Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पावसाचा जोर, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

0
0

फोटो

.......

नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने जिल्ह्याच्या विविध भागात दमदार हजेरी लावली. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी,चंदगड, आजरा येथे जोरदार पाऊस झाला. कोल्हापूर शहरात दिवसभरात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळल्या. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गुरुवारी रात्री आठ वाजता राजाराम बंधारा येथे पाण्याची पातळी १७ फूट चार इंच इतकी होती.

नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे पाच बंधारे पाण्याखाली आहेत. पंचगंगा नदीवरील राजाराम, शिंगणापूर, रुई, इचलकरंजी बंधारे पाण्याखाली आहेत. यवलूज बंधाराही पाण्याखाली आहे. गेल्या आठवड्यापासून उघडीप दिलेल्या पावसाने मंगळवारपासून पुन्हा हजेरी लावली. बुधवारी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. कधी उघडीप, तर कधी पावसाच्या मोठ्या सरी असा लपंडाव दिवसभर सुरू होता. जिल्ह्याच्या विविध भागात कुठे दमदार तर कुठे उघडीप असे चित्र होते. हातकणंगले, शिरोळ, करवीर तालुक्यात पाऊस कमी होता. दरम्यान, बुधवारी सकाळी आठ वाजताच्या नोंदीनुसार जिल्ह्यात सरासरी १५.८० मिमी पावसाची नोंद झाली. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ५२ मिमी पाऊस पडला. शाहूवाडी तालुक्यात ३२ मिमी तर राधानगरीमध्ये २४ मिमी पाऊस झाला. राधानगरी, दूधगंगा, कुंभी, कोदे धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दूध बंद आंदोलनास गोकुळकर्मचारी संघटेनचा पाठिंबा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारने दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर प्रती लिटर पाच रूपये जमा करावेत, या मागणाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे १६ जुलैपासून दूध संकलन बंद तसेच मुंबईचा दूध पुरवठा तोडण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनास जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेने बुधवारी पाठिंबा जाहीर केला. यासंबंधीचे पत्र संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील, उपाध्यक्ष शामराव पाटील यांनी खासदार राजू शेट्टी यांना दिले.

पत्रात म्हटले आहे, दूध दरासाठीचे आंदोलन उत्पादकांच्या हिताचे आहे. जिल्ह्यात ऊस दराइतकाच दूध दराचा विषय महत्वाचा आहे. दूध व्यावसाय सर्वसामान्यांना आधार आहे. सध्या कमी झालेल्या दूध दरामुळे व्यवसाय आर्थिक अडचणीत आला आहे. व्यवसाय परवडण्यासाठी म्हैस, गाय दूध खरेदी दरात वाढ होणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारकडे अनुदान मागणी केली आहे, ती योग्य आहे. त्यास गोकुळ कर्मचारी संघटनेचा पाठिंबा आहे.

दरम्यान, दूध दर आंदोलन यशस्वी करण्यासाठी स्वाभिमीनी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व्यापक जागृती करीत आहेत. जिल्हानिहाय मेळावे घेऊन गावातील संस्थांनी दूध संकलन बंद ठेवणे, मुंबईकडे जाणारे दूध अडवण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होण्यासाठीचे नियोजन प्रमुख पदाधिकारी करीत आहेत. जिल्ह्यातील दूध उत्पादकातील जागृतीसाठी सहा जुलै रोजी दुपारी दोन वाजता येथील शाहू स्मारक भवनात मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्याच्या तयारीसाठी येथील स्वाभिमीनीच्या कार्यालयात बैठक झाली. त्यात मेळाव्याला मोठ्या संख्येने उत्पादक, शेतकरी उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय झाला. बैठकीस जिल्हाध्यक्ष भगवान काटे, जालिदंर पाटील, सावकर मादनाईक, वैभव कांबळे आदी उपस्थित होते.

-----------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलसीबी कारवाई

0
0

लुबाडणूकप्रकरणी अटक

कोल्हापूर

शेंडापार्क येथे रिक्षाचालकाची लुबाडणूक केल्याप्रकरणी दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. त्यांच्याकडून ८९ हजार रूपये किमतीचे दोन मोबाइल हॅण्डसेट जप्त केले. श्रीनाथ उर्फ श्रीन्या लेमन लोंढे (रा. स्वातंत्र्यसैनिक वसाहत, राजेंद्रनगर झोपडपट्टी) आणि करण मनोज मछले (रा. मोतीनगर) या दोन संशयित आरोपींना अटक केली. मोबाइल हॅण्डसेट विक्रीसाठी संशयित राजारामपुरी येथे येणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. २२ जून रोजी शेंडापार्कात रात्री पावणे अकरा वाजता अर्जुन पोवार (रा. म्हाडा कॉलनी) या रिक्षाचालकाला लुबाडले होते. त्यांच्याकडून १० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, दोन मोबाइल हॅण्डसेट आणि रोख ४५० रूपये काढून घेतले होते. याबाबत राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उच्च शिक्षणातील १३८७ पदांचे रिकामे

0
0

धोरणाअभावी लटकली पद मंजुरी

राज्यात प्राध्यापकांची नऊ हजार पदे रिक्त, अध्यापनासह अन्य कामकाजावर परिणाम

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:@Appasaheb_MT

कोल्हापूर

विद्यार्थ्यांच्या करिअरच्या टप्प्यामध्ये उच्च शिक्षण हा महत्वाचा घटक आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान या सिनीअर कॉलेजच्या पातळीवर विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, संशोधन व गुणवत्ता वाढ यावर फोकस आहे. मात्र संपूर्ण राज्यभरात तब्बल नऊ हजार प्राध्यापक पदांची भरती झालेली नाही. रिक्त प्राध्यापकपदाच्या दुप्पटीहून अधिक शिक्षकेतर पदे राज्याच्या विविध विभागत रिक्त आहेत. भरती बंदीमुळे अध्यापनापासून प्रशासकीय कामकाज अशा पातळीवर 'प्रभारी' कामकाज सुरू आहे. जिमखाना, ग्रंथालय, विद्यार्थी कल्याण मंडळ, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कामावर परिणाम होत असल्याचे संस्थाचालकांपासून प्राचार्य प्राध्यापकांपर्यंत सर्वांचेच म्हणणे आहे. विश्वसनीय माहितीनुसार रिक्त पदांच्या भरतीबाबत धोरण अद्याप ठरले नसल्याने भरती बंदीचा निर्णय हटेना असे चित्र आहे.

