Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

साखर उद्योग प्रश्नी पंतप्रधानांसोबत बैठक

$
0
0

सहा जूनला पंतप्रधानांसोबत बैठक

साखर उद्योगप्रश्नी सहा जूनला दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार असून एफआरपीसह प्रलंबित अन्य मागण्यांवर चर्चा होणार आहे.

एफआरपी ठरवताना साखर विक्रीचा जो दर निश्चित केला जातो, तोच दर साखरेला मिळावा. त्या दरापेक्षा कमी दराने साखर विक्री करता येणार नाही, असा कायदा करावा. ३० लाख बफर स्टॉक करण्यास परवानगी मिळावी. कारखान्यांच्या साखरविक्रीचा साठा निश्चित करून त्यावर निर्बंध आणावेत, अशा साखर उद्योगाच्या मागण्या आहेत. अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ही बैठक होत आहे. बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री पंकजा मुंडे, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीतून महिलेची पर्स लंपास

$
0
0

एसटीतून महिलेची पर्स लंपास

कोल्हापूर

कोल्हापूर-घुंगुरवाडी एसटीत चोरट्याने महिलेची पर्स लंपास केली. शुक्रवारी (ता. १) दुपारी हा प्रकार घडला. याबाबत मीना रवींद्र चौधरी (वय ४३, रा. धनकवडी, पुणे) यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. चौधरी या निकमवाडी येथे देवदर्शनासाठी निघाल्या होत्या. टाऊन हॉल परिसरात त्यांच्याकडील पर्स लंपास झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी एसटीत शोध घेतला, मात्र पर्स सापडली नाही. त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात जाऊन पर्सचोरीची फिर्याद दाखल केली. पर्समध्ये ३५ हजार रुपये किंमतीचे दीड तोळ्यांचे मंगळसूत्र, बँकांची एटीएम कार्ड, आधार कार्ड, ओळखपत्र, ड्रयव्हिंग लायसन्स होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बायकोला विक अन् कर्ज भर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

क्रेडीट कार्डची १ लाख २२ हजार रुपये थकीत रक्कम भरण्यासाठी बायको आणि आईला विकण्याचा संतापजनक सल्ला रत्नाकर बँकेतील महिला अधिकाऱ्यांनी दिला आहे. धमकीच्या मोबाइल कॉलचे रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याने आरबीएल बँकेच्या महिला कर्मचाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत श्रेयस संजय पोतदार (वय ३२, रा. बेलबाग, मंगळवार पेठ, कोल्हापूर) यांनी सुप्रिया पाठक आणि शीतल (दोघी रा. मुंबई) यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान या दोघींची महिला दक्षता आयोगाकडून चौकशी होणार आहे.

श्रेयस पोतदार हे सराफ व्यावसायिक आहेत. राजारामपुरीच्या आठव्या गल्लीतील रत्नाकर बँकेत त्यांचे खाते आहे. दीड वर्षांपूर्वी बँकेने त्यांना क्रेडीट कार्ड दिले होते. १ लाख ८९ हजार रुपयांचा व्यवहार करण्याची क्षमता या कार्डवर होती. गेल्या चार महिन्यांपासून या कार्डवर १ लाख २२ हजार रुपये रक्कम थकीत आहे. ही रक्कम तातडीने भरावी यासाठी रत्नाकर बँकेच्या मुंबई शाखेतील रिकव्हरी विभागातून रोज पोतदार यांना फोन येतात. २४ एप्रिल ते २७ एप्रिल या दरम्यान सुप्रिया पाठकने फोन करून रक्कम भरण्याबाबत दमदाटी केली. पोतदार यांनी फोन उचलण्यास टाळाटाळ केल्यानंतर महिला अधिकाऱ्यांनी पोतदार यांच्या पत्नीसह आई आणि मित्रांनाही फोन करून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. 'काहीही कर, पण बँकेचे पैसे भर. क्रेडीट कार्ड वापरायची तुझी लायकी नाही तर वापरलेस कशाला? पैसे भरायची वेळ आल्यावर बायकोकडे मोबाइल देतोस. पैसे नसतील तर तुझ्या बायकोला आणि आईला विक पण, बँकेचे पैसे दे. नाहीतर तुझ्या आईला आणि बायकोला मुंबईत आमच्या ऑफिसमध्ये पाठव.'

महिला अधिकाऱ्यांनी अश्लील भाषेत पोतदार यांच्या आई आणि पत्नीला शिवीगाळ केली. शिवाय बदनामी करण्याची धमकीही दिली. याबाबत श्रेयस पोतदार यांनी २५ मे रोजी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दोन्ही महिला अधिकाऱ्यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. यानुसार सुप्रिया पाठक आणि शीतल या दोघींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. क्रेडीट कार्डची थकीत रक्कम भागवण्यासाठी आईसह बायकोला विकण्याचा सल्ला देणारे मोबाइल कॉलचे रेकॉर्डिंग शुक्रवारी व्हायरल झाले. या प्रकाराने रत्नाकर बँकेच्या महिला अधिकाऱ्यांबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, संबंधित महिला अधिकाऱ्यांची महिला दक्षता समितीच्या वतीने चौकशी होणार आहे.

२५ हजारांची फसवणूक केल्याची तक्रारी

महिला अधिकाऱ्यांच्या दमदाटीनंतर पोतदार यांनी २७ एप्रिलला बँकेच्या राजारामपुरी येथील शोखेत जाऊन पृथ्वीराज देसाई या कर्मचाऱ्याकडे २५ हजार रुपये दिले. याची पावती कर्मचाऱ्यांनी दिली नाही, असा आरोप पोतदार यांनी केला आहे. पैसे देऊनही पावती न दिल्याची तक्रार त्यांनी पोलिसात केली आहे.

