Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची हानी टाळा

$
0
0

फोटो आहे.

कोल्हापूर टाइम्स टीम

हवा आणि पाणी दोन्ही मोफत असल्याने मानवाला त्यांची किंमत नाही. त्यांच्या संवर्धनासाठी फारसे लक्ष दिले जात नाही. जैवविविधतेच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येकाची असून विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची हानी टाळावी, असे प्रतिपादन पर्यावरण तज्ज्ञ अमोल घाग यांनी मंगळवारी केले. जिल्हा परिषदेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.

अमोल घाग म्हणाले, पर्यावरणाचे संरक्षण करून विकास करणे सहज शक्य आहे. त्यासाठी नियोजन महत्वाचे आहे. नियोजन नसताना स्वार्थासाठी औद्योगिक विकास केल्यास पर्यावरणाची हानी होते. जैववैविधतेच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येकाची आहे. प्रत्येकाने एक रोपे लावून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. सरकार वृक्ष लागवडीची मोहिम राबवत आहे. त्या मोहिमेत सरकारी अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची आहे. अधिकाऱ्यांनी झाडे लावण्यासह संवर्धनासाठी नियोजन करावे.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीमुळेच कोल्हापूर जिल्हयात पाणी टंचाई निर्माण होत नाही. भविष्यातही टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी सतर्क राहणे काळाची गरज आहे. एकेकाळी मुबलक पाणी असणाऱ्या शिमला शहरात सध्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. हीच वेळ कोल्हापूरवर येऊ नये, त्यासाठी पर्यावरण रक्षणाची गरज आहे. सरकारने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक झाडे लावून जगविली पाहिजेत. प्लॅस्टिक वापराला फाटा देऊन प्रदूषणमुक्त पंचगंगेसाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे. पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. या वेळी निसर्ग मित्र अनिल चौगुले यांनी मार्गदर्शन केले. या वेळी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुलाचे काम गुरुवारपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रीय स्मारके प्राधिकरणच्या बैठकीत पर्यायी पुलाच्या बांधकामाला मान्यता मिळाली. मान्यतेच्या त्या आदेशाच्या प्रतीच्या प्रतिक्षेत राष्ट्रीय महामार्ग, बांधकाम विभाग आहे. दोन दिवसांत लेखी स्वरुपात आदेश प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे. त्यानुसार पर्यायी पुलाच्या बांधकामाला गुरुवारपासून सुरुवात करण्याचे नियोजन आहे. पावसाळ्याच्या कालावधीत पर्यायी पुलाचे काम कशा पद्धतीने करता येईल, कोणती कामे प्राधान्याने करता येतील? याबाबत नियोजन सुरु आहे.

भारतीय पुरातत्त्व विभागाचे पश्चिम विभागीय संचालक डॉ. एम. नंबीराजन यांच्याकडे मान्यतेची तांत्रिक प्रक्रियेची पूर्तता करण्याची जबाबदारी सोपवली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्मारके प्राधिकरणकडून मान्यता मिळाल्यानंतर बांधकामासाठी आवश्यक फॉर्म नंबर चार भरण्याची पूर्तता करावी लागते. खासदार छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांनी याकामी लक्ष घातल्याने त्याचीही पूर्तता झाली आहे. नंबीराजन यांच्याकड तो फॉर्म उपलब्ध झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यातील संयुक्त सर्व्हेनंतर पर्यायी पूल हा पुरातत्त्व विभागाच्या १०० मीटर कक्षेच्या बाहेर असल्याने बांधकामासाठी ना हरकत दाखला मिळावा, असा अहवाल राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे पाठिवला होता. त्या विभागाकडून दोन दिवसांत एनओसी मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय कार्यालयाकडून पुरातत्त्वच्या मुंबई कार्यालयाकडे व त्यानंतर बांधकाम विभागाला आदेश प्राप्त होईल.

........

अबुटमेंटचे काम अग्रक्रमाने

आसमास कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत पर्यायी पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. कंपनीचे येथील प्रतिनिधी एन. डी. लाड यांनी बांधकाम विभागाकडून आदेश मिळताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. हौदाच्या ठिकाणी सपाटीकरण केलेल्या जागेत अबुटमेंटची उभारणी होणार आहे. त्यासाठी खोदाई केली जाईल. १५ फूट पिलर, पुलाचा ४० मीटरचा स्लॅब अशी महत्त्वाची कामे आहेत. शिवाय पुलाच्या उर्वरित २० टक्के कामासाठी पुलाच्या पश्चिमेकडील बाजूने रस्ता तयार करावा लागणार आहे. आदेश मिळताच काम सुरु करण्याचे नियोजन केले आहे.

.......................

बांधकामखर्च आणखी वाढणार

पर्यायी पुलाचे मूळ अंदाजपत्रक नऊ कोटीचे होते. त्या अंदाजपत्रकात दोनदा वाढ झाली. अंतिमत: पुलाचा संपूर्ण खर्च १५ कोटीवर अपेक्षित धरला आहे. उर्वरित वीस टक्के कामासाठी ३,०५,३५,४५५ रुपयांची वर्क ऑर्डर काढली आहे. दरम्यान, पुलाच्या पश्चिमेकडील बाजूने रस्ता, पुलाची अन्य कामे यामुळे बांधकाम खर्चात आणखी ५० लाख रुपयांहून अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतनाचा राग

$
0
0

वाटचाल चार वर्षांची

............................

प्रशासन

........

सरकारी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात असंतोष

satish.ghatage@timesgroup.ocm

Twitt:satishgMT

लीड..........

केंद्रातील भाजप सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी केली असली राज्यात अंमलबजावणी न झाल्याने राज्य सरकारी, निम सरकारी कर्मचाऱ्यांकडून केंद्र सरकारविरोधात राग आळवला जात आहे. गेल्या चार वर्षात सरकारकडून एकही मागणी मान्य झालेली नाही, त्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप केला जात आहे. केंद्र व राज्य सरकारच्याविरोधात सनदशीर मार्गाने आंदोलन केले जात आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येईल तसतशी आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

..............................................

केंद्रात वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्यात वेतन आयोग लागू केला जातो. ही परंपरा भाजप सरकारच्या काळात मोडली गेल्याची भावना कर्मचाऱ्यांकडून बोलून दाखवली जात आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक जानेवारी २०१६ रोजी सातवा वेतन आयोगाची घोषणा करण्यात आली तर २०१७ पासून अमंलबजावणी करण्यात आली. पण राज्य कर्मचाऱ्यासाठी सातव्या वेतन आयोगासाठी राज्य सरकारने समिती नियुक्ती करुनही अंमलबजावणीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, वन, आरटीओ, कृषी, आरोग्य, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, प्राध्यापक सह सर्व सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचा आग्रह वाढू लागला आहे.

सातव्या वेतन आयोगाबरोबर अंशदायी पेन्शन योजना बंद करुन जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी प्रमुख मागणी आहे. केंद्रातील महिला कर्मचाऱ्यांना बालसंगोपनासाठी दोन वर्षे रजा मिळते. राज्यातील महिला कर्मचाऱ्यांना सध्या सहा महिने बाळंतपणासाठी रजा मिळते. केंद्राप्रमाणे दोन वर्षे बालसंगोपन रजा मिळावी ही महिला कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे.

