Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आप्पा साळोखेंचे निलंबन मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला संप आणि माध्यमांशी बोलल्यामुळे कोल्हापूर विभागातील वाहक आणि 'इंटक'चे विभागीय सचिव आप्पासाहेब साळोखे यांना एसटी महामंडळाने निलंबित केले होते. शनिवारी केलेली निलंबनाची कारवाई रविवारी मागे घेण्यात आली. संपकाळात अन्य संघटनांचे पदाधिकारी, नेते आणि कर्मचारी सहभागी झाले होते. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याने एसटीत राजकारणाची 'डबल बेल' वाजू लागली आहे.

सरकारने जाहीर केलेली वेतनवाढ अमान्य असल्याने ८ आणि ९ जून रोजी कोल्हापूर विभागातील कर्मचाऱ्यांनी अघोषित 'काम बंद' आंदोलन केले. यावेळी इंटकचे जयप्रकाश छाजेड आणि कोल्हापूर विभागाचे सचिव आप्पासाहेब साळोखे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. संपासंदर्भात कोणत्याही कर्मचाऱ्याने बोलू नये, अशा सूचना मुंबईतून सर्व विभागीय कार्यालयांना दिल्या होत्या. साळोखे यांनी माध्यमांशी बोलून एसटी प्रशासनाच्या ध्येय धोरणाच्या विरोधात मत मांडले आहे. त्यातून गैरशिस्तपणा दिसतो, असा ठपका ठेवून त्यांना निलंबित केले होते. याप्रकरणी रविवारी कोल्हापूरचे आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) अजय पाटील यांनी साळोखे यांचे निलंबन मागे घेतले. या सर्व प्रकारामुळे एसटी प्रशासनाच्या निर्णयासंदर्भात विभागीय कार्यालय, कार्यशाळेत उलटसुलट चर्चा सुरू राहिली.

०००००

विभाग नियंत्रक अनभिज्ञ

शनिवारी ईदची सुटी असूनही कोल्हापूर विभागीय कार्यालयाने साळोखे यांना निलंबित केल्याचे पत्र दिले. याप्रकरणी विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांना माध्यमांनी प्रतिक्रिया देण्याबाबत दूरध्वनी केला. मात्र, त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. पलंगे या कारवाईप्रश्न अनाभिज्ञ होते का, अशी चर्चा एसटी संघटनांत सुरू राहिली. मध्यवर्ती बसस्थानकात दिवसभर निलंबन आणि अधिकाऱ्यांची मानसिकता यावर चर्चा सुरू राहिली.

०००००

संपकाळात मी माध्यमांशी विचार मांडत असताना महामंडळाची परवानगी घ्यावी लागते. त्या संदर्भात मला माहिती नव्हती, असे निवेदन प्रशासनला दिले आहे.

आप्पासाहेब साळोखे, वाहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरुणीची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

वाठार (ता. हातकणंगले)येथील महाविद्यालयीन तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आशिया शौकत मोमीन (वय २४)असे तरुणीचे नाव आहे. ही घटना रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. याची नोंद पेठवडगाव पोलिसांत झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, आशिया ही पेठवडगाव येथील एका महाविद्यालयात पदवीच्या अखेरच्या वर्षात शिकत आहे. तिच्या वडिलांचा टेलरिंगचा व्यवसाय आहे. आई-वडील कामानिमित्त नातेवाइकांकडे गेले असता तिने राहत्या घरी तुळईला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू जयंतीची एकच मिरवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती (२६ जून) थाटामाटात साजरी केली जाणार आहे. ईर्षा, वाद टाळून तालीम मंडळे, संस्था, संघटना, पेठांतर्फे शहरात एकच भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याचा निर्णय शाहू जयंती नियोजन बैठकीत रविवारी घेण्यात आला. लोकराजा राजर्षी शाहू जयंती समितीच्या कार्याध्यक्षपदी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. मिरजकर तिकटी येथील हिंदू एकता सभागृहात बैठक झाली.

शाहू जयंतीनिमित्त शहरातील प्रमुख पेठा, तालीम मंडळ, संस्थाप्रमुखांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मिरवणुकीच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. सायंकाळी साडेचार वाजता मिरवणुकीची सुरुवात होणार आहे. निमंत्रक किसन भोसले म्हणाले, 'कोल्हापूरच्या परंपरेला शोभेल अशी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वच पेठा, तालीम मंडळांनी एकत्रितपणे सहभाग घ्यावा. मिरवणुकीसाठी लागणाऱ्या आर्थिक नियोजनाबाबत सोमवारी (ता. १८) बैठक होणार आहे. झांजपथक, लेझीम, मर्दानी खेळाचे आखाडे, चित्ररथ, पोवाडा, वाहतुकीचे नियोजन, मिरवणुकीचा मार्ग, शाहूंचे जीवनकार्याचे प्रबोधनाची नेटके नियोजन करावे. त्यासाठी लोकराजा राजर्षी शाहू जयंती समितीची स्थापना करण्यात येणार आहे. समिती स्थापनेत कोणतेही राजकारण नसून प्रत्येक भागाला प्रतिनिधित्व देण्यात येणार आहे.' राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सदस्य आर. के. पोवार म्हणाले, 'स्थानिक समिती मोठी नसावी. फेटे घालून शहरात मिरवणूक काढण्यात येईल. दोन दिवसांत नियोजनाचा आराखडा तयार करावा.'

संयुक्त जुना बुधवार पेठेचे धनंजय सावंत म्हणाले, 'सकाळी शहरातील सर्वच तालीम संस्थांनी शाहूंच्या प्रतिमेचे पूजन करावे. मिरवणुकीत मल्लखांबाची मल्लखांबची प्रात्याक्षिके सादर करणारे महाराष्ट्र हायस्कूलच्या मुख्याध्यापकांसोबत चर्चा करावी. शहरातून सकाळी दुचाकी रॅली काढावी.' जयकुमार शिंदे म्हणाले, 'राजर्षी शाहूंचा जीवनपट नव्या पिढीला माहिती होण्यासाठी खासबाग, राधानगरी धरण, मर्दानी खेळ, साठमारी आदींचा समावेश चित्ररथात करावा.' शाहीर दिलीप सावंत म्हणाले, 'शाहू जीवनचरित्र पोवाड्यातून सादर केले जाणार आहे. उद्घाटन सोहळ्याच्या वेळी पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी छायाचित्रात दिसण्यासाठी गर्दी करू नये. मिरवणुकीचा समारोप होईपर्यंत प्रत्येकाचा सहभाग असावा.' शिवाजी तरुण मंडळातर्फे सुजित चव्हाण यांनी २१ हजार रुपयांची देणगी जाहीर करून पेठांत शाहूंच्या जीवनावर २१ फूट उंचीचे डिजिटल फलक उभारण्यात येतील, असे सांगितले.

बैठकीत किशोर घाटगे, उमेश पोर्लेकर, बाबा पार्टे, अशोक पोवार, मनसेचे राजू जाधव, जुना बुधवार पेठेचे सुशील भांदिगरे, संजय जाधव, संयुक्त उत्तरेश्वर पेठेचे महेश लोखंडे यांनीही सूचना केल्या.