००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलनामुळे विकासाला खीळ - अविनाश सुभेदार

$
0
0

'आंदोलनांमुळे विकासाला खीळ'

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सततच्या आंदोलनांमुळे एकीकडे प्रशासन अस्वस्थ असून उठसूट केलेल्या आंदोलनांमुळे जिल्ह्याच्या विकासावर विपरीत परिणाम होत असल्याची खंत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी व्यक्त केली. राज्यकर्त्यांचे कार्यकर्त्यांवरील नियंत्रण कमी झाल्याने अशी परिस्थिती वारंवार उद्भवत असल्याचे त्यांनी नमूद केले. दूध संकलनासाठी वापरण्यात येत असलेल्या इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची जप्ती करु नका, या मागणीसाठी निवेदन देण्यास आलेल्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत ते बोलत होते.

भूविकास बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे गेल्या २० दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. खासगी प्राथमिक शिक्षक, शिक्षकेतर महासंघ, किसान सभेचा मोर्चा, बचत गटांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. या सर्व सुरू असलेल्या आंदोलनाबाबत जिल्हाधिकारी सुभेदार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, 'प्रश्न किती महत्त्वाचा आहे, याचा विचार न करता कोणीही उठतो आंदोलन करतो. पाण्याचा प्रश्न, रेल्वे, रस्ता, पर्यायी पुलाचे कामावरुन कृती समित्या लगेच तयार होतात. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसत आहे, याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले जात आहे. आंदोलन करणारे कार्यकर्ते कोणाचे आहेत? अशा कार्यकर्त्यांवर नियंत्रण नको का? ' .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्पदंशाने बालकाचा मृत्यू

$
0
0

(फोटो आहे)

सर्पदंशाने बालकाचा मृत्यू

कोल्हापूर

आईसोबत शेतात जाताना सर्पदंश झाल्याने पाच वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सत्यम संजय प्रभू (रा. घानवडे, ता. करवीर) असे मृत बालकाचे नाव आहे. घानवडे येथे शुक्रवारी (ता. १) सकाळी ही घटना घडली. सुवर्णा प्रभू या घानवडे येथे अंगणवाडी सेविका आहेत. त्याचे पती संजय हे सेंट्रिंग कामगार आहेत. शुक्रवारी सकाळी सुवर्णा या मुलगा सत्यम आणि मुलगी तनुजा (वय दीड वर्षे) यांना सोबत घेऊन शेतात निघाल्या होत्या. यावेळी शेताच्या बांधावरून जाणाऱ्या सापाच्या अंगावर सत्यमचा पाय पडला. सापाने सत्यमच्या पायाला दंश केला. सर्पदंश झाल्याने तो मोठ्याने ओरडला. सुवर्णा यांनी बांधावरून निघून जाणारा साप पाहताच सत्यमला घेऊन त्या उपचारासाठी धावल्या. गावातील खासगी रुग्णालयात जाऊन त्यांनी प्राथमिक उपचार घेतला. गावातील डॉक्टरांनी त्यांना तातडीने सीपीआरमध्ये जाण्याचा सल्ला दिला. यानंतर रुग्णवाहिकेतून त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. सीपीआरमधील डॉक्टरांनी सत्यमची तपासणी केली. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. सर्पदंशानंतर अवघ्या तासाभरात सत्यमचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुनील भोसले निधन

$
0
0

सुनील भोसले

कोल्हापूर

तेलंगणा येथे सेवा बजावित असताना कारदगा (ता. चिकोडी) येथील सुनील दामोदर भोसले (वय ४५) यांचे निधन झाले. ते सीआरपीएफमध्ये हवालदार पदावर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफ लुटीतील म्होरक्या अटकेत

$
0
0

फोटो

..............

सराफ लुटीतील म्होरक्या अटकेत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबईतील सराफाला लुटणाऱ्या टोळीच्या सूत्रधारास जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. आनंद उर्फ राजू पिल्लई (वय ३५, रा. पी.डी. मिल रोड, मुंबई) असे संशयिताचे नाव आहे. मुंबईत एका घरफोडीच्या गुन्ह्यात तो पोलिसांच्या हाती लागला होता. जुना राजवाडा पोलिसांनी शुक्रवारी (ता. १) सकाळी त्याचा ताबा घेतला. सूत्रधाराच्या अटकेने सराफाच्या लुटीचा उलगडा होणार आहे.

मुंबईतील सराफ कांतीलाल जसवंतराज मेहता (वय ५३, रा. एम.जी. रोड, मुंबई, बोरीवली) हे ७ फेब्रुवारीला कोल्हापुरात आले होते. पहाटे साडेपाचच्या सुमारास गुजरीतील मरुधर भवनसमोर चौघांनी मारहाण करीत सुमारे एक किलो सोन्याचे दागिने लुटले होते. पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली कार आणि कारच्या चालकाला अटक केली होती. त्याच्याकडून मि‌ळालेल्या माहितीवरून पोलिसांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अमू आनंद पिल्लई या महिलेलाही अटक केली होती. या टोळीचा सूत्रधार आनंद पिल्लई हा मुंबईतील एका घरफोडीच्या तपासात मुंबई पोलिसांच्या हाती लागला. याची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिसांनी संशयित पिल्लईचा ताबा मागितला होता. शुक्रवारी सकाळी पिल्लईचा ताबा जुना राजवाडा पोलिसांना मिळाला.

