Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

रेसिडेन्सी क्लबमार्फत वृक्षारोपण

$
0
0

फोटो आहे....

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रेसिडेन्सी क्लबमार्फत सचिव अमर गांधी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 'महाराष्ट्र होतोय बहारदार, कोल्हापूर बनवू हिरवेगार' या उपक्रमांतर्गत रेसिडेन्सी क्लबमार्फत ठिकठिकाणी रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट असल्याचे गांधी यांनी सांगितले. याप्रसंगी ज्येष्ठ सभासद मदन चव्हाण, सहसचिव नील पंडित, खजानिस शीतल भोसले, सतीश घाटगे यांच्या हस्ते रोपांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन सुधर्म जामसांडेकर यांनी केले. यावेळी सचिन शिरगांवकर, पुनीत गांधी, अशोक सुभेदार, रजनीकांत पाटील, प्रदीप पटेल, चंद्रशेखर डोली, महावीर सौंदती, शेखर आजरी, विजय भिवटे, डॉ. हणमंत पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कात्यायनीचे टपोरा पाऊस...

$
0
0

Maruti.patil@timesgroup.com

Tweet@MarutipMT

कोल्हापूर : पावसाचे थेंब आले तरी काहीजण खिडकी बंद करण्यासाठी सरसावतात, पण घराबाहेर पडलं की हाताच्या ओंजळीत पाऊसधारा घट्ट पकडून ठेवाव्याशा वाटतात. मग पावले आपोआप निसर्गाच्या सानिध्यात पाऊसधारा अनुभवण्यासाठी वळतात. असाच पावसच्या सरी झेलण्यासाठी अनेकांची पावले कात्यायनी परिसराकडे वळतात. गर्द झाडी, डोंगर कपाऱ्यांवरुन वाहणाऱ्या धारा पाहतांना पर्यटक ओलेचिंब होतात. टपोऱ्या पाऊसधारा झेलत शहराचे विहंगम दृश्य आणि कळंबा तलावाचे सौंदर्य मनाला अल्हादायक वाटते.

कोकण असो की देश. सह्याद्री असो की सातपुडा. पावसाची संततधार सुरू झाल्यानंतर अनेकांची पावले पाऊसधारा अनुभवण्यासाठी निसर्गाकडे वळतात. यात शहरापासून जवळची ठिकाणे शोधली जातात. जोवर पाऊस येत नाही तोवर सर्वांचीच तगमग होते आणि मग आला की, चार-दोन दिवसांत त्याचा त्रास वाटायला लागतो. घर, ऑफिस, शाळा, कॉलेज या साऱ्यांमागे धावताना अनेकदा पाऊस वाट अडवून धरतो असचं वाटतं. पण रुटीनमधून बाहेर पडायचं ठरवली की, तोच पाऊस भन्नाट होता हे कळतं.

रोज हात, पाय ओले करणाऱ्या पावसाचे चार-दोन थेंब आले तरी त्यापासून बचावासाठी डारे-खिडक्या पटापट बंद होतात. पण एखादवेळी पावसाच्या सरी अंगावर पडू लागल्यानंतर हाच पाऊस भन्नाट अनुभव देतो. तसाच भन्नाट पाऊस अनुभवण्यासाठी अनेकजण कात्यायनी परिसरात प्राधान्य देतात. धकाधकाच्या जीवनापासून अगदी लांब असलेल्या या ठिकाणी अनेक देशी-परदेशी पक्ष्यांचे थवे पहायला मिळतात. याच परिसरात कळंबा अन् भीमा-शंकर तलाव असल्याने परिसराला अधिक निसर्गाची देणगी लाभली आहे. नवदुर्गांपैकी एक दुर्गा असेलेली कात्यायनी देवी अन् भीमा-शंकराच्या दर्शनाबरोबर पावसात भिजण्याची मजा लुटली जात आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत महाविद्यालयीन युवक-युवतींसोबत एक दिवसाच्या पर्यटनासाठी अनेकजण कात्यायनी परिसराला भेट देतात. सह्याद्रीपेक्षा उंच डोंगररांगा नसल्या, तरी इथल्या डोंगरावरुन कोसळणाऱ्या धारा मनाला अधिक सुखदायी वाटतात. कोसळणाऱ्या धारांसोबत कळंबा तलावाचे, शहराचे विहंगम दृश्य मनाला अधिक अल्हाददायक वाटते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुनावणी बुधवारी

$
0
0

कोल्हापूर : करवीर तालुकाअंतर्गत असलेल्या विधानसभा मतदारसंघातील आक्षेपाधीन मतदारांनी नावासंबंधी योग्य पुराव्यासह व त्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याकडील पुराव्यासह ६ जुलैला सायंकाळी ५.३० वाजता भवानी मंडपातील विद्यापीठ हायस्कूलसमोरील जुन्या प्रांत कार्यालयात सुनावणीस उपस्थित राहावे, असे आवाहन करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयर्न मॅन स्पर्धा

$
0
0

पंधरा कोल्हापूरकर बनले आयर्नमॅन

ऑस्ट्रियातील अतिशय अवघड स्पर्धेत मिळवले यश

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्ण करावी लागणारी स्पर्धा म्हणून आयर्न मॅन स्पर्धेची क्रीडाविश्वात ख्याती आहे. या स्पर्धेत शारीरिक क्षमतेचा कस लागतो. क्रीडा विश्वातील अवघड समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेत कोल्हापूरच्या बारा व इचलकरंजीच्या तीन सुपुत्रांनी आर्यन मॅनचा किताब पटकावत कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवले आहे. ऑस्ट्रियात ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेत जगभरातून ३ हजार खेळाडू सहभागी झाले होते.

