Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मदतच बेतली जिवावर

$
0
0

\Bआपत्कालीन व्यवस्थापनाच्या अज्ञानाचे शिरोलीत दोन बळी\B

राहुल मगदूम, कसबा बावडा

पुलाची शिरोली येथे शिरोली हाउसिंग सोसायटीत कुळाच्या निष्काळजीपणामुळे गॅसची गळती होऊन झालेल्या स्फोटात मदतीसाठी धावून गेलेल्या दोघांचे बळी गेले. मदतीची भावना असावीच, पण आपत्कालीन व्यवस्थापनाच्या अज्ञानामुळे नाहक महेंद्र पाटील आणि मारुती सुतार या दोघांना जीव गमवावा लागला. या घटनेने दोन्ही कुटुंबांना जबर धक्का बसला असून, आपत्कालीन व्यवस्थापणाची गरजही अधोरिखित झाली.

मूळचे चंदगड तालुक्यातील फाउंड्री उद्योजक के. के. पाटील यांनी १५-२० वर्षांपूर्वी एमआयडीसीत काम करत शिरोलीच्या माळवाडी भागात २००६ मध्ये प्लॉट खरेदी केला. दोन वर्षांपूर्वी दुमजली बंगला बांधला. यापैकी खालील पहिला मजला एमआयडीसीत मशीन ऑपरेटर म्हणून कामास असणारे मूळचे कर्नाटकातील दऱ्याप्पा पाटील यांच्या परिवाराला भाड्याने राहण्यासाठी दिला आहे.

३० मे रोजी सकाळी सातच्या सुमारास तळमजल्यावरून गॅसचा वास आणि धूर येत असल्याचे लक्षात आले. त्यांनी पहिल्या मजल्यावर झोपलेला मोठा मुलगा महेंद्र पाटील यास त्वरित खाली बोलवले. आग लागण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी त्या खोलीत राहणारे निलव्वा कांडगोड, श्रावणी कांडगोड, सुधाराणी कांडगोड यांना बाहेर काढले आणि लगेच महेंद्र याने वडिलांच्या मदतीने तेथे असणाऱ्या चार दुचाकी बाजूला घेतल्या. महेंद्रने स्वयंपाकाच्या खोलीतील खिडकीची काच फोडून शेजारील शेतातील माती व वाळू टाकण्यास सुरवात केली. दरम्यान, आरडाओरडा ऐकून घराशेजारी शेतात पाणी पाजणारे सागर पाटील तसेच शेजारच्या घरातील देवपूजा करत बसलेला नीलेश पाटील, मारुती सुतार, नीलेश आढाव, यांनी तत्काळ धाव घेत स्वयंपाकघराच्या इतर खिडक्यांना असणाऱ्या काचा फोडल्या.

सर्वजण वाळू टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत होते. इतक्यात सिलिंडरचा स्फोट झाला आणि आगीचे लोट खिडकी व दरवाज्यातून बाहेर आले. यावेळी वाळू टाकणारे महेंद्र पाटील, मारुती सुतार, नीलेश आढाव हे आगीच्या भडक्यात सापडले. त्यात महेंद्रला व मारुतीला आगीच्या ज्वाळांनी वेढले. यात ते सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त भाजले. नीलेश पाटील यांच्या चेहऱ्यासह हाताला भाजले. तर सागर पाटील यांनी डोक्याला टॉवेल गुंडाळला होता त्यामुळे त्यांच्या डोक्याचा भाग आगीपासून बचावला. परंतु हात पोटासाह पाठीवर गंभीर इजा झाली. परिसरातील नागरिकांनी सर्वांना तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.

या घटनेतील जखमींमधील महेंद्र पाटील याची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र, त्याची झुंज अपयशी ठरली. आग विझवण्यासाठी धावलेले मारुती सुतार हेदेखील दुर्देवी ठरले. वरच्या मजल्यावर झोपलेला महेंद्र आगीत सापडू नये, यासाठी वडिलांनी त्याला खाली बोलवले. मात्र, स्फोटोमुळे तोच सर्वाधिक जखमी झाला. मारुती सुतार हे मूळचे तासगाव तालुक्यातील कुमठे येथील आहेत. नोकरीच्या निमित्ताने ते शिरोली येथे राहत होते. आगीची घटना पाहून तेही मदतीला धावले, मात्र मदतीची भावना त्यांच्याच जिवाशी येईल याची कल्पनाही त्यांना आली नाही.

के. के. पाटील यांची दोन्ही मुले महेंद्र आणि नरेंद्र हे दोघेही कंदलगाव येथील भारती विद्यापीठात शिकत होते. महेंद्रने बारावीत ९८ टक्के गुण मिळवून सिव्हिल पदविकेचा अभ्यास सुरू केला होता. त्याचे तिसरे वर्ष पूर्ण होऊन त्याने त्यामध्ये ९२ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले होते. लहानपणापासून लोभस व मनमिळावू असणाऱ्या महेंद्रचा सोसायटीपासून शाळा-कॉलेज पर्यंतचा मित्र परिवार मोठा होता. त्याच्या अचानक अपघाती जाण्याने मित्रांना मोठा धक्का बसला आहे.

महेंद्र कोकणात गेला असता तर...

महेंद्रचे मामा कोकणात असतात. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते आंबे देण्यासाठी कोल्हापुरात आले होते. सुटी असल्याने महेंद्र आणि नरेंद्र या दोघांनाही त्यांनी कोकणात येण्याचा आग्रह केला. लहान भाऊ नरेंद्र मामासोबत सुटीसाठी गेला. मात्र महेंद्रने नंतर येतो असे सांगून वेळ मारून नेली. महेंद्रने मामाचे एकले असते, तर कदाचित त्याच्या बाबतीत असे घडले नसते, असे म्हणून त्याच्या आई, वडीलांनी टाहो फोडला.