आनंद पिल्लई याच्या टोळीने राज्यात अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत. गुजरीत सराफाला लुटल्यानंतर ही टोळी मुंबईला गेली होती. यानंतर टोळीतील सर्व सदस्य विखुरले. गुन्ह्यातील कारच्या क्रमांकावरून पोलिसांनी कारचालकाला अटक केली होती. गुन्ह्याची पद्धत आणि कार चालकाकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आमु पिल्लई या महिलेला सुरतमधून (गुजरात) अटक केली होती. कारचालक नागेश तुकाराम हुनुचगिरे (रा. मुंबई) याच्यासह पिल्लई दाम्पत्य आणि मुन्ना उर्फ मेहताब मंजूर अन्सारी (रा. मीरारोड, ठाणे), कार्तिक सुब्रम्हण्यम नायडू (रा. टिटवाळा, मुंबई) आणि बटलर (रा. भायकळा, मुंबई) यांच्याविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सराफ लुटीतील सूत्रधाराचा ताबा मिळाल्याने लुटीबाबत महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागणार आहे. आनंद पिल्लई याला कोर्टात हजर केले असता, त्याला चार जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. पोलिस निरीक्षक अनिल गुजर अधिक तपास करीत आहेत.

.......

चौकट

कटाचा उलगडा होणार

लुटारुंनी सराफ कांतीलाल मेहता यांच्या मागावर राहून लूट केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. सराफ कधी कोल्हापुरात पोहोचणार, कोठे जाणार याची सर्व माहिती संशयितांनी काढली होती. लुटारू टोळीच्या सूत्रधाराला ताब्यात घेतल्याने कटाचा उलगडा होणार आहे. कटात सहभागी असणाऱ्या अन्य संशयितांनाही पोलिस अटक करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किसान सभेचा आंदोलनाचा इशारा

$
0
0

किसान सभेचा तीव्र

आंदोलनाचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गायीच्या दुधाला प्रति लिटर ४० रुपये तर म्हशीच्या दुधाला ६० रुपये हमीभाव द्यावा या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात अखिल भारतीय किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र निदर्शने केली. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन सर्व विभागांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यात शुक्रवारपासून शेतकरी आंदोलनास सुरुवात झाली असून अखिल भारतीय किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सभेच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन दिले. यावेळी जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजूरांच्या मागण्यांवर चर्चा झाली. देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करा, वारसा नोंदी तत्काळ कराव्यात, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, ऊस उत्पादकाला हंगामापूर्वी जाहीर केलेल्या दरानुसार फरकाच्या रक्कमा द्याव्यात, शेतीमालाला योग्य हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय प्रकल्पासाठी जमिनी काढून घेण्यात येऊ नयेत, निराधार योजनेसाठी आर्थिक सहाय्य ६०० रुपयांवरुन दोन हजार रुपये करावे, आदी मागण्यांवर चर्चा करण्यात आली. शिष्टमंडळात सुभाष निकम, आप्पासाहेब परीट, मनोहर मरगट्टी, डॉ. सुभाष जाधव, संभाजी यादव, नारायण गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते.

दरम्यान, शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी तातडीने बैठक घेतली. बैठकीत शेतकरी आंदोलनासंदर्भात चर्चा झाली. जिल्ह्यात आंदोलन तीव्र झाल्यास कोणत्या उपाय योजना करायचा या संदर्भात चर्चा करण्यात आली. दूध, भाजीपाला, धान्य व्यावसायिकांनी बंदोबस्ताची मागणी केल्यास तत्काळ सरंक्षण देण्यात यावे, अशा सूचना करण्यात आल्या. तसेच सर्व विभागांना सतर्क राहण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीचे चार कोटी ७८ लाख जमा

$
0
0

कर्जमाफीचे चार

कोटी ७८ लाख जमा

कोल्हापूर

तब्बल तीन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी कर्जमाफीची आठवी यादी राज्य सरकारच्या आयटी विभागाने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस पाठवली. यादीमध्ये जिल्ह्यातील २,७९७ लाभार्थ्यांना चार कोटी ७८ लाख ५३ हजारांची कर्जमाफी रक्कम मिळाली आहे. दोन दिवसांत बँकेकडून लाभार्थ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यात प्राप्त झालेल्या सातव्या यादीतील १४ हजार लाभार्थ्यांची यादी परत गेल्यानंतर कर्जमाफीचे कामकाज जवळपास ठप्पच झाले होते. बुधवारपासून कर्ज खात्यांची तपासणी सुरू झाली असताना, शुक्रवारी कर्जमाफीची यादी प्राप्त झाल्याने लाभार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यामध्ये नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या २,६७२ लाभार्थ्यांना चार कोटी ३० लाख ८३ हजार तर थकबाकीदार ११५ लाभार्थ्यांना ३६ लाख ६२ हजारांची कर्जमाफी झाली आहे. दीड लाखांवरील दहा लाभार्थ्यांना ११ लाख सात हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छ कोल्हापूरसाठी प्रयत्न करू

$
0
0

लोगो : टॉकटाइम

स्वच्छ कोल्हापूर, निरोगी कोल्हापूर

ऐतिहासिक, पर्यटन आणि धार्मिकदृष्ट्या कोल्हापूरला अनन्य साधारण महत्त्व आहे. बारा महिने पर्यटक, भाविक कोल्हापूरला भेट देत असतात. महापालिकेच्या माध्यमातून त्यांना अत्यावश्यक सेवा देताना शहराची प्रतिमा उंचाविण्यासाठी स्वच्छ कोल्हापूर ही संकल्पना राबवली जाईल. शहरवासियांच्या आरोग्याला प्राधान्यक्रम राहील. पावसाळ्यात साथ रोग उद्भवणार नाहीत यासाठी 'निरोगी कोल्हापूर'साठी यंत्रणा कार्यान्वित केली जाईल, असा संकल्प नूतन महापौर शोभा बोंद्रे यांनी व्यक्त केला. कोल्हापूर शहराच्या ४६ व्या महापौरपदी निवड झाल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी शहर विकासाशी निगडीत कामांना चालना दिली जाईल, अशी ग्वाही दिली.

