Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पंचगंगा धोका पातळीकडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दोन दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर ओसरला असला, तरी पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास पंचगंगेने ३९ फूट ही इशारा पातळी गाठली. पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीवरुन धोका पातळीकडे (४३ फूट) सुरू झाली आहे. शनिवारी दिवसभरात सरीवर सरी कोसळत होत्या. अद्यापही जिल्ह्यातील ६३ बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतूक अन्य मार्गावरुन वळवण्यात आली. आपत्ती यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

शनिवारी दिवसभर सरीवर सरी कोसळत होत्या. राधानगरी आणि शाहूवाडीत मात्र जोर कायम आहे. राधानगरी, कुंभी व कासारी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. सकाळी ३८ फुटावर असणारी पाणीपातळी रात्री १० वाजता ३९ फुटापर्यंत पोहोचली. दरम्यान, घटप्रभा, वारणा व राधानगरी धरणातून विसर्ग सुरू असल्याने वेदगंगा, दुधगंगा, वारणा व पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन जिल्ह्यातील ६३ बंधारे पाण्याखाली गेले. जिल्ह्यातील सहा राज्य मार्गासह १२ जिल्हा मार्ग पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली. राधानगरी, शाहूवाडी, चंदगड, भूदरगड तालुक्यात झालेल्या पावसांमुळे २१ ठिकाणच्या घरांच्या भिंती पडून सुमारे तीन लाख ८१ हजार रुपयांचे नुकसान झाले.

\Bजवाहरनगरात झाडे पडल्याने वाहतूक ठप्प\B

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जवाहर नगर ते आयसोलेशन हॉस्पिटल मार्गावरील मोठे झाडे दुपारी सव्वा एक वाजता पडले. यामुळे येथील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली. अग्निशमन दलाच्या जवानानी झाडे बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. तर लक्ष्मीपुरी पान लाइन येथील झाडाची फांदी विद्युत वाहिनीवर पडल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.

...................................

धरण पाणीसाठा

कोयना ५९.१२

राधानगरी ५.९५

वारणा २६.७७

दुधगंगा १६.०५

कोयनेत २४ तासांत तीन टीएमसीने वाढ

कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये धुवाँधार पाऊस सुरू आहे. शिवसागर जलाशयात ५३ हजार २०६ क्युसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणीसाठा ६३.०७ टीएमसी एवढा झाला आहे. मागील चोवीस तासांत धरणातील पाणीसाठ्यात तीन टीएमसीने वाढ झाली आहे. पाटणसह परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने उसंत काहीशी उसंत दिली असली तरीही अद्याप धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या धुवाँधार पावसामुळे १६ हजार ३९९ पाणी धरणात येत आहे. त्यामुळे पाणीपातळी वाढत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोघां चोरट्याकडून सव्वा लाखांच्या बॅटरी जप्त

0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वाहनांच्या बॅटऱ्या लंपास करणाऱ्या दोन चोरट्यांकडून सव्वा लाख रुपयांचा १७ बॅटरी राजारामपुरी पोलिसांनी जप्त केल्या. मोहसीन नासीर चित्तेवान (वय २६, रा. महातगल्ली, कोल्हापूर), अक्षय विजय कांबळे (वय २५ रा. लक्ष्मीपुरी, भाजी मार्केट) अशी अटक केलेल्या संशयित चोरट्याची नावे आहेत. त्यांनी राजारामपुरी परिसरात घरासमोर, मोकळ्या मैदानात लावलेल्या अवजड वाहनांच्या बॅटरी चोरल्याची कबुली चोरट्यांनी दिली. आयसोलेशन हॉस्पिटल, वाळू अड्डा, मार्केट यार्ड, रेल्वे गुड्स यार्ड या ठिकाणी उभ्या अवजड वाहनांतूनही बॅटरी चोऱ्या केल्या आहेत. त्यांच्याकडून १ लाख २३ हजाराच्या १७ बॅटरी जप्त केल्या. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक औंदूबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली. शहरात बॅटरी चोरीचे प्रमाण वाढले होते. त्या पार्श्वभूमीवर विशेष पथके नेमून तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी केल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांच्या नशिबी आजही दु:खच

0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet @Uddhavg_MT

देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा शेती हाच आहे. शेतीकडे दुर्लक्ष करून हा देश चालूच शकत नाही. दुर्दैवाने गेल्या ६०-६५ वर्षात शेतीच्या विकासासाठी ठोस धोरण तयारच झाले नाही. केंद्र सरकारने केलेली हमीभावाची घोषणा शेतकऱ्यांसाठी नाही, तर २०१९ च्या निवडणुकीची तयारी आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न केवळ शेतीत नाहीत तर त्यांना मिळणाऱ्या सुविधा, आरोग्य, त्यांच्या मुलांचे शिक्षण, जागतिक बाजारपेठ आणि आयात-निर्यात धोरण यात आहेत. कोणतेही सरकार जोपर्यंत याच्या मुळाशी जाऊन ठोस धोरण ठरवत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न संपणार नाहीत. किंबहुना, ते वाढत राहतील, अशी खंत ज्येष्ठ विचारवंतर प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी व्यक्त केली.

.....

प्रा. एन. डी. पाटील हे नाव म्हणजे महाराष्ट्रातील गेल्या ७५ वर्षांच्या सामाजिक चळवळींचा जिवंत इतिहासच. विद्यार्थीदशेपासून स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय झालेले एन. डी. पाटील पुढे गिरणी कामगार, शेतकऱ्यांच्या जमिनी, शिक्षण, विजेचे प्रश्न, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमाप्रश्न, कोल्हापूरचा टोल लढा, खंडपीठ आंदोलन अशा अनेक प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरले. त्यांनी ज्या प्रश्नात लक्ष घातले तो तडीस नेला. प्रचंड अभ्यास, धारदार वक्तृत्व आणि हजरजबाबीपणाच्या बळावर त्यांनी अनेकांची बोलती बंद केली. सत्ताधाऱ्यांनाही अनेकदा निमूटपणे त्यांचा शब्द प्रमाण मानावा लागला. त्यांच्यासमोर युक्तिवाद करण्याचे धारिष्ट्यही अपवादानेच दिसे. वयाच्या नव्वदीतही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असाच आहे.

रुईकर कॉलनीतील घरात पुस्तकांच्या गराड्यातील एनडींनी आयुष्यातील पहिल्या आंदोलनाच्या आठवणी जाग्या केल्या. ते म्हणाले, 'स्वातंत्र्यापूर्वीचा तो काळ होता. आमच्या भागात, म्हणजे त्यावेळच्या सातारा जिल्ह्यात वाळवा परिसरात नाना पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. बापू लाड यांच्याकडून स्वातंत्र्य चळवळ जोरदार सुरू होती. विद्यार्थीदशेत मी राष्ट्रसेवा दलाचे काम करीत होतो. मित्रांना स्वातंत्र्याचे महत्त्व सांगणे, निरोप पोहोचवणे, ठरलेल्या ठिकाणी भाकरी पोहोचवण्याची जबाबदारी माझ्यावर होती. या कामात आम्ही कधीच ब्रिटिशांच्या हाती लागलो नाही. मात्र, आमच्यावर त्यांची बारीक नजर होती. पेठ वडगावात दर सोमवारी भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात हजारोंची उलाढाल होत असे. त्याच ठिकाणी एका व्यक्तीने देशी दारुचे दुकान सुरू केले. गरीब शेतकऱ्यांच्या जनावरांची खरेदी-विक्री झाल्यानंतर ते थेट दारुच्या गुत्त्यात जायचे. हा गुत्ता बंद करण्यासाठी पहिले आंदोलन केले. रंगराव पाटील, मी आणि माझ्या आठ ते दहा मित्रांनी आंदोलनाची धार वाढवल्याने पोलिसांनी आम्हाला अटक केली. १९४४-४५ च्या सुमारास आमची रवानगी बिंदू चौक सबजेलमध्ये झाली. १५ दिवसांनी जामीन मिळाला. तेव्हा माझे वय अंदाजे १६ वर्षांचे होते.'

'कोल्हापुरात राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण सुरू झाले आणि कोल्हापूरच्या पुरेगामीत्वाचे धडे मिळाले. तत्कालीन कॉँग्रेसमध्ये सक्रीय झालो. पुढे १९४८ मध्ये भारतीय शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. शेतकरी कामगार पक्ष सत्तेत होता, तेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणजे केवळ शेतीचे प्रश्न नसतात. त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा, मुलांना शिक्षण मिळावे, सिंचनाची सोय व्हावी, पुरेशी वीज मिळावी हेही प्रश्न महत्त्वाचे असतात. शेतमालाला योग्य दर मिळावा म्हणून मी राज्यात पहिल्यांदाच कापूस एकाधिकार खरेदी योजना सुरू केली. कोल्हापुरात सरकारमार्फत गूळ खरेदी केंद्र सुरू केले. कोकणात काजूकीया खरेदी केंद्र सुरू केले. सध्या हमीभावाचे केवळ गाजर दाखवले जात आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेला हमीभाव ही २०१९ च्या निवडणुकीची तयारी आहे. बजेटमध्ये तरतूद होत नाही तोपर्यंत या पोकळ घोषणाच म्हणाव्या लागतील. यासाठी केंद्र सरकारला स्वतंत्र निधीची तरतूद करावी लागेल. सरकारची तशी मानसिकता दिसत नाही. एफआरपीचाही असाच घोळ आहे. तूर खरेदीचा सावळा गोंधळ नवीन नाही, त्यामुळे ठोस धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न संपणार नाहीत हेच खरे.'

