Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जीएसटी परतावा तत्काळ देऊ

$
0
0

केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांचे आश्वासन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जीएसटी परतावे तत्काळ देण्यासाठी महाराष्ट्रात विशेष शिबिरांचे आयोजन केले जाईल. या माध्यमातून परतावे तत्काळ देण्याची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन अर्थमंत्री पियुष गोयल यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाला दिले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या शिष्टमंडळाने उपाध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली गोयल यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.

जीएसटी कायद्यामधील परताव्या संबंधी व्यापार उद्योग क्षेत्रातील वेगवेगळ्या घटकांच्या तक्रारी येत आहेत. उद्योग क्षेत्रांमध्ये इंजिनीअरिंग ,फाउंड्री, ऑटो स्पेअर पार्टस, वस्त्रोद्योग या क्षेत्रातील उत्पादक व निर्यातदारांना मोठ्या प्रमाणात कराची रक्कम सुरुवातीच्या टप्प्यात जमा करावी लागते. त्याचा परतावा वेळेवर न मिळाल्याने अडचणी निर्माण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी बैठक झाली. या वेळी उपाध्यक्ष ललित गांधी यांनी जीएसटी मधील वेगवेगळ्या अडचणी मांडल्या. छोट्या व्यापाऱ्यांना भराव्या लागणाऱ्या रिटर्न्स ची संख्या कमी करावी. ई वे बिल मधील तरतूदी सोप्या कराव्यात, आदी मागण्या मांडल्या. गोयल म्हणाले, 'जीएसटी मधील व्यापार उद्योग क्षेत्राला जाणविणाऱ्या अडचणी सोडविणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. परताव्या संदर्भात संबधित अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. भविष्यात चेंबर ऑफ कॉमर्स सोबत संवाद साधून जीएसटी मधून अडचणी दूर केल्या जातील. यावेळी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडचे राष्ट्रीय सचिव प्रवीण खंडेलवाल दिल्ली प्रदेश अध्यक्ष सतीश गर्ग आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अहिल्यादेवी जयंतीनिमित्त मिरवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भंडाऱ्याची उधळण, पिवळे झेंडे, डोक्यावर फेटे आणि टोप्या, कडाडणारी हलगी आणि धनगरी ढोलाच्या निनादात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९३ व्या जयंतीनिमित्त रविवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते दसरा चौक येथे मिरवणुकीचे उद्घाटन झाले. यावेळी पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे, माजी मंत्री विनय कोरे, माजी आमदार राजीव आवळे, मल्हार सेनेचे बबनराव रानगे उपस्थित होते. मल्हार सेना महाराष्ट्र राज्यच्यावतीने या भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

मिरवणूक दसरा चौकातून बिंदू चौक, छत्रपती शिवाजी पुतळा मार्गे पुन्हा दसरा चौकात विसर्जित करण्यात आली.

मिरवणुकीत जिल्ह्यातून कार्यकर्ते सहभागी झाले होते. सोहळ्यातील प्रमुख आकर्षण असलेल्या भव्य रथात अहिल्यादेवींच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. यावेळी गजनृत्याचा आविष्कार उपस्थितांना पाहायला मिळायला. धनगरी ढोल, खोडा आणि जोडीला लेझीम अशा नादमयी वाद्यांमुळे मिरवणुकीत रंगत भरली गेली. यावेळी धनगर

अश्वनृत्य आकर्षण

धनगरी ढोलाच्या ठोक्यावर घोड्याने केलेले नृत्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. भंडाऱ्याच्या उधळणीत तालबद्ध पारंपरिक पद्धतीने तरुणही नृत्यात सहभागी झाले होते. ढोलपथकात जिल्हाभरातून ढोलताशा पथकाचे कार्यकर्ते शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवरी मुलीची बॅग चोरणारा अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लिशां हॉटेल चौकातील महालक्ष्मी हॉलमध्ये वधूची बॅग लंपास केल्याप्रकरणी शाहुपूरी पोलिसांनी संतोष नारायण जाधव (वय २९ रा. नेर्ली, ता. करवीर) याला अटक केली. सीसीटीव्ही फुटेजद्वारे ही चोरी उघडकीस आली असून रविवारी महालक्ष्मी हॉल परिसरातच या चोरट्याला पकडण्यात आले.

महालक्ष्मी हॉलमध्ये २२ मे रोजी साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना संतोष जाधवने वधू कक्षात जाऊन वधूची बॅग लंपास केले होती. त्यामध्ये नेकलेस, झुबे, रोख १५ हजार रुपये असा एकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल होता. त्या प्रकरणी रंजना गणपती पाटील (रा. म्हाकवे ता. कागल) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दिली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी हॉलमधील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यामध्ये जाधव हा बॅग घेऊन जात असल्याच दिसले. या हॉलच्या व्यवस्थापकाला रविवारी जाधव हा महालक्ष्मी हॉल परिसरात फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ शाहूपुरी पोलिसांनी दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. परिसरात पोलिसांना पाहताच जाधवने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला पकडून ताब्यात घेण्यात आले. त्याने महालक्ष्मी हॉलमधून बॅग चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्याने चोरीचे दोन गुन्हे कबुल केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्री चंद्रकांत पाटील मेळावा...पान तीनसाठी

$
0
0

फोटो

..................

पक्षाने आदेश दिल्यास 'उत्तर' च्या मैदानात

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधानसभा लढविण्याचे संकेत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'निवडणुका लढविण्याचा माझा स्वभाव नाही. गाजावाजा न करता लोकहिताची कामे, पक्षाचे संघटन मी करत असतो. मी नेहमी कोऱ्या पाकीटाच्या भूमिकेत असतो. या पाकिटाला कुठे जायचं हे ठरविता येत नाही. मालकच पत्ता ठरवितो. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक भाजप पूर्ण ताकदीनिशी लढविणार आहे.पक्षाने आदेश दिला तर मी 'उत्तर'मधून लढण्यास तयार आहे, ' अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात पालकमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्याची रणनिती सांगितली. उत्तर प्रदेश, कर्नाटकातील निकालाचे संदर्भ देत ते म्हणाले, 'बूथ कार्यकर्तेच निवडणुकीत चमत्कार घडवू शकतात. निवडणुकीच्या विजयात बूथ रचना आणि कार्यकर्त्यांचा वाटा मोठा आहे. एका विधानसभा मतदारसंघात ३०० बूथ असतात. एका बूथवर साधारणपणे एक हजार मतदारांचा समावेश असतो. वाढदिवस, मुलांच्या परीक्षेचा निकालाप्रसंगी कुटुंबीयांना भेटून गुलाबाचे फूल व शुभेच्छा द्या. एका बूथ कार्यकर्त्याने वीस कुटुंबांना भेट देऊन भाजपला मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे. प्रभागनिहाय कार्यक्रमांचे आयोजन करुन नागरिकांना भाजप सरकारची कामगिरी पटवून सांगा.'

