Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे फेब्रुवारी मध्ये घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल गुरूवारी दुपारी तीन वाजता www.mscepune.in आणि https://puppss.mscescholarshipexam.in या संकेत स्थळावर घोषित करण्यात आले. या वेबसाइटवर शाळा आणि पालकांना विद्यार्थ्यांच्या लॉगिनमधून निकाल पाहता येणार आहे. दरम्यान, या निकालात विद्यार्थ्यांनी गुणपडताळणी करून घ्यायची आहे. बदल किंवा त्रुटी असल्यास ३० जूनपर्यंत ५० रूपये शुल्क भरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. विद्यार्थी, आडनाव, वडिल, आईचे नाव यामध्ये चुक झाल्यास दुरूस्ती करता येणार आहे. दुरूस्तीसाठी फक्त ऑनलाइनच अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर होणार आहे, असे परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी प्रसिध्दी पत्रकातून कळविले आहे.

------------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालकमंत्र्यांना काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता येणार हा दृष्टांत

0
0

फोटो

..................

काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्तेचा पालकमंत्र्यांना दृष्टांत

मुश्रीफांकडून खिल्ली, राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्याचा उपहासात्मक पुरस्कार देवून सत्कार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे अध्यात्मवादी आहेत. त्यांना भविष्य ताबडतोब कळते. म्हणून त्यांना राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचा सत्ता येणार हा दृष्टांत झाला आहे. एवढ्या लवकर भविष्य ओळखणारे राज्यातील ते एकमेव महसूल व पालकमंत्री आहेत. २०१९ मध्ये राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आल्यावर पालकमंत्र्यांच्या घरी जाऊन त्यांना मिठाई भरवणार', अशी खिल्ली उडवत आमदार हसन मुश्रीफ यांनी भाजपवर टीका केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना अमेरिकेत 'आऊट स्टँडिंग लिडरशीप इन डेव्हलपमेंट' हा पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्याचा उपहासात्मक, प्रतिकात्मकरित्या 'आऊटस्टँडिंग चीफ मिनिस्टर' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या उपहासात्मक आंदोलनात खासदार धनंजय महाडिक, आमदार मुश्रीफ, उपमहापौर महेश सावंत, जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, माजी आमदार के.पी. पाटील, आर.के. पोवार आदी सहभागी झाले.

आमदार मुश्रीफ म्हणाले,' गेल्या चार वर्षात भाजप सरकारने केंद्रात व राज्यात शेतकरी, कष्टकरी जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. तरीही भाजप सरकारकडून उत्तम काम केल्याचे ढोल पिटले जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्याकडे गृहखाते असूनही राज्यातील कायदा व सुव्यवस्था कोलमडली आहे. नागपूर तर गुन्हेगारांचे शहर झाले आहे. विचारवंतांच्या हत्या होऊनही त्यांचे मारेकरी सापडत नाहीत. मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली सर्व पातळ्यावर सरकार अपयशी ठरले असले तरी अमेरिकेत त्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना'आऊटस्टँडिंग चीफ मिनिस्टर' पुरस्कार दिला आहे. '

खासदार धनंजय महाडिक म्हणाले,' चार वर्षात कोणताही घटक समाधानी नसल्याचे आजच्या आंदोलनाने सिद्ध झाले आहे. मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाला आरक्षण मिळालेले नाही. जीएसटी, नोटबंदीमुळे उद्योजकांचे कबंरडे मोडले आहे. समाजातील सरकारविषयी असलेला रोष प्रकट करण्यासाठी राष्ट्रवादीने आंदोलन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आपला कारभार असाच सुरु ठेवावा, यासाठी शुभेच्छा.'

माजी आमदार के.पी. पाटील म्हणाले, 'आघाडी सरकारच्या काळात शाहू मिल येथे राजर्षी शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावे या ठरावाला देवेंद्र फडवणीस यांनी पाठींबा दिला हाता. पण या भव्य स्मारकाचा विसर मुख्यमंत्र्यांना पडला असल्याने त्यांना मुंबईहून थेट नागपूरला परत पाठवावे लागेल.' तर जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना 'खोटारडे' अशी उमपा दिली.

००००००

ए.वाय. यांची फिरकी

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेतील रामेश्वर पत्की यांनी ए.वाय. पाटील यांची चांगलीच फिरकी घेतली. 'पालकमंत्र्यांसमवेत मला वारंवार भेटलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील' अशी ओळख त्यांनी करुन देताच स्टेजवरील नेत्यांसह उपस्थित कार्यकर्त्यांत हास्यांची कारंजी उसळली.

००००००

मुख्यमंत्र्यांचे पारदर्शक भाषण

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेतील रामेश्वर पत्की यांनी हुबेहूब नक्कल करत आंदोलनात चांगलीच रंगत आली. स्टेजवर आलेल्या शेतकरी, कष्टकऱ्याच्या निवेदनावर सह्या ठोकल्या. एका शेतकऱ्याने तर मुख्यमंत्र्याने निवेदन देताना 'कर्जमाफी तर करा, नाही तर मरायला परवानगी द्या' अशी मागणी केली. सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्र्याच्या भूमिकेतील पत्कींनी मला कोल्हापुरातील पाणी प्यायला द्या, असे म्हणत भाषणाला सुरूवात केली. ते म्हणाले,' आज मी पारदर्शक भाषण करणार आहे. चार वर्षात चांगला कारभार केल्याने माझा अमेरिकेत आणि कोल्हापुरात सन्मान झाला. मी घोषणा केलेला तीर्थक्षेत्र विकास आराखडा बघितला का ?, ४२ गावांसाठी निर्माण झालेले प्राधिकरणाचे कार्यालय पाहिले का ?, चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून ६० हजार कोटींचे रस्ते बघितले का? असे प्रश्न करुन उपस्थितांना चांगलेच हसवले. पेट्रोल दरवाढ होत असली तरी पेट्रोलचे दर पंपावर काचपेटीतून स्पष्ट दिसतात इतका आमचा पारदर्शक कारभार आहे. माझ्या कार्याची कोणत्याच पक्षाने दखल घेतली नाही फक्त कोल्हापुरात राष्ट्रवादीने दखल घेतल्याबद्दल आभारी आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयितांच्या मालमत्तेवर बोजा चढवणार

0
0

बँकेच्या लेखापरीक्षकांची होणार चौकशी

संशयितांच्या मालमत्तेवर बोजा चढवणार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कसबा बावडा शाखेतील सोन्याचा अपहार लेखापरीक्षणात कसा लक्षात आला नाही असा प्रश्न पोलिसांनी उपस्थित केला आहे. लेखा परीक्षकांच्या अहवालांमधील माहिती घेण्यासाठी बँकेचे लेखापरीक्षण करणाऱ्या दोन्ही लेखापरीक्षकांची चौकशी केली जाणार आहे. अटकेतील तिन्ही संशयित अपहाराची कबुली देण्यास टाळाटाळ करीत असल्याने ३२ लाखांचा बोजा त्यांच्या मालमत्तेवर चढवण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे.

