Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

दहावीत ब्राझिलच्या भुगोलाचा अभ्यास

$
0
0

satish.ghatage@timesgroup.com

Tweet@satishgMt

कोल्हापूर : सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक पसंतीचा संघ असलेल्या ब्राझिलच्या संघावर फुटबॉल शौकिनांच्या नजरा खिळल्या आहेत. याचवेळी यंदा बदलेलेल्या दहावीच्या अभ्यासक्रमात भूगोल विषयाच्या पुस्तकातही ब्राझील देशाने स्थान मिळवले आहे. विद्यार्थ्यांना तुलनात्मक अभ्यासाची सवय लागावी म्हणून भारताबरोबर ब्राझील देशाची निवड करण्यात आली आहे.

बहुतांशी भारतीयांना ब्राझीलची ओळख फुटबॉल खेळणारा देश अशी आहे. पण जगभरात जी विकसनशील देशांची नावे पुढे येतात, त्यामध्ये भारताबरोबर ब्राझीलची चर्चा होते. यंदा दहावीचा अभ्यासक्रम बदलला असून पाठपुस्तक तयार करताना भूगोल विषय अभ्यास समितीने तुलनात्मक अभ्यासासाठी ब्राझीलची निवड केली आहे. ब्राझीलचे भारताशी बऱ्याच दृष्टीने साम्य आहे. दोन्ही देश सांस्कृतिक, प्राकृतिक विविधतेने नटलेले आहेत. दोन्ही देशांत लोकशाही मार्गाने कारभार चालतो या बाबींचा विचार अभ्यास समितीने केला आहे.

दहावीच्या भूगोलच्या पुस्तकात एकूण नऊ पाठ असून त्यापैकी आठ पाठांत भारताबरोबर ब्राझील देशाची तुलनात्मक माहिती देण्यात आली आहे. भारत व ब्राझील या दोन देशांचे स्थान व विस्तार, प्राकृतिक रचना, हवामान, नैसर्गिक वनस्पती व प्राणी, लोकसंख्या, मानवी वस्ती, अर्थव्यवस्था व व्यवसाय, पर्यटन, वाहतूक व संदेश वहन यांचा आढावा प्रत्येक पाठात घेतला गेल्याने हे पुस्तक स्पर्धा परीक्षेच्यादृष्टीनेही अभ्यासासाठी मदत करणारे ठरणार आहे.

पुस्तकातील प्रत्येक धड्यात भारत व ब्राझीलचे नकाशे दिले आहेत. दोन्ही देशाचे ध्वज, ते कोणत्या कारणांसाठी प्रसिद्ध आहेत यांची तुलनात्मक माहिती आहे. प्राकृतिक रचना व जलव्यवस्थेत भारतातील गंगा नदीची ब्राझीलमधून वाहणाऱ्या अॅमेझॉन नदीची तुलना केली आहे. दोन्ही देशांतील पर्वत, मैदाने, द्वीपकल्प, किनारापट्टी यांची तुलनात्मक मांडणी केली आहे. हवामानाचा अभ्यास करताना ब्राझीलमधील पर्जन्यछायेचा प्रदेश, अवर्षणग्रस्त भाग, वाळवंटे, पाऊस स्थितीची माहिती दिली आहे. दोन्ही देशांतील नैसर्गिक वनस्पती व प्राण्यांची माहिती वाचनीय आहे. ब्राझीलमधील जंगलातील अजगर, सिंहासारखा दिसणारा सोनेरी तामरिन, मकाऊ या प्राण्यांची माहितीही देण्यात आली आहे. दोन्ही देशांतील लोकसंख्येचा प्रश्न गंभीर असून त्यामुळे उद्भविणाऱ्या समस्यांचा उहापोहही पाठात करण्यात आला आहे. दोन्ही देशातील नागरिकांचा आढावा घेण्यात आला असून अर्थव्यवस्थेची माहिती विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारी आहे. भारत व ब्राझीलमधील पर्यटन, वाहतूक व्यवस्था, संदेश वहन या विषयांनाही स्पर्श करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा नियोजनची बैठक

$
0
0

कोल्हापूर : जिल्हा नियोजन मंडळाची बैठक बुधवारी (ता.२०) दुपारी एक वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात होणार आहे. तत्पूर्वी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी साडेबारा वाजता डोंगरी विभाग विकास कार्यक्रम अंमलबजावणी बैठक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नऊ हजार रुपयांचा गुटखा जप्त

$
0
0

नऊ हजार रुपयांचा गुटखा जप्त

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यात गुटखानिर्मितीसह विकण्यावर बंदी असतानाही त्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनी बुधवारी कारवाई केली. विक्रेत्यांकडून साडेआठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पाच विक्रेत्यांविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीपुरी परिसरातील काही पान टपऱ्यांध्ये गुटख्याची छुपी विक्री सुरू असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. यानुसार गेल्या दोन दिवसांपासून संशयित विक्रेत्यांची तपासणी सुरू होती. बुधवारी सायंकाळी लक्ष्मीपुरी येथील पृथ्वी पान शॉप, साधना पान शॉप, जयभवानी पान शॉप, महालक्ष्मी पान शॉप आणि सुनीता पान शॉप याठिकाणी कारवाई करून साडेआठ हजारांचा गुटखा जप्त केला. गुटखाबंदी असतानाही छुप्या पद्धतीने गुटखा विक्री केल्याबद्दल शॉपी मालकांवर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतही काही विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र, याचा तपशील अन्न व औषध प्रशासन विभागाने दिला नाही.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीईओंचे अंगरक्षक आणि अभ्यागतात हाणामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एलईडी बल्ब बसविल्याचे बिल वारंवार पाठपुरावा करूनही गांधीनगर ग्रामपंचायतीकडून मिळत नसल्याने बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ठेकेदार दाम्पत्य लहान बाळाला घेऊन जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना भेटण्यासाठी आले. मात्र, भेटीपासून रोखल्याने सीईओंचे अंगरक्षक पोलिस आणि त्यांच्यात हाणामारी झाली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात हे प्रकरण गेले. मात्र, दोघांनाही समज देऊन प्रकरणावर पडदा टाकला.

गांधीनगरमध्ये एलईडी बल्ब बसविल्याचे बिल मिळाले नसल्याने उजळाईवाडीमधील ठेकेदाराने जि. प. प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला. गांधीनगर ग्रामपंचायतीसमोर दाम्पत्याने दोन दिवसांचे आंदोलनही केले. मात्र, त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी लहान बाळाला घेऊन जि. प.समोर ठिय्या आंदोलन सुरू केले. कुणीही दखल घेत नसल्याचे निदर्शनास आल्याने ते ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कक्षासमोर आले. तेथे अधिकारी नसल्याचे कळताच सीईओंना भेटण्यासाठी कक्षाकडे धाव घेतली. कक्षासमोर थांबलेले सीईओंच्या अंगरक्षक पोलिसाने साहेब मिटिंगमध्ये आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत विभागातील संबंधित अधिकाऱ्याना भेटावे, असा सल्ला दिला. पण ग्रामपंचायतीच्या कारभाराला वैतागलेले दाम्पत्य सीईओंना भेटण्याचा आग्रह धरले. त्यातून टोकाची वादावादी वाढली. अंगरक्षक आणि त्यांच्यात हाणामारी झाली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात प्रकरण मिटविले.

