Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कसबा बावडा शाखाधिकारी, कॅशिअर निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कसबा बावडा शाखेतील अपहारप्रकरणी शाखाधिकारी संभाजी शंकर पाटील (रा. शिये), कॅशिअर परशराम कल्लाप्पा नाईक (रा. कसबा बावडा) यांना बुधवारी जिल्हा बँकेने निलंबित केले, तर सराफ सन्मुख ढेरे यांना पॅनलवरुन काढून टाकण्यात आले.

जिल्हा बँकेच्या कसबा बावडा शाखेत तारण ठेवलेले सोने बनावट असल्याचे समोर आल्यानंतर शाखेतील मुदत संपलेल्या १९९ सोने तारणांमधील जिन्नसांची पडताळणी करण्यात आली. चौकशी अधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळणीमध्ये ३२ प्रकरणे संशयित होती. त्यापैकी २७ तारण प्रकरणांमध्ये सुमारे ३२ लाखांचा अपहार झाला असल्याचे स्पष्ट झाले. अपहारामध्ये सकृतदर्शनी दोषी असलेल्या शाखाधिकारी, कॅशिअर व सराफ यांच्यावर मंगळवारी शाहूपुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

त्यानंतर बँकेने कारवाई करताना शाखाधिकारी पाटील व कॅशिअर नाईक यांना निलंबित केले. सराफ ढेरे यांना पॅनलवरुन कमी केले आहे. शाखाधिकारी पाटील यांचा तात्पुरता कार्यभार अकाउंटट तर कॅशिअर नाईक यांचा पदभार लेखापालांकडे देण्यात आल्याची माहिती सीईओ डॉ. ए. बी. माने यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रक्तदाता दिवस

$
0
0

रक्तदाता दिवस

००००००

सीपीआर ब्लड बँकेची दमछाक

रक्ताच्या मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीमुळे रुग्णांची गैरसोय; तरुणाईत जाणीवजागृतीची गरज

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet-sachinpMT

कोल्हापूर : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. त्यातून कुणाचा तरी जीव वाचवला जाऊ शकतो. अनेकदा तातडीने रक्ताची गरज निर्माण होते तेव्हा रक्तपुरवठा करताना मुबलक साठ्यासाठी ब्लड बँकांना रक्तदाते उपलब्ध होणे गरजेचे असते. रक्तदात्यांची संख्या वाढत असली तरी मागणी आणि पुरवठा यात मेळ साधताना सीपीआर ब्लड बँकेची दमछाक होतेय. रुग्णांचा आधारवड असलेल्या सीपीआर रुग्णालयात मात्र रक्ताचा तुटवडा जाणवतोय. मे आणि जून महिन्यात अपुऱ्या रक्तपुरवठ्याला वारंवार सामोरे जावे लागते. मागील वर्षी ११ हजार ४१९ जणांनी रक्तदान केले असून, वाढत्या मागणीचा विचार करता हा पुरवठा तोकडा पडत असून सीपीआरला रक्तदात्यांच्या दातृत्वाची गरज आहे.

सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी जिल्ह्यासह सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथून लोक येतात. प्रसूती, हृदयशस्त्रक्रिया, अपघात विभाग, थॅलेसिमिया, हिमोफेलिया, रक्ताचा कर्करोग यासाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता भासते. साधारणत: एका बॅगेत ३५० मिलिलिटर रक्त असते. अशा एक हजार बॅगांची दर महिन्याला गरज असते. सध्या मे आणि जून महिन्यात रक्त संकलित होण्याचे प्रमाण कमी असल्याने तुटवडा अधिक जाणवतो. तसेच रक्ताचा साठा ठराविक काळापेक्षा अधिक करता येत नसल्याने कायम रक्तदान शिबिरे, रक्तदाते यांच्यावर अवलंबून राहावे लागते. सध्या शहरात सहा खासगी रक्तपेढ्या असून, त्यांच्या माध्यमातून व्यावसायिकरीत्या रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. काही रक्तपेढ्या प्रलोभन दाखवतात, याचाही सीपीआर रक्तपेढीतील रक्तसंकलनावर परिणाम होतो.

असे होत रक्तसंकलन

रक्ताच्या अपुऱ्या पुरवठ्यावर मात करण्यासाठी राजर्षी शाहू सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, डॉक्टर, कर्मचारी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करतात. रक्तदाता दिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. तसेच विविध सण आणि उत्सवांच्या माध्यमातून शहर व जिल्ह्यात अनेक तरुण मंडळांच्या सहकार्याने कँपचे आयोजन केले जाते. अनेक तरुण स्वत:च्या वाढदिवसानिमित्त स्वेच्छेने रक्तदान करतात. काहीजण आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिर घेतात. यंदा जोतिबा यात्रेतही नागरिकांनी रक्तदान शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. रक्तदात्याला गरज भासल्यास मोफत रक्त दिले जाते. तसेच सीपीआरमध्ये नोंद करून रक्तदात्याला राज्यातील कुठल्याही सरकारी रक्तपेढीतून मोफत रक्त घेता येते.

कोण करू शकते रक्तदान?

रक्तदानासाठी नियमावली असते. त्याआधी रक्तदात्याकडून प्रश्नावली भरून घेतली जाते. २१ ते ६० वयापर्यंतच्या व्यक्तीला रक्तदान करता येते. त्यासाठी त्या व्यक्तीचे वजन किमान ५० किलो आणि हिमोग्लोबिन १२.५ इतके हवे. तसेच ती व्यक्ती निरोगी असणे गरजेचे आहे. त्या व्यक्तीला साधारण रक्तदान करण्यापूर्वी काही महिने कावीळ, मलेरिया, डेंग्यू वा तत्सम कोणतेही आजार नसावेत. त्याचबरोबर टॅटू गोंदवून सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी असेल व मधुमेह, कॅन्सर, उच्च वा कमी रक्तदाब असणाऱ्या व्यक्तीचे रक्त घेतले जात नाही. वर्षातून तीनवेळा साधारण तीन महिन्यांच्या अंतराने कोणतीही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते.

रक्तदात्याचे प्रकार व रक्ताचे दर

रक्तदात्याचे दोन प्रकार पाहायला मिळतात. त्यात ऐच्छिक व सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान करतात तसेच दुसरे बदली रक्तदाते म्हणजे कुटुंबात कोणाला गरज असेल तर रक्ताच्या बॅगच्या बदल्यात स्वत:चे रक्त देतात. सध्या सीपीआरमधील बॅगेचा दर ५०० रुपये आरहे, तर खासगी ब्लड बँकांत तो १२५० रुपयांपासून सुरू होतो.

कॉल ऑन ब्लड

रक्ताची गरज भासल्यास १०४ क्रमांकाला कॉल केल्यानंतर सीपीआरकडून रक्तपुरवठा केला जातो. यासाठी दोन कर्मचारी कार्यरत आहेत. रुग्णाचा रक्तगट माहीत नसल्यास कर्मचारी हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्ताचे सँपल घेऊन रक्तगट निश्चित करतात व त्यानुसार रक्तपुरवठा केला जातो. यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते.

शहरातील रक्तपेढ्या

सीपीआर ब्लड बँक, कोल्हापूर महापालिका ब्लड बँक, शाहू ब्लड बँक, संजीवनी ब्लड बँक, जीवनधारा ब्लड बँक, अर्पण ब्लड बँक, वैभवलक्ष्मी ब्लड बँक, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल ब्लड बँक

कोट...

