Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

विकासासाठी २४ लाख ६ हजार मंजूर

$
0
0

कोल्हापूर : जिल्ह्यातील दूधगंगा प्रकल्पांतर्गत कागल, करवीर, शिरेाळ, हातकणंगले तालुक्यांतील पुनर्वसित गावठाणमध्ये सेवासुविधा निर्माण करण्यासाठी २४ लाख ६ हजार रुपये मंजूर झाल्याची माहिती काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष गुंडोपंत पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली. या निधीतून कागल पुनर्वसन वसाहतीमध्ये क्रीडांगण संरक्षण भिंत बांधणे, ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, तर कसबा सांगावमध्ये स्मशानशेड बांधणे, मुडशिंगी वसाहतीमध्ये ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, दत्तवाड बाबराचीवाडी वसाहतीमध्ये ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, अब्दुललाट वसाहतीमध्ये बसथांबा बांधणे, पट्टणकोडोली वसाहतीमध्ये स्मशानशेड बांधण्याची कामे केली जाणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापूर आर्ट फाऊंडेशनतर्फे व्यंगचित्रांचे प्रदर्शन

$
0
0

आर्ट फाऊंडेशनतर्फे लहू काळे

यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर आर्ट फाऊंडेशनतर्फे शेतकऱ्यांच्या जीवनावर भाष्य करणाऱ्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरविले आहे. प्रसिध्द व्यंगचित्रकार लहू काळे यांनी ही व्यंगचित्रे रेखाटली आहेत. १७ ते २३ जून या कालावधीत शाहू स्मारक भवन येथील कलादालन येथे प्रदर्शन होणार आहे. प्रदर्शन कालावधीत व्यंगचित्रकार काळे यांना निमंत्रित केले आहे.

व्यंगचित्रकार काळे यांची चार हजारांहून अधिक व्यंगचित्रे प्रसिध्द झाली आहेत. मे २०१८ मध्ये त्यांची नोंद 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये झाली आहे. शाहू स्मारक भवन येथील प्रदर्शनात जवळपास १५० व्यंगचित्रे मांडली जाणार आहेत. सर्वच चित्रे 'शेतकऱ्यांची जीवनशैली' या विषयाशी निगडीत आहेत. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन देशातील अनेक शहरात झाले आहे. 'जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडताना त्यांना बळ देण्याचे काम ही व्यंगचित्रे करतात. शेतकऱ्यांचे मातीविषयी प्रेम, सकारात्मक भावना, संकटाला दोन हात करण्याच्या ताकदीचे दर्शन व्यंगचित्रांतून घडते, 'असे कोल्हापूर आर्ट फाऊंडेशनने प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. काळे हे मूळचे निकनूर येथील आहेत. ते पुण्यात केंद्रीय विद्यालयात अध्यापक म्हणून काम करतात. त्यांना आजपर्यंत कलारत्न, समाजभूषण, आदर्श शिक्षक, कलागुरु असे पुरस्कार मिळाले आहेत. रविवारी सकाळी दहा वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी कलाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आर्ट फाऊंडेशनचे उपाध्यक्ष अजेय दळवी, समन्वयक प्रशांत जाधव, डी. डी. पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगबहार

$
0
0

'रंगबहार'तर्फे रविवारी

निसर्ग चित्रण स्पर्धा

कोल्हापूर

कोल्हापूरच्या कला चळवळीशी निगडीत आणि नव्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या 'रंगबहार' या संस्थेला चाळीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने रविवारी १७ जून रोजी खुल्या निसर्गचित्रण स्पर्धेचे आयोजन केले आहे. टाऊन हॉल म्युझियम परिसरात ही निसर्ग चित्रण स्पर्धा होणार आहे. संस्थेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून रविवारी सकाळी नऊ ते दुपारी या वेळेत स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही. स्पर्धेनंतर लगेचच बक्षीस वितरण होईल. तसेच स्पर्धकांना त्यांच्या कलाकृती परत केल्या जातील. १५००, १००० आणि ५०० व प्रशस्तिपत्रक असे पुरस्काराचे स्वरुप आहे. स्पर्धकांनी रंगसाहित्य व कागद स्वत: आणावयाचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रलंबित गुन्ह्यांची उकल करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'घरफोडी, चेन स्नॅचिंग, वाहनचोरी अशा गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणात त्यांची उकल होण्याचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे प्रलंबित गुन्ह्यांची उकल करण्यासाठी सर्वच पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी विशेष नियोजन करावे. याशिवाय महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घ्यावी,' असे आदेश पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना क्राइम आढावा बैठकीत दिले. पोलिस अधीक्षक कार्यालयात गुरुवारी क्राइम आढावा बैठक पार पडली.

वाढते गुन्हे आणि त्यांची उकल करण्याच्या प्रमाणात विसंगती वाढत असल्याने पोलिस अधिकाऱ्यांच्या क्राइम आढावा बैठकीत यावर चर्चा झाली. यावर बोलताना अधीक्षक संजय मोहिते म्हणाले, 'अलीकडे घरफोड्या, चेन स्नॅचिंग आणि वाहनचोरीचे गुन्हे वाढले आहेत. ज्या तुलनेत गुन्हे घडत आहेत, त्या तुलनेत गुन्ह्यांची उकल होत नाही. प्रलंबित गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. सर्वच पोलिस ठाण्यांकडे असलेल्या प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा करण्यासाठी प्रयत्न करावेत. गरज पडल्यास सायबर पोलिस ठाणे आणि सीसीटीव्ही यंत्रणा, फोन कॉल्स तपासणी यासह आधुनिक साधनांचा वापर करावा. ज्या गुन्ह्यांची उलक झाली आहे, त्या गुन्ह्यातील जप्त मुद्देमालाची विल्हेवाट लावावी. चोरट्यांकडून मिळालेला मुद्देमाला कोर्टाच्या आदेशाने मूळ मालकांना परत करावा.'

कोल्हापूरसह परिक्षेत्रात महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे वाढल्याचे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'ने प्रसिद्ध केले होते. याची गांभीर्याने दखल घेत बैठकीत चर्चा करण्यात आली. निर्भया पथकांच्या कारवाईनंतरही महिलांचे विनयभंग वाढत आहेत, त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस अधिकाऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आदेश अधीक्षक मोहिते यांनी दिले. रमजान ईद आणि आषाढी यात्रा यासाठी बंदोबस्ताचे नियोजन करून आवश्यक त्या ठिकाणी जादा मनुष्यबळाची मागणी करावी. सर्व पोलिस ठाणी स्मार्ट करण्याचे काम सध्या सुरू आहे. महिन्याभरात हे काम पूर्ण करावे. पोलिस कल्याण विभागामार्फत पहिल्यांदाच पोलिसांसह त्यांच्या कुटुंबीयांना सहलींचे नियोजन केले आहे. याला पोलिसांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्याने सहलीसाठी बसच्या फेऱ्या वाढवल्या जाणार आहेत. सर्वच पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन अधीक्षक मोहिते यांनी केले.

बैठकीसाठी अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, श्रीनिवास घाडगे, उपअधीक्षक सतीश माने, शहर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, करवीरचे सूरज गुरव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह संजय मोरे, अनिल गुजर, औदुंबर पाटील, आदी, उपस्थित होते.

०००

चौकट...

