Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कोरे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची निवड

$
0
0

कोरे अभियांत्रिकीच्या

चार विद्यार्थ्यांची निवड

म. टा. वृत्तसेवा, शिराळा

वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांची पुण्यातील सिंटेल या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर या पदासाठी कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झाली. सायली देशपांडे, चेतन हलुंडे, शिवानंद सावळगी, ऋतुराज पाटील या चार विद्यार्थ्यांना वार्षिक तीन लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. तात्यासाहेब कोरे अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर यांनी ही माहिती दिली.

सिंटेल कंपनीचे ट्रेनिंग प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. एस. टी. पाटील आंतरराष्ट्रीय स्तरावर संगणक व सॉफ्टवेअर क्षेत्रात कंपनी काम करीत असून तिचे मुख्य कार्यालय अमेरिकेत आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विनय कोरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम, प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना प्रा. एस. टी. पाटील, ट्रेनिंग प्लेसमेंट विभागप्रमुख, संगणक विभागप्रमुख प्रा. ए. जी. पाटील, प्रा. आर. सी. शिक्केरी, प्रा. व्ही. बी. बीरादार, प्रा .एम. आर. हूडगी व टीपीसी यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वारणेत सायन्स व्हॅन

$
0
0

मोबाइल सायन्स एक्झिबिशन

व्हॅनचे वारणानगरात उदघाटन

म. टा. वृत्तसेवा, पन्हाळा

'वारणा शिक्षण संकुलाने वारणा विज्ञान केंद्राची निर्मिती करून परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचे काम केले आहे. याचा पुढील भाग म्हणून या केंद्रांच्यावतीने व नेहरू सायन्स सेन्टरच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यासाठीचा व्हॅन दौरा जिल्ह्यातील लहान मुलांमध्ये कल्पकता निर्माण करण्यास उपयुक्त ठरेल' असे प्रतिपादन वारणा समुहाचे प्रमुख व माजी मंत्री डॉ. विनय कोरे यांनी येथे बोलताना केले. भविष्यात वारणा परिसरातून अनेक शास्त्रज्ञ उदयास येतील अशी अपेक्षा कोरे यांनी व्यक्त केली.

मुंबईतील नेहरू सायन्स सेन्टर आणि वारणा विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने प़थमच नेहरू सायन्स सेन्टरच्या मोबाईल सायन्स एक्झिबिशन व्हॅनचे उदघाटन झाले. जिल्ह्यातील विविध शाळांना ही मोबाईल व्हॕन भेट देणार आहे. मोबाईल सायन्स एक्झिबिशन सर्व तालुक्यातील काही प्रमुख शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षक भेटींसाठी मोफत उपलब्ध केली जाणार आहे. प्रदर्शनात न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, वायुमंडलीय दबाव, बल, गुरुत्व, घर्षण, प्रकाशाचे गुणधर्म, मालिका आणि समांतर परिपथ या सारख्या बऱ्याच संकल्पना उपकरणांच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडल्या जाणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या सहभागाने वेगवेगळे वैज्ञानिक उपक्रम केले जाणार आहेत.

उदघाटनावेळी वारणा विभाग शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम , वारणा विज्ञान केंद्राचे प्रिन्सिपॉल कोऑर्डिनेटर डॉ. जॉन डिसोझा , सायंटिफिक ऑफिसर प्रा. एस. एस. पाटील, प्रा. एस. एच. मोरे, प्रा. पी. एस. कुंभार, प्रा. पी. डी. लोले, वारणा विद्यालयाचे मुख्याध्यापक एम बी. मलमे , मिलीटरी स्कूलचे प्राचार्य. टी. बी. राटवळ आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळेगोंडवाडी अंधारात

$
0
0

ट्रान्सफॉर्मर जळाल्याने

काळगोंडवाडी अंधारात

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

काळगोंडवाडी (ता. चंदगड) येथील वीज वितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे गेली दहा दिवस हे गाव अंधारात असून वीज वितरण कंपनीने लवकरात-लवकर ट्रान्सफार्मर बदलून खंडित वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होत आहे.

काळगोंडवाडी हे अतिशय दुर्गम गाव आहे. येथे चारही बाजुने जंगल असून मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्याचा वावर आहे. गेल्या आठ दिवसापासुन गावात वीज नसलेने शाळेच्या विद्यार्थ्यांचीही गैरसोय होत आहे. प्रकाशासाठी चिमणीचा आधार घेण्यासाठी घरात रॅकेलही नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मोबाईल चार्जिंग नसल्यामुळे संपर्क तुटला आहे. त्याशिवाय दुध संस्थांना ही फॅट एस.एन.एफ. साठी वीजेची गरज आहे. मात्र वीज नसल्याने ही व्यवस्था कोलमडली आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी वीज वितरणाच्या कार्यालयाकडे मागणी करुनही कंपनी दुर्लक्ष करत असून लवकरात-लवकर ट्रान्सफॉर्मर बदलावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषद...

$
0
0

जिल्हा परिषद लोगो वापरावा

.............

७३ कर्मचारी विभागीय चौकशीच्या फेऱ्यात

वेतनवाढीपासून सेवासमाप्तीपर्यंतच्या कारवाईची टांगती तलवार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील ७३ हून अधिक कर्मचारी विभागीय चौकशीच्या फेऱ्यात आहेत. प्रशासकीय कामकाजात चुका, अफरातफर, वरिष्ठांना पूर्व कल्पना न देता परस्पर निर्णय घेऊन घोळ निर्माण केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेतील विविध विभागातील कर्मचारी प्राथमिक चौकशीत दोषी आढळले आहेत. विभागीय चौकशी पूर्ण होताच त्यांच्यावर वेतनवाढीपासून बडतर्फीपर्यंतची कारवाई होणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली. दुसरीकडे प्रशासनाला कसलीही कल्पना न देता अनधिकृतपणे गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे.

जास्त दिवस अनधिकृतपणे गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती केली जाते. मार्च २०१८ अखेर २१ कर्मचारी ३० दिवसांपेक्षा जास्त गैरहजर राहिले होते. तर एक एप्रिल ते जून अखेल या कालावधीत आणखी चार कर्मचारी विनापरवानगी कामावर गैरहजर आहेत. यापैकी बाराजणांवर निलंबनाची कारवाई झाली असून तेरा कर्मचाऱ्यांवर नजीकच्या काळात कारवाई होण्याची शक्यता आहे. विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी जिल्हा परिषद येथे आयोजित आढावा बैठकीत एका वर्षापेक्षा जास्त अनधिकृतपणे गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाकडून गैरहजर कर्मचाऱ्यांची माहिती संकलनाचे काम सुरू आहे.