०००

सिंहाचा वाटा उचलू

नूतन कार्याध्यक्ष महेश जाध‌व म्हणाले, 'कोल्हापूरच्या परंपरेला साजेल, अशी भव्य प्रबोधनात्मक मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही. त्यासाठी प्रत्येकावर जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. जयंतीचे शिष्टमंडळाकडून मान्यवरांना आमंत्रण देण्यात येईल. तटाकडील तालीम मंडळाचा गेली दहा वर्षे अध्यक्ष असल्याने मिरवणुकीचे नियोजनाची परिपूर्ण माहिती आहे. एकेवर्षी मिरवणुकीसाठी निधीची कमतरता भासली. तेव्हा पदाधिकाऱ्यांनी सोने तारण ठेवून बँकेतून कर्ज घेतले. शाहू जयंती सोहळ्यासाठी सिंहाचा वाटा उचलला जाईल.'

००००

...तर आर. के. आमदार झाले असते

महेश जा‌धव म्हणाले, 'दिग्गज पदाधिकारी आणि अनुभवी कार्यकर्त्यांसोबत काम करण्याची संधी मिळत आहे. यापूर्वी शाहू जयंतीचे कार्याध्यक्षपद सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भूषविले आहे. नेटक्या नियोजनामुळे कोणतीही मिरवणूक यशस्वीपणे पार पाडली जाते. आर. के. पोवार यांचे कार्यही चांगले आहे. ते मुंबईत असते तर नक्कीच आमदार झाले असते.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटीआय प्रवेशासाठी धांदल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर आणि जिल्ह्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) ऑनलाइन पद्धतीने केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ३० जूनअखेर ऑनलाइन अर्ज भरणे, त्यामध्ये दुरुस्ती करण्याची अंतिम मुदत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विद्यार्थ्यांची अर्ज दाखल करण्यासाठी धांदल उडाली आहे. शहरातील नेट कॅफेत गर्दी दिसत आहे.

दहावीचा निकाल लागल्याने पुढील शिक्षणासाठी प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे. नोकरी, व्यावसायासाठी चांगली संधी असल्याने यंदा आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असल्याचे दिसत आहे. अर्ज भरणे सोयीचे आणि सुटसुटीत होण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने प्रवेशाचे ऑनलाइन वेळापत्रक जाहीर केले आहे. http://admission.dvet.gov.in या वेबसाइटवर संस्थांची नावे, कोर्सनिहाय जागांची संख्या प्रसिद्ध केली आहे. कोल्हापुरातील शासकीय आयटीआयमध्ये ३१ व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी १३१९ जागांची प्रवेशक्षमता आहे. त्यातील एक वर्ष मुदतीचे अभियांत्रिकी व बिगर अभियांत्रिकी व्यवसायासाठी ६१२, तर दोन वर्षे मुदतीच्या अभियांत्रिकी व्यवसायांसाठी ७०७ जागांची क्षमता आहे.

पहिल्या प्रवेश फेरीसाठी अभ्यासक्रम व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करावे लागणार आहेत. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ३० जूनअखेर रोज सकाळी १० ते ११ या वेळेत नि:शुल्क प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या वेबसाइटवर अधिक माहिती व अर्ज भरण्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन व्यावसाय शिक्षण, प्रशिक्षण संचालनालयातर्फे केले आहे.

०००

कळंबा आयटीआयमधील अभ्यासक्रमनिहाय प्रवेशक्षमता

एक वर्ष मुदतीचे अभियांत्रिकी कोर्स : यांत्रिक कृषित्र (६३), नळ कारागीर (५२), गवंडी (२६), सुतारकाम (२६), संघाता (८४), पत्रे कारागीर (४२), फाउंड्रीमन (४२), यांत्रिक डिझेल (४२), प्लास्टिक प्रोसिसिंग ऑपरेटर (४२).

एक वर्ष मुदतीचे बिगर अभियांत्रिकी व्यवसाय : कर्तन व शिवणशास्त्र - मुले (२१), कर्तन व शिवणशास्त्र - मुली (२१), भरतकाम व विणकाम - मुली (२१), बेसिक कॉस्मॉटोलॉजी - मुली (२६), फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग - मुली (२६), लघुलेखन - इंग्रजी (२६), कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग (५२).

दोन वर्षे मुदतीचे अभियांत्रिकी व्यवसाय : कृषी व यंत्रसामग्री (२१), रंगारी (२१), तारतंत्री (२१), यांत्रिक मोटारगाडी (४२), आरेखक यांत्रिकी (४२), आरेखक स्थापत्य (२६), वीजतंत्री (८४), यांत्रिक प्रशितन व वातानुकूलिकरण (२६), यंत्र कारागीर घर्षक (६४), जोडारी (६३), कातारी (९६), यंत्र कारागीर (११२), इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अँड सिस्टीम (२६), मेक मशिन टुल्स मेंटेनन्स (२१), टुल अँड डायमेकर (२१), वीज विलेपक (२१).

०००००

जिल्ह्यातील आयटीआयनुसार प्रवेश क्षमता : गडहिंग्लज २८९, तुर्केवाडी १०५, मूरगूड १६८, हातकणंगले १३१, राधानगरी १५२, आजरा २९८, शाहूवाडी १९९, शिरोळ २०५, पन्हाळा ८९, गगनबावडा १४७, भुदरगड १४२.

--------------

वेळापत्रक असे :

http://admission.dvet.gov.in या वेबसाइटवर केंद्रीय प्रवेश प्रक्रिया

ऑनलाइन अर्ज भरणे, दुरुस्त करण्याची मुदत : ३० जूनअखेर

कागदपत्रांच्या तपासणीनंतर अर्ज निश्चित करणे : ४ जून ते २ जुलै

पहिल्या फेरीसाठी अभ्यासक्रम व संस्थानिहाय विकल्प निवडणे : ४ जून ते ३ जुलै

प्राथमिक गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे, एसएमएसद्वारे कळविणे : ५ जुलै

यादीवर हरकती नोंदवणे : ६ जुलैपर्यंत

अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध : १० जुलै

निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कादगपत्र पडताळणी : ११ ते १५ जुलैपर्यंत

दुसरी प्रवेश फेरी : ११ ते १६ जुलै

तिसरी प्रवेश फेरी : २१ ते २६ जुलै

चौथी प्रवेश फेरी : ३१ जुलै ते ४ ऑगस्ट

००००००

हेल्पलाइन अशी

अर्ज भरतानाच्या अडचणी, मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी १८००१२०१६९६, ८१०४४९३३६१, ८१०४४६०६४०, ९१०८२५९८१२ या क्रमांकांवर सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत संपर्क साधावा.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळ शिरगावजवळ गुटखा जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील गोकुळ शिरगाव एमआयडीसी फाट्यावर शनिवारी रात्री गुटखा, पान मसाल्याची वाहतूक करणाऱ्या संतोष महादेव जोंधळेकर ( वय ३७ रा. तामगाव) याला चारचाकी गाडीसह पोलिसांनी अटक केली. अन्न आणि भेसळ प्रशासन पथकाने वाहनाची तपासणी केल्यानंतर सुगंधी तंबाखूसह त्याच्याकडून ५५ हजार ३८० रुपयांचा गुटखा जप्त केला.

गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत परिसरात गुटखाविक्री होत असल्याची माहिती गोकुळ शिरगाव पोलिसांना मिळाली. शनिवारी रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास चारचाकी गाडी ( एम एच ०९-ई जि -१०९५) गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत आली असता, गस्त पथकातील पोलिसांनी गाडी आडवली. त्यामध्ये गुटखा असल्याचे आढळले. पोलिसांनी अन्न आणि सुरक्षा व भेसळ प्रतिबंध पथकाला पाचारण केले. या विभागाचे वरिष्ठ अधिकारी रमाकांत पाटील व सहाय्यक आयुक्त मोहन केबळकर यांनी गाडीची तपासणी केली असता आरएमडी पान मसाला, तंबाखू , विमल पान मसाला, व्ही सुंगधी मसाला आणि गुटखा असल्याचे आढळून आले. यापुर्वीही पोलिसांना जोंधळेकर हा अवैधरित्या गुटखा विकत असल्याची माहिती पंटरद्वारे मिळाली होती. त्या अनुषंगाने शनिवारी तो गोव्याहून गुटखा घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. संशयित संतोष जोंधळेकर याचे तामगाव येथे किराणा मालाचे दुकान आहे. किराणा माल दुकानांमध्ये संतोष हा नेहमी गुटख्याची जादा दराने विक्री करत होता. तर अनेकांना तो व्याजाने पैसे देणे, मादक पदार्थ विकणे, व्याजाने दिलेले पैसे जबरदस्तीने वसूल करणे,अशा अनेक तक्रारी होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्राईम पट्टा १७ जून

$
0
0

मारहाणीत आई, मुलगा जखमी

कोल्हापूर : सावर्डे (ता. राधानगरी) येथे झालेल्या मारहाणीत संदीप सदाशिव मोरे (वय ३०), मालूबाई सदाशिव मोरे (५५) असे आई व मुलगा जखमी झाले. मालूबाई यांच्या अंगावर गावातील एका व्यक्तीने अंगावर मोटारसायकल घातल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी संदीप व मालूबाई गेल्या असता त्यांना मारहाण झाली. शनिवारी रात्री साडेनऊ वाजता घटना घडली. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.

कदमवाडीत एक जखमी

कोल्हापूर : कदमवाडी येथील सिद्धार्थ चौकात पूर्ववैमनस्यातून झालेल्या मारहाणीत अभिजित राजू चव्हाण (वय २१, रा. विचारे माळ) जखमी झाला. चौकात कट्ट्यावर बसला असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर ब्लेडने वार केले, तर डोक्यात बाटली मारल्याने तो जखमी झाला. चव्हाणला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे.

बॅटने मारहाण, दोघे जखमी

कोल्हापूर : विचारे माळ येथील मैदानावर बॅटने केलेल्या मारहाणीत दोघे जखमी झाले. इजाज समीर शेख (वय १५, रा. सदरबाजार), अरबाज इब्राहिम भटकर (१८, रा. कदमवाडी) अशी जखमींची नावे आहेत. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. दोघांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे.

दुचाकी घसरून

दोघे जखमी

कोल्हापूर : कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरील कोतोली फाटा येथे मोटारसायकल घसरून झालेल्या अपघात दोघे जखमी झाले. निखिल गोरख गुरव व सागर नायकू निंबाळकर (दोघेही रा. उचगाव) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना सीपीआरमध्ये उपचारास दाखल केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्फोटात एक ठार, दोघे जखमी

$
0
0

फोटो..

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिरोली एमआयडीसी येथील कारखान्यात कार्बनडाय ऑक्साइड सिलिंडरचा स्फोट होऊन एक कामगार जागीच ठार झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. बिपीनकुमार आर्या (वय ३०, सध्या रा. एमआयडीसी शिरोली, मूळ गाव अलिबाग, जि. मथुरा, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे, तर अमित वंजारी (३०, रा. निगवे दुमाला, ता. करवीर) आणि वसंत परीट (४५, रा. मलकापूर, ता. शाहूवाडी) अशी जखमी कामगारांची नावे आहेत. स्फोटाची घटना रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. याबाबतची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांनी दिलेली माहिती अशी : हरियाणाच्या निरज चंद्रा यांच्या शिरोली एमआयडीसीतील के. इंडस्ट्रियल गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत औद्योगिक व वैद्यकीय कारणांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजन, कार्बनडाय ऑक्साइड ऑरगॉन, डिझॉल अॅसिटिलीन या वायूंचे सिलिंडर तयार केले जातात. चंद्रा यांचा सातारा येथेही कारखाना आहे. रविवारी सकाळी सातारा येथून टेम्पोतून वायू भरलेल्या सिलिंडरचा साठा शिरोली एमआयडीसी येथे आला. कामगारांनी कारखान्यात सिलिंडर उतरून घेतले. कारखान्यातील कर्मचारी बिपीनकुमार आर्या प्रत्येक सिलिंडरचा क्रमांक वहीत नोंद करत होते. शेवटच्या सिलिंडरची नोंद करत असताना अचानक त्याचा स्फोट झाल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या पोटाजवळ सिलिंडर फुटले, तर स्फोटाच्या धक्क्याने दुसरे सिलिंडर त्यांच्या छातीवर पडले. स्फोटाने आर्या यांच्या पोटाच्या चिंधड्या उडाल्या. अमित वंजारी व वसंत परीट गंभीर जखमी झाले. अपघातानंतर सर्व कर्मचारी घटनास्थळी धावले. त्यांनी जखमी वंजारी व पाटील या दोघांना सीपीआरमध्ये हलवले. वंजारी गंभीर जखमी झाल्याने त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. कारखान्यातील कर्मचारी सचिन दिनकर पाटील (रा. म्हाकवे गल्ली, नेर्ली, ता. करवीर) यांनी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

०००

सहकाऱ्यांना अश्रू आवरणे कठीण

बिपीनकुमार आर्या व त्यांचे सहकारी शनिवारी रात्री एकत्र हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. सकाळी कामावर आल्यानंतर जेवणाची चर्चा सुरू होती. सिलिंडरची नोंदणी करत असताना त्यांच्या सहकाऱ्यांसमोरच स्फोट झाला. त्यात आर्याच्या पोटाच्या चिंधड्या उडाल्याचे सांगताना त्याच्या सहकाऱ्यांना अश्रू आवरणे कठीण जात होते.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू जयंतीची एकच मिरवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती (२६ जून) थाटामाटात साजरी केली जाणार आहे. ईर्षा, वाद टाळून तालीम मंडळे, संस्था, संघटना, पेठांतर्फे शहरात एकच भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याचा निर्णय शाहू जयंती नियोजन बैठकीत रविवारी घेण्यात आला. लोकराजा राजर्षी शाहू जयंती समितीच्या कार्याध्यक्षपदी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. मिरजकर तिकटी येथील हिंदू एकता सभागृहात बैठक झाली.

