Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

एकत्रित निवडणुका नाहीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'देशात एकाचवेळी निवडणुकांची हूल उठवली जात असली तरी घटनात्मकदृष्ट्या ते बेकायदेशीर आहे, तशी शक्यताही नाही, त्या ठरल्यावेळीच होतील,' असे स्पष्ट मत माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.

देशातील सद्य:स्थितीवर वृत्तपत्रांच्या निवडक संपादकांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. लोकसभा आणि विधानसभांची निवडणूक एकाचवेळी घेण्यावर भारतीय जनता पक्षाने चर्चा सुरू केली आहे. यासंदर्भातील प्रश्नावर ते म्हणाले, 'त्या एकाचवेळी घ्याव्यात या मताचा मी नाही. घटनेत तशी तरतूदही नाही. यामुळे राज्यांना मिळालेल्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होईल. मुदत पूर्ण न झालेल्या राज्यांच्या विधानसभा बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट आणून मुदतपूर्व निवडणुका घ्याव्या लागतील. हे शक्य नाही.' २०१९ च्या निवडणुकांवरील चर्चेवर ते म्हणाले, 'या निवडणुका राष्ट्रीय वाटत नाहीत, त्यांचे स्वरूप तसे राहिलेले नाही. राज्यांतील सत्तेचा हिशेब मांडून या निवडणुकांचा विचार सुरू झाला आहे, तो हितावह नाही.'

आगामी पंतप्रधानपदासाठी आपण इच्छुक असल्याची घोषणा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अलिकडेच केली, यामुळे कॉंग्रेसच्या परंपरेचा भंग झाला असे वाटत नाही काय, या प्रश्नावर ते म्हणाले, 'राहुल गांधींच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाखालील आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्यास आपण पंतप्रधान होणार काय, या प्रश्नावर त्यांनी ते उत्तर दिले होते. कॉंग्रेस आज बारा-तेरा राज्यांत भाजपनंतरचा मोठा पक्ष आहे. यूपीएचे नेतृत्त्व कॉंग्रेसच करेल. गेल्या चार वर्षांत विकासाची केवळ फुसकी चर्चाच झाली, वास्तवात मात्र समाजातील काही घटक आक्रमक झाले तर काही भितीच्या सावटाखाली वावरत आहेत, हे आजचे वास्तव आहे. हे देशाच्या वाटचालीसाठी चांगले नाही.'

देशातील अर्थव्यवस्थेवर भाष्य करताना ते म्हणाले, 'महागाई, इंधन दरवाढीने देश आज संतप्त आहे. बेराजगारी वाढत आहे. भविष्य निर्वाह निधीने (इपीएफ) दिलेली आकडेवारी म्हणजे नवी रोजगारनिर्मिती नव्हे. ती केवळ सांख्यिकी माहिती आहे, वस्तुस्थिती वेगळी आहे. वाढती अनुत्पादक कर्जे आणि विकासाचा घसरता दर यामुळे बँकिंग क्षेत्रही अडचणीत आल्याचे सांगून यामुळे बँक व्यवसाय कोलमडेल, असे म्हणता येणार नाही. मात्र, बँकांच्या मूळ हेतूला धोका पोहोचला आहे. कॉलेजिअम प्रणाली डावलून न्यायाधीश नियुक्त्या सुरू असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. न्यायालयीन प्रक्रियेत सरकारचा हस्तक्षेप वाढत आहे.'

देशातील कृषीव्यवस्थेसमेार मोठे आव्हान निर्माण झाले असून, या क्षेत्रातही अस्वस्थता वाढते आहे. महाराष्ट्रातील स्थितीही चांगली नाही, असे सांगत कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याची गरज नसल्याचे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले.

यावेळी माजी मंत्री सतेज पाटील, डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे संजय डी. पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एकत्रित निवडणुका नाहीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'देशात एकाचवेळी निवडणुकांची हूल उठवली जात असली तरी घटनात्मकदृष्ट्या ते बेकायदेशीर आहे, तशी शक्यताही नाही, त्या ठरल्यावेळीच होतील,' असे स्पष्ट मत माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.

देशातील सद्य:स्थितीवर वृत्तपत्रांच्या निवडक संपादकांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. लोकसभा आणि विधानसभांची निवडणूक एकाचवेळी घेण्यावर भारतीय जनता पक्षाने चर्चा सुरू केली आहे. यासंदर्भातील प्रश्नावर ते म्हणाले, 'त्या एकाचवेळी घ्याव्यात या मताचा मी नाही. घटनेत तशी तरतूदही नाही. यामुळे राज्यांना मिळालेल्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होईल. मुदत पूर्ण न झालेल्या राज्यांच्या विधानसभा बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट आणून मुदतपूर्व निवडणुका घ्याव्या लागतील. हे शक्य नाही.' २०१९ च्या निवडणुकांवरील चर्चेवर ते म्हणाले, 'या निवडणुका राष्ट्रीय वाटत नाहीत, त्यांचे स्वरूप तसे राहिलेले नाही. राज्यांतील सत्तेचा हिशेब मांडून या निवडणुकांचा विचार सुरू झाला आहे, तो हितावह नाही.'

