Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

माजी अर्थमंत्री पी. चिदबंरम

0
0

फोटो

...............

मोदींच्या राज्यात

अर्थव्यवस्था खिळखिळी

नोटबंदी ही सर्वात मोठी चूक असल्याचा चिदंबरम यांचा हल्लाबोल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'काँग्रेस आघाडी सरकारच्या कालावधीत देशाची विकासात्मक वाटचाल सुरु होती. आर्थिक विकास दर ७.५ टक्क्यापर्यंत पोहचला होता. मात्र भाजप सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देशाचा विकास घटला. गेल्या चार वर्षात आर्थिक विकासदर साडेसात टक्क्यांवरुन ६.७ टक्क्यांपर्यंत घसरला. विकासदरात दीड टक्क्यांची घसरण झाल्याने देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. समाजातील एकही घटक या सरकारच्या कामगिरीवर समाधानी नाही. नोटबंदी ही तर भाजप सरकारची सर्वात मोठी चूक ठरली. त्याचे परिणाम अनेक वर्षे भोगावे लागणार आहेत,'असे टीकास्त्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सोडले.

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि संलग्न औद्योगिक, व्यापारी व व्यावसायिक संघटनेतर्फे चिदंबरम यांचे 'राष्ट्रीय अर्थव्यवस्था: सद्यस्थिती व परिणाम' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. येथील केशवराव भोसले नाट्यगृह येथे आयोजित या व्याख्यानाला पावसातही प्रचंड गर्दी झाली होती. चिदंबरम यांनी तासाभराच्या भाषणात काँग्रेस आघाडीच्या कालावधीतील देशाच्या कामगिरीपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या नोटबंदी, जीएसटी, इंधन दरवाढ, कृषी व बँकीग क्षेत्रातील अधोगती यासंबंधी विस्तृत विवेचन केले.

चिदंबरम म्हणाले, 'सरकारची प्रत्येक वर्षी दोन कोटी तरुणांना नोकरी देण्याची वल्गना खोटी ठरली. नोटबंदी आणि जीएसटीमुळे व्यापार, व्यवसाय व उद्योग जगतावर विपरित परिणाम झाला. गेल्या चार वर्षात किती तरुणांना नोकऱ्या मिळाल्या, नवीन रोजगार निर्मिती किती वाढली हा संशोधनाचा विषय बनला आहे. सारासार विचार न करता नोटबंदीचा निर्णय म्हणजे मोदी सरकारची ग्रेटेस्ट चूक आहे. सरकारने नोटबंदीमुळे काळा पैसा, भ्रष्टाचार, दहशतवाद्यांना होणाऱ्या आर्थिक रसदीला पायबंद बसेल अशी घोषणा केली होती. कालांतराने यापैकी एकही घोषणा सत्यात उतरली नाही. देशाची संपत्ती निर्माण करण्यात व्यापारी, उद्योजक व शेतकरी हे प्रमुख घटक आहेत. सरकारने या घटकांसाठी प्रोत्साहित धोरण राबविण्याऐवजी त्यांच्यासमोर संकटाची मालिकाच उभी केली. या सरकारकडे देशाला विकासाच्या मार्गावरुन पुढे नेण्याचे आर्थिक धोरण नाही. वर्षभरात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. चार वर्षात सरकारने देशावर नोटबंदी, जीएसटी, इंधन दरवाढीचे आघात केले. येत्या वर्षभरात त्यांनी नवीन आघात करुन देशवासियांना बेजार करु नये हीच अपेक्षा आहे.' चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी स्वागत केले. आनंद माने यांनी प्रास्ताविक केले. योगेश कुलकर्णी यांनी आभार मानले. आमदार सतेज पाटील, महापौर शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, चेंबरचे उपाध्यक्ष संजय शेटे, उद्योजक चंद्रकांत जाधव, प्रदिप कापडिया, शरद रणपिसे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

............

जीएसटी नव्हे गब्बर सिंग टॅक्स

भाजप सरकारने प्रचंड गाजावाजा केलेला जीएसटी कर म्हणजे गब्बर सिंग टॅक्स असल्याची खिल्ली चिदंबरम यांनी उडविली. ते म्हणाले, 'संपूर्ण देशभरात एक करप्रणाली या व्यापक उद्देशाने जीएसटीची संकल्पना मी मांडली. पण या चांगल्या संकल्पनेची भाजप सरकारने अतिशय चुकीच्या पध्दतीने अंमलबजावणी केली. चार टक्क्यांपासून चाळीस टक्क्यांपर्यंत जीएसटी लागू करत आर्थिक लूट केली. या सरकारच्या 'अच्छे दिन'पेक्षा काँग्रेसच्या कालावधीतील 'पुराने दिन' चांगले होते अशी आता लोकांची धारणा बनली आहे.'

..........

कृषी क्षेत्रातही पिछेहाट

चिदंबरम म्हणाले, 'आघाडी सरकारमधील तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या दहा वर्षांच्या कालावधीत देशाच्या कृषी क्षेत्राचा झपाट्याने विकास झाला. कृषी क्षेत्रातील विकास साडेचार टक्क्यापर्यंत वाढला होता. मात्र या सरकारने कृषी क्षेत्रातही निराशा केली. शेतकरी आणि शेतीची नस ओळखता न आल्यामुळे कृषी क्षेत्रासाठी भरभक्कम योजना राबविता आल्या नाहीत. कृषी उत्पादनापासून शेतमालाच्या भावापर्यंत शेतकरी वर्गाची उपेक्षा झाली. गेल्या चार वर्षात दर कृषीचा विकास दर हा २.०७ टक्क्यापर्यंत खाली उतरला.'

..................

तीन टायर पंक्चर

व्यक्तिगत पातळीवर खर्च करण्याची कुवत, खासगी गुंतवणूक, बँकीग व्यवहार आणि पेट्रोलियम पदार्थातील सरकारी गुंतवणूक ही देशाच्या विकासाच्या गतीची चार चाके समजली जातात. यापैकी पहिली तीनही चाके पंक्चर झाली आहेत. खासगी गुंतवणूक शून्यावर आली आहे. मंदी आणि जाणीवपूर्वक कर्ज बुडवेगिरी करणाऱ्यांवरील कारवाईत हलगर्जीपणा, राष्ट्रीयकृत बँकाचे वाढते एनपीए आणि थकीत कर्जामुळे बँका नवीन कर्ज देण्याच्या स्थितीत राहिल्या नाहीत. निर्यात दरात शून्य टक्क्यांपर्यंत घसरण झाली. पेट्रोलियम पदार्थापासून तीन लाख कोटी रुपयांचे उत्पन्न वगळता अन्य घटकांतील कामगिरी निराशजनक असल्यामुळे आर्थिक संकट आणखी गडद होण्याची चिन्हे असल्याची शक्यता चिदंबरम यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हद्दपार आरोपीस अटक

0
0

हद्दपार गुंडास

राजारामपुरीत अटक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्ष हद्दपार करण्यात आलेल्या आसु बादशाह शेख (वय २३, गोखले विद्यालयासमोर, दौलतनगर) या गुंडास राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी अटक केली.

