Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

१५ हजार लायसन्सचे वितरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने एका दिवसात लायसन्स देण्याच्या मोहिमेतर्गंत आतापर्यत १५ हजारांहून अधिक लायसन्स वितरित केल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी गुरुवारी प्रसिद्धी पत्रकातून दिली.

पत्रकात म्हटले आहे, जून महिन्यांपासून एका दिवसात लायसन्स तयार करून देण्याची मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेतून कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात नवीन लायसन्स काढणे, लायसन्सचे नुतनीकरणाची सोय झाली आहे. एका दिवसात लायसन्स तयार करुन ती पोस्टामार्फत पाठविण्यात येत असल्याने संबंधितांना घरपोच लायसन्स मिळत आहे. कार्यालयात रोज सुमारे २०० ते २५० जणांना नवीन लायसन्स तयार करणे, नूतनीकरण करण्याची प्रक्रिया एका दिवसात पूर्ण केली जात आहे. येथे वाहन खरेदी करणाऱ्यांना एका दिवसातच नंबर उपलब्ध करुन दिले जात आहे. कॅम्पमध्ये वाहन खरेदी करणाऱ्यांना दुसऱ्या दिवशी नंबर दिले जात आहे.

सुविधा केंद्र

आरटीओकडील लर्निंग, पक्‍के लायसन्स, नुतनीकरण, वाहन तपासणीची प्रक्रिया पारदर्शक, गतिमान होण्यासाठी सामान्य सुविधा केंद्र स्थापन करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे यांनी सांगितले. ई-गर्व्हनर्स सर्व्हिस इंडिया लिमिटेडच्या सहकार्यातून अशी केंद्रे निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘लाचखोर अधिकारी, पोलिसांना निलंबित करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारत राखीव बटालियनच्या कोल्हापूर कार्यालयात सापडलेले सहा लाचखोर अधिकारी आणि पोलिस तसेच शाहूवाडी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी प्रतिभा सुर्वे यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पत्रकाद्वारे केली आहे. या सर्व संशयितांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. त्यासह खातेनिहाय कारवाई करण्यात येईल. मात्र या लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केवळ निलंबित करण्याऐवजी बडतर्फ करण्याची गरज आहे. निलंबित केल्यानंतर पुन्हा काही महिन्यांना या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रूजू करण्यात येईल. त्यामुळे पुन्हा सर्वसामान्यांकडून लाच घेण्यासाठी तत्पर सेवा बजाविण्यास सज्ज राहतील. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल लागण्यापूर्वीच रंगेहात पकडलेल्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी भाकपचे जिल्हा सेक्रेटरी सतीशचंद्र कांबळे, शहर सेक्रेटरी अनिल चव्हाण यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमृत महोत्सवानिमित्त वंचितांना मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अमृत महोत्सव वाढदिवस म्हटला की त्याचा डामडौल काही औरच असतो. मात्र या दिनाचे औचित्य साधून कॉमर्स कॉलेजमधील निवृत्त प्रा. एल. एस. खोत यांनी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. स्नेह्यांनी अमृत महोत्सवी वाढदिवसाप्रसंगी कोणत्याही प्रकारचे हार, गुच्छ व शाल व भेटवस्तू न देता संबंधित रक्कम वंचित घटकांच्या मदतीसाठी जमा करावी, असे आवाहन केले आहे. त्या जमलेल्या रकमेत प्रा. खोत यांनी स्वत:कडील २५ हजार रुपयांची भर घालून अंध, अपंग व कॅन्सरपीडित लोकांना देण्याचे ठरविले आहे.

रविवारी २२ जुलै रोजी आयोजित कार्यक्रमात प्रा. खोत यांच्या 'माझी जीवन गाथा'या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात येणार आहे. ताराराणी विद्यापीठ परिसरातील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृहात दुपारी बारा वाजता कार्यक्रमाला प्रारंभ होईल. प्रा. खोत हे ताराबाई पार्क परिसरात वास्तव्यास आहेत. कॉमर्स कॉलेज येथे त्यांनी ३२ वर्षे नोकरी केली. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक अशी त्यांची ओळख होता. भूगोल विषयाचे प्राध्यापकासह जिमखाना विभाग प्रमुखपदाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणवेश वाटप

$
0
0

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील माले येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे गरजू विद्यार्थी, विद्यार्थिनींना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी राजमहंमद पठाण, मेजर नारायण सुतार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्याध्यापिका एम. व्ही. कदम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी नारायण सणगर, अरविंद चौगुले यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. मोफत गणवेश उपक्रमासाठी श्रीमती एस. बी. पाटील यांचे सहकार्य लाभले. ए. बी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यू. एस. सूर्यवंशी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडपीठ जागेसाठी मंगळवारी बैठक