शाहू जयंतीनिमित्त शहरातील प्रमुख पेठा, तालीम मंडळ, संस्थाप्रमुखांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मिरवणुकीच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. सायंकाळी साडेचार वाजता मिरवणुकीची सुरुवात होणार आहे. निमंत्रक किसन भोसले म्हणाले, 'कोल्हापूरच्या परंपरेला शोभेल अशी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वच पेठा, तालीम मंडळांनी एकत्रितपणे सहभाग घ्यावा. मिरवणुकीसाठी लागणाऱ्या आर्थिक नियोजनाबाबत सोमवारी (ता. १८) बैठक होणार आहे. झांजपथक, लेझीम, मर्दानी खेळाचे आखाडे, चित्ररथ, पोवाडा, वाहतुकीचे नियोजन, मिरवणुकीचा मार्ग, शाहूंचे जीवनकार्याचे प्रबोधनाची नेटके नियोजन करावे. त्यासाठी लोकराजा राजर्षी शाहू जयंती समितीची स्थापना करण्यात येणार आहे. समिती स्थापनेत कोणतेही राजकारण नसून प्रत्येक भागाला प्रतिनिधित्व देण्यात येणार आहे.' राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सदस्य आर. के. पोवार म्हणाले, 'स्थानिक समिती मोठी नसावी. फेटे घालून शहरात मिरवणूक काढण्यात येईल. दोन दिवसांत नियोजनाचा आराखडा तयार करावा.'

संयुक्त जुना बुधवार पेठेचे धनंजय सावंत म्हणाले, 'सकाळी शहरातील सर्वच तालीम संस्थांनी शाहूंच्या प्रतिमेचे पूजन करावे. मिरवणुकीत मल्लखांबाची मल्लखांबची प्रात्याक्षिके सादर करणारे महाराष्ट्र हायस्कूलच्या मुख्याध्यापकांसोबत चर्चा करावी. शहरातून सकाळी दुचाकी रॅली काढावी.' जयकुमार शिंदे म्हणाले, 'राजर्षी शाहूंचा जीवनपट नव्या पिढीला माहिती होण्यासाठी खासबाग, राधानगरी धरण, मर्दानी खेळ, साठमारी आदींचा समावेश चित्ररथात करावा.' शाहीर दिलीप सावंत म्हणाले, 'शाहू जीवनचरित्र पोवाड्यातून सादर केले जाणार आहे. उद्घाटन सोहळ्याच्या वेळी पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी छायाचित्रात दिसण्यासाठी गर्दी करू नये. मिरवणुकीचा समारोप होईपर्यंत प्रत्येकाचा सहभाग असावा.' शिवाजी तरुण मंडळातर्फे सुजित चव्हाण यांनी २१ हजार रुपयांची देणगी जाहीर करून पेठांत शाहूंच्या जीवनावर २१ फूट उंचीचे डिजिटल फलक उभारण्यात येतील, असे सांगितले.

बैठकीत किशोर घाटगे, उमेश पोर्लेकर, बाबा पार्टे, अशोक पोवार, मनसेचे राजू जाधव, जुना बुधवार पेठेचे सुशील भांदिगरे, संजय जाधव, संयुक्त उत्तरेश्वर पेठेचे महेश लोखंडे यांनीही सूचना केल्या.

०००

सिंहाचा वाटा उचलू

नूतन कार्याध्यक्ष महेश जाध‌व म्हणाले, 'कोल्हापूरच्या परंपरेला साजेल, अशी भव्य प्रबोधनात्मक मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही. त्यासाठी प्रत्येकावर जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. जयंतीचे शिष्टमंडळाकडून मान्यवरांना आमंत्रण देण्यात येईल. तटाकडील तालीम मंडळाचा गेली दहा वर्षे अध्यक्ष असल्याने मिरवणुकीचे नियोजनाची परिपूर्ण माहिती आहे. एकेवर्षी मिरवणुकीसाठी निधीची कमतरता भासली. तेव्हा पदाधिकाऱ्यांनी सोने तारण ठेवून बँकेतून कर्ज घेतले. शाहू जयंती सोहळ्यासाठी सिंहाचा वाटा उचलला जाईल.'

००००

...तर आर. के. आमदार झाले असते

महेश जा‌धव म्हणाले, 'दिग्गज पदाधिकारी आणि अनुभवी कार्यकर्त्यांसोबत काम करण्याची संधी मिळत आहे. यापूर्वी शाहू जयंतीचे कार्याध्यक्षपद सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भूषविले आहे. नेटक्या नियोजनामुळे कोणतीही मिरवणूक यशस्वीपणे पार पाडली जाते. आर. के. पोवार यांचे कार्यही चांगले आहे. ते मुंबईत असते तर नक्कीच आमदार झाले असते.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


\Bजयसिंगपुरात हलक्या सरी\Bजयसिंगपूर शहर व

$
0
0

\Bजयसिंगपुरात हलक्या सरी

\Bजयसिंगपूर शहर व परिसरात रविवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. यामुळे आठवडी बाजारात खरेदीसाठी आलेले नागरिक व भाजी विक्रेत्यांची धावपळ उडाली. दुपारी सोसाट्याचा वारा सुरू झाला. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

\Bहुपरीत जोरदार

\Bहातकणंगले - हुपरी परिसरात सायंकाळी सहानंतर पावसाने सुमारे दीडतास जोरदार हजेरी लावली. रविवारी दिवसभर हुपरी परिसरात ढगाळ वातावरण झाले होते. हेरले, रुकडी, हातकणंगले, कुंभोज, पेठवडगाव, किणी, घुणकी परिसरात रात्री उशिरापर्यंत पावसाची रिमझिम चालू होती.

\Bराधानगरीत पुन्हा आगमन

\Bराधानगरी: मागील सहा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती पण रविवार पासून पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. तालुक्यातील बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तालुक्यातील जवळपास १०० टक्के पेरण्या काही भागात उगवल्या आहेत.पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. तर दिवसभर ढगाळ वातावरण होते.

\Bभुदरगडमध्ये तुरळक पाऊस

\Bगारगोटी : तालुक्याच्या सर्वच भागात आज तुरळक पाऊस सुरू झाला. पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक होता. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजास दिलासा मिळाला. या पावसाने अपुऱ्या पेरणीच्या कामास गती मिळाली आहे.

\Bकागलमध्ये पिकांना दिलासा

\Bकागल :तालुका आणि परिसरातही मृगाच्या पावसाच्या हजेरीने शेतकरी सुखावला आहे. काही शेतकऱ्यांनी भाताची धुळवाफ पेरणी केली आहे. तर इतर पिकांसाठी शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. गेल्या १५ दिवसांपासून वातावरणातील प्रचंड उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर माळरानावर असणाऱ्या व विहिरीच्या पाण्याची सोय नसणाऱ्या ठिकाणच्या पिकांना या पावसाने जीवदान मिळाले आहे. खडकेवाडा, लिंगनूर, गलगले, बेळुंकी, हमिदवाडा, मेतगे परिसरातील शेतीला तब्बल १५ दिवसांपासून पाणी नव्हते आज चिकोत्रा नदीत जोरदार मान्सून पावसाने हजेरी लावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जवानाची आत्महत्या