आगामी पंतप्रधानपदासाठी आपण इच्छुक असल्याची घोषणा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अलिकडेच केली, यामुळे कॉंग्रेसच्या परंपरेचा भंग झाला असे वाटत नाही काय, या प्रश्नावर ते म्हणाले, 'राहुल गांधींच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाखालील आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्यास आपण पंतप्रधान होणार काय, या प्रश्नावर त्यांनी ते उत्तर दिले होते. कॉंग्रेस आज बारा-तेरा राज्यांत भाजपनंतरचा मोठा पक्ष आहे. यूपीएचे नेतृत्त्व कॉंग्रेसच करेल. गेल्या चार वर्षांत विकासाची केवळ फुसकी चर्चाच झाली, वास्तवात मात्र समाजातील काही घटक आक्रमक झाले तर काही भितीच्या सावटाखाली वावरत आहेत, हे आजचे वास्तव आहे. हे देशाच्या वाटचालीसाठी चांगले नाही.'

देशातील अर्थव्यवस्थेवर भाष्य करताना ते म्हणाले, 'महागाई, इंधन दरवाढीने देश आज संतप्त आहे. बेराजगारी वाढत आहे. भविष्य निर्वाह निधीने (इपीएफ) दिलेली आकडेवारी म्हणजे नवी रोजगारनिर्मिती नव्हे. ती केवळ सांख्यिकी माहिती आहे, वस्तुस्थिती वेगळी आहे. वाढती अनुत्पादक कर्जे आणि विकासाचा घसरता दर यामुळे बँकिंग क्षेत्रही अडचणीत आल्याचे सांगून यामुळे बँक व्यवसाय कोलमडेल, असे म्हणता येणार नाही. मात्र, बँकांच्या मूळ हेतूला धोका पोहोचला आहे. कॉलेजिअम प्रणाली डावलून न्यायाधीश नियुक्त्या सुरू असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. न्यायालयीन प्रक्रियेत सरकारचा हस्तक्षेप वाढत आहे.'

देशातील कृषीव्यवस्थेसमेार मोठे आव्हान निर्माण झाले असून, या क्षेत्रातही अस्वस्थता वाढते आहे. महाराष्ट्रातील स्थितीही चांगली नाही, असे सांगत कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याची गरज नसल्याचे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले.

यावेळी माजी मंत्री सतेज पाटील, डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे संजय डी. पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांचे ठिय्या आंदोलन सुरू

$
0
0

कोल्हापूर

सेवानिवृत्तीनंतरचे लाभ न मिळण्यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर ११ शिक्षकांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. कोल्हापूर महानगर माध्यमिक शिक्षक संघ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. मागण्यांप्रश्नी वेळोवेळी प्रशासनाशी पाठपुरावा करूनही दुर्लक्ष झाल्याची भावना त्या शिक्षकांची झाली आहे. त्यामुळे निर्णायक ठिय्या आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. आंदोलनात तिलोत्तमा सोनवणे, दगडू थडके, शिवाजी कांबळे, सुरेश काजिर्णेकर, बनाबाई कांबळे, बी. एल. गौडाडकर, पांडुरंग पाटील, नामदेव कांबळे, शिवाजी शिंदे, पी. के. चौगुले, सुरेश बेलेकर यांचा सहभाग आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गळफास घेऊन आत्महत्या

$
0
0

(फोटो आहे)

नवविवाहित तरुणाची आत्महत्या

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लग्नाला दोन महिने होण्यापूर्वीच नवविवाहित तरुणाने सासुरवाडीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. संदीप शामराव साजणे (वय ३०, रा. नंदगाव, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. गगनबावडा तालुक्यातील मुटकेश्वर येथे मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला. कौटुंबिक वादातून आत्महत्या करीत असून, यास पत्नी आणि सासरे जबाबदार असल्याची चिठ्ठी मृत साजणेच्या पँटच्या खिशात पोलिसांना मिळाली.

सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी संदीप साजणेचा मुटकेश्वर येथील ऋतुजा पाटील हिच्याशी विवाह झाला होता. काही दिवसांनंतर पत्नी ऋतुजा सासरी नंदगाव येथे न राहता माहेरी मुटकेश्वर येथे राहू लागली. तिला सासरी घेऊन जाण्यास संदीप तिथे गेला होता. मात्र, पत्नीने सासरी येण्यास नकार दिला. तसेच सासऱ्यानेही पाठविण्यास नकार दिला. त्यामुळे तो मुटकेश्वर येथे राहत होता. मंगळवारी सकाळी त्याने झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले. गगनबावडा येथील पोलिसपाटील यांनी पोलिसांना याची वर्दी दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. त्याच्या पॅँटच्या खिशामध्ये पोलिसांना ओळखपत्र आणि चिठ्ठी मिळाली. 'कौटुंबिक वादातून आत्महत्या करीत असून, माझ्या आत्महत्येस पत्नी आणि सासरे यांना जबाबदार धरावे,' असे चिठ्ठीत लिहिले आहे. साजणेच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे. याबाबत गगनबावडा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानसरे खटल्याची सुनावणी ९ जुलैला

$
0
0

पानसरे हत्याप्रकरणी

सुनावणी ९ जुलैला

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोंविद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी ९ जुलैपर्यंत लांबणीवर पडली. संशयितांचे वकील उपस्थित नसल्याने मंगळवारी कोर्टातील कामकाज होऊ शकले नाही. संशयित समीर गायकवाडवर आरोपपत्र दाखल करू नये, यासाठी पानसरे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचबरोबर तपास यंत्रणेने दोघा संशयितांना मिळालेल्या जामिनाविरोधात उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली आहे. मंगळवारी पानसरे हत्याप्रकरणाची सुनावणी जिल्हा कोर्टात होती. संशयित गायकवाड न्यायालयात उपस्थित होता. मात्र, त्याचे वकील पुण्यात असल्याने ते उपस्थित राहू शकले नाही. विशेष सरकारी वकील राणे यांनी उच्च न्यायालयात या संदर्भात सुरू असणाऱ्या कामकाजासंबधीची माहिती दिली. त्यानंतर न्यायालयाने याबाबतची पुढील सुनावणी ९ जुलैला ठेवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपतर्फे इफ्तार पार्टी

$
0
0

कोल्हापूर : भाजप अल्पसंख्याक मोर्चातर्फे बुधवार (ता.६) पासून रोज येथील दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंग येथे सायंकाळी साडेसहा वाजता इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हा अध्यक्ष संदीप देसाई, अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष नजीर देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज कोसळून महिला ठार

$
0
0

कोल्हापूर : जिल्ह्याला वळवाचा तडाखा बसला असून, चंदगड तालुक्यातील महिपाळगड येथील वनिता विठ्ठल मोरे (वय ४०) ठार झाली. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. मोरे या देवरवाडी शिवारातील शेतात काम करण्यास गेल्या असताना त्यांच्यावर वीज पडली, त्यात त्या ठार झाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रदूषण’मध्ये मृत माशांचे पूजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यास असमर्थ ठरलेल्या प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाच्या पायरीवर शिवसेनेच्या वतीने मृत मासे, दूषित पाणी आणि जलपर्णीचे पूजन अशा अनोख्या आंदोलनाद्वारे निषेध करण्यात आला. नदी प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या कोल्हापूर महापालिका, साखर कारखाने, औद्योगिक कारखान्यांवर कारवाईची मागणीही करण्यात आली.

जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून पंचगंगा नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास मोर्चा काढला. मोर्चात हातगाडीवर मृत मासे मांडले होते. तसेच तांब्याच्या घागरीत पंचगंगेतील पाणी व जलपर्णी ठेवण्यात आली होती. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निषेधाच्या घोषणा देत शिवसैनिकांचा मोर्चा कार्यालयासमोर आला. यावेळी कार्यालयासमोर फाटक बंद करण्यात आले. अधिकाऱ्यांनी मोर्चास सामोरे यावे, अशी मागणी शिवसैनिकांनी केली. अधिकारी येण्यास टाळाटाळ करू लागल्यावर शिवसैनिक फाटक उघडून आत घुसले. कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अधिकारी नागेश लोंदलकर आले. जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. एकीकडे प्रदूषण होऊ नये म्हणून तुम्ही प्रबोधन करता आणि दुसरीकडे प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई का करत नाही, असा प्रश्न केला. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षामुळे पंचगंगेची अवस्था वाईट झाले असून मृत मासे, दूषित पाणी, जलपर्णी तुमच्या कार्यालयात ठेवून घ्या, अशी मागणी केली. पण अधिकाऱ्यांनी नकार दिल्यावर शिवसैनिक आक्रमक झाले. अधिकारी लोंदलकर यांनी जिल्ह्यात आपण नुकताच पदभार स्वीकारला आहे. आम्हाला कारवाई करण्यास थोडी संधी द्या, अशी विनंती केली. त्यानंतर महिला कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालयाच्या पायरीवर जलपर्णी, मृत मासे आणि पाण्याचे पूजन करून प्रशासनाचा निषेध केला. त्यानंतर शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्या वतीने जयंती नाला, दुधाळी, बापट कॅम्प आणि लाइन बाजार येथे एसटीपी प्रकल्प उभारण्यात आला आहे. एसटीपी उभारणाऱ्या कंपन्यांनी वेळेत काम पूर्ण न केल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पंचगंगा नदी प्रदूषणाला जबाबदार धरून महापालिका आयुक्त अभिजित चौधरी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा जल अभियंत्यांना निलंबित करावे. एसटीपी वेळेत न पूर्ण न करणाऱ्या कंपन्यांची डिपॉझिट जप्त करून निविदा रद्द कराव्यात, ठेकेदारावर फौजदारी गुन्हे नोंदवावेत, जिल्ह्यातील साखर कारखाने क्रशिंग परवान्यापेक्षा अधिक क्रशिंग करतात. जादा क्रशिंग करणाऱ्या कारखान्यांना नवीन सांडपाणी निर्गत प्रकल्प उभारण्याचे आदेश द्यावेत अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