जिल्हा बँकेच्या कसबा बावडा शाखेत २७ कर्जदारांच्या तारण सोन्याचा अपहार करून ३२ लाखांची फसवणूक करणारे बँकेचे शाखाधिकारी संभाजी पाटील, कॅशिअर परशुराम नाईक आणि सराफ सन्मुख ढेरे या तिघांचीही चौकशी सुरू आहे. चौकशीत गुन्ह्याची कबुली देण्यास टाळाटाळ सुरू असल्याने अपहारातील रकमेचा बोजा तिघांच्याही मालमत्तेवर चढवला जाणार आहे. यासाठी त्यांच्या नावावरील संपत्तीची माहिती घेतली जात आहे. तिन्ही संशयितांनी गेल्या दोन वर्षात बँकेच्या कागदपत्रात फेरफार केले आहेत. कर्जदारांच्या बोगस सह्यादेखील केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. हा प्रकार बँकेच्या लेखापरीक्षणात निदर्शनास न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत चौकशी करण्यासाठी बँकेच्या दोन लेखापरीक्षकांना बोलवले जाणार आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीत विश्वविक्रमी ‘योग’

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

जत तालुक्यातील दुर्गम आणि मोठ्या शहरांपासून कोसो दूर असलेल्या बालगावचा शिवार गुरुवारी गर्दीच्या महापुराने न्हावून निघाला. केवळ गर्दी नव्हे, तर सुमारे एक लाखावर साधक योगमध्ये सहभागी झाले. निमित्त होते, जागतिक योग दिनाचे आणि श्रम कामी आले होते सांगली जिल्हा प्रशासनाचे! ज्याची नोंद ‹विश्वक्रम म्हणून झाली.

बालगाव येथील गुरुदेवाश्रमात गेले अनेक महिने या विश्वविक्रमाची तयारी सुरू होती. लाखावर साधक जमा करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. जागतिक योगदिनानिमित विश्वविक्रमी योग शिबिराचे आयोजन तेही बालगावसारख्या दुर्गम आणि हजारभर लोकसंख्या असलेल्या गावात यशस्वी करणे म्हणजे एक दिव्यच होते. परंतु अगदी जिद्दीने तयारी लागलेल्या  जिल्हा प्रशासनाला आणि त्या ठिकाणच्या गुरुदेवाश्रमच्या मदतीला हजारो हात लागले आणि एक लाख दहा हजाराच्या योगसाधकांनी घातलेल्या सूर्यनमस्काराने विश्वविक्रमाची नोंद केली.

सांगली शहरापासून बालगावचे अंतर १५५ किलोमीटर तर ७० किलोमीटरवर जत आहे. त्यामुळे केवळ तीस किमी अंतरावर असलेल्या विजापूरचा उपयोग करत हे मिशन सांगली जिल्हा प्रशासनाने यशस्वी केले. पन्नास एकरावर पसरलेले मॅटिंग वाऱ्याने उडून जावू नये म्हणून रात्री उशीरा त्यावर खिळे मारण्याचे ठरले. त्यासाठी विजापूरहून साडेसहा टन खिळे आणले. मुक्कामाला असणारे शिक्षक, स्वयंसेवक आणि तीन हजार सरकारी अधिकारी, कर्मचार्यांनी सर्वांना जुजबी ज्ञान देऊन पहाटेपर्यंत खिळे मारण्याचे काम केले. प्रत्येकजण रांगेत दिसणे महत्त्वाचे असल्याने त्यासाठी रेषा आखण्याचे काम अवघड असले तरी तरी ते करणे भाग होते. ते झाले म्हणूनच एकूण उपक्रम आकर्षक झाला.

 २२ हजार विद्यार्थी आणि आजूबाजूच्या गावातील नागरिक, अगदी कर्नाटकाच्या सीमाभागातून आलेले नागरिक, अशी मोठी संख्या एकत्र आल्याने आरोग्यापासून ते आपत्तीनिवारणापर्यंतची सर्व यंत्रणा सज्ज ठेवावी लागली. एकूण दहा हजार वाहने त्या  परिसरात होती. ३७ रुग्णवाहिका आणि १५० डॉक्टरांचे पथक या ठिकाणी तैनात करण्यात आली होती. सकाळी लाखाहून अधिक साधक माळरानावर आले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मंत्री, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत योग शिबिराला सुरूवात झाली. एका खेड्यात योगाचा विक्रम झाला. यासाठी अनेक दिवस राबणाऱ्या हाताचे चीज झाले. त्यामुळे सर्वांचा सत्कार करण्यात आला.

कोट

मुख्य शहरापासून लांब असलेल्या खेड्यात हा विक्रम करणे अवघड काम होते. पण हजारो हात मदतीसाठी आले. त्यामुळेच हा विश्वविक्रम होऊ शकला. विशेष म्हणजे तीन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉडने या विक्रमाची नोंद घेतली. जगाला योगसाधनेच्या माध्यमातून आरोग्याची गुरुकिल्ली देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यांच्याच प्रयत्नांचा भाग म्हणून हा उपक्रम साकारला.