बर्फाच्छादित प्रदेश, मायनस डिग्री तापमान अशा आव्हानात्मक वातावरणात १८ ते ९९ वयोगटासाठी ट्रायथलॉन स्पर्धा आयोजित करण्यात येते. स्पर्धेवेळी तापमान १३ अंशावर असूनही खेळाडूंनी कामगिरीत सातत्य ठेवत आगेकूच कायम ठेवली. जलतरण, सायकलिंग, रनिंग हे प्रकार स्पर्धेत पूर्ण करावे लागतात. स्पर्धेची वेळ १६ तास असते. यात ३.८ किलोमीटर जलतरण, १८० किलोमीटर सायकलिंग तसेच ४२.०२ किमी. रनिंगचा समावेश होतो. आदित्य शिंदे, सतीश ननावरे, रौनक पाटील, आशिष तंबाखे, चेतन चव्हाण, विनोद चांदवाणी, उदय पाटील, डॉ. संदेश बागडी, डॉ. विजय कुलकर्णी, डॉ. प्रदीप पाटील, वरद पाटील तसेच इचलकरंजीचे स्वप्नील माने, महेश मेटे, विशाल कोथळे यांनी स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. याशिवाय चेतन चव्हाण (कोल्हापूर), सत्यवान नणावरे व बलराज पाटील (इचलकरंजी) यांचा समावेश आहे. यशस्वी टीमला 'आयर्न मॅन' वैभव बेळगावकर आणि आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील, जलतरण तलावाचे प्रशिक्षक निळकंठ आखाडे, अश्विन भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.

खेळाडू व त्यांनी नोंदवलेली वेळ

आदित्य शिंदे (१० तास ५२ मिनिटे), रौनक पाटील (१४ तास ४ मिनिटे), आशिष तंबाखे (१४ तास ४० मिनिटे), चेतन चव्हाण (१४ तास ५८ मिनिटे), डॉ. प्रदीपकुमार पाटील (१५ तास ५० मिनिटे),संदेश बागडी (१५ तास २९ मिनिटे), उदय पाटील (१५ तास ३३ मिनिटे), विजय कुलकर्णी (१५ तास ३१ मिनिटे), विनोद चांदवाणी (१५ तास ३२ मिनिटे),महेश मेटे (१५ तास ५८ मिनिटे), स्वप्निल माने (१४ तास ४८ मिनिटे, विशाल कोथळे (१५ तास ४० मिनिटे).

१४ वर्षीय वरदची कमाल

स्पर्धेत चौदा वर्षीय वरद पाटील हा वडील उदय पाटील यांच्या सोबत सहभागी झाला होता. अत्यंत खडतर परिस्थितीतही त्याने स्पर्धेत सहभाग नोंदवल्याने त्याचे कौतुक होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्णय स्वागतार्ह पण निवड करणार कोण?

$
0
0

(फोटो आहेत)

निर्णय स्वागतार्ह पण निकषांचे काय?

किंवा

पारदर्शकता ठेवल्यास अभूतपूर्व निर्णय

साहित्य संमेलन अध्यक्ष निवड प्रक्रियेचे साहित्यिकांतून स्वागत

कोल्हापूर

लीड ,

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आता निवडणूक होणार नाही, तर निवड होणार आहे. घटक संस्थांनी सुचवलेल्या तीन साहित्यिकांच्या नावांतून एक नाव निवडण्याचे काम साहित्य महामंडळ करेल. साहित्यिकांसह वाचकांनीही या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, साहित्य संमेलनाचा अध्यक्ष आणि वाद ही परंपरा टाळण्यासाठी अध्यक्षपदाचे निकष काय असणार? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. योग्य निकष आणि निवड मंडळाने पारदर्शकता ठेवल्यास हा निर्णय अभूतपूर्व ठरणार आहे. साहित्यिक गुणवत्तेपेक्षा निवडून येण्याची क्षमता हाच निकष ब‌ळावत होता, त्यामुळे महामंडळाने केलेली घटनादुरुस्ती अनेक कसदार साहित्यिकांना अध्यक्षपदाच्या संधीपर्यंत पोहोचवणार आहे. जाणकार साहित्यिकांमुळ‌े मराठी साहित्यासह भाषेचाही दर्जा सुधारेल आणि खऱ्या अर्थाने संमेलनांमध्ये 'साहित्य' दिसेल. मात्र,अध्यक्षपदाच्या निकषांवरून पुन्हा वाद होऊ नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

............

निवड समितीची मक्तेदारी नको

गेल्या अनेक वर्षांपासून साहित्य महामंडळ आणि संमेलने यावर ठराविक लोकांची मक्तेदारी असलेली दिसते. अखिल भारतीय असे नाव असूनही दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोकण मराठी साहित्य सभा, आदी संस्थांना संलग्नता मिळत नाही. असे प्रकार कधी थांबणार? अध्यक्षपदासाठी निवडणूक थांबवून निवड प्रक्रिया राबवणे स्वागतार्ह आहे. मात्र, यात निवड समितीचा सच्चेपणा आणि पारदर्शकता गरजेची आहे. निवड समितीची मक्तेदारी बनली तर पुन्हा मागे सुरू होते त्याचाच अनुभव येणार. अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा माझा अनुभव वाईट आहे. यात अनेकांचे हितसंबंध दडलेले असतात. संमेलनातील विशिष्ठ गटांचा प्रभाव कमी करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल. याची अंमलबजावणी करणे वाटते तितके सोपे नाही हे महामंडळाने लक्षात घ्यावे. जुना गोंधळ टाळून नवीन प्रक्रिया राबवावी.

चंद्रकुमार नलगे, ज्येष्ठ साहित्यिक

............

उशिरा सुचलेले शहाणपण

साहित्य महामंडळाने यापूर्वीच हा निर्णय घेणे अपेक्षित होते. उशिरा का होईना, पण निर्णय घेतला हे महत्त्वाचे. निवडणूक प्रक्रिया रद्द करून निवड प्रक्रियेतून अध्यक्ष निवडण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. यापूर्वीच हा निर्णय घेतला असता तर कदाचित बा. भ. बोरकर, इंदिरा संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी दिसले असते. निवडणूक प्रक्रियेतून दया पवार, शिवाजी सावंत अशा मोठ्या साहित्यिकांना दगदग सोसावी लागली. निवडून आलेल्या अनेक अध्यक्षांच्या साहित्यिक दर्जाबाबत आजही प्रश्नचिन्ह आहे. केवळ निवडून येण्याच्या क्षमतेवर ते अध्यक्ष बनले. साहित्य आणि भाषेच्या विकासासाठी त्यांनी काय केले, याचे उत्तर आजही मिळत नाही. नव्याने घेतलेला निर्णय साहित्य संमेलनांसह साहित्य आणि मराठी भाषेचाही दर्जा सुधारण्यासाठी उपयुक्त ठरेल. साहित्य संमेलनातील अध्यक्षांची भाषणेही आता दर्जेदार असतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. निवडप्रक्रियेवरून वाद होऊ नयेत एवढीच अपेक्षा.

प्रा. डॉ. राजन गवस, मराठी विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ

.............