प्रश्न : महापौर म्हणून कोणत्या वेगळ्या संकल्पना राबविणार?

'स्वच्छ कोल्हापूर, निरोगी कोल्हापूर'ही माझी संकल्पना आहे. शहरवासियांना आरोग्य विषयक सुविधा, प्रत्येक प्रभागात स्वच्छतेला प्राधान्य राहील. पावसाळ्याच्या कालावधीत साथरोग उद्भवण्याची शक्यता आहे. शहरात डेंगीसदृश रुग्ण आढळत आहेत. या साऱ्या प्रकाराची गंभीर दखल घेत आरोग्य यंत्रणा सक्रिय केली आहे. अधिकाऱ्यांना प्रत्येक प्रभागात स्वच्छता मोहिमेच्या सक्त सूचना आहेत. कचरा उठाव, साफसफाई, स्वच्छ व मुबलक पाणी अशा सुविधा देऊन 'स्वच्छ कोल्हापूर, सुंदर कोल्हापूर'च्या संकल्पनेला मूर्त रुप दिले जाईल.

पदाधिकारी-नगरसेवक व प्रशासनातील दुरावा कसा संपुष्टात आणणार?

पदाधिकारी-नगरसेवक व प्रशासनातील वाढत्या दुराव्यामुळे महापालिकेच्या कामकाजावर थेट परिणाम होतो. गेल्या काही महिन्यांत या दोन्ही घटकांत विसंवाद निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यांच्यामध्ये संवाद घडवून प्रशासकीय कामकाज गतिमान केले जाईल. नगरसेवकांच्या प्रशासनाकडून अपेक्षा, विकास कामांसाठी आवश्यक निधी, प्राधान्यक्रमाने करावयाची कामे निश्चित केली जातील. नागरिकांना जलद सुविधा मिळायला हव्यात हा मुख्य उद्देश आहे.

शहर विकासाला चालना देणारे प्रकल्प रखडलेत ?

थेट पाइपलाइन योजना ही शहरवासियांच्या जिव्हाळ्याची योजना आहे. योजनेचे उर्वरित काम जलदगतीने झाले पाहिजे. ज्या अडचणी आहेत त्याच्या सोडवणुकीसाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांची संयुक्त फिरती व आढावा बैठकीचे नियोजन करण्याबाबत आयुक्तांना पत्र दिले आहे. अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, दुधाळी एसटीपी, पंचगंगा नदी प्रदूषणमुक्ती अशा शहरांशी संबंधित प्रकल्प मार्गी लागले पाहिजेत यासाठी प्रयत्नशील आहे. संध्यामठ व रंकाळा टॉवरची दुरवस्था होत आहे. या वास्तूंच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष कामाला कशी सुरुवात होईल यासाठी पाठपुरावा राहील. सांडपाणी व्यवस्थापन केंद्र पूर्ण क्षमतेने चालू राहिल्यास प्रदूषणाचा प्रश्न सुटणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंगल्याच्या बांधकामावरून मंत्री सुभाष देशमुख अडचणीत

$
0
0

सोलापूर:

सोलापूरमध्ये अग्निशमन केंद्रासाठी आरक्षित असलेल्या जागेवर अलिशान बंगला बांधल्याप्रकरणी राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. बंगल्याचं बांधकाम बेकायदा असून, त्याचा परवाना मागे घेतल्याचा अहवाल महापालिकेनं उच्च न्यायालयात सादर केला आहे. या प्रकरणावरून देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

अग्निशमन केंद्र आणि व्यापारी गाळ्यांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर देशमुख यांनी अलिशान बंगला बांधला आहे. बंगल्याच्या बांधकामास परवानगी दिल्याप्रकरणी महापालिकेवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीची याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यानुसार अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने महापालिका आयुक्तांना दिले होते. मात्र, अनेक दिवसांपासून त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने पुन्हा अवमान याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार, महापालिका आयुक्तांनी न्यायालयात अहवाल सादर केला आहे. त्यात बंगल्याची बांधकाम परवानगी मागे घेत असल्याचं म्हटलं आहे. हा बंगला बेकायदा असल्याचं यावरून स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, बंगल्याच्या बांधकामावरून सुभाष देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. देशमुख यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून बंगला पाडण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. दुसरीकडे बंगल्याच्या बांधकामासाठी महापालिकेकडून सर्व परवानग्या घेण्यात आल्या होत्या, असं स्पष्टीकरण देशमुख यांनी दिलं आहे. महापालिकेनं परवानगी दिली तेवढंच बांधकाम केलं आहे. दोषी आढळल्यास आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर, क्षणार्धात मंत्रिपदावरून दूर होईन. तसंच स्वखर्चाने बंगला पाडू, अशी प्रतिक्रिया देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ललित गांधी चेंबरचे उपाध्यक्ष

$
0
0

फोटो

ललित गांधी यांची

उपाध्यक्षपदी निवड

कोल्हापूर

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजच्या उपाध्यक्षपदी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांची सलग तिसऱ्यांदा निवड झाली . महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची निवडणूक नुकतीच झाली. यामध्ये संतोष मंडलेचा यांची अध्यक्षपदी फेरनिवड व अमित कामत यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड झाली. तर ललित गांधी यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड झाली . १५ जून रोजी मुंबई येथे होणाऱ्या ९० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवनिर्वाचित पदाधिकारी पदभार स्वीकारणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारमंत्र्यांचा बंगला बेकायदा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरातील होटगी रोड परिसरात बांधलेला टोलेजंग बंगला अग्निशमन दलासाठी आरक्षित जागेवर असून, तो बेकायदा असल्याचा अहवाल सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केला आहे. देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. न्यायालयाने दोषी ठरविल्यास राजीनामा देऊ, असे देशमुख यांनी म्हटले आहे.