पाच दिवस आठवडा करावा या मागणीला जोर धरत असला तरी सध्या सहा दिवसात कर्मचारी पूर्ण क्षमतेने काम करत नाहीत असा आरोप सरकारकडून केला जात आहे. गेली अनेक वर्षे सरकारी कर्मचारी भरती नसल्याने एका कर्मचाऱ्यांकडे तीन विभागाचा कारभार सोपवला जात असल्याचे चित्र प्रत्येक कार्यालयात पहायला मिळते. अनेक कर्मचारी रात्री उशिरापर्यंत काम करत असतात. पाच दिवसांचा आठवडा केल्यास वीज, पाणी, वाहतूक खर्चात मोठी बचत होऊ शकते, असे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने अहवाल दिला असला तरी सरकार पाच दिवसाच्या आठवड्यासाठी टाळाटाळ करत आहे. कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वरुन ६० करावे अशी मागणी महसूल कर्मचारी करत आहेत. पण ही मागणी शिक्षकांकडून केली जात नाही. ६० वय केल्याने निवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना द्यावयास लागणारी रक्कम वापरण्यास सरकारला मिळते असा दावा केला जात आहे. पण ५८ वर्षे निवृत्तीचे वय ठेवल्याने नवीन भरती प्रक्रिया होऊ शकतो, असा सरकारचा दावा आहे. सरकार नवीन भरती प्रक्रिया राबवत नाही, निवृत्तीचे वयही वाढवत नाही असा आरोप कर्मचारी संघटनांकडून केला जात आहे. आरोग्य विभागात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्यात असुरक्षिततेची भावना वाढीस चालली आहे. रात्री अपरात्री काम करताना सरकारी रुग्णालयात सुरक्षा रक्षकांची उणीव भासत आहे. पाळणा घरे, चेजिंग रुम, स्वच्छता गृहांची कमतरता भासत आहे.

...................

चौकट

कंत्राटी कर्मचारी भरतीस विरोध

भरती प्रक्रियेऐवजी सरकारी कार्यालयात कंत्राटी कर्मचारी भरले जात आहेत. त्याचा फटका युवकांवर होत आहे. कमी पगारात त्यांना राबावे लागत असल्याने त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ मिळत नसल्याने संघटनांचा कंत्राटी कर्मचारी भरतीस विरोध आहे. आरोग्य सेवेत कंत्राटी कर्मचारी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. सीपीआर रुग्णालयात स्वच्छतेसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे कर्मचारी ठेकेदाराशी बांधील असल्याने डॉक्टर व अधिकाऱ्यांनी जाब विचारल्यास, ठेकेदाराला विचारा, अशी थेट उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे चित्र पहायला मिळते.

...................

रोज नवा सरकारी अध्यादेश

शैक्षणिक क्षेत्रात गेली चार वर्षे गोंधळाचे राज्य आहे. रोज नवीन सरकारी अध्यादेशामुळे शिक्षक वैतागून गेले आहेत. शिक्षणातील नवीन प्रयोग राबवले आहेत. कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्या जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. शिक्षकांना अशैक्षणिक कामाचा बोजा वाढत असल्याने शैक्षणिक गुणवत्ता घटत चालली आहे. अंगणवाडी ते इयत्ता बारावीपर्यंत समग्र शिक्षण ही योजनेचे स्वागत होत असले तरी अंमलबजावणीच्यावेळी योजनेचे भवितव्य ठरणार आहे. शाळांना अनुदान मिळत नसल्याने पायाभूत सुविधांची अबाळ होत चालली आहे. शाळा व महाविद्यालयात शिक्षक व प्राध्यापकांची भरती होत नसल्याने सीएचबीवर काम करावे लागत आहे. आयआयएम, आयआयटी, मेडिकल कॉलेजची संख्या वाढवण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे ही एकमेव चांगली वार्ता आहे.

००००

कोट

'केंद्र व राज्यात भाजपचे सरकार आहे. पण सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गतवर्षी दोन ते दिवस काम बंद आंदोलन केल्यानंतर सरकारने मागण्या मान्य केल्या जातील, असे आश्वासन दिले होते. पण आश्वासनांची पूर्तता न झाल्याने पुन्हा आंदोलन करावे लागणार आहे.

अनिल लवेकर, सचिव, राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटना

००००

'अंशदायी पेन्शन योजना बंद करुन जुनी पेन्शन योजना सुरु करावी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरु करावी,अशी मागणी सरकारकडे केली आहे. अशैक्षणिक कामे देऊ नयेत ही मागणी सुद्धा सरकारने धुडकावून लावली आहे. मागण्या मान्य होत नसल्याने अध्ययन करताना अडचणी येत आहेत.

राजेश वरक, पदाधिकारी, माध्यमिक शिक्षक संघटना

००००

'केंद्राप्रमाणे राज्यात सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी. सर्व शिक्षण अभियानाचे अनुदान सुरु करावे या मागण्या करुनही सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. अंगणवाडी ते बारावीपर्यंत समग्र शिक्षण योजनेची सक्ती केली जाणार आहे. त्यामुळे शैक्षणिक दर्जा वाढण्याची शक्यता आहे.

सुदााकर सावंत, पदाधिकारी, प्राथमिक शिक्षक संघटना,

००००

'आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांना भितीखाली काम करावे लागत आहे. सरकारी रुग्णालयातील वॉर्डमध्ये सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली पाहिजे. परिचारिकांसाठी बदली प्रक्रिया रद्द करावी, महिला कर्मचाऱ्यांसाठी पाळणा घराची सोय करावी, या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत आहेत.

हशमत हवेरी, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र गर्व्हमेंट नर्सेस फेडरेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकामाविरोधात तहसीलदारांकडे तक्रार

$
0
0

(फोटो आहेत)