विजयकुमार काळम पाटील, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केर्लीत दोन गटात मारामारी

0
0

केर्लीत दोन गटांत मारामारी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतजमिनीच्या वादातून केर्ली (ता. करवीर) येथे गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास दोन गटांत मारामारी झाली. काठी, कुऱ्हाड व कोयत्याने एकमेकांवर हल्ला केल्याने दोन्ही गटांतील आठजण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे. याप्रकरणी दोन्ही गटांकडून परस्पर विरोधात तक्रार दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

संदीप संभाजी गवळी (वय ३२), राहुल रंगराव गवळी (२८), अतुल शिवाजी गवळी (३२) संग्राम संभाजी गवळी (२९), संभाजी सदाशिव गवळी (६०), धनाजी हिंदुराव गवळी (४२), हिंदुराव रामचंद्र गवळी (६५), बाजीराव हिंदुराव गवळी (४०, सर्व रा. केर्ली) अशी जखमींची नावे आहेत. गवळी कुटुंबात गेल्या दोन वर्षांपासून सामायिक शेतजमिनीवरून वाद सुरू आहे. याच वादातून गुरुवारी सकाळी हिंदुराव रामचंद्र गवळी व संभाजी सदाशिव गवळी यांचे दोन गट भिडले. काठी, कुऱ्हाड, कोयता आणि दगडाने केलेल्या मारहाणीत दोन्ही गटांतील आठजण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी खासगी वाहनातून सीपीआरमध्ये दाखल केले. करवीर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत परस्परविरोधात गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोर मनुगडे निलंबित

0
0

(फोटो आहे)

लाचखोर मनुगडे निलंबित

चौकशीनंतर होणार बडतर्फीची कारवाई

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणारा पोलिस हवालदार रंगराव भागोजी मनुगडे (वय ५६, रा. सुर्वेनगर, कोल्हापूर) याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी गुरुवारी (ता. २१) निलंबनाचे आदेश काढले. चौकशीनंतर त्याच्यावर बडतर्फीची कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक मोहिते यांनी दिली. दरम्यान, कोर्टाने मनुगडेचा जामीन नाकारल्याने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे.

प्लॉट खरेदी-विक्रीच्या वादातून आनंद चंद्रकांत गायकवाड यांच्यासह आठजणांच्या विरोधात करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास हवालदार मनुगडे याच्याकडे होता. मनुगडे याने गायकवाड याला पोलिस ठाण्यात बोलवून अटक करण्याची धमकी दिली. अटक टाळण्यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांची लाच देण्याची मागणी केली. गायकवाड आणि त्याची पत्नी या दोघांचे दहा हजार रुपये आणि इतर सहाजणांचे प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे ३० हजार रुपये देण्याची मागणी केली होती. पहिल्या टप्प्यात यातील पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना हवालदार मनुगडे बुधवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ सापडला होता. पोलिसांनी त्याला गुरुवारी जिल्हा कोर्टात हजर केले असता, कोर्टाने जामीन नाकारला. शुक्रवारी पुन्हा जामिनावर सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केर्लीजवळ ट्रक-जीप धडकेत पाच जखमी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भरधाव ट्रकने पेट्रोल पंपाकडे निघालेल्या बोलेरो जीपला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाचजण जखमी झाले. अपघात गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास घडला. जखमींना तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. अपघाताची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

आपटी (ता. पन्हाळा) येथील शहाजी रामचंद्र खांबे (वय ४८), रेखा शहाजी खांबे (४२), श्रद्धा शहाजी खांबे (२२), श्रेयश शहाजी खांबे (१७), अलका शिवाजी जाधव (५५) हे बोलेरो जीममधून आपटी गावातून कोल्हापूरकडे येत होते. केर्लीजवळील पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी त्यांनी पंपाकडे जीप वळवली. याचवेळी कोल्हापूरहून पन्हाळ्याकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने बोलेरोला जोराची धडक दिली. या अपघातात बोलेरोतील पाचजण जखमी झाले. जीपचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनधारकांनी जखमींना १०८ रुग्णवाहिकेसह खासगी वाहनातून सीपीआरमध्ये दाखल केले. याप्रकरणी ट्रकचालकावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तडीपार तीन गुंड अटकेत

0
0

तडीपार तीन गुंड अटकेत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, दहशत, लूटमार असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या तीन गुन्हेगारांना राजारामपुरी पोलिसांनी तडीपार केले आहे. तडीपार असतानाही हे गुंड कोल्हापूर शहरातच वावरत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील व त्यांच्या पथकाने तिघांना जेरबंद केले. त्यांना शुक्रवारी जिल्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. आसू बादशहा शेख (वय २३, रा. दौलतनगर), रोहित परशराम कुऱ्हाडे (२१, रा. पंत मंदिर शेजारी, शाहूनगर) आणि अमित सुरेश दिंडे (२०, रा. राजारामपुरी, १४ वी गल्ली) अशी त्यांची नावे आहेत. एक ते दोन वर्षांसाठी त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार केले असतानाही आदेशाचा भंग करून ते कोल्हापुरात राहत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मतदार नोंदणीत टाळाटाळ करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

0
0

दोघांवर गुन्हे दाखल

कोल्हापूर

मतदार नोंदणी कामासाठी नेमणूक केलेली असतानाही कामकाजासाठी गैरहजर राहून निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल दोघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राजाराम कॉलेजचे शाळा सहायक ए. एम. देशमुख व लोकमान्य विद्यालयाचे गोविंद दुलेवाड अशी त्यांची नावे आहेत. बट्टू जयराम गोरे (वय ४५ रा. ताराबाई पार्क) यांनी गुरुवारी (ता. २१) शाहूपुरी पोलिसात फिर्याद दिली .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्र हाउसिंग निवडणूक

0
0

हाउसिंग फायनान्सवर

'व्ही. बी.' बिनविरोध

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र स्टेट को ऑप. हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशच्या निवडणुकीत माजी चेअरमन व्ही. बी. पाटील यांच्यासह सातजणांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित १४ जागांसाठी १ जुलैला मतदान होणार आहे.

या संस्थेची अकरा वर्षांनंतर निवडणूक लागली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपसह अनेक पक्षांनी रस घेतल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. अर्ज मागे घेण्याची गुरुवारी अंतिम मुदत होती. त्यामध्ये पुणे व नाशिक विभागातून प्रत्येकी तीन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. यामध्ये कोल्हापूरचे बांधकाम व्यावसायिक व्ही. बी. पाटील यांच्यासह सागर काकडे, ललित चव्हाण, वसंत गीते, सतीश पाटील, बाळासाहेब सानप यांचा समावेश आहे. राखीव गटातून जळगावचे विजय पाटील बिनविरोध निवडून आले.

पुणे विभागातून व्ही. बी. पाटील यांच्यासह माजी नगरसेवक सुनील मोदी, प्रा. निवास पाटील व आकाराम पाटील यांनी अर्ज दाखल केले होते. त्यांनी माघार घेतल्याने तिघेजण बिनविरोध निवडून आले. २१ जागांसाठी १ जुलैला मतदान, तर मतमोजणी ३ जुलैला होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि. प. तर्फे आता मद्यपींचे समुपदेशन

0
0

पान ६ फ्लायर

काटृन टाकता येईल

...................