आमदार सुरेश हाळवणकर यांनी भाजप सरकारच्या गेल्या चार वर्षातील विकासकामांचा आढावा घेतला. महानगर अध्यक्ष संदीप देसाई यांनी स्वागत केले. यावेळी गोकुळचे संचालक बाबा देसाई, अॅड. संपतराव पवार, भाजपचे गटनेते विजय सुर्यवंशी, स्थायी सभापती आशिष ढवळे, जयश्री जाधव, सविता भालकर, उमा इंगळे, किरण नकाते, माजी नगरसेवक आर.डी.पाटील, राहुल चिकोडे, अशोक देसाई, ताराराणी आघाडीचे राजसिंह शेळके, शेखर कुसाळे, पूजा नाईकनवरे आदी उपस्थित होते.

..................

ब्रँच नाही तर रिझर्व्ह बँकच

फ्लॉवर फेस्टीव्हल, नवदुर्गा दर्शन, आडवाटेवरील कोल्हापूर अशा विविध उपक्रमांचे दाखले देत लोकांसाठी काम करत राहण्याचा सल्ला पालकमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिला. निधी वाटपावरुन विरोधकांनी पालकमंत्र्यांना उद्देशून रिझर्व्ह बँकेची ब्रँच असल्याची टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना पालकमंत्री म्हणाले, 'होय माझ्याकडे रिझर्व्ह बँकेची ब्रँच नाही तर रिझर्व्ह बँकच आहे. शहर व जिल्ह्यातील विकासकामांना आणि सामाजिक उपक्रमांना निधी कमी पडू देणार नाही.'

....................

मिरवणूक काढू म्हणणाऱ्यांची तोंडे बंद

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला. पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या विकासकामांसाठी चार हजार कोटी रुपयांचा निधी आणला. यामुळे ५०० कोटी आणल्यास हत्तीवरुन मिरवणूक काढतो म्हणणाऱ्यांची तोंडे आता बंद झाली आहेत, असा टोला जाधव यांनी लगावला.

.........................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्षभराच्या कॉल डिटेल्सची चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

क्रेडिट कार्ड प्रकरणी रत्नाकर बँकेचे खातेदार आणि बँकेच्या वसुली महिला अधिकारी यांच्यात मोबाइलवर झालेल्या संभाषणाच्या वर्षभराच्या कॉल डिटेल्सची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. खातेदाराला शिविगाळ केलेल्या दोघी महिलांना चौकशीसाठी नोटिस पाठविली असून सोमवारी (ता. ४) बँकेचे राजारामपुरी शाखेतील कर्मचारी पृथ्वीराज देसाई यांना जबाबाला बोलाविले आहे.

जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रेडीट कार्डची थकीत रक्कम भरण्यासाठी आई आणि बायकोला विकण्याचा संतापजनक सल्ला देणाऱ्या रत्नाकर बँकेच्या महिला अधिकाऱ्यांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. बँक प्रशासनाने सुप्रिया पाठक आणि शीतल (दोघी रा. मुंबई) या दोन्ही महिलांची चौकशी सुरू केली. रत्नाकर बँकेचे खातेदार श्रेयस संजय पोतदार (वय ३२, रा. बेलबाग, मंगळवार पेठ, कोल्हापूर) यांनी क्रेडीट कार्डवर वापरलेली १ लाख २२ हजार रुपयांची थकीत रक्कम तातडीने भरावी, यासाठी बँकेच्या रिकव्हरी विभागातून तगादा सुरू होता. २४ एप्रिल ते २७ एप्रिल दरम्यान मुंबईतील रिकव्हरी शाखेतून सुप्रिया पाठक आणि शीतल या दोन महिला अधिकाऱ्यांनी पोतदारसह त्यांच्या नातेवाईकांना फोन करून थकीत रक्कम भरण्यास सांगितले. या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. रिकव्हरी विभागातून पोतदार यांना आलेल्या संभाषणाच्या प्रत्येक कॉलची चौकशी सुरू केली आहे. 'काहीही कर, पण आमच्या बँकेचे पैसे भर. पैसे भरायची ऐपत नाही, तर क्रेडीट कार्ड घेतले कशाला. आई आणि बायकोला विक, पण पैसे भर. नाहीतर तुझ्या बायकोला मुंबईत आमच्या ऑफिसला पाठव,' यासह अश्लील भाषेत दमदाटी करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांचे मोबाइल रेकॉर्डिंग सोशल मीडियात व्हायरल झाले होते. फिर्यादीची पत्नी दुर्गा पोतदार, मित्र मंथन गवळी यांचे पोलिसांनी रविवारी जबाब घेतले. क्रेडिट कार्डवर वर्षभरात केलेल्या खरेदीचा तपशील घेतला आहे. चौकशीला हजर न राहिल्यास मुंबईत जाऊन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी-

$
0
0

व्याख्यान: कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांचे व्याख्यान, विषय: राष्ट्रीय अर्थव्यवस्था-सद्यस्थिती व परिणाम, स्थळ: केशवराव भोसले नाट्यगृह, वेळ: सायं. ५ वा.

कीर्तन: सिद्धिविनायक सांस्कृतिक सेवा मंडळाच्यावतीने कीर्तन, स्थळ: श्री महालक्ष्मी मंदिर गारेच्या गणपतीसमोर,कोल्हापूर, वेळ: सायं. ७.३० वा.

