Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पावसाची उघडझाप

$
0
0
गेल्या दोन दिवसांपासून थोडी विश्रांती घेतलेल्या पावसाचे गुरुवारी शहरात पुनरागमन झाले. त्यामुळे शहरातील वातावरण पुन्हा पावसाळी बनले असून गेल्या २४ तासांत सरासरी २१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

राधानगरी ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञाची गरज

$
0
0
मागील सहा महिन्यांपासून राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयाला नव्या इमारती, आवश्यक वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व विविध तांत्रिक सुविधांसह अद्ययावत आरोग्य सेवा पुरविण्यात सुरवात केली आहे.

पेन्शनच्या बहाण्याने वृद्धेचे दागिने लंपास

$
0
0
पेन्शन देतो अशी बतावणी करुन रांगोळी(ता.हातकणंगले) येथील वृध्देचे सुमारे २० हजार रुपये किंमतीचे पाऊण तोळे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात लंपास केले. राजवाडा परिसरात दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

सीरियल किलरची दहशत

$
0
0
अनोळखी युवकाचा डोक्यात दगड घालून खून केला असल्याची घटना गुरुवारी सकाळी रेल्वे स्टेशन परिसरात उघडकीस आली. गेल्या तीन महिन्यात अशा प्रकारे सात फिरस्त्यांचे खून करण्यात आले असल्याची माहिती प्रजासत्ताक संस्थेचे दिलिप देसाई यांनी दिली.

पोलंड कॉलिंग कोल्हापूर

$
0
0
युरोपमधील राजकीय-आर्थिक स्थैर्य असलेल्या व आर्थिक मंदीतही आर्थिक वाढ नोंदवलेल्या पोलंडने कोल्हापुरातील उद्योजकांना गुंतवणुकीसाठी गुरुवारी निमंत्रण दिले आहे.

छाननीतच सरपंचपदाची ‘लॉटरी’

$
0
0
शिरोळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीतच महिला उमेदवाराला सरपंचपदाची ‘लॉटरी’ लागली. प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज छाननीत अवैध ठरल्यामुळे सौ.सुवर्णा प्रकाश कोळी यांचा सरपंचपदी बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

सातवेत सापडले मगरीचे पिल्लू

$
0
0
सातवे (ता. पन्हाळा) येथे मंगळवारी सायंकाळी शिवाजी उर्फ आण्णा विश्वास निकम यांच्या शेताशेजारील पाणंदीत मगरीचे पिल्लू आढळून आले. शेतातून घरी येत असताना त्यांना हे मगरीचे पिल्लू दिसले.

दगड डोक्यात घालून खून

$
0
0
सिरियल किलरबाबत शहरात सुरु असताना शनिवारी आणखी एका अनोळखी इसमाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. परिख पुलानजीक रेल्वे गेटसमोर हा प्रकार घडला.

विद्यापीठ सेवक संघाची निदर्शने

$
0
0
शिवाजी विद्यापीठ सेवक संघाच्या वतीने विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी विद्यापीठ प्रशासनाविरोधात निदर्शने करण्यात आली. सेवक संघाच्या मागण्यासंदर्भात प्रशासनाशी वारंवार चर्चा करूनही निर्णय घेतला जात नाही, असा आरोप या वेळी करण्यात आला.

मंदीत जपून पावले टाका

$
0
0
‘औद्योगिक क्षेत्रात सध्या मंदीचे दिवस आहेत. या परिस्थितीत उद्योजकांनी जपून पावले टाकली पाहिजेत. त्यामुळे बँकांचे कर्ज घेणे किंवा विस्तारीकरण यासारखा निर्णय घेण्याचे धाडस आता करू नये’ असा सल्ला ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर यांनी दिला.

लाखमोलाचा ‘भवताल’

$
0
0
महाराष्ट्र सरकारचा पर्यावरणविभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने संयुक्तपणे आयोजित केलेल्या लघुपट स्पर्धेच्या व्यावसायिक गटात कोल्हापूरच्या ‘गहिवर फाउंडेशन’ची निर्मित, मयूर कुलकर्णी यांची संकल्पना व दिग्दर्शन असलेल्या ‘भवताल’ या लघुपटाला एक लाख रुपये व सन्मानचिन्ह अशा पुरस्कारासह लक्षणीय दाद मिळाली.

कुष्ठपीडित मुले करणार पर्यावरण रक्षण

$
0
0
शेंडा पार्कमधील स्वाधारनगरमधील कुष्ठपीडित मुलांनी पर्यावरण रक्षण करण्याचा निर्धार केला. दीपक देवलापूरकर यांच्या आनंदवन या घरास भेट देऊन पर्यावरणविषयक विविध उपक्रमांची माहिती घेतली.

गायकवाड खूनप्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी

$
0
0
हेमंत गायकवाड याच्या खूनातील संशयित एक्साइज इन्स्पेक्टर राजेंद्र सावंत व त्यांची दोन म‌ुले अभिजीत व धैर्यशील (रा. लीशा हॉटेलनजीक) या तिघांना मुख्य न्यायाधिश डी. आर. पाटील यांनी शनिवारी न्यायालयीन कोठडी सुनावली.

डेंगीने घेतला विवाहितेचा बळी

$
0
0
शहरात डेंगीमुळे शनिवारी आणखी एका महिलेचा मृत्यू झाला. साक्षी संतोष सातुसे (वय ३०, रा. संभाजीनगर, कामगार चाळनजीक) असे त्यांचे नाव आहे. कामगार चाळ परिसरात तिघांमध्ये डेंगीसदृश लक्षणे दिसत असल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मोर्चा रद्द, आता चर्चा

$
0
0
टोलसंदर्भात भूमिका जाहीर करावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे नेते, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या घरावर आयोजित करण्यात आलेला टोलविरोधी कृती समितीचा मोर्चा रद्द करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी पुन्हा टोलवले

$
0
0
रस्ते विकास प्रकल्पातील टोलबाबत निर्णय घेण्याच्या हालचाली नगरविकास खात्याने जोरदार हालचाली सुरू केल्या असल्या तरी शनिवारी कोल्हापुरात आलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र टोलबाबत माहिती घेतो, असे सांगत पुन्हा टोलवले.

जलसंधारणासाठी जागतिक बँकेकडून कर्ज

$
0
0
दुष्काळावर मात करण्यासाठी राज्यात १ लाख सिमेंटचे बंधारे आणि साडेचार लाख शेततळी बांधण्यात येणार आहेत. जलसंधारणाच्या या कामांसाठी राज्य सरकार दोन-तीन वर्षात चाळीस हजार कोटी रुपयांपर्यंत खर्च करणार आहे. यासाठी अधिक निधी लागणार आहे.

काँग्रेस इच्छुकांच्या मिरजेत मुलाखती

$
0
0
महापालिका निवडणुकीला आता जोर चढू लागला आहे. शनिवारी सकाळी आकरा वाजल्यापासून काँगेस पक्षाच्यावतीने निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती उत्साहात पार पडल्या.

कृष्णा, कोयना नदीला पूर

$
0
0
कोयना खोरे आणि परिसरात शनिवार सायंकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. मुसळधार पावसाने कोयना नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे कराडपासून पुढे कृष्णा नदीला पूर आला आहे.

मागितल्यास राजीनाम्याला संजय मंडलिक तयार

$
0
0
जिल्हा परिषदेची सभा झाल्यानंतर आता अध्यक्षपद बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राजीनामा मागण्याबाबत पुढील आठवड्यात जिल्हयातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलवण्यात येणार आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images