आंदोलनात शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, अवधूत साळोखे, शशी बिडकर, राजेंद्र पाटील, दिलीप जाधव, रवी चौगुले, अभिजित चव्हाण, शुभांगी पोवार, सुजाता सोहनी, दीपाली शिंदे, कमल पाटील, आदींसह शिवसैनिक सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिबिरासाठी निवड

$
0
0

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर : पिंच्यांक सिलॅट व स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियातर्फे श्रीनगर येथे शेर-ए-काश्मीर इनडोअर स्टेडियमवर होणाऱ्या प्रशिक्षण शिबिरासाठी कोल्हापुरातील चौघांची निवड झाली. शुभम सुतार (वजन गट ५० ते ५५), विशाल मोरे (वजन गट ६५ ते ७०),अमोल बावडेकर (वजन गट ७०ते ७५) तसेच मुलींमध्ये मृणाल कांबळेची जकार्ता येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली. क्रीडा मंत्रालय व स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियातर्फे चाळीस दिवसांचा प्रशिक्षणाचा कालावधी आहे. त्यांना महाराष्ट्र पिंच्यांक सिलॅटचे सचिव किशोर येवले, जिल्हाध्यक्ष डॉ.भारत कोटकर, नितीन कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्या दोघींचे निलंबन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

क्रेडीट कार्डवरील थकवलेली रक्कम भरण्यासाठी आई आणि बायकोला विकण्याचा संतापजनक सल्ला देणाऱ्या रत्नाकर बँकेच्या दोन महिला अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. बँकेच्या चौकशीत सुप्रिया पाठक आणि शीतल (दोघीही रा. मुंबई) या दोघी दोषी आढळल्या आहेत. प्रसिद्धी पत्रकाद्वारे मंगळवारी संध्याकाळी रत्नाकर बँक प्रशासनाने कारवाईची माहिती दिली.

रत्नाकर बँकेच्या राजारामपुरी शाखेतील खातेदार श्रेयस पोतदार यांना बँकेने क्रेडीट कार्ड दिले होते. १ लाख ८९ हजार रुपयांच्या व्यवहाराची क्षमता असलेल्या कार्डवर पोतदार यांच्याकडून १ लाख २२ हजार रुपयांची रक्कम थकीत होती. थकीत रक्कम त्वरित भरावी यासाठी बँकेच्या रिकव्हरी विभागाकडून तगादा सुरू होता. मुंबईतील रिकव्हरी विभागातून सुप्रिया पाठक आणि शीतल या दोन महिला अधिकाऱ्यांनी २४ ते २७ एप्रिल दरम्यान पोतदार यांच्या मोबाइलवर फोन करून अश्लील भाषेत धमकावले होते. 'आई आणि बायकोला विक, मात्र बँकेचे पैसे भर. पैसे नसतील तर तुझ्या बायकोला मुंबईत आमच्या बँकेच्या ऑफिसमध्ये पाठव,' अशी दमदाटी करीत बदनामी करण्याची धमकीही दिली होती. याबाबत पोतदार यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. अश्लील भाषेतील दमदाटीचे मोबाइल रेकॉर्डिंग सोशल मीडियात व्हाययरल झाल्यानंतर बँकेच्या कामकाजाबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.

बँक प्रशासनाने संबंधित महिला अधिकाऱ्यांनी वापरलेल्या भाषेचा यापूर्वीच निषेध केला असून, त्या दोघींची चौकशी करण्यात आली. मंगळवारी चौकशी पूर्ण झाल्यानंतर सुप्रिया पाठक आणि शीतल या दोघींनाही निलंबित करण्यात आले. बँकेने रिकव्हरीचे काम स्विफ्ट कलेक्शन सर्व्हिसेस या खासगी कंपनीकडे दिले होते. खासगी कंपनीमार्फत या दोघी रत्नाकर बँकेसाठी काम करीत होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राहुल चव्हाण खून प्रकरणातील चौघे निर्दोष

$
0
0

राहुल चव्हाण खूनप्रकरणातील चौघे निर्दोष

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जवाहरनगर येथील गुंड राहुल चव्हाण याच्या खून प्रकरणातील चौघांची मुंबई हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केली. जिल्हा कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर संशयितांनी हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने मंगळवारी निकाल दिला असून, अमित उर्फ पिंटू महादेव भास्कर (वय २८), महादेव शामराव भास्कर (५८), सुरेश मारुती शिंदे (५१) आणि अमोल महादेव भास्कर (३४, सर्व रा. जवाहरनगर, कोल्हापूर) हे चौघे निर्दोष सुटले. चौघांच्या निर्दोष मुक्ततेमुळे पोलिसांनी जवाहरनगरातील बंदोबस्तात वाढ केली आहे.

