Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

साखर उदयोग

0
0

नुकसान थांबले, पण धोका कायम

साखर पॅकेजबद्दल उद्योगातून प्रतिक्रिया

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

साखर उद्योगापुढे निर्माण झालेले संकट दूर करण्यासाठी सात हजार हजार कोटी रुपयांची पॅकेजची घोषणा फसवी असल्याची टीका जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. साखर विक्रीचा दर २९ रुपये निश्चित केल्याने साखर उद्योगाचे नुकसान थांबले आहे पण साखर कारखान्यांना बँकांनी दिलेल्या कर्जांचे पुर्नंघटन न झाल्यास साखर उद्योगावरील धोका कायम आहे, असे मत त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, साखर उद्योग अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्राने धाडसी निर्णय घेतला असला तरी साखरेची आधारभूत किंमत २९ रुपयाऐवजी ३२ रुपये केली पाहिजे. इथेनॉल निर्मितीचा निर्णय फसवा असल्याची टीका होत असून साखर निर्यातीचे अनुदान दुप्पट करावे, साखर निर्यातीचे धोरण निश्चित करण्याची गरज आहे. केंद्र सरकारने साखर उद्योजकांसाठी जाहीर केलेले पॅकेज निव्वळ धूळफेक करणारे आहे. साखरेची एफआरपी ३२०० रुपये जाहीर झाली तेव्हा साखरेचा ३३०० रुपये होता. आता दर २५७५ रुपये घसरला आहे. साखर उद्योगासाठी बँकांनी दिलेल्या कर्जाची परतफेड होणे अवघड झाले आहे. अनेक साखर कारखान्याची साखर गोदामात पडून आहे. साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाची परतफेड जून अखेरीस करण्याची गरज आहे. कर्जफेड न झाल्यास सर्व कर्जे एनपीएमध्ये जाणार आहेत. त्यामुळे पुढील हंगामास बँका साखर कारखान्यांना कर्ज देणार नाहीत व त्याचा फटका साखर हंगाम सुरु होण्यावर होऊ शकतो. केंद्र सरकारने ४५लाख टन साखरेचा बफरस्टॉक करावा. साखरेचा किमान विक्री दर २९ रुपये कमी केल्याने साखर उद्योगाचे संकट किमान थांबले आहे. पण साखर विक्रीचा दर ३२ रुपये करावा, अशी आमची मागणी आहे. तसेच निर्यात अनुदान प्रतिटन ५५ रुपयावरुन दुप्पट करावे. कारखान्यांना दिलेल्या कर्जाचे पुर्नघटन करावे. गतवर्षीची साखर व या हंगामातील साखर शिल्लक असून पुढील हंगामात साखरेचे बंपर उत्पादन होणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ नियोजन करावे. परदेशात कच्ची साखर पाठवण्याचे नियोजन करावे. केंद्र व राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केल्यास ऊस उत्पादकांना एफआरपी देणे शक्य होणार आहे.

---------------

साखरेचे दर उतरल्याने अनेक साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना एफआरपीची रक्कम देणे शक्य झालेले नाही. साखर उद्योग अडचणीत आहे. त्या उद्योगास उर्जितावस्था आणण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेले निर्णय दीर्घकालीन हिताचे आहेत. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र सध्या शेतकऱ्यांना एफआरपी देण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यासाठी सरकारने कारखान्यांना विशेष अनुदान द्यावे.

धनंजय महाडिक, खासदार

--------------

केंद्र सरकारने साखर उद्योगास अडचणीतून बाहेर काढण्यासाठी धाडसी निर्णय घेतला. यामुळे ऊस उत्पादक, साखर उद्योगास दिलासा मिळेल. साखर मुल्यांकनामध्येही वाढ होईल. कारखान्यांची कर्ज खाती एनपीएमध्ये जाणार नाहीत. सध्या देशपातळीवर साखर उत्पादन खर्च ३ हजार ४०० ते ३ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल येतो. त्यामुळे केंद्राने निश्चित केलेल्या २९०० रूपयांचा दरचा फेरविचार होणे आवश्यक आहे.

पी. जी. मेढे, अभ्यासक, साखर उद्योग

००००००

सरकारने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी ४५०० कोटी रुपयांचे स्वस्त कर्ज उपलब्ध करण्याचा आणि त्यावरील व्याजावर सहा टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे निर्णय घेतला आहे. इथेनॉल धोरणामुळे शेतकऱ्याला अधिक भाव मिळू शकतो. इथेनॉल निर्मिती कारखाने सुरु करण्यासाठी राज्यातील कारखान्यांनी तत्काळ प्रयत्न केले पाहिजेत.

शामराव देसाई, जैवइंधन शेतकरी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालकमंत्री अगतिक; हसन मुश्रीफांची टीका

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पालघर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप शिवसेना युती तुटल्यास काँग्रेसची सत्ता येईल, असे वक्तव्य करणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील अगतिक झाले आहेत, अशी टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. शिवसेना व भाजपमध्ये युती झाल्यास काँग्रेस राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेल्या इनकमिंगवाल्याचे वाटोळे होणार, अशी खिल्लीही उडवली. आघाडी सरकारच्या कालावधीत मी व आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्यासाठी २२ हजार कोटी रुपयांचा निधी आणला असल्याने आमच्या मिरवणुकीसाठी इंद्राचा ऐरावत आणावा लागेल, असा टोलाही त्यांनी पालकमंत्र्यांना लगावला. केडीसीसी बँकेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आमदार मुश्रीफ म्हणाले, पालकमंत्री पाटील यांनी ५०० कोटी रुपयांचा निधी आणला असेल, तर हत्तीवरुन मिरवणूक काढली जाईल, असे वक्तव्य आमदार सतेज पाटील यांनी केले होते. या वक्तव्याला विरोध करून अडीच ते चार हजार कोटी रुपयांचा निधी आणला आहे, त्यामुळे विजयी मिरवणुकीसाठी आठ हत्ती आणावे लागतील, अशी टीका पालकमंत्री पाटील आणि आमदार सुरेश हाळवणकर यांनी केली होती. युती सरकारकडून जिल्हा नियोजन मंडळ आणि सर्व सरकारी विभागाकडे आलेला निधी एकूण चार हजार कोटी रूपये आहे. पंधरा वर्षाच्या आघाडी सरकारच्या काळात १५०० कोटी रूपये आणले. पंधरा वर्षात आम्ही आणलेला निधी २२ हजार कोटी रूपयांपर्यंत आहे. थेट पाइपलाइन, जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, राजर्षी शाहू जन्मस्थळ, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, शाहू खासबाग मैदान, रस्ते, ड्रेनेज लाईनसह अनेक कामांसाठी मोठा निधी आणला.