$
0
0

बार असोसिएशनने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी शेंडा पार्कातील ७५ एकर जागेच्या प्रस्तावात विभागीय आयुक्त कार्यालयाने १५ त्रुटी काढल्या आहेत. याबाबत जिल्हा बार असोसिएसनचे अध्यक्ष प्रशांत चिटणीस यांनी शिष्टमंडळासह शुक्रवारी (ता. २०) जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी भेट घेतली. त्रुटींची पूर्तता करण्यासाठी मंगळवारी (ता. २४) संबंधित विभागांच्या प्रमुखांची बैठक घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

कोल्हापुरातील खंडपीठाच्या जागेसाठी शेंडा पार्क येथील ७५ एकर जागेचा मागणी केली आहे. खंडपीठ कृती समितीसोबत झालेल्या बैठकीत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जागेचा प्रस्ताव मार्गी लावण्याच्या सूचना विधी व न्याय विभागाला दिल्या होत्या. यानुसार कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने शेंडा पार्कातील जागा खंडपीठासाठी आरक्षित करावी, असा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाला पाठवला. विभागीय आयुक्त कार्यालयाने नुकतेच त्रुटींचे पत्र कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवले असून, १५ त्रुटींची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत शुक्रवारी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी सुभेदार यांनी त्रुटींची पूर्तता करण्यासाठी मंगळवारी संबंधित विभागांच्या प्रमुखांची बैठक घेण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना दिल्या. त्रुटींची पूर्तता करून वेळेत सर्व कागदपत्र विभागीय आयुक्त कार्यालयात सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

त्रुटींची पूर्तता करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत महानगरपालिका, आरोग्य विभाग, वनविभाग, महसूल विभागासह शेंडा पार्कात जागेची मागणी केलेल्या १४ विभागांच्या प्रमुखांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. बार असोसिएशनचे पदाधिकारीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. जागेचा मोजणी नकाशा, महापालिकेचे ना हरकतपत्र, जागेसंदर्भात असेलेल्या प्रलंबित दाव्यांची स्थिती, जागेच्या वस्तुस्थितीचा पंचनामा, नगररचना विभागाच्या सहायक संचालकांचा अभिप्राय, शहर विकास आराखड्यातील आरक्षणांची माहिती, आदी त्रुटींवर या बैठकीत चर्चा होणार आहे. अध्यक्ष चिटणीस यांच्यासह सहसचिव तेहजीज नदाफ, सदस्य ओंकार देशपांडे, अभिषेक देवरे, संजय मुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.

खंडपीठाच्या जागेसंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयाने १५ त्रुटींचे पत्र पाठवले आहे. या त्रुटींची तातडीने पूर्तता करावी, यासाठी शुक्रवारी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत मंगळवारी बैठकीचे आयोजन केले आहे, त्यामुळे लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल.

अॅड. प्रशांत चिटणीस, अध्यक्ष, जिल्हा बार असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमृत महोत्सवानिमित्त वंचितांना मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अमृत महोत्सव वाढदिवस म्हटला की त्याचा डामडौल काही औरच असतो. मात्र या दिनाचे औचित्य साधून कॉमर्स कॉलेजमधील निवृत्त प्रा. एल. एस. खोत यांनी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. स्नेह्यांनी अमृत महोत्सवी वाढदिवसाप्रसंगी कोणत्याही प्रकारचे हार, गुच्छ व शाल व भेटवस्तू न देता संबंधित रक्कम वंचित घटकांच्या मदतीसाठी जमा करावी, असे आवाहन केले आहे. त्या जमलेल्या रकमेत प्रा. खोत यांनी स्वत:कडील २५ हजार रुपयांची भर घालून अंध, अपंग व कॅन्सरपीडित लोकांना देण्याचे ठरविले आहे.

रविवारी २२ जुलै रोजी आयोजित कार्यक्रमात प्रा. खोत यांच्या 'माझी जीवन गाथा'या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात येणार आहे. ताराराणी विद्यापीठ परिसरातील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृहात दुपारी बारा वाजता कार्यक्रमाला प्रारंभ होईल. प्रा. खोत हे ताराबाई पार्क परिसरात वास्तव्यास आहेत. कॉमर्स कॉलेज येथे त्यांनी ३२ वर्षे नोकरी केली. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक अशी त्यांची ओळख होता. भूगोल विषयाचे प्राध्यापकासह जिमखाना विभाग प्रमुखपदाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणवेश वाटप