आपत्कालीन व्यवस्थेचे अज्ञान

निष्काळजीपणामुळे सिलिंडरचा स्फोट झाला त्याअगोदर काही मिनिटे धूर आला होता. गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. गॅस गळती आणि आग सुरू असताना नेमके काय करावे, याची माहिती नसल्याने सर्वजण आग विझवण्यासाठी धावले. भडकणारी आग नसेल आणि छोट्या प्रमाणात आग असेल तरच विझवण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा अग्निशामक यंत्रणेला कळवून आग विझवणे गरजेचे असते. अशावेळी आपत्कालीन व्यवस्थापनाच्या अज्ञानातून मोठी हानी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उचगावात वृद्धेला मारहाण करून जबरी चोरी

$
0
0

उचगावात वृद्धेला मारहाण

करून जबरी चोरी

साडेसहा लाखांच्या रोकडसह साडेनऊ लाखांचा ऐवज लंपास

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चोरट्याने घरात घुसून वृद्धेला मारहाण करीत हात-पाय बांधून आणि तोंडात बोळा घालून रोख रकमेसह साडेनऊ लाखांचा ऐवज लंपास केला. उचगाव येथील साई कॉलनीत शनिवारी (ता. ९) भरदिवसा ही जबरी चोरी झाली. तोंडावर कापड बांधून आलेल्या चोरट्याने घरातील रोख ६ लाख ६० हजार रुपये आणि १२० ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेने उचगाव परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

गांधीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उचगाव येथे साईराम हॉटेलच्या मागे साई कॉलनीत नामदेव भगवान पवार यांचे घर आहे. पवार यांचा वीटभट्टीचा व्यवसाय असल्याने ते मुले आणि पत्नीसह दिवसभर वीटभट्टीवर असतात. त्यांची ८० वर्षांची आई एकटीच घरी असते. शनिवारी नेहमीप्रमाणे नामदेव पवार यांच्यासह घरातील इतर लोक वीटभट्टीवर गेले होते. आई लालूबाई या एकट्याच घरी होत्या. दुपारी साडेतीनच्या सुमारास दारावरील बेल वाजल्याने त्या दार उघडण्यासाठी गेल्या. दार उघडताच चोरट्याने त्यांच्या चेहऱ्यावर जोरदार ठोसा मारला. चेहऱ्यावर मार लागल्याने लालूबाई जमिनीवर कोसळल्या. चोरट्याने मफलर व टॉवेलने लालूबाईंचे हातपाय बांधले. ओरडू नये, यासाठी तोंडात कापडाचा बोळा घातला. त्यानंतर चोरट्याने लोखंडी तिजोरीचे दार उचकटून त्यातील रोख ६ लाख ६० हजार रुपयांची रक्कम आणि बेडमधील दागिन्यांचा डबा असा सुमारे साडेनऊ लाखांचा ऐवज घेऊन पलायन केले.

संध्याकाळी नामदेव पवार घरी आल्यानंतर त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. चोरट्याकडून मारहाण झाल्याने लालूबाई घाबरल्या होत्या. नामदेव यांनी तातडीने खासगी रुग्णालयात आईवर उपचार केले. त्यांनी रविवारी संध्याकाळी गांधीनगर पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली. तोंडावर कापड बांधून आलेला चोरटा उंची होता, तसेच त्याच्या डोळ्यांवर चष्मा होता, अशी माहिती लालूबाई यांनी पोलिसांना दिली.

..............

चौकट

माहितीतील व्यक्तीकडून चोरी

नामदेव पवार यांनी वीटभट्टीवरील मजुरांचे पगार भागविण्यासाठी चार दिवसांपूर्वीच बँकेतून पैसे काढले होते. ही रक्कम त्यांनी तिजोरीत ठेवली होती. चोरट्याने केवळ कपाटातील रक्कम आणि बेडरुमधील दागिन्यांचा डबा लांबवला. इतर वस्तूंना त्याने हात लावलेला नाही. वृद्धेसही गंभीर इजा पोहोचवली नाही. त्यामुळे घरात पैसे आणि दागिने आहेत याची माहिती असलेल्या व्यक्तीनेच चोरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभाजीनगरात घरफोडी, लाखाचा ऐवज लंपास

$
0
0

शहरात तीन ठिकाणी घरफोड्या

सव्वा लाखाचा ऐवज लंपास

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संभाजीनगरसह सानेगुरुजी वसाहतीत अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोड्या केल्या. या घटनांमध्ये बंद घरांच्या दरवाजाचे कुलूप तोडून सव्वा लाखाचा ऐवज लंपास केला. हा प्रकार रविवारी (ता. १०) उघडकीस आला. चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य करून किंमती ऐवज लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केरबा बिद्रे यांचे संभाजीनगरमधील जोतिर्लिंग सोसायटीत प्लॉट नंबर एकमध्ये घर आहे. बिद्रे हे बुधवारी कुटुंबासह बाहेरगावी गेल्यामुळे घराला कुलूप होते. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घरी परत आल्यानंतर बिद्रे यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. आत जाऊन पाहिले असता, कपाटातील ३० ग्रॅमचा सोन्याचा लक्ष्मीहार, २० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन चेन असा सुमारे १ लाख ८ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती जुना राजवाडा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

तर सानेगुरुजी वसाहतीत राहणारे प्रकाश परशुराम माताडे (५१) हे बाहेरगावी गेले होते. चोरट्याने त्यांच्या घराचा कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. कपाटातील रोख तीन हजार रुपये, कॅमेरा, एक ग्रॅम सोन्याचे दागिने असा मुद्देमाल त्यांनी लंपास केला. रविवारी सकाळी माताडे घरी आल्यानंतर चोरीचा हा प्रकार लक्षात आला. याशिवाय नाळे कॉलनीत राहणारे कौशिक हरपचंद बेडीया (३६) हे पाहुण्यांकडे गेले असता, त्यांच्याही घरात चोरी झाली. चोरट्यांनी घरातील इनव्हर्टर व बॅटरी लंपास केली. या दोन्ही घटनेत १५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. एकाच दिवशी उघडकीस आलेल्या तीन घरफोड्यांत सुमारे सव्वालाखाचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसात नोंद झाली आहे. चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य केल्याने सुट्टीच्या अखेरच्या टप्प्यात घरफोडीच्या घटना वाढत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागावमध्ये अन्नातून विषबाधा

$
0
0

पोलिस डायरी..... लोगो

....................

नागावमध्ये अन्नातून विषबाधा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हातकणंगले तालुक्यातील नागावमध्ये एकाच कुटुंबातील सातजणांना अन्नातून विषबाधा झाली. जेवण करून झोपल्यानंतर रविवारी (ता. १०) रात्री उशिरा उलट्यांचा त्रास सुरू होताच त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. दीपक रंगराव कांबळे (वय ३०), पत्नी मीना (वय २८), मुलगी प्रतीक्षा (वय ५), मोठी मुलगी दिव्या (वय ९), भावजय स्वाती विजय कांबळे (वय २६), वैष्णव विजय कांबळे (वय ८), वैदेही विजय कांबळे (वय५, रा. सर्व नागाव) अशी विषबाधा झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. सर्वांवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.