मुश्रीफ म्हणाले, पालकमंत्री पाटील अगतिक झाले आहेत. ते काय बोलतात त्यांनाच काही कळत नाही. शिवसेनेशी युती नसेल तर काँग्रेसची सत्ता येईल, असे वक्तव्य करीत आहेत. पालघर लोकसभा निवडणुकीनंतर 'युती तुटणार' असे वृत्त प्रसिद्ध होताच माध्यमांसमोर पालकमंत्री हवालदिल झाले. स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या पालकमंत्री यांनी गेल्या चार वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांची 'इनकमिंग'ची डायरी भरली आहे. भाजपची शिवसेनेशी युती झाली तर 'इनकमिंग' वाल्यांचे वाटोळे होणार आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी 'इनकमिंग' झालेल्यांना ' दिल्या घरी सुखी रहा' असे सांगून त्यांना आलेल्या पक्षात परत पाठवून द्या, असा सल्लाही दिला आहे.

ऋतुराजचा खुलासा करावा

कोल्हापूर उत्तरमधील भाजपचे उमेदवार ऋतुराज पाटील असतील, असे वक्तव्य पालकमंत्री पाटील यांनी केले आहे. याकडे लक्ष वेधले असता पालकमंत्री पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबाबत आमदार सतेज पाटील यांनी तत्काळ खुलासा करावा. खुलासा न केल्याने पक्ष कार्यकर्त्यांच्यात संभ्रम निर्माण होऊ शकतो, असेही मुश्रीफांनी सांगितले. दरम्यान कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील खासदार धनंजय महाडिक यांना दुसऱ्यांदा 'संसदरत्न' पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मुश्रीफ यांनी त्यांचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरोली गॅस स्फोटातील दुसऱ्या जखमीचा मृत्यू

0
0

(फोटो आहे)

शिरोली गॅस स्फोटातील दुसऱ्या जखमीचा मृत्यू

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथे फ्रीजच्या गॅस स्फोटात जखमी झालेले मारुती शिवाजी सुतार (वय ३७, मूळ गाव कुमठे, ता. तासगाव, जि. सांगली, सध्या रा. शिरोली हौसिंग सोसायटी, पुलाची शिरोली) यांचा उपचारादरम्यान मंगळवारी (त. ६) रात्री उशिरा मृत्यू झाला. त्याच्यावर गेले सात दिवस सीपीआरमध्ये उपचार सुरू होते. या घटनेतील महेंद पाटील या तरुणाच्या मृत्यूनंतर सुतार याचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या दोन झाली आहे. ३० मे रोजी सकाळी शिरोली हौसिंग सोसायटीत के. के. पाटील यांच्या घरातील भाडेकरू निलव्वा काडगोंड यांच्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. यानंतर आग विझवताना फ्रीजच्या गॅसचा स्फोट झाल्याने आग विझवण्यासाठी गेलेले दहाजण जखमी झाले होते. यापैकी तिघे गंभीर जखमी होते. यातील महेंद्र पाटील याचा रविवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. त्यानंतर मारुती सुतार यांचा मृत्यू झाल्याने शिरोलीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रो कब्बडीत लाख मोलाचे खेळाडू

0
0

प्रो कब्बडीत कोल्हापूरच्या खेळाडूंचा 'डंका'

sachin.patil1@timesgroup.com

कोल्हापूर : कला, साहित्य आणि क्रीडा क्षेत्रात कोल्हापूरकर नेहमीच आघाडीवर असतात. खेळातील उज्ज्वल परंपरा कायम ठेवत प्रो कब्बडी स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात कोल्हापूर जिल्ह्यातील सात खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. क्षमता, प्रतिभा आणि गुणवत्तेच्या जोरावर या खेळाडूंनी यश मिळवत कब्बडीचा दर्जा उंचावला आहे. दोन दिवस प्रो-कबड्डीच्या यावर्षीच्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव सुरु होता. यात सिद्धार्थ देसाई हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला 'यू मुंबा' संघाने करारबद्ध केले असून ऋतुराज कोरवीला गुजरात फोर्च्युन संघाने आपल्याकडे खेचले आहे. बोलीत खेळाडू लाखमोलाचे ठरले आहेत.

सर्वाधिक बोली लागलेला सिद्धार्थ देसाई हा चंदगड तालुक्यातील उंदळेवाडीसारख्या ग्रामीण भागातून आलेला आहे. सिद्धार्थ सध्या एअर इंडिया संघात प्रतिनिधित्व करत आहे. सिद्धार्थला यु मुंबा संघाकडून मोठ्या रकमेची बोली लागली आहे. ऋतुराज कोरवी हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची येथील आहे. उजवा कोपरा रक्षक व चढाईसाठी प्रसिद्ध असलेला ऋतुराजने राष्ट्रीय कब्बडी स्पर्धेत २०१८ साली महाराष्ट्र संघातून खेळ केला होता. चपळाईने मजबूत पकड हे त्याच्या खेळाचे वैशिष्ट्य आहे. अनेक नामवंत खेळाडूंना देखील त्याच्या पकडीतून सुटता येत नाही. गुजरात फोर्च्युन जायंट्सने त्याला करारबद्ध केले असून या हंगामात त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. ऋतुराजला कब्बडीचे बाळकडू घरातून मिळाले आहे. त्याच्या आई वडिलांनी राष्ट्रीय स्तरावर खेळ केला आहे. पाटणा पायरेट्सने पसंदी दिलेला करवीर तालुक्यातील सडोली खालसाचा तुषार पाटील आक्रमक चढाया करण्यासाठी प्रसिद्ध आहे. सध्या तो आयकर संघाकडून खेळत असून खेळातील अद्भुत कौशल्याच्या जोरावर त्याने नाव कमावले आहे. सडोली खालसाचा दुसरा खेळाडू महाराष्ट्र पोलिस संघाचा कर्णधार महेश मगदूम याला बंगळुरू बुल्स संघाने ८ लाखांची बोली लावून करारबद्ध केले आहे. दबंग दिल्ली संघातून बहारदार खेळ केलेल्या आनंद पाटीलला यंदा जयपूर पिंक पँथरने आपल्याकडे खेचले आहे. सावध पवित्रा घेत चढाया करण्यात तो माहीर मानला जातो. आनंद हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील आहे. राधानगरी तालुक्यातील आणाजेचा सुपुत्र अक्षय जाधवला पुणेरी फलटणकडून चांगली किंमत मिळाली आहे. जाधव हा यापूर्वीही पुणेरी फलटणकडून खेळायचा, त्याला यंदा पुण्याने ८ लाख रुपये मोजून आपल्याकडे कायम ठेवले आहे. प्रतिकूल परिस्थितीत सर्वोत्कृष्ट खेळ करणारा गुरुनाथ मोरे पुणेरी फलटणकडून यंदाही खेळणार आहे. त्याने मागील कामगिरीच्या जोरावर संघातील आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. तो आजरा तालुक्यातील लाकूडवाडीचा असून सध्या सेनादलातून खेळतो आहे. प्रो कब्बडी स्पर्धेत व्यावसायिक कंपन्यांनी कोल्हापूरच्या खेळाडूंचा समावेश करताना गुणवत्ता आणि मागील हंगामातील कामगिरीला प्राधान्य दिले आहे. टी ट्वेंटी स्पर्धेतील खेळाडूंना जेवढ्या प्रमाणात बोली लागते तेवढ्याच प्रमाणात कब्बडी खेळाला लागल्याने उपेक्षित राहिलेल्या या मराठमोळ्या खेळाला पुन्हा प्रतिष्ठा लाभत आहे.

