Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आरपीआयचे नेते संधीसाधू - खासदार अशोक सिद्धार्थ

$
0
0

आरपीआयचे नेते संधीसाधू

अशोक सिद्धार्थ यांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) नेत्यांनी नेहमीच संधीसाधूपणाची भूमिका घेतली. काँग्रेस, भाजप यांच्याबरोबर सोयीनुसार हातमिळवणी करताना स्वत:चा फायदा करुन घेतला. त्यांच्या कृतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला हानी पोहोचली असल्याने राज्यातील जनेतचा आरपीआय नेत्यावरील विश्वास उडाला असल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीचे खासदार अशोक सिद्धार्थ यांनी पत्रकार बैठकीत केला.

राजर्षी शाहू महाराज जयंती समारोप कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार सिद्धार्थ म्हणाले, 'सत्तेच्या हव्यासापोटी आरपीआय नेत्यांनी नेहमीच सोयीची भूमिका घेत विरोधी विचारधारेच्या पक्षासोबत युती केली. डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे पाइक असल्याचे सांगताना प्रत्यक्षात मात्र त्यांना या विचारधारेविरोधात काम केले. आरपीआय नेत्यांची वृत्ती बहुजनांच्या हक्कावर गदा आणणारी असल्याने राज्यातील जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे.'

केंद्र सरकारवर टीका करताना खासदार सिद्धार्थ म्हणाले, 'देशाचा चौकीदार म्हणून काम करण्याची ग्वाही देत भाजपचे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. पण त्यांच्या समोरुनच नीरव मोदी, ललित मोदी व विजय मल्ल्या पळून गेले. निवडणूक प्रचारात दिलेल्या आश्वासनाचा भाजपला विसर पडला असल्याने, आगामी निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवेल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मेडिकल असोसिएशनचीवंध्यत्वावर कार्यशाळा

$
0
0

कोल्हापूर: कोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे निरंतर वैद्यकीय शिक्षण उपक्रमांतर्गत 'वंधत्व' विषयावर हॉटेल सयाजी येथे कार्यशाळा झाली. इंदिरा आयवीएफ सेंटरचे डॉ. रमेश गायकवाड, डॉ. नागदिप्ती नाई, डॉ. निलेश बालकवडे, डॉ. संतोष डफळे, डॉ. इंद्रनील जाधव, डॉ. भारती यांनी मार्गदर्शन केले. स्त्री आणि पुरूष यांच्यात वंधत्वाची कारणे, विटामिन डी, वंध्यत्व निवारणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धता आदींची माहिती कार्यशाळेत देण्यात आली. यावेळी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक जाधव, डॉ. सोपान चौगले, डॉ. ए. बी. पाटील, डॉ. रमाकांत दगडे, डॉ. शैलेश कोरे, डॉ. आनंद कोरे, डॉ. अरुण धुमाळे, डॉ. अमोल कोडोलीकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्यासाठी पोलिसांचे मॅरेथॉन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पोलिसांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी 'उत्तम आरोग्यासाठी मॅरेथॉन' हा उपक्रम सुरू केला. शाहू जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी सकाळी याची सुरुवात करण्यात आली. आठवड्यातून दोनदा किमान पाच किलोमीटर अंतर पळून आरोग्य सुदृढ राखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

बदलती जीवनशैली आणि कामाचा वाढता ताण यामुळे पोलिसांचे आरोग्य बिघडत आहे. पोलिसांचे आरोग्य उत्तम रहावे आणि त्यांची शरीरसंपदा सुदृढ रहावी, यासाठी नांगरे-पाटील यांनी पोलिसांच्या उत्तम आरोग्यासाठी मॅरेथॉन हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमात पोलिस किमान पाच किलोमीटर अंतर धावणार आहेत. राजर्षी शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी सकाळी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, गृह उपअधीक्षक सतीश माने, शहर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, करवीरचे उपअधीक्षक सूरज गुरव, शहरातील सर्व पोलिस ठाण्यांचे निरीक्षक, आदी ३० अधिकारी व १५० कर्मचाऱ्यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. पोलिस मुख्यालयापासून मॅरेथॉनला सुरुवात झाली. पितळी गणपती, धैर्यप्रसाद हॉल चौक, शासकीय विश्रामगृह, महासैनिक दरबार हॉल, न्यायसंकुल ते पोलिस मुख्यालय असे पाच किलोमीटर अंतर पूर्ण करण्यात आले.

यावेळी बोलताना नांगरे-पाटील म्हणाले, 'आरोग्य उत्तम असणे सर्वांसाठीच महत्त्वाचे आहे. पोलिसांच्या कामाच्या वेळांमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. यामुळे अनेक व्याधींचा सामना करावा लागतो. आरोग्याच्या तक्रारींमुळे कुटुंबातही कुरबूर सुरू राहते. कामावर याचा परिणाम होतो. हे टाळण्यासाठी पोलिसांनी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. धावणे हा सर्वांगसुंदर व्यायाम आहे. पोलिसांनी यासाठी वेळ काढावा. सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये आरोग्याबाबत सजगता राहावी यासाठी प्रत्येक आठवड्यात दोन दिवस किमान पाच किलोमीटर अंतर धावण्याचा उपक्रम राबवला जाईल. यामुळे पोलिसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.'

यानंतर अलंकार हॉलमध्ये पोलिस दलाच्या वतीने शाहू जयंती साजरी करण्यात आली. आयजी विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी शाहूपुरी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक शिवाजी पाटील यांनी उपस्थितांना शाहू महाराजांच्या कार्याविषयी माहिती दिली. प्रभावी भाषणामुळे आयजी नांगरे-पाटील यांनी शिवाजी पाटील यांना एक हजार रुपयांचे बक्षिस दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रमिकांचा ५ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

$
0
0

सर्व श्रमिक संघाचा मोर्चा

कोल्हापूर

किमान तीन हजार रूपये पेन्शन आणि महागाई भत्ता नाकारणाऱ्या मंत्र्यांना 'दे धक्का' देण्यासाठी पाच जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. सरकारच्याविरोधात सर्व श्रमिक संघाच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्याचे बैठकीत ठरले. शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे ही बैठक झाली. यामध्ये पेन्शनरांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध करून मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. लक्ष्मीपुरी येथील श्रमिक संघाच्या कार्यालयापासून मोर्चाची सुरूवात होईल. यावेळी लालासाहेब गायकवाड, प्रकाश जाधव, इमाम राऊत, डी. एम. पाटील, विलासराव चव्हाण, सुरेश गाडगीळ आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात प्राध्यापकांचा वर्ग निम्मा रिकामाच

$
0
0

विद्यापीठाचा लोगो वापरावा...

