Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

तर सांगली-कोल्हापूर रस्त्यावर टोल

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet:@bhimgondaMT

कोल्हापूर : सांगली-कोल्हापूर रस्त्याचे दुपदरी आणि चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्याआधीच ठेकेदार सुप्रिम कंपनीने टोलविरोधी आंदोलनाचा धसका घेत गाशा गुंडाळला. रस्त्याच्या कामावर केलेल्या खर्चाचे ११७ कोटी रुपये द्यावेत, अन्यथा टोल लावण्यास परवानगी द्यावी अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लवादाकडे केली आहे. दाखल याचिकेवर लवादाचे प्रमुख, सुप्रिम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांनी जर ठेकेदाराचे पैसे देण्याचा आदेश दिला तर सरकारला तो आदेश पाळावा लागेल. अन्यथा मूळ करारानुसार ठेकेदारास टोल वसुलीसाठीची संरक्षण द्यावे लागणार आहे. रस्त्याचे काम रेंगाळल्याने रस्ता सद्यस्थितीत मृत्यूचा सापळा बनला आहे. तरीही टोल सुरू होण्याची धास्ती आहे.

नागपूर-रत्नागिरी रस्त्याला मे २०१३ मध्ये राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. त्याआधीच या मार्गावरील कोल्हापूर - सांगलीपर्यंतचा ५२.६१ किलोमीटरचा रस्ता राज्य रस्ते विकास महामंडळाकडून 'बांधा, वापरा, हस्तातंर करा' (बीओटी) या तत्वावर तयार करण्यासाठी सुप्रिम कंपनीला सरकारने ठेका दिला. त्यामध्ये शिरोली-बसवनखिंड, अंकलीपूल-मिरजफाटा, मिरजफाटा-सांगली हा २५.६६ किलोमीटरचा रस्ता चौपदरी तर बसवनखिंड अंकली पूल-जयसिंगपूर, बसवनखिंड-अंकली पूल ते जैनापूरपर्यंतचा २६.९५ किलोमीटरचा रस्ता दुपदरी करणे अपेक्षित आहे. शिवाय या मार्गावर १५ पूल प्रस्तावित होते.

प्रत्यक्षात ठेकदाराने २०१४ पर्यंत ६० टक्के काम पूर्ण केले. दरम्यान, कोल्हापूर शहरात टोलबंदीसाठी आंदोलन व्यापक झाले. त्यातून सरकारने शहरातून टोल हद्दपार केल्याची घोषणा केली. सर्वत्र टोलविरोधी चळवळीला बळ मिळाले. सांगली - कोल्हापूर रस्त्याच्या नियोजित टोल वसुलीलाही तेथील लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संघटना, संस्थांनी जोरदार विरोध केला. परिणामी टोल वसुली करता येणार नसल्याचा धसका ठेकेदाराने घेतला आणि काम अर्धवट राहिले.

मे २०१६ मध्ये हा रस्ता राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाकडे वर्ग केल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केली. प्रत्यक्षात रस्ता अजूनही वर्ग झालेला नाही. ठेकेदाराने सुप्रिम कोर्टात धाव घेत रस्त्यावर खर्च केलेले पैसे मिळावेत किंवा टोल वसुलीस मदत करावी, अशी मागणी केली. कोर्टाने त्यांच्या मागणीचे प्रकरण लवादाकडे वर्ग केले. लवादाच्या निर्णयावर प्रशासन पुढील कार्यवाही करेल. नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार ठेकेदारास केलेल्या कामांचे पैसे द्यावे लागतील. न दिल्यास ठेकेदाराला टोल वसुलीसाठी सरकारला संरक्षण द्यावे लागणार आहे, असा पेच आहे.

ठेकेदारास १५ कोटींचा दंड

ठेकेदार कंपनीने वेळेत काम न केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या कंपनीस २०१४ पासून प्रत्येक दिवसाला दीड लाख रुपये दंड आकारला आहे. प्रकरण लवादाकडे जाईपर्यंत दंडाची रक्कम १५ कोटी रुपये झाली. लवादाची पहिली सुनावणी जानेवारी महिन्यात झाली. प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने रस्त्याच्या देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी या मार्गावर अपघातांची मालिका कायम आहे. अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत.

सांगली-कोल्हापूर रस्त्याच्या कामाचा ठेका असलेली सुप्रिम कंपनी लवादाकडे गेली आहे. लवादाकडे सुनावणी सुरू आहे. त्याचा होणाऱ्या निर्णयाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. तोपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे केले जाईल.

- संजय सोनवणे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

दृष्टिक्षेपात सांगली - कोल्हापूर रस्ता

२० ऑक्टोबर २०१२

कामाला मंजुरी

५२. ६१

एकूण रस्ते (किमी)

१९६ कोटी ५ लाख

प्रकल्प खर्च (रुपयांत)

२०१४ अखेर

काम पूर्ण करण्याची मुदत

१५ कोटी

दिरंगाईने कंपनीला झालेला दंड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भारतीय फुटबॉल संघात अनिकेत जाधव याची निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील युवा आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू अनिकेत जाधव याची स्पेनमधील व्हेलन्सिया येथे २१ जुलै ते ४ ऑगस्ट यांदरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वीस वर्षाखालील सीओटिआएफ आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात फॉरवर्ड म्हणून निवड झाली आहे. हा संघ गुरुवारी (ता. १९) स्पेनला रवाना झाला. निवडलेल्या संघात सतरा वर्षाखालील युवा विश्वचषक खेळलेल्या भारतीय संघातील खेळाडूंचा सामावेश आहे. २३ ते २५ जुलै यांदरम्यान स्पेनमध्ये भारतीय संघ स्थानिक संघांबरोबर सराव सामने खेळणार आहे. या सामन्यात २४ सदस्यीय भारतीय संघात अनिकेतचा फॉरवर्ड म्हणून समावेश आहे. या सामन्यानंतर तो कोटीफ चषक स्पर्धेत सामने खेळणार आहेत. अनिकेतला केएसएचे पेट्रन इन चिफ शाहू छत्रपती, 'विफा'चे उपाध्यक्ष मालोजीराजे, खासदार संभाजीराजे, 'विफा'च्या महिला समितीच्या अध्यक्षा मधुरिमाराजे यांचे प्रोत्साहन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मसाज पार्लरच्या नावाखाली चालतात कुंटणखाने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली खुलेआम कुंटणखाने सुरू आहेत. गोपनीय माहिती मिळूनही मध्यवस्तीसह उपनगरांत सुरू असलेल्या अवैध कुटंणखान्यांकडे स्थानिक गुन्हे अन्वेषण (डी.बी) पथकही काणाडोळा करीत आहे. महाराष्ट्रासह परराज्यांतील पीडित मुलींच्या असहायतेचा गैरफायदा घेणारे मुख्य सूत्रधार मोकाटच आहेत. पार्लर, फिटनेसच्या नावाखाली शहरातील गल्लीबोळांतही सुरू असलेले हे सेंटर रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या व्यवसायाच्या रॅकेटचे कनेक्शन महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात आहे.