$
0
0

चंदगड: चिंचणे (ता. चंदगड) येथे गावच्या रोडलगत गळफास लावून लखन गंगाराम पाटील (वय २८, रा. दुंडगे, ता. चंदगड) या जवानाने आत्महत्या केली. ते सुटीसाठी गावी आले होते. पाटील हे आपल्या नवीन घरात झोपायले गेले होते. गेल्या काही दिवसांपासून ते निराश होते. नेहमीप्रमाणे ते नवीन घरात झोपायला गेले होते. शनिवारी सकाळी त्यांना उठवायला गेल्यानंतर त्यांनी गळफास घेतल्याचे कुटुंबीयांच्या समजले. पोलिसांनी पंचनामा करुन कोवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज मंडळ क्रेडिट सोसायटी सभा

$
0
0

वीज मंडळ क्रेडिट

सोसायटीची सभा उत्साहात

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'वीज कामगारांनी सहकारी संस्थेच्या सेवांचा लाभ घ्यावा. मात्र, सभासदांनी गरजेपुरतेच कर्ज काढावे', असे आवाहन वीज कामगार इंटकचे राज्याचे मुख्य महासचिव हिंदुराव पाटील यांनी केले. राज्य वीज कामगार काँग्रेस इंटकच्या अधिपत्याखाली विद्युत मंडळ कामगार सहकारी ग्राहक संस्थेची ४५ वी आणि विद्युत मंडळ कामगार सहकारी क्रेडिट संस्थेच्या ३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. ताराबाई पार्कातील चंदवाणी सभागृहात ही सभा झाली.

हिंदुराव पाटील म्हणाले, 'सहकारी ग्राहक संस्थेने १४ टक्के लाभांश आणि क्रेडिट संस्थेने १४. ५० टक्के लाभांश देऊन लौकिक निर्माण केला आहे.' ग्राहक संस्थेचे अध्यक्ष मधुकर तेलवेकर यांनी अहवाल वाचन केले. सचिव सुहास वडणगेकर यांनी इतिवृत्ताचे वाचन केले. क्रेडिट संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर पुरंदरे यांनी अहवाल वाचन केले. राजन कापसे यांनी अहवाल वाचन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सुभाष ढेरे, आनंदा चौगुले, बी. डी. शिंदे, मानसिंग चव्हाण, शिवानंद आहेरवाडी, संजय कावणेकर यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सुभाष ढेरे, सचिव चंद्रशेखर पुरंदरे, परिमंडळ सचिव कृष्णात पाटील, महापारेषणचे सर्कल सचिव मानसिंग चव्हाण उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साप्ताहिक बाजारभाव

$
0
0

साप्ताहिक बाजारभाव

००००

वांगी, मिरची वधारली

लिंबू कवडीमोल; फणसाची आवकेत मोठी वाढ

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मान्सून पावसाने अद्याप जोर धरला नसताना आणि आवक कायम असतानाही वांगी, मिरची, कोथिंबिरीचे दर चांगलेच वधारले आहेत. संपूर्ण उन्हाळ्यात भाव खाल्लेल्या लिंबूला मात्र कवडीमोल दर मिळत आहे. सरासरी एक रुपयाला एका लिंबूची विक्री होत असताना काही ठिकाणी १० रुपयांना १५ ते २० लिंबू मिळत आहेत. भाजीपाल्याची बाजारात अशी स्थिती असताना फणसाच्या आवक आणि मागणीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.

मान्सून पावसाला सुरुवात झाल्यानंतर भाजीपाल्याची आवक मंदावते. त्यामुळे दरात नेहमीच वाढ होत असते. यावर्षी मान्सून पावसाने अद्याप जोर धरला नसल्याने भाजीपाल्याची आवक नेहमीप्रमाणे सुरू आहे. तरीही दर मात्र वाढू लागले आहेत. मेथी, पालक, शेपू व पोकळा या पालेभाज्यांचा दर चांगलाच वाढला आहे. सर्वच पालेभाज्यांचा दर सरासरी १५ ते २० रुपयांवर पोहोचला आहे.

वांगी, ढबू मिरची, दोडका, कारलीच्या दरात किलोमागे सरासरी १० रुपयांची वाढ झाली आहे. या सर्वच फळभाज्यांचा दर ५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून वरणा बाजारात दाखल झाला असून, सरासरी ६० रुपये किलोने विक्री होत आहे. आवक वाढल्यानंतरच दर कमी येण्याची शक्यता आहे.

मे महिन्यापासून फणसाची आवक सुरू झाली होती. याच दरम्यान हापूस आंब्याची मागणी वाढल्याने फणसाला मागणी कमी होती. पण जूनच्या पहिल्या दिवसापासून पावसाला सुरुवात झाल्यानंतर हापूसची मागणी कमी होऊन फणसाच्या मागणीत वाढ झाली आहे. मागणीबरोबरच आवक वाढल्याने अनेक ठिकाणी फणस विक्रीचे स्टॉल दिसत आहेत. लक्ष्मीपुरी, गंगावेश, कपिलतीर्थ मार्केटसह अनेक ठिकाणी फणस विक्रीचे स्टॉल लावण्यात आले आहेत. सरासरी ४० ते १०० रुपये एका नगाचा दर आहे. त्याचबरोबर सुट्या गऱ्यांची विक्रीही मोठ्याप्रमाणात सुरू आहे.

......................

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो)

वांगी - ५० रु.

टोमॅटो - २० रु.

भेंडी - ४० रु.

ढबू मिरची - ४० रु.

जवारी गवार - ५० रु.

दोडका - ६० रु.

कारली - ५० रु.

वरणा - ६० रु.

ओली मिरची - ४० रु.

..............

कांदा - १२ ते १५ रु.

बटाटा - ३० रु.

लसूण - ३० रु.

आले - ११० रु.

................

पालेभाजी दर (पेंडी)

मेथी - २० रु.

पोकळा - १५ रु.

पालक - १० रु.

शेपू - १५ रु.

कोथिंबीर - २५ रु.

.................

फळांचे दर (प्रतिकिलो)

संत्री - १०० रु.

मोसंबी - ४० रु.

डाळिंब - २० ते ४० रु.

सफरचंद - १८० ते २०० रु.

चिकू - ४० रु.

केळी - २५ ते ३० रु. डझन

जवारी केळी - ४० ते ५० रु. डझन

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रा. पुष्पा भावेंना राजर्षी शाहू पुरस्कार

$
0
0

२६ जून रोजी वितरण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुरोगामी विचारांची पक्की बैठक, अन्यायाविरोधात लढणाऱ्यांना क्रियाशील पाठिंबा, सामाजिक प्रश्नांची तड लावण्यासाठी आंदोलनातील अग्रभागी राहणाऱ्या प्रा. पुष्पा भावे यांना यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर झाला. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने २६ जून रोजी शाहू जयंतीदिनी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रोख एक लाख रुपये, स्मृतीचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी पुरस्काराची घोषणा केली. मंगळवारी (ता. २६) सायंकाळी सहा वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन येथे श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. भावे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