खोटी फिर्याद दिल्यास कारवाई

खासगी सावकारी रोखण्यासाठी सावकारांच्या विरोधात तक्रारी देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. यानुसार तक्रारदार फिर्याद दाखल करीत आहेत. मात्र, तपासादरम्यान तक्रारदार माघार घेण्याचेही प्रकार वाढत आहे. खोटी तक्रार देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्यांच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिला आहे. गेल्या महिन्याभरात तीन तक्रारदारांनी ऐनवेळी माघार घेतल्याने खासगी सावकारांवरील कारवाई पुढे गेली नाही, त्यामुळे असा निर्णय घेतल्याचे मोहिते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वेच्छा निवृत्तीवर ठाम...

$
0
0

इंद्रजित देशमुख यांचा फोटो वापरावा....

'सेवानिवृत्तीनंतर दुष्काळग्रस्त,

शेतकऱ्यांसाठी काम करणार'

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी अजून आठ वर्षे नोकरी असताना स्वेच्छानिवृत्तीचे पत्र सरकारला दिले आहे. पत्रात त्यांनी घरगुती कारणामुळे निवृत्ती घेत असल्याचे म्हटले आहे. मात्र, बदली प्रक्रियेतील आर्थिक घडामोडीच्या क्लेषातून सरकारी सेवेला रामराम केल्याची चर्चा आहे. त्यांनी तो निर्णय मागे घ्यावा, यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर दबाव आणत आहेत. मात्र, ते स्वेच्छानिवृत्तीच्या निर्णयावर ठाम आहेत. निवृत्तीनंतर महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, दुष्काळग्रस्त लोकांसाठी काम करणार असल्याचे देशमुख गुरुवारी भेटायला आलेल्या प्रत्येकाला सांगत होते.

देशमुख यांनी यापूर्वी शिरोळ, पुणे येथे काम केले आहे. तीन वर्षांपासून जि. प. मध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत आहेत. बदलीसाठी पात्र असल्याने त्यांनी सातारा जि. प. देण्याची सरकारकडे विनंती केली. मात्र, त्या ठिकाणी मोठी किंमत मोजून दुसरे अधिकारी रुजू झाले. बदलीसाठी किंमत मोजणे देशमुख यांच्या तत्त्वात बसले नाही. ऑफर देऊनही किंमत मोजत नसल्याने त्यांना अकोला दाखविण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. अशाप्रकारच्या बदली प्रक्रियेतील कटू अनुभवामुळे आत्मक्लेषातून त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला. अर्ज मंजूर करून सरकार जुलैअखेर त्यांना सेवेतून मुक्त करेल. त्यानंतर ते सांगली जिल्ह्यातील माहोली या मूळ गावी वास्तव्य करणार आहेत. तेथून ते पहिल्यांदा महाराष्ट्रभर दौरा करून वंचित घटकांसाठी काम करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी काम करणारे अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्याशी प्राथमिक चर्चा केली आहे.

००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोर नायकवडीवर कारवाईचा प्रस्ताव

$
0
0

लाचखोर नायकवडीवर कारवाईचा प्रस्ताव

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सात-बारा उतारा देण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारणाऱ्या करवीर तहसीलदार कार्यालयातील वरिष्ठ लिपिक खैबर शरपुद्दीन नायकवडी (वय ५७, रा. नायकवडी गल्ली, कागल) याच्यावर कारवाई करावी, असा प्रस्ताव निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी तयार केला आहे. शुक्रवारी हा प्रस्ताव जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. नायकवडीवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाऊसिंगजी रोडवरील बीएसएनएल कार्यालयासमोर तीन हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नायकवडीला रंगेहात पकडले होते. पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे यांनी अटकेनंतर कारवाईसंदर्भातील अहवाल करवीर प्रातांधिकाऱ्यांकडे पाठवला. प्रातांधिकाऱ्यांकडून तो निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. नायकवडीवर कारवाई करावी, असा अहवाल दिला आहे.ॉ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी सावकाराचा जामीन फेटाळला

$
0
0

खासगी सावकाराचा जामीन फेटाळला

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खासगी सावकारी करणारा शिक्षक रघुनाथ ज्ञानदेव शिंदे (रा. नरतवडे, ता. राधानगरी) याचा जामीन दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी फेटाळला. शिंदे याने बेकायदेशीर खासगी सावकारी करून कर्ज वसुलीसाठी तगादा लावल्याने अशोक साताप्पा सुतार या तरुणाने आत्महत्या केली होती. याप्रकरणी राधानगरी पोलिसांनी खासगी सावकार शिंदे याला अटक केली आहे. त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. गुरुवारी जिल्हा कोर्टात सुनावणी झाली. मात्र, कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा भूमिका

$
0
0

मटा भूमिका :

कोल्हापूरच्या जनतेची कुचेष्टा थांबवा !

पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाला पर्यायी पूल उभारणीचे काम लालफितीच्या कारभारात लटकले आहे. ते आता पावसाळा संपल्यानंतरच सुरू करायचे, असा निर्धारच राष्ट्रीय महामार्ग विभागाने केलेला दिसतो. शिवाजी पुलाचे काम हा केवळ कोल्हापूरकरांसाठीच नव्हे, तर संपर्ण राज्यासाठी किंबहुना 'सुपरफास्ट' विकासाचे दावे करणाऱ्या सरकारसाठीही अतिमहत्त्वाचा आणि प्राधान्यक्रमाचा विषय असायला हवा होता. मात्र, विविध कारणे सांगून जी टोलवाटोलवी सुरू आहे, ती संतापजनक तर आहेच; पण कोल्हापूरच्या जनतेच्या संयमाचा बांध फोडणारीही आहे. लोकभावनेची अवहेलना करावी तर कशी, याचे ताजे उदाहरण म्हणून या पुलाच्या कासवगतीने सुरू असलेल्या कामाकडे पाहावे लागेल.