$
0
0

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील माले येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे गरजू विद्यार्थी, विद्यार्थिनींना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी राजमहंमद पठाण, मेजर नारायण सुतार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्याध्यापिका एम. व्ही. कदम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी नारायण सणगर, अरविंद चौगुले यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. मोफत गणवेश उपक्रमासाठी श्रीमती एस. बी. पाटील यांचे सहकार्य लाभले. ए. बी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यू. एस. सूर्यवंशी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केएमटी भाडेवाढीला सर्वसाधारण सभेची मंजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या काही वर्षात तोट्यात सापडलेल्या महापालिकेच्या परिवहन उपक्रमाला (केएमटी) उर्जितावस्था देण्यासाठी महानगरपालिका परिवहन समितीने सादर कलेलेल्या प्रवासी भाडेवाढीच्या प्रस्तावाला शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपसूचनेसह मंजुरी मिळाली. सभेने भाडेवाढीला मंजुरी दिल्याने केएमटीच्या तिकीट दरवाढीवर शिक्कामोर्तब झाले. आता भाडेवाढीचा प्रस्ताव परिवहन प्राधिकरण समितीकडे पाठवला जाईल.

शहरासह परिसरातील महापालिकेच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून दररोज ११० केएमटी बस रस्त्यावर धावतात. एसटी, अवैध वाहतुकीबरोबर स्पर्धा करत दैनंदिन आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होत असल्याने रोज सुमारे अडीच लाखांचा तोटा सहन करावा लागतो. जमा-खर्चाचा ताळमेळ जमवताना केएमटीने तोट्यातील मार्गावरील बस बंद केल्या. तरीही केएमटीच्या उत्पन्नावर फारसा परिणाम झाला नाही. त्यामुळे प्रशासनाने १४ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव परिवहन समितीकडे पाठवला.

मंगळवारी (ता. १७) परिवहन समितीच्या सभेत नव्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देत तो सर्वसाधारण सभेत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १४ टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपसूचनेसह मंजुरी देण्यात आली. प्रस्तावित भाडेवाढीमुळे केएमटीचा दैनंदिन ६० हजार रुपयांचा तोटा भरुन निघणार आहे. नव्या प्रस्तावामध्ये पहिल्या टप्प्यासाठी एक रुपया तर त्यानंतरच्या चौथ्या टप्प्यापासून प्रत्येकी दोन रुपयांची वाढ सुचविण्यात आली आहे. प्रस्तावित भाडेवाढीमुळे विद्यार्थ्यांची पासची रक्कम दरमहा २५० ते ३५० रुपये होणार आहे. मात्र दैनंदिन पास मात्र पाच रुपयांनी कमी होणार आहे. सुधारित भाडेवाढीच्या प्रस्तावाला सभेत मिळालेल्या मंजुरीनंतर तो परिवहन प्राधिकरण समितीकडे पाठविण्यात येईल. प्रस्तावाला मंजुरी मिळल्यानंतर ऑगस्टपासून केएमटीच्या तिकीट दरात वाढ केली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आज प्रबोधन दिंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फुलेवाडी रिंगरोड परिसरातील शुभंकरोती इंग्लिश प्ले स्कूल व कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांच्यावतीने आषाढी एकदशीचे औचित्य साधून शनिवारी (ता.२१) प्रबोधन दिंडीचे आयोजन केले आहे. जोतिबा मंदिर आपटेनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर मार्गे चिंतामणी पार्क अशी दिंडी निघणार आहे. वृक्षारोपण, बेटी बचाव, प्लास्टिक बंदी, पाणी वाचवा, नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण या विषयाच्या अनुषंगाने समाज प्रबोधन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय क्रीडा स्पर्धेला आज सुरुवात

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेंतर्गत सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेला आज सुरुवात होत आहे. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, प्राथमिक शिक्षण सभापती अशोक जाधव यांच्या उपस्थितीत सकाळी साडेदहाला होणार आहे. स्पर्धा १९ ते २५ जुलै या कालावधीत विभागीय क्रीडासंकुल येथे होतील. स्पर्धा १४ व १७ वर्षाखालील वयोगटात होत असून स्पर्धेत ९० शाळा सहभागी होणार आहेत.

यंदा दरवर्षीप्रमाणे कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत एकूण ४२ अनुदानित क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेतील १४ वर्ष मुले, १७ वर्ष मुले व मुलींमध्ये विजयी व उपविजयी संघास दिवंगत अवधूत घारगे यांच्या स्मरणार्थ राजेंद्र घारगे यांच्याकडून ट्रॉफी देण्यात येणार आहे.