..........

कीटकनाशक

प्राशनाने वृध्देचा मृत्यू

कोल्हापूर

राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावातील सुमन भीमराव साळोखे (वय ७५) या वृध्देचा कीटकनाशक प्राशनाने मृत्यू झाला. साळोखे यांनी शनिवारी (ता. ९) राहत्या घरी कीटकनाशक प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते, मात्र उपचारादरम्यान सोमवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

..............

कार झाडावर

आदळून दोघे जखमी

कोल्हापूर

संगमेश्वर ते कोल्हापूर मार्गावर शाहूवाडी हद्दीत भरधाव कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले. सोमवारी (ता. ११) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. संग्राम सदाशिव पाटील (वय २७, रा. कणेरी, ता. करवीर) आणि हिंदुराव साताप्पा कांबळे (३०, रा. बेळगाव) अशी जखमींची नावे आहेत.

..........

दुचाकी घसरून

दोघे जखमी

कोल्हापूर

वाठार ते वडगाव मार्गावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी झाले. संदीप सुरेश माने (वय ३२, रा. आळते, ता. हातकणंगले) व महेश अरुण भोसले (२४, रा. कुंभोज, ता. हातकणंगले) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्या डोक्याला इजा झाली असून, त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीपीआरमध्ये दानशूरांकडून सुविधा

$
0
0

फोटो आहे.

अभ्यागत मंडळाच्या बैठकीत विस्तारीकरणावर चर्चा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सीपीआरमधील रुग्णांना चांगल्या सेवा मिळण्यासाठी आवश्यक सुविधा, वैद्यकीय यंत्रसामुग्रीची खरेदी दानशूर व्यक्ती, सीएसआर फंडातून कराव्यात. त्यानुसार आमदार अमल महाडिक पाठपुरावा करतील, अशी सूचना अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभ्यागत मंडळाच्या बैठकत सोमवारी केली. बैठकीत सीपीआर अपघात विभागाच्या विस्तारीकरणावरही चर्चा झाली.

तीन महिन्यातून होणारी अभ्यागत मंडळाची बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत अधिष्ठाता डॉ. सुधीर नंणदकर यांनी सीपीआरमधील समस्या, अडचणी मांडल्या. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, 'सीपीआरला अनेक वर्षांनी पूर्णवेळ अधिष्ठाता मिळाला आहे. अभ्यागत मंडळाची नियमित बैठक होत आहेत. सीपीआरचे अनेक प्रलंबित प्रश्न सुटले आहेत. एमआरआय मशीनची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. या मशीनची किंमत १५ कोटी आहे. सरकारकडून इतका निधी मिळवण्यात अडचणी येत आहेत. यामुळे शिर्डी ट्रस्टकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. निधी मिळाल्यानंतर मशीन खरेदी केली जाईल. श्वान दंश झाल्यानंतर दिली जाणारी रेबीज लसची टंचाई आहे. पुढील तीन महिन्यासाठी लागणारी लस खरेदीसाठी आवश्यक निधी दिला जाईल. कोल्हापुरात अनेक दानशूर आहेत. त्यांच्याकडून सीपीआरमध्ये यंत्रसामुग्री, सुविधा देण्यासाठी सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्याचा प्रस्ताव देण्याची सूचना दिली आहे.

दरम्यान, पुढील अभ्यागत बैठकीस जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्यास सांगावे, अशी सूचना अधिष्ठाता नंणदकर यांना पालकमंत्री पाटील यांनी दिली. डोंगराळ तालुक्यात वैद्यकीय अधिकारी कमी आहेत. त्यामुळे १०८ रुग्ण्वाहिकेद्वारे प्रसुतीसाठी महिलांना सीपीआरला प्राथमिक आरोग्य केंद्रातून पाठवले जाते. सीपीआरवर अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे रिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा भरण्यासंबंधीचा निर्णय घेण्याची गरज असल्याचे आमदार अमल महाडिक यांनी सांगितले. डॉ. रघुजी थोरात यांनी सीपीआरला आवश्यक ती औषधे खरेदीसाठी सरकारकडे मागितला तितका निधी मिळत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. जाधव यांनी अपघात कक्षाच्या विस्तारीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्ताव मागवून घेण्याची सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिली. बैठकीस अजित गायकवाड, शीतल रामुगडे आदी सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या आग्रहामुळे नागपुरला

एमआरआय मशीन खरेदीसाठी निधीसाठी शिर्डी देवस्थान ट्रस्टला प्रस्ताव दिला आहे. एका मशीनसाठी निधी देण्याचे मान्य केले होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आग्रहामुळे ट्रस्टकडून एक मशीन खरेदीला नागपुरला निधी मिळाला. आपण आता पुन्हा प्रयत्न करू, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेवरपरिचरांचा मोर्चा

$
0
0

फोटो आहे.

.........................

परिचर संघटनेचा

जिल्हा परिषदेवर मोर्चा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सेवेत कायम करावे, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी कोल्हापूर जिल्हा आरोग्य परिचर संघटना व करवीर कामगार संघाच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार यांना देण्यात आले.

प्राथमिक, उपकेंद्रात अनेक वर्षांपासून परिचर रूग्णांची सेवा करीत आहेत. त्यांना केवळ दरमहा १२०० रूपये तुटपुंजे मानधन दिले जाते. कमी मानधनामुळे कुटुंब चालवण्यासाठी त्यांना खासगी सावकारांकडे हात पसरावे लागत आहेत. त्यांचे मानधन सहा हजार करावे, मानधनाची रक्कम वेळेवर मिळावी, थेट बँक खात्यावर मानधन जमा करावे, लसीकरणाची सक्ती करू नये, परिचरांना सन्मानाची वागणूक द्यावी या मागण्यांसाठी अनेक वर्षांपासून सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे कामगार संघाच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चा जि. प. च्या दारात आल्यानंतर परिचरांनी आवारात ठिय्या मारला. शिष्टमंडळातर्फे निवेदन दिल्यानंतर मोर्चाची सांगता करण्यात आली. मोर्चात दिलीप पोवार, सुशिला यादव, एस. बी. पाटील, अॅड. बाळासाहेब पोवार, एम. बी. पडवळे, निर्मला शिंदे, सुमन कुंभार, बाळाबाई कांबळे, सुमित्रा कुडचे, रत्नाबाई शिंदे यांच्यासह परिचर सहभागी झाले .