शेख याच्या नावावर खुनाचा प्रयत्न, मारामारी, जबरी चोरी असे सात गंभीर गुन्हे आहेत. पोलिसांनी शेख याच्याविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव करवीर प्रातांधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला होता. प्रांताधिकाऱ्यांनी ३० नोव्हेंबर, २०१७ रोजी जिल्ह्यातून एक वर्ष हद्दपार केले होते. हद्दपार असतानाही शेख राजारामपुरीत आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. उपनिरीक्षक अण्णाप्पा कांबळे, हेड कॉन्स्टेबल अशोक पाटील, युवराज पाटील, अनिल शिंदे यांनी राजारामपुरीत पाठलाग करुन शेख याला पकडले. शेख याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुरातत्त्व’चा ग्रीन सिग्नल

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुरातत्त्व विभागाच्या मान्यतेअभावी गेली तीन वर्षे रखडलेल्या पर्यायी पुलाच्या बांधकामाला केंद्रीय पुरातत्त्व सर्व्हेक्षण विभागाने सोमवारी मान्यता दिली. नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत 'पुरातत्त्व'मध्ये समाविष्ट असलेल्या ब्रह्मपुरी टेकडीपासून पर्यायी पुलाची जागा १२७ मीटर अंतरावर असल्याने बांधकामाला मान्यता देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. 'पुरातत्त्व'च्या १०० मीटर कक्षेच्या बाहेर जागा असल्याने बांधकामाला तत्काळ सुरु होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गेले काही दिवस प्रशासकीय आणि लोकप्रतिनिधींच्या पातळीवर पर्यायी पुलाच्या बांधकामासाठी वेगवान हालचाली सुरु होत्या. केंद्रीय पुरातत्त्व विभाग, राज्य महसूल विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने २९ व ३० मे रोजी ब्रह्मपुरी टेकडी व पर्यायी पुलाच्या जागेचा सर्व्हे केला. ब्रह्मपुरी टेकडीच्या तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून पर्यायी पुलाच्या मोजदाद झाली. त्यामध्ये पर्यायी पूल शंभर मीटर क्षेत्राच्या बाहेर असल्याचे सामोरे झाले. पर्यायी पूल हा पुरातत्व वास्तूच्या कक्षेत येत नसल्यामुळे बांधकामासाठी ना हरकत दाखला मिळावा, असा अहवाल सादर केला होता. त्याला केंद्रीय पुरातत्त्व विभाग व राष्ट्रीय स्मारके प्राधिकरणची मान्यता आवश्यक होती.

दरम्यान, पर्यायी पुलाच्या बांधकामासाठी कोल्हापुरात जन आंदोलन झाले. पंचगंगा नदीवरील जुन्या शिवाजी पुलाचे आयुष्यमान संपले आहे. पर्यायी पुलाचे ८० टक्के काम पूर्ण आहे. उर्वरित वीस टक्के कामाला पुरातत्त्व विभागाने मान्यता नाकारल्याने डिसेंबर २०१५ पासून पर्यायी पुलाचे काम रखडले आहे. पुरातत्त्वच्या नियमावलीचा अडसर दूर करण्यासाठी पर्यायी पुलाच्या बांधकामाला मान्यता मिळण्याबाबतचे विधेयक लोकसभेत मंजूर झाले. मात्र हे विधेयक राज्यसभेपुढे सादर न झाल्याने हा प्रयत्न मागे पडला. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन करताना जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्रीय पातळीपर्यंत पाठपुरावा केला. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते, कार्यकारी अभियंता विजय कांडगावे हेही प्रयत्नशील होते.

...........

कोल्हापूरच्या विकासामधील अडथळयाचा आणखी एक प्रश्न सोडविला. पर्यायी पुलाचे रखडलेले काम लवकरच पूर्ण होईल. नजीकच्या काळात हा मार्ग नागरिकांसाठी खुला होईल. कोल्हापूरच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील

...............

पर्यायी पुलाच्या बांधकामासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले. संसदेत आवाज उठवला. पर्यायी पुलासाठी जनमताचा रेटा आणि लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांतील समन्वयामुळे हा प्रश्न सुटला. 'पुरातत्त्व'ची मान्यता मिळाल्याने बांधकामाचा मार्ग सुकर झाला.

खासदार धनंजय महाडिक

...................

पर्यायी पुलाच्या बांधकामाला मान्यता मिळावी, यासाठी गेली दोन वर्षे अथक प्रयत्न सुरु होते. राष्ट्रीय स्मारके प्राधिकरणने अंतिम मंजुरी दिल्यामुळे उर्वरित काम सुरु होईल. आजचा दिवस कोल्हापूरसाठी आनंदाचा आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती

.................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन वार्ता

0
0

शर्मिला जाधव

कोल्हापूर

येथील सरोज ग्रुपच्या संचालिका शर्मिला दिपक जाधव (वय ४९) यांचे निधन झाले. सरोज ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक दिवंगत बापूसाहेब जाधव यांच्या त्या स्नुषा व संचालक दिपक जाधव यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता.६) सकाळी नऊ वाजता आहे.

--------

विजय दोरूगडे

कोल्हापूर

राजारामपुरी येथील विजय नारायण दोरूगडे (वय ५८) यांचे निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, जावाई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता.६) सकाळी नऊ वाजता आहे.

-----------

सुशिला शिंदे

कोल्हापूर

महाडिक वसाहतमधील सुशिला गणपतराव शिंदे (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता.६) सकाळी आहे.