उद्घाटन कार्यक्रमास नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, नगरसेवक किरण नकाते, नगरसेवक सचिन पाटील व नगरसेवक संतोष गायकवाड, प्रशासनाधिकारी शंकर यादव उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडपीठासाठी निर्णायक लढा

$
0
0

सांगली जिल्हा बारच्या सभेत निर्णय

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सहा जिल्ह्यातील पदाधिकारी आणि वकिलांचा मेळावा लवकरच घेतला जाणार असून खंडपीठ आंदोलनाचा निर्णायक लढा दिला जाणार असल्याचा निर्धार सांगली जिल्हा बार असोसिएशनमध्ये व्यक्त करण्यात आला. खंडपीठासाठी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची चर्चा आणि बैठक सुरू केली आहे. त्यातंर्गत खंडपीठ कृती समितीने सांगली जिल्हा बार असोसिएशनला भेट दिली.

खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक व जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत चिटणीस, माजी अध्यक्ष विवेक घाटगे यांच्यासह जिल्हा बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगली जिल्हा बार असोसिएशनला भेट दिली. त्यांचा सांगली बार असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी सांगली जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. सचिन पाटील म्हणाले, 'खंडपीठ लढायांमध्ये सांगली जिल्ह्याने नेहमीच पुढाकार घेतला असून या पुढेही कायम राहणार आहे. सहा जिल्ह्याच्या पदाधिकारी व वकील वर्गाचा मेळावा लवकर घेऊन आंदोलनाचा निर्णायक लढा सुरू करावा. सांगली जिल्हा बारचे ज्येष्ठ वकील एच. के. पाटील, प्रताप हारुगडे, सुरेश भोसले, महेश जाधव, किरण रजपूत यांनी मत मांडले. नुकत्याच झालेल्या बार कौन्सिल निवडणुकीवेळी सहा जिल्ह्यांची एकी आणि समन्वय राहिला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

कोल्हापूर जिल्हा बारचे माजी अध्यक्ष विवेक घाटगे म्हणाले, बार कौन्सिलची निवडणूक व खंडपीठाचा प्रश्न या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. त्याबाबत स्वतंत्रपणे विचार करणे अपेक्षित आहे. खंडपीठाच्या प्रश्न निर्णायक टप्यावर आहे. त्यासाठी ताकदीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.' कोल्हापूर जिल्हा बारचे अध्यक्ष प्रशांत चिटणीस म्हणाले, 'खंडपीठाचा प्रश्न प्रामुख्याने पक्षकारांशी निगडित आहे. सहा जिल्ह्यातील वकिलांत खंडपीठाबाबत कोणतेही दुमत नाही. खंडपीठाचा प्रश्न येत्या काही महिन्यात पूर्णतः मार्गी लागू शकेल.' यावेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष आनंद जाधव, कार्यकारिणी सदस्य ओंकार देशपांडे, युवराज शेळके, ॲड. विजय पाटील आदी उपस्थित होते. यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज प्रबोधन दिंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फुलेवाडी रिंगरोड परिसरातील शुभंकरोती इंग्लिश प्ले स्कूल व कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांच्यावतीने आषाढी एकदशीचे औचित्य साधून शनिवारी (ता.२१) प्रबोधन दिंडीचे आयोजन केले आहे. जोतिबा मंदिर आपटेनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर मार्गे चिंतामणी पार्क अशी दिंडी निघणार आहे. वृक्षारोपण, बेटी बचाव, प्लास्टिक बंदी, पाणी वाचवा, नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण या विषयाच्या अनुषंगाने समाज प्रबोधन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कन्यागत’च्या कामासाठी सुधारित प्रस्ताव द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नृसिंहवाडीतील कन्यागत महापर्वकाळ सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यातील २७ कोटी ७५ लाखांच्या कामांचे सुधारित प्रस्ताव सर्व संबंधित यंत्रणांनी त्वरित द्यावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी झालेल्या जिल्हा पर्यटन समितीस बैठकीत केली.

सुभेदार म्हणाले, श्री क्षेत्र जोतिबा विकासाचा २७ कोटींचा आराखडा करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात मंजूर ५ कोटींच्या निधीतून दर्शन मंडप, टॉयलेट कॉम्प्लेक्स उभारणीची सर्व प्रक्रीया करून तांत्रिक मान्यतेसाठी ३१ जुलै अखेर प्रस्ताव जिल्‍हा पर्यटन समितीकडे द्यावा. त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यांतर्गत सविस्तर अंदाजपत्रक तांत्रिक मान्यतेसह नगर विकास विभागाकडे पाठवावा. श्री. राजर्षि छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळ, लक्ष्मी विलास पॅलेस येथील प्रलंबित कामांबाबत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा. पंचगंगा घाटात पर्यटकांसाठी मूलभूत सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने ४ कोटी ७८ लाखांस मान्यता दिली आहे.

