Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

भीषण अपघातात जवानासह दोघे ठार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुणे-बेंगळुरू महामार्गावर मयूर पेट्रोल पंपासमोर कोल्हापूरहून गोकुळ शिरगावच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला मागून आलेल्या भरधाव आयशर ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील जवानासह दोघे ठार झाले. जवान सुशांत आनंदा पाटील (वय २५, रा. कणेरी, ता. करवीर) आणि ओमकार विश्वास पाटील (२४, रा. कणेरीवाडी, ता. करवीर) अशी मृतांची नावे आहेत. अपघात शनिवारी (ता. ३०) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडला.

सीपीआर व अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत पाटील कणेरी येथील असून, सहा वर्षांपूर्वी तो भारतीय सैन्य दलात भरती झाला. लग्न ठरवण्यासाठी आठ दिवसांपूर्वीच तो सुटीवर आला होता. दोन महिन्यांच्या सुट्टीत लग्न ठरवण्याचा त्याचा विचार होता. तो कणेरीवाडीतील मित्र ओमकार पाटीलसोबत पन्हाळ्याला गेला होता. या दोघांनीही कोल्हापुरात एका मित्राचा वाढदिवसही साजरा केला. साडेसहाच्या सुमारास हे दोघे घरी परत निघाले होते. मयूर पेट्रोल पंपासमोर पाठीमागून आलेल्या भरधाव आयशर ट्रकने (एचआर ३८ यू. ००७०) दुचाकीला जोराची धडक दिली. दुचाकीसह दोघांनाही चिरडून आयशर पुढे गेला. वाहनधारकांनी पाठलाग करून ट्रक थांबवला. मात्र, चालक पळून गेला.

परिसरातील नागरिकांनी आणि काही वाहनधारकांनी गंभीर जखमी सुशांत आणि ओमकारला १०८ रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये पाठवले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. अपघाताची माहिती मिळताच कणेरी आणि कणेरीवाडीतील नागरिकांनी सीपीआरच्या अपघात विभागात गर्दी केली. रात्री उशिरा उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

दरम्यान, गोकुळ शिरगाव एमआयडीसी पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. आयशर ट्रकही जप्त केला. पळून गेलेल्या आयशर ट्रकचालकाचा शोध सुरू असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज खाडे यांनी सांगितले.

लग्नाचे स्वप्न अधुरे राहिले

सुशांत २६ मराठा बटालियनमध्ये जम्मू-काश्मिर येथे कार्यरत होता. त्याचा मोठा भाऊही सैन्यात आहे. लग्न ठरवण्यासाठी तो दोन महिन्यांची सुटी घेऊन आठ दिवसांपूर्वीच घरी आला होता. मुली पाहण्यासाठी घरात नियोजन सुरू होते. अपघाती मृत्यूने त्याचे लग्नाचे स्वप्न अधुरेच राहिले. त्याच्या पश्चात आई, मोठा भाऊ असा परिवार आहे. सुशांतच्या मृत्यूने त्याच्या आईला मोठा धक्का बसला.

ओमकार अभियांत्रिकीचा विद्यार्थी

ओमकार पाटीलचे मूळ गाव गडहिंग्लज तालुक्यातील हनिमनाळ हे आहे. त्याच्या वडिलांचा कडबाकुट्टीचा व्यवसाय आहे. गेल्या २० वर्षांपासून ते पत्नी आणि मुलांसह कणेरीवाडीत राहतात. ओमकार अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. त्याच्याच दुचाकीवरून हे दोघे पन्हाळ्याला गेले होते. तो एकुलता होता. त्याच्या नातेवाईकांनी सीपीआरच्या आवारात केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

घटनास्थळाचे भीषण दृष्य

आयशर ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्यानंतर तीस ते चाळीस फूट फरफटत नेले. यामुळे दुचाकी ट्रकखाली अडकली होती. यातच सुशांत आणि ओमकार अडकले होते. या अपघाताचे दृष्य भीषण होते. दोघांच्या अंगावर अनेक जखमा झाल्या होत्या. महामार्ग पोलिस आणि काही नागरिकांनी ट्रकखालून दोघांना बाहेर काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहर डीवायएसपींकडून पोलिस ठाण्यांची तपासणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना योग्य वागणूक मिळत नसल्याच्या तक्रारी शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्याकडे आल्या होत्या. याबाबत पोलिस ठाण्यांतील कारभाराची चाचपणी करण्यासाठी डॉ. अमृतकर यांनी शनिवारी डमी तक्रारदार पाठवून तपासणी केली. शहरातील शाहूपुरी, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्यात डमी तक्रारदार पाठवले. या तक्रारदारांची ठाणे अंमलदारांनी तातडीने दखल घेऊन त्यांची तक्रार ऐकूण घेतली. याशिवाय त्यांच्या तक्रारीचे निरसन करण्याचाही प्रयत्न केला. पोलिस ठाणी स्मार्ट केल्याने नागरिकांना पुरेशा सुविधा आणि चांगली वागणूक देणे बंधनकारक केले आहे. डमी तक्रारदारांकडून केलेल्या तपासणीत पोलिसांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाल्याची माहिती उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोषी संचालकांचे सभासदत्व रद्द करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०१० ते २०१५ या कालावधीतील कार्यकारिणीने सुमारे पाऊण कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला. त्या प्रकरणातील दोषी संचालकावर कारवाई करण्याऐवजी सध्याची कार्यकारिणी गप्प राहून त्यांना पाठीशी घालण्याचा खटाटोप करत आहे. दोषी संचालकावर कारवाई करताना त्यांचे सभासदत्व रद्द करावे, अन्यथा पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय मराठी चित्रपट नाट्य व्यावसायिक कृती समितीने दिला. कृती समितीचे अध्यक्ष भालचंद्र कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या कार्यकारिणीवरही तोफ डागली.

महामंडळाचे सभासद अशोक जाधव यांनी महामंडळाची गेल्या तीन वर्षांत सर्वसाधारण सभा घेतली नाही. अनेक प्रश्नांची सोडवणूक होऊ शकली नाही. यामुळे सध्याचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा अशी मागणी कृती समितीने केली.