उच्च शिक्षण व अर्थ विभागाने जानेवारी २०१७ मधील विद्यार्थी संख्या गृहित धरुन तयार केलेल्या प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पद भरतीच्या आकृतीबंधाला उच्च शिक्षण व अर्थ विभागाने मंजुरी दिली. मात्र रिक्त पदे शंभर टक्के की सत्तर टक्क्यांपर्यंत भरायची यासंबंधी धोरण ठरत नसल्याने पद भरतीचा निर्णय लटकला आहे. आता हा निर्णय मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकारी कमिटीपर्यंत पोहचला आहे. राज्यातील प्रत्येक विभागातील रिक्त पदांचा अहवाल शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून उच्च शिक्षण मंत्रालयाला सादर झाला आहे. ग्रंथपाल, शारिरिक शिक्षण संचलक, अधिव्याख्याते, प्रबंधक, अधीक्षक, मुख्य लिपिक, वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक, लघुलेखक, ग्रंथालय लिपिक, प्रयोगशाळा सहायक, प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय परिचर, सहायक ग्रंथपाल, लेखपाल मिळून २६ प्रकारच्या पदांचा समावेश आहे.

शारिरिक शिक्षण संचालक नसल्यामुळे ठिकठिकाणी जिमखाना विभागाचे पॅकअप झाले आहे. सिनीअर प्राध्यापक निवृत्त झाल्यामुळे नव्याने पदे भरलेली नाहीत. परिणामी संशोधन प्रोजेक्टवर मर्यादा पडल्या आहेत. 'नॅक'च्या नव्या मूल्यांकन पध्दतीत पूर्ण भरती प्रक्रियेला गुण आहेत. भरती बंदीमुळे अपुऱ्या प्राध्यापकांच्या बळावर 'नॅक' मूल्यांकनाला सामोरे कसे जायचे असा प्रश्न कॉलेजिअसना सतावत आहे. रिक्त पदाबाबत महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत चर्चाही केली आहे. लोणावळा येथे महाराष्ट्र राज्य प्राचार्य संघटनेची बैठक झाली. बैठकीत रिक्त पदे व शैक्षणिक प्रश्नांसोबत दर तीन महिन्यांनी आढावा घेण्यासाठी कोअर ग्रुपची स्थापना केली. ग्रुपच्या स्थापनेला ऑगस्टमध्ये तीन महिने होतात.

................

कोल्हापूर, सांगली व सातार जिल्ह्यातील रिक्त पदे

पदे मंजूर पदांची संख्या भरलेली पदे रिक्त पदे

अधिव्याख्याते ४२१४ २८२७ १३८७

शिक्षकेतर पदे ३८१२ २४३९ १३८२

एकूण ८०२६ ५२५७ २७६९

.............................................................

सांगली जिल्ह्यात ८३१ पदे भरतीविना (४३० शिक्षक, ४०१ शिक्षकेत्तर कर्मचारी)

कोल्हापूर जिल्ह्यात ९३५ पदे रिक्त (४८७ शिक्षक, ४४८ शिक्षकेत्तर कर्मचारी)

................

कोट

'प्रत्येक वर्षी विद्यार्थी संख्येवर पदमान्यता दिली जाते. ३१ ऑक्टोबर रोजीच्या पटसंख्येवर पदनिश्चिती केली होती. गेली तीन, चार वर्षे शिक्षण सहसंचालक कार्यालयाने पदमान्यतेचा कॅम्प आयोजित केले. कॉलेजनिहाय किती पदे मान्य आहेत, या संदर्भातील लेखी पत्र आजतागायत दिले नाही. दरम्यान, नियमित प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची पदांची भरती न झाल्यामुळे अध्यापन व प्रशासकीय अशा दोन्ही ठिकाणी परिणाम होत आहे.

डॉ. क्रांतिकुमार पाटील, अध्यक्ष, शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशन

..................................

'प्राध्यापक भरतीवरील बंदीमुळे अध्यापनापासून, विद्यार्थी केंद्रीभूत उपक्रमांपर्यत परिणाम झाला आहे. शिक्षणमंत्र्यांनी कोल्हापूर, नांदेड, पुणे येथे प्राध्यापक भरतीची घोषणा केली. पण अद्याप निर्णय झाला नाही. नेट, सेट, पीचडी पात्र होऊनही नियुक्त्या रखडल्याने संबंधित उमेदवारांचे नुकसान होत आहे. कौटुंबिक समस्या उदभवत आहेत. पात्रता असूनही नोकरी नाही, वाढते वय यामुळे अनेकांचे विवाह जुळत नाहीत अशी विचित्र स्थिती बनली आहे.

प्रा. डॉ. किशोर खिलारे, निमंत्रक, सेट नेट पीएचडी प्राध्यापक कृती समिती

...................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीएसकेंसह तिघांचा जामीन अर्ज फेटाळला

0
0

कोल्हापूर :

महाराष्ट्र ओनर्सशिप फ्लॅट अॅक्टनुसार (मोफा) नुसार दाखल केलेल्या गुन्ह्यात बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. यू. कदम यांनी बुधवारी फेटाळला. डी. एस. कुलकर्णी यांच्यासह पत्नी हेमंती, मुलगा शिरीष यांच्यावर मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके दाम्पत्यावर मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा तिन्ही ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. फसवणुकीची रक्कम कोट्यवधींच्या घरात आहे. पुणे व कोल्हापूर पोलिसांनी आतापर्यंत डीएसकेंच्या ५०० मालमत्ता सील केल्या आहेत. त्यांच्या वकिलांनी आमच्याविरोधात दाखल असलेल्या फिर्यादी रद्द करा, म्हणून उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. त्यावर झालेल्या सुनावणीमध्ये विशेष सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळल्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी या तिघांच्या अटकेची तयारी केली आहे. दरम्यान, कुलकर्णी दाम्पत्याने पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतल्यास त्यांच्याविरोधात आम्ही अपील दाखल करणार असल्याचे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपअधीक्षक आर. बी. शेडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराईत गुन्हेगार हद्दपार

0
0

(फोटो आहे)

सराईत गुन्हेगार हद्दपार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजारामपुरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार कैलास नारायण जगदने (वय ५३, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) याला एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी हद्दपारीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, गुरुवारपासून याची अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला.