माणगाव येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या ऐतिहासिक स्मारकाबाबातही सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. प्रादेशिक पर्यटन विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या सर्वच कामांचा आढावा घेतला. बैठकीस प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई, माहिती उपसंचालक सतिश लळीत, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, पश्चिम देवस्थान समितीचे सचिव विजय पवार, कार्यकारी अभियंता तुषार बुरूड, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा रूपाली धडेल, आर्कीटेक्ट राजन सावंत, केएसबीपीचे सुजय पित्रे आदीजण उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर खंडपीठाचा प्रश्न राज्यसभेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, अशा मागणीने खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सरकारचे लक्ष वेधले.

कोल्हापूर परिक्षेत्रातील सुमारे ६२ हजार न्यायालयीन प्रकरणे हे मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. कोल्हापूरहून मुंबईला जाण्यासाठी जवळपास ८ तास लागतात त्यामुळे केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाचे एक खंडपीठ कोल्हापूर येथे स्थापन करावे अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेत केली. यावर केंद्रीय विधी व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी 'या संदर्भातील प्रस्ताव अद्याप राज्य सरकारकडून आलेला नाही' असे खासदार संभाजीराजे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांकरीता मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे स्थापन करण्यास मान्यता द्यावी अशी शिफारस मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती यांना करावी यासंदर्भात १२ मे २०१५ रोजी राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. कुठल्याही ठिकाणी उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करायचे असल्यास राज्य शासनाने या संबंधी पूर्ण प्रस्ताव तयार करून हा प्रस्ताव उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व राज्यपाल यांच्या सहमतीने केंद्र सरकारकडे सादर करायचा असतो, त्यानंतर केंद्र सरकार यावर निर्णय घेत असते. या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्य सरकारकडून लवकरात लवकर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल व नागरिकांच्या मागण्या लक्षात घेता यासाठी लढा उभा केला जाईल असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच देणाऱ्यास रंगेहात पकडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींना सहकार्य करण्यासाठी पोलिस मुख्यालयातील सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र कदम यांना ५० हजार रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या रुई (ता. हातकणंगले) मोहन जिन्नू मगदूम याला शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. सायंकाळी सात वाजता ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक कदम यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. पोलिस अधिकाऱ्याला लाच देण्याचे आमिष दाखविल्याप्रकरणी मगदूम याच्यावर शाहुपूरी पोलिसांत रात्री उशीरा गुन्हा नोंदविण्यात आला.

रुई (ता. हातकणंगले) येथील लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेत ७ कोटी ५ लाख ४४ हजार ८६ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी हातकणंगले पोलिस ठाण्यात २९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपींपैकी लिपिक भरत कल्लाप्पा मगदूम याच्यावरील कारवाई टाळण्यासाठी त्याचा नातेवाईक मोहन मगदूम हा शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखा विभागात आला. या शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कदम यांना त्याने पाच लाख रुपये देण्याचे आमिष दाखविले. शुक्रवारी यापैकी ५० हजार रुपये आगाऊ रक्कम देण्याचे ठरले. कदम यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती दिली. लाचलुचपत विभागाने त्यासाठी सकाळपासूनच कार्यालयात सापळा रचला. मगदूम लाच देण्यासाठी आले असता त्यांना रंगेहात पकडले. त्याने दिलेली लाचेची रक्कम जप्त करण्यात आली. लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक गिरीश गोडे, निरीक्षक प्रवीण पाटील, सहायक फौजदार शाम बुचडे, हवालदार मनोज खोत, पोलिस नाईक, शरद पोरे, नवनाथ कदम, संग्राम पाटील, कृष्णात पाटील यांनी कारवाई केली. गेल्या आठवड्यात जवानांकडून लाच घेताना भारत राखीव बटालियनच्या सहाजणांना लाचलुचपत विभागाने पकडले होते. शुक्रवारी पोलिसांना लाच देणाऱ्यालाच पकडल्याने हा चर्चेचा विषय ठरला.