अभिनेते कुलकर्णी म्हणाले, '२०१० ते २०१५ या कालावधीतील गैरव्यवहाराबाबत तत्कालिन कार्यकारिणीला दोषी ठरविले आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाने गैरव्यवहारप्रकरणी केवळ दहा लाख ७८ हजार रुपयांचा दंड केला आहे. मात्र दंडाची रक्कम नगण्य असून यासंदर्भात धर्मादाय आयुक्तांना भेटणार आहे. तांत्रिक बाबीमुळे गैरव्यवहारात सहभागी नसणारे माजी संचालकही अडकले आहेत. दरम्यान त्या चौकशी अहवालात कागदोपत्री सहकार्य न केल्याबद्दल विद्यमान कार्यकारिणीला एक लाख रुपयांचा दंड केला आहे. यासंबंधी कार्यकारिणीकडे चौकशी केली असता अहवालाच्या लेखा परीक्षणादरम्यान त्यांच्या मागणीनुसार मुख्य व्यवस्थापकांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यासंबंधी कार्यकारिणीने हायकोर्टात दावा दाखल केल्याचे सांगितले. महामंडळाचे नुकसान टाळण्यासाठी विद्यमान कार्यकारिणीने पूर्वीच्या दोषी संचालकांना पाठीशी न घालता योग्य त्या कारवाईसाठी पुढाकार घ्यावा.'

नगरसेविका सुरेखा शहा म्हणाल्या, 'गैरव्यवहार प्रकरणी आजी, माजी संचालक एकमेकांना सांभाळून घेत आहेत. मुंबई, नाशिकमध्ये महामंडळाशी संबंध नसणाऱ्या व्यक्तींची निवडणुकीवर डोळा ठेवून सभासद नोंदणी सुरू आहे.'

बाबा पार्टे यांनी महामंडळाचे कोल्हापुरातील कार्यालय अन्यत्र हलविण्याचा घाट सुरू असल्याचा आरोप केला. पत्रकार परिषदेला समितीचे कार्यवाह अर्जुन नलवडे, सुरेंद्र पन्हाळकर, अरुण चोपदार, छाया सांगावकर, सदानंद सूर्यवंशी, रणजित काकडे, तानाजी पाटील, दिलीप माने, शांताराम सावंत आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मंदिर परिसरात चोरी करणाऱ्या दोन महिलांना अटक

0
0

अंबाबाई मंदिर परिसरात

दोन चोरट्या महिलांना अटक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात चोरी करणाऱ्या दोन महिलांना ताब्यात घेऊन अंबाबाई मंदिरातील सुरक्षा रक्षकांनी जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी रुपा रामो बेनित्री (वय २२), रक्षा मनोज गायकवाड (२२, दोघी रा. हुबळी, कनार्टक) यांना अटक करुन त्यांच्याकडून एक मोबाईल व पर्स जप्त केला. शनिवारी (३०) अंबाबाई मंदिरात दोन महिला संशयितरित्या फिरत असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. मंदिर परिसरातील सुरक्षा रक्षकांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. नंतर त्यांना ताब्यात घेऊन जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे एक मोबाईल व पर्स मिळाली. दोघींनी मोबाईल व पर्स चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’चे पीआरओ मोहन यादव यांचे निधन

0
0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) जनसंपर्क अधिकारी मोहन बाबूराव यादव (वय ५९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील सामाजिक कार्यकर्ते पांडबा यादव यांचे ते भाऊ होत. यादव 'गोकुळ'मध्ये सन १९८५ पासून कार्यरत होते. या कालावधीत काही काळ त्यांनी संघाच्या स्टोअर विभागाकडे, त्यानंतर काही वर्षे संघाचे तत्कालीन चेअरमन कै. आनंदराव पाटील-चुयेकर यांच्याकडे पी.ए. म्हणून व उर्वरित संपूर्ण कालावधीत संघाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहिले. यादव यांची अत्यंत कर्तव्यदक्ष व मनमिळाऊ अधिकारी म्हणून संघामध्ये परिचित होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. यादव यांच्या पार्थिवावर प्रयाग चिखली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह 'गोकुळ'चे संचालक उपस्थित होते. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २) सकाळी नऊ वाजता प्रयाग चिखली येथे होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापाऱ्यांची आज निदर्शने

0
0

व्यापाऱ्यांची आज निदर्शने

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'वॉलमार्ट फ्लिपकार्ट करार' रद्द करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रिजतर्फे सोमवारी (ता. २) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी साडेदहा वाजता निदर्शने करण्यात येणार आहे. कोल्हापूर डिस्ट्रीक्ट कंझ्युमर प्रॉडक्टस् असोसिएशन, किरकोळ किराणा दुकानदार असोसिएशन आणि सर्व सहयोगी संघटना सहभागी होणार आहेत. फ्लिपकार्ट ही ऑनलाइन व्यवसाय करणारी 'वॉलमार्ट' या जागतिक बलाढ्य कंपनीने खरेदी केली आहे. या दोन्ही कंपन्यांच्या करारामुळे देशातील कपडे, दैनंदिन वापराच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, किराणा यासह सर्वंच क्षेत्रातील किरकोळ विक्रेत्यांना फटका बसणार आहे. देशातील पाच कोटींहून अधिक संख्येने असलेला किरकोळ व्यापाऱ्यांचा व्यवसाय मोडीत निघणार आहे. या कराराच्या विरोधात देशभर निदर्शने होत असून कोल्हापूर जिल्ह्यात निदर्शने करण्यात येणार आहे. निदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, धैर्यशील पाटील आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपसंचालक कार्यालयात लुटीचे रॅकेट

0
0

\Bउपसंचालक कार्यालयात लुटीचे रॅकेट\B

मंत्रालयापर्यंत वाटा, वाढत्या खाबुगिरीने प्राध्यापक त्रस्त

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : bhimgondaMT

कोल्हापूर : येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वाढत्या खाबुगिरीने प्राध्यापक त्रस्त झाले आहेत. कार्यालय ते कॉलेज असे पैसे गोळा करून कामे करून देणारे रॅकेट येथे सक्रिय आहे. त्यातूनच वैयक्तिक शिक्षक मान्यतेचा दर ४ लाख २० हजारांपर्यत गेला आहे. अपवाद वगळता इतर सर्वच कामांत २० ते ४० हजार रुपयांची वसुली केली जात आहे. या प्रकारांकडे वरिष्ठांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. खाबुगिरीचा वाटा मंत्रालयापर्यंत जात असल्याचे आरोपही होत आहे.

कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली या जिल्ह्यांतील ज्युनिअर कॉलेजचे प्रशासकीय कामकाज येथील हत्तीमहल रोडवरील शिक्षण उपसंचालक कार्यालयातून चालते. जादा विद्यार्थी तुकड्या, विषय, वैयक्तिक मान्यता, संस्थांतर्गंत बदली, वरिष्ठ वेतनश्रेणी, निवड श्रेणीस मान्यता देणे अशी महत्वाचे कामे उपसंचालकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन करीत असते. याशिवाय कॉलेजमधील सेवा सुविधा, बेकायदेशीर कामकाजाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणे, पेन्शन प्रकरण निर्गत करणे, नियमित वेतनश्रेणीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली जाते. या कामांतही डल्ला मारला जात आहे.