सीपीआर ब्लड बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत रक्तपुरवठा केला जातो. सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत असून शहरातील सामाजिक संस्था, तरुण मंडळे आदींनी स्वेच्छेने रक्तदान करण्यास प्राधान्य दिल्यास मे आणि जून महिन्यात जाणवणारा अपुरा रक्तपुरवठा सुरळीत होईल. विविध संस्थांनी केवळ ठराविक काळात रक्तदान शिबिरे न घेता वर्षभर अंतराने घेतल्यास अपुऱ्या रक्तपुरवठा समस्येवर मात करता येईल.

डॉ. आर. व्ही. रामटेके, विभागप्रमुख शरीर विकृती शास्त्र

...

रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. त्यामुळे तरुणांनी रक्तदान करण्यात पुढाकार घ्यायला हवा. मी माझ्या वाढदिवसानिमित्त व वर्षातून तीनवेळा आवर्जून रक्तदान करतो. प्रत्येकाने वर्षातून किमान एकदा रक्तदान केल्यास एखाद्याचा जीव वाचविण्यात हातभार लावता येईल.

श्रीकांत मेडशिंगे, रक्तदाता

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानसेवींच्या नियुक्तीवरुन विद्यापीठात धुसफूस सेवक संघाच्या यू टर्न पत्राची चर्चा

$
0
0

लोगो शिवाजी विद्यापीठ

मर्जीतील सेवकांसाठी नियमांत पळवाट

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सेवानिवृत्तीनंतर प्रशासनातील अधिकारी व प्राध्यापक-कर्मचाऱ्यांची पुन्हा 'मानसेवी' म्हणून नियुक्ती करु नये, असा ठराव व्यवस्थापन परिषदेने केला. ठराव करुन तीन वर्षाचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच मर्जीतील सेवकासाठी नियमात पळवाट काढत पुन्हा सेवेत सामावून घेतले आहे. मानसेवी ऐवजी 'ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी' असे नाव देऊन ही प्रक्रिया पार पाडली. या नियुक्तीवरून शिवाजी विद्यापीठात सदस्य, अधिकाऱ्यांत धुसफूस सुरू झाली आहे.

या पदांची प्रक्रिया व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेऊन नियमाच्या चौकटीत प्रक्रिया पूर्ण केली. मात्र त्या मान्यतेवरुन व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांत धुसफूस सुरू झाली. सेवानिवृत्तांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी प्रशासनातील काही वरिष्ठांची धडपड विद्यापीठाच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. विद्यापीठ सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची पुन्हा 'मानसेवी' म्हणून नियुक्त करू नये, असा ठराव व्यवस्थापन परिषदेने २ जुलै, २०१५ मध्ये केला होता. त्या नियमातून पळवाटा शोधत विद्यापीठात गेल्या वर्षभरात तीन ठिकाणी सेवानिवृत्तांना पुन्हा नोकरीत सामावून घेतले. प्रत्येक वेळी नाव बदलून मर्जीतील लोकांना संधी दिली आहे.

सध्या विद्यापीठातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कार्यालयीन स्वीय सहायकाची 'ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी' या पदनामाने पुन्हा सेवेत सामावून घेतल्याने चर्चेत भर पडली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठ सेवक संघाने २१ एप्रिल, २०१८ ला विद्यापीठातील प्रतिनियुक्तीवरील अधिकारी परत

पाठवून मानसेवी सेवकांची पुन्हा नियुक्ती करु नये, या आशयाचे पत्र प्रशासनाला दिले होते. सेवानिवृत्ती अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घेतल्यास अन्य कर्मचाऱ्यांना संधी मिळत नाही, पदोन्नती डावलली जात असल्याचा आरोप सेवक संघाने पत्रात केला होता. दरम्यान विद्यापीठात 'ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी (ओएसडी) या नावांनी सेवानिवृत्त सेवकाला पुन्हा सेवेत सामावून घेतले आहे. त्यांच्या नियुक्तीवरुन व्यवस्थापन परिषदेत

विषय उपस्थित झाल्यानंतर मानसेवी नव्हे तर 'ओएसडी' म्हणून नियुक्ती करण्यात येत असून या नियुक्तीला व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिल्याचे सांगितले. दरम्यान सेवक संघाने चार दिवसांपूर्वी प्रशासनाला गरजू सेवानिवृत्तांना सेवेत घ्यावे, असे पत्र दिले आहे. सेवक संघाच्या यापूर्वीच्या आणि चार दिवसांपूर्वी दिलेल्या पत्रामुळे संघाने 'यू टर्न' घेतल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचाराचा मुद्दा सर्कीट बेंच

$
0
0

पान ३ अॅंकर

...............

फाइल फोटो

...............

प्रचारात सर्कीट बेंचचा मुद्दाच केंद्रस्थानी

तिन्ही पॅनेलकडून जोरदार प्रचार, १५ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही, त्यामुळे तीन पॅनेलकडून ४२ उमेदवार रिंगणात आहेत. मतदानाला अवघा एक दिवस उरल्याने तिन्ही पॅनेलकडून जोरदार प्रचार सुरू आहे. विशेष म्हणजे यंदाही सर्कीट बेंचच्या मुद्यावरच प्रचार सुरू आहे.

जिल्हा बार असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीसाठी शुक्रवारी (ता. १५) मतदान होणार आहे. यासाठी प्रशांत देसाई, प्रशांत चिटणीस आणि प्रकाश देशमुख-आंबेकर यांची तीन पॅनेल रिंगणात आहेत. तिन्ही पॅनेलकडून ४२ इच्छुकांनी अर्ज भरले होते. अर्ज माघारीच्या दिवशी म्हणजे बुधवारी एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही, त्यामुळे १५ जागांसाठी ४२ उमेदवार नशीब आजमावणार आहेत. मतदान अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपल्याने उमेदवारांना प्रचारासाठी अत्यल्प वेळ मिळाला आहे. तिन्ही पॅनेलकडून जोरदार प्रचार सुरू असल्याने शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुका बार असोसिएशनमध्ये बैठका आणि गाठीभेटींना वेग आला आहे.

गेल्या चार-पाच वर्षांप्रमाणे यंदाही बार असोसिएशन निवडणुकीच्या प्रचारात सर्कीट बेंचचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. सर्वच पॅनेलकडून सर्कीट बेंचसाठी ताकद पणाला लावण्याचे आश्वासन दिले जात आहे. याशिवाय कोर्टाच्या इमारतींमध्ये वकिलांसह पक्षकारांना पुरेशा सुविधांची उपलब्धता करणे, नवीन वकिलांना न्यायाधीश परीक्षांसाठी प्रोत्साहन देणे, ग्रंथालयांची व्यवस्था करणे, वरिष्ठ वकिलांकडून तरुणांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, वकिलांसह वकिली क्षेत्राचा सन्मान कायम राहावा यासाठी प्रयत्न केले जातील, अशी अश्वासने पॅनेल प्रमुखांकडून दिली जात आहेत.

............

चौकट

- जागा - १५

उमेदवार - ४२

मतदार - २४०६

पॅनेल - ३

...........

कोट

' खंडपीठाचा प्रश्न अंतिम टप्प्यात आहे. खंडपीठ कृती समितीला राज्य सरकारने शब्द दिला आहे. याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन मी मतदारांना दिले आहे. याशिवाय तरुण मतदारांना मार्गदर्शन आणि कोर्टाच्या इमारतींमध्ये सुविधा देण्यासही प्राधान्य दिले जाईल.

प्रशांत देसाई, पॅनेल प्रमुख

............

कोट

' गेल्या २० वर्षांपासून मी खंडपीठ आंदोलनात सक्रीय आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी माझे प्राधान्य असेल. समाजव्यवस्था ढासळू नये, यासाठी न्याय व्यवस्थेचा सन्मान कायम राहणे गरजेचे आहे. न्यायव्यवस्था आणि वकिलांचा सन्मान वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.

