Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पावसाच्या तुरळक सरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शनिवारी आणि रविवारी जिल्ह्यात सरीवर सरी कोसळ्यानंतर सोमवारी दुपारनंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. रविवार पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाने सोमवार दुपारपासून दडी मारली. रात्री नऊच्या सुमारास पावसाची जोरदार सर आली.

मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर पकडला होता. मान्सून पावसातील पहिल्याच नक्षामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पेरणीच्या कामाना वेग आला होता. तर धूळवाफ पेरणी झालेल्या पिकांची चांगली उगवण झाली होती. पण आठवडा भर पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर पडली होती. याचा परिणाम भात लागणीसह सोयाबीन व भुईमूग पेरणीवर झालाा. शनिवारी रात्रीनंतर मात्र पुन्हा पावसाला सुरुवात झाली. रविवारीही सकाळपासून पावसाच्या अधून-मधून सरी कोसळत होत्या. सोमवारी पहाटेपासून पावसाने जोर धरला होता. दुपारपर्यंत पावसाच्या सरी पडत होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांची चांगलीच पळापळ झाली. दुपारी १२ नंतर मात्र पाऊस पूर्णपणे थांबला होता. दिवसभर ढगाळ वातावरण असले, तरी पावसाने हुलकावणी दिली. दुपारनंतर थांबलेल्या पावसाला पुन्हा रात्री साडेआठपासून सुरुवात झाली. सकाळपेक्षा रात्री पावसाचा जोर जास्त असल्याने अनेक ठिकाणच्या रस्त्यावर पाणी साचले होते. सोमवार पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे जयंती नाला ओसांडून वाहत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ट्रक वाहतूक बंद

0
0

कोल्हापूर: ऑल इंडिया कन्फेडरेशन ऑफ गुड्स व्हेईकल्स ऑनर्स असोसिएशनतर्फे देशव्यापी बेमुदत संपामुळे सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यातून दक्षिणेच्या राज्यात सुमारे ५०० ते ६०० ट्रकवाहतुकीवर परिणाम झाला. संपाचा प्रभाव असलेल्या राज्यातून कोल्हापुरात येणाऱ्या माल वाहतुकीस ब्रेक लागला. या असोसिएशनच्या मान्यतेचे ट्रक वाहतूकदार जिल्ह्यात नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी ट्रक चालक, मालकांनी संपात सहभाग घेतलेला नाही.

डिझेलच्या वाढत्या दराविरोधात सध्या पुकारलेल्या संपाला ऑल इंडिया मोटर्स ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेने पाठिंबा दिलेला नाही. या संघटनेने २० जुलैनंतर संप पुकारला आहे. यामुळे असोसिएशनच्या संपात ऑल इंडिया ट्रान्सपोर्टचे सभासद असलेले ट्रक व्यावसायिक सहभागी झालेले नाही. परिणामी आताच्या संपाचा परिणाम प्रकर्षाने जाणवत नाही, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रादेशिक साखर उपसंचालक राठोड यांची बदली

0
0

प्रादेशिक साखर उपसंचालक

राठोड यांची बदली

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारच्या सहकार विभागाने सोमवारी रात्री उशीरा विविध अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. कोल्हापूर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयातील उपसंचालक दिग्विजय राठोड यांची बदली झाली असून त्यांच्याकडे पुणे शहर उपनिबंधकपदाचा कार्यभार सोपवला आहे. तर सातारचे जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम यांची कोल्हापूर नागरी बँक असोसिएशनच्या उपनिबंधकपदी नियुक्ती झाली आहे. गेल्या दोन वर्षापासून करवीरचे निबंधक सुनील धायगुडे यांच्याकडे नागरी बँक असोसिएशनच्या उपनिबंधक पदाचा कार्यभार होता. डॉ. कदम यांच्या ठिकाणी सांगलीचे उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांची तर सांगलीच्या जिल्हा उपनिबंधकपदी नितीन करे यांची नियुक्ती झाली आहे. सहकार विभागाच्या विविध पदांच्या बदल्या मे महिन्यापासून सुरू होत्या. प्रथम लेखापरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर केवळ जिल्हा उपनिबंधक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे बाकी होते. सहकार विभागाने रात्री उशीरा बदल्याचे आदेश काढले असून बदलीच्या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना बुधवारपर्यंत पदभार स्वीकारण्याच्या सूचना केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकल्पग्रस्त कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न