----------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाबूजमाल दर्गा उरुसास प्रारंभ

$
0
0

ओळी

............

शहरातील हिंदू मुस्लिमांचे श्रध्दास्थान असलेल्या गुरुवार पेठेतील बाबूजमाल दर्गा उरुसास सुरुवात झाली. सोमवारी रात्री गंध लेपणाचा विधी झाला तर मंगळवारी (१२) रात्री गलेफ चढवण्यात येणार आहे. उरुसानिमित्त बाबूजमाल दर्गास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पर्यटनातून आर्थिक विकासाचा संकल्प’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर शहर व जिल्हा पर्यटन विकासातून आर्थिकदृष्ट्या समृद्ध आणि श्रीमंत करण्याचा संकल्प असून त्यादृष्टीने जिल्ह्यात पर्यटन विकासाचे नवनवे प्रकल्प शासनाने हाती घेतले आहेत. जेऊर येथे विकसित केलेला व्हर्टिकल ॲडव्हेंचर पार्कमुळे जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला निश्चितपणे नवी दिशा मिळेल असे,' प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

कोल्हापूर वनविभाग आणि संयुक्त वन विकास समिती, जेऊरच्यावतीने सुमारे दीड कोटीहून अधिक रुपये खर्चुन विकसित केलेल्या व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्कचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते आज झाले. त्यावेळी जेऊर येथे समारंभात ते बोलत होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'व्यवसायाबरोबरच दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, गोट फार्मिंग अशा जोड धंद्याबरोबरच ग्रामीण जनतेला उत्पन्नची साधने पर्यटन व्यवसायातून उपलब्ध करुन देण्यावर अधिक भर दिला आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी अनेकविध उपक्रम हाती घेतले असून त्यामधील काजवा महोत्सव, आडवाटेवरचं कोल्हापूर असे विविध उपक्रम हाती घेतले असून यापुढील काळातही असे अनेक प्रकल्प हाती घेऊन पर्यटनाला आणि रोजगार-स्वयंरोजगार निर्मितीला प्राधान्य दिले जाईल,' अशी घोषणाही त्यांनी केली.

हा व्हर्टिकल ॲडव्हेंचर पार्क जिल्ह्याच्या पर्यटन विकासातील केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास व्यक्त करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, 'या व्हर्टिकल ॲडव्हेंचर पार्कमध्ये नऊ साहसी पर्यटन खेळ असून यासाठी पर्यटन समितीच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी ६०० रुपये तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ८०० रुपये फी आकारली जाणार आहे. मात्र येत्या पावसाळ्यानंतर या व्हर्टिकल ॲडव्हेंचर पार्कमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभर सवलतीच्यादरात प्रवेश उपलब्ध करुन दिला जाईल. यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी १०० रुपये आणि महाविद्यालयींन विद्यार्थ्यांसाठी २०० रुपये प्रवेश फी आकारली जाईल. उर्वरित प्रवेश फीची रक्कम फाउंडेशनच्या माध्यमातून भरली जाईल,' अशी घोषणाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

याप्रसंगी सरपंच प्रियांका महाडिक आणि संयुक्त वन व्यस्थापन समितीचे अध्यक्ष धोंडिराम पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी उपवन संरक्षक प्रभुनाथ शुक्ल यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आभार सहायक वन संरक्षक विजय गोसावी यांनी मानले.

या समारंभास प्रांताधिकारी अजय पवार, उपवन संरक्षक प्रभुनाथ शुक्ल, सहायक वन संरक्षक विजय गोसावी, विभागीय वन अधिकारी माणिकराव भोसले, तहसीलदार अनंत गुरव, पंचायत समितीचे सदस्य अनिल कंदुरकर, पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा रुपाली धडेल, सरपंच प्रियांका महाडिक, संयुक्त वन व्यस्थापन समितीचे अध्यक्ष धोडिराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चाचा इशारा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बारवे, दिंडेवाडी प्रकल्प आणि चिकोत्रा (झुलपेवाडी) प्रकल्पाचे कामासंदर्भात २५ जून पर्यंत राज्य सरकारने पावले न उचल्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर एक जुलै रोजी मोटार सायकल रॅलीने मोर्चा काढण्याचा इशारा अखिल भारतीय किसान सभेने दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या बैठकीत कोणताच निर्णय न झाल्याने सभेने निर्णय जाहीर केला.

अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीला आमदार हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर, किसान सभेचे पदाधिकारी, आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत बारवे दिंडेवाली प्रकल्पग्रस्त पुनर्वसनासह पूर्ण करावा, अशी मागणी करण्यात आली. सरकारी मुलकी पड, गायरान, शेती विकास महामंडळाच्या जमिनी उपलब्ध करून पुनर्वसन करावे. जर जमीन उपलब्ध न झाल्यास प्रकल्पग्रस्तांना एकरी २० लाख रुपयांची नुकसान भरपाई दयावी, अशी मागणी करण्यात आली.

आरळगुंडीकडून येणारे पाणी चिकोत्रा धरणात वळवण्याबाबत प्रत्यक्ष निधी वनखात्याकडे वर्ग करुन तात्काळ काम सुरू करावे. हेळ्याचा देव येथून जाणारे ओघळाचे पाणी चिकोत्रा धरणात वनविभागातील जमिनीतून वळवण्यात यावे. भावेश्वरी मंदिर परिसरातील पाणी वनविभागातून नाल्यावाटे धरणाकडे वळवण्यात यावे. हिरण्यकेशी नदीकडे जाणारे पाणी कॅनाद्वारे धरणाकडे वळवावे, अशी मागणी करण्यात आली. पण बैठकीत प्रशासनाकडून ठोस उत्तरे न मिळाल्याने बैठकीनंतर पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला संभाजी यादव, शिवाजीराव मगदूम, अॅड दयानंद पाटील, सुभाष निकम, सयाजी पाटील, योगेश पाटील, प्रा. डॉ. जे. एल आळवेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