---------------

जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या तयारीत व्यस्त होतो. त्याचवेळी गांधीनगरमध्ये एलईडी बल्ब बसविलेले ठेकेदार पत्नी, लहान मुलास घेऊन मला भेटण्याचा आग्रह करीत होते. त्या दरम्यान कक्षासमोरील पोलिस आणि त्यांच्यात गोंधळ झाला. त्या ठेकेदाराच्या प्रलंबित प्रकरणात मी स्वत: लक्ष घालून सकारात्मक आदेश देणार आहे.

डॉ. कुणाल खेमनार, सीईओ, जि.प.

-------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकीत एफआरपी...

$
0
0

थकीत एफआरपीप्रश्नी

२० कारखान्यांना नोटिसा

साखर आयुक्तांची कारवाई; जिल्ह्यातील ११ कारखान्यांचा समावेश

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नुकत्याच पार पडलेल्या गळीत हंगामातील थकीत एफआरपीप्रकरणी कोल्हापूर विभागातील २० साखर कारखान्यांना साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांनी आरआरसीअंतर्गत नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ११, तर सांगली जिल्ह्यातील ९ कारखान्यांचा समावेश असून, या कारखान्यांकडे मेअखरे २२३ कोटी ५५ लाखांची थकीत एफआरपी आहे.

केंद्र सरकारच्या ऊसदर नियंत्रण कायद्यानुसार ऊसगाळप झाल्यानंतर १४ दिवसांच्या आत एफआरपी देणे बंधनकारक आहे. या कायद्याचे उल्लंघन झाल्यास ऊस नियंत्रण आदेश १९६६ च्या कलम ३ (३) नुसार कारखान्यांवर कारवाई करण्याची तरतूद आहे. या तरतुदीनुसार एफआरपी न दिलेल्या कारखान्यांना साखर आयुक्तांनी आरआरसीतंर्गत नोटिसा बजावल्या आहेत. तत्पूर्वी थकीत कारखान्यांना नोटिसा पाठवून सुनावणी घेतली होती. सुनावणीदरम्यान सर्वच कारखान्यांनी एफआरपी देण्याची लेखी हमी दिली होती. पण एक महिन्यानंतरही बिले अदा न केल्याने साखर आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

गळीत हंगामाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसांत गाळप झालेल्या उसाची बिले अदा केली. पण त्यानंतर साखर दरात झालेल्या घसरणीमुळे एफआरपी देण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे एफआरपीची रक्कम थकीत होत गेली. केंद्र सरकारने बफर स्टॉक, निर्यात अनुदान देत काही उपाययोजना केल्या. पण केंद्र सरकारच्या उपाययोजना तकलादू ठरल्याने अद्याप उत्पादकांना पूर्ण एफआरपी मिळू शकलेली नाही. पंधरा दिवसांपूर्वी केंद्र सरकारने साखर निर्यातीसाठी अनुदान देण्याची घोषणा केली, पण त्यानंतरही साखर निर्यात होऊ शकलेली नाही. गेल्या आठवड्यात सर्व साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन थकीत एफआरपी जूनअखेर देण्याचे घोषणा केली. पण त्यापूर्वी साखर आयुक्तांनी नोटिसा बजावल्या असल्याने यातून कारखानदार कसा मार्ग काढणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

०००

नोटिसा दिलेले कारखाने (थकीत रक्कम कोटीमध्ये)

कोल्हापूर जिल्हा : केन अॅग्रो (१२.९०), राजाराम (६०.०९), दत्त दालमिया (१२६६.२७), इकोकेन (६२०.१७), गुरुदत्त शिरोळ (२,३९८.५६), इंदिरा (२११.९२), कुंभी-कासारी (१०६२.७३), महाडिक शुगर्स (९८२.८४), मंडलिक (४९०.२८), संताजी घोरपडे (८२.१७), गायकवाड (१२२३.८८). सांगली जिल्हा : किसन-अहिर (२६८.२१), क्रांती-कुंडल (१६४५.५०), महाकाली (९८२.८४), राजारामबापू साखराळे (३६४९.०२), राजारामबापू वाटेगाव (१०७५.७८), सदगुरू आटपाडी (१५९२.२५), सोनहिरा वांगी (२४८०.०५), विश्वास शिराळा (२०३८.८१)

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्यशोधकांचे अंतरंग पुस्तकरुपात

$
0
0

फोटो - आहेत

लोगो - साहित्य संस्कृतीचा

'सत्यशोधकांचे' उलगडले 'अंतरंग'

५९७ कार्यकर्त्यांचा जीवनपट पुस्तकरुपात, बाबासाहेबांचे चित्रमय चरित्रही उपलब्ध

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:@Appasaheb_MT

सामाजिक समता व समताप्रधान समाजनिर्मिती हा उद्देश ठेवून महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची निर्मिती केली. असंख्य कार्यकर्त्यांनी सत्यशोधक समाज चळवळीचा क्रांतीकारी इतिहास निर्माण केला. सत्यशोधकी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकणारी फारसे ग्रंथ उपलब्ध नाहीत. महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीला सत्यशोधकीच्या क्रांतीकारी पर्व आणि त्याच्या शिलेदारांचे अंतरंग ग्रंथरुपाने उलगडले आहे. सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक प्रा. जी. ए. उगले यांनी 'सत्यशोधकांचे अंतरंग' हा चळवळीतील कार्यकर्त्यांचा पट मांडणारा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथांतून ५९७ कार्यकर्त्यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला आहे. त्यामध्ये १८७३ ते २०१७ या कालावधीतील कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

महात्मा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समताप्रधान समाजनिर्मिती आणि सामाजिक समतेवर सत्यशोधक समाजाची विचारधारा आधारलेली. विविध आव्हाने पार करत सत्यशोधक चळवळ ठिकठिकाणी रुजली. चळवळीतील कार्यकर्त्यांनी संकटावर मात करत नेटाने कार्य केले. त्यामध्ये महाराष्ट्र, बेळगाव आणि बडोदा प्रांतातील कार्यकर्त्यांचा समावेश होता. सत्यशोधकी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या कार्याचा वेध घेणारे एकत्रित पुस्तक नव्हते. महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतील मुख्य आधार बनलेल्या सत्यशोधक चळवळीचा इतिहास समाजासमोर आला पाहिजे हा दृष्टीकोन ठेवून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे या ग्रंथांची निर्मिती केली आहे. औरंगाबाद येथील प्रा. जी. ए. उगले यांनी सत्यशोधक चळवळीवर अभ्यास करुन या ग्रंथांचे लेखन केले आहे.

लेखक प्रा. उगले म्हणाले, '२००८ पासून त्याचे काम सुरु होते. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेपासून ते आता कार्य करणाऱ्या विविध भागातील कार्यकर्त्यांच्या कार्याची ओळख करुन दिली आहे. सत्यशोधक चळवळीत तीस महिला कार्यकर्त्या सक्रिय होत्या. २०१६ मध्ये पुस्तकाचे काम पूर्ण झाले. या पुस्तकाच्या माध्यमातून सत्यशोक समाज चळवळीचा क्रांतिकारी इतिहास उपलब्ध झाला.' ग्रंथात कोल्हापूर आणि परिसरातील तीसहून अधिक सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्त्यांच्या कार्याची ओळख करून दिली आहे.