..........................

प्राध्यापकांचा वर्ग निम्मा रिकामाच

विविध विभागातील मिळून ११४ पदे रिक्त, सरकारी धोरणामुळे अध्यापन-संशोधनावर परिणाम

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:@Appasaheb_MT

कोल्हापूर :

राज्य सरकारने प्राध्यापक भरतीवर घातलेली बंदी आणि वयोमानुसार निवृत्त होणारे प्राध्यापक यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या विविध विभागातील प्राध्यापक पदांच्या रिक्त संख्येत दरवर्षी भर पडत आहे. विद्यापीठ पातळीवरील अध्यापन व अध्ययनाचा भर हा सत्तर टक्के संशोधनावर आधारित आहे. मात्र राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे विविध अधिविभागाचा भार अपुऱ्या प्राध्यापकावर आहे. विद्यापीठातील ३६ अधिविभागात मिळून तब्बल ११४ पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. मंजूर २६४ पदापैकी १४९ पदे कार्यरत आहेत. जवळपास ४८ टक्के पदांवर नियुक्ती झालेली नाही. सरकारच्या प्राध्यापक भरतीवरील बंदीच्या निर्णयाचा फटका विद्यापीठ पातळीवरील शिक्षण आणि संशोधनाला बसल्याची भावना कॅम्पसमधील तज्ज्ञ प्राध्यापक व्यक्त करत आहेत.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेतही रिक्त जागांच्या प्रश्नावर सखोल चर्चा झाली. राज्य सरकारने प्राध्यापक पदाच्या भरतीवरील बंदी कायम ठेवल्याने विद्यापीठ प्रशासनाने एकत्रित मानधनावर हंगामी तत्वावर ११ महिन्यासाठी सहायक प्राध्यापकांची ३२ पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय होऊन तीन आठवड्याचा कालावधी उलटला पण अद्याप कसलीही प्रक्रिया सुरु झाली नाही. नव्या शैक्षणिक वर्षासाठी सध्या प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. जुलै महिन्यापासून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या वर्गांना सुरुवात होईल. तत्पूर्वी पद न भरल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण,असा प्रश्न उपस्थित होत आहे.

२०१४ पासून प्राध्यापक भरती ठप्प आहे. गेल्या चार वर्षात जवळपास ११४ पदे रिक्त झाली आहेत. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत याविषयी चर्चा झाली. विद्यापीठ पातळीवर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरेसा अध्यापक वर्ग उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने विद्यापीठातील विविध अधिनियम वेतन अनुदानाखाली ३२ पदे भरण्याचा निर्णय झाला. तातडीची बाब म्हणून सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ कलम १२ (७) अन्वये वेतन अनुदानाखाली हंगामी स्वरुपात पद भरण्याचा निर्णय झाला. मासिक २१६०० इतक्या मानधनावर ११ महिन्यांसाठी ही पदे भरली जाणार आहेत. यावर विद्यापीठ वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. विद्यापीठाने हंगामी पदे भरण्याचा पायंडा पाडू नये. कमी मानधनावरील शिक्षकांकडून पूर्ण क्षमतेने अध्यापन, संशोधनाचे काम होणार का याकडे काही जण लक्ष वेधत आहेत. दुसरीकडे विद्यापीठ 'नॅक' मूल्यांकनाच्या चौथ्या फेरीची तयारी करत आहे. 'नॅक'ला सामोरे जाताना प्राध्यापक पदांची भरती पूर्ण क्षमतेने झाली तरच मूल्यांकनाच स्थान उंचावणार आहे. हंगामी पदाची मलमपट्टी न करता नियमित प्राध्यापक पदे भरावीत यासाठी यंत्रणेने पाठपुरावा करण्याची गरज आहे.

..............

विद्यापीठातील प्राध्यापकांच्या पदाचा तपशील

पदनाम मंजूर पदे कार्यरत पदे रिक्त पदे

सहायक प्राध्यापक १५६ १०७ ४८

सहयोगी प्राध्यापक ५९ २५ ३४

प्रोफेसर ४९ १७ ३२

.....................................................

एकूण २६४ १४९ ११४

..........................................................

केमिस्ट्री, फिजिक्समध्ये रिक्तपदांची संख्या जास्त

विद्यापीठातील रसायनशास्त्र विभाग, पदार्थविज्ञान विभाग, वनस्पतीशास्त्र विभाग, प्राणीशास्त्र विभागाचे संशोधन आणि नवनवीन प्रकल्पांची देशभर प्रशंसा झाली. या विभागातील प्राध्यापकांच्या संशोधनाची दखलही विविध पातळीवर गेली. विद्यापीठातील सायन्स शाखेच्या सर्वच विभागाकडे विद्यार्थ्यांचा ओढा असतो. विभागातील प्राध्यापकांच्या संशोधनावर विद्यापीठाच्या गुणवत्तेचा दर्जा ठरतो. मात्र विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात ११, जीव रसायनशास्त्र ०१, प्राणीशास्त्र ६, वनस्पतीशास्त्र ४, संख्याशास्त्र २ आणि पदार्थविज्ञान विभागात ७ पदे रिक्त आहेत.

...........

कोट

'प्रशासनाकडून विद्यापीठातील रिक्त पदांच्या भरतीसाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. सात ते आठ वेळा सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसोय होऊ नये यासाठी हंगामी तत्वावर पदे भरण्याचा निर्णय झाला. विद्यापीठ फंडातून त्यांना वेतन दिले जाणार आहे. येत्या दोन दिवसात प्रक्रियेला सुरुवात होईल. शिक्षण आणि संशोधनावर कसलाही परिणाम होणार नाही. प्रत्येक विभागाला आवश्यक पदांच्या भरतीविषयी विचारणा केली आहे. त्यांनी जादा मागणी केल्यास नियुक्त्या केल्या जातील.