ट्रस्टचे विश्वस्त डॉ. जयसिंगराव पवार यांनी भावे यांच्या निवडीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, 'सामाजिक क्षेत्रात असामान्य कामगिरीबद्दल आणि शाहू महाराजांच्या विचारांचा कृतीशील वारसा चालू ठेवणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून प्रा. भावे यांची ओळख आहे. समाज प्रबोधनाच्या वाटचालीमध्ये दीर्घकाळ दिलेल्या मौलिक योगदानाचा सन्मान यासाठी त्यांची निवड केली आहे. पुरोगामी विचाराच्या मध्यमवर्गीय घरामध्ये जन्मलेल्या पुष्पा भावे यांचे शिक्षण मुंबईतील एल्फिस्टन कॉलेज, पुण्यातील डेक्कन कॉलेज येथे झाले. मराठी व संस्कृत विषयांची उच्च पदवी त्यांनी संपादन केली आहे. मराठी साहित्य, सौंदर्यशास्त्र, नाट्यशास्त्र या क्षेत्रात सैद्धांतिक मांडणारी करणारे कसदार लेखन करत मराठी साहित्यात समीक्षक म्हणून त्यांना आदराचे स्थान आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून त्यांनी सार्वजनिक जीवनास प्रारंभ केला. शाहीर अमर शेखांच्या सानिध्यात लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या डाव्या विचारांच्या कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. गोवा मुक्ती आंदोलन, दलित पँथर चळवळ, आणीबाणीविरोधी लढा, मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ, डॉ. बाबा आढावांची एक गाव एक पाणवठा, हमाल पंचायत, देवदासी मुक्ती चळवळ, असंघिटत महिला कामगारांचे लढे, आंदोलन, चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग आहे. आजही त्यांचा सामाजिक चळवळींना सक्रीय पाठिंबा आहे.

राजर्षी शाहू पुरस्काराचे मानकरी

भाई माधवराव बागल (१९८४), श्रीमती मेहरुन्निसा दलवाई (१९८५), क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर (१९८६), चित्रपती व्ही. शांताराम (१९८७), शाहीरविशारद पिराजीराव सरनाईक (१९८८), डॉ. बाबा आढाव (१९८९), तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (१९९०), गुरु हनुमान सिंग (१९९१), साथी नानासाहेब गोरे (१९९२), बाबा नेसरीकर (१९९३), चंद्रकांत मांडरे (१९९४), वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज (१९९५), शंकरराव खरात (१९९६), मायावती (१९९७), रयत शिक्षण संस्था, सातारा (१९९८), न्या. पी. बी. सावंत (१९९९), रॅग्लर जयंत नारळीकर (२०००), आशा भोसले (२००१), राजेंद्र सिंह (२००३), जयमाला शिलेदार (२००५), यशवंतराव मोहिते (२००६), प्रा. एन. डी. पाटील (२००७), डॉ. भालचंद्र मुणगेकर (२००८), प्राचार्य शिवाजीराव भोसले (२००९), डॉ. आ. ह. साळुंखे (२०१०), प्राचार्य रा. कृ. कणबरक, बाबूराव धारवाडे (२०११), कॉ. गोविंदराव पानसरे (२०१२), प्राचार्य पी. बी. पाटील (२०१३), हिंदकेसरी गणपतराव आंदळकर (२०१४), भाई वैद्य (२०१५), शरद पवार (२०१६), डॉ. रघुनाथ माशेलकर (२०१७)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरातील ८४ जि. प. शाळा शिक्षकांविना

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील ८४ शाळांत कायमस्वरुपी एकही शिक्षक नसल्याने या शाळांना अजूनही कुलूप आहे. शाळा सुरू होऊन चार दिवस झाले तरीही शिक्षक न मिळाल्याने संबंधित शाळांतील विद्यार्थी अध्यापनापासून वंचित राहिले आहेत. आतंरजिल्हा बदलीने आल्यानंतरच तेथे पूर्णवेळ शिक्षक मिळणार आहे. अन्यथा जवळच्या शाळेतील शिक्षकांना अतिरिक्त कार्यभार देण्यात येणार आहे. सध्या पूर्णवेळ शिक्षकांविना शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे.

सरकारच्या शिक्षण विभागाने शिक्षकांच्या ऑनलाइन बदलीची प्रक्रिया राबविली. नव्या निकषानुसार वर्षानूवर्षे सुगम तालुक्यात नोकरी केलेल्या शिक्षकांची बदली दुर्गम तालुक्यात करण्यात आली. अनेक शिक्षकांनी दुर्गम तालुक्यातील पण सोयीच्या शाळांना प्राधान्य दिले. अतिदुर्गम ठिकाणच्या शाळांकडे त्यांनी पाठ फिरविली. यामुळे पन्हाळा, चंदगड, भुदरगड, गगनबावडा, शाहूवाडी तालुक्यातील बहुतांशी शाळांना एकही शिक्षक मिळाले नाहीत. सर्व शाळा १५ जून रोजी सुरू झाली. शिक्षक असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले. याउलट ८४ शाळांत शिक्षक नसल्याने तेथील शाळाच बंद राहिल्या. तेथील विद्यार्थी पहिल्या दिवशी स्वागत होईल, या अपेक्षेने मोठ्या आनंदात आले. शाळेला कुलूप पाहून त्यांना नाराज होऊन घरी जावे लागले.

चार वर्षापासून नवीन शिक्षक भरती नाही. डोंगराळ तालुक्यातील शाळांत जाऊन अध्यापन करण्याची मानसिकता नाही. यामुळे शून्य शिक्षकांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शिक्षक कोठून द्यायचा असा प्रश्न शिक्षण प्रशासनासमोर उभा आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून जवळच्या शाळेतील शिक्षकाकडे अतिरिक्त कार्यभार देण्याचे आदेश दिले आहेत. पण जवळच्या शाळेतील शिक्षकांनीही पाठ फिरविली आहे. तालुक्याच्या ठिकाणी किंवा जवळच्या चांगल्या शाळेत रोज पाल्यास सोडणे, आणण्यासाठीचा खर्च करण्याची कुवतही पालकांची नाही. यामुळे शून्य शिक्षकांच्या ८४ शाळांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.

शिक्षक नसलेल्या शाळा

पन्हाळा : गोठवे, पडसाळी, वाशी, पानारवाडी, इंनोळे, बांदीवडे, सुर्वेवाडी, मुडेकरवाडी.

चंदगड : बुजवडे धनगरवाडा, कानूर धनगरवाडा, काळगोंडवाडी, अडूरे, इनाम सावर्डे, शिप्पूर, नगरगाव, पारगड, मिरवेल, हंबीरे, किटवडे नवीन वसाहत, कलीवडे धनगरवाडा, खळणेकरवाडी.

हातकणंगले : भादोले शाळा क्रमांक दोन.

आजरा : पारपोली गावठाण.

भुदरगड : एरंडोळ धनगरवाडा, शिवडाव, मानी, धुरेवाडी, तळेवाडी, भटवाडी, कोल्हेवाडी, भारमलवाडी, खेलवाडी, डेळे, मोघोली धनगरवाडा. गगनबावडा : कातळी, काटेवाडी, सर्गी धनगरवाडा. राधानगरी :पाल, हसवे हरिजनवाडा, पादुकाचा धनगरवाडा, हुंबेवाडा, मधला धनगरवाडा, बागलवाडी, गावठाण, हुबळेवाडी, तोरस्करवाडी, बड्याचीवाडी.