अॅड. प्रशांत चिटणीस, पॅनेल प्रमुख

............

कोट

' गेल्या काही दिवसात खंडपीठ आंदोलनाला अपेक्षित गती नाही. पालकमंत्र्यांच्या माध्यमातून हा प्रश्न सरकारसह मुख्य न्यायमूर्तींकडे मांडण्याचा आमचा प्रयत्न असेल. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करण्यासही आम्ही मागे हटणार नाही.

अॅड. प्रकाश देशमुख-आंबेकर, पॅनेल प्रमुख

..............................

पॅनेल आणि उमेदवारांची नावे, कंसात पद

अॅड. प्रशांत चिटणीस पॅनेल

अॅड. प्रशांत यशवंत चिटणीस (अध्यक्ष), आनंद भाऊसाहेब जाधव (उपाध्यक्ष), सुशांत बळवंत गुडाळकर (सचिव), तेहजीज अल्ताफहुसेन नदाफ (सहसचिव), धैर्यशील प्रदीप पवार (लोकल ऑडिटर), पूजा सचिन देशमुख (महिला प्रतिनिधी), सदस्य जयदीप विलास कदम, ओंकार जयंत देशपांडे, सदाशिव श्रीपती जंगम, अविनाश बाजीराव पाटील, स्वाती भीमराव तानवडे, विद्याधर सुज्ञान शेलार, संजय एम. मुळे, युवराज आनंदराव शेळके, अभिषेक राजेंद्र देवरे.

-----------------

अॅड. प्रशांत देसाई पॅनेल

अॅड. प्रशांत अप्पासाहेब देसाई (अध्यक्ष), दत्तात्रय नारायण जाधव (उपाध्यक्ष), महेशकुमार जगन्नाथराव जाधव (सचिव), अमोल गोविंद कुलकर्णी (सहसचिव), ऋतुराज बाबासाहेब देशमुख (लोकल ऑडिटर), मनीषा महादेव पाटील (महिला प्रतिनिधी), सदस्य- रणजित पांडुरंग गुरव, अमोल नामदेव नाईक, भरत संभाजी पाटील, दीपाली सुरेश पोवार, कृष्णात खंडू माने, विनायक दत्तात्रय म्हांगोरे, अरुण रामा शिंदे, सुरेश बाबासो शिंदे, संग्राम भुजंगराव शिर्के.

------------------

अॅड. प्रकाश देशमुख-आंबेकर पॅनेल

अॅड. प्रकाश बाबूराव देशमुख-आंबेकर (अध्यक्ष), सयाजीराजे सदाशिव कदम (उपाध्यक्ष), नाथ सखाराम पाटील (सचिव), सुरेश सदाशिव कदम (सहसचिव), माणिक बाबूराव शिंदे (लोकल ऑडिटर), भाग्यश्री नीळकंठ कुलकर्णी (महिला प्रतिनिधी), सदस्य- गौरव प्रकाश जवळकर, निखील चंद्रशेखर वारंगे, कौस्तुभ नेमीनाथ रोटे, अभिजित अप्पासाहेब बच्चे-पाटील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय मागेघेण्यासाठी देशमुख यांची मनधरणी

$
0
0

जिल्हा परिषदेमधील

अधिकाऱ्यांच्या बदल्या

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील जिल्हा परिषदमधील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील डॉ. एच. टी. जगताप यांची बदली सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी झाली. सातारा जि. प मधील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि येथे प्रकल्प संचालक म्हणून काम केलेले पी. बी. पाटील यांची यवतमाळ जि. प. कडे बदली झाली. सांगली जि. प. तील ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक ए. एस. माने यांची सिंधुदूर्ग येथे बदली झाली. तर सांगली जिल्ह्यातील खानापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस. डी. जोशी यांची लातूर जि. प. कडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारपदी बढतीने बदली झाली. सध्या रायगड जि. प. मध्ये सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कार्यरत असलेले चंद्रकांत वाघमारे यांची बदली चंद्रपूर जि. प. कडे झाली आहे.

दरम्यान, येथील जिल्हा परिषदेचे अतिरक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दिल्याचे वृत्त कळाल्यानंतर बुधवारी दिवसभर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, संस्थांचे पदाधिकारी, हितचिंतकांनी त्यांची भेट घेण्यासाठी रिघ लावली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

$
0
0

कारच्या धडकेत

दुचाकीस्वार ठार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर पडवळवाडीजवळ कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सतीश मारुती पाटील (वय ४१, रा. प्रयाग चिखली, ता. करवीर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. हा अपघात बुधवारी (ता. १३) दुपारी घडला. प्रयाग चिखली येथील सतीश पाटील हे सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर होते. बुधवारी दुपारी ते कामानिमित्त दुचाकीवरून पन्हाळ्याकडे निघाले होते. पडवळवाडीजवळ पोहोचताच समोरून आलेली कार आणि दुचाकीची धडक झाली. या धडकेत पाटील यांना भरधाव कारने पंधरा ते वीस, फूट फरफटत नेले. परिसरातील नागरिक आणि काही वाहनधारकांनी गंभीर जखमी अवस्थेत त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. प्रथमोपचारानंतर त्यांना खासगी रुग्णालयात हलवले. तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेच्या शाखांचे होणार ऑडिट

$
0
0

जिल्हा बँकेच्या शाखांचे होणार ऑडिट

चार्टर्ड अकाउंटटची नियुक्ती करण्याचा बँकेचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कसबा बावडा शाखेत सोने तारणमध्ये झालेल्या अपहारानंतर बँक प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रत्येक शाखेमधील सर्वच व्यवहारांची माहिती दर महिन्याला मुख्य कार्यालयाला मिळण्यासाठी चार्टर्ड अकाउंटटची (सीए) नेमणूक करण्याचा निर्णय बँक प्रशासनाने घेतला आहे. जिल्हा बँकेच्या १९१ शाखांचे अतंर्गत लेखापरीक्षण करुन सीए आपला अहवाल मुख्य कार्यालयाकडे सादर करणार आहे. बँकेच्या या निर्णयामुळे शाखाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर वचक निर्माण होणार आहे.

दोन आठवड्यापूर्वी कसबा बावडा शाखेत सोने तारण कर्जप्रकरणात सुमारे ३२ लाखाचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बँक प्रशासन खडबडून जागे झाले आहे. शाखाधिकारी, कॅशिअर व सराफ यांनी संगनमत करुन अपहार केल्याचे पोलिस तपासात उघड होत आहे. पहिल्यांदा तारण कर्जदारास रक्कम देवून प्रकरण परस्पर दडपण्याचा प्रयत्न झाला, पण प्रकरणाची व्याप्ती वाढत गेल्यानंतर बँकेने चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक केली. चौकशी अधिकाऱ्यांच्या अहवालात केवळ कसबा बावडा शाखेतील २७ प्रकरणांत ३२ लाखांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बँकेने प्रत्येक शाखेचे अंतर्गत लेखापरीक्षण करण्यासाठी सीए ची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हा बँकेने सीए यांच्या नेमणुकीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यांची नेमणूक झाल्यानंतर जिल्हा बँकेच्या १९१ शाखांचे अंतर्गत लेखापरीक्षण होणार आहे. लेखापरीक्षणात सोने तारण कर्जप्रकरणासह सर्वच प्रकारच्या व्यवहारांची तपासणी केली जाणार आहे. अंतर्गत लेखापरीक्षणाचा अहवाल तत्काळ बँकेच्या मुख्य शाखेस पाठवला जाणार आहे. बँकेच्या या निर्णयामुळे शाखांत काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक निर्माण होणार आहे. काही शाखेमध्ये काही गैरव्यवहार सुरू असल्यास त्याची तत्काळ माहिती मिळण्यास सोपे जाणार आहे.