'येथे सर्व प्रकारच्या जुनाट रोगांवर इलाज केला जाईल', 'केरळमधील आयुर्वेदिक उपचार पद्धतीसह आधुनिक उपचार केले जातील', 'एकदा अवश्य भेट द्या' अशी जाहिरातबाजी करून शहरात अनेक ठिकाणी मसाज पार्लर थाटले आहेत. ऑनलाइन जाहिराती, मेळावे, शिबिर घेऊन नागरिकांना 'आरोग्यदायी मसाज पार्लर' असल्याची दिशाभूल मसाज पार्लरच्या मालकांकडून केली जात आहे. आकर्षक जाहिरात करून ग्राहकांना मसाज पार्लरपर्यंत खेचण्याचे काम सुरू असते. त्यासाठी पार्लर मालकांनी दहा ते बाराजणांच्या मार्केटिंग टीमकडून पार्लरची जाहिरात केली जाते. ग्राहक निश्चित झाल्यास त्यांना विशेष भत्ताही दिला जातो. आयुर्वेदाची कोणतीही माहिती नसताना आयुर्वेदिक मसाज, फायदे आणि त्यासाठी आकारल्या जाणाऱ्या दराची माहिती दिली जाते. काही मसाज पार्लर संचालकांनी सोशल मीडियावरही मसाज पार्लरची जाहिरात केली आहे. व्हायरल केलेल्या जाहिरातीला लाइक, कमेंट केलेल्यांना संपर्क साधला जातो. ग्राहकांची गरज ओळखून ऑफर दिली जाते. ग्राहकांना संपर्क साधण्यासाठी दररोज वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून दूरध्वनी केला जातो. राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरीसह उपनगरातही या प्रकारची सेंटर सुरू असल्याचे समजते. गजबजलेल्या अपार्टमेंटमध्येही पार्लर, फिटनेस सेंटरचा फलक लावून काम सुरू झाल्याचा दिखावा केला जातो. प्रत्यक्षात या ठिकाणी कुंटणखाने सुरू असतात. परिसरातील नागरिकांनी तक्रार केल्यास पोलिसांना या प्रकारची माहिती मिळते. मात्र त्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक गांभीर्याने कार्यरत नसल्याचे दिसते.

गेल्या तीन महिन्यांत पोलिसांनी पाचहून अधिक ठिकाणी छापे टाकून मसाज पार्लरवर कारवाया केल्या. या ठिकाणाची सर्व माहिती गोपनीय विभागाला खबऱ्याकडून मिळाल्याचे समजते. या सर्व पार्लरच्या मुख्य सूत्रधार महिला आहेत. ग्राहक शोधण्याचे काम पुरुषांवर सोपविले आहे. परराज्यातील पीडित मुलींना या व्यवसायात ओढले जात आहे. आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटकातून पीडित मुलींना आणले जाते. मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेले कुंटणखाने नागरिकांच्या घरांपर्यंत पोहोचलेले असल्याने सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याला कारणीभूत ठरत आहेत. यापूर्वी पोलिसांनी शाहूपुरीतील पाच बंगला परिसरात मंजुळा अपार्टमेंटमध्ये कारवाई करून कुंटणखाना चालविणाऱ्या दोन महिलांना अटक केली होती. यामध्ये एका पीडित मुलीची सुटका केली. बॉडी मसाजच्या नावाखाली शिवाजी उद्यमनगर येथील श्री समर्थ इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर कुंटणखाना चालविणाऱ्यांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. त्यासह उपनगरांतही छापे टाकले. संबधितांवर कारवाई करण्यात आली. मात्र, कुटंणखाने चालविणारे मुख्य सूत्रधार अद्याप मोकाटच आहेत.

००००

बिनधास्त घरमालक

शहराच्या मध्यवस्तीसह उपनगरांत मसाज पार्लरसाठी जादा भाडे दिले जाते. घरभाडे जादा मिळत असल्याने घरमालकांकडून कागदपत्रांची आणि भाडेकरूची फारशी चौकशी केली जात नाही. या प्रकारचे अवैध प्रकार रोखण्यासाठी घर भाड्याने देताना भाडेकरूची सर्व माहिती संबंधित पोलिस ठाण्यात जमा करण्याची नियमावली पोलिसांनी यापूर्वी जाहीर केली आहे. मात्र, त्याला घरमालकांकडून प्रतिसाद मिळत नाही. भाडेकरारानुसार संबंधित जागा कोणत्या कारणासाठी वापरली जाते, याची माहिती दिली जात नाही. अनेकदा घरमालकांच्या दुर्लक्षामुळेच मसाज पार्लरच्या नावाखाली भरवस्तीत कुंटणखाने सुरू राहत असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवळीत वृद्धाचा मृतदेह

$
0
0

राधानगरी : आवळी बुद्रुक (ता. राधानगरी) येथील शेतवडीत शामराव गणू पाटील (वय ६०) या वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. याबाबतची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झाली आहे. आवळी बुद्रुक येथील बंडू हरी कवडे यांच्या तांबूळ शेतवडीत शामराव पाटील यांचा मृतदेह आढळला. शामराव पाटील स्मृतिभ्रंश झाल्याने १५ जुलैपासून फिरत होते. तांबूळ शेतीत काही लोकांना मृतदेह दिसला. त्यांनतर गावात चर्चेला उधाण आले. पाटील हे मोघर्डे (ता.राधानगरी) येथील असून त्यांचा मुलगा नवनाथ शामराव पाटील यांनी राधानगरी पोलिसात वर्दी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तावडे हॉटेल जागेप्रश्नी नगरसेवक आक्रमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गांधीनगर ते तावडे हॉटेल परिसरातील जागेबाबत महापालिकेची बाजू भक्कम असताना सुप्रिम कोर्टात बाजू मांडताना वकिलांना नगररचना विभागाने माहितीच पुरवली नाही. त्यामुळे वकिलांना म्हणणे मांडण्यासाठी एक महिन्याची मुदत मागावी लागली, असा आरोप नगरसेवकांनी शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला. हक्काच्या जागेबाबत प्रशासनाने हयगय करू नये अशी सूचना करत नगरोत्थान योजनेतील निधीवरुन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी हे नगरसेवकांच्या हक्कांवर गदा आणत असल्याचा आरोप संतप्त नगरसेवकांनी केला. मागासवर्गीय निधीला कात्री लावल्याबद्दल नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच फैलाव घेतले. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर शोभा बोंद्रे होत्या. दरम्यान, ऐच्छिक निधीबाबत सर्व नगरसेवकांना आराखडा सादर करण्यासाठी पत्रे पाठवली असताना, मागासवर्गीय निधीसाठी पत्रे न पाठवल्याबद्दल प्रशासनाचा निषेधाच्या घोषणा देत आणि काळ्या फिती बांधून नगरसेवकांनी सभागृहात प्रवेश केला. जोरदार घोषणाबाजी करत नगरसेवक भुपाल शेटे, संतोष गायकवाड, आश्विनी बारामते यांनी सभागृह डोक्यावर घेतले.

नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी गांधीनगर ते तावडे हॉटेल परिसरातील जागेवरुन प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. 'तावडे हॉटेल परिसरातील महापालिकेच्या आरक्षित जागेवर उचगाव ग्रामपंचायतीने हक्क दाखवत महापालिकेविरोधात हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाने महापालिकेच्या बाजूने निर्णय देत अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले. त्याचवेळी राज्य सरकारने यात हस्तक्षेप करत अतिक्रमण हटविण्यास मज्जाव केला. याठिकाणचे मिळकतदार आणि उचगाव ग्रामपंचायतीने सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली. यावर सुनावणी होऊन कोर्टाने स्थगिती आदेश देत दोन जुलै रोजी महापालिकेला म्हणणे मांडण्यास सांगितले. मात्र, सुनावणीदरम्यान सुप्रिम कोर्टातील वकिलांना नगररचना विभागाने माहितीच पुरवली नसल्याने वकिलांनी म्हणणे मांडण्यासाठी एक महिन्याची मुदत मागितली. महापालिकेची बाजू भक्कम असताना म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागणे ही दुर्दैवी बाब आहे.' यावर सुनावणी १५ जुलैला होणार होती. आता तीन दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रा. पाटील यांनी चार महिन्यांत प्रतिज्ञापत्र का सादर केले नाही? जागेमुळे महापालिकेचा फायदा होणार असताना महापालिका मुद्दाम दिरंगाई करत असल्याचा आरोप केला.

महापालिकेच्या ८१पैकी अकरा प्रभाग अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असून प्रभागातील विकासकामांसाठी पाच टक्के राखीव निधीची तरतूद करणे बंधनकारक आहे. त्यानुसार प्रत्येक वर्षी चार कोटी ४३ लाख निधी उपलब्ध असताना २०१६ ते २०१८ पर्यंत निधीच मिळाला नसल्याचे नगरसेवक भुपाल शेटे यांच्यासह इतर सदस्यांनी निदर्शनास आणून देत प्रशासनावर गंभीर आरोप केले.

नगरोत्थान योजनेतील पैसे मिळत नसल्याने उद्विग्न झालेल्या नगरसेविकांनी 'घर विका, पण रस्ता करा' असे सुनावल्यानंतर गटनेते शारगंधर देशमुख यांनी 'सभागृहात नगरोत्थानमधून झालेली पाच नगरसेवकांची कामे दाखवा' असे आव्हान देत सरकारकडून निधी आणण्यास प्रशासन कमी पडत असल्याचा आरोप केला. यावर आयुक्त डॉ. चौधरी यांनी 'नगरोत्थान योजनेमध्ये यापूर्वी राज्य व महापालिका प्रत्येकी ५० टक्के वाटा होता. महापालिकेने ५० टक्के निधी उभा करण्यासाठी कर्ज घेतले आहे. पण सरकारने हे प्रमाण सध्या ७०:३० केले असल्याने २२ कोटींचा निधी मिळाला आहे. उर्वरीत निधीसाठी पाठपुराव सुरू आहे' असे सांगितले.

उपमहापौर महेश सावंत यांनी अमृत योजनेला दिरंगाई का? अशी विचारणा केली. चार प्रभागांत ड्रेनेज लाइनचे काम पूर्णत्वाकडे जात असून या प्रभागांतील रस्ते कोण करणार? असा मुद्दा शारंगधर देशमुख यांनी उपस्थित करत ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली. अमृत योजनेसाठी ११५ कोटींचा निधी मंजूर झाला असून ड्रेनेज व पाणीपुरवठा पाइपलाइनचे काम एकाचवेळी सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी २५ जुलै रोजी ठेकेदार आपला हिस्सा जमा करणार असल्याचे सांगितले.

दरम्यान विषय पत्रिकेवरील काही विषयांच्या मंजुरीनंतर सदस्यांची उपस्थिती कमी झाल्याने कोरमअभावी सभा तहकूब करावी लागली.चर्चेत सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, रत्नेश शिरोळकर, नियाज खान, अभिजित चव्हाण, अश्विनी रामाणे, किरण शिराळे, किरण नकाते, मुरलीधर जाधव यांनी सहभाग घेतला. सभेच्या सुरुवातीला कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात प्राविण्य मि‌ळवलेल्यांचा महापौर बोंद्रे व आयुक्त डॉ. चौधरी यांच्या हस्ते सत्कार झाला.

महिला सदस्यांची महौपारांकडे कैफियत

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नेहमीच महिला नगरसेविकांना बेदखल करण्यात येते. महत्त्वाचे प्रश्न मांडण्यासाठी अनेक महिला सदस्या उभ्या राहतात. पण इतर नगरसेवक आपला प्रश्न किंवा मुद्दा जोरदारपणे मांडताना त्यांचा आवाज क्षीण करतात. शुक्रवारच्या सभेतही महिला सदस्यांना तसा अनुभव आल्यानंतर त्यांनी सभा तहकूब झाल्यानंतर थेट महापौर बोंद्रे यांच्या कक्षात धाव घेतली. महिला व बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा, स्वाती यवलुजे, सूरमंजिरी लाटकर, वहिदा सौदागर, लता पोवार व रीना कांबळे यांनी आपली कैफियत मांडत सभागृहात बोलण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

- शिंगणापूर योजनेची मालकी कोणाची? नगरसेवकांचा सवाल

- एमजीपीची मालमत्ता ताब्यात घेण्याची मागणी

- नादुरुस्त वाहनावर शुल्क आकारणीस मंजुरी

- परवान्यांसाठी शुल्कात वाढ नाही

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर मुख्यमंत्र्यांनी पूजेस येणे टाळावे: भाविक

$
0
0

पंढरपूर

आषाढी सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांना पूजा न करू देण्यावर ठाम असलेल्या मराठा संघटनांच्या ठाम भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील सकल मराठा समाज पाठीशी उभा राहिल्याने दगडफेकीच्या प्रकारातून वारकरी भाविकांच्या दहशत पसरू लागली असून, वारकऱ्यांना नाहक त्रास होणार असेल तर मुख्यमंत्र्यांनी आषाढीच्या महापूजेस येऊ नये, अशी भूमिका सर्वसामान्य वारकरी मांडू लागला आहे. गेल्या दोन तीन दिवसात सातत्याने एसटी बसेसवर दगडफेकीचे प्रकार सुरु झाले असून, सोलापूर जिल्ह्यात १३ बसेस फोडण्यात आल्या आहेत. आषाढीसाठी येणाऱ्या राज्यभरातील सामान्य भाविकांच्या मनात या मुळे भीतीचे वातावरण असून पंढरपुरात पोचलेला भाविक देखील धास्तावलेला आहे.

आषाढी हा लाखो वारकऱ्यांचा महासोहळा असल्याने तो वारकऱ्यांना आनंदाने करू द्यावा, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी पूजा न केल्याने आषाढी सोहळ्याचे कोणतेही नुकसान होणार नाही. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आगमनाने जर कोणता अनुचित प्रकार घडला अथवा अफवांमुळे चेंगराचेंगरी झाल्यास आषाढी सोहळा बदनाम होईल अशी भीती या सर्वसामान्य वारकऱ्यास वाटत आहे.

