमोल कल्याणकर, गोरख शिंदे, सुधा सरनाईक, पूजा पाटील, सुवर्णा मिठारी, लता जगताप, अनिता जाधव आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कृषी राज्यमंत्री खोत अपयशी

गेल्या वर्षी झालेल्या संपामध्ये तोडगा काढण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुढाकार घेतला. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक लावण्याची मागणी रयत क्रांती संघटनेच्या कार्यकारणीने केली. मंत्री खोत यांनी मागणी मान्य केली नाही. कार्यकारणीतील अनेक संघटनांनी आरक्षणाचा मुद्यावर टीका करण्यास सुरुवात केल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदस्यांना आवर घालण्याची सूचना मंत्री खोत यांना केली. खोत यांनी तशी सूचना केली, पण रयत संघटनेपेक्षा आरक्षणाला प्राधान्य देत संपूर्ण संघटनेने कार्यकारणीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे तत्कालीन जिल्हा संपर्क प्रमुख संतोष कांदेकर यांनी सांगितले.

महामंडळाकडून केवळ ११ जणांना कर्जपुरवठा

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे मराठा समाजासाठी ४०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असल्याचे पालकमंत्री पाटील सांगतात. महामंडळाकडे कर्जमागणीचे राज्यातील दहा हजार अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ११५ व्यक्तींना कर्ज मिळाले असून त्यामध्ये फक्त ११ मराठा समाजाच्या व्यक्तींचा समावेश आहे. महामंडळ जर मराठा समाजासाठी असेल तर, केवळ ११ व्यक्तींनाच कर्जपुरवठा का? तसेच मोर्चानंतर सरकारने काढलेल्या सात आध्यादेशातून मराठा समाजाची फसवणूक केली असल्याचा आरोप मोहन मालवणकर यांनी पत्रकार बैठकीत केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदाधिकारी बदलाचा फार्स की शिक्कामोर्तब

$
0
0

म. टा. प्रतिनिध, कोल्हापूर

महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी बदल झाल्यानंतर जिल्हा परिषदेतील अन्य समिती सभापतिपदासाठी इच्छुकांच्या आशा उंचावल्या आहेत. उपाध्यक्ष आणि शिक्षण समिती सभापती बदलासाठी इच्छुक सरसावले आहेत. दोन्ही पदाबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांची सोमवारी (ता. २३) बैठक होणार आहे. सरसावले इच्छुक, स्थिर झालेले पदाधिकारी या पार्श्वभूमीवर बैठकीत बदलाच्या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब होईल की बैठकीचा फार्स ठरणार याची उत्सुकता आहे.

सध्या उपाध्यक्ष आणि शिक्षण समिती ही दोन्ही पदे शिवसेनेकडे आहेत. आमदार चंद्रद्रीप नरके गटाचे सदस्य सर्जेराव पाटील हे उपाध्यक्ष तर माजी आमदार संजय घाटगे यांचे पुत्र अंबरिश घाटगे हे शिक्षण समिती सभापती आहेत. आमदार सुजित मिणचेकर गटाचे सदस्य प्रविण यादव यांचा उपाध्यक्षपदासाठी दावा आहे. शिक्षण समितीकडून नरके गटाच्या सदस्या मनीषा कुरणे, कोमल मिसाळ इच्छुक आहेत. आमदार सत्यजित पाटील गटाचे सदस्य हंबीरराव पाटील यांनी शिक्षण समितीसाठी दावा केला आहे. सोमवारी सायंकाळी माजी आमदार घाटगे यांच्या निवासस्थानी आमदार नरके, मिणचेकर यांची बैठक होणार आहे. मात्र आषाढी एकादशी व इतर कार्यक्रमात नेते मंडळी व्यस्त असल्याने बैठक पुढे ढकलण्याची शक्यताही दिसत आहे. दुसरीकडे जनसुराज्य शक्ती पक्षाकडे बांधकाम आणि समाजकल्याण समिती सभापतीपद आहे. बांधकाम समिती सभापतीसाठी कोतोली येथील सदस्य शंकर पाटील इच्छुक आहेत. अन्य समितीत बदल होत असताना जनसुराज्यची त्या अनुषंगाने या आठवड्यात बैठक होणार असल्याची माहिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी अपघातात चिमणेचा वृद्ध ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

दुचाकीच्या धडकेत चिमणे (ता. आजरा) येथील वृद्ध ठार झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी उशिरा घडली. उत्तूर-चिमणे मार्गावर झालेल्या या अपघातात यशवंत नाना शिंत्रे (वय ६५, रा. चिमणे) ठार झाले. उपचारासाठी गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, तर ज्ञानदेव शिवाजी तारळेकर (वय ३५, रा. चिमणे) गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत रात्री उशिरा आजरा पोलिसांत नोंद झाली.

शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास शिंत्रे नेहमीप्रमाणे दूध घालण्यासाठी उत्तूर डेअरीला दुचाकी (एमएच-०९, बीटी-२२६५) वरून निघाले होते. त्यावेळी या मार्गावरील गोपाल पोतदार यांच्या शेताजवळ समोरून येणाऱ्या तारळेकर यांच्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे शिंत्रे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून शिंत्रे यांना तातडीने गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. मात्र, उपचारापूर्वीच ते मृत झाल्याची वर्दी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गडहिंग्लज पोलिसांत दिली. तर तारळेकर यांच्यावर प्रथम उत्तूर आरोग्य केंद्रात आणि त्यानंतर परिस्थिती गंभीर झाल्याने गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. शिंत्रे यांच्या पश्चात पत्नी, मुलगे व नातवंडे असा परिवार आहे. गडहिंग्लज येथील सहायक फौजदार सर्जेराव झुरळे यांनी रात्री उशिरा आजरा पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्रांतीदिनी मराठा समाजाचा ठोक मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सकल मराठा समाजाने मराठा मूक क्रांती मोर्चे काढले. अत्यंत संयमाने काढण्यात आलेल्या लाखोंच्या मोर्चानंतरही सरकारला मागण्यांबाबत पाझर फुटलेला नाही. मराठा समाजाने संयमाने मागण्या केल्याने सरकार फक्त आश्वासनावर बोळवण करत असल्याचा समज बनला आहे. त्यामुळेच मराठा समाजाने 'आता मूक नाही, तर ठोक मोर्चाद्वारे' मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी पुन्हा एकदा एल्गार केला आहे. उस्मानाबाद, बीड नंतर आता कोल्हापुरात क्रांतीदिनी (ता. ९ ऑगस्ट) ठोक मोर्चा काढून सरकारची कोंडी करण्यात येणार आहे.

अॅट्रासिटी कायद्याच्या दुरुस्तीसह शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळवण्यासाठी सकल मराठा समाजाने राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने मूक क्रांती मोर्चे काढले. राज्यातील या मोर्चानंतर सरकारने अनेक आश्वासने दिली. आश्वासनानंतरही मराठा समाजातील युवकांची नोकरी व शिक्षणामध्ये पिछेहाट सुरुच असून, दोन वर्षात सरकारने कोणत्याच आश्वासनाची पूर्तता न केल्याने मराठा समाजाने आता ठोक मोर्चा काढण्यास सुरुवात केली आहे. तुळजाभवानीचा जागर करुन मोर्चाच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे.

सोलापूर, उस्मानाबाद, बीड आदी ठिकाणी निघालेल्या ठोक मोर्चानंतर मोर्चाचे लोण हळूहळू राज्यभर पसरु लागले आहे. कोल्हापुरात मराठा क्रांती संघटनेच्या माध्यमातून मोर्चाची तयारी सुरू केली असून मोर्चाची जनजागृती करण्यासाठी ३१ जुलै रोजी मोटारसायकल रॅली काढून करवीर निवासिनी अंबाबाईला साकडे घालण्यात येणार आहे. याच दरम्यान मंत्र्यांच्या गाड्या अडवून त्या फोडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मंत्र्यांच्या गाड्या अडवणार

मराठा क्रांती संघटनेने क्रांतीदिनी (ता. ९ ऑगस्ट) ठोक मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्यात येणार आहे. तत्पूर्वी मंगळवारी ३१ जुलै रोजी करवीर निवासिनी अंबाबाईस साकडे घालण्यात येणार आहे. मोर्चापूर्वी जिल्ह्यात येणाऱ्या मंत्र्यांच्या गाड्या अडवण्यात येणार आहेत. प्रसंगी गाड्यांची तोडफोड करणाच्या इशारा देत गुन्हे दाखल होण्याची पर्वा करणार नसल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चक्काजाम’ने महामार्गावर तणाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