छोट्या पक्षांच्या भवितव्याबद्दल ते सांगतात, 'मोठ्या पक्षांची धास्ती वाटण्याची गरज नाही. जनतेचे अव्वल प्रश्न उचलून धरणे आणि त्यावर उत्तरे शोधणे हे राजकीय पक्षांचे काम आहे. पक्ष किती मोठा हे महत्त्वाचे नाही. छोट्या पक्षांनी जनतेच्या प्रश्नांना हात घातल्यास त्यांना जनाधार मिळतो, हा इतिहास आहे. देशाची घटना, लोकशाही आणि नागरिकांचे सार्वभौमत्व जपण्याला राजकीय पक्षांनी प्राधान्य देणे गरजेचे आहे. धर्मांधता आणि द्वेषाचे राजकारण भविष्यात घातक ठरण्याचा धोका आहे. कोल्हापूरच्या मातीनेच माझे व्यक्तिमत्व घडवले. राजाराम कॉलेजने पुरोगामीत्वाची शिकवण दिली. बिंदू चौकात अनेक सभा गाजवल्या. एकही रुपया खर्च न करात इथल्या जनतेने मला चाळीस हजारांहून अधिक मतांनी निवडून दिले. शाहू महाराजांपासून भाई माधवराव बागल आणि बहुजन विचारांची परंपरा जोपासणाऱ्या अनेकांचे संस्कार माझ्यावर झाले. कोल्हापूरचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरणे हे माझे कर्तव्य समजतो. कॉम्रेड गोविंद पानसरे आणि माझी विचारसरणी सारखीच होती. अनेक आंदोलनात आम्ही एकत्र होतो. त्यांची हत्या होणे हे सरकार आणि पोलिसांचे अपयश आहे. त्यांची उणीव नक्कीच जाणवते. त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यात सरकारच्या इच्छाशक्तीचा अभाव दिसतो. याबद्दल मी अनेकदा नाराजी व्यक्त केली. कर्नाटकात गौरी लंकेश यांचे मारेकरी सापडतात, मग पानसरे आणि डॉ. दाभोलकरांचे मारेकरी का सापडत नाहीत?'

..........

सीमाप्रश्न रेंगाळण्यास कर्नाटक सरकारचा आडमुठेपणा कारणीभूत आहे. आम्ही त्यांच्यासमोर अनेक पर्याय ठेवले होते. भाषावार प्रांतरचनेचा निकष लावून हा प्रश्न निकाली काढणे शक्य आहे. या तुलनेत स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा वेगळा आहे. काही लोक जाणीवपूर्वक त्याचे राजकीय भांडवल करू पाहतात. त्यांना वेळीच रोखणे गरजेचे आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी शंभराहून अधिकांनी हौतात्म्य दिल्याचे लक्षात ठेवा.

.......

सरकारने अजूनही शिक्षणाबद्दल गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. खासगीकरणावर भर देणारे सरकार त्यांच्या जबाबदारीपासून पळ काढत आहे. शिक्षणाचे खासगीकरण केवळ मूठभर लोकांच्या हिताचे आहे. ग्रामीण महाराष्ट्रासाठी सरकारी शिक्षण व्यवस्थेची गरज आहे. शिक्षणाच्या खासगीकरणाने प्रश्न सुटणार नाहीत, उलट ते अधिक जटील होतील. शिक्षणसम्राटांना आवरणे आत्ताच कठीण झाले आहे.

.......

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लढ्याची ऊर्जा

0
0

प्रश्न अनेक,

उत्तर एकच 'एनडी!'

प्रश्न कोल्हापूरचा असो, जिल्ह्यातला असो वा महाराष्ट्राचा... ताजा असो व रखडलेला... तो सुटायचा असेल तर उत्तर एकच 'एन. डी. पाटील!' कसलेही सत्तास्थान नसताना प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडे अनेकजण धाव घेतात. ते असतील तर प्रश्न सुटणार याची खात्री असल्यानेच वयाच्या नव्वदीतही त्यांच्या हातात नेतृत्व दिले जाते. त्यांच्यात आजही लढण्याची ताकद, जिंकण्याची उर्मी आहे अन् संघर्षाची ऊर्जा आहे. त्यांचे नेतृत्वही तरूणाला लाजवेल असे. कार्यकर्त्यांत ते लढण्याची उमेद जागवतात. कोल्हापूर, सांगली, साताराच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. नैतिक अधिष्ठान आणि न्यायासाठी कुठल्याही संघर्षासाठी तयार असल्याने त्यांनी प्रस्थापितांविरोधातील लढाया यशस्वी केल्या.

गुरूबाळ माळी

प्रा. एन. डी. पाटील यांची माजी आमदार व माजी कॅबीनेट मंत्री अशी त्यांची ओळख फार कमी. पण, श्रमिकांचा नेता, कष्टकऱ्यांचा आधार आणि जनतेच्या भल्यासाठी लढल्या जाणाऱ्या प्रत्येक आंदोलनातील सक्रीय कार्यकर्ता ही ओळख जास्त. लढवय्या योद्धा म्हणूनच ते सर्वपरिचित आहेत. सामान्यांसाठी धावून जाणारा हक्काचा माणूस म्हणून ते लोकांना आपले वाटतात. पुरोगामी चळवळीशी घट्ट नाते जपणाऱ्या 'एनडीं'नी वैचारिक नाळ कधी तुटू दिली नाही. म्हणून तर सत्कार समारंभ असो वा उद्घाटनाचा कार्यक्रम, अशांना नम्रपणे नकार देणारे 'एनडी' अन्यायाविरूद्धच्या लढ्यात मात्र अग्रभागी. सर्वांच्या पुढे लढताना त्यांचा उत्साहही तरूणांना लाजवणारा असतो. ज्या लढ्यात सर आहेत, तो लढा यशस्वी होणारच असे जणू समीकरणच. शिवाय ज्या लढ्यात सर असतील तो लढा मॅनेज होणार नाही, मध्येच थांबणार नाही हे निश्चित ठरलेले. यामुळे जिथे सरांचे नेतृत्व आहे, जिथे सरांचा नुसता सहभाग आहे, त्या आंदोलनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याचे धाडस कुणी करणे अशक्यच.

माझ्या आयुष्यातील शेवटचा लढा असे म्हणत 'एनडी' आणि गोविंदराव पानसरे यांनी हातात हात घालून टोल लढ्याचा एल्गार पुकारला. आठ वर्षे हा लढा सुरू होता. ज्यात कोल्हापूरकरांना शंभर टक्के यश आले. हा विजय कोल्हापूरकरांच्या संघटित लढ्याचा जरूर होता. त्याबरोबरच तो एनडी आणि पानसरेंच्या नेतृत्वाचा होता. हे दोघे या लढ्यात नसते तर ते आंदोलन कधीच मॅनेज झाले असते. कारण कोल्हापूरकरांनी अशी मॅनेज आंदोलने अनेक पाहिली आहेत. टोलचा लढा शेवटचा असेल, असे जाहीर करूनही गेल्या दोन तीन वर्षांत सर ना थांबले ना थकले. त्यांचा लढा अजूनही सुरूच आहे. प्रत्येक लढ्यात तिच जिगर, तोच उत्साह आणि तीच तडफ घेऊन ते सहभागी होताहेत.

टोलमुक्तीनंतर सरांनी खंडपीठ आंदोलनात उडी घेतली. त्यांच्या सहभागामुळे या आंदोलनाला बळ आले. सर आहेत हे कळताच मुख्यमंत्र्यांनी चर्चेला बोलवले. आश्वासन दिले. या आंदोलनाला गती आली. थातूरमातूर सांगून वेळ मारून नेण्याचे धाडस त्यांच्या समोर कुणालाच होत नाही. राज्याचा मुख्यमंत्री असो वा अन्य कोणताही मंत्री. बैठकीला 'एनडी' असले की त्याचा नूरच बदलतो. बैठकीला गांभीर्य प्राप्त होते आणि प्रश्नांची सोडवणूक होते हा सगळ्यात महत्त्वाचा भाग.

खंडपीठाबरोबरच सरांनी शाळा बचाव आंदोलनात सहभागी झाले. दसरा चौकात दहा हजारावर मुलांच्या उपस्थितीत त्यांनी शाळा वाचवण्याचा एल्गार केला. कोल्हापूरचे हे आंदोलन राज्यभर पसरले ते त्यांच्यामुळेच. यातून किमान निम्म्या शाळातरी नक्की वाचल्या. इतर शाळांसाठी आंदोलन सुरूच आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नासाठी सर गेले चाळीस वर्षे लढत आहेत. एवढ्या वर्षात 'एनडी' आणि सीमाप्रश्न यांचे अतुट नाते झाले आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि राजकीय पक्षांच्या संधीसाधूपणामुळे हा प्रश्न पन्नास वर्षे भिजत पडला आहे. त्याची खंत सरांना नक्कीच असेल. मध्यवर्ती एकीकरण समितीचे ते नेते आहेत. आजही त्यांच्याच नेतृत्वाखाली एकीकरण समितीचे राजकीय वाटचाल सुरू आहे. विधानसभेचे उमेदवार कोल्हापुरात त्यांच्या निवासस्थानी जाहीर झाले, यावरून सारे काही स्पष्ट होते.

कोल्हापूरला काळम्मावाडी धरणातून थेटपाइपलाइनने पाणी पुरवठा व्हावा यासाठी चाळीस वर्षे लढा सुरू होता. या लढ्यातही सर होते. त्यामुळे हा लढा जिवंत राहिला. राजकारणी लोकांना त्याची दखल घ्यावी लागली. उशिरा का होईना त्याचे काम सुरू झाले.