सरकारनेच दिलेल्या माहितीनुसार १० डिसेंबर २०१५ पासून पुलाचे काम बंद आहे. येत्या डिसेंबरमध्ये याला तीन वर्षे पूर्ण होतील. मूळ पर्यायी पुलाच्या कामाबाबत कोणतीही व्यवहार्यता न तपासता घाईघाईने दिलेली मंजुरी, त्यानंतर पुरातत्त्व खात्याची परवानगीच नसल्याचा झालेला साक्षात्कार, महाडजवळील सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेनंतर सरकारला आलेली जाग, पुलाच्या कामात संभाव्य अडथळा ठरणारे झाड, पाण्याचा हौद, त्याची पाडापाडी, पर्यावरणवाद्यांवर आगपाखड, यातूनच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची सर्वपक्षीय कृती समितीने घेतलेली झाडाझडती, यावर्षी जानेवारीत झालेल्या अपघातात १३ जणांचा गेलेला हकनाक बळी, पुरातत्त्व खात्याच्या हद्दीत हा पूल येतच नसल्याचा विनोद अशा असंख्य दिव्यातून पुलाचे काम कसेतरी रडतखडत सुरू (केवळ कागदावर) आहे. नियोजनशून्यतेचा हा मोठा दाखला ठरावा. पुलाचे काम सुरू करायचे सर्व मार्ग आता मोकळे झाले असे वाटत असतानाच पुलाचा शेवटचा रेलिंग पिलर उभारण्यासाठी जमिनीत आधार सापडेना झाला आहे. नवा पिलर तळापासून उभारावा लागण्याची शक्यता असल्याने साहजिकच पुलाचे स्ट्रक्चरल डिझाइन बदलावे लागणार आहे. त्यासाठी कोल्हापूरचे अधिकारी मुंबईतील संबंधित संकल्पचित्र मंडळाच्या अधिकाऱ्यांना भेटून आले. आता ते तीन दिवसांत येणार आहेत म्हणे! त्यांच्या दौऱ्यानंतर पाहणी, पुन्हा सर्वेक्षण, अहवाल, नवा आराखडा, मंजुरी, त्यासाठी नव्याने अंदाजपत्रकीय तरतूद, त्याला मंजुरी आणि त्यानंतर कामास झाली तर सुरुवात अशी मोठी अडथळ्यांची शर्यत बाकी आहे. हे अधिकारी दुसऱ्या दिवशी लगेच येऊ शकले नसते का? सरकारचे अधिकारीही किती तत्परतेने या कामामागे धावत आहेत, हे पाहून कोल्हापूरच्या जनतेची मोठी करमणूक होते आहे. वास्तविक आजवरच्या दिरंगाईसाठी, त्यामुळे वाढलेल्या खर्चाची, मध्यंतरी झालेल्या अपघाताची जबाबदारी निश्चित करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत. मुळातच या संपूर्ण कामाची, त्याच्या मुदतीत पूर्ततेची, कामाच्या दर्जाची आणि प्रगतीची माहिती याची एकखांबी जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही. आता ऐन पावसाळ्यात १३८ वर्षे जुन्या आयुष्य संपलेल्या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद करावी लागणार आहे. यामुळे होणार मन:स्ताप वेगळाच! एकूणच गेल्या सहा महिन्यांतील प्रयत्नांनंतरही पुलाचे काम इंचानेही पुढे सरकलेले नाही. पोस्टरबाज लोकप्रतिनिधींनी तोंडाला कुलूप लावले आहे. कोल्हापूरच्या जनतेची ही कुचेष्टा आतातरी थांबवा!

०००००००००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्यांनीही अनुभवला जीवनाचा आनंद!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. 'स्टार बझार'सारख्या मॉलमध्ये फेरफटका मारुन आवडणाऱ्या वस्तूची स्वत: खरेदी करणं, पीव्हीआरसारख्या थिएटरमध्ये जाऊन सर्वांसोबत सिनेमा पाहण्याची मजा लुटणं, संध्याकाळी रंकाळ्याच्या काठावर फेरफटका मारुन चाट, पाणीपुरी, आईस्क्रीमचा आस्वाद घेणं या गोष्टी 'सावली केअर सेंटर'तर्फे आयोजित निवासी स्वावलंबन शिबिराच्या समारोपाच्या पूर्वसंध्येला शिबिरार्थी मुलामुलींनी आयुष्यात प्रथमच अनुभवल्या. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्यांचे पालकही सुखावले नसते तरच नवल!

वेगवेगळ्या प्रकारचं अपंगत्त्व असणार्‍या व्यक्तींना सामाजिक जीवनातील छोट्या मोठ्या आनंदांपासूनही वंचित राहावं लागतं ही बाब लक्षात घेऊन या व्यक्तींना शक्य तितक्या प्रमाणात स्वावलंबी होण्यासाठी छोट्यामोठ्या युक्त्या शिकवणं, सार्वजनिक ठिकाणी वावरण्याच्या दृष्टीने त्यांना आत्मविश्‍वास देण्याचा प्रयत्न करणं आणि त्याचबरोबर आपण काहीच करू शकण्याच्या अवस्थेत नाही, या मानसिकतेतून त्यांना बाहेर काढून, तेही जीवनाचा आनंद घेऊ शकतात, याची जाणीव करुन देणं अशा उद्देशाने 'सावली केअर सेंटर'तर्फे निवासी स्वावलंबन शिबिर आयोजित केले होते. शिबिरार्थींना निरोप देण्याआधी त्यांनी त्यांच्या पालकांसह सिनेमागृह, मॉल, रंकाळा तलावाचा परिसर या ठिकाणी आवर्जून नेऊन वेगळे अनुभव घेतले. सेरेब्रल पाल्सी असणारी मुलं-मुली या शिबिराच्या निमित्तानं प्रथमच आईवडिलांपासून महिन्यासाठी दूर राहिली. महिन्याभरासाठी त्यांचं सगळं वेळापत्रक आणि वातावरणच या शिबिरामुळं बदलून गेलं होतं. परिणामी निरोप घेताना या मुलांच्या मनात हुरहूर होती त्याचप्रमाणे त्यांना निरोप देताना 'सावली केअर सेंटर'चे किशोर देशपांडे व त्यांचे सर्व सहकारी हेही भावविवश झाले. सर्वात बोलकी प्रतिक्रिया ही अनेक पालकांची होती. आपल्या मुलांना 'सावली'च्या रुपात त्यांचं असं नवं घर मिळालं, असं पालकांनी आवर्जून सांगितलं.

एक महिन्याच्या कालावधीत शिबिरार्थींमध्ये मानसिक, शारीरिक कौशल्ये आत्मसात करणे यादृष्टीने कोणते फरक पडले याच्या नोंदी 'सावली केअर सेंटर'ने ठेवल्या, त्याचबरोबर 'लोकमान्य हॉस्पिटल'च्या कोल्हापूर व गोव्यातील तज्ज्ञांकडून शिबिरार्थींच्या हाडांच्या स्थितीसह अन्य बाबींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीचे तिकीट आता राउंड फिगर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

इंधनाचे वाढते दर, खासगी प्रवासी वाहतुकीची समस्या आणि कामगारांची पगारवाढ यामुळे आर्थिक बोजा वाढलेल्या एसटी महामंडळाने भाडेवाढीचा निर्णय घेतला. शुक्रवारी साधारणपणे १८ टक्के भाडेवाढ होणार असून, शनिवार (ता.१६) पासून त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. प्रस्तावित भाडेवाढीविषयी गुरुवारी दिवसभर आकडेमोड सुरू होती. भाडेवाढीमुळे प्रवासीसंख्या घटण्याची भीती महामंडळाला आहे. दुसरीकडे नव्याने भाडेवाढ करताना तिकिटाची आकारणी पूर्ण रुपयांत होणार असल्याचे वृत्त आहे. यामुळे सुट्या पैशांमुळे वाहक व प्रवासी यांच्यात होणारा वाद टळणार आहे.

एसटी तिकीट पूर्ण रुपयांत नसल्यामुळे सुट्या पैशांचा वाद हा ठरलेला. वाहक आणि प्रवाशांदरम्यान सुट्या पैशांवरून वादाचे प्रसंग तर नित्याचे. वाद टाळण्यासाठी प्रस्तावित भाडेवाढीत तिकिटाची आकारणी राउंड फिगरमध्ये होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गुरुवारी रात्रीपासून भाडेवाढ लागू करण्याची शक्यता होती. १८ टक्के भाडेवाढीचा निर्णय झाला असला तरी प्रस्तावित भाडेवाढ किती असेल यावरून वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात होते. साधी बस, शिवशाही बससाठी आकारल्या जाणाऱ्या तिकिटात वाढ होणार असल्याने सर्वच घटकांतील प्रवाशांना भाडेवाढीची झळ बसणार आहे. कोल्हापूर विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्याही गुरुवारी दिवसभर मुंबईकडे नजरा लागल्या होत्या. तिकीट आकारणी पाच रुपयांच्या पटीत करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. प्रत्येक स्टेजला किती भाडे आकारणी होणार, कुठल्या पटीत असणार यासंबंधी नेमकी माहिती अधिकाऱ्यांनाही गुरुवारी दिवसभर होऊ शकली नाही.

