Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘खासगी सावकारांविरोधात निर्भयपणे तक्रारी द्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर जिल्ह्यातील खासगी सावकारी मोडून काढण्यासाठी तक्रारदारांनी पुढे येण्याची गरज आहे. तक्रारदारच आले नाहीत तर पोलिसांना कारवाई करता येणे अवघड आहे. त्यामुळे सावकारीच्या त्रासाचा सामना करणाऱ्यांनी निर्भीपणे पुढे येऊन तक्रारी द्याव्यात. खासगी सावकारांपासून त्यांना मुक्त करण्याची जबाबदारी पोलिस घेतील. भविष्यात सावकारांकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याचाही बंदोबस्त केला जाईल. नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन तक्रारी द्याव्यात,' असे आवाहन पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी केले आहे.

शहरासह जिल्ह्यात खासगी सावकारी बोकाळली आहे. १० ते ३० टक्के दरमहा व्याजदर आकारून नागरिकांची लूट केली जाते. सावकारांच्या दमदाटीने आणि भीतीने लोक तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात येत नाहीत. खासगी सावकारांकडून गुंडांच्या माध्यमातून दहशत निर्माण केली जाते. कर्जदारास जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणीच्या स्वरुपात रक्कम वसूल केली जात आहे. काही ठिकाणी घर, जमीन बळकावण्याचेही प्रकार घडले आहेत. सावकारांच्या दहशतीने तक्रारी दाखल होत नसल्याने पोलिसांनी कारवाई करण्यात मर्यादा येतात. अनेकदा आवाहन करूनही जून महिन्यात जिल्ह्यात खासगी सावकारांविरोधात केवळ नऊ गुन्हे दाखल झाले आहेत. नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत, पोलिस अधीक्षक कार्यालय किंवा स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी. तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवले जाईल. याशिवाय तक्रारदारास पूर्णपणे पोलिसांचे संरक्षण राहील, अशी माहिती अधीक्षक मोहिते यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जमिनीच्या वादातून दमदाटी

$
0
0

सात सिंगल फोटो...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बाळेघोल (ता. कागल) येथील जमिनीचा हक्क सोडण्यासाठी जमिनीच्या मूळ मालकाला दमदाटी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी सात जणांना अटक केली. यात एका पोलिसाचाही समावेश आहे. महापालिकेत दोनवेळा महत्त्वाचे पद भूषविलेल्या एका माजी नगरसेवकाच्या साथीदारांनी दमदाटी केल्याप्रकरणी त्या नगरसेवकाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. याबाबत दिलीप मारुती पाटील (वय ४१, रा. ताराबाई पार्क, शिवशक्ती हेरिटेज, कोल्हापूर) यांनी फिर्याद दाखल केली.

सहायक फौजदार हंबीरराव गोविंद पाटील, त्यांची पत्नी (दोघेही रा. बाळेघोल) यांच्यासह प्रशांत दिगंबर नीळकंठ (४५, रा. शनिवारपेठ), पंकज गजानन बोळाज (२५, रा. गावभाग, सांगली), तानाजी आनंदराव जाधव (३०, रा. पाचगाव), रविराज भरत चौगुले (३३, रा. शिवाजी पेठ), बंडू प्रल्हाद लोंढे (२९, रा. गंजीमाळ, शिवाजी पेठ) आणि बाळकृष्ण भैरू डावरे (३६, रा. खरी कॉर्नर, कोल्हापूर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप पाटील यांची बाळेघोल येथे जमीन आहे. शिवाजी पेठेतील एका माजी नगरसेवकाच्या बहिणीचे कुटुंबीय आणि फिर्यादी पाटील यांच्यात जमिनीच्या मालकीवरून वाद आहे. माजी नगरसेवकाच्या बहिणीचा पती हंबीरराव पाटील पुण्यात सहायक फौजदार आहे. १४ जूनला हंबीरराव पाटील, त्याची पत्नी यांच्यासह नऊजण दिलीप पाटील यांच्या ताराबाई पार्कातील घरी गेले. 'बाळ‌ेघोल येथील जमिनीचा हक्क सोड. नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही,' अशी धमकी दिली. यानंतर माजी नगरसेवकाच्या सांगण्यावरून दिलीप पाटील यांना खरी कॉर्नर येथे बोलावून दमदाटी केली. तसेच तसेच वारंवार मेसेज व मोबाइलवरून धमकीही दिली. या प्रकाराला कंटाळून पाटील यांनी मंगळवारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यानुसार पोलिसांनी प्रशांत नीळकंठ, पंकज बोळाज, तानाजी जाधव, रविराज चौगुले, बंडू लोंढे आणि बाळकृष्ण डावरे अशा सातजणांना अटक केली.

या गुन्ह्यात शिवाजी पेठेतील एका माजी नगरसेवकाचा सहभाग असल्याच्या संशयावरून पोलिसांचा तपास सुरू आहे. गेले दोन दिवस पोलिस माजी नगरसेवकाच्या घराकडे जात आहेत. मात्र, नगरसेवक शहराबाहेर गेल्याचे सांगण्यात आले. चौकशीनंतर गुन्ह्यात सहभाग आढळल्यास त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, अटकेतील संशयितांना जिल्हा कोर्टात हजर केले असता, त्यांना जामीन मिळाला.

०००

माजी नगरसेवकाच्या

सहभागाचा शोध सुरू

माजी नगरसेवकाच्या सांगण्यावरूनच दिलीप पाटील यांना दमदाटी झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दमदाटी करण्यासाठी अटकेतील एका संशयिताला त्या नगरसेवकाने मेसेज पाठवला होता. याशिवाय मोबाइलवरून बोलणेही झाले होते. हे सर्व पुरावे शोधण्याचे काम सुरू आहे.

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणच्या मुख्य अभियंतापदी भोसले

$
0
0

फोटो आहे...