योगोपचार शिबिर: विठ्ठल तांदळे यांच्यावतीने योगोपचार शिबिर, स्थळ: प्रभातीर्थ अपार्टमेंट, ए वॉर्ड ताराबाई रोड, कोल्हापूर, वेळ: सकाळी व सायंकाळी ६ ते ८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्री चंद्रकांत पाटील

$
0
0

खासदार, दहा आमदारांवर भाजपचा दावा

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पक्षाने आदेश दिल्यास 'उत्तर'मधून लढायला तयार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मी खूप हुशार राजकारणी आहे, मला भविष्यातील खूप लवकर कळतं. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेचे दोन्ही खासदार आणि जिल्ह्यातील दहा आमदार भाजप ठरविणार आहे. या दोन्ही निवडणुकीत मी भाजपचे म्हणणार नाही, पण पक्ष ठरवतील तेच खासदार आणि आमदार होतील. त्या दिशेने संबंधितांशी बोलणी सुरु आहे.'अशा शब्दात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नव्या राजकीय समीकरणाचे संकेत दिले. नजीकच्या काळात राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळेल. त्या दिशेने बोलणी सुरु असल्याचेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी सायंकाळी झाला. आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलच्या सभागृहात झालेल्या मेळाव्याप्रसंगी पालकमंत्र्यांनी आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना चार्ज केले. ते म्हणाले, 'कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात मोठी लढाई करायची आहे. विधानसभा निवडणूक लढविण्याचा माझा स्वभाव नाही. त्याची मला आवडही नाही. मात्र पक्षाने आदेश दिल्यास मी निवडणूक लढायला तयार आहे. मी नेहमी कोऱ्या पाकिटाच्या भूमिकेत असतो. कोऱ्या पाकिटाला कुठे जायचं ते ठरविता येत नाही. मालक त्याचा पत्ता ठरवितो. आपण फक्त काम करत राहायचे,' अशा शब्दांत त्यांनी 'उत्तर'च्या मैदानात उतरण्याचे सूतोवाच केले.

'उत्तर'साठी सतेज पाटलांचे पुतणेही चर्चेत

भाजप, कोल्हापूर उत्तरची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविणार आहे. भाजपकडून उत्तरमध्ये इच्छुकांची मांदियाळी आहे. महेश जाधव, सत्यजित कदम यांची नावे चर्चेत आहेत. माझ्याही उमेदवारीची चर्चा आहे. तसेच शांतपणे निवडणूक जिंकण्याचे कौशल्य असणारे सुहास लटोरे, सुनील कदम, मधुरिमाराजे छत्रपती, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील अशी अनेकांची नावे चर्चेत आहेत. उमेदवारी कुणाला द्यायची याचा निर्णय पक्षाचे सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर व वरिष्ठ नेते घेतील, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

मतांची बेरीज बघा आणि कामाला लागा...

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले भाजपचे महेश जाधव आणि ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम मेळाव्याच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले. पालकमंत्र्यांनी, दोघांकडे पाहत उत्तरमधील मतदानाची आकडेवारी मांडली. ते म्हणाले, 'गेल्या निवडणुकीत सत्यजित कदमांना ५२ हजार तर महेश जाधवांना ४२ हजार मते मिळाली. आमदार राजेश क्षीरसागर यांना ६८ हजार मते मिळाली आहेत. कदम आणि जाधवांच्या मतांची बेरीज ९४ हजार होते. हे दोघे एकत्र आले तर निकाल काय लागू शकतो, याचा अंदाज आला आहे. आता या दोघांनी काम करत रहावे, मात्र निर्णय पक्षच घेईल.

.......................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशमुख यांना अभिवादन

$
0
0

कोल्हापूर: दिबंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी भरीव निधी दिला. कार्यकर्त्यांना बळ दिले. पक्षाला न्याय देणारा एकमेव नेता म्हणून इतिहास निर्माण केल्याचे गौरवौद्वागार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील यांनी काढले. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार सतेज पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, हिंदुराव चौगुले, ए. डी. गजगेश्वर, महमद शरीफ शेख, विष्णू पाटील, शारदा तोंदले, सर्जेराव भोसले आदींनी मनोगत व्यक्त केले. या वेळी गौतम सासने, बाबुराव कांबळे, करण जाधव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘क्षमता ओळखून नियोजन करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'संघर्षमय प्रवास हीच अधिकारी घडण्याची प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या अभ्यासाची क्षमता वाढवून वेळचे व योग्य अभ्यासाचे नियोजन करावे,' असा सल्ला आयएएस अधिकारी डॉ. गिरीष बदोले यांनी दिला. विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित केले होते.

डॉ. बदोले म्हणाले, 'परिस्थिती बेताचीच असल्याने घरच्यांना खूप काही सहन करावे लागले. कुटुंबाने जमेल तेवढे सहकार्य करून मानसिक बळ दिले. मात्र परिस्थितीवर मात करून कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळविता येते. सध्या ऑनलाइन सुविधा चांगल्या मिळू लागल्याने ग्रामीण भागात राहून देखील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करता येऊ शकते. संघर्षमय प्रवास हीच अधिकारी घडण्याची प्रक्रिया आहे. वेळ, क्षमता आणि तब्येतीची काळजी घेऊन अभ्यासाचे निश्चित वेळापत्रक निश्चित केले पाहिजे. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करताना लिखाण कौशल्य विकसित झाले पाहिजे. अनेक संकेतस्थळाचा उपयोग अभ्यासाठी होऊ शकतो. मोबाइल हा केवळ संपर्काचे साधन मानून इंटरनेट सेवेचा उपयोग अभ्यासासाठी करावा. एमपीएससी विभागप्रमुख अमित लव्हटे, यूपीएससी विभागप्रमुख प्रवीण गांगुर्डे, एमबीए विभागप्रमुख वृंदा सलगर, कौशल्य विकास विभागप्रमुख नितीन कामत आदी उपस्थित होते. विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी स्वागत केले. सार्या कुलकर्णीने आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सविनय...’मधून मुस्लिम मनाचे प्रतिबिंब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'साहित्यिक हा समाजाच्या वेदनेची मांडणी करत असतो. साहिल शेख यांच्या माध्यमातून वेदनेशी नाते जुळलेला लेखक समाजाला मिळाला आहे. 'सविनय अस्वस्थ' या कथासंग्रहातून समाजातील वास्तवाची मांडणी करण्यात आली आहे. मुस्लिम मनाच्या मानसिकतेचे प्रतिबिंब या पुस्तकात उमटते. हा कथासंग्रह साहित्याची नव्याने चिकित्सा करायला भाग पाडेल,' असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक बाबुराव गुरव यांनी काढले. साहिल शेख लिखित 'सविनय अस्वस्थ' या कथासंग्राहाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. शाहू स्मारक भवन येथे प्रकाशन सोहळा पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मिलिंद कसबे उपस्थित होते.