राज्याचा प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांनी ही पूजा करावी, असेही मत अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केले आहे. आषाढी यात्रेत राजकारण नको असेही वारकऱ्यांना वाटते आहे. आषाढीचा सोहळा हा वारकरी संप्रदायाचा असल्याने यंदा आषाढीची महापूजा वारकऱ्यांनी केली तर काय बिघडणार आहे, असा सवाल देखील भाविक विचारत आहेत. तर, मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन खुशाल महापूजा करावी असेही मत काही वारकरी बोलून दाखवत आहेत. दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली राज्यप्रमुखाच्या हस्ते होणारी महापूजेची परंपरा खंडित न होऊ देता हि पूजा निर्विघ्नपणे पार पडण्यास मदत करावी, असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी केले आहे

युती शासनाच्या काळात मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना अशीच एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यावर जोशी याना आंदोलकांच्या भूमिकेपुढे नमते घेत महापूजेस मुकावे लागले होते. याबरोबर कार्तिकी यंत्रेदरम्यान देखील दिवंगत आर. आर. पाटील आणि अजित पवार यांनाही उपमुख्यमंत्री असताना ही पूजा करता आली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच मोटारसायकल जप्त

$
0
0

चोरट्याकडून पाच मोटारसायकल जप्त

लक्ष्मीपुरी पोलिसांची कारवाई

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर आणि इचलकरंजी परिसरातून मोटारसायकल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी गंगावेस येथून ताब्यात घेतले. जय उदय कदम (वय २२, रा. सुबल रेसिडेंन्सी, श्रीकृष्ण कॉलनी, देवकर पाणंद) आणि त्याचा मित्र अभिजित कोंडेकर अशी चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी कदम आणि कोंडेकर याची चौकशी केली असता पाच मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.

दुचाकी चोरीचा तपास करण्यासाठी लक्ष्मीपुरी पोलिसांचे गुन्हे शोध पथक गंगावेस येथील वाघाची तालीम परिसरात आले असता दोघे संशयित फिरताना आढळले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता कदम हा डॉल्बी ऑपरेटर असल्याचे सांगितले. त्याने शहराच्या विविध भागातून चार आणि इचलकरंजीतून एक अशा एकूण दीड लाख रुपये किंमतीच्या पाच मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. वाहनांच्या काही सुट्या भागांची विक्री केली आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक यशवंत बाबर यांनी व्यक्त केली आहे.

सिंगल फोटो आहे.

वृद्धेला दगडाने मारहाण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कसबा बावडा येथील मातंग वसाहतीत किरकोळ वादावादीदरम्यान तरुणाने मीराबाई कांबळे (वय ५८) यांना दगडाने मारहाण केली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत रात्री उशीरापर्यंत तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते. मीराबाई यांचे शेजारी बाळू रामा काळे याच्यासोबत चार दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. शनिवारी सकाळी दोघांत शाब्दिक बाचाबाची झाली. सायंकाळी मीराबाई गल्लीतील दुकानांत आल्यानंतर काळेने शिवीगाळ सुरू केली. वादावादीदरम्यान काळेने मीराबाई यांना दगडाने मारहाण केली. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लूटप्रकरणी तिघे ताब्यात

$
0
0

सीसीटीव्ही फूटेजवरून तपास; चार पथके रवाना

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजारामपुरी आठव्या गल्लीत शुक्रवारी दुपारी टेलरिंग कामगाराला रिव्हॉल्वरचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी शनिवारी रात्री उशिरा रेकॉर्डवरील तीन सराईत चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. फुटेजमधील संशयितांची रेखाचित्रे तयार करण्याचे काम सुरू असून राजारामपुरी पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची चार पथके चोरट्याच्या शोधासाठी तैनात केली आहेत.

शनिवारी दुपारी राजारामपुरी सहावी गल्ली येथे टेलरिंग कामगार संजय प्रल्हाद गुरव (वय ५८, रा. कुपेकर गल्ली, मंगळवार पेठ) यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून सोन्याची चेन लंपास केली होती. या प्रकरणी पोलिसांनी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. या परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले आहे. शेजारील एका दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजसह परिसरातील काही जणांकडून चौकशी सुरू केली. या फुटेजमध्ये मोटारसायकलवरून तिघे जण आले असून गुरव यांना मारहाण केल्याचे दिसते. त्यावरून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असून चोरटे स्थानिक असल्याची प्राथमिक माहिती तपासात पुढे आली आहे. तिघेही चोरटे २० ते २७ वयोगटातील आहेत. चोरट्याने गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीचा क्रमांकावरून शोध घेण्याचे कामही सुरू केले आहे. मात्र सीसीटीव्हीचे मिळालेले फूटेज पंधरा ते वीस फुटावरील असल्याने त्याच्या वाहनांचा क्रमांक स्पष्टपणे दिसत नाही. दरम्यान पोलिसांनी चोरटे पसार झालेल्या सहाव्या गल्लीपर्यंत शोधमोहीम राबविली. या घटनेची गंभीर दखल पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी घेतली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकासह राजारामपुरी पोलिसांना तत्काळ शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिवस रात्र पेट्रोलिंग वाढवून सराईत गुन्हेगाराच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवाजी पूल दुचाकी, रिक्षांसाठी खुला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर पन्हाळा मार्गावरील पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल शनिवारी दुपारी बारा वाजता दुचाकी व रिक्षांसाठी खुला करण्यात आला. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या आदेशानंतर पुलावरील वाहतूक सुरु करण्यात आली. या निर्णयामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर केर्ली येथे पुराचे पाणी आल्याने जिल्हा प्रशासनाने शिवाजी पूल वाहतुकीस बंद केला होता. पूर ओसरु लागल्याने पूल वाहतुकीस खुला करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत होती. शनिवारी दुपारी पाण्याची पातळी ४१ फूट ५ इंचावर आल्यानंतर जिल्हाधिकारी सुभेदार यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या सूचनेनुसार दुचाकी व रिक्षा वाहतुकीला मार्ग खुला केला. पण सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने व अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी कायम ठेवली आहे. पूल वाहतुकीस खुला झाल्याने प्रयाग चिखली, आंबेवाडी, वडणगे, वरणगे पाडळी, निगवे, निटवडे, रजपूतवाडी, केर्ली या गावातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. अवजड वाहतूक शिये, जठारवाडी, भुये, निगवे दुमाला मार्गे वळवण्यात आली आहे. पाणी पातळी कमी झाल्यानंतर हलक्या वाहनांना वाहतुकीस परवानगी देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्र हायस्कूल उपांत्य फेरीत

$
0
0

सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सुब्रोतो मुखर्जी शालेय फुटबॉल स्पर्धेत शनिवारी झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात प्रशांत सलवादेच्या धडाकेबाज ४ गोलच्या जोरावर महाराष्ट्र हायस्कूलने शांतिनिकेतन स्कूलवर ५-० असा दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. छत्रपती शाहू विद्यालय, प्रायव्हेट हायस्कूलने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत उपांत्य फेरी गाठली. १७ वर्षे वयोगटातील सामने रविवारी (ता.२२) सुरू होतील. स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल मैदानावर सुरू आहे.

उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्र हायस्कूल विरुद्ध शांतिनिकेतन हायस्कूल यांच्यातील लढत लक्षवेधी ठरली. महाराष्ट्र हायस्कूलकडून प्रशांत सलवादेने ४ गोल व संकेत मेढेने १ गोल करत विजय साकारला. छत्रपती शाहू विद्यालयाने राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियमला ४-० ने नमवले. सामन्यात शाहू विद्यालयाकडून अथर्व खांडके, सिद्धेश पंदारे, स्वागत पाडळकर, हर्ष माली यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. प्रायव्हेट हायस्कूलने शिलादेवी शिंदे हायस्कूलवर ३-१ ने विजय मिळवला. प्रायव्हेटकडून हर्ष पवारने २, सुमित मोरेने १ तर शिलादेवी शिंदे हायस्कूलकडून कमलेश पाडळकरने एका गोलची नोंद केली.

सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने प्रिन्स शिवाजी इंग्लिश मीडियमवर २-० ने विजय मिळवला. महाराष्ट्रकडून दर्शन पाटील व संकेत मेढेने प्रत्येकी एक गोल नोंदवला. शाहू विद्यालय विरुद्ध स. म. लोहिया यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत राहिल्याने सामन्याचा निकाल टायब्रेकरवर घेण्यात आला. यात शाहू विद्यालयाने २-० ने विजय मिळवला. सडनडेथवर राधाबाई इंग्लिश मीडियम स्कूलने १-० ने कोल्हापूर इंग्लिश मीडियमवर मात केली. प्रायव्हेट हायस्कूल विरुद्ध जयभारत हायस्कूल यांच्यातील सामन्यात प्रायव्हेटने २-० ने विजय मिळवला. प्रायव्हेटकडून श्रेयश पाटील, हर्ष पवार यांनी प्रत्येकी एका गोलची नोंद केली. शाहीद जमादारच्या गोलवर शिलादेवी शिंदे हायस्कूलने शाहू दयानंद हायस्कूलला १-० ने नमवले. पोद्दार इंग्लिश मिडीयम स्कूल विरुद्ध कोल्हापूर पब्लिक स्कूल यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत राहिली. सामन्याचा निकाल टायब्रेकरवर घेण्यात आला. यात पोद्दार स्कूलने ३-२ गोलफरकाने विजय मिळवला. छत्रपती शाहू विद्यालय (सीबीएसई)ने प्रबुद्ध हायस्कूलचा २-० ने पराभव केला. शाहू विद्यालयाकडून यश साळुंखे, नील देसाई यांनी प्रत्येकी एका गोलची नोंद केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरसाच्या आगमनाने घबराट

$
0
0

हातकणंगले : तालुक्यातील घुणकी, चावरे परिसरात तरस या जंगली प्राण्याचे आगमन झाल्याने शेतकरी व नागरिकांत मोठ्या प्रमाणात घबराटीचे वातावरण पसरले असून वनखात्याने तत्काळ तरसाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. गेल्या महिन्यात नवे चावरे येथे आठ जनावरांना तरसाने हल्ला केल्याने ती मृत्युमुखी पडली होती. ही घटना ताजी असताना शुक्रवारी संध्याकाळी फिरायला गेलेल्या ओम खताळ या पंधरावर्षीय शाळकरी मुलाचा तरसाने पाठलाग केला. त्याने सायकल तिथेच टाकून धूम ठोकली. चावरे व घुणकी येथील या घटना पाहता तरसांचा मुक्काम परिसरात असण्याची शक्यता असून ते समूहाने राहत असल्याने त्यांची संख्या एकापेक्षा जास्त निश्चितच असण्याची शक्यता नाकारता येत नाही.दरम्यान आज करवीर परिक्षेत्राच्या वनाधिकारी सोनल देशमुख यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून तरसांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुख्यमंत्र्यांना शासकीय पुजेला विरोध नको’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही राज्य सरकारची भूमिका आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वजण प्रयत्न करत आहोत. मराठा समाजाने केलेल्या प्रत्येक मागणीची पूर्तता सरकारी पातळीवर करण्यात आली आहे. तसेच उर्वरित मागण्यांसाठी सरकारकडून प्रयत्नही सुरू आहेत. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत असताना पंढरपुरातील मुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजेला विरोध करणे उचित ठरणार नाही. महापुजेला विरोध न करता चर्चेतूनच मार्ग काढावा,' असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

पत्रकात म्हटले आहे, 'मराठा समाजाने आपल्या मागण्यासाठी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मूक मोर्चे काढून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. या मागण्यांचा विचार करत सरकारने वेळोवेळी निर्णय घेत या मागण्या मान्य केल्या. शिष्यवृत्तीमधील सवलत, वसतिगृहांमधील सवलत, नोकऱ्यांमध्ये तसेच शिक्षणात आरक्षण यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. कोर्टातही मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार भक्कमपणे बाजू मांडत आहे. मराठा समाजाच्या मागण्या पुर्ण करण्यात आल्या आहेत. कोर्टात सरकारची बाजू कशी बरोबर आहे, हे सांगण्याचे काम केले जात आहे. पावसाळी अधिवेशनात विधानसभेत मुख्यमंत्री फडवणीस यांनी नोकर भरतीत मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणार असल्याचे जाहीर केले. मराठा समाजाच्या मागणीसाठी उपसमितीचीदेखील नियुक्ती करण्यात आली असून मी अध्यक्ष आहे. उपसमितीचे कामकाज अत्यंत जलदगतीने व वेगाने होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सरकारने मराठा समाजाच्या विकासासाठी ४५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास योजना देखील मराठा समाजातील तरुण तरुणींसाठी लागू केली आहे. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत असताना पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना शासकीय पूजेला विरोध करणे उचित ठरणार नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमवारी दिंडी

$
0
0

कोल्हापूर: कळंबा, तपोवन परिसर, मोरे कॉलनी, देवकर पाणंद, साने गुरुजी वसाहत अशा विविध भागातील ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत दिंडीचे आयोजन केले आहे. ज्येष्ठ नागरिक सेवा संघ तपोवन परिसराच्यावतीने सोमवारी (ता.२३) चव्हाण कॉलनी, यशवंत लॉन ते देवकर पाणंद पांडूरंग नगरीपर्यंत दिंडी काढण्यात येणार आहे. यामध्ये राजे संभाजी विद्यालय, बालभवन तपोवन संस्थेचे विद्यार्थी दिंडीत सहभागी होणार आहेत. सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या वेळेत पायी दिंडी निघणार आहे. संस्थेचे अध्यक्ष शंकर भोला, सांस्कृतिक समिती प्रमुख विजय चव्हाण, प्रभाकर जाधव, विलास कुलकर्णी, उर्मिला कुलकर्णी, अनिल कट्टी यांच्यासह अन्य पदाधिकारी नियोजन करत आहेत. ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, तपोवनतर्फे पहिल्यांदाच दिंडीचे आयोजन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुधवारी मेळावा

$
0
0

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघातर्फे (सुटा) बुधवारी (ता. २५) सीएचबी प्राध्यापकांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात सीएचबी प्राध्यापकांच्या अडचणीबाबत चर्चा करुन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. शाहू स्मारक भवन येथे दुपारी ३.३० वाजता मेळाव्याला प्रारंभ होईल.

