Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

महिला क्रिकेट संघ प्रशिक्षकपदी रमेश पोवार निवड

$
0
0

प्रशिक्षकपदी रमेश पोवार

कोल्हापूर : भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून कोल्हापूरचे सुपुत्र फिरकीपटू रमेश पोवार यांची निवड करण्यात आली. माजी प्रशिक्षक तुषार आरोठे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या पदावर पोवार त्यांची वर्णी लागली. निवडीची घोषणा सोमवारी बीसीसीआयकडून करण्यात आली. पोवार गडहिंग्लज तालूक्यातील गिजवणे गावचे आहेत. भारतीय महिला संघातील खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक तुषार आरोठे यांच्यात वाद झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्यानंतर पोवार यांची अंतरिम प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. निवड हंगामी स्वरुपाची असून जोपर्यंत तुषार अरोठेंच्या जागी योग्य व्यक्तीची निवड होत नाही, तोपर्यंत पोवार यांच्याकडे जबाबदारी असणार आहे. ऑफ स्पिनर रमेश पोवार यांनी २ कसोटी तर ३१ एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांच्या नावावर एकदिवसीय सामन्यात ३४ विकेट आहेत. येत्या २५ जुलैपासून बंगळुरू येथे महिला क्रिकेट संघाचे सराव शिबीर होणार असून यात पोवार सहभागी होणार आहेत. बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवण्यास सुरुवात केली असून अर्ज करण्यासाठी २० जुलै अंतिम तारीख आहे. सोपवलेली जबाबदारी सर्वोत्तमरित्या पार पाडणार असल्याचे पोवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नागनवाडी, सर्फनाला प्रकल्पग्रस्तांना पॅकेज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भुदरगड व आजरा तालुक्यांतील नागनवाडी, सर्फनाला व आंबेओहोळ प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीऐवजी विशेष आर्थिक पॅकेज दिले जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील गुंजवणी व वांग प्रकल्पांच्या धर्तीवर आर्थिक पॅकेजचा पर्याय इतर प्रकल्पग्रस्तांना दिला जात आहे. याबाबत मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासोबत आमदार प्रकाश आबिटकर यांची नागपूर येथे बैठक झाली. या निर्णयामुळे रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास येण्यास मदत होणार आहे.

भुदरगड तालुक्यातील नागनवाडी लघु पाटबंधारे सिंचन प्रकल्प भूसंपादन व पुनर्वसनाअभावी गेली दहा वर्षे प्रलंबित आहेत. नवीन भूसंपादन कायदा २०१३ नुसार भूसंपादन करण्यासाठी २१.८६ कोटी रुपयांचा निधी महसूल खात्याकडे वर्ग करण्यात आला आहे. अद्याप ७९.३३ हेक्‍टर क्षेत्रासाठी रेडीरेकनरच्या तिप्पट दराने विशेष आर्थिक पॅकेज हेक्‍टरी २७ लाख रुपये या दराने २१.५५ कोटी रुपयांचा प्रस्ताव अपर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी विभागीय आयुक्त पुणे यांच्यामार्फत मदत व पुनर्वसन विभागाकडे सादर केला आहे. तसेच आजरा तालुक्यातील सर्फनाला मध्यम प्रकल्पाचे काम ६५ टक्क्यांहून अधिक झाले आहे. या प्रकल्पांतर्गत प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनी उपलब्ध नसल्याने सुमारे ११५.४८ हेक्टर क्षेत्रासाठी ३० लाख रुपये हेक्टर दराने ३४.६४ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. लाभक्षेत्रातील संपादित जमिनींचे प्रथम प्राधान्याने वाटप होऊन उर्वरित आवश्यक क्षेत्रास आर्थिक पॅकेज देण्यास अटींच्या अधीन राहून मान्यता घेण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती आमदार आबिटकर यांनी दिली. नागनवाडी, सर्फनाला व आंबेओहोळ प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना पुरंदर (जि. पुणे) तालुक्यातील गुंजवणी व वांग प्रकल्पांच्या धर्तीवर प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीऐवजी विशेष आर्थिक पॅकेजबाबत सरकारकडून लवकरच निधी उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रलंबित प्रमुख सिंचन प्रकल्प पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजमाता सत्वशीला भोसले यांचे निधन

$
0
0

सावंतवाडी, ता. १८ ः सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सत्वशीलादेवी भोसले (वय ८६) यांचे बुधवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास निधन झाले. त्या गेली काही दिवस आजारी होत्या. राजमाता सत्वशीलादेवी यांनी कलाक्षेत्रामध्ये भरीव काम केले. त्या मूळच्या बडोदा संस्थानमधील होत्या. सावंतवाडी संस्थानचे राजे शिवरामराजे भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर त्या सावंतवाडी संस्थानात आल्या. शिवरामराजे यांच्या काळातच संस्थान विलीन झाले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक समाजोपयोगी धोरणे राबविली होती. शिवरामराजे हे दीर्घकाळ आमदार म्हणूनही कार्यरत होते. त्यांना सत्वशीलादेवी यांनी समर्थ साथ दिली. सावंतवाडीतील लाकडी खेळणी व इतर हस्तकलेला ऊर्जितावस्था आणण्यासाठी राजमातांनी आपले आयुष्य वेचले. त्यांनी त्यासाठी स्वतःही ही कला आत्मसात केली. विशेषतः गंजिफा निर्मितीची कला जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. आजही राजवाड्यात याबाबतचे उपक्रम होतात. त्यांनी शिक्षण क्षेत्रातही भरीव काम केले. पंचम खेमराज महाविद्यालयाच्या माध्यमातून हजारो तरुणांना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची द्वारे खुली केली. राजमाता सत्वशीलादेवी गेले काही दिवस आजारी होत्या. त्यांच्यावर बेळगाव येथे उपचार करण्यात आले. तेथून त्यांना येथे आणण्यात आले. रात्री सव्वानऊच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या मागे मुलगा श्रीमंत खेमसावंत उर्फ बाळराजे, मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॉडी मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बॉडी मसाजच्या नावाखाली शिवाजी उद्यमनगर येथील श्री समर्थ इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या अड्ड्यावर राजारामपुरी पोलिसांनी बुधवारी छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले. कुंटणखाना चालविणारी संशयित अस्मिता जगताप आणि तिचा साथीदार रवींद्र कदम (दोघेही रा. कदम गल्ली, केर्ली, ता. करवीर) यांच्यासह दोघांना ताब्यात घेतले.