प्रकृती बिघडली असताना, अंथरूणावर खिळून असतानाही सरांचा उत्साह कधी कमी झाला नाही. पायाच्या त्रासामुळे चालता येत नाही. तरीही वॉकरचा आधार घेत ते आंदोलनाच्या ठिकाणी जातात. 'आमच्या आंदोलनाचे नेतृत्व करा,' अशी विनंती करायला कुणी गेले तर त्यांचा नकार कधीच नसतो. आंदोलन कशासाठी, त्यात समाजहित किती? याचाच ते विचार करतात. म्हणून तर वीजदरवाढीपासून ती कृषीपंपावरील अधिभार वाढीपर्यंतच्या सर्व आंदोलनात 'एनडी' हे नाव दिसतेच. त्यांच्या पुढाकारानेच कृषीपंपावरील कित्येक कोटी अधिभार माफ करण्यात आला. राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला.

कोल्हापूरकरांनी सरांना विधानसभेवर पाठवले. हे कोल्हापूरचे नाहीत, ते सांगली जिल्ह्यातील आहेत असा प्रचार त्यांच्याविरोधात झाला. पण, या प्रचाराला भीक न घालता कोल्हापूरकरांनी एक बुलंद आवाज विधासभेत पाठवला. हा आवाज केवळ कोल्हापूरचाच ठरला नाही तर तो महाराष्ट्राचा ठरला. पण, याच पुरोगामी कोल्हापुरात नंतर शेकापचे वादळ कमी होत भगवी लाट आली. ती लाट पंचवीस वर्षानंतरही कायम आहे. पराभव झाला म्हणून सर कधी थांबले नाहीत, कोल्हापूरशी त्यांची नाळ इतकी जुळली की, ते येथेच स्थायिक झाले. त्यांचे रूईकर कॉलनी येथील निवासस्थान हे अनेक निराधारांचा आधार आहे. याच निवासस्थानातून अनेक आंदोलनांचे रणशिंग फुंकले जाते.

स्वच्छ प्रतिमेच्या सरांच्या चारित्र्यावर डाग नाही. त्यामुळे ते मंत्र्यांपासून कोणत्याही अधिकाऱ्याला कोणतीही भीड न ठेवता बोलू शकतात. त्यांचा धाक एवढा की, समोरचा माणूस सर आहेत म्हटल्यावर निम्मा गार होतो. खोटेनाटे सांगण्याचा प्रयत्नही तो करू शकत नाही. त्यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदरयुक्त भीती आहे. लोकहितासाठी कुणालाही भिडण्याची ताकद त्यांच्यात आहे.

अगदी अलिकडेच इचलकरंजीला वारणेचे पाणी देण्यावरून वाद सुरू झाला. या आंदोलनाचे नेतृत्व करावे, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली. प्रकृती बरी नसतानाही ते या आंदोलनात उतरले. मंत्रालयात गेले. बैठकीला उपस्थित राहिले. तासगावचा साखर कारखाना केवळ काही कोटीत घशात घालण्याचा प्रयत्न काही राजकीय व्यक्तींनी केला. पण सर त्याविरोधात पाय रोवून उभे राहिले. म्हणून तर हा कारखाना वाचला. रयत शिक्षण संस्थेत अजूनही बाजारीकरणाचा शिरकाव झाला नाही, यालाही कारणीभूत आहे ते सरांचेच नेतृत्व.

'एनडी' आणि पानसरे हे पुरोगामी विचारांचे दोन खंदे वीर. पानसरेंची हत्या झाली. या हत्येने सर एकाकी पडले. पण, त्यांचा लढा थांबला नाही. पानसरेंची हत्या करणाऱ्यांना अटक करावी, या मागणीसाठी आजही ते रस्त्यावर उतरतात. दरमहा मॉर्निंग वॉकमध्ये ते सहभागी होतात. या दोघांतील नाते मैत्रीपलिकडचे होते. पानसरेंची उणीव भरून काढण्याचे काम 'एनडी' करत आहेत. कोल्हापूरची सामाजिक चळवळीची वीण घट्ट करत, पुरोगामीत्वाचा चेहरा टिकवण्यात ते आघाडीवर आहेत. त्यांच्या कर्तृत्वाला ना प्रांत, ना कुठल्या क्षेत्राचे बंधन. समाजाच्या सर्व आघाड्यावर तळपणारे हे नेतृत्व लढ्याची ऊजा आहेत.

.................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकच्या धडकेत वारीतील महिलेचा मृत्यू

0
0

सातारा:

लोणंद येथे रस्ता ओलांडताना मागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने एक वारकरी महिला ठार झाली आहे. कविता तोष्णीवाल असे या महिलेचं नाव आहे.

तोष्णीवाल या महाबळेश्वर येथील राहणाऱ्या आहेत. दिंडीतील वारकऱ्यांना अन्नदान करण्यासाठी त्या लोणंद येथे आल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे पती आणि दोन लहान मुलेही होते. काल ज्ञानोबाची पालखी लोणंदवरून फलटणला जात होती. त्यावेळी मुलांसोबत रस्ता ओलांडत असताना एका ट्रकने त्यांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने या अपघातातून त्यांची दोन्ही मुले बचावली. अपघातामुळे मुलांनी एकच आक्रोश केल्याने वारकरीही संतप्त झाले. काही वारकऱ्यांनी ट्रकचालकाला पकडले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने कोणतीही दुर्देवी घटना घडली नाही. पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात उत्स्फूर्त बंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातही दूध आंदोलनाला उत्स्फूर्त पाठींबा मिळाला. आंदोलनादरम्यान दूध वाहतूक करणारा भारत डेअरीच्या टेम्पोतील दुधाच्या पिशव्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर फेकून दिल्या. तसेच कोगनोळी येथे पेट्रोलपंपावर थांबलेल्या पाच टँकरमधील दूध ओतून देण्यात आले. यात नंदिनी दूध संस्थेचे बेंगळूरहून मुंबईकडे जाणारे चार तर महाराष्ट्रातील एका टँकरचा समावेश आहे. बांबवडेतही टँकरवर दगडफेक करण्यात आली. दरम्यान, दिवसभरात 'गोकुळ'चे तीस टँकर मुंबईकडे बंदोबस्तात रवाना करण्यात आले. १० टँकर टप्प्याटप्याने पाठवण्यात आले. टँकरच्या मागे-पुढे पोलिस वाहने होती. तसेच पोलिसांचे एक वाहन हायवेवर नजर ठेवून होते. कोल्हापूर, सातारा, पुणे पोलिसांनी दूध वाहतुकीला सरंक्षण दिले.

स्वाभीमानी संघटनेने जाहीर केल्यानुसार रविवारी रात्री खासदार राजू शेट्टी यांच्याहस्ते पंढरपुरात नामदेव पायरीवर दुग्धाभिषेक घालून आंदोलनास सुरुवात करण्यात आली. तसेच अंबाबाई मंदिराच्या प्रवेशद्वारात महिलांनी अभिषेक घातला. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गावागावांत ग्रामदेवतांना अभिषेक घालत आंदोलनाची सुरुवात केली. शिरढोण (ता. शिरोळ) येथे दुधाचा टँकर अडवून शेतकऱ्यांनी गरीब कुटुंबांना दूध वाटप केले. सांगली व इचलकरंजी शहरात मोफत दूध वाटप करण्यात आले. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांच्या नेतृत्वाखाली शहरात कनाननगर झोपडपट्टीत दूध वाटप करण्यात आले. तसेच गावागावांत रॅली काढण्यात आल्या. गोकुळने सोमवारी संकलन बंद ठेवले मात्र वारणा संघाने दूध स्वीकारले.

\B'गोकुळ'चे आज संकलन\B

आज, मंगळवारी गोकुळच्यावतीने दूध संकलन सुरु करण्यात येणार आहे. पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी अकरा वाजेपर्यंत दूध डेअऱ्यातील संकलित दूध चिलिंग सेंटरवर आणले जाईल. आंदोलकांनी टेंपो अडवले तर पोलिसांना ताबडतोब कळवण्याच्या सूचना 'गोकुळ'च्या कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

रविवारी संकलन केलेले गोकूळचे दूध पोलिस बंदोबस्तात मुंबईला पाठवण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापुराचा धोका

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तुफान पावसाने सोमवारी जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले. पंचगंगेची वाटचाल धोका पातळीच्या दिशेने वाढत आहे. शहरात पाणी वाढले असून, महापुराचा धोका निर्माण झाला आहे. पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गासह गगनबावडा, मुरगूड मार्गावरील वाहतूक सोमवारी बंद करण्यात आली. कसबा बावडा ते शिये रस्त्यावरही पुराचे पाणी आले मंगळवारपासून हा रस्ताही वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता आहे. पुराचे पाणी शहरातील नागरी वस्तीत शिरु लागल्याने महापालिकेने तेथील नागरिकांना कोणत्याही क्षणी सुरक्षितस्थळी हलवण्याची तयारी केली आहे. जोरदार पावसामुळे गटारी व नाले ओसंडून वाहिल्याने नागाळा पार्क, महावीर गार्डन, शाहूपुरी, लिशां हॉटेल परिसर, राजारामपुरी या परिसरातील जवळपास दीडशे घरांत पाणी शिरले. यात दुकान गाळे, हॉटेल यांचाही समावेश असल्याने मोठे नुकसान झाले. लोक अक्षरश: भीतीच्या छायेत आहेत.

जिल्ह्यातील ३८ रस्ते बंद झाले असून, ७९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील शंभरहून अधिक गावांचा संपर्क अंशत: तुटला असून गगनबावडा तालुक्यातील टेकवाडी गावचा संपर्क तुटला आहे. धरणक्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे राधानगरी धरण ८४ टक्के भरले आहे. ९० टक्क्यानंतर धरणाचे स्वयंचलित दरवाजे केव्हाही उघडू शकतात.

