Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कोथिंबीर, लिंबू झाला स्वस्त

$
0
0

फ‌ळभाज्यांचे दर कडाडले

आवक जेमतेम, कोथिंबीर, लिंबू झाले स्वस्त

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या काही दिवसांत पावसाची सातत्याने उघडझाप सुरू असल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या आवकेवर होत आहे. फळभाज्या व पालेभाज्यांची आवक जेमतेम असल्याने दर वाढले आहेत. मात्र कोथिंबीर व लिंबूच्य दरात चांगलीच घसरण झाली. कोथिंबीरीच्या एका पेंडीचा दर २५ रुपयांवरून दहा रुपये झाला असताना लिंबूची ढिगावर विक्री सुरू झाली आहे. इतर फळभाज्यांच्या दरात मात्र चांगलीच वाढ झाली आहे.

खरीप हंगामाच्या पेरणीमुळे सध्या जिल्ह्यातील भाजीपाला पिकाखालील क्षेत्रात चांगलीच घट झाली. शहरात प्रामुख्याने पर जिल्ह्यातून भाजीपाल्याची आवक होत असल्याने दरामध्ये वाढ झाली आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याची किरकोळ प्रमाणात आवक सुरू आहे. भाजीपाल्याच्या दरात वाढ होत असली तरी त्याला कोथिंबीर आणि लिंबू हे त्याला अपवाद ठरले आहेत.

गेल्या काही दिवसांत कोथिंबीरच्या एक पेंडीचा दर २५ ते ४० रुपयांपर्यंत पोहोचला होता. गेल्या आठवड्यात २५ रुपये दर असताना रविवारच्या बाजारात हाच दर दहा रुपयांवर आला. दर कमी असताना ग्राहकांची मागणी कमी दिसत होती. उन्हाळ्यामध्ये एक लिंबूची विक्री पाच ते दहा रुपयांना होत होती. आता गेल्या आठवड्यापासून लिंबूची ढिगावर विक्री सुरू आहे. दहा रुपयाला दहा ते २० लिंबू मिळत आहेत. इतर फळभाज्यांच्या दरात चढ-उतार होत आहेत. सर्व फळभाज्यांच्या दरात या आठवड्यात वाढ झाली आहे.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो)

वांगी - ७०

टोमॅटो - २०

भेंडी - ४०

ढबू मिरची - ४०

जवारी गवार - ५०

दोडका - ६०

कारली - ५०

वरणा - ६०

ओली मिरची - ४०

..............

कांदा - १६ ते २०

बटाटा - ३०

लसूण - ३०

आले - ११०

................

पालेभाजी दर (पेंडी, रुपयांत)

मेथी - २०

पोकळा - १५

पालक - १०

शेपू - १५

कोथिंबीर - १०

.................

फळांचे दर (प्रतिकिलो)

संत्री - १००

मोसंबी - ४०

चिकू - ४०

डाळींब - २० ते ४०

सफरचंद - १८० ते २००

केळी - २५ ते ३० (डझन)

जवारी केळी - ४० ते ५० (डझन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेकापची निदर्शने...

$
0
0

प्लास्टिक बंदीसाठी

शेकापची निदर्शने

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारच्या प्लास्टिक बंदीचा निर्णय मागे घेण्याच्या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली. छत्रपती शिवाजी चौक येथे आंदोलन झाले. 'संपूर्ण प्लास्टिक वापर व त्याच्या उत्पादनावर बंदी झाली पाहिजे' अशी भूमिका पक्षातर्फे मांडण्यात आली.

प्लास्टिक बंदीबाबत सरकारची भूमिका म्हणजे धरसोडवृत्तीची आहे. किरकोळ व्यापाऱ्यांना काही अटी व शर्तीवर प्लास्टिक पिशव्या वापरास परवानगी दिल्यामुळे प्लास्टिक पिशव्यावरील बंदीचा प्रमुख हेतूच साध्य झाला नाही. किरकोळ व्यापाऱ्यांना दिलेल्या सवलतीमुळे प्लास्टिक वस्तूंची खुलेआम विक्री सुरू झाली. काही व्यापाऱ्यांनी जादा दराने विक्री करत काळाबाजार सुरू केला. व्यापारी व काही हॉटेल व्यावसायिकाकडून पॅकिंग चार्जेस म्हणून जादा पैसे आकारत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली.

आंदोलनात पक्षाचे सरचिटणीस बाबूराव कदम, प्राचार्य टी. एस. पाटील, सुभाष सावंत, संग्राम माने, युवा आघाडीचे शहराध्यक्ष स्वप्निल पाटोळे, राजेंद्र कोतमिरे, दिलीपकुमार जाधव, मधुकर हरेल आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदूषणमुक्तीचे आणखी एक पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका विविध पातळ्यांवर प्रयत्नशील आहे. दुधाळी नाल्यातून मोठ्या प्रमाणात मिसळणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने उभारलेले दुधाळी सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) कार्यान्वित केले आहे. हा प्रकल्प १७ एमएलडी क्षमतेचा आहे. तब्बल २१ कोटी ५० लाख रुपये खर्चून हा प्रकल्प साकारला आहे.

शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने यापूर्वी कसबा बावडा रोडवर ७६ एमएलडी क्षमतेचा प्रकल्प उभारला आहे. दरम्यान, दुधाळी नाल्यातून पंचगंगा नदीत मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी १७ एमएलडी क्षमतेचा आणखी एक प्लँट दुधाळी परिसरात निश्चित केला. साडेतीन वर्षांच्या प्रयत्नानंतर दुधाळी एसटीपी सुरू करण्यात रविवारी यश आले. दुधाळी नाल्यावर बंधारा बांधून संपूर्ण सांडपाणी अडविले आहे. नवीन संप वेलमध्ये पाणी उचलून दोन बेसिनमध्ये जैविक प्रक्रिया होणार आहे. गेल्या महिन्यात एसटीपीचे काम पूर्ण झाले होते. मात्र, विद्युत कनेक्शनवरून महापालिका व महावितरण यांच्यामध्ये एकवाक्यता निर्माण झाली नाही. महापालिकेच्या डिझाइनमध्ये काही बदल सुचविले.