0
0

आठ जणांवर गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हाधिकारी कार्यालयात नरवेली (ता. गगनबावडा) कुंभी लखमापूर प्रकल्पग्रस्त पडवळ कुटुंबाने सोमवारी दुपारी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. एका प्रकल्पग्रस्ताने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी प्रसंगावधान राखत रोखला. पडवळ कुटुंबातील आठ जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नरवेली येथील पडवळे कुटंबासह २४ कुटंबाना कुंभी लखमापूर प्रकल्पग्रस्त म्हणून जमीन दिली आहे. नरेवली येथील प्रकल्पग्रस्त पडवळ कुटुंबीयांना सांगशी (ता.गगनबावडा) येथील भालचंद्र नानीवडेकर यांची गट नं. ६६ व ६९ मधील आठ एकर जमीन सरकारने ताबा घेऊन पडवळ कुटुंबियांना दिली आहे. पण मूळमालक नानिवडेकर पडवळ कुटुंबाने पिकवलेले पीक कापून नेतात. तसेच वारंवार पडवळ कुटुंबाला धमकी देतात. पडवळ कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात तक्रार अर्ज दिला होता. मात्र जिल्हा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. पडवळे कुटुंबानी जिल्हाप्रशासनाला सोमवारी (ता. १८ ) कुटुंबियांसह आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयात कडक पोलिस बंदोबस्त ठेवल्याने छावणीचे रुप आले होते. कार्यालयाच्या दोन्ही फाटकाजवळ गगनबावडा व शाहूपुरी पोलिस ठाण्यातील अधिकारी, पोलिस कर्मचारी, महिला कर्मचाऱ्यांना बंदोबस्तास तैनात ठेवले होते. अनुचित प्रकार रोखण्यासाठी अग्निशमन दलाचा बंब आणि रुग्णवाहिकाही ठेवली होती. दुपारी तीन वाजता नरवेली येथील पडवळ कुटुंबातील सदस्य महिला व लहान मुलांसह जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्यासाठी आले. पडवळ कुटुंबातील महिलांना ताब्यात घेताना महिला पोलिस कर्मचाऱ्यांसमवेत त्यांची झटापट झाली. लहान मुलांच्या ओरडण्याने आणि महिलांच्या किंचाळण्याच्या आवाजाने एकच गर्दी झाली. एका पुरुषाने पोलिसांची नजर चुकवत अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून ताब्यात घेतले. त्यानंतर सर्व आंदोलकाकांना पोलिसांनी व्हॅनमधून शाहूपुरी पोलिस ठाण्यात नेले. याप्रकणणी दत्तात्रय मारुती पडवळ, राजश्री प्रकाश पडवळ, वैशाली संतोष पडवळ, संतोष श्रीपती पडवळ, दीपाली दत्तात्रय पडवळ, रमेश श्रीपती पडवळ, प्रदीप मारूती पडवळ, प्रकाश मारूती पडवळ यांना अटक केली. त्यांच्यावर कलम ३०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफ ढेरे अटकेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा बँकेच्या कसबा बावडा शाखेतील सोने कर्ज तारण फसवणुकीतील तिसरा संशयित आरोपी सराफ सन्मुख आनंदराव ढेरे (रा. कसबा बावडा) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सोमवारी (ता. १८) अटक केली. ढेरे याला मंगळवारी जिल्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. दरम्यान, पोलिसांनी बँकेतील २७ कर्ज प्रकरणांची कागदपत्रे जप्त केली असून, कर्जदारांचे जबाब घेण्याचे काम सुरू आहे.

कसबा बावडा येथील जिल्हा बँकेच्या शाखेत कर्जदारांनी तारण ठेवलेल्या सोन्यातील सुमारे एक किलो सोने काढून त्या ठिकाणी बनावट सोने ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. यातून कर्जदारांची ३२ लाखांची फसवणूक झाली आहे. पोलिसांनी या गुन्ह्यातील बँकेचा शाखाधिकारी संभाजी शंकर पाटील आणि कॅशिअर परशुराम कल्लाप्पा नाईक या दोघांना अटक केली आहे. तिसरा संशयित सराफ सन्मुख ढेरे हा मात्र गुन्हा दाखल होण्याची चाहूल लागताच पसार झाला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी कसबा बावडा येथून सराफ ढेरे याला अटक केली. त्याला मंगळवारी कोर्टात हजर केले जाणार आहे. गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी बँकेतील कर्ज प्रकरणांची कागदपत्रे जप्त केली आहेत. यात कर्जदाराचा अर्ज, तारण सोन्याची तपासणी केलेला कागद, यावरील शाखाधिकारी, कॅशिअर आणि सराफाच्या नोंदी तपासण्याचे काम सुरू आहे. कागदपत्रांवरील अनेक सह्यांबाबत पोलिसांना शंका आहे. त्यामुळे मूळ कर्जदाराला बोलवून सह्यांची पडताळणी केली जात आहे. कर्जदारांचे जबाबही घेतले जात आहेत.

तारण सोने सील करून ठेवल्यानंतर ते पुन्हा कुणी बाहेर काढले याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. याबाबत अटकेतील शाखाधिकारी पाटील आणि कॅशिअर नाईक या दोघांकडून चौकशीत असहकार्य सुरू आहे. त्यामुळे अद्याप पोलिसांच्या हाती ठोस माहिती लागलेली नाही. सराफाच्या अटकेमुळे फसवणुकीचा कट कोणी रचला, सोने कुणी बदलले, बनावट सोने कोणाकडून आणले, याबदल्यात मिळालेल्या पैशांचे काय केले, अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंध मुलाचे लैंगिक शोषण करणारा अटकेत

0
0

(फोटो आहे)

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंध तरुणाला घरी सोडण्याचे आमिष दाखवून त्याच्यावर लैंगिक शोषण करणारा शेखर शामराव साळवी (वय ३५, रा. सध्या दिलबहार तालमी परिसर, मूळ गाव वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) याला जुना राजवडा पोलिसांनी सोमवारी (ता. १८) अटक केली. संशयित साळवी याने यापूर्वीही अशाच प्रकारचा गुन्हा केल्याने त्याच्यावर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याला मंगळवारी कोर्टात हजर केले जाणार आहे.

जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित हा अंध असून तो शहरात फिरून अगरबत्ती विकण्याचे काम करतो. डिजिटल नंबर प्लेट बनवणारा शेखर साळवी याच्याशी अगरबत्ती विक्रीतून पीडित अंध मुलाची ओळख झाली होती. शेखर साळवी हा अंध मुलाला त्याच्या दुकानात नेऊन अश्लील चाळे करीत होता. गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास साळवी याने पीडित तरुणाला फोन करून बोलवून घेतले. घरी जाण्यासाठी मिरजकर तिकटी येथे सोडतो, असे सांगून त्याला दुचाकीवर बसवून ऑफिसमध्ये नेले. त्याचे अनैसर्गिक लैंगिक शोषण केले. याबाबत पीडित अंध तरुणाने बालगोपाल तालीम परिसरातील काही तरुणांना माहिती दिली. यानंतर तरुणांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन संशयिताचा शोध घेण्याची मागणी केली. पीडित तरुणाच्या फिर्यादीनुसार शेखर साळवी याच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मोबाइल कॉलच्या डिटेल्स आणि सीसीटीव्ही फुटेजवरून संशयित साळवी याला सोमवारी दुपारी अटक केली. अधिक तपसा पोलिस उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३१ जणांना पदस्थापना

0
0

कोल्हापूर

राज्यातील बाहेरच्या जिल्ह्यातून बदलीने आलेल्या ६३ पैकी ३१ शिक्षकांना येथील जिल्हा परिषद शिक्षण प्रशासनाने नियुक्ती दिली. पदस्थापनेचा आदेश घेण्यासाठी संबंधित शिक्षकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात गर्दी केली होती. विस्थापित ५५ शिक्षकांनाही शाळा देण्यात आली. दोन दिवसात आतंरजिल्हा बदलीने आलेल्या ६३ शिक्षकांनाही पदस्थापनेचा आदेश देण्यात येणार आहे. दरम्यान, प्रभारी शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले दीर्घ मुदतीच्या रजेवर गेले आहेत. त्यांचा अतिरिक्त कार्यभार सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र आडसूळ यांच्याकडे देण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिलरसाठी खडकांचे नमुने घेणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पर्यायी पुलाच्या पिलरच्या ठिकाणी बोअर मारुन खडकांचे नमुने घेण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग विभागाने घेतला आहे. मंगळवारी बोअर मारण्याचे काम सुरु करण्यात येणार असून दोन दिवस काम चालणार आहे. दरम्यान नवी मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकल्प चित्र मंडळाकडून दोन दिवसात पुलाच्या आराखड्याचे डिझाईन मिळणार आहे.

पर्यायी पुलाच्या पिलरसाठी साडेनऊ मीटर खोदाई करूनही पाया लागला नाही. तसेच खोदाई करताना विहिरीसारखा मोठा खड्डा लागल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्वरित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकल्प चित्र मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधला. पुलाच्या बांधकामाचा प्रश्न गंभीर असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकल्प चित्र मंडळ ब्रिजेसचे कार्यकारी अभियंता भोंगे, दोन उपकार्यकारी अभियंत्यांनी शनिवारी (ता. १६)घटनास्थळी जाऊन पाहणी करून दोन दिवसांत किरकोळ बदल करून सोमवारपर्यंत पिलर व स्लॅबचे डिझाइन पाठविण्यात येईल असे सांगितले होते. पण मुंबई कार्यालयाकडून सोमवारी डिझाईन प्राप्त झाले नाही. डिझाईन दोन दिवसांत मिळण्याची शक्यता असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान पिलरसाठी खोदाई करण्यात येणार असून तत्पुर्वी खडकाचे नमुने घेण्यासाठी बोअर मारण्यात येणार आहे. मंगळवारी बोअर मारण्याचे काम करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तहसीलदार दिघेंवर ठपका

0
0

आंबेवाडी जमीनप्रकरणी होणार विभागीय चौकशी

मटा इम्पॅक्ट

मूळ बातमीचा फोटो वापरणे.. आजच्या तारखेला आहे.

Gurubal.mali@timesgroup.com

gurubalmaliMT

कोल्हापूर : कुळाला जमीन देण्याच्या प्रकरणात दिलेला आदेश फिरवण्याच्या प्रकरणात तहसीलदार उत्तम दिघे यांना चौकशी समितीने दोषी ठरवले आहे. उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांनी हा अहवाल दिल्यामुळे दिघे यांची विभागीय चौकशी करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. 'अर्थ'पूर्ण व्यवहारानंतर तो मी नव्हेच अशी भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यास यामुळे झटका बसला आहे.

करवीर तालुक्यातील आंबेवाडी येथे दगडू चव्हाण व शिवाजी चव्हाण यांच्याकडे रमेश कुरणे व अन्य सहा जणांची तीस गुंठे जमीन कसण्यास होती. १९५७ पासून ते कूळ म्हणून असल्याने त्या जमीनीवर त्यांचा हक्क होता, सात बारा त्यांच्या नावाने असल्याने जागा खरेदीसाठी त्यांनी करवीर तहसीलदारांकडे अर्ज केला होता. त्यानुसार तहसीलदार दिघे यांनी मान्यता दिली. तसा आदेशही दिला. पण तीन महिन्यानंतर त्यांनी आपण असा आदेशच दिला नसल्याचे सांगत त्यांचा अर्ज फेटाळला. एकाच प्रकरणात दोन वेगवेगळे निर्णय घेताना आदेशावरील सही आपली नसल्याचे सांगत 'तो मी नव्हेच' अशी भूमिका त्यांनी घेतली. पण फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात दोन्ही आदेशावरील सही एकाच व्यक्तीने केल्याचा अहवाल आल्यानंतर त्यांचे बिंग फुटले.