ओढ्यातील बांधकाम

नोटीस देऊनही सुरूच

बांधकामाविरोधात तहसीलदारांकडे तक्रार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाचगावमध्ये भैरवनाथ कॉलनी परिसरातील ओढ्यात सुरू असलेल्या बांधकामाविरोधात ग्रामपंचायतीने करवीर तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. ओढा अडवून सुरू असलेले बांधकाम थांबवण्याची सूचना ग्रामपंचायतीने संबंधित बांधकाम व्यावसायिकाला दिली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करून बांधकाम सुरूच ठेवले आहे. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने ओढ्यातील बांधकामाचे गांभीर्य समोर आले असून, तातडीने कारवाई न झाल्यास ओढ्याचे पात्र बदलण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पाचगावमध्ये आर.के. नगरकडून गावठाणकडे येणाऱ्या ओढ्यात प्रदीप भुयेकर-पाटील यांनी बांधकाम सुरू केले आहे. गेल्या आठवड्याभरात त्यांनी ओढ्याच्या काठावरील झाडे तोडून ओढ्यात मध्येच संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू केले आहे. ओढ्याच्या काठापासून १० फूट बाहेर बांधकाम करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीने बांधकाम व्यावसायिकांना दिल्या आहेत. मात्र सूचनांकडे दुर्लक्ष करून बांधकाम व्यावसायिकांकडून ओढ्यातील बांधकाम सुरूच आहे. सोमवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसाने ओढ्यात मोठ्या प्रमाणात पाणी आले. यामुळे ओढ्याच्या काठाची जमीन खचली असून, पावसाळ्यात ओढ्याचे पात्र बदलण्याचा धोका निर्माण झाला आहे. बांधकाम तातडीने थांबवावे अशी नोटीस ग्रामपंचायतीने दिली होती. याकडे दुर्लक्ष करून काम सुरूच ठेवल्याने ग्रामपंचायतीने करवीरचे तहसीलदार उत्तम दिघे यांच्याकडे तक्रार अर्ज दिला आहे. यानंतरही ओढ्यातील बांधकाम सुरू राहिल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार देणार असल्याचे सरपंच संग्राम पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, सोमवारी झालेल्या पावसाने ओढ्यात मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. काठावरील झाडे तोडल्याने जमीन खचू लागली आहे. ओढ्याच्या दोन्ही बाजूला सिमेंट कॉँक्रीटची भिंत घालण्याचे काम सुरू आहे. यामुळे ओढ्याचे अंतर केवळ पाच ते सात फूट एवढेच राहणार आहे. या प्रकारामुळे ओढ्याचे पात्र बदलण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिकांनाही याचा फटका बसणार आहे. याशिवाय अवैध बांधकामे फोफावण्याचाही धोका आहे. एका व्यावसायिकाने केलेले बांधकाम काढण्यास ग्रामपंचायत असमर्थ ठरत असेल, तर इतर बांधकाम व्यावसायिकही अवैध बांधकाम करू शकतात. त्यामुळे वेळीच ओढ्यातील बांधकाम रोखण्याचे आणि झालेले बांधकाम काढण्याचे काम करवीर तहसीलदारांसह जिल्हा प्रशासनाला करावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज कोसळून देवर्डेत चौघे जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भात पेरणीसाठी शेतात गेलेल्या एकाच कुटुंबातील चौघांच्या अंगावर वीज कोसळून ते जखमी झाले. भुदरगड तालुक्यातील देवर्डे येथे मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. संजय नामदेव सुतार (वय ४५), संगीता संजय सुतार (४०) या दाम्पत्यासह मुलगा ओंकार (१०) आणि मुलगी सुजाता (१८, सर्व रा. देवर्डे) अशी जखमींची नावे आहेत.

सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, संजय सुतार मंगळवारी पत्नी, मुलगी आणि मुलासह सुतारवाडी परिसरातील शेतात भात पेरणीसाठी गेले होते. दुपारी दोनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाल्याने सुतार कुटुंबीय जवळच्याच चिंचेच्या झाडाखाली थांबले होते. काही वेळाने विजांचा कडकडाट होऊन त्यांच्याजवळ वीज कोसळली. या घटनेत मुलगा ओंकार गंभीर जखमी झाला, तर संजय सुतार यांचा उजवा पाय भाजला. पत्नी संगीता आणि मुलगी सुजाता यादेखील किरकोळ जखमी झाल्या. या घटनेनंतर चौघेही वडाप वाहनातून उपचारासाठी कडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले. प्रथमोपचारानंतर त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले. ओंकार पाचवीमध्ये शिकतो, तर सुजाता बारावीत शिकत आहे. घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीबीएसजवळून प्रवाशाचे ५० हजारांचे पाकीट लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरहून कराडला निघालेल्या प्रवाशाच्या खिशातील पैशांचे पाकीट चोरट्याने लंपास केले. पाकिटात ५० हजार ५०० रुपयांची रोकड आणि बँकांची एटीएम कार्ड होते. हा प्रकार रविवारी (ता. ३) सकाळी साडेसहाच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक परिसरात घडला. याबाबत धैर्यशील गजानन पाटील (वय ३४, रा. बनपुरीकर कॉलनी, कराड, जि. सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : धैर्यशील पाटील कामानिमित्त कोल्हापुरात आले होते. रविवारी सकाळी ते परत कराडला जात असताना सकाळी साडेसहाच्या सुमारास ते मध्यवर्ती बसस्थानक परिसरात पोहोचले. कराडला जाणाऱ्या बसमध्ये चढताना गर्दीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पँटच्या खिशातील पाकीट लांबवले. बसमध्ये बसल्यानंतर पाकीट चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी पुन्हा खाली येऊन शोध घेतला. मात्र पाकीट सापडले नाही. पाकिटात ५० हजार ५०० रुपये रोख, बँकांची एटीएम, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन होते. याबाबत त्यांनी सोमवारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धावत्या बसचा दरवाजा निखळला; पादचारी जखमी

$
0
0

पंढरपूर:

राज्य परिवहन महामंडळाच्या 'लालपरी'चा ७०वा वाढदिवस राज्यात साजरा होत असताना पंढरपुरात एका धावत्या बसचा दरवाजा निखळून रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीच्या अंगावर पडला. यात ती व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पंढरपूर-सरकोली ही एसटी बस पंढरपूर स्थानकातून सांगोला चौकमार्गे सरकोलीकडे मार्गस्थ झाली. अण्णाभाऊ साठे चौकात या बसचा चालकाजवळील दरवाजा अचानक निखळला. तो एका पादचाऱ्याच्या अंगावर पडला. यात तो गंभीर जखमी झाला आहे. स्थानिकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले. दरम्यान, पंढरपूर आगारात असलेल्या बहुतेक बस जुन्या झाल्या असून, प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या घटनेनंतर तरी महामंडळाने पंढरपूर आगाराला नवीन बस द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिपिक भरती प्रक्रिया स्थगित करा

$
0
0

लिपिक भरती प्रक्रिया स्थगित करा

कोल्हापूर टाइम्स टीम

राज्यातील जिल्हा न्यायालयांसाठी लघुलेखक, लिपिक आणि शिपाई पदांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेवर भारतीय विद्यार्थी आणि युवा व बेरोजगार मोर्चाने आक्षेप घेतला आहे. भरती प्रक्रियेतील निकषांबाबत संभ्रमावस्था निर्माण झाल्याने ही भरती प्रक्रिया स्थगित करावी, किंवा दुरुस्तीसह पात्र उमेदवारांची नव्याने यादी जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन बुधवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना देण्यात आले.

राज्यातील जिल्हा न्यायालयांमध्ये लघुलेखक, लिपिक आणि शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. लघुलेखकाच्या १०१३, लिपिक पदासाठी ४७३८ आणि शिपाई पदासाठी ३१७० अशा एकूण ८९२९ जागा भरल्या जात आहेत. शिपाई पदासाठी ७ वी, लिपिक आणि लघुलेखक पदासाठी १२ वी यासह कोणत्याही पदवीचा पदवीधर अशी पात्रता जाहीर केली होती. मोठ्या संखेने जागा भरल्या जात असल्याने नोकरी मिळण्याच्या आशेने सुमारे ४ लाख उमेदवारांनी अर्ज भरले होते. यातील केवळ ८० हजार उमेदवारांना पात्र ठरवले असून, उर्वरित उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आले आहे. अनेक उच्च शिक्षितांना अपात्र ठरवल्याने उमेदवारांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. ३१ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या पात्रता यादीसाठी नेमके कोणते निकष लावले? अशी विचारणा अपात्र उमेदवारांकडून केली जात आहे. जाहिरातीत दिलेल्या निकषांनुसार भरती प्रक्रिया राबवावी किंवा सद्याची पात्रता यादी स्थगित करून मूळ निकषांनुसार नव्याने यादी तयार करावी, अशी मागणी भारतीय विद्यार्थी आणि युवा व बेरोजगार मोर्चा यांनी केली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिले. शिष्टमंडळात प्रमोद कांबळे, निखील कांबळे, छाया साखरीकर, हर्षदा कांबळे, सुयश कांबळे, सुशील काटे, धनंजय सावंत, राजू कांबळे, प्रसाद जाधव, पूनम जाधव आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निवृत्तीवेतनाचा प्रस्ताव पाठविणार