प्रा. गुरव म्हणाले, 'क्रांतीची बिजे आधी मनात तयार होत असतात. बुद्धांच्या मार्गावर चालल्यास सामाजिक परिवर्तन घडू शकते. धर्माची चिकित्सा करणाऱ्यांची संख्या समाजात कमी आहे. भौतिक वास्तव मांडण्याचे धाडस फार कमी लेखक करतात. धर्माच्या चिकित्सेला आता नव्याने प्रारंभ होत आहे.'

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचे विचार पुढे नेणारे लेखन सातत्याने होण्याची गरज असल्याचे सांगून डॉ. मिलिंद कसबे म्हणाले, 'शेख यांच्या कथांच्या चिकित्सेसाठी दलित साहित्यात नव्या सौंदर्यशास्त्राची आवश्यकता आहे. साहित्यातील ठराविक चौकटी मोडून पलीकडे जाणाऱ्या लेखनाची समाजाला अधिक गरज आहे.'

प्रास्ताविक अनिल म्हमाणे यांनी केले. कार्यक्रमास भदंत आर. आनंद, भदंत एस. संबोधी, प्रा. करुणा मिणचेकर, डी. एस. खोत, कमलाकर सारंग आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रवीण बनसोडे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा एज्युफेस्ट भाषणे

$
0
0

फोटो आहेत.

चांगल्या करिअरसाठी

मोह टाळा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करून आई, वडिलांच्या स्वप्नांची पुर्तर्तेसाठी कष्ट करण्याच्या वयात दुनियादारी करणे, मित्र, मैत्रिणींसोबत चैनी करणे, महत्त्वाचा वेळ वाया घालवणे, अशा मोहाच्या क्षणाचा त्याग करणे आवश्यक आहे. मुलांनी जबाबदारीची जाणीव ठेऊन भविष्याचा वेध घेणे गरजेचे आहे. बलस्थाने ओळखून करिअरची निवड केल्यास यशाच्या उच्च शिखरापर्यंत पोहचता येते,' असे प्रतिपादन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी केले.

मटा एज्युफेस्ट कार्यक्रमात 'पालकांच्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षा' या विषयावर ते बोलत होते. त्यांनी ओघवत्या आणि परिणामकारक भाषेत केलेल्या मार्गदर्शनामुळे पालक, विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. अंतराळवीर कल्पना चावला, वि. स. खांडेकर यांच्या अमृतवेलमधील प्रस्तावना यशस्वी करिअरसाठी कशी आदर्श आहे, हे त्यांनी सांगितले.

देशमुख म्हणाले, 'करिअर दिशा निवडण्यासाठीच्या संभ्रमामुळे संबंधित पालक, विद्यार्थ्यांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यांच्यासमोर करिअरची वाट निवडतानाचे अनेक प्रश्न उभे आहेत. अशावेळी पालकांनी आपल्या इच्छा पालकांवर लादू नयेत. आवड, निवड, कल, सुप्त गुण ओळखून मुलांना प्रोत्साहित करावे. काही विद्यार्थ्यांना बारावीत अपयश येते. अशांनी मानासिकदृष्या खचून जाऊ नये. बारावी म्हणजे अंतिम नाही. अपयश आले तरी करिअर चांगले घडवता येते. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांवरील करिअर करण्याला वाव मिळाला तर ते भविष्यात आनंदी राहू शकतात. अनेक विद्यार्थ्यांना 'स्व'चा शोध उशिरा लागतो. अशा विद्यार्थ्यांना निवडलेल्या करिअरमध्ये अडचणींना सामोरे जावे लागते. ज्या विद्यार्थ्यांना लवकर स्वचा शोध लागला आहेत त्यांना लवकर यशस्वी होता येते. करिअरची दिशा निश्चित करताना शरीर, मन, अध्यात्म, बुद्धी, भावनिक या पाच गुणांच्या कसोटीवर तपासणी करून घ्यावी.'

'करिअर निवडताना आर्थिक

कमाईचा विचार महत्त्वाचा'

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करिअरची निवड करताना भविष्यातील नोकरी, व्यावसायातील संधीचा विचार प्राधान्याने होणे गरजेचे आहे. केवळ आवड या एकाच निकषावर करिअरचा रस्ता निवडू नये. प्रामाणिकपणे नोकरी, व्यावसाय करून चांगले पैसे मिळवता येण्याचा व्यावहारिक विचार करिअर निवडताना प्राधान्याने झालाच पाहिजे,' असे मत प्राचार्य विराट गिरी यांनी व्यक्त केले.

मटा एज्युफेस्ट कार्यक्रमात ' योग्य करिअरची निवड' या विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले, 'सध्या स्पर्धेचे युग आहे. अनेक संधी, अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालकांत करिअरची दिशा निवडताना संभ्रम निर्माण होतो. अशावेळी पालकांनी सरकारच्या शिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेल्या कलशोध चाचणी अहवालाचा आधार घ्यावा. त्या चाचणीला वैज्ञानिक आधार आहे. कोणत्या शाखेला अधिक गुण आहेत, त्या विभागाला करिअर निवडताना प्राधान्य द्यावे. प्राधान्य क्रम ठरवताना कल चाचणी अहवाल ७० टक्के, त्यानंतर १० टक्के क्षमता, १० टक्के आवड, १० टक्के चांगल्या संधीचा विचार होणे आवश्यक आहे. नातेवाइक, मित्र सांगतात म्हणून कधीही करिअरची दिशा निवडू नये. आपल्यातील क्षमता, बलस्थाने कोणत्या विषयात आहे, हेही पाहणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहेत. आता शिकत असलेला अभ्यासक्रम भविष्यात किती उपयुक्त आहे, त्याचीही माहिती तज्ज्ञांकडून जाणून घ्यावी. निवडलेल्या शाखेत केवळ चांगले गुण मिळाल्यानंतर नोकरी, यशस्वी उद्योजक होता येत नाही. करिअरच्या उच्च शिखरावर पोहचण्यासाठी कौशल्य, गुणवत्ता महत्त्वाचे आहे. ते आत्मसात करणे गरजेचे आहे. मार्केटमध्ये कौशल्य असलेल्यांचा बोलबाला असतो. त्यांच्यासाठी चांगल्या संधी चालून येतात. त्या पातळीवरही विद्यार्थ्यांनी कमी पडू नये.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीईटी निकाल-२

$
0
0

पाच फोटो

..........