महावितरण मुख्य

अभियंतापदी भोसले

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुख्य अभियंता किशोर परदेशी यांची महावितरणच्या मुख्यालयात बदली झाल्याने महावितरण कोल्हापूर परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी अनिल भोसले बदलीवर रुजू झाले. भोसले यांनी यापूर्वी मुख्य अभियंता म्हणून लातूर परिमंडल व पुणे प्रादेशिक विभागात काम केले आहे. अधीक्षक अभियंता म्हणून त्यांनी सोलापूर, लातूर, पुणे जिल्ह्यात काम केले आहे. महावितरणकडून ग्राहकाभिमुख सेवा देण्यासह यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीला प्राधान्य देऊन वीज अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही भोसले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दिली.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोडावत कॉलेजमध्ये अर्किटेक्चर

$
0
0

संजय घोडावत विद्यापीठात आर्किटेक्चर शाखा सुरू

कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरकडून मान्यता,

कोल्हापूर टाइम्स टीम

संजय घोडावत विद्यापीठात या वर्षी नव्यानेच स्कूल ऑफ आर्किटेक्चर शाखा सुरू करण्यात आली आहे. नुकतीच या अभ्यासक्रमाला नवी दिल्लीच्या कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरकडून मान्यता मिळाली आहे. हा अभ्यासक्रम पाच वर्षांचा आहे.

नाटा (NATA) किंवा जे ई ई (JEE) पेपर-२ या परीक्षा दिलॆले विद्यार्थी या शाखेसाठी प्रवेश पात्र राहतील. या व्यतिरिक्त डिप्लोमा सिव्हिल इंजिनीरिंग पूर्ण केलेले विद्यार्थी देखील या शाखेस प्रवेश पात्र आहेत. आर्किटेक्चर स्कुल साठी २५ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले प्राचार्य ए.एन.जोशी यांची नेमणूक करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त विद्यापीठात लिबरल आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, मॅनेजमेंट आणि टेक्नॉलॉजीमध्ये यूजी, पीजी आणि पीएचडी अभ्यासक्रम शिकवले जातात. विद्यापीठात संशोधन आधारित अध्यापनावर भर दिला जातो. विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, सृजनशीलता, कला गुणकौशल्य, तांत्रिक कौशल्ये व व्यावसायिक अभिवृत्ती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात.

याबद्दल विश्वस्त विनायक भोसले म्हणाले 'महाराष्ट्रात आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात रियल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात वेगाने विकास सुरु आहे त्यासाठी उत्तम दर्जाचे आर्किटेक्ट हवे आहेत. असे उत्तम दर्जाचे पदवीधर तयार करण्याचा संजय घोडावत विद्यापीठाचा मनोदय आहे.'

विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, कुलगुरू डॉ. व्ही. ए. रायकर यांनी या मान्यतेबद्दल आनंद व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाळीस टक्के पुनर्वसन अद्याप कागदावरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणा (चांदोली) धरणामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांचे भाग्य उजळून निघाले. मात्र धरणासाठी ज्यांची घरेदारे आणि शेतजमिनी पाण्याखाली गेल्या त्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे घोंगडे ३० वर्षांहून अधिक काळ भिजत पडले आहे. ४० टक्के प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झालेलेच नाही, असा प्रकल्पग्रस्तांचा दावा आहे, तर २० ते २५ टक्के पुनर्वसनाचे काम राहिले आहे, असे प्रशासन सांगते.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वारणा नदीवर १९६५ मध्ये राज्य सरकारकडून धरण बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली. प्रत्यक्षात धरणाच्या कामाला १९७० ते १९७२ या कालावधीत सुरुवात झाली. धरणाच्या पायासाठी आंबोळे गाव विस्थापित करण्यात आले. पुनर्वसन कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी आंबोळे गावाचे पुनर्वसन करण्यात आले. त्यानंतर करडे, तांबवे, वाडी हुरुप, दुर्गेवाडी ही गावे विस्थापित झाली. तीस वर्षांपूर्वी विस्थापित गावांतील ग्रामस्थ अशिक्षित असल्याने त्याचा फायदा घेत सरकारी यंत्रणांनी कागदोपत्री पुनर्वसन केल्याचा बनाव केला. प्रकल्पग्रस्तांना वारणा नदीकाठचा लाभ ज्या गावांना मिळाला त्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ३२०० हेक्टर जमिनीवर पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्यक्षात लाभक्षेत्रात इतकी जागा नसल्याने सुरवातीला प्रकल्पग्रस्तांना सरकारी जमिनी देण्यात आल्या.

हातकणंगले तालुक्यातील कुंभोज गावात १५० प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले. कुणाला अर्धा एकर तर कुणाला चार एकर जमिनी मिळाल्या. धरणाखाली ज्या शेतकऱ्यांना २० ते २५ एकर जमिनी गेल्या त्यांना चार ते पाच एकर जमिनी देऊन बोळवण करण्यात आली. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील जमिनी कसदार असल्याने पुनर्वसनात दिलेल्या जमीनीचा दर जास्त असल्याचे सांगून प्रकल्पग्रस्तांची तोंडे बंद करण्याचा प्रयत्न केला. काही शेतकऱ्यांना देवस्थानच्या मालकीच्या जमिनी देण्यात आल्या. देवस्थानच्या जमिनीवर प्रकल्पग्रस्तांची नावे लागली असली तरी मूळ मालक म्हणून देवस्थानच असल्याने प्रकल्पग्रस्तांना कर्ज मिळणेही अवघड झाले आहे.

प्रकल्पग्रस्तांना कुंभोज, लाटवडे, करडे, किणी, पारंगाव, चावरे, थेरगाव, कोडोली, सैदापूर, सरुड, नेर्ले, कोतोली, गोडोली, सोंडोली, जांभूर, विरळे या गावात जमिनी दिल्या आहेत. या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पग्रस्तांना दिल्याने स्थानिक गावकरी व प्रकल्पग्रस्तांच्यात सातत्याने वाद होत असतात. काही ठिकाणी प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांना जमिनी दिल्या. पण, जमीनमालकांनी कोर्टात धाव घेत पुन्हा जमिनी ताब्यात घेतल्याने प्रकल्पग्रस्त उघड्यावर पडले आहेत. प्रकल्पात जमिनी गेलेले मूळ मालक हयात नाही. त्यांची मुले, नातवंडे जमिनीसाठी सरकारी कार्यालयाचे उंबरे झिजवत आहेत. आजअखेर ६० टक्के प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झाले असून ४० टक्के प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नाही.