सरकारी ग्रंथालयातील नवीन प्रकाशने

कोल्हापूर येथील 'शासकीय मुद्रणालय व लेखन सामग्री भांडार'येथील बुक डेपोमध्ये 'सत्यशोधकांचे अंतरंग'सह अन्य पुस्तके उपलब्ध झाली आहेत. यामध्ये 'महात्मा फुले समग्र वाङमय, क्रांतिसूक्ते : राजर्षी शाहू महाराज, निवडक शाहीर अमरशेख, कविवर्य वा. रा. कांत यांचे काव्यविश्व, महाराष्ट्राचा प्रयोगात्म लोककला परंपरा आणि नवता, कथांतर समकालीन जागतिक कथा, मराठी ऊर्दू शब्दकोश, विनोबा जीवनदर्शन, कलेची मूलतत्वे' या पुस्तकांचा समावेश आहे. शिवाय 'महाराष्ट्र वार्षिकी २०१८' हा अभ्यासकांसाठी पर्वणी ठरणारा आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने त्याची निर्मिती केली आहे.

राजर्षींचे क्रांतीसूक्ते, बाबासाहेबांचे चित्रमय चरित्र

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रमय चरित्र ग्रंथ तयार केला आहे. चित्रमय चरित्रासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर गौरवग्रंथ, डॉ. आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत हा ग्रंथही विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे मुद्रणालय व्यवस्थापनने सांगितले. क्रांतिसूक्ते : राजर्षी शाहू महाराज या पुस्तकांत राजर्षी शाहू महाराजांच्या भाषणांचा टिपा टिप्पणीसह चिकित्सक अभ्यास केला आहे. प्रा. हरी नरके यांनी संपादित केलेला ८६२ पानी महात्मा फुले समग्र वाङमय विक्रीसाठी उपलब्ध आहे. शिवाय प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङमय अंतर्गत दोन, तीन, चार आणि पाचवा खंड उपलब्ध आहेत. चार खंडांची किंमत ११७२ रुपये इतकी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महागाई विरोधात जोरदार निदर्शने

$
0
0

महागाईविरोधात

भाकपची निदर्शने

कोल्हापूर टाइम्स टीम

वाढलेल्या महागाई विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. 'मोदी सरकार चले जावे'च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. सरकारने इंधनाच्या दरात केवळ १२ पैशांनी कपात करून वाहनचालकांची चेष्टा केली आहे. त्यामुळे मागण्यांच्या निवेदनासोबत पंतप्रधान सहायता निधीसाठी १२ पैशांचा धनादेश निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आला.

शंभर दिवसांत अच्छे दिन आणण्याचे स्वप्न दाखवत भाजप सरकार सत्तेवर आले. चार वर्षे झाली तरी कोणत्याच घटकाला अच्छेदिनाचा अनुभव आलेला नाही. उलट पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढले आहेत. महागाईमुळे सामान्यांना जगणे मुश्किल झाले आहे. त्यांचे दैनंदिन सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. इंधनाचे दर झपाट्याने रुपयांत वाढत आहेत. कमी होताना पैशात होत आहेत. महागाई कमी करण्याऐवजी मंत्री बेजबाबदार वक्तव्ये करून दिशाभूल करीत आहेत. भांडवलदारांच्या भल्यासाठी सरकार काम करीत आहे. अशा सरकारच्या कार्यपध्दती विरोधी आणि महागाई कमी करण्यासाठी निदर्शने करण्यात आली. निदर्शनात रघुनाथ कांबळे, सतिशचंद्र कांबळे, अनिल चव्हाण, बी. एल. बरगे, मीना चव्हाण, दिलदार मुजावर, स्नेहल कांबळे, डॉ. मीनल जाधव, नामदेव पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाण करणारे तिघे अटकेत

$
0
0

मारहाण करणारे तिघे अटकेत

कोल्हापूर : पत्नीशी बोलत असल्याच्या रागातून पतीसह तिघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात जखमी तरुणाने फिर्याद दिली. यानुसार करवीर पोलिसांनी बुधवारी दुपारी तिघांना अटक केली. संदीप गणपती पाटील (३५, रा. आसुर्ले, ता. पन्हाळा), बाळासाहेब लक्ष्मण पाटील (४५, रा. वडणगे पाडळी), जयसिंग तानाजी माने (३८, रा. केर्ले) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. यांनी केलेल्या मारहाणीत जितेंद्र बाजीराव जाधव (३४, रा. दरेवाडी, ता. पन्हाळा) जखमी झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरगुती गॅसची काळजी घेताना...

$
0
0

लोगो : मटा गाइड

००००००००००००००००

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घरगुती गॅस वापरताना निष्काळजीपणा केल्याने दुर्घटनांना सामोरे जावे लागत आहे. नुकतेच शिरोली एमआयडीसी येथे एलपीजी गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दोघांना जीव गमवावा लागला, तर पाचहून अधिक जखमी झाले. घरगुती गॅसगळतीमुळे विशेषत: सिलिंडरच्या गळतीमुळे होणारे अपघात टाळणे शक्य आहे. घरातील किचन हा सर्वाधिक महत्त्वाचा भाग आहे. गृहिणींकडून गॅस वापराची नियमित दक्षता आणि काळजी घेतल्यास होणाऱ्या अपघातांपासून बचाव होऊ शकतो.

००

कशी घ्याल काळजी?

गॅस सिलिंडर आणि गॅसची पाइप यांची नियमित तपासणी करा.

कंपनीच्या अधिकृत कर्मचाऱ्यांकडून तपासणी करून घ्या.

चांगल्या दर्जाची पाइप वापरा.

स्वयंपाक झाल्यानंतर रेग्युलेटरचा स्वीच बंद करा.

गॅसगळती झाल्यास दारे-खिडक्या उघडा.

ट्यूब, लाइट सुरू करू नका.

गॅसचा वास येत असल्यास काडेपेटी, लायटर, सिगारेट लायटर वापरू नका.

मेणबत्ती सुरू असेल तर तत्काळ विझवा.

रेग्युलेटरचा स्वीच बंद करा.

गॅस कंपनीच्या माणसाला तत्काळ फोन करा.

सर्वांना दिसतील असे दूरध्वनी क्रमांक लिहून ठेवा

००००

गॅस गळती झाल्यास...

काही वेळेस गॅसच्या चुकीच्या वापरामुळे किंवा लिकेजमुळेही आग लागू शकते. गॅस लिकेजचा वास आल्यास सर्व दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा. इलेक्ट्रिकचे कोणतेही उपकरण चालू अथवा बंद करू नये. सिलिंडरवरील रेग्युलेटर काढून नॉबवर त्याची प्लास्टिकची कॅप लावून वितरकाला संपर्क करा. काडेपेटी किंवा मेणबत्ती चुकूनही पेटवू नका. गॅस उपकरण घरच्या घरी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नये. गॅसमधील कोणत्याही प्रकारच्या उपकरणाचा बिघाड झाल्यास गॅस वितरकाशी संपर्क साधा. सिलिंडर व गॅस शेगडीच्या सान्निध्यात इलेक्ट्रिक शेगडी, रॉकेल स्टोव्ह, कोळसा शेगडी अशा इतर उपकरणांचा वापर करू नये. पाच वर्षे गॅरंटीसह ट्रिपल कोटिंग असलेली, दीर्घकाळ टिकणारी आयएसआय मार्कची सुरक्षा पाइपच वापरा. या पाइप उंदरांचा उपद्रव, उष्णता, पाणी व प्रतिकूल वातावरणाचा परिणाम होत नाही.