----------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तरेत भाजपमुळे रंगणार राजकारण

0
0

'उत्तर' मध्ये भाजपमुळे रंगत

भाजपमध्ये भाऊगर्दी, मात्र इतर पक्षांची डोकेदुखी वाढणार

Gurubal. mali@timesgroup.com

कोल्हापूर

'उत्तर' मधील सर्वच प्रबळ उमेदवार भाजपच्या यादीत असल्याचे सांगत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वच पक्षांची डोकेदुखी वाढवली आहे. शिवाय 'कमळा'साठी वाढलेली इच्छुकांची भाऊगर्दी देखील शेवटच्या क्षणी या पक्षालाच त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात भाजप अथवा काँग्रेसचे मधुरिमाराजे की ऋतुराज पाटील याची उत्सुकता प्रचंड वाढली आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात एकेकाळी भाजपला उमेदवारच मिळत नव्हता. त्यामुळे शिवसेनेला जागा बहाल करण्याची वेळ या पक्षावर यायची. पण चार वर्षात या पक्षाच्या तिकिटावर लढण्यासाठी अनेकजण पुढे येत असल्याचे दिसत आहे. युती झाल्यास ही जागा शिवसेनेलाच जाणार आहे. कारण विद्यमान आमदार या पक्षाचा असल्याने ही जागा सेना सोडणार नाही. पण सध्या राज्यपातळीवर या दोन पक्षात जे काही रामायण सुरू आहे, ते पाहता युती हाईलच हे खात्रीने सांगण्यासारखी सध्या तरी परिस्थिती नाही. त्यामुळेच कदाचित भाजपने उत्तरेत काहींना ताकद देण्यास सुरूवात केली. शिवाय मंत्री पाटील व आमदार क्षीरसागर यांच्यातील दुरावा देखील दोन्ही पक्षातील संघर्ष वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे.

उत्तर मतदारसंघ लढण्याचा निर्णय झालाच तर भाजपची पहिली पसंती ही मधुरिमाराजे असणार आहे. त्यासाठी गेले काही महिने त्यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण त्यांचा पक्ष निश्चित होत नसल्याने प्रवेश थांबला आहे. काँग्रेसकडून त्या लढाव्यात यासाठी देखील वर्षभर त्यांना साकडे घातले जात आहे. ते शक्य नसेल तर राष्ट्रवादीचे दरवाजे देखील त्यांच्यासाठी उघडे करण्यात आले आहेत.

दिवाळीच्या दरम्यान ऋतुराज पाटील यांचा भाजप प्रवेश जवळजवळ निश्चित झाला होता. मधुरिमाराजे लवकर निर्णय घेत नसल्याच्या पार्श्वभूमीवर पाटील यांना पक्षात घेऊन उमेदवारी जाहीर करण्याचा भाजपचा प्रयत्न होता. पण काही कारणाने हा प्रवेश लांबला आणि नंतर तो थांबला. त्यानंतर पाटील यांची काँग्रेसच्या उमेदवारीसाठी जोरदार चर्चा सुरू झाली. आता पालकमंत्र्यांनी पुन्हा त्यांचे नाव घेत अजूनही चमत्कार होऊ शकतो अशी शक्यताच व्यक्त केली आहे. गेले महिनाभर मंत्री पाटील व आमदार सतेज पाटील यांच्यात उघड संघर्ष सुरू आहे, तरीही मंत्री पाटील ऋतुराजचे नाव घेतात, यावरून कुठेतरी पाणी मुरते आहे, याची कल्पना येते. महाडिक आणि पाटील गटाला पुन्हा एकत्र आणण्याचा मंत्री पाटील यांचा प्रयत्न सुरू आहे. पण एकदा हा प्रयत्न फसल्याने पुन्हा ते एकत्र येण्याची शक्यता नाही. पण राजकारणात कधीही काहीही घडू शकते, म्हणून तर कदाचित मंत्री पाटील तसे प्रयत्न करत असावेत.

महेश जाधव यांना हळूहळू भाजपमध्ये स्पर्धक वाढत आहेत. पक्षाने आदेश दिल्यास स्वत: लढण्यास तयार असल्याचे सांगत मंत्री पाटील यांनी शड्डू मारला आहे. शिवाय मधुरिमाराजे,ऋतुराज अशी प्रबळ नावे घेत भाजपकडे चांगले उमेदवार असल्याचे सांगितले जात आहे. मागीलवेळी काँग्रेसकडून लढताना ५२ हजार मते घेतलेल्या सत्यजीत कदम यांनाही भाजपने उमेदवारांच्या यादीत समाविष्ठ केले आहे. सुहास लटोरे आणि सुनील कदम यांची नावे आश्चर्यकारकरित्या पुढे करत मंत्री पाटील यांनी भाजपमध्येच चर्चेला उधाण आणले आहे. उमेदवारांची ही यादी कदाचित शेवटच्या क्षणी त्यांनाच अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.

भाजपमध्ये इच्छुकांची नावे वाढत आहेत, त्याचवेळी इतर पक्षातील उमेदवारांची संख्या कमी होत आहे. कारण मधुरिमा व ऋतुराज हे दोघेही पक्षापलिकडील प्रबळ उमेदवार आहेत. यातील कुणीही भाजपमध्ये आल्यास काँग्रेसला त्याचा फटका बसणार आहे. कारण हे दोघे सोडल्यास सध्या तरी या पक्षाकडे एकही प्रबळ उमेदवार नाही. हीच अवस्था राष्ट्रवादीची आहे. या पक्षाकडून आर.के.पोवार, अदिल फरास व राजू लाटकर हे तिघेही इच्छूक असले तरी पक्षाची शहरातील ताकद मर्यादित आहे. याची जाणीव देखील या तिघांना निश्चितच आहे. कारण यापूर्वी पक्षाने शक्तिपरीक्षा घेतली आहे. त्याचा त्यांना पुरावा मिळाला आहे.

................

चौकट

आमदार क्षीरसागर निश्चिंत

शिवसेना शहरात सध्या प्रबळ आहे. इतर कोणत्याही पक्षाचे उमेदवार ठरले नसले तरी क्षीरसागर यांची उमेदवारी पक्की आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कोण याचीच उत्सुकता अधिक आहे. मंत्री पाटील, मधुरिमाराजे व ऋतुराज यापैकी कुणीही रिंगणात उतरले तर ते क्षीरसागर यांना आव्हानात्मक ठरणार आहे. पण युती अथवा आघाडी झाली नाही तर चौरंगी लढत होईल. त्यामुळे या मतदारसंघात प्रचंड चुरस निर्माण होणार आहे. पण युती झाल्यास सध्या भाजपच्या यादीत असणाऱ्या अनेकांची मोठी अडचण होणार आहे. कदाचित ही अडचण होऊ नये म्हणूनच मधुरिमाराजे व ऋतुराज यांची पावले थांबले असतील. सध्या तरी ऋतुराज यांना काँग्रेसमध्ये मधुरिमाराजे वगळता इतर कुणी स्पर्धक नाही. या दोघांची उमेदवारी निश्चित असली तरी पक्ष ठरत नसल्यानेच उत्तरेतील उत्सुकता वाढत आहे.