उचंगी घळभरणी १५ जानेवारीपर्यंत करण्याची सूचना

आजरा तालुक्यातील उचंगी लघुपाटबंधारे प्रकल्पाची घळभरणी १५ जानेवारीपर्यंत करण्याची सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी केली. शिवसेनेचे विजय देवणे, जिल्हा परिषद माजी सदस्य संग्रामसिंह कुपेकर, सुनील शिंत्रे यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. उचंगी सांडव्याची निविदा प्रक्रिया सप्टेंबरअखेरीस पूर्ण करावी, प्रकल्पग्रस्तांसाठी २७ हेक्टर जागा उपलब्ध करुन प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करावे, चाफोडी ते जेऊर रस्ता तयार करावा, १५० घरांच्या विस्थापनासाठी एक कोटी ७४ लाख रुपयांच्या निधीसाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला प्रभारी जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनीषा कुंभार, पाटबंधारे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, उपअभियंता अनिल कोरगांवकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शामप्रसाद कांबळे यांचे निधन

$
0
0

शामप्रसाद कांबळे

यांचे निधन

कोल्हापूर

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए) चे राज्य सदस्य शामप्रसाद साताप्पा कांबळे (वय ६८) यांचे निधन झाले. दलित पँथर चळवळीमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. ते दलित मुक्ती सेनेचे दहा वर्षे जिल्हाध्यक्ष होते. मंगळवारी (१२) सकाळी नऊ वाजता कसबा बावडा येथे जलदान विधी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कृष्णा खो’रेचे पाटील उपाध्यक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, मुंबई,

कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी सांगलीचे खासदार संजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी आमदार चैनसुख मदनलाल संचेती, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी आमदार डॉ. सुनील पंजाबराव देशमुख तर उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव तर यांची नियुक्ती करण्यात आली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सोमवारी ही माहिती दिली.

पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी दोन मंडळाचे अध्यक्ष व दोन महामंडळाच्या उपाध्यक्षपदांच्या नियुक्तीस मान्यता दिली होती. त्यानुसार चार पदांच्या नियुक्त्या घोषित करण्यात आल्या. यामध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी खासदार संजय पाटील यांना संधी देण्यात आली आहे. त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे. या नियुक्तीमुळे कृष्णा खोरे प्रकल्पाला गती मिळणार आहे.

दरम्यान, विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी चैनसुख संचेती यांची तर उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी योगेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी आमदार डॉ. सुनील पंजाबराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय अन्य काही महामंडळावर विविध कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार आहे. त्याची यादी तयार आहे. मुख्यमंत्री परदेशातून येताच त्याची घोषणा करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.

खासदार संजय पाटील हे कृष्णा खोरेंतर्गत सुरू असलेल्या योजनांसाठी निधी मिळत नसल्यामुळे नाराज होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी मंत्रालयात निधीच्या प्रश्नांवर मंत्र्यांनाही धारेवर धरले होते. त्यामुळे सरकारने तातडीने निधीही दिला होता. या पार्श्वभूमीवर त्यांची महामंडळावर नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्याला अखेर मूर्त स्वरुप आले. पाटील यांच्या रुपाने सांगलीला कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष दुसऱ्यांदा मिळाले आहे. यापूर्वी युतीच्या काळात अजित घोरपडे उपाध्यक्ष होते.

०००००००००

महामंडळाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील सर्व प्रकल्पांचे नियोजन आणि जलस्रोतांचे व्यवस्थापन अधिक सक्षमपणे करून कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. विशेषतः सांगली जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या कामाला गती देण्यासाठी पदाचा उपयोग करणार आहे. माझ्यावर दाखविलेल्या विश्वसाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचा आभारी आहे.

संजय पाटील, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्याने बंदुकीसह टीव्ही पळवला

$
0
0

चोरट्याने बंदुकीसह

टीव्ही पळवला

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कळंबा येथील जनाईदत्त नगरमध्ये बनावट किल्लीने घराच्या दरवाजाचे कुलूप काढून चोरट्याने घरातील बारा बोअरची बंदूक आणि टीव्ही लांबवला. हा प्रकार रविवारी (ता. १०) रात्री दहाच्या सुमारास उघडकीस आला. याबाबत पांडुरंग गोविंद पालकर (वय ५८, सध्या रा. जनाईदत्तनगर, कळंबा, मूळ रा. नागनवाडी, ता. भुदरगड) यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग पालकर हे मूळचे नागनवाडीचे असून, कोल्हापुरात खासगी कंपनीत नोकरी करतात. कळंबा येथील जनाईदत्तनगरमध्ये दत्तात्रय बाबूराव निकम यांच्या घरी ते भाड्याने राहतात. ते शनिवारी कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. सोमवारी सकाळी परत आल्यानंतर त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. चोरट्याने बनावट चावीच्या सहाय्याने कुलूप काढून घरातील बारा बोअरची बंदूक, एक नंबर छऱ्याचे सहा राऊंड आणि सॅमसंग कंपनीचा टीव्ही असा सुमारे २५ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. चोरट्याने कपाटातील साहित्य विस्कटून किंमती ऐवजांचा शोध घेतला, मात्र त्याच्या हाती अन्य किंमती ऐवज आणि रोकड लागली नाही. पालकर यांनी चोरीच्या घटनेची माहिती करवीर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. थेट बंदूक आणि टीव्ही घेऊन चोरट्यांनी पळ काढल्याने याची उलटसुलट चर्चा परिसरात सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भय्यू महाराज आत्महत्या, मोठा धक्का

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येने कोल्हापुरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. कोल्हापुरातील अनेक राजकीय नेते, उद्योगपती, बांधकाम व्यावसायिक त्यांचे भक्त होते, विशेष म्हणजे त्यांनी अध्यात्मिक निवृत्तीची घोषणाही कोल्हापुरात केली होती.

भय्यूजी महाराज यांच्या आई कोल्हापूरच्या होत्या. त्यामुळे लहानपणापासूनच ते कोल्हापुरात येत होते. अध्यात्मिक गुरू गुरूनाथ मुंगळे हे त्यांचे गुरू. त्यामुळे कोल्हापुरात आले की, ते त्यांना निश्चित भेटत. वर्षातून एक दोनवेळा तरी ते कोल्हापुरात येत होते. त्यामुळे येथे त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. त्यांचे राजकीय, उद्योग, बांधकाम, शिक्षणासह विविध क्षेत्रात भक्त असल्याने कोल्हापूरशी त्यांचा खूप जवळचा संबंध होता. खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, निवृत्त पोलिस उपअधीक्षक मदन पाटील, करणसिंह गायकवाड,अभिजीत मगदूम, दिलीप भांडवलकर यांच्यासह अनेकजण त्यांचे भक्त होते.