देशमुख यांनी बंगला बांधलेली जागा महापालिकेच्या अग्निशमन विभाग, व्यापारी गाळ्यांसाठी आरक्षित होती. त्यांचा बंगला बेकायदा असल्याची तक्रार महेश चव्हाण यांनी न्यायालयात दाखल केली होती. या प्रकरणी ३१ मे पर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनाला दिला होता. त्यानुसार पालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी अहवाल सादर केला आहे. 'संबंधित बांधकाम आरक्षित जागेवर असल्याने बांधकाम परवाना रद्द केला होता,' असा उल्लेख अहवालात आहे. आयुक्तांनी न्यायालयात सादर केलेला अहवाल २६ पानी आहे. त्यामध्ये देशमुखांच्या बांधकामावर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत.

सात हजार चौरस फुटांचे बांधकाम

देशमुख यांचा प्लॉट २२,२४३  चौरस फुटांचा आहे. त्यावर त्यांनी ९४२५  चौरस फूट बांधकामाची अधिकृत परवानगी घेतली; पण प्रत्यक्षात तिप्पट जास्त बांधकाम झाले आहे. महापालिकेने बाराशे चौरस फूट बांधकामाची परवानगी दिली असताना देशमुखांनी सात हजार चौरस फुटांचे बांधकाम केले. हा बंगला म्हणजे आलिशान महालच आहे. ज्या आरक्षित जागेवर देशमुख यांनी बंगला बांधला आहे, तेथे त्यांच्यासह दहा जणांनी इमारत बांधल्या आहेत. त्या इमारतींचे बांधकाम परवाने महापालिकेने परत घेतले आहे. देशमुख यांच्यासह सिद्धाराम चिट्टे, राम रेड्डी, चंदा पाटील, शरदकृष्ण ठाकरे, मनाली ठाकरे, वंदना राम रेड्डी, डी राम रेड्डी, श्रीकृष्ण कालेकर, माधवी कालेकर, पुरुषोत्तम ईगा-मल्लय्या ईगा अशी आरक्षित जागेवर टोलेजंग बंगले बांधलेल्या उद्योजकांची नावे आहेत. बांधकाम परवाना देताना कायद्याला अनुसरून दिली नसल्याचे सांगत बांधकाम परवाने परत घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

बंगला स्वखर्चाने पाडू : देशमुख 

दोषी आढळल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, असे सुभाष देशमुख यांनी म्हटले आहे. तसेच, बंगला बेकायदा असल्याचे निष्पन्न झाल्यास तो स्वखर्चाने पाडू, असेही त्यांनी म्हटले आहे. 'जागेचे बांधकाम करताना महापालिकेची परवानगी घेतली होती. जेवढी जागा आहे तेवढ्या जागेवर बांधकाम केले आहे. चुकीचे काहीही केलेले नाही.  रोख पैसे भरून परवाना घेतला आहे. जागा आरक्षित होती, तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी परवाना कसा दिला? त्यांचा दोष आहे. याबाबत मी न्यायालयात दाद मागणार आहे. तिथे जो निर्णय होईल तो मान्य करेन,' असेही देशमुख म्हणाले.

बंगला पाडलाच पाहिजे : महेश चव्हाण

'देशमुख यांच्या बंगल्याच्या बांधकामासाठी महापालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी हेराफेरी करून परवानगी दिली, त्यांच्यावर सर्वप्रथम कारवाई झाली पाहिजे. या आरक्षित जागेवर भाजी मंडई, मिनी शॉपिंग सेंटर तसेच अग्निशमन केंद्र व्हावे, यासाठी देशमुखांचा बंगला पाडून जागा ताब्यात घेतली पाहिजे. आरक्षित जागेवर बांधकाम करण्यासाठी गुंठेवारी कायदा लागू होत नाही. याबाबत भक्कम पुरावे आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याकडे मी दिले होते. त्यांनीसुद्धा सखोल चौकशी करून अहवाल दिला आहे. माझ्यासारख्या सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. मी कोणतेही राजकारण करणार नाही. देशमुखांनी राजीनामा द्यावा अशीही माझी मागणी नाही; परंतु आता बांधकाम बेकायदा असल्याचे सिद्ध झाले असल्याने देशमुख यांनी स्वत:हून बंगला पाडावा अन्यथा पालिकेने त्यावर कारवाई करावी. त्या जागी आरक्षणानुसार कामे व्हावीत,' असे तक्रारदार महेश चव्हाण यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारमंत्री अडचणीत

$
0
0

सहकारमंत्री अडचणीत

सुभाष देशमुख यांच्या बेकायदा बंगल्याबाबत महापालिकेकडून उच्च न्यायालयात अहवाल

अभ्यासात प्लॅनिंग महत्त्वाचे

$
0
0

फोटो : डॉ. भरत खराटे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अभ्यासाचे काटेकोर व योग्य नियोजन, प्रयत्नांची जोड, कष्टाची तयारी, अडचणीवर मात करण्याची जिद्द यातून तावून सुलाखून निघालेला विद्यार्थी यशाचे ध्येय गाठू शकतो, असे प्रतिपादन चाटे एज्युकेशन ग्रुपचे सहाय्यक संचालक डॉ. भरत खराटे यांनी केले. मटा एज्युफेस्टच्या उपक्रमातील 'दहावी व बारावीनंतरच्या संधी' या विषयावरील व्याख्यानात बोलताना त्यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला.