तहसीलदारांनी आपलाच निर्णय फिरवल्याने त्यांच्या विरोधात कुळानी तक्रार केली. त्यामुळे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्यासाठी उपजिल्हाधिकारी लाटकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. महिनाभर चौकशी केल्यानंतर लाटकर यांनी आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. या अहवालात दिघे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत दिघे यांच्यावरील आरोपात तथ्य असल्याचे सिद्ध झाले आहे. दिलेला आदेश मागे घेण्यात मोठा 'अर्थ' दडला असल्याची चर्चा होती. यामुळे या प्रकरणाची गेले दोन महिने महसूल खात्यात चर्चा सुरू होती. दिघे यांच्यावर ठपका ठेवल्याने या प्रकरणातील गांभीर्य आणखी वाढले आहे.

प्राथमिक चौकशीत दिघे यांच्यावर ठपका ठेवल्याने त्यांची विभागीय चौकशी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी घेतला आहे. तसा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, कोल्हापुरात चौकशी सुरू असतानाच दिघे यांना बढती मिळून वर्धा येथे रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्तीचे नवीन ठिकाण मिळाले. बदली होऊन १५ दिवस झाल्यानंतरही त्यांना कार्यमुक्त केलेले नाही. यामुळे याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. सात बारा ऑनलाइनचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे, ते संपेपर्यंत त्यांना याच पदावर काम करावे लागण्याची शक्यता आहे. पण आता विभागीय चौकशी लागल्याने त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

तहसीलदार अतुल दिघे यांची उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांच्या समितीने चौकशी केली. त्यामध्ये दिघे दोषी आढळल्याचा अहवाल देण्यात आला आहे. यामुळे त्यांची विभागीय चौकशी करावी, असा प्रस्ताव सरकारला पाठवण्यात येणार आहे.

अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी

आंबेवाडी जमीन प्रकरणात तहसीलदार दिघे यांनी तीन महिन्यांत दोन वेगवेगळे निर्णय घेतले. हे निर्णय संशयास्पद असल्याने त्यांच्या चौकशीसाठी विविध पातळीवर पाठपुरावा करत होतो. त्याला यश आले आहे. त्यांच्यावर या प्रकरणी कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

संजय पवार-वाईकर, संरक्षण ग्राहक सेल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अग्निशमन दल जवानांनी फुलवली बाग

0
0

अग्निशमन दलच्या

जवानांनी फुलवली बाग

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरावर कोणतीही आपत्ती आल्यानंतर ते दक्ष असतात. त्यावेळी ते अवितर कष्ट करतात. प्रसंगी जीवाची बाजी लावतात. अन्य वेळी त्यांना काहीसा मोकळा वेळ मिळतो. या फावल्या वेळाचा वापर करुन अग्निशमन दलाच्या जवानांनी वर्गणीतून सुंदर बाग फुलवली आहे. टिंबर मार्केट येथील अशोक माने फायर स्टेशनजवळील ही छोटी बाग कौतुकाचा विषय ठरली आहे.

टिंबर मार्केट येथे माने फायर स्टेशनच्या शेजारी आणि पाठीमागे मोकळी जागा आहे. या मोकळ्या जागेवर अनेकांचे लक्ष आहे. या मोक्याच्या जागेचा वापर खरमाती व कचरा टाकण्यासाठी होत होता. या जागेत बाग फुलवण्याचा निर्णय अग्निशमन दलाच्या जवानांनी घेतला. मुख्य अधिकारी रणजित चिले यांच्या मार्गदर्शनानुसार अन्य कोणाचीही मदत न घेता कर्मचाऱ्यांनी स्वत: वर्गणी जमवली. महानगरपालिकेच्या उद्यान खात्यातील राजू मगदूम, अग्निशमन दलातील नामदेव पाटील, राजू मगदूम, सुनील वाईंगडे यांनी पुढाकार घेतला. उद्यान विभागातून लॉन, झाडे, कर्टन ट्री याचा आराखडा करण्यात आला. कामगारांनी वर्गणी जमवून दहा ते बारा डंपर माती खरेदी केली. नंतर उद्यान खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सूचनेनुसार जवानांनी श्रमदान करुन बाग विकसित केली. या उपक्रमाला नगरसेविका जयश्री चव्हाण व माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांनी पाठिंबा दिला.

बागेत तीन प्रकारची लॉन तयार केली आहेत. खराब पेव्हिंग ब्लॉकपासून एक छोटा चौक केला आहे. बारा डंपर लाल मातीवर जंपिंग लॉनही विकसित केले जात आहे. येथे एक सुंदर लॉन तयार झाले आहे. बागेत कडिपत्ता, नारळ, आंबा ही झाडे लावली आहेत. शिवाय शोभिवंत झाडे लावली असून तारेचे कुंपण घालून बाग बंदिस्त केली आहे. येथील फुलझाडे बहरली आहेत. बागेच्या मागे सार्वजनिक शौचालय आहे. ते शेडनेट लावून बंदिस्त केले आहे. उन्हाळ्यात बाग कोमेजू नये म्हणून पाणीही उपलब्ध करण्यात आले. परिसरात ही बाग म्हणजे ऑक्सिजन पार्क झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी पूल ते खानविलकर पेट्रोल पंप नवीन मार्ग करा