दरम्यान, विभागीय चौकशीत अधीक्षक, कक्ष अधिकारी, वरिष्ठ लिपिक, शिक्षक, पर्यवेक्षक, शाखा अभियंता, ग्रामसेवक अडकले आहेत. ग्रामपंचायत विभागातील २८ कर्मचारी प्राथमिक चौकशीत दोषी आढळले आहेत. त्यापाठोपाठ प्राथमिक शिक्षण विभागातील २२ कर्मचारी आहेत. आरोग्य विभागातील कामकाज हे नेहमीच चर्चेचे आहे. सर्वसाधारण सभेतही त्याचे पडसाद उमटत असतात. या विभागातील आठ आणि सामान्य प्रशासन विभागातील दहा कर्मचारीही दोषी आढळले आहेत. ग्रामपंचायत पाणी पुरवठा विभाग, पशुसंवर्धन, वित्त, कृषि विभागातील काही कर्मचारी विभागीय चौकशीच्या टप्प्यात आहेत.

...........................

२१ जण निलंबित

प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा, अफरातफर आणि लाचलुचपतच्या कारणाखाली २१ कर्मचारी निलंबित आहेत. निलंबनाच्या कारवाईत प्राथमिक शिक्षण विभागातील १२ कर्मचारी आहेत. लाचखोरीची लागण वर्ग तीन व चारमधील काही कर्मचाऱ्यांना झाली असून गेल्या वर्षभरात सातजण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. तर १२ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुधासह विमानसेवेचा प्रश्न संसद अधिवेशनात

$
0
0

(तिघांचे फोटो वापरावेत)

दुधासह विमानसेवेचा प्रश्न संसद अधिवेशनात

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लीड ...

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून, या अधिवेशनात कोल्हापूरचे महत्त्वाचे प्रश्न मांडले जाणार आहेत. दुधासाठी अनुदान मिळण्यापासून ते प्रवासी विमानसेवा पूर्ववत सुरू करावी, साखर निर्यातीच्या अनुदानात वाढ व्हावी, सर्किट बेंचला मान्यता मिळावी असे अनेक प्रश्न अधिवेशनात मांडले जाणार आहेत.

..............

हमीभावासह दुधाचा प्रश्न मांडणार

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. शेती उत्पादनाला खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले होते. याबाबत काही उत्पादनांवर सरकारने हमीभावाची घोषणा केली. मात्र, याची अंमलबजावणी कशी होणार याबाबत संभ्रमावस्था आहे. यासाठी आर्थिक तरतूद केली आहे काय, याचा जाब अधिवेशनात विचारला जाईल. सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे असा शेतकऱ्यांचा आग्रह आहे. राज्य सरकारला हा प्रश्न सोडवता येत नसेल तर, केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करावा. दूध भुकटीची निर्यात करण्यासाठी ठोस धोरण तयार करावे आणि याची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी मागणी अधिवेशनात करणार आहे. उसाच्या दरासह साखरेचे दर आणि निर्यातीचा प्रश्न गंभीर आहे. एफआरपीत वाढ केल्याचे सरकारकडून जाहीर केले जाते. मात्र याची कारखान्यांकडून अंमलबजावणी होत नाही. याशिवाय खंडपीठ आणि विमानसेवेचा प्रश्न मार्गी प्रयत्न करणार आहे.

खासदार राजू शेट्टी

................

शाहू महाराजांना भारतरत्न मिळावा

राजर्षी शाहू महाराजांचे कार्य संपूर्ण देशाला दिशादर्शक असे आहे. त्यांना भारतरत्न मिळावा यासाठी गेल्या अधिवेशनात मी प्रयत्न केले होते. मात्र, अधिवेशनातील गोंधळामु‌ळे यावर चर्चा झाली नाही. या पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा मी हा मुद्दा मांडणार आहे. देशातील अनेक खासदारांचा या मागणीला पाठींबा आहे, त्यामुळे शाहू महाराजांना भारतरत्न सन्मान मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा दोन महिन्यातच खंडित झाली. एअर डेक्कन कंपनीकडून ही विमानसेवा काढून त्या ठिकाणी इंडिगो किंवा स्पाईस जेट कंपनीची नियुक्ती करण्याचा आग्रह धरणार आहे. विमानसेवेचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावला जाईल. साखरेची निर्यात करण्यासाठी प्रतिकिलो ११ रुपयांचे अनुदान मिळावे, त्याचबरोबर साखरेच्या मूळ किमतीतही वाढ करण्याची मागणी केली जाणार आहे. ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या कंपन्या त्यांच्याकडील २ टक्के सीएसआर फंड त्यांच्याच खासगी एनजीओंसाठी खर्च करतात. या रकमेचा योग्य वापर व्हावा यासाठी १०० कोटी रुपयांवर उलाढाल असलेल्या सर्वच कंपन्यांनी सीएसआर फंड चांगल्या संस्थांना, एनजीओंना द्यावा. यातील २५ टक्के रक्कम खेळासाठी देणे बंधनकारक करावे, असा आग्रह अधिवेशनात धरणार आहे.

खासदार धनंजय महाडिक

.................

'गडकिल्ले संरक्षण'धोरणाचा आग्रह

सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर एअर डेक्कन कंपनीच्या माध्यमातून कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा सुरू झाली होती. ही सेवा दोन महिने सुरळीत चालली. यानंतर मात्र कंपनीने कोणतेही ठोस कारण न देता विमान सेवा खंडित केली आहे. ही विमानसेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला जाईल. सक्षम विमान कंपनीच्या माध्यमातून ही सेवा नियमित सुरू राहावी असा आमचा प्रयत्न असेल. केंद्र सरकारने गडकिल्ल्यांच्या संरक्षणासाठी धोरण जाहीर केले आहे. याच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करण्यास प्राधान्य दिले आहे. याशिवाय मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. याबाबत संसदेच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला जाणार आहे. कोल्हापुरात पीएनजी गॅस वितरण योजनेत कोल्हापूर शहराचा समावेश झाला आहे. याची लवकर अंमलबजावणी होण्यासाठी अधिवेशानात प्रयत्न केले जातील. या योजनेमुळे कोल्हापूर शहर गॅस सिलिंडरमुक्त होणार आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षणाची कार्यवाही करा

$
0
0

मराठा समाजाला तत्काळ

आरक्षणाची कार्यवाही करा

म. टा. वृत्तसेवा , कुडित्रे

मराठा व धनगर समाजाला तात्काळ आरक्षण देण्यासंदर्भात शासनाने कार्यवाही करावी अशी मागणी आमदार नरके यांनी मराठा आरक्षणाबाबत उपस्थित केलेल्या स्थगन प्रस्तावावर बोलताना विधानसभेमध्ये केली.