मागील वर्षी महाराजांनी कोल्हापुरात पत्रकार बैठक घेत अध्यात्मिक निवृत्तीची घोषणा केली. कोल्हापुरात त्यांच्या हस्ते अनेक कार्यक्रम झाले होते. सर्वच पक्षातील नेत्यांशी त्यांचे अतिशय चांगले संबंध होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे कळताच भक्तांमध्ये खळबळ उडाली. या वृत्ताने अनेकांना धक्का बसला.

'भैय्यू महाराज उर्फ उदयसिंह देशमुख यांच्या अचानक मृत्यूमुळे एक मोठी सामाजिक पोकळी तयार झाली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात, शेतकऱ्यांना मोफत बियाणे देणे, कैद्यांच्या मुलांसाठी शिक्षण, भारतमातेविषयी प्रेम जागृत करून देश प्रेम वाढवणे, मुलींना शिक्षणाची संधी, आरोग्य सेवा अशी भरीव सामाजिक कामे त्यांनी केली.

- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

'परमेश्वर हा माणसात असतो , दगडात नसतो . भैय्यू महाराज 'लिव्हिंग गॉड ' होते . राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज यांनी फार मोठे सामाजिक कार्य केले .त्यांनी आपल्या अनुयायांवर अढळ माया केली .त्यामुळे त्यांच्यावर श्रद्धा असणारे असंख्य लोक आहेत . सोनिया गांधी आणि प्रतिभाताई पाटील यांच्यामुळे मी राज्यपाल झालो. त्यामध्ये भैय्यूजी महाराजांनी केलेली मदत मी विसरू शकत नाही .

डॉ .डी.वाय .पाटील, माजी राज्यपाल

'राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांनी केलेली आत्महत्या अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक घटना आहे. गेली २० वर्षे भय्यूजी महाराज यांचा आमच्या कुटुंबियांशी घनिष्ठ संबंध होता. एक सदाबहार ऊर्जा देणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती. त्याचबरोबर सामाजिक, अध्यात्मिक क्षेत्रातही त्यांचा मोठा दबदबा होता. सर्वोदय परिवाराच्या माध्यमातून वृक्षारोपण, शिक्षण या क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली होती.

धनंजय महाडिक, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट सोनेप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

$
0
0

बनावट सोनेप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

केडीसीसीच्या कसबा बावडा शाखाधिकाऱ्यासह कॅशिअर, सराफाचा समावेश

२७ कर्जदारांची ३२ लाखांच्या दागिन्यांची फसवणूक

फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता

सर्वच शाखांतील तारण सोन्याच्या तपासणीची मागणी

संशयितांना लवकरच अटक होणार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कसबा बावडा येथील शाखेत कर्जासाठी तारण ठेवलेले सोन्याचे दागिने बदलून फसवणूक केल्याप्रकरणी बँकेच्या शाखाधिकाऱ्यासह कॅशिअर आणि सराफ या तिघांवर मंगळवारी (ता. १२) शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. बँकेने नेमणूक केलेले अंतर्गत तपासणी अधिकारी रामगोंडा भुजगोंडा पाटील (वय ५६, रा. सांगवडे, ता. करवीर) यांनी फिर्याद दिली.

फिर्यादीनुसार शाखाधिकारी संभाजी शंकर पाटील (५६, रा. शिये, ता. करवीर), कॅशिअर परशुराम कल्लाप्पा नाईक (रा. साईनाथ कॉलनी, कसबा बावडा) आणि सराफ सन्मुख आनंदराव ढेरे (रा. कसबा बावडा) या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या तिघांनी संगनमत करून २७ कर्जदारांचे ३२ लाख रुपये किमतीचे दागिने बदलले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा सहकारी बँकेच्या कसबा बावडा शाखेत कर्जदारांनी तारण ठेवलेले सोने बदलून त्याऐवजी बनावट सोने देण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत कर्जदार वनिता पांडुरंग मोरे (रा. हनुमाननगर, शिये) यांनी जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात तक्रार अर्ज दिला होता. अर्जाची दखल घेऊन बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. अंतर्गत तपासणी अधिकारी रामगोंडा पाटील यांनी केलेल्या चौकशीत या शाखेत २७ कर्जदारांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांमध्ये फेरफार केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. शाखाधिकारी, कॅशिअर आणि बँकेने नेमणूक केलेला सराफ या तिघांनी संगनमत करून खऱ्या दागिन्यांच्या ठिकाणी खोटे दागिने ठेवले. यासाठी तयार केलेल्या तारण कागदपत्रांवर बनावट सह्या केल्या. बँकेच्या विश्वासाला तडा देणारे कृत्य शाखाधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांनी केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याच्या सूचना बँकेच्या अध्यक्षांनी दिल्या होत्या. यानुसार तपासणी अधिकारी पाटील यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

पोलिसांनी शाखाधिकारी संभाजी पाटील, कॅशिअर परशुराम नाईक आणि सराफ सन्मुख ढेरे या तिघांवर गुन्हा दाखल केला. सीलबंद लिफाफ्यांमधून खरे सोने काढून त्याठिकाणी बनावट सोने ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तारण कर्जाची कागदपत्रेही त्यांनी नव्याने तयार केली. यासाठी कर्जदारांच्या बोगस सह्याही त्यांनीच केल्याचा आरोप कर्जदारांनी केला आहे. गुन्हा दाखल करताना शाहूपुरी पोलिस ठाण्यात कर्जदारांनीही गर्दी केली होती. २७ कर्जदारांनी ठेवलेल्या ३२ लाख किमतीच्या दागिन्यांची फसवणूक झाली आहे. संशयितांना लवकरच अटक करून सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती तपास अधिकारी, सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे यांनी दिली.