प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करताना काही सरकारी अधिकाऱ्यांनी घोळ घातले आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना किती जमिनी दिल्या, याची एकत्रित माहिती सांगली व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडे नाही. प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीची यादी संकलित माहिती करावी, अशी मागणी वारणा प्रकल्पग्रस्तांकडून होत आहे. पुनर्वसनाचे काम किचकट असल्याने पुनर्वसन कार्यालयाचा पदभार स्वीकारण्यास अधिकारी धजत नाहीत. राजकर्त्यांकडून पाठपुरावा होत नसल्याने धरणग्रस्तांचे घोंगडे भिजत पडले आहे.

०००००

श्रमिक मुक्ती दलाकडून प्रकल्पग्रस्तांना जमिनी मिळाव्या, यासाठी आंदोलन सुरु आहे. पण सरकारी अधिकारी वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारतात. प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्त व जमिनीचे वाटप यामुळे घोळ असल्याने प्रशासनाने जमीनवाटपाची माहितीचे संकलित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पुनर्वसनाचे काम थंडावल्याने लोकशाही मार्गाने आंदोलन सुरु आहे.

वसंत पाटील, वारणा प्रकल्पग्रस्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांना शालेय साहित्य

$
0
0

विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

कोल्हापूर टाइम्स टीम

क्रांतीसिंह नाना पाटील नगर येथील राजर्षी शाहू हायस्कूलमध्ये १०१ विद्यार्थ्यांना पेन आणि वह्यांचे वाटप करण्यात आले. जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे गजानन विभूते यांच्या कुटुंबियांकडून साहित्य देण्यात आले. अनिल चव्हाण यांनी या शालेय उपक्रमाची माहिती दिली. कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, रेणुका भक्त संघटनेचे संस्थापक अशोकराव जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. शोभा विभूते, सुशांत विभूते, माधुरी विभूते, प्रशांत विभूते, आदित्य विभूते, सुनील जाधव, केशव माने, पंकज बारटक्के, विजय पाटील आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक डी. जी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. निशा साळोखे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्या चव्हाण यांची निवड

$
0
0

विद्या चव्हाण यांची निवड

कोल्हापूर : हातकणंगले तालुका काँग्रेस आय कमिटीच्या अनुसूचित विभागाच्या अध्यक्षपदी विद्या मनोहर चव्हाण (चोकाक) यांची निवड करण्यात आली. त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन जिल्हाध्यक्ष बाजारीव सातपुते यांनी या पदावर निवड केली. त्यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयवंतराव आवळे, राजू आवळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योग दिन साजरा

$
0
0

व्याख्याने, प्रात्यक्षिकांतून योग दिन

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरातील विविध शैक्षणिक संस्था, संघटना आणि औद्योगिक संस्थांतर्फेही आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. अनेक ठिकाणी योग प्रशिक्षकांनी योग साधकांकडून योगाची प्रात्यक्षिके करवून घेतली. ठिकठिकाणी व्याख्यान, योग प्रात्यक्षिके झाली.

मेनन पिस्टन्स कंपनी : शिरोली येथील मेनन पिस्टन्स लिमिटेड कंपनीत योग दिन साजरा झाला. दैनंदिन कामकाजातून मानसिक ताणतणावाचे नियोजन व आरोग्य यासंबंधी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ संभाजीनगरतर्फे शिबिराचे आयोजन केले होते. एचआर विभागाचे एस.व्ही.शिंदे, आर.एम.तोंदले यांनी नियोजन केले. कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय चव्हाण व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. कंपनीचे असोसिएटेड उपाध्ययक्ष एस.बी.पी.कुलकर्णी व अमित देशपांडे यांचे सहकार्य लाभले.

प्रिन्सेस इंदूमतीदेवी हायस्कूल : प्रिन्सेस इंदूमतीदेवी हायस्कूल फॉर गर्ल्स प्रशालेमध्ये योगशिक्षिका स्वाती गंधवाले यांनी विद्यार्थिनीकडून योगाची प्रात्यक्षिके करुन घेतली. शिल्पा देगांवकर यांनी योगावर आधारित विविध प्रात्यक्षिके सादर केली. गीतांजली ठोमके यांनी सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकांविषयी मार्गदर्शन केले. शिबिरात २५० विद्यार्थिनीनी सहभाग घेतला. याप्रसंगी एनसीसी सहा महाराष्ट्र बटालियनचे प्रदीप कुमार, संस्थेच्या अध्यक्षा वत्सला पाटील, सचिव बिना मोहिते, कार्यकारिणी सदस्य राजलक्ष्मी खानविलकर, आशा पाटील, शैलजा भोसले, भारती कडेकर, वर्षा पाटीलल आदी उपस्थित होते.

उर्दू माध्यमिक विद्यालय : मौलाना अबुलकलाम आझाद उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे मुख्याध्यापक उस्मान मुकादम यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणजे काय यासंबंधी माहिती दिली. तसेच योगसनाच्या विविध प्रकाराविषयी माहिती दिली. मुलांनी विविध योगासने सादर केली. याप्रसंगी शाळा समितीचे अध्यक्ष मक्तुम देसाई, हनिफ म्हालदार, ए.ए.देसाई, एन.एस.मोमीन आदी उपस्थित होते.