टुकार लेखकांना आळा बसेल

गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलन हे साहित्यिकांचे राहिले नसून, ते बिगर साहित्यिकांचे झाले आहे. कधी प्रशासक, कधी लेखकराव, तर कधी ग्रंथसंपादकांनीही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून मिरवून घेतले. राज्यकर्त्यांचा हस्तक्षेप हा पुन्हा वेगळाच मुद्दा. साहित्य संमेलनात साहित्य सोडून सारे काही सुरू होते. याच्या मुळाशी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया कारणीभूत होती. कोणीही टुकार लेखक त्याच्या राजकीय आणि आर्थिक बळावर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बसत होता. आता लेखकराव होऊ पाहणाऱ्यांना आळा बसेल. अध्यक्षांची निवड करण्याची मोठी जबाबदारी साहित्य महामंडळाकडे आली आहे. महामंडळाने जबाबदारीचे भान ठेवून दर्जेदार साहित्यिकांची निवड समिती तयार करावी. ज्यांनी साहित्य क्षेत्रात खरेच चांगले योगदान दिले, त्यांचीच निवड केली जावी. गरज पडल्यास ठराविक वर्षांनी निवड समितीची पूनर्रचना करावी. यामुळे निवड समितीचीही मक्तेदारी होणार नाही.

प्रा. डॉ. रवींद्र ठाकूर, साहित्यिक

..............

निवड प्रक्रियेवरून वाद नकोत

अध्यक्षपदासाठी निवडणूक रद्द करून निवड प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय साहित्य संमेलनातील वादाची परंपरा खंडित करणारा ठरू शकतो. संपूर्ण साहित्य क्षेत्रासाठी हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. निवडणूक प्रक्रियेमुळे अनेक दर्जेदार साहित्यिक अध्यक्षपदापासून दूरच राहिले. विंदा करंदीकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी विचारणा झाली. भालचंद्र नेमाडेंसारखे अनेक साहित्यिक आजही निवडणूक प्रक्रियेमुळेच अध्यक्षपदापासून दूर आहेत. वादाची परंपरा खंडित करण्यासाठी निवड प्रक्रियेचे स्वागत आहे. मात्र, निवड प्रक्रिया पारदर्शक असावी. साहित्य महामंडळाने सहयोगी संस्थांची मते आजमावून घ्यावीत. निवडलेल्या साहित्यिकाच्या नावावरून पुन्हा वाद होऊ नयेत, अन्यथा निवड झालेल्या लेखकाचा आणि त्याच्या साहित्याचाही अपमान होईल. राजकारणविरहित निवड प्रक्रिया राबवल्यास वाद होणार नाहीत, असे वाटते.

बाबा परीट, कथालेखक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपले सरकारसाठी ३१ पर्यंतअर्ज करण्याचे आवाहन

$
0
0

'आपले सरकार सेवा केंद्र' साठी

३१ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर आणि जिल्ह्यातील सर्व महा ई सेवा केंद्र, सेतू, नागरी सुविधा केंद्र तसेच संग्राम केंद्रे यांचे आपले सरकार केंद्रात रूपातंर कण्यात येत आहे. या केंद्रातून सरकारच्या सर्व सेवा देण्यात येणार आहे. याशिवाय ज्यांना आपले सरकार केंद्र हवे आहे, त्यांनी ३१ जुलै २०१८ पूर्वी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी प्रसिध्दी पत्रकातून केले.

प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात एक 'आपले सरकार सेवा केंद्र' सुरू करण्याचे नियोजन आहे. पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांत दोन केंद्रे स्थापन करण्यात येईल. शहरातही याच प्रमाणात केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सध्या कार्यरत आपले सरकार सेवा केंद्राची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.kolhapur.gov.in या वेबसाईटवर आहे. इच्छुकांनी या संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना डाऊनलोड करावा. अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा, असेही पत्रकात म्हटले आहे.

-------------------------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लॉजमधील कुंटणखान्यावर छापा

$
0
0

अभिषेक लॉजमधील

कुंटणखान्यावर छापा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिरोली पुलाची(ता. हातकणंगले) गावाच्या हद्दीत कोल्हापूर-सांगली मार्गावरील अभिषेक लॉजिंग व रेस्टॉरंट मल्टिपर्पज हॉल येथील कुंटणखान्यावर छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत एजंट रोहन भैरवनाथ दाभोलकर (वय २३, रा. पैजारवाडी, ता. पन्हाळा) याला अटक केली असून, दोन पीडित महिलांची सुटका केली. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध विभागाने सोमवारी (ता. २) रात्री ही कारवाई केली.

अभिषेक लॉजिंगमध्ये कुंटणखाना सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध विभागाच्या सहायक पोलिस निरीक्षक प्रियांका शेळके यांना मिळाली होती. शेळके यांनी बनावट ग्राहक पाठवून याची खात्री केल्यानंतर सोमवारी रात्री छापा टाकला. कारवाईदरम्यान दोन पीडित महिला आढळल्या असून यातील एक महिला परप्रांतीय आहे. या दोन्ही महिलांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली. एजंट रोहन दाभोलकर हा लॉजमालक संजय भरत मिठारी (रा. सर्किट हाऊसच्या मागे, कारंडे मळा) आणि मॅनेजर सचिन प्रमोद सिंह (२१, रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) या दोघांच्या मदतीने कुंटणखाना चालवत होता. पोलिसांनी दाभोलकर याला अटक केली असून, तिघांवर गुन्हा दाखल केला. लॉजमालक व मॅनेजर दोघेही पळून गेले असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक शेळके यांनी सांगितले. पोलिस हवालदार आनंदराव गोडसे, रवींद्र गायकवाड, आनंदा पाटील, किशोर पाटील, वैशाली पिसे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्राथमिक’च्या सभापतीपदी अशोक जाधव

$
0
0

दोन फोटो आहेत.

..............

प्राथमिक शिक्षण मंडळ

सभापतीपदी अशोक जाधव

उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे सचिन पाटील

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळ समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे अशोक जाधव तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन पाटील यांची निवड झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. छत्रपती ताराराणी सभागृहात मंगळवारी विशेष बैठकीत ही निवड झाली.

महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समिती सभापतीपदासाठी अशोक जाधव तर भाजप-ताराराणीकडून नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील यांचे अर्ज दाखल केले होते. अर्जांच्या छाननीनंतर दोन्ही अर्ज वैध ठरवल्यानंतर अर्ज माघारीसाठी १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला. सभापतीपदासाठी दोन्ही अर्ज कायम राहिल्याने मतदान घेण्यात आले. यामध्ये जाधव यांना पाच तर खाडे-पाटील यांना चार मते मिळाली. पीठासन अधिकारी डॉ. खेमनार यांनी सभापतीपदी जाधव यांची निवड झाल्याचे जाहीर केले. जाधव हे लक्ष्मीविलास पॅलेस प्रभाग क्रमांक पाचचे प्रतिनिधीत्व करतात. त्यानंतर उपसभापतीपदासाठीही मतदान घेण्यात आले. यामध्ये सचिन पाटील यांना पाच तर मेहजबीन सुभेदार यांना चार मते पडली. शिवाजी उद्यमनगर प्रभागाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पाटील यांनी एका मताने सुभेदार यांचा पराभव करत उपसभापतीपद मिळवले. डॉ. खेमनार यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, सहाय्यक आयुक्त मंगेश शिंदे, प्रशासन अधिकारी शंकर यादव, नगरसचिव दिवाकर कारंडे, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, उमाकांत कांबळे आदी उपस्थित होते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपहरण करून खंडणी उकळणारे तिघे अटकेत

$
0
0

अपहरण करून खंडणी उकळणारे तिघे अटकेत

दमदाटी करून एटीएमवरून काढले २५ हजार रुपये

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॅफेमध्ये मैत्रिणीसोबत कॉफी पिऊन बाहेर आल्येल्या तरुणाचे अपहरण करून त्याच्याकडून २५ हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या तिघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. शिवाजी पेठेतून शनिवारी (ता. ३०) दुपारी अपहरणाचा प्रकार घडला होता. याबाबत संतोष नारायण मंझाले (वय २५), प्रदीप बळीराम मस्के (३२, दोघेही रा. सुधाकर जोशीनगर, कोल्हापूर) आणि सागर अजित गवंडी (२५, रा. निर्माण चौक, ताराराणी कॉलनी) या तिघांना पोलिसांनी अटक केली. अतुल भीमराव प्रज्ञावंत (२१, रा. नागाळा पार्क) याने फिर्याद दिली.

अतुल प्रज्ञावंत हा शनिवारी दुपारी शिवाजी पेठेतील न्यू कॉलेजजवळ श्री कॅफेमध्ये मैत्रिणीसोबत कॉफी पित बसला होता. दीडच्या सुमारास तो कॅफे हाऊसमधून बाहेर आला. याचवेळी तीन अनोळखी तरुणांनी प्रज्ञावंत याच्याजवळ येऊन, तुमचे काय चालू आहे? असे विचारत पैशांची मागणी केली. यातील एकजण प्रज्ञावंत याच्या दुचाकीवर पाठीमागे बसला. त्याने दुचाकी शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्याच्या दिशेने घेण्यासाठी दमदाटी केली. इतर दोघे दुसऱ्या दुचाकीवरून पाठोपाठ आले. या परिसरातील एका बंद घरासमोर दुचाकी थांबवली. या तिघांनी त्याच्याकडे ३० हजार रुपये खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली. त्याच्याकडील मोबाइल आणि पैशांचे पाकीटही काढून घेतले. यानंतर पुन्हा त्याला शिवाजी पेठेत फिरवून देवकर पाणंद येथील कृष्णा हॉस्पिटलच्या समोर महाराष्ट्र बँकेच्या एटीएम सेंटरजवळ नेले. एटीएम सेंटरमधून पैसे काढण्यासाठी दमदाटी केली. जबरदस्तीने एटीएममधून २५ हजार रुपये काढले. त्याचबरोबर पाकिटातील १८०० रुपये असे २६८०० रुपये काढून घेतले. हा प्रकार कुणाला सांगितल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन तिघेही निघून गेले.

अचानक घडलेल्या प्रकाराने अतुल प्रज्ञावंत घाबरला होता. याबाबत त्याने सोमवारी (ता. २) जुना राजवाडा पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. भरदिवसा अपहरण करून खंडणी उकळण्याच्या या प्रकाराने पोलिसही चक्रावले. पोलिसांनी तातडीने याची दखल घेऊन श्री कॅफे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि फिर्यादीने दिलेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. सोमवारी रात्री उशिरा यातील संशयित संतोष मंझाले, प्रदीप मस्के आणि सागर गवंडी या तिघांना अटक केली. कोर्टात हजर केले असता तिघांना शुक्रवारपर्यंत (ता. ६) पोलिस कोठडी मिळाली. यातील मंझाले हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले हे करीत आहेत.

प्रज्ञावंत अभियांत्रिकीचा विद्यार्थी

अतुल प्रज्ञावंत हा नागाळा पार्क येथील असून, गुरुकमल रेसिडेन्सी येथे त्याचे कुटुंबीय राहतात. आष्टा येथील अभियांत्रिकी कॉलेजमध्ये तो शिक्षण घेत आहे. शनिवारी सुट्टी असल्याने तो मैत्रिणीसह न्यू कॉलेज परिसरातील श्री कॅफेमध्ये कॉफी पिण्यासाठी थांबला होता. याचवेळी संशयितही कॅफेमध्ये होते. मुलीसोबत थांबला असल्याने त्याला भीती घालून सहज पैसे उकळता येतील, असे ठरवून तिघांनी अपहरण करून प्रज्ञावंत याच्याकडून पैसे उकळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाकूहल्ला करून तरुणास लुटले

$
0
0

चाकूहल्ला करून

तरुणास लुटले

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तरुणावर चाकूहल्ला करून त्याच्याकडील रोख ३० हजार रुपये आणि सोन्याची चेन असा ५५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार सोमवारी (ता. २) रात्री बालिंगा (ता. करवीर) येथे घडला. याबाबत महादेव सदाशिव शिंदे (वय ३४, रा. सुलोचना पार्क, नवीन वाशी नाका) याने करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांकडून संशयित लुटारुंचा शोध सुरू आहे.

करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव शिंदे हा सोमवारी रात्री बालिंगा गावाहून घरी निघाला होता. यावेळी वाटेत त्यांना दोघांनी अडवले. दोन्ही लुटारुंनी त्यांना लाथाबुक्‍यांनी मारहाण केली. यानंतर एकाने चाकूहल्ला करून शिंदे याच्या पँटच्या खिशातील ३० हजार रुपये काढून घेतले. याशिवाय त्याच्या गळ्यातील सोन्याची चेनही लंपास केली. चाकूहल्ल्यात शिंदे याच्या कंबरेस दुखापत झाली आहे. रोकड आणि सोन्याची चेन घेऊन दोघे लुटारू पळून गेले. जखमी शिंदे याला मित्रांनी उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. त्यानंतर शिंदे याने करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दोघा संशयित लुटारूंपैकी एकाचे नाव राहुल कल्लाप्पा गुरव (रा. सानेगुरूजी वसाहत) असे असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचनाम्यासाठी पालिका अधिकाऱ्यांची दांडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा प्रदूषणास जबाबदार असलेल्या महापालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सोमवारी दिल्या होत्या. नदी प्रदूषणासाठी कारणीभूत स्थळांची पाहणी करून पंचनामे करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी गेले असता, पाहणीला महापालिका अधिकाऱ्यांनी दांडी मारली. त्यामुळे पंचनामेच होऊ शकले नाहीत. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी प्रदूषण नियंत्रणचे सदस्य सचिव डॉ. अनबलगन यांना पत्र पाठवून महापालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदविण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे.

गेल्या काही वर्षांत पंचगंगा नदी प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. प्रदूषणामुळे पिण्याचे पाणी दूषित होत असल्याने शहरासह नदीकाठावरील गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील नाल्यांचे पाणी रोखण्यात महापालिकेला येत असलेले अपयश आणि कार्यान्वित नसलेल्या एसटीपी प्लांटमुळे प्रदूषणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोमवारी पर्यावरण मंत्री कदम यांनी क्षेत्रीय पाहणी करून महापालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या.

सूचनानुसार मंगळवारी देसाई यांनी प्रदूषण मंडळाचे अधिकारी प्रशांत गायकवाड यांची भेट घेऊन पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी केली. गायकवाड यांनी कक्ष अधिकाऱ्यांना पाहणी करण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांनी जयंती नाला, दुधाळी व बावडा येथील पंपिंग स्टेशनची पाहणी केली. मात्र, यावेळी महापालिका अधिकाऱ्यांनी दांडी मारली. शाहूपुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक व मोरे यांनी अनेकवेळा महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, पण एकही अधिकारी पाहणीसाठी आले नाहीत. त्यामुळे प्रदूषित करणाऱ्या ठिकाणांचे पंचनामेच होऊ शकले नाहीत.

क्षेत्र भेटीसाठी महापालिका अधिकारी आले नसल्याने देसाई यांनी पर्यावरण मंत्री कदम यांच्या आदेशाचा भंग झाला असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, असे पत्र डॉ. अनबलगन यांना पाठवले आहे.

०००

कोट

सांडपाणी थेट नाल्यात जात असल्याने अधिकारी पाहणी करण्यासाठी आले होते. पण सांडपाणी थेट नाल्यात न जाता एसटीपी प्लांटमध्ये वळवले आहे. याबाबत प्रदूषणच्या अधिकाऱ्यांचे समाधान झाले आहे. क्षेत्र भेटीसाठी अधिकाऱ्यांनी माहिती दिली होती, पण वेळेत पोहोचण्यापूर्वी त्यांची भेट पूर्ण झाली होती. तसेच पर्यावरण मंत्री कदम यांच्या आदेशानुसार जयंती नाल्यावरील दोन पंप सुरू केले आहेत.

सुरेश कुलकर्णी, जलअभियंता

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील ४२ कि.मी.रस्ते होणार चकाचक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत संशोधन व विकासअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील ४२ किलोमीटरचे रस्ते चकाचक होणार आहे. रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत यांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी २७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून हे रस्ते होणार आहेत.

ग्रामीण भागातील रस्त्यांचा दर्जा अतिशय चांगला राहिला पाहिजे, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची स्थिती चांगली नाही. तसेच ग्रामीण भाग चांगल्या रस्त्यांच्या माध्यमातूनच शहराला जोडला गेल्यास दळणवळण सुविधा वाढल्यास ग्रामीण भागाचा विकास झपाट्याने साधला जाऊ शकतो, हे धोरण ठेवून पालकमंत्री पाटील यांनी दर्जेदार रस्ते करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील हातकणंगले, करवीर, राधानगरी, भुदरगड, आजरा या तालुक्यांतील ४२ किलोमीटरचे रस्ते चकाचक व दर्जेदार होणार आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेकडील आणि इतर ग्रामीण रस्त्यांचा समावेश केला आहे. यासाठी २७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून तो निधी मंजूर झाला आहे. रस्ता केल्यानंतर पुढील पाच वर्षे याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंकाळ्यावर डॉक्टर्स डे साजरा

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डॉक्टर आनंदीबाई जोशी, डॉ. रखमाबाई राऊत, डॉ. कृष्णाबाई केळवकर यांच्या स्मृतीस अभिवादन करुन रंकाळा मॉर्निंग ग्रुपच्यावतीने डॉक्टर्स डे साजरा केला. 'समाजभान' शपथ घेऊन तिन्ही महिल्या डॉक्टर्स यांच्या नावे स्मृती वृक्षाचे रोपण करण्यात आले.

यावेळी डॉ. मनाली मिठारी, डॉ. महावीर मिठारी, डॉ. प्रिया गुरव, डॉ. आनंद गुरव, डॉ. विनायक भोई, डॉ. वृंदा कुलकर्णी, डॉ. भक्ती कुलकर्णी यांचा रोप व पुस्तके देऊन सत्कार केला. कार्यक्रमास संभाजी पाटील व अर्जुन पाटील यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे नियोजन ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी केले. यावेळी पुष्पा कुलकर्णी, चारुलता मार्त, शितल येळावकर, संज्योत जमदग्नी, आनंदराव चिखलीकर, राजा इनामदार, नितीन भोसले, सुनील जाधव, राजा गाडगीळ, प्राचार्य जीनपाल मगदूम, विवेक भिडे, महादेव फल्ले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बरसणाऱ्या सरी...झोंबणारा वारा

$
0
0

पुईखडी

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:@AppasahebMT

कोल्हापूर : नागमोडी वळणाची रस्ते,रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या टुमदार बंगल्याच्या रांगा नजरेत भरत असताना अंगभर वारा लपेटून राहतो. बरसणाऱ्या सरी आणि झोंबणारा वारा अंगावर झेलत पुईखडीतील वाट चालताना पावसाची विविध रुपं मनाला सुखावू लागतात. कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागाला जोडणाऱ्या कोल्हापूरच्या हिलस्टेशनवरुन लांबवर दिसणाऱ्या डोंगररागांनी नेसलेला हिरवाकंच शालू आणि पुईखडी परिसरातील हिरवाई पाहताना भान हरपून जाते. पावसाळ्याच्या कालावधीत तर हा सारा परिसर नवलाइने नटल्यासारखा भासतो.