डॉ. खराटे म्हणाले, 'विद्यार्थ्यांचा यशाचा पल्ला गाठण्यासाठी खडतर वाटचाल करावी लागते. कारण हा पल्ला गाठताना निकोप स्पर्धा असते. हजारो विद्यार्थी यशाचा पल्ला गाठण्यासाठी कष्ट घेत असतात. त्यामुळे आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांना कष्टाशिवाय पर्याय नसतो. देशातील आयआयटी शिक्षण संस्थेत देशभरातील २५ हजार विद्यार्थी प्रवेश घेत असतात. सर्व विद्यार्थी गुणवत्तेच्यादृष्टीने तोडीचे असतात. तरीही पहिल्या वर्षी अनेक विद्यार्थ्यांना यश मिळते तर काही विद्यार्थ्यांना गुण कमी मिळतात. करिअरमधील ही निकोप स्पर्धा जिंकण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने अभ्यासाचे काटेकोर नियोजन करावे,' असा सल्ला डॉ. खराटे दिला.

ते पुढे म्हणाले, 'दहावी व बारावीनंतर कोणते क्षेत्र निवडायचे याचे भान विद्यार्थ्यांना असावे लागते. निवडलेल्या क्षेत्रात अत्युच्य यश मिळवण्यासाठी प्रत्येक वर्षी अभ्यास करावा लागतो. प्रत्येक वर्षी मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग शिक्षणानंतर मिळालेल्या संधीच्यावेळी जबाबदारी पार पडताना होतो.

उत्कृष्ट व अतुच्च शिक्षण देणाऱ्या संस्था आपला विद्यार्थी टॉपमध्ये आलाच पाहिजे, यासाठी नियोजन करत असतात. आठवी ते बारावी या कालावधीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे हे जाणवू लागते. बारावीनंतर त्यांचा कल पक्का होण्याकडे लागतो. त्यानुसार विद्यार्थी आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत असतात. त्यासाठी विद्यार्थ्यांनी दिवसभरातील अभ्यासाचे नियोजन करावे. अभ्यासाची शिस्त अंगी बाणवावी. वाईट व्यक्ती व वाईट सवयीपासून दूर रहा. चुकीच्या प्रलोभणे टाळा. प्रत्येक टप्प्यावर योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होते. विद्यार्थी स्वत: चिंतन मनन करू लागल्याने प्रत्येक टप्प्यातील अनुभवाचा फायदा मिळतो. झालेल्या चुका टाळून ध्येयापर्यंत कसे जायचे याचे भान येते. विद्यार्थ्याला स्पर्धा टाळता येत नाही. विद्यार्थ्यांनी निकोप स्पर्धची सवय लावून घ्यावी. स्पर्धेची सवय लागलेले विद्यार्थी कसून अभ्यास करुन यशाचे ध्येय गाठू शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलांवर इच्छा लादू नयेत

$
0
0

जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्पर्धा परीक्षा अतिशय कठीण व खडतर असतात. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:ला अभ्यासात झोकून द्यावे. दिल्ली, मुंबई, पुण्यानंतर कोल्हापुरातही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे सुरू झाल्याने त्याला फायदा विद्यार्थ्यांना होऊ लागला आहे. शहराबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत चमकू लागले आहेत हे एक चांगले लक्षण आहे, असे मत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी व्यक्त केले. करिअर करण्यासाठी पालकांनी पाल्यावर इच्छा लादू नयेत, असा सल्लाही दिला.

हॉटेल पॅव्हेलियन येथील मधुसूदन हॉलमध्ये शनिवारी सुरू झालेल्या मटा एज्युफेस्टच्या उद्घाटनप्रसंगी 'प्रशासकीय सेवेतील संधी' विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर शोभा बोंद्रे होत्या. चाटे एज्युकेशन ग्रुप एज्युफेस्टचे मुख्य प्रायोजक आहेत.

जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, 'दहावी व बारावी नंतर पालक व विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडतो. अशावेळी मटा एज्युफेस्ट हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या करिअरला वळण देण्यास उपयुक्त ठरू शकतो. मटा एज्युफेस्टचे अतिशय नेटके नियोजन केले असून दहावी व बारावीनंतर विद्यार्थ्यांना विविध शाखांची माहिती एका छताखाली उपलब्ध झाली आहे. दहावी व बारावीनंतर ठरावीक विद्यार्थी ध्येयानुसार वाटचाल करत असतात पण बहुतांशी विद्यार्थी व पालकांची द्विधा मन:स्थिती असते, याकडे जिल्हाधिकारी सुभेदार यांनी लक्ष वेधले. आपल्याला यश मिळेल का याची चिंता विद्यार्थ्यांना सतावत असते. तर आपल्या मुलांने इजिंनीअर, डॉक्टर बनावे अशी पालकांची अपेक्षा असते. पालक आपल्या इच्छा मुलांवर लादत असतात. पालकांनी पाल्याच्या मनाचा कल, त्याची कोणत्या विषयात गती आहे याचे निरीक्षण केले पाहिजे. निसर्गाने प्रत्येक व्यक्तीला उपजत कला दिल्या असतात. पालकांनी आपल्या मुलांतील कला जोपासण्यासाठी मार्गदर्शक राहिले पाहिजे. आवडीच्या क्षेत्रात विद्यार्थी स्वत:ला झोकून देतात. त्यामुळे ते यशाची पायरी सहज गाठतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