स्काऊट-गाईड संस्था : कोल्हापूर भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्था व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने महावीर कॉलेज येथे योग दिन साजरा झाला. कार्यालयातील जिल्हा संघटन आयुक्त विक्रांत देशपांडे, लिपिक संजय नेबापुरे, सेवक विकास रत्नपारखे, संतोष कोळी यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला. विविध योगासने, प्राणायमची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

वालावलकर हायस्कूल : मुक्त सैनिक वसाहत परिसरातील शां.कृ.पंत वालावलकर हायस्कूलमध्ये योग प्रशिक्षक सदाशिव ऱ्हाटवळ यांनी योगाचे फायदे विद्यार्थ्यासमोर विषद केले. मुख्याध्यापक महावीर मुडबिद्रीकर, उपमुख्याध्यापक बाळाराम लाड, क्रीडाशिक्षक सुरेखा पोवार, दिनकर शिंत्रे, सागर वाडकरसह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. ध्यानधारणा, कपालभाती, प्राणायमची प्रात्यक्षिके सादर झाली.

गोखले कॉलेज : गोपाळकृष्ण गोखले कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना जनेतंर्गत जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. प्रा. एन. आर. कांबळे यांनी योगासनाची प्रात्याक्षिके सादर केली. प्रा. पी. बी. झावरे यांनी योगाची माहिती दिली. या वेळी प्राचार्य डॉ. ए. बी. गडकरी, उपप्राचार्य एस. एच. पिसाळ, पर्यवेक्षक एस. एन. मोरे आदी उपस्थित होते. एस. डी. मोहिते यांनी आभार मानले.

एलआयसी : योग दिनाचे औचित्य साधून भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे 'एलआयसी कॅन्सर कव्हर' ची माहिती देण्यात आली. सेंटरला भेट देणाऱ्या कॅन्सर पिडीतांच्या नातेवाईकांना या पॉलिसीचे महत्व सांगितले. डॉ. रेश्मा सूरज पवार यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या राधिका मोहिते, मुरामील पटेल, चेतन जावळे, एलआयसी मार्केटिंग व्यवस्थापक आजगांवकर, महेश कुलकर्णी, दिलीप मोरे, संजय ढवळे, देवेंद्र इंगळे आदी उपस्थित होते.

गिरी यांचा सत्कार

कोल्हापूर महापालिकेच्या योग वर्गात जागतिक योग दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होवून तहसिलदारपदी नियुक्ती झालेल्या ऐश्वर्या आनंद गिरी यांचा सत्कार करण्यात आला. सिने दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या हस्ते सत्कार झाला. याप्रसंगी राजाभाऊ पाटील, रमेश व सतीश आंबर्डेकर यांनी मनोगत व्यक्त केले. महापालिकेमार्फत कपिलतीर्थ मार्केट येथे मोफत योग वर्ग सुरु असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन रमेश आंबर्डेकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इचलकरंजी बेंदूर...

$
0
0

कर तोडण्याचा मान धाकट्या पाटलांच्या बैलाला

इचलकरंजी शहरात कर्नाटकी बेंदूर उत्साहात

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

वस्त्रनगरीत ११३ वर्षांची परंपरा असलेला कर्नाटकी बेंदूर सण गुरुवारी उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. सायंकाळी गावभागातील जुनी गावचावडी येथे मानाचा कर तोडण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये धाकट्या पाटलांच्या बैलाने कर तोडण्याचा मान मिळविला.

प्रतिवर्षाप्रमाणे शहर व परिसरात कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून गाय-बैलांना न्हाऊ माखू घातले जात होते. त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घालून पुरणपोळीचा नैवेद्य खायला दिला गेला. त्याचबरोबर घरात मातीचे बैल आणून त्यांची हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगांवर ठेवून त्यांची मनोभावे पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. सकाळपासून पंचगंगा नदीघाटावर बैलांना अंघोळ घालून आकर्षक रंगांनी व फुलांनी सजवून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

शहरात गांधी पुतळा चौक, मंगळवार पेठ, झेंडा चौक, चंदूर रोड, आंबी गल्ली, अवधूत आखाडा, सांगली रोडसह आदी ठिकाणी कर तोडण्याचा कार्यक्रमही पार पडला. सायंकाळी प्रथेनुसार इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने गावभागातील महादेव मंदिरनजीक पारंपरिक पद्धतीने कर तोडण्याचा कार्यक्रम पार पडला. तत्पूर्वी उत्सव कमिटीच्या वतीने घेण्यात आलेल्या जनावरांच्या प्रदर्शनातील विजेत्यांना मान्यवरांचे हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, चंद्रकांत चौगुले, विलास गाताडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, आदींच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

बेंदूर उत्सव समितीने कागवाडे मळ्यातील जिम्नॅशियम मैदानात भरविलेल्या जनावरांच्या प्रदर्शनात विविध प्रकारची सुमारे शंभरहून अधिक जनावरे सहभागी झाली होती. उत्कृष्ट असलेल्या जनावरांना वेगवेगळ्या प्रकारची अनुक्रमे बक्षिसे देण्यात आली. त्यामध्ये मोठा गट : प्रमोद अण्णासाहेब कोले, दत्तात्रय श्रीपती शेळके, सिद्धू भाऊ लवटे. दोन दाती : सौरभ भाऊसाहेब पाटील, रवींद्र वसंतराव माने, केदार ज्ञानेश्‍वर कोळी. चारदाती : ओमकार अनंत कचरे, संतोष आनंदा लवटे यांच्या बैलास बक्षीस मिळाले. त्याचबरोबर दोनदाती, हणम, जवारी, गाय-वासरू, सुट्टा पाडा अशा विविध गटातील जनावरांना बक्षिसे देण्यात आली. याप्रसंगी प्रकाश दत्तवाडे, राजू माने, उत्तम आवाड़े, सुभाष जाधव, विजय भोसले, शैलेश गोरे, आर. के. पाटील, शिवाशिष पाटील उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी बेंदूर कमिटीच्या सदस्यांसह बाळासाहेब कलागते, राजेंद्र बचाटे, ईलाही कलावंत, संपत जामदार, सागर मगदूम, अहमद मुजावर, नंदू पाटिल, पापालाल मुजावर, शिवाजी काळे, शिवाजी माळी, राजू माळी, बजरंग अब्दागिरे, तानाजी मगदूम आदींसह गावकामगार पाटील, पोलिसपाटील यांचे सहकार्य लाभले.