.................

'उत्तर' मधील इच्छूक

भाजप.. चंद्रकांत पाटील, मधुरिमाराजे, महेश जाधव, ऋतुराज पाटील, सत्यजीत कदम, सुहास लटोरे, सुनील कदम

शिवसेना.. राजेश क्षीरसागर, संजय पवार

काँग्रेस.. मधुरिमाराजे, ऋतुराज पाटील, सचीन चव्हाण

राष्ट्रवादी.. आर.के.पोवार, राजू लाटकर,अदिल फरास

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी-

0
0

योग शिबिर: विठ्ठल तांदळे यांच्यातर्फे योगोपचार शिबिर, स्थळ: प्रभातीर्थ अपार्टमेंट, ए वॉर्ड, ताराबाई रोड, कोल्हापूर, वेळ: सकाळी व संध्याकाळी ६ ते ८ वा.

प्रबोधन रॅली: एकटी संस्था व कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे कचरा विलगीकरण उपक्रमांतर्गत प्रबोधनात्मक रॅली, स्थळ: मध्यवर्ती बसस्थानक रिक्षा स्टॅण्ड, कोल्हापूर, वेळ: सकाळी १० वा.

कार्यशाळा: जिल्हा परिषद कोल्हापूरतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कार्यशाळा, स्थळ: राजर्षी शाहू सभागृह, जिल्हा परिषद, कोल्हापूर, वेळ: सकाळी ११ वा.

सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम: महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी संघाच्यावतीने माथाडी कायदा सुवर्णमहोत्सवी समारंभ, स्थळ: शाहू मार्केट यार्ड, वेळ: दुपारी १ वा.

नेत्ररोग तपासणी शिबीर: सर्वमंगल सेवासंस्थेतर्फे विनामूल्य नेत्ररोग तपासणी शिबिर, स्थळ: ६५१, ई शाहूपुरी दुसरी गल्ली, कोल्हापूर,वेळ: दुपारी ४ वा.

एकांकिका: अभिरुची संस्थेतर्फे दोन एकांकिकाचे सादरीकरण, स्थळ: छत्रपती शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर, वेळ: सायं. ६ वा.

कीर्तन: श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे वासुदेवबुवा जोशी यांचे कीर्तन, स्थळ: श्री महालक्ष्मी मंदिर, गारेच्या गणपतीसमोर, कोल्हापूर, वेळ: सायं. ७.३० वा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमीन बेकायदेशीरपणे नावावर केल्याचा आरोप

0
0

कोल्हापूर

राधानगरी तालुक्यातील पुगांव येथे देवस्थानची दोन एकर शेतजमीन आहे. त्यापैकी ४५ गुंठ्यांची जमीन बेकायदेशीरपणे कुळाच्या नावे लावण्यात आली आहे. त्यासंबंधी तहसिलदार, मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार केला. तरीही न्याय मिळालेला नाही, अशी माहिती विनायक नकाते यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. नकाते म्हणाले, 'गावात नारायणदेव देवस्थानची दोन एकर जमीन आहे. या देवस्थानचे शिवलिंग रामचंद्र नकाते, श्रीमंती शंकर नकाते यांच्यासह आठजण ट्रस्टी आहेत. दरम्यान, गावातील एका शेतकऱ्याने नियमबाह्यपणे प्रशासनाला हाताशी धरून ४५ गुंठे देवस्थानची जमीन स्वत:च्या नावावर लावून घेतली आहे. त्यांनी ट्रस्टीना खंडही दिलेला नाही. देवस्थानच्या जागेवर सरकारकडून मंजूर घरकुल बांधण्यात आले आहे. त्या शेतकऱ्याचे नाव कमी करून नकाते या ट्रस्टींची नावे सातबारावर लावावीत, शेतीचा ताबा मिळावा, असा पत्रव्यवहार प्रशासनाकडे केला. मात्र प्रशासनाने दखल घेतलेली नाही.

------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुपरीतील बेघर संघटनेची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

0
0

हुपरीतील बेघर

संघटनेची धरणे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हुपरी येथील बेघर कुटुंबांना भूखंड मिळावा, या मागणीसाठी छत्रपती राणी इंदुमती देवी बेघर संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे धरण्यात आली. आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

संघटनेच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे , औद्योगिक हुपरी शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. शहर नागरिकांच्यादृष्टीने जमीन अपुरी पडत आहे. शहरात अनेक कामगार, भूमिहीन, मागासवर्गीय, दारिद्र्य रेषेखालील गरीब गरजू कुटुंबे बेघर आहेत. जिल्हा प्रशासनाने सरकार हक्कातील जमीन गावठाण हद्दवाढ करुन प्रत्येक कुटुंबास भूखंड द्यावा, अशी मागणी तीन वर्षापूर्वी करण्यात आली. गेली तीन वर्षे संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. सध्या ही जमीन प्रादेशिक आराखड्यात रहिवासी कारणासाठी समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे गावातील बेघर नागरिकांवर हा अन्याय आहे. गावातील पात्र बेघर कुटुंबांना ही जमीन भूखंड पाडून परत मिळावी अशी मागणी करण्यासाठी आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष विद्याधर कांबळे, सचिव दिलीप शिंगाडे, खजिनदार उदय कोराणे, हिरालाल कांबळे, दिनकर कांबळे, रविंद्र कांबळे कविता साळुखे, कल्पना लोहार, वैशाली कंगणे आदी सहभागी झाले .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खासगी सावकारांच्याविरोधात मोक्का लावू

0
0

नांगरे पाटील यांचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खासगी सावकारांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्यांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) लावण्याचा इशारा विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील दिला . परिक्षेत्रातील सर्व पोलिस ठाण्यांना गेल्या सहा महिन्यातील खासगी सावकारांच्याविरोधातील तक्रारीची माहिती घेण्याचे आदेश नांगरे पाटील यांनी दिले .