शाहूवाडी : धाऊसवाडा, मानोली, चाळणवाडी, गणापूर, विशाळगड, केबुर्लेवाडी, केदारलिंगवाडी, पुसाळे, जावली धनगरवाडा, गोठवे, सावर्डी भैरीधन, इनोली, पिंगळेधन, गावडी, धुमकेवाडी, गवळेवाडी, बादेवाडी, बौद्धवाडी शेंबवणे, नवलाईदेवीवाडी, कुंभवडे, जाधववाडी, भिसेवाडी, क्रांतीनगर, पाटेवाडी, तळीचावाडा, अंबाईवाडी, खोतवाडा उखळू, चौकेवाडी, कुंभाचीवाडी, न्हाव्याचीवाडी, मायरेवाडी, बर्कीधन, नादारीधन, नादारीवाडी, कळकेवाडी, पारिवणे, गिरगाव.

आंतरजिल्हा बदलीतून येणाऱ्या शिक्षकांची नियुक्ती शिक्षक नसलेल्या शाळेत प्राधान्याने केली जात आहे. शिक्षण अधिकाऱ्यांना त्या शाळेत पूर्णवेळ शिक्षक मिळेपर्यंत तापुरत्या स्वरूपात सोय करण्याची सूचना दिली आहे. सर्व शाळांना शिक्षक देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नदीतील जलपर्णीवर फुटबॉल सामना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा,

पंचगंगा नदीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने अनोखे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. नदीला जलपर्णीचा विळखा पडल्याने मैदानसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शिवाजी तरुण मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळाच्या फुटबॉल टीम बोलावून प्रतिकात्मक सामन्याचे आयोजन केले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, 'पंचगंगा नदी विषारी बनली असून नदीत मैला सोडला जातो. विविध कारखान्यांची मळी सोडली जाते. यामुळे नदी प्रदूषित झाली असून जलपर्णीमुळे नदीची आताची स्थिती क्रीडांगणासारखी झाली आहे. याला कोल्हापूर महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे.'

यावेळी शिवसैनिकांनी महापालिकेच्या व प्रदूषण नियंत्रण महामंळाच्या विरोधात जोरात घोषणाबाजी केली. या आंदोलनात जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण देवस्थान समितीचे सदस्य शिवाजी जाधव, शियेचे सरपंच रणजित कदम, बाजीराव पाटील, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, तानाजी आंग्रे, शशी बिडकर आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, क्षेत्रअधिकारी संजय मोरे अविनाश कडले यांनी नदीतील पाण्याचे नमुने घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खंडपीठासाठी एकजुटीने आंदोलन

$
0
0

(फोटो आहे)

खंडपीठासाठी एकजुटीने आंदोलन

पदभार समारंभात नूतन अध्यक्ष अॅड. चिटणीस यांची ग्वाही

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'खंडपीठाचा प्रश्न निर्णायक टप्प्यावर आहे. सहा जिल्ह्यातील वकिलांची एकजूट करून नव्याने आंदोलन केले जाईल,' अशी ग्वाही कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे नूतन अध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस यांनी दिली. नूतन पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. १८) कार्यभार स्वीकारला. कसबा बावडा येथील जिल्हा कोर्टाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीत झालेल्या तिरंगी लढतीत अॅड. प्रशांत चिटणीस यांच्या पॅनेलने १५ पैकी १२ जागा जिंकत बाजी मारली. नूतन अध्यक्ष प्रशांत चिटणीस यांनी पदाधिकारी आणि कार्यकिरणी सदस्यांसह सोमवारी असोसिएशनचा कार्यभार स्वीकारला. जिल्हा कोर्टात आयोजित केलेल्या कार्यक्रमात मावळते अध्यक्ष अॅड. प्रशांत शिंदे यांनी नूतन अध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस यांचे स्वागत करून सूत्रे त्यांच्याकडे सोपवली.

यावेळी बोलताना अॅड. चिटणीस म्हणाले, 'सर्व वकिलांच्या पाठिंब्यामुळे बार असोसिएशनचे काम पाहण्याची संधी मिळाली आहे. सर्वांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही काम करू. आपल्या सगळ्यांसाठी खंडपीठाचा प्रश्न सर्वाधिक महत्त्वाचा आहे. गेल्या काही वर्षातील सातत्यपूर्ण आंदोलनांमु‌ळे हा प्रश्न निर्णायक टप्प्यावर आहे. राज्य सरकारसह मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे पाठपुरावा करून हा प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. यासाठी सहा जिल्ह्यातील वकिलांना भेटून खंडपीठ कृती समितीची पुनर्बांधनी केली जाईल. सर्व वकिलांच्या एकजुटीने खंडपीठ आंदोलन यशस्वी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.' मावळते अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा देऊन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी उपाध्यक्ष ए. बी. जाधव, सचिव सुशांत गुडाळकर, लोकल ऑडिटर धैर्यशील पवार, ज्येष्ठ वकील महादेवराव आडगुळे, माजी अध्यक्ष विवेक घाटगे, निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष पिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल, शिवाजीराव राणे, प्रकाश मोरे आदी उपस्थित होते.

..............

चौकट

खंडपीठाचे निमंत्रक माजी अध्यक्षच

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक असतात. डिसेंबरमध्ये झालेल्या खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत निमंत्रकांचा कालावधी दोन वर्षांचा करण्याचा ठराव मंजूर झाला आहे. यानुसार अॅड. प्रशांत शिंदे हेच आणखी एक वर्षासाठी निमंत्रकपदी कायम राहणार आहेत. नवीन ठरावामुळे वकिलांचे सर्वच गट खंडपीठ आंदोलनात सक्रीय राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजर्षी शाहू व्याख्यानमाल बुधवारपासून

$
0
0

साहित्य संस्कृती ... लोगो

............

राजर्षी शाहू

व्याख्यानमाला उद्यापासून

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे बुधवारपासून (२३) राजर्षी शाहू व्याख्यानमालेस प्रारंभ होत आहे. शाहीरी मुजऱ्याने व्याख्यानमालेस सुरुवात होणार आहे. बुधवारी (ता.२०) शाहीर संजय जाधव, शाहीर बाबासाहेब खांडेकर व शाहीर सखाराम चौगुले हे शाहीरी मुजरा व पोवाडा सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाहीर अंबादास तावरे भूषवणार आहेत. गुरुवारी (ता.२१) 'भारतीय राज्यघटना आणि धर्मनिरपेक्षता' या विषयावर असीम सरोदे यांचे व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थान प्रसाद कुलकर्णी भूषवणार आहे. शुक्रवारी (ता.२२) 'आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारत' या विषयावर डॉ. उत्तरा सहस्त्रबुध्दे यांचे व्याख्यान होणार आहे. तर 'राजर्षी शाहू आणि स्त्री दास्य विमोचन' या विषयावर डॉ. भारती पाटील यांचे व्याख्यान शनिवारी (ता.२३) होणार आहे. रविवारी (ता.२४) जयदेव डोळे यांचे 'बदलती प्रसार माध्यमे व जातीय हिंसाचार' या विषयावर व्याख्यान होणार आहे. सोमवारी (ता. २५) जून रोजी 'शेतकरी चळवळ आणि स्वामीनाथन आयोग' या विषयावर अमर हबीब यांचे व्याख्यान होणार आहे. व्याख्यानाचे अध्यक्षस्थान डॉ. जे.एफ.पाटील भूषवणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर कनेक्शनचा तपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटीने अटक केलेला संशयित आरोपी परशुराम वाघमारे याचा कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येतील संशयित समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्याशी संपर्क आल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीने या तिघांच्या कोल्हापूर कनेक्श्नबाबतच्या शक्यतांचा शोध सुरू आहे. या तिघांमधील संपर्काची चौकशी महाराष्ट्र एसआयटीकडून सुरू आहे. यासाठी तिघांचेही कॉल डिटेल्स तपासण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, कर्नाटक आणि महाराष्ट्र एसआयटीचा तपास समन्वयाने सुरू आहे. कोणत्याही क्षणी महाराष्ट्र एसआयटीचे पथक बेंगळुरूला रवाना होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कर्नाटक एसआयटीच्या अटकेतील संशयित आरोपी परशुराम वाघमारे हा हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील काही तरुणांशी त्याचा नियमित संपर्क होता. कॉम्रेड पानसरे हत्येतील संशयितांशीही वाघमारेचा संपर्क आल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र एसआयटीची कर्नाटकातील डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासावर नजर आहे. यापूर्वी अनेकदा महाराष्ट्र आणि कर्नाटक एसआयटीने माहितीची देवणा-घेवाण केली आहे. संशयित वाघमारेच्या अटकेनंतर तिन्ही हत्यांमध्ये एकच शस्त्र वापरल्याची शक्यता बळावल्याने पानसरे हत्येच्या तपासासाठी वाघमारेची चौकशी महत्त्वाची ठरणार आहे. तपास अधिकारी तिरुपती काकडे यांच्या नेतृत्वाखालील पथक कोणत्याही क्षणी बेंगळुरुला रवाना होणार आहे.