जवाहरनगर परिसरातील गुंड राहुल चव्हाण याचा २०१७ मध्ये एका सलूनच्या दुकानात चाकू आणि तलवारीने भोसकून निर्घृण खून झाला होता. या खूनप्रकरणी पोलिसांनी अमित उर्फ पिंटू भास्कर, महादेव भास्कर, सुरेश शिंदे आणि अमोल भास्कर या चौघांना अटक केली होती. राजारामपुरी पोलिसांनी खुनाचा तपास करून संशयितांच्या विरोधात कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. जिल्हा कोर्टात सुनावणी झाल्यानंतर २०१७ मध्ये चार आरोपींना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आरोपींनी या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते. २००९ पासून हायकोर्टात सुनावणी सुरू होती. मंगळवारी या खटल्याचा निकाल लागला. कोर्टाने चारही संशयितांची निर्दोष मुक्तता केली. संशयितांच्या मुक्ततेनंतर जवाहरनगर परिसरात पुन्हा टोळीयुद्धाची भीती निर्माण होण्याची शक्यता गृहित धरून राजारामपुरी पोलिसांनी परिसरातील बंदोबस्त वाढवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर रेल्वे स्थानकाची स्वच्छता मोहीम

$
0
0

रेल्वेस्थानक स्वच्छतेसाठी विशेष चाचणी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रेल्वेस्थानक म्हणजे अस्वच्छता, गबाळपेणा, ठिकठिकाणी टाकलेल्या पिशव्या हे चित्र डोळयांसमोर उभे राहते. मात्र कोल्हापूर रेल्वे स्थानकाची स्वच्छता करुन परिसर दुर्गंधीमुक्त करण्यासाठी स्वच्छता प्रकल्पाची चाचणी झाली. रेल्वे स्थानकावर औषध फवारणी करण्यात आली. मुंबईतील इनोव्हेटिव्ह क्लिनींग सिस्टीम कंपनीने स्वच्छतेसाठी विशेष उपाययोजना राबवली.

खासदार धनंजय महाडिक आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वच्छता प्रकल्पाची चाचणी घेण्यात आली. लवकरच या चाचणीचा अहवाल रेल्वे प्रशासनाला पाठवून सकारात्मक निर्णय घेतला जाईल आणि कोल्हापूरचे रेल्वेस्थानक परिपूर्ण बनविले जाईल, असे खासदार महाडिकांनी सांगितले. रेल्वे स्थानकावरील शौचालयांची स्वच्छता आणि कचरा उठाव, प्लॅटफॉर्मवरील स्वच्छतेसाठी वरिष्ठ पातळीवरुन सूचना येतात. पण कोल्हापूर रेल्वेस्थानक प्रशासनाने त्यापुढे जाऊन स्थानक निर्जंतुकीकरण, दुर्गंधीमुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबईतील कंपनीने येथील स्थानक कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची प्रात्यक्षिके दाखवली. प्लॅटफॉर्म, रेल्वेचे डबे, शौचालये व अन्य ठिकाणी औषध फवारणी केली. कंपनीच्या प्रतिनिधींनी या फवारणीच्या परिणामांची माहिती दिली. रेल्वेस्थानकातील शौचालयात सेजबॉश सॅनटायझन बॅक्टेरिया नियंत्रण चाचणी घेतली. चाचणी करण्यापूर्वी बॅक्टेरियाचे प्रमाण ११५ पर्यंत होते. मात्र चाचणी झाल्यानंतर अवघ्या दोन मिनिटात बॅक्टेरियाचं प्रमाण ६० वर पोहचले. रेल्वेरुळाखालील जमीन घुशीने पोखरल्याने रुळाला धोका पोहचू शकतो, मात्र औषध फवारणीमुळे उंदीर आणि घुशीचे प्रमाण कमी होईल असे कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले. हा अहवालाला प्रशासनाची मान्यता मिळताच नियमित अंमलबजावणी होईल, असे स्थानकप्रबंधक विजयकुमार यांनी सांगितले. या वेळी मोहन शेटे, समीर शेठ, शिवनाथ बियाणी, पंडितराव कर्णिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्ट लिपिक भरतीत लाखो उमेदवार अपात्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यातील जिल्हा न्यायालयांमध्ये लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई या पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू आहे. ८ हजार १२१ रिक्त जागांसाठी सुमारे नऊ लाख अर्ज आले होते. छाननी प्रक्रियेत यातील केवळ ८० हजार उमेदवारांना पात्र ठरवत उर्वरित उमेदवारांना अपात्र ठरवले आहे. यामुळे पात्र असूनही लाखो उमेदवार परीक्षेपासूच वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवार बुधवारी (ता. ६) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत.