आमदार नरके म्हणाले, 'महाराष्ट्रामध्ये आजतागायत ५८ सकल मराठा क्रांतीमुक मोर्चा निघाले. हे मोर्चे कोणत्याही समाजाविरुध्द नव्हते तर मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी होते. लाखोंच्या संख्येने निघालेले हे मोर्चे अतिशय शांततेने पार पडले असून कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. मराठा क्रांतीने मुंबई येथे काढलेल्या महामोर्चानंतर दिलेल्या आश्वासनातही काही निर्णय घेतले मात्र त्याची अंमलबजावणी आजतागायत झालेली नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे केवळ सांगितले जाते मात्र प्रत्यक्षात शासनाकडून यासंदर्भात कोणतेही प्रामाणिक प्रयत्न केले जात नाहीत.केवळ आश्वासने देऊन झुलवत ठेवले आहे. मराठा समाजाला ५१ टक्के आरक्षण आहे. हे आरक्षण सोडून मराठा समाजाला विशेष आरक्षण देण्यासंदर्भात तसेच सध्या मराठा समाज हा अतिशय गंभीर परिस्थितीतून जात आहे. त्याचा उद्रेक होऊ नये, शांततेचा भंग होऊ नये या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात शासन कोणती भूमिका घेणार आहे याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी खुलासा करावा.'

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना जिल्हानिहाय मराठा कुणबी दाखले देण्यात यावेत. स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशींची अंमलबाजावणी करावी. जिल्ह्यात मराठा वसतिगृहे तातडीने सुरू करण्यात यावीत. तसेच धनगर समाजाला आरक्षण देणेबाबतचा प्रश्नदेखील प्रलंबित आहे. या धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्नदेखील लवकरात लवकर मार्गी लावावा , अशी मागणी आमदार नरके यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेयजल भ्रष्टाचारप्रकरणी फौजदारीचे आदेश

$
0
0

पेयजल भ्रष्टाचारप्रकरणी

फौजदारी दाखल करण्याचे आदेश

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

अडकूर-मलगेवाडी (ता. चंदगड) येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कामातील तक्रारीच्या चौकशीत या योजनेतील सरकारी निधीचा योग्य वापर झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे संबधीत अध्यक्ष, सचिव, सरपंच व मक्तेदार व तांत्रिक सेवा पुरवठादारावर दोन दिवसात फौजदारी गुन्हा दाखल करावा असा मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. कोल्हापुर यानी आदेश दिला आहे.

अडकूर-मलगेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत कामामध्ये निकृष्ट व वेळ काढूपणामुळे दर्जाहिन काम झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सुमारे २२ मे रोजी सुनावणी झाली. या कामाच्या सुरूवातीला बारा वर्ष झाली तरी काम पुर्ण नाही. अनेक ठिकाणी ठिकाणी मलगेवाडीची पाइप खराब झाली आहे. या बाबत तक्रार करण्यात आली होती, सुनावनी दरम्यान सर्व त्या बाबीवर चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सरकारी निधीचा योग्य वापर झाला नाही. योजनेत स्वारस्य नसल्याने या योजनेशी अध्यक्ष (तत्कालीन) सचिव, सरपंच, मक्तेदार व तांत्रीक सेवा पुरवठादार यांच्यावर दोन दिवसांत उपअभियंत्यांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा व त्याचा अहवाल सादर करावा असे सुनावणीत म्हटले आहे. या योजनेच्या बोजवाऱ्यामुळे अडकूर- मलगेवाडीमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘करवीर’मध्ये ५००० हेक्टर ऊस क्षेत्र वाढले

$
0
0

'करवीर'मध्ये ५००० हेक्टर ऊस क्षेत्र वाढले

पंचायत समितीची मासिक सभा, शेतकऱ्यांना बियाणे उशीरा मिळाल्यची तक्रार

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी माती परीक्षण गरजेचे असून करवीर तालुक्यातून ६६५९ उद्दीष्टांपैकी ६१८९ माती नमुने परीक्षणासाठी पाठवले आहेत. तालुक्यामध्ये १८ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र असले तरी आगामी हंगामात २३ हजार हेक्टर ऊस क्षेत्र उपलब्ध होणार आहे. तालुक्याच्या ऊस क्षेत्रात गतवेळपेक्षा यावेळी ५ हजार हेक्टरने वाढ होणार आहे अशी माहिती तालुका कृषी अधिकारी एच. एस. हावळे यांनी करवीर पंचायत समितीच्या मासिक सभेत दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती राजेंद्र सूर्यवंशी होते.

कृषी विभागाच्या चर्चेवेळी हावळे यांनी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत २०१६-१७ मध्ये २३ प्रस्ताव आले होते. त्यापैकी १७ जणांना लाभ मिळाल्याचे सांगितले. यावेळी सागर चौगले यांनी शेतकऱ्यांना पेरणीसाठी बियाणे उशिरा मिळाल्याची तक्रार करून यापुढे दक्षता घेण्यास सांगितले. आश्विनी धोत्रे यांनी हुमणी कीड नियंत्रणासाठी प्रभावी कार्यक्रम राबविण्याची सूचना केली.

प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकांना रेबीज लस नसल्याचे सांगितले जाते असा सुनील पोवार यांनी आरोप करताच आरोग्य अधिकारी नलवडे यांनी पूर्वी एका पेशंटकरीता एकच डोस वापरण्यासाठी (रॅबी पूर) इंजेक्शन येत होते. पण आता एका व्हायलमध्ये १० डोस येतात. यातील १ डोस पेशंटला दिला आणि नंतर तसे पेशंट नाही आले तर उर्वरित ९ डोसचे औषध फेकून द्यावे लागत असल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यानंतर सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी एका पेशंटसाठी एकच डोस यावा अशा मागणीचा ठराव जिल्हा परिषदेकडे पाठवू असे सांगितले. आश्विनी धोत्रे यांनी शहरालगतच्या गावांना शहरातून आलेल्या कचऱ्याचा त्रास होत असून ग्रामीण भागात डेंगीला आळा घालण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी तर शोभा राजमाने यांनी साथ पसरायच्या आधीच उपाययोजना करण्याचे सांगितले.