शिवाजी उद्यमनगरात या ठिकाणी लेडीज मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक औंदुबर पाटील यांनी या ठिकाणची माहिती घेऊन सापळा रचला. कारवाईसाठी सातजणांचे पथक तयार करण्यात आले. लेडीज मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना सुरू असल्याचे स्पष्ट झाले. या ठिकाणी आलेले रोहित माने (वय २९, रा. २५४२ ए वॉर्ड, शिवाजी पेठ), मंजुनाथ यल्लापा दौलतकर (वय २७, आर. के. नगर, सोसायटी क्रमांक ४) यांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरोधात अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ कायद्यातंर्गत कारवाई करण्यात आली. कारवाईत महिला पोलिस उपनिरीक्षक जे. आर. चव्हाण, सहायक फौजदार एस. बी. हुंडरके, संजय जाधव, आश्विनी अतिग्रे, बाजीराव विघ्ने, अमोल अवघडे आदींनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाची उघडीप, पूरस्थिती गंभीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर आणि जिल्ह्यात बुधवारी पावसाचा जोर कमी असला तरी पूरस्थिती मात्र कायम आहे. धरणक्षेत्रात सुरू असलेली संततधार आणि विसर्गामुळे नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. पाणी शिरल्यामुळे शहरातील सुतारवाडासह इंगळी, रुई आणि कुरुंदवाड येथे मिळून दोनशेवर लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. नागाव बंधारा येथे पुराच्या पाण्यात किशन कन्हैया या (रा. नागाव, मूळ उत्तर प्रदेश) हा तरुण वाहून गेला. दुपारी त्याचा मृतदेह सापडला. शिये टोल नाका येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या पुण्याच्या कारचालकासह दोघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले. तर प्रयाग चिखली येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या पाडळी बुद्रुकच्या शिवाजी महादेव पाटील यांची नागरिक व आपत्कालीन यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी वाचवले.

पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने महापुराचा धोका कायम आहे. बुधवारी सकाळी पंचगंगा नदीची पातळी ४३.९ इंचावर पोहचली होती. दिवसभरात पंचगंगेची पाणी पातळी एका फुटाने वाढली. राजाराम बंधारा येथे सायंकाळी सहा वाजता पाणी पातळी ४४.४ फुटावर पोहचली. पाणी पातळीत वाढ होत असल्याने शहरातील काही भागांना फटका बसला. शहरातील ७० लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. सिद्धार्थनगरजवळच्या सीता कॉलनीत पाणी घुसले.

राधानगरी धरण ९४ टक्क्यांवर जादा भरल्याने स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. यामुळे नद्यांच्या पातळीत आणखी वाढ होऊन पूरस्थिती गंभीर होऊ शकते. प्रशासनाने शहर आणि जिल्ह्यात हाय अलर्ट जारी केला आहे. बुधवारी दिवसभर धरणक्षेत्रातही पावसाचा जोर ओसरला होता.

राधानगरी (१६०० क्युसेक्स), वारणा (सांडव्यातून १७३२९ क्युसेक्स) आणि कुंभीतून (३५० क्युसेक्स) धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्यामुळे धोका कायम आहे. पंचगंगा नदीवरील नागाव बंधारा येथे बुधवारी सकाळी किशन कन्हैया हा तरुण पाय घसरुन पाण्यात वाहून गेला. दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर दुपारी बाराच्या सुमारास त्याचा मृतदेह मिळाला. दरम्यान पुराच्या पाण्याचा धोका वाढल्यामुळे इंगळी येथील १५, रुईतील ३ आणि कुरुंदवाड गोठणपुरातील सात कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले.

८१ बंधारे पाण्याखाली, प्रमुख मार्ग बंदच

१२३ बंधाऱ्यापैकी ८१ बंधारे अद्यापि पाण्याखाली आहेत. त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली आहे. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग बंद आहे. शिवाजी पुलावरील वाहतूक बंद केली आहे. गगनबावडा मार्गावरही पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. यांसह दहा राज्यमार्ग, २४ प्रमुख जिल्हा मार्ग पावसामुळे बंद झाल्याने पर्यायी मार्ग वाहतूक सुरू केली आहे. १२ ग्रामीण मार्ग आणि १६ इतर जिल्हा मार्ग बंद आहेत.

..........................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतिभा सुर्वे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव

$
0
0

प्रतिभा सुर्वे यांच्या

निलंबनाचा प्रस्ताव

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाहूवाडी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी प्रतिभा शिवाजी सुर्वे यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शिक्षण विभागाला सादर करण्यात येणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांच्यावरील कारवाईचा अहवाल जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना मंगळवारी लाच घेताना रंगेहात पकडले होते. दरम्यान, सुर्वेंसह त्यांच्या कार्यालयातील कनिष्ठ सहायक नितीन राबाडे याच्यावरही कारवाई होणार आहे. जिल्हा परिषदेकडून गुरुवारी त्यांच्यावर कारवाई अपेक्षित आहे. सेवापुस्तक व अंतिम वेतन प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात त्यांनी लाचेची मागणी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज दरवाढीला सरकारचा पाठींबा?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'वीज कंपन्यांनी प्रतियुनिट ३ रुपये ९० पैसे वीज दरवाढीचा प्रस्ताव दिला आहे. यावर सरकारने काहीच प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. याशिवाय ऊर्जा सत्यशोधन समितीच्या अहवालावरही सरकारने काहीच कारवाई केलेली नाही. याचा अर्थ वीज दरवाढीच्या प्रस्तावाला सरकारचा पाठिंबा आहे काय?' असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. यावर मंत्री मदन येरावार समाधानकराक उत्तर देऊ शकले नाहीत, अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली.

कृषिपंप व पाणीपुरवठा योजनांची सुमारे २२ हजार कोटींची थकबाकी माफ करण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे काय, असा तारांकित प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित झाला होता. या प्रश्नावरील चर्चेत आमदार सतेज पाटील यांनी सहभाग घेतला. ते म्हणाले, 'कोल्हापूर जिल्ह्यात महावितरणने शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीज तोडली. याबाबत ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी शेतकऱ्यांसह मुंबईत मोर्चा काढला होता. त्यावेळी ऊर्जामंत्री आणि मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत अनेक आश्वासने देण्यात आली. पाणीपुरवठा योजनांच्या थकबाकीचे १२० कोटी रुपये सरकारने भरण्याचे आश्वासन दिले होते. तसा शब्द मुख्यमंत्र्यांनीच डॉ. एन. डी. पाटील यांना दिला होता. त्या आश्वासनांचे काय झाले? एकीकडे मुख्यमंत्री आश्वासने देतात, तर दुसरीकडे त्याची पूर्तता करण्यासाठी कोणत्याच हालचाली केल्या जात नाहीत. वीज गळती थांबत नाही. वीज कंपन्यांमधील भ्रष्ट कारभार सुरूच आहे. या स्थितीत ३ रुपये ९० पैसे प्रतियुनिट वीजदर वाढवण्याचा प्रस्ताव वीज कंपन्यांनी दिला आहे. वीज दरवाढीला सरकारचाच पाठिंबा आहे काय? सत्यशोधन समितीचा अहवाल जुलै महिन्यातच सरकारला सादर झाला आहे. यावर सरकारने काहीच कार्यवाही केलेली नाही. याबाबत खुलासा करावा,' अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत केली. यावर बोलताना मंत्री येरावार यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही, अशी माहिती आमदार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.ॉ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्भय वॉक उद्या