राज्यातील जिल्हा न्यायालयांमधील रिक्त असलेल्या ८ हजार १२१ जागांच्या भरती प्रक्रियेसाठी २८ मार्च २०१८ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यानुसार लघुलेखक व लिपिक पदासाठी कमीत कमी दहावी पास, तर शिपाईपदासाठी सातवी पाससह टंकलेखन, संगणक कौशल्य असे निकष दिले होते. मोठ्या प्रमाणात जागा भरल्या जात असल्याने अनेक उच्चशिक्षितांनी अर्ज केले होते. मात्र, भरती प्रक्रियेसाठी राबविलेल्या छाननीतून केवळ ८० हजार उमेदवारांनाच पात्र ठरविले आहे. निकषांनुसार पात्र असूनही लाखो उमेदवारांना अपात्र ठरवल्याने भरती प्रक्रियेसाठी नेमके कोणते निकष वापरले जात आहेत, असा प्रश्न उमेदवारांनी उपस्थित केला आहे. यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन देणार असल्याची माहिती उमेदवार विनायक साळोखे आणि प्रवीण लंगरे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शस्त्रप्रदर्शन करणाऱ्या संघटनांवर गुन्हे दाखल करा

$
0
0

शस्त्रप्रदर्शन करणाऱ्या

संघटनांवर गुन्हे दाखल करा

पुरोगामी संघटनांचे पोलिस अधीक्षकांना निवेदन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बजरंग दलाने आयोजित केलेल्या शिबिराची सांगता शस्त्रसंचलनाने झाली होती. याला शहरातील डाव्या व पुरोगामी संघटनांनी आक्षेप घेतला असून, सार्वजनिक ठिकाणी शस्त्रप्रदर्शन करून दहशत निर्माण करणाऱ्या संघटनांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली. याबाबतचे निवेदन मंगळवारी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांना देण्यात आले.

बजरंग दलाच्या वतीने शहरात कार्यकर्त्यांसाठी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराची सांगता शस्त्रसंचलनाने झाली. सार्वजनिक ठिकाणी उघडपणे खांद्यावर बंदुका घेऊन फिरणे लोकशाहीला मारक असून, हा प्रकार दहशत निर्माण करणारा असल्याचा आरोप डाव्या व पुरोगामी संघटनांनी केला आहे. शस्त्रप्रदर्शन करणाऱ्या संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी पुरोगामी संघटनांनी निवेदनाद्वारे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे केली. निवेदनात म्हटले आहे की, 'सार्वजनिक ठिकाणी शस्त्रप्रदर्शन करणे बेकायदेशीर आहे. काही संघटनांनी मात्र उघडपणे शस्त्रसंचलन करून लोकशाही व्यवस्थेवरील अविश्वास व्यक्त केला. नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या या कृत्याला पोलिस आणि काही राज्यकर्त्यांचा पाठिंबा असल्याचा संशय आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे मारेकरी पोलिसांना सापडले नाहीत. गुन्ह्यातील शस्त्रे आणि वाहनेही पोलिसांना मिळाली नाहीत. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणीही महाराष्ट्रातील संशयितांना अटक झाली. अशा स्थितीत उघडपणे शस्त्रे घेऊन संचलन करणाऱ्या संघटनांमुळे हिंसा घडण्याचा धोका आहे. पोलिसांनी संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.

शस्त्रसंचलनाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन अधीक्षक संजय मोहिते यांनी दिले. यावेळी सतीशचंद्र कांबळे, नामदेव गावडे, लक्ष्मण वायदंडे, बी. एल. बरगे, अनिल चव्हाण, स्नेहल कांबळे, आरती रेडेकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅव्हल मालकासह दोघांना पोलिस कोठडी

$
0
0

ट्रॅव्हल कंपनी मालकांसह

दोघांना चार दिवस कोठडी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बोगस ट्रॅव्हल कंपनी काढून प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या सौरभ सिंग (वय २७), अविषेक सिंग (वय ३५ दोघेही रा. पुणे) या संशयितांना कोर्टाने चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. शाहूपुरी पोलिसांनी त्यांना सोमवारी (ता.४) अटक केली होती. फसवणुकीची व्याप्ती वाढत चालली असून त्यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी प्रवाशी पुढे येत आहेत.