१४ वा वित्त आयोगातून चुकीच्या व निकृष्ट पध्दतीने होणाऱ्या कामाची पाहणी करण्यासाठी विभाग कार्यरत आहे का ? आणि अशा कामाबाबत काय कारवाई होणार असा सवाल रमेश चौगले यांनी करून करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी विजय भोसले ,चंद्रकांत पाटील यांनीही या चर्चेत भाग घेतला. प्रदीप झांबरे यांनी वळीवडे मेन रोडवरील बेकायदेशीर स्पीडब्रेकर काढण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग चालढकल करत असून तीन महिने यावर काहीच कार्यवाही का नसल्याबद्दल सुनावले. सविता पाटील यांनी कुरुकली कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी फेऱ्या वाढवून वेळेत सोडण्याची सूचना केली. यशोदा पाटील यांनी खुपिरे येथील पेयजलचे काम रखडल्यामुळे अंतर्गत रस्त्याची कामे खोळंबली असल्याचे सांगितले. अविनाश पाटील यांनी वाकरे गावातील लांबच्या अंतरावरील मुलांसाठी जवळच्या परिसरातील इमारत भाड्याने घेऊन त्याठिकाणी अंगणवाडी सुरू करण्याची मागणी केली. सरिता कटेजा यांनी गांधीनगरमधील १२ अंगणवाडीत पाणी , वीज नसल्याची तक्रार केली. गटविकास अधिकारी सचिन घाटगे यांनी कार्यभार पाहिला.

अधिकारी गैरहजर

मासिक सभेला बहुतांशी विभागाचे अधिकारी गैरहजर असल्यामुळे चंद्रकांत पाटील , इंद्रजित पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनीही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. ज्यावेळी सगळे अधिकारी उपस्थित असतील त्यावेळी सदस्यांना बोलवा, आम्ही येऊ, असा पवित्रा घेतला. विजय भोसले यांनी अन्य एखाद्या दिवशीही सर्व सदस्य एकत्र बसून मतदारसंघातील समस्यांवर चर्चा करून कामे करण्यास प्रधान्य घेऊ असे सुचविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिंदेंना वगळल्याने काँग्रेसची निदर्शने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या सर्वोच्च काँग्रेस कार्यकारिणीची घोषणा केली असून यात २३ ज्येष्ठ नेत्यांना सहभागी करून घेण्यात आले आहे. मात्र, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना या कार्यकारिणीतून वगळण्यात आल्यामुळे सोलापुरातील शिंदे समर्थकांनी काँग्रेस भवनासमोर निर्दशने केली़. या वेळी शहर व जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातून पाच जणांना स्थान देण्यात आले असून, मुकुल वासनिक, अविनाश पांडेय, बाळासाहेब थोरात, रजनी पाटील आणि राजीव सातव यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय १८ स्थायी सदस्य, १० विशेष निमंत्रितांचा समावेश आहे. मात्र, सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला वगळण्यात आल्याने सोलापुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत सुशीलकुमार शिंदे यांची प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी 'नो कॉमेंट्स' एवढीच प्रतिक्रिया दिली होती. परंतु, औपचारिक गप्पांमध्ये मात्र त्यांनी 'पक्षाने आपल्याला खूप काही दिले आहे. आता काहीही अपेक्षा नाही. राहुल गांधी यांची टीम खूप चांगली असून, आगामी काळात या टीमकडून मोठ्या अपेक्षा आहेत,' असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुडूसमध्ये माउलींच्या पालखीचे गोल रिंगण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

माळशिरस मुक्कामावरून पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यातील गोल रिंगणाचा सोहळा खुडूस येथे मोठ्या उत्साहात पार पडला. माळशिरसहून मार्गस्थ झालेला पालखी सोहळा दुसऱ्या गोल रिंगणासाठी सकाळी नऊ वाजता खुडूस शिवारात पोहोचला. ढगाळ वातावरणात चोपदारांनी रिंगण लावून घेतले. परंपरेप्रमाणे रिंगणाला सुरुवात झाली. सकाळी साडेनऊ वाजता माउलींचा अश्‍व रिंगणासाठी सोडण्यात आला. पालखीतळावर रिंगणात नेत्रदीपक दौड करून देवाच्या अश्वाने लाखो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्यामागे स्वाराच्या अश्‍वानेही नेत्रदीपक दौड करून प्रदक्षिणा पूर्ण केली. माऊलीऽ माऊलीऽऽ नामाचा जयघोष करीत रिंगण सोहळा पार पडला. त्यानंतर वारकरी पारंपरिक खेळ खेळण्यात दंग झाले. या रिंगण सोहळ्यानंतर दुपारी निमगाव मगराचे (पाटी) येथे दुपारी बारा वाजता पालखी सोहळा पोहोचला. निमगाव, विझोरी, विजयनगर आदी ग्रामपंचायतींच्या वतीने सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. या परिसरातील हजारो भाविकांनी माउलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. दुपारचे भोजन व विश्रांतीनंतर सोहळा वेळापूरकडे निघाला.

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पंढरीस जात असताना वेळापूरनजीक टेकडीवरून त्यांना विठ्ठलाचे दर्शन झाले. त्यामुळे ते येथूनच पंढरपूरपर्यंत धावत सुटले अशी आख्यायिका आहे. वारकरी तुकाराम महाराजांचा अभंग म्हणून येथून धावतात. हा विलोभनीय सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक येथील टेकडीवर गर्दी करतात. धावा येथे सोहळा पोहोचताच रिमझिम पावसाला सुरुवात झाली. अशा पावसातच धाव्याचा आनंदमय सोहळा पार करीत सायंकाळी कैवल्यमूर्ती वेळापूर नगरीत विसावली. उद्या, शुक्रवारी पालखी सोहळा पंढरपूर तालुक्यात प्रवेश करणार असून, सकाळी ठाकूरबुवा येथे गोल रिंगण, तोंडले येथे नंदाच्या ओढ्यावर दुपारचा विसावा घेऊन संत ज्ञानदेव, संत सोपानकाका या दोन बंधूंच्या भेटीच्या सोहळ्यानंतर हा सोहळा पिराची कुरोली येथे पंढरपूर तालुक्यात प्रवेश करेल व भंडीशेगाव मुक्कामी पोचणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुडूसमध्ये माउलींच्या पालखीचे गोल रिंगण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

माळशिरस मुक्कामावरून पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यातील गोल रिंगणाचा सोहळा खुडूस येथे मोठ्या उत्साहात पार पडला. माळशिरसहून मार्गस्थ झालेला पालखी सोहळा दुसऱ्या गोल रिंगणासाठी सकाळी नऊ वाजता खुडूस शिवारात पोहोचला. ढगाळ वातावरणात चोपदारांनी रिंगण लावून घेतले. परंपरेप्रमाणे रिंगणाला सुरुवात झाली. सकाळी साडेनऊ वाजता माउलींचा अश्‍व रिंगणासाठी सोडण्यात आला. पालखीतळावर रिंगणात नेत्रदीपक दौड करून देवाच्या अश्वाने लाखो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्यामागे स्वाराच्या अश्‍वानेही नेत्रदीपक दौड करून प्रदक्षिणा पूर्ण केली. माऊलीऽ माऊलीऽऽ नामाचा जयघोष करीत रिंगण सोहळा पार पडला. त्यानंतर वारकरी पारंपरिक खेळ खेळण्यात दंग झाले. या रिंगण सोहळ्यानंतर दुपारी निमगाव मगराचे (पाटी) येथे दुपारी बारा वाजता पालखी सोहळा पोहोचला. निमगाव, विझोरी, विजयनगर आदी ग्रामपंचायतींच्या वतीने सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. या परिसरातील हजारो भाविकांनी माउलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. दुपारचे भोजन व विश्रांतीनंतर सोहळा वेळापूरकडे निघाला.