डॉ.डी.टी.शिर्के, प्रकुलगुरु

...................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिलरसाठी खोदलेली विहीर भरण्यास प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीवरील पर्यायी पुलाच्या बांधकामासाठी पिलर उभारणी करण्यात येणार आहे. पिलरसाठी ४० फूट खोदाई करण्यात आलेली विहीर भरण्यास बुधवारी सुरुवात झाली. विहिरीत साचलेले पाणी उपसण्याचे काम तीन तास चालले. त्यानंतर विहिरीत अडीच फूट उंचीचे फिचिंग करण्यात आले.

गुरुवारपासून काँक्रिट आणि दगडांचे मिश्रण करून विहीर भरली जाईल. हे काम दोन दिवस चालणार आहे. काँक्रिटने विहीर भरल्यानंतर त्यावर आरसीसी बेड तयार करण्यात येईल. त्यानंतर पिलरच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. बुधवारी पावसाचा जोर ओसरल्याने पिलर उभारणीच्या अनुषंगिक कामाला गती आल्याची माहिती मे आसमास कंपनीचे प्रतिनिधी एन. डी. लाड यांनी सांगितले. पंचगंगा नदीची पाणीपातळी कमी होऊ लागल्याने प्रत्यक्ष बांधकामामध्ये अडचणी उद्भवणार नाहीत, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवेसाठी पर्यायाचा शोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एअर डेक्कनची कंपनीने कोल्हापूर, नाशिक, जळगांव आणि बेळगांवची विमानसेवा बंद केली आहे. ही विमानसेवा नियमित सुरू राहण्यासाठी इंडिगो विमान कंपनीकडे मागणी केली आहे. अन्य विमानतळावर एअर डेक्कनला दिलेले वेळेचे स्लॉट आणि मुंबई विमानतळावरील वेळेचा स्लॉट मिळाल्यास कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा पूर्ववत सुरू होणार आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी या प्रकरणी पुढाकार घेऊन हवाई उड्डान मंत्रालय आणि इंडिगो कंपनीसोबत चर्चा सुरू केली आहे.

येथील छत्रपती राजाराम महाराज विमानतळावर दोन महिन्यांपूर्वी कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू झाली. मात्र तांत्रिक कारण सांगत ही विमानसेवा बंद झाली आहे. ती सुरू होण्यासाठी प्रशासनाच्या पातळीवर पाठपुरावा सुरू झाला आहे. इंडिगो कंपनीचे महाराष्ट्र हेड अजय जाधव आणि केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांचे स्वीय सहायक अंकुर शर्मा यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. विमानसेवा सुरू करण्याबाबतचा इ मेलही हवाई उड्डाण मंत्रालयाला पाठविण्यात आला. उड्डाणासाठी विमाने सज्ज आहेत. मात्र त्यासाठी सेवा मार्गावरील वेळेचा स्लॉट आणि सेवा सुरू करण्याचे अधिकृत पत्र मिळाल्यानंतरच ही सेवा सुरू होईल, अशी ग्वाही इंडिगो कंपनीच्या प्रशासनाने खासदार महाडिक यांना दिली आहे. येत्या सोमवार (ता. २) पर्यंत कंपनीकडून पत्र मिळाल्यास ही सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

'उडान' योजनेच्या पहिल्या टप्प्यात एअर डेक्कन कंपनीकडून कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा सुरू झाली. उडानच्या दुसऱ्या टप्प्यात इंडिगो कंपनीने कोल्हापूर-हैदराबाद-तिरूपती या मार्गावर विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. या हवाई मार्गांना मान्यताही मिळालेली आहे. अद्याप वेळेच्या स्लॉटचे नियोजन सुरू आहे. छत्रपती राजाराम महाराज विमानतळावरून ऑगस्ट महिन्यात या मार्गावरील सेवा सुरू करण्याच्या घोषणा करण्यात आल्या. इंडिगो कंपनीने विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शविल्यास मुंबईसह दुसऱ्या टप्प्यातील बेंगळुरू, हैदराबाद आणि तिरूपती मार्गावर सेवा सुरू होणार आहे. दरम्यान, तांत्रिक अडचणीमुळे सेवा बंद केली असून ही सेवा लवकरच पूर्ववतपणे सुरू होणार असल्याचे एअर डेक्कन कंपनीकडून सांगण्यात येत आहे.

००

एअर डेक्कन कंपनीने दहा दिवसांत सेवा सुरू करावी. कोल्हापूर-मुंबई विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. सेवा सुरू न झाल्यास कंपनीला 'ब्लॅक लिस्ट 'करण्याची मागणी संसदेत करणार आहे.

धनंजय महाडिक, खासदार

००

प्रवासी तिकिटाचे काय?

कोल्हापूर ते मुंबईसाठी उडान योजनेसह सर्वसाधारण तिकिटाची नोंदणी प्रवाशांनी केली आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे वेळेवर पगार नसल्याने ही सेवा विस्कळित झाली आहे. कंपनीच्या विमानतळावरील व्यवस्थापकांना काहीही न बोलण्याची अट घातल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे.

००

कोल्हापूर- पुणे-मुंबई या मार्गावर विमानसेवा सुरू करण्याची गरज आहे. या मार्गासाठी सर्वांधिक प्रवासी संख्या मिळू शकते. या प्रकारची हॉपिंग सेवा सुरू झाल्यास प्रवाशांना सोयीचे ठरणार आहे.

डॉ. डी. वाय. पाटील, माजी राज्यपाल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफ ढेरेकडून दहा लाखांचे सोने जप्त

$
0
0

लोगो : जिल्हा बँक बनावट सोने प्रकरण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कसबा बावडा शाखेतील कर्ज तारण सोने अपहारातील दहा लाखांचे सोने आणि चांदी पोलिसांनी जप्त केली. अटकेतील संशयित सराफ सन्मुख ढेरे याच्या दुकानातून पोलिसांनी ११ किलो चांदी आणि २० तोळे सोन्याचे दागिने ताब्यात घेतले. सराफासह शाखाधिकारी आणि कॅशिअरने संगनमताने २७ कर्जदारांचे एक किलो दागिने लंपास करून तेथे बेंटेक्सचे दागिने ठेवले होते.