0
0

पर्यायी पूल दिरंगाईबाबत

हायकोर्टात जनहित याचिका

सामाजिक कार्यकर्ते नाथाजी पोवार यांची माहिती

कोल्हापूर टाइम्स टीम

शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाच्या नियोजनात सर्व खात्यांचे अधिकारी निष्क्रीय होते. त्यामुळे डिसेंबर २०१५ पासून पुलाचे काम रेंगाळले. अधिकाऱ्यांच्या लालफितीच्या कारभाराविरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते नाथाजी पोवार यांनी सांगितले. दरम्यान, जुना बुधवार पेठ व शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी शिवाजी पूल ते खानविलकर पेट्रोल पंप या मार्गावर नवीन रस्ता करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

नाथाजी पोवार म्हणाले, 'शिवाजी पुलासाठी बांधण्यात येणाऱ्या पर्यायी पुलाचे काम यापूर्वीच पूर्ण होणे शक्य होते. अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. कोल्हापूर महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभागासह सर्वच खात्यांचे अधिकारी या पुलाच्या कामाबाबत निष्क्रिय राहिले. परिणामी नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागला. अधिकाऱ्यांच्या लालफितीच्या कारभाराविरोधात आता मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे.'

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरून शहरात येणाऱ्या वाहतुकीला पर्याय देण्यासाठी नवा रस्ता विकसित करण्याबाबत महानगरपालिकेने विचार करावा असे सांगून पोवार म्हणाले, 'शिवाजी पूल, तोरस्कर चौक, जुना बुधवार तालीम, सोन्या मारुती चौक, टाऊन हॉल, चिमासाहेब चौक, दसरा चौक या मार्गावर वाहतूक वाढली आहे. पहाटे पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत अव्याहतपणे वाहतूक सुरू असते. परिसरातील नागरिकांचे स्वास्थ्य हरवले आहे. पर्यायी पुलाचा प्रकल्प पूर्ण होत आहे. तसेच या भागातील काही परिसर ब्रह्मपुरी पुरातत्व खात्याच्या कक्षेत येत नसल्याने शिवाजी पूलापासून खानविलकर पेट्रोल पंप हा मार्ग विकसित करावा.' त्यासाठी स्मशानभूमीजवळच्या नाल्यावर पूल बांधावा अशी सूचना त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यू पॅलेस परिसरातून चंदन झाडांची चोरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

न्यू पॅलेस परिसरातील चंदनाच्या चार झाडांची अज्ञाताने रविवारी (ता. १७) चोरी केली. याबाबत न्यू पॅलेस येथील सुपवायझर सतीश मारुती शिंदे (वय ४६, रा. राजारामपुरी, १४ वी गल्ली) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. चार वर्षांपूर्वीच न्यू पॅलेस परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी झाली होती. यानंतर पुन्हा १० हजार रुपयांच्या चार झाडांची चोरी झाल्याने याचे गांभीर्य वाढले आहे.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यू पॅलेस परिसरात वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत. रविवारी काही कर्मचाऱ्यांना सुट्टी असते. कर्मचारी नसल्याचे पाहून चोरट्यांनी परिसरातील चंदनाची चार झाडे तोडून नेली. यातील एका झाडाचा व्यास ९ इंच असून, उर्वरित तीन झाडांचा व्यास सात ते आठ इंच आहे. झाडांची चोरी झाल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. यानंतर सुपरवायझर सतीश शिंदे यांनी शाहूपुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. चोरी झालेल्या चार झाडांची किंमत सुमारे दहा हजार रुपये असल्याचा उल्लेख फिर्यादीत केला आहे. यापूर्वीही न्यू पॅलेस परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी झाली होती. चोरट्यांपासून झाडांचे संरक्षण व्हावे यासाठी चंदनाच्या झाडांना सिमेंट काँक्रिटची सुरक्षाजाळी बसवली आहे. यानंतरही चोरट्यांनी झाडे लंपास केल्याने याचे गांभीर्य वाढले आहे. अधिक तपास शाहूपुरी पोलिसांकडून सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी पूल ते खानविलकर पेट्रोल पंप नवीन मार्ग करा

0
0

शिवाजी पूलापासून शहरात

नवा रस्ता विकसित करा

कोल्हापूर टाइम्स टीम

जुना बुधवार पेठ व शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी शिवाजी पूल ते खानविलकर पेट्रोल पंप या मार्गावर नवीन रस्ता करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नाथाजी पोवार यांनी केली. दरम्यान, शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाच्या नियोजनात सर्व खात्यांचे अधिकारी निष्क्रीय होते. त्यामुळे डिसेंबर २०१५ पासून पुलाचे काम रेंगाळले. अधिकाऱ्यांच्या लालफितीच्या कारभाराविरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे पोवार यांनी सांगितले.

नवा पर्यायी रस्ता विकसित करण्याबाबत महानगरपालिकेने विचार करावा असे सांगून पोवार म्हणाले, 'शिवाजी पूल, तोरस्कर चौक, जुना बुधवार तालीम, सोन्या मारुती चौक, टाऊन हॉल, चिमासाहेब चौक, दसरा चौक या मार्गावर वाहतूक वाढली आहे. पहाटे पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत अव्याहतपणे वाहतूक सुरू असते. परिसरातील नागरिकांचे स्वास्थ्य हरवले आहे. पर्यायी पुलाचा प्रकल्प पूर्ण होत आहे. तसेच या भागातील काही परिसर ब्रह्मपुरी पुरातत्व खात्याच्या कक्षेत येत नसल्याने शिवाजी पूलापासून खानविलकर पेट्रोल पंप हा मार्ग विकसित करावा.' त्यासाठी स्मशानभूमीजवळच्या नाल्यावर पूल बांधावा अशी सूचना त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोपडपट्ट्या प्रॉपर्टी कार्डवर कधी ?