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पंढरीस जात असताना वेळापूरनजीक टेकडीवरून त्यांना विठ्ठलाचे दर्शन झाले. त्यामुळे ते येथूनच पंढरपूरपर्यंत धावत सुटले अशी आख्यायिका आहे. वारकरी तुकाराम महाराजांचा अभंग म्हणून येथून धावतात. हा विलोभनीय सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक येथील टेकडीवर गर्दी करतात. धावा येथे सोहळा पोहोचताच रिमझिम पावसाला सुरुवात झाली. अशा पावसातच धाव्याचा आनंदमय सोहळा पार करीत सायंकाळी कैवल्यमूर्ती वेळापूर नगरीत विसावली. उद्या, शुक्रवारी पालखी सोहळा पंढरपूर तालुक्यात प्रवेश करणार असून, सकाळी ठाकूरबुवा येथे गोल रिंगण, तोंडले येथे नंदाच्या ओढ्यावर दुपारचा विसावा घेऊन संत ज्ञानदेव, संत सोपानकाका या दोन बंधूंच्या भेटीच्या सोहळ्यानंतर हा सोहळा पिराची कुरोली येथे पंढरपूर तालुक्यात प्रवेश करेल व भंडीशेगाव मुक्कामी पोचणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे माळीनगरमध्ये उभे रिंगण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे माळीनगर येथे गुरुवारी सकाळी भक्तिरसपूर्ण उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. या वेळी पालखी सोहळ्यातील व सोलापूर जिल्ह्यातील पहिले उभे रिंगण सोहळा व अश्वांची नेत्रदीपक दौड हृदयात साठवीत लाखो भाविकांनी रिंगणाचा आनंद लुटला.

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा माळीनगर हद्दीत प्रवेश करताच ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच अभिमान जगताप, उपसरपंच सारिका एकतपुरे व सदस्यांनी स्वागत केले. तुकोबांच्या पालखीच्या आगमनाची आस लावून बसलेल्या भक्तांना तुकाराम महाराज पालखी दृष्टी पडताच रथातील पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली. विठ्ठलमय वातावरणात पालखी सोहळा माळीनगरच्या दिशेने पुढे सरकत सकाळी नऊ वाजता माळीनगर रोडवरील श्रीहरीनगर येथे येऊन थांबला. तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील व सोलापूर जिल्ह्यातील पहिले उभे रिंगण सोहळ्याकरिता पताकाधारक वारकरी, तुळशीधारक महिला, विणेकरी, पकवाजवादक, टाळकरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगा करून भजन व टाळ मृदंगाच्या गजरात दंग झाले होते.

अश्वांच्या पूजेनंतर घोडेस्वाराने उभ्या रिंगणात प्रथम फेरी मारली. त्यानंतर दुसरा घोडेस्वार हातात पताका घेऊन स्वार झाला. अतिशय वेगाने धावणाऱ्या या अश्वाने तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेऊन फेरी पूर्ण केली. अश्वांच्या पाऊलखुणांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. या वेळी चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून भाविकांना आवर घालण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांबरोबरच, होमगार्डस् व माळीनगर कारखान्याचे सुरक्षा रक्षक तैनात होते.

रिंगण सोहळा संपल्यानंतर मॉडेल हायस्कूलच्या मैदानावरील ओपन थिएटरमध्ये पालखी सोहळा विसावला. या वेळी शुगरकेन सोसायटीचे माजी चेअरमन प्रकाश गिरमे, त्यांच्या पत्नी रेखाताई गिरमे यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे माळीनगरमध्ये उभे रिंगण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे माळीनगर येथे गुरुवारी सकाळी भक्तिरसपूर्ण उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. या वेळी पालखी सोहळ्यातील व सोलापूर जिल्ह्यातील पहिले उभे रिंगण सोहळा व अश्वांची नेत्रदीपक दौड हृदयात साठवीत लाखो भाविकांनी रिंगणाचा आनंद लुटला.

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा माळीनगर हद्दीत प्रवेश करताच ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच अभिमान जगताप, उपसरपंच सारिका एकतपुरे व सदस्यांनी स्वागत केले. तुकोबांच्या पालखीच्या आगमनाची आस लावून बसलेल्या भक्तांना तुकाराम महाराज पालखी दृष्टी पडताच रथातील पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली. विठ्ठलमय वातावरणात पालखी सोहळा माळीनगरच्या दिशेने पुढे सरकत सकाळी नऊ वाजता माळीनगर रोडवरील श्रीहरीनगर येथे येऊन थांबला. तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील व सोलापूर जिल्ह्यातील पहिले उभे रिंगण सोहळ्याकरिता पताकाधारक वारकरी, तुळशीधारक महिला, विणेकरी, पकवाजवादक, टाळकरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगा करून भजन व टाळ मृदंगाच्या गजरात दंग झाले होते.

अश्वांच्या पूजेनंतर घोडेस्वाराने उभ्या रिंगणात प्रथम फेरी मारली. त्यानंतर दुसरा घोडेस्वार हातात पताका घेऊन स्वार झाला. अतिशय वेगाने धावणाऱ्या या अश्वाने तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेऊन फेरी पूर्ण केली. अश्वांच्या पाऊलखुणांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. या वेळी चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून भाविकांना आवर घालण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांबरोबरच, होमगार्डस् व माळीनगर कारखान्याचे सुरक्षा रक्षक तैनात होते.