जिल्हा बॅँकेचा कसबा बावडा शाखाधिकारी संभाजी शंकर पाटील (वय ५६, रा. शिये), कॅशिअर परशुराम कल्लाप्पा नाईक (४८, रा. बलभीम गल्ली, कसबा बावडा) आणि अधिकृत सराफ सन्मुख आनंदराव ढेरे (४५, रा. पिंजार गल्ली, कसबा बावडा) यांच्यावर १२ जूनला शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ३१ मे रोजी कर्जदार वनिता पांडुरंग मोरे यांना फसवणुकीचा प्रकार लक्षात आला. यानंतर हा अपहार उघड झाला. संशयित तिघांनी लॉकरमधील एक किलो वजनाचे सोने काढून तेथे बेंटेक्सचे बनावट दागिने ठेवले होते. अपहारातील ३२ लाखांचे दागिने वसूल करण्याचे काम स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे. सराफ ढेरेने अपहारातील सोन्याच्या दागिन्यांतून १९० ग्रॅमची लगड करून गुजरी येथील महालक्ष्मी बुलियनचे सराफ अशोक माळी यांना विकली. त्यातील पैशातून स्वत:च्या सराफ दुकानात सोने व चांदीचे दागिने घेऊन व्यवसाय सुरू केला होता. ही माहिती पोलिस तपासात पुढे आल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी ढेरेच्या दुकानातून ११ किलो चांदी व २० तोळे सोन्याचे दागिने जप्त केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, उपनिरीक्षक सचिन पंडित, कॉन्स्टेबल संजय पडवळ, संतोष पाटील, प्रल्हाद देसाई, किरण भोगम, संतोष माने, अर्जुन बेंदरे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपघातातील १५ विद्यार्थ्यांना डिस्चार्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर-सांगली मार्गावर माले फाटा येथे कंटेनर आणि स्कूल बसच्या अपघातातील जखमींमधील १५ विद्यार्थ्यांना बुधवारी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. अद्याप नऊ जखमींवर उपचार सुरू आहेत. यातील लविना चूघ ही विद्यार्थिनी आणि बसमधील अटेंडन्स हृषिकेश कांबळे यांची प्रकृती चिंतानजक आहे. या दोघांवरही शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

गांधीनगर येथून विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या बसला कोल्हापूर-सांगली मार्गावर माले फाटा येथे मंगळवारी सकाळी अपघात झाला होता. समोरून आलेल्या भरधाव कंटेनरच्या धडकेत स्कूल बसच्या चालकासह कंटेनरचा चालक आणि क्लिनरचा मृत्यू झाला होता. या अपघातात बसमधील अटेंडन्ससह २६ विद्यार्थी जखमी झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अनेक विद्यार्थ्यांना डोके, तोंड, पाय, हात आणि छातीला दुखापत झाली होती. यातील लविना चूघ या विद्यार्थिनीच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच बसमधील अटेंडन्स हृषिकेश कांबळे याचीही प्रकृती गंभीर आहे. या दोघांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. उपचारादरम्यान बुधवारी दिवसभर जखमी विद्यार्थ्यांचे पालक आणि घोडावत स्कूलमधील शिक्षक रुग्णालयात उपस्थित होते. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने बुधवारी दुपारी १५ विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला. उर्वरित नऊ विद्यार्थ्यांवर अद्याप उपचार सुरू आहेत. यातील पाच ते सहा विद्यार्थ्यांना गुरुवारी डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, अपघातात ठार झालेले स्कूल बसचे चालक जयसिंग चौगुले यांच्यावर मंगळवारी संध्याकाळी गडमुडशिंगी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कंटेनरचा चालक सुरेश खोत आणि क्लिनर सचिन खिलारी यांच्या मृतदेहावर सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणी करण्यात आली. मंगळवारी संध्याकाळी त्यांचे मृतदेह नातेवाइकांकडे सोपविण्यात आले. हातकणंगले पोलिसांसह आरटीओकडून अपघाताची चौकशी सुरू आहे. कंटेनरमध्ये बिघाड झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले की, चालकाच्या चुकीनेच अपघात घडला याबाबतचा अहवाल आरटीओकडून पोलिसांना प्राप्त होणार आहे. हातकणंगले पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून, कंटेनरचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप, सेना सोडून आघाडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभेची २०१९ ची निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली लढवणार आहोत. या निवडणुकीत भाजप, शिवसेना सोडून आघाडीला दहा जागा देणाऱ्या जाण्यासंबंधी चर्चा करणार आहे, अशी माहिती आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पत्रकारांशी दिली.

अॅड. आंबेडकर यांनी पुढाकार घेऊन विविध समाज घटकांची वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आहे. तिची पहिली बैठक बुधवारी कोल्हापुरात झाली.

पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, 'जातीयवादी पक्ष, कुटुंबकेंद्रीत राजकारण, घराणेशाहीला छेद देण्यासाठी आघाडीची स्थापना केली. आघाडीतर्फे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार आहोत. भाजप, शिवसेना या दोन पक्षांना वगळून इतर पक्ष, आघाड्यांसोबत जाण्याससंबंधीच्या चर्चेची दारे खुली ठेवली आहेत. केवळ लोकसभा निवडणुकीसाठी पुरोगामी विचारधारा असलेल्या पक्षांबरोबर आघाडी करणार आहोत. मात्र विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढविण्यात येतील. लोकसभेत ज्या पक्षांसोबत जाऊ त्यांच्याकडून धनगर, माळी, भटके विमुक्त, ओबीसी, मुस्लिम, अनुसूचित जाती-जमातीसाठी प्रत्येकी दोन अशा १० जागा देण्याची अट घातली जाईल. ही अट मान्य न झाल्यास आम्ही सर्वच्या सर्व ४८ जागा स्वबळावर लढविणार आहोत. यापुढे सातारा, पुणे, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना व सोलापूर या ठिकाणी मेळावा घेण्यात येईल.'

सरकार घटनेतील नियम व अटींना बगल देत आयपीएस, आयएएस परीक्षेऐवजी थेट अधिकारी म्हणून नियुक्त करण्याची घोषणा केली आहे. त्याला आमचा विरोध आहे. या निवडीला जनतेतूनही व्यापक विरोध होण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

यावेळी 'उपरा'कार लक्ष्मण माने उपस्थित होते.

------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घटप्रभा धरण भरले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

धरणक्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून अतिवृष्टी होत असल्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. दमदार पावसामुळे चंदगड तालुक्यातील घटप्रभा धरण शंभर टक्के पूर्ण भरले आहे. दीड टीएमसी क्षमता असलेले हे धरण बुधवारी पूर्णक्षमतेने भरले आहे. दरम्यान, कासारी धरणक्षेत्रात २०० मिलिमीटर इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील १२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बुधवारी पावसाचा जोर ओसरला.