कोल्हापूर विभागातून दररोज ९९०च्या आसपास एसटी बस सुटतात. या बसमधून वाहतूक करणाऱ्या प्रवाशांची संख्या चार लाख २५ हजारांहून अधिक आहे. जवळपास पाऊण कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न आहे. रोजचा खर्च, इंधन दर, देखभाल, दुरुस्ती, खासगी वाहतुकीचे आव्हान यामुळे एसटीच्या आर्थिक उत्पन्नावर मर्यादा पडत आहेत. दुसरीकडे एसटी महामंडळाने कामगारांसाठी ४,८४९ कोटी रुपयांची सुधारित वेतन कराराची घोषणा केली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर एसटीला भाडेवाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एकीकडे भाडेवाढ आणि दुसरीकडे प्रवासी घटण्याची भीती अशा दोलायमान स्थितीत एसटी महामंडळ असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

.......................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट सोने तपास एलसीबीकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कसबा बावडा शाखेतील बनावट सोने कर्ज प्रकरणाचा तपास शाहूपुरी पोलिसांकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी गुरुवारी दुपारी हे आदेश दिले. दरम्यान, या गुन्ह्यातील तिन्ही संशयित आरोपी पळाले असून, पोलिसांकडून शोध सुरूच आहे.

जिल्हा बँकेच्या कसबा बावडा शाखेत तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांमधील सुमारे एक किलो दागिने काढून त्या ठिकाणी बनावट दागिने ठेवून ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत कसबा बावडा शाखेतील शाखा मॅनेजर संभाजी शंकर पाटील (५६, रा. शिये, ता. करवीर), कॅशिअर परशुराम कल्लाप्पा नाईक (रा. साईनाथ कॉलनी, कसबा बावडा) आणि सराफ सन्मुख आनंदराव ढेरे (रा. कसबा बावडा) या तिघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. बँकेने केलेल्या अंतर्गत चौकशीत हे तिघेही दोषी आढळल्याने त्यांच्यावर बँकेने निलंबनाची कारवाई केली आहे. दरम्यान, पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईच्या भीतीने तिन्ही संशयितांनी पळ काढला आहे. शाहूपुरी पोलिसांनी सहा ठिकाणी छापे टाकून त्यांचा शोध घेतला. मात्र, ते सापडले नाहीत.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी गुरुवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपास वर्ग केला. निरीक्षक तानाजी सावंत यांनी तपासाची सूत्रे स्वीकारली आहेत. संशयितांच्या शोधासाठी तीन पथके तयार केली आहेत. त्यांच्या घरांसह नातेवाईक आणि पै-पाहुण्यांच्या घरांवर पोलिसांची नजर आहे. मोबाइल लोकेशनवरून त्यांच्या शोध घेतला जात आहे. मात्र, तिघांचेही मोबाइल बंद आहेत. लवकरच तिन्ही संशयितांना अटक केली जाईल, अशी माहिती निरीक्षक सावंत यांनी दिली. संशयितांना मदत करणाऱ्या सहकाऱ्यांची माहिती काढण्याचे काम सुरू आहे. विशेषत: बनावट दागिने तयार करून देणारे पोलिसांच्या रडारवर आहेत. लवकरच त्यांच्यावरही कारवाई होणार आहे.

००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर-बिदर रेल्वे सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर-बिदर रेल्वेला बुधवारी (१३) रात्री सुरुवात झाली. खासदार धंनजय महाडिक यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर रेल्वे मार्गस्थ झाली. यावेळी पुणे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोल्हापूर बिदर ही साप्ताहिक रेल्वे असून दर बुधवारी रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी कोल्हापूर स्थानकातून बिदरला रवाना होणार आहे. ही गाडी गुरुवारी सकाळी सव्वा दहा वाजता पोहचणार आहे. तसेच गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता बिदरहून पुन्हा ही रेल्वे कोल्हापूरकडे येणार असून गुरुवारी रात्री १२ वाजून ३५ मिनिटांनी कोल्हापुरात पोचणार आहे.

पुणे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर म्हणाले, 'कोल्हापूर स्थानकातील तीन प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्म वाढवल्यामुळे महालक्ष्मी एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या २० पर्यंत करणे शक्य होणार आहे. त्यासाठी १० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. कोल्हापूर मिरज हा एकच मार्ग आहे. जयसिंगपूर आणि हातकणंगले येथे क्रॉसिंग स्टेशन करण्याचा विचार आहे. त्यामुळे रेल्वेचा वेग वाढवण्यास मदत होऊ शकते.

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, 'रेल्वेस्थानकावर सुविधा देण्यासाठी प्रशासनाने तांत्रिक मदत करावी. निधीसाठी लोकप्रतिनिधी पाठपुरावा करतील. कोल्हापूर-मुंबई मार्गावर सुपरफास्ट गाडी सोडावी. कोल्हापूर-शिर्डी मार्गावर रेल्वे सुरू करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत.'

यावेळी पुणे विभागाचे कमर्शिअल मॅनेजर संजयकुमार दास यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ऑपरेशन मॅनेजर गौरव झा, रेल्वे सल्लागार समितीचे समीर शेठ, शिवनाथ बियाणी, मोहन शेटे, स्टेशन प्रबंधक ए. आर. फर्नांडिस, विजय कुमार, सी. टी. कळस्कर, अशोक कांबळे, एस. वाय. गायकवाड, एस. व्ही. देशपांडे, शिवाजी निकम आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशिक्षणार्थी डॉक्टर संपावर

$
0
0

सीपीआरमध्ये रुग्णांची गैरसोय,

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आपल्या विविध मागण्यांसाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी अनिश्चितकालीन संप पुकारला आहे. त्यामुळे उपचारासाठी जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहे. सीपीआरमध्ये रोजच्या उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या शेकडोच्या घरात आहे. उपलब्ध डॉक्टरांची संख्या येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत अपुरी आहे. सीपीआरमध्ये कार्यरत असणाऱ्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची संख्या १५० आहे.

राज्यात प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना दरदिवशी २०० रुपये प्रमाणे विद्यावेतन दिले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून वेतनवाढ करण्याची त्यांची मागणी आहे. वाढत्या महागाईच्या तुलनेत दरमहा सहा हजार रुपये वेतनावर काम करणे शक्य होत नाही. २०१५ साली सरकारने वेतनमान सहा हजाराहून वाढवून ११ हजार करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले होते. तसेच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन देण्यात आले होते. यावर ठोस कार्यवाही होत नसल्याने राज्यातील सर्व प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी सरकारविरोधात निदर्शने केली होती. तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्सच्या प्रतिनिधींना येत्या १५ दिवसात या विषयावर तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण गेल्या ३० ते ४० दिवसांपासून यावर निर्णय घेण्यात आलेला नसल्याने नाईलाजाने संपूर्ण राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स अनिश्चितकालीन संपावर जात असल्याचे पत्र गिरीश महाजन यांना देण्यात आल्याची माहिती सीपीआर हॉस्पिटल अस्मिचे सहसचिव डॉ. वैभव बागल यांनी दिली . यावेळी डॉ. बद्रीनाथ कदम, डॉ. हिमानी पाटील, डॉ.मुंतजीर सय्यद, अभिषेक मुळे, डॉ.ऐश्वर्या मुंडे उपस्थित होते.