०००

खेळाडूंची संघर्षात्मक वाटचाल

प्रो कब्बडीत चांगल्या बोली लागलेल्या खेळाडूंचा या स्पर्धेपर्यंतचा प्रवास संघर्षातून झाला आहे. पुरेशा सोयीसुविधा नसताना अनेक खेळाडूंनी ग्रामीण भागातून सुरुवात करत मोठी मजल मारली आहे. क्रिकेटपेक्षा कब्बडीसारख्या उपेक्षित राहिलेल्या खेळात करिअर करण्याच्या निर्णयावर ठाम राहत कोल्हापूरच्या जिगरबाज खेळाडूंनी क्षमता सिद्ध केली आहे.

००

अशा लागल्या बोली

सिद्धार्थ देसाई: ३६ लाख ५० हजार (यु मुंबा)

ऋतुराज कोरवी: ३०.४० लाख (गुजरात फोर्च्युन जायंट्स)

तुषार पाटील: २३ लाख (पाटणा पायरेट्स)

आनंद पाटील: ८ लाख (जयपूर पिंक पँथर)

महेश मगदूम: ८ लाख (बंगळुरू बुल्स)

गुरुनाथ मोरे: ८ लाख (पुणेरी फलटण)

अक्षय जाधव: ८ लाख (पुणेरी फलटण)

०००

कोल्हापुरचे खेळाडू मोठ्या संख्येने प्रो कब्बडीसाठी निवडले जात आहेत, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. या मातीत गुणवत्ता आणि क्षमता ठासून भरली आहे. भविष्यात भारतीय कब्बडी संघाकडून खेळण्याचे स्वप्न आहे.

आनंद पाटील, कब्बडी खेळाडू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१७ अनधिकृत शाळा बंद

0
0

शिक्षण प्रशासनाचा दावा; अचानक तपासणी होणार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात अनधिकृतपणे १७ खासगी शाळांना कुलूप लागल्याचा अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा शिक्षण प्रशासनाकडे पाठवला आहे. मात्र या अनधिकृत शाळा व वर्ग खरोखरच बंद आहेत की केवळ कागदावरच बंदचा अहवाल दिला आहे, त्याची अचानक शाळेला भेट देऊन तपासणी केली जाणार आहे. एकही अनधिकृत शाळा सुरू राहू नये, त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार येत्या दोन दिवसांत विशेष बैठक घेणार आहेत.

सरकारच्या शिक्षण विभागाने एप्रिल महिन्यात अनधिकृत शाळा बंद करण्याचे आदेश दिले. विनापरवाना सुरू असणाऱ्या शाळांना एक लाखांचा दंड करण्याचेही आदेशात म्हटले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षण प्रशासनाने सुरुवातीला अनधिकृत २४ शाळा शोधून काढल्या. त्यातील पाच शाळा दुसऱ्या टप्यात वगळण्यात आल्या. उर्वरित १९ शाळा व्यवस्थापनास बंद करण्याची सूचना दिली. १७ शाळा आणि अनधिकृत वर्ग बंद करण्यात आल्याचा अहवाल नुकताच प्रशासनाकडे आला आहे. प्रशासनाच्या अनधिकृतच्या यादीत असलेल्या तीन शाळा अद्याप सुरू आहेत. त्यांनाही बंद करा, अन्यथा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यातर्गंत कारवाई करण्यात येईल, अशा इशाऱ्याची नोटीस दिली आहे.

दरम्यान, उजळाईवाडीतील स्वामी विवेकानंद फाउंडेशन लिंगेस्टिक मायनॉरीटी चॅरिटेबल ट्रस्टची पहिली ते चौथीपर्यंतची शाळा सुरूच आहे. अल्पसंख्याक दर्जातून सरकारकडे परवानगीसाठी प्रस्ताव दिला आहे, असे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. आदिवासी दर्जात असल्याने शाळा सुरू ठेवल्याचे शाहूवाडीतील शामराव शिवाजी दाभाडे केंद्रीय प्राथमिक शाळा व्यस्थापनाचे म्हणणे आहे. शहरातील राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सीबीएससी अभ्यासक्रमाचे वर्ग सुरूच आहेत. परवानगीचा प्रस्ताव अंतिम टप्यात असल्याचा त्यांचा दावा आहे. उर्वरित अनधिकृत १७ शाळा बंद आहेत, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र त्यातील अनेक शाळांना राजकीय आश्रय आहे. त्यामुळे दबावापोटी कागदोपत्री बंद दाखवून भरमसाठ फी घेत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची शक्यता आहे. यापूर्वी अनेकवेळा या शाळा बंदच्या नोटिशींना केराची टोपली दाखवली आहे. यामुळे खरोखर त्या शाळा बंद आहेत का त्याची खात्री करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक अचानक भेट देणार आहे.