लिपिक ते उपसंचालकापर्यंत प्रत्येकांनी सात दिवसांच्या आत प्रस्तावांची फाईल निर्गत करणे बंधनकारक आहे. मात्र पैसे न दिल्यास फाईलमध्ये जाणीवपूर्वक त्रुटी काढून फाइल प्रलंबित ठेवली जाते. संबंधीत प्राध्यापकास हेलपाटे मारायला लावले जातात. मागेल तितके पैसे देण्याची त्यांची मानसिकता तयार केली जाते. नंतर पैसे मागणी केली जाते. पैशाचा व्यवहार ठरल्यानंतर निरोप मिळताच 'साहेब' तातडीने फाईल मागून घेऊन सही करतात. अशा प्रकारे पैसे गोळा करणारे रॅकेट येथे कार्यरत आहे.

आठवड्यापूर्वी 'महाराष्ट्र टाइम्स'ने प्रत्येकी ४ लाख २० हजार रुपये घेऊन ७० प्राध्यापकांची बेकायदेशीर वैयक्तिक मान्यता देण्याचे प्रकरण उघडकीस आणले. त्यानंतर उपसंचालक कार्यालयातील डल्लामारू रॅकेटसंबंधीच्या तक्रारी 'मटा'कडे केल्या आहेत.

शिक्षणसेवकाचा कार्यकाळ संपल्यानंतर नियमित वेतनश्रेणी लागू करण्यासाठी ३० ते ४० हजार, निवड श्रेणीसाठी १० ते २० हजार असे खाबुगिरीचे दर आहेत. त्यामुळे सामान्य प्राध्यापकांत असंतोष आहे. पैसे दिले नाही तर नियमितीकरणाचे सरकारकडून हक्काचे लाभही मिळत नसल्याने शिक्षणसेवक हतबल आहेत. पैसे घेणाऱ्याची लाचलुचपत पथकाकडे तक्रार केल्यास, त्याला पकडून दिल्यास संस्था पाठिशी राहत नाही, नोकरी जाण्याचा धोका असतो. त्यामुळे पैसे देऊन काम करून घेण्याची मानसिकता वाढली आहे. परिणामी लाचखोर अधिकारी, कर्मचारी मालामाल होत आहेत.

उपसंचालक कार्यालयात प्राध्यापकांकडून पैसे घेऊन काम करून देणारे मोठे रॅकेट आहे. पैसे देण्यास असमर्थता दाखवल्यास हेलपाटे मारायाला लावले जातात. किरकोळ त्रुटींवर बोट ठेवत पैसे वसूल केले जात आहेत. वसुलीच्या रॅकेटमध्ये कॉलेज, काही शिक्षक संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांचा सामावेश आहे.

- सुरेश बेलेकर, अन्यायग्रस्त प्राध्यापक

शिक्षण विभागात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. भ्रष्टाचाराचे पैसे मंत्रालयापर्यंत पोहचवले जात आहे. त्यामुळे पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यभरात प्रभारी उपसंचालक नियुक्त करून लुटीला प्रोत्साहन देण्याचा नवा फंडा सुरू आहे. भ्रष्टाचारासंबंधीच्या तक्रारी अनेकवेळा सचिव पातळीपर्यंत केल्या आहेत. तक्रारीची दखल घेतली जात नाही. त्यामुळे शिक्षणमधील खाबुगिरी रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष घालणे गरजेचे आहे.

- एस. एल. दीक्षित, विभागीय अध्यक्ष, ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन

उपसंचालक कार्यालयात पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक टेबलवरील फायलींचा निपटारा ७ दिवसाच्या आत करणे बंधनकारक आहे. मात्र सध्या असे होत नाही. प्रकरण प्रलंबित राहिल्यानंतर खाबुगिरीला वाढत असते. त्यामुळे पेन्शन, नियमित वेतनश्रेणी, पदोन्नतीच्या प्रकरणांना मान्यता देण्यासाठी आठवड्यातून एका दिवस शिबिर लावता येईल. तरच भ्रष्टाचाराला आळा बसेल.

- संपतराव गायकवाड, निवृत्त सहायक संचालक

८००

पाच जिल्ह्यांतील कॉलेज

७०००

प्राध्यापक

०००

(मूळ कॉपी)

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : bhimgondaMT

कोल्हापूर : येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये खाबुगिरीचे दर वधारले आहेत. कार्यालयात ते कॉलेज असे पैसे गोळा करून काम करून देणारे रॅकेट सक्रिय आहे. त्यातूनच वैयक्तिक शिक्षक मान्यतेचा दर ४ लाख २० हजारांपर्यत गेला आहे. अपवाद वगळता इतर सर्वच कामात २० ते ४० हजारांपर्यंत वसुली केली जात आहे. वसुलीचे दर तेजीत असतानाही वरिष्ठही त्याकडे सोयीनुसार दूर्लक्ष केल्याचे समोर येत आहे. यामुळे खाबुगिरीचा वाटा मंत्रालयापर्यंत जात असल्याचा आरोप होत आहे.

कोल्हापूर शहर, जिल्हा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली या जिल्ह्यातील ज्युनिअर कॉलेजचे प्रशासकीय कामकाज येथील उपसंचालक कार्यालयातून चालते. जादा विद्यार्थी तुकड्या, विषय, वैयक्तिक मान्यता, संस्थांतर्गंत बदली, वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणीस मान्यता देणे अशी महत्वाचे कामे उपसंचालकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन करीत असते. याशिवाय कॉलेजमधील सेवा सुविधा, बेकायदेशीर कामकाजाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणे, पेन्शन प्रकरण निर्गत करणे, नियमित वेतनश्रेणीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली जाते. या कामांतही डल्ला मारला जात आहे.

लिपिक ते उपसंचालकार्यंत प्रत्येकांनी सात दिवसाच्या आत प्रस्तावाची फाईल निर्गत करणे बंधनकारक आहे. मात्र पैसे न दिल्यास प्रस्तावाचे फाईल जाणीवपूर्वक त्रुटी काढून दाबून ठेवली जाते. संबंधीत प्राध्यापकास हेलपाटे मारायला लावले जाते. मागेल तितके पैसे देण्याची त्यांची मानसिकता तयार केली जाते. त्यानंतर पैसे मागणी केली जाते. पैशाचा व्यवहार ठरल्यानंतर निरोप मिळताच साहेब तातडीने फाईल मागून घेऊन सही करतात. अशाप्रकारे पैसे गोळा करणारे रॅकेट कार्यरत आहे. प्रत्येकी ४ लाख २० हजार रूपये घेऊन ७० प्राध्यापकांचे बेकायदेशीर वैयक्तिक मान्यता देण्याचे प्रकरण महाराष्ट्र टाइम्सने आठवड्यापूर्वी उघडकीस आणले. त्यानंतर उपसंचालक कार्यालयातील डल्लामारू रॅकेटसंबंधीच्या तक्रारी मटाकडे केल्या जात आहेत.