चौकट

लक्ष्मीपुरी शाखा अहवालाकडे लक्ष

कसबा बावडा शाखेप्रमाणेच लक्ष्मीपुरी येथील जिल्हा बँकेच्या शाखेत अपहार झाल्याचे उघड झाले होते. लक्ष्मीपुरी शाखेत खातेदाराच्या नावावरील रक्कम परस्पर काढण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर दोषी कर्मचाऱ्यांला निलंबित केले होते. या प्रकरणाची सरकारी लेखापरीक्षण अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू आहे. चौकशी अहवालाकडे सहकार क्षेत्राचे लक्ष असून अशाच प्रकारचा अपहार भूदरगड शाखेतही झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्र हाउसिंगसाठी दोन स्वतंत्र पॅनेल

$
0
0

महाराष्ट्र हाऊसिंगसाठी दोन स्वतंत्र पॅनेल

राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस, शिवसेनेतील नेत्यांचा दोन्ही पॅनेलमध्ये समावेश

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या अकरा वर्षापासून कर्जवसुली आणि कर्जवापट बंद असल्यामुळे मरणासन्न अवस्थेमध्ये पोहोचलेल्या महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाउसिंग फायनान्स कार्पोरेशच्या २१ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. संपूर्ण राज्यात कार्यक्षेत्र असलेल्या संस्थेवर कब्जा मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षामध्ये चुरस निर्माण झाली असून सर्व पक्ष एकत्र येवून दोन पॅनेल तयार करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

न्यायालयीन प्रक्रियेत सापडलेल्या हाऊसिंग कार्पोरेशनची निवडणूक तब्बल आकारा वर्षानंतर होत आहे. राज्यातील पाच विभागातून प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे. संस्थेत झालेला गैरव्यवहारांमुळे संचालक मंडळाला अपात्र ठरवल्यानंतर प्रथमच निवडणूक होत आहे. हाउसिंग कार्पोरेशनचे कामकाज ठप्प असले, तरी यावर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. पुण्याचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार अंकुश काकडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमध्ये भाजप, काँग्रेस व शिवसेनेचे नेते व त्यांच्या नातेवाईकांचा समावेश असून पॅनेल रचनेसाठी नुकतीच पुणे येथे बैठक पार पडली.

या पॅनेलच्या विरोधात भाजपचे राष्ट्रीय सदस्य सिताराम राणे (ठाणे) व आमदार प्रवीण दरेकर मोर्चेबांधणी करत आहेत. या पॅनेलमध्येही भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यासाठी मुंबई येथे नुकतीच बैठक झाली असून अर्ज माघारीनंतर अधिकृतरित्या दोन्ही पॅनेलची घोषणा होणार आहे.

सध्या पुणे विभागातून कोल्हापूरचे हाउसिंग कार्पोरेशनमध्ये राष्ट्रवादीचे व्ही. बी. पाटील एकमेव प्रतिनिधित्व करत असून जाहीर झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे प्रा. निवास पाटील, शिवसेनेचे सुनील मोदी व आकाराम पाटील यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केलेले सर्वजण उमेदवारी मिळवण्यासाठी वरिष्ठस्तरावर प्रयत्न करत आहेत. दोन्ही पॅनेलमध्ये सर्वच पक्षातील नेत्यांचा समावेश असल्याने निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. निवडणूक चुरशीची होणार असली, तरी कामकाज ठप्प झालेलेल्या हाउसिंग कार्पोरेशनचे पुनरुज्जीवन करण्याचे शिवधनुष्य भविष्यात नवनिर्वाचित संचालकांना उचलावे लागणार आहे.

चौकट

संपूर्ण राज्यात कार्यक्षेत्र असलेल्या महाराष्ट्र हाउसिंग कार्पोरेशनसाठी पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई येथून प्रत्येकी तीन तर औरंगाबाद विभागातून चार संचालकांना प्रतिनिधित्व मिळणार आहे. त्याच बरोबर अनुसूचित जाती, ओबीसी, अनुसूचित जमाती प्रत्येकी एक व महिला प्रवर्गासाठी दोन जागांचा यामध्ये समावेश आहे.

स्थापनेलाच हरताळ

तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी हाउसिंग कार्पोरेशनची स्थापना केली. संपूर्ण राज्यात अनेक मोक्याच्या ठिकाणी इमारती असलेल्या कार्पोरेशनतर्फे गोरगरीब व्यक्तींसाठी घरबांधणी, दुरुस्ती यासाठी वित्तपुरवठा केला जातो. पण गेल्या अकरा वर्षापासून असा वित्तपुरवठा केलेला नसल्याने जुन्या कर्जांची वसुलीही मंदावली आहे. त्यामुळे संस्था स्थापन, संस्थेची उद्दिष्टाला हरताळ फासला जात आहे.

उमेदवारी अर्ज माघार - २१ जून

चिन्ह वाटप - २२ जून

मतदान - १ जुलै

मतमोजणी - ३ जुलै

एकूण जागा - २१

उमेदवारी अर्ज - ६९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दाभोळकर ट्रस्टतर्फे शिष्यवृत्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दाभोळकर चॅरिटेबल ट्रस्ट व डॉ. श्रीमती अहिल्याबाई दाभोळकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने दरवर्षी दहावी, बारावी व पदवीपर्यंत शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृती देण्यात येते. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी किमान ७० टक्के गुण असणे आवश्यक आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी संस्थेकडे अर्ज करावेत, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष शशिकांत प्रभू यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी दाभोळकर चॅरिटेबल ट्रस्ट या नावे तर विद्यार्थिनींनी डॉ. श्रीमती अहिल्याबाई दाभोळकर चॅरिटेबल ट्रस्ट या नावे अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जासोबत शाळा किंवा कॉलेजचे ओळखपत्र, गुणपत्रक, कॉलेजच्या फी भरल्याची पावती, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड किंवा आधारकार्ड, बँक पासबुक या कागदपत्रांच्या छायांकित प्रती जोडाव्यात. ही शिष्यवृत्ती कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्गावरील दारुबंदीने वाढले तस्करीचे गुन्हे

$
0
0

महामार्गावरील दारूबंदीने वाढले तस्करीचे गुन्हे

अपघातांचे प्रमाण किंचित घटले, वर्षभरात तस्करीचे २००० गुन्हे

३ कोटी ६७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर : महामार्गांवरील अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी सुप्रीम कोर्टाने ५०० मीटर अंतरातील दारू विक्री बंद करण्याचे आदेश दिले होते. १ एप्रिल, २०१७ मध्ये या आदेशाची अंमलबजावणी झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ८८७ दारू दुकानांना कुलूप लागले. परिणामी अपघाती मृत्यूंचे प्रमाण काहीअंशी घटले. मात्र, दारू तस्करीचे प्रमाण वाढले. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात अवैध दारुची वाहतूक आणि विक्रीचे तब्बल दोन हजार गुन्हे दाखल झाले आहेत.