जिल्हा परिषद करणार मद्यपींचे समुपदेशन

स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने कार्यशाळा, ग्रामपंचायत पातळीपर्यंत शोध

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर

येथील जिल्हा परिषद स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने मुख्यालय, पंचायत समिती, ग्रामपंचायत पातळीवरील मद्यपी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा त्रयस्तपणे शोध घेत समुपदेशन करणार आहे. त्यासाठी या आठवड्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. समुपदेशनाव्दारे मद्यमुक्त जीवन जगण्यासाठी संबंधितास प्रवृत्त करण्यात येणार आहे. मंगळवारी पाणी पुरवठा विभागातील एका लिपिकाने दारू पिऊन धिंगाणा घातला. त्यानंतर प्रशासनाने हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला.

जि. प. प्रशासन हागणदारीमुक्त गावांपासून व्यसनमुक्त निकोप समाजनिर्मितीसाठी प्रयत्न करीत असते. याउलट मुख्यालयातील माध्यमिक, ग्रामपंचायत, बांधकाम, ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील काही कर्मचारी ऑनड्युटी दारू पिऊन असतात अशा तक्रारी आहेत. पंचायत समिती, ग्रामपंचायत पातळीवर तर मद्यपी कर्मचारी मोकाटच असतात. अनेकवेळा ते कामावरही नसतात. खातेप्रमुखांच्या निदर्शनास येऊनही कारवाई केल्यास संबंधितांचे कुटुंब उघड्यावर पडले या हेतूने दुर्लक्ष केले जाते. परिणामी त्याचा गैरफायदा घेत हे कर्मचारी अधिकच दारूच्या आहारी जातात हे दोन दिवसांपूर्वी लिपिक राजेश पवार याने दारूच्या नशेत धिंगाणा घातल्यानंतर स्पष्ट झाले. धिंगाणा घातला म्हणून पवार दारू पिऊन कार्यालयात येते होता हे समोर आले. मात्र वारंवार दारू पिऊन वास येऊ नये म्हणून सुगंधी सुपारी तोंडात धरून गूपचूपपणे काम करणाऱ्या तळीरामांचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दारूच्या नशेतील राजेशने कार्यालयात घातलेला गोंधळ वृत्तपत्रातून वाचून मंगळवार पेठेतील अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख प्रकाश मेहता यांनी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी जि. प., पंचायत समिती, ग्रामपंचायत पातळीवरील कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी मद्यमुक्त जीवन असा उपक्रम राबण्यासाठी इच्छुक असल्याचा प्रस्ताव दिला. ४०० स्वयंसेवकांच्या मदतीने हा उपक्रम राबवण्याची संकल्पना आहे. पहिल्या टप्यात जिल्हा, तालुका पातळीवर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. त्यातून मद्यमुक्त जीवन जगण्यासाठी समुपदेशनासाठी आवाहन करण्यात येणार आहे.

-----------

चौकट

त्रयस्तपणे माहिती घेणार

मद्यमुक्त जीवनासाठीची कार्यशाळा सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. त्यामध्ये प्रबोधनात्मक मार्गदर्शन करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात दारू पिणाऱ्यांची त्रयस्त आणि गोपनीयपणे माहिती घेण्यात येणार आहे. माहिती कोणाकडून मिळाली हे गुप्तपणे ठेवत संस्थेचे स्वयंसेवक संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्याशी संपर्क साधतील. घरी जाऊन त्यांचे, कुटुंबियाचे समुपदेशन करणार आहेत. गरज असल्यास संस्था संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यास निवासी शिबिरात दाखल करून समुपदेशन करणार आहे.

-------------------------

कोट

'जि. प. अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने 'जि. प. प्रशासन मद्यमुक्त जीवन' असा उपक्रम राबविणार आहे. जि.प.मुख्यालय, पंचायत समिती, ग्रामपंचायत पातळीवरील व्यसनी कर्मचाऱ्यांचे समुपदेशनाव्दारे संबंधित संस्था तज्ज्ञांव्दारे मनपरिवर्तन करेल. व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी विविध कार्यक्रम राबविले जातील. त्याची सुरूवात लवकरच केली जाईल.

डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी

-------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनी शेट्टी स्टोरी

0
0

सिंगल फोटो..

आत्मविश्‍वासाने मिळविले यश

जयसिंगपूरची सोनी शेट्टी मुलींमध्ये राज्यात तिसरी

अजय जाधव, जयसिंगपूर

जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर जयसिंगपूर येथील सोनी सदाशिव शेट्टी हिने राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यात मुलींमध्ये तिसरा क्रमांक पटकावला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच खाकी वर्दी परिधान करण्याचे पाहिलेले स्वप्न तिने सत्यात उतरविले.

शेट्टी कुटुंबीय जयसिंगपूर येथील अवचितनगरमध्ये छोट्याशा कौलारू घरात राहते. मूळचे उडपीनजीकच्या बोम्मनहळ्ळी येथील हे कुटुंब. ३५ वर्षांपूर्वी सोनीचे वडील सदाशिव जयसिंगपुरात आले आणि बसस्थानकाच्या मागील बाजूस असणाऱ्या भजी चौपाटीमध्ये चहागाडा सुरू केला. पत्नी कांती, तसेच मनीषा, सोनी व महेश या मुलांसमवेत त्यांच्या संसाराचा गाडा कसाबसा चालत होता. सध्या ते मगदूम शिक्षण संकुलात कँटीन चालवितात.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सोनीने नगरपालिकेच्या शाळा क्र.९मध्ये प्राथमिक शिक्षण घेतले. यानंतर प्रथम विभूते विद्यालयात व नंतर बळवंतराव झेले हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतले. एअर फोर्स किंवा नेव्हीमध्ये करिअर करायचं असे सोनीचे स्वप्न होते. मात्र, दहावीनंतर तिने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतल्याने पुढील वाटा बंद झाल्या. जयसिंगपूर येथील घोडावत कन्या महाविद्यालयात शिक्षण घेत असताना कार्यक्रमानिमित्त महिला पोलिस अधिकारी येत असत. येथेच सोनीच्या मनात खाकी वर्दीचे प्रेम निर्माण झाले.

वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर सोनीने सांगली येथे वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला. शिक्षण घेत असतानाच खाकी वर्दीचे स्वप्न गप्प बसू देत नव्हते. यामुळे तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यासही सुरू केला. सांगली येथे सातत्याने अनेकांचे मार्गदर्शनही घेतले. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी चार वर्षे परिश्रम घेतले. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने पदवीधर असलेल्या सोनीसमोर कुटुंबाला हातभार लावण्यासाठी नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, अशाही परिस्थितीत तिला आई-वडिलांनी प्रोत्साहन दिले. पदवीधर असलेला लहान भाऊ महेश याने आपले शिक्षण अर्धवट सोडून स्वतः वडिलांच्या व्यवसायात हातभार लावण्याचा निर्णय घेतला व बहिणीला पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. सोनीच्या कुटुंबात सरकारी नोकरीत कुणीही नाही. तिने खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न पाहिले आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर ते पूर्ण केले. परीक्षेचा निकाल ऐकताच शेट्टी कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

००००

कोट...

जिद्द, चिकाटीने सलग चार वर्षांच्या परिश्रमानंतर मला हे यश मिळाले. तुमच्याकडे आत्मविश्‍वास आणि प्रामाणिक प्रयत्न असतील तर यश निश्‍चित मिळते. ध्येय साध्य करण्यासाठी तुमची कठोर परिश्रमाची तयारी हवी.

सोनी शेट्टी

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लाख’मोलानंतर शिपायांचे वापसीसत्र

0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : येथील जिल्हा परिषद सामान्य प्रशासनाने वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी आणि तक्रारी असलेल्या ३१ शिपायांच्या बदल्या महिन्यापूर्वी केल्या होत्या. त्यातील तीन शिपायांच्या 'लाख'मोलानंतर मूळ ठिकाणी बदली झाली आहे. त्यांच्यात वसुलीचे विशेष गुण असल्याने 'अवघड' अडचणीतून मार्ग काढत त्यांना मलईदार विभाग मिळाले आहेत. अशाप्रकारे 'लाख'मोलाच्या घडामोडींनी शिपाई वापसीसत्र सुरू आहे. याउलट नियुक्तीपासून निवृत्तीपर्यंत अनेक शिपाई गैरसोयीच्या ठिकाणी काम करीत आहेत. त्यांनी मुख्यालयात सोयीच्या विभागात बदलीसाठी येण्यासाठी अनेकवेळा अर्जही केले आहेत. मात्र, पैसे देण्याची आणि साहेबाला मॅनेज करण्याची क्षमता त्यांच्यात नाही. त्यामुळे ते वर्षानुवर्षे गैरसोयीच्या ठिकाणीच कार्यरत असल्याच्याही तक्रारी आहेत.

जिल्हा परिषद मुख्यालय आणि पंचायत समित्यांमधील एकूण ३१ शिपायांच्या बदल्या करण्यात आल्या. दहा वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी आणि तक्रारी असलेल्यांची प्राधान्याने बदली करण्यात आली. अर्थ विभागात दहा वर्षांपेक्षा सेवा केलेले, तक्रारीवरून एका शिपायाची ग्रामीण पाणीपुरवठा विभागात बदली झाली. त्याने अर्धा लाखापर्यंत व्यवहार करून पुन्हा वित्त विभागात बदली मिळविली. सोळा वर्षांपासून बांधकाम विभागात कार्यरत शिपायाची बदली झाली. मात्र, त्यानेही अर्थपूर्ण वशिला लावत बांधकाम विभागातील सभापती कक्षात प्रतिनियुक्तीवर बदली करून घेतली. माध्यमिकमधून ग्रामीण विकास यंत्रणा विभागात बदली झालेल्या शिपायाने तेथील साहेबाच्या त्रासाला कंटाळून १५ हजारांची चिरीमिरी देऊन उपाध्यक्षांच्या कक्षात प्रतिनियुक्ती घेतली आहे. कागल तालुक्यातील सांगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातून मुख्यालयात येण्यासाठी एका शिपायाने ४० हजार मोजले आहेत. मात्र, अद्याप त्याची बदली झालेली नाही. अशाप्रकारे अर्थपूर्ण घडामोडींमुळे शिपायाच्या बदल्या होत आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणारे आणि भ्रष्ट मार्गाचा अवलंब न करणाऱ्या शिपायांना निवृत्तीपर्यंत एकाच ठिकाणी काम करावे लागत आहे.

००००

मूळ ठिकाणी आलेले...

मूळ विभागात पुन्हा बदलीने आलेल्या शिपायांची नावे आणि कंसात विभाग असे : रवींद्र पोवार (ग्रामीण पाणीपुरवठा), मारुती पाटील (माध्यमिक शिक्षण), राजूद्दिन जमादार (अर्थ).

-----------------

कोट...

शिपाई बदलीच्या सरकारी निकषात स्पष्टता नाही. तरीही अर्ज केलेले, तक्रारी असलेल्यांच्या बदल्या झाल्या आहेत. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम केल्याने आणि तक्रारी असल्याने बदली झालेले पुन्हा मूळ ठिकाणी आल्याच्या प्रकरणाची माहिती घेतो. त्यांच्या बदलीसाठी कुणाची शिफारस पत्रे आहेत, त्याचा शोध घेतला जाईल. चुकीची बदल्या झाल्या असल्यास सीईओंशी चर्चा करून दुरुस्ती केली जाईल.

रवींद्र आडसूळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन)

-------

'बांधकाम'ला सर्वाधिक मागणी

जिल्हा परिषदेमधील बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, माध्यमिक, वित्त विभाग मलईदार विभाग आहेत. या तीनपैकी सर्वाधिक ढपला पाडण्याची संधी बांधकाममध्ये आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागात ठेकेदारांकडून पैसे गोळा करण्याची प्रामाणिक जबाबदारी पार पाडत असलेल्या शिपायाविरोधात तक्रार झाली. वसुलीला वैतागलेल्या ठेकेदारानेच त्याच्याविरोधात तक्रार केली. त्यानंतर माध्यमिक विभागात बदली झाली. तेथे कमाईला संधी नसल्याने पुन्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागात तो रुजू झाला. तेथेही त्याचे मन रमेना. जास्त कमाईमुळे बांधकाम विभागात जाण्याचा मोह त्याला झाला आहे. एका सदस्याला हाताशी धरून त्याने 'लाख'मोलाची घडामोड केली आहे. त्याला बांधकाम विभाग देण्यासाठी एका सदस्याने सुपारी घेतली आहे.