विक्रमनगर येथील नवदुर्गा कॉलनीजवळील रेल्वेमार्गावर प्रथमच पाणी साचले. पूरस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाची दहा पथके सज्ज ठेवली आहेत. हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा तालुक्यांमध्ये पथके पाठवण्यात येणार आहेत.

पंचगंगेसह भोगावती, कुंभी, कासारी, दुधगंगा, वेदगंगा, वारणा, हिरण्यकेशी अशा सर्वच नद्यांची पातळी वाढत आहे. धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरु आहे. राधानगरी ८४ टक्के, दूधगंगा ७५ टक्के तर वारणा ८४ टक्के भरले आहे. कडवी धरण दुपारी भरले असून त्यातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरु झाला आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता असल्याने पूर वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी सायंकाळी सात वाजता पंचगंगेची पातळी ४० फूट आठ इंच होती. शहरात ठिकठिकाणी नाल्याचे पाणी तुंबण्यास सुरुवात झाली. सायंकाळी कसबा बावडा ते शिये पूलदरम्यान एक फूट पाणी आले. पूर वाढल्यास मंगळवारपासून हा मार्गही वाहतुकीसाठी बंद होणार आहे. केर्ली येथील जगबुडी पुलाजवळ पाणी आल्याने रत्नागिरी महामार्ग तर मांडुकली येथे रस्त्यावर पाणी आल्याने गगनबावडा हा मार्ग दुपारपासून बंद करण्यात झाला. निढोरी पुलावर पाणी आल्याने कोल्हापूर ते मुरगूड या महत्वाच्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. दिवसभरात जिल्ह्यात ३३ पडझडीच्या घटना घडल्या. सहा लाख ६१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. नऊ मार्गावरील वाहतूक एसटीने बंद केली आहे. प्रयाग येथील संगमावर पाण्याची पातळी वाढून पाणी रविवारी दत्त मंदिरात शिरले. त्यामुळे वरणगे-पाडळी मार्गे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. वडणगे- कोल्हापूर मार्गावर ठिकठिकाणी पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूकही रात्री बंद होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील मोठ्या धरणांमधून अजून मोठा विसर्ग सुरु झालेला नाही. पण, तुफान पावसामुळे धरणे भरुन लवकरच विसर्ग सुरु होऊ शकतो. त्यामुळे नद्यांच्या पातळीत मोठी वाढ होणार असल्याने पुराचे पाणी पुढे जाण्यासाठी आलमट्टी धरणातून विसर्ग आवश्यक आहे. त्यादृष्टीने सोमवारपासून आलमट्टीतून २५ हजार क्युसेक्स विसर्ग सुरु करण्यात आला.

....

राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे केव्हाही उघडणार

टेकवाडी गावचा संपर्क तुटला

रत्नागिरी, गगनबावडा मार्ग बंद

कसबा बावडा ते शिये रस्त्यावर पाणी

कोल्हापूर ते मुरगूड मार्ग बंद

७९ बंधारे पाण्याखाली

३८ रस्ते बंद

आपत्ती व्यवस्थापनाची दहा पथके सज्ज

९ एसटी मार्ग बंद

....

भिंत कोसळून महिला ठार

हेरलेतील हनुमाननगरात मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून महिला ठार झाली. अन्य तिघे गंभीर जखमी झाले. अनिता रविंद्र काटकर (वय ३७) असे मृत महिलेचे नाव आहे. तर पती रवींद्र बापू काटकर (वय ४६), मुलगा अनिकेत (२०), मुलगी शिवानी (१७) गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमूलचे दूध रोखून दाखवा

0
0

मुंबईत अमूलचे दूध रोखून दाखवा

म. टा. वृत्तसेवा, पन्हाळा

'खासदार राजू शेट्टी यांनी आमचे दूध रोखण्यापेक्षा अमूलचे दूध मुंबईमध्ये रोखून दाखवावे. आम्हीही त्यांच्या सोबत आंदोलन करू' असे आव्हान माजी मंत्री विनय कोरे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध रोको आंदोननाच्या पार्श्वभूमीवर कोरे बोलत होते. काही दिवसांपूर्वी माजी मंत्री कोरे यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून ,दूध पावडर निर्यात आणि अनुदान या वियावर तसेच दूध व्यवसायासमोरील अडचणी मांडल्या होत्या. कोरे यांच्या मागणीवर राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेत काही निर्णय घेतले आहेत.

माजी मंत्री कोरे म्हणाले, 'गाईच्या दुधाला प्रती लिटर ५ रुपये अनुदान थेट दूध उत्पादकाला मिळावं म्हणून राज्यभर स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. आंदोलन हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे , पण ते आंदोलन शांततेच्या मार्गानं व्हावे . दुधाचा दर हा मागणी आणि पुरवठा या तत्वावर ठरतो. काही दिवसांपासून सातत्याने, उत्पादित होणारे गाईचे दूध वाढत असल्याने दुधाचे दर कमी झाले. जर दर चांगला द्यायचा असेल तर गाईच्या दुधाच्या भुकटीचा वापर शालेय पोषण आहारात केला तर बऱ्याच दुधाला बाजारपेठ मिळेल आणि पर्यायानं दुधाला चांगला दर मिळेल. सध्या सुरू असलेले आंदोलन हे शेतकऱ्यांनी उत्पादित केल्याला दुधासाठी, निर्माण केलेल्या दूध संघांविरोधात असून दुसऱ्या राज्यातून आणि अमूलसारख्या मोठ्या ब्रँडचे दूध संघटनेने थांबवून दाखवावे .आम्ही त्यांच्यासोबत आंदोलनामध्ये सामील होऊ.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुरगूडला संततधार पाऊस

0
0

मुरगूड परिसरात संततधार सुरुच

निढोरीजवळ पाणी, मार्ग बंद,बानगे पूलही पाण्याखाली

म.टा.वृत्तसेवा,कागल

गेले आठवडाभर पडत असलेल्या संततधार पावसामुळे वेदगंगा नदीस महापूर आला आहे.आठवड्यापासून मुरगूड परिसरातील वेदगंगा नदीवरील कुरणी,सुरुपली,बस्तवडे, चिखली हे बंधारे पाण्याखाली आहेत.आज मुरगूड मुधाळ तिठ्ठा मार्गावर निढोरीजवळ वेदगंगेचे पाणी आल्याने सकाळी ११ वाजल्यापासून एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे.संध्याकाळपर्यंत या मार्गावर सुमारे तीन फूटांपर्यंत पाणी आले आहे. तर बानगे पुलावरही पाणी आल्याने या मार्गावरील वहातूक बंद झाली. त्यामुळे वेदगंगेच्या उत्तरेकडील सुमारे दहा गावांचा मुरगूडशी संपर्क तुटला आहे.उद्या (दि.१७)सकाळपर्यत मुरगूड-निपाणी मार्गावरील शिंदेवाडी येथेही वेदगंगेच्या पूराचे पाणी येण्याची शक्यता असल्याने मुरगूड-निपाणी मार्गाही उद्या बंद होण्याची शक्यता आहे.नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुरगूड परिसरात गेले आठवडाभर संततधार पाऊस पडत आहे.या पावसामुळे या नदीवरील कुरणी,सुरुपली,बस्तवडे,चिखली बंधाऱ्यावर पाणी आल्याने या मार्गावरील वहातूक पूर्णतः बंद आहे.कालपासून वाढलेल्या पावसामुळे मुरगूड मुधाळ तिठ्ठा मार्गावरील निढोरीजवळ वेदगंगेचे पाणी रस्त्यावर आल्याने वहातूक बंद केली आहे.सकाळी अकरा वाजता सुमारे दीड ते दोन फूट पाणी रस्त्यावर आल्याने एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे.दुपारपर्यंत खाजगी गाड्या धाडसाने या मार्गावरुन चालू होत्या पण रात्री उशिरा पाण्याची पातळी वाढल्याने मुरगूड-मुधाळ तिठ्ठा मार्ग बंद झाला आहे.त्याचबरोबर मुरगूड निपाणी मार्गावरील शिंदेवाडी येथेही उद्यापर्यंत (१७)वेदगंगेचे पाणी येण्याची शक्यता असल्याने हा मार्गही बंद होण्याची शक्यता आहे.

तर आज सकाळीच बानगे पुलावर सुमारे पाच फुट पाणी आल्याने या मार्गावरील वहातूक ठप्प झाली आहे.आज दिवसभर कोसळत असलेल्या पावसामुळे शाळा, महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची उपस्थिती तुरळकच होती.नद्यांना वाढणार्या पाण्यामुळे दुपार नंतर काही शाळा सोडण्यात आल्या.पावसामुळे या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुरगूडसह यमगे, शिंदेवाडी या तीन गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या सर पिराजीराव तलावाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून आज सायकाळपर्यंत या तलावातील पाणी ३२ फुटांवर पोहोचले. सुमारे ३७ फूट पाणी साठा झाल्यावर तलाव पूर्ण क्षमतेने भरतो.आठवड्यापासून नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असल्याने नदीकाठच्या पिके पाण्याखाली गेली आहेत त्यामुळे या पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुक्रवारपासून देशव्यापी चक्काजाम

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

इंधन दरवाढ, टोलची वाढती रक्कम आणि वाहनधारकांना लागू केलेल्या प्राप्तिकराच्या विरोधात शुक्रवारपासून (ता. २०) देशव्यापी चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात मालवाहतुकीसह प्रवासी वाहतूक करणारी वाहने सहभागी होणार आहेत. वाहनधारकांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घ्यायचे नाही, असा निर्धार जिल्ह्यातील वाहनधारकांनी केला. वाहतूकदार संघटनेचे माजी अध्यक्ष प्रकाश गवळी यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. १७) शाहूपुरीत वाहनधारकांचा मेळावा पार पडला.