०००००००

पुढील वर्षी बक्षिसांची बरसात

बेंदूर सणाचा वाढता उत्साह पाहून माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी पुढील वर्षापासून बक्षिसाच्या रकमेत भरघोस वाढ करण्याची घोषणा केली. त्यानुसार खुल्या गटासाठी अनुक्रमे एक लाख, ७५ हजार व ५१ हजार आणि लहान गटासाठी अनुक्रमे ७५ हजार, ६० हजार व ५० हजार अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाना पाटीलनगरमध्ये मनपा शाळेचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

क्रांतिसिंह नाना पाटीलनगर परिसरात नवीन कॉलन्या स्थापन होत आहेत. लोकवस्ती वाढत आहे. या परिसरात महापालिकेची शाळा नाही. प्राथमिक शाळेसाठी या भागातील मुलांना अन्यत्र जावे लागते. या भागात महापालिकेच्या वतीने प्राथमिक शाळा सुरू करावी यासाठी हालचाली सुरू आहेत. महापालिकेची प्राथमिक शिक्षण समितीची शुक्रवारी बैठक होत आहे. या बैठकीत हा प्रस्ताव सादर होणार आहे.

महापालिकेने उपनगरांत सुरू केलेल्या अनेक शाळा गुणवत्तेच्या बळावर हाउसफुल्ल ठरल्या आहेत. शिवाय खासगी शाळांना लाजवतील इतक्या सुविधा महापालिका शाळेत उपलब्ध आहेत. त्याच धर्तीवर क्रांतिसिंह नाना पाटीलगनर परिसरात प्राथमिक शाळा सुरू करावी, असा प्रस्ताव विचाराधीन आहे. सभापती वनिता देठे यासंबंधी प्रस्ताव सादर करणार असल्याचे वृत्त आहे. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर व आसपासच्या परिसरात मध्यमवर्गीय कुटुंबांची संख्या मोठी आहे. या भागातील पालकांनी शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९२५ वाहनधारकांकडूनदीड लाखांचा दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईची मोहीम पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी सुरू ठेवली. शहरासह जिल्ह्यात १२६ मद्यपी वाहनचालक आढळले, तर भरधाव वाहन चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे ७९९ वाहनधारक ट्रॅफिक ड्राइव्हमध्ये सापडले. मद्यपी वाहनधारकांविरोधात पोलिसांनी जिल्हा कोर्टात तक्रारी दाखल केल्या आहेत. ७९९ वाहनधारकांकडून १ लाख, ५१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

बेशिस्त वाहनधारकांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी रात्रीपासून ट्रॅफिक ड्राइव्ह सुरू केला आहे. या मोहिमेत मद्यपी वाहनचालकांसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत ९२ मद्यपी चालकांसह ४४० वाहनचालकांवर कारवाई झाली होती. यातून पोलिसांनी ९० हजारांचा दंड वसूल केला. बुधवारी रात्री ही कारवाई पुन्हा सुरू झाली. शहरातील दसरा चौक, बिंदू चौक, तावडे हॉटेल, कावळा नाका, सायबर चौक, शेंडा पार्क, संभाजीनगर चौक, रंकाळा, शिये रोड, कळंबा परिसरात पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी केली. जिल्ह्यात इचलकरंजी, पेठवडगाव, हातकणंगले, जयसिंगपूर, कागल, गडहिंग्लज, गारगोटी, आजरा, चंदगड, पन्हाळा, मलकापूर, आदी परिसरात ही कारवाई करण्यात आली. मध्यरात्रीपर्यंत केलेल्या कारवाईत १२६ मद्यपी वाहनचालक सापडले, तर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे ७९९ वाहनचालक सापडले. मद्यपी वाहनचालकांच्या विरोधात पोलिसांनी जिल्हा कोर्टात तक्रारी दाखल केल्या आहेत. बेशिस्त वाहनधारकांकडून १ लाख ५१ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगली-कोल्हापूर मार्ग मृत्यूचा सापळा

$
0
0

प्रवीण कांबळे, हातकणंगले

सांगली-कोल्हापूर महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने केलेल्या अरुंद पूल, संरक्षक कठडे, दिशादर्शक फलक यांसह अनेक अर्धवट कामांनी वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. परिणामी रस्त्यावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने हा महामार्ग जणू मृत्यूचा सापळाच बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करूनही जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षाने हा महामार्ग आणखी किती बळी घेणार? हा संशोधनाचा विषय बनला आहे.

दरम्यान, मंगळवारी झालेल्या कंटेनर व स्कूल बसच्या अपघाताने जिल्ह्यात खळबळ उडाली. मात्र, या अपघातानंतर महामार्गाची फक्त चर्चा होत असून, प्रत्यक्षात मात्र यामध्ये कोणताही मार्ग काढला जात नसल्याने प्रवासी व नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

सांगली-कोल्हापूर महामहामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या मालिकांत अनेक जीव जाऊन संसार उघड्यावर पडले. त्यामुळे या वाढत्या अपघातांना पायबंद घालण्यासाठी विविध संघटनांच्या जनआंदोलनाने व या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा निर्णय घेण्यात आला. ४३ किलोमीटर अंतरासाठी १९६.५ कोटी रुपयांचे हे काम सन २०१२ साली मुंबईतील सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला मिळाले; परंतु कंपनीने हे काम मुदतीत पूर्ण केले नाही. त्यामध्ये कंपनीने महामार्गावरील गतिरोधक नसणे, दिशादर्शक फलक नसणे, गावांलगत सेवामार्ग नसणे, वेगनियंत्रण नसणे, हातकणंगले उड्डाणपूल अर्धवट अवस्थेत, रस्त्यांचे चढ-उतार, रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टर नसणे, महामार्गावर प्रवाशांना उन्हाळ्यात व पावसाळ्यात उभे राहण्यासाठी पिकअप शेड नसणे, काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे गुळगुळीत झाला आहे, भुयारी मार्ग नसणे अशा अनेक कारणांमुळे अपघात वाढले आहेत. महामार्गावरील अरुंद पूल, संरक्षक कठड्यांचे अर्धवट बांधकाम व चोकाक फाट्यावरील 'एस' आकाराचे वळण यांसह अतिग्रे येथे पाण्याची मोरी बांधली नाही व रुकडी फाट्यावर गतिरोधक नाही तसेच कोल्हापूरहून येत असताना अतिग्रे गावाजवळ रस्ता निमुळता होत गेल्याने अपघातास निमंत्रण देणारे ठरत आहे.