महामार्गांवर असलेल्या दारू विक्रीच्या दुकानांमुळे वाहनचालकांना सहज दारुची उपलब्धता होते. दारुच्या नशेत वाहन चालवल्यानेच बहुतांश अपघात होतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी सुप्रीम कोर्टाने महामार्गापासून ५०० मीटर अंतरातील वाईन शॉप, परमिटरुम बिअरबार आणि देशी दारुची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते. १ एप्रिल, २०१७ पासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली. या निर्णयाने कोल्हापूर जिल्ह्यातील १३५५ दुकानांपैकी ८८७ दुकाने बंद झाली होती. यात शहरातील २१० दुकानांपैकी १६१ दुकानांचा समावेश होता. यानंतर सहा महिन्यांच्या काळात सुमारे ७० टक्के विक्रेत्यांनी अन्य ठिकाणी दुकाने स्थलांतरीत करून विक्री सुरू ठेवली. दरम्यानच्या काळात मात्र बंद दुकानांमुळे दारुची तस्करी वाढली.

कोल्हापुरातील दारू तस्करांसाठी गोवामेड दारू ही कमी वेळेत हमखास जादा पैसा मिळवून देणारा स्रोत ठरली आहे. यामुळे कोकणमार्गे गोवामेड दारुची तस्करी सुरू असते. महामार्गावरील दारुबंदीच्या निर्णयानंतर या तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एप्रिल २०१७ ते मे २०१८ या १३ महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोल्हापूर जिल्ह्यात २००० मद्य तस्करांवर कारवाई केली. यात अवैध मद्याची वाहतूक करणे, गोवामेड मद्याची तस्करी, अवैध दारू विक्रीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. चंदगड आणि आजरा तालुक्यात तस्करांनी स्वत:चे अड्डे तयार केले आहेत. गोव्यातून आंबोलीमार्गे आणलेली तस्करीतील दारू चंदगड आणि आजरा तालुक्यातील काही फार्महाऊसमध्ये ठेवली जाते. काही तासात ही दारू छुप्या मार्गाने विक्रेत्यांपर्यंत पोहोचते. वाढती तस्करी रोखण्याचे आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभागासमोर उभे ठाकल्यानंतर अधीक्षक गणेश पाटील यांनी गेल्या वर्षभरात चंदगड आणि आजरा तालुक्यात नाकाबंदीसह गस्तही वाढवली. खबऱ्यांचे जाळे वाढवले, यामुळे दारू तस्कर तपासणी पथकांच्या रडारवर आले.

गेल्या वर्षभरात पथकांनी दारू तस्करीचे २००० गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत १०६५ आरोपींना अटक केले. १५० वाहनांसह ३ कोटी ६७ लाख २० हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल पथकांनी जप्त केला. २०१६ मध्ये झालेल्या कारवायांच्या दीडपट अधिक कारवाया २०१७ मध्ये झाल्या आहेत. महामार्गांवरील दारुबंदीच्या निर्णयामुळेच तस्करी वाढल्याचे निरीक्षण अधिकाऱ्यांनी मांडले आहे. वाढत्या मद्यतस्करीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सराईत तस्करांवर हद्दपारीच्या कारवाया केल्या जाणार आहेत. याचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली.

००

अपघाती मृत्यू काहीअंशी घटले

कोल्हापूर जिल्ह्यात २०१६ मध्ये ४११ अपघाती मृत्यूंची नोंद आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने १ एप्रिल २०१७ पासून महामार्गांवरील दारू विक्री बंद झाली. २०१७ मध्ये ३६८ अपघाती मृत्यू झाले आहेत. गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यात ११९ अपघाती मृत्यूंची नोंद आहे. महामार्गावरील दारुबंदीच्या निर्णयानंतर २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये अपघातांचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसते.

००

२०१७ मधील कारवाया - २०००

अटक आरोपी - १०६५

जप्त वाहने - १५०

जप्त मुद्देमाल - ३ कोटी ६७ लाख २० हजार ३४५

००

अपघातांची संख्या - २०१६ - ४११

२०१७ - ३६८

२०१८ - ११९

००

गोव्यात कमी किमतीत मिळणारी दारू कोल्हापुरात आणून विकण्याचे प्रमाण वाढत आहे. २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये तस्करांवरील कारवाई वाढली आहे. विशेषत: महामार्गावरील दारूबंदीच्या निर्णयानंतर वाढलेल्या मद्यतस्करीला आळ‌ा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष नियोजन केले आहे.

गणेश पाटील - अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, कोल्हापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाऊसिंगजी रोडवरीलमालमत्ता विकसित करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद विश्रामगृह खासगीकरण करण्यास स्थायी समिती बैठकीत अनेक सदस्यांनी बुधवारी विरोध केला. विश्रामगृहाच्या खासगीकरणाऐवजी शहरातील भाऊसिंगजी रोड, इचलकरंजी येथील हवामहल आदी ठिकाणच्या जागा विकसित कराव्यात, मागणी करण्यात आली. अध्यक्षस्थानी जि.प अध्यक्षा

शौमिका महाडिक होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली.

जि. प. बांधकाम विभागाची चार विश्रामगृहे आहेत. त्यापासून उत्पन्न मिळवण्यासाठी खासगी संस्था किंवा व्यक्तिंना भाड्याने देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानुसारची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. दरम्यान, हा विषय स्थायी समिती बैठकीत चर्चेत आला. त्यावेळी बहुतांशी सदस्यांनी विश्रागृहाच्या खासगीकरणास विरोध केला. खासगीकरणातून कमी उत्पन्न मिळेल. त्याऐवजी शहर आणि तालुक्याच्या ठिकाणी मोक्यांच्या ठिकाणी असलेल्या जि. प. च्या जागा विकसित करावे, अशी मागणी केली. या वेळी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, शिक्षण सभापती अंबरीश घाटगे, बांधकाम सभापती सर्जेराव पाटील- पेरीडकर, समाज कल्याण सभापती विशांत महापुरे, महिला व बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारणा लुटीतील संशयितांच्या जामिनाला आव्हान

$
0
0

वारणा लुटीतील संशयितांच्या

जामिनाला आव्हान

सीआयडीचे हायकोर्टात अपिल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणानगर येथील एका शिक्षण संस्थेच्या इमारतीतून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या लुटीप्रकरणी अटक केलेल्या संशयितांमधील चौघांना जिल्हा कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. याविरोधात सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी हायकोर्टात धाव घेतली असून, संशयितांचा जामीन रद्द व्हावा यासाठी अपिल केले. दरम्यान, गुन्ह्यातील आरोपी निलंबित सहायक फौजदार शरद कुरळपकर याला फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

चोरटा मैनुद्दीन मुल्ला याच्याशी संगनमत करून वारणानगर येथून सव्वानऊ कोटी रुपयांची लूट करणाऱ्या सांगलीतील सात पोलिसांसह नऊ जणांवर कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यातील सहायक फौजदार शरद कुरळपकर वगळता अन्य आठ संशयितांना सीआयडीने अटक केली होती. सीआयडीने संशयितांवर आरोपपत्र दाखल केले आहे. मुख्य सूत्रधार मैनुद्दीन मुल्ला, निलंबित सपोनि प्रवीण चंदनशिवे, कॉन्स्टेबल रवींद्र पाटील आणि शंकर पाटील या चौघांना जिल्हा कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. संशयितांचा जामीन रद्द करावा, यासाठी हायकोर्टात अपिल करण्याच्या सूचना सीआयडीचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी दिल्या होत्या. यानुसार अपर पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी चारही संशयितांच्या जामिनाला आव्हान देण्यासाठी हायकोर्टात अपिल दाखल केले. याबाबत जुलै महिन्यात सुनावणी होणार आहे, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.