$
0
0

कोल्हापूर

कॉ. गोविंद पानसरे समता संघर्ष समितीतर्फे शुक्रवारी (ता. २०) निर्भय मॉर्निग वॉक शाहूपुरी परिसरात होत आहे. सकाळी सात वाजता बसंत बहार रोडवरून वॉकची सुरूवात होईल. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ.गोविंद पानसरे आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचे मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत. पोलिस प्रशासनाकडून ठोसपणे कारवाई केली जात नाही. त्याच्या निषेधार्थ होत असलेल्या निर्भय वॉकमध्ये सहभागी होण्याचे आवाहन समितीचे रमेश वडणगेकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्लास्टिक विषय

$
0
0

बंदी असलेल्या पिशव्या ग्राहकांच्या माथी

विक्रेत्यांकडून फसवणूक, नॉनवोवन पॉलीप्रॉपिलीन पिशव्यांची सर्रास विक्री

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet-sachinpMT

राज्य सरकारने प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतल्यानंतर कोल्हापूरकरांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले. किरकोळ कारवाई वगळता अनेकांनी प्लास्टिकला पर्याय शोधण्यास सुरुवात केली. नागरिकांच्या हातात कापडी पिशव्या दिसू लागल्या. मात्र, प्लास्टिकला पर्याय म्हणून बंदी असलेल्या नॉन वोवन पॉलीप्रॉपिलीन पिशवव्यांची विक्री राजरोसपणे चालू आहे. याबाबत अनिभिज्ञता असल्याने ग्राहकही त्याला कापडी पिशवी समजून खरेदी करत आहेत. प्लास्टिक विक्रेत्यांनी त्याला असा पर्याय दिल्याने ग्राहक गोंधळात पडले आहेत.

सरकारने २३ मार्चला केलेल्या अधिसूचनेनुसार नॉन वोवन पॉलीप्रॉपिलीन पिशवीवर बंदी घालण्यात आली आहे. पण या नॉन वोवन पॉलीप्रॉपिलीन पिशव्या आणि कापडी पिशव्यांत साम्य असल्याने त्या ग्राहकांच्या गळी उतरवल्या जात आहेत. ग्राहकही प्लास्टिकला पर्याय शोधल्याच्या आवेशात त्या खुलेआम घेऊन फिरत आहेत. या पिशव्या कापडी आहेत म्हणून प्रचार, प्रसार, व्यवसाय केला जात आहे. अनेक लग्नसमारंभ तसेच कार्यक्रमात या पिशव्यांचे वाटप केले जात आहे. वेगवेगळ्या रंगात आकर्षकरीत्या उपलब्ध असलेल्या या पिशव्यांवर 'प्लास्टिक टाळा, पर्यावरण वाचवा' संदेश देखील लिहिलेला आढळतो. अशा पिशव्यांचे रिसायकलींग तसेच फारसा पुनर्वापरही होत नाही. अनेक प्लास्टिक व्यावसायिकांना अशा पिशव्यांवर बंदी असल्याचे ठाऊक असूनही ग्राहकांना त्याची माहिती दिली जात नाही. अशा पिशव्यांची साठवणूक करणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे.

नॉन वोवन पॉलीप्रॉपिलीन

या पिशव्या वेगवेगळ्या रंगाढंगात मिळतात. अशा पिशवीला आग लावली असता त्यातील प्लास्टिक वितळून त्याचे ठिपके पडतात आणि ती हळूवार जळत जाते.

महिला बचतगटांचीही फसवणूक

नॉन वोवन पॉलीप्रॉपिलीन पिशव्यांच्या निर्मिती करणाऱ्या व्यवसायात अनेक महिला बचतगट तसेच वैयक्तिकरित्या यात लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. या पिशव्यांवर बंदी असल्याचे कळताच व्यावसायिक महिलांना धक्का बसला आहे.

प्लास्टिक प्रबोधनासाठी राज्यभरात फिरत असताना अनेकांच्या हाती नॉन वोवन पॉलीप्रॉपिलीन पिशव्यांच्या सर्रास आढळल्या. नागरिक मात्र अशा पिशव्यांना कापडाची पिशवी समजत आहेत. याबाबत विक्रेत्यांनी देखील त्यांना माहिती न दिल्याने ते अशा पिशव्या खरेदी केल्या जात आहेत. या पिशव्या प्लास्टिकसदृश्य असून पर्यावरणास हानिकारक आहेत. नागरिकांनी कापडी पिशव्यांचा वापर करावा. कापडी दिसणाऱ्या पिशव्या तपासून खरेदी कराव्यात.

- मिलिंद पगारे, पर्यावरण तज्ज्ञ

नॉन वोवन पॉलीप्रॉपिलीन पिशव्यांवर बंदी असल्याची काही माहिती नव्हती. त्या पिशव्या अगदी कापडी पिशवीसारख्या वाटल्याने आम्ही त्या खरेदी केल्या होत्या. विक्रेत्यांनी याबाबत कोणतीच माहिती दिली नाही. सरकारने याबबत जागृती करावी व माहिती लोकांपर्यत पोहचवावी.

- रुपाली जाधव, गृहिणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडपीठाबाबत घ्या तातडीने निर्णय

$
0
0

खंडपीठाबाबत घ्या

तातडीने निर्णय

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापूर येथे मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ तातडीने सुरू व्हावे, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेना आमदारांनी नागपूर येथे विधानभवनच्या पायऱ्यांवर धरणे धरले.

आमदार क्षीरसागर म्हणाले,' कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे, अशी भूमिका राज्य सरकारने स्वीकारली आहे. त्याला विलंब होत असेल तर फिरते खंडपीठ (सर्किट बेंच) व्हावे यावरही सरकारने सहमती दर्शवली. मात्र, प्रत्यक्षात याची अंमलबजावणी करण्यात चालढकल सुरू आहे. हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र पाठवून खंडपीठ स्थापनेबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. या आश्वासनानंतर वकिलांनी सुमारे १२७ दिवसांचे साखळी उपोषण मागे घेतले होते. परंतु, सरकारकडून याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने वकिलांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. खंडपीठ स्थापनेबाबत नुसते कागदी घोडे नाचवून कोल्हापूरसह सहाही जिल्ह्यांतील नागरिक, वकील आणि पक्षकारांवर अन्याय होत आहे. कोल्हापूर खंडपीठ स्थापनेबाबत सरकारने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभे करण्यात येईल.'