0
0

झोपडपट्ट्या प्रॉपर्टी कार्डावर कधी?

मालकीहक्काचा प्रश्न दुर्लक्षितच, सोयी-सुविधांवर भर हवा

कोल्हापूर टाइम्स टीम

राज्यातील प्रत्येक शहरात झोपडपट्ट्यांचे अस्तित्व आज ठळकपणे जाणवते. याला कोल्हापूर शहरही अपवाद नाही. येथे राहणा-या नागरिकांना सामान्य नागरिकांना मिळणा-या किमान सोयी सुविधा मिळत नाहीत. मग मालकीहक्काचा प्रश्न तर दूरच राहिला. गेली काही दशके झोपडपट्टीधारकांच्या मालकीहक्काचा प्रश्न सरकारकडून, लोकप्रतिनिधींकडून बेदखल झाला आहे. आगामी वर्षात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याची चर्चा सुरू होईल. पण झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळणे याला प्राधान्यक्रम हवा.

शहरात आधुनिक जीवनशैलीच्या सर्व सोयी-सुविधा असतात. चांगले रस्ते, वीज, पाणी, मुलांना शिक्षण, करमणूकीची साधने आणि मुख्य म्हणजे रोजगार! याउलट स्थिती ग्रामीण भागाची आहे. येथे मुलभूत जीवनावश्यक सुविधांची वानवा असतानाच तोट्यातील शेती लोकांना शहराकडे वळवते. ग्रामीण बेरोजगार शेतमजूर रोजगाराच्या शोधात शहराकडे धाव घेतात. कालौघात शहरे स्मार्ट करण्याकडे सरकारचा कल आहे. अशा अनेकविध कारणांनी शहराकडे येणारा लोंढा सतत वाढतच आहे. या स्थलांतरितांना शहरात राहण्यासाठी किमान खर्चात झोपडपट्टी हाच परवडणारा मार्ग असतो. अर्थात झोपडपट्टीत जगण्यासाठी आवश्यक सुविधांचा अभाव असतानाही अगतिकतेने सर्वांना रहावे लागते.

झोपडपट्टीधारकांचे जनावरांसारखे जगणे बदलून त्यांच्याही वाट्याला चांगले आयुष्य यावे यासाठी शासनाने अनेक प्रयत्न केले. आज राज्यातील १/१/२०११ पर्यतच्या सर्व झोपडपट्ट्यांना कायद्याने संरक्षण दिले आहे. १९७१च्या झोपडपट्टी सुधारणा कायद्यानुसार रस्ते, वीज, पाणी, स्वच्छता आदी मुलभूत सुविधा पुरवल्या जात आहेत. याशिवाय त्यांना पर्यायी जागा देऊन पुनर्वसन करणे, राहत्या ठिकाणी घरे, फ्लॅट बांधून देणे किंवा जागेचे कायदेशिर मालकत्व बहाल करणे असे अनेक उपक्रम सरकारने हाती घेतले आहेत. २८ सप्टें १९९९ आणि सुधारित ४/४/२००२ च्या कायद्याने सरकारी जागेवरील झोपडपट्टीधारकांना त्यांच्या राहत्या जागेचे त्यांना मालक बनविले. अर्थात जागेची मालकी देणे किंवा प्रॉपर्टी कार्ड , ७/१२ उतारे देणे ही इतकी सोपी गोष्ट नाही. त्यासाठीची कागदोपत्री सोपस्कार एकट्या झोपडपट्टीधारकांच्या अवाक्याबाहेरचे आहेत.

कोल्हापूरकडे एक नजर टाकली तर असे दिसते की, आज या शहरात सुमारे एकुण ७६ झोपडपट्ट्या असून यापैकी ४४ घोषित आहेत. घोषित झोपडपट्ट्यांपैकी २३ सरकारी जागेवर तर ८ महानगरपालिकेच्या जागेवर वसल्या आहेत. यातील ब-याच झोपडपट्ट्या अत्यंत जुन्या आहेत. १९६९ला लक्षतीर्थ (तोफेचा माळ), १९६५ दौलतनगर इत्यादी. शहरातील सर्वात जुनी झोपडपट्टी म्हणजे शाहूनगर. येथील रहिवाशांना राजर्षी शाहू महाराजांच्या काळात म्हणजे सन १९१२ मध्ये मोफत जागा दिल्या गेल्या. इथे राहणारा जवळपास सगळा वडार समाज होता. तेव्हापासून आजवर, दीर्घकाळ या झोपडपट्टीधारकांचा मालकीहक्काचा लढा सुरू आहे. हा सर्वात जुना, शाहूनगर झोपडपट्टीचा प्रश्न म्हणजे १०६ वर्षांचा !

सन २००९ च्या निवडणूकीनंतर काही झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा आम्ही प्रयत्न केला. अर्थात ही प्रक्रिया अत्यंत किचकट आणि वेळखाऊ आहे. प्रथम सर्व झोपडपट्टीधारकांची मोजणी फी भरून एकाचवेळी पूर्ण झोपडपट्टीची मोजणी करणे, त्यातील प्रत्येक रहिवाशांची मोजणी करणे, त्यांना स्वतंत्र नंबर देणे, रस्ते आदी सोयीसुविधांसाठी जागा सोडून 'ले-आऊट' करणे, प्रत्येक झोपडपट्टीधारकांकडून दंडासहित मालकीहक्काची रक्कम भरुन घेऊन मग त्यांना मालक बणविणे किंवा ७/१२ प्रॉपर्टी कार्ड देणे ही सर्व किचकट प्रक्रिया लक्षतीर्थ, दौलतनगर आदी ठिकाणी यशस्वीपणे राबविली. ब-याच जणांना मालकी पत्रे ७/१२ उतारे दिले. या कार्यात तत्कालीन राज्यमंत्री, सतेज पाटील यांनी चांगले सहकार्य केले. पुढे ही जबाबदारी इतरांनी घेतली. पण अपेक्षेप्रमाणे काम झाले नाही. यामध्ये मूळ झोपडपट्टीधारक, राजकीय नेतृत्व आणि प्रशासन या तिघांनी एकत्र येऊन एकजीवपणे काम करणे गरजेचे होते. पण दुर्देवाने तसे घडले नाही.