कलम - या कलमांनुसार गुन्हे दाखल

४२० - फसवणूक करणे

४०८ - कर्मचाऱ्याने स्वत:च्या पदाचा गैरवापर करून संस्थेची फसवणूक करणे

४०६ - कर्मचाऱ्याने जाणीवपूर्वक स्वत:च्या ताब्यातील मुद्देमालाशी छेडछाड करणे

४६७ - खोट्या सह्या करणे

३४ - संगनमताने कट रचणे

बँकेच्या विश्वासाला तडा

राज्यातील इतर जिल्हा बँकांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पगार आहेत. कर्जदारांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांमध्ये फेरफार करून फसवणूक करण्याचा प्रकार गंभीर आहे. यामुळे बँकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच शाखांमधील तारण सोन्याची तपासणी करावी. असे प्रकार अन्य शाखांमध्येही घडल्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती फसवणूक झालेल्या कर्जदारांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकशी अधिकाऱ्याची सौभाग्यवतीसाठी खरेदी

$
0
0

'उपसंचालक'मधील वरिष्ठ अधिकाऱ्याचा प्रताप, बिलासाठी पुन्हा वसुली

Bhimgonda.Desai @timesgroup.com

Tweet : bhimgondaMT

कोल्हापूर

येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयातील काहीजणांनी संगनमताने साहेबांच्या आशिर्वादाने प्रत्येकी ४ लाख २० हजार रूपये घेऊन ७० प्राध्यापकांना वैयक्तिक सरकारी मान्यता देण्याचा डाव आखला होता. आठवडाभरापूर्वी हे प्रकरण 'महाराष्ट्र टाइम्स'ने चव्हाट्यावर आणले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्याने कार्यालयास भेट दिली. मात्र त्यांनी वस्तुनिष्ठ चौकशी न करता फार्स केला. सौभाग्यवतींना कोल्हापुरी भेट देण्यासाठी तब्बल ९० हजारांची खरेदी केली. त्याचे बिल साहेबांना भागविण्याचा आदेश दिल्याची जोरदार चर्चा शिक्षण क्षेत्रात आहे. बिलाचे इतके पैसे परत मिळवण्यासाठी पुन्हा फाईलींवर नियमांचा बागुलबुवा उभा करून वसुली केली जात असल्याचा आरोप होत आहे.

उपसंचालक कार्यालय प्रशासनातील खाबूगिरी, डल्लामारू वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. तेथील साहेबांनी कोल्हापूरसह पाच जिल्ह्यांतील ७० प्राध्यापकांना सरकारी मान्यतेचा आदेश देण्यासाठी दोन कोटींचा ढपला जमविला. ढपल्यासाठी नियमबाह्य आदेश देण्याच्या प्रक्रियेविरोधात अन्यायग्रस्त प्राध्यापकांनी शिक्षणमंत्री, सचिवांकडे तक्रारी केल्या. तरीही वरिष्ठांना हाताशी धरून जाता जाता डल्ला मारत आदेश देण्याचे साहेबांचे नियोजन होते. हे वृत्त 'मटा'मध्ये प्रसिध्द झाले. त्याची दखल घेत वरिष्ठ अधिकारी चौकशीसाठी उपसंचालक कार्यालयात दाखल झाले. ढपल्याचे आकडे पाहून त्यांनाही मोह आवरता आला नाही. ते वाट सोडून सौभाग्यवतींसाठी खरेदीसाठी कनिष्ठ साहेबांना घेऊन बाजारात गेले. महागडी साडी, दागिने अशा विविध वस्तूंची मनसोक्त खरेदी केली. वस्तू घेतल्यानंतर त्यांनी आपल्या खिशात हात न घातल्याने सोबतच्या साहेबांना सुमारे ९० हजारांचे बिल भरावे लागले. त्यानंतर ते चौकशीचा फार्स करून दुसऱ्या दिवशी खरेदीच्या वस्तू घेऊन निघून गेले. त्यावर ९० हजार रूपयांचे बिल कसे वसूल करायचे यांची चिंता त्या येथील साहेबांना लागली. त्यांनी कार्यालयातील काही मध्यस्तांना फर्मान काढले. त्यामुळे त्या बिलासाठी वेगळी वसुली करीत असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत आहेत. चौकशी आडून सौभाग्यवतीची हौस दुसऱ्याच्या पैशातून भागवण्यासाठी वरिष्ठांनी केलेल्या खरेदीचे वृत्त आठ दिवसानंतरही चर्चिले जात आहे.

बिल भागवणारे आणि खरेदी करणाऱ्यांचे संगनमत असल्याने हे प्रकरण गूपचूपपणे हाताळले जात आहे. यामुळे चौकशीचे प्रकरणही गुंडळाले आहे. साहेब पायउतार झाल्याने त्यांचे भक्त बिलाची वसुली करण्यात व्यस्त दिसत आहेत. परिणामी प्रशासनाकडे ७० प्राध्यापक भरतीच्या प्रकरणाच्या चौकशीचे पुढे काय झाले, त्याची माहिती विचारली असताना ठोस उत्तर मिळत नाही. खरोखरच चौकशी वस्तुनिष्ठ झाली असती तर अहवाल तयार झाला असता. तो बाहेर आला असता. परंतु, चौकशीचा फार्स झाला. वाटा आणि ९० हजारांची खरेदीच्या बिलावर प्रकरणच गुंडाळल्याचा आरोप होत आहे. याउलट भरतीचे प्रकरणच वादग्रस्त झाल्याने ६८ प्राध्यापकांच्या मान्यतेलाही ब्रेक लागला आहे.

--------------

कोट

'६८ प्राध्यापकांना मान्यतेसंबंधी सरकारकडून कोणतेही आदेश अद्याप आलेले नाहीत. या भरती प्रकरणाची चौकशी झालेली नाही. वरिष्ठ केवळ भेट देऊन गेले. या प्रकरणातील काही फाईली त्यांनी पाहिल्याचे कार्यभार घेतल्यानंतर कळाले. चौकशी न झाल्याने अहवालाचा प्रश्नच नाही.

किरण लोहार, प्रभारी उपसंचालक

--------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाबूजमाल गलेफ मिरवणूक उत्साहात

$
0
0

बाबूजमाल गलेफ

मिरवणूक उत्साहात

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पारंपरिक वाद्यांच्या गजरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या बाबू जमाल गलेफ मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. बाबूजमाल, गुजरी, भवानी मंडप, घुडणपीर परिसरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम भाविक सहभागी झाले होते.