दरम्यान, सांगली येथील शिव पार्वती कन्स्ट्रक्शन या कंपनीने रस्त्यांच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले. या कंपनीच्या कामांची चौकशी करावी, अशी मागणी आमदार क्षीरसागर यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केली होती. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कंपनीने केलेल्या कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात सुरळीत दूधपुरवठा सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तीन दिवसांपासून दूध संकलन बंद आंदोलन सुरू आहे. यामुळे बुधवारी तिसऱ्या दिवशी शहरात दूधटंचाई जाणवली नाही. गोकुळ, वारणासह इतर दूध संघांच्या किरकोळ विक्री व्यवस्थेत व्यत्यय आला नसल्याने ग्राहकांना दूध टंचाईचा फटका बसलेला नाही. शहरात गोकुळसह सर्व दूध संघांचे रोजचे सुमारे दीड लाख लिटर दुधाचे वितरण नेहमीप्रमाणे होत आहे. दरम्यान, आंदोलनामुळे खबरदारी म्हणून मध्यरात्रीनंतरच मुख्य विक्रेत्यांकडे दूध पोहोच केले जात आहे.

दूध संकलन बंद आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. आंदोलनामुळे किरकोळ विक्रीसाठीच्या दुधाची टंचाई निर्माण होईल, अशी शंका ग्राहकांच्या मनात होती. त्यासाठी अनेक ग्राहक पहाटे उठून दूध घेताना दिसत आहे. मात्र शहरात दूध टंचाई निर्माण होऊ नये यासाठी गोकुळ, वारणा दूध संघाने वितरणात सुरळीत ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले. शहरातील प्रमुख वितरकांकडे मध्यरात्रीच दुधाच्या पिशव्या पोहोच केल्या जात आहेत.

दूध पिशव्या पोहोच करण्यासाठीच्या वाहनाला पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. यामुळे ते वाहन अडविण्याचे प्रकार झालेले नाहीत. संघाकडे संकलन कमी झाले तरी पहिल्यांदा शहराला दूधपुरवठा करण्यावर अधिक भर दिला आहे. शिल्लक दूध मुंबई, पुणे येथे पोलिस बंदोबस्तात पाठविण्यात येत आहे. दूध संघाशिवाय अनेक खासगी व्यावसायीक दुचाकीवरून थेट उत्पादकाकडून खरेदी करून ग्राहकांच्या घरोघरी जात दूध पोहोच करीत आहेत. यामुळे शहरात दूध टंचाई निर्माण झालेली नाही. सामान्य ग्राहकांसह हॉटेल व्यावसायिक, मेसधारकांना आवश्यक तितके दूध मिळत असल्याचे चित्र आहे. टंचाईच नसल्याने जादा दराने दूध विक्रीच्याही तक्रारी नाहीत.

०००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्राइम थोडक्यात

$
0
0

हायमास्टला आग

कोल्हापूर

शिवाजी चौक परिसरातील हायमास्टला बुधवारी दुपारी शॉर्टसर्किटने अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलास तत्काळ माहिती दिली. काही क्षणातच अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी आले. अग्निशमन दलाचे फायर ऑफिसर ओंकार खेडकर, फायरमन आकाश जाधव, ड्रायव्हर विनायक लिमकर यांनी आग आटोक्यात आणली.

.................

मोबाइल चोरीस

कोल्हापूर

मध्यवर्ती बसस्थानकातून मोबाइल चोरल्याची तक्रार शुभम भोसले (वय १८, रा. मदिना कॉलनी, उचगाव) यांनी शाहुपूरी पोलिसांत बुधवारी दिली. सीबीएसवरून परगावी जात असताना सुमारे दहा हजार रूपये किंमतीचा मोबाइल चोरल्याची तक्रार भोसले याने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिघांना जीवनदान, सव्वा कोटीहून अधिक नुकसान

$
0
0

टॉकटाइमच्या लोनने वाचला जीव

प्रयाग चिखलीत तरुण धावले मदतीला

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आसपासचा एक किलोमीटरचा परिसर पुराच्या पाण्याने वेढलेला. मदतीची आर्त हाकही कुणापर्यंत पोहचत नव्हती. मोबाइलमध्ये बॅलन्स नव्हता. जीवावर बेतलेल्या या प्रसंगी पाडळी बुद्रुकच्या शिवाजी महादेव पाटील यांनी मोबाइलवरुन टॉक टाइम लोन घेतला आणि चौघांना फोन करुन स्वतवर बेतलेल्या जीवघेण्या संकटाची जाणीव करुन दिली आणि काही वेळातच तरुणांची यंत्रणा मदतीसाठी सरसावली. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शिवाजी पाटील यांना सुरक्षितपणे पाण्यातून बाहेर काढण्यात यश मिळाले.

दरम्यान, बुधवारी दिवसभरात पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या तिघांना नागरिक व यंत्रणेच्या सतर्कतेमुळे जीवदान लाभले. दुपारी प्रयाग चिखली तर सायंकाळी कसबा बावडा शिये टोल नाका येथे नागरिकांनी व अग्निशनम विभागाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करुन पुराच्या पाण्यातून संबंधितांची सुटका केली. तर शहर आणि परिसराला महापुराने वेढला घातल्यामुळे नागरी वस्तीत पाणी शिरु लागले आहे. सुतारवाड्यापाठोपाठ पंचगंगा तालीम परिसर, शाहूपुरी कुंभार गल्लीतील काही भागात रस्त्यावर गुडघ्याइतके पाणी साचल्याने नागरिकांना ये जा करण्यास पंचाईत झाली आहे.

प्रयाग चिखली येथील संत ज्ञानेश्वर सहकारी दूध संस्थेत पाडळी बुद्रुकचे शिवाजी महादेव पाटील वय ५८ हे सचिव म्हणून काम करतात. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ते गावाकडे निघाले. पुराच्या पाण्यातून जात असताना पाण्याच्या प्रवाहाने ते वाहून जाऊ लागले. पाण्याच्या प्रवाहात त्यांना एका झुडुपाचा आधार मिळाला. झुडुपाला धरून ते थांबून राहिले. त्या झुडुपाच्या परिसरातील एक किलोमीटर अंतरात पुराचे पाणी पसरले होते. त्यांचा आवाजही कुणापर्यंत पोहचत नव्हता. मोबाइलमध्ये बॅलन्स नव्हता. त्यांनी मोबाइलवरुन टॉकटाइम लोन घेऊन चौघांना फोन करुन जीवावर बेतल्याचे सांगितले. संभाषण सुरु असतानाच मोबाइल हातातून निसटून पाण्यात पडला. प्रयाग चिखली येथील तरुण मदतीसाठी सरसावले. जिल्ह्याची रेस्क्यू फोर्सही सोबतीला धावली. लांब रोपच्या आधारे पाटील यांची सुटका केली. मदतकार्यात चिखलीचे गाव कामगार तलाठी श्रीकांत नाईक, उपसरपंच भूषण पाटील, शिवाजी नाईक, भारत वाडकर, सुधीर वाडकर, रोहित पाटील, शिवाजी पाटील, युवराज दळवी, सागर साळोखे यांचा पुढाकार होता.

......