दर पाच वर्षांनी येणा-या निवडणुका रहिवाशांना आपल्या प्रलंबीत कामांविषयी जाब विचारण्यासाठी संधी देतात. आता २०१९ हे निवडणूक वर्ष आहे. सहाजीकच झोपडपट्टीधारकांच्या प्रॉपर्टी कार्डाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येईल. उमेदवारांना झोपडपट्टीधारक आमच्या मालमत्ता हक्कपत्राचे काम झाले का? असे विचारून अडवतील. उमेदवार फार हुशार असतात. १५-२० वर्षे सत्ता भोगणा-या मंडळींना तर प्रत्येक प्रलंबीत समस्यांना कसे सामोरे जायचे याचे कसब माहीत असते. त्यांच्या राजकीय कौशल्यासमोर (?) झोपडपट्टीधारक नमतात आणि पुढच्या वेळी ठामपणे प्रॉपर्टी कार्ड तयार करुन देऊ अशा आश्वासनावर वेळ मारून नेली जाते असा नेहमीचा अनुभव आहे. म्हणजे पुढच्या निवडणुकांपर्यत काहीही होणार नाही.

कोल्हापुरातील झोपडपट्टीधारकांसाठी प्रॉपर्टी कार्ड मिळवण्यासाठी आजची परिस्थिती अनुकूल आहे. मुख्य म्हणजे राज्याचे महसूलमंत्रीपद कोल्हापूरकडे, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. दौलतनगर, लक्षतीर्थ आदी बहुतांश झोपडपट्ट्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात येतात. स्थानिक आमदार अमल महाडिक आणि महसुलमंत्री पाटील एकाच पक्षाचे, भाजपचे आहेत. त्यामुळे त्यांनी मनावर घेतले तर झोपडपट्टीधारकांचा प्रश्न सत्वर मार्गी लागू शकतो. तब्बत १८ वर्षांपूर्वी कायदा झाला. झोपडपट्टीधारकांनी आता आणखी किती वर्षे वाट पहावी? हाच प्रश्न आहे.

बी. जी. मांगले

अध्यक्ष, जागर फाउंडेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मल्हारराव सूर्यवंशी यांचे निधन

0
0

मल्हारराव सूर्यवंशी

कोल्हापूर

सानेगुरुजी वसाहत येथील प्रा. मल्हारराव तुकाराम सूर्यवंशी याचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, व भावजय असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरोज चषक वक्तृत्व स्पर्धा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महिला भजनी मंडळ सदस्यांसाठी जिल्हास्तरीय 'सरोज चषक' वक्तृत्व स्पर्धा १८ जुलै रोजी आयोजित केली आहे. स्वंयप्रेरिका महिला सहकारी औद्योगिक संस्थेतर्फे सरोजिनीदेवी विश्वनाथ पाटील यांच्या ४९ व्या स्मृतिदिनानिमित्त स्पर्धा होत आहेत. स्पर्धा ११५१, ई, सरोज,साईक्स एक्स्टेंशन येथील स्वयंसिद्धा हॉलमध्ये सकाळी दहा वाजता स्पर्धेची सुरूवात होईल. विजेत्यांना सरोज चषक आणि २५०० रूपये, द्वितीय क्रमांकासाठी २००० रूपये आणि चषक आणि तृतीय क्रमांकासाठी चषक आणि १५०० रूपये देण्यात येणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी जयश्री गायकवाड, दूरध्वनी क्रमांक २५२५१२९ वर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुजू होण्याआधीच करवीर निरीक्षकांची बदली

0
0

रुजू होण्याआधीच

करवीर निरीक्षकांची बदली

लक्ष्मीपुरीसाठी नवे अधिकारी, दिलीप जाधव घेणार कागलचा चार्ज

कोल्हापूर टाइम्स टीम

करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप जाधव यांची लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात बदली झाली. मात्र, बदलीच्या ठिकाणी हजर होण्यापूर्वीच त्यांची कागल पोलिस ठाण्यात बदली झाली. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात निरीक्षक वसंतराव बाबर यांची बदली करण्यात आली आहे. गॅझेट जाहीर झाल्यानंतरही केलेला हा बदल नेमका कोणामुळे झाला? अशी चर्चा सध्या पोलिस दलात सुरू आहे.