कैलास जगदने याच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात मारामारी, सरकारी नोकरावर हल्ला करणे, सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवणे असे तीन गुन्हे दाखल आहेत. सरकारी नोकरावर हल्ला केल्याप्रकरणी त्याला कोर्टाने शिक्षा सुनावली होती. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाढ होण्याचा धोका असल्याने शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील यांनी जगदने याच्या हद्दपारीचा प्रस्ताव करवीरचे प्रांताधिकारी इथापे यांच्याकडे पाठवला होता. इथापे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, जगदने याला एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लूटमार करणारे दोघे अटकेत

0
0

(फोटो आहेत)

लूटमार करणारे दोघे अटकेत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बालिंगा येथे तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील रोख ३० हजार रुपये आणि एक तोळ्याची सोन्याची चेन असा ६० हजारांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या दोघांना करवीर पोलिसांनी बुधवारी अटक केली. राहुल कल्लाप्पा गुरव (वय २६) व आकाश रामचंद्र चांदम-पोवार (२६, दोघेही रा. सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. मंगळवारी रात्री बालिंगा येथील रसिका हॉटेलच्या मागील बाजूस लूटमारीचा प्रकार घडला होता. याबाबत महादेव सदाशिव शिंदे (वय ३४, रा. सुलोचना पार्क, वाशी नाका, कोल्हापूर) याने करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

करवीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशी नाका येथील महादेव शिंदे हा बालिंगा येथील एका दारू विक्रीच्या दुकनात मॅनेजर म्हणून काम करतो. मंगळवारी रात्री दुकान बंद करून तो वाशी नाक्याकडे निघाला होता. यावेळी दोघांनी अडवून त्याच्या डोक्यात फायटर मारून जखमी केले. जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हल्लेखोरांनी त्याच्याकडील ३० हजारांची रोकड आणि गळ्यातील सोन्याची चेन असा सुमारे ६० हजारांचा मुद्देमाला लंपास केला होता. याबाबत महादेव शिंदे याने करवीर पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली होती. त्यानुसार करवीर पोलिसांनी लूटमार करणारे राहुल गुरव व आकाश चांदम-पोवार या दोघांना बुधवारी सकाळी सानेगुरुजी वसाहत येथून अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तरमधील १४ हजार, तर दक्षिणमधील १२ हजार नावे वगळली

0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet : satishgMT

कोल्हापूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेने मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू केले आहे. त्यानुसार कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील १४ हजार २४८, तर कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील १२ हजार ३२६ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. मृत, स्थलांतरित तसेच दुबार मतदारांमुळे मतदारयादीत घोळ निर्माण झाला होता. आता अद्ययावत यादीमुळे जिल्हा निवडणूक शाखेचे काम सुलभ होणार आहे.

करवीर प्रांताधिकारी, करवीर तहसीलदार कार्यालयाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मतदार यादी शुद्धिकरण करण्याचा कार्यक्रम दरवर्षी केला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत सध्या मतदारांचे रंगीत फोटो गोळा करण्याचे काम बीएलओ घरोघरी जाऊन करत आहेत. प्रत्येक मतदाराच्या घरात जाऊन बीएलओ मृत, स्थलांतरित याची माहिती घेतली जाते. जो मतदार मृत झाला आहे, त्याच्या कुटुंबातील सदस्यांची सही घेतली जाते. तसेच विवाह, नोकरी, व्यवसायानिमित्त स्थलांतरित झालेल्या मतदारांची माहिती घेऊन त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. जिल्हा निवडणूक शाखेने दुबार नावांची यादी बीएलओंना दिली असून, त्याची खातरजमा करून पंचनामा करून नावे वगळण्यात आली आहेत. मृतांची नावे वगळण्यासाठी महापालिकेतील जन्म-मृत्यू विभागाकडून नावे घेऊन कोल्हापूर व कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील नावे वगळली आहेत. तसेच १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांचे फॉर्मही भरून घेतले आहेत. मृत, दुबार व स्थलांतरित नावांची यादी घेऊन सुनावणीची संधी निवडणूक आयोगाने दिली आहे. जर चुकीच्या पद्धतीने मतदारांची नावे वगळली आहेत, अशी शंका वाटल्यास मतदार व राजकीय पक्षांना तक्रार करण्यास संधी दिली आहे.

निवडणूक शाखेने प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना दुबार नावांची यादी असलेली सीडीही उपलब्ध करून दिली आहे. तसेच प्रत्येक मतदाराने आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची खातरजमा निवडणूक आयोगाच्या नॅशनल व्होटर सर्च वेबसाइटवर करता येते. वगळलेल्या नावांची यादी महापालिकेच्या शिवाजी मार्केट कार्यालय व करवीर तहसीलदार कार्यालयात लावण्यात आली आहे.

०००००००

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाने मतदार यादीचे शुद्धिकरण करण्यात येत आहे. मृत, दुबार, स्थलांतरित मतदारांची नावे वगळली आहेत. जर नावे वगळताना चूक झाली असेल तर एक सप्टेंबर रोजी होणाऱ्या नवीन मतदार नोंदणीत पुन्हा नावे नोंदवता येतील.