पुण्यातील दोघांची सुटका

कसबा बावडा शिये रस्त्यावर पाणी पसरल्याने दोन दिवसांपासून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. पोलिसांनी बॅरेकेटस लावून मार्ग रोखला होता. मात्र सायंकाळी सहा वाजण्याच्या पुणे येथील अरविंद मधुकर काकडे आणि विवेक मिश्रा यांनी त्याला न जुमानता चारचाकी वाहन पाण्यात घातले. ५० ते ६० फुटाचे अंतर पार केल्यानंतर चारचाकी वाहन पुराच्या पाण्याने वेढले. वाहनाच्या काचेपर्यंत पाणी पोहचल्याने दोघांनी सुटकेसाठी आरडाओरड सुरु केली. उपस्थित नागरिकांनी तत्काळ महापालिकेच्या अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची शिकस्त करुन त्या दोघांची सुटका केली. तसेच वाहनही पाण्यातून बाहेर काढले.

...........

५०० हून अधिक घरांची पडझड

गेल्या काही दिवसातील जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील ५०० घरांची पडझड होऊन तब्बल एक कोटी २५ लाख रुपयांचे नुकसान झाले. दोन दिवसात १४२ घरे बाधित झाली आहेत. यामध्ये ४४ लाख रुपयांचे नुकसान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यायी शिवाजी पुलाच्याकामातून आबदार मुक्त

$
0
0

पर्यायी शिवाजी पूल बांधकाम प्रकरण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे यांनी पर्यायी शिवाजी पुलाच्या प्रशासकीय कामकाजात दिरंगाईचा ठपका उपअभियंता संपत आबदार यांच्यावर ठेवला. बुधवारी त्यांच्याकडून पुलाच्या प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी काढून घेतल्याचे लेखी पत्र सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळास कांडगावे यांनी दिले. दरम्यान, शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी अभियंता कांडगावे यांना धारेवर धरले. आबदार यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला.

पंचगंगा नदीवरील पर्यायी शिवाजी पुलाचे अपूर्ण काम सुरू होते. मात्र पाया खोदाईसाठीचा अंतिम आराखड्याचा अहवाल उपअभियंता आबदार यांनी वेळेत दिला नाही. पहिल्यांदा अहवाल दिला तो चुकीचा होता, असे अभियंता कांडगावे यांचे म्हणणे आहे. दोन अधिकाऱ्यांच्या वादामुळे अपूर्ण कामास विलंब होत असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे. पाया खोदाईसाठीचा अहवाल वेळेत दिलेला नाही, वरिष्ठांचे आदेश पाळलेले नाहीत. यामुळे उपअभियंता आबदार यांना निलंबित करा, त्यांच्याकडून पुलाच्या प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी काढून घ्या, या मागणीसाठी कृती समितीचे आर. के. पोवार, बाबा पार्टे, चंद्रकांत यादव, किशोर घाटगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ दुपारी १२ वाजता राष्ट्रीय महामार्ग अभियंता कार्यालयात गेले. तेथे त्यांनी कार्यकारी अभियंता कांडगावे यांची भेट घेतली.

यावेळी बोलताना आर.के. पोवार म्हणाले, 'अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे पर्यायी शिवाजी पुलाचे काम रेंगाळले आहे. उपअभियंता आबदार यांनी जाणीवपूर्वक पुलाच्या पाया खोदाईच्या आराखड्यासाठीचा अहवाल दिलेला नाही. शिष्टमंडळ भेटण्यासाठी येणार असल्याची पूर्वसूचना देऊनही ते गैरहजर राहिले. म्हणून त्यांना त्वरित निलंबन करा, अन्यथा आम्ही तुमच्या कार्यालयास टाळे लावू.'

बाबा पार्टे म्हणाले, 'आबदार यांना पाठिशी घालण्याचे कारण काय, ते वेळेत माहिती देत नाहीत. वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लघंन करतात. सरकारी कामात अडथळा आणतात. तरीही त्यांचे निलंबन का केले जात नाही?'

त्यावर कार्यकारी अभियंता कांडगावे म्हणाले, 'उपअभियंता आबदार यांना निलंबित करण्याचे अधिकार मला नाहीत. त्यांच्या विरोधात वरिष्ठांकडे अहवाल पाठविला आहे. त्यांना मी पाठिशी घातलेले नाही. सध्या पंचगंगा नदीत पाणी वाढले आहे. पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा पुलाचे उर्वरित काम सुरू केले जाईल.' यावेळी संभाजी जगदाळे, सतीश कांबळे, अशोक भंडारे, सुनील देसाई, विजय करजगार, फिरोज उस्ताद, दिलीप माने, तानाजी पाटील आदी उपस्थित होते.

----------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रजा, साप्ताहिक सुट्टीसाठीही पैसे

$
0
0

भारत राखीव बटालियनचे कोल्हापूर कार्यालय बनलेय भ्रष्टाचाराचे कुराण\B

संघटीत लाचखोरी ..... मालिका लोगो\B

.................

लीड...

भारत राखीव बटालियन क्रमांक तीनच्या कसबा बावडा येथील कोल्हापूर कार्यालयात गेल्या दहा वर्षांपासून भ्रष्टाचाराचे कुराण सुरू आहे. लाचखोरीने पिचलेल्या खेळाडूंनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर बटालियनच्या सहाजणांना अटक करण्यात आली. खेळाडू कर्मचाऱ्यांना हजेरीत सूट देण्यासह अन्य सवलती देण्यासाठी चाळीस हजाराची लाच घेताना उपअधीक्षकासह निरीक्षक, दोन उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल आणि लिपिक अशा सहाजणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात पकडले. बटालियनची टीमच जाळ्यात सापडल्याने एकच खळबळ उडाली. या कार्यालयात सुरू असलेला भ्रष्टाचार आणि कर्मचाऱ्यांची पिळवणूक याचा वेध घेणारी मालिका आजपासून...

Sachin.Yadav@timesgroup.com

tweet:@sachinyadavMT

कोल्हापूर

भारत राखीव बटालियनच्या जवानांना हजेरीत अॅडजेस्टमेंट, अर्जित रजा, साप्ताहिक सुट्टी, खातेनिहाय विविध प्रकारच्या अभ्यासक्रमासाठी निवड आणि अभ्यासक्रमातून मुक्तता, चोवीस तास ड्युटीतून सवलत देण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत आहे. त्यासाठी 'मॅनेज' करणारी भ्रष्टाचाराची टीम बटालियनच्या राज्यभरातील कंपनीत कार्यरत आहे. मात्र यंत्रणेतील बडा मासा अद्याप 'खुशाल' आहे. विभागाच्या महासंचालक अर्चना त्यागी यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज आहे.