सध्या प्राध्यापक भरतीवर बंदी असल्याने राज्यभरात दहा हजारावर जागा रिक्त आहेत. या जागेवर नेट, सेट उत्तीर्ण व पीएचडीधारकांची 'सीएचबी'तत्वावर नेमणूक करण्यात येते. त्यांना दरमहा चार ते सहा हजार मानधन दिले जाते. परिणामी या प्राध्यापकांची कुचंबणा होते. या प्राध्यापकांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्याला 'सुटा'चे प्रा. एस. जी. पाटील, प्रा. सुधाकर मानकर, डॉ. सुभाष जाधव, डॉ. डी. एन. पाटील, डॉ. अरुण पाटील, डॉ. आर. जी. कोरबू मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राधिकरणाबाबत नागरिक अनभिज्ञ

$
0
0

समाविष्ठ गावांतील लोकप्रतिनिधींच्या बैठकीत आरोप; बुधवारी आर. के. नगर येथे बैठक

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'प्राधिकरणाची अधिसूचना निघून अकरा महिन्याचा कालावधी गेल्यानंतरही प्राधिकरणाचे स्वरुप आणि कायद्याबाबत नागरिक अनभिज्ञ आहेत. प्राधिकरणाच्या कायद्याची विस्तृत मांडणी करण्याची जबाबदारी सरकारची असताना सरकार यामध्ये सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे प्राधिकरणातील ४२ गावांच्या विकासाला खीळ बसली आहे. प्राधिकरणाच्या माध्यमातून हद्दवाढीसाठी टाकलेले एक पाऊल आहे,' असा आरोप शनिवारी झालेल्या नागरी विकास क्षेत्र प्राधिकरण आणि प्राधिकरणातील समाविष्ठ गावातील लोकप्रतिनिधींच्या बैठकीत केला. प्राधिकरणाच्या माध्यमातून ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत आणि कायद्याची माहिती देण्यासाठी बुधवारी (ता. २५) सकाळी ११ वाजता आर. के. नगर येथे बैठक घेण्यात येणार आहे.

प्राधिकरण स्वीकारायचे किंवा नाही याचा निर्णय बैठकीत घेण्यात येणार आहे. बैठकीचे इतिवृत्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठवण्याचा निर्णय बैठकीत घेतला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे होते.

शासकीय विश्रामगृह येथील बैठकीला मार्गदर्शन करताना माजी आमदार संपतबापू पवार-पाटील म्हणाले, 'प्राधिकरणाच्या अधिसूचनेनंतरही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही ही वस्तुस्थिती असली, तरी प्रादेशिक विकास आराखाड्यामध्ये सुचवलेल्या सूचनानुसार जर प्राधिकरणाची अंमलबजावणी होणार असले, तर प्राधिकरणाचा काहीही उपयोग होणार नाही. प्रादेशिक आराखड्यामध्ये सुचवलेले रस्ते अनेक खासगी मिळकतीसह घरांवरुन जाणार आहेत. प्राधिकरणामध्ये प्रथम १८ गावांचा समावेश होता. त्यानंतर ४२ गावांचा समावेश केला. प्राधिकरणातील गावांचा व पर्यायाने भावी पिढीचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सरकारकडे भक्कमपणे जावे लागेल. यासाठी प्राधिकरणातील गावांचा सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. प्राधिकरण फायद्याचे की तोट्याचा याचा अभ्यास करुन संयम व शांततेच्या मार्गाने गेले तरच उचीत न्याय मिळेल.'

'शहरातील नागरिक कसे राहतात, याचा लेखाजोखा मांडण्यासाठी हद्दवाढविरोधी कृती समिती स्थापन झालेली नव्हती. शहराचा विकास कोणाला नको आहे. पण आम्हाला हद्दवाढ नको होती. पण याचा काही लोकांनी वेगळा अर्थ काढून शहर व ग्रामीण असा वाद निर्माण केला. पण अशा कोणत्याही वादात न पडता आम्हाला विकास हवा आहे, असे पवार-पाटील यांनी स्पष्ट केले.'

काटे म्हणाले, '८० टक्के नागरिकांना प्राधिकरण माहीत नसताना त्यांना अंधारात ठेवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील बैठक घेत आहेत. ज्यांच्या अडचणी आहेत, त्यांना बैठकीला निमंत्रित केले जात नाही. प्राधिकरण सचिव शिवराज पाटील शंकाचे निरसन न करता केवळ ऐकण्याची भूमिका घेत आहेत. प्राधिकरणाबाबत सरकार योग्य खुलासा करत नसल्याने आंदोलन तीव्र करण्याची आवश्यकता व्यक्त केली.'

बी. जी. मांगले म्हणाले, '१७ ऑगस्ट, २०१७ रोजी प्राधिकरणाची अधिसूचना निघाली. प्राधिकरणातील गावांना महापालिकेप्रमाणे सुविधा दिल्या जातील. त्याचवेळी गावठाणावरील आरक्षण उठवणार नाही, घरफाळ्यात वाढ करणार नाही,आदी आश्वासने दिली. मात्र अकरा महिन्यानंतर प्राधिकरणाच्या माध्यमातून असा कोणता विकास घडून आला. अकरा महिन्यात केवळ २०० बांधकाम परवाने मिळाले असून अनेक बांधकाम परवाने अडकून पडले आहेत. एम. आर. खान यांनी प्रादेशिक विकास आराखडा तयार केला आहे. आराखड्यानुसार अनेक मिळकतीमधून रस्ते दाखवले आहेत. त्यामुळेच या विकास आराखड्यावर तब्बल ५,३९० हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे प्राधिकरण ही हद्दवाढ करण्यासाठी पहिला टप्पा असल्याचा आरोप त्यांनी केला.'

निमंत्रक नाथाजी पवार म्हणाले, 'प्राधिकरणाचा कायदा व स्वरुप सांगण्याची जबाबदारी सरकारची होती. सरकारने ही जबाबदारी पार पाडलेली नसली, तरी अधिसूचना निघाली असल्याने प्राधिकरण नको असे म्हणता येणार नाही. तर त्याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात प्राधिकरण अस्तित्वात आले असून त्या माध्यमातून विकास झाला का? याची माहिती घेवून तक्रार करावी लागेल.'

बैठकीत भोगावतीचे माजी संचालक बी. ए. पाटील, मोरेवाडीचे माजी सरपंच अमर मोरे, महादेव पाटील, नारायण पवार, बाजीराव पाटील आदींनी मनोगत व्यक्त केली. बैठकीस प्राधिकरणात येणारे गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.