.......................

इतर राज्यातील प्रशिक्षणार्थी

डॉक्टरांचे विद्यावेतन

उत्तर प्रदेश- १७ हजार ९००

कर्नाटक- १९ हजार ९७५

पश्चिम बंगाल- २१ हजार

केरळ- २० हजार

आसाम- २० हजार

छत्तीसगड -२० हजार

बिहार- ₹१५ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामविकासमध्ये बदलीचा बाजार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ग्रामविकास विभागातर्फे जिल्हा परिषद, पंचायत समिती, शिक्षण विभागाच्या बदलीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामध्ये बदलीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील मलईदार अधिकारीपदाचा दर २५ लाखांवर पोहोचला आहे. बदलीचा अर्ज मंत्रालयात संबंधित टेबलला गेल्यानंतर बदलीने मागितलेल्या जागेचा दर सांगितला जातो. त्यावर किती बोला, अशी बोली लावली जाते. तो दर न दिल्यास थेट विदर्भ, मराठवाड्यातील गैरसोयीचा जिल्हा, तालुका दाखवला जात आहे. परिणामी बदलीचे आकडे ऐकून प्रामाणिक, पारदर्शकपणे जनतेच्या सेवेसाठी नोकरी करणारे अधिकारी स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग पत्करत आहेत.

जून महिना सुरू झाल्याने विनंती, तक्रार, पात्र असलेले कर्मचारी, शिक्षक, अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. बदलीस पात्र अधिकारी, कर्मचारी महिन्याभरापासून सोयीच्या ठिकाणासाठी तालुका ते मंत्रालयापर्यंत सर्व पातळीवर प्रयत्न करीत आहेत. यावर्षी बदलीचे दर आवाक्याबाहेर पोहोचले आहेत. त्यामुळे त्यांच्यात प्रचंड अस्वच्छता निर्माण झाली आहे. सोयीचे ठिकाण हवे तर पैसे टाका नाही तर विदर्भ, मराठवाड्यात जा, असा थेट निरोपच मंत्रालयातून पोहोच होत आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेत वर्षभरात रुजू झालेल्या अधिकाऱ्यांनीही दिलेल्या पैशाचे दर उघडपणे चर्चिले जात आहेत. २० लाख रुपये मोजून आल्यानंतर विनापैशाची कामाची अपेक्षा कशी करायची, असा प्रश्नचिन्ह उभा राहत आहे. दिलेले पैसे काढण्यासाठीची वसुलीही सुरू झाली आहे. जि. प. मध्ये वाद्रगस्त ठरलेले अधिकारी मुदवाढसाठी किंमत मोजली. ते पैसे वसूल होण्याआधीच त्यांची बदली रायगड येथे झाली. पुन्हा ठरलेला दर देणे शक्य झाले नसल्याने त्यांना मराठवाडा दाखविण्यात आला. साताऱ्याहून येथे येण्यास इच्छुक असलेल्या अधिकाऱ्यास २५ लाखांचा निरोप मिळाला. मी प्रामाणिक अधिकारी आहे. मला इतके पैसे देणे शक्य नाही. त्यामुळे हवे तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात बदली करा, असे आव्हानच त्यांनी दिले. त्यांची बदली यवतमाळ येथे झाली.

येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत इंद्रजित देशमुख बदलीसाठी पात्र आहेत. त्यांच्या ठिकाणी येण्यासाठी प्रचंड रस्सीखेच झाली. पूर्वी जिल्ह्यात काम केलेल्या अधिकाऱ्याने २५ लाख किंमत मोजून बुकिंग केले आहे. बदलीचा आदेश अधिकृत निघण्याआधीच त्यांनी प्रांपचिक साहित्य येथे हलविले आहे. पैसे मोजल्याने त्यांना येथेच बदली होणार असल्याचा मोठा आत्मविश्वास असल्याची चर्चा आहे. अशाप्रकारे गावपातळीवर काम करणारे ग्रामसेवक, प्राथमिक शिक्षक ते जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये सोयीच्या आणि मोक्याच्या ठिकाणची बदली, बढतीसाठी पैसे गोळा करणारी यंत्रणा मंत्रालयापर्यंत कार्यरत असल्याचा आरोप होत आहे.

०००

चौकट...

११ महिने नोकरीसाठी सहा लाख

राधानगरी तालुक्यातील ग्रामविकासासंबंधीच्या एका अधिकाऱ्याची सेवानिवृत्ती ११ महिने शिल्लक आहे. त्यांनी आहे त्याच ठिकाणी किंवा कोल्हापूर जिल्ह्यात बदलीचे ठिकाण मिळण्यासाठी विनंती केली. त्यासाठी सहा लाख मोजावे लागतील, अस संदेश आला. त्यांनी दोन लाख देण्याची तयारी दर्शवली. इतकी कमी रक्कम मान्य न झाल्याने त्यांना थेट परभणी दाखविण्यात आले. बदलीचे ठिकाण कळाल्यानंतर त्यांनी सुरुवातीला मागितलेले सहा लाख देतो. मात्र, सोयीचे ठिकाण द्या, अशी विनंती केली. ती अमान्य करून ११ लाखांची मागणी झाली. हा आकडा ऐकून त्यांनी बदलीच्या ठिकाणी जाणे पसंत केले. शिरोळ तालुक्यातील एका अधिकाऱ्याने बदलीसाठी तीन लाख रुपये दोन महिन्यांपूर्वी मोजले. त्यांना पैसे दिल्याने हव्या असलेल्या ठिकाणी बदली होईल, याची खात्री होती. बदलीची प्रक्रिया अंतिम टप्यात आली. तरीही त्यांचे बदलीच्या यादीत नाव आलेले नाही. त्यामुळे दिलेले पैसेही गेले अन बदली नाही, असे अशी वेळ त्यांच्यावर सध्या आली आहे.

----------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

११ लाख किलो तूरडाळीचे वितरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तूरडाळीचे गेल्या दोन वर्षांत बंपर उत्पादन झाल्याने राज्य सरकारने रेशनवर तूरडाळ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हा पुरवठा कार्यालयाने सात महिन्यात तब्बल ११ लाख किलो तूरडाळ खपवली आहे. सरकारने रेशनवरील तूरडाळीचा दर ५५ रुपयावरुन ३५ रुपये करण्याचा आदेश दिला असून, रेशनकार्डधारक स्वस्तात तूरडाळ मिळणार असल्याने सामान्यांना तूरडाळीचा बाबतीत 'अच्छे दिन' आले आहेत.