अनधिकृत शाळा व वर्ग सुरू असलेल्याने बंदच्या यादीत असलेल्या शाळांची नावे अशी : विद्याभवन इंग्लिश मीडियम स्कूल,(उजळाईवाडी, ता. करवीर),जिनियस पब्लिक स्कूल (भुये, ता. करवीर), यश इंग्रजी मीडियम स्कूल (पेठवडगाव, ता. हातकणंगले), सेंट ॲन्स इंग्लिश मीडियम स्कूल, ज्ञानप्रबोधीनी इंग्लिश मीडियम स्कूल (बाचणी, ता. कागल), जे. पी. नाईक ग्लोबल स्कूल (बहिरेवाडी, ता. आजरा), विद्यांजली प्राथमिक विद्यालय (कोंडिग्रे, ता. शिरोळ), एस. एन. इंग्लिश मीडियम स्कूल, आजरा, रोझरी इंग्लिश स्कूल (वाटंगी, ता. आजरा), किलबिल विद्यामंदिर, खतीजा सेमी-उर्दू, शिवराज इंग्लिश स्कूल (गडहिंग्लज), हिरण्यकेशी स्कूल (नूल, गडहिंग्लज), प्रेमानंद इंग्लिश स्कूल (हेरे, ता. चंदगड), विद्यामंदिर यशोधा इंग्लिश मीडियम स्कूल (सावर्डे, ता. गनगनबावडा), प्रिन्स शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल (कोल्हापूर), खतीजा सेमी उर्दु स्कूल (चंदगड).

अनधिकृत १७ शाळा बंद झाल्याचा अहवाल गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून आला आहे. त्या अहवालातील सर्व शाळा खरोखर बंद आहेत का त्याची खात्री करण्यात येईल. त्या शाळांना अचानक भेटी देण्यात येतील.

डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कष्टकऱ्यांचा संघर्ष पुस्तकरुपात

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आजरा तालुक्यातील श्रमिक कष्टकरी स्त्री पुरुषांनी केलेला संघर्ष, न्याय हक्कांसाठी त्यांच वर्षानुवर्षे सुरू असलेला लढा आता शब्दबद्ध झाला आहे. या लढ्यातील आघाडीचे कार्यकर्ते संपत देसाई यांनी कष्टकऱ्यांच्या संघर्षाचा सृजनापर्यंतचा प्रवास 'एका लोकलढ्याची यशोगाथा' या पुस्तकरुपांनी समोर आणला आहे. रविवारी (ता.१०) दुपारी ४.३० वाजता शाहू स्मारक भवन येथे पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे.

जिल्ह्यातील कष्टकरी, धरणग्रस्त त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वर्षानुवर्षे आंदोलन करत आहेत. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा लढा गाजला. प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनासाठी लढा, हक्कासाठी त्यांनी प्रशासनापासून लोकप्रतिनिधीपर्यंत केलेला पाठपुरावा आंदोलनाची साक्ष देतात. श्रमकऱ्यांच्या या लढ्यात आघाडीचे कार्यकर्ते म्हणून संपत देसाई यांचा सक्रिय सहभाग राहिला. त्यांनी लोक आंदोलनाच्या लढ्यावर लेखन केले आहे. लेखक डॉ. राजन गवस, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या हस्ते आणि डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण समारंभ होत आहे. या समारंभासाठी कॉम्रेड धनाजी गुरव, हुमायून मुरसल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शब्द पब्लिकेशनचे डॉ. नवनाथ शिंदे, प्रकाश मोरस्कर, सामाजिक संवेदना मंच आजराचे डी. के. बोडके, मारुती पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधीनगर सरपंच विरोधात बंड

0
0

म.टा.वृत्तसेवा, कसबा बावडा,

गांधीनगर (ता. करवीर) येथील येथील ग्रामपंचायतीच्या १७ पैकी १४ सदस्यांनी सरपंच रितू लालवाणी यांच्या मनमानी कारभाराची चौकशी व्हावी, या मागणीचे निवेदन करवीरचे गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, सरपंच रितू लालवाणी या पदाचा दुरुपयोग करुन बेकायदेशीर बांधकामांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळेच विविध पक्ष, संघटना ग्रामपंचायत कारभाराविरोधात सतत आंदोलने, तक्रारी करत आहेत. सरपंच लालवाणी यांच्या मनमानी कारभारामुळे गावची बदनामी होत आहे. बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याचा ठराव होऊनही कारवाई केली जात नाही. सिसनं १३५७-३ या भूखंडावरील विनापरवाना कंपाऊंडवर कारवाई करण्यास गेलेल्या ग्रामसेवकांना सरपंचांनी विरोध करून कारवाई करू नये, असा लेखी आदेश दिला आहे.या सर्व प्रकाराची चौकशी करावी. शिष्टमंडळात उपसरपंच सोनी सेवलानी, प्रेमचंद लालवाणी, प्रताब चंदवाणी, गणेश देवकुळे, स्वाती चंदवाणी, मोहिनी साखरे, लक्ष्मीबाई उदासी, प्रकाश उदासी, चंदरलाल उदासी, प्रशांत कुलकर्णी, विनोद हजुराणी, कल्पना ठोमके, सुनिता टेहल्याणी, कमल कल्याणकर आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विक्रमनगरातील तरुणाचा मृत्यू

0
0

विक्रमनगरातील तरुणाचा मृत्यू

कोल्हापूर : विक्रमनगर येथील मदिना कॉलनीत राहणारा मोहंमद अजीज खान (वय ४७, मूळ रा. वलसाद, गुजरात) हा राहत्या घरात गुरुवारी (ता. ६) सकाळी बेशुद्धावस्थेत आढळला. मित्रांनी त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तो मृत झाल्याचे सांगितले. मोहंमदला दारूचे व्यसन होते. केटरर्सकडे तो वेटर म्हणून काम करीत होता. घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

दुचाकी अपघातात तरुण जखमी

कोल्हापूर : कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर आंबेवाडी गावाजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात महेश वसंतराव सूर्यवंशी (वय ३४, रा. सोनतळी, ता. करवीर) जखमी झाला. अपघात गुरुवारी सकाळी झाला. जखमी महेशला परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत करण्यात आली.