सीईटीमध्ये घोडावत,

चाटे समूहाचे यश

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील चाटे ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स व चाटे कोचिंग क्लासेस तसेच संजय घोडावत आय. आय टी व मेडिकल अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. शनिवारी रात्री ऑनलाईन निकाल जाहीर झाला . एमएचटी-सीईटी परीक्षा विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरविणारी असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या परीक्षेला अनन्यसाधारण महत्व असते. एमएचटी-सीईटीचा निकाल लागल्यानंतर वेगवेगळ्या व्यावसायिक कोर्सेसना जाण्याचा विद्यार्थ्यांचा मार्ग या गुणांमुळे स्पष्ट झाला आहे.

संजय घोडावत शिक्षण समूहातील अमेय कवडे, हर्षद भोसले, अथर्व गणपते, जतीश खराडे यांनी यश मिळविले. तर चाटे शिक्षण समूहाच्या कोल्हापूर विभागातील शुभम कुष्ठे, वेदिका संकपाळ, प्रशांत लगड, प्रतिक कदम, प्रथमेश पाटील, दिव्या तावडे, प्रगती कुमठेकर, संकेत पाटील, श्रुतिका ढमकले, आकाश कांबळे, सिद्धीराज जाधव, शिवम मंडलिक, स्वानंद तळेकर, नेहा जाधव, श्रेयश पाटील, तेजस पाटील, निधी पटेल, प्रज्वल घाडगे,आरती कांबळे, अमृता कारंडे, ओम मिरजे, रोहीत कारंजकर, अभिषेक पवार, मनाली बोंगाळे, निशांत पंतबाळेकुंद्री, रेवती पाटील, हेरंब चौगुले, प्रथमेश निर्मळे, शिवेंद्र गोडबोले, ऋतुजा देसाई, युथिका साळुंखे, समर्थ मोरे, प्रथमेश कदम, सर्वश्री चौधरी, अनुजा कुरकुरे, अभिषेक गायकवाड, मिथिला शेडशाळे, सिमरन वर्मा, अश्लेषा कुपडे, यश शेषनाईक, श्रीरंग कुलकर्णीं, मोनिका जलपुरे, इंद्रजीत पाटील, रोहीत जाधव, प्रितम निंबाळकर, सम्मेद पाटील, संदेश बोबडे, श्रेया कांबळे, निखिल पाटील, संयुक्ता फडतरे, मनाली कर्णे, शर्विल लाड, ओंकार चौलवार, मंथन भोसले, विनायक घराळ, सोनाली तोवर, रोहीणी माळी, प्रणव खाडे, कोमल कोरे, संकेत पाटील, तेजस पाटील, निहारीका कुलकर्णी, प्राजक्ता चोथे, श्रद्धा निंबाळकर, वैष्णवी पंधारे, स्नेहल माने, सुमैय्या भालदार या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट सोने: महिलेची KDCC विरुद्ध तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केडीसीसीत सोनेतारणासाठी ठेवलेले सोने बनावट असून बँकेची फसवणूक केली आहे. त्या विरोधात संबधित महिला, बँकेची जिन्नस तारण समिती, सोनार आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करावी, असा अर्ज बँकेच्या अधिकाऱ्यांनी शाहूपुरी पोलिसांत रविवारी दिला. मात्र संबधित महिलेने सोनेतारणासाठी ठेवलेले सोने बदलल्याचा आरोप केला आहे. केडीसीसीच्या कसबा बावडा येथील शाखेत हा प्रकार घडला असल्याचे समजते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केडीसीसीच्या कसबा बावडा शाखेत एक वर्षापूर्वी एका महिलेने सोनेतारणवर ९९ हजार रूपयांचे कर्ज घेतले होते. यामध्ये १९ ग्रॅम, १४ ग्रॅम आणि ७ ग्रॅमचे दागिने होते. एकूण चार तोळे दागिने सोनेतारणासाठी ठेवले होते. चार दिवसांपूर्वी संबधित महिला दागिने सोडविण्यासाठी बँकेत गेली. त्या वेळी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सील फोडून त्या महिलेला दागिने दाखविले. त्या वेळी त्या महिलेने सोनेतारणासाठी दिलेले दागिने वेगळे होते आणि बँकेने दिलेले दागिने वेगळे असल्याचा आरोप केला. त्या वेळी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सोने मूल्यमापन करणाऱ्या बँकेच्या सोनाराला बोलाविले. त्याने केलेले मूल्यमापन संबधित महिलेला मान्य नव्हते. बँकेने पु्न्हा दुसऱ्या सोनाराला बोलाविले. या सोनाराने टंच काढल्यानंतर चार तोळे सोन्यात केवळ तीन ग्रॅम सोने खरे असून उर्वरित सोने बेन्टेंक्सचे असल्याचे बँक अधिकाऱ्यांना सांगितले. संबधित बँकेच्या व्यवस्थापकाने केडीसीसीच्या मुख्य शाखेला हा प्रकार कळविला. त्या प्रकरणी केडीसीसीने संबधित तक्रारदार महिला, बँकेची सोने जिन्नस तारण समिती आणि संबधित कर्मचारी यांची चौकशी करावी, असा अर्ज शाहूपुरी पोलिसांत दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा एज्युफेस्ट हाऊसफुल्ल

$
0
0

रविवारी विद्यार्थी, पालकांची मोठी गर्दी; दिवसभर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील पॅव्हेलियन हॉटेलमध्ये महाराष्ट्र टाइम्सतर्फे आयोजित मटा एज्युफेस्टमध्ये सहभागी संस्थांची माहिती घेण्यासाठी आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी दुसऱ्या दिवशी रविवारी विद्यार्थी, पालकांनी मोठी गर्दी केली होती. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने दिवसभर विद्यार्थ्यांची वर्दळ वाढलेली होती. दिवसभरात दोन सत्रात तज्ज्ञांची मार्गदर्शनपर कार्यक्रम झाले. यावेळी उपस्थितांनी शंका, अडचणी तज्ज्ञांना विचारल्या. आज (ता. ४) एज्युफेस्टची सांगता होईल. चाटे एज्युकेशन ग्रुप प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत.

दहावी, बारावीनंतर पुढे काय? असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यासमोर असतो. त्यांना योग्य मार्गदर्शन, चांगल्या कॉलेजची, अभ्यासक्रमांची माहिती एकाच छताखाली मिळण्यासाठी आयोजित मटा एज्युफेस्टला सकाळी नऊपासून विद्यार्थी, पालकांनी हजेरी लावली. प्रत्येक स्टॉलवर थांबून ते बारकाईने कॉलेजची माहिती घेताना दिसत होते. कोणते अभ्यासक्रम शिकवले जातात, प्रॅक्टिकलसाठीची लॅब कशी आहे, कॅम्पस इंटरव्ह्यू आहे का, त्यामध्ये आतापर्यंत किती विद्यार्थ्यांची सहभाग घेतला, निवड किती विद्यार्थ्यांची झाली, कॉलेजचा परिसर कसा आहे अशी सविस्तर माहिती त्यांनी घेतली. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर, शंकाचे समाधान सर्वच स्टॉलवर करण्यात आले. एकाच छताखाली सर्व विषयांच्या अभ्यासक्रमांची, तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाल्याने विद्यार्थी, पालकांनी समाधान व्यक्त केले.