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'कोल्हापूर परिक्षेत्रात खासगी सावकारकीचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. गेल्या सहा महिन्यात खासगी सावकारांच्यावर कारवाया करण्यात आल्या आहेत. पण खासगी सावकरांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या होत असल्याच्या घटना घडल्याने खासगी सावकारांच्यावरील बडगा उगारण्याची गरज आहे. खासगी सावकारांना सळो की पळो करुन सोडण्यात येईल.'

नांगरे पाटील पुढे म्हणाले,' खासगी सावकारांवर पोलिस कारवाई करत आहेत. पण तक्रारदार पुढे येत नसल्याने पोलिसांना कारवाई करताना अडचणी येतात. पण गेल्या सहा महिन्यात पोलिसांकडून खासगी सावकारांच्यावर कारवाई होत असल्याने अनेक तक्रारदार खासगी सावकारांच्याविरोधात तक्रारी देण्यास पुढे येत आहेत. काही वेळा स्वत: पोलिस फिर्यादी होत आहे. तरीही खासगी सावकारकीचा जाच संपलेला नाही. कठोर कारवाई करण्यासाठी कायद्यातील सर्व नियमांचा अवलंब केला जाईल. खासगी सावकारकीची मोठी यंत्रणा असते. व्याज वसुलीसाठी मोठी यंत्रणा राबवली जाते. त्याची माहिती घेऊन संघटित गुन्हा कायदाअंतर्गत मोक्का कारवाई केली जाईल.' नागरिकांनी सावकारांच्याविरोधात निर्भयपणे तक्रारी कराव्यात असे आवाहनही त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरला पावसाने झोडपले

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरास जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास एक तास जोरदार पावसाने झोडपून काढले. यामुळे उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. विजेच्या गडगडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी तुंबल्याचे दिसत होते. मॉन्सूनपूर्व पावसामुळे भात पेरणीला वेग येणार आहे.

कुडित्रे

करवीर तालुक्यात सायंकाळी चार वाजल्यानंतर ढग दाटून येऊ लागले. पाच वाजण्याच्या सुमारास संततधार पावसास सुरुवात झाली. समाधानकारक पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. करवीरच्या पश्चिम भागातील डोंगराळ भागात भात पेरणीची कामे बहुतांशी पूर्ण झाली आहेत. त्यामुळे शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत होते.


गडहिंग्लज

गडहिंग्लज शहर वगळता परिसरात सोमवारी पावसाने दमदार हजेरी लावली. गडहिंग्लज शहरात अपेक्षित पाऊस झाला नसला तरीही अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. तर शेंद्री, हनिमनाळ, हडलगे, बड्याचीवाडी, औरनाळ गावांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली.

राधानगरी

राधानगरी तालुक्यात सोमवारी सायंकाळी पावसाने सुरवात केली. तासभर पडलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. या पावसामुळे रोहिणी नक्षत्रातील पेरणी केलेल्या भात पिकाची उगवण होण्यास अनुकुलता मिळणार आहे.परंतु पेरणीसाठी तयार केलेल्या शेती वाफ्यात पाणी साचल्याने अनेक शेतकऱ्यांची भात पेरणीची उर्वरित कामे लांबली आहेत. पठारी भागात शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. काही ठिकाणी पेरणीच्या मशागतीच्या कामाला फायदा होणार आहे.


चंदगड

शहरासह परिसरात सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. सकाळी वातावरण ढगाळ होते. त्यामुळे हवेत उष्मा जाणवत होता. सकाळी अकरानंतर मात्र रिपरिप पावसाने रिघ धरली होती. दिवसभर हा पाऊस पडत होता. कधी जास्त तर कधी कमी अशा प्रमाणात दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच होती. चंदगड तालुक्यात गेले काही दिवस सुरु असलेल्या वळीव पावसामुळे तालुक्याच्या कर्यात भागात धुळवाफ पेरणीच्या कामांना गती आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपुते सेट उत्तीर्ण

0
0

कोल्हापूर: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठतर्फे घेण्यात आलेल्या सेट (राज्य पात्रता परीक्षा) परीक्षेत रवींद्र मारुती सातपुते इंग्रजी विषयातून उत्तीर्ण झाले. त्यांना प्रा. डॉ. चंद्रकांत लंगरे यांच्यासह इंग्रजी विभागप्रमुख आणि प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाक कर्मचाऱ्यांचे आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'इंन्किलाब जिंदाबाद, मोदी सरकार हायहाय, आयोग आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, पीजी नंदा हायहाय अशा घोषणा देत अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना, कोल्हापूर व नॅशनल युनियन ग्रामीण डाक सेवक शाखेच्यावतीने विविध मागण्यांसाठी रेल्वेस्थानकावर निदर्शने करण्यात आली. यावेळी स्टेशन प्रबंधक विजय कुमार यांना संघटनेच्यावतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सरकारने मागण्याबाबत विचार न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला.

ग्रामीण डाक सेवकांनी २१ मेपासून बेमुदत संप जाहीर केला आहे. सेवकांच्या मागण्यांबाबत सरकारने गांभीर्याने लक्ष न दिल्याने रेल्वेस्थानकावर तीव्र निदर्शने करण्यात आली. ग्रामीण डाक सेवकांना तत्काळ सातवा वेतन आयोग लागू करावा, कर्मचाऱ्याना पेन्शन मिळावी तसेच कमलेश चंद्र कमिटीचा अहवाल व शिफारसीना सरकारने मान्यता द्यावी, विभागीय कर्मचाऱ्याना ज्या सोयीसुविधा मिळतात त्या ग्रामीण डाक सेवकांना लागू कराव्यात, सेवेत कायम करावे, कामाची वेळ आठ तास करावी, अशा मागण्या यावेळी संघटनेच्यावतीने करण्यात आल्या. सरकारने मागण्याबाबत विचार करण्यासाठी एक महिन्याचा अवधी मागितला असून मागण्या मान्य करू असे लेखी देण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली.

यावेळी बेडी कलगौडा, चंद्रकांत बुडके, योगेश जाधव, एकनाथ पाडळकर, आनंदराव पाटील, एस.जी. काळूगडे, सूर्याजी रावण, दिगंबर सावंत, दादासाहेब खोत, एन. डी. नावलेकर आदी सहभागी झाले होते.