घटप्रभा धरणक्षेत्रात १९३ मिलिमीटर पाऊस पडला. गेल्या चार दिवसांपासून या परिसरात अतिवृष्टी होत असल्याने दीड टीएमसी क्षमतेचे धरण बुधवारी भरले. जिल्ह्यातील विविध धरणक्षेत्रांत बुधवारी पावसाचा जोर कायम होता. धरणक्षेत्रातील पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी संथगतीने वाढत होत आहे. राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाणीपातळी २३ फूट आहे. पंचगंगा घाट परिसरातील नदीपात्रातील मंदिरे अजूनही पाण्याखाली आहेत. बुधवारी शहर आणि परिसरात पावसाने उघडीप दिली. मात्र, सकाळी आणि दुपारच्या वेळी हलक्या सरी कोसळल्या.

पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे सात बंधारे पाण्याखाली आहेत. कासारी नदीवरील यवलूज बंधारा बुधवारी पाण्याखाली गेला. भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, खडक कोगे व सरकारी कोगे हे पाच बंधारे पाण्याखाली आहेत. बुधवारी सकाळी आठपर्यंतच्या नोंदीनुसार जिल्ह्यात ३७६ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. गगनबावड्यात ९३.५०, तर चंदगडमध्ये ६४.१६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी ३१.३९ मिलिमीटर पाऊस झाला. करवीर तालुक्यात १०.१८ मि.मी., गडहिंग्लजमध्ये १४ मि.मी., तर कागलमध्ये २०.४२ मि.मी. पाऊस झाला.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील १ लाख ९३ हजार टन साखर बफरमध्ये

$
0
0

बफर स्टॉकमुळे कारखान्यांना दिलासा

जिल्ह्यात एक लाख ९३ हजार टन साखर बफर स्टॉकमध्ये

देशात ३० लाख टन साखरेचा स्टॉक होणार

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर

केंद्र सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने देशात ३० लाख मेट्रिक टन साखरेचा बफर स्टॉक करण्याचा अध्यादेश सोमवारी काढला. अध्यादेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना एक वर्षासाठी एक लाख ९३ हजार मेट्रिक टन साखर बफर स्टॉक करता येणार आहे. बफर स्टॉकमधील साखरेला केंद्र सरकार संबंधित कारखान्यांना व्याज, विमा व गोडावून भाडे देणार असून याकरिता १,१०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. कारखान्यांना बफर स्टॉकची मर्यादा दिल्याने भविष्यात साखरेच्या दरात वाढ होऊन कारखान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

देशातंर्गत साखरेची गरज २५० लाख मेट्रिक टन असताना यावर्षी ३१६ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले. तसेच गेल्या हंगामातील ४१ लाख मेट्रिक टन साखर शिल्लक होती. गरजेपेक्षा देशात १०७ लाख मे. ट. साखर साठा जास्त असल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला. देशातंर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी असल्याने साखर उठाव ठप्प झाला. त्याचा परिणाम बाजारपेठेवर होऊन साखर दरात प्रचंड घसरण होऊ लागली. अतिरिक्त उत्पादनाचा अंदाज केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्रालयाचा फोल ठरल्याने संपूर्ण साखर उद्योग अडचणीत आला. कच्ची साखर निर्यात, निर्यातीसाठी अनुदान याकडे दुर्लक्ष झाल्याने हंगाम संपताना उत्पादकांची देणी थकण्याबरोबरच प्रत्येक कारखान्यांच्या गोडावूनमध्ये साखरेची थप्पी वाढतच गेली. यातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रीय सहकारी व खासगी साखर संघानी ३० लाख टन बफर स्टॉक करण्याची मागणी केली होती.

मागणीनुसार केंद्र सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे आयुक्त जी. एस. साहू यांनी ३० लाख टन साखरेचा बफर स्टॉक करण्याचा अध्यादेश काढला आहे. एक वर्षभर ही साखर गोडावूनमध्ये राहणार असल्याने देशातंर्गत साखरेच्या मागणीत वाढ होऊन दरातही वाढ होणार आहे. यापैकी कोल्हापूर जिल्ह्याच्या वाट्याला एक लाख ९३ हजार टन बफर स्टॉक करण्याची मर्यादा मिळाली आहे. जिल्ह्यात १३ लाख ४० हजार मे.ट. साखर शिल्लक असून यापैकी एक लाख ९३ लाख मे. टन साखर एक वर्षासाठी गोडावूनमध्ये ठेवण्याची मुभा मिळाली आहे. बफर स्टॉकमध्ये ठेवण्यात येणाऱ्या साखरेवर २,९०० प्रतिक्विंटल प्रमाणे वर्षाला १२ टक्के व्याज, विमा आणि गोडावून भाडे देण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने १,१०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी साखरेचा प्रतिक्विंटल दर ३,९०० रुपये होता. बाजारात साखरेची उपलब्धता वाढल्यानंतर हाच दर २,४०० रुपयांपर्यंत घसरला. तसेच मागणीही कमी झाली. बफर स्टॉकच्या निर्णयामुळे बाजारात साखरेचा पुरवठा कमी आणि मागणीमध्ये वाढ झाल्यानंतर साखरेच्या दरात निश्चितच वाढ होईल. याचा फायदा साखर कारखानदारीला होईल, अशी अपेक्षा साखर उद्योगाकडून व्यक्त केली जात आहे.

....................

चौकट

कारखान्यांमध्ये होणारा साखर स्टॉक (मेट्रिक टन हजारमध्ये)

वारणा (२०), पंचगंगा (१४), कुंभी-कासारी (१२), बिद्री (९), भोगावती (१०), दत्त-शिरोळ (१९), गडहिंग्लज (३), शाहू कागल (११), दालमिया (५), जवाहर (३१), राजाराम (९), आजार (४), शरद (११), तांबाळे (४), गुरुदत्त (१२), हेमरस (७), सेनापती घोरपडे (८), फराळे (२०), ग्रीन पॉवर (६).

...................