रिंगण सोहळा संपल्यानंतर मॉडेल हायस्कूलच्या मैदानावरील ओपन थिएटरमध्ये पालखी सोहळा विसावला. या वेळी शुगरकेन सोसायटीचे माजी चेअरमन प्रकाश गिरमे, त्यांच्या पत्नी रेखाताई गिरमे यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिर समिती सदस्यांचे ‘काम बंद’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

विठ्ठल मंदिर समितीच्या सदस्याने केलेल्या शिवीगाळीच्या निषेधार्थ ऐन यात्रेच्या तोंडावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दोन तास काम बंद आंदोलन केले. परिस्थिती हाताबाहेर चालल्याचे लक्षात येताच संबंधित सदस्याने माफी मागणून प्रकरणावर पडदा पाडला.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विठुरायाच्या क्षणभराच्या दर्शनासाठी ३० -३० तास दर्शन रांगेत उभे राहून हाल अपेष्टा सहन करीत असतात. मात्र अशाही वेळी मंत्रालयातील अधिकारी, आमदार, खासदार यांची चिठ्ठी घेऊन रोज शेकडो 'व्हीआयपी' तासाभरात दर्शन घेऊन निघून जातात. आता तर काही सदस्यांनी थेट दर्शनाचा बाजार मांडला असून, पैसे घेऊन दर्शन देण्यासाठी चक्क एजंट नेमल्याचा आरोप मंदिर समितीचे कर्मचारी करीत आहेत. भाविकांनाही सध्या याचा अनुभव येत असून, परभणीवरून आलेल्या जितेंद्र देशमुख यांना तासात दर्शन करून देण्यासाठी माणशी एक हजार रुपये मागितल्याचे त्यांनी सांगितले. अतिशय कमी पगारात काम करणाऱ्या मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना गेल्या दोन दिवसांत शिवसेनेचे समिती सदस्य संभाजी शिंदे आणि सचिन अधटराव यांनी शिवीगाळ केल्याने आज कर्मचाऱ्यांना शेवटी कामबंद आंदोलन करावे लागले. सचिन अधटराव या सदस्यावर काही दिवसापूर्वी महिला लाडू ठेकेदाराने गंभीर आरोप केले होते. आपल्या बोलण्याने कर्मचाऱ्यांचा गैरसमज झाला असून, आपण दिलगिरी व्यक्त केल्याचे सांगितले. संभाजीराजे शिंदे यांनीही शिवीगाळ केल्याचा आरोप फेटाळला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरजे मलिष्काला शिवसैनिकाची धमकी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

मुंबईतील खड्ड्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी रेड एफ एमच्या आरजे मलिष्का आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 'झिंग झिंग झिंगाट..'च्या तालावर बनविलेले 'गेली गेली मुंबई खड्ड्यात..' हे गाणे चांगलेच व्हायरल होत आहे. या गाण्यातून मुंबईची बदनामी होत असल्याचा आक्षेप घेऊन सोलापूरचे शिवसैनिक अतुल भंवर यांनी कार्यालयात घुसून मलिष्काला मारण्याची धमकी दिली आहे.

कडवे शिवसैनिक असलेले अतुल भंवर हे सोलापुरातील शिवसेनेचे माजी नगरसेवक श्रावण भवर यांचे चिरंजीव आणि युवा सेनेचे पदाधिकारी बाबासाहेब भंवर यांचे भाऊ आहेत. 'गेली गेली मुंबई खड्ड्यात..' हे गाणं ऐकल्यानंतर अतुल भंवर यांनी मुंबईतील रेड एफएमच्या कार्यालयात फोन करून, 'मुंबईची बदनामी करण्याचा ठेका तुम्ही उचललाय का?, मी सोलापुरात राहत असलो तरी महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईविषयी नितांत आदर आहे. राजधानीला जर कोणी नाव ठेवत असेल, तर बाळासाहेबांचा शिवसैनिक शांत बसणार नाही. मुंबईमध्ये १०५ जणांनी हौतात्म्य पत्करले आहे. यापुढे मलिष्का यांनी अशी गाणी केली तर शिवसेनेकडून त्याच भाषेत उत्तर दिले जाईल. शिवसेनेच्या रणरागिणी रेड एफएमच्या कार्यालयात घुसून मारतील. शिवसेना आमचा पक्ष आहे, मराठी आमची अस्मिता आहे आणि मुंबई आमची शान आहे.. जय महाराष्ट्र..' असा संवाद साधला आहे. रेड एफएम कार्यालयात अतुल भंवर यांनी केलेल्या कॉलची ऑडिओ क्‍लिप सर्वत्र व्हायरल होत आहे.

'आरजे मलिष्काने मुंबईबद्दल काहीही बोलले तर आम्ही शिवसैनिक सहन करू शकत नाही. ज्या मुंबईत तुम्ही राहता त्याच मुंबईबद्दल अशी बदनामी करू नये. खड्डे तर सगळीकडेच आहेत. आपल्या शहराबद्दल प्रेम पाहिजे. खड्ड्यांच्या प्रश्‍नाकडे शासनाचे, महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी दुसरे काही तरी करा. मुंबई खड्ड्यात गेली असे म्हणणे चुकीचे आहे. गाणे ऐकल्यानंतर मी रेड एफएमच्या कार्यालयात फोन करून माझा राग व्यक्त केला आहे.

- अतुल भंवर, शिवसैनिक, सोलापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरुणी वाहून गेली

$
0
0

चंदगड : पावसाळी पर्यटनासाठी कॉलेजच्या मैत्रिणींसोबत आलेली तरुणी सुप्रिता संजीव गाली (वय २०, रा. इटगी, कळसनट्टी, जि. बेळगाव) ही तिलारीनगर (ता. चंदगड) येथील धामणे डॅममधून वाहून गेली. गुरुवारी दुपारी दोनच्या दरम्यान ही घटना घडली. तिचा चुलतभाऊ सचिन गाली याने याबाबतची माहिती चंदगड पोलिसांत दिली. पोलिसांनी सांगितले की, बेळगावमध्ये कॉलेजच्या शिकणाऱ्या मित्र-मैत्रिणींसोबत सुप्रिता दुपारी तिलारीनगरलगतच्या धामणे डॅम परिसरात आली होती. ती सध्या बीकॉममध्ये शिकत आहे. दुपारी दोनच्या दरम्यान धामणे डॅमच्या तलावाच्या पाण्यात ती मैत्रिणींसोबत पाण्यात उतरली. पाण्याचा अंदाज न आल्याने ती वाहून गेली. घाबरलेल्या मैत्रिणींनी याची माहिती दिली. चंदगड पोलिसांनी तिचा शोध घेतला. मात्र ती सापडली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरस्थिती कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या आठवड्यापासून सतत वाढत असलेली पंचगंगा नदीच्या पुराची पातळी गुरुवारी काही इंचाने कमी झाली. पंचगंगा धोकापातळीवरुन वाहत असून दिवसभरातील संततधार आणि दोन दिवसांत अतिवृष्टी होण्याचा हवामान खात्याने दिलेला इशारा यामुळे नदीकाठावरील नागरिकांमध्ये महापुराची भीती कायम आहे. जिल्ह्यातील ६४ मार्ग बंद असून सांगली फाट्यावरुन कोल्हापूरकडे येणाऱ्या सर्व्हीस रोडवर पुराचे पाणी आले आहे. त्यातून वाहतूक सुरु असून पाणीपातळी आणखी वाढल्यास हा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सकाळी विशाळगड घाटात दरड कोसळल्याने दुपारपर्यंत वाहतूक ठप्प होती.