दहावी व बारावीनंतर विद्यार्थ्यांची गळती मोठ्या प्रमाणात होते याकडे जिल्हाधिकारी सुभेदार यांनी लक्ष वेधले. ६० टक्के विद्यार्थी दहावीनंतर शिक्षण सोडून देतात. बारावीनंतर गळतीचे प्रमाण २० टक्क्यांनी वाढते. फक्त २० टक्के विद्यार्थीच पदवी शिक्षण पूर्ण करतात. वीस टक्के विद्यार्थ्यांच्या भवितव्याची काळजी जरी आपण करत असलो तरी शिक्षण सोडलेल्या ८० टक्के विद्यार्थ्यांना किमान कौशल्य शिक्षणांकडे वळवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

प्रशासकीय सेवेतील संधीवर बोलताना जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, 'स्पर्धा परीक्षा हा अतिशय कठीण व खडतर असतात. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाला वाहून घ्यावे लागते. केंद्रीय लोकसेवा व राज्य सेवा परीक्षाचा अभ्यास बारावीपासून सुरू करण्याचा सल्ला त्यांनी दिला. बारावीनंतर ज्या शाखेत प्रवेश घेणार असतो त्या विषयांचा मुख्य परीक्षेत समावेश असतो. रोज १२ ते १४ तास अभ्यासाची तयारी ठेवली पाहिजे. पूर्वीच्या काळी अशा परीक्षांची माहिती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळत नव्हती. आता दिल्ली, मुंबई, पुण्यानंतर कोल्हापुरातही स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणाऱ्या संस्था सुरू झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील मुले यूपीएससी व एमपीएससी परीक्षेत चमकत आहेत.

अभियांत्रिकी, वैद्यकीय, प्रशासकीय सेवा याबरोबर सध्या खेळांतही करिअर संधी आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. कोल्हापुरातील नेमबाजपटू तेजस्विनी सावंत, राही सरनोबत ही उत्तम उदाहरणे आहेत. आयपीएल क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, प्रो कबड्डीमध्ये खेळाडूंच्यावर ५० लाखांपासून १० कोटींपर्यंत बोली लागत आहेत. तीन महिन्यांत खेळाडू लखपती, करोडपती होत आहे. ज्या प्रमाणे अभ्यास करताना नियोजन करावे लागते त्यामुळे खेळातील करिअर करण्यासाठी खेळाडूंना कष्ट, नियोजन यांची सांगड घालून जिद्दीने प्रवास करावा लागतो,' असे मत व्यक्त केले.

००००

मटाचे कौतुक

महाराष्ट्र व देशहिताचे विचार करणारे दैनिक महाराष्ट्र टाइम्स शालेय जीवनापासून वाचत आहे. निरपेक्ष, सडेतोड भूमिका असलेल्या मटाने महाराष्ट्राला तीन पिढ्यामध्ये बौद्धिक ज्ञानाची भर घातली आहे. सामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठेऊन लेखन करणाऱ्या मटाने विद्यार्थी व करिअरकडे लक्ष केंद्रित केले आहे, असे मत जिल्हाधिकारी सुभेदार यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संचालक मंडळ बरखास्त करावे

$
0
0

कोल्हापूर

गडहिंग्लज साखर कारखाना संचालक मंडळ बरखास्त करावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन साखर सहसंचालक सचिन रावळ यांना शिवसेनेतर्फे देण्यात आले. कारखाना कामगारांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे कामगार आयुक्तांनी पुढाकार घेत कामगारांचे प्रश्न सोडवावेत, त्रिसदस्यीय समितीचे ऑडीट नेमून कारखान्याचे दहा वर्षाचे लेखापरीक्षण करावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी विजय देवणे, प्रा. सुनील शिंत्रे, प्रभाकर खांडेकर, दिलीप माने आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा एज्युफेस्ट प्रतिक्रिया

$
0
0

महाराष्ट्र टाइम्सने मटा एज्युफेस्टद्वारे विद्यार्थी व पालकांना उपयुक्त दालन उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी जी आवश्यक माहिती आहे ती या उपक्रमातून मिळत आहे. शैक्षणिक क्षेत्रासाठी हा स्तुत्य उपक्रम असून समाजाच्या विकासात अशा उपक्रमांची गरज आहे. या उपक्रमातील योग्य करिअर निवडून विद्यार्थी कसून अभ्यास करतील आणि शहर व देशाच्या विकासात योगदान देतील.

महापौर शोभा बोंद्रे

०००००००

महाराष्ट्र टाइम्सने एज्युफेस्टचे अतिशय सुरेख नियोजन केले आहे. पालक व विद्यार्थ्यांनी स्टॉलला भेटी दिल्या असून चांगला प्रतिसाद लाभला आहे. विद्यार्थी व पालक करिअरच्या बाबतीत किती सजग आहेत, हे दिसून येत आहे.

सलील राजगुरू, पार्थ सीडस्

००००

मटाच्या एज्युफेस्टमध्ये आम्ही प्रथमच सहभागी होत आहोत. नेटके नियोजन, आकर्षक स्टॉलची मांडणी व मान्यवरांच्या व्याख्यानांचे आयोजन केले आहे. विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने एज्युफेस्टला भेट देत असून आमच्या संस्थेचा हुरुप वाढला आहे.

अर्चना सावंत, दि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया

००००

मटा एज्युफेस्टमध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद लाभत आहे. स्टॉलची योग्य मांडणी केली असून मान्यवरांच्या व्याख्यानांचे आयोजन केले आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांची गर्दी वाढू लागली आहे. पुढील दोन दिवसांत आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल.