सचिन इथापे, करवीर प्रांताधिकारी

००००

मतदारसंघनिहाय मतदार

मतदारसंघाचे नाव पुरुष मतदार महिला मतदार एकूण

कोल्हापूर उत्तर १,३३,७७२ १३७,६७६ २,७७,४९९

कोल्हापूर दक्षिण १,६७,७५४ १,५७,०३५ ३,२४,७९३

करवीर १,५५,३२१ १,४१,५६४ २,९६,८८६

००००

वगळलेल्या मतदारांची आकडेवाडी

कोल्हापूर उत्तर : १४,२४८

कोल्हापूर दक्षिण : १२,३२६

करवीर : २९२२

०००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वर्षभरात ५८५ कोटी सीजीएसटी जमा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'एक देश एक कर प्रणाली अंतर्गत जीएसटीची प्रभावी अंमलबजावणी कोल्हापूर विभागात झाली आहे. वर्षभराच्या कालावधीत ५८५ कोटींचा जीएसटी जमा झाला आहे. नव्या २० हजार करदात्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. या यशस्वी वाटचालीत सर्वांचा मोठा वाटा आहे,' असे गौरवोद्वागार कोल्हापूर विभागाचे अप्पर राज्य कर आयुक्त चंद्रहार कांबळे यांनी काढले. जीएसटीच्या अंमलबजावणीची वर्षपूर्ती झाल्याबद्दल कसबा बावडा रोडवरील जीएसटी भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरूवात झाली. आयुक्त कांबळे म्हणाले, 'वस्तू व सेवा कराची प्रभावी अंमलबजावणी झाल्याने करात सुसूत्रता आली आहे. सर्वच व्यवहार ऑनलाइन झाल्याने सोपी आणि सुटसुटीत करप्रणालीचे सर्वच स्तरावरून स्वागत झाले आहे. मात्र अजूनही करदात्यांमध्ये व्यवसाय कराबाबत संभ्रमावस्था आहे. ती दूर करण्यात येईल. जीएसटी, व्यवसाय कर आणि मूल्यवर्धित कराची आकारणी विभागातर्फे केली जाते. ई वे बिलाची प्रबोधनाची मोहिमही राबविली जात आहे. पहिल्या टप्प्यात वाहनांची तपासणी करण्यात आली. ५० हजारांपेक्षा जादा वाहतूकधारकांना सूचना केल्या आहेत. भविष्यात अन्वेषण पथकातर्फे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. '

राज्य कर विभागाच्या सहआयुक्त रेश्मा घाणेकर, केंद्रीय जीएसटी विभागाचे सहायक आयुक्त च. वं. केदार यांनी वर्षभर राबविलेल्या उपक्रमाची माहिती सांगितली. जीएसटीच्या कोल्हापूर विभागाला आयएसओ मानांकनासाठी तत्कालिन सहआयुक्त विलास इंदलकर यांचे सहकार्य लाभल्याचे सांगितले. सी. ए. सतीश डकरे, गिरीश कुलकर्णी यांनी जीएसटीचे अनुभव सांगितले. पहिल्या टप्प्यात जीएसटीला झालेला विरोध, प्रबोधन आणि अंमलबजावणीची प्रकिया सांगितली. वर्षपूर्ती निमित्त विभागातील गुणवंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार झाला. बजरंग मोरे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीच हजार व्यापाऱ्यांची नोंदणी रद्द होणार

0
0

अडीच हजार व्यापाऱ्यांची नोंदणी रद्द होणार

सलग सहा महिने विवरणपत्र न भरल्याने जीएसटी भवनकडून कारवाई सुरू

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सलग सहा महिने जीएसटीचे विवरणपत्र भरले नसल्याने जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार व्यापाऱ्यांची नोंदणी रद्द होणार आहे. याबाबत जीएसटी भवनने संबंधित व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवण्याचे काम सुरू केले आहे. व्यापाऱ्यांनी तातडीने विवरणपत्र न भरल्यास जीएसटी भवनकडून एकतर्फी करनिर्धारणा होऊ शकते. कारवाई टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी विवरणपत्र भरावे, असे आवाहन जीएसटी अधिकाऱ्यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सुमारे ७० हजार व्यापाऱ्यांनी जीएसटी नोंदणी केली आहे. आपसमेळ योजनेतील नोंदणीधारक वगळता इतरांना दर महिन्याला पुरवठ्याचा तपशील भरून तो जीएसटी विभागाकडे ऑनलाइन सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, यातील जवळपास अडीच हजार व्यापाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून विवरणपत्र भरलेले नाही. विवरणपत्र न भरलेल्या व्यापाऱ्यांची संख्या वाढत असल्याने अशा व्यापाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मोहीम जीएसटी भवनकडून सुरू झाली आहे. विवरणपत्र नियमित भरण्यासाठी स्मरणपत्र दिले होते. यानंतरही काही व्यापाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे सुमारे अडीच हजार व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. नोटीस मिळताच सात दिवसात विवरणपत्र भरा किंवा खुलासा करा, अशा सूचना जीएसटी अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. मुदत संपूनही विवरणपत्र न भरल्यास जीएसटी अधिकाऱ्यांकडून एकतर्फी करनिर्धारणा होऊ शकते. त्याचबरोबर नोंदणीही रद्द केली जाणार आहे. ही कारवाई टाळण्यासाठी संबंधित व्यापाऱ्यांनी तातडीने विवरणपत्र भरावे, असे आवाहन राज्य कर सहआयुक्त रेश्मा घाणेकर यांनी केले आहे.

चौकट

कर्मचारी, अधिकाऱ्यांचा सन्मान

जीएसटी प्रणालीची अंमलबजावणी करण्यासाठी उल्लेखनीय काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. राज्य कर उपायुक्त राजेंद्र कुलकर्णी, सहायक राज्य कर आयुक्त अभिजित पोरे, राज्य कर अधिकारी संतोष साळुंखे, अमित हसबनीस,कर निरीक्षक पंडित कांबळे, अनिल कोळी यांच्यासह राज्य कर अधिकारी बजरंग मोरे, संगणक तज्ज्ञ अमित देशपांडे, मंदार देसाई, मदतनीस गौतम कांबळे यांना वरिष्ठांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा वसतीगृहातप्रवेश प्रक्रिया सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील सदर बाजार परिसरातील सरकारी निवासस्थानात जिल्ह्यातील मराठा समाजातील ७२ विद्याथ्यांच्या मोफत निवासाची सोय २६ जुलैपासून करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रोटोकॉल विभागात करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी प्रसिध्दी पत्रकातून केले आहे.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारतर्फे सदर बाजार येथे वसतिगृहाची सोय करण्यात आली आहे. या वसतिगृहात विद्यार्थ्यांना राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. २६ जुलैपासून वसतिगृहामध्ये विद्यार्थी प्रत्यक्षात राहण्यास जातील, अशी व्यवस्था करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत. त्यामुळे प्रशासन सर्व तयारी करीत आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. वसतीगृहात केवळ निवासाची मोफत सोय होणार आहे. भोजनाची व्यवस्था नसणार आहे. कॉलेज करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशास प्राधान्य दिले जाणार आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुभेदार यांनी केले आहे.