०००००

रेग्युलेटर बंद करा

काम संपल्यानंतर कॉक आणि रेग्युलेटर बंद करून ठेवा. टी जॉइंट करून रेग्युलेटरवर एकापेक्षा जास्त उपकरणांचा वापर प्रतिबंधक आहे. शेगडी सिलिंडरच्या जास्त जवळ ठेवू नये. तसेच शेगडी जमिनीपासून साधारण उंचीवर ठेवून स्वयंपाक करावा.

००००००

सुती कपडे वापरा

स्वयंपाकघरात काम करीत असताना अंगावर नेहमी सुती वस्त्र किंवा अग्निप्रतिरोधक अॅप्रन वापरावे. टेरिकॉट, नॉयलॉनसारखे वस्त्र लगेच पेट घेते. गॅस सिलिंडर नेहमी उभे ठेवावे. गॅस संपत आला म्हणजे सिलिंडर आडवे किंवा उलटे करू नका. सिलिंडर व गॅस उपकरणास लहान मुले हात लावणार नाहीत याची काळजी घ्यावी.

०००००

एलपीजी जोडताना

- जेथे एलपीजी ठेवायचा आहे ती जागा हवेशीर असावी. तिला समोरासमोर वायुविजन होईल अशी रचना असावी. दारे-खिडक्या बंद असणाऱ्या खोलीत कधीही एलपीजी वापरू नये. सिलिंडर, रेग्युलेटरचे बटन आणि रबरी पाइप हात पोहोचेल अशा पद्धतीने ठेवावी.

- सिलिंडरचा वापर नेहमी जमिनीवरच करा. तळघरात, जमिनीखाली एलपीजी वापरू नये. शेगडी जमिनीवर ठेवू नये. ती नेहमी टेबलावर किंवा ओट्यावर उभे राहून जेवण बनविता येईल अशा पद्धतीने ठेवावी.

- एका खोलीत दोनपेक्षा जास्त सिलिंडर ठेवू नयेत. सिलिंडर नेहमी उभ्या स्थितीत ठेवावा. ते आडव्या किंवा इतर दुसऱ्या स्थितीत ठेवल्यास त्याच्यातील द्रवरूप एलपीजी उघड्या व्हॉल्व्हमधून बाहेर येईल आणि घातक परिस्थिती निर्माण होऊ शकते.

- गॅस उपकरणांच्या अवतीभवती एक मीटरच्या अंतरामध्ये इलेक्ट्रिक ओव्हन, केरोसीन स्टोव्ह असे कोणतेही उष्णता निर्माण करणारी साधने ठेवू नयेत. सिलिंडरला थेट ऊन, पाऊस मिळेल किंवा धूळ बसेल अशा ठिकाणी ठेवू नये. सिलिंडरवर कोणतेही भांडे, कापड, आदी ठेवू नयेत. रिकामे किंवा भरलेले सिलिंडर सुरक्षाकॅप लावल्याशिवाय ठेवू नका.

००

भरलेले सिलिंडर जोडताना

सिलिंडरच्या वरची सुरक्षाकॅप काढण्यासाठी तिला खाली दाबा, तिची दोरी खेचा आणि दोरी खेचलेल्या अवस्थेत असतानाच सिलिंडरची कॅप उचला. सिलिंडरच्या आतमध्ये सिलिंग रिंग असल्याची खात्री करा. ही रिंग नसेल तर सिलिंडर वापरू नका. त्याची सुरक्षा कॅप पुन्हा लावून ठेवा. गॅस वितरकांशी संपर्क साधून सिलिंडर बदलून घ्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोघे मिळून मुख्यमंत्री ठरवूया

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'प्रत्येकाला आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, असे वाटत असते. याच अपेक्षेतून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच, असे म्हटले असेल. पण, राज्यात आगामी मुख्यमंत्री कोण असेल ते भाजप आणि शिवसेना असे दोघे मिळूनच ठरवावा लागेल,' अशी भूमिका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी मांडली. युतीमधील मतविभागणीचा फायदा काँग्रेसला होऊ नये, याची काळजी आपणच घेतली पाहिजे, असा सबुरीचा सल्लाही त्यांनी दिला.

जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली. मंगळवारी मुंबईत झालेल्या शिवसेना स्थापना दिवस मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच, असे वक्तव्य केले होते. त्यासंबंधी पत्रकारांनी विचारले असता पाटील म्हणाले की, आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, असे सर्वच पक्षांना वाटत असते. गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री भाजपचा झाला. पक्षाने कोणतीही घोषणा न करता मुख्यमंत्री करून दाखवला, असा टोला लगावला. पण यापुढे दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री ठरवावा लागेल. दोन्ही पक्षांनी वेगवेगळी भूमिका घेतल्यास त्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होईल. त्यामुळे मतविभागणी टाळण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी शिवसेनेला गोंजरण्याचाही प्रयत्न केला.

राष्ट्रवादीच्या आंदोलनाची खिल्ली

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज, गुरुवारी मुख्यमंत्र्यांना 'आऊटस्टँडिंग चीफ मिनिस्टर' पुरस्कार देऊन प्रतिकात्मक आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची पाटील यांनी खिल्ली उडवली. ते म्हणाले, 'लोकशाहीत रस्ता रोको, निषेध, धरणे आंदोलनाचा सर्वांना अधिकार आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरू आहेत, हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे या आंदोलनातून राष्ट्रवादी काँग्रेसचेच हसे होईल, असा टोलाही लगावला.

सांडपाणी रोखण्यासाठी विशेष योजना

पंचगंगा नदीकाठच्या गावांतील सांडपाणी रोखण्यासाठी चार ते पाच गावांचे क्लस्टर तयार करून विशेष योजना हाती घेतली जाईल. याबरोबरच पंचगंगा काठावरील सर्वच गावांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने आरओ सिस्टिम राबवण्यात येणार आहे. या दोन्ही योजनांसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी प्राप्त न मिळाल्यास सीएसआरमधून निधी उपलब्ध करुन दिला जाईल. देशांतील ज्या दहा नद्यांचे शुद्धीकरण करण्यात येत आहे त्यात पंचगंगेचा समावेश करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यधुंद लिपिकनिलंबित होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागात मंगळवारी मद्यधुंद अवस्थेत धुमाकूळ घातलेला कनिष्ठ लिपिक राजेश जयसिंग पवार यास निलंबित करण्यात येणार आहे. त्यासाठीची फाइल सामान्य प्रशासनाने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे गेली आहे. त्यांची सही झाल्यानंतर तो गुरुवारी (ता.२१) निलंबित होईल. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत पवारने धिंगाणा घातला. यापूर्वीही कार्यालयात त्याने असा प्रकार केला होता. यामुळे प्रशासनाने गंभीर्याने नोंद घेऊन पवारच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार केला आहे. पोलिस प्रशासनाकडून केलेल्या वैद्यकीय तपासणी अहवालात मद्याचे सेवन केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्यावर बडतर्फीची कारवाईही होऊ शकेल, अशी माहिती सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी रवींद्र आडसूळ यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना दिली.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मिडियावर प्रचार

$
0
0

राष्ट्रवादीचे २५ हजार कार्यकर्ते

मांडणार पक्षाची भूमिका

राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष कोते पाटील यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडण्यासाठी राज्यात पंचवीस हजार कार्यकर्ते तयार करण्याबरोबरच ९४ हजार बुथ कमिट्या स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार संग्राम कोते पाटील यांनी दिली.