आमदार नरके, महाडिकांचा पाठिंबा

अधिवेशनामुळे आमदार चंद्रदीप नरके व अमल महाडिक बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. बैठक सुरू असताना दोन्ही आमदारांनी राजू माने यांच्याशी संपर्क साधून बैठकीत जो निर्णय होईल तो मान्य असले, असा संदेश दिल्याचे माने यांनी बैठकीत सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जि. प. कर्मचारी सोसायटीअध्यक्षपदी आर.डी. पाटील

$
0
0

कोल्हापूर : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी अध्यक्षपदी आर. डी. पाटील यांची तर उपाध्यक्षपदी शांताराम माने यांची बिनविरोध निवड झाली. सहकारी संस्था कोल्हापूर शहर उपनिबंधक पी. एम. बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. अध्यक्षपदासाठी पाटील यांचे नाव के. आर. किरुळकर यांनी सुचवले तर एम. आर. पाटील यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी शांताराम माने यांचे नाव विजय टिपुगडे यांनी सुचवले तर रामदास पाटील अनुमोदन दिले. यावेळी मावळते अध्यक्ष किरुळकर व उपाध्यक्ष रामदास पाटील यांचा सत्कार करण्यात आले. यावेळी संचालक एम. आर. पाटील, महावीर सोळांकुरे, शिवाजी काळे, दिनकर तराळ, सचिन मगर, राजीव परिट, श्रीकांत वरुटे, बजरंग कांबळे, विष्णू तळेकर, रवींद्र घस्ते, रंजना आडके, गौरी पाटील, संगीता गुजर, सुनील मिसाळ, एन. डी. पाटील, रणजित पाटील, सयाजी पाटील, विजय गवंडी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राधिकरणाबाबत नागरिक अनभिज्ञ

$
0
0

समाविष्ठ गावांतील लोकप्रतिनिधींच्या बैठकीत आरोप; बुधवारी आर. के. नगर येथे बैठक

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'प्राधिकरणाची अधिसूचना निघून अकरा महिन्याचा कालावधी गेल्यानंतरही प्राधिकरणाचे स्वरुप आणि कायद्याबाबत नागरिक अनभिज्ञ आहेत. प्राधिकरणाच्या कायद्याची विस्तृत मांडणी करण्याची जबाबदारी सरकारची असताना सरकार यामध्ये सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे प्राधिकरणातील ४२ गावांच्या विकासाला खीळ बसली आहे. प्राधिकरणाच्या माध्यमातून हद्दवाढीसाठी टाकलेले एक पाऊल आहे,' असा आरोप शनिवारी झालेल्या नागरी विकास क्षेत्र प्राधिकरण आणि प्राधिकरणातील समाविष्ठ गावातील लोकप्रतिनिधींच्या बैठकीत केला. प्राधिकरणाच्या माध्यमातून ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत आणि कायद्याची माहिती देण्यासाठी बुधवारी (ता. २५) सकाळी ११ वाजता आर. के. नगर येथे बैठक घेण्यात येणार आहे.

प्राधिकरण स्वीकारायचे किंवा नाही याचा निर्णय बैठकीत घेण्यात येणार आहे. बैठकीचे इतिवृत्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठवण्याचा निर्णय बैठकीत घेतला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे होते.

शासकीय विश्रामगृह येथील बैठकीला मार्गदर्शन करताना माजी आमदार संपतबापू पवार-पाटील म्हणाले, 'प्राधिकरणाच्या अधिसूचनेनंतरही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही ही वस्तुस्थिती असली, तरी प्रादेशिक विकास आराखाड्यामध्ये सुचवलेल्या सूचनानुसार जर प्राधिकरणाची अंमलबजावणी होणार असले, तर प्राधिकरणाचा काहीही उपयोग होणार नाही. प्रादेशिक आराखड्यामध्ये सुचवलेले रस्ते अनेक खासगी मिळकतीसह घरांवरुन जाणार आहेत. प्राधिकरणामध्ये प्रथम १८ गावांचा समावेश होता. त्यानंतर ४२ गावांचा समावेश केला. प्राधिकरणातील गावांचा व पर्यायाने भावी पिढीचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सरकारकडे भक्कमपणे जावे लागेल. यासाठी प्राधिकरणातील गावांचा सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. प्राधिकरण फायद्याचे की तोट्याचा याचा अभ्यास करुन संयम व शांततेच्या मार्गाने गेले तरच उचीत न्याय मिळेल.'

'शहरातील नागरिक कसे राहतात, याचा लेखाजोखा मांडण्यासाठी हद्दवाढविरोधी कृती समिती स्थापन झालेली नव्हती. शहराचा विकास कोणाला नको आहे. पण आम्हाला हद्दवाढ नको होती. पण याचा काही लोकांनी वेगळा अर्थ काढून शहर व ग्रामीण असा वाद निर्माण केला. पण अशा कोणत्याही वादात न पडता आम्हाला विकास हवा आहे, असे पवार-पाटील यांनी स्पष्ट केले.'

काटे म्हणाले, '८० टक्के नागरिकांना प्राधिकरण माहीत नसताना त्यांना अंधारात ठेवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील बैठक घेत आहेत. ज्यांच्या अडचणी आहेत, त्यांना बैठकीला निमंत्रित केले जात नाही. प्राधिकरण सचिव शिवराज पाटील शंकाचे निरसन न करता केवळ ऐकण्याची भूमिका घेत आहेत. प्राधिकरणाबाबत सरकार योग्य खुलासा करत नसल्याने आंदोलन तीव्र करण्याची आवश्यकता व्यक्त केली.'

बी. जी. मांगले म्हणाले, '१७ ऑगस्ट, २०१७ रोजी प्राधिकरणाची अधिसूचना निघाली. प्राधिकरणातील गावांना महापालिकेप्रमाणे सुविधा दिल्या जातील. त्याचवेळी गावठाणावरील आरक्षण उठवणार नाही, घरफाळ्यात वाढ करणार नाही,आदी आश्वासने दिली. मात्र अकरा महिन्यानंतर प्राधिकरणाच्या माध्यमातून असा कोणता विकास घडून आला. अकरा महिन्यात केवळ २०० बांधकाम परवाने मिळाले असून अनेक बांधकाम परवाने अडकून पडले आहेत. एम. आर. खान यांनी प्रादेशिक विकास आराखडा तयार केला आहे. आराखड्यानुसार अनेक मिळकतीमधून रस्ते दाखवले आहेत. त्यामुळेच या विकास आराखड्यावर तब्बल ५,३९० हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे प्राधिकरण ही हद्दवाढ करण्यासाठी पहिला टप्पा असल्याचा आरोप त्यांनी केला.'

निमंत्रक नाथाजी पवार म्हणाले, 'प्राधिकरणाचा कायदा व स्वरुप सांगण्याची जबाबदारी सरकारची होती. सरकारने ही जबाबदारी पार पाडलेली नसली, तरी अधिसूचना निघाली असल्याने प्राधिकरण नको असे म्हणता येणार नाही. तर त्याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात प्राधिकरण अस्तित्वात आले असून त्या माध्यमातून विकास झाला का? याची माहिती घेवून तक्रार करावी लागेल.'

बैठकीत भोगावतीचे माजी संचालक बी. ए. पाटील, मोरेवाडीचे माजी सरपंच अमर मोरे, महादेव पाटील, नारायण पवार, बाजीराव पाटील आदींनी मनोगत व्यक्त केली. बैठकीस प्राधिकरणात येणारे गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.