डॉ. श्रीनिवास पाटील, डीकेटीई सोसायटीज टेक्सस्टाइल अँड इंजिनीअरिंग इन्स्टिट्युट, इचलकरंजी

००००

मटा एज्युफेस्टला भेट दिल्याने समाधान वाटले. प्रत्येक स्टॉलला भेट दिल्याने आमच्या मनातील अनेक शंका दूर झाल्या. शैक्षणिक संस्थाकडून योग्य व चांगली माहिती मिळत असून पाल्याचे करिअर निवडण्यासाठी मदत होणार आहे.

प्रसाद गरगट्टे, राजारामपुरी

००००

मटा एज्युफेस्ट उपक्रमात विद्यार्थ्यांना चांगली माहिती मिळत आहे. बारावीनंतर अनेक शाखामध्ये संधी आहे हे एज्युफेस्टला भेट दिल्यानंतर लक्षात आले. विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी एज्युफेस्ट अतिशय उपयुक्त आहे.

श्रद्धा कांबळे, पुईखडी

००००

इंजिनीअरिंगमधील अनेक शाखांची माहिती मटा एज्युफेस्टमध्ये मिळाली. मुलांपुढे शिक्षणाचे क्षेत्र किती विस्तारत आहे आणि कोल्हापूर शहर व आसपासच्या गावात शिक्षण संस्था आहेत यांची माहिती दिली.

मनाली मिठारी, रुईकर कॉलनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांना पिटाळले ...

$
0
0

फोटो

..........

सर्व्हेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पिटाळले

कोथळीत संतप्त ग्रामस्थांचा घेराव, अमृत योजनेला कृष्णाकाठच्या गावांचा विरोध

म.टा.वृत्तसेवा,जयसिंगपूर

इचलकरंजी शहराच्या अमृत योजना उपसा केंद्राच्या सर्व्हेक्षणासाठी आलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना कोथळी (ता.शिरोळ) येथे संतप्त ग्रामस्थांनी घेराव घातला. कृष्णा नदीकाठी प्रश्‍नांचा भडीमार करीत धारेवर धरले. आम्ही पाणी देणार नाही, तुम्ही परत जा. पुन्हा इकडे सर्व्हेक्षणासाठी याल तर परिणाम वाईट होतील, असा इशारा देत अधिकाऱ्यांना पिटाळून लावण्यात आले.

इचलकरंजी शहराला वारणा नदीतून पाणी पुरवठा करण्यात यावा, यासाठी दानोळीऐवजी कोथळी हद्दीतील वारणा-कृष्णा नदी संगमाजवळ उपसा केंद्र निश्‍चित करण्यात आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १५ दिवसात त्याचा अहवाल तयार करावा असा निर्णय गुरूवारी मुंबई येथील बैठकीत झाला आहे. इचलकरंजी शहराची अमृत योजना कार्यान्वित झाल्यास मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होईल व कोथळीसह शिरोळ तालुक्यातील गावांना सांगली शहराचे कृष्णा नदीतून येणारे सांडपाणी प्यावे लागेल. शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होईल, या शक्यतेमुळे शिरोळ तालुक्यात कृष्णाकाठच्या गावात अस्वस्थता पसरली आहे. यामुळे इचलकरंजीच्या अमृत योजनेला विरोधासाठी गुरूवारच्या बैठकीनंतर हालचाली सुरू आहेत.

दरम्यान, शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कोथळी येथे कृष्णा-वारणा संगमाजवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता टी.बी.चौगुले, ए.एस.मुल्ला, उपअभियंता एस.एस.कयलापन, सुकुमार लंबे आदींसह सात अधिकारी आले होते. ही माहिती कोथळी येथे समजताच ग्रामपंचायतीचा धोक्याचा इशारा देणारा भोंगा वाजविण्यात आला. यानंतर काही क्षणातच सत्यवादी चौकात ग्रामस्थांनी गर्दी केली. अमृत योजनेच्या सर्व्हेक्षणासाठी पाहणीसाठी अधिकारी आल्याचे समजताच ग्रामस्थांनी नदीकाठी धाव घेतली. संतप्त ग्रामस्थांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून प्रश्‍नांचा भडीमार केला. अमृत योजनेला आमचा विरोध आहे. आम्ही येथून पाणी नेऊ देणार नाही. तुम्ही इथे परत येण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा परिणाम वाईट होतील, असा इशारा दिला. यामुळे गोंधळ निर्माण झाला व वातावरण तणावपूर्ण बनले. अधिकाऱ्यांचीही भंबेरी उडाली. गावातील काही प्रमुखांनी पुढाकार घेऊन जमावाला शांत केले. जमावाचा उद्रेक होण्यापूर्वी निघून जा असे सांगत अधिकाऱ्यांना पिटाळून लावण्यात आले. अधिकाऱ्यांनीही आम्ही पाहणी न करता परत जात असल्याचे सांगून तसा अहवाल वरिष्ठांना पाठवित असल्याचे सांगितले.

यावेळी राजगोंडा पाटील, संजय नांदणे, श्रीकांत पाटील, बाहुबली इसराण्णा, वृषभ पाटील, शितल धडेल आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट -

आज कोथळीत बैठक

इचलकरंजी येथील अमृत योजनेच्या विरोधासाठी ग्रामस्थ एकवटले असून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवार (ता. ३) कोथळी गाव बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच सकाळी नऊ वाजता आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थांची बैठक बोलविण्यात आली आहे.

फोटो ओळ-

कोथळी येथे कृष्णा-वारणा संगमाजवळ संतप्त ग्रामस्थांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live

Latest Images