दरम्यान, या गुन्ह्यातील निलंबित सहायक फौजदार शरद कुरळपकर हा दीड वर्षांपासून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर राहण्याची नोटीसही पाठवली. मात्र, तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही, त्यामुळे कुरळपकर याला फरार घोषित करावे, अशा मागणीचा अर्ज पोलिसांनी कोर्टात सादर केला आहे. लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. कुरळपकर याला फरार घोषित केल्यानंतर त्याच्या मालमत्तेवरही टाच आणण्याची प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक गायकवाड यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अटकेसाठी सहा ठिकाणी छापे

$
0
0

अटकेसाठी सहा ठिकाणी छापे

संशयित आरोपी पत्नी, मुलांसह पळाले

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कसबा बावडा शाखेत कर्जदारांनी तारण ठेवलेले सोन्याचे दागिने लंपास करून बनावट दागिने ठेवणाऱ्या तिघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तिन्ही संशयित आरोपींच्या शोधासाठी शाहूपुरी पोलिसांनी बुधवारी (ता. १३) कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील सहा ठिकाणी छापे टाकले. तिन्ही संशयित आरोपी पत्नी, मुलांसह पळाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी कसबा बावड्यातील सराफ सन्मुख ढेरे याच्या दुकानाची झडती घेतली.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कसबा बावडा शाखेत कर्जदारांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांमधील खरे दागिने लंपास करून त्याठिकाणी बनावट दागिने ठेवून ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एक किलोहून अधिक सोने गायब करून कर्जदारांसह बँकेची फसवणूक करणारे बँकेचे मॅनेजर संभाजी शंकर पाटील (वय ५६, रा. शिये, ता. करवीर), कॅशिअर परशुराम कल्लाप्पा नाईक (रा. साईनाथ कॉलनी, कसबा बावडा) आणि सराफ सन्मुख आनंदराव ढेरे (रा. कसबा बावडा) या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांच्या अटकेसाठी शाहूपुरी पोलिसांनी बुधवारी कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात सहा ठिाकणी छापे टाकले. कसबा बावडा, शिये, वरणगे पाडळी, इस्लामपूरसह अन्य ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला. मात्र, संशयित पत्नी आणि मुलांसह गायब झाल्याने पोलिसांच्या हाती लागले नाहीत. चार दिवसांपूर्वी बँकेकडून अंतर्गत तपासणी होताच गुन्हा दाखल होण्याची चाहूल लागल्याने संशयितांनी पळ काढला. त्यांना अटकपूर्व जामीन मिळू नये, यासाठी पुरेपूर प्रयत्न सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.

पोलिसांनी बुधवारी दुपारी कसबा बावडा येथे सन्मुख ढेरे याच्या दुकानाची झडती घेतली. या झडतीत काही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. कोर्टाच्या परवानगीने दुकान सील केले जाणार आहे. यासाठी प्रक्रिया सुरू आहे. बँकेतून खरे सोने काढल्यानंतर त्या ठिकाणी ठेवलेले बनावट सोने कोणत्या सोनारांनी तयार करून दिले होते, याचा शोध सुरू आहे. या गुन्ह्यात मदत करणाऱ्या संशयितांवरही कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या घटनेने बँकेच्या तारण कर्जदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. सर्वच शाखांमधील तारण सोन्याची तपासणी करण्याची मागणी कर्जदारांकडून सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावकारी पाश होतोय घट्ट

$
0
0

फाइल फोटो

..............

सावकारी पाश होतोय घट्ट

सावकारी कायद्याचे सर्रास उल्लंघन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बँकांकडून सहज कर्ज पुरवठा उपलब्ध होत नसल्याने किरकोळ गरजांसाठीही खासगी सावकारांच्या हातापाया पडावे लागते. थेट घरापर्यंत पोहोचणारा गरजू म्हणजे जणू काही सावजच आहे, अशा अविर्भावात खासगी सावकार कर्ज पुरवठा करतात. कर्जदाराची जमीन, घर किंवा किमती ऐवज तारण ठेवून मनमानी व्याजाची आकारणी करतात. विशेष म्हणजे सावकारीचा परवाना नसतानाही कायदा धाब्यावर बसवून कर्जदारांची लूट केली जाते, त्यामुळे खासगी सावकारांचा पाश दिवसेंदिवस घट्ट होत आहे.

कर्जाची गरज सर्वांनाच पडते. मात्र, किरकोळ कर्जासाठी बँका दारातही उभे करून घेत नाहीत, असा सार्वत्रिक अनुभव आहे. एखादी बँक कर्ज देण्यास तयार झालीच तर कागदपत्रांची पूर्तता करताना कर्जदाराची दमछाक होते. यातून त्याच्या हातात नेमकी कर्जाची किती रक्कम येईल, याबाबतही खात्री नसते. अशावेळी गरजूंना खासगी सावकार हाच जवळचा पर्याय वाटतो. कमी भांडवलात लाखो रुपये उकळता येत असल्याने गल्लोगल्ली खासगी सावकार निर्माण झाले आहेत. दरमहा दहा ते ३० टक्क्यांपर्यंत व्याजाची वसुली करून कर्जदारांना कंगाल केले जाते. कर्जाच्या वसुलीसाठी दमदाटी करणे, रात्रीअपरात्री घरात घुसून शिवीगाळ, मारहाण करण्याचे प्रकार नित्याचेच घडत आहेत. तारण ठेवेलली वस्तू पदरात पडत नाही, तोपर्यंत सावकाराचे व्याज थांबत नाही. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत शेतकरी सावकाराचे सावज ठरत होते. अलीकडे सर्वच क्षेत्रात खासगी सावकारी बोकाळली आहे. छोटे व्यावसायिक, भाजी विक्रेते, कामगार, मजूर यांच्या गळ्याभोवती खासगी सावकारीचा पाश घट्ट होत आहे.

राज्य सरकारने २०१४ मध्ये खासगी सावकारी कायद्यात सुधारणा करून सावकारांना हा कायदा बंधनकारक केला. या कायद्यानुसार जिल्हा उपनिबंधकांकडे पाच हजार रुपये भरून खासगी सावकारीचा परवाना मिळतो. एप्रिल ते मार्च अशी वर्षभरासाठी याची मुदत असते. मार्चनंतर पुन्हा तीन महिन्यात परवान्याचे नुतनीकरण करावे लागते. कर्ज देण्यासाठीही सावकारांना नियमावली आहे. तारण कर्जासाठी वार्षिक १२ टक्के व्याजाची आकारणी करता येते, तर विनातारण कर्जासाठी वार्षिक १५ टक्के व्याजाची आकारणी करणे बंधनकारक आहे. मुद्दल रकमेपेक्षा व्याज जास्त घेऊ नये, कोऱ्या स्टॅम्पवर कर्जदाराच्या सह्या घेऊ नयेत, कर्ज वसुलीसाठी दमदाटी करू नये, त्याचबरोबर दर तीन महिन्याला त्याला मुद्दल आणि व्याज वसुलीची पावती द्यावी, अशी नियमावली खासगी सावकारांसाठी बंधनकारक केली आहे. प्रत्यक्षात मात्र विनापरवाना सावकारांचे जिल्ह्यात पेव फुटले आहे. दर महिन्याला ५ ते ३०० टक्के व्याजाची आकारणी केली जाते. वसुलीसाठी दमदाटी नेहमीचच आहे. वसुलीसाठी गुंडांची फौजच सावकारांकडे असते.

...............