०००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमळ उखडण्यासाठी मदत करा

0
0

खासदार राजू शेट्टी यांचे आमदार सतेज पाटील यांना आवाहन

फोटो आहे.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'अच्छे दिन'च्या शोधात सत्ता परिवर्तनाच्या लढाईमध्ये सहभागी झालो. पण अच्छे दिनापेक्षा 'लुच्चे दिन' वाट्याला आले. शेतकरी, सर्व सामान्य व्यक्ती सरकाच्या चुकीच्या धोरणामुळे नागवला जात आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले असून हे दलालांचे सरकार आहे. दलालांपासून देश व राज्याला वाचवण्याकरिता आणि देशातील कमळ उखडून टाकण्यासाठी मदत करा, लोकांच्या अपेक्षांना तडा जावू देऊ नका,' असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी आमदार सतेज पाटील यांना केले. यासाठी मागील कारभारातील चुका सधारण्याची अपेक्षाही खासदार शेट्टी यांनी व्यक्त केली.

आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या वह्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. शाहू स्मारक भवन येथे कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना खासदार शेट्टी यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचे वाभाडे काढले. ते म्हणाले, 'शिवारात काय चाललय सरकारला माहीत नाही. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी देणंघेणं नसल्याने अतिरिक्त दूध व साखरेचा प्रश्न निर्माण झाला. शेतकरी, विद्यार्थी, सर्वसामान्यांची आवस्था अत्यंत बिकट असताना चार वर्षांच्या काळात न केलेल्या कामांच्या जाहिरातीसाठी ४ हजार ३०० कोटी रुपये खर्च केले. अशा खोट्या जाहिरातीच्या माध्यमातून अनेक कमळे उगवली आहेत. केवळ जिल्ह्यातील नव्हे, तर देशातील शेतकऱ्यांच्या समस्यांची माहिती घेतली आहे. मी पट्टीचा शेतकरी आहे. कोणत्या पिकाला कोणते तणनाशक कधी लागते याची माहिती मला आहे. या तणनाशकाचा वापर करुन देशातील कमळ उखडून टाकणार आहे. सरकारने शेतकऱ्यांचा केलेल्या विश्वासघाताचा बदला घेणार असून त्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे. राइट टू एज्युकेशनचा कायदा केला. पण प्रत्येकाच्या ऐपतीनुसार सर्वांना शिक्षण मिळते का? जून महिना आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चामुळे पालकांमध्ये भीती निर्माण होत, असताना सरकार मात्र कमी पटसंख्येचा मुद्दा पुढे करत शाळा बंद करण्याचा निर्णय घेत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, वि. रा. शिंदे, लोकमान्य टिळक, आगरकर यांच्या विचारांवर गदा आणली जात आहे. पुरोगामी राज्यात शिक्षणाच्या बाजारीकरणातून सुरू असलेल्या बट्ट्याबोळ थांबवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. अशा संघर्षमय स्थिती वह्या वापट कार्यक्रम स्तुत्य असला, तरी ज्यांच्याकडे सत्तेची सूत्रे आहेत त्यांचा चंगळवाद जोपासण्यासाठी आम्ही आडाणी गुलामांची फौज पुरवण्याचे काम कारायचे का? गुणवत्ता जन्माने नाही, तर कर्तृत्वाने ठरते. गुणवत्ता काही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नसून गुणवत्तेला पैल्यू पाडण्याचे काम करावे लागते.'

इंधन दरवाढीबाबत ते म्हणाले, 'यूपीए सरकारच्या काळात क्रुड ऑइलचा दर १०५ डॉलर अताना पेट्रोल ६६ रुपये प्रतिलिटर मिळत होते. पण सध्या क्रुड ऑइलचा दर ७९ डॉलर असताना पेट्रोलचा दर ८६ रुपये कसा? दरातील ही तफावत कोणाच्या खिशात जाते? व्हॅटऐवजी जीएसटी आला. पण यातून जनतेचा फायदा होण्याऐवजी केवळ सीएंना रोजगार मिळाला.'

मारुतीच्या बेंबीत विंचूच आहे...

ग्रामीण भागातील लोककथेचा आधार घेत 'मारुतीच्या बेंबीत गार गार लागत नाही तर तिथं विंचूच आहे,' असे सांगत खासदार शेट्टी यांनी ऋतुराज पाटील यांच्या कथित भाजपप्रवेशावर भाष्य केले. ते म्हणाले, 'भाजपबरोबर सत्ता परिवर्तनामध्ये सहभागी होऊन माझी पुरती फसगत झाली. मारुतीच्या बेंबीत बोट घालून गार लागतं का बघितलं पण तिथं विंचूच आहे. सर्वत्र चोर आणि दलालांचा बाजार सुरू आहे, त्यामुळे पालकमंत्री पाटील यांनी कितीही म्हटले, तरी ऋतुराज पाटलांना इकडं-तिकडं पाठवू नका, नाहीतर विंचू चावून फसगतच होईल, असे सांगताच एकचा हशा पिकला.

'किती बैलांना पोसायचे'

सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाणीव सरकारला नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. आपल्याप्रमाणे न्यूझिलंडमध्ये अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर भाकड जनावरे कत्तलखान्यामध्ये पाठवून यातून मार्ग काढला. पण आपल्याकडे कत्तलखान्यासंदर्भात कायदा केला. त्यामुळे भाकड जनावरांचा भार शेतकऱ्यांना सोसावा लागत असून यांचे धर्मकार्य पूर्ण होत असले, तरी शेतकरी देशोधडीला लागत आहे. गायींचे रक्षण करता, मग गल्लीपासून दिल्लीपर्यंत निर्माण झालेल्या बैलांनाही आम्ही पोसायचे का? असा खडा सवाल त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्य अकादमी

0
0

देशभरातील विविध भाषांमध्ये काम करणारी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळणे ही साहित्यक्षेत्रात सन्मानाची बाब समजली जाते. डिसेंबर १९५२ मध्ये साहित्य अकादमीच्या स्थापनेचा निर्णय झाला. १२ मार्च १९५४ ला अकादमीचे उद्घाटन झाले. ७ जानेवारी १९५६ ला अकादमीची नोंदणी करण्यात आली. अकादमीचे पहिले अध्यक्ष तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. १९६३ ला पुन्हा त्यांची फेरनिवड झाली.