मेळाव्यात बोलताना गवळी म्हणाले, 'मालवाहूक आणि प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे. वाढते इंधन दर आणि टोलचा भुर्दंड सहन करण्यापलिकडे पोहोचला आहे. यातच थर्ड पार्टी प्रिमियम आणि वाहनधारकांना अन्यायकारक प्राप्तिकर लागू केल्याने हा व्यवसाय धोक्यात आला आहे. वाहन दारात लावून असले तरीही प्राप्तिकरापोटी ठराविक रक्कम भरावी लागणार आहे. सरकारने वाहतुकीच्या धोरणात बदल करावा यासाठी देशातील सर्व वाहनधारक एकवटले आहेत. शुक्रवारपासून संपूर्ण देशात चक्काजाम आंदोलन सुरू होत आहे. यात माल वाहतूकदारांसह प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचाही समावेश आहे. सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्याशिवाय आंदोलन मागे घ्यायचे नाही.' यावेळी कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष भाऊ घोगळे, सचिव हेमंत डिसले, खजानिस प्रकाश केसरकर यांच्यासह किरण पडवळ, विजय भोसले, पंडित कोरगावकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजारामपुरी, शाहूपुरीत नवे रस्ते उखडले

0
0

खडीवरुन गाड्या घसरुन अपघात

कोल्हापूर टाइम्स टीम

शाहूपुरी, राजारामपुरीतील प्रमुख तीन मार्ग गेल्या दोन वर्षात चकाचक करण्यात आले. पण गेल्या चार दिवसांत पडलेल्या पावसामुळे राजारामपुरी बसरुट मार्गावरील नवीन रस्त्यांची खडी उघडी पडल्याने मोटारसायकल घसरुन अपघात होत आहेत. तर शाहूपुरी परिसरातील ड्रेनेज लाइनचे मॅनहोल अपघाताला निमंत्रण देत आहे. राजारामपुरीतील नवीन रस्ते उखडल्याने रस्त्याच्या कामावर केलेला खर्च पावसाच्या पाण्यात वाहून गेला आहे.

राजारामपुरीतील मुख्य गल्ल्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. बसरुट व बालाजी कलेक्शनकडे जाणारा रस्ता दोन वर्षापूर्वी केला होता. राजारामपुरीतील हे तीनही मार्ग अत्यंत सुस्थितीत होते, मात्र गेल्या चार दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसांमुळे रस्त्यांची दैना उडाली आहे. बस रुटच्या दोन्ही मार्गावर खड्डे नसले, तरी रस्त्याच्यावरील लेयरची पूर्णत: खडी वरती आली आहे. दोन्ही मार्गावर पावसाचा पाणी निचरा होण्यासाठी बहुतांशी ठिकाणी गटारीच नसल्याने गटारी तुंबल्याने सर्व पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे नवीन केलेल्या रस्त्यांची दैना तर उडालीच असून या रस्त्यावरुन जाताना मोटारसायकलस्वारांना जीव मुठीत घेवून गाडी चालवावी लागत आहे. तरीही गाडीवरील नियंत्रण सुटत असल्याने मोटारसायकल घसरुन वारंवार अपघात होत आहेत.

बस रुटच्या मुख्य मार्गांची अशी स्थिती असताना इतर पहिल्या गल्लीपासून दहाव्या गल्लीपर्यंतचे सर्व रस्ते उखडून गेले असून अनेकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. राजारामपुरी दुसऱ्या व सातव्या गल्लीत सर्वात मोठे खड्डे पडले असून खड्ड्यात साचलेल्या पाण्यातून मोटारसायकल चालवताना अंदाज येत नसल्याने मोटारसायकल घसरत आहेत. बहुतांशी ठिकाणी वाहनधारकांना डर्क ट्रॅकचा अनुभव घेत आहेत. तर सोमवारी पडलेल्या पावसामुळे राजारामपुरी सिग्नल येथे साचलेले पाणी दुपारपर्यंत साचलेले होते.

शाहूपरी परिसरातील नाइक अँड नाइक कंपनी, शाहूपुरी दुसरी गल्ली व पाचव्या गल्लीत मोठे खड्डे पडले आहेत. दुसऱ्या गल्लीतील कृष्णा नर्सिंग होम जवळ पडलेल्या अनेक खड्ड्यांमुळे वाहनधारक अन्य मार्गाचा वापर करत आहेत. तर पाचव्या गल्लीतील मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठा खड्डा पडला आहे. शाहूपुरीतील इतर रस्त्यांची स्थिती चांगली असली, तरी ड्रेनेज लाइनचे मॅनहोलमुळे अपघात होत आहेत. सांडपाणी ड्रेनेज लाइनला जोडण्यासाठी अनेकठिकाणी चरी खोदल्या आहेत. त्यांची व्यस्थीत डागडुजी केलेली नसल्याने आणि अनेकठिकाणी मॅनहोल रस्त्यापासून वरखाली असल्याने वारंवार अपघात होत आहेत.

शाहूपुरीतील मॅनहोल धोकादायक

शाहूपुरीतील अनेक गल्ल्यांमध्ये ड्रेनेजलाइनचे मॅनहोल रस्त्याच्या वर तर काहीठिकाणी रस्त्याच्या खाली राहिले आहेत. तसेच मॅनहोलचे झाकन तुटलेली आहेत. यामुळे या मार्गावरुन जाताना मोटारसायकलस्वारांना कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फा चारकाही वाहनासह मोटारसायकल पार्किंग असल्याने अरुंद रस्त्यातून मार्ग काढताना आणि मॅनहोल चुकवताना अपघात होऊन वादाचेही प्रसंग उद्भवत आहेत.

अनेकठिकाणी पावसाळ्यापूर्वी सांडपाणी निचरा होण्यासाठी गटारांची स्वच्छता केली नाही. त्यामुळे मोठ्या पावसामध्ये सर्व पाणी रस्त्यावर आल्याने अनेक ठिकाणी बारीक खडी वर येऊन मोटारसायकल घसरत आहेत. विशेषत: बस रुटवर खडी वर आल्याने अनेकजण मोटारसायकल घसरुन जखमी होत आहेत.

हरिश पसारे, राजारामपुरी दुसरी गल्ली, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंगीला घाबरू नका...

0
0

डॉ. वरुण बाफना

कन्स्टिंग रक्तविकार व कर्करोग तज्ज्ञ

पाऊस आलाय थोडं भिजून घ्या, थोडा मातीचा गंध घ्या, थोडा मोराचा छंद घ्या, आलाय पाऊस जरा भजून घ्या... पावसाळ्यात या काव्यपंक्ती आवर्जून आठवतात. पाऊस प्रत्येकालाच हवाहवासा आणि सुखावणारा वाटतो. पावसाळ्यातला आनंद लुटताना तब्ब्येतीची काळजी घेणे गरजेचे असते. आरोग्य चांगले असेल तर निसर्गाशी नाते जुळायला देखील मदत होते. सध्या शहरासह जिल्ह्याला डेंगी नावाच्या भयावह साथीने सुंदरशा पावसाळयात थैमान घातलंय. या संसर्गजन्य रोगाने सगळ्यांना, विशेषत: लहान मुलांच्या पालकांना घाबरवून सोडलंय. तर डेंगी म्हणजे काय? त्यावर प्रतिबंध कसा घालायचा? त्यावर उपचार काय? अवस्था चिंताजनक आहे हे कसे ओळखायचे? चला तर मग माहिती करून घेऊ.

डेंगीची लक्षणे

डेंगी ताप हा एडीस इजिप्ती नावाचा डास चावल्याने होतो. डेंगीचा संसर्ग केवळ दिवसा चावणाऱ्या डासांमुळे होतो. तसेच उच्च आर्द्रता असलेल्या पावसाळ्यात संक्रमणाची शक्यता अधिक वाढते. डास चावल्यानंतर ४ ते १० दिवसांत डेंगीची लक्षणे आढळतात आणि साधारणपणे २ ते ७ दिवस ती टिकतात. डेंगीचा ताप असेल हे ओळखायचे कसे? असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. अतिताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, हाड किंवा स्नायूची वेदना, मळमळ, उलट्या, पुरळ (शरीरावर सर्वसाधारणपणे विस्तृत लाल रंगाचे पुरळ), खाज सुटणे अशी प्राथमिक लक्षणे आढळतात. या आजाराचा सर्वात महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे एकदा ताप येऊन गेल्यानंतर गुंतागुंतीची परिस्थिती उद्भवते. यावेळी रक्तातील हेमेटोक्रिट मूल्यांच्या वाढीसह प्लेटलेट संख्या कमी होत जाते. अशा परिस्थितीत निर्जलीकरणास प्रतिबंध करणे आणि द्रवपदार्थ भरपूर प्रमाणात पिणे आवश्यक आहे. काही लक्षणांवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे डेंगी तीव्र होऊ शकतो. यालाच डेंगी रक्तस्त्रावी ताप असेही म्हणतात.

काही गंभीर लक्षणे

पोटात तीव्र वेदना, सततच्या उलट्या, शरीरातून रक्तस्त्राव होणे (उदा. मलमूत्रातून, रक्ताच्या उलट्या), श्वासोश्वासाची गती अनैसर्गिकपणे वाढणे, थकवा, बेचैनी जाणवणे.