मार्गदर्शनाचे पहिले सत्र सकाळी साडे अकरा वाजता सुरू झाले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी 'पालकांच्या विद्यार्थ्यांचे अपेक्षा' या विषयावर मार्गदर्शन केले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. देशमुख यांनी प्रभावी भाषेत मार्गदर्शन केल्याने श्रोते मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर संजय घोडावत पॉलिटेक्निकचे प्राचार्य विराट गिरी यांनी योग्य करिअरची निवड यावर मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमधील करिअर निवडीचा संभ्रम दूर झाला. योग्य करिअर निवडताना कोणत्या निकषांचा आधार घ्यावा, हे त्यांनी नेमक्या शब्दात सांगितले. दुसरे सत्र सायंकाळी साडेचार वाजता सुरू झाले. 'विमानसेवेतील संधी' यावर नंदकुमार गुरव यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विमान सेवेत कोणत्या प्रकारच्या संधी आहेत हे सांगितले. डॉ. नितीन कदम यांनी 'दहावीनंतरचे करिअर' तर सलील राजगुरू यांनी 'परदेशी शिक्षण आणि भाषा' या विषयावर मार्गदर्शन केले. दोघांच्याही मार्गदर्शनात नव्या संधीची ओळख पालक, विद्यार्थ्यांना झाली. आज, सोमवारीही नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत एज्युफेस्ट प्रवेश सर्वासाठी खुला राहणार आहे.

दरम्यान आज (ता. ४) या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. गेल्या दोन दिवसांत शहरासह जिल्ह्यातील विद्यार्थी, पालकांनी या प्रदर्शनातील विविध शैक्षणिक स्टॉलला भेटी देवून माहिती घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रगतीच्या वाटा : उद्योजक भूषण गांधी

$
0
0

फोटो आहे

प्रगतीच्या वाटा ... लोगो

.........................

संशोधनातून नावीन्यपूर्ण निर्मिती करणारे 'भूषण'

'झिरकोनिअम पावडर' ची सोळा देशात निर्यात

Sachin.Yadav@timesgroup.com

tweet:@sachinyadavMT

कोल्हापूर

कौशल्याला संशोधन आणि तंत्रज्ञानाची जोड दिल्याने कोल्हापूरच्या उद्योजकांचे उत्पादन जगभरात जात आहे. जगात केवळ कोल्हापूर आणि जर्मनी या दोनच ठिकाणी झिरकोनिअम पावडरची निर्मिती केली जाते. भारतीय तसेच अमेरिकन नौदल, मिसाइल, सॅटेलाइन प्रक्षेपण, मेडिकल, विमानाचे पार्ट, रॉकेटसह चारचाकी वाहनांतील एअर बॅगमध्ये ही पावडर वापरली जाते. या पावडर निर्मितीच्या निमित्ताने कोल्हापूरचे नाव जगाच्या नकाशावर झळकाविणाऱ्या उद्योजकाचे नाव आहे, भूषण गांधी.

भूषण गांधी हे सेंट झेविअर्सचे १९८५ च्या बॅचचे विद्यार्थी असून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण न्यू कॉलेज येथून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पुणे येथील इंजिनीअरिंग कॉलेजमधून बीई मेटॅलर्जीची पदवी घेतली. पदवीनंतर त्यांनी स्वत: चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. गोकुळ शिरगाव एमआयडीसीत एक एकर जागा घेऊन श्री बाबाजी केमिकल्स नावाने व्यवसायाची सुरूवात केली. १९९९ ते २०१२ या कालावधीत व्हेनेडियम, मॉलिबडेनम आणि टंगस्टनची निर्मिती करण्यास सुरूवात केली. त्यानंतर याच प्रकारातील झिरकोनिअम आणि टिटॅनिअम हायड्रेड पावडरची निर्मिती करण्यास सुरूवात केली. या पावडरचा गैरवापर झाल्यास विघातक घटना घडू शकत असल्याने सरकारच्यावतीने अनेक अटी, नियम आणि निकष लावण्यात आल्या आहेत.

भूषण यांनी या पावडर निर्मितीसाठी संशोधन करून नवे मॉडेल बनविले. त्यासाठी अमेरिकेतील संस्थांची संशोधनासाठी मदत घेण्यात आली. याचबरोबर बाबाजी केमिकलला जर्मनीच्या टीयूव्हीनॉर्ड कंपनीकडून जीआय आयएसओ ९००१-२०१५ मानांकन मिळाले. तसेच भाभा ऑटोमेटिक सेंटरकडून या प्रकारचे उत्पादन तयार करण्यासाठी परवानगी मिळाली. पावडरसाठी कच्च्या मालाची आयात अमेरिकेहून केली जाते. या कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाते. महिन्याला सुमारे ५० किलोपासून पुढे पावडर तयार केली जाते. त्याला जगभरातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पृथ्वी, अग्नी मिसाइल प्रक्षेपणासाठी कोल्हापुरातून पावडर आयात केली गेली. झिरोरियमचा उपयोग डेंटल, व्हीप जॉइंटसाठी केला जात आहे. ऑटोमोबाइल, संरक्षण, एरोस्पेस, आयफोन, बॅटरी, वैद्यकीय प्रकल्पात डेंटल, हीप जॉइंट, उद्योग क्षेत्रात अॅल्युमिनियम, पावडर मेटॅलर्जी, मेटल इंजेक्नश मॉल्युडिंग, थ्री डी प्रिटिंग आदी क्षेत्रात या पावडरचा उपयोग केला जातो. अमेरिका, इस्त्राइल, कोरिया, चीनसह अन्य ठिकाणी ही पावडर निर्यात केली जात आहे. चारचाकी वाहनांत एअरबॅगसाठी वापरली जाणारी पावडर या ठिकाणी तयार केली जाते. कोणत्याही वाहनाला धडक बसल्यास सेन्सरच्या माध्यमातून एअर बॅग खुल्या होतात. त्यासाठी विशिष्ट पद्धतीने तयार केलेली केमिकलयुक्त पावडर वापरली जाते. वाहनांच्या अलिशान प्रकारानुसार एअर बॅगमध्ये वापरले जाणाऱ्या पावडरीचे प्रमाण बदलते.