दाभोलकर कॉर्नर येथे सौरभ सिंग, अविषेक सिंग यांनी टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्सचे कार्यालय सुरू केले होते. या कंपनीकडून सिमला, कुलू, मनाली येथे सहलीचे नियोजन असल्याचे सांगत प्रवाशांकडून लाखो रुपये उकळल्याचा संशय आहे. बांधकाम व्यावसायिक आनंद दादासाहेब पाटील यांनी तक्रार दिल्यानंतर कंपनीचे बिंग फुटले. शाहूपुरी पोलिसांनी दोघांना पुण्यातून अटक केली आहे. आजअखेर दाखल झालेल्या तक्रारीनुसार १६ लाखांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले असून, फसवणूकीची व्याप्ती ३० लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक रणजित पाटील यांनी वर्तवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संप सरकार पुरस्कृत: राजू शेट्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीसह अन्य विविध मागण्यांसाठी सुरू असलेला शेतकऱ्यांचा संप हा सरकार पुरस्कृत आहे. गेल्यावर्षी संप मोडण्यासाठी पुढाकार घेतलेले कर्तेकरविते या वेळेच्या संपाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळत आहे. त्यांचे चारित्र्य संशयास्पद असून विश्वासहर्ता नाही. त्यामुळेच देशातील १९३ शेतकरी संघटनांशी चर्चा करून संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. या टप्प्यात संप करण्याची गरज नव्हती, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' शी बोलताना मांडली.

खासदार शेट्टी म्हणाले, गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी देशव्यापी संप करुन सरकार आणि समाजाचे लक्ष वेधले. मात्र केवळ संप आणि आंदोलनाने मागण्या मान्य करून घेण्यास मर्यांदा येतात. त्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा. पुन्हा कर्जबाजारी होऊ नये, त्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीतील सूत्रानुसार शेतमाला हमी भाव मिळावा, अशी दोन खासगी विधेयक तयार केली आहेत. देशभरातील १९३ शेतकरी संघटनांचे नेते, पदाधिकारी, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची चर्चा केलेली ही दोन विधयेक केंद्र सरकारच्या पावसाळी अधिवेशनात मांडली जाणार आहेत.

या विधेयकांला सर्वच विरोधी पक्षाने पाठिंबा दिला आहे. प्रत्यक्षात सभागृहात विधेयक मांडल्यानंतर पाठिंबा देणारे आणि विरोध करणाऱ्या पक्षाचे खरे चित्र उघड होईल. ही तयारी सुरू असताना स्वयंघोषित शेतकरी नेत्यांनी एक जून पासून देशव्यापी संप पुकाराला. या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यासाठी १९३ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत आणि दोन खासगी विधेयकावर सरकारची भूमिका स्पष्ट झालेली नाही. त्यासह संप सरकार पुरस्कृत असल्याचा सूर उमटल्याने संपात सहभागी होऊ नये, असा सूर उमटला.

शेट्टी म्हणाले, संपकऱ्यांकडून आमच्या मागण्यांसाठी संप सुरू आहे. संपात सहभागी नसलो तरी मागण्यांना आमचा पाठिंबा आहे. संपाला विरोध करण्याची भूमिका नाही. त्यामध्ये कोणताही व्यत्यय आणलेला नाही. आम्ही पाठिंबा दिलेला नाही, त्याचा अर्थ शेतकरी चळवळीत फूट पडला, असा काढणे उचित ठरणार नाही. कारण संपाचे नेतृत्व करणाऱ्यांनी यापूर्वी झालेल्या कोणत्याही शेतकरी चळवळीला योगदान दिलेले नाही.

प्रमुख डावे पक्षही नाहीत

शेतकरी संपात माक्सवादी कम्युनिष्ट पक्ष, भारतीय कम्युनिष्ट पक्ष, राष्ट्रीय किसान संघ, कर्नाटकातील रयत संघटना, रघुनाथ पाटील यांची शेतकरी संघटना यांच्यासह इतर डाव्या चळवळींचा सहभाग संपात नाही. शेतकरी खरीप पिकांच्या पेरणीच्या धांदलीत असल्याने त्यांनीही पाठ फिरविली असल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

$
0
0

सहा पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांतील १४७ पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदली प्रक्रियेला मंगळवारी सुरुवात झाली. जिल्ह्यातील सहा पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात दिवसभर परिक्षेत्रातील पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. याची अंतिम यादी रात्री उशिरा जाहीर होणार आहे, तर उपनिरीक्षकांच्या बदल्यांची यादी बुधवारी (ता.६) जाहीर होणार आहे.