ट्रक उलटल्याने चालक जखमी

कोल्हापूर : बांबवडे ते वारणानगर मार्गावर कोडोली धाब्याजवळ भरधाव ट्रक उलटला. यात चालक रावसाहेब नबीसाहेब वालेकर (वय ३०, रा. कोरोची, ता. हातकणंगले) जखमी झाले. बुधवारी (ता. ६) रात्री नऊच्या सुमारास हा अपघात घड. जखमी रावसाहेब यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.

ब्लेडने वार केल्याने तरुण जखमी

कोल्हापूर : शुक्रवारपेठ येथील नितीन नंदकुमार ओतारी (वय ३०) याने दारू नशेत स्वत:च्या अंगावर ब्लेडने वार करून घेतले. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे. यापूर्वीही दोनवेळा त्याने असा प्रकार केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केडीसी १९१ शाखातील ५० कोटी किंमतीच्या दागिन्यांची तपासणी

0
0

केडीसीसीच्या १९१ शाखांतील

सोने दागिन्यांची होणार तपासणी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कसबा बावडा शाखेतील सोने तारण दागिन्यांतील घोटाळ्यानंतर जाग आलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने १९१ शाखांतील सोने दागिन्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या दागिन्यांची किंमत अंदाजे ५० कोटी रुपये आहे. तसेच कसबा बावडा शाखेतील सोने तारण कर्जाची मुदत संपलेल्या १५ कर्जदारांना नोटीस पाठवून दागिन्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कसबा बावडा शाखेत सोने तारण कर्जाची फेड केल्यानंतर साडेसहा लाख रुपये किमतीच्या दागिन्यांऐवजी बेंटेक्स दागिने असल्याचे निदर्शनास आले. कर्जावेळी बँक शाखाधिकारी, सराफ, कॅशिअर, ग्राहक आणि साक्षीदारांच्या सह्या घेतल्या जातात तरीही गैरव्यवहार घडला असून बँकेने पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली आहे.

बावड्यातील गैरव्यवहार लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व शाखांतील सोन्यांच्या दागिन्यांची मशिनद्वारे तपासणी केली जाणार आहे. कसबा बावडा येथे १५ सोने तारण कर्ज प्रकरणांची मुदत संपली आहे. या कर्जदारांना बँकेने नोटीस पाठविली आहे. कर्जाची रक्कम न भरल्यास दागिन्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. या कर्ज प्रकरणातून कसबा बावडा शाखेत आणखी घोटाळा घडला आहे का, हे स्पष्ट होणार आहे. बँक शाखाधिकारी, एजंट आणि सराफ यांच्या संगनमताने घोटाळे होत आहेत. राज्यातील सर्व जिल्हा बँकांमध्ये केडीसीसी बँकेतील कर्मचाऱ्यांना सर्वांत जास्त पगार असतानाही कर्मचाऱ्यांकडून गैरव्यवहार होत असल्याबद्दल मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली.

जिल्हा बँकेच्या प्रत्येक शाखांत नाबार्ड, राज्य सहकारी बँक आणि बँकेचे अंतर्गत लेखापरीक्षण होते. बँकांमध्ये गैरव्यवहार होऊ नये म्हणून खासगी सीए नेमण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी सीए प्रत्येक शाखेत जाऊन स्वतंत्र लेखा परीक्षण करतील, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळ अॅडव्हायझरी कमिटीची आज बैठक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासह अन्य प्रश्नांच्या सोडवणुकीसंदर्भात अॅडव्हायझरी कमिटीची शुक्रवारी (ता.८) बैठक होत आहे. कमिटीचे चेअरमन धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता विमानतळ येथे बैठक होणार आहे. खासदार राजू शेट्टी, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनाही बैठकीला आमंत्रित केले आहे. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, आयुक्त अभिजित चौधरी, जिल्हा पोलिस अधिक्षक संजय मोहिते, कोल्हापूर विमानतळाच्या डायरेक्टर पूजा मूल, कमिटी सदस्य समीर शेठ, विशाल चोरडिया, अमर गांधी, सुरेंद्र जैन, योगेश कुलकर्णी आदींच्या उपस्थितीत ही बैठक होईल. विमानतळ विस्तारीकरण, आवश्यक सुविधा, अतिक्रमण अशा विविध घटकांसंबंधी निर्णय अपेक्षित आहे.

....................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्री पाटील यांची सोयीची भूमिका

0
0

शिक्षण कृती समितीचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोयीस्कर भूमिका घेत राजर्षी शाहू महाराज यांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण कायद्याची शताब्दी महोत्सव करण्याचे टाळले. शिक्षण वाचवा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. सत्तेचा गैरवापर करीत चळवळीत कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यास ते भाग पाडत आहेत.' असे आरोप शिक्षण वाचवा नागरी कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, गिरीष फोंडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून गुरुवारी केले. नऊ जून रोजी शिक्षणमंत्री विनोद तावडे कोल्हापुरात येणार आहेत त्यावेळी त्यांनी पळ न काढता बिंदू चौकात चर्चेला यावे, असे आव्हानही कृती समितीने पत्रकाद्वारे दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे, 'कमी पटाच्या शाळा बंद करणे, शाळांचे कंपनीकरण धोरणाविरोधात शिक्षण कृती समितीतर्फे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने शिक्षणमंत्री तावडे यांनी गेल्या महिन्यात कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर जेष्ठ सामाजिक नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्यासह डाव्या पक्षावर टीका केली. बिंदू चौकात चर्चेसाठी येण्याचे आव्हानही दिले. आव्हान स्वीकारून मंत्री तावडे यांच्याशी पत्रव्यवहार केला. ३० मे रोजी बिंदू चौकात त्यांची प्रतीक्षा केली. मात्र ते आले नाहीत. नऊ जूनला ते कोल्हापुरात एका कार्यक्रमासाठी येणार असल्याचे कळते. त्यावेळी त्यांनी वेळ द्यावा. शिक्षण वाचवा कृती समिती प्रा.एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली चर्चा करण्यास तयार आहे. त्यामुळे शिक्षणमंत्री तावडे यांनी पळ न काढता स्वत:हून चर्चेसाठी बिंदू चौकात यावे, असे आव्हान दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंभार सहकारी सोसायटी...

0
0

शनिवारी यांत्रिक चाकाचे वाटप

कोल्हापूर : शहर कुंभार माल उत्पादक सोसायटीकडून गरजू आणि गरीब कुंभार कारागिरांना शनिवारी (ता. ९) सकाळी अकरा वाजता यांत्रिक चाकांचे वाटप आणि प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप केले जाणार आहे.