राज्य राखीव दलाचे एकूण १६ गट आहेत. पैकी कोल्हापुरातील गटाचा क्रमांक १६ वा असून भारत राखीव बटालियनचा देशात तिसरा क्रमांक आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांसाठी ७५० जवान तैनात आहेत. जिल्हा पोलिस प्रशासनाला मदत करण्यासाठी राखीव बटालियन तैनात आहे. मात्र या ठिकाणी सुरू असलेल्या भ्रष्टाचारात जवानांची पिळवणूक होत आहे. बटालियनमध्ये जवानांच्या प्रत्येक कामासाठी अलिखित दरपत्रक ठरले आहे. चालक प्रशिक्षणासाठी १० हजार, आर्मर प्रशिक्षणासाठी ७० हजार, गैरहजर राहिल्यास ५ हजार, खानावळीसाठी २५०० रूपये, हजेरीत सवलत देण्यासाठी १०० ते १००० रूपयांचा दर आकारला जात आहे. एक दिवसाची रजा हवी असल्यास १०० ते ५०० रूपये घेतले जातात. जवानांच्या कामाची सायंकाळी पाच ते दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंतची वेळ आहे. दोनशेहून अधिक जवान परजिल्ह्यातील आहेत. त्यांना येण्यासाठी वेळ झाल्यास तासांनुसार लाच मागितली जाते. जवानांना विविध अभ्यासक्रमाची सक्ती आहे. त्यामध्ये पीटी, जीपीआयसह राज्य राखीव दलाचे विविध अभ्यासक्रम आहेत. या सर्व अभ्यासक्रमातून मुक्तता मिळविण्यासाठी पाच हजारांपासून पुढे दर आकारणी केली जाते. जवानांच्या खानावळीत ४० अधिकाऱ्यांचे जेवण केल्याचे कागदोपत्री दाखविले जाते. प्रत्यक्षात दहा अधिकाऱ्यांना जेवण दिले जाते. उर्वरित जेवणाचा भत्ता हा यंत्रणेच्या प्रमुखाला दिला जात आहे. संबधितांकडून पैसे मिळाले नसल्यास त्यांना २४ तास खडा पहारा देण्याच्या ड्युटीवर तैनात केले जाते. साप्ताहिक सुट्टीही दिली जात नाही. अधिकाऱ्यांच्या मर्जीतले जवान डबे आणि कपडे धुण्याचे काम करतात. त्यांना सरकारी कामातून विशेष सूट यंत्रणेकडून दिली जात आहे. बटालियनमधून प्रतिनियुक्तीवर गेलेल्या काही कर्मचाऱ्यांची चौकशी करणे गरजेचे आहे. एक सहायक निरीक्षक, हवालदार यांनी लाच घेण्याचा पायंडा पाडला असून हीच वाट भक्कम करीत त्यांच्या जागेवर नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांनी जवानांची पिळवणूक सुरू केली. नोकरी टिकवायची असल्याने अधिकाऱ्यांच्या विरोधात बोलण्यास कोणीही पुढे येत नाही. मुंबई येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी झाल्यास चौकशी केली जाते. मात्र त्यानंतर काहीच कार्यवाही केली जात नसल्याचा अनुभव जवानांना आहे. बटालियनचे विशिष्ट अधिकारी जवानांकडून पैशाची मागणी करीत असल्याच्या लेखी तक्रारी विभागाच्या महासंचालक अर्चना त्यागी यांच्याकडे करण्यात आल्या. अतिरिक्त महासंचालक संदीप कर्णिक यांनीही कोल्हापुरात येऊन माहिती घेतली होती. मात्र त्यानंतर प्रकरण थांबले. अधिकाऱ्यांची चौकशी झाली, मात्र काहीही कारवाई झालेली नाही.

...................

भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्यांची बदली

बटालियनच्या कार्यालयात भ्रष्टाचाराला विरोध करणारे काही अधिकारी होते. त्यातील काहींची आसाम येथे बदली करण्यात आली. तर काही अधिकाऱ्यांची अन्य राज्यात बदली करण्यात आली. सोलापूर आणि पुणे कंपनीचे इनजार्च म्हणूनही येथील एका चांगल्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली.

............

'त्या' चे लागेबांधे गृहमंत्रालयापर्यंत

कार्यालयातील यंत्रणेचा ब्रेन असलेल्या म्होरक्याचे लागेबंधे गृहमंत्रालयापर्यंत आहेत. चौकशी करणाऱ्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत 'तो' मुंबईत असतो. कोल्हापुरातून गेलेल्या अनेक तक्रारींना केराची टोपली दाखविली गेली आहे. अनेकांना 'मॅनेज' करण्यात त्याचे मोठे कौशल्य आहे. चाळीस हजारांची लाच घेताना सहाजणांना ताब्यात घेतले आहे. मात्र या यंत्रणेच्या प्रमुखांवर कारवाई अपेक्षित आहे. महिन्यातून एकदा कोल्हापुरात आणि उर्वरित दिवस मुंबईत राहणाऱ्या 'त्या' अधिकाऱ्यांची चौकशी करणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाढलेली एफआरपी फसवी

$
0
0

एफआरपी बेस वाढल्याने उत्पादकांना फायदा होणार नसल्याचा सूर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारने येत्या ऊस हंगामासाठी एफआरपीत २०० रूपयांची वाढ केली आहे. मात्र एफआरपीसाठीचा उसाचा पायाभूत (बेस) उतारा साडेनऊ वरून दहा टक्के केला आहे. परिणामी पूर्वीपेक्षा अधिकचा ऊस दर उत्पादकांना मिळणार नाही. परिणामी वाढविलेली एफआरपी फसवी, धूळफेक करणारी असल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी व्यक्त केला. याउलट वाढविलेली एफआरपी साखरेचा भाव वाढविल्याशिवाय देणे शक्य नाही, असा सूर साखर कारखानदारांचा आहे. दरम्यान, आताच्या एफआरपीनुसार पश्चिम महाराष्ट्रात सरासरी ११ ते साडेअकरा उतारा धरल्यास २६५० रूपयांपर्यंत पहिली उचल मिळू शकते.

साडेनऊ उताऱ्याला २५०० रूपये आणि पुढील प्रत्येक उताऱ्याला २३८ रूपये अशी एफआरपी होती. त्यात फेररचना करून पायाभूत उतारा साडेनऊ वरून दहा टक्के नुकताच करण्यात आला. पुढील १ उताऱ्याला २७५ रूपये सुधारित दर केला आहे. पायाभूत उतारा अर्धा टक्क्याने वाढविल्याने एफआरपी वाढवूनही उत्पादकांना त्याचा फारसा फायदा होणार नाही. उलट उत्पादकांना गेल्या हंगामापेक्षा कमी एफआरपी मिळेल, अशी शक्यता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. अशी वस्तुस्थिती राहिल्यास केंद्र सरकारची एफआरपी वाढ केवळ आकड्यांचा खेळ ठरल्यास उत्पादकांच्या पदरी निराशा येणार आहे. कारखानदारांना आताची सर्व रिकव्हरीची रक्कम देता आलेली नाही. वाढलेली रिकव्हरी साखरेचा भाव वाढला तरच देणे शक्य आहे, असे कारखानदारांचे मत आहे.