दरम्यान, रस्त्यावरील पाणी कमी झाल्याने गगनबावडा मार्ग दिवसभर सुरु होता. पण गुरुवारी पडणाऱ्या पावसामुळे रात्री रस्त्यावर पाणी येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सायंकाळी सातनंतर सकाळी आठ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ६८ बंधारे पाण्याखाली असल्याने अनेक ठिकाणची वाहतूक पर्यायी मार्गाने सुरु आहे. रत्नागिरी महामार्गासह अन्य राज्यमार्ग व जिल्हा, ग्रामीण असे ६४ मार्ग बंद आहेत.

धरणक्षेत्र तसेच गगनबावडा, पन्हाळा, करवीर, राधानगरी या तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत होती. ४३ फुटाची धोका पातळी ओलांडून दीड फुटापर्यंत पाणी पातळी वाढली. यामुळे महापुराचा धोका निर्माण झाला होता. मात्र पावसाने उघडीप दिल्याने बुधवारी रात्रीपासून पाणी पातळीची वाढ थांबली. रात्रभर ४४ फूट ५ इंचावर पातळी स्थिर राहिली. गुरुवारी सकाळपासून कमी होत सायंकाळपर्यंत ती ४४ फुटांपर्यंत खाली आली होती. यामुळे व्हीनस कॉर्नर, सीपीआरजवळील सीता कॉलनी, कुंभार गल्ली आणि शुक्रवार पेठ या परिसरात आलेल्या पाण्याला काहीसा उतार पडला. गुरुवारी अधूनमधून उघडीप देत दिवसभर हजेरी लावली. यामुळे नदी व नाल्याकाठच्या नागरिकांमध्ये पाणी वाढण्याची भीती कायम आहे.

जिल्ह्यातील घटप्रभा, जांबरे, कोदे व कडवी धरणे भरली आहेत. तर राधानगरी(९६ टक्के), तुळशी(९० टक्के) , चित्री (९३ टक्के) , जंगमहट्टी (९८ टक्के) ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. पावसाचा जोर वाढला तर पूरस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारामारीप्रकरणी अटक

$
0
0

कोल्हापूर

यादवनगर परिसरात दोन गटात झालेल्या मारामारीप्रकरणी दोन्ही गटाच्या १८ जणांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. दोन गटात सोमवारी किरकोळ भांडणातून दोन गटात वादावादी झाली होती. त्याचे रुपांतर मारामारीत झाले होते. या प्रकरणी एका गटातील साहिल शेख, मोहमद शेख, जमीर मुल्ला, अल्ताफ देवडी, दाऊद शेख, राकेश माजगांवकर, तौकीर शेख, तौहीर मुजावर, शहाबाज मेस्त्री, सादिक शेख (सर्व रा. यादवनगर) आणि दुसऱ्या गटातील शुभम डाबाळे, शुभम लाखे, सागर लाखे, अजय डावाळे, श्लोक लाखे, अशोक पाटील, अक्षय लाखे, आकाश पाटील (सर्व रा. यादवनगर) यांना अटक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयिताचा हल्ला

$
0
0

मोक्कातील अल्पवयीन

संशियताचा चाकू हल्ला

इचलकरंजी : पोलिसांना माहिती देत असल्याच्या संशयावरुन मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या जर्मनी गँगमधील अल्पवयीन गुन्हेगारासह त्याच्या दोन साथीदारांनी केलेल्या चाकू हल्ल्यात एकजण जखमी झाला. सत्यजित विजय कोले (वय 19 रा. दत्तनगर कबनूर) असे जखमीचे नाव आहे. ही घटना भोनेमाळ परिसरात घडली. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी शहरातील जर्मनी गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. या टोळीतील मुख्य संशयित हा अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. तेथून चार दिवसापूर्वी तो तेथून पळून आला. शहरातील भोनेमाळ परिसरातील एस. पी. पान शॉपसमोर सत्यजित कोले हा रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उभा होता. सदरचा अल्पवयीन गुन्हेगार हा दोन साथीदारांसह त्याठिकाणी आला. पोलिसांना माहिती देतोस या कारणावरुन कोले याच्यावर त्याने चाकूहल्ला केला. त्यामध्ये सत्यजित हा जखमी झाला आहे. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुराची तिव्रता कायम

$
0
0

पुराची तिव्रता कायम

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणि धरणांच्या क्षेत्रात पाऊस कमी झाला असला तरी पुराची तिव्रता कायम असल्याचे चित्र नदीकाठांवर आहे. चंदगड तालुक्यात पावसामुळे घरांच्या पडझडीचे सत्र सुरू आहे. तालुक्यात ११ घरांची अंशत: पडझड झाली. शाहूवाडी तालुक्यात केम्बुर्णेवाडी घाटात कोसळलेली दरड हटविण्यात आली. काळम्मावाडी धरणातून विसर्ग सुरू झाला असून राधानगरी धरणही भरण्याच्या वाटेवर आहे. गडहिंग्लज, आजरा तालुक्यात मात्र पावसाने उसंत दिली.

केम्बुर्णेवाडी घाटात

दरड कोसळली

शाहूवाडी : विशाळगडकडे जाणाऱ्या भाततळी-पांढरेपाणी मार्गावरील केम्बुर्णेवाडी घाटात अतिवृष्टीमुळे गुरुवारी सकाळी दरड कोसळली. यामुळे विशाळगड-कोल्हापूर ही प्रवासी बस रस्त्यात काहीकाळ अडकून पडली. जिल्हा आपत्कालीन कक्षाकडून याबाबत सूचना मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थानिक ठेकेदाराकडील जेसीबी यंत्राच्या सहाय्याने दरड कोसळलेला भाग बाजूला करून तासाभरात रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. या घाट रस्त्याच्या रुंदीकरणासह दुरुस्तीचे काम सुरू असल्याने अधूनमधून घाटात दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. दरम्यान तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला असून वारणा व कडवी नदीच्या पुराचे पाणी काही प्रमाणात ओसरले आहे. तरीही पुराची तीव्रता कमी झालेली नाही.