सर्वसामन्यांचे हाल

जिल्ह्यातील ग्रामीण भागात पोस्टाच्या माध्यमातून अनेक सुविधा पुरवल्या जातात. यामध्ये मनीऑर्डर, आरसीबुक पोहच सुविधा, नोकरी निवड पत्रे, विविध पार्सल, पासपोर्ट कागदपत्रे, शेतकऱ्यांची औषधे, विमासुविधा यांचा समावेश होतो. जिल्ह्यात ग्रामीण डाक सेवकांची संख्या ११०० असून त्यांनी केलेल्या बेमुदत संपामुळे सर्व सेवा ठप्प झाल्या आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना विविध समस्येला सामोरे जावे लागत आहे. सरकारने याबाबत तत्काळ निर्णय घेत संप मिटवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

फोटो-अर्जुन टाकळकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदुषणमुक्तीसाठी शिरढोणमध्ये उपोषण

0
0

फोटो

..........

पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी शिरढोणमध्ये उपोषण

प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कठोर कारवाईची मागणी

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करावी, पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना राबवावी या मागणीसाठी शिरढोण (ता.शिरोळ) येथे उपोषण करण्यात आले. नदी प्रदुषणाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पंचगंगा प्रदूषणमुक्त संघर्ष समितीतर्फे गळ्यात जलपर्णी घालून ग्रामपंचायतीसमोर ठिय्या मारण्यात आला. तसेच एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

कोल्हापूर व इचलकरंजी या दोन मोठ्या शहरातील सांडपाणी, उद्योगधंद्यातील रसायनयुक्त पाणी, जयंती नाल्यातील थेट मैला, काळ्या ओढ्यातील पाणी यामुळे पंचगंगा देशातील दुसऱ्या क्रमांकाची प्रदूषित नदी बनली आहे. या नदीच्या प्रदूषणामुळे नदीकाठच्या गावांना रोगराईला तोंड द्यावे लागत आहे. मासे मृत होत आहेत. जमिनी नापीक होण्याचा धोका आहे.

पंचगंगा नदीकाठावर राहणाऱ्या लोकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळण्याचा अधिकार आहे. कोल्हापूर व इचलकरंजी यांना पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी मिळालेल्या सरकारी निधीची चौकशी व्हावी व दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी, इचलकरंजीने पंचगंगा नदीचे प्रदूषण थांबविल्याशिवाय कोणत्याही पाणी योजनेस मंजुरी देऊ नये, अशा मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या.

आंदोलकांनी अंगावरचे कपडे काढून गळ्यात जलपर्णी अडकवून पंचगंगा प्रदूषण करणाऱ्या घटकांविरोधात व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत अनोखे आंदोलन केले. शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी जि.प.सदस्य सावकर मादनाईक यांनी आंदोलकांची भेट घेतली. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांच्यासह प्रा. चंद्रकांत मोरे, विश्‍वास बालिघाटे, अविनाश पाटील, मधुकर सासणे, शिवानंद कोरबू, विलास चौगुले, चंद्रकांत माणगावे, सरपंच बिलकश मुजावर, गजानन सासणे, आरपीआयचे सतीश भंडारे, सय्यद मुजावर, राजेखान नदाफ, रावसाहेब बिरोजे, दस्तगीर बाणदार, विजय मगदूम, अविनाश शंभूशेट्टी, सचिन यादव, दादू चौगुले, डॉ. कुमार पाटील, कल्लाप्पा शिवमूर्ती, रूपचंद शिंदे, शुभम गुरवाण, समीर बाणदार यांच्यासह ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले .

..........................

फोटो ओळ- पंचगंगा प्रदुषणमुक्तीसाठी गळ्यात जलपर्णी अडकवून उपोषण करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारची चार वर्षे

0
0

पायाभूत सुविधा

फोटो आहेत.

विकासाचा रस्ता खाचखळग्यांचाच

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : केंद्र सरकारकडून शहर आणि जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी चार वर्षांत भरीव निधीच आलेला नाही. नियमित येणाऱ्या निधीतील कामेही टक्केवारी प्रवृत्तीमुळे निकृष्ट दर्जाची झाल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील शाळा, रस्ते, गटर्स, आरोग्य सुविधा, पिण्याचे शुद्ध पाणी अशा मूलभूत सुविधांच्या पातळीवर अपेक्षाभंगच झाल्याच्या प्रतिक्रिया सर्वच घटकांतून ऐकायला मिळतात.

सत्तेवर येताना मोदी सरकारने विकासाची सुंदर स्वप्ने दाखवली. परिणामी सर्वांच्याच अपेक्षा उंचावल्या. चार वर्षे झाल्यानंतर नेमका कुणाचा विकास झाला, शहर, ग्रामीण भागात मूलभूत सुविधा मिळाल्या काय, त्याची विरोधी पक्ष आणि अभ्यासकही चिकित्सा करू लागले आहेत. मोदींनी प्रत्येकांच्या खात्यावर १५ लाख रूपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. ते प्रत्यक्षात उतरलेच नाही. दर्जेदार मूलभूत सुविधाही पुरवल्या नाहीत, अशा सार्वत्रिक प्रतिक्रिया आहेत. पायाभूत सुविधांबाबत जितके महत्त्व रस्त्यांचे आहे तितकेच रेल्वे, हवाई वाहतुकीला आहे. त्यामधील हवाई वाहतुकीला म्हणजे विमान सेवा सुरू करण्याला चार वर्षाच्या पाठपुराव्यानंतर यश आले आहे. विमानतळाच्या विस्तारीकरण रेंगाळले आहे. रेल्वेच्या फेऱ्या वाढवणे, स्टेशनवर प्रवाशांना स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे नाहीत. घोषणा होऊनही शहरातील उड्डाण पूल झालेली नाहीत. शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची वाईट अवस्था आहे. महिलांसाठी पुरेशा प्रमाणात स्वतंत्र स्वच्छतागृहे नाहीत.

महापालिकेच्या आणि ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांत पायाभूत सुविधांची वानवा आहे. विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणीही मिळत नाही. शाळांत खेळण्यासाठी मैदाने नाहीत. स्वच्छतागृहांची, शाळा इमारतींची पडझड झाली आहे. सातारा ते कागल राष्ट्रीय महामार्गासाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र अद्याप दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सर्व वाड्या, वस्त्यांना जोडणारे रस्ते खड्डेमय आहेत. राधानगरी, शाहूवाडी, चंदगड, आजरा या डोंगराळ तालुक्यातील काही वाड्यांपर्यंत एकदाही रस्ते केलेले नाहीत.