---------------------------

कोट

' एफआरपीचा पूर्वीचा बेस साडेआठ होता. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकाने तो वाढवून ९ केला. आता भाजप सरकारने साडेनऊऐवजी दहा केला. २०० रूपयांची वाढ करताना भाजप सरकारने एफआरपीचा बेस दहा करून उत्पादकांची फसवणूक केली आहे. बेस अर्धा टक्यांनी वाढविल्याने प्रती रिकव्हरी मिळणारे पैसे कमी होणार आहेत. यामुळे एफआरपी वाढली तर गेल्या हंगामापेक्षा कमी दर मिळणार आहे. एफआरचा बेस नऊ करावा, अशी मागणी शेतकरी संघटनांची आहे.

जालिंदर पाटील, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष

--------------------

'केंद्र सरकारने एफआरपीची रक्कम वाढविताना बेस बदलला आहे. अर्धा टक्क्यांनी वाढवून दहा टक्के केला आहे. यामुळे ऊस उत्पादकांना जादा पैसे मिळण्याऐवजी कमी दर मिळणार आहे. साडेआठ रिकव्हरीचा बेस धरल्यास प्रती टन सुमारे ३३५ रूपयांचा फटका बसणार आहे. सरकारने उत्पादकांची दिशाभूल केली आहे. प्रत्यक्षात उत्पादकांना कमीच पैसे मिळणार आहेत.

रघुनाथ पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना

----------

'उत्पादन खर्च वाढल्याने उसाची एफआरपी वाढायलाच हवी. केंद्राने वाढविलेली २०० रूपयाची वाढ योग्य आहे. याबरोबरच साखरेचा किमान दरही ३२०० वर निश्चित करायला हवा होता. साखरेचे दर वाढले नाही तर एफआरपी देणे कारखानदारांना शक्य होणार नाही. कारखानदारी अडचणीत येईल. यावर्षीची एफआरपी देण्यासाठीच कारखानदारांना कर्ज काढावे लागले आहे.

हसन मुश्रीफ, आमदार, साखर कारखानदार

-------------------

'दिवसेंदिवस उसाचा उत्पादन खर्च वाढत आहे. त्यांना जास्त दर मिळायलाच हवा. म्हणून केंद्र सरकारने २०० रूपयांची एफआरपी वाढवलेली आहे. आताची एफआरपी देण्यासाठी साखरेची आधारभूत किंमतही वाढायला हवी. अन्यथा एफआरपी देताना साखर कारखानदारांना अडचणींना सामारे जावे लागणार आहे. यावर्षी साखरेचे दर कमी झाल्याने अनेक कारखान्यांची एफआरपी थकीत आहे.

पी. जी. मेढे, साखर उद्योगतज्ज्ञ

-------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपास गतीने करा

$
0
0

कोल्हापूर

'अनुसूचित जाती -जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमान्वये दाखल होणाऱ्या खटल्यांचा तपास गतीने करावा', अशी सूचना जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी गुरूवारी केली. जिल्हा दक्षता, संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाखाली जिल्ह्यात २३ प्रकरणांना अर्थ सहाय्य मंजूर झाल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी सरकारी वकील ॲड. विवेक शुक्ल, समाजकल्याण सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, जिल्हा समाजकल्याण अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एफ. देशमुख, समाज कल्याण निरीक्षक केशव पांडव, अशासकीय सदस्य दलितमित्र निरंजन कदम आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्राइम थोडक्यात

$
0
0

दोन फोटो आहेत

सराईत दुचाकी

चोरट्यांना अटक

कोल्हापूर

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोघा सराईत दुचाकी चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या. तानाजी कोडिंबा सवळेकरी (वय ३१. रा. दरवेशी पाडळी, ता. हातकणंगले), फिरोज उर्फ हैदर आलिम नदाफ (वय २५ रा. कुंभोज, ता. हातकणंगले) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. सवळेकरी हा सराईत चोरटा असून तो २०१५ पासून जामिनावर मुक्त आहे. त्याने कागल, जुना राजवाडा, करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीचे गुन्हे केले आहेत. नदाफ याच्यावर गोकुळ शिरगाव, मुरगूड, गारगोटी, करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले, वडगाव, कोडोली, बत्तीस शिराळा या ठिकाणी चोरीचे बारा गुन्हे दाखल आहेत. तो ही जामिनावर मुक्त आहे. दोघांच्याकडून ८० हजार रूपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त केल्या. त्यांच्याकडून आणखी काही दुचाकी चोरीचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ही कारवाई केली.

...

सुमो-ट्रक अपघातात ११ जखमी

कोल्हापूर

जोतिबा येथून देवदर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या सुमोची समोरुन येणाऱ्या ट्रकला धडक बसल्याने ११ जण जखमी झाले. कोल्हापूर ते पुणे महामार्गावर टोप (ता. हातकणंगले) जवळ गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जमखींवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. सुभद्रा बळीराम राठोड (वय ५५), सुरेश नागेराव धळगडे (वय ५५), पार्वतीबाई श्रीराम रावते (वय ६०), शकुंतला उद्धवराव ठाकणे (वय ७०), अंजनाबाई नागोराव धळगडे (वय ८०), सदाशिव केशवराव शिंदे (वय ३८), विश्वनाथ बाबा जाधव (वय ७०), सुभाष संपतराव राउऊत (वय ५०), शाम गणपतराव बनछोडे (वय ७०), श्रीराम उद्धव हर्णे (वय १०), नामदेव गणपती गोडसे (वय ५२, सर्व रा. पुसद, यवतमाळ) अशी जमखींची नावे आहेत. सर्व भाविक पंढरीच्या वारीसाठी बाहेर पडले होते. त्यांनी एक दिवस कोल्हापुरात मुक्काम करुन अंबाबाईचे दर्शन घेतले. गुरुवारी सकाळी वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबांचे दर्शन घेऊन महामार्गावर आले असता त्यांच्या सुमोला ट्रकची धडक बसली.

.

दोन फोटो आहेत

दीड लाखांचा

मावा जप्त

कोल्हापूर

स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि अन्न औषध प्रशासन विभागाने मावा बनविण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची विक्री केल्याप्रकरणी हॉकी स्टेडियमजवळील वटवृक्ष पानपट्टीवर छापा टाकून १ लाख ५४ हजार १३७ रूपयांचा माल जप्त केला. या प्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. अतुल बाजीराव सूर्यवंशी (वय ३७), सागर बाजीराव सूर्यवंशी (वय ३३, दोघेही रा. गजानन महाराज नगर, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून उषा सुगंधी साहित्याचे ३३ बॉक्स, सुपारी, चुना, आवळा वेल मिक्सर, तयार मावा जप्त केला आहे. अन्न औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मोहन केंबळकर, अन्न सुरक्षा अधिकारी शुभांगी कर्णे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषणचे राजेंद्र सानप, इकबाल महात, सुनील कवळेकर, राजेंद्र हांडे आदींनी कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत मोर्चा

$
0
0

परिवहन कार्यालयासाठी

इचलकरंजीत मोर्चा

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

इचलकरंजीत शहरात रिक्षा चालक व मालवाहतूक टेम्पोंसह सर्वच वाहनांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय आवश्यक असून त्यासाठी रिंगरोडवरील क्रांती गारमेंट प्रशिक्षण केंद्राची इमारत व लगतची जागा नगरपरिषदेने तत्काळ द्यावी, या मागणीसाठी रिक्षा चालक-मालक, मालवाहतूक टेम्पो कृती समितीच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयावर वाहनांसह धडक मोर्चा काढण्यात आला.