महामार्गावरील अनेक कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याने मोठ्या प्रमाणात अपघातांची संख्या वाढल्याने 'सुप्रीमच्या' कारभाराबद्दल मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला होता. तीन वर्षांपूर्वी या महामार्गाचे हस्तांतरण राष्ट्रीय महामार्गात केल्याने या रस्त्याचे भाग्य उजळणार असे वाटत असताना आजअखेर याकडे कोणीही लक्ष दिले नसल्याने वारंवार अपघातांच्या घटना घडत आहेत. महामार्गावरील हालोंडी, मौजे वडगाव, अतिग्रे, इचलकरंजी फाटा, रुकडी फाटा, अतिग्रे, चोकाक फाटा, माले फाटा, बसवान खिंड, हातकणंगले बसस्थानक, मजले फाटा, आदी अनेक ठिकाणे मृत्यूचा सापळा बनली आहेत. हातकणंगले येथील उड्डाण पुलासाठी उभा केलेला सांगडा वडाप वाहतुकीचा अड्डा बनून तेथे वाहतूकदारांसाठी अपघातास आमंत्रण देणारे ठरत आहे तसेच सांगली फाट्यावरील टोल वसुलीचे शेड वाहतुकीस अडथळा ठरत आहे.

वारंवार होणाऱ्या अपघातांच्या घटनांकडे सार्वजनिक बांधकामसह लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन उपाययोजना करणे गरजेचे असताना त्यांच्या फक्त दिखाऊपणामुळे अनेक वाहनचालक बळी पडत असल्याने संतप्त नागरिक व प्रवाशांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.

००००००

लोकप्रतिनिधी, संघटना अज्ञातवासात

सांगली-कोल्हापूर महामार्गावरील निकृष्ट कामे करत असताना सुप्रीम कंपनीला सतत धारेवर धरून जाब विचारणारे लोकप्रतिनिधी, संघटनांचे पदाधिकारी सध्या महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या मालिकेकडे दुर्लक्ष करत आहेत. यामागचे गौडबंगाल चर्चेचा विषय असून, या गंभीर प्रश्नाकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे बनले आहे.

०००००

कोट...

महामार्गावरील अतिग्रे गावात सुप्रीम कंपनीने पाण्याची मोरी बांधली नाही, रुकडी फाट्यावर गतिरोधक नाही, गावातील रस्ता निमुळता होत गेल्याने अनेक अपघात घडले आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याने दिशादर्शक फलक लावण्यासाठी ग्रामस्थांची बैठक घेऊन आंदोलन करणार आहोत.

सागर पाटील, सरपंच, अतिग्रे

००००००

ठेकेदार कंपनी : सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर

कोल्हापूर-सांगली अंतर : ४३ कि.मी.

रस्त्यासाठीचा खर्च : १९६.५ कोटी

कामाला सुरुवात : २०१२

पाच वर्षांत : २७३ अपघातांत ७४ ठार

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोक जनशक्ती पार्टी शहरप्रमुखपदी पप्पू बल्लाळ यांची निवड

$
0
0

पप्पू बल्लाळ यांची निवड

कोल्हापूर

लोक जनशक्ती पक्षाच्या अध्यक्षपदी पप्पू पोपट बल्लाळ यांची शहरप्रमुख एकमताने निवड झाली. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. जिल्हा महासचिवपदी तकदीर कांबळे, उपाध्यक्षपदी तुलसीदास थोरात तर सहसचिवपदी भास्कर सोरटे यांचे निवड झाली. यावेळी चंद्रकांत माने, उदय भोसले, अशोक पोवार, श्रीधर कांबळे, प्रियंका गायकवाड, शारदा सकटे, शीतल क्षीरसागर, महिपत क्षीरसागर, दीपाली सकटे, लक्ष्मी भालकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसआरपीएफ अधिकाऱ्यांची चौकशी

$
0
0

अधिकाऱ्यांची डीआयजी कर्णिक यांच्याकडून तपासणी

म. टा. वृत्तसेवा कसबा बावडा

राज्य राखीव दलाचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप कर्णिक यांनी गुरुवारी (ता. २८) कोल्हापुरातील राज्य राखीव दलाच्या मुख्यालयास भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली. कोल्हापुरातील एका अधिकाऱ्याबाबत वरिष्ठांकडे निनावी पत्राद्वारे तक्रारी पोहोचल्या आहेत. या पार्श्वभूमीवर डीआयजी कर्णिक यांनी समादेशकांची चौकशी केली. चौकशी अहवालाबाबत मात्र त्यांनी मौन बाळगले. दरम्यान, राज्य राखीव दलाच्या जागेसंदर्भात ठोस चर्चा झाली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