इंधन दरावर सरकारी नियंत्रण असावे, टोल रद्द करावा यांसह अन्य मागण्यांसाठी मालवाहतूकदारांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आंदोलक आक्रमक झाले. राष्ट्रीय महामार्गावरील २० हून अधिक माल वाहतूक करणाऱ्या ट्रकची हवा सोडून काही वाहनांतील मालही उतरविला. उजळाईवाडीजवळ माल उतरून महामार्गावरील आरामबसची वाहतूकही अडविण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर वाहतुकीची कोंडी फुटून तणाव निवळला. शिरोली-नागाव ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने सर्व्हिस रोडवर थांबलेल्या वाहनधारकांच्या प्रबोधनासाठी फेरी काढली. राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, शाहू मार्केट यार्ड, गांधीनगर, लक्ष्मीपुरीत माल वाहतूक पूर्णपणे थांबली. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर विकासवाडी येथे साखळी उपोषणासाठी उभारलेल्या मंडपाला पोलिसांनी परवानगी नाकारली. दरम्यान, असोसिएशनचे शिष्टमंडळ सोमवारी (ता. २३) जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते यांची भेट घेणार आहेत. संपामुळे जिल्ह्यात सुमारे ६० कोटींहून अधिक रुपयांची मालवाहतूक थंडावली आहे.

ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या नेतृत्वाखाली सहाहून अधिक मागण्यांसाठी २० जुलैपासून चक्काजाम आंदोलन सुरू आहे. रविवारी सकाळी असोसिएशनचे सभासदांनी विकासवाडीत साखळी उपोषणासाठी मंडप उभारण्याचा प्रयत्न केला. मात्र, मंडपाला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतर असोसिएशनच्या पाच पथकांनी राष्ट्रीय महामार्गावर मालवाहतूक करणाऱ्यांचे प्रबोधन केले. मालवाहतुकीची वाहने बंद करून संपात सहभागी होण्याचे आवाहन केले. मात्र, परराज्यातील काही वाहनांनी त्यास जुमानले नसल्याने १८ हून अधिक वाहनांतील हवा सोडण्यात आली. शिरोलीत काही वाहनांतील मालही खाली उतरविण्यात आला. जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्या शिरोली नागाव ट्रान्स्पोर्ट शाखेने शिरोली ते टोप संभापूर या परिसरातील सर्व्हिस रोडवर थांबलेल्या वाहनधारकांचे प्रबोधन केले. असोसिएशनचे अध्यक्ष कुलभूषण कोळी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. औद्योगिक मालाची माल वाहतूक बंद पाडली. काही वाहनांची हवा सोडून माल उतरविला. असोसिएशनच्या पाच भरारी पथकांनी राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी थांबलेल्या मालवाहतुकदारांची भेट घेतली. गांधीनगर ते उचगाव या मार्गावरील मालवाहतूकीची वाहने अडविली. विकासवाडीत जाजल पंपाजवळ असोसिएशनचे पदाधिकारी तळ ठोकून होते. या ठिकाणी केरळ, तमिळनाडू, कर्नाटककडून ये-जा करणारी वाहने अडविली. थांबविण्यास नकार दिलेल्या ट्रकची हवा सोडली. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत वाहतूक बंद करण्याचे आवाहन केले. जाजल पंपाजवळ रविवारी १५० वाहने थांबविण्यात आली.

शहरात रेल्वे गुड्स यार्ड, मार्केट यार्ड, शिरोली जकात नाका येथे वाहने थांबून राहिली. आंदोलनात कोल्हापूर जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष भाऊ घोगळे, निपाणी माल-ट्रक वाहतूक संघटनेचे अरूण जाधव, कागलचे मल्लारी पाटील, आजरा असोसिएशनचे बाबू नायकवडी, राधानगरीचे सूर्याजी पाटील, वडगांवचे संजय दुधाणे आदी सहभागी झाले.

'जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलनाची व्याप्ती दररोज वाढविली जाणार आहे. सरकारने वाहतुकदारांचा संयम सुटण्याची वाट पाहू नये. कोणत्याही क्षणी आंदोलन चिघळू शकते.'