-----------------------------

प्रतिक्रिया

मोदी सरकार चार वर्षांत सर्वच पातळीवर अपयशी ठरले. पायाभूत सुविधांच्या विकासासंबंधी सर्वाच्याच अपेक्षाभंग झाल्या आहेत. निवडणुकीत दिलेल्या जाहिरनाम्यातील आश्वासनाची पूर्तता केली नाही. उलट महागाई वाढली आहे. केवळ घोषणाबाजीवर भर आहे. शहरातील ड्रनेज, रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्यांच्या सुविधांची वाट लागली आहे. या सरकारने चार वर्षांत 'खोटे बोल पण, रेटून बोल,' अशीच कामगिरी केली आहे.

श्रीकांत कदम, निवृत्त कर्मचारी

-------

शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. केलेल्या रस्त्यांवरही वर्षभराच्या आत खड्डे पडले आहेत. शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात वीज नाही. केवळ रात्रीच वीज पुरवठा केला जातो. अनेक ठिकाणी खांब नादुरूस्त आहेत. जोरदार वाऱ्यांनी वीजभारीत तारा कोसळत आहेत. कन्यागत महापर्व कार्यक्रमानिमित्त आलेल्या निधींचा विनियोग चांगला झाला नाही. नृसिंहवाडी वगळता इतर ठिकाणी या निधीतून पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या नाहीत.

रावसाहेब चौगुले, शेतकरी

---------------

दर्जेदार सेवा, सुविधांपेक्षा जाहिरातबाजी, घोषणाबाजीवर सरकारचा अधिक भर राहिला. कोल्हापूर शहरातील उपनगर आणि तालुका, गावांतील रस्त्यांची वाईट अवस्था आहे. सर्व वार्डात, गावांत शुध्द पाणी पुरवठा होत नाही. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. नद्यांचे प्रचंड प्रदूषण होत आहे. प्रदूषण रोखण्यासाठी सरकारचा निधी मिळालेला नाही. सरकार सत्तेवर आल्यापासून सिंचनाचे क्षेत्र वाढीसाठी विशेष प्रयत्न केलेले नाही.

विजय पाटील, निवृत्त कर्मचारी

---------------

शेती, उद्योग आदी क्षेत्रात चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्या नाहीत. सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारने चार वर्षात विशेष निधी दिला नाही. खेड्यांमध्ये वीजपुरवठा सुरळीत होत नाही. थ्री फेज वीज रात्रीच्या वेळीच दिले जाते. परिणामी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्री जावे लागते. शेतीचे उत्पादनही वाढलेले नाही. उत्पादनाला चांगला भावही मिळालेला नाही. यामुळे सरकारने चार वर्षांत केवळ विकासाचे गाजर दाखवण्याचे काम केले आहे.

बापू पाटील, सामाजिक कार्यकर्ते

-----------------------

अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास रखडला

महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकासह देशभरातून हजारो भाविक रोज अंबाबाई मंदिरात येतात. त्यांना चांगल्या पायाभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांसाठी ८० कोटी मंजूर झाले आहेत. मात्र प्रत्यक्षात कामांना सुरूवात झालेली नाही. यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रचंड गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. मंदिर परिसरात महिला, पुरूषांसाठी सुसज्ज स्वच्छतागृहे नाहीत. यावरून मूलभूत सुविधांचा कसा फज्जा उडला आहे, हे स्पष्ट होते.

-----------

११०० कोटींची घोषणा हवेतच

सर्किट बेंचबाबत एप्रिल २०१७ रोजी बैठक झाली होती. त्या बैठकीत सर्किट बेंचसाठी सरकार पायाभूत सुविधांवर चर्चा झाली होती. त्यावेळी सरकारने खंडपीठासाठी ११०० कोटींची तरतूद करू, असे आश्वासन दिले होते. जिल्हा न्यायालयाच्या जुनी इमारतीसाठी चार ते पाच कोटींची मागणी केली होती. प्रत्यक्षात निधी मिळाला नाही. कोटींच्या घोषणा हवेत राहिल्या. कन्यागत महापर्व कार्यक्रमानिमित्त वर्षापूर्वी सरकारने सुमारे ६२ कोटी दिले. या निधीतून नृसिंहवाडीसह शिरोळ तालुक्यात मूलभूत सुविधा निर्माण करणे अपेक्षीत होते. मात्र प्रत्यक्षात दर्जेदार विकासांची कामे झाली नाहीत. परिणामी भाविकांना सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. मंदिर परिसरातील सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्याने कृष्णा नदीचे पाणी दूषीत होत आहे.

-----------

प्रशासनाचे निधीसंबंधी दावे

थेट पाइपलाइन योजना : १९२

कोल्हापूर शहर नळपाणी पुरवठा योजना : ११४ कोटी

शहर मलनि:सारण योजना : ७० कोटी ७० लाख

सर्व शिक्षा अभियान : ३१० कोटी

राष्ट्रीय आरोग्य अभियान : १९ कोटी ८१ लाख

कोल्हापूर शहर स्वच्छता अभियान : १ कोटी ३८ लाख

इचलकरंजी शहर पाणी पुरवठा : ७० कोटी

प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना : १२० कोटी

रस्ते विकास व मजबूतीकरण : ३७ कोटी

मूलभूत सुविधांसाठी रूसाकडून शिवाजी विद्यापीठास : दीड कोटी

सातारा ते कागल राष्ट्रीय महामार्ग : २५५०

------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर.के. नगर परिसरात महिलेची सोन्याची चेन लंपास

0
0

वृद्धेची सोन्याची

चेन लंपास

कोल्हापूर

आर.के.नगर परिसरात चालत जात असताना मोटार सायकलवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी वृद्धेची सोन्याची चेन हिसडा मारुन पळवून नेली. रविवारी (ता.३) सायंकाळी ही घटना घडली. अलका शिवानंद उत्तुरे (वय ६३, रा. सोसायटी नं १. आर.के.नगर, मोरेवाडी) यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उत्तुरे या रविवारी सायंकाळी फिरण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. त्या हेमलता टेंबुर्ले यांच्या बंगल्याजवळून चालत जात असताना त्यांच्या पाठीमागून मोटारसायकल आली. मोटारसायकलवरील पाठीमागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारुन तोडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मारामारीत एक जखमी