पुईखडीवर काही ठिकाणी झाडांची दाट गर्दी, पानावरुन टपटपणारे पावसाचे थेंब आणि त्या थेंबांनी शहारुन येणारे अंग ही सुखद अनुभूती मनाला प्रफुल्लित करते. कोण बसथांब्याच्या आडोशाला थांबून पावसाची रुपे न्याहाळत असतो तर उघड्या माळावर स्वच्छंदपणे फिरत पाऊस अंगावर झेलत राहतो. ऊन-पावसाच्या खेळात क्षणाक्षणाला परिसराचे रुप पालटते. कधी ढग दाटून येतात तर कधी सूर्यदर्शनाने सारा परिसर उजाळतो, निसर्गाचा हा देखणा अविष्कार डोळ्याचे पारणे फेडतो. पाऊसवेडा मनांची पावले स्वच्छंदपणे उघड्या माळावर भटकत राहतात. कोल्हापूर-राधानगरी रोडवरील पुईखडी परिसर हा हिरवाईने नटलेला. हिरव्यागार टेकड्या, ठिकठिकाणची उंच झाडे आणि टुमदार बंगल्याचा परिसर. पावसाळ्याच्या कालावधीत तर या साऱ्या परिसराचे रुपच पालटते.

पुईखडी हा परिसर उंचावर असल्याने या ठिकाणावरून कोल्हापूरचा अनोखा नजराणा दृष्टीस पडतो. पावसाच्या सरी अंगावर झेलत कोल्हापूरचे विहंगम दृश्य डोळ्यात साठविताना वेळेचे भान राहत नाही. जयादेवी पी. पाटील पार्क, संकल्पसिद्धी मंगल कार्यालय परिसर, राम मंदिर या साऱ्या परिसरात फेरफटका मारताना पावसाची विविध रुपे नजरेस पडतात. पुईखडीवरुन कोल्हापूरकडील मार्ग आणि पश्चिम बाजूच्या ग्रामीण भागाला जोडणाऱ्या पीरवाडी, वाशीला जोडणारा मार्ग टेकड्यातून जाणारा. वळणावळणाचा रस्ता. बरसणाऱ्या सरी आणि पावसाच्या सरी टेकड्यावरुन वाहत रस्त्यापर्यंत मिसळणाऱ्या. बाइकवरून सैर करतानाची मजा तर काही औरच आहे. एकदा तरी पुईखडीवरुन पावसाचा आनंद लुटण्याची साद घालणाऱ्या या परिसरातून कोल्हापूरचे विहंगम दृश्य मनाला आणखी ताजेतवाने बनविते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संगे पावसाच्या धारा...

$
0
0

चंबुखडी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हिरवीगार उसाची शेती, त्यातून लाल पाण्याचा प्रवाह घेऊन धावणारी नागमोडी भोगावती नदी, जोतिबा व पन्हाळ्यावरील ढगाची दाटी असं विहंगम दृश्य असलेल्या चंबुखडी टेकडीवर सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा सरी झेलण्याची जम्माडी गमंत अनुभवण्याची मजा काही और आहे.

पूर्वेला टेंबलाई, पश्चिमेचा सिद्ध बटुकेश्वर, दक्षिणेला कात्यायणी आणि उत्तरेला जोतिबा या कोल्हापूर शहरावरील सीमेवरील देवता. फुलेवाडी ओलांडली की उजव्या बाजूला शिंगणापूरच्या रस्ता लागतो. छोट्या वळणावळणाच्या रस्त्यांना जाताना जिल्हा परिषद विद्यानिकेतनच्या समोर चंबुखडी टेकडी लागते. चंबखडी टेकडीची पायवाटेवरुन जाताना आजूबाजूचा निसर्गाने नटलेला प्रदेश मनाला मोहवून टाकतो. मंदिराकडे जाण्यासाठी दगडी पायावरुन जाताना गगनबावड्याकडून येणारा सोसाट्याच्या वाऱ्याची झलक पहायला मिळते. थंडगार झोंबरा वारा वाहत असताना चोहोबाजूने बहरलेला हिरवागार निसर्ग डोळ्यात साठवताना देहभान हरपून जावे लागते. चंबुखडी टेकडीवर सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी झेलताना मिळणारा आनंद तर अवर्णनीय असतो. पावसापासून बचावासाठी टेकडीवरील गणपती मंदिराजवळ आडोसा आहे. आडोशाला थांबून समोर दिसणारा पावसाचा खेळ डोळ्यात साठवायला मिळतो. सोसाटयाच्या वाऱ्याने होणारी झाडांच्या पानांची सळसळ, हिरवीगार उसाची शेती आणि त्यातून नागमोडी वळणाच्या नदीपात्रातील लाल भडक पाणी चित्रकाराला कुंचला हातात घेऊन चित्र काढायला प्रवृत्त करावा इतका सुंदर नजारा चंबुखडीवरुन अनुभवायास मिळतो. उत्तरेला पन्हाळा व जोतिबा डोंगर खुणावत राहतो. पाऊसाची सर ओसरल्यावर ऊन पावसाचा खेळ सुरू होतो. पन्हाळा व जोतिबा डोंगरावर अलगद उतरणाऱ्या ढगांची दाटी चंबुखडी डोंगरावरुन पहायला मिळते. सोसाट्याचा वारा, ऊन पावसाचा खेळ आणि थोडी विश्रांती घेऊन पडणारा पाऊस अनुभवने गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाहू समाधिस्थळाचे १५ सप्टेंबरपर्यंत उद्घाटन

$
0
0

फोटो आहेत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाहू समाधिस्थळ येथे बसविण्यात येणाऱ्या मेघडंबरीचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापौर शोभा बोंद्रे यांनी शिल्पकारांना दिले. त्याचबरोबर समाधिस्थळाची उर्वरित कामे ३० ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश बुधवारी प्रशासनाला देत शाहू समाधिस्थळाच्या कामात हयगय न करण्याच्या सक्त सूचना दिल्या. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर शाहू समाधिस्थळाचे १५ सप्टेंबरपर्यंत उद्घाटन करण्यात येणार आहे. महापौर बोंद्रे यांच्यासह आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी शाहू समाधिस्थळ व मेघडंबरीच्या कामाची पाहणी केली.