राज्य राखीव दलाच्या कोल्हापुरातील बटालियनचे अधिकारी पदाचा गैरवापर करीत असल्याच्या तक्रारी पोलिस महासंचालक कार्यालयाकडे गेल्या होत्या. याबाबत अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी राज्य राखीव दलाचे उपमहानिरीक्षक संदीप कर्णिक गुरुवारी कोल्हापुरात आले होते. जुन्या पोलिस मुख्यालयाच्या इमारतीत असलेल्या राज्य राखीव दलाच्या कार्यालयात त्यांनी अधिकाऱ्यांची चौकशी केली. गेल्या वर्षभरातील कामकाजाची कागदपत्रेही त्यांनी तपासली. बटालियनच्या जागेसाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या निमित्ताने कोल्हापुरातील अधिकारी वारंवार मुंबईच्या फेऱ्या करतात. अनेक दिवस मुंबईत राहूनच ते काम करतात, त्यामुळे कोल्हापुरातील कामकाजाकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलिस दलाकडे बदली झाल्याचे आदेश आल्यानंतर आनंदोत्सव साजरा करणाऱ्या एका सहायक पोलिस निरीक्षकासह हवालदाराने कार्यालयातच दारू पार्टी केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. अशा असंख्य निनावी तक्रारी मुख्य कार्यालयात गेल्यानंतर उपमहानिरीक्षक कर्णिक चौकशी करण्यासाठी गुरुवारी दुपारी पोहोचले. बुधवारी रात्री अपर पोलिस महासंचालक राज्य राखीव दलाच्या मुंबईच्या कार्यालयातील एक उपनिरीक्षक व चार कारकून आले होते. त्यांनी गुरुवारी सकाळपासून कोल्हापूरच्या कार्यालयातील कागदपत्रे ताब्यात घेऊन तपासणी चालू केली होती.

भारत राज्य राखीव दलाच्या कोल्हापुरातील बटालियनची डिसेंबर २००८ मध्ये स्थापना करण्यात आली होती. राजकीय व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह कोकणात परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी बटालियनवर आहे. कोल्हापुरात सातशे जवान कार्यरत असून, या तुकडीतील कर्मचारी मुंबई, पुणे, दौंड या ठिकाणी पाठवले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षण आवाज...

$
0
0

आवाज फोटो आहेत...

००००००

'मराठा आरक्षण'

आता अंत पाहू नका

०००

आरक्षणासाठी मराठा समाजाने गेल्या वर्षी राज्यभर लाखोंच्या संख्येने शांततेत मोर्चे काढले. त्याला वर्ष होऊन गेले तरी आरक्षण मिळालेले नाही. आरक्षणाशिवाय सरकारच्या अनेक सेवा, सवलती, उपाययोजना अद्याप कागदावरच आहेत. त्यामुळे आरक्षणप्रश्नी हायकोर्टाने सरकारला काय केले, असा प्रश्न बुधवारी विचारला. त्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. सरकारने समाजाच्या सहनशीलतेचा अंत न पाहता न्यायालयात ठोस भूमिका मांडून तातडीने आरक्षण मिळवून द्यावे, अशी भावना विविध क्षेत्रांतील नागरिकांनी व्यक्त केल्या.

-------

भाजपकडून फसवणूक

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यकर्ते जाणीवपूर्वक रेंगाळत ठेवत आहेत. यावरून सरकार आरक्षणप्रश्नी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. यामुळेच हायकोर्टाने सरकारला जाब विचारला. मराठासह सर्वच समाजाला भाजपने फसविले आहे. सरकारी नोकरभरती बंदी करून बेरोजगारांना बेकारीच्या खाईत लोटण्यात आले. सरकारने मराठा समाजाचा अंत न पाहता तातडीने आरक्षण देण्यासाठी कोर्टात भक्कमपणे बाजू मांडावी, अन्यथा समाज आक्रमक होईल.

रूपेश पाटील, युवक

--------------

सरकारचे बोटचेपे धोरण

सेवा, सुविधा नसल्याने मराठा समाज विकासापासून मागे आहे. या समाजातील गरीब विद्यार्थ्यांना फीसाठीचे पैसे देणे शक्य नसल्याने शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. शेतमालाला भाव नसल्याने बहुसंख्य शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळेच मराठा समाजाने एकत्र येऊन आरक्षणाची मागणी केली आहे. त्याची दखल घेऊन सरकारने त्वरित आरक्षण देणे गरजेचे होते. मात्र, सरकार कोर्टाकडे बोट दाखवत आरक्षण देत नाही, असे अशी शंका येत आहे.

मदन बागल, व्यावसायिक

---------

विनाविलंब आरणक्ष द्या

गुणवत्ता असूनही आरक्षण नसल्याने मराठा समाजातील तरुणांना सरकारच्या विविध विभागात नोकरी मिळत नाही. शेतीचे तुकडे झाल्याने कुटुंब चालविणे अवघड झाले आहे. मोलमजुरी करून मराठा समाजातील कुटुंबास चारितार्थ चालवावे लागत आहे. गरीब कुटुंबातील अनेकांना पैसे नसल्याने चांगल्या कॉलेजमध्ये मुलांना शिक्षण देणे शक्य होत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणे काळाची गरज आहे. सरकारने विनाविलंब आरक्षणाची मागणी पूर्ण करावी.

संतोष भारती, नोकरदार

---------------------

ठोस भूमिका घ्यावी

आरक्षण नसल्याने मराठा समाजाचा सर्वांगीण विकास झालेला नाही. आरक्षणासाठी लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले. दुसऱ्या समाजाचे काढून मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी अजिबात मागणी आहे. इतर समाजाला ज्याप्रमाणे आरक्षण दिले आहे, त्याप्रमाणे मराठा समाजालाही आरक्षण मिळावे. सरकारने कोर्टात आरक्षण देण्यासाठी आवश्यक सर्व पुरावे देऊन ठोस भूमिका घ्यावी. त्यातून मार्ग काढून लवकरात लवकर आरक्षण द्यावे.

भरत पाटील, उद्योजक

---------------

सरकारबाबत शंका

मराठा समाजातील सर्वांचा आरक्षण हा जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. समाजातील पुढच्या पिढीची प्रगती होण्यासाठी आरक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. महागडी शैक्षणिक फी परवडत नसल्याने समाजातील अनेक मुले इंजिनीअरिंग, वैद्यकीय शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यामुळेच समाजाने आरक्षणाची मागणी केली आहे. हायकोर्टाने विचारणा केल्याने आरक्षणासंबंधी सरकार गंभीर आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दीपा डोणे, गृहिणी

--------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महानगरपालिका शाळेतीलविद्यार्थ्यांना दप्तर वाटप

$
0
0

कोल्हापूर

महानगरपालिका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेतर्फे विद्यार्थ्यांना महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते दप्तर वाटप करण्यात आले. प्रभाकर आरडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपमहापौर महेश सावंत, आशालता कांजर, सरिता सुतार यांची भाषणे झाली. सुधाकर सावंत यांचा महापौर बोंद्रे यांच्या हस्ते सत्कार झाला. याप्रसंगी शिक्षण समिती सभापती वनिता देठे, एस. के. यादव, अश्विनी बारामते, अरूण बारामते, दिलीप भोईटे, उमेश देसाई आदी उपस्थित होते. संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सरीता सुतार यांनी आभार मानले.