संशयित वाघमारेचा महाराष्ट्रातील वावर शोधण्याचे काम कर्नाटक एसआयटीकडूनही सुरू आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात कर्नाटक पोलिसांचे पथक कोल्हापुरात आले होते. त्या पथकाने काही लोकांची चौकशी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चाही केली होती. या चर्चेनंतरच वाघमारेची अटक झाल्याचे बोलले जाते. सध्या वाघमारेचा ताबा कर्नाटक एसआयटीकडे आहे. कर्नाटक एसआयटीचा तपास संपल्यानंतर त्याचा ताबा महाराष्ट्र एसआयटीला मिळू शकतो. मात्र, यासाठी कोर्टाची परवानगी घेणे गरजेचे आहे. वाघमारेसह अटकेतील उर्वरित संशयितांचा गायकवाड आणि डॉ. तावडे यांच्याशी संपर्क आल्याचा पोलिसांना संशय आहे. याचा शोध घेण्यासाठी सर्व संशयितांचे मोबाइल कॉल डिटेल्स तपासले जात आहेत. संबंधितांचे नातेवाईक आणि मित्रांचीही चौकशी सुरू आहे. त्यांनी ज्या संस्थांमध्ये काम केले आहे, त्या संस्थांशी संबंधित पदाधिकारीही तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. लवकरच त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यधुंद कारचालकाचा थरार

$
0
0

अल्पवयीन मद्यधुंद

कारचालकाचा थरार

लाइन बाजार परिसरात सुरक्षा भिंतीसह पाण्याची टाकी पाडली

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वाढदिवसाची पार्टी करून परत आलेल्या मद्यधुंद अल्पवयीन कारचालकाने रविवारी (ता. १७) मध्यरात्री लाइन बाजार परिसरात एका घराची सुरक्षा भिंत आणि पाण्याची टाकी पाडली. यात एका कारचेही नुकसान झाले. भरधाव वेगात आलेल्या कारने परिसरात थरार निर्माण झाला होता. मद्यधुंद कारचालकाच्या वडिलांनी नुकसान भरपाई देण्याचे कबूल केल्याने हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले नाही. याची चर्चा मात्र कसबा बावडा परिसरात सोमवारी दिवसभर सुरू होती.

लाइन बाजार परिसरातील एक सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगा वडिलांची कार घेऊन रविवारी रात्री मित्राच्या वाढदिवसासाठी गेला होता. मध्यरात्री तो मद्याच्या नशेत परत आला. लाइन बाजार येथील पद्मा पथक चौकात त्याचा कारवरील ताबा सुटला. भरधाव कारने रस्त्याकडेला पार्क केलेल्या एका कारला धडक दिली. यानंतर घराची सुरक्षा भिंत पाडून पाण्याची टाकीही पाडली. झाडला धडकून कार थांबली. मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक जमा झाले. नागरिकांनी अल्पवयीनास कारमधून बाहेर काढले, तेव्हा तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे लक्षात आले. कारच्या धडकेत नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त नागरिक शाहूपुरी पोलिस ठाण्यात निघाले होते. मात्र, मद्यधुंद तरुणाच्या वडिलांनी नुकसान भरपाई देण्याचे कबूल केल्याने या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजळाईवाडी तामगाव नेर्ली रस्ता पूर्वतत ठेवावा

$
0
0

फोटो

......

नेर्ली तामगाव रस्ता पूर्वतत ठेवा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी उजळाईवाडी नेर्ली तामगाव रस्ता बंद करण्यात येणार आहे. या रस्त्याला पर्यायी मार्ग होईपर्यंत हा मार्ग बंद करु नये, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी ग्रामस्थांच्यावतीने केली. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना मागणीचे निवेदन सोमवारी देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे , भारतीय विमानपतन प्राधिकरणाने विस्तारीकरण, आधुनिकीकरणासाठी २७४ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे. या निधीतून विस्तारीकरण आणि आधुनिकीकरणाची कामे सुरु झाली असल्याचे समजते. विमान विस्तारीकरणासाठी संपादित केलेल्या जागेत उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव या रस्त्याचा काही भाग येत आहे. त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधणे काम सुरु होणार असल्याने उजळाईवाडी-नेर्ली-तामगाव रस्ता बंद केला जाणार आहे. या मार्गाचा वापर उजळाईवाडी व कोल्हापूर परिसरातील नागरिक हुपरी एमआयडीसीकडे जाण्यासाठी करीत आहेत. हा मार्ग बंद केला जात असल्याने व पर्यायी मार्ग नसल्याने हुपरी एमआयडीकडे जाण्यासाठी दूरच्या अंतरावरुन जावे लागणार आहे. तर तामगावमधील नागरिकांना राष्ट्रीय महामार्गाकडे येण्यासाठी दुस­ऱ्या मार्गाचा वापर करताना गैरसोय होणार आहे. कोल्हापूर प्राधिकरण नुकतेच अस्तिवात आल्याने विमानतळ परिसर नजीकच्या गावातील पाणंद रस्ते, गाव रस्ते व नवे डी.पी. रोड बाबत धोरण ठरवण्यासाठी बराच कालावधी लागणार असल्याने तामगाव, उजळाईवाडी परिसरातील नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होणार आहे. जिल्हा प्रशासनाने उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव रस्त्याला पर्यायी मार्ग उपलब्ध होईपर्यंत व त्याबाबतचा निर्णय मार्गी लागेपर्यंत उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव रस्ता बंद न करता पूर्ववत चालू ठेवावा. शिष्टमंडळात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, गोकुळचे माजी संचालक प्रकाश चौगुले यांच्यासह उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव ग्रामस्थांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images