$
0
0

कोल्हापूर : देवदासींना संजय गांधी निराधार व श्रावण बाळ निवृत्ती वेतनाचे लाभ मिळण्यासाठी सरकारकडे शिफारस करण्याचा निर्णय उपजिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेण्यात आला. महसूल उप जिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. २००७ पासून देवदासींना ७०० रुपये निवृत्तीवेतन मिळते. पण देवदासी प्रथा नष्ट करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक देवदासी निवृत्ती वेतनापासून वंचित राहिल्या आहेत, असे नेहरु युवा देवदासी विकास मंडळाचे अशोक भंडारे व मायादेवी भंडारे यांनी सांगितले. बैठकीला नायब तहसीलदार दिलीप सावंत, जिल्हा परिवेक्षा अधिकारी बी.जी. काटकर, योगेश गवळी, पंकज भंडारे, मानसिंग माने, दिलीप आवळे, रेखा वडर, अरुणा पाटील, सुनंदा चव्हाण आदी उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजेसाठी शिवसेनेचे आंदोलन

$
0
0

रेंदाळमधील शिवसैनिकांचे ताराबाई पार्कात आंदोलन

कोल्हापूर टाइम्स टीम

रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील मानेनगर प्रभाग क्रमांक एकमध्ये सुरळीत वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी शिवसेना, रेंदाळच्या ग्रामपंचायत सदस्यांनी एमएसईबीच्या ताराबाई पार्क कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषणाची सुरूवात केली.

हातकणंगले तालुक्यातील रेंदाळमधील मानेनगर प्रभाग क्रमांक एक हा परिसर औद्योगिक क्षेत्र आहे. मात्र या परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. वीज पुरवठा सुरळीत करावा, यासाठी पाठपुरावा करुनही त्याकडे डोळेझाक करणाऱ्या महावितरण कंपनीच्या निषेधार्थ रेंदाळचे ग्रामपंचायत सदस्य व शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे. रेंदाळ येथील अभियंता टांकसाळे यांच्याकडे वारंवार तक्रार करुनही नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक केली जात नाही. त्याची अन्यत्र बदली करावी, अशी मागणी करण्यात आली. १४ मे रोजी वीजेचा दाब वाढल्याने मोठे नुकसान झाले. यामध्ये अनेक घरातील विद्युत उपकरणे, टीव्ही, फ्रीज, लॅपटॉप मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानाची भरपाई मिळावी, यासाठी आंदोलन सुरू आहे. रेंदाळ येथे २४ मे रोजी उपोषण केल्यावर हुपरी शाखेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कार्यवाहीचे लेखी पत्र दिले होते. मात्र अद्याप काहीही कार्यवाही केलेली नसल्याने उपोषण सुरू आहे. उपोषणात महेश कोरवी, उपशहरप्रमुख शुभम चौगले व मोहन खोत सहभागी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारखान्याच्या छतावरून पडल्याने कामगार ठार

$
0
0

(फोटो आहे)

कारखान्याच्या छतावरून

पडल्याने कामगार ठार

कागल पंचतारांकित एमआयडीसीतील दुर्घटना

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत कारखान्याच्या छताचे पत्रे बसविताना ४० फूट उंचावरून पडून कामगार ठार झाला. बाजीराव आनंदा साळोखे (वय ४५, रा. पोहोळे तर्फ आळते, ता. पन्हाळा) असे मृत कामगाराचे नाव आहे. बुधवारी साडेबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.

सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, उद्योजक शामराव देशिंगकर यांची उद्यमनगर आणि कागल पंचतारांकित एमआयडीसीत भवानी आयर्न फाउंड्री आहे. सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी पंचतारांकित एमआयडीसीत नवीन युनिट सुरू केले. देशिंगकर यांच्या फाउंड्रीत २० वर्षे कार्यरत असलेले बाजीराव साळोखे बुधवारी पंचतारांकित एमआयडीसीतील युनिटमध्ये काम करीत होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसात फाउंड्रीच्या छताचे पत्रे उडाल्याने दुरुस्तीचे काम सुरू होते. यासाठी साळोखे इतर कामागारांसह छतावर चढले होते. अचानक पायाखालील पत्रा तुटून साळोखे सुमारे ४० फूट खाली जमिनीवर कोसळले. डोक्यावर पडल्याने त्यांना गंभीर इजा झाली. अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कामगारांनी त्यांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच भवानी आयर्नच्या उद्यमनगर सुनिटमधील कामगार आणि अधिकाऱ्यांनी सीपीआरमध्ये गर्दी केली. मृत साळोखे यांचा भाऊ अर्जुन साळोखे यांच्यासह नातेवाइकांनीही गर्दी केली. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांकडे सोपविण्यात आला. मृत बाजीराव सा‌ळोखे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

$
0
0

टेम्पोच्या धडकेत

दुचाकीस्वार ठार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुरगूड-निपाणी मार्गावर गलगले फाटा येथे टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार झाला. निखिल विलास रामाणे (वय २७, रा. मुरगूड, ता. कागल) असे मृताचे नाव आहे. हा अपघात बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास घडला.

मुरगूड येथील निखिल रामाणे हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करीत होता. बुधवारी सकाळी तो कामानिमित्त दुचाकीवरून निपाणी येथे गेला होता. काम आटोपून परत येताना त्याच्या दुचाकीची आणि समोरून आलेल्या टेम्पोची समोरासमोर धडक झाली. धडकेत निखिलच्या डोक्याल गंभीर इजा झाली. काही वाहनधारकांनी त्याला रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. त्याच्या पश्चात आई व भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, टेम्पोचालकाने अपघातस्थळावरून पळ काढला असून, मुरगूड पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेतला. अपघाताची नोंद मुरगूड पोलिस ठाण्यात करण्यात आली.

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदुत्ववादी पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी

$
0
0

पणजी, रामनाथी (गोवा) : '२०१९ च्या निवडणुका जवळ आल्या आहेत. गेल्या निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांचा भाजप सरकारला विसर पडला आहे; म्हणून हिंदुत्ववाद्यांनी आतापासूनच आपल्या मागण्या निश्‍चित करून त्या राजकीय पक्षांच्या समोर ठेवल्या पाहिजेत. आज विकासाच्या नावे राजकारण चालू आहे; मात्र 'हिंदुत्वासह विकास' आम्हाला अपेक्षित आहे. यासंदर्भात हिंदुत्ववादी पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी,' अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केली. ते येथील श्री रामनाथ देवस्थानमध्ये आयोजिलेल्या सातव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामध्ये तिसऱ्या दिवशीच्या सत्रात 'वर्ष २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांच्या संदर्भात हिंदुत्वनिष्ठांची भूमिका' या विषयावर बोलत होते.