----------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजीनामा प्रक्रियाला ‘ब्रेक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे यांनी बुधवारी अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्याकडे राजीनामा दिला. मात्र अध्यक्षा महाडिक यांनी अद्याप राजीनामा मंजूर केलेला नाही. त्यामुळे पुढील प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. तातडीने मंजूर करून नव्याने निवड प्रक्रिया लावण्यासाठी इच्छुक प्रयत्नशील आहेत. दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राजीनामा मंजूर करण्याची भूमिका घेतल्यास विलंब होणार आहे. याउलट विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाचे कारभारी सदस्य सावध आहेत. निवडणूक लागल्यास नेत्यांनी आदेश दिल्यास उमेदवार उभा करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पान १ साठी आरटीओ निर्णय

$
0
0

शुभवार्ता

एका दिवसात

वाहन परवाना

कोल्हापूर

उमेदवारांचा वेळ, पैसा आणि धावपळ वाचविण्यासाठी कोल्हापूर आरटीओने एका दिवसांत वाहन परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे. वाहन चाचणीसह सर्व कागदपत्रांची छाननी एकाच दिवशी केली जाणार आहे. पोस्टाऐवजी परवाना थेट हाती दिला जाणार असल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. परवाना चाचणीची वेळही सकाळी साडेआठ वाजता केली आहे. ग्रामीण भागातील उमेदवारांचे कार्यालयाकडे हेलपाटे वाचविण्यासाठी तालुकानिहाय शिबिरांची संख्या वाढविली आहे. जिल्ह्यात ४० शिबिरे घेतली जाणार आहेत. पोस्टद्वारे किंवा थेट हाती लायसन्स असे दोन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. गुरूवारी एकाच दिवशी १६० लायसन्स तत्काळ तयार करण्यात आली. नवीन वाहन खरेदी केल्यानंतर एका दिवसांत वाहनांना क्रमांक मिळणार आहे. त्याचा एसएमएस वाहनधारकांच्या मोबाइलवर दिला जाणार आहे. लायसन्स मुदतवाढ, पत्ता बदल, नावांत बदल, अवजड वाहनांचा नूतनीकरण एका दिवसांत केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

...........

सविस्तर वृत्त पान ५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रास्त भाव संघटनेतर्फे उद्या सन्मान मेळावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेतर्फे शनिवारी (ता. ३०) राज्यस्तरीय सन्मान मेळावा आणि ई-पीडीएस प्रणाली कार्यशाळा आयोजित केली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील असून अन्न, नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते बायोमेट्रिक रेशनिंगमध्ये उत्कृष्ट काम केलेले अधिकारी, कर्मचारी, रास्त भाव दुकानदारांचा सत्कार होणार असल्याची माहिती ऑल इंडिया फेअर प्राईसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत यादव, रास्त भावचे रवींद्र मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कार्याध्यक्ष यादव म्हणाले, 'रास्त भाव धान्य दुकानदारांची बायोमेट्रिक रेशनिंग प्रणाली कार्यशाळा होत आहे. शासकीय विश्रामगृहाजवळील महासैनिक दरबार हॉलमध्ये दुपारी साडेबारा वाजता मेळावा होईल. कोल्हापूर जिल्ह्यात ईपीडीएस यंत्रणेची अंमलबजावणी फेब्रुवारी २०१८ मध्ये सुरू झाली. या योजनेंतर्गत अंत्योदय घटकाला ९० टक्के धान्य पाच लाख कुटुंबांना देण्यात आले. सरकारने या कामाची दखल घेऊन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे.' अन्न नागरी व पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, अव्वर सचिव किशोर ठोसर, ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनचे अध्यक्ष पुष्पराज देशमुख, उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी आदी उपस्थित राहतील. यावेळी गजानन हवालदार, राजन पाटील, राजेश मंडलिक आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनाराच्या पोलिस कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कसबा बावडा शाखेत तारण सोन्याचा अपहार करणाऱ्या तिघांपैकी सोनाराच्या पोलिस कोठडीत दोन जुलैपर्यंत वाढ झाली, तर बँकेच्या कॅशिअरसह शाखाधिकाऱ्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. अपहारातील सोन्याच्या रकमेची वसुली करण्यासाठी संशयितांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली.

जिल्हा बॅँकेचा कसबा बावडा शाखाधिकारी संभाजी शंकर पाटील (वय ५६, रा. शिये), कॅशिअर परशुराम कल्लाप्पा नाईक (४८, रा. बलभीम गल्ली, कसबा बावडा) यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी त्यांना गुरुवारी जिल्हा कोर्टात हजर केले होते. कोर्टाने या दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तर सराफ सन्मुख आनंदराव ढेरे (४५, रा. पिंजार गल्ली, कसबा बावडा) याला कोर्टाने आणखी पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली. सराफाची चौकशी सुरू असून, उर्वरित दोघांची रवानगी बिंदू चौकातील सबजेलमध्ये झाली. संशयित तिघांनी लॉकरमधील एक किलो वजनाचे सोने काढून तेथे बनावट दागिने ठेवले होते. अपहारातील ३२ लाखांच्या दागिन्यांपैकी दहा लाखांचे दागिने पोलिसांनी सराफ ढेरे याच्या दुकानातून जप्त केले आहेत. उर्वरित दागिन्यांच्या रकमेची वसुली करण्यासाठी तिन्ही संशयितांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images