चौकट

उपनिबंधक कार्यालयाकडे एकही तक्रार नाही

बेकायदेशीर सावकारीच्या विरोधात कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा उपनिबंधकांसह पोलिसांनाही आहेत. सर्व तालुका उपनिबंधकांकडून नोंदणीकृत सावकारांची नियमित तपासणी केली जाते. त्यांच्याविरोधात तक्रार आल्यास परवाना रद्द करण्याचेही अधिकार उपनिबंधकांकडे आहेत. प्रत्यक्षात मात्र उपनिबंधकांकडे गेल्या वर्षभरात एकाही सावकाराबद्दल तक्रार आलेली नाही. पोलिसांकडे ३० हून अधिक तक्रारी दाखल आहेत. मात्र, ठोस पुराव्यांचा अभाव आणि ऐनवेळी तक्रारदारांनीच माघार घेतल्याने सावकार मोकाट सुटतात.

............

कोट

' नोंदणीकृत सावकारांविरोधात आमच्याकडे तक्रारी आलेल्या नाहीत. नियमापेक्षा अधिक व्याजाची वसुली होत असेल तर कर्जदारांनी ठोस पुराव्यांसह उपनिबंधक कार्यालयात तक्रारी द्याव्यात. संबंधित सावकाराची सखोल चौकशी करून त्याच्यावर कारवाई केली जाईल. तक्रारी दाखल झाल्याशिवाय बेकायदेशीर सावकारी लक्षात येत नाही, त्यामुळे तक्रारदारांनी पुढे येणे गरजेचे आहे.

अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक

...........

कोट

' शहरासह जिल्ह्यात खासगी सावकारीचे प्रमाण पुन्हा वाढत आहे. हा गंभीर प्रकार रोखण्यासाठी तक्रारदारांनी निर्भयपणे सावकारांच्या विरोधात तक्रारी द्याव्यात. अवैध सावकारीतून होणारी कर्जदारांची पिळवणूक रोखण्यासाठी पोलिसांकडून धडक मोहीम सुरू केली आहे.

तानाजी सावंत, पोलिस निरीक्षक, एलसीबी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेज, विद्यापीठ मूल्याकंन

$
0
0

विद्यापीठाचा फोटो वापरावा..

०००

विद्यार्थ्यांच्या समाधानावर मूल्यांकन

'नॅक'कडून होणार कॅम्पसमधील ५० टक्के विद्यार्थ्यांचा सर्व्हे; ऑनलाइन प्रक्रियेवर भर

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet@Appasaheb_MT

कोल्हापूर : उच्च शिक्षणाची गुणवत्ता, संशोधनाची तपासणी करतानाच कॉलेज आणि विद्यापीठ पातळीवरील शिक्षण पद्धती आणि सुविधांवर विद्यार्थी समाधानी आहेत का? याचाही धांडोळा आता घेतला जाणार आहे. यासाठी 'नॅक'ने (नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडिटेशन कौन्सिल) मूल्यांकनाच्या स्वरूपात बदल केले आहेत. 'नॅक'मार्फत मूल्यांकन प्रक्रियेच्या प्रारंभीच संबंधित कॉलेज आणि विद्यापीठ आवारातील ५० टक्के विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण होणार आहे. शैक्षणिक संस्थांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, 'नॅक'च्या मूल्यांकन पिअर कमिटीतील सदस्य संख्येवर मर्यादा घातली आहे. कमिटी केवळ तीन सदस्यीय असून त्यांनी अवघ्या दोन दिवसांत तपासणी करावयाची आहे.

यापूर्वी मूल्यांकनासाठी सदस्यांचे जम्बो पथक, शहरातील मोठ्या हॉटेलमध्ये निवासाच्या सोयीपासून ते पाहुणचार हा सार्वत्रिक चर्चेचा विषय ठरला होता. उच्चशिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता आणि व्यवस्थेचे मूल्यमापन पारदर्शीपणे झाले पाहिजे, जागतिक दर्जाच्या पातळीवर उच्चशिक्षणाची व्यवस्था पोहोचावी यासाठी सरकारच्या पातळीवर विविध प्रयत्न सुरू आहेत. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून उच्चशिक्षण क्षेत्रातील कॉलेज आणि विद्यापीठाचे मूल्यांकन करणाऱ्या 'नॅक' मूल्यांकन स्वरूपातही बदल केले आहेत. जम्बो पथकाद्वारे होणारे मूल्यांकन नव्या स्वरूपात असणार नाही. नव्या स्वरूपात पिअर कमिटीचा प्रवास खर्च, निवास व्यवस्थेची जबाबदारी शैक्षणिक संस्थेवर असणार नाही. 'नॅक'मार्फतच त्यांची व्यवस्था केली जाणार आहे.

'नॅक' मूल्यांकनाच्या नव्या स्वरूपात विद्यार्थ्यांवर अधिक फोकस आहे. नॅक मूल्यांकनासाठी प्रस्ताव सादर करतानाच कॉलेज आणि विद्यापीठातील सर्वंकष शैक्षणिक माहिती सादर करावयाची आहे. सोबतीला शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांची मेल आयडी, मोबाइल नंबर कळवायचे आहेत. 'नॅक'कडून एकूण पटसंख्येपैकी ५० टक्के विद्यार्थ्यांचे ज्या त्या शैक्षणिक संस्थेतील पायाभूत सुविधा, विद्यार्थीकेंद्रित उपक्रक्रमासंबंधी ऑनलाइन सर्वेक्षण होईल. प्रत्येक विद्यार्थ्याला नॅकची लिंक पाठवून त्या माध्यमातून माहिती संकलित होणार आहे. दहा टक्के विद्यार्थ्यांनी माहिती भरणे बंधनकारक आहे.

............

...तर थेट स्वायत्तचा दर्जा

मूल्यांकन प्रक्रियेत पिअर कमिटीला निर्णयाचे ३० टक्के अधिकार असणार आहेत. उर्वरित ७० टक्के माहिती ऑनलाइन सादर करावयाची आहे. यापूर्वी नॅक समितीच्या भेटीप्रसंगी सादरीकरणावर भर होता. आता त्या कागदपत्रांची प्रमाणपत्रे स्कॅन करून ऑनलाइन सादर करावी लागतील. विद्यार्थ्यांचे समाधान सर्वेक्षण, ७० टक्के ऑनलाइन माहिती सादरीकरणानंतर मूल्यांकनासाठी पात्र ठरलेल्या कॉलेज आणि विद्यापीठांना १००० गुणांची प्रश्नावली भरावी लागणार आहे. तर नॅक मूल्यांकनात अंतिम चार गुणांपैकी ३.५१ गुण प्राप्त करणाऱ्या कॉलेजना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून थेट स्वायत्त शैक्षणिक संस्थेचा दर्जा दिला जाणार आहे.

.................

विद्यापीठाची तयारी सुरू

शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने 'नॅक'च्या चौथ्या टप्प्यातील मूल्यांकनासाठी तयारी सुरू केली आहे. मूल्यांकनाच्या अनुषंगाने कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वेगवेगळ्या कमिट्या स्थापन केल्या आहेत. अधिविभागप्रमुखांच्या बैठका घेऊन जबाबदारी निश्चित केली. साधारणपणे नोव्हेंबर २०१९ मध्ये नॅक मूल्यांकन समितीकडून विद्यापीठाचे मूल्यांकन होऊ शकेल, या दृष्टीने विद्यापीठ प्रशासन नियोजन करत आहे.

....................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एक लाखांवर रूपयांची मदत

$
0
0

कोल्हापूर : येथील सरोजिनीदेवी विश्वनाथ विश्वस्त मंडळातर्फे ताराराणी विद्यापीठातील पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना एक लाखांवर रूपयांची मदत देण्यात आली. प्रत्येक विद्यार्थीनीस एक हजार आणि नववी आणि दहावीच्या विद्यार्थीनीस १५०० रूपयांप्रमाणे एकूण एक लाख सात हजार देण्यात आले. स्वयंसिध्दाच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला. या वेळी कांचन परूळेकर, जयश्री शिरोळकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रमजान ईदसाठी बाजारपेठ सजली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुस्लिम समाजातील प्रमुख सण असलेल्या रमजान ईदसाठी बाजारपेठेत खरेदीला उधाण आले आहे. ईदनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ईद फेस्टिव्हलला मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान सुका मेवा, मसाले, शेवया, नवीन ड्रेस खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली आहे.

गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या रोजा व इफ्तार पार्टीनंतर आता मुस्लिम बांधवांना ईद साजरी करण्याचे वेध लागले आहेत. गेल्या आठवड्यापासूनच बाजारपेठेत ईदच्या खरेदीसाठी गर्दी वाढत होती.

महापालिका परिसर, ताराबाई रोड, लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ मार्केट येथे सुकामेव्याची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शीरकुर्म्यासाठी काजू, बदाम, बेदाणे यांना मागणी वाढली आहे. भाजलेल्या शेवयांनाही मागणी आहे.

लहान मुलांमध्ये नवीन कपडे खरेदीचा उत्साह असून महाद्वार रोड, जोतिबा रोड, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी येथील कपड्यांच्या दुकानात कपडे खरेदीसाठी गर्दी झाली आहे. ईदनिमित्त दुकानदार, व्यावसायिकांकडून देण्यात आलेल्या खास ऑफर्समुळे शहरात ईदच्या खरेदीचा माहोल शिगेला पोहोचला आहे. ईदसाठी महिलांमध्ये मेहंदी काढण्याची परंपरा आहे. त्यामुळे बाजारात मेंदीच्या कोनलाही मागणी वाढली आहे. तसेच बुरख्यामध्ये एम्ब्रॉयडरी केलेल्या तसेच खडीवर्क व जरदोशी वर्क केलेल्या बुरख्यांच्या खरेदीसाठी लक्ष्मीपुरी मार्केटमध्ये महिलांनी गुरूवारी गर्दी केली.

दरम्यान, ईदनिमित्त मुस्लिम समाजातील महिला घराच्या स्वच्छतेच्या तयारीत व्यस्त आहेत. तसेच घर सजावटीच्या साहित्यामध्ये पडदे, गालिचे, बेडशीट, तोरण यांची विशेष खरेदी सुरू आहे. मुस्लिम बोर्डिंगच्यावतीने ईद नमाज पठणासाठी मैदानाची स्वच्छता करण्यात आली असून नमाजपठणासह ईदच्या पारंपरिक विधींची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईद जोड

$
0
0

बुरख्याला जोड स्टाइलची

मुस्लिम समाजातील महिला ईदनिमित्त नव्या बुरख्याची खरेदी आवर्जून करतात. प्लेन काळ्या रंगाच्या बुरख्याला सध्या स्टाइलची जोड आली आहे. यामध्ये पांढऱ्या, गुलाबी, निळ्या खड्यांनी सजवलेल्या बुरख्यांनी सध्या क्रेझ आहे. तसेच बॉर्डरसाठी एम्ब्रॉयडरी असलेल्या बुरख्यांची खरेदी करण्याकडे महिलांचा कल आहे. लुगडी ओळ, बिंदू चौक, मटण मार्केट रोड परिसरातील बुरख्यांच्या दुकानात सध्या नव्या स्टाइलच्या बुरख्यांची प्रचंड रेंज उपलब्ध असून खरेदीसाठी गर्दी केली आहे.

सुकामेव्यासह फ्लेवर्ड शेवयांनाही मागणी

ईदनिमित्त मुस्लिम समाज बांधव मित्रपरिवाराला शीरकुर्म्याची मेजवानी देतात. त्यासाठी शेवया व सुकामेवा यांची खीर बनवण्याची प्रथा आहे. या खीरसाठी लागणाऱ्या सुक्यामेव्याला गेल्या आठ ते पंधरा दिवसांपासून मागणी वाढली आहे. शनिवारी होत असलेल्या ईदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सुका मेव्याची खरेदी सुरू आहे. बदामाचे दर किलोला हजार रुपयांच्या घरात आहे तर काजू एक किलोसाठी पाचशे रुपयांपासून आठशे ते नऊशे रुपयांनी विक्री केला जात आहे. काजूमध्ये अख्खा, पाकळी व तुकडा काजू विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच काही मुस्लिम महिला काजूपावडर व बदाम पावडरचीही खरेदी करत असल्यामुळे दुकानदारांनी खास पावडर स्वरुपातील काजू व बदाम उपलब्ध करून दिले आहेत.

बिर्याणीचा बेत जोरात

ईददिवशी शीरकुर्म्यासोबत बिर्याणीचाही बेत घरोघरी केला जातो. यासाठी खास तांदळाची खरेदी करण्यासाठी मुस्लिम महिलांनी धान्यबाजारात फेरफटका मारण्यास सुरुवात केली आहे. बिर्याणीसाठी अख्खा बासमती, दिल्ली राइस या तांदळाची खरेदी केली जात आहे. लक्ष्मीपुरी धान्य बाजार, कपिलतीर्थ मार्केट परिसरात तांदुळ खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. तर मसाल्यांसाठी बाजारगेट परिसरातील तसेच महापालिका चौकातील मसाल्यांच्या दुकानात गुरुवारी दिवसभर गर्दी होती.

वर्षातील महत्त्वाचा व मोठा सण असल्यामुळे ईदसाठी सर्वप्रकारची खरेदी करण्याचा उत्साह आहे. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत ईदचा उत्साह आहे. खरेदीसोबत नमाजपठण करण्यात येणार असल्याने त्याचीही तयारी सुरू आहे.

मोहसीन मुजावर

ईदनिमित्त बनवण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थ्यांमध्ये शीरकुर्म्यांसाठी सुकामेव्याची खरेदी आवश्यक असते. यंदा सुका मेव्याचे दर प्रतिकिलो वीस ते तीस रुपयांनी महागल्यामुळे थोडे बजेट वाढले आहे. तसेच मसाल्यांच्या दरातही वाढ झाल्याचा परिणाम आर्थिक बजेटवर झाला आहे.

रूबिना मणेर, गृहिणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कला कल्पनाला’ पुरस्कार

$
0
0

फोटो आहे.

कोल्हापूर : पुण्यातील द अॅक्टिव्ह ग्रुपतर्फे आयोजित खुली टॅग अॅवार्ड स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये सोशल मिडिया विभागात येथील कला कल्पना एजन्सीला यंदा टॅग पुरस्कार मिळाला. पुणे येथी सुप्रिद्ध राजा रविवर्मा कलादालनात झालेल्या कार्यक्रमात डॉ. मधुरा भिडे यांच्या हस्ते संजीव चिपळूणकर यांनी पुरस्कार स्वीकारला. जाहिरात एजन्सी, आर्टीस्ट यांच्यासाठी झालेल्या स्पर्धेत २५ विभागात २५० पेक्षा अधिक प्रवेशिका आल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा भूमिका : इन्ट्रो

$
0
0

पर्यायी पुलाच्या कामाचा खो-खो गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. कोकणला जोडणाऱ्या या पुलाचे काम नियोजनशून्य धोरणामुळे, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आणि सरकारी अनास्थेमुळे रखडले. राजकीय इच्छाशक्ती दिसली, तरीही गेली तीन वर्षे ते खोळंबले आहे. आता आणखी तीन-चार महिने ते जागेवरच थांबणार आहे. शिवाजी पूल वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करावा लागणार असल्याने कोल्हापूरच्या जनतेची अडवणूक होणार आहे. याला जबाबदार कोण?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images