'काळम्मावाडी'तून

दोन हजार क्यूसेसचा विसर्ग

राधानगरी : काळम्मावाडी (ता. राधानगरी ) येथील राजर्षी शाहू सागर जलाशयातून गुरुवारी प्रती सेकंद दोन हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग दुधगंगा नदीपात्रात करण्यात आला आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. दुधगंगा नदीवरील सुळंबी, सोंळाकूर येथील बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. काळम्मावाडी येथील राजर्षी शाहू सागर जलाशय ८५ टक्के भरला आहे. जलाशयातील पाणी कोल्हापूर जिल्हा आणि कर्नाटक सीमाभागात कालव्याद्वारे शेतीच्या सिंचनसाठी उपयोगात आणले जाते. पंचवीस टीएमसी पाणीसाठा होत असलेल्या जलाशयात सध्या बावीस टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण परिसरात गुरुवारपर्यंत २१८५ मीलीमीटर पाउस झाला आहे. गेल्यावर्षीपेक्षा एक हजार मिलीमीटर जादा पावसाची नोंद झाली आहे. आगामी काळातील पावसाचे प्रमाण आणि जलाशयात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याचे गुणोत्तर घेऊन धरण प्रशासनाने सांडवा पातळीत असताना पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. धरणाच्या पाच वक्राकार दरवाज्यांतून प्रती सेकंद दोन हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग ४ वाजून ३० मिनिटांनी दुधगंगेत करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी उपअभियंता एम. एम. किटवाडकर, शाखा अभियंता एस. बी यादव, महादेव सावंत, बाळासाहेब पाटील, शांताराम हवलदार, ए. व्ही. जाधव. दत्ता गुरव, अनिल चौगले, कालवा निरिक्षक राजेंद्र जागनुरे आदी उपस्थित होते. दरम्यान, राधानगरी तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. तालुक्यातील भोगावती, तुळशी, दुधगंगा नदीची पूरपातळी कमी झाली आहे. मात्र तारळे, शिरगाव, राशिवडे येथील भोगावती नदीवरील बंधारे पाण्याखाली आहेत. राधानगरी जलाशय ९७ टक्के भरला आहे. जलाशय परिसरात गुरुवारपर्यंतच्या २४ तासांत ४० मिलीमीटर पाऊस झाला. एकूण पाऊस २८४० मिलीमीटर झाला आहे. राधानगरी जलाशयात ८.११ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जलाशय भरण्यास फक्त अर्धा टीएमसी पाणीसाठ्याची गरज आहे. त्यामुळे जलाशयाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. तालुक्यातील तुळशी, काळम्मावाडी येथील जलाशय ऐंशी टक्के भरले आहेत. तर खामकरवाडी,केळोशी ,हसणे येथील लघु तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

पाऊस ओसरला....

गडहिंग्लज : गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने अखेर विश्रांती घेतली. आज दिवसभर गडहिंग्लज शहर व परिसरात सूर्यनारायणाचे दर्शन घडले. मात्र अधून मधून पावसाची सरी पडत राहिल्या. हिरण्यकेशी नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे त्यामुळे पुराचा धोका टळला आहे. दरम्यान आजरा, चित्री व आंबोली परिसरात सुरु असलेल्या पावसामुळे हिरण्यकेशी नदी दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान आज दिवसभर पावसाने उघडीप दिली आहे. गेल्या आठवड्यात गडहिंग्लज उपविभागाला पावसाने झोडपले. तालुक्यातील ऐनापूर, निलजी, नांगनूर, नूलसह नेसरी परिसरातील हडलगे व तावरेवाडीतील बंधारे पाण्याखाली गेले होते.

'चित्री'मध्ये ९३ क्के पाणीसाठा

आजरा : आजरा तालुक्यात आज पावसाचा जोर ओसरला आहे. विश्रांती घेत पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. आज सकाळपर्यंत सरासरी २४.२५ मिमी पावसाची नोंद झाली. तर चित्री पाटबंधारे पाणलोट क्षेत्रात ३६ मिमी पाऊस झाला. यामुळे तिथे ९३ टक्के पाणी साठा झाला आहे. पाणीसाठ्याच्या वेगाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार पासूनच या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग १८० क्यूसेकने सुरू आहे. यामुळे तेथील विद्युत निर्मिती केंद्रातून प्रतितास २००० युनिट वीज निर्माण होत असल्याचे गडहिंग्लज पाटबंधारे अभियंता सुहास कुलकर्णी यांनी सांगितले. दरम्यान, तालुक्यातील खानापूर तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. कानोली, सरंबळवाडी, पारपोली, एरंडोळ, हत्तीवडे आणि देऊळवाडी येथील ११ घरांची पडझड होऊन सव्वा लाखांपर्यंत नुकसान झाले आहे.

चंदगडला नुकसानीचे सत्र सुरुच

चंदगड : गेले अकरा दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसाने काल काहीसी उसंत दिल्यामुळे आठ दिवस पाण्याखाली असलेले ताम्रपर्णी नदीवरील कोनेवाडी, माणगाव, कोवाड, हल्लारवाडी, कोकरे, करंजगाव, तर घटप्रभा नदीवरील भोगोली, कानडी, गणुचीवाडी व गवसे हे तीन बंधारे व हिंडगाव, चंदगड पूल आजच्या नवव्या दिवशी मात्र वाहतुकीला खुले झाले. सलग आठ दिवस नदीकाठची पिके पाण्याखाली होती. त्यामुळे त्यामध्ये चिखल साचल्याने कुजण्याला सुरवात झाली आहे. सकाळी आठपर्यंत झालेल्या २४ तासात तालुक्यात सरासरी १५.६६ तर आतापर्यंत १३०२.१६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. चंदगड सर्कलमध्ये सर्वाधिक ३३ तर सर्वात कमी कोवाड सर्कलमध्ये ५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पावसामुळे भिंती पडून मोठे नुकसान झाले आहे. पोवचीवाडी येथील चंद्रकांत टेमकर यांच्या घराची भिंत कोसळून दहा हजार रुपयांचे तर निवता चौगुले यांच्या घराची भिंत कोसळून चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. उत्साळी येथील जगन्नाथ परीट-यादव यांच्या घराची भिंत कोसळून पन्नास हजार तर देवरवाडीत विठ्ठल भोगण यांच्या घराची भिंत कोसळून दहा हजारांचे नुकसान झाले. भोगोलीत रुक्माण्णा कांबळे यांच्या घराची भिंत कोसळून चाळीस हजार तर चंद्राबाई कोदाळकर यांच्या घराची भिंत कोसळून तीस हजार रुपयांचे, ओमान्ना गावडे यांच्या गोठ्याचे नुकसान होऊन वीस हजार रुपयांचे नुकसान झाले. चिंचणे येथील धोंडिबा तरवाळ यांच्या गोठ्याचे सात हजार रुपयांचे नुकसान झाले. मलतवाडीत संदीप मिलके यांच्या घराची भिंत कोसळून तीस हजार, मुकुंद पाटील यांच्या घराची भिंत कोसळून तीस हजारांचे नुकसान झाले. चिंचणेत अर्जुन पाटील यांच्या घराची भिंत कोसळून पंचवीस हजार तर गवसेतील पांडुरंग नांदवडेकर यांच्या घराची भिंत कोसळून नऊ हजार रुपयांचे, शामराव कांबळे यांच्या घराची भिंत कोसळून वीस हजारांचे नुकसान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images