\B

कार्य

\Bभारतीय साहित्य अकादमी साहित्य संवाद, प्रकाशन आणि साहित्य प्रसाराचे काम करणारी केंद्रीय संस्था आहे. देशातील २४ भाषा आणि इंग्रजीत होणाऱ्या साहित्यिक घडामोडींना बळ देणारी ही संस्था आहे. अकादमीने आजपर्यंत जवळपास सहा हजारहून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. प्रत्येक १९ तासाला एक पुस्तक या वेगाने प्रकाशन होते. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यपातळीवर ५० हून अधिक चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येते.

\Bपुरस्कार

\Bअकादमीच्यावतीने प्रतिवर्षी २४ भाषांत दर्जेदार साहित्यकृतींना पुरस्कार देतात. याव्यतिरिक्त या भाषांतील अनुवादित साहित्यालाही पुरस्कार दिले जातात. वर्षभरातील समीक्षा, परिसंवाद, निवडप्रक्रियेतून हे पुरस्कार निश्चित केले जातात.

\Bमान्यताप्राप्त भाषा

\Bभारतीय संविधानात समाविष्ट असलेल्या २२ भाषांव्यतिरिक्त राजस्थानी आणि इंग्रजी भाषांनासुद्धा अकादमीने मान्यता दिली आहे. या भाषांतील साहित्याची दखल अकादमी घेते.

\Bमुख्य कार्यालय

\B साहित्य अकादेमी, रवींद्र भवन, ३५ फिरोजशाह मार्ग, नवी दिल्ली या इमारती संगीत नाटक अकादमी, ललित कला अकादमी आणि साहित्य अकादमीची कार्यालये आहेत. येथील कार्यालयात डोंगरी, इंग्रजी, हिंदी, कश्मीरी, मैथिली, नेपाळी, पंजाबी, राजस्थानी, संस्कृत, संताली आणि उर्दू भाषांतील प्रकाशने आणि कार्यक्रमांची आखणी करते. याव्यतिरिक्त कोलकाता, बेंगळुरू, चेन्नईतही विभागीय कार्यालय आहे.

\B

महाराष्ट्रातील कार्यालय मुंबईत

\Bसाहित्य अकादमीचे मुंबईतील कार्यालय १९७२ मध्ये सुरू करण्यात आले. या कार्यालयातून मराठीसह हिंदी इंग्रजी, गुजराती, कोंकणी आणि सिंधी प्रकाशने आणि कार्यक्रमांची आखणी करण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेवा निवृत्तीनिमित्त सत्कार

0
0

कोल्हापूर : येथील रवळनाथ को ऑप हाउसिंग फायनान्स सोसायटीच्या शाखेतर्फे सेवानिवृत्त प्राध्यापक, अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संजय घोडावत विद्यापीठचे कुलसचिव प्राचार्य डॉ. बी. एम. हिर्डेकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी विलास सावंत, प्रा. साधना पाटील, प्रा. नामदेव शिरोळकर, प्रा. डॉ. बी. के. काटकर यांचा सत्कार करण्यात आला. सुशांत करोशे, भास्कर सांगावकर, डॉ. सतीश घाळी, अमृत सुतार, पंकज कुंभार आदी उपस्थित होते. प्रा. आर. एस. पाटील यांनी स्वागत केले. एम. एल. चौगुले यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. एच. व्ही. देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. ए. एम. गुरव यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शर्यतींचे आयोजन केल्यास कारवाई

0
0

कोल्हापूर : सुप्रीम व हायकोर्टाच्या निर्णयानुसार बैलगाड्यांच्या शर्यतीवर बंदी घालण्यात आली असून जिल्ह्यात बैलगाड्या शर्यतींचे आयोजन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिला. जिल्ह्यात बैलगाड्यांच्या शर्यतींचे आयोजन न करण्याबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी दिल्ली येथील भारतीय जीवजंतू कल्याण मंडळ, तपासणी समितीचे आवाहक आणि सदस्य डॉ. एस. के. मित्तल यांच्या उपस्थितीत बैठक झाली. कोर्टाच्या निर्णयानुसार बैलगाड्यांच्या शर्यतीवर बंदी घालण्यात आली असून कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजर्षी शाहू व्याख्यानमाला

0
0

लोगो : राजर्षी शाहू व्याख्यानमाला

महासत्तेसाठी ठोस धोरण राबवावे

डॉ. उत्तरा सहस्रबुद्धे यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आंतरराष्ट्रीय राजकारणात संपूर्ण जग गेली पंचवीस वर्षे भारताकडे 'उगवती सत्ता' म्हणून पाहत आहे. भारताने 'उगवती सत्ता' या कोषातून बाहेर पडत महासत्तेसाठी प्रयत्न केले पाहिजे. नोकरशहांच्या प्रभावाखाली परराष्ट्र धोरण न राबविता भारतीय राजकारण्यांनी भारताला महासत्ता बनण्यासाठी ठोस व नियोजनबद्ध आंतरराष्ट्रीय धोरण राबवायला हवे,' असे मत डॉ. उत्तरा सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले. राजर्षी शाहू व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. 'बदलते आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारत' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी डॉ. जयसिंगराव पवार प्रमुख उपस्थित होते.

डॉ. सहस्रबुद्धे म्हणाल्या, '१९९० च्या दशकात जर्मनीचे एकत्रिकरण आणि रशियाचे विघटन यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठे बदल झाले. रशियाचे वर्चस्व संपुष्टात आल्यानंतर अमेरिका एकमेव महासत्ता असली तरी जगभरात भारत, ब्राझील, रशिया, चीन, इराण अशा क्षेत्रीय सत्ता निर्माण झाल्या. हे देश अमेरिकेबरोबर संबंधही राखतात आणि स्पर्धाही करतात. देशाची सुरक्षितता, लष्करी वर्चस्व, युद्ध हे प्रश्न थोडे मागे पडले असून हिंसा, वांशिक दंगली, समुद्रातील चाचेगिरी या प्रश्नांनी उग्र स्वरूप निर्माण झाले आहे.'