काय घ्यावेत उपचार

डेंगी तापावर सध्या कोणतीही लस किंवा विशिष्ट असे औषध उपलब्ध नाही. रोगसूचक उपचारांनाच प्राधान्य असते. याकाळात रुग्णांनी लगेच वैद्यकीय सल्ला घ्यावा, आराम करावा. तसेच भरपूर प्रमाणात द्रव पदार्थाचे सेवन करावे. अस्पीरीन, इब्युप्रोफेन सारखी औषधे कटाक्षाने टाळली पाहिजे, कारण यामुळे रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो. तसेच डॉक्टरांच्या निरिक्षण अंतर्गत हेमेटोक्रिट आणि प्लेटलेट संख्येकडे लक्ष असणे महत्त्वपूर्ण ठरते. काही प्रकरणांमध्ये प्लेटलेट चढवणे गरजेचे ठरते. योग्य वैद्यकीय निगा आणि लवकर लक्षणे ओळखल्याने धोका कमी होतो.

रुग्ण आणि नातेवाइकांनी काय केले पाहिजे?

डेंगी असल्याची शंका निर्माण झाल्यास भीती न बाळगता सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नातेवाइकांनी, कुटुंबीयांनी अशा रुग्णास भरपूर द्रव पिण्यास द्यावे, शरीरातून लघवीमार्गे रक्तस्त्राव होते आहे का याकडे लक्ष द्यावे. निदान करण्यासाठी त्वरित रक्त तपासणीचा आग्रह धरावा.

अशी घ्या काळजी

डासांच्या अंडी घालण्याची ठिकाणे नष्ट करणे महत्त्वाचा पर्याय आहे. पाणी साठवण्याची टाकी (घरगुती पेयजल, स्नानगृह इ.), प्लॅस्टिक कंटेनर, बाहेर टाकलेल्या बाटल्या, टिनस्, टाकलेले टायर, कृत्रिम कंटेनर, खड्डे, बांधकाम साइट, पावसाचे पाणी गोळा करण्यासाठीचे ड्रम यात डास अंडी घालत असल्याने अशा ठिकाणी पाणी साठून राहणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. स्वत:ला डास चावणार नाहीत यासाठी लांब बाही असलेले कपडे घालणे. डासांना पळवून लावण्यासाठी काही मॉस्किटो कॉइल्स मिळतात त्याचा वापर करणे. संध्याकाळीच्या वेळेत घराचे दरवाजे व दारे खिडक्या बंद कराव्यात. प्रतिबंधात्मक उपायांसोबत लोकांचा सामूहिक सहभाग डेंगीला हरवू शकतो

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बालकल्याण’ मधीलचार मुले पळाली

0
0

कोल्हापूर

मंगळवार पेठेतील डॉ. सर्वपल्ली निरीक्षणगृह बालगृहातील चार मुले खिडकीचे गज वाकवून पळाली. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. याबाबत गणपती कांबळे (वय ६०, रा. शिंगणापूर) यांनी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली. बालकल्याण संकुल इमारतीच्या सुमारे पन्नास फूट उंचीवरून चादर बांधून हे चौघेजण खाली उतरले. सुरक्षारक्षकांची नजर चुकवून त्यांनी पलायन केले. शाहीद असिफ पठाण (वय १३, रा. सायरा गल्ली, रणापूर. जि. लातूर), अनुराध लक्ष्मण बिरजे (वय १७, रा. शिनोळी, ता. चंदगड), आदर्श शेखर जर्मनी (वय १७, रा.कबनूर, ता. हातकणंगले), शुभम संजय घाटगे (वय १७, रा. देवाळे, ता. पन्हाळा) अशी त्यांची नावे आहेत. यापूर्वीही हे चौघेजण तीन ते चारवेळा बालकल्याण संकुलातून पळून गेले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात ५० मार्गांवर पाणी

0
0

जिल्ह्यात ५० मार्गांवर पाणी

वाहतूक विस्कळीत, एसटीच्या फेऱ्यांवर परिणाम

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या आठवड्याभरातील जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील ५० मार्ग पाण्याखाली गेले आहेत. यात रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासह कोकणात जाणाऱ्या गगनबावडा या राज्य मार्गाचाही समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासह जिल्हा परिषदेकडील २० जिल्हा मार्ग बंद आहेत. याचा परिणाम वाहतुकीवर झाला असून, एसटी प्रशासनाने अनेक ठिकाणी वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवली आहे.

जिल्ह्यात गेल्या चार दिवसात पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी शहरात काही प्रमाणात जोर कमी झाला असला तरी, धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे. पंचगंगा नदी धोका पातळीवर आहे, तर इतरही नद्या पात्राबाहेर पडल्याने नद्यांच्या काठांवरील शेती पाण्याखाली गेली आहे. जिल्ह्यातील १२३ बंधाऱ्यांपैकी ८५ बंधारे पाण्याखाली आले आहेत. रस्त्यांवर सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कोल्हापूर-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावर रजपूतवाडीजवळ पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीला बंद केला आहे. शाहूवाडीकडून येणारी वाहतूक बोरपाडळेमार्गे पुणे-बेंगळुरू महामार्गावर वळवली. रत्नागिरीकडे जाणारी वाहतूकही बारपाडळेमार्गे सुरू आहे. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या आदेशाने शिवाजी पुलावरील वाहतूक बंद केली असून, या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर टेकवाडीजवळ पाणी आल्याने कोकणात उतरणारा हा महत्त्वाचा मार्ग बंद आहे. गगनबावडामार्गे कोल्हापूरला येणारी वाहतूक राधानगरीमार्गे वळवण्यात आली आहे. कळे येथे पाणी आल्याने बाजारभोगावला जाणारी वाहतूक बंद आहे. भडगाव पुलावर पाणी असल्याने गडहिंग्लजमधून नेसरी, चंदगडला जाणारी वाहतूक आजरामार्गे वळवली आहे. चंदगड ते आजरा मार्गावरील वाहतूक दोन्हीकडून गवसे पुलापर्यंत सुरू आहे. कुरुंदवाड डेपोतून जाणाऱ्या पणजी आणि खारेपाटण या गाड्या रद्द केल्या आहेत, तर कागल ते इचलकरंजी मार्गावरील दोन्हीकडील वाहतूक हुपरीपर्यंत सुरू आहे. पणजी आणि खारेपाटण येथे जाणाऱ्या बस वगळता इतर सर्व बस फेऱ्या अंशत: आणि पर्यायी मार्गाने सुरू असल्याची माहिती एसटीचे सांख्यिकी अधिकारी एस. एस. कुमठेकर यांनी दिली. पर्यायी मार्गाने वाहतूक वळवल्याने प्रवाशांची सोय झाली असली तरी, आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

चौकट

गगनबावडा डेपोला सर्वाधिक फटका

गगनबावडा डेपोतून कोल्हापूर आणि कोकण या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. टेकवाडीजवळ रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णत: बंद आहे. गगनबावडा तालुक्यात अंतर्गत मार्गही पाण्याखाली आहेत, त्यामुळे या डेपोतील ९० टक्के बससेवा बंद आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

चौकट

पाण्याखालील मार्ग

सार्वजनिक बांधकाम विभागाकडील मार्ग

राष्ट्रीय महामार्ग - १

राज्य मार्ग - ९

प्रमुख जिल्हा मार्ग - १४

जिल्हा परिषदेकडील मार्ग

ग्रामीण मार्ग - ११

इतर जिल्हा मार्ग - १५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळप्रश्नी बैठक लांबणीवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर विमानतळावरील सुविधांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी आयोजित केलेली बैठक लांबणीवर पडली आहे. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार आणि विमानतळ प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक विमानतळावर होणार होती. मात्र, जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्हाधिकारी पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी शिरोळ येथे गेल्याने बैठक पुढे ढकलण्यात आली.

या बैठकीत विमानतळावरील सध्याच्या सुविधा, एअर डेक्कन कंपनीकडून खंडित झालेली विमानसेवा, विमानतळाचे विस्तारीकरण, आरक्षित जागेचा जाबा घेणे आणि प्रस्तावित इमारतींच्या कामाबाबत चर्चा होणार होती. बैठक लांबणीवर पडल्याने या कामांचा आढावा पुढील बैठकीत घेतला जाणार आहे. दरम्यान, एअर डेक्कन कंपनीने सुरू केलेली कोल्हापूर-मुंबई प्रवासी विमानसेवा अवघ्या दोन महिन्यातच खंडित झाल्याने लोकप्रतिनिधींनी विमानसेवा पूर्ववत सुरू करण्याचा आग्रह धरला आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्याबाबत एअर डेक्कन कंपनीला सूचना देण्याची विनंती केली होती. यानुसार कंपनीने मागील आठवड्यात विमान सेवा सुरू करण्याचे जाहीर केले. मात्र, पावसाचे कारण पुढे करून विमानसेवेला ब्रेक लावला. आश्वासनानंतर दोन आठवडे उलटूनही विमानसेवा सुरू नसल्याने याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. कंपनी बदलून विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऐच्छिक निधीची कामे मार्गी लागणार

0
0

निविदा प्रक्रिया त्वरीत राबवण्याच्या आयुक्तांच्या सूचना

महापालिका लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अर्थसंकल्पामध्ये मंजूर केलेली नगरसेवकांची ऐच्छिक कामे लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. नगरसेवकांनी सुचवलेल्या कामांचे अंदाजपत्रक तयार करुन त्वरीत निविदा प्रक्रिया राबवण्याच्या सूचना आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगळवारी केल्या आहेत. ३१ जुलैपर्यंत विकासकामांची यादी वॉर्ड ऑफिसकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

नगरसेवकांना जिल्हा नियोजन समिती, सरकारी अनुदान याबरोबर ऐच्छिक निधीतून विकासकामे करता येतात. नगरसेवकांना दरवर्षी प्रत्येकी सात लाख प्रमाणे १२५ कोटीच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पासह इतर प्रकारच्या निधीतून केली जाते. अर्थसंकल्पामध्ये तरतूद करुनही कामे होत नसल्याची तक्रार नेहमीच नगरसेवकांकडून केली जाते. सर्वसाधारण सभेत तर ऐच्छिक निधीवरुन प्रशासन व नगरसेवकांमध्ये नेहमीच जुंपते.

