Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

​‘नॅक’साठी लगीनघाई!!

$
0
0
‘इमारतींना रंगरंगोटी, पायाभूत सुविधांची पूर्तता, ग्रंथालय-जिमखान्याला दिला जाणारा नवा लूक, प्रत्येक डिपार्टमेंटचा अद्ययावत प्रोफाइल आ​णि प्राध्यापकांना अपडेट राहण्याच्या सूचना अशी लगीनघाई आता कॉलेज कॅम्पसमध्ये ‌दिसू लागेल.

संपत्तीच्या वादातून वडिलांचा खून?

$
0
0
मालगाव (ता. मिरज) येथील भाऊसाहेब दत्तू जाधव (वय ६०) या शेतकऱ्याचा डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून खून करण्यात आला. मालगाव-मल्लेवाडी रस्त्यावर भाऊसाहेब जाधव यांची सहा एकर शेती आहे.

होमिओपॅथिक डॉक्टर आज संपावर

$
0
0
राज्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील होमिओपॅथिक डॉक्टर्स सोमवारी एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर जाणार असून, या दिवशी सातारा जिल्ह्यातील सर्व होमिओपॅथिक डॉक्टर्स आपले दवाखाने बंद ठेवणार आहेत, अशी माहिती सातारा जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स असोशिएशनतर्फे डॉ. जयदीप चव्हाण यांनी दिली.

श्री व कृष्णा हॉस्पिटलचा ‘जीवनदायी’साठी समावेश

$
0
0
अत्यल्प उत्पन्नामुळे महागड्या आरोग्य सेवा घेणे अशक्य असलेल्या पेशंट्ससाठी राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने’साठी कराडच्या श्री व कृष्णा हॉस्पिटलची निवड करण्यात आली आहे. या योजनेमुळे सर्व सामान्य पेशंट्सना दिलासा मिळाला आहे.

महावीर मंदिरातून ५.७५ लाखांची चोरी

$
0
0
सांगलीतील महावीर स्वामी मंदिरातील पावणेसहा लाख रुपयांचा ऐवज चौघांनी लुटल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. मंदिराचा पुजारी विजय आण्णाप्पा कुंभार (वय २५, वाठार, ता. हातकणंगले) यांचे हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबून त्यांना एका पोत्यात घालून ठेवल्याचे मंदिराच्या ट्रस्टींना दिसल्यानंतर चोरीचा प्रकार समोर आला.

कदम घेणार कारभाराचा आढावा

$
0
0
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेतील सत्ताधाऱ्यांमध्ये भ्रष्टाचाराचे कलगीतुरे सुरू झाल्याने सत्तेत ‘आनंदी आनंदच दिसत आहे,’ अशी टिप्पणी करीत पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सोमवारी महापालिका बैठकीत कारभाराचा आढावा घेणार असल्याचे सांगितले.

‘विरोधाला विरोध ही आमची संस्कृती नव्हे’

$
0
0
कागल तालुक्यात विरोधाला विरोध करण्याची संस्कृती हसन मुश्रीफांचीच आहे. आमची कधीच नव्हती आणि नाही. मुश्रीफांची याबाबतीत उदाहरणे द्यायची झाली तर वृत्तपत्रांचे रकाने भरतील पण उदाहरणे संपणार नाहीत, असा टोला आज माजी आमदार संजय घाटगे यांनी व्हन्नाळी (ता.कागल) येथील पत्रकार परिषदेत लगावला.

गाताडे यांचा मार्ग मोकळा

$
0
0
येथील नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार विलास गाताडे यांनी दाखल केलेला अर्ज रद्द करावा अशी मागणी करणारी राष्ट्रवादी काँग्रेसचे विठ्ठल चोपडे यांची याचिका जिल्हा न्यायाधीश ए. ए. शहापुरे यांनी फेटाळली. त्यामुळे गाताडे यांची उमेदवारी अबाधित राहिली आहे.

कारिवडेची तरुणी बेपता

$
0
0
कारिवडे (ता. भुदरगड) येथील देवयानी भीमराव हानफोडे (वय १८) ही कॉलेज तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार चुलते विजय गोंदू हानफोडे यांनी भुदरगड पोलिसात दिली आहे. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी मामाच्या गावी गारगोटी येथे जाते असे सांगून, देवयानी घरातून निघून गेली.