भूषण यांनी आंतराष्ट्रीय स्तरावर गुणवत्ता सिद्ध करून कोल्हापूरचे नाव उज्ज्वल केले आहे. या पावडरची निर्यात विमानातून केली जाते. बाबाजी केमिकल्समध्ये कच्चा मालावर प्रक्रिया करण्यासाठी सहा इंजिनिअर्स आहेत. गुणवत्तापूर्ण उत्पादन, शास्त्रोक्त संशोधनाची जोड आणि परिश्रमाची दखल घेत अमेरिकन नौदलाने गांधी यांना इंटरनॅशनल एक्सलंन्स हा पुरस्कार दिला आहे.

००

कोट

'एखाद्या क्षेत्रात मनापासून आवड असल्यास आणि संशोधनाची जिद्द असल्यास नावीन्यपूर्ण निर्मिती होऊ शकते. त्यामुळेच वेगळ्या धाटणीच्या व्यवसायाची सुरूवात केली. संशोधन क्षेत्रातील तरूणांना या क्षेत्रातही मोठी संधी उपलब्ध आहे. भारतीय युवकांची बौद्धिक क्षमता आणि संशोधनाची दखल निश्चितच जगाला घ्यावी लागेल.

भूषण गांधी, उद्योजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोथळी बंद

$
0
0

फोटो

..............

'अमृत' विरोधात कोथळीत कडकडीत बंद

म.टा.वृत्तसेवा,जयसिंगपूर

इचलकरंजी शहराच्या अमृत योजनेसाठी कोथळी येथे वारणा-कृष्णा नदी संगमाजवळ उपसा केंद्र निश्‍चित करण्यात आले आहे. उपसा सुरू झाल्यास कोथळीसह शिरोळ तालुक्यास सांगलीचे सांडपाणी प्यावे लागेल. यामुळे अमृत योजनेस विरोध असून आता चर्चा नाही अन् पाणीही नाही असा निर्णय कोथळी येथे वारणा-कृष्णा बचाव समितीच्या बैठकीत घेण्यात आला. 'इचलकरंजी शहरातील सांडपाणी पंचगंगेत मिसळते. त्यांनी दुषित केलेले पाणी शिरोळ तालुक्यातील जनतेने प्यायचे अन् त्यांना वारणेचे शुध्द पाणी द्यायचे, हा कुठला न्याय,' असा सवाल बैठकीत शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केला.

इचलकरंजी शहराच्या अमृत योजनेसोठी वारणा कृष्णा संगमाजवळ उपसा होणार असल्याने शिरोळ तालुक्यातून विरोध वाढत आहे. रविवारी कोथळी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. वारणा-कृष्णा बचाव कृती समितीची बैठक झाली. यावेळी कोणत्याही परिस्थितीत पाणी न देण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी बोलताना यड्रावकर म्हणाले, 'इचलकरंजी शहराच्या उशाला पंचगंगा नदी आहे. मात्र सांडपाण्यामुळे या नदीचे पाणी दुषित झाले आहे. पंचगंगेचे हेच दुषित पाणी शिरोळ तालुक्यात नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्यावे लागते. यामुळे आता अमृत योजनेला विरोध करण्यासाठी आंदोलनात जयसिंगपूरसह शिरोळ तालुक्यातील नागरिक सामील होतील.'

माजी जि.प.सदस्य सावकार मादनाईक म्हणाले, 'इचलकरंजी शहराने एक वर्षाचा निधी पंचगंगा स्वच्छतेसाठी वापरून नदी प्रदुषणमुक्त करावी. अमृत योजनेव्दारे इचलकरंजीकरांना शुध्द पाणी हवे आहे पण शिरोळ तालुक्यातील अनेक गावांना पंचगंगेचे रसायनयुक्त सांडपाणी पाणी प्यावे लागते. कोथळीच्या संगमावर अमृत योजनेसाठी पाणी उपसा झाला तर कृष्णाकाठच्या पुढच्या गावांना गटारीचे पाणी प्यावे लागेल.'

वारणा बचाव कृती समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे म्हणाले, 'अमृत योजनेला पाणी दिले तर शिरोळ तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होईल. यामुळे वारणा-कृष्णा बचाव समितीच्या मागे आम्ही नक्की उभे राहू. एक थेंबही पाणी देणार नाही असा निर्धार करूया.'

यावेळी भाऊसो मगदूम, वृषभ पाटील, श्रीकांत पाटील, ग्रा.पं.सदस्य प्रमोद कुंभार, भिमगोंडा बोरगावे, पंचायत समिती सदस्य राजगोंडा पाटील, संजय नांदणे, आप्पासो पाटील, गौतम पाटील, सुकुमार नेजकर, प्रा.एस.टी.पाटील, सागर चिपरगे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी शिरोळ पं.स.सभापती मिनाक्षी कुरडे, धनगोंडा पाटील, देवगोंडा पाटील, सर्जेराव शिंदे, राम शिंदे, केशव राऊत, धन्यकुमार भोसले, सरपंच सौ.अमृता पाटील, उपसरपंच सागर पुजारी, ग्रा.पं.सदस्य रावसो बोरगावे, रवि पुजारी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बचत गटांचे आंदोलन मागे

$
0
0

कोल्हापूर : महिला बचत गटांना २५ हजार रुपये कर्ज देण्याची तयारी बँक अधिकाऱ्यांनी दर्शवल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महालक्ष्मी बचत गटाने गेले सहा दिवस सुरू असलेले उपोषण शनिवारी मागे घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले सहा दिवस मनसे वाहतूक सेना अध्यक्ष राजू जाधव व गीता कांबळे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू होते. राष्ट्रीयकृत बँकांनी महिला बचत गटांना २५ हजार रुपये कर्ज द्यावे, मायक्रोफायनान्स कंपन्याच्या दामदुप्पट व्याज दराची सरकारने चौकशी करावी,या प्रमुख मागण्यासाठी आंदोलन सुरु होते. शुक्रवारी (ता. १) उपोषणातील सहभागी गीता कांबळे यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना उपचारासाठी सीपीआर रुणालयात हलवण्यात आले होते. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन शनिवारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करून कर्ज देण्याची तयारी दर्शवल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. आंदोलनात उषा जाधव, मेघा साठे, सुनीता कणगांवकर, रचना पोवार, सुनीता गोंधळी यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्राइम संक्षिप्त

$
0
0

गंठण लंपास

कोल्हापूर : केएमटी बसमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील ७५ हजार रुपयांचे अडीच तोळ्याचे गंठण चोरट्याने हिसडा मारून लंपास केले. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अयोध्या कॉलनी, फुलेवाडी रिंगरोडवर हा प्रकार घडला. काही तरुणांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र चोरटे पळून गेले. शीला गजानन निकम (वय ५५, रा. शाहुपूरी, पाचवी गल्ली) यांनी करवीर पोलिसांत तक्रार दाखल केली.