पोलिस दलात गेल्या महिन्याभरापासून बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. यात १३ अधिकारी बाहेरच्या जिल्ह्यात गेले. तर ३० अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यात अंतर्गत बदल्या झाल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक दिनकर मोहिते यांची पुणे शहर येथे बदली झाल्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत यांची स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या निरीक्षकपदी बदली झाली. लक्ष्मीपुरीच्या रिक्त जागी करवीरचे निरीक्षक दिलीप जाधव यांची बदली करण्यात आली. पोलिस अधीक्षकांनी बदल्यांचा आदेश ८ जूनला जाहीर केला. या बदल्यांनंतर जुना राजवाडा आणि कागल पोलिस ठाण्यात बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल, असे अधीक्षकांनी स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात आठवडाभरातच जाधव यांची लक्ष्मीपुरीतील बदली रद्द करून त्यांची कागल पोलिस ठाण्यात रवानगी करण्यात आली. लक्ष्मीपुरीसाठी बाहेरून आलेले वसंतराव बाबर यांची नियुक्ती केली. लक्ष्मीपुरीत रुजू होण्यापूर्वीच जाधव यांची कागलला बदली झाल्याने याबाबत पोलिस दलात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य रग्बी स्पर्धेत कोल्हापूर पुरुष संघाला विजेतेपद

0
0

राज्य रग्बी स्पर्धेत कोल्हापूर

पुरुष संघाला विजेतेपद

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट रग्बी स्पर्धेत कोल्हापूरच्या पुरुष संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी मुंबई संघाचा १२-५ असा पराभव केला. महिला संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

कोल्हापूर पुरुष संघाने बीड संघाचा १०-० तर यवतमाळचा १५-० असा धुव्वा उडवला. सिंधुदुर्ग संघाचा १५-१० तर सातारा संघाचा ५-० असा पराभव केला. महिला संघाने अमरावती संघाचा १५-०, मुंबई सबरबन संघाचा १०-०, ठाणे संघाचा १०-० असा पराभव केला. मुंबई संघाकडून कोल्हापूर संघ १५-० असा पराभूत झाला. दोन्ही संघांना दीपक पाटील यांचे प्रशिक्षण लाभले. खेळाडूंना खासदार संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे, माजी आमदार मालोजीराजे, पोलिस निरीक्षक बाजीराव कळंत्रे, प्रा. अमर सासने, नगरसेवक राहुल माने, तौफिक मुल्लाणी यांचे प्रोत्साहन लाभले.

पुरुष गटातील खेळाडूंमध्ये सुहास बेनके, अक्षय व्हरांबळे, पृथ्वीराज पाटील, विकास पाटील, श्रीधर निगडे, प्रशांत कांबळे, रोहित मुद्राळे, विनायक पोवार, प्रमोद कांबळे, सुहास पाटील, श्रीधर पाटील, सचिन पाटील यांचा समावेश होता. तर महिला संघातील खेळाडूंमध्ये निलम पाटील, पूजा कुंभार, शुभांगी गावडे, शितल शिणगारे, ऋतुजा शिणगारे, सोनाली साळवी, तेजस्वीनी कोळसे, सरस्वती माळी, अश्विनी पाटील, प्रियांका पाटील, स्वप्नाली परमकर, भाग्यश्री पाटील यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घुडणपीर दर्गा उरुस आजपासून

0
0

कोल्हापूर : शिवाजी चौक येथील हिंदू-मुस्लिम एैक्याचे प्रतीक असलेल्या हजरत सय्यद मुबारक घुडणपीर दर्गा ऊरुस बुधवार (ता.२०) पासून सुरू होत आहे. बुधवारी रात्री गंधलेपन, तर गुरुवारी (ता.२१) रात्री शाहूकालीन परंपरेनुसार भोसलेवाडी येथून पारंपरिक वाद्याच्या गजरात गलेफ मिरवणूक काढण्यात येणार आहे. जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील अधिकारी गलेफ नेणार आहेत, असे पत्रक दर्गा कमिटीचे अध्यक्ष लियाकत मुजावर, इकबाल मुजावर, वजीर मुजावर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिंत पडून पाच विद्यार्थी जखमी

0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

शौचालयाशेजारील बांधलेली भिंत ढासळून गोकुळ शिरगाव येथील सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे पाच विद्यार्थी मंगळवारी जखमी झाले. यातील एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर आहे. जखमी विद्यार्थ्यांवर सिद्धगिरी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. या घटनेनंतर पालकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.

घटनास्थळावरून व गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, सौ. अंबुबाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सकाळी ११ वाजता प्रार्थना झाल्यानंतर विद्यार्थी वर्गात जात होते. काही विद्यार्थी लघुशंकेसाठी मुतारीत गेले. त्यावेळी विद्यार्थ्यांची एकच गर्दी झाली. विद्यार्थ्यांच्या ढकला ढकलीत मुतारी समोर आडोशासाठी बांधलेली भिंत कोसळली. यात पवन राजेश दुबे(वय १४, रा. तामगाव,ता. करवीर), ओम विष्णू नलवडे (वय १४, रा. उजळाईवाडी, ता. करवीर), ऋषिकेश संजय घोरपडे(वय १४, शिवाजी पेठ, रंकाळा, कोल्हापूर), कार्तिक सचिन पाटील ( वय ११, रा. कागल) हे जखमी झाले तर प्रेम गणेश भगत ( वय आठवी, रा. शाहू कॉलनी, कागल)याच्या पोटाला गंभीर दुखापत झाल्याने त्यास अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

जखमी विद्यार्थ्यांना सिद्धगिरी रुग्णालयात तत्काळ उपचारासाठी दाखल केले आहे. रुग्णालयाने तातडीने यंत्रणा तैनात करत उपचार सुरू केले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपचार केले. हे वृत्त समजताच पालकांनी रुग्णालयात धाव घेतली. शिक्षण संस्थेचे प्राचार्य के. डी. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुलांना धीर दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images