या निवडणुकीत हिंदुत्ववाद्यांची भूमिका काय असणार, पुन्हा भाजपच्या हाती सत्ता सोपवणार का, असा प्रश्‍न विचारला जात आहे; मात्र निवडणुकांतून लोकशाहीच्या केवळ एका राजकीय व्यवस्थेत पालट होतो, उर्वरित सर्व व्यवस्था 'सेक्युलर'च राहतात. परिणामी देशात हिंदू बहुसंख्यांकाना दुर्लक्षित करून एकगठ्ठा असणाऱ्या अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणावर आधारित राजकारण चालू आहे. त्यामुळे कोणत्याही सरकारला अल्पसंख्यांकाचे तुष्टीकरण केल्याशिवाय पर्याय रहात नाही, असे सांगून ते म्हणाले, 'हिंदुत्ववाद्यांची सत्ता असतानाही अयोध्येतील राम मंदिर, काश्मीरमधील हिंदूंचे पुनर्वसन ही स्वप्नेच राहिली आहेत. सत्ता उपभोगणाऱ्यांचाच खरा विकास सुरू आहे. यासाठीच आता हिंदुत्ववादी पक्षांनी त्यांची हिंदू राष्ट्राच्या संदर्भातील भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे.'

या वेळी 'हिंदु फ्रन्ट फॉर जस्टिस'चे अध्यक्ष अधिवक्ता हरि शंकर जैन, नेपाळमधील सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता पवित्र खडका आदी उपस्थित होते. सत्राच्या प्रारंभी हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी डॉ. माधव भट्टराई यांचा, तर झारखंड येथील समितीचे प्रदीप खेमका यांनी अधिवक्ता हरि शंकर जैन यांचा विशेष सन्मान केला. काठमांडू (नेपाळ) येथील 'राष्ट्रीय धर्मसभा नेपाळ'चे अध्यक्ष आणि नेपाळचे राजगुरु डॉ. माधव भट्टराई यांनी 'नेपाळची वर्तमान स्थिती, संघटित झालेले विविध हिंदू आणि नेपाळला 'हिंदू राष्ट्र' बनवण्याचे प्रयत्न' या विषयावर भाषण केले.

शस्त्रसंधी आत्मघातकी

केंद्रातील भाजप सरकारने चार वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. सरकार कणखर भूमिका घेऊन फुटीरतावाद्यांना स्पष्ट संदेश देईल, अशी जम्मू-काश्मीरमधील लोकांची अपेक्षा होती. दुर्दैवाने सध्या उलट घडत आहे. जम्मू-काश्मीरमधील पीडीपी-भाजप युती शासनाचा कार्यकाळ नागरिकांसाठी वाईट ठरला आहे. प्रशासनाच्या सर्व स्तरांवर फुटीरतावाद्यांचा प्रभाव आहे, काश्मीरबरोबर जम्मूलाही मुस्लिमबहुल करण्याचा प्रयत्न होत आहे,असा आरोप 'यूथ फॉर पनून कश्मीर'चे राष्ट्रीय संयोजक राहुल कौल यांनी पत्रकार परिषदेत केला. 'आतंकवाद्यांच्या विरोधात 'एकतर्फी संघर्षविराम' हा केंद्र शासनाचा निर्णय आत्मघातकी ठरला आहे. यामुळे फुटीरतावाद्यांना देशाविरुद्धचे युद्ध अधिक तीव्र करण्यास अवकाश मिळत आहे. संघर्षविरामाचा कोणताही परिणाम फुटीरतावाद्यांवर झालेला नाही, हे वारंवार होत असलेली आतंकवादी आक्रमणे आणि नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात होत असलेला गोळीबार, यांतून स्पष्ट होत आहे', असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागल सातारा सहा पदरी रस्ते निविदा प्रक्रिया पुढे गेली

$
0
0

कागल सातारा रस्ते निविदा प्रक्रिया रखडली

satish.ghatage@timesgroup.com

Twitt:satishgMT

कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यातील तांत्रिक अडचणीमुळे कागल सातारा रस्ते निविदा प्रक्रिया रखडली आहे. एक जूनला होणारी निविदा आता एक जुलैपर्यत पुढे ढकलण्यात आली आहे.

केंद्र सरकारकडून राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करणारी सुवर्ण चुतष्कोण योजना देशभरात राबवली जात आहे. या योजनेमध्ये कागल ते सातारा १३२.७६० किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग सहा पदरी करण्यात येणार आहे. या रस्त्यांसाठी २५५० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. यापूर्वी चार पदरी महामार्ग केला असल्याने भूमीसंपादनाचा प्रश्न गंभीर नसला तरी ३५ हेक्टर जागा संपादित करावयाची आहे. २०१४ मध्ये भाजप सरकारने कागल सातारा रस्ता सहा पदरी करण्याची घोषणा केली होती. पण अद्याप साडेतीन वर्षे पूर्ण होऊनही या रस्त्याच्या कामाला अद्याप गती आलेली नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्याचा डीपी बनवला आहे. पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ यांच्यातील तांत्रिक कारणामुळे निविदा प्रक्रिया रेंगाळली आहे.

कागल ते सातारा हा महामार्ग सध्या महाराष्ट्र विकास मंडळाकडे आहे. महामंडळाकडे ३ मे २०२२ पर्यंत सध्या महामार्ग राहणार आहे. सध्या या रस्त्यांवर किणी व तासवडे हे दोन टोल नाके आहेत. दोन्ही टोल नाक्यांना वसुलीसाठी मुदत वाढवून दिली आहे. जर रस्त्यांचे काम सुरु केल्यास टोल कोणी वसूल करायचा, त्याची मुदत किती, चार पदरी रस्त्यांसाठी सध्या सुरु असलेली टोल वसुलीला दिलेली मुदतवाढ हे प्रश्न किचकट होण्याची शक्यता आहे. या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी गतवर्षी सात ऑगस्ट २०१७ मध्ये केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितिन गडकरी यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत तांत्रिक अडचणीवर मात करुन निविदा प्रक्रिया जाहीर केली जाईल आणि रस्त्याचे काम सुरु होईल अशी घोषणा केली होती. २२ एप्रिल, २०१८ मध्ये मंत्री गडकरी यांच्याकडे खासदार धनंजय महाडिक यांनी रस्त्याचे काम लवकर सुरु करण्याची मागणी केली होती. मात्र अद्याप हे काम सुरु झालेले नाही.

कागल सातारा रस्त्यांवर तोडगा काढण्यासाठी मे २०१८ च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात बैठकीचे नियोजन होते. बैठकीत तोडगा निघाल्यानंतर कागल सातारा रस्त्याची निविदा एक जून रोजी काढण्याची तयारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दर्शविली होती. पण राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने ही बैठक रद्द करण्यात आली. त्यामुळे आता निविदेची नवीन तारीख एक जुलै रोजी दिली आहे. एक जुलैला निविदा जाहीर होणार की पावसाळ्यानंतर निविदा जाहीर होणार याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

