Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

LBT विरोधात ११ रोजी निषेध दिन

$
0
0
‘एलबीटी’विरोधात येत्या ११ डिसेंबरला सर्व महापालिका क्षेत्रात व्यापारी मेळाव्याचे आयोजन व राज्य सरकारबद्दल निषेध दिन पाळण्यात येणार आहे, अशी माहिती येथील एलबटी विरोधी कृती समितीचे अध्यक्ष आशिष शहा यांनी दिली.

अवकाळी पावसाचा साता-याला तडाखा

$
0
0
थंडीचे दिवस सुरू झाले असले, तरी सातारा शहरात अवकाळी पाऊस पडत आहे. चार दिवसांपूर्वी सातारा, कराड, पाटण तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले होते. रविवारी रात्री पुन्हा सातारा शहराला अवकाळी पावसाचा तडाखा बसला. जवळपास तीन तास मुसळधार पाऊस पडत होता.

महावीर मंदिरातील चोरी पुजा-याकडूनच

$
0
0
सांगलीत महावीर मंदिरातील मूर्तीवरील ऐवज चोरणारा पुजारीच असल्याचे सोमवारी उघडकीस आले. हा केवळ चोर पुजारी नसून तो ‘प्रेमपुजारी’ आहे. कोल्हापुरातल्या मंदिरात पुजारी असताना प्रेयसीची हत्या करण्याची सुपारी देण्यासाठी त्याने चोरी केली आणि आता तिसऱ्या प्रेयसीबरोबर लग्नाचा बार उडवून देण्यासाठी मूर्तीवरील पावणेसहा लाखांचा ऐवज चोरल्याचे समोर आले आहे.

गणितासाठी ‘गणित कमांडो’

$
0
0
हसत खेळत आणि लहानसहान उदाहरणांच्या माध्यमातून गणिताचे अध्यापन करण्यासाठी गणित चळवळीतील ज्ञान उपयुक्त ठरणारे आहे. शालेय मुलांच्या मनातील गणिताची भीती दूर झाली पाहिजे. त्यासाठी जिल्हा परिषद प्रत्येक तालुक्यासाठी दहा तज्ज्ञ शिक्षकांची गणित कमांडो म्हणून नेमणूक करणार आहे.

ग्रामीण भागांतील फेऱ्यांत कपात

$
0
0
डिझेलच्या दरातील वाढ व रात्रीच्या फेऱ्यांना मिळणारा कमी प्रतिसाद लक्षात घेऊन केएमटीने प्रशासनाने ग्रामीण भागातील रात्री उशिरा धावणाऱ्या फेऱ्यांत कपात केली आहे. रात्री उशिरा धावणाऱ्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून सध्या कोल्हापूरहून सुटणाऱ्या बसच्या वेळा १५ ते अर्धा तास अगोदर घेण्यात आल्या आहेत. रविवारपासून (ता. १ डिसेंबर) वेळापत्रकाच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली.

बिझनेस पार्सल झाले ‘एक्स्प्रेस’

$
0
0
राज्यात कुठेही ४८ तासात तर देशभरात तीन दिवसात पोहोचणारे पोस्टाचे बिझनेस पार्सल ‘एक्स्प्रेस पार्सल’ या नव्या नावाने एक डिसेंबरपासून सुरू झाले. पोस्टातर्फे बिझनेस पार्सल सेवा पोहोचवण्यासाठी लागणाऱ्या विलंबामुळे व्यावसायिकांनी कुरियरसेवेकडे मोर्चा वळवल्याने गेल्या महिन्याभरापासून बिझनेस पार्सलसेवा बंद होती.

भ्रष्टाचाराच्या तत्त्वज्ञानाचे भाडोत्री विचारवंत

$
0
0
सॉक्रेटिसने सोफिस्ट विचारवंतांवर टीका करताना त्यांना भ्रष्टाचाराच्या तत्त्वज्ञानाचे भाडोत्री विचारवंत म्हटले आहे आणि सोफिस्ट हे ज्ञानाचे कंत्राटदार झाले असून, त्यातच माणसांच्या शोषणाचे मूळ आहे, असेही म्हटले आहे.

अंग राखून चळवळ होत नाही

$
0
0
गेल्या ४० वर्षांपासून फेरीवाल्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याबरोबरच त्यांच्याविषयी समाज आणि प्रशासकीय पातळीवर असलेला गैरसमज दूर करण्याचे काम कॉम्रेड दिलीप पवार करीत आहेत.

विजयदुर्गमध्ये ‘कल्चरल फिस्ट’

$
0
0
छत्रपती शिवरायांच्या मराठा आरमारात समाविष्ट झालेला पहिला जलदुर्ग...विजयदुर्ग, ऐतिहासिक रामेश्वर मंदिर, गिर्ये बिच, दामले मळा, नौकायनाद्वारे पुरातत्त्व नैसर्गिक गोदी आणि वाघोटन खाडी अशा विजयदुर्गाच्या कवेत सामावलेल्या गोष्टींचे प्रशिक्षित गाईडमार्फत दर्शन, त्याचबरोबर कोकणातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी २१, २२ आणि २८, २९ डिसेंबर दरम्यान पर्यटकांना चाखायला मिळणार आहे.