--------------------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भीमा कोरेगाव दंगलीतील संशयीत आरोपी संभाजी भिडे यांना अटक करीत नसल्याचा आरोप करीत पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार गुरू बिराजदार यांना देण्यात आले. दरम्यान, निवेदन स्वीकारण्यास उपस्थित नसल्याबद्दल जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला.

याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की,अच्छे दिनची स्वप्ने दाखवत भाजपने जनतेची दिशाभूल केली. वाढत्या हल्ल्यामुळे महिलांमध्ये आणि मागासवर्गीय घटकात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. याशिवाय दंगलीतील सूत्रधार भिडे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. मात्र त्यांना अद्याप अटक झालेली नाही. सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. त्यांना त्वरित अटक करावी, शेतकऱ्यांना संपर्ण कर्जमाफी द्यावी, पेट्रोल, डिझेलचे दर कमी करावेत, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे प्रलंबित पैसे द्यावेत, शाहूपुरी पोलिस स्टेशनच्या जुन्या इमारतीच्या जागी भीम-शाहू स्मारक उभारावे, विविध विकास महामंडळाची कर्जे माफ करावीत, बेरोजगारांना नोकरी द्यावी, हुपरीतील गट नंबर ९२५ -८ अ जागा बेघरांना द्यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

यावेळी पक्षाचे डी. जी. भास्कर, नंदकुमार गोंधळी, विद्याधर कांबळे, सोमनाथ घोडेराव, अब्बास शेख, रमेश कांबळे आदी उपस्थित होते.

-----------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध गॅस १२ सिलिंडर जप्त

0
0

अवैध १२ गॅस

सिलिंडर जप्त

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मिरजकर तिकटी येथे एका स्क्रॅपच्या दुकानात अवैधरित्या गॅस भरणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. या परिसरातील एका खासगी दवाखान्याजवळ अवैधरित्य गॅस भरताना जिल्हा पुरवठा विभाग आणि राजवाडा पोलिसांनी ही कारवाई केली. अब्दुल हमीद अब्दुल कादर अत्तरवाला (वय ४२) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव असून त्याच्याकडील १२ सिलिंडर जप्त करण्यात आली. मिरजकर तिकटी येथे अवैधरित्या गॅस भरला जात असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा पुरवठा विभागाकडे दाखल झाल्या होत्या. अन्नधान्य वितरण अधिकारी डी. एम. सणगर यांनी ही तक्रार राजवाडा पोलिसांकडे नोंदविली. त्यानुसार पोलिस आणि पुरवठा विभागाच्या संयुक्त पथकातर्फे ही कारवाई करण्यात आली. बुधवारी दुपारी संजय बाजीराव कांबळे ( वय ३९, रा. शांतीनगर, पाचगाव) याच्या रिक्षात अवैधरित्या गॅस भरताना अब्दुल अत्तरवाला रंगेहाथ सापडला. त्याच्याकडून वजन काटा, रेग्युलेटर आणि १२ सिलेंडर जप्त करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढीव हमीभाव केवळ धूळफेक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारने खरीप हंगामातील १४ पिकांच्या हमीभावामध्ये वाढ केली असली, तरी वास्तव उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याने जाहीर केलेला हमीभाव केवळ धूळफेक आहे. उत्पादन खर्चात २० ते २५ टक्के वाढ झालेली असताना हमीभावात झालेली वाढ नगण्य असून दीडपट हमीभाव दिल्याचा दावा केंद्र सरकार करत असेल, तर याचे विश्लेषण करण्याचे खुले आव्हानच शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी दिले आहे. सरकारने वाढवलेला हमीभाव केवळ २०१९ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केल्याचा आरोप करत प्रत्यक्षात या घोषणेचा फायदा शेतकऱ्यांना होणार नसल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी खरीप पिकांच्या हमीभावात दीडपट वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोषी स्वागत होत असताना शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी मात्र यावर जोरदार टीकेचे प्रहार केले. उत्पादन खर्चात २० ते २५ टक्के वाढ केलेली असताना हमीभाव मात्र २०० ते ९०० रुपये क्विंटलपर्यंत वाढवला आहे. त्यामुळे दीडपट हमीभावापेक्षा कितीतरी पटीने हा भाव कमी आहे. खरीप पेरणीनंतर कृषिमालाच्या दरात वाढ होते. या दरवाढीप्रमाणेच बुधवारी झालेली दरवाढ असताना त्याला दीडपट हमीभावाचा मुलामा दिला जात आहे. वास्तव उत्पादन खर्चापेक्षा कितीतरी पटीने कमी असल्याने हमीभावाचे विश्लेषण करण्याचे थेट आव्हानच शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी दिले आहे.

०००००

शेतकऱ्यांचा विश्वासघात

दीडपट हमीभाव दिला म्हणून भाजप नेते ढोल बडवत असतील, तर तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंह यांनी यापेक्षा अधिक वाढ केली होती. भाजप दीडपट हमीभाव दिल्याचा दावा करत असेल, तर याचे विश्लेषण करण्याचे आपण थेट आव्हान देत आहोत. सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादनावर झाला आहे. व्हॅट अस्तित्वात आल्यानंतर शेतकऱ्यांच्या अनेक वस्तू त्यामधून वगळल्या होत्या. पण वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अस्तित्वात आल्यानंतर शेतकऱ्यांच्या सर्वच वस्तूंवर जीएसटी आकारण्यात येत आहे. वाढीव करात कृषी उत्पादनावरील बोजाच आहे. डिझेलच्या किमती वाढल्यानंतर मशागतीच्या खर्चात वाढ झाली. तसेच मुजरीमध्ये वाढ झाली. रासायनिक खत्यांच्या किमतीत वर्षभरात २० टक्के वाढ झाली, तर ५० किलो वजनाची खताची पिशवी ४५ किलो करून दर मात्र जुनाच ठेवला. सर्व वस्तुस्थितीचा विचार करता उत्पादन खर्चात पीकनिहाय २० ते २५ टक्के वाढ झाली असताना, हमीभाव २० ते २२ टक्के वाढवला आहे. केवळ वाढीव खर्च देणार असेल, तर वेगळे काय केले? दीडपट हमीभाव देणार अशी घोषणा देत होते, त्याचे काय झाले? हा केवळ शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे. दीडपट हमीभावाचे अमिष दाखवून शेतकऱ्यांची चेष्टा करता का?