कोते पाटील म्हणाले, 'सोशल मीडियाकडे सध्या ओपिनियन मेकर म्हणून पाहिले जाते. यामुळे आगामी निवडणूक प्रचारात त्याला अतिशय महत्व असणार आहे. राष्ट्रवादीची भूमिका जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी पंचवीस हजार कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. पक्षाची ताकद नियोजबद्ध् पध्दतीने वाढवण्यासाठी तालुकावर बैठका घेण्यात येत आहेत. पंधरा ऑगस्टपर्यंत दोनशेवर तालुक्यात अशा बैठका घेण्यात येतील.पक्षाला राज्यात पुन्हा सत्तेवर आणण्यात युवक राष्ट्रवादीचा सिंहाचा वाटा असणार आहे.'

ते पुढे म्हणाले, 'केंद्र व राज्य सरकारकडून गेल्या चार वर्षात अपेक्षाभंग झाला आहे. केंद्राच्या स्मार्ट सिटी, मुद्रा लोन, डिजीटल इंडिया अशा सर्वच योजना फसल्या आहेत. राज्यात सरकारी कर्मचारी भरतीबाबत निर्णय घेतला असला तरी ही भरती कंत्राटी पध्दतीने करण्यात येणार आहे. ही युवकांची फसवणूक आहे. चार वर्षात १४ लाख मुले स्पर्धा परीक्षा देत आहेत,पण केवळ साडे तीनशेच जागा भरल्या आहेत. या सर्व पातळीवर युवकांना फसवण्याचे काम सरकार करत असल्याने सरकारच्या विरोधात महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.'

राज्यात ९४ हजार बुथ कमिट्या स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगून प्रत्येक कमिटीत दहा कार्यकर्त्यांचा समावेश असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजातील मुलांना फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय झाला असला तरी कॉलेजना तसे आदेश दिले नाहीत, त्यामुळे ही सवलत मिळत नसल्याने या विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक आदिल फरास उपस्थित होते.

....................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घनकचरा व्यवस्थापनसाठी ३७ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कसबा बावडा रोडवरील कचऱ्याचे डोंगर, परिसरात पसरलेली दुर्गंधी आणि कचरा पेट घेतल्याने निर्माण झालेल्या धुरामुळे त्रस्त बनलेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. झूम प्रकल्प परिसरातील सुमारे सात एकर जागेवरील कचरा कॅपिंग (ज्या त्या ठिकाणी कचऱ्यावर दाब) करून त्यावर लॉन तयार करण्यात येणार आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापनसाठी ३७ कोटी १७ लाख रुपयांच्या प्रकल्प आराखड्याला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता दिली आहे. साधारणपणे दिवाळीनंतर या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

प्रकल्पाच्या एकूण खर्चात ५० टक्के वाटा महापालिकेचा आहे, तर केंद्र आणि राज्य सरकारकडून ५० टक्के निधी मिळणार आहे. चौदाव्या वित्त आयोगातून महापालिकेकडे २० कोटी रुपये उपलब्ध आहेत. त्या निधीचा वापर घनकचरा व्यवस्थापनसाठी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांनी दिली. या प्रकल्पांतर्गत शहरातील कचरा उठाव करण्यासाठी १०४ वाहनांची खरेदी करण्यात येणार आहे. नागरिकांनी भविष्यात कंटेनरमध्ये कचरा टाकण्याऐवजी घरोघरी महापालिकेकडून कचरा उठाव होईल. एक हजार घरांसाठी एक वाहन असे नियोजन आहे.

कचरा उठावसाठी १०४ वाहने (अॅटो ट्रिपर)उपलब्ध झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने शहरातील कंटेनर कमी करण्याचे प्रस्तावित आहे. १०४ वाहनांच्या खरेदीसाठी सहा कोटी ६९ लाख रुपयांची तरतूद आहे. महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापनचा आराखडा सादर केला होता. एमजीपी, मुख्य अभियंता पुणे कार्यालयाने सोमवारी (ता.१८) या आराखड्याला मंजुरी दिली होती. एमजीपी कार्यालयाकडून महापालिकेला बुधवारी मंजुरीबाबतचे अधिकृत पत्र मिळाले. घनकचरा व्यवस्थापनसाठी विविध कामे प्रस्तावित आहेत. यामध्ये कसबा बावडा रोडवरील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्थळ रस्ते, गटर्स व स्ट्रॉर्म वॉटर या कामांचाही समावेश आहे. शिवाय घनकचरा संकलन, वाहतूक, प्रक्रिया व कचऱ्याची विल्हेवाटसाठी तरतूद केली आहे.

०००

२२ हजार चौरस मीटरवर लॉन

शहरात रोज २०० टन कचरा निर्माण होतो. तो कसबा बावडा रोडवरील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी कचरा टाकला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून येथे कचरा टाकल्याने कचऱ्याचे डोंगर तयार झाले आहेत. तेथे तीन लाख टन कचरा, खरमाती असल्याची महापालिकेची माहिती आहे. तेथे तब्बल २२ हजार चौरस मीटर जागेवरील कचरा कॅपिंग करून त्यावर लॉन तयार करून शोभिवंत रोपांची लागवड केली जाणार आहे. यासाठी तब्बल नऊ कोटी ४७ लाखांची तरतूद आहे. याशिवाय आयसोलेशन हॉस्पिटल परिसर व साळोखेनगर परिसर येथे बायोगॅस प्लँट प्रस्तावित केले आहेत. यासाठी दोन कोटी ३० लाख रुपयांची तरतूद आहे.

................

घनकचरा व्यवस्थापनातील प्रस्तावित कामे

कचरा उठावसाठी १०४ वाहनांची खरेदी : सहा कोटी ६९ लाख रुपये

कचऱ्याचे कॅपिंग करून लॉनची निर्मिती व इतर कामे : ९ कोटी ४७ लाख रुपये

ओला व सुका कचरा वर्गीकरण प्रकल्प : ६ कोटी रुपये

रस्ते, गटर्स व स्ट्रॉर्म वॉटर : ७० लाख रुपये

कर्मचाऱ्यांना गम बूट, मास्क व इतर साहित्य खरेदी : २३ लाख रुपये

घनकचरा व्यवस्थापनसाठी प्रबोधन व जनजागृती : एक कोटी रुपये

दोन बायोगॅस प्लँटसाठी : दोन कोटी ३० लाख रुपये

.........................................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याची आवक घटली - मालवाहतूक संप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

इंधन दरवाढ कमी करावी व मालवाहतूक भाड्यामध्ये वाढ करावी या मागणीसाठी मालवाहतूकदारांनी संप सुरू केला आहे. संपाचा फटका कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील कांदा-बटाटा आवकेवर होऊ लागला आहे. गेल्या चार दिवसांपेक्षा मंगळवार व बुधवारी कांदा बटाट्याची आवक चांगलीच घटली आहे. स्थानिक मालवाहतूक सुरू असली, तरी बाहेरुन येणाऱ्या मालाचे प्रमाण कमी होऊ लागले आहे.

मालवाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया कॉन्फ्युडरेशन ऑफ गुडस् व्हेईकल ओनर्स असोसिएशनतर्फे देशव्यापी संप सुरू केला आहे. संपामध्ये स्थानिक मालवाहतूकदार सहभागी झालेले नसले, तरी कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गुजरात व उत्तरप्रदेश येथील मालवाहतूकदार सहभागी झाले आहेत. बाजार समितीमध्ये नगर, पुणे व लासगाव येथून कांद्याची तर गुजरात व उत्तरप्रदेश येथून बाटाट्याची आवक होते. समितीमध्ये आलेला कांदा-बटाटा दक्षिणेकडील राज्यात पाठवला जातो. संपामध्ये येथील मालवाहतूकदार सहभागी झाले असल्याने येथून जाणारा मालच थांबला आहे.

मालाची उचल होत नसल्याने कांदा व बटाट्याची आवक मंदावली आहे. दररोज सुमारे ५० ते ६० ट्रक मालाची आवक होत असते. पण यामध्ये निम्म्याने घट झाली असून बुधवारी फक्त २५ ट्रक समितीमध्ये दाखल झाले. शुक्रवारी (ता. १५) कांद्याच्या ९,८८८५ तर बटाट्याच्या चार हजार पिशव्या आवक झाली होती. तर मंगळवारी कंद्याच्या ४,६९१ तर बटाट्याच्या १,३५५ पिशव्यांची आवक झाली होती. बुधवारी कांद्याच्या ७,७६९ व बटाट्याच्या ४,२३३ पिशव्या आवक झाली आहे. समितीमध्ये सोमवार, बुधवार व शनिवारी मालाची आवक जास्त होत असली, तरी यामध्ये लक्षणीय घट झाली आहे. कांदा व बटाट्याची आवक घटली असली, तरी त्याचा दरावर मात्र अद्याप परिणाम झालेला नाही. कोल्हापूर येथून जाणारा कांदा दक्षिणेतील राज्यात जाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तामिळनाडू व केरळ येथून होणारा नारळाचा पुरवठा कमी झाला आहे. कांदा-बटाट्याची आवक कमी असली, तरी संपाचा भाजीपाला वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र आठवड्याच्या बाजारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

..............

कोट

'समितीमध्ये सोमवार, बुधवार व शनिवारी कांदा-बटाट्याची आवक जास्त होते. तुलनेने बुधवारी आवक कमी झाली. आवक अशीच राहिल्यास संपाचा परिणाम झाल्याचे चित्र दिसेल.

वसंत पाटील, कांदा-बटाटा विभाग प्रमुख

कोट

'मालवाहतूकदारांच्या संपामुळे गेल्या दोन दिवसांपासून कांदा-बटाट्याची आवक कमी झाली आहे. आवक कमी असली, तरी त्याचा दरावर परिणाम झालेला नाही. उच्चप्रतिच्या कांद्याचा किलोचा दर १२ ते १५ रुपये असून बटाट्याचा दर ३० रुपये आहे. आवक अशीच राहिल्यास आठवड्याच्या बाजारात दर वाढण्याची शक्यता आहे.

अरुण खोराटे, कांदा-बटाटा व्यापारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच घेणारा पोलिस अटकेत

$
0
0

(फोटो आहे)

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटकेची कारवाई टाळण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना करवीर पोलिस ठाण्यातील हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. रंगराव भागोजी मनुगडे (बक्कल नंबर १९८४, वय ५६, रा. सुर्वेनगर) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी एकच्या सुमारास सुर्वेनगर येथे मनुगडेच्या घराजवळच सापळा रचून केली. कारवाईने पोलिस दलातील लाचखोरी पुन्हा एकदा समोर आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गिरीश गोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद चंद्रकांत गायकवाड (३२, रा. उजळाईवाडी) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. गायकवाड यांचे सासरे दस्तगीर हसन शेख आपटेनगरमध्ये राहतात. शेख यांचा त्यांचे शेजारी शिवाजी सुतार यांच्याशी वाद झाला होता. याच वादातून सुतार यांनी शेख यांचे जावई आनंद गायकवाड व त्यांची पत्नी यांच्यासह आठजणांवर दोन महिन्यांपूर्वी करवीर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासाचे काम करवीर पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार रंगराव मनुगडेकडे आहे. मनुगडेने गायकवाड यांना बोलावून अटकेची धमकी दिली.

अटक टाळण्यासाठी त्याने गायकवाड यांच्याकडे प्रत्येकी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती यातील पाच हजार रुपये बुधवारी देण्याचे ठरले. गायकवाड यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. उपअधीक्षक गोडे यांनी तक्रारीची खात्री करून सापळा रचला. तक्रारदार गायकवाड यांनी मनुगडेला मोबाइलवर फोन करून पाच हजार रुपये देण्याची तयारी दर्श‌वताच त्याने गायकवाडना सुर्वेनगरमधील मूग जनरल स्टोअरजवळ बोलावले. याचवेळी लाचलुचपत पथकाने अॅन्थ्रासीन पावडर लावलेल्या नोटा गायकवाड यांच्याकडे देऊन मूग जनरल स्टोअर परिसरात सापळा रचला. दुपारी एकच्या सुमारास पाच हजार रुपयांची लाच घेताना मनुगडे रंगेहात जाळ्यात सापडला. ही कारवाई एसीबीचे उपअधीक्षक गोडे, पोलिस नाईक आबासाहेब गुंडणके, कॉन्स्टेबल नवनाथ कदम, कृष्णात पाटील, चालक विष्णू गुरव यांनी केली. रात्री उशिरापर्यंत त्याच्या घराची झडती घेण्याचे काम सुरू होते.

०००००

टी शर्ट, बर्मुड्यावरच अटक

मनुगडे दुपारी घरी जेवणासाठी गेला होता. जेवायला बसण्यापूर्वीच तक्रारदार गायकवाड यांनी मनुगडेस फोन करून ठरलेली रक्कम घेऊन आल्याचे सांगितले. यानंतर मनुगडे टी शर्ट आणि बर्मुड्यावरच मूग जनरल स्टोअरजवळ पोहोचला. लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याच्यावर झडप घातली. कपडे घालून येतो अशी गयावया तो करीत होता. मात्र, पथकाने त्याला टी शर्ट आणि बर्मुड्यावरच अटक करून एसीबीच्या कार्यालयात आणले. कार्यरत असलेल्या करवीर पोलिस ठाण्यातच त्याच्यावर गुन्हा दाखल झाला.