शिक्षण सेवकाचा कार्यकाळ संपल्यानंतर नियमित वेतनश्रेणी लागू करण्यासाठी ३० ते ४० हजार, निवड श्रेणीसाठी १० ते २० हजार असे खाबुगिरीचे दर आहेत. यामुळे सामान्य प्राध्यापकांत असंतोष आहे. पैसे दिले नाही तर नियमित सरकारकडून हक्काचे लाभही मिळत नसल्याने तो हतबल आहे. पैसे घेणाऱ्याला लाचलुचपत पथकाव्दारे पकडून दिल्यास संस्था पाठिशी राहत नाही, नोकरी जाण्याचा धोका असतो. यामुळे पैसे देऊन काम करून घेण्याची मानसिकता वाढली आहे. परिणामी लाचखोर अधिकारी, कर्मचारी मालामाल होत आहेत.

उपसंचालक कार्यालयात प्राध्यापकांकडून पैसे घेऊन काम करून देणारे मोठे रॅकेट आहे. पैसे देण्यास असमर्थता दाखवल्यास हेलपाटे मारायाला लावले जाते. किरकोळ त्रुटीवर बोट ठेवत पैसे वसूल केले जात आहे. वसुलीच्या रॅकेटमध्ये कॉलेज, काही शिक्षक संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्याचा सामावेश आहे.

सुरेश बेलेकर, अन्यायग्रस्त प्राध्यापक

शिक्षण विभागात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. भ्रष्टाचाराचे पैसे मंत्रालयापर्यंत पोहचले जात आहे. यामुळे पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यभरात प्रभारी उपसंचालक नियुक्त करून लुटीला प्रोत्साहन देण्याचा नवा फंडा सुरू आहे. भ्रष्टाचारासंबंधीच्या तक्रारी अनेकवेळा सचिव पातळीपर्यंत केल्या आहेत. तक्रारीची दखल घेतली जात नाही. त्यामुळे शिक्षणमधील खाबुगिरी रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष घालणे गरजेचे आहे.

एस. एल. दिक्षीत, विभागीय अध्यक्ष, ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन

उपसंचालक कार्यालयात पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक टेबलवरील फाईलींचा निपटारा ७ दिवसाच्याआत करणे बंधनकारक आहे. मात्र सध्या असे होत नाही. प्रकरण प्रलंबित राहिल्यानंतर खाबुगिरीला वाढत असते. म्हणून पेन्शन, नियमित वेतनश्रेणी, पदोन्नतीची प्रकरणांना मान्यता देण्यासाठी आठवड्यातून एका दिवस शिबिर लावता येईल. भ्रष्टाचाराला आळा बसेल.

संपतराव गायकवाड, निवृत्त सहायक संचालक

पाच जिल्ह्यातील कॉलेज

८००

प्राध्यापक

७०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकेतर कर्मचारी सभा

0
0

उपाध्यक्षपदी श्रीपती आवाड

कोल्हापूर

जिल्हा माध्यमिक शाळा सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची १० वी सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष गणपतराव बागडी होते. सभेत संघटनेच्या उपाध्यक्षपदी श्रीपती आवाड आणि खजिनदारपदी सुभाष घोसाळकर यांची निवड करण्यात आली. सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. २०१७-१८ मधील जमाखर्चास मंजुरीसह आश्वासित वेतनश्रेणी, सातवा वेतना आयोग आणि अपुरी पेन्शन संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश सुभेदार यांची भेट घेण्याचे ठरले. सचिव विजय चव्हाण यांनी स्वागत केले. कार्याध्यक्ष ए. जी. चौगले यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फेरीवाले युनियनला आश्वासन

0
0

फेरीवाले पुनवर्सन मार्गी लावू

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शहरातील रॉकेल फेरीवाल्यांचा प्रश्न आणि पुनवर्सनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल', असे आश्वासन अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी कोल्हापूर फेरीवाले युनियनच्या शिष्टमंडळाला दिले. मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सरकारच्या धोरणामुळे शहरातील फेरीवाले बेरोजगार झाले आहेत. त्याबाबत गांभीर्याने विचार करावा. सरकारच्या अन्य योजनांत रॉकेल फेरीवाल्यांचा समावेश करावा. मंत्री बापट यांनी या मागण्यांचा आढावा घेतला जाईल, असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात युनियनचे सेक्रेटरी दिलीप पवार, रघुनाथ कांबळे, शिवाजी सगट, विलास माने, गोरख गायकवाड, भास्कर कांबळे आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निढोरीजवळ बेकायदेशीर वाळू उपसा

0
0

फोटो...

म. टा. वृत्तसेवा, कागल

मुरगूड-निढोरी पुलाजवळ वेदगंगा नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफियांवर शुक्रवारी दुपारी महसूल विभागाने कारवाई करू साहित्य जप्त केले. या कारवाईमुळे अन्य वाळूतस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. वाळू उपसा करण्याचे साहित्य जप्त केल्याची माहिती मंडल अधिकारी विष्णू कुंभार यांनी दिली आहे.

कागल व भुदरगड तालुक्यांत दूधगंगा-वेदगंगा नदीपात्रात गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे. उन्हाळ्यात रात्रीच्या वेळी वाळू उपसा केला जायचा, तर सध्या पावसाळ्यात बिनधास्तपणे बेकायदेशीर वाळू उपसा सुरू केला आहे. निढोरी पुलाजवळ रविवारी २० ते २५ वाळूमाफिया नदीपात्रातून वाळू काढत होते. पावसाळा असल्याने नदीला पाणी भरपूर आहे. मात्र, तरीही जिवाची पर्वा न करता नदीच्या पाण्यातून वाळूउपसा केला जात असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. त्यानंतर मंडल अधिकारी विष्णू कुंभार, तलाठी नीलम दळवी, कोतवाल सुनील शेणवी व अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अधिकारी आल्याचे समजताच वाळू उपसा करणाऱ्या तरुणांनी साहित्य तेथेच टाकून पलायन केले. नदीपात्राकडेला वाळूचे ढीग मारले होते, तर काही वाळू पोत्यांमध्ये भरली होती. अधिकाऱ्यांनी वाळू उपसा करण्यासाठी आणलेल्या बादल्या, प्लास्टिक बुट्ट्या व नदीपात्रात जाण्यासाठी तयार केलेला तराफा जप्त केला.