दोन वर्षांपूर्वी तूरडाळीचे दर २०० रुपये झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडधान्याचे उत्पादन घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. मराठावाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तुरीचे उत्पादन घेतले. गतवर्षी पाऊस चांगले पडल्याने तुरीचे बंपर उत्पादन झाले. सरकारने शेतकऱ्यांची तूर खरेदी केली पण तुरडाळीचा बाजारात उठाव झाला नाही. त्यानंतर राज्य सरकारने रेशनवर तूरडाळ खपवण्याचा निर्णय घेतला. रेशनदुकानदारांसह शालेय पोषण आहार, अंगणवाडी, कारागृह, वसतीगृहांना तूरडाळ खरेदीचे बंधन घातले.

तूरडाळ खपवण्यास राज्यातील बहुतांशी सर्व पुरवठा कार्यालयाकडून टंगळामंगळ होत असताना कोल्हापूर जिल्हा पुरवठा कार्यालयाने तूरडाळ खपवण्याचे शिवधनुष्य पेलले. डिसेंबर २०१७ मध्ये तूरडाळीचा दर बाजारात ६० ते ६५ रुपये होता. त्यावेळी सरकारने रेशनवरील तूरडाळीचा दर ५५ रुपये निश्चित केला. राज्य पणन महामंडळाने तूरडाळ पॉलिश व पॅकेजिंग करुन तूरडाळीचा पुरवठा राज्यात केला. जिल्ह्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात २५५० क्विंटल तूरडाळ पाठवली. जिल्ह्यातील १५७२ रेशन दुकानात अन्न सुरक्षा लाभार्थ्यांना तूरडाळीचे वाटप करण्यात आले. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात २९०० क्विंटल तूरडाळ पाठवण्यात आली. ही तूरडाळ ग्राहकांनी खरेदी केली. साडेपाच लाख लाभार्थ्यांना दोन टप्प्यात तूरडाळीचे वाटप करण्यात आले.

२०१७/२०१८ मध्ये तूरडाळीचे चांगले उत्पादन झाल्याने राज्य सरकारने पुन्हा प्रत्येक जिल्ह्यात तूरडाळ पाठवली. जिल्ह्यात १७ मार्च २०१८ मध्ये २८९० क्विंटल तर ४ मे रोजी २९०० क्विंटल तूरडाळीचा दुसरा स्टॉक आला. दोन हप्त्यात ११ लाख २३८.७५ क्विंटल तूरडाळ रेशनवरील ग्राहकांनी खरेदी केली. ५५ रुपये तुरडाळीची विक्री केल्यानंतर प्रतिकिलो तीन रुपये कमिशन रेशन दुकानदारांना देण्यात आले. जिल्हा पुरवठा विभागाने द्वारपोच योजनेद्वारे प्रत्येक दुकानात वेळेवर तूरडाळ पोचवल्याने तूरडाळीचे वाटप झाले.

पाच जून २०१८ रोजी राज्य सरकारने रेशनवरील तूरडाळीचा दर ५५ रुपयावरुन ३५ रुपये इतका कमी केला आहे. वीस रुपयाने तूरडाळीचा दर कमी झाल्याने ग्राहक तूरडाळीच्या प्रतिक्षेत आहेत. दोन वर्षापूर्वी तूरडाळीचा दर २०० रुपयापर्यंत पोचला होता. त्यावेळी सर्वसामान्यांच्या आहारात डाळ गायब झाली होती. पण आता तूरडाळीचा दर कमी झाल्याने सर्वसामान्यांना तूरडाळ खाणे परवडू लागले आहे.

०००००

जिल्हा पुरवठा कार्यालयाने द्वारपोच योजनेद्वारे तूरडाळ प्रत्येक रेशन दुकानात पाठवली. रेशन दुकानदारांनीही सरकारच्या उपक्रमाला सहकार्य केले. त्यामुळे ११ हजार २३८.७५ क्विंटल तूरडाळ ग्राहकापर्यंत पोचवण्यात यश आले.

विवेक आगवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी

००००

तूरडाळीचा टप्पा तारीख प्राप्त तुरडाळ

पहिला टप्पा ११डिसेंबर २०१७ २५४८.७५ क्विंटल

दुसरा टप्पा २८ डिसेंबर २०१७ २९०० क्विंटल

तिसरा टप्पा १७ मार्च २०१८ २८९० क्विंटल

चौथा टप्पा ४ मे २०१८ २९०० क्विंटल

एकूण ११,२३८.७५ क्विंटल

...........................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ. पद्मा रेखा जिरगे यांच्या वंध्यत्वावरील संशोधनास जागतिकस्तरावर मान्यता

$
0
0

फोटो आहे

...................

वंध्यत्वावरील संशोधनात कोल्हापूरची मोहोर

डॉ. पद्मरेखा जिरगे यांचा संशोधन प्रकल्प आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्त्रियांच्या जननेंद्रियांच्या क्षयरोगामुळे गर्भनलिकेसह गर्भाशयावर विपरित परिणाम होतो. यातून मोठ्या प्रमाणात वंध्यत्वाची समस्या निर्माण होत आहे. अशाप्रकारची समस्या भेडसावणाऱ्या स्त्रियांची तपासणी करून संशोधित केलेल्या उपचारपद्धतीवर आधारीत संशोधन प्रकल्पाला जागतिक दर्जाच्या ह्यूमन रिप्रॉडक्शन या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये स्थान मिळाले आहे. या विषयावर झालेले हे जगातील पहिले संशोधन असल्याचा दावा संशोधक व कोल्हापुरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पद्मरेखा जिरगे यांनी पत्रकार परिषदेत केला. जगातील अशाप्रकारच्या संशोधनात यानिमित्ताने जागतिक स्तरावर कोल्हापूरच्या वैद्यकीय प्रगतीची मोहोर उमटली आहे.

या संशोधनाबाबत सविस्तर माहिती देताना डॉ. जिरगे म्हणाल्या, 'वंध्यत्वाची समस्या असलेल्या जोडप्यांचा अभ्यास करून हे संशोधन करण्यात आले आहे. यासाठी ८५० महिलांच्या गर्भाशय व जननेंद्रियाची तपासणी करण्यात आल्यानंतर त्यापैकी ३९५ महिलांच्या गर्भाशयात क्षयरोगाचे जंतू आढळून आले. संशोधनासाठी निवडण्यात आलेल्या महिलांचे वय २१ ते ३८ या गटातील होते. एका महिलेच्या चाळीस प्रकारच्या नोंदी या संशोधनासाठी करण्यात आल्या. गर्भधारणा होण्यासाठी अनेक उपचार घेतल्यानंतरही अपेक्षित परिणाम न दिसलेल्या महिलांची तपासणी या संशोधनासाठी महत्त्वाची ठरली असून त्यामुळे महिलांच्या जननेंद्रियातील क्षयरोग वंध्यत्वासाठी कारणीभूत ठरत असून त्याचे स्त्रीबीजावरील होणारे विपरित परिणाम याची शास्त्रीय मिमांसा यासंशोधनात करण्यात आली आहे. २०१० पासून ही समस्या निदर्शनास आली. त्यानुसार संशोधन सुरू करण्यात आल्यानंतर २०१३ मध्ये स्त्री जननेंद्रियांमधील क्षयरोगाच्या जंतूंचे निदान झाले. त्यानंतर यासाठी तपासणी व उपचार पद्धती विकसित करण्यात आली. याबाबतचा अहवाल बंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टी.बी. कंट्रोल या संस्थेकडे पाठवण्यात आल्यानंतर या संशोधनाच्या जागतिक प्रवासाला खऱ्याअर्थाने वेग आला. ह्यूमन रिप्रॉडक्शन या आंतरराष्ट्रीय जर्नलच्या संपादकांनी, क्षयरोगाचा अधिकाधिक धोका असलेल्या चीन, अफ्रिका, भारत, दक्षिण अमेरिका येथील महिलांना या संशोधनाचा फायदा होऊ शकतो असा शेरा दिला आहे.