आमदार नरके, महाडिकांचा पाठिंबा

अधिवेशनामुळे आमदार चंद्रदीप नरके व अमल महाडिक बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. बैठक सुरू असताना दोन्ही आमदारांनी राजू माने यांच्याशी संपर्क साधून बैठकीत जो निर्णय होईल तो मान्य असले, असा संदेश दिल्याचे माने यांनी बैठकीत सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन : नीलकंठ कारंजकर

$
0
0

नीलकंठ कारंजकर

कोल्हापूर : येथील टिंबर मार्केट परिसरातील नीळकंठ शंकर कारंजकर (वय ९१) यांचे निधन झाले. ते सहकार खात्यातून निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सात मुली, सुना, जावई, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता.२२) सकाळी ८.३० वाजता पंचगंगा स्मशानभूमीत होणार आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वरी, शेंगदाणे शाबूला मागणी

$
0
0

लोगो : बाजारभाव

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नेहमीच्या किराणा मालाबरोबर आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शाबू, शेंगदाणे, वरी, राजिगरा या उपवासासाठी लागणाऱ्या पदार्थांना मागणी वाढली आहे. श्रावण व भाद्रपद हे उपवासाचे महिने सुरू होणार असल्याने खाद्य तेलाच्या दरातही वाढ होऊ लागली आहे.

गेले आठवडाभर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बाजारपेठ थंडावली होती. त्यातच पुरामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांची संख्या कमी झाली होती. पण पावसाने उसंत घेतली असल्याने किराणा मालाच्या दुकानात गर्दी होऊ लागली आहे. सोमवारी (ता. २३) आषाढी एकादशी असल्याने उपवासाच्या शाबू, वरी, शेंगदाणे या पदार्थांना मागणी वाढली आहे. शाबूचा दर स्थिर असून ५६ ते ६० रुपये प्रतिकिलो दर आहे. शाबू पर्लची किंमत प्रतिकिलो ८० रुपये आहे. पर्ल शाबूपासून शाबू चिवडा तयार केला जातो. वरीच्या मागणीत वाढ झाली असून वरीचा दर ६० ते ९० रुपये किलो असा दर आहे. शेंगदाणा दरात पाच रुपयांनी वाढ झाली आहे. प्रतिकिलो ७५ रुपये असलेला शेंगदाणा दरची वाढ ८० रुपये प्रतिकिलो इतकी झाली आहे. राजिगरा दर ८० रुपये प्रतिकिलो असून लाडू तयार करण्यासाठी ग्राहकांकडून खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत होता.

गव्हाच्या दरात दोन रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच उडीद डाळीचा दर ६४ रुपयावरुन ७२ रुपयापर्यंत पोचला आहे. श्रावण महिन्यात खाद्य तेलांच्या मागणीत वाढ होत असून पॅकबंद खाद्य तेलाच्या दरात दोन ते तीन रुपये वाढ झाली आहे. सूर्यफुलाचे दर ९५ ते ११० रुपये आहेत.

किराणा दर (किलोमध्ये)

पोहे : ४८ रु.

साखर : ३६ ते ३८ रु.

शेंगदाणे : ८० रु.

मैदा : ३० रु.

आटा : ३० रु.

गूळ :४० ते ५० रु.

शाबू: ५६ ते ६० रु.

००

डाळीचे दर (किलोमध्ये)

तूरडाळ: ६४ ते ७० रु.

मूगडाळ: ८० रु.

उडीद डाळ: ७२ रु.

हरभरा डाळ : ६० रु.

मसूर डाळ : ६८ ते ७२ रु.

मसूर : ६० ते १३० रु.

चवळी : ८० ते १०० रु.

हिरवा वाटाणा : ८० ते ९० रु.

काळा वाटाणा : ६८ रु.

पांढरा वाटाणा : ५६ रु.

मटकी : ६० ते ९० रु.

छोले : १०० ते १२० रु.

पावटा: १०० रु.११०

०००

बार्शी शाळू : ३४ ते ३८ रु.

गहू : २८ ते ३६ रु.

ज्वारी नं.१ : २४ ते ३० रु.

ज्वारी नं.२: २० ते २५ रु.

बाजरी : २४ रु.

नाचणी : ३६ रु.

००००

तेलाचे दर

शेंगतेल : १२५ रु.

सरकी तेल : ९० रु.

खोबरेल : २४० ते

सूर्यफूल : ९५ ते ११० रु.

०००

मसाले दर (किलोमध्ये)

तीळ : १४० ते १६० रु.

जिरे: २४० ते २८० रु.

खसखस: १०० ते १००० रु.

खोबरे : १८० ते २४० रु.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर ओसरू लागला

$
0
0

पावसाचा जोर कमी झाल्याने पंचगंगेची पाणीपातळी उतरली

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पावसाचा जोर कमी झाल्याने पूर ओसरू लागला असून शनिवारी दिवसभरात कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याजवळ पाण्याची पातळी एक फुट दोन इंचाने कमी झाली. पूर ओसरत असला तरीही जिल्ह्यातील ५७ बंधारे पाण्याखाली असून वारणा, काळम्मावाडी, राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाने हुपरी (ता. हातकणंगले) येथील घर पडल्याने दीड लाखाचे नुकसान झाले असून या दुर्घटनेत जिवितहानी झाली नाही. गेल्या २४ तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ४५. ५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

वारणा, राधानगरी, काळम्मावाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी (ता. २०) दक्षतेचा आदेश दिला होता. पण शनिवारी पावसाचा जोर ओसरल्याने पुराच्या पाणी पातळीत घट होऊ लागली आहे. शुक्रवारी पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी ४२ फूट ८ इंच होती. शनिवारी सकाळी आठ वाजता पाणी पातळी ४१ फूट ११ इंचापर्यंत आली. पण दिवसभरात झपाट्याने पाणी ओसरू लागले. सायंकाळी सहा वाजता पाणी पातळी ४१ फुटापर्यंत आली. रात्री आठवाजेपर्यंत पाणी पातळी ४० फूट दहा इंच इतकी होती. दिवसभरात एक फुटापेक्षा जास्त पाण्याची पातळी कमी झाल्याने नागरी वस्तीत पाणी घुसण्याचा धोका कमी झाला आहे.

राधानगरी धरणाच्या दोन स्वयंचलित दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दिवसभर ४ हजार ४४६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत होता. काळम्मावाडी धरणातून पाच हजार क्युसेक्स तर वारणेतून १२ हजार ४१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. दरम्यान कोयना धरण्यातून पाण्याचा विसर्ग वाढला असून कृष्णा नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत कोयनेतून १८ हजार ३११ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत होता. पण दुपारी बारानंतर पाण्याचा विसर्ग वाढवला असून तो २४ हजार क्युसेक्सपर्यंत पोचला आहे. दुसरीकडे कर्नाटकातील अल्लमट्टी धरणात एक लाख ७३ हजार ९२३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

तालुकानिहाय पाऊस

हातकणंगले ५.५० मि.मी.

शिरोळ २.५७

पन्हाळा २०.१४

शाहूवाडी ३१.००

राधानगरी २५.८३

करवीर १२.००

कागल १२.५७

गडहिंग्लज ८.५७

भुदरगड २२.४०

आजरा ३१.७५

चंदगड १६.६६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images