०००

कागल सातारा रस्त्यांवरील नव्याने होणारे पूल

लक्ष्मी टेकडी उड्डाण पूल : ९५ मीटर

तावडे हॉटेल बास्केट ब्रीज : १३०३ मीटर

सांगली फाटा ओव्हर ब्रीज : ३० मीटर

टोप ओव्हर ब्रीज : ३३० मीटर

अंडर ब्रीज : निढोरी, कागल बस स्टँड, नागाव फाटा, अंबप, कणेरीवाडी जलाल पेट्रोल पंप

पुलांची पुर्नबांधणी : उजळाईवाडी, उचगाव, कागल बस स्टँड

नदीवरील पूल : पंचगंगा, घुणकी नाला, वारणा नदी,

ट्रक थांबे : सांगली फाटा, उजळाईवाडी

फूट वेअर ब्रीज : गोकुळ शिरगाव, पुलाची शिरोली,

००००

सी लिंक धर्तीवर बास्केट ब्रीज

पुण्याकडून कोल्हापुरात प्रवेश करण्यासाठी गांधीनगर-तावडे हॉटेलजवळ १३०३ मीटरचा बास्केट ब्रीज उभारण्यात येणार आहे. सी लिंकच्या धर्तीवर या पुलाचे डिझाइन केले आहे. सध्या असलेल्या रस्त्यांची पुर्नबांधणी करुन बास्केट ब्रीज बांधण्यात येणार आहे. कागल सातारा रस्त्यांवरील सर्वात खर्चिक पूल ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आला पावसाळा, महावितरणची तयारी

$
0
0

महावितरणने तोडल्या तीन हजारांवर झाडांच्या फांद्या

अखंडित वीज पुरवठा करण्याचा निर्धार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पावसाळ्यात ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण कंपनीची पूर्ण तयारी झाली आहे. कोल्हापूर आणि सांगली असे कार्यक्षेत्र असलेल्या विभागीय कार्यालयाने सहा हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही सुरू केली आहे. कोल्हापुरात पेट्रोलिंग करून १६५७ झाडांच्या फांद्या आणि सांगली जिल्ह्यात १३५८ अशा दोन्ही मिळून वीजेच्या तारांना स्पर्श होण्याची शक्यता गृहित धरून ३०१५ फांद्या तोडल्या. काही नैसर्गिक आपत्ती वगळता आवश्यक कामासाठी काही फिडरवर मोजक्याच परिसरातील वीज पुरवठा बंद केला जाणार आहे. पावसाळ्यात घरगुती, औद्योगिक आणि शेतीला अखंडित वीज पुरवठा करण्याचा निर्धार महावितरणने व्यक्त केला आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षासह प्रत्येक गावांतील फिल्डवरील कामाचे आउटसोर्सिग केले आहे.

वीजांचा कडकडाट, ढगफुटी आणि महापुराच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणने मान्सूनपूर्व तयारी पूर्ण केली आहे. गतवेळेच्या पावसाळ्यात ५०० हून अधिक पोल उखडलेले होते. काही ठिकाणी नवीन पोलची उभारणी केली आहे. झाडांच्या फांद्याचा स्पर्श होऊन अनेकदा शॉर्टसर्किटमधून माणसे आणि पक्ष्यांना जीव गमावावा लागला आहेत. त्यासाठी दोन्ही जिल्ह्यात विभागात विशेष मोहिम राबविली आहे. या वर्षी काही भागातून थेट वीजग्राहकांनी वीजवितरण कंपनीकडे झाडांच्या अनावश्यक फांद्याच्या तक्रारी दाखल केल्या. त्याची दखल घेऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी झाडांच्या फांद्या तोडल्या आहेत. गंजलेले पोलही बदलले आहेत. उखडलेले लोखंडी पोल, सिमेंटचे पडलेले आणि गंजलेले पोल, लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या, झुकलेले पोल, निसटलेले कंडक्टर, ट्रान्सफार्मरमधील ऑइलची लेव्हल तपासण्यात आली. पंचगंगा काठावरील गावे, पाण्यात बुडणारे ट्रान्स्फार्मर, धोकादायक ठिकाणी सुरू राहणारा वीजपुरवठा बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत. पाणी पातळी झपाट्याने वाढल्यास संबधित ट्रान्सफार्मर बंद केला जाणार आहे. नैसर्गिक आपत्ती आणि गरज असेल त्या ठिकाणीच वीज पुरवठा बंद केला जाईल. पावसामुळे सगळ्या गावाचा वीज पुरवठा बंद करू नये, असे आदेश ग्रामीण कार्यालयाला दिले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे काही ठिकाणी पुरवठा खंडित झाल्यास महावितरणचे कर्मचारी आणि नियुक्त केलेल्या खासगी यंत्रणेकडून तातडीने दुरुस्ती केली जाणार आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील बिल्डर्सनी विजेची मीटर पहिल्या मजल्यावर बसवावीत, अशा सूचना केल्या आहेत. काही भागात पावसाचे पाणी अपार्टमेंटच्या तळघरात जाते. हा धोकादायक प्रसंग टाळण्यासाठी महावितरणने बिल्डर्स असोसिएशन, अपार्टमेंटच्या संचालक मंडळाला सूचना केल्या आहेत. दरम्यान वीज ग्राहकांना होणारा त्रास कमी होण्यासाठी आणि शहरातील १६ सबस्टेशनच्या वीज यंत्रणेतील बिघाड तत्काळ मार्गी लावण्यासाठी 'महावितरण' ची 'सुपरवायझरिंग कंट्रोल अॅण्ड डाटा अॅक्विझिशन' (स्काडा) यंत्रणा मात्र अद्याप गतिमान करण्याची गरज आहे.

०००

एसएमएसद्वारे अलर्ट

महावितरण धोक्याची सूचना देण्यासाठी ३१४ सेक्शनला बल्क पद्धतीने एसएमएस देण्याची सुविधा आहे. कोणत्याही गावांतील वीज पुरवठा बंद करायचा असेल तर महावितरणच्या मुख्य कार्यालयातून सूचना दिल्या जाणार आहेत. वीज, वारा, पाण्याची तीव्रता पाहून संबंधित गावांला अलर्ट दिला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे त्यासाठी दोन कर्मचारी कायमस्वरूपी देण्यात येणार आहेत. त्यासह महावितरणचा स्वतंत्र कक्षात कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. वीज पुरवठा बंद करण्याचा एसएमएस अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर दिला जाणार आहे. पुढील टप्पा म्हणून फिडर ते ग्राहकांपर्यंत संदेश देण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात तीन्ही प्रकारचे मिळून १८ लाख ग्राहक आहेत.

००

महावितरण

३० उपविभागीय कार्यालये

कोल्हापूर ६ विभाग- शहर, जयसिंगपूर ग्रामीण एक जयसिंगपूर ग्रामीण २, गडहिंग्लज, इचलकरंजी

सांगली- सांगली शहर, सांगली ग्रामीण, विटा, इस्लामपूर, कवठेमहाकांळ,

५४ उपविभागीय कार्यालये- कोल्हापूर ३० , सांगली २४

३१४ सेक्शन

कर्मचारी ५०००

वायरमन ४०००

ऑपरेटर १०००

अभियंता ७५०

००

वाहिन्या

११ केव्ही २३ हजार १७२ किलोमीटर

लघुदाब वाहिनी- ४४ हजार ६६० किलोमीटर

ट्रान्सफॉर्मर ४१ हजार १७६

०००

कोल्हापूर सांगली एकूण

खराब पोल दुरूस्ती : १८८ १४७ ३३५

जुने कंडक्टर : १३३.७ ९८.४ २३२

जुन्या सर्व्हिस लाइन : १२२७ २१५ १४४२

रोड क्रॉस लाइन १२३ १०४ २२७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवराज्याभिषेकची मिरवणूक थाटामाटात

$
0
0

शिवराज्याभिषेक मिरवणूक थाटात

मराठा महासंघातर्फे आयोजित सोहळ्यात मराठी संस्कृतीचे दर्शन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांची वेशभूषा केलेले युवक, शक्ती आणि भक्तीच्या संगमाची प्रचिती घडविणाऱ्या वारकऱ्यांचे पथक, हलगीचा कडकडाट आणि ढोलताशांचा गजर अशा थाटामाटात शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याची मिरवणूक निघाली. अखिल भारतीय मराठी महासंघाच्या कोल्हापूर जिल्हा शाखेतर्फे आयोजित या मिरवणुकीने नागरिकांना शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याची अनुभूती घडविली. मिरवणुकीत भगव्या रंगाच्या साड्या आणि भगवे फेटे परिधान केलेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती. शहरातील प्रमुख मार्गावरुन 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'च्या घोषाने मिरवणूक मार्ग निनादला. मर्दानी खेळाच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी अंगावर रोमांचे उभे राहिले.