सुप्तावस्थेतील क्षयरोगाचे निदान करताना येणारे अडथळे, विशिष्ट टेस्ट करण्याची गरज, व निरीक्षणावर आधारीत उपचार ही या संशोधनाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. संशोधनातील उपचार पद्धतीचा अवलंब केल्यानंतर तपासणी केलेल्या महिलांपैकी ५४ महिलांना एका वर्षाच्या कालावधीत गर्भधारणा झाली. या संशोधनामध्ये डॉ. जिरगे यांना शुती चौगुले, डॉ. अजय केणी, डॉ. सुमा कुमार आणि डॉ. दिपक मोदी यांचे सहकार्य लाभले.

कोट

'मुळातच स्त्री बीजांची संख्या कमी असलेल्या स्त्रियांमध्ये गर्भधारणेची शक्यता कमी असते. या निष्कर्षाच्या आधारे या संशोधनातून, वंध्यत्व असलेल्या स्त्रियांमध्ये सुप्त अवस्थेतील क्षयरोग आढळल्यास स्त्रीबीज संख्या कमी होते व त्यामुळे अंडाशयाची कार्यक्षमता व गर्भधारणेची शक्यता कमी होते. अशा स्त्रियांमध्ये क्षयरोगाचे योग्य उपचार झाल्यास स्त्रीबीजांची कार्यक्षमता व गर्भधारणेची शक्यता वाढते हे सिद्ध करण्यात आले आहे.

डॉ. पद्मरेखा जिरगे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर राष्ट्रवादी निवड

$
0
0

राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्षांच्या

नियुक्त्या लांबणीवर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सांगली, सातारा व सोलापूर जिल्हाध्यक्षांच्या निवडी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरूवारी जाहीर केल्या. पण कोल्हापूर जिल्हा व शहराध्यक्षांच्या नियुक्त्या लांबल्याने उलटसुलट चर्चेला वेग आला आहे. शहराध्यक्षपदसाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्यानेच या निवडी लांबल्याचे समजते.

राष्ट्रवादी पक्षाने दोन महिन्यापूर्वी राज्यातील सर्व शहर व जिल्हाध्यक्षांची नावे प्रदेशपातळीवर मागवून घेतली होती. जेथे इच्छुक जास्त होते, तेथे अनेकांची नावे कळवण्यात आली होती. त्यातून प्रदेशाध्यक्षाकडून एका नावाची घोषणा होणार होती. गुरूवारी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी राज्यातील एकवीस जिल्हाध्यक्षांची नियुक्ती जाहीर केली. त्यामध्ये सुनील माने यांची सातारा, विलासराव शिंदे यांची सांगली तर दीपक साळुंखे यांची सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शेजारच्या तीन जिल्ह्यातील अध्यक्षांची नियुक्ती केली असताना कोल्हापूर मात्र लांबणीवर टाकण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी ए.वाय. पाटील यांचे एकमेव नाव पाठवण्यात आले आहे. मात्र शहराध्यक्षपदी आर.के. पोवार, राजू लाटकर व अदिल फरास या तिघांची नावे पाठवण्यात आली आहेत. तिघांनीही आग्रह धरल्याने कुणाला संधी द्यायची असा प्रश्न प्रदेशाध्यक्षांना पडला आहे. यामुळे शहर व जिल्हाध्यक्ष या दोन्ही नियुक्त्या लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई पगारी पुजारीपदाकडे पाठ

$
0
0

पॉइंटर

पगारी पुजारीपदासाठी एकूण ११३ अर्ज

६ महिला अर्जदार पुजारीपदासाठी इच्छुक

५५ घराण्यांतील एकाही विद्यमान पुजाऱ्याचा अर्ज नाही

१९ ते २१ जून या कालावधीत मुलाखतीची प्रक्रिया

वरिष्ठतेनुसार तीन टप्प्यांत मुलाखत प्रक्रियेचे नियोजन

निवड प्रक्रियेसाठी सहा सदस्यांची नियुक्ती

००००

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिरातील पगारी पुजारी नेमण्याबाबत केलेल्या कायद्याच्या प्रस्तावानुसार पगारी पुजारीपदासाठी ११७ अर्ज दाखल झाले असून, यामध्ये ६ महिलांचा समावेश आहे. मात्र, सध्या अंबाबाई मंदिरात पुजारी म्हणून कार्यरत असलेल्या ५२ घराण्यांतील एकाही विद्यमान पुजाऱ्याने सरकारी पुजारीपदासाठी अर्ज केलेला नाही. विद्यमान पुजाऱ्यांसह सेवेकऱ्यांनी या पदासाठी स्वारस्य न दाखवत पगारी पुजारीपदाकडेच पाठ फिरवली आहे. दरम्यान १९ ते २१ जून या कालावधीत पगारी पुजारीपदासाठी मुलाखती घेण्यात येणार असून, यासाठी सहासदस्यीय समितीची नियुक्ती केली आहे. जुलैअखेर नियुक्तीची अंतिम यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी जून महिन्यात पुजारी अजित ठाणेकर यांनी अंबाबाईला पारंपरिक साडीऐवजी घागरा-चोली पेहराव परिधान केला होता. या प्रकारावरून भाविकांमध्ये संतप्त भावना उमटल्या होत्या. तसेच अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समितीने आठ महिने केलेल्या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारच्या विधी व न्याय खात्याच्या पुढाकाराने पंढरपूरच्या धर्तीवर अंबाबाई मंदिरातील सध्याचे पुजारी हटवून सरकारी पगारी पुजारी नेमण्यासंदर्भात विधेयक विधानसभा व विधानपरिषदेत मंजूर केले. २८ मार्चला विधेयक मंजूर झाल्यानंतर १२ एप्रिलला कायद्याचा मसुदा तयार केला. दरम्यान, अद्याप कायद्याची अंमलबजावणी झाली नसली तरी पगारी पुजारी नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना राज्याच्या विधी व न्याय मंत्रालयातर्फे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पगारी पुजारीपदासाठी अर्ज करण्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती. या पदासाठी आलेल्या अर्जांच्या पार्श्वभूमीवर निवड प्रक्रिया कशी राबवायची यासाठी १३ जूनला मुंबईत बैठक घेण्यात आली.

पगारी पुजारीपदासाठी एकूण ११३ अर्ज आले असून, १०७ अर्ज पुरुष उमेदवारांनी, तर ६ अर्ज महिला उमेदवारांनी केले आहेत. अंबाबाईच्या नित्य पूजाविधींसह मंत्रपठण, धार्मिक विधी, साडी पेहराव, नैवेद्य, सण उत्सवातील विशेष पूजा असे महत्त्वाचे विधी योग्यप्रकारे करणाऱ्या तसेच पौरोहित्य व अंबाबाईच्या धार्मिक विधींचे ज्ञान असलेल्या अर्जदारांना निवडप्रक्रियेत प्राधान्य देण्यात येणार असल्यामुळे सध्या अर्जांची छाननी सुरू आहे.