बापट कॅम्प येथील सोसायटीच्या सभागृहात कार्यक्रम होईल. केंद्र सरकारचा खादी आणि ग्रामोद्योग आयोग आणि केंद्रीय ग्राम कुम्हारी संस्था खानापूर बेळगाव यांच्या सहकार्याने सोसायटीला २०० यांत्रिकी चाके मंजूर झाली आहेत. पैकी पहिल्या टप्प्यात ३५ यांत्रिक चाके मिळणार आहेत. उपमहापौर महेश सावंत यांच्या हस्ते वाटप होणार असून अध्यक्षस्थान महापौर शोभा बोंद्रे भूषवणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सनी पोवार खुनातील दोन पोलिसांना जामीन

0
0

सनी पोवार खुनातील दोन पोलिसांना जामीन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पेठवडगाव पोलिस ठाण्याच्या कोठडीत सनी पोवार या तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवून वडगाव पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक संजीव पाटील, सहायक फौजदार धनाजी पाटील व हवालदार बबन शिंदे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निकालाविरोधात संशयितांनी मुंबई हायकोर्टात अपील केले होते. न्यायमूर्ती आर. बी. गवई व सारंग कोतवाल यांनी संजीव पाटील व धनाजी पाटील यांचा सशर्त जामीन मंजूर केला.

पेठवडगाव पोलिस ठाण्यात २०१४ मध्ये पोलिसांच्या मारहाणीत सनी पोवार या तरुणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक संजीव पाटील याच्यासह तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. सीआयडीने या प्रकरणाचा तपास करून जिल्हा कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्याची सुनावणी होऊन कोर्टाने २०१७ मध्ये संजीव पाटील, सहायक फौजदार धनाजी पाटील व बबन शिंदे या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. जिल्हा न्यायालयातील निकालाच्या विरोधात आरोपींच्या वतीने मुंबई हायकोर्टात अपील केले होते. ॲड. अशोक मुंडरगी यांनी आरोपींची बाजू मांडली. त्यानंतर न्यायमूर्ती आर. बी. गवई व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने संजीव पाटील व धनाजी पाटील यांनी दर महिन्याला सीआयडी कार्यालयात हजेरी लावण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला. तर बबन शिंदे याने अद्याप जामिनासाठी अर्ज दाखल केलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यायी पुलाच्या कामास प्रारंभ

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्रीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या परवानगीनंतर गुरुवारी गेली अडीच वर्षे रखडलेल्या पर्यायी पुलाच्या बांधकामास सुरुवात झाली. पिलर उभारण्यासाठी जेसीबीने खुदाई करण्यात आली. पिलरचे काम युद्धपातळीवरून पूर्ण होणार असून, दोन पिलरवर स्लॅब टाकण्याचे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या देखरेखीखाली पुलाचे काम पूर्ण होणार आहे.

शिवाजी पूल धोकादाक झाल्याने पर्यायी पुलाचे काम ताबडतोब सुरू करावे यासाठी कोल्हापूर शहर व जिल्हा कृती समितीने आंदोलन सुरू केले होते. पुलाचे काम सुरू न झाल्यास भिंत बांधून पूल बंद केला जाईल, असाा इशारा दिला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने पुलाचे बांधकाम सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. पुलाच्या बांधकामास केंद्रीय पुरातत्त्व विभागाने परवानगी नाकारल्याने राज्य आपत्कालीन विभागाकडेही प्रस्ताव पाठविला होता. तसेच केंद्रीय पुरातत्त्व विभाग, महसूल आणि राष्ट्रीय महामार्गावर खडलेले पर्यायी पुलाचे काम युद्धपातळीवर होण्यासाठी ब्रह्मपुरी टेकडी व पर्याय पुलामधील अंतर तपासण्यासाठी मे महिन्यात सर्व्हे करण्यात आला. ब्रह्मपुरी टेकडीवरून पुलाच्या तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून सर्व्हे केल्यानंतर पुलाचे अंतर पुरातत्त्व वास्तूपासून १०० मीटरच्या पुढे १२७ मीटर दूर असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले. त्यामुळे पुलाच्या बांधकामातील मार्ग मोकळा झाला. पूल बांधणीचे ठिकाण पुरातत्त्व विभागाच्या कक्षेत येत नसल्याचा अहवाल केंद्रीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे पाठविला आहे. त्यानंतर सोमवारी (ता.४) या विभागाने पर्यायी पुलाच्या बांधकामास परवानगी दिली.

केंद्रीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे इतिवृत्त राष्ट्रीय महामार्ग विभागाला प्राप्त झाल्यानंतर गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे यांच्या हस्ते कामास सुरुवात झाली. पिलर उभारण्यासाठी जेसीबीने खड्डा खुदाईचे काम सुरू करण्यात आले. १६.५ फूट लांबीच्या स्लॅबसाठी १५ ते २० फूट खड्डा खोदण्यात येणार असून, त्यानंतर पिलर उभारण्यात येणार आहे. दोन्ही पिलरवर स्लॅब टाकण्यात येणार आहे. पाऊस, पूर, महापुरामुळे पिलरवर स्लॅब टाकण्यास विलंब होणार असला तरीही नोव्हेंबरपर्यंत स्लॅब पूर्ण होईल, असा विश्वास ठेकेदार एन. डी. लाड यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांच्या निर्णयानुसार वाटचाल

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षाचे नेते शरद पवार सर्वेसर्वा आहेत. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखविला, ताकद दिली. मी, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे. पवार जे निर्णय घेतील त्यानुसार माझी राजकीय वाटचाल राहील. निवडणूक कधीही लागू दे, मी लढवायला तयार आहे,' असे खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ लोकसभेसाठी दुसऱ्या उमेदवाराची घोषणा करत आहेत याकडे लक्ष वेधले असता खासदार महाडिक म्हणाले, 'मुश्रीफ नेते आहेत. त्यांची भूमिका काय यावर मी बोलू शकत नाही. त्यांच्या मनातील कळत नाही. पवार आणि त्यांच्यात काय चर्चा झाली हे मला माहीत नाही. मात्र, पवार जे निर्णय घेतील तशी माझी वाटचाल राहील,' असे त्यांनी स्पष्ट केले.