खासदार, राजू शेट्टी, संस्थापक स्वाभिमानी शेतकरी संघटना

...............

हमीभावाची घोषणा हवेत

खरीप पिकांच्या हमीभावात वाढ केलेली असली, तरी केंद्र सरकारने पूर्णत: फसवणूक केली आहे. वाढविलेला दर म्हणजे राजा उदार अन् हाती भोपळा अशी स्थिती आहे. दीडपट हमीभाव दिलेला नसून दरवर्षीप्रमाणे होणारी वाढ दिली असून त्याला दीडपटवाढीचा मुलामा देत आहेत. भाताचा (धान) उत्पादन खर्च ३,२५० रुपये असताना त्यावर ५० टक्के नफा म्हणजेच १,६२५ अधिक करून ४,८७५ रुपये हमीभाव देण्याची आवश्यकता होती. तरच दीडपट भाव झाला असता. पण भाताचा हमीभाव १,५५० वरून १,७५० रुपये केला आहे. वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांची कर्जे भागणार नसून आत्महत्याही थांबणार नाहीत. गतवर्षी तुरीचे बंपर उत्पादन झाल्यानंतर मोझांबिक देशातून तूर आयात केली. १३,५०० रुपये क्विंटलप्रमाणे तूर आयात केली. मात्र त्याचवेळी देशातील शेतऱ्यांना ५,४५० रुपये दर दिला. नव्या हमीभावानुसार तूर उत्पादकांना ५,६७५ रुपये मिळणार आहे. याचाच अर्थ केंद्र सरकारने जाहीर केलेला हमीभाव हा केवळ धूळफेक आहे. निवडणूक जाहीरनाम्यात उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली होती. तसेच काँग्रेसने शेतकरीविरोधी केलेले सर्व कायदे रद्द करण्याची घोषणा केली होती. पण १५५ वस्तूंमधून कृषिमालाच्या वस्तू रद्द करण्याचा कायदा अद्याप अस्तित्वात आलेला नाही. त्यामळे केवळ घोषणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे.

रघुनाथ पाटील, शेतकरी संघटना

................

सरकारी धोरणाचा शेतकरी बळी

शेतीमालाच्या आधारभूत किमतीमध्ये सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. आधारभूत किमत निश्चित केली, तरी त्यापेक्षा कमी भाव बाजारात मिळतो. त्यावेळी सरकारचे कायदे केवळ पुस्तकात राहतात आणि शेतकऱ्यांची लूट होते. यावर्षी मक्याची आधारभूत किमत १,४५० असताना व्यापाऱ्यांनी १,१०० ते १,२०० रुपयांनी खरेदी केला. शेतकऱ्यांच्या छोट्या गरजा असल्याने पावती घेऊन गुन्हा दाखल करू शकत नसल्याने त्याचा फायदा घेतला जातो. तुरीचा हमीभाव ५,४५० रुपये असताना व्यापाऱ्यांनी ९५० ते १,१०० रुपये कमी भाव देऊन तुरीची खरेदी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना ८९० कोटींचा तोटा झाला. अतिरिक्त तूर खरेदी करण्यासाठी केंद्रे सुरू केली, पण अशा केंद्रांतून केवळ ३० ते ३२ टक्के तूर खरेदी केली. तुरीबाबत अशी वस्तुस्थिती असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोझांबिक देशाबरोबर कडधान्य आयात करण्याबाबत करार करताना तुरीचाही समावेश केला. यामुळे गरज नसताना १५ लाख टन तूर आयात केली. सरकारच्या अशा धोरणांचा बळी शेतकरी ठरतो. गेल्या दहा वर्षात साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या रोखण्यासाठी वास्तव उत्पादनावर आधारित हमीभाव ठरवण्याची गरज आहे.

प्रा. जालंदर पाटील, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष

००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप आघाडीत सभापतिपदासाठी चुरस

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी भाजप आघाडीत इच्छुकांची संख्या वाढली आहे. सभापतिपदासाठी १६ जुलैला निवडणूक होणार आहे. भाजप आघाडीतील सत्ता वाटपाच्या सूत्रानुसार आवाडे गटाच्या वंदना मगदूम यांचे नाव आघाडीवर आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेतील सत्ता वाटपावेळी भाजप आघाडीला पाठिंबा दिलेल्या अपक्ष सदस्या रसिका पाटील यासुद्धा सभापतिपदासाठी इच्छुक आहेत. यामुळे भाजप आघाडीकडून कुणाला संधी मिळणार याविषयी उत्सुकता आहे. महिला व बालकल्याण समिती सभापतिसोबतच अन्य ठिकाणीही बदल करावेत यासाठी इच्छुक प्रयत्नशील आहेत.

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेवेळी अध्यक्षांसह इतर समिती सभापतिपदाचा कार्यकाल सव्वा वर्षाचा निश्चित केला होता. कालावधी उलटून गेल्यानंतर पदाधिकारी बदलले नसल्याने इच्छुक सदस्यांत नाराजी उमटली होती. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदस्या व सभापति शुभांगी शिंदे यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याने रिक्त पदासाठी आता १६ जुलैला निवडणूक होत आहे. या पदासाठी सत्तारूढ गटातील आवाडे गटाच्या वंदना मगदूम यांना संधी मिळण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पीक विमा योजनेत सहभागी व्हा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारने २०१८ मधील खरीप हंगामासाठी लागू केलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पत्रकाद्वारे केले आहे. कर्जदार शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे ही योजना ऐच्छिक आहे.