समितीमध्ये धार्मिक अभ्यासक गणेश नेर्लेकर, संस्कृत भाषातज्ज्ञ प्रा. शिवदास जाधव, देवस्थानचे सचिव विजय पोवार, सदस्य शिवाजीराव जाधव, संगीता खाडे व शंकराचार्य पीठाचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. ११ प्रमुख पुजाऱ्यांसह ३५ सहायक पुजारी अशी एकूण ५५ पुजारी व सेवेकऱ्यांची आवश्यकता असल्यामुळे वरिष्ठतेनुसार तीन टप्प्यांत निवड प्रक्रियेंतर्गत मुलाखती घेण्यात येणार आहेत.

०००

पात्रतानिकष होणार कठोर

पगारी पुजारी नियुक्तीसाठी निवडण्यात येणाऱ्या पुजाऱ्यांसाठी धार्मिक ज्ञान, मंदिरातील विधींची माहिती, मंत्रपठण, देवीला साडी परिधान करण्याचे तंत्र, वैदिक प्रमाणपत्र यासह अनुभवाला प्राधान्य देण्यात येणार आहे.

00000000000000000000

कोट...

पगारी पुजाऱ्यांच्या नियुक्तीबाबत अंतिम अधिकार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारीत ठेवला आहे. सध्या केवळ ब्राह्मण कुटुंबातील पुजाऱ्यांना हक्क होता. मात्र, नव्या कायद्यानुसार जातीची चौकट पुजारी नियुक्तीसाठी काढून टाकली असून, कोणत्याही जातीची अर्जदार व्यक्ती पात्रतानिकषानुसार पगारीपुजारी म्हणून निवडप्रक्रियेत समाविष्ट होऊ शकणार आहे. मात्र ती व्यक्ती चांगल्या वर्तणुकीची असावी. नियुक्तीनंतर पुजाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

महेश जाधव, अध्यक्ष, देवस्थान समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन

$
0
0

कोंम्बिंग ऑपरेशनसह ओपन बारवर कारवाई

तडीपार गुंडास अटक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आणि शहरातील गुन्हेगारांवर वचक निर्माण करून पोलिसांनी बुधवारी (ता. १३) रात्रीपासून गुरुवारी (ता. १४) पहाटेपर्यंत शहरात कोम्बिंग ऑपरेशन केले. या कारवाईत एक तडीपार गुंड पोलिसांच्या हाती लागला. याशिवाय रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या बिअरबारसह ओपन बारवरही पोलिसांनी कारवाई केली. यात २२ अधिकाऱ्यांसह शंभरहून अधिक पोलिसांनी सहभाग घेतला.

शहरात चोरी, लूटमार, मारामारी, दहशत माजवण्याचे प्रकार वाढत आहेत. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी रेकॉर्डवरील सराईतांवर पोलिसांची नजर आहे. झोपडपट्टी परिसरात तडीपार गुन्हेगार लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांची धरपकड करण्यासाठी शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी २२ अधिकारी आणि १०० हून अधिक पोलिसांसह शहरात कोम्बिंग ऑपरेशन केले. सदर बाजार, कनाननगर, यादवनगर, जवाहरनगर, राजेंद्रनगर या भागात एकाच वेळी राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ओंकार विनायक आरगे (वय २३, रा. म्हाडा कॉलनी, शास्त्रीनगर) हा तडीपार गुंड पोलिसांच्या हाती लागला.

पोलिसांनी रात्री १२ ते पहाटे ४ पर्यंत लिशां हॉटेल, संभाजीनगर, सायबर चौक, शिवाजी पूल या ठिकाणी नाकाबंदी करून दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी केली. वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहने चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. शंभर ते सव्वाशे पोलिसांची कुमक रात्रभर रस्त्यावर होती. मध्यवर्ती बसस्थानक, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, स्टेशन रोड, शाहूपुरी या हद्दीतील लॉजची तपासणी करून संशयितांकडे चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत बिअर बार, दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता प्रस्थापित राहावी यासाठी शहर उपअधीक्षक कार्यालयात गुरुवारी दक्षता समितीची बैठक पार पडली. या बैठकीला दक्षता समितीचे सदस्य आणि शहरातील सर्व पोलिस अधिकारी उपस्थित होते.

चौकट... ओपनबारवर कारवाई

मध्यवर्ती बसस्थानक, कावळा नाका, रुईकर कॉलनी, शेंडा पार्क, आदी परिसरात पोलिसांनी ओपन बारवर कारवाई केली. याशिवाय उद्याने, मोकळी मैदाने आणि फुटपाथवर बसून मद्यपान करणाऱ्यांना पकडून समज देण्यात आली. पोलिसांकडून कारवाईसुरू असल्याचे लक्षात येताच अनेकांनी पळ काढला. ही कारवाई यापुढेही सुरू ठेवली जाणार असल्याची माहिती उपअधीक्षक अमृतकर यांनी दिली.

०००००००००००००००००००००

खासगी सावकार महिलेसह

दोघांवर गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पतीच्या आजारपणात उपचारासाठी खासगी सावकार महिलेकडून घेतलेल्या एक लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड करूनही आणखी अडीच लाखांच्या मागणीसाठी दमदाटी करणाऱ्या खासगी सावकार महिलेविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. महादेवी बाळेस खडी (रा. सानेगुरुजी वसाहत) असे गुन्हा दाखल झालेल्या खासगी सावकार महिलेचे नाव आहे. तिच्या साथीदारावरही गुन्हा दाखल झाला आहे. बाळाबाई संगाप्पा वडेर (वय ४५, रा. शाहूपुरी) या महिलेने फिर्याद दाखल केली.

पतीच्या आजारपणावरील उपचारासाठी बाळाबाई वडेर हिने दरमहा १० टक्के व्याजाने महादेवी खडी हिच्याकडून दरमहा १० टक्के व्याजाने एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. १२ जून २०१५ पासून जून २०१८ पर्यंत ३ लाख ६० हजार रुपये परत केले होते. तरीही अडीच लाख रुपये देणे लागत असल्याचे सांगून वडेर यांच्या दारातील ट्रॅक्टर आणि ट्रॉली ओढून नेली. याबाबत वडेर यांनी गुरुवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन महादेवी खडी या महिलेसह तिच्या साथीदाराच्या विरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षा ड्रायव्हरमुळे जीवदान

$
0
0

सोशल मीडियामुळे

मुलांना मिळाली आई

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आर. के. नगर परिसरात रस्त्यावर भांबावलेल्या स्थितीत ८० वर्षांची वृद्धा फिरत होती. रिक्षाचालक विशाल आनंदराव सातपुते यांनी त्या वृद्धेची चौकशी केली. तिची कुणाकडून फसवणूक व अंगावरील दागिन्यांची लुबाडणूक होऊ नये म्हणून तिला राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी बिनतारी संदेशाद्वारे जिल्हाभर माहिती दिली. तसेच सोशल मीडियावरून आवाहन केले. त्यानुसार गोकुळ शिरगाव येथील त्यांची मुले पोलिस ठाण्यात दाखल झाली आणि त्यांनी आईला घरी नेले. तसेच पोलिस व रिक्षाचालकाचे आभार मानले. सोशल मीडियामुळे आई मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. गोकुळ शिरगाव येथील पार्वती महादेव पाटील असे या वृद्धेचे नाव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images