- सुभाष जाधव, जिल्हाध्यक्ष, जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशन

सहभागी संघटना

कोल्हापूर लॉरी वाळू वाहतूक संघटना, बॉक्‍साइड ट्रक वाहतुकदार, गांधीनगर मोटरमालक ट्रक असोसिएशन, शिरोली नागाव ट्रक ट्रान्स्पोर्ट असोसिएशन सर्व तालुका माल ट्रक वाहतूकदार संघटना, लोकल मालट्रक वाहतुकदार, संघटना, गांधीनगर गुड्स ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, निपाणी गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन, काळी-पिवळी टॅक्‍सी युनियन

काय आहेत मागण्या

- पेट्रोल-डिझेलचा जीएसएसटीत समावेश करा

- ५४ टक्के करांचा भार कमी करा

- टोल रद्द करावा

- आयकरविषयक ४४ ए कलम रद्द करा

- इंधन दरावर सरकारी नियंत्रण असावे

- इंधनाची दरवाढ कमी करा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भवानी मंडपात रंगला रिंगण सोहळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डोक्यावर तुळस घेतलेल्या महिला, हाती भगवी पताका, मुखी विठूनामाचा घोष आणि टाळ-मृदंगांचा गजर अशा भावभक्तिमय वातावरणात रविवारी सायंकाळी शहरात श्री ज्ञानेश्वर माउली पालखी व पादुकांची नगरप्रदक्षिणा पार पडली. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला शहराच्या विविध भागांत विठुरायाचा गजर घुमला. सायंकाळी सहाच्या सुमारास भवानी मंडप येथे रिंगण सोहळा रंगला. मोरेवाडी येथील मुन्ना व सुलतान या अश्वांनी सात फेऱ्यांद्वारे रिंगण पूर्ण करताच 'माउली...माउली'चा जयघोष टिपेला पोहोचला.

ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळा भक्त मंडळातर्फे गेली सोळा वर्षे नगरप्रदक्षिणा आयोजित केली जाते. मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिर येथून सायंकाळी पाचच्या सुमारास नगर प्रदक्षिणेला प्रारंभ झाला. महापौर शोभा बोंद्रे, पश्चिम महराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, जयश्री सदाभाऊ शिर्के, अनिता महेश जाधव, स्वाती चव्हाण, आदींच्या हस्ते पालखी पूजन झाले. यानंतर विठुनामाचा घोष करत नगरप्रदक्षिणा मार्गस्थ झाली.

सजविलेल्या बैलगाड्या, माउलीच्या रथातील चांदीची पालखी, भालदार, चोपदार, विठ्ठल भक्तीत रममाण झालेले वारकरी आणि भजनी मंडळांचा दिंडीमध्ये समावेश होता. बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, जोतिबा रोडमार्गे पालखी भवानी मंडपमधील तुळजा भवानी मंदिरासमोर दाखल झाली. तेथे आनंदराव लाड महाराज आणि चोपदार भगवान तिवले यांच्या मार्गदर्शनाखाली रिंगण सोहळा रंगला. 'माउली माउली'चा घोष आणि टाळ-मृदंगांच्या गजरात सोहळा रंगला. मोरेवाडी येथील मुन्ना व सुलतान या अश्वांनी सात फेऱ्या पूर्ण केल्या. हा भावभक्तिमय सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यानंतर पालखी बालगोपाल तालीम, मिरजकर तिकटीमार्गे टिंबर मार्केटकडे रवाना झाली. सासने इस्टेट येथे पालखीचा विसावा आहे. याठिकाणी कीर्तन, प्रवचनाचा कार्यक्रम झाला. दरम्यान, भक्त मंडळाचे बाळासाहेब पवार, दीपक गौड, एम. पी. पाटील-कावणेकर, बाळासाहेब गुरव, आदींनी नगरप्रदक्षिणेचे नियोजन केले.

००००

पुईखडी येथे आज रिंगण सोहळा

प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ (ता. करवीर) येथे आषाढी एकादशीला दर्शनासाठी गर्दी होते. या ठिकाणी जिल्ह्यातून दिंड्या दाखल होतात. कोल्हापूर ते नंदवाळ दिंडीला सोमवारी सकाळी सात वाजता विठ्ठल मंदिर येथून सुरुवात होईल. बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौक, उभा मारुती चौकमार्गे दिंडी मार्गस्थ होईल. शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम येथे सकाळी ९.३० वाजता उभे रिंगण होईल. पुईखडी येथे सकाळी ११.३० वाजता मुख्य रिंगण सोहळा होणार आहे. यानंतर दिंडी नंदवाळला रवाना होईल. यामध्ये २१० दिंड्या सहभागी होणार आहेत.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खगोलशास्त्रज्ञाचा संशोधनप्रवास पुस्तकररुपात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भारतात पहिला रेडिओ टेलिस्कोप तयार करणारे, अवकाश व खगोलक्षेत्रात जागतिक पातळीवरचे संशोधन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय किर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. आर. व्ही. भोसले यांचा संशोधन प्रवास पुस्तकरुपांनी उलगडणार आहे. त्यांच्या आजवरच्या वाटचालीवर आधारित 'स्मृतितरंग' या पुस्तकाची निर्मिती केली आहे. पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्या खगोल व अवकाशक्षेत्रातील संशोधनाची ओळख घडेल. मंगळवारी (ता. २४) पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित केला आहे.