प्रभागात वेळेत विकासकामे होत नसल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यामुळे नगरसेवक हा निधी मिळवण्यासाठी प्रशासनावर दबाव निर्माण करतात. पण प्रशासनाकडून योग्य वेळी निधी मिळत नसल्याची तक्रार वारंवार केली जाते. निविदा प्रक्रिया त्वरीत राबवली जात नसल्याने कामास विलंब लागतो. त्यामुळे प्रशासनाविरोधात नेहमीच नगरसेवक आक्रमक होतात.

अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेला निधी नगरसेवकांना त्वरित मिळण्यासाठी आता आयुक्तांनी त्यांनी सुचवलेल्या कामांचे अंदाजपत्रक तयार करुन एका महिन्याच्या आत निविदा प्रक्रिया राबवण्याचा सूचना देत मंजुरीप्रमाणे कामे तत्काळ करुन अहवाल पाठवण्याच्या सूचना नियंत्रण अधिकारी, शहर अभियंता व सर्व उपशहर अभियंता यांना दिल्या आहेत. प्रत्येक प्रभागनिहाय करण्यात येणाऱ्या कामांची यादी ३१ जुलैपर्यंत वॉर्ड ऑफिसकडे सादर कराण्याच्या सूचना आयुक्त डॉ. चौधरी यांनी दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडपीठ जागेच्या प्रस्तावात १५ त्रुटी

0
0

विभागीय आयुक्त कार्यालयाचे जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या जागेसाठी शेंडा पार्कातील ७५ एकर जागा मिळावी, असा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्त कार्यालयात पाठवला होता. या प्रस्तावात १५ त्रुटी काढल्या असून, मंगळवारी त्रुटींचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळाले. त्रुटींची पूर्तता करून आवश्यक त्या कागदपत्रांसह पुन्हा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश विभागीय उपआयुक्त प्रताप जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास दिले आहेत.

कोल्हापुरातील खंडपीठाच्या इमारतीसाठी खंडपीठ कृती समितीने शेंडा पार्कातील ७५ एकर जागेची मागणी केली होती. यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागेचा प्रस्ताव मागवण्याचे आदेश दिले होते. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने जागेचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयात पाठवला होता. या प्रस्तावात विभागीय आयुक्त कार्यालयाने १५ त्रुटी काढल्या आहेत. त्रुटींचे पत्र मंगळवारी (ता. १७) कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयास मिळाले. जागा आरक्षित करण्यासाठी विधी व न्याय विभागाच्या प्रशासकीय मान्यतेचे पत्र, मागणी केलेल्या जमिनीचे गट नंबर, एकूण क्षेत्र यांची सविस्तर माहिती, संबंधित स्थानिक खात्यांचे अभिप्राय, मोजणी नकाशा, महापालिकेचा अभिप्राय, जागेचा पंचनामा, यापूर्वी मागणी केलेल्या कार्यालयांच्या प्रस्तावांची सध्यस्थिती, शहर विकास आराखड्यातील आरक्षणाची स्थिती, आदी १५ त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव पाठवावा, असे आदेश विभागीय उपआयुक्त जाधव यांनी दिले आहेत.

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत चिटणीस यांनी सोमवारी शिष्टमंडळासह विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांची भेट घेतली होती. यावेळी म्हैसेकर यांनी जागेच्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. त्याच दिवशी त्यांनी त्रुटींचे पत्र कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयास रवाना केल्याने खंडपीठासाठी जागा अरक्षित करण्याच्या कामाला गती आल्याचे मत बार असोसिएशनचे अध्यक्ष चिटणीस यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारत राखीव बटालीयनच्या डीवायएसपीसह सहाजणांना अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारत राखीव बटालियनधील खेळाडू कर्मचाऱ्यांना हजेरीत सूट देण्यासह अन्य सवलती देण्यासाठी चाळीस हजाराची लाच घेताना भारत राखीव बटालियनच्या कसबा बावडा येथील कार्यालयात उपअधीक्षकासह निरीक्षक, दोन उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल आणि लिपिक अशा सहाजणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात पकडले. बटालियनची टीमच जाळ्यात सापडल्याने एकच खळबळ उडाली. सहायक समादेशक (पोलिस उपअधीक्षक) मनोहर नारायण गवळी (वय ५८, रा. शिवाजी चौक, टेंबलाईवाडी, कोल्हापूर, मूळ गाव बसरगे, गडहिंग्लज), पोलिस निरीक्षक मधू श्रीपती सकट (५६, निपाणी, लिंबगाव, पोस्ट, माळी, चिंचोरे, ता. नेवासा, जि. अहमदनगर, ( सध्या एसआरपी कॅम्प, कसबा बावडा), लेखनिक-सहायक फौजदार रमेश शिरगुप्पे (वय ३३, संभाजीपूर, शिरोळ), हजेरी मास्तर आनंदा महादेव पाटील (३६, रा. बस्तवडे, ता. कागल), लिपिक राजकुमार रामचंद्र जाधव (५३, लखनापूर, चिकोडी, जि. बेळगांव, सध्या रा. प्रिन्स शिवाजीनगर कसबा बावडा), पोलिस शिपाई प्रवीण प्रधान कोळी ( २८, रा. अब्दुललाट, ता. शिरोळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

बटालियनमध्ये सहायक फौजदार असलेल्या एका खेळाडूने 'लाचलुचपत प्रतिबंधक'कडे तक्रार दिली होती.

हजेरी मास्तर आनंदा पाटीलने ऑगस्टमध्ये होणाऱ्या विभागांतर्गत क्रीडा स्पर्धेच्या सरावासाठी आलेल्या २३ खेळाडूंना त्रास देणार नाही, बंदोबस्त देणार नाही, असे सांगितले होते. त्यासाठी प्रत्येकी ५ हजाराची लाच मागितली. हे पैसे वरिष्ठांपर्यंत द्यावे लागतात, असे सांगून तत्काळ रक्कम देण्यासाठी तगादा लावला. काहींनी पैसे दिले. आठ खेळाडूंनी पैसे दिले नव्हते. त्यामुळे पाटीलने तक्रारदारास सर्वांकडून रक्कम जमा करून द्यायला सांगितले. तक्रारदाराला कर्मचारी पतसंस्थेतून लाखाचे कर्ज मंजूर करून देण्यासाठी संस्थेचा पदाधिकारी, सहायक फौजदार शिरगुप्पेने ५ हजार रूपये मागितले होते. लिपिक राजकुमार जाधवने खेळाडूंच्या दैनंदिन सराव भत्याची रक्कम काढून घेण्यासाठीही लाच मागितली होती. या सर्वांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार सापळा रचला आणि सर्वांना रंगेहात पकडले.

शिपाई रक्कम भरण्यासाठी बाहेर पडला अन्

१६ जुलै रोजी दिलेल्या तक्रारीची पंचांनी खात्री करून घेतली. सोमवारी कार्यालय बंद झाल्याने मंगळवारी सापळा रचण्यात आला. सहायक फौजदार आनंदा पाटीलकडे ४० हजाराची रक्कम देण्यात आली. त्याने वरिष्ठांशी संपर्क साधून कल्पना दिली. शिरगुप्पेने त्यातील २ हजार रूपये काढून घेतले. उर्वरित ३ हजार नंतर देणार असल्याचे सांगितले. त्यानुसार सर्वांच्या मागणीनुसार प्रत्येकाने आपापली रक्कम काढून घेतली. उर्वरित २७ हजारांची रक्कम बँकेतून ट्रान्स्फर करण्यासाठी शिपाई प्रवीण कोळीकडे देण्यात आली. कोळी ही रक्कम कार्यालयाबाहेर घेऊन जात असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडले. या सर्वांना त्यांनी घेतलेल्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर नागरी बँकांचा कारभार विस्कळीत

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांवर स्वतंत्र व्यवस्थापन मंडळ नेमण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे दोन सत्ताकेंद्रे निर्माण होऊन कारभार विस्कळीत होण्याची भीती आहे. असे झाल्यास नागरी बँकांचा कारभार विस्कळीत होईल. सहकारी बँकांमध्ये व्यावसायिकता आणण्यासाठी तज्ज्ञांचे स्वतंत्र संचालक मंडळ नेमण्याचा रिझर्व्ह बँकेचा हेतू आहे. त्यापेक्षा संचालक मंडळात किमान पाच तज्ज्ञ व्यक्ती घ्यावेत आणि व्यवस्थापक मंडळाचा त्यांनी आग्रह धरू नये,' असे मत राज्य फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील नागरी बँकांतर्फे आयोजित विचारविनिमय बैठकीत ते बोलत होते. बैठक ताराराणी चौकातील श्री वीरशैव सहकारी बँकेच्या कार्यालयात पार पडली.