रविवारी (ता.१०) बाबूजमाल उरुसास सुरुवात झाली. गेले तीन दिवस अनेक भाविकांनी दर्ग्याचे दर्शन घेतले. सोमवारी (ता.११) रात्री गंध लेपणाचा कार्यक्रम झाला. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास ढोल-ताशांच्या गजरात गलेफ मिरवणुकीस सुरुवात झाली. गावकामगार पाटीलवाडा येथे पठण झाले. त्यानंतर गुजरीमार्गे मिरवणूक जुना राजवाडा येथील भवानी मंदिरात गेली. तिथे राजर्षी शाहू महाराजांच्या गादीला अभिवादन करून मिरवणूक घुडणपीर दर्ग्यात गेली. त्यानंतर पापाची तिकटीमार्गे मिरवणूक पुन्हा बाबूजमाल दर्ग्यात आली. तिथे दर्ग्याला गलेफ चढविण्यात आला. दर्ग्याचे मुख्य लियाकत मुजावर, ऐनुद्दीन मुल्ला, अल्ताफ मुतवल्ली, शकील मुतवल्ली, इम्तियाज मुतवल्ली, दिलावर मुजावर, शाहरूख गडवाले यांनी धार्मिक विधी केले. पहाटेपर्यंत भाविकांनी दर्शन घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुकानगाळा जि. प. नेघेतला ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दरमहा १८०० ते दोन हजार रूपयांप्रमाणाचे साडेचार लाखांचे भाडे थकवल्याप्रकरणी जिल्हा परिषद बांधकाम प्रशासनाने भाऊसिंग रोडवरील तीन नंबरचा दुकानगाळा ताब्यात घेतला. जि. प. च्या मालकीचे या रोडवर १४ दुकानगाळे आहेत. झेरॉक्स व इतर स्टेशनरी विक्रीच्या दुकानगाळ्यांचे भाडे थकले होते. साडेचार लाख थकीत भाडे भरावे, अन्यथा गाळा सोडावा, अशी कायदेशीर नोटीस दिली होती. साहित्य काढून घेतल्याने दुकानगाळा मंगळवारी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती जि. प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरूड यांनी दिली.

-------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक लाखांवर रूपयांची मदत

$
0
0

कोल्हापूर : येथील सरोजिनीदेवी विश्वनाथ विश्वस्त मंडळातर्फे ताराराणी विद्यापीठातील पाचवी ते आठवीतील प्रत्येक विद्यार्थीनीस एक हजार, नववी आणि दहावीच्या विद्यार्थीनीस १५०० रूपयांप्रमाणे एकूण एक लाख सात हजार देण्यात आले. स्वयंसिध्दाच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी कांचन परूळेकर, जयश्री शिरोळकर आदी उपस्थित होते.

------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन खासगी सावकारांविरोधीत गुन्हे दाखल

$
0
0

दोन खासगी सावकारांविरोधात गुन्हे दाखल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मनमानी कर्जाची आकारणी करून त्याच्या वसुलीसाठी दमदाटी करणाऱ्या दोन खासगी सावकारांच्या विरोधात मंगळवारी (ता. १२) शाहूपुरी आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला . याशिवाय भुदरगड आणि हुपरी पोलिस ठाण्यातही खासगी सावकारांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अवैध खासगी सावकारी करून गरजू लोकांची पिळवणूक सुरू असल्याने अवैध सावकारांच्या विरोधात पोलिसांनी कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे.बंटीशेठ पिंजाणी (रा. ४ थी गल्ली, मेन रोड, राजारामपुरी) आणि नरेश अशोक परुळेकर (रा. विश्रामबाग, सांगली) अशी गुन्हे दाखल झालेल्या सावकारांची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत वसंत नेर्लेकर (वय ६१, रा. नागाळा पार्क) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. २०१६ मध्ये त्यांना राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ले येथील मंदिराच्या बांधकामाचा ठेका मिळाला होता. या कामासाठी ऐनवेळी पैशांची कमतरता जाणवू लागल्याने त्यांनी राजारामपुरीतील खासगी सावकार बंटीशेठ पिंजाणी याच्याकडून दरमहा ६ टक्के व्याजाने २ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज देतानाच पिंजाणी याने नेर्लेकर यांच्याकडून १०० रुपयांचे दोन कोरे स्टॅम्प घेतले होते. या कर्जापोटी गेल्या दोन वर्षात त्यांनी मूळ रक्कम आणि व्याजाची १ लाख ५३ हजारांची रक्कम परत केली. यानंतरही २ लाख ७२ हजार रुपयांची मागणी करीत पिंजाणी याच्याकडून दमदाटी केली जात आहे. वारंवार रात्री-अपरात्री मोबाइलवर फोन करून जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे. पैसे देण्यास टाळाटाळ होत असल्याने पिंजाणी याने नेर्लेकर यांच्या शाहूपुरीतील कार्यालयात जाऊन मारहाणही केली. याबाबत नेर्लेकर यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. ७) फिर्याद दिली. याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे.

शिवाजी पेठेतील सचिन आनंदराव वरुटे (वय ३६, रा. साकोली कॉर्नर, कोल्हापूर) याने २०११ मध्ये घराच्या नुतणीकरणासाठी नरेश परुळेकर या खासगी सावकाराकडून दरमहा १० टक्के व्याजाने १ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मार्च २०१८ पर्यंत वरुटे यांनी सावकारासह त्याच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात ४ लाख ५० हजार रुपये जमा केल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतरही १ लाख ९० हजार रुपयांची मागणी करून पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली जात असल्याची तक्रार वरुटे यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात केली.

............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरिओमनगरमध्ये घरफोडी

$
0
0

हरिओमनगरमध्ये घरफोडी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रंकाळा तलवाच्या पिछाडीस असलेल्या हरिओम नगरमध्ये बंद घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ६० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. मंगळवारी (ता. १२) दुपारी हा प्रकार उघडकीस आला. प्रकाश कृष्णाजी म्हेतर (वय ६८) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश म्हेतर यांचा मुलगा व सून हे दोघे एका राष्ट्रीयकृत बँकेत काम करतात. वर्षापूर्वी त्यांची बदली अकोला येथे झाली आहे. सुटीसाठी ते कोल्हापुरात आले आहेत. शुक्रवार पेठेत म्हेतर यांचे जुने घर आहे. रविवारी सायंकाळी म्हेतर व त्यांच्या पत्नी शुक्रवार पेठेतील घरी गेले होते. मंगळवारी ते पुन्हा हरिओम नगरमधील घराकडे गेले असता, घराचा कडी-कोयंडा उचकटल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी बेडरुममधील कपाटातील कपडे व इतर साहित्य विस्कटून टाकले होते. तसेच त्यामध्ये असणाऱ्या लहान मुलांच्या सोन्याच्या ५ अंगठ्या, चांदीच्या वस्तू , महागडी चार घड्याळे व तीन हजार रुपये रोख रक्कम असा ६० हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केल्याचे म्हेतर यांचा निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ जुना राजवाडा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images