जिल्ह्यातून अशोक धुमाळ (वाहतूक शाखा), निशिकांत भुजबळ (विमानतळ), अनिल गाडे (शाहूवाडी), धनंजय जाधव (पोलिस कल्याण), शौकत जमादार (पासपोर्ट विभाग), अरविंद चौधरी (भुदरगड) यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षकांमध्ये विद्या जाधव (पोलिस मुखालय), पुष्पलता मंडले (करवीर), विकास जाधव (कोडोली), विठ्ठल दराडे (जुना राजवाडा), राकेश हांडे (मुरगूड) आदींचा या बदल्यांमध्ये समावेश आहे. या अधिकाऱ्यांच्या कोणत्या ठिकाणी बदल्या झाल्या, त्याची यादी रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नाही. बुधवारी १४७ पोलिस उपनिरीक्षकांच्या मुलाखती घेऊन बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. बदली समितीमध्ये विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, साताऱ्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील, करवीरचे पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, आदींचा समावेश आहे. बदली प्रक्रियेसाठी परिक्षेत्रातून शंभरपेक्षा जास्त पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षकांनी मंगळवारी विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयामध्ये गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रायगड स्वच्छतेसाठी हजारो हात एकवटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आलेल्या हजारो शिवभक्तांनी स्वच्छता मोहीम राबवत खासदार संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे, शहाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधत रायगड प्लास्टिकमुक्त मोहीम फत्ते केली. दरम्यान, बुधवारी (ता.६) होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त रायगडावर दाखल झाले आहेत.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक छत्रपती संभाजीराजे व युवराज शहाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता मुख्य सोहळा होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून १६७४ ला रायगडावर राज्याभिषेक झाला. शिवराज्यभिषेक सोहळा म्हणजे मुघल साम्राज्याविरोधातील पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते. मुघल साम्राज्यातून शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली होती. या दिवसाची स्मृती कायम राहावी, या उद्देशाने छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहाने साजरा होत आहे. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे राजसदरेवर आगमन होईल. शिवरायांच्या उत्सवमूर्तीचे छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते विधिवत पूजन, अभिषेक व त्यानंतर मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीवर सुवर्णाभिषेक केला जाईल.

दरम्यान, मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास प्लास्टिकमुक्त रायगड उपक्रमात ४०० स्वयंसेवकांसह हजारो शिवभक्तांचे हात स्वच्छता मोहिमेत सरसावले. चित्तदरवाजा ते भवानी टोक अशा ३७ ठिकाणांची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मेणा दरवाजा, हिरकणी बुरुज, टकमक टोक, होळीचा माळ, बाजारपेठ, महादरवाजा, कृषावर्त तलाव, शिवसमाधी, भवानी टोक, जगदीश्वर मंदिर, दारूखाना, हत्तीखाना, राजदरबार, बारा टाके आदी परिसरात स्वच्छता करण्यात आली. राज्यातील शिवभक्तांसह शिवाजी विद्यापीठ, मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे व सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा मोहिमेत सहभाग होता.

रायगड प्राधिकरणाच्यावतीने गडावर उत्खनन सुरू आहे. उत्खननात सापडलेल्या वस्तूंचे प्रदर्शन रायगडावर मांडण्यात आले. हजारो शिवभक्तांनी प्रदर्शनाला भेट दिली. शिवभक्तांसाठी राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने अन्नछत्राचे आयोजन केले आहे. हजारो शिवभक्तांनी अन्नछत्राचा लाभ घेतला. राजसदर, होळीचा माळ परिसरात मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाधव, सावंत, पळसुलेंना डीवायएसपीपदी बढती

$
0
0

२ फोटो..

जाधव, सावंत, पळसुलेंना

डीवायएसपीपदी बढती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पोलिस निरीक्षक श्रीधर जाधव, सचिन सावंत, विजय पळसुले यांना पोलिस उपअधीक्षक बढती मिळाली आहे. तिघेही मूळचे कोल्हापूरचे आहेत. जाधव सध्या पिंपरी-चिंचवड, तर सावंत सोलापूरमध्ये कार्यरत आहेत.

श्रीधर जाधव शिवाजी पेठेतील सरदार तालीम येथील रहिवासी असून, ते न्यू कॉलेजचे विद्यार्थी आहेत. त्यांनी यापूर्वी घाटकोपर, बारामती, हुपरी, स्पेशल प्रोटेक्शन युनिट, शिखरापूर, नारायणगाव, मेढा, सातारा शहर, खंडाळा, क्राइम ब्रँच पुणे शहर, दत्तवाडी, वाकड पोलिस ठाण्यात गेली ३० वर्षे सेवा केली आहे. सचिन सावंत यांनी मुंबईत १५ वर्षे सेवा बजावली असून सातारा, महाबळेश्वर येथे काम केले आहे. ते मंगळवार पेठ संभाजीनगर परिसरातील रहिवासी आहेत. विजय पळसुले कळंबा येथील रहिवासी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवराज्यभिषेकदिन मिरवणूक आज

$
0
0

शिवराज्यभिषेक दिनानिमित्त

आज मिरवणूक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने बुधवारी (ता.६) शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांसह मावळ्यांच्या वेशभूषेतील कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. तसेच मर्दानी खेळ, वारकरी, झांजपथक मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असणार आहे. मिरवणुकीत शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images