चौकट

अनेक कारखान्यांची साखर उघड्यावर

हंगामाला सुरुवात झाल्यानंतर जानेवारी २०१८ पासून बाजारातील साखरेची मागणी घटली आहे. गेल्या हंगामातील शिल्लक साखर आणि नवीन तयार झालेली साखर ठेवण्यास गोडावून अपुरे पडल्यामुळे जिल्ह्यातील अनेक कारखान्यांची साखर उघड्यावर पडली आहे. ही साखर केवळ प्लास्टिक कागदाच्या सहाय्याने बंधिस्त केली आहे. केंद्र सरकारने बफर स्टॉकचा निर्णय घेतला असला, तरी वर्षभर साखर जपून ठेवावी लागणार असल्याने यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी लागणार आहे.

............

कोट

'राष्ट्रीय सहकारी व खासगी साखर संघानी केलेल्या मागणीप्रमाणे बफर स्टॉकची मर्यादा ठरवून दिली आहे. हा निर्णय स्वागतार्ह असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २,९०० ऐवजी ३,१०० प्रतिक्विंटल दर निश्चित करण्याची मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण झाल्यास कारखान्यांना पर्यायाने उत्पादकांना चांगल्या प्रकारे दिलासा मिळेल.

पी. जी. मेढे, मानद तज्ज्ञ सल्लागार, राजाराम कारखाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुजन आघाडी ५० जागा लढविणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'प्रत्यक्ष सत्तेत वाटा न देता सर्वच राज्यकर्त्यांनी वंचित बहुजन समाजाचा वापर करून घेतला. दुर्लक्षित वंचित समाजाचे प्रश्न वर्षानुवर्षे कायम राहिले. सत्ता मिळाल्याशिवाय त्यांचे प्रश्न सोडविता येणार नाहीत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे ५० पेक्षा अधिक जागा लढविणार असल्याची घोषणा आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी केले. आमच्या सहभागाशिवाय राज्यात सरकार स्थापन करणे अशक्य होईल, असेही ते म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचा येथील शाहूस्मारक भवनात संवाद मेळावा झाला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

अॅड. आंबेडकर म्हणाले, 'स्वातंत्र्यानंतर अजूनही अनेक समाजाच्या लोकांना विधानसभा, लोकसभेते राजकीय प्रतिनिधीत्व मिळाले नाही. यामुळे आघाडीच्या माध्यमातून लोकशाहीचे सामाजिकरण करणासाठी प्रयत्न करीत आहोत. आघाडीला राजसत्ता मिळण्याची वेळ आल्यास मंत्रीपदापेक्षा वंचित समूहाचे प्रश्न सोडविण्याचा अजेंडा मांडणार आहे. वंचित घटकाला व्यवस्थेचा वाटा मिळवून देणार आहे. आघाडीत सामील होताना समाजातील प्रचलित संघटना बरखास्त करा, असे आम्ही अजिबात म्हटलेले नाही. मात्र जे समाज आघाडीत सहभागी होतील, त्यांनी प्रामाणिकपणे, निष्ठेने आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणले पाहिजे.'

'उपरा'कार लक्ष्मण माने म्हणाले, 'राज्यात वंचित बहुजन आघाडीचे ५० ते ६० आमदार निवडून आल्यास प्रकाश आंबेडकर सहजपणे मुख्यमंत्री होतील. त्यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवण्यासाठी आघाडीतील प्रत्येक समाजाने बूथ पातळीवर बांधणी आतापासूनच करावी. राज्यातील, केंद्रातील सरकार मनमानी निर्णय घेत आहे. अधिकारी नियुक्तीचेही खासगीकरण केले आहे.'

लिंगायत समाजाच्या नेत्या सरलाताई पाटील म्हणाल्या, 'महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात वंचित समाजाला एकत्र केले. यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या पाठिशी लिंगायत समाजही असेल.'

यावेळी धनगर समाजाचे नेते बबन रानगे, दत्ताजी देसाई, माजी आमदार हरी भदे, अॅड. विजय मोरे यांची भाषणे झाली. सर्जेराव विभुते, संजय सकट, सविता सोनटक्के, बळवंत सुतार, बयाजी शेळके, बाबासाहेब नदाफ यांनीही मनोगत व्यक्त केले. अमोल पांढरे यांनी प्रास्ताविक केले. अनिल म्हमाने यांनी आभार मानले.

नेते दावणीला

'इचलकरंजीतील प्रमुख मुस्लिम नेते सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या दावणीला बांधले आहेत. त्यामुळे समाजाचा विकास झालेला नाही. प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी पुढाकार घ्यावा', असे आवाहन दस्तगिरी बाणदार केले.

पवार हे सोयीनुसार धर्मनिरपेक्ष

शरद पवार यांचा धर्मनिरपेक्ष विचार सोयीनुसार असतो अशी टीका अॅड. आंबेडकर यांनी केली. ते म्हणाले, 'व्यक्तीपेक्षा समूहाच्या विकासाचा मुद्दा घेऊन आघाडीची स्थापना केली आहे. आघाडीतर्फे दिलेले उमेदवार बहुजन समाजातील असतील. त्यांना निवडून आणण्यासाठी समाजोत्तर उमेदवाराला मतदान करण्याची मानसिकता केली पाहिजे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीचे आमिष दाखवून पावणेपाच लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून चिपळूणमधील महिलेची पावणेपाच लाखांची फसवणूक झाली. याबाबत श्रद्धा सुधीर मोरे (वय ५५, रा. बुरुमतळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, उमेश कुमार तिवारी (४५, रा. शशीविहार प्लाझा, शाहूपुरी, पहिली गल्ली, कोल्हापूर) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा मोरे त्यांच्या मुलांसाठी नोकरीच्या शोधात होत्या. याचवेळी कोल्हापुरात शाहूपुरीतील उमेश तिवारी याच्याशी त्यांचा संपर्क झाला. शाहूपुरीच्या पहिल्या गल्लीत तिवारी याचे जी ३ मल्टीग्रुप जी एफ कार्यालय आहे. तेथे तिवारी आणि मोरे यांची भेट झाली. मोरे यांचा मुलगा राहुल आणि मुलगी पूजा यांनाही त्याने खासगी बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. यासाठी त्याने मोरे यांच्याकडून २ जानेवारी ते १९ मे या मुदतीत ४ लाख ८३ हजार रुपये घेतले. यातील काही रक्कम रोख स्वरूपात दिली, तर काही तिवारी याच्या बँक खात्यावर जमा केली. पैसे देऊनही नोकरी मिळत नसल्याने मोरे यांनी पैसे परत मागितले. मात्र, तिवारीने टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोरे यांनी बुधवारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तिवारीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे. त्याने अन्य काही गरजूंनाही नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन २

$
0
0

पद्मावती पाटील

कोल्हापूर

कदमवाडी रोडवरील शिवराज कॉलनी येथील पद्मावती आप्पासाहेब पाटील (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात सून, मुलगा असा मोठा परिवार आहे. त्या कावळा नाका येथील श्री महालक्ष्मी महिला सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा होत्या. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २९) सकाळी आहे.