दिवस आंदोलनांचा

$
0
0
घोषणा, निदर्शने, मोर्चा आणि धरणे आंदोलनामुळे सोमवारचा दिवस जिल्हाधिकारी कार्यालयावर ताण आणणारा होता. आंदोलनाची संख्या लक्षात घेऊन पोलिसांनी प्रत्येकांना वेगळी वेळ आणि जागा निश्चित करुन दिल्याने दुपारपर्यंत एकापाठोपाठ एक मोर्चे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

आधी ‘वारणे’तून ठरले मग आता ‘कृष्णे’तून का?

$
0
0
‘ठरले वारणेतून आणि मग कृष्णेतून का ?,’ असा सवाल करीत पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सांगली - मिरज - कुपवाड महापालिकेच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांना ‘कृष्णेच्या अशुद्ध पाण्याने लोक हैरान झाले आहेत.

अलमट्टीच्या उंचीवाढीला पतंगरावांचा विरोध

$
0
0
कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवायला लवादाने परवानगी दिली असली, तरी आपला उंची वाढीला विरोध आहे. उंचीवाडीचे परिणाम काय होतील, यावर राज्याच्या मंत्रिमंडळात चर्चा करून केंद्राकडे उंचीवाढीला विरोध केला जाणार असल्याचे डॉ. पतंगराव कदम यांनी सोमवारी सांगलीत सांगितले.

७९५ ग्रामपंचायतींना २६ कोटींचा निधी

$
0
0
गावांचा एकात्मिक विकासाचा आराखडा बनवून लोकांच्या सहभागातून विविध योजना एकात्मिक पद्दतीने सातत्याने राबविण्यात कोल्हापूर जिल्हा परिषदेने आघाडी घेतली आहे. तर पर्यावरण संतुलित ग्रामयोजनेअंतर्गत जिल्ह्यातील ७९५ ग्रामपंचायती योजनेच्या तृतीय वर्षाच्या निकषास पात्र ठरल्या आहेत.

ग्रामीण साहित्य संमेलन २९ डिसेंबरला

$
0
0
निमशिरगाव (ता. शिरोळ) येथे २९ डिसेंबर रोजी होणाऱ्या ग्रामीण साहित्य संमेलनात देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

आकृत‌िबंधाविरोधात कागलमध्ये निदर्शने

$
0
0
राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील निम्म्याहून अधिक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा सुधारित आकृतीबंध रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कागल तालुका शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात घेण्यात आला. यावेळी २३ ऑक्टोबरच्या सुधारित आकृतीबंधाचा निषेध करत परिपत्रकाची होळी करण्यात आली.

जमिनींचा मोबदला द्या

$
0
0
धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीबाहेरील मालकी जमिनीचा मोबदला त्वरित मिळावा किंवा या जमिनीला पर्यायी जमीन मिळावी या मागणीसाठी जिल्ह्यातील काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेच्यावतीने राधानगरी तहसीलदार कार्यालयावर रविवारी धडक मोर्चा काढण्यात आला.

काँग्रेस गप्प, राष्ट्रवादी आक्रमक

$
0
0
उस दरप्रश्नी राजू शेट्टी दोन्ही काँग्रेसवर हल्लाबोल करताना राष्ट्रवादीचे नेते हा हल्ला परतवून लावत आहेत. मात्र दुसरीकडे काँग्रेसचे नेते पहिल्यापासून​ या आंदोलनाकडे थंडपणे पहात आहेत. शेटृींची कोंडी करण्यात मंत्री आर. आर. पाटील, जयंत पाटील, हसन मुश्रीफ हे सारे आघाडीवर होते.

एड्ससह जगणा-या महिलांसमोर अडचणींचा डोंगर

$
0
0
एचआयव्ही एड्ससारखा आजार झाल्यानंतर माणूस समाजाच्या नजरेत आपले अस्तित्व गमावतो. पण आपल्या कुटुंबाच्या नजरेतसुद्धा त्याला चांगली वागणूक मिळत नाही. एचआयव्ही व एड्स झालेल्या पेशंटमध्ये महिलांच्या वाट्याला येणारे दुःख तर फक्त सहन करत राहणे आणि आयुष्यात येणाऱ्या अडचणींचा डोंगर पार कसा याची चिंता करीत दिवस ढकलणे याच्याभोवतीच फिरते.

‘पेटा’चा वन खात्याविरोधात खटला

$
0
0
जोतिबा देवस्थानच्या सुंदर हत्तीला अभयारण्यात सोडून द्यावे, असा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला असतानाही त्याची अंमलबजावणी न करता तो आमदार विनय कोरे यांच्या ताब्यातच आहे.

शेट्टींकडून विश्वासघात

$
0
0
‘आंदोलन चिरडण्याची माझी भूमिका असती, तर मी आमचे कारखाने बंद ठेवलेच नसते. तोडफोड करणे, ही राजारामबापूंच्या कार्यकर्त्यांची प्रवृत्ती नाही,’ असा स्पष्ट इशारा देत ‘दगड मारायचे ३००० ला, अन सेटलमेंट करायची २२०० ला,’ ही राजू शेट्टींची प्रवृत्ती आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images