एसपी कार्यालयात खळबळ

लाचलुचपत विभागाने सापळा रचून पोलिस अधीक्षक कार्यालयात कारवाई केल्याची बातमी पोलिस दलात पसरली. अधीक्षक कार्यालय आणि शहरातील पाचही पोलिस ठाण्यात या कारवाईची चर्चा सुरू होती. काही पोलिस अधिकारी आणि कर्मचारी हडबडून गेले. मात्र, पोलिसांना लाच देण्यासाठी आलेला रंगेहात सापडल्याने अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजारामपुरी आठव्या गल्लीतील भारत हाउसिंग सोसायटीत शुक्रवारी दुपारी एका टेलरिंग कामगाराला दुचाकीवरून आलेल्या तिघांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्याच्या गळ्यातील एक तोळा सोन्याची चेन लुटली. संजय प्रल्हाद गुरव (वय ५८, रा. कुपेकर गल्ली, मंगळवार पेठ) असे या कामगाराचे नाव आहे. चेन लुटल्यानंतरही चोरट्यांनी गुरव यांना मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटिव्ही कैद झाला असून, पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

राजारामपुरी सहाव्या गल्तीत टेलरिंग व्यावसायिकाकडे गुरव काम करतात. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारात जेवन करून ते राजारामपुरी आठवी गल्ली येथे आले. तेथे पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तिघा तरुणांनी त्यांना अचानक अडविले. दोघांनी दुचाकीवरून उतरून एकाने खिशातून रिव्हॉल्व्हर काढून गुरव यांच्यावर रोखले आणि दुसऱ्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेतली. त्यानंतर त्यांनी आरडाओरडा सुरू करताच त्यांना मारहाण केली. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी दुकानात सहकाऱ्यांना हा प्रकार सांगितला. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली. परिसरातील सीसीटीव्हीतील फुटेजमध्ये चोरटे कैद झाल्याचे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सकल मराठा समाजाचेठिय्या आंदोलन सुरू

$
0
0

फोटो आहे.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आरक्षणासह विविध मागण्या मान्य करण्यास सरकार विलंब करीत असल्याचा आरोप करीत येथील सकल मराठा समाजातर्फे शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. सरकारने जाहीर केलेल्या मेगा भरतीत आरक्षण देण्याची लेखी हमी दिल्याशिवाय आंदोलन मागे घ्यायचे नाही, या निर्धाराने दोन दिवसांपासून परळीतील तहसील कर्यालयासमोर मोठ्या संख्येने मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.

सकल मराठा समाजातर्फे राज्यभर ५८ मोर्चे शांततेने काढण्यात आले. तरीही सरकारने आरक्षणासह विविध मागण्या पूर्ण केलेल्या नाही. केवळ आश्वासने देत आहे, असा आरोप करीत मराठा समाजातर्फे परळीत मोर्चा काढून ठिय्या आंदोलन सुरू केले. राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयांसमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्याचे आवाहन परळीतील मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांनी केले आहे. त्यानुसार येथील हणमंत पाटील, विजय गायकवाड, सागर धनवडे, विश्वास जाधव, संभाजी थोरवत, विकास संकपाळ, संतोष मगदूम, संतोष भातमारे, विनायक पवार, आदींनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात समाजाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंदजित सावंत, आदी उपस्थित होते.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज दरवाढीविरोधात मुंबईत २५ जुलैला परिषद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वीज कंपन्यांनी सादर केलेल्या दरवाढीच्या प्रस्तावाला वीजग्राहक व औद्योगिक संघटनेने विरोध केला आहे. प्रस्तावित वीज दरवाढ हाणून पाडण्यासाठी राज्यभरातील वीज ग्राहकांचा मेळावा २५ जुलैला मुंबईत आयोजित केला आहे. याबाबत शुक्रवारी (ता. २०) कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनच्या हॉलमध्ये जिल्ह्यातील व्यावसायिक आणि उद्योजकांची राज्यस्तरीय समन्वय समितीचे समन्वयक प्रताप होगाडे यांच्यासोबत बैठक पार पडली.

वीज कंपन्यांनी दरवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे. या प्रस्तावामुळे किमान २२ टक्के दरवाढ होणार असल्याचा दावा वीजग्राहक व औद्योगिक संघटनांनी केला आहे. ही दरवाढ हाणून पाडण्यासाठी राज्यातील वीजग्राहक व औद्योगिक संघटना एकत्रित येत आहेत. याबाबत शुक्रवारी वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांच्यासोबत कोल्हापुरातील इंजिनीअरिंग असोसिएशनच्या हॉलमध्ये व्यावसायिक व उद्योजकांची बैठक पार पडली. बैठकीत होगाडे यांनी वीज दरवाढीला विरोध करण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, 'वीज कंपन्यांकडून ग्राहकांची फसवणूक सुरू आहे. प्रतियुनिट आठ पैशांची दरवाढ करणार असल्याचे सांगितले जाते. मात्र हा फसवा प्रचार आहे. प्रत्यक्षात प्रतियुनिट १ रुपये ४५ पैसे वाढ होणार आहे. ही दरवाढ २२ टक्के आहे. मुळातच देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वीजेचे दर २५ ते ३५ टक्के अधिक आहेत. या स्थितीत वीज कंपन्यांमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्याऐवजी सरकार भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहे,' असा आरोप होगाडे यांनी केला आहे.