छत्रपती शाहू महाराज पुतळा येथून सुरू झालेला मोर्चा छत्रपती शिवाजी पुतळा, कॉ. मलाबादे चौक, म. गांधी पुतळा ते बंगला रोडवरून प्रांताधिकारी कार्यालयावर आला. येथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी शाहू ग्रुप मालवाहतूक कृती समितीचे अध्यक्ष प्रकाश लोखंडे, रिक्षा संघटनेच्या नंदा साळुंखे, लियाकत गोलंदाज आदींची भाषणे झाली. त्यानंतर शिष्टमंडळाच्यावतीने तहसिलदार वैशाली राजमाने यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोटरवाहन निरिक्षक सुरेश माळी उपस्थित होते. मोर्चाचे निवेदन घेण्यासाठी उपस्थित न राहिल्याबद्दल प्रांताधिकारी, नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला.

सध्या वाहन पासिंग ट्रॅकसाठी सुचविलेली जागा ही रहिवाशी जागा असून या जागेची मागणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केली आहे. पण ही जागा अपुरी असून स्वामी समर्थ केंद्रासाठी भाडेकराराने देण्याबाबत प्रशासनाने पत्रव्यवहार केला आहे. केवळ राजकीय द्वेषातून आंदोलन मोडीत काढण्यासाठी त्याच जागेचा घाट घातला जात आहे. त्यासाठी आटापिटा करुन पत्रव्यवहार केल्याची कागदपत्रे रंगविली असल्याचे सांगितले. यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सांगीतले, ' इचलकरंजी औद्योगिक शहर असल्याकारणाने रिक्षा, मालवाहतूक टेम्पो, ट्रॅक्स, टेम्पो ट्रॅव्हलर्स अशा वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वाहन पासिंगसाठी कोल्हापूर येथे जावे लागत असल्याने संपूर्ण दिवस खर्ची पडतो. त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय इचलकरंजी येथे होणे गरजेचे आहे. त्यासाठी लालनगर रिंगरोड परिसरातील क्रांती गारमेंट प्रशिक्षण केंद्राची तयार इमारत कार्यालयासाठी आणि लगतची जागा वाहन पासिंग ट्रॅकसाठी द्यावी. सर्व काही तयार असल्यामुळे पासिंग ट्रॅक सुरु होण्यास कालावधी लागणार नाही.'

मध्यंतरीच्या काळात प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी राजेंद्र मदने यांच्या कमिटीने रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाबाबत अहवाल सादर केला होता. मात्र राज्य सरकारने फेटाळून लावत स्वतंत्र मंडळाऐवजी विकेंद्रीत क्षेत्रातील विविध १२३ घटकांतील कामगारांना एकाच योजनेत आणून त्यांची हेटाळणीच केली आहे. रिक्षाचालकांसाठी तामिळनाडूच्रा धर्तीवर कल्राणकारी मंडळ स्थापन करुन त्राद्वारे भविष्रनिर्वाह निधी, आरोग्र विमा, मुलांचे शिक्षण, पेन्शन, घरकुले असे लाभ मिळणे गरजेचे आहे. रिक्षा साठीच्या इन्शुरन्सचे पैसे विमा कंपनीला भरावे लागतात. मात्र त्याद्वारे रिक्षाचालकांना काहीच लाभ मिळत नाही. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या धर्तीवर स्वतंत्र बोर्ड स्थापन करुन त्याद्वारे लाभ मिळवून द्यावेत. आरटीओ कार्यालय सुरु झाल्यास अत्यावश्यक सर्वच आधुनिक सुविधा शहरात उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर मदने कमिटीने सुचविलेल्या शिफारशींचा स्वीकार करुन रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करणेसाठी पाठपुरावा करुन त्याची निर्गत करावी अशी मागणी आवाडे यांनी केली.

आंदोलनात महाराष्ट्र रिक्षाचालक संघटना, इंदिरा ऑटो युनियन, अशोक कोलप, शाहीर जावळे, मल्लिकार्जुन बिल्लुरे, राजेश आवळे, महावीर हेरलगे, अनिल कातुरे यांच्यासह रिक्षाचालक, मालवाहतूक टेम्पो चालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदगड बेळगाव मार्ग खड्ड्यात

$
0
0

चंदगड-बेळगाव राज्य मार्ग खड्डयात

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

गेल्या पंधरा दिवसात पडलेल्या मुसळधार पावसाने बेळगाव-वेगुर्ला राज्य मार्गावर शिनोळी ते गुडवळे फाट्या पर्यंत मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्ता वाहतुकीला अयोग्य बनला असून अपघातांच्या संख्येत दिवसेनदिवस वाढ होत आहे. मे-जुन मध्ये भरलेले खड्डे पहिल्याच पावसात उखडल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चंदगड तालुक्यात दरवर्षी ४ हजार मिलीमीटर पेक्षाही अधिक पाऊस पडतो. सध्या हे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. बेळगाव-वेगुर्ला मार्गावर, शिनोळी, तुर्केवाडी फाटा, ढोलगरवाडी फाटा, पाटणे फाटा, हलकर्णी फाटा, नरेवाडी, दाटे, नागनवाडी, शिरगाव, म्हाळूंगे, कानुर, सडेगुडवळे या ठिकाणी रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. चंदगड फाटा ते चंदगड येथील संभाजी चौकापर्यंतचा रस्ता खड्यामुळे दिसेनासा झाला आहे. या पावसामध्ये तालुक्यातील रस्त्यावरील खड्डे भरताना बांधकाम खात्याने केवळ मलमपट्टी केली होती. मे-जुन अखेर भरलेले खड्डे या पावसात उखडून गेल्याने रस्त्याला तलावाचे स्वरुप आले आहे. खड्ड्यात पाणी साचल्याणे खड्डा किती खोलीचा आहे. हा अदांज न आल्याने दुचाकीस्वार खड्डयात पडून अपघात होत आहे. चारचाकी गाड्याचे मोठ्या प्रमाणात टायर पंक्चर होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सार्व. बांधकाम खात्याने किमान खड्डयामध्ये दगड टाकुन तरी खड्डे बुजवावेत अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images