वाळू उपशावर सरकारने निर्बंध घातल्याने वाळूचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना घरे बांधणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे सध्या वाळूतस्करीचे प्रमाण वाढत आहे. राधानगरी आणि भुदरगड तालुक्यांत अशाच पद्धतीने वाळू उपसा सुरू आहे. त्यावर काय कारवाई होते याकडे आता लक्ष लागले आहे.

००००

शाळेला दांडी मारून...

वाळू उपसा करण्यासाठी शाळेला दांडी मारून काही विद्यार्थी आले होते. नदी प्रवाहाच्या पाण्यात बुडून हे विद्यार्थी जिवाची पर्वा न करता वाळू काढत होते. शिकण्याच्या या वयात भरदिवसा वाळू उपसाणाऱ्या या विद्यार्थ्यांबाबत घटनास्थळी चर्चा सुरू होती.

०००

फोटो ओळ...

मुरगूड-निढोरी पुलाजवळ वेदगंगा नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपसा करण्याचे साहित्य जप्त करताना महसूल अधिकारी व कर्मचारी

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोघा चोरट्यांकडून नऊ दुचाकी जप्त

0
0

फोटो...

म. टा. वृत्तसेवा, निपाणी

कागलमधील दोन दुचाकी चोरट्यांना निपाणी पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून दोन लाख ९० हजार किमतीच्या नऊ मोटारसायकली जप्त केल्या. सुरेश कृष्णमूर्ती शेट्टी (वय ३६, रा. मूळ संभाजीनगर, कोल्हापूर सध्या गणेशनगर कागल) आणि प्रतीक संजय पवार (वय २८, रा. शिवाजी चौक, कागल) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी कोल्हापूर, निपाणी, संकेश्वर आणि चिकोडी येथून या मोटारसायकली चोरल्या होत्या.

सुरेश कृष्णमूर्तीला चार दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याने मोटारसायकल चोरताना रंगेहात पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या तपासणीत त्याने पवार याच्या मदतीने दुचाकी चोरून विकत असल्याचे कबूल केले. त्यामुळे निपाणी पोलिसांनी पवार यालाही ताब्यात घेत या दोघांकडून दोन लाख ९० हजार रुपयांच्या नऊ मोटारसायकली जप्त केल्या.

कारवाईत सीपीआय किशोर भरणी, शहरचे सहायक फौजदार आर. ए. शेख, एम. जी. निलाखे, हवालदार राजू कोळी, आदींनी भाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या एफआरपीतील दरोडा अमान्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

यंदाच्या हंगामासाठी एफआरपी फेररचनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उलट प्रश्न विचारायचे नाही, या अटीवर भाजपच्या मर्जीतील १४४ बोगस शेतकरी प्रतिनिधींना दिल्लीत बोलावून घेतले. मोदींनी स्वत:चा सत्कार करून घेऊन एफआरपीसाठीची बैठक झाल्याचा बनाव केला. त्यानंतर वृत्तपत्रात यंदाच्या एफआरपी पुनर्रचनेत साडेनऊ ऐवजी १० रिकव्हरीला २७५० रुपये दर करण्यावर चर्चा झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. असे करून एफआरपीची रक्कम कमी करीत उत्पादकांच्या खिशावर टाकलेला प्रतिटन १४५ रुपयांचा दरोडा कदापिही मान्य करणार आहे, असा इशारा रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला. या निर्णयामुळे ऊसपट्ट्यात औषधालाही कमळ शिल्लक राहणार नाही, असा इशाराही त्यांनी केला.

खासदार शेट्टी म्हणाले, 'सध्याची एफआरपी कारखानदारांना देणे शक्य नाही, असे कारण पुढे करीत रिकव्हरीचा बेस बदण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. आता साडेनऊ रिकव्हरीला २७५० आणि पुढील एका रिकव्हरीला २८९ रुपये देणे बंधनकारक आहे. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी एफआरपी पुनर्रचनेत रिकव्हीरीचा बेस साडेनऊ ऐवजी १० करण्याचे नियोजन केले आहे. यामुळे उत्पादकांचे प्रतिटन १४५ रुपयांचे नुकसान होणार आहे. केंद्र सरकारचा हा डाव हाणून पाडला जाईल. चुकीच्या पद्धतीने खर्चाचा हिशेब करून पिकांचा हमीभाव ठरविला जात आहे. त्यालाही विरोध आहे. पंतप्रधान मोदी यांनी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे पुन्हा गाजर दाखविले आहे. दुसऱ्या बाजूला दीडपट हमीभाव देणे शक्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात दिले आहे. त्यामुळे मोदी शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत.

परदेशातील स्वीस बँकेत काळा नव्हे पांढरा पैसा असल्याचा साक्षात्कार आता अर्थमंत्र्यांना झाला आहे. हे जर खरे असेल तर निवडणुकीत काळा पैसा आणून प्रत्येकांच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन देऊन जनतेची फसवणूक केल्याचे मोदींनी मान्य करावे. त्याबद्दल जनतेची त्यांनी माफी मागावी. अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचा अभ्यास कमी असल्याने माणसांना खाण्यासाठी रेशनवर मका पुरवठा करीत आहेत. त्यांना जर मका खपवायचा असेल तर एक रुपये किलो दराने जिल्ह्यात पाठवावा. शेतकरी जनावरांसाठी तो आनंदाने खरेदी करेल.

००००

चौकट

कारखानदार, सरकारने पाहावे

साखर कारखानदारांनी थकीत एफआरपी त्वरित द्यावी. ती कशी द्यायची ते कारखानदार आणि सरकारने ठरवावे. उत्पादकांना पैसे मिळाले पाहिजेत, ही आमची मागणी आहे. कारखानदारांनी इमानदारीने शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी पाठपुरावा करावा. हवे तर आम्ही मदत करू, असे खासदार शेट्टी यांनी सांगितले.

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारच्या धडकेत महिला ठार

0
0

कारच्या धडकेत महिला ठार

कोल्हापूर : पुणे-बेंगळूरू महामार्गावर कणेरी फाटा येथे कारच्या धडकेत पादचारी महिला ठार झाली. शांतव्वा गडगीअप्पा ब्राह्मणकर (वय ४५, रा. सध्या रा. कणेरी, मूळ गाव रामपूर, जि. बेळगाव) ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता अपघात झाला.