शाहू समाधिस्थळ व मेघडंबरीचे गेल्या अडीच वर्षांपासून काम सुरू आहे. माजी महापौर हसीना फरास यांनी दोनवेळा पाहणी करून समाधिस्थळाचे काम गतीने करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याचबरोबर उद्घाटनाची डेडलाइनही दिली होती. पण समाधिस्थळाचे काम अद्याप संथगतीने सुरू असल्याने बुधवारी पुन्हा पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी भेट देऊन कामाचा आढावा घेतला. समाधिस्थळाची पाहणी करून महापौर बोंद्रे यांनी काम त्वरित करण्याच्या सूचना केल्या. मेघडंबरी बसवल्यानंतर समाधिस्थळाचे उर्वरित काम दोन दिवसांच काम पूर्ण होईल, असे ठेकेदार व्ही. के. पाटील यांनी स्पष्ट केल्यानंतर सर्व अधिकारी, पदाधिकारी बापट कँप येथील मेघडंबरीच्या कामाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले.

पदाधिकाऱ्यांनी शिल्पकार किशोर पुरेकर यांच्याकडे मेघडंबरीचे काम किती दिवसांत पूर्ण होणार, अशी विचारणा केली. पुरेकर यांनी १५ ऑगस्टपर्यंत मेघडंबरी तयार होईल असे स्पष्ट केले. मेघडंबरी तयार झाल्यानंतर तपासणी होऊन ३० ऑगस्टपर्यंत समाधिस्थळावर बसविण्यात येणार आहे. शिल्पकारांना १५ ऑगस्टची डेडलाइन देत आर्किटेक्ट जाधव व ठेकेदार पाटील यांना दर आठवड्याला कामाचा आढावा घेण्याची सूचना आयुक्त डॉ. चौधरी यांनी दिली. ३० ऑगस्टला समाधिस्थळाचे काम पूर्ण झाल्यानंतर १५ सप्टेंबरपर्यंत उद्घाटन करण्यात येणार असल्याने कामात हयगय न करण्याची सक्त सूचना महापौर बोंद्रे यांनी सर्वच संबंधितांना दिल्या.

यावेळी उपमहापौर महेश सावंत, महिला बालकल्याण सभापती सुरेखा शहा, विरोधी पक्षनेते विलास वास्कर, प्राथमिक शिक्षण सभापती अशोक जाधव, नगसेवक दिलीप पोवार, अफजल पिरजादे मेहजबीन सुभेदार, नगरसेविका माधवी गवंडी, शोभा कवाळे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आर्किटेक्ट इंजिनीअर अभिजित जाधव, ठेकेदार व्ही. के. पाटील यांच्यासह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

००००

संरक्षण भितीच्या कामाला आठवड्यात सुरुवात

शाहू समाधिस्थळाच्या संरक्षण भिंतीचे काम गेल्या काही वर्षांपासून रखडले आहे. भिंतीचे काम लवकर सुरू करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, स्थायी समिती सभेत मुंजरी मिळाल्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे. स्थायी समितीची बैठक झाल्यानंतर आठवड्यात संरक्षण भिंतीच्या कामाला सुरुवात होणार आहे.

...........

इटलीनंतर कोल्हापूर मेघडंबरी

इटली येथील फ्लोरेंस येथे राजाराम महाराजांच्या समाधिस्थळावर मेघडंबरी उभा केली आहे. या मेघडंबरीची प्रतिकृती शाहू समाधिस्थळावर उभारण्यात येत आहे. तीन टन ब्राँझ धातूची मेघडंबरी बनविण्याचे काम सुरू असून यासाठी प्रथम १४ लाखांचा खर्च येणार होता, पण यामध्ये किमान पाच लाखांचा खर्च वाढणार आहे. त्यासाठी अगाऊ निधीची तरतूद करण्यात येणार आहे.

....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय कुरघोडीत समित्या निराधार

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : भाजप, शिवसेनेचे सरकार येऊन चार वर्षे झाले तरी जिल्ह्यातील सर्व संजय गांधी आर्थिक दुर्बल अनुदान योजना समितीच्या अध्यक्षांची निवड झालेली नाही. अध्यक्ष आणि समितीची निवड त्या तालुक्यातील आमदारांच्या अध्यक्षतेखाली होते. मात्र त्यास पालकमंत्र्यांची शिफारस बंधनकारक आहे. समितीच्या अध्यक्षपदावर सत्ताधारी भाजप, शिवसेनेने दावा केला आहे. मात्र या दोन्ही पक्षातील अंतर्गत कुरघोडीमुळे गगनबावडा, राधानगरी, पन्हाळा तालुक्यातील समिती आणि अध्यक्षपदच निराधार झाले आहेत. त्यामुळे तालुक्यातील गरजू, तळागाळातील लाभार्थीपर्यंत पोहचणे अडचणीचे होत आहे.

अपंग, विधवा, वृध्द निराधार लोकांचे जगणे सुसह्य करण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेची अंमलबजावणी केली जाते. या योजनेतून पात्र लाभार्थीला दर महिन्याला ६०० ते ९०० रूपये दिले जातात. लाभार्थी निवडीसाठी प्रत्येक तालुक्यात समिती असते. समितीने मान्यता दिलेल्या लाभार्थीस अुनदान सुरू होते. भाजप, सेनेचे सरकार आल्यानंतर २०१४ मध्ये जुन्या समित्या बरखास्त करण्यात आल्या. संबंधित विधानसभा मतदारसंघातील आमदारांच्या अध्यक्षतेखाली नव्या समितीची स्थापना करून अध्यक्ष निवड करावी लागते. त्यास पालकमंत्र्यांची शिफारस आवश्यक असते.

जिल्ह्यातील अधिकाधिक समित्यांवर भाजपच्या कार्यकर्त्याला संधी देण्याचा प्रयत्न झाला. उलट शिवसेना, राष्ट्रवादीच्या आमदारांना आपल्या मतदारसंघातील तालुका समिती अध्यक्षपदी जवळच्या कार्यकर्त्याची वर्णी लागावी, यासाठी प्रयत्नशील आहे. या कुरघोडीमुळे अध्यक्षपदाच्या नावावर एकमत होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या सरकारचा कार्यकाळ संपत आला तरी चार तालुक्याचे समिती अध्यक्ष आणि अशासकीय सदस्यांची नियुक्ती झालेली नाही. या तिन्ही तालुक्याचे आमदार शिवसेनेचे आहेत.

डोंगराळ तालुके

पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा तालुक्यातील संजय गांधी आर्थिक दुर्बल अनुदान योजना समितीची स्थापना झालेल्या नाहीत. त्यामुळे चार वर्षांपासून समितीचा कारभार अध्यक्षाविना सुरू आहे. त्यामुळे सचिव म्हणून तहसीलदारच कामकाज पाहत आहेत. परिणामी जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत या तीन तालुक्यांतील लाभार्थींची संख्या कमी आहे. त्याचाच संदर्भ घेत यापूर्वीच्या सनियंत्रण समितीच्या बैठकीत खासदार राजू शेट्टी यांनी डोंगराळ तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी का कमी आहेत, तीन तालुक्यातील सर्व लोक श्रीमंत आहेत का, निराधार कुणीही नाही का? असा प्रश्न विचारला होता. त्यानंतही फारशी सुधारणा झालेली नाही.

शिरोळला आमदारच अध्यक्ष

समितीचे तालुकानिहाय अध्यक्ष असे : उत्तर विधानसभा मतदारसंघ : किशोर घाटगे, दक्षिण : तानाजी पाटील, करवीर : राजेंद्र दिवसे, कागल : धनराज घाटगे, शाहूवाडी : सर्जेराव पाटील, हातकणंगले : महेश चव्हाण, इचलकरंजी : विलास रानडे, शिरोळ : आमदार उल्हास पाटील, भुदरगड : प्रकाश पाटील, गडहिंग्लज : अनिल खोत, आजरा : अरूण देसाई, चंदगड : माजी आमदार गोपाळराव पाटील.

----------

तीन तालुके वगळता इतर ठिकाणी संयज गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती झाली आहे. ज्या तालुक्यात समितीचे अध्यक्ष नाहीत तेथे तहसीलदार काम पाहतात. तीन समितीवर अध्यक्ष का निवडलेले नाहीत, त्याबाबतची माहिती नाही.

अरविंद काटकर, उपजिल्हाधिकारी (महसूल)

------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात २५ हजारकामगार नोंदणीचे उद्दिष्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत इमारत व इतर बांधकाम कामगार नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यात २५ हजार कामगार नोंदणीचे उद्दिष्ट आहे. मात्र त्यापेक्षा अधिक कामगारांची नोंदणी करण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकातून दिली.

कामगारमंत्री संभाजी पाटील - निलंगेकर, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत नागपूर येथून योजनेचा इ-शुभारंभ बुधवारी झाला. त्यानंतर झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे माहिती देण्यात आली. त्यानंतर प्रातिनिधी स्वरूपात निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे यांच्या हस्ते काही कामगारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव, कामगार अधिकारी यशवंत हुंबे, राहुल तोडकर, चंद्रकांत पोवार, नरोत्तम लाटा, पराग जोशी आदी उपस्थित होते.

----------------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

११ विदेशी बॉक्स जप्त

$
0
0

फोटो आहे

विदेशी मद्याचे ११ बॉक्स जप्त

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चारचाकी वाहनाचा पाठलाग करून राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध ब्रँण्डच्या गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे ११ बॉक्स जप्त केले. या मालाची वाहनासह किंमत १ लाख ३२ हजार रूपये आहे. या प्रकरणी पंकज गजानन धाडणकर (वय २६, रा. २३९८, ए वॉर्ड, वांगी बोळ, शिवाजी पेठ) याला ताब्यात घेतले आहे.

एका वाहनातून मद्याचे बॉक्स नेत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने शिवाजी पेठ येथे सापळा लावून मारूती सुझुकी ८०० ( एम एच- ०३ एस ८४८१) या वाहनाचा पाठलाग केला. वाहनाची तपासणी केली असता विविध ब्रँण्डच्या गोवा बनावटीचे विदेशी मद्याचे बॉक्स लपविल्याचे निदर्शनास आले. वाहनांतून ११ बॉक्स जप्त करण्यात आले असून त्याची किंमत ७२ हजार रूपये इतकी आहे. विभागाचे जिल्हा अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. या कारवाईत भरारी पथकाचे निरीक्षक एस. एस. बरगे, दुय्यम निरीक्षक के. बी. नडे, जे. एन. पाटील, संदीप जानकर, सचिन काळेल, सागर शिंदे, जय शिनगारे, आर. एच. पिसे, वैभव मोरे आदींनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी सावकारी प्रकरणी दोघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खासगी सावकारी केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी माधल बाळेस खडी (वय ४०, रा. कोणूर चाळ,न्यू शाहूपुरी,मूळ रा. मुनशाळ, पेजी, गोकाक) आणि बसवराज शेकाप्पा चिलकंडे (वय २५ रा. सपटल, ता. सौंदत्ती) या दोघांना अटक केली. त्यांच्यावर महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली. या प्रकरणी बाळाबाई वडेर उर्फ लगळी (वय ४५, शाहूपुरी ३ री गल्ली) यांनी फिर्याद दाखल केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लगळी यांनी खडी आणि चिलकंडे यांच्याकडून दहा टक्के व्याज दराने सुमारे एक लाख रुपयांची रक्कम पतीच्या आजारपणाच्या उपचारासाठी घेतली. त्यांनी १५ एप्रिल २०१७ पर्यंत ३ लाख ६० हजार रूपयांची परतफेडही केली. तरीही व्याजापोटी अजूनही १ लाख ७० हजार रूपये देणे लागत असल्याचा तगादा खडी आणि चिलकंडे यांनी लावला. फिर्यादी निरक्षर असल्याचा फायदा घेऊन अडीच लाख रूपये देणे लागत असल्याचे लिहून घेतले. पैसे नाही दिले तर ट्रॅक्टर द्यावा लागेल, असे करारपत्रही केले. नोव्हेंबर २०१७ मध्ये फिर्यादीच्या दारात लावलेल्या ट्रॅक्टर जबरदस्तीने काढून घेतला.

बाळाबाई लगळी यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी दोघांना अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images