शास्त्रोक्त ज्ञान नसल्यानेच अणुप्रकल्पांना विरोध

$
0
0
अणुऊर्जा म्हणजे काय? त्याचे महत्व किती आणि धोका किती व कोणाला याबाबत कोणतेही शास्त्रोक्त ज्ञान नसणारेच जैतापूरसीरख्या प्रकल्पांना विरोध करीत आहेत. अशा प्रकल्पांना नेमका विरोध का व कशासाठी याबाबत काहीच न सांगणारी अशी आंदोलने केवळ पैसे उकळण्यासाठीच केली जात असल्याचे प्रतिपादन जेष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांनी आजरा येथे केले.

२० रिक्षांवर आरटीओची कारवाई

$
0
0
जिल्हा प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने आज शहर व परिसरात दोन पथकांच्याने बेकायदेशीर२० रिक्षांवर कारवाई करुन १६ रिक्षा जप्त केल्या. विना परवाना, खासगी रिक्षातून अवैध वाहतूक, घरगुती गॅसचा वापर करणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्याची मागणी येथील रिक्षा संघटनांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविण्यात आली.

टोळ्यांना मोबाइल टॉयलेट द्या

$
0
0
ऊस तोडणी कामगारांना शौचालयाची सुविधा नसल्यास उघड्यावर शौचास बसल्याने पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. दूषित पाण्यामुळे आरोग्य विषयक समस्या निर्माण होतात. त्यामुळे ऊस तोडणी कामगारांच्या ​आरोग्याची काळजी करताना त्यांच्यासाठी शौचालयाची व्यवस्था करावी, असे जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील साखर कारखान्यांना कळविले आहे.

प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करा

$
0
0
पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासंदर्भात येत्या १० दिवसांत कायमस्वरुपी उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा देत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यधिकारी सुनील पवार यांना धारेवर धरले.

पाणी टंचाई हे राज्यकर्त्यांचे पाप

$
0
0
म्हासुर्ली-धामणी खोऱ्यातील पाण्याची तीव्र टंचाई राज्यकर्त्यांचे पाप आहे. हा पाणी प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी यापुढे येथील जनतेनेच पुढे आले पाहिजे, असे प्र‌तिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केले.

शेतकऱ्यांना लुटणा-यांना बेड्या घालू

$
0
0
ज्यांनी ज्यांनी शेतकऱ्यांना लुटले त्यांच्या हातात बेड्या घातल्याशिवाय राहणार नाही. माझे आंदोलन शेतकऱ्यांची ताकद वाढविण्यासाठी आहे, निवडणुकीसाठी नाही. साखर कारखाने जास्त दिवस बंद ठेवणे अशक्य आहे. त्यामुळे आंदोलनाला मर्यादा आल्या, अशी कबुली देतानाच खासदार राजू शेट्टी‌ यांनी कारखानदारांवर टीका केली.

‘कोंडी फुटल्यानेच मुश्रीफांना पोटशूळ’

$
0
0
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन खासदार सदाशिव मंडलिक यांनी पुढाकार घेऊन शेट्टी यांच्याशी चर्चा करून ‘हमीदवाडा’ साखर कारखान्याकडून पहिली उचल २६५०रुपये जाहीर करून आंदोलनाची कोंडी फोडली.

पवारांची भागीदारी सिद्ध करा

$
0
0
रेणुका शुगर्समध्ये कृषीमंत्री शरद पवार यांची भागीदारी आहे असे सांगणाऱ्या खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी पुराव्यासह त्याचे जाहीर स्पष्टीकरण करावे, अन्यथा कोर्टात जाऊ, असा इशारा रेणुका शुगर्सच्या अध्यक्षा विद्या मुरकुंबी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला.

खासदार शेट्टी खोटारडे!

$
0
0
२६५० रुपयांपेक्षा जास्त देणाऱ्या कारखाना अध्यक्षांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करू म्हणारे खासदार राजू शेट्टी कुठे आहेत, असा सवाल करत निवळ लबाड आणि खोटे बोलून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात शेट्टी पटाईत आहेत, असा आरोप बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार के. पी. पाटील यांनी केला. ते बिद्री (ता. कागल) येथील दुधगंगा-वेदगंगा साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी बोलत होते.

कारखान्यांची धुराडी पेटली

$
0
0
ऊसदराचा तोडगा निघाल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी दर जाहीर करत गळीत हंगामाला रविवारपासून प्रारंभ केला. दुधगंगा-वेदगंगा, शरद कारखाना, आजरा कारखाना, आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना तसेच दत्त शिरोळ सहकारी साखर कारखाने सुरू झाले.

भाषा टिकण्यासाठी जबाबदारी ओळखा

$
0
0
‘राजकीय नेते, लेखक व प्रसारमाध्यमांबरोबरच भाषा टिकवण्याची जबाबदारी समाजाचीही आहे. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होणाऱ्यांनी आपली मुले इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पाठवणे शोभनीय नाही.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images