शांतव्वा ब्राह्मणकर या रस्त्याच्या कडेने चालत कामावर जात होत्या. एका कारने दोन ते तीन मोटार सायकलला धडक देऊन रस्त्यावरुन चालत जाणाऱ्या शांतव्वा यांना जोरात धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना कणेरी येथील ग्रामस्थांनी खासगी रुग्णवाहिकेने सीपीआर रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. प्राची राहुल नांगरे या कार चालवत होत्या. नांगरे या गडहिंग्लजकडे जात असताना कारवरील ताबा सुटल्याने अपघात झाला, असे गोकुळ शिरगाव पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेरीवाले आज आयुक्तांची भेट घेणार

0
0

फेरीवाले आज घेणार

आयुक्तांची भेट

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेतर्फे कोंबडी बाजार परिसरात व्यापारी संकुल उभारणी प्रस्तावित आहे. मात्र, या संकुलामुळे या परिसरातील पन्नासहून अधिक फेरीवाल्यांवर विस्थापित होण्याची वेळ येणार आहे. महापालिकेने त्या फेरीवाल्यांना विस्थापित न करता त्याच परिसरात व्यवसाय करु द्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन करु असा निर्णय श्री शाहू फेरीवाले संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.

संघटनेचे महंमदशरीफ शेख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. संघटनेतर्फे सोमवारी (ता. २) दुपारी चार वाजता आयुक्तांना मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी महंमदशरीफ शेख म्हणाले, 'गेली तीस, चाळीस वर्षे फेरीवाले या भागात व्यवसाय करत आहेत. त्यांना कायद्याप्रमाणे व्यवसाय करू द्यावा. या भागातील रस्ते अरुंद आहेत, व्यापारी संकुल झाल्यास वाहतुकीचा प्रश्न निर्माण होईल.'

महापालिकेतील सभागृह नेता दिलीप पोवार, रियाज सुभेदार, म्रेड दिलीप पवार, गणी आजरेकर, सुरेश जरग यांनी फेरीवाल्यांच्या मागणी न्याय असून त्यांची पाठीशी राहू असे सांगितले. याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, सरला पाटील, शशिकांत मेथे, चंदा बेलेकर, किरण गवळी, अविनाश उरसाल, के. एम. बागवान, वसंत मुळीक आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महानगरपालिका मुकादमास मारहाण

0
0

महानगरपालिकेच्या

मुकादमास मारहाण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कामावरुन लवकर का जातोस?' याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील मुकादम रितेश रामस्वरुप पटवणे (वय ३२) याला सफाई कामगाराच्या भाच्याने बेदम मारहाण केली. रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास रेसकार्स चौकात ही घटना घडली.

या घटनेची घडलेली हकीकत अशी की, महानगरपालिकेतील एका सफाई कर्मचाऱ्याची कामाची वेळ सकाळी सहा ते दुपारी दोन अशी असताना तो रोज साडेआठ वाजता कामावरुन घरी जात होता. त्याबद्दल मुकादम रितेश पटवणे यांनी २५ जून रोजी त्याला कामावरील हलगर्जीपणाबद्दल जाब विचारला. यावेळी दोघांत वादावादी झाली. कर्मचाऱ्याला जाब विचारल्यामुळे त्याचा भाचा मुकादम पटवणे यांच्यावर चिडून होता. रविवारी दुपारी कर्मचाऱ्याचा भाचा सहकाऱ्यासह रेसकोर्स चौकात आला. त्याने पटवणे यांना अडवून मामाला जाब का विचारतो म्हणून लाथा-बुक्क्यांसह दगड, काठ्यांनी मारहाण केली. त्यामध्ये पटवणे जखमी झाले. त्यांना सीपीआर रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले. सीपीआर पोलिस चौकीत मारहाणीत जखमी अशी नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गांजा विक्रीतील मुख्य सुत्रधाराचा शोध

0
0

गांजा विक्रीतील

सूत्रधाराचा शोध

कोल्हापूर : राजारामपुरीतील गांजा विक्री प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधाराचा शोध घेण्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पथके पाठवली आहेत. शनिवारी (३०) पोलिसांनी दीड किलो गांजा जप्त केला आहे.

राजारामपुरीत गांजा विक्री केली जात आहे अशी माहिती राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील यांना मिळाली. त्यांनी शनिवारी रात्री राजारामपुरीतील दहाव्या गल्लीतील गांजा विकणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दीड किलो गांजा मिळाल्याने पोलिस हादरुन गेले. पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवत दोघा संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू केली आहे. कोल्हापुरात शेजारच्या जिल्ह्यातून गांजा येत असल्याने पोलिसांनी मुख्य सुत्रधारांना शोधण्यासाठी पथके तयार केली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पथके पाठवण्यात आली आहे. राजारामपुरीतून शहरातील कोणत्या भागात गांजाचे वितरण होते याची माहिती पोलिस घेत आहेत. गांजा विक्रीसाठी तरुणांना जाळ्यात ओढले जात आहे का? याचा तपासही पोलिस करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

... तर मुंबईचा दूध पुरवठा रोखू-राजू शेट्टी

0
0

कोल्हापूर:

'आतंरराष्ट्रीय बाजारपेठेत दुधाच्या भुकटीचे दर कमी झाले आहेत. परिणामी देशांतर्गंत बाजारपेठेतील भुकटीचे दर कोसळले असून गायीच्या दुधाचे दर कमी झाले आहेत. दूध व्यावसाय तोट्यात आला आहे. त्यामुळे सरकारने १५ जुलैपर्यंत दूध उत्पादकांच्या खात्यावर प्रती लिटर ५ रूपयांप्रमाणे अनुदान जमा करावे. अन्यथा १६ जुलैपासून बेमुदत दूध संकलन बंद पाडू. सर्व रस्त्यांची नाकेबंदी करून मुंबईला एक थेंबही दूध सोडणार आहे. या आंदोलनात राज्यातील लाखो शेतकरी सहभागी होतील. दूध उत्पादकांच्या न्याय, हक्कासाठी प्रसंगी कायदा हातात घेऊ', असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला.

खासदार शेट्टी म्हणाले, 'आतंरराष्ट्रीय बाजारपेठेत यापूर्वी दुधाच्या भुकटीचे किलोचे दर १३५ रूपये होते. ते आता २७५ रूपयांपर्यंत खाली आले आहेत. संकलित केलेल्या ५५ टक्के दुधाची भुकटी आणि बटर केले जाते. यामुळे भुकटीचे दर कमी झाल्याचा थेट तोटा उत्पादकांना बसत आहे. गायीच्या दूधाचे दर कमी झाल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. उत्पादक अडचणीत आल्याने दूध उद्योग संकटात आहे. याचे संकेत मिळाल्याने सहा महिन्यापूर्वी केंद्रीय कृषीमंत्र्याची भेट घेऊन दूध उद्योगास सावरण्यासाठी ठोस उपाय योजना करण्यासंबंधीची मागणी केली. मुख्यमंत्र्याचेही लक्ष वेधले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे नाईलास्तव आंदोलन करण्याची वेळ आली आहे.'