००

दोघे जखमी

कोल्हापूर : दुचाकीवरून शेताकडे जात असताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले. राजाराम तुकाराम पाटील (वय ६५) व साधना महेश पाटील (वय ३२ रा. मांगोली, ता. राधानगरी) अशी जखमींची नावे आहेत. रविवारी दुपारी हा अपघात झाला. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.

००

अपघातातील जखमीचा मृत्यू

कोल्हापूर : सांगली-कोल्हापूर रोडवर अतिग्रे फाटा येथे दुचाकी अपघातात जखमी झालेल्या सुरेश सदाशिव देसाई (वय ६१, रा. साजणी,ता. हातकणंगले) यांचा रविवारी मृत्यू झाला. २० मे रोजी हा अपघात झाला होता. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू होते.

००००

अपघातात तरुण जखमी

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाजवळील झालेल्या दुचाकी अपघातात अप्पू यल्लाप्पा पडसलगे (वय २८ रा.राजेंद्रनगर) हा तरूण जखमी झाला. त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे.

०००

शाळकरी मुलगा जखमी

कोल्हापूर : येथील टाऊन हॉल परिसरात बसची वाट पाहताना शाळकरी मुलगा जखमी झाला. सिद्धार्थ काशिनाथ मुस्के (वय १२ रा. सोलापूर) असे त्याचे नाव आहे. तो नातेवाइकांसह रविवारी कोल्हापुरात आला होता. त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे.

००

हृदयविकाराने कामगाराचा मृत्यू

कोल्हापूर : कुशिरे (ता. पन्हाळा) येथे कारखान्यात काम करत असताना हदयविकाराच्या धक्क्याने मनोज कुमार (वय ३६) या कामगाराचा मृत्यू झाला. त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्राइस : संक्षिप्त दोन

$
0
0

बँकेतून चेकची चोरी

कोल्हापूर : राजारामपुरी आयडीबीआय बँकेच्या काउंटर क्रमांक सहावरून १ लाख, ९२ हजार, ३०१ रुपयांचा चेक चोरून नेल्याची तक्रार खातेदार ललिता महाजन ( वय ४८, रा. वसुंमती निवास, वारणा कॉलनी, नागाळा पार्क) यांनी राजारामपुरी पोलिसांत दिली. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारात त्या बँकेत गेल्या होत्या. त्या वेळी दहा मिनिटानंतरच चेक चोरून नेल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

००

एकावर चाकूहल्ला

कोल्हापूर : दारू उधार दिली नसल्याने एकावर चाकू हल्ला करण्याची घटना शाहूपुरी जुना पुलावरील एका देशी दारूच्या दुकानात घडली. महेश वर्मा (वय ३२, रा. ई वॉर्ड, शाहू रोड, शाहूपुरी) यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी सोन्या, हरिश (पूर्ण नावे नाहीत) आणि एका अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दारू दिली नसल्याने चाकूने हल्ला केल्याने तळहाताला जखम झाली आहे. त्याना शिवीगाळ करून मारहाण केल्याची फिर्याद दाखल झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयजी ऑफीसमोरिल आत्मदहन आंदोलन लेखी आश्वासनानंतर मागे

$
0
0

आयजी ऑफीससमोर

आत्मदहनाचा प्रयत्न

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खंडणीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप करत शिवाजी दशरथ पोळ (रा. मार्डी. ता. माण जि. सातारा) याने विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयासमोर सोमवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी लेखी आदेश दिल्यानंतर पोळ याने आत्मदहनाचा निर्णय मार्ग घेतला. सुमारे सहा तास आयजी कार्यालयासमोर आत्मदहन रोखण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज होत्या.

याबाबत अधिक माहिती अशी, शिवाजी पोळ यांचा गेल्यावर्षी अपघात झाल्यावर त्यांना उपचारास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपघातास कारणीभूत असणाऱ्या बाळकृष्ण नारनवरे (रा. मार्डी) यांनी उपचारासाठी ५० हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली होती. पण पैसे देण्यास टाळाटाळ केल्यानंतर पोळ यांनी सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. शिंगणापूर पोलिस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बाळकृष्ण नारनवरे यांनी शिवाजी पोळ यांना पैसे देण्याचे कबूल केले होते. मात्र नोव्हेंबर २०१७ मध्ये नारनवरे यांनी पोळ यांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा नोंदवला. पोलिसांनी खातरजमा न करता आपल्यावर गुन्हा नोंदवला असा आरोप पोळ यांनी केला. आपल्यावरील गुन्हा मागे घ्यावे यासाठी त्यांनी सातारा पोलिस अधीक्षकांना दोन ते तीन वेळा निवेदने दिली. त्यांच्या कार्यालयासमोर दोनवेळा आत्मदहनाचा प्रयत्न केला. पण पोलिसांकडून कोणतीच कार्यवाही न झाल्याने त्यांनी आयजी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता.

सोमवारी सकाळी आत्मदहन रोखण्यासाठी आयजी कार्यालय परिसरात पोलिसांचे पथक, अग्निशमन दलाचा बंब, आरोग्य यंत्रणेचे कर्मचारी उपस्थित होते. शिवाजी पोळ हे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रॉकेलची बाटली घेऊन आयजी कार्यालय परिसरात आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील रॉकेलची बाटली काढून घेतली. त्यानंतर त्यांच्याशी चर्चा सुरु केली. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास नांगरे पाटील यांच्यासमोर त्यांना हजर करण्यात आले. नांगरे पाटील यांनी पोळ यांचे म्हणणे ऐकूण घेतले. सातारा पोलिस अधीक्षकांनी सात दिवसात पोळ यांच्यासंबधित अहवाल दिल्यानंतर कायदेशीर बाबी पडताळून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर पोळ यांनी आत्मदहन आंदोलन मागे घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images