०००

इशाऱ्यानंतरही मनुगडेचा भ्रष्ट कारभार

करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका लाचखोरावर एसीबीने महिन्यापूर्वी कारवाई केली होती. यानंतर अटकेतील संशयिताच्या घराची झडती घेणाऱ्या हवालदार मनुगडेचाही यात सहभाग होता. त्याचवेळी एसीबीचे उपअधीक्षक गोडे यांनी मनुगडेस इशारा दिला होता. 'लाचखोरांविरोधात एसीबी गय करणार नाही, त्यामुळे लाचखोरीपासून दूरच राहा,' असा इशारा दिल्यानंतरही मनुगडेने लाच घेऊन स्वत:च्या पायावर दगड मारून घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डास निर्मूलनासाठीकोरडा दिवस पाळा

$
0
0

'डास निर्मूलनासाठी

कोरडा दिवस पाळा'

कोल्हापूर : जिल्ह्यात डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करण्याबरोबरच गुरूवार कोरडा दिवस पाळा. आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी डास निर्मूलन मोहिम युध्दपातळीवर व्यापकपणे राबवावी, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी मंगळवारी केले. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या 'एकात्मिक डास निर्मूलन' मोहिम शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी डास निर्मूलनासाठी जिल्ह्यात डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडण्याचा प्रभावी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. आरोग्य सभापती सर्जेराव पाटील, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, प्रसाद खोबरे आदी उपस्थित होते. डॉ. योगश साळे यांनी स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत बांधकामांची खरेदी-विक्री बंद

$
0
0

Gurubal.mali@timesgroup.com

Tweet : gurubalmaliMT

कोल्हापूर : कोणतीही परवानगी न घेता घरे अथवा दुकानगाळे बांधून विकणाऱ्यांना चाप लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून यापुढे अनधिकृत बांधकामांची नोंदणी सहनिबंधक कार्यालयात होणार नसल्याने अशा मालमत्तांची खरेदी-विक्रीच बंद होणार आहे. दरम्यान, अनधिकृत बांधकामांना अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार असून, अशा नियमबाह्य इमारतींचा शोध घेत विकसकांची नावे वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्याचा आदेशही महापालिका, नगरपालिकांसह प्राधिकरण समित्यांना दिल्याने यापुढे या बांधकामांनाही ब्रेक लागणार आहे.

राज्यातील बहुतांश बांधकाम व्यावसायिक परवानगी न घेता इमारतींचे बांधकाम करतात. प्लॅन एक आणि बांधकाम दुसरेच करत या मालमत्ता विक्री करतात. पण जेव्हा हे बांधकाम अनधिकृत असल्याचे लक्षात येते, तेव्हा त्याचा त्रास विनाकारण ग्राहकांना होतो. त्याला दंड तर भरावा लागतोच, शिवाय कधी कधी अशा अनधिकृत बांधकामावर हातोडा पडतो. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या उशिरा लक्षात येते; पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यांना आर्थिक दणका तर बसतोच; शिवाय मानसिक त्रासही सहन करावा लागतो. हे टाळण्यासाठी सरकारने अनधिकृत बांधकामांची दस्तनोंदणीच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे अशा बांधकामांची खरेदी-विक्री थांबणार आहे.

अनधिकृत बांधकामे थांबविण्यासाठी अशा बांधकामांची प्रभागनिहाय यादी तयार करत ती विकसकाच्या नावासह वृत्तपत्रात तसेच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही यादी दुय्यम सहनिबंधकांनाही देण्यात येणार आहेत. यामुळे अशा इमारतींची नोंदणी करण्यासाठी कागदपत्रे आल्यास त्याची नोंदणीच होणार नाही. शिवाय अनधिकृत बांधकामांची जबाबदारी थेट अधिकाऱ्यांवरच टाकण्यात आली आहे. ज्या अधिकाऱ्याच्या भागात अशी बांधकामे आढळतील, त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. त्यामुळे यापुढे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना चांगलाच चाप बसणार आहे.

००००

अशी होणार कारवाई

अनधिकृत बांधकाम करणाऱ्याचे नाव वृत्तपत्रात झळकणार

नियमबाह्य बांधकामांची यादी दुय्यम निबंधकांकडे देणार

न्यायालयीन प्रक्रियेत ग्राहकांना अधिकारी करणार मदत

अनधिकृत बांधकाम असेल तर अधिकाऱ्यांवर कारवाई

०००

नियमितीकरणाकडे थंडा प्रतिसाद

राज्यातील २०१५ पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांना अभय देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही बांधकामे नियमित करून घेण्याचे आदेशही देण्यात आले. शिवाय सहाशे चौरस फुटांच्या आतील बांधकामे नियमित करून घेण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तरीही बांधकामधारकांकडून या उपक्रमाला थंडा प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापुरात तीन महिन्यांत केवळ ३२ अर्ज आले आहेत. त्यामुळे आणखी दोन महिने यासाठी मुदतवाढ देण्यात येणार आहे.

००००००

कोट...

विकसकाने परवानगी न घेताच बांधकाम केल्याने त्याचा त्रास ग्राहकाला होतो. त्यामुळे अशा बांधकामांची नोंदणीच न करण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. सरकारच्या आदेशानुसार महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे, त्यामध्ये अधिकारी सकारात्मक नसल्याने त्याला थंडा प्रतिसाद मिळत आहे, यामुळे अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे.

महेश यादव, अध्यक्ष क्रिडाई, कोल्हापूर

०००

कोट...

दस्त नोंदणीसाठी आलेल्या कागदपत्रांवरून बांधकाम अधिकृत आहे की नाही, हे कळत नाही. पण यापुढे अशा अनधिकृत बांधकामांची यादीच सहनिबंधक कार्यालयाला मिळणार आहे. त्यामुळे सरकारचा आदेश येताच अशा मालमत्तांची खरेदी-विक्री बंद करण्यात येईल.

सुंदर जाधव, जिल्हा सहनिबंधक

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस सत्तेवर आल्यास राज्याची वाट

$
0
0

जिल्ह्यात भाजप ठरवेल तेच खासदार, आमदार; पालकमंत्री पाटील यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आमचे सरकार आले नाही तर २१ पैकी एक राज्य ताब्यातून गेल्याने भाजपला काहीच फरक पडणार नाही, पण चुकून काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले तर राज्याची वाट लागेल,' असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार, आमदार भाजप ठरवेल तेच असतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील भाजपच्या बूथ कमिटीची बैठक लोणार वसाहत येथील गणेश मंगल कार्यालयात झाली. यावेळी पालकमंत्री पाटील बोलत होते. आगामी वर्षभरात केंद्र व राज्य सरकारचे काम प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आमदार सुरेश हाळवणकर व आमदार अमल महाडिक यांनी यावेळी पक्षाच्या कामाचा आढावा घेतला.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'चार वर्षांत केंद्र व राज्यात सरकारने विकासकामांचा डोंगर उभारला आहे. त्यामुळे या कामांच्या जोरावर २०१९ ला पुन्हा सरकार येण्यास काहीच हरकत नाही. युती होईल की नाही माहीत नाही. आज आमचा मुख्यमंत्री आहे, २०१९ ला शिवसेना व भाजप एकत्र येऊन आगामी मुख्यमंत्री ठरवू. त्यासाठी दोघांची युती होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास त्याचा फायदा काँग्रेस व राष्ट्रवादीला होईल. यामुळे चुकून काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले तर राज्याची वाट लागेल. शिवसेना व भाजपची युती व्हावी ही आमची इच्छा आहे. एकत्र आलो तरच दोघांचा फायदा आहे.'