ते पुढे म्हणाले, 'पुणे येथे स्वाभिमानीच्या नेतृत्वाखाली २९ जूनला निघालेल्या अभूतपूर्व मोर्चावेळी दुधाला प्रती लिटर ५ रूपयांचे अनुदान थेट उत्पादकांच्या खात्यावर जमा करावे, गरीब देशांत भुकटी निर्यात करावी, बफर स्टॉक करून दूध व्यावसायाला सावरावे अशी मागणी केली आहे. अशाप्रकारचे अनुदान कर्नाटक सरकार देते. गुजरात सरकारनेही दूध उद्योगाला मदत केली आहे. यामुळे प्रती लिटर ५ रूपयांचे अनुदान उत्पादकांना तातडीने देणे महाराष्ट्र सरकारला शक्य आहे. दूध उद्योग अडचणीतून बाहेर येईपर्यंत असे अनुदान दिल्यास सरकारला महिन्याला दीडशे कोटींची तरतूद करावी लागते. दूध उत्पादकांसाठी महिन्याला सरकारने इतके पैसे उभा करावेत. अन्यथा सरकारशी संघर्ष अटळ आहे. मुंबईला जाणारे पुणे, नाशिक, अहमदाबाद असे तीन प्रमुख मार्ग आहेत. त्या मार्गावर नाकाबंदी करून मुंबईला जाणारे दूध रोखले जाईल. त्यावेळी सरकारने पोलिस बळाचा वापर केल्यास कायदा हातात घेऊ.'

११ वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती

'दूध दरासाठीची ११ वर्षांपूर्वी मुंबईचा दूध पुरवठा बंदचे आंदोलन केले होते. त्याला यश आल्याने मुंबई दुधापासून तडफडल्याने सरकारला जाग आली. यावेळचे आंदोलनही तीव्र असेल. एक थेंबही दूध मुंबईला सोडणार नाही. दूध संघांनी आंदोलनाला विरोधाची भूमिका घेऊन आमच्याशी पंगा घेऊ नये. उत्पादकांच्या भल्यासाठी सहकार्य करावे', असे आवाहनही खासदार शेट्टी यांनी केली.




मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रीन मोहीम

0
0

हिरवाईने बहरणार महाराष्ट्र उद्यान

मटा-गार्डन्स क्लब आणि महापालिकेच्या साथीने वृक्षारोपण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या उद्यानांचे संवर्धन आणि पर्यावरण जागृती निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स, गार्डन्स क्लब आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कृतिशील उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातंर्गत रविवारी ताराबाई पार्क येथील महाराष्ट्र उद्यानामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आणि माजी महापौर अर्जुन माने यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले.

वृक्षारोपणाच्या पहिल्याच उपक्रमांला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये विशेषत: महिलांचा उल्लेखनीय सहभाग होता.

रविवारी महाराष्ट्र उद्यानात झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यफूल असलेल्या जारुळ (ताम्हण) वृक्षांचे रोपण करण्यात आले. उद्यानाच्या सुशोभिकरणाची प्रक्रिया अव्याहतपणे सुरू राहणार आहे. यासाठी स्थानिक नागरिकांची मदत घेतली जाणार आहे.

कार्यक्रमात आयुक्त डॉ. चौधरी म्हणाले, 'शहरातील अनेक ओपन स्पेस आणि उद्यानांमध्ये विकासात्मक प्रकल्प राबविता येऊ शकतात. उद्यानांचे सुशोभीकरण करण्यासाठी लोकसहभाग मिळाल्यास विकासाला अधिक चालना मिळेल. सामाजिक संस्थांनी उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी तयारी दर्शवल्यास त्याला महापालिका सर्वोतोपरी मदत करेल. त्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.' यावेळी आयुक्तांनी महाराष्ट्र टाइम्स व गार्डन्स क्लबने हाती घेतलेल्या कृतिशील उपक्रमांचे कौतुक केले.

तत्पूर्वी गेल्या एक महिन्यापासून उद्यानाच्या सुशोभिकरणाची प्रयत्न सुरू झाले आहेत. या अंतर्गत प्रथम उद्यानांची सफाई करण्यात आली. उद्यानामध्ये तयार होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नागरिकांना प्रात्यक्षिकेही देण्यात आली आहेत. पुढील काळात उद्यानाला संरक्षक भिंतीची उभारणी केली जाणार आहे. या भिंतीवर पर्यावरण पूरक संदेश चित्रमयरित्या साकारले जाणार आहेत असे यावेळी सांगण्यात आले.

वृक्षारोपण कार्यक्रमास गार्डन्स क्लबच्या सुनीता देशमुख, संगिता कोकितकर, शैला निकम, कविता मोदी, वर्षा वायचळ, जयश्री कजारिया, अमृता वासुदेवन, रेणुका वाधवानी, कृपेश हिरेमठ, श्रीनिवास जोशी, मंगेशराव देशमुख, इंडियन वुमेन्स सायंटिस्ट असोसिएशनच्या डॉ. स्मिती गिरी, रोटरी क्लब ऑफ गार्गीच्या प्रेसिडंट सुजाता लोहिया, सेक्रेटरी कविता घाटगे, सुरेखा इंग्रोळे, आशा जैन, विना सिन्हा, कोल्हापूर बोन्साय क्लबच्या सुनीती देशमुख, रत्नोदय सोसायटीच्या चेअरमन प्रभावती सावंत, सेक्रेटरी संध्या वराडकर, दिलीप जोशी, सुधीर सावंत, आशा खाडिलकर, मिलिंद हावळ, आरती हावळ आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र उद्यानाप्रमाणे शहरातील सर्व उद्यानांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबवले पाहिजेत. यातून पर्यावरण चळवळ वाढीस लागेल. पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षणही होईल. शहरामध्ये असे उपक्रम राबवण्यास सामाजिक संस्था तयार असल्यास त्यांना गार्डन्स क्लबच्यावतीने सर्वोतोपरी मार्गदर्शन केले जाईल.

- रमेश शहा, गार्डन्स क्लब

महाराष्ट्र टाइम्सने पर्यावरण रक्षणाचा चांगला उपक्रम घेतला आहे. क्लबच्यावतीने ग्रीन सिटी प्रोजेक्ट हाती घेतला आहे. वर्षभर या प्रोजेक्टच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात येणार आहे. रविवारी या अंतर्गत पहिला उपक्रम झाला. उद्यान सुशोभिकरण आणि पर्यावरण संवर्धनासाठी नेहमीच प्रयत्न केले जातील.

- सुजाता लोहिया, प्रेसिडंट, रोटरी क्लब ऑफ गार्गी,

वृक्षारोपण मोहिमेसाठी रत्नोदय हाउसिंग सोसायटीने नेहमीच पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र टाइम्सचा उपक्रम स्तुत्य असून ग्रीन इंडिया, ग्रीन कोल्हापूर प्रमाणेच ग्रीन नागाळा पार्क अशी नवी ओळख यातून निर्माण होईल.