पत्रकात म्हटले आहे की, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड या कंपनीची नियुक्ती केली आहे. विमा योजनेत भात, ज्वारी, नाचण, भुईमूग, सोयाबीन या पिकांचा समावेश आहे. योजनेत सहभागासाठी कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३१ जुलै अंतिम तारीख आहे, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी २४ जुलै अंतिम मुदत आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत एकरकमी परतफेड योजनेची मुदत ३० जून २०१८ अखेर होती. ही मुदत ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत वाढविली असून, दीड लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची उर्वरित रक्कम बँकेत भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ च्या अंमलबजावणीसाठी सरकारने स्थापन केलेल्या उपसमितीच्या ३ मे २०१८ च्या सभेत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये पात्र थकीत खाते ३१ जुलै २०१७ नंतर पूर्णफेड झाले असेल तर पात्र लाभाची रक्कम लाभार्थ्याच्या बचत खात्यावर जमा करण्यात येईल. मात्र, खात्यावर ३१ जुलै २०१७ पूर्वी थकीत कर्जाची पूर्ण फेड झाली असल्यास हे कर्ज खाते लाभासाठी पात्र नसेल.

००००

वसुलीत वाढ

बँकेची ३० जून २०१८ अखेर शेती कर्ज वसूलपात्र रक्कम १५७० कोटी रुपये होती. त्यापैकी १३८७ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. वसुलीचे हे प्रमाण ८८ टक्के असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वसुलीत तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलन बेदखलभारिपचा आज घंटानाद

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तीन ते चार महिन्यांपासून मागणी केली जात आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी अशा कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असून राज्य सरकारचा महसूल बुडवून स्वत:चा फायदा करत आहेत. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने बुधवारपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी दखल न घेतल्याने गुरुवारी (ता. ५) घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.

डॉ. विजय पाटील यांना पदमुक्त करून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी, महापालिका क्षेत्रातील राजीव आवास घरकुल योजनेचा फेरसर्वे करून लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करावी, नगरोत्थानमधील नित्कृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे तसेच २०१० पासून केंद्र व राज्य सरकारकडून मागासवर्गीय वसाहतीसाठी आलेला निधी खर्च न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, आदी मागण्यांसाठी बुधवारपासून भारिपच्यावतीने बेमुदत उपोषण सुरू केले.

सकाळी ११ वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात झाली. सायंकाळी पाचपर्यंत आंदोलनाची महापालिका प्रशासनाने दखल न घेतल्याने महासंघाने गुरुवारी घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. उपोषणामध्ये शहराध्यक्ष संजय गुदगे, राजन पिडाळकर, सचिन आडसुळे, परशुराम जाधव, प्रशांत वाघमारे, संभाजी लोखंडे, केशव लोखंडे आदी सहभागी झाले होते.

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर: मधुमेहाच्या रुग्णांचे प्रमाण वाढले

0
0


कोल्हापूर:

रोजच्या जगण्यात वाढलेली गतिमानता, फास्ट फूडचा जमाना, पराकोटीला पोहचलेला तणाव, बदलती जीवनशैली आणि आहाराच्या चुकीच्या सवयींमुळे कोल्हापूरकरांत मधुमेहींची संख्या दरवर्षी ५.८ टक्क्यांसह लक्षणीयरीत्या वाढते आहे. दर दहा हजारात लोकसंख्येमागे २३५ रुग्ण मधुमेहाचे आढळतात. पूर्वी श्रीमंतांचा रोग म्हणून ख्याती असलेला मधुमेह आता सर्वसामन्यांपर्यंत पोहचला असून यात २५ ते ३५ वयोगटातील तरुण आणि महिलांचा समावेश सर्वाधिक आहे. कोल्हापुरातील मधुमेह रुग्णांची वाढलेली संख्या चिंताजनक असून ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

मधुमेहाबाबत अनेक गैरसमज असून त्याबाबत पुरेशी माहिती समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. मधुमेहापासून सुटका होत नसली तरी योग्य आहार, व्यायाम, तणावमुक्ती व सकारात्मक विचारांच्या माध्यमातून त्यावर नियंत्रण ठेवता येते. मधुमेह शरीरातील चयापचय क्रियेशी निगडीत आहे. एखाद्याला मधुमेह होतो म्हणजे त्या व्यक्तीच्या शरीरात इन्सुलीन कमी प्रमाणात निर्माण होत असते. अलीकडे गरोदरपणात महिलांना मधुमेह होण्याचा धोका अधिक वाढला आहे. स्त्रियांचा गर्भपात होणे, बाळाचे वजन वाढणे, बाळाच्या शरीरात विकृती निर्माण होणे असे धोके वाढतात. तसेच प्रसूतीकाळात मधुमेहामुळे मृत्युमुखी पडण्याच्या संख्येत वाढ होते आहे. मधुमेह असणाऱ्यांना हृदयरोग होण्याची शक्यता अधिक असते. याबरोबर रक्तदाब, वाढते वजन, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढणे या समस्या देखील भेडसावत आहेत.



अनुवंशिक मधुमेह

या प्रकारात लहान मुले आणि किशोरवयीन तरुणांचा समावेश होतो. वयस्क लोकांनाही त्याचा धोका जाणवतो. याचे मुख्य कारण अनुवंशिकता आहे. काही बालके जन्मजात मधुमेहाची शिकार होतात. यामध्ये शरीरात इन्सुलिन निर्माण होत नाही किंवा कमी प्रमाणात तयार होते.

इन्सुलिन कमी होणे

जगातील ४१ कोटींहून अधिक लोक या प्रकारात मोडतात. स्थूलपणा आणि मधुमेह याचा जवळचा संबंध आहे. यामध्ये शरीरातील इन्सुलिन कमी होते आणि ग्लुकोजचे प्रमाण वाढते. पस्तीसपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना याचा धोका अधिक संभवतो. किडनी, लिव्हर यावर दूरगामी परिणाम होतात. या प्रकारातील रुग्णांना हृदयरोग होण्याची शक्यता सर्वाधिक असते. मधुमेहाचे लवकर निदान होत नसते कमीत कमी चार ते पाच वर्षे ती व्यक्ती मधुमेहाच्या पूर्वावस्थेत असते. मधुमेहाच्या सुप्तावस्थेत त्याचे निदान झाल्यास होणारे दुष्परिणाम काही प्रमाणात टाळता येतात. यासाठी रक्ताची एचबी एवन सी ही तपासणी फायद्याची ठरते.