0
0

मारामारीप्रकरणी

दोघांवर गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सदर बाजार येथील शाहू कॉलेजसमोरील चोपडे गल्लीत लहान मुलांच्या भांडणावरुन झालेल्या मारामारीत सचिन मसाजी कोकणे ( वय ४२) हे गंभीर जखमी झाले. बबन उर्फ अभिजित राजू चव्हाण व योगेश राजू चव्हाण (रा दोघे. चोपडे गल्ली सदर बाजार) या संशयितांविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

रविवारी (ता.३) दुपारी चोपडे गल्ली येथील सचिन कोकणे यांच्या लहान मुलाचे शेजारी राहणाऱ्या चव्हाण यांच्या मुलाशी भांडण झाले. यावेळी जाब विचारायला गेलेल्या सचिन यांना बबन चव्हाण व योगेश चव्हाण यांनी डोक्यात काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने ते जखमी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीच तोळे वजनाची सोन्याची चेन चोरीस

0
0

अडीच तोळ्याची

मोहनमाळ चोरीस

कोल्हापूर

रंकाळा अंबाई टँक परिसरातून चोरट्याने अडीच तोळे वजनाची मोहनमाळ चोरुन नेली. उमा बबन भोसले (वय ६४, करवीर निवासिनी अंबाई टँक परिसर) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे. ३० मे रोजी भोसले घराशेजारी बागेत फुले तोडण्यासाठी गेल्या असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. स्वयंपाकघरातील भांड्याच्या रॅकमधील स्टीलच्या डब्यातील अडीच तोळे वजनाची मोहनमाळ चोरुन नेल्याची फिर्याद दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टूर्स कंपनीच्या तिघांना अटक

0
0

प्रवाशांची अडीच लाखाची फसवणूक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सिमला कुलू मनाली सहलीसाठी अंदाजे अडीच लाख रुपये शुल्क आकारुनही सहलीला न पाठवता रक्कम हडप करणाऱ्या टूर्स कंपनीच्या मालक व कर्मचाऱ्याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी सौरभ सिंग (वय २७, रा. शिवरंजनी कॉम्प्लेक्स, वडगाव शेरी, पुणे), राकेश शर्मा (४०, रा. पुणे), अविषेक सिंग (३५, रा. पुणे) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला असून मालक सौरभ सिंग, अविषेक सिंग या दोघांना अटक केली आहे. आनंद दादासाहेब पाटील (४५, रा. पुण्यपर्व अपार्टमेंट, भोसलेवाडी) यांनी फिर्याद दिली होती.

दाभोळकर कॉर्नर येथील अमात्य टॉवर्सच्या तिसऱ्या मजल्यावर लेजर इंटरनॅशनल या कंपनीच्यावतीने सिमला कुलू मनाली सहलीसाठी बुकींग केले जात होते. बांधकाम व्यावसायिक आनंद पाटील यांनी कुटुंबातील पाच सदस्यांसह सिमला कुलू मनाली या सहलीसाठी दोन लाख ३८ हजार रुपये भरले होते. पण सहलीला न पाठवता तिघा संशयितांनी पैसे हडप केले. तिघांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक रणजित पाटील या गुन्ह्याचा तपास करत असून त्यांनी दोघा संशयितांना अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांग व्यक्तीला मारहाण

0
0

दिव्यांगाला लुबाडून मारहाण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाद्वार रोडवरील वांगी बोळ यथील दूध शॉपी बंद करुन घरी जाणाऱ्या दिव्यांग प्रसाद जयवंत चौगले (वय ३०, रा. वांगी बोळ) याला दोघा मद्यपींनी बेदम मारहाण करुन त्याच्याकडील साडेपाच हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. रविवारी (ता. ३) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जुना राजवाडा पोलीसांनी संशयित अनिकेत चव्हाण, सतिश चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

प्रसाद चौगले याचे वांगी बोळ येथे लक्ष्मी दूधशॉपी आहे. रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दूध डेअरी बंद करुन घरी जात असताना मद्य प्राशन केलेल्या अनिकेत चव्हाण व सतिश चव्हाण यांनी प्रसादला आडवले. त्याला शिवीगाळी करीत बेदम मारहाण केली. दिवसभर दूध विक्रीतून जमा झालेले साडेपाच हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. अचानक मारहाण झालेने प्रसाद बिथरुन गेला. वांगी बोळात तो घरी परतला असता अनिकेत चव्हाण व सतीश चव्हाण हे दोघे त्याच्या मागोमाग आले. त्यांनी प्रसादच्या आईवडीलांनाही शिविगाळ केली. प्रसादने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सनातन संस्थेवर बंदी घाला

0
0

फोटो आहे.

भाकप, डाव्या पक्षांतर्फे बिंदू चौकात निदर्शने

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकरांनंतर आता कर्नाटकातील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणात सनातन संस्थेच्या साधकांचा सामावेश असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सनातन संस्थेवर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षासह लोकशाहीवादी, पुरोगामी, डाव्या पक्षातर्फे सोमवारी करण्यात आली. त्यांनी बिंदू चौकात जोरदार निदर्शने करीत सरकारचे लक्ष वेधले.

यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे म्हणाले, 'कॉम्रेड पानसरे यांच्या खुनामध्ये समीर गायकवाड तसेच डॉक्टर दाभोलकरांच्या खुनांमध्ये डॉ वीरेंद्र तावडे हे सनातनचे साधक सापडले आहेत. यापूर्वीदेखील सनातनचे साधक वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सापडले आहेत. त्यामुळे सनातन संस्थेवर सरकारने त्वरित बंदी घालावी.'

कॉम्रेड पानसरे यांचे सर्व खुनी पकडण्यात अपयश आल्याबद्दल शंकर काटाळे यांनी सरकारचा धिक्कार केला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सीमा पाटील यांनी सरकारने मारेकऱ्यांना पकडले नाही तर मोठा उठाव केला जाईल, असा इशारा दिला. यावेळी कॉम्रेड गोविंद पानसरे अमर रहे, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर अमर रहे, सनातन संस्थेवर त्वरित बंदी घातलीच पाहिजे, मारेकऱ्यांना पाठिशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, जातीयवादी सरकार चले जाव अशा आशयाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी रघुनाथ कांबळे, नामदेव गावडे, गिरीश फोंडे, सुनीता अमृतसागर, बी. एल बर्गे, प्रशांत आंबी, दिलदार मुजावर, बाबुराव कदम, गीता हसूरकर आदी कार्यकर्ते सहभागी झाले .

-----------------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images