माधव पंडित

कोल्हापूर

राजारामपुरी पाचवी गल्ली येथील आशाकुंज अपार्टममेंट मधील माधव दत्तात्रेय पंडित (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपहारातील संशयित कर्मचाऱ्यांचे पलायन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळ शिरगाव येथील कोल्हापूर कॅन्सर हॉस्पिटलमध्ये औषध खरेदीत एक कोटी ३२ लाखांचा अपहार करणारे संशयित गुन्हा दाखल होताच पसार झाले. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बुधवारी तिन्ही संशयितांच्या घरांची झडती घेतली. मात्र, संशयित घर सोडून पळाले आहेत. अपहाराच्या तपासासाठी पोलिसांनी हॉस्पिटलमधील कागदपत्रे ताब्यात घेतली असून, कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.

कोल्हापूर कॅन्सर हॉस्पिटलचे अकाउंट मॅनेजर अजय आनंदराव खोत (रा. लाइन बाजार, कसबा बावडा), औषध वितरक किरण शिंदे (रा. कोडोली, ता. पन्हाळा) आणि प्रवीण दत्तात्रय आळतेकर (रा. माळवाडी, दानोळी, ता. शिरोळ) यांनी संगनमताने अपहार केल्याची फिर्याद डॉ. सूरज पवार यांनी दिली आहे. दोन जानेवारी २०१५ ते एक एप्रिल २०१६ या कालावधीत आपल्या पदाचा गैरवापर करत औषध खरेदीच्या बोगस बिलांच्या नोंदी करून संशयितांनी अपहार केला आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र कदम यांच्यासह चौघांच्या पथकाने बुधवारी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले. संशयितांच्या घराची झडती घेतली असता, ते पसार झाल्याचे निदर्शनास आले. त्यांचे मोबाइलही बंद आहेत. कागदपत्रांची तपासणी सुरू असून, भक्कम पुरावे गोळा केले जात आहेत. संशयितांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे उपअधीक्षक राजेंद्र शेडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२२ पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील २२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी बुधवारी जारी केले. यात दोन निरीक्षक, दोन सहायक निरीक्षक आणि १८ उपनिरीक्षकांचा समावेश आहे. सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण चौगुले यांची शिरोळ पोलिस ठाण्यात बदली झाली होती. मात्र, ती रद्द करून त्यांची पासपोर्ट शाखेत बदली करण्यात आली. पासपोर्ट शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांची बदली शिरोळ पोलिस ठाण्यात झाली.

बदली झालेले अधिकारी असे : सहायक पोलिस निरीक्षक स्वाती सूर्यवंशी (इचलकरंजीतून हातकणंगले), उपनिरीक्षक प्रकाश कांबळे (गोकुळ शिरगावमधून शिरोली एमआयडीसी), सूर्यकांत शिरगुप्पी (शिरोलीतून जुना राजवाडा), शशिकांत गिरी (पन्हाळ्यातून शाहूवाडी), मनोज कवडे (शहापूरमधून शिवाजीनगर), प्रेमकुमार केदार (कुरुंदवाडमधून राजारामपुरी), गणेश कवितके (कागलमधून राधानगरी), युवराज सूर्यवंशी (इचलकरंजी गावभागमधून शिवाजीनगर), विकास टोके (जिविशातून बीडीडीएस), विजय कार्वेकर (जिविशातून नियंत्रण कक्ष), पूनम रुगे (शिरोळमधून जयसिंगपूर), शरयू देशमुख (शिवाजीनगरमधून पेठवडगाव), अण्णासाहेब शिंदे (हुपरीतून कुरुंदवाड), सरिता जाधव (पेठवडगावमधून कोडोली), संजय नागरगोजे (गडहिंग्लजमधून जुना राजवाडा), पूनम माने (जयसिंगपूरमधून शिरोळ), पल्लवी यादव (गावभागमधून हुपरी), दिलीप शिंदे (नियंत्रण कक्षातून शाहूवाडी उपअधीक्षक कार्यालय वाचक) याशिवाय नव्याने हजर झालेले उपनिरीक्षक शिवाजी दरेकर यांची कोडोली, तर सपोनि शिवानंद कुंभार यांची इचलकरंजी पोलिस ठाण्यात बदली झाली आहे.

००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला बालकल्याणसभापतींचा राजीनामा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे यांनी बुधवारी पदाचा राजीनामा अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्याकडे दिला. राजीनामा मंजूर करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविल्यानंतर पुढील निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. दरम्यान, सव्वा वर्षानंतर खांदेपालट करण्याचा शब्द मानून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या आदेशानुसार शिंदे यांनी राजीनामा दिला. यानंतर अध्यक्षांसह उपाध्यक्ष, बांधकाम, शिक्षण, समाजकल्याण सभापतींचा राजीनामा होणार का, होणार असेल तर कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भाजपने मित्र पक्षांच्या मदतीने वर्षापूर्वी जि. प. ची सत्ता मिळविली. अध्यक्षांसह इतर पदांवर इच्छुकांची संख्या अधिक होती. त्यामुळे सव्वा वर्षानंतर खांदेपालट करण्याचा शब्द भाजपसह सत्तेतील सहभागी गट, पक्षाच्या नेत्यांनी इच्छुकांना दिले. २३ जूनला सव्वा वर्ष झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे 'स्वाभिमानी'च्या महिला, बालकल्याण सभापती शिंदे यांनी राजीनामा दिला. त्यावेळी शिक्षण सभापती अंबरीश घाटगे, सदस्य प्रवीण यादव, राहुल आवाडे, राजू मगदूम, आदी उपस्थित होते.

शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेवर आवाडे गटाच्या वंदना मगदूम यांनी दावा केला आहे. नवीन निवडीसाठी विशेष सर्वसाधारण सभा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आठ दिवसांनंतर आयोजित केली जाणार आहे. प्रत्यक्ष निवडीवेळी दोन अर्ज दाखल झाल्यास निवडणूक लागणार आहे. त्यावेळी बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. काठावर बहुमत असल्याने इच्छुकास निवड होईपर्यंत सत्ताधारी सदस्यांची मर्जी सांभाळावी लागणार आहे. दरम्यान, शौमिका महाडिक यांचा राजीनामा घेऊन ठरल्याप्रमाणे अरुण इंगवले यांना अध्यक्ष करणार असल्याचे भाजपचे हिंदुराव शेळके यांनी मंगळवारी एका जाहीर कार्यक्रमात सांगितले. यामुळे इंगवले यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, महाडिक यांच्या राजीनाम्यासंबंधी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ते अध्यक्ष बदलण्यास सकारात्मक नाहीत. उपाध्यक्षपदासाठी प्रवीण यादव प्रयत्नशील आहेत. महिला, बालकल्याण सभापतींपासून सुरुवात झाली आहे. ठरल्याप्रमाणे अध्यक्षासह सर्वच पदाधिकाऱ्यांचा राजीमाना घेऊन एकाचवेळी नवीन पदाधिकारी निवडीची प्रक्रिया राबवावी, यासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू आहे.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेसमोर आत्मदहनाचा प्रयत्न

$
0
0

फोटो आहे....

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाहूवाडी तालुक्यातील पिशवी येथील सामाजिक कार्यकर्ते व हरित सेनेचे सदस्य शिवाजी गुंगा इंगवले यांनी ग्रामपंचायत विभागाच्या गलथान, निष्क्रिय, दिरंगाई कारभाराविरोधात बुधवारी जिल्हा परिषद समोर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत त्यांना ताब्यात घेतले. गावातील सरकारी जमिनीवरील अतिक्रमण केलेल्यास ग्रामपंचायत प्रशासन पाठीशी घालत असल्याचा त्यांचा आरोप आहे.

पिशवीत १३ हेक्टर ६२ गुंठे सरकारी जमीन आहे. त्या जमिनीवर लावलेली झाडे तोडून गावातील काही लोकांनी अतिक्रमण केले. अतिक्रमण काढून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी इंगवले यांनी २०१० मध्ये गटविकास अधिकाऱ्यांकडे केली. मात्र, वारंवार हेलपाटे मारूनही त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली. २० फेब्रुवारी २०१८ रोजी शाहूवाडी पंचायत समितीसमोर उपोषण केले. त्यावेळी गटविकास अधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांनी एक महिन्यात कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्षात प्रशासन दोषींना पाठिशी घालत राहिले. जिल्हा परिषदेमधील ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही गांभीर्याने लक्ष दिले नाही, असा त्यांचा आरोप आहे. नेहमीप्रमाणे टोलवाटोलवी केली. त्यामुळे इंगवले यांनी जिल्हा परिषदेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला. तरीही ग्रामपंचायतीचे वरिष्ठ अधिकारी सुस्तच राहिले. परिणामी इंगवले यांच्यावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याची वेळ आली.

००००

चौकट

न्यायाऐवजी गुन्हा

इंगवले यांनी लालफितीच्या आणि प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात न्यायाच्या अपेक्षेने आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना न्याय मिळण्यास मदत करण्याऐवजी शाहूपुरी पोलिसांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यांच्या वाट्यास न्याय, नव्हे गुन्हा आला.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू ग्रंथ उपलब्ध

$
0
0

ग्रंथ फोटो आिण रमेश जाधव सिंगल फोटो

.........

आता नव्या दिमाखात

'राजर्षी शाहू गौरव ग्रंथ'

म.टा.वृत्तसेवा,कसबा बावडा

राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित 'राजर्षी शाहू गौरव ग्रंथ' शाहूप्रेमींसाठी उपलब्ध झाला आहे. राज्य सरकारच्या राजर्षी शाहू चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे व डॉ. रमेश जाधव संपादित या ग्रंथाची तिसरी आवृत्ती शाहू जयंतीदिनी प्रकाशित झाली. येथील शासकीय ग्रंथ भांडारमध्ये हा ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध आहे.

डॉ. जाधव यांनी २०१३ ते २०१६ या तीन वर्षांच्या काळात शाहूंच्या जीवनावर नवीन संदर्भ असलेले लेख आणि छायाचित्रे संपादित आणि संकलित करून १३८० पानांत त्याला ग्रंथाचे रुप दिले. तिसरी आवृत्ती दोन खंडांत विभागली असून पहिल्या खंडात राजर्षी शाहू गौरव ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीचा समावेश आहे. दुसऱ्या खंडात एकूण सात भाग आहेत. राजर्षी शाहूंचे समकालीन लेखक व महाराष्ट्रातील नामवंत लेखक संशोधकांच्या ४१ लेखांचा समावेश आहे. 'आम्ही पाहिलेले शाहू महाराज' या शीर्षकाखाली मान्यवरांच्या आठवणी आहेत. तिसऱ्या विभागात शाहूकालिन महत्वाची कागदपत्रे, चौथ्या विभागात शाहू महाराजांचे आदेश, हुकूमनामे आहेत.

पाचव्या विभागात सक्तीचे शिक्षण, विवाह विषयक कायदा, महिलांना संरक्षण कायदा आदींचा समावेश आहे. सहाव्या विभागात महाराजांची निवडक व दुर्मीळ छायाचित्रे आहेत. सातव्या व आठव्या विभागात कालसूची, नामसूची पाहावयास मिळते. कोल्हापूर संस्थानचा नकाशा, छत्रपती घराण्याची वंशावळ यासंबंधी माहिती आहे. ग्रंथात छत्रपती राजाराम महाराजांच्या साखरपुड्याच्या प्रसंगीचे दुर्मिळ छायाचित्र आहे. ग्रंथांची किंमत ३०० असून एकदम दहा प्रती खरेदी केल्यास एक ग्रंथ २२५ रुपयांना मिळतो.

........

कोट

'गौरवग्रंथामुळे एकत्रितरित्या राजर्षी शाहू महाराजांचे सर्वव्यापी कार्य राज्यभरात पोहचण्यास मदत झाली. युवा पिढीला या ग्रंथापासून निश्चित प्रेरणा मिळेल आणि युवा पिढी राजर्षी शाहूंचा विचार पुढे घेऊन जाईल.

डॉ.रमेश जाधव , लेखक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images