कागल तालुक्यातील बस्तवडेसारख्या ग्रामीण भागापासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील शास्त्रज्ञापर्यंतचा प्रवास हा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरावा, हा पुस्तक निर्मितीमागील उद्देश असल्याचे कुंभी-कासारी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी. टी. पाटील यांनी सांगितले. पाटील यांनी 'स्मृतितरंग' पुस्तकाचे शब्दांकन केले आहे. साइक्स एक्टेंशन परिसरातील जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या महालक्ष्मी सभागृहात सायंकाळी ४.३० वाजता पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, विद्यापीठातील नॅनो टेक्नॉलॉजी विभागाचे डॉ. पी. एस. पाटील यांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशनाचा समारंभ होईल. संयोजन समितीचे सदस्य विश्वास काटकर, डॉ. सुभाष देसाई, पंडीत कंदले, विजया भोसले आदी उपस्थित होते.

जिद्दीमुळे अवकाश संशोधन केंद्र

शिवाजी विद्यापीठात १९९० मध्ये भौतिकशास्त्र विभागात एमएस्सीसाठी अवकाशशास्त्र अभ्यासक्रम सुरू झाला. अभ्यासक्रम सुरू करण्यात डॉ. भोसले यांचा सिंहाचा वाटा आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील संशोधक विद्यार्थ्यांना अवकाश संशोधन क्षेत्राबाबत अभ्यास करता यावा हा त्यामागील प्रमुख उद्देश होता असे भोसले यांनी सांगितले. राजाराम कॉलेजमध्ये पदवी स्तरावरील अवकाशशास्त्र विषय सुरू करण्यात त्यांचे योगदान आहे. शिवाजी विद्यापीठातर्फे पन्हाळगडावर अवकाश संशोधन केंद्र चालू करण्यासाठी डॉ. भोसले यांची जिद्द कारणीभूत आहे. डॉ. भोसले यांनी तयार केलेल्या रेडिओ टेलिस्कोपचा वापर करुन आकाशगंगेतून उद्भवणाऱ्या रेडिओ लहरींचा अभ्यास केला जातो.

पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित करावे

'डॉ. भोसले यांनी आयुष्यभर वैज्ञानिकवादी, मानवतावादी दृष्टिकोन ठेवून समाजकल्याणाचे काम केले. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भोसले यांनी बुद्धिमत्ता आणि संशोधनाच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेतली. अवकाश, खगोल क्षेत्रात भरीव काम केले. संशोधनात त्यांना नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांचा सहवास लाभला. त्यांच्या संशोधनाची दखल घेऊन सरकारने त्यांचा 'पद्मश्री' व त्यापेक्षा मोठ्या पुरस्कारांनी सन्मान करावा' असे मत डॉ. सुभाष देसाई यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा विभागाकडे अनेक वर्षे नोकरी करणाऱ्या चार शाखा अभियंत्यांच्या अन्यत्र बदल्या झाल्या. महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण कार्यालयाकडून त्या चारही अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये पाणीपुरवठा विभागाकडील शाखा अभियंता पी. के. आलाटकर, एम. बी. पाटील, आर. के. कांबळे व पी. व्ही. कामत यांचा समावेश आहे.

हे चौघेही अधिकारी जिल्हा परिषदेत रुजू होऊन बारा वर्षांहून अधिक काळ झाला. या कालावधीत त्यांच्या अन्यत्र बदल्या झाल्या होत्या. मात्र प्रत्येकवेळी त्यांनी बदली आदेश रद्द करून आणले. शाखा अभियंता आलाटकर, पाटील यांची सोलापूरला बदली झाल्यानंतर त्यांनी पुन्हा त्याला स्थगिती मिळवली होती. मात्र, जिल्हा परिषदेने या दोघांनाही कार्यमुक्त करत त्यासंबंधी जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना पत्र दिले. दुसरीकडे शाखा अभियंता कांबळे व कामत यांची सांगली महापालिकेत बदली झाली आहे. या बदलीला स्थगिती मिळावी यासाठी त्यांनी पुन्हा कोर्टात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. दरम्यान एकाच ठिकाणी अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने रितसर तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर या प्रक्रियेला वेग आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images