- अजयराज वराडकर, स्थानिक नागरीक

पर्यावरण संवर्धनाचा संदेश

'एकीचे बळ, मिळते फळ' याचा प्रत्यय देत रविवारी आयोजित वृक्षलागवडीच्या उपक्रमात आला. कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेकांनी कार्यक्रमात सहभाग घेत पर्यावरण सजगतेबरोबर पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. सकाळी सात वाजल्यापासून वृक्षारोपण करत अनेकांनी ग्रीन संडे साजरा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोंडीमुळे अपघाताला निमंत्रण

0
0

अजय जाधव, जयसिंगपूर

कोल्हापूर-सांगली मार्गावर जयसिंगपूर, उदगाव ते अंकली टोलनाका दरम्यान वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी अपघाताला निमंत्रण देत आहे. पोलिसांनी सूचना फलक लावूनही या मार्गावरून अवजड वाहतूक सुरूच आहे. यामुळे आता अशा वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे.

कोल्हापूर-सांगली रस्ता चौपदरीकरणांतर्गत शिरोली फाटा ते तमदलगे येथील बसवान खिंड हा रस्ता चौपदरी करण्यात आला. जयसिंगपूर शहरातून रस्ता चौपदरीकरणास विरोध झाल्याने बसवान खिंड, निमशिरगाव, जैनापूर ते अंकली टोलनाका हा रस्ता दुपदरी तर बसवान खिंड जयसिंगपूर, उदगाव ते अंकली टोलनाका हा रस्ताही दुपदरी करण्यात आला. त्यामुळे कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील वाहतूक काही प्रमाणात तमदलगे, निमशिरगाव या बायपास रस्त्याने सुरू झाली. मात्र, तरीही उदगाव, जयसिंगपूर शहरातून जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण अद्याप कायम आहे.

गेल्या वीस वर्षांत कोल्हापूर-सांगली महामार्गावर वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या मार्गावरील अवजड वाहतुकीमुळे जयसिंगपूर व उदगाव येथे वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे. ही कोंडी टाळण्यासाठी जयसिंगपूर पोलिसांनी अवजड वाहतुकीस जयसिंगपूर-उदगाव मार्गावरून प्रवेशबंदीचे फलक बसवान खिंड तसेच अंकली टोलनाक्याजवळ लावले आहेत. मात्र, यानंतरही सूचना फलकांकडे दुर्लक्ष करून या रस्त्यावरून अवजड वाहतूक सुरूच आहे.

कोल्हापूर-सांगली रस्ता जयसिंगपूर शहराच्या मध्यभागातून गेला आहे. रस्त्याच्या दक्षिण बाजूस बहुतांश शाळा व महाविद्यालये आहेत. यामुळे सकाळी व संध्याकाळी वाहनांच्या गर्दीतून जीव मुठीत धरून विद्यार्थी व महिलांना रस्ता ओलांडावा लागतो. जयसिंगपूर बसस्थानकातून एसटीच्या तब्बल १३०० हून अधिक फेऱ्या होतात. यामुळे बसस्थानकासमोर तसेच मध्यवर्ती क्रांती चौकात अनेकदा वाहतूक ठप्प होते. रविवारी आठवडी बाजारदिवशी वाहनांच्या रांगा नित्याच्याच असतात.

उदगाव येथे बसस्थानकासमोर रस्त्यावरच एसटी बसेस थांबतात. परिणामी या ठिकाणी तसेच कोल्हापूर सांगली मार्गावर शिरोळकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते. उदगाव रेल्वे उड्डाणपुलाजवळ रस्ता अरुंद आहे. याठिकाणी रस्त्याकडेला फळविक्रेते बसलेले असतात. वाहनधारक फळे खरेदीसाठी रस्त्यावरच वाहने उभी करीत असल्यानेही वाहतूक ठप्प होते. उदगाव, जयसिंगपूर येथे वाहतुकीच्या कोंडीमुळे लहान-मोठे अपघातही होत आहेत. यामुळे कोल्हापूर-सांगली महामार्गावरील अवजड वाहने बायपास रस्त्याने वळविण्यासाठी जिल्हा पोलिस यंत्रणेकडून ठोस उपाययोजनेची गरज आहे. अवजड वाहने शहरात आल्यास दंडात्मक कारवाईचे पाऊलही उचलावे अशी नागरिकांची मागणी आहे.

००००

अवजड वाहतूक सुरूच

३ मार्चला उदगाव येथील रेल्वे उड्डाणपुलाला कंटेनरने धडक दिली. या घटनेत रेल्वेचे रूळ सरकले होते. यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूस लोखंडी संरक्षक कमानी उभारण्यात आल्या आहेत. उदगाव-जयसिंगपूर मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरून अवजड वाहतुकीस प्रवेश बंदी करण्यात आली आहे. याबाबत सूचना फलकही लावले आहेत. मात्र, यानंतरही अवजड वाहतूक सुरूच आहे.

०००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुलेटसह आठ मोटरसायकल चोरणाऱ्या दोघांना अटक

0
0

बुलेटसह आठ मोटरसायकली

चोरणाऱ्या दोघांना अटक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बुलेटसह आठ मोटारसायकल चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या पथकाने अटक केली. रेकॉर्डवरील गुन्हेगार पवन राजू नामे (वय २०, रा. टिंबर मार्केट, गंजीमाळ) आणि त्याचा साथीदार प्रितम बाबूराव परीट (वय २९, रा. राजेंद्रनगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

शहरातील वाहन चोरीच्या गुन्ह्याना आळा बसावा यासाठी नियुक्त विशेष पथकातील हेडकॉन्स्टेबल अमर आडुरकर, समीर मुल्ला, अभिजित घाटगे यांना गस्त घालत असताना रेकॉर्डवरील गुन्हेगार पवन नामे याच्याकडे वेगवेगळ्या मोटारसायकल असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने मोटारसायकल चोरीची कबुली दिली. त्याने मध्यवर्ती बसस्थानक, कागल बाजारपेठ, जयसिंगपूर बसस्थानक परिसरातील पाच मोटारसायकल चोरुन मित्र प्रितम परीट याच्याकडे विक्रीस दिल्या होत्या. त्यामध्ये तीन स्प्लेंडर, एक हिरोहोंडा पॅशन, एक अॅक्टिव्हा मिळाल्या. परीट याच्याकडे सांगलीतील त्याच्या मित्राने चोरी करून विक्रीसाठी दिलेल्या तीन मोटारसायकल मिळाल्या. त्यामध्ये एक बुलेट, दोन स्प्लेंडर अशा सव्वा दोन लाख रुपये किंमतीच्या मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images