मराठा महासंघ, स्वराज्य भवन ट्रस्ट व विविध संघटनेतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक सोहळा मिरवणूक शहरवासियांचा आकर्षण ठरला. सजविलेल्या ट्रॉलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली होती. मंगळवार पेठेतील मराठा महासंघाच्या कार्यालयापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. तत्पुर्वी खासदार धनंजय महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजप महानगर अध्यक्ष संदीप देसाई, डॉ. संदीप पाटील, शहर पोलिस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर, करवीर उपविभागीय उपअधीक्षक सूरज गुरव आणि संयोजक व मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या प्रमुख उपस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मिरवणूक मार्गस्थ झाली.

महापौर शोभा बोंद्रे व उपमहापौर महेश सावंत मंगळवार पेठेत मिरवणुकीत सामील झाले. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेतील शाळकरी मुलासह मावळ्यांचा लवाजामा हे मिरवणुकीचे आकर्षण ठरले. दहा गावाच्या वारकऱ्यांच्या भजनी मंडळांनी अभंग सादरीकरणातून भक्ती आणि शक्तीचा संगम घडविला. आदित्य मारुती पाटील या शाळकरी मुलांनी पंढरीच्या विठ्ठलाची वेशभूषा केली होती. मिरवणुकीने मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविले. मिरवणुकीत फडकणारे भगवे ध्वज आणि नागरिकांनी परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या फेट्यांनी सगळे वातावरण भगवेमय बनले होते.

\Bजयजयकारांने मार्ग दुमदुमला

\Bपारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, शिवाजी चौक, बिंदू चौक, मार्गे पुन्हा मंगळवार पेठ अशी मिरवणूक निघाली. जयघोषांनी मिरवणूक मार्ग दुमदुमला मिरवणुकीत जय हनुमान तरुण मंडळ मार्गेवाडीचे ढोल ताशा पथक, हलगीवादक राजू आवळे यांचे हलगी पथक आणि स्क्रीनवरुन सामाजिक कार्याचा जागर हे मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले. मिरवणुकीत स्वाभिमानीचे भगवान काटे, बबनराव रानगे, डॉ. शिवाजीराव हिलगे, शशिकांत पाटील, उत्तम जाधव, चंद्रकांत चव्हाण, अशोक देसाई, सुरेश जरग, कृष्णाजी हरुगडे, अजित सासने, नितीन नायकवडी, शिवाजी पाटील, शैलेजा भोसले, दीपा ढोणे, अरुण कुराडे, अनंत म्हाळुंगेकर, महादेव पाटील, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब भोसले, अवधूत पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राधानगरी ,भोगावतीत दमदार पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेले दोन दिवस सायंकाळनंतर पावसाची सुरूवात झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने हजेरी लावली. राधानगरी, भोगावती परिसरात दमदार पाऊस झाला. काही ठिकाणी छोटे नाले, ओढे भरून वाहू लागले. चार दिवस सलग पडत असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

०००

राधानगरी

राधानगरी तालुक्यात मान्सून पावसाला दमदार सुरवात झाली आहे. बुधवारी दुपारपासून आकाशात काळे ढग दाटून आले. सायंकाळी चार वाजता पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. साडेपाच नंतर मात्र पावसाने दमदार सुरूवात केली. पाऊस सुरू झाल्याने अनेक शेतकऱ्यांची धांदल उडाली. पेरणीसाठी तयार केलेले वाफे पाण्याने तुंबल्यामुळे पेरणीसाठी शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत. पेरणीला पर्याय म्हणून बियाणांची तरवे टाकण्याची तयारी सुरू आहे. राधानगरी तालुक्यात सलग चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने पठारी भागात भुईमूग,नाचणी पिकांच्या शेती मशागतीची कामे सुरू झाली आहेत.

०००००००

हातकणंगले

हातकणंगले तालुक्यातील हुपरी,पट्टणकोडोली,रुकडी, हातकणंगले,पेठवडगाव, कुंभोज, हेरले, शिरोली परिसरातील अनेक गावात दुपारी साडेचार नंतर सोसाट्याचा वारा, विजेचा कडकडाटासह पावसाची सुरूवात झाली. तीन तास झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचले. तालुक्यातील हुपरी,पट्टणकोडोली, रूकडी, हातकणंगले,पेठवडगाव, कुंभोज, हेरले, शिरोली परिसरातील अनेक गावात पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या रहिवाशांना सायंकाळी गारवा मिळाला. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली.

००

फोटो ओळी -हुपरी (ता.हातकणंगले)येथे सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने गावातील डॉ. सुभाषचंद्र बोस पुतळा परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. (साक्षी फोटो, हुपरी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी दहा दिवस... बिल ४२०

$
0
0

दहा दिवस पाणी अन् बिल ४२० रूपये

पाचगाव पाणीपट्टीत वाढ, रहिवाशी त्रस्त

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दोन महिन्यातून दहा दिवस पाणी आणि पाणीपट्टी मात्र ४२० रूपये असा कारभार पाचगाव ग्रामपंचायतीचा सुरू आहे. पाच ते सहा दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जातो. तासभर पाणी सोडले जाते. पाणी पुरवठा कमी आणि बिल मात्र जादा असे चित्र पाचगावांत आहे. यापूर्वी दोन महिन्याला ३५० रुपये बिल आकारले जात होते. नव्या बिलात ८० रूपयांची वाढ केली आहे.

भाजपचे आमदार अमल महाडिक व काँग्रेसचे आमदार सतेज पाटील कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकास कामे केल्याचा दावा करतात. मात्र या विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव असलेल्या पाचगाव पाणी प्रश्नाचे घोंगडे मात्र भिजत पडले आहे. गावची लोकसंख्या ३० हजारापंर्यंत आहे. गावठाण आणि पश्चिम बाजूला मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे. पश्चिम बाजूला जवळपास ५७ कॉलनी असून गिरगाव मुख्य रोडच्या दोन्ही बाजूने नागरी वस्ती वाढत आहे. त्या तुलनेत पाचगावला आवश्यक पाणी पुरवठा केला जात नाही. गांधीनगर पाणी योजनेंतर्गत तेरा गावांना पाणी पुरवठा करण्याची योजना नियोजित आहे. या योजनेंतर्गत दूधगंगा नदीतून पाणी उपसा केला जातो. पूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून (एमजीपी) १००० लिटर पाण्याला बारा रुपयांनी आकारणी केली जायची. त्यामध्ये वाढ करुन प्रति हजार १९ रुपये इतका दर केला. त्याविरोधात आंदोलन झाल्यानंतर तीन रुपयांनी दर कमी करण्यात आला. एमजीपीकडून उपलब्ध पाण्याचे वितरण ग्रामपंचायतीकडून केले जाते. गावासाठी रोज सुमारे ११ लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र पाचगाव ग्रामपंचायतीकडे पाणी साठवणुकीची क्षमता असलेल्या मोठ्या टाक्या आहेत. मुबलक साठा करण्याची सोय नसल्यामुळे वितरणावर परिणाम होत आहे. त्याचा थेट फटका रहिवाशांना बसत आहे. अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. गावच्या पश्चिम बाजूच्या कॉलनी व उपनगरात पाच ते सहा दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जात होता. तासभर पाणी वितरित केले जात असून त्याची वेळ निश्चित नाही. दरम्यान वीस हजार लिटर पाण्यासाठी ४२० रूपयांची आकारणी केली जात असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.