घरगुती वीज ग्राहकांसह, व्यावसायिक, उद्योजक या सर्वांनाच प्रस्तावित वीज दरवाढ परवडणारी नाही. गेल्या पाच ते सहा वर्षात राज्यातील औद्योगिक वीजेची मागणी घटली आहे. याचा अर्थ वाढत्या वीजदरांमुळे राज्यातील उद्योग इतरत्र स्थलांतरीत होत आहेत. शेतकऱ्यांसाठी ही वीज दरवाढ सर्वाधिक धोकादायक ठरणार आहे, त्यामुळे दरवाढीविरोधात सर्व वीज ग्राहकांनी एकत्र येण्याचे आवाहन होगाडे यांनी बैठकीत केले. वीज दरवाढीच्या विरोधात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी राज्यस्तरीय समन्वय समितीने २५ जुलैला मुंबईत परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेसाठी राज्यभरातून वीज ग्राहक उपस्थित राहणार आहेत. वीज दरवाढीविरोधात ३१ जुलैपर्यंत वीज नियामक आयोग आणि राज्य सरकारकडे हरकती व सूचना दिल्या जाणार आहेत. या हरकती कशा पद्धतीने द्याव्यात याचे मार्गदर्शन होगाडे यांनी उपस्थितांना केले. हरकती सादर केल्यानंतर ६ ते १६ ऑगस्टदरम्यान राज्यात सहा ठिकाणी सुनावणी होणार आहे. यावेळी कोल्हापूर जिल्हा इंजिनीअरिंग असोसिएसन, गोशिमा, स्मॅक या संस्थांसह इचलकरंजी, कागल, हातकणंगले येथील उद्योजक संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांची आश्वासने सोशल मीडियात झळकवणार

'साडेतीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे वीज दरवाढीविरोधात आंदोलन केले होते. त्यांनी स्वत: वीजग्राहक व औद्योगिक संघटनांसोबत वाढीव वीज बिलांची होळी केली. सत्ताबदलानंतर वीजग्राहकांना दिलासा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी साडेतीन वर्षांपूर्वीच्या भाषणाची व्हिडिओ क्लीप सोशल मीडियात झळकवली जाईल', अशी माहिती प्रताप होगाडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१७ बँक खाती संशयिताच्या भोवऱ्यात

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com

tweet:@sachinyadavMT

कोल्हापूर : भारत राखीव बटालियनमधील लाचखोरीचा प्रकरणातील महत्वाचा मुद्दा लाचेचे पैसे जमा करणाऱ्या बँक खात्याचा आहे. खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव यासंदर्भात चर्चेत आहे. वरकमाईचे पैसे त्याच्यासह खात्यातील १७ जणांच्या खात्यांवर भरण्यात आले आहेत. यामध्ये दोन खासगी व्यक्तींच्या बँक खात्यांचा समावेश आहे. एका राष्ट्रीयीकृत बँकेसह एका बड्या खासगी बँकेत खात्यावर व्यवहार झाले आहेत.

लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडू नये, यासाठी वरिष्ठांनीच ऑनलाइन पैसे ट्रान्स्फरची यंत्रणा कार्यन्वित केली. त्यानुसार बटालियनमधील १७ कर्मचाऱ्यांची पैसे गोळा करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली. जवानांकडून विविध कामांसाठी घेतलेली लाच पद्धतशीरपणे या १७ जणांच्या खात्यावर ट्रान्सफर केली जाते. त्यासाठी चार ते पाच वर्षांपूर्वी एका राष्ट्रीयकृत बँकेत सर्वांची खाती उघडण्यात आली. या ठिकाणी या कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन जमा केले जाते. गेल्या सहा महिन्यांपासून ही सर्व खाती एका बड्या खासगी बँकेत उघडण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून या खात्यांवर सुमारे ५० लाखांहून अधिक रुपयांचे व्यवहार झाले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासणीत ही खाती समोर आली आहे.

चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारलेल्या हवालदाराच्या मोबाईल कॉल डिटेल्समध्ये त्याने कारवाईवेळी केलेला शेवटचा दूरध्वनी खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला केला आहे. त्याच्या खात्यावर २७ हजार रुपये जमा करण्यात येणार होते. लाचलुचपत विभागाच्या पथकाला हवालदाराकडे अंथ्रासीन लावलेल्या नोटांसह रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतरच्या चौकशीत लाच जमा केली जाणारी बँक खाती महत्वाची असल्याचे दिसले. २०१७मध्ये वर्ग चारच्या विविध पदांसाठी झालेल्या भरतीसाठी या १७ लोकांनी 'महत्वपूर्ण कामागिरी' बजाविली होती. लाचखोरीचे 'कलेक्टर' म्हणून प्रसिद्ध असलेल्यांनी भरतीत 'लाख'मोलाचे काम केले. बटालियनच्या ए, बी, सी, डी आणि ई या कंपनीकडून 'मेस अॅडव्हास'ही परस्पर लाटण्यात आला. याची ५० हून अधिक जवानांची सुमारे दोन लाख रुपयांची रक्कम आहे. कंपनी कमाडंटनंतर हत्यार, आवक-जावकची कामे पाहण्यासाठी कॉर्टर मास्तरच्या ड्युटीसाठी वीस हजार रुपये यंत्रणेने घेतले. सेवा पुस्तकातही विविध प्रकारच्या प्रशिक्षणाची नोंद करण्यासाठी जवानांकडून प्रत्येकी ५०० रुपये घेतले जातात असे सांगण्यात येते. जवानांना गोपनीय अहवाल खराब करण्याच्या धमक्याही त्यांच्याकडून दिल्या जात असल्याचे समजते. जवानांची अनेक कामे मर्जीतल्या 'मानसपुत्रा'कडे दिल्याची चर्चा सुरू आहे.

कोऱ्या प्रश्नपत्रिका

'जाऊ तेथे खाऊ' या उक्तीप्रमाणे लाचखोर यंत्रणेने मिळेल त्या कामात जवानांची लुबाडणूक केली. बटालियनच्या अंतर्गत परीक्षेतून कार्यालयाचा स्टाफ निवडला जातो. ही परीक्षा देण्यासाठी वीसहून अधिक जवान परीक्षेस बसले. कार्यालयात मेजर, हवालदार, कम्प्युटर ऑपरेटर, पगारपत्रकी (बाबूजी) या पदांसाठी परीक्षार्थींकडून सुमारे प्रत्येकी वीस हजार रुपये घेण्यात आले. पैसे दिलेल्यांना प्रश्नपत्रिका कोऱ्या ठेवण्यास सांगण्यात आले. परीक्षेच्या निकालाआधी व्यवहार पूर्ण केलेल्यांना ९८ गुण देण्यात आले अशी चर्चा आहे.

(समाप्त)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हस्तांतराअभावी अडकले ३७ वाहनचालकांचे वेतन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केएमटीकडे ठोक मानधनावर कार्यरत ३७ वाहनचालकांना महापालिकेच्या आस्थापना विभागाकडे वर्ग करण्याचे आदेश प्रशासाने दिले. मात्र वाहनचालकांना केएमटीने महापालिकेकडे वर्ग न केल्याने त्यांच्या प्रत्येक महिन्याच्या वेतनाला दिरंगाई होत आहे. दोन ते तीन महिन्यातून एकदा वेतन मिळत आहे. त्यामुळे आधीच मानधनावर असलेल्या वाहनचालकांना उसनवारीवर आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे. या वाहनचालकांची आस्थापना त्वरीत बदलण्याची मागणी महिला व बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा यांनी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

केएमटीकडे ठोक मानधनावरील वाहनचालक गेल्या पाच ते सहा वर्षांपासून महापालिकेच्या वर्कशॉप विभागाकडे कार्यरत आहेत. हे वाहनचालक अनेक पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या वाहनांवर चालक आहेत. वर्कशॉप विभागाकडे कार्यरत वाहनचालकांना महापालिकेच्या आस्थापनेकडे वर्ग करण्याचे आदेश अतिरिक्त परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. मात्र गेल्या पाच वर्षांपासून केएमटीच्या व्यवस्थापनाने ३७ वाहनचालकांना महापालिकेकडे हस्तांतरित केलेले नाही. त्यामुळे हस्तांतर प्रक्रियेत अडकलेल्या वाहनचालकांना प्रत्येक महिन्याचे वेतन दोन ते तीन महिन्याच्या विलंबानंतरच मिळते. दर महिन्याला वेतन मिळत नसल्याने वाहनचालकांना उसनवारीवर उदरनिर्वाह करावा लागत आहे. अनेक वाहनचालक रजा, सुटीच्या काळात इतर ठिकाणी काम करुन उदरनिर्वाह करत आहेत. वाहनचालकांची ही ससेहोलपट रोखण्यासाठी केएमटीकडून त्यांना महापालिकेकडे वर्ग करण्यात यावे अशी मागणी महिला व बालकल्याण समिती सभापती शहा यांनी आयुक्तांकडे केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images