ते पुढे म्हणाले, 'जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप ठरवेल तोच उमेदवार विजयी होईल. प्रत्येक मतदारसंघात किमान तीस ते चाळीस टक्के मते मिळतील या दृष्टीने प्रचाराला लागा. गणेशोत्सव, दिवाळी, दसरा सणांच्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचा, सरकारच्या कामाची माहिती द्या.'

आमदार महाडिक म्हणाले, 'गेल्या चार वर्षांत पंतप्रधान व मुख्यमंत्री सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करत आहेत. दक्षिण मतदारसंघात आपण भरीव काम केले आहे. जलयुक्त शिवार, पर्यटन, विमानसेवा यासह विविध माध्यमांतून काम केल्याने त्याचा निश्चितच फायदा होईल.'

बाबा देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी मकरंद देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, संदीप देसाई, विजया पाटील यांची भाषणे झाली. मेळाव्यास स्थायी समितीचे सभापती आशीष ढवळे, प्रताप कोंडेकर, नगरसेवक सुनील कदम, सत्यजित कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी 'गोकुळ'चे नूतन संचालक अनिल यादव यांचा सत्कार करण्यात आला.

००००

पराक्रमी आमदार

आमदार हाळवणकर व अमल महाडिक हे पराक्रमी आमदार आहेत, असा उल्लेख करताना पालकमंत्री पाटील म्हणाले, 'आयुष्यात माझा पराभव कधीही होणार नाही, असे म्हणणाऱ्या सतेज पाटील यांचा महाडिक यांनी पराभव केला. २५ वर्षे आमदार असणाऱ्या आवाडेंना हाळवणकरांनी पराभूत केले. त्यामुळे हे दोघेही पराक्रमी आमदार आहेत.'

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांकडून ‘ऑपरेशन ऑल आउट’ सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोर्टाने बजावलेले समन्स आणि वॉरंटकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना अटक करून कोर्टात हजर करण्याचे ऑपरेशन ऑलआऊट पोलिसांनी सुरू केले. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी १२ तासात ६२२ जणांना समन्स बजावण्यात आले. १२१ जणांना वॉरंट बजावून त्यांना अटकही केली. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यात ही मोहीम राबवली जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली.

कौटुंबिक वाद, जमीनजुमला आणि आर्थिक वाद यातून कोर्टात दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये कोर्टाकडून संबंधितांना समन्स आणि वॉरंट बजावले जाते. याकडे दुर्लक्ष करून कोर्टाचा अवमान करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी ऑपरेशन ऑलआऊट सुरू केले आहे. अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी मंगळवारी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना प्रलंबित समन्स, वॉरंटचा निपटारा करण्याच्या सूचना दिल्या. यानुसार बुधवारी सकाळपासून ऑपरेशन ऑलआउटची सुरुवात झाली. पोलिसांनी १२ तासांत ७५३ पैकी ६६२ समन्स आणि वॉरंट बजावली आहेत. यात जामीनपात्र २१८ पैकी १२२ वॉरंट बजावली. यातील ७ पोटगी वॉरंट आहेत. अजामीनपात्र ४३१ पैकी १२१ वॉरंट बजावली. यातील १२१ लोकांना तातडीने अटक करून कोर्टात हजर केले. या सर्वांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

या मोहिमेत राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला. प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी कोणत्या पद्धतीने कार्यवाही करावी, याबाबत त्यांनी नियोजन केले. हुपरी पोलिस ठाण्याने सर्वाधिक प्रलंबित वॉरंट आणि समन्स निकाली काढण्याचे काम केले. ऑपरेशन ऑलआउट यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले. यामुळे प्रलंबित वॉरंट आणि समन्सचे प्रमाण कमी होऊन कोर्टाचे कामकाज गतिमान होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फिनोमेनल’ अध्यक्षांसह ११ जणांवर गुन्हे दाखल होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मेडिक्लेमसह गुंतवलेल्या रकमेवर दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक केल्याबद्दल मुंबईतील फिनोमेनल ग्रुपविरोधात आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत तक्रार दाखल झाली. कोल्हापूरसह परिसरातील ६२० गुंतवणूकदारांची २ कोटी ८० लाखांची फसवणूक झाली आहे. याबाबत कागदपत्रांची तपासणी करून संस्थेच्या अध्यक्षांसह ११ संचालकांवर लवकरच गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

मुंबईतील फिनोमेनल ग्रुप ऑप कंपनीचे कार्यालय येथील स्टेशन रोड येथील प्रभाकर प्लाझामध्ये आहे. मेडिक्लेमसह गुंतवलेली रक्कम नऊ वर्षांत दामदुपटीने परत देण्याचे आमिष कंपनीने दाखवले होते. आरोग्य सुविधा आणि दामदुप्पट परतावा यामुळे कोल्हापूरसह परिसरातील सातशेहून अधिक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. १९९८ पासून ही योजना सुरू होती. गुंतवणुकीच्या जोरावर कंपनीने मुंबई, पुणे, लातूर, महाबळेश्वर यांसह केरळमध्येही जमीन आणि बांधकाम व्यवसायात गुंतवणूक केली. सुरुवातीचे काही वर्ष कंपनीने गुंतवणूकदारांना योग्य परतावा दिला. मात्र, जून २०१६ पासून मेडिक्लेमसह गुंतवलेली रक्कमही परत मिळालेली नाही. ६२० गुंतवणूकदारांचे २ कोटी ८० लाख रुपये कंपनीकडे अडकले आहेत. ही रक्कम परत मिळावी, यासाठी दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे.

कोल्हापुरातील गुंतवणूकदारांनी कंपनीच्या मुंबईतील कार्यालयात जाऊन गुंतवलेली रक्कम परत देण्याचा तगादा लावला. मात्र, कंपनीकडील जमिनींची विक्री प्रक्रिया सुरू असून, लवकरच पैसे परत केले जातील, अशी माहिती कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. प्रत्यक्षात पैसे देण्याऐवजी टोलवाटोलवी सुरू असल्याने फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले. याबाबत गुंतवणूकदारांनी मागील आठवड्यात कोल्हापुरात बैठक घेतली होती. त्यांनी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांची भेट घेऊन चर्चा केली. यानंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत तक्रार देण्याचा निर्णय घेतला. यानुसार बुधवारी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत फिनोमेनल कंपनीच्या अध्यक्षांसह ११ संचालकांविरोधात फसवणुकीची तक्रार दिली. 'कागदपत्रांची पडताळणी करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील,' अशी माहिती उपअधीक्षक राजेंद्र शेडे यांनी दिली. तक्रारदार बी. वाय. यादव म्हणाले, 'कोल्हापूरसह परिसरातील ६२० गुंतवणूकदारांची २ कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबत आम्ही पोलिसात तक्रार दाखल केली आहे. गुंतवणूकदारांचे सर्व पैसे परत मिळावेत यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images