अनास्कर म्हणाले, 'सामूहिक गरजेतून सहकारी बँका निर्माण झाल्या आहेत. त्याचे मालक सभासद असतात. स्वतंत्र व्यवस्थापन मंडळ नेमण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या प्रस्तावाला सहकार क्षेत्रातून मोठा विरोध होत आहे. एकाचवेळी दोन सत्ताकेंद्रे असतील तर प्रशासनातील विसंवाद वाढण्याचा धोका निर्माण होईल. त्यामुळे नागरी बँकाच्या दैनंदिन कारभारावर त्याचे विपरीत परिणाम होतील.'

'नागरी बँकांनी मालेगम समिती व आर. गांधी समिती या दोन्ही अहवालांना तीव्र विरोध केल्याचे सांगून अनास्कर म्हणाले, 'स्वतंत्र व्यवस्थापन मंडळ नेमण्याऐवजी संचालक मंडळातच तज्ज्ञ मंडळींसाठी राखीव जागा ठेवण्याची तयारीही दर्शवली होती. एकाच बँकेत संचालक मंडळ व व्यवस्थापकीय मंडळ असणे व्यवहार्य ठरणार नाही. त्यामुळे विसंवाद वाढून त्याचा बँकांच्या व्यवसायावर परिणाम होईल तसेच व्यवस्थापन मंडळातील सदस्यांची नेमणूक संचालक मंडळ करणार असल्याने मर्जीतील व्यक्तींनाच प्राधान्य दिले जाईल.'

माजी मंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, 'राष्ट्रीयीकृत बँकांत तज्ज्ञ संचालक असतात. तरीही तेथे हजारो कोटींचे घाटाळे होतात. सहकारी बँकांचा देशपातळीवरील अर्थक्षेत्रात अत्यल्प वाटा असला तरी सरकारी बँकांपेक्षा काम चांगले आहे. एनपीए कमी आहे. याचा अर्थ आमचे संचालक व्यावसायिक आहेत.'

जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनचे अध्यक्ष निपुण कोरे म्हणाले, 'ज्या बँका व्यवस्थापक मंडळ नेमणार नाहीत त्यांना कार्यविस्तार, शाखाविस्तारास परवानगी मिळणार नाही त्यामुळे बँकांचा विकास व प्रगती थांबणार आहे. अशा प्रकारच्या जाचक अटी लावणे सहकारी व लोकशाही तत्त्वाविरुद्ध आहे. सध्या सहकारी बँका व्यापारी बँकांपेक्षा चांगले काम करत आहेत. व्यापारी बँकातील घोटाळे रोज उघडकीस येत आहेत. सरकार सहकारी बँकांना कोणतीही आर्थिक मदत करत नाहीत त्या केवळ सभासदांच्या भांडवलावर आणि नफ्यातून जमवलेल्या गंगाजळीवर उभ्या आहेत. सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सहकारी बँका टिकणे गरजेचे आहे.'

इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन प्रकाश आवाडे, सांगली, सातारा, सोलापूर असोसिएशनचे पदाधिकारी सुधीर जाधव, हणमंत पाटील, राजकुमार झंवर यांनी मनोगते व्यक्त करत बैठकीत झालेल्या निर्णयाला पाठिंबा दिला. यावेळी. यावेळी वीरशैव बँकेचे चेअरमन डॉ. दिलीप चौगुले तसेच बँक्स असोसिएशनचे संचालक, अनेक बँकांचे चेअरमन, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. बँक असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंकरराव मांगलेकर यांनी सूत्रसंचालन केले. बँक असोसिएशनचे नॅफकॅबचे संचालक अशोक सौंदत्तीकर यांनी आभार मानले.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बटालियनची लाचखोर टीम जाळ्यात

0
0

डीवायएसपी जाळ्यात सापडल्याची पहिलीची घटना

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बटालियनमधील शिपायापासून ते कमाडंटपर्यंत पैसे द्यावे लागतात. प्रत्येकाचा हिस्सा ठरलेला आहे. ठरलेले पैसे न दिल्यास सर्वांनाच निलंबित केले जाणार असल्याची धमकी देणारी भारत राखीव बटालियनची कोल्हापूरची टीम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात मंगळवारी रंगेहाथ सापडली. लाच घेताना डीवायएसपी दर्जाचा अधिकारी सापडल्याची ही पहिलीच घटना आहे. कसबा बावडा येथील बटालियन क्रमांक तीनच्या कार्यालयात सोमवारी लाच घेणार असल्याची खात्री करून मंगळवारी कारवाई झाली. लाच प्रकरणातील ४० हजारांपैकी उर्वरित २७ हजार रूपये ट्रान्स्फर करण्यात येणाऱ्या बँक अकाउंटटची चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणी बटालियनचे कमाडंट खुशाल सपकाळ यांच्या भूमिकेसंदर्भात कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

निलंबन करण्याची धमकी देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात २१ खेळाडूंनी सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. मोठ्या संख्येने खेळाडूंनी तक्रार दाखल करण्याची पहिलीच वेळ असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले. शिपायांपासून ते डीवायएसपीपर्यंत लाच घेणार असल्याची शहानिशा सोमवारी (ता. १६) सकाळपासून सुरू करण्यात आली. त्यासाठी शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यंत दूरध्वनीवरून झालेले संभाषणाचे रेकॉर्ड करण्यात आले. प्रत्यक्षात लाच प्रकरणाची अधिकारीही सहभागी असल्याची खात्री करण्यात आली. पंचांसमक्ष त्याची नोंद करण्यात आली. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता प्रत्यक्षात हा सापळा रचण्यात आला. पंच साक्षीदारांसह तक्रारदार या कार्यालयात गेले. त्यांच्याकडून हजेरी मेजर आनंदा पाटील याने लाच स्वीकारली. ठरल्याप्रमाणे लिपिक सहायक फौजदार शिरगुप्पे याला दोन हजार रूपये दिले. सहायक समादेशक गवळी याला २ हजार रूपये, लिपिक जाधव याला २ हजार रूपये दिले. त्यानंतर हजेरी मेजर आनंदा पाटील याने कमाडंट सपकाळ यांना दूरध्वनीवरून तक्रारदारासंदर्भात बोलणे करून दिले. सपकाळ यांचेही संबधित व्यक्तिसोबत संभाषण झाले. त्यानुसार मेजर पाटील याने ठरल्यानुसार लाचेची रक्कम कमाडंट सपकाळ यांच्या खासगी व्यक्तीच्या अकाउंटवर भरण्यासाठी २७ हजार रूपये पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण कोळी यांच्याकडे दिले. कोळी कार्यालयातून बाहेर पडताच लाचलुचपत विभागाने तत्काळ कारवाई केली. हजेरी मेजर पाटील याने सहायक समादेशक गवळी, कमाडंट खुशाल सपकाळ, पोलिस निरीक्षक सकट यांच्यासाठी आठ जवानांकडून प्रत्येक पाच हजार रूपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. निरीक्षक सकट यांनीही सांकेतिक भाषेत लाचेच्या मागणीस दुजोरा दिला. सहायक गवळी याने अन्य सहकाऱ्यांना पैसे देऊन माझे वैयक्तिक पैसे द्यावे लागतील, अशी मागणी केल्याचे स्पष्ट झाले. लाच घेतलेल्या चाळीस हजार रूपयांच्या नोटांना अंथ्रासीन पावडर लावण्यात आली. प्रत्येकाने घेतलेली लाच ही रंगेहाथ पकडण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील, सहायक फौजदार शाम बुचडे, पोलिस हवालदार मनोज खोत, पोलिस नाईक शरद पोरे, नवनाथ कद, पोलिस कॉन्स्टेबल रूपेश माने, मयूर देसाई यांनी कारवााईत सहभाग घेतला.

संशयितांच्या घरांची झडती सुरू

लाचप्रकरणी सापडलेल्या संशयितांच्या घराची झडती सुरू केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यासाठी सातारा आणि सांगली येथून जादा कर्मचारी मागविले आहेत. डीवायएसपी गवळी याच्या टेंबलाईवाडीतील शिवाजी चौक येथील, सकट याच्या कसबा बावडा येथील एसआरपी कॅम्प, शिरोळ (संभाजीपूर) येथील सहायक फौजदार रमेश शिरगुप्पे, हजेरी मेजर आनंदा पाटील याच्या (बस्तवडे, ता. कागल), लिपिक राजकुमार जाधव याच्या कसबा बावडा येथील प्रिन्स शिवाजीनगर आणि शिपाई प्रवीण कोळी याच्या अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील घराची झडती सुरू केली आहे.

खोटा अहवाल पाठविण्याची धमकी

खेळाडूंनी पैसे न दिल्यास बंदोबस्तासाठी पाठविले जाईल. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न केल्यास खोटा अहवाल पाठविला जाऊन सर्वांना निलंबित केले जाईल. त्यासाठी प्रत्येकाने पाच हजार रूपये द्यावेत. आठ जवानांचे पाच हजार रूपये प्रमाणे ४० हजार रूपये जमा करून देण्याची जबाबदारी हजेरी मेजर पाटील याच्याकडे सोपविली होती. ज्या जवानांनी पैसे दिले नव्हते, त्यांना मेजर पाटील आणि पोलिस निरीक्षक सकट यांनी त्रास देण्यास सुरूवात केली होती. रविवारी सुट्टीच्या दिवशीही सरावासाठी बोलविले होते. एसआरपीफ सोसायटीकडून कर्जासाठीही सहायक फौजदार शिरगुप्पे याने पाच हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. नियमित १७५ रूपये भत्ता वाटपासाठी प्रत्येकी दोन हजार रूपयांची मागणी केली. हे सर्व जमा होणारे पैसे कमांडट खुशाल सपकाळ यांनाही द्यावे लागणार असल्याचे खेळाडूंना सांगितले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images