मधुमेहाची लक्षणे

भूक आणि तहान जास्त लागणे

वारंवार लघवी लागणे

वजन एकाएकी कमी होणे

शारीरिक थकव्यामुळे कार्यक्षमता मंदावणे

डोकेदुखी आणि चक्करचा त्रास होणे

जननेंद्रीयाला खाज सुटणे

कुठलीही जखम लवकर न भरणे

वारंवार फोड, फुटकळ्या येणे

शरीराला खाज सुटणे

एकाएकी नजर मंदावणे

लहान मुलांनी वारंवार अंथरूणात लघवी करणे

नपुंसकत्व निर्माण होणे.

काय काळजी घ्याल ...

नित्यनियमाने व्यायाम, योग साधना, ध्यान

किमान चाळीस मिनिटे व्यायाम

रोज चार किलोमीटर अंतर चालणे

वय, वजन आणि उंची लक्षात घेऊन आहारावर नियंत्रण ठेवणे.

वर्षातून एकदा रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून घेणे

डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे

आजारापूर्वीच वैद्यकिय विमा उतरवणे



मधुमेहींसाठी आहारवेळ

मधुमेही रुग्णांनी कमी आणि थोड्या अंतराने खात राहावे. यात सकाळचा नाश्ता साडेनऊपर्यंत उरकावा. तसेच जेवण साडेअकरा ते दोनपर्यंत व संध्याकाळचा हलका आहार साडेचार ते साडेपाच या वेळेत घ्यावा. रात्रीचे जेवण सात ते साडेनऊ या वेळेत करावे. रात्रीचे जेवण व झोपेमध्ये किमान २ ते ३ तासांचे अंतर असावे..

काय खावे

रताळे, गाजर(गोड नव्हे), काळी द्राक्षे, स्ट्रॅाबेरी, सफरचंद(हिरवे), कडधान्यात द्विदल मोड आलेली कडधान्ये, पालेभाजीत कारले, मेथी, पालक, आले तसेच अक्रोड खाण्यास प्राधान्य द्यावे.


काय टाळावे

साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ टाळावेत, मिठाई, चीज, बटाटा, चिकन, फ्रूट ज्यूस, सोडा ड्रिंक, मैद्याचे पदार्थ, स्वीट कॉर्न, चायनीज पदार्थ, दारू तसेच अमली पदार्थांचे सेवन टाळावे. रोजच्या आहारात पांढऱ्या भाताचे प्रमाण कमी ठेवावे. त्याऐवजी बाजरी आणि नाचणीचा समावेश करावे..


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणने मागवल्या २६३ कोटींच्या निविदा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारच्या धोरणानुसार यापुढे कृषिपंपाचे कनेक्शन उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारेच होणार आहे. याची निविदा प्रक्रियासुद्धा सुरू झाली असून, कोल्हापूरसाठी ७५ व सांगलीसाठी १८८ कोटींच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार १०, १६ व २५ केव्हीए क्षमतेच्या छोट्या थ्री फेज वितरण रोहित्राद्वारे वीजजोडणी मिळणार आहे. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील १९ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ होईल.

प्रचलित पद्धतीनुसार शेतीला ६३ व १०० केव्हीए क्षमतेच्या रोहित्रावरून वीजपुरवठा केला जातो. एका रोहित्रावर १५ ते २० कृषिपंपांना वीजपुरवठा केला जात असल्याने कमी दाबाने वीजपुरवठा होऊन बिघाड होतात. वीजपुरवठा खंडित होणे, रोहित्र जळणे तसेच तांत्रिक गळती वाढणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर उपाय म्हणून उच्चदाब वितरण प्रणाली राबविण्याचे धोरण आखले आहे. या प्रणालीमध्ये शेतकऱ्यांच्या विहिरीपर्यंत उच्चदाबाची (११ केव्ही) वाहिनी उभारून वीज जोडणी दिली जाणार आहे. ७.५ अश्वशक्ती जोडभारासाठी १० केव्हीएचे, १० अश्वशक्तीसाठी १६, तर त्याहून अधिक भार किंवा शेजारी दुसरे शेतकरी असल्यास २५ केव्हीए क्षमतेचे थ्री फेज रोहित्र खांबावरच बसविले जाणार आहे. त्याच खांबावर रोहित्राच्या खाली मीटर पेटी बसवून जोडणी दिली जाणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात ५४९१ शेतकरी कृषिपंपाच्या जोडणीसाठी प्रतीक्षेत आहेत, तर सांगली जिल्ह्यात १३ हजार ४८७ शेतकरी वीज जोडणीसाठी प्रतीक्षेत आहेत. कोल्हापूरसाठी ७५ कोटी २१ लाखांच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील १८७ कोटी ९५ लाखांच्या निविदा मागविल्या आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच संपूर्ण जोडण्या उच्चदाब वितरण प्रणालीतूनच मिळणार आहेत, अशी माहिती महावितरणच्या वतीने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा अधिकारी हजर

0
0

दहा पोलिस

अधिकारी रूजू

कोल्हापूर

जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात १० अधिकारी बुधवारपासून हजर झाले. यामध्ये दोन सहायक पोलिस निरीक्षकांसह आठ उपनिरीक्षकांचा समावेश आहे. जिल्हापोलिस प्रमुख संजय मोहिते यांनी त्यांच्या नियुक्तीचे आदेश बुधवारी काढले. सर्व अधिकाऱ्यांची पोलिस नियंत्रण कक्षातून जिल्ह्यातील दहा पोलिस ठाण्यात नियुक्ती झाली आहे. बदली झालेले अधिकारी आणि नेमणूक पुढीलप्रमाणे, सहायक पोलिस निरीक्षक संगीता माने (शिरोळ पोलिस ठाणे), सहायक पोलिस निरीक्षक संभाजी काळे (करवीर), पोलिस उपनिरीक्षक महादेव जठार (शाहूवाडी), अजित पाटील (पन्हाळा), रोहिदास पवार (चंदगड), अतुल कदम ( गांधीनगर), सचिन पांढरे (शाहुपूरी), राजेंद्र यादव (शहापूर), निखिल कर्चे (कागल), श्रीधर जगताप (आजरा).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images