.....................

लोकसंख्या तीस हजाराच्या आसपास

मनपाकडून पाच ते सात हजार लोकसंख्येला पाणी पुरवठा

उर्वरित सुमारे २३ हजार लोकांना जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा

रोज ११ लाख लिटर पाण्याची गरज

ग्रामपंचायतीकडे पाणी साठवणूकीसाठी टाक्या नाहीत

एका टाकीची साडेचार तर दुसऱ्या टाकाची चार लाख लिटर क्षमता

टाक्या भरण्यासाठी एक दिवसांचा कालावधी

०००

पाचगाव ग्रामपंचायतीकडे पाणी साठवणुकीची यंत्रणा नसल्यामुळे पाणी पुरवठयावर परिणाम होत आहे. दहा लाख लिटर क्षमतेची टाकी आवश्यक आहे. जिल्हा नियोजन समितीकडून पाण्याची टाकी बांधण्यासाठी निधीचा पाठपुरावा सुरु आहे. त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची पाचगावचे सरपंच, सदस्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते भेट घेणार आहेत.

विराज पाटील, करवीर तालुका शिवसेनाप्रमुख

००

जीवन प्राधिकरणाने कमी दराने ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. या मागणीसाठी १५० नागरिकांच्या शिष्टमंडळाने एमजीपी अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्याकडून ग्रामपंचायतीला पूर्वीप्रमाणे एक हजार लिटरला बारा रुपये दराने पाणी पुरवठा झाल्यास नागरिकांना कमी दराने पाणी पुरवठा करणे शक्य आहे. त्यासाठी प्रयत्नशील आहे.

संग्राम पाटील, सरपंच पाचगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोंधळींचा निवृत्तीनिमित्त सत्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर गुरुच्या रुपात वेगवेगळी माणसे भेटत गेली, प्रत्येकाकडून नवनवीन गोष्टी शिकता आल्या. यात आई ही सर्वश्रेष्ठ गुरु राहिली. जगण्याचे सूत्र तिने शिकवले. आयुष्यभर सकारात्मक वृत्ती आणि प्रशासकीय कामकाजात माणुसकी जपली. सेवानिवृत्तीनंतर कलाक्षेत्रात काम करणार आहे,' असे उद्गार शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी यांनी काढले.

गोंधळी नुकतेच निवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा गौरव समारंभ झाला. अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते आणि दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांच्या अध्यक्षतेखाली समारंभ झाला. याप्रसंगी त्यांच्या 'म्हणे एमकेजी' या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. पेटाळा येथील राम गणेश गडकरी सभागृहात कार्यक्रम झाला. कलाशिक्षक सागर बगाडे यांनी मानपत्र वाचन केले.

अभिनेते सोलापूरकर म्हणाले,' शिक्षण उपसंचालक गोंधळी हे बहुआयामी व्यक्तीमत्व आहे. शिक्षण, प्रशासन, साहित्य, अभिनय, कविता अशा प्रत्येक प्रातांत ठसा उमटविला. बुध्दी, समाजाप्रती विचार आणि कमालीचा आत्मविश्वास हे गुणविशेष मला भावले. त्यांनी आयुष्यात संयम कधी ढळू दिला नाही. हा सेवानिवृत्तीचा समारंभ नव्हे तर त्यांच्या कार्याचा गौरव समारंभ आहे.'

चंद्रकांत जोशी म्हणाले, 'गोंधळी यांनी शिक्षक, प्रशासक या दोन्ही टप्प्यावर वेगळी मुद्रा उमटवली.'

याप्रसंगी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, प्रभारी शिक्षण उपसंचालक किरण लोहार, प्रा. जयंत आसगावकर, संजय पुजारी यांनी मनोगत व्यक्त केले. गौरव समिती प्रमुख टी. एम. कुंभार यांनी प्रास्ताविक केले. भरत रसाळे यांनी आभार मानले. विनोदकुमार लोहिया, प्राचार्य पी. एस. हेरवाडे, शिक्षण निरीक्षक डी. एस. पोवार, मुख्याध्यापक सूर्यकांत चव्हाण, राजेंद्र कोरे, शिक्षक संघटनेचे नेते दादा लाड आदी उपस्थित होते.

...................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनापरवाना फलकांवर कारवाई

$
0
0

विनापरवाना फलकांवर कारवाई

पंधरा जणांवर केले गुन्हे दाखल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाची परवानगी न घेता वाढदिवसाचे फलक लावून शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या पंधरा जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. मिरजकर तिकटी, शिंगोशी मार्केट, शिवाजी पेठ परिसरातील दहा फलक पोलिसांनी जप्त केले. पोलिसांच्या कारवाईमुळे पोस्टर बॉईजनी पळ काढला.

पोलिसांनी विनापरवानगी फलकांवर कारवाया करण्याची मोहीम सुरू केली होती. गेल्या महिन्याभरात या कारवाईने शहरातील फलकांची संख्या काही प्रमाणात घटली होती. आता पुन्हा फलकबाजी करून शहर विद्रूप करण्याचे प्रकार सुरू आहे. जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजी पेठ, मिरजकर तिकटी, शिंगोशी मार्केट परिसरात विनापरवानगी फलक लागल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. यानुसार पोलिसांनी बुधवारी दहा फलक काढून जप्त केले. याबाबत आदित्य सुनील डोंगळे (रा. मंगळवार पेठ), शुभम दंडगे, प्रतीक शिरुडकर, क्रांतीकुमार मंडलिक, निवास निकम, नेहाल खेडकर, श्रेयस दुखंडे (सर्व रा. बालगोपाल तालीम जवळ), सौदन अपराध, युवराज अपराध, सचिन पाटील, अभिमन्यू चोरगे, पिंटू पाटील, विकी कोकाटे, अनिकेत मोरे, ओंकार, लक्ष्मण, (पूर्ण नाव नाही) या पंधरा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांकडून विनापरवानगी फलकांवर कारवाई सुरू असल्याचे कळताच अनेक पोस्टरबाईजनी कारवाई टाळण्यासाठी परिसरातून पळ काढला. परवानगी न घेता डिजिटल फलक व झेंडे लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश विशेष पोलिस माहनिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिले आहेत. मंगळवार पेठ येथे राहणारा आदित्य डोंगळे याचा बुधवारी वाढदिवस असल्याने शहरात विविध ठिकाणी शुभेच्छा फलक लागले होते. यासंबंधी स्थानिकांनी तक्रार करताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चित्रीकरण करीत फलक उतरवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images