खासदार महाडिकांना सलग दुसऱ्या वर्षी संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. देशपातळीवर हा पुरस्कार मानाचा समजला जातो. देशभरातील पाच खासदारांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल के. एम. नारायणन, माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांच्या हस्ते ९ जूनला आयआयटी मद्रास येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. याप्रसंगी आयआयटी मद्रासचे संचालक भास्कर राममूर्ती मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, लोकप्रतिनिधींच्या सर्वांगीण कामकाजाचा सरकारस्तरावर आढावा घेणाऱ्या पीआरएस इंडिया या संस्थेसह प्राइम पॉइंट फाउंडेशन, प्रो सेन्स आणि केंद्रीय संसदरत्न समितीतर्फे देशभरातील खासदारांच्या कार्याचे मूल्यमापन केले जाते. महाडिकांना २०१६-१७ मध्ये संसदेत सर्वाधिक प्रश्न विचारणे, विकासकामांना चालना दिल्याबद्दल संसदरत्न पुरस्कार दिला होता. या पुरस्काराची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत खासदार महाडिक यांनी राजकीय वाटचालीविषयी भूमिका मांडली.

२०१७-१८ मधील संसदेतील कामकाजाचा सहभाग, नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविण्याची तयारी, प्रश्नांची सोडवणूक या बाबींची दखल घेत यंदाही त्यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला. याबद्दल महाडिक म्हणाले, 'आजअखेर संसदेत ९७० प्रश्न उपस्थित केले. ४५ चर्चांमध्ये सहभाग घेतला. याव्यतिरिक्त सहा खासगी विधेयके सादर केली. यामध्ये शिक्षण हक्कासह देशभरात खेळाच्या पायाभूत सुविधांसाठी पंधरा हजार कोटी रुपयांची तरतूद करावी या विधेयकांचा समावेश आहे. विकासात्मक दृष्टी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. संसदेतील कामगिरीची दखल घेत २०१७-१८ या वर्षाचा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.'

..............

हम जमीनसे जुडे हुए है

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार महाडिकांना केंद्रात मंत्रिपद देऊ, असे वक्तव्य केले होते त्याविषयी विचारले असता महाडिक म्हणाले, 'प्रत्येक पक्षाला चांगल्या उमेदवारांची आवश्यकता असते. खासदार म्हणून माझा चांगला परफॉर्मन्स आहे. हम जमीन से जुडे हुए है. सामान्य माणसात मिसळतो. मंत्रिपदाचे वक्तव्य करून त्यांनी मला मान दिला असावा, असे मला वाटते. कुठल्याही पक्षाच्या भूमिकेबाबत बोलण्याइतका मी मोठा नाही.'

.............

पवारांचे मार्गदर्शन, कोल्हापूरकरांचे आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी निवडून आल्यास मतदारसंघात एक हजार कोटी रुपयांचा निधी विकासासाठी उपलब्ध करू, अशी ग्वाही दिली होती. गेल्या चार वर्षांच्या कालावधीत एक हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा केला. यासाठी ३५०० कोटी रुपये मंजूर असून, आतापर्यंत १७०० कोटी प्रोजेक्टसाठी वर्ग झाले आहेत. कोल्हापूर विमानसेवा व विस्तारीकरणासाठी पाठपुरावा, पासपोर्ट कार्यालय, रेल्वे स्थानकातील सुविधेसाठी २२ कोटी रुपयांची मंजुरी अशी विविध कामे केले. पक्षाचे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचे मार्गदर्शन लाभले. कोल्हापूरच्या नागरिकांच्या पाठबळामुळे हे काम मी करू शकलो. संसदरत्न पुरस्कार हा कोल्हापूरच्या नागरिकांचा आशीर्वाद आहे. जिल्ह्यातील रस्त्यासाठी ४०८ कोटी रुपये आणले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निधी उपलब्ध करुन दिला. जिल्ह्यात बीएसएनएलचे १२ टॉवर मंजूर झाले आहेत.

...............................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१२ जूनला मंत्रालयावर मोर्चा

0
0

कोल्हापूर : कृषी मालाला दीडपट हमीभाव द्यावा, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या नेतृत्वाखाली १२ जून रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चात जिल्ह्यातील शेतकरी साखर, सोयाबीन, तूर घेऊन सहभागी होतील, असे निवेदन किसान सभेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिले. शेतकऱ्यांना पेन्शन, दूध दरवाढ, संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी आदी मागण्या आहेत. शिष्टमंडळात सभेचे नामदेव गावडे, रघुनाथ कांबळे, प्रशांत आंबी, सतिशचंद्र कांबळे, प्रशांत आंबी कृष्णा पानसे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपूर: हेडफोनने घेतला तरुणाचा बळी

0
0

पंढरपूर :

कानाला हेडफोन लावून रुळ ओलांडणे एका तरुणाच्या जीवावर बेतले. इंजिनची धडक बसल्याने तरुणाला जीव गमवावा लागला. उमेश खिलारे असे तरुणाचे नाव आहे.

गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास उमेश कानाला हेडफोन लावून प्लॅटफॉर्मवरून उतरुन रूळ ओलांडत होता. यावेळी मिरजेकडे निघालेल्या इंजिनाने जोरदार हॉर्न वाजवला मात्र कानात हेडफोन असल्याने उमेशला हा आवाज ऐकू आला नाही. इंजिनाची जोरदार धडक बसल्याने उमेश फेकला गेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलांच्या शिक्षणाची घ्या काळजी

0
0

(फोटो आहे)

पोलिसांनो, तंदुरुस्त रहा!

आयजी नांगरे-पाटील यांचे पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांना आवाहन

पोलिस कल्याण सप्ताहाचा समारोप

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पोलिस दलातील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी स्वत:च्या तंदुरुस्तीकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी नियमित व्यायाम करावा, तसेच काम करताना तणावमुक्त राहावे. कुटुंबीयांना जास्तीतजास्त वेळ देऊन मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या,' असे आवाहन विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी केले. अलंकार हॉल येथे शुक्रवारी सकाळी पोलिस कल्याण सप्ताहाच्या समारोपप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

आयजी नांगरे-पाटील म्हणाले, 'पोलिसांसाठी शारीरिक तंदुरुस्ती अतिशय महत्त्वाची असते. कामाच्या वेळा, ठिकाण आणि स्वरुप यामुळे पोलिसांची दमछाक होते. हे टाळण्यासाठी पोलिसांनी तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी तणावमुक्त राहावे. त्यासह कामाच्या वेळेचे नियोजन करून अधिकाधिक वेळ कुटुंबात घालवावा. मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे,' फिजिओथेरपीस्ट डॉ. प्रांजली धामणे यांची 'योग्य आहार' या विषयावर कार्यशाळा झाली. शेती व दूग्धव्यवसायाची आवड असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान झाले.

जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा, त्यांच्या कुटुंबीयांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम पोलिस कल्याण विभागाकडून सुरू आहे. या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात मुख्यालयात पोलिस कल्याण सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. सप्ताहादरम्यान वैद्यकीय शिबिर, व्यसनमुक्तीपर व्याख्यान, नेत्रतपासणी करण्यात आली.

या वेळी मान्यवरांच्या हस्ते २०१७-१८ शैक्षणिक वर्षात उत्तम यश मिळवलेल्या मुलांचा सत्कार झाला. निखील शिंदे, अमित व्हटकर, मेहवीन शेख, सिध्देश परीट, प्रदीप पाटील, रुपाली गुरव, करूणा कांबळे शुभंकर नलवडे, रवींद्र पाटील, रितूल नाकील, भक्ती पाटील, समीक्षा पुजारी, अनघा हजारे, जास्मीन गवंडी यांना गौरविण्यात आले. पोलिस अधीक्षक संजय मोहिते उपअधीक्षक सतीश माने, शाहूवाडी विभागाचे उपअधीक्षक आर. आर. पाटील, शहर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, तानाजी सावंत, अशोक धुमाळ, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळग्रस्त ऋतुजाची यसाची पालवी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उस्मानाबाद जिल्ह्यातील नागझरवाडीच्या ऋतुजाचे शिक्षण दुष्काळामुळे बंद करण्याची वेळ तिच्या आई-वडिलांवर आली होती. दुष्काळामुळे हाताला कामच नसल्याने दोन वर्षांपूर्वीच मुलीची शाळा बंद करण्याचा विचार सुरू होता. याचवेळी कोल्हापुरात खिडक्यांचे पडदे शिवून उदरनिर्वाह करणाऱ्या मावसभावाने ऋतुजाला शिक्षणासाठी कोल्हापुरात बोलवले. ऋतुजाने मावसभावाचा विश्वास सार्थ ठरवत दहावीच्या परीक्षेत ९३.८० टक्के गुण मिळवले. दुष्काळाने होरपळलेल्या आई-वडिलांच्या मनाला ऋतुजाच्या यशाने आशेचे नवी पालवी फुटली.

ऋतुजा बापूराव यादव हिचे मूळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यातील नागझरवाडी. दोन एकर कोरडवाहू शेती आणि मोलमजुरी करून कसेबसे पोट भागत होते. २०१६ मध्ये दुष्काळाच्या झळा वाढल्या. शेतात काहीच पिकले नाही. दुष्काळामुळे मोलमजुरीही बंद झाली. दोन वेळच्या खाण्याचे वांदे झाल्याने मुलीचे शिक्षण बंद करण्याचा विचार आई-वडिलांकडून सुरू होता. शाळेत हुशार असलेल्या ऋुतुजाला शिकण्याची खूप इच्छा. पण दुष्काळाच्या झळांमध्ये तिच्या स्वप्नांची होळी होण्याची वेळ आली होती. घरात पहिलीच मुलगी शिकत होती. याचा अभिमान ऋुतुजाच्या मावसभावाला होता. तिचे मावसभाऊ भैरवनाथ गाडे हे कोल्हापुरात दरवाजे आणि खिडक्यांचे पडदे शिवण्याचे काम करतात. राजारामपुरीच्या आठव्या गल्लीत ते पत्नी आणि मुलासह राहतात. गाडे यांनी ऋतुजाच्या आई-वडिलांची कोंडी ओ‌ळखली. २०१६ मध्ये तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन तिला कोल्हापुरात आणले. उषाराजे हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि ऋतुजाच्या शिक्षणाचा प्रवास थांबता-थांबता पुन्हा सुरू झाला.

जेमतेम आर्थिक परिस्थिती आणि आई-वडिलांपासून शेकडो किलोमीटर दूर राहूनही तिची शिकण्याची उर्मी कमी झाली नाही. उलट तिच्यातील जिद्द वाढली. मावसभाऊ आणि वहिणीला कामात मदत करून तिने अभ्यास केला. शाळेतील अभ्यासाव्यतिरिक्त तिने स्वत:चे अभ्यासाचे नियोजन केले होते. दहावीच्या परीक्षेत ९३.८० टक्के गुण मिळवून तिने स्वत:च्या जिद्दीची चुणूक दाखवली.

ऋतुजाला संगणक अभियंता व्हायचे आहे. यासाठी खुप परिश्रम करण्याची तिची तयारी आहे. आई-वडिलांचे कष्ट आणि मावसभावाने ऐनवेळी मदतीचा हात पुढे केला नसता, तर कदाचित आठवीपर्यंतच शिक्षण थांबले असते. परिस्थितीची जाणीव असलेल्या ऋतुजाने नातेवाईकांसह शिक्षकांचाही विश्वास सार्थ ठरवला. आता पुढील लढाईसाठी बळ मिळाल्याची भावना ती व्यक्त करते.

'अभ्यासाचा ताण घेण्यापेक्षा समजून घेणे, लिखानाचा सराव आणि मैत्रिणींशी केलेल्या चर्चेतून चांगला अभ्यास झाला. अभ्यासात सातत्य ठेवल्यानेच अपेक्षित गुण मिळवता आले.'

ऋतुजा यादव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाणेकरांवर कारवाई कधी?

0
0

ठाणेकरांवर कारवाई कधी?

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात मूर्तीला घागरा-चोली वस्त्र परिधान करून भाविकांच्या भावना दुखावल्याच्या घटनेला ९ जूनला एक वर्ष पूर्ण होत आहे. याबाबत गुन्हा दाखल करूनही गेल्या वर्षभरात अजित ठाणेकर यांच्यावर फौजदारी कारवाई का केली नाही? अशी विचारणा करवीर निवासिनी अंबाबाई पुजारी हटाव कृती समितीने केली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना हे निवेदन देण्यात येणार आहे. राज्य सरकारने एप्रिल २०१८ मध्ये मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचा कायदा केला. तरीही याची अंमलबजावणी होत नसल्याने १५ दिवसात कायद्याची अंमलबजावणी करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करावे लागेल, असा इशारा कृती समितीने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images