त्या पुढे म्हणाल्या, 'आंतरराष्ट्रीय राजकारणातील बदलाचा परिणाम भारतावर झाला असून, १९९१ पासून तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांच्या काळापासून देशाचे पररराष्ट्र धोरण बदलण्यास सुरुवात झाली. या धोरणाचा विस्तार माजी पंतप्रधान आय. के. गुजराल, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग यांनी कालानुरूप विस्तार केला. नरसिंहराव यांचे धोरण सध्याचे भाजप नरेंद्र मोदी यांचे सरकार राबवत असून त्यामध्ये तीन टप्पे केले आहेत. शेजारच्या देशाबरोबर उत्तम संबंध ठेवणे याचा संबंध पहिल्या टप्प्यात येतो. सध्या पाकिस्तान वगळता शेजारी बांगलादेश, नेपाळ, अफगाणिस्तान, श्रीलंका, भूतान या देशांबरोबर संबध आहेत. दुसऱ्या टप्प्यात पूर्व आशियातील भारताची सागरी सीमा असलेल्या ब्रह्मदेश, इंडोनिशिया, थायलंड, व्हिएतनाम या देशांबरोबर भारताचे चांगले संबंध आहेत. तिसऱ्या टप्प्यात आफ्रिका खंडापासून पॅसिफिक महासागरमधील अमेरिका, चीन, ब्राझील या देशांबरोबर भारताने संबंध सुधारले असून, त्यामुळे भारताचा व्यापार वाढला आहे. भारताचा विकासदर वाढला असल्याने जगभरातील देश भारताकडे उगवता देश म्हणून पाहत आहेत.'

भारताने उगवता देश या प्रतिमेतून बाहेर पडले पाहिजे असे सांगून डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त करुन त्यांनी भारताने परराष्ट्र धोरण जाहीर केले पाहिजे, असे मत व्यक्त केले. परराष्ट्र धोरण राबवताना राजकर्त्यांनी नोकरशहाच्या प्रभावाखालून बाहेर पडले पाहिजे. त्यासाठी ठोस व नियोजनबद्ध धोरण राबवले पाहिजे असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. अशोक चौसाळकर यांनी केले.

००००००

आजचे व्याख्यान

वक्त्या : डॉ. भारती पाटील

विषय : राजर्षी शाहू आणि स्त्री दास्य विमोचन

वेळ : सायंकाळी ६ वा.

स्थळ : शाहू स्मारक भवन

००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी सावकारावर गुन्हा दाखल

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खासगी सावकाराकडून दरमहा १० टक्के व्याजाने घेतलेल्या ६० हजार रुपयांपोटी साडेतीन लाख रुपयांची परतफेड करूनही चार लाख रुपयांच्या मागणीसाठी तगादा लावणाऱ्या खासगी सावकाराविरोधात गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. प्रशांत दत्तात्रय जाधव असे सावकाराचे नाव आहे. प्रमिला रामकृष्ण मनवळ (वय ४०, रा. तामगाव, मूळ रा. रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी : फिर्यादी प्रमिला मनवळ यांचे पती आर्थिक अडचणीत असल्यामुळे नोव्हेंबर २०१६ मध्ये त्यांनी प्रशांत जाधव या खासगी सावकाराकडून दरमहा १० टक्के व्याजाने ६० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांनी फेब्रुवारी २०१८ पर्यंत व्याज व दंड अशी साडेतीन लाख रुपयांची परतफेड केली. मात्र, आणखी चार लाख रुपये देणे लागते, असे सांगून प्रमिला मनवळ यांचे राहते घर जाधवने आपल्या नावावर करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या प्रमिला व त्यांच्या पतीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी गोकुळ शिरगाव पोलिसांना जाधव याच्यावर खासगी सावकारीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शुक्रवारी दुपारी हा गुन्हा दाखल झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनाकडून पालकमंत्र्याची दिशाभूल

0
0

धैर्यशील माने यांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'देशातील प्रदूषित नदी शुद्धीकरण प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामध्ये पंचगंगा नदीचा सामावेश करू,' अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्याचे नुकतेच वृत्तपत्रातून कळाले. मात्र यापूर्वीच नदी शुद्धीकरण योजनेत पंचगंगा नदी आहे. यामुळे पुन्हा समावेश करण्याचा मुद्दाच येत नाही. पण प्रशासनाने चुकीची माहिती दिल्याने पालकमंत्री पाटील यांनी तशी माहिती दिल्याचा आरोप जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी शुक्रवारी केला. पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासंबंधी पालकमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत करतो, असेही ते म्हणाले. जुलै २०१५ मध्ये केंद्र सरकारने निधी शुद्धीकरणासाठी निधी दिला. निधीतून उपाय योजनेवर नियंत्रण ठेवण्याच्या समितीवर खासदार राजू शेट्टी अध्यक्ष आहेत. मात्र त्यांनी काहीही केले नाही,असा आरोपही त्यांनी केला.

माने म्हणाले, 'पंचगंगा नदी प्रदूषणाचा सर्वाधिक फटका हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील गावांना बसत आहे. त्यामुळे गेल्या २५ दिवसांपासून नदीकाठावरील गावे विविध मार्गाने आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधत आहेत. नदीतील जलपर्णीत उतरणे, नदी चोरीला गेल्याची फिर्याद देणे, असे अभिनव आंदोलनही केले. यापार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांनी पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी काही उपाय सूचविले आहेत. त्यांची भूमिका सकारात्मक आहे. परंतु प्रशासन जाणीवपूर्वक त्यांची दिशाभूल करीत आहे. चुकीची माहिती देत आहे.

नदी प्रदूषणाला सर्वाधिक जबाबदार कोल्हापूर महानगरपालिका आहे. आम्ही आंदोलन केल्यानंतर महानगरपालिकेस सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी कोट्यावधींचा निधी मिळाला. अजूनही सांडपाणी नदीतच मिसळत आहे. यामुळे प्रकल्पासाठी महानगरपालिकेला मिळालेल्या निधीची चौकशी झाली पाहिजे. जुलै २०१५ मध्ये केंद्र सरकारने निधी शुद्धीकरणासाठी निधी दिला. निधीतून उपाय योजनेवर नियंत्रण ठेवण्याच्या समितीवर खासदार राजू शेट्टी अध्यक्ष आहेत. मात्र त्यांनी काहीही केले नाहीत. त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या नियंत्रणाखालील खर्च झालेल्या निधींचीही चौकशी झाली पाहिजे. प्रदूषणामुळे अनेकजण बळी पडले. त्याला जबाबदार धरून खासदार शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images