महावितरणकडून रविवारी विद्युत जोडणी झाल्यामुळे महापालिकेचा मार्ग सुकर झाला. अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, प्लँट मॅनेजर संजय कदम, लक्ष्मी इंजिनीअर्सचे शहा यांच्या उपस्थितीत सांडपाणी प्रक्रिया केंद्राची सुरुवात करण्यात आली. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी गेले काही दिवस प्रयत्नशील होते. शनिवारी रात्रीही उपअभियंता आर. के. पाटील व इतर अधिकारी प्रकल्पस्थळी उशिरापर्यंत थांबून कामाचा आढावा घेत होते.

दुधाळी सांडपाणी प्रकिया केंद्र सुरू झाल्यामुळे पंचगंगा नदीमध्ये मिसळणारे सांडपाणी कमी होणारे आहे. शिवाय सांडपाणी अडवून त्यावर प्रक्रिया होणार असल्यामुळे प्लास्टिक व केरकचरा नदीत मिसळणार नाही. सानेगुरुजी वसाहत, दुधाळी परिसर, जुना वाशी नाका परिसर, टिंबर मार्केट परिसर या भागातील सांडपाणी अडवून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. या प्रकल्पाविषयी बोलताना पाणीपुरवठा विभागाचे जल अभियंता सुरेश कुलकर्णी म्हणाले, 'दुधाळी नाल्यावर बंधारा बांधून संपूर्ण सांडपाणी अडविले आहे. नवीन संप वेलमध्ये पाणी उचलून दोन बेसिनमध्ये जैविक प्रक्रिया होणार आहे. रविवारपासून या प्रकल्पाला सुरुवात झाली. सांडपाण्यावर जैविक प्रक्रिया होण्यासाठी काही कालावधी लागतो. येत्या आठ ते दहा दिवसात प्रकल्प टप्प्याटप्प्याने प्रकल्प क्षमतेने कार्यान्वित होईल.'

०००

रामदास कदम आज जिल्हा दौऱ्यावर

पर्यावरणमंत्री रामदास कदम सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत सर्किट हाउस येथे पंचगंगा नदीच्या स्वच्छतेसंदर्भात बैठक होणार आहे. या बैठकीत महापालिका पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या उपाय योजनांची माहिती सादर करणार आहे.

.................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अफवा पसरवण्याऱ्यावर कारवाईचा पोलिसांचा इशारा

$
0
0

अफवा पसरवणाऱ्यांवर

कारवाईचा इशारा

कोल्हापूर : लहान मुले चोरणारी टोळी आली आहे अशी अफवा सोशल मिडियावर पसरवून समाजात भितीचे वातावरण पसरवणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असा इशारा कोल्हापूर पोलिसांनी दिला. धुळ्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाई करण्याचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

पोलिसांनी पत्रकात असे म्हटले आहे की, सध्या सोशल मिडियावरून काही अनोळखी व्यक्तीचे किंवा महिलांचे फोटो दाखवून अशा व्यक्ती मुले चोरणाऱ्या टोळीतील आहेत, अशी अफवा पसरवली जात आहे. त्यामुळे समाजात भीतीचे वातावरण पसरले जात आहे. अफवांमुळे ज्या व्यक्ती अशा घटनांशी संबंधित नसतात, त्यांना विनाकारण समाजातील लोकांकडून मारहाण केली जात आहे. अफवांचे पीक पसरवणाऱ्यांवर कोल्हापूर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे. चुकीचे मेसेज प्रसारित करणाऱ्या व्यक्तींवर कोल्हापूर पोलिस दलाकडून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादाची टिक टिक कायम

$
0
0

शहराध्यक्षपदाचा वाद संपेना

राष्ट्रवादीतील गोंधळ, आठवडाभरात निर्णयासाठी हालचाली

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:@Appasaheb_MT

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शहराध्यक्षपदासाठी मुलाखती घेऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला, मात्र शहराध्यक्षपदासाठी एकमत न झाल्यामुळे निवड लांबणीवर पडली आहे. आजी-माजी अध्यक्षांसह माजी नगरसेवकांनीही शहराध्यक्षपदासाठी शड्डू ठोकला आहे. चौघांपैकी एकाची निवड झाल्यास अन्य तिघे नाराज होणार, पक्षांतर्गत नाराजी उद्भवणार म्हणून जिल्हा नेतृत्वाने 'थंडा करके खाओ' या नीतीचा अवलंब केल्याची चर्चा पक्षातच सुरू आहे. पक्षाच्या अन्य शहरांतील पदाधिकारी निवडी जाहीर होत असताना, कोल्हापूर शहर अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या हालचाली सुरू आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदासाठी २६ एप्रिल रोजी मुलाखती झाल्या. विद्यमान शहराध्यक्ष राजू लाटकर, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आर. के. पोवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आदिल फरास, माजी नगरसेवक अनिल कदम, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर अशा सहा जणांनी शहराध्यक्षपदासाठी दावा केला. मात्र लाटकर, पोवार, फरास आणि कदम हे चौघे प्रमुख दावेदार समजले जातात.

दरम्यान, मुलाखतीवेळी पक्षाचे शहरात १७२३० सभासद व १७२३ क्रियाशील सदस्य असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेत सत्ताधारी पक्ष. पंधरा नगरसेवक पक्षाचे आहेत. महापौर पदासह उपमहापौर, स्थायी समिती सभापती अशी महत्वाची पदे नगरसेवकांनी भूषविली आहेत. पक्ष सत्तेवर असला तरी सुरुवातीपासूनच शहरात संघटनात्मक जाळे प्रभावीपणे विणले नसल्याचे कार्यकर्तेच खासगीत सांगतात. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शहरात वर्चस्व मिळविण्यात पक्षाला अपयश येत असल्याचे दिसते. आता आगामी लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभेची निवडणूक असल्यामुळे शहराध्यक्षपदासाठी अनेकजण पुढे सरसावले आहेत. त्यामुळे चुरस वाढली आहे.

वरिष्ठांची मर्जी, मुश्रीफांची जवळिक

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांचे समर्थक अशी आर. के. पोवार यांची ओळख. पवारांच्या मर्जीतील नेते, कार्यकर्त्यांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. त्यांनी अनेक वर्षे शहराध्यक्षपद सांभाळले. विधानसभा निवडणूकही लढविली. विद्यमान शहराध्यक्ष राजू लाटकर, 'युवक'चे पदाधिकारी आदिल फरास हे आमदार मुश्रीफ यांचे 'हार्ट' समजले जातात. पक्षीय कामासोबतच त्यांनी महापालिकेत प्रतिनिधीत्व केले आहे. दोघांनीही स्थायी समिती सभापतिपद भूषविले आहे. तिघांनीही शहराध्यक्षपदासाठी दावा करण्यामागे विधानसभेची निवडणूक हेच प्रमुख कारण आहे. विधानसभा निवडणूक लढविण्याची तिघांचीही ईच्छा आहे. माजी नगरसेवक अनिल कदम यांनी शहराध्यक्षपदासाठी दावा केला आहे. त्यामुळे या निवडीवरुन जिल्हा नेतृत्वासमोर पेच निर्माण झाला आहे. एकाला संधी देऊन तिघांना डावलल्याने पक्षातंर्गत नाराजी उद्भवू शकते असे गृहीत धरून निवडीबाबत चालढकल सुरू आहे.

कोल्हापूर शहराध्यक्ष निवडीबाबत आठ दिवसांत निर्णय होईल. या आठवड्यात मुंबईत पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्यासोबत बैठक होईल. त्यामध्ये चर्चा होऊन शहराध्यक्षपदाचा निर्णय होईल.

- दिलीप पाटील, निवडणूक निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रणदिवे कार्यमुक्त

$
0
0

रणदिवे कार्यमुक्त

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील घानवडे येथील सत्यम प्रभू यांना सर्पदंश झाला होत. त्याला उपचारासाठी हसूर दुमाला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी अमित पोळ आणि रश्मी रणदिवे या गैरहजर होते. परिणामी वेळीच उपचार न झाल्याने प्रभू यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोळ, रणदिवे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी निलंबित केले आहे. त्यापैकी रणदिवे यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश सीईओ खेमनार यांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व मृत भिक्षुक?

$
0
0

पाचही जण मंगळवेढ्यातील डवरी गोसावी समाजाचे

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून साक्री तालुक्यातील राईनपाड्यात जमावाच्या अमानूष मारहाणीत मृत्युमुखी पडलेले पाच जण हे भिक्षुक असल्याची माहिती हाती आली आहे. भिक्षुकीसाठीच रविवारी ते गावात आले आणि स्थानिकांच्या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

मारहाणीत मृत झालेले पाचही जण मंगळवेढा परिसरातील डवरी गोसावी समाजाचे असून या घटनेने या समाजात दहशतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवेढा तालुक्यातील खवे येथील दादाराव भोसले, भारत भोसले आणि भारत माळवे यांच्यासह मानेवाडी येथील आप्पा इंगोले आणि कर्नाटक सीमेवरील राजू भोसले या पाच जणांचा या मारहाणीत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावांत डवरी गोसावी समाज वास्तव्यास आहेत. बहुतांश परिवारांना शेतीवाडी नसल्याने हे कुटुंब देशभर फिरतात व कुटुंबाची उपजीविका चालवितात. मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी, खवे, गणेशवाडी, निंबोणी जिंती या परिसरातील शेकडो कुटुंबे सध्या बाहेर असून, रविवारच्या घटनेमुळे डवरी गोसावी समाजात प्रचंड भीतीचे वातावरण आहे.

या घटनेत मृत झालेल्या दादाराव भोसले यांच्यामागे वयोवृद्ध आई असून, त्यांची पत्नी व भाऊ हे त्यांच्यासोबतच बाहेर भटकंती करतात. तर मानेवाडी येथील आप्पा इंगोले अविवाहित असून, त्याच्या मागे आई आणि एक भाऊ असा परिवार आहे. या घटनेनंतर मंगळवेढा पोलिसांनी गावात बंदोबस्त ठेवला आहे.

अफवेतूनच मारहाण

'धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेचा मी निषेध व्यक्त करतो. अफवाच्या माध्यमातून ही घटना घडली असून, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ही लोकं होती. ते ज्योतिषी पाहणे किंवा भिक्षुकी मागणे यासाठी आले असल्याचे समजत आहे. घटना घडवून आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांशी बोलणे झाले आहे', अशी माहिती धुळ्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. तर 'राईनपाड्यात घडलेल्या घटनेत लोकांनी एकत्र येत पाचही जणांची चौकशी न करता त्यांना मारहाण केली. या घटनेपूर्वीही धुळे व नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून अशा घटना घडत असून, गावकऱ्यांनी त्या सर्वांना पोलिसांच्या हाती द्यायला पाहिजे होते. पण कायदा हातात घेतल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली', असे साक्रीचे आमदार डी. एस. अहिरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंद्रभागेत मानवी विष्ठेचे विषाणू सर्वाधिक

$
0
0

पंढरपूर :

वारकरी संप्रदायाची सर्वात पूजनीय असलेली चंद्रभागा नदी सर्वात जास्त प्रदूषित बनत चालली आहे. मानवी विष्ठेचे सर्वाधिक विषाणू चंद्रभागेत असल्याचे स्फोटक वास्तव रविवारी झालेल्या ‘क्षमा मी चंद्रभागा’ या परिषदेत अभ्यासकांनी समोर आणले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी नमामी चंद्रभागा परिषदेची घोषणा करीत चंद्रभागा प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना केली होती. मात्र, निधी येऊनही कोणतेही ठोस काम होऊ शकले नव्हते. यासाठी नेमलेल्या प्राधिकरणालाही विशेष अधिकार नसल्याचे याचे काम कागदावरच राहिले आहेत. या सर्व प्रकारचा निषेध करीत भीमा नदी प्रदूषण मुक्तीला गती मिळण्यासाठी रविवारी राज्यातील जल अभ्यासकांनी एकत्र येत क्षमा मी चंद्रभागा परिषदेचे आयोजन केले होते. जल प्रदूषण विरोधी कृती समितीने या परिषदेचे आयोजन केले होते. यासाठी आंतराष्ट्रीय नदी खोरे जलतज्ज डॉ. विजय परांजपे, अॅड. असीम सरोदे, भीमा नदी नीरु रक्षा रायतू वर्ग समितीचे अध्यक्ष पंचप्पा कलबुर्गी, शामसुंदर सोन्नर, असे मान्यवरांना जलतज्ज्ञ अनिल पाटील यांनी एका मंचावर आणून ही परिषद आयोजित केली होती.

असे होते प्रदूषण

भीमेच्या उगमाचे थोडे अंतर सोडल्यावर ती दोन महापालिका, दहा नगरपालिका, दहा औद्योगिक वसाहती, खाजगी औद्योगिक क्षेत्रे, खाजगी व सहकारी साखर कारखान्यांसह जवळपास एक कोटी लोकसंख्येने निर्माण केलेल्या सांड पाण्याने नदी मरणासन्न अवस्थेत पोचल्याचे अभ्यासकांनी समोर आणले. या पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनाचे प्रमाण अनेक ठिकाणी शून्यावर पोचले असून, मानवी विष्ठेतील विषाणूंची संख्या प्रतिलिटर २ ते ५ हजारांवर पोचल्याचे स्फोटक वास्तव समोर आणले आहे. जे पाणी आजही लाखो भाविक पिण्यासाठी वापरातात. लाखो वारकरी पवित्र तीर्थ म्हणून घेतात, त्या पाण्यात मानवी विष्ठेतील सर्वात जास्त विषाणू असल्याचे भीषण वास्तव या परिषदेत मांडण्यात आले.

केंद्र-राज्य सरकारने माफी मागावी

देश आणि राज्यातील नद्यांचे प्रदूषण करणाऱ्या राजकीय नेत्यांसह औद्योगिक वसाहती, महापालिका आणि इतर घटकांवर समाजातील वकील आणि इतरांनी न्यायालयात फौजदारी खटले दाखल करण्याचे आवाहन या वेळी अॅड. असीम सरोदे यांनी केले. जे घटक समाजाचे आरोग्य आणि स्वास्थ्य धोक्यात आणतात त्यांच्यावर अधिकारांचा वापर करून गुन्हे दाखल करण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. आज केंद्र आणि राज्य सरकारला नद्यांचे प्रदूषण रोखण्यात आलेल्या अपयशाबद्दल देशातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गांजा विक्रेता अटकेत

$
0
0

गांजा विक्रेता अटकेत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजारामपुरीच्या १२ व्या गल्लीतील एका घरातून पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी सुमारे दीड किलो गांजा जप्त केला होता. याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी (ता. २) किरण मनोहर अवघडे (वय ४४) या विक्रेत्यास अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. गांजा विक्रेत्याच्या अटकेने मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजारामपुरी येथील १२ व्या गल्लीतील राहणारा किरण अवघडे हा गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून अवघडे याच्या घरातून १५ हजार ५०० रूपये किमतीचा दीड किलो गांजा पकडला होता. सोमवारी त्याला शाहू मिल परिसरातून अटक केली. अवघडे हा मिरजेतून गांजा आणून विकत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. अवघडे याची सासूरवाडी मिरज असून त्याचा मेहुणा गांजा पुरवत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. मागणीनुसार अवघडे हा शहरात विविध ठिकाणी गांजा विक्री करीत होता. मिरजेतून गांजा येत असल्याची माहिती मिळाल्याने मिरजेतील संशयितांचीही चौकशी पोलिसांकडून होणार आहे. यातून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी वर्तवली आहे. अटकेतील अवघडे याचे कॉल डिटेल्स तपासण्याचे काम सुरू आहे. फौजदार अण्णाप्पा कांबळे अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्ष्मीपुरी बाजारातून महिलेचे दागिने लंपास

$
0
0

लक्ष्मीपुरी बाजारातून

महिलेचे दागिने लंपास

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लक्ष्मीपुरी येथील आठवडी बाजारातून महिलेचे पर्समधील तीन तोळ्यांचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले. याबाबत सुनीता अरुण प्रभावळे (वय ३३, रा. जयभारत कॉलनी, फुलेवाडी रिंगरोड) यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. प्रभावळे या रविवारी दुपारी तीनच्या सुमारास लक्ष्मीपुरीत बाजारात खरेदीसाठी गेल्या होत्या. दुर्गामाता मंदिरासमोर गर्दीत त्यांच्याकडील पर्समधील दीड तोळ्याचे मंगळसूत्र आणि सव्वा तोळ्याची सोन्याची चेन चोरट्याने लंपास केली. काही वेळाने हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी आसपास शोध घेतला. मात्र, दागिने सापडले नाहीत. याबाबत त्यांनी सोमवारी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजबाहेर हुल्लडबाजांवर कारवाई

$
0
0

हुल्लडबाजांवर कारवाई

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील शाळा व कॉलेजच्या बाहेर टवाळखोरी करणाऱ्या हुल्लडबाजांवर पोलिसांनी सोमवारी (ता. २) कारवाई केली. विवेकानंद कॉलेज, महावीर कॉलेज, कमला कॉलेज, न्यू कॉलेज याबरोबरच बिंदू चौक, राजाराम तलाव परिसरात पोलिसांनी २४ तरुणांना पकडले. त्यांना पोलिस ठाण्यात नेऊन समज देऊन सोडण्यात आले. याशिवाय कॉलेज परिसरात भरधाव वाहन चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७ तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक राणी पाटील, कॉन्स्टेबल अश्विनी पाटील आदींनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात १६ अर्ज

$
0
0

जिल्हास्तरीय लोकशाही

दिनात १६ अर्ज

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

' जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये नागरिकांकडून १६ तक्रार अर्ज देण्यात आले. तक्रार अर्जाचा संबंधित सरकारी यंत्रणांनी तत्काळ निपटारा करावा', असे आदेश उपजिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात उपजिल्हाधिकारी काटकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. लोकशाही दिनात महसूल व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेसंबधित प्रत्येकी दोन, जिल्हा परिषद व पोलिस अधीक्षक कार्यालय संबधित प्रत्येकी तीन, नगरपालिका प्रशासन, संबधित चार तर जिल्हा अधीक्षक कृषी विभाग, महावितरण कार्यालय संबधित प्रत्येकी एक असे एकूण १६ अर्ज प्राप्त झाले आहेत. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, करमणूकचे तहसीलदार गणेश शिंदे यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम कामगारांना त्वरीत लाभ द्या

$
0
0

बांधकाम कामगारांना त्वरीत लाभ द्या

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहायक कामगार आयुक्तांना सूचना

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना देण्यात येणारे लाभ त्वरीत देण्याच्या सुचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कामगार आयुक्त कार्यालयाला दिल्या. प्रत्येक महिन्यात किती कामगारांना लाभ दिला याबाबत दरमहा स्वत: बैठक घेणार असल्याचेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. सोमवारी इमारत बांधकाम कामगार व सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्या उपस्थित शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली.

कामगारांची बंद असलेली वैद्यकीय विमा योजना, स्वतंत्र घरकूल, नोंदणी व नूतनीकरण प्रक्रिया सुरू ठेवावी, कामगारांना मंडळाकडून मिळणारे लाभ त्वरीत मिळावे आदी मागण्यांसाठी विविध बांधाकम संघटनांची बैठक पालकमंत्री पाटील यांच्यासमवेत झाली. मंडळाकडून कामगारांना विविध लाभाच्या अनेक योजना सुरू आहेत. पण, विविध कागदपत्रांमुळे जिल्ह्यातील बहुतांशी कामगार वंचित राहिले असल्याचे निदर्शनास आणून दिले.

यावेळी पालकमंत्री पाटील यांनी, बांधकाम कामगारांना मिळणारे लाभ त्वरीत देण्याच्या सूचना करत बोगस कामगारांची नोंदणी होणार नाही, यासाठी गावागावांत भेट देण्याचे आदेश दिले. बांधकाम कामगारांना महिन्यात किती लाभ दिला, याबाबत दर महिन्याला आढावा घेणार असल्याचे स्पष्ट केले. पुढील बैठक एक ऑगस्ट रोजी घेण्याचे निश्चित केले. राज्य सरकारच्या कोणत्याही योजनापासू लाभार्थी वंचित राहणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहन करत घरकूल योजनेसाठी अधिवेशानंतर कामगार मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांच्यासोबत संघटनांची बैठक घेण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

'कामगार कार्यालयाकडून बांधकाम कामगार नोंदणीसाठी बुधवारपासून अभियानाला सुरुवात होणार आहे. प्रकल्पस्थळी जाऊन कामगारांची नोंदणी करण्यात येईल' असे सहायक कामगार आयुक्त गुरव यांनी स्पष्ट केले. बैठकीस भोगावतीचे माजी व्हाइस चेअरमन हंबीरराव पाटील, संजय सुतार, गुणवंत नागटिळे, अभिजित केकरे, अमोल कुंभार, प्रशांत हरणे, संतोष गायकवाड, जोतीराम मोरे, के. पी. पाटील, लता चव्हाण, विकास कांबळे, रज्जाक अत्तार आदी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच जणांवर गुन्हा दाखल

$
0
0

गांजाची नशा करणाऱ्या

पाच जणांवर कारवाई

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

बर्की व विशाळगड-गजापूर फाट्यावर अचानक नाकाबंदी करताना शाहूवाडी पोलिसांनी ४८ बेशिस्त वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करून ९६०० रुपये दंड वसूल केला. विशाळगड येथे गांजाचे सेवन करून नशा करणाऱ्या पाचजणांविरुद्ध अंमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती शाहूवाडीचे पोलिस निरीक्षक मनोहर रानमळे यांनी दिली.

शाहूवाडी पोलिसांनी आठवडाभरात आंबा, विशाळगड, मलकापूर, बांबवडे आदी ठिकाणी राबविलेल्या विशेष मोहिमेंतर्गत बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५३ वाहन चालकांवर केलेल्या करवाईतून सुमारे दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मद्यपान करून वाहन चालवताना सापडलेल्या सहा चालकांविरुद्ध न्यायालयीन खटले दाखल केले आहेत. विशाळगड परिसरात ४५ हुल्लडबाजांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याची माहितीही यावेळी रानमळे यांनी दिली.

सध्या बर्की, मानोली, केर्ले आशा ठिकाणी नैसर्गिक धबधबे प्रवाहित झाले आहेत. धबधबे व परिसरातील पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. अशावेळी पर्यटकांनी स्थानिक लोकांना उपद्रव होणार नाही अशा रीतीने निसर्ग पर्यटनाचा आस्वाद घ्यावा. असे आवाहन करण्यात आले. जे पर्यटक मद्यसेवन करून अथवा तत्सम पद्धतीने दंगा-मस्ती करून कायद्याचे उल्लंघन करतील, अशांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा रानमळे यांनी दिला.

'तालुक्यातील आंबा, विशाळगड, बर्की यांसारख्या पर्यटन स्थळांच्या परिसरात पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता यावा यासाठी शाहूवाडी पोलिस ठाण्याकडून अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बेशिस्त वर्तन करून पर्यटनाला गालबोट लावणाऱ्या हुल्लडबाजांवर दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. यासाठी उपविभागातून पोलिस गस्त वाढविण्यात येणार आहे.'

- मनोहर रानमळे, पोलिस उपनिरीक्षक, शाहूवाडी

फोटो ओळ :

विशाळगड (ता. शाहूवाडी) येथे गांजाचे सेवन करून नशा करणाऱ्या पाच इसमांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीतील प्रदूषणाची पाहणी

$
0
0

पर्यावरण मंत्र्यांकडून

काळ्या ओढ्याची पाहणी

म.टा.वृत्तसेवा,इचलकरंजी

पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी इचलकरंजीला धावती भेट देत काळ्या ओढ्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रदूषणप्रश्नी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले. परिसरातील नागरिकांनी मंत्री कदम यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत प्रदुषणाचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली.

गेल्या काही वर्षांपासून पंचगंगा नदी प्रदुषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. याविरोधात सातत्याने आंदोलने करूनही कोणतेच ठोस उपाययोजना केले जात नाहीत. या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री कदम यांनी शिरोळ तालुक्यातील हेरवाड बंधाऱ्यासह शहरातील टाकवडे वेस परिसरातील काळ्या ओढ्याची पाहणी केली. पाहणी दरम्यान मंत्री कदम यांनी रसायनमिश्रित व दुर्गंधीयुक्त काळसर रंगाचे सांडपाणी पाणी पाहून पाणीपुरवठा विभागाचे अभियंता बाजी कांबळे यांच्यासह अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.

शिरोळचे आमदार उल्हास पाटील, शिवसेना शहरप्रमुख सयाजी चव्हाण यांनी प्रदुषणाची तिव्रता निदर्शनास आणून देत तातडीने पावले उचलण्याची मागणी केली. यावेळी शिरोळ पंचायत समिती सभापती संजय माने, सतीश मलमे, राजू आरगे, तहसिलदार गजानन गुरव यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते, नागरीक उपस्थित होते.

\R

फोटो - इचलकंरजी येथे काळ्या ओढ्याची पाहणी करताना पर्यावरण मंत्री रामदास कदम. सोबत आमदार उल्हास पाटील आदी.

(छाया : ओमप्रकाश)\R

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यंत्रमागाचे आधुनिकीकरण करा

$
0
0

यंत्रमागाचे आधुनिकीकरण हाच पर्याय

इचलकरंजीत यंत्रमागधारकांचा मेळावा संपन्न

म.टा.वृत्तसेवा,इचलकरंजी

'बदलत्या काळानुसार साध्या यंत्रमागाच्या आधुनिकीकरणाशिवाय पर्यायच नाही. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना उपलब्ध असून यंत्रमागधारकांनी त्याचा लाभ घ्यावा', असे आवाहन प्रभारी वस्त्रोद्योग आयुक्त नरेशकुमार यांनी केले. राज्य वस्त्रोद्योग महासंघ, कोल्हापूर जिल्हा पॉवरलूम असोसिएशन, केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात विविध योजनांची माहिती देण्यासाठी यंत्रमागधारकांचा मेळावा झाला. त्यावेळी नरेशकुमार बोलत होते. आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा अलका स्वामी यांची प्रमुख उपस्थित होते. यावेळी भोनेमाळ येथील कारखानदार अतुल कबाडे यांनी साध्या मागाचे रॅपिअर लूममध्ये रुपांतर केलेला यंत्रमाग पाहणीसाठी ठेवला होता.

नरेशकुमार म्हणाले, 'साध्या यंत्रमागाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकार ५० टक्के, राज्य सरकार ३५ टक्के व स्व:भांडवल १५ टक्के अशी योजना आहे. त्याप्रमाणे सुताच्या कृत्रिम दरवाढीला पर्याय म्हणून किमान ११ यंत्रमागधारकांना एकत्र येवून यार्न बँक सुरू करता येते. त्यांच्याकडून जितके भांडवल गोळा होईल, तितकेच भांडवल केंद्र सरकारकडून दिले जाणार आहे. त्यामुळे सूत खरेदीचा बिकट प्रश्न सुटणार आहे. ग्रुप शेड पध्दतीने व्यवसाय करण्याची आवश्यकता असून त्यासाठीसुध्दा विविध योजना आहेत. उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी पर्यायाने वीजेत बचत होण्यासाठी सरकारने योजना आखल्या आहेत. त्यासाठी यंत्रमाग कारखान्यावर सोलर पॅनेल (सौरऊर्जा) चा हा सर्वोत्तम पर्याय आहे.'

सोलापूरचे सहाय्यक संचालक किसन पवार म्हणाले, 'साध्या यंत्रमागाचे आधुनिक यंत्रमागात रुपांतर करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने सुरू केलेली ही योजना पायलट प्रोजेक्ट म्हणून इचलकरंजी, सोलापूर, भिवंडी, नागपूर या चार शहरांसाठी आहे.'

आमदार सुरेश हाळवणकर यांनी, 'सरकारने कर्जावरील व्याजात पाच टक्के व्याज सवलत जाहीर केली आहे. आगामी अधिवेशनात वीज दर सवलतही जाहीर होणार आहे. साध्या यंत्रमागाचे आधुनिकीकरण केल्यास उत्पादनात वाढ होईल. त्याचबरोबर कमी आवाज, दुरुस्ती खर्चात कपात, जास्त गतीमुळे उत्पादन वाढेल. ६५ सुटे भाग बदलून साध्या यंत्रमागाचे आधुनिक रॅपिअर लूममध्ये रुपांतर करता येते. त्याचा संकल्प यंत्रमागधारकांनी करावा.'

मेळाव्यात नरेंद्र वन्नम, पी. ए. कुलकर्णी, सुरेश इंगळे, राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी आदींनी मार्गदर्शन केले. अजित जाधव, जिल्हा पॉवरलूम असोशिएशनचे अध्यक्ष दीपक राशिनकर आदी उपस्थित होते.

फोटो

इचलकरंजी येथील यंत्रमागधारकांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना प्रभारी वस्त्रोद्योग आयुक्त नरेशकुमार. (छाया : ओमप्रकाश)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैन धर्म आजच्या संदर्भात विषयी व्याख्यान

$
0
0

'जैन धर्म-आजच्या संदर्भात'

विषयी गुरुवारी व्याख्यान

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

निवृत्त आयएएस अधिकारी आणि सिल्कलँड बिझनेस ग्रुपचे (दुबई) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय जाधव यांचे 'जैन धर्म- आजच्या संदर्भात' या विषयी गुरुवारी (ता.५) व्याख्यान आयोजित केले आहे. डॉ. जाधव हे मूळचे कोल्हापूरचे असून त्यांनी, 'धर्म व तत्वज्ञान' या विषयावर जगभरात ठिकठिकाणी व्याख्याने दिली आहेत. शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी साडेपाच वाजता व्याख्यान होणार आहे. यावेळी 'नाबार्ड' चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. या व्याख्यानाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कुलभूषण बिरनाळे, आर. एस. आलासे, विश्वास पवार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिंदू चौकात कोयता हल्ल्यात दोघे जखमी

$
0
0

बिंदू चौकात कोयता

हल्ल्यात दोघे जखमी

जमिनीच्या वादातून आरसी गँगच्या गुंडांचा हल्ला

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बिंदू चौकात आठ ते दहाजणांनी जमिनीच्या वादातून दोघा भावांचा पाठलाग करून कोयत्याने हल्ला केला. फिल्मी स्टाईलने घडलेल्या या थरारक घटनेत मयूर प्रकाश क्षीरसागर (वय ३०) आणि विनायक शामराव क्षीरसागर (३३, दोघेही रा. भोई गल्ली, बिंदू चौक) हे दोघे जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुंड गौरव वडर याच्यासह सात ते आठजणांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

जखमी विनायक क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गंगुबाई सदाशिव साळुंखे, बाबासाहेब सदाशिव क्षीरसागर (दोघेही रा. प्रयाग चिखली, ता. करवीर), गौरव वडर, प्रकाश कांबळे यांच्यासह तीन ते चारजणांवर गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू आहे.

लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनायक क्षीरसागर यांच्या वडिलांनी २०१२ मध्ये गंगूबाई सदाशिव साळुंखे (रा. प्रयाग चिखली) यांच्याकडून गट क्रमांक १३३/१ व १३१/४ मधील ४६ गुंठे जमीन खरेदी केली आहे. जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावर फिर्यादीचे नाव आहे. जमिनीची किंमत वाढत असल्याने विकलेली जमीन परत करावी असा आग्रह गंगुबाई साळुंखे आणि त्यांचा मुलगा बाबासाहेब यांनी क्षीरसागर कुटुंबीयांकडे धरला आहे. याबाबत अनेकदा क्षीरसागर यांच्या घरी जाऊन आणि मोबाइलवरूनही त्यांनी जमीन परत करण्यास दमदाटी केली. जमिनीकडे गेल्यानंतरही त्यांनी वारंवार वाद घातला. परंतु क्षीरसागर कुटुंबीयांनी जमीन परत देण्यास नकार दिल्याने वाद वाढला होता.

क्षीरसागर कुटुंबीयांनी याबाबत पोलिस अधीक्षक कार्यालयासह करवीर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. विनायक आणि मयूर हे दोघे सोमवारी सकाळी तक्रारीबाबत चौकशी करण्यासाठी करवीर पोलिस ठाण्यात गेले होते. परत घरी जाताना पद्मा टॉकीज चौक ते बिंदू चौक मार्गावरील बराले फोटो स्टुडिओसमोर पोहोचल्यानंतर चार ते पाच तरुणांनी विनायक यांची दुचाकी अडवली. 'प्रकाश कांबळे भाईने तुला बोलवले आहे,' असे म्हणत जबरदस्तीने विनायक क्षीरसागर यांना एका दुचाकीवर बसण्यासाठी सांगितले. यावेळी विनायक यांनी सोबत येण्यास नकार दिल्याने त्यांना दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न केला. यावेळी मयूर क्षीरसागर यांनी ढकलाढकली केल्याने गौरव वडर याने दुचाकीच्या डिकीतून कोयता काढून दोघांवर हल्ला केला. यात मयूर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर विनायक यांच्या हातावर कोयत्याला वार लागला. दोघांनी आरडाओरडा केल्याने हल्लेखोरांनी पळ काढला. नागरिकांनी जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला. मात्र, तोपर्यंत हल्लेखोर पळाले होते.

............

चौकट

जमीन मिळवण्यासाठी सुपारी

एकदा विकलेली जमीन पुन्हा मिळवण्यासाठी जमिनीच्या आधीच्या मालकिणीने आणि तिच्या मुलाने सुपारी दिल्याचा आरोप फिर्यादींनी केला आहे. याबाबत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनीदेखील मोबाइलवर फोन करून जामिनीबाबत सामोपचाराने तोडगा काढा, असे सांगितले होते. मात्र, पैसे देऊन विकत घेतलेली जमीन परत करणार नाही, असे क्षीरसागर यांनी स्पष्ट सांगितल्याचा उल्लेख फिर्यादीत केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात शुक्रवारी ‘महारेरा’ विषयक कार्यशाळा

$
0
0

विद्यापीठात शुक्रवारी

'महारेरा' विषयक कार्यशाळा

कोल्हापूर : क्रिडाई कोल्हापूर, महारेरा व शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. ४) 'महारेरा कायदा' विषयक कार्यशाळा आयोजित केली आहे. विद्यापीठातील वि. स. खांडेकर भाषाभवन येथे दुपारी २.३० ते सायंकाळी सहा या वेळेत कार्यशाळा होईल. 'महारेरा'चे सचिव डॉ. वसंत प्रभू, तांत्रिक विभाग अधिकारी डी. आर. हाडदरे, कनिष्ठ तांत्रिक सल्लागार गणेश जाव्हरे, मुख्य सल्लागार केतन अस्तिक, विनतीत वायकूळ हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महारेराकडे नोंदणीकृत प्रकल्पांच्या विकासकांना नोंदणीनंतरच्या कराव्या लागणाऱ्या पूर्ततेविषयी माहिती देण्यात येणार आहे. कार्यशाळेस बांधकाम व्यावसायिक, इंजिनीअर्स, वास्तुविशारद, वकील व चार्टर्ड अकौंटटस यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कोल्हापूर क्रिडाईचे अध्यक्ष महेश यादव, उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, सचिव के. पी. खोत, कार्यशाळा समन्वयक आदित्य बेडेकर, तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ. जयदीप बागी, प्रा. श्रीकांत भोसले यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुई, इंगळी, पट्टणकोडोलीत प्रदूषण पहाणी

$
0
0

पंचगंगा प्रदूषणाची झाडाझडती

पर्यावरणमंत्र्यांकडून रुई, इंगळी, पट्टणकोडोलीत पाहणी, कारवाईचे आदेश

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

'पंचगंगा नदीचे प्रदूषण करणाऱ्या पंचतारांकित औद्योगिक वसाहत, लक्ष्मी इंडस्ट्रीज यांच्यावर तत्काळ कारवाई करावी' असे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिले. पंचगंगा नदीत पंचतारांकित औद्योगिक वसाहत आणि लक्ष्मी इंडस्ट्रीजच्या केमिकलमिश्रित पाणी मिसळत असलेल्या हातकणंगले तालुक्यातील रुई पूल, इंगळी ओढा, पट्टणकोडोली थोरला ओढा याठिकाणी पर्यावरण मंत्री रामदास कदम, आमदार उल्हास पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. ओढ्यातील काळे व दुर्गंधीयुक्त पाण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना कदम यांनी चांगलेच फैलावर घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.

पंचगंगा नदीच्या प्रदूषणमुक्ती जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखाली नदीकाठावरील गावांनी मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभारुन पंचगंगा बचाव कृती समितीची स्थापना केली आहे. प्रदूषणाने नदी जलपर्णीने व्यापल्याने रुकडीतील मच्छीमार बांधवांनी पंचगंगा नदी चोरीस गेल्याची तक्रार हातकणंगले पोलिस ठाण्यात देऊन प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाईची मागणी केली होती. पंचतारांकित औद्योगिक वसाहत, लक्ष्मी इंडस्ट्रीजसह अन्य घटकांनी नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित केली असल्याचा अहवाल देऊनही मंडळाने अद्याप कारवाई केली नाही. दरम्यान नदी चोरीस जाण्याच्या अनोख्या तक्रारीने राज्यात खळबळ उडून प्रदूषण मंडळाच्या अनागोंदी कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेल्याने पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता.

पंचगंगा नदीच्या प्रदूषणाने हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील जनतेचे कॅन्सर, त्वचारोग यांसारख्या असाध्य रोगांनी आरोग्य धोक्यात आले आहे. त्याबरोबर शेत जमिनीतून घेतलेली पिके शरीरास धोकादायक ठरत आहे. यामुळे शिरोळचे आमदार उल्हास पाटील यांनी पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा नागपूर अधिवेशनात मांडणार असल्याचे सांगितले होते.

दरम्यान आज पर्यावरण मंत्री कदम हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना दुपारी अचानकपणे रुई पूल, इंगळी ओढा, पट्टणकोडोली थोरला ओढा या ठिकाणी भेटी दिल्या. ओढ्यावरील काळे व दुर्घंधीयुक्त पाणी पाहून कदम चांगलेच संतप्त झाले.

अधिकाऱ्यांचे चेहरे पडले..

मंत्री कदम यांच्या अचानक भेटीत रुई पुलावर लक्ष्मी इंडस्ट्रीजमधून केमिकलमिश्रीत पाणी प्रक्रिया न करता ओढ्याने थेट नदीत मिसळत असल्याचे दिसून आल्याने कदम यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत कारवाईचे आदेश दिले. संतप्त झालेल्या मंत्री कदम यांच्या रुद्रावताराने अधिकाऱ्यांचे चेहरे चांगलेच पडले होते.

फोटो ओळी - १) इंगळी व पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील ओढ्यात पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील केमिकल मिश्रत मिसळत असल्याची पाहणी करताना पर्यावरण मंत्री रामदास कदम. शेजारी साताप्पा भवान, आमदार उल्हास